Quantcast
Are you the publisher? Claim or contact us about this channel


Embed this content in your HTML

Search

Report adult content:

click to rate:

Account: (login)

More Channels


Showcase


Channel Catalog


Articles on this Page

(showing articles 1 to 20 of 42605)
(showing articles 1 to 20 of 42605)


Channel Description:

News from India by India number one website

(Page 1) | 2 | 3 | .... | 2131 | newer

  0 0

  दुसऱ्याच्या लग्नात विघ्न आणणारे आणि स्वतःच्या लग्नासाठी आग्रही असलेल्या एका प्रेमळ भुताची कथा रसिकांसमोर येत्या शुक्रवारी येणार आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून फुललेली ही धमाल कथा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल असे प्रतिपादन पटकथा-संवाद लेखक लक्ष्मीकांत विसपुते यांनी केले.

  0 0

  नोटीस बजावूनही ठप्प असलेले रेल्वेस्टेशन ते क्रांतीचौक या डॉ. पुरूषोत्तम भापकर रस्त्याचे काम आज मंगळवारी नव्या दमाने सुरू झाले. पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी या रस्त्याची व कामाची पाहणी केली. 'काम वेगाने सुरू करा आणि संपवा', अशी सूचना त्यांनी संबंधित ठेकेदाराला केली.

  0 0

  इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दल 'अॅन इंजि‌निअर मेक्स दी वर्ल्ड' असे म्हटले जाते. या क्षेत्रात आता मुलींचा टक्का वाढला आहे. काही वर्षापूर्वी मेकॅनिकल, सिव्हील, प्रोडक्शन अशा शाखा 'जड' म्हणून ओळखल्या जात होत्या. गेल्या काही वर्षात ट्रेंड बदलला आहे.

  0 0

  पावसाळा सुरू झालेला असताना पालिकेतर्फे केली जाणारी नाले सफाई मात्र, अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. एक महिन्यात नालेसफाईचे फक्त तीस टक्केच काम झाले आहे. आता पावसाने दमदारपणे हजेरी लावल्यास पाऊसच नाले स्वच्छ करील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  0 0

  तीनवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आल्याची माहिती करमाड पोलिसांनी दिली. उद्धव उर्फ बंटी काकडे (वय ३२, रा. वडखा) असे या नराधामाचे नाव असून तो पीडित बालिकेच्या शेजारी राहतो.

  0 0

  'इंजिनिअरिंग' प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला ७ जूनपासून सुरूवात होत आहे. प्रवेश अर्ज करण्याची मुदत ७ ते १३ जूनपर्यंत देण्यात आली आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या प्रवेश स्विकृती केंद्रावर (एआरसी सेंटर) अधिकच्या चकारा कमी करण्यात आल्या आहेत.

  0 0

  राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या (एनआरएचएम) कामांचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे शनिवारी औरंगाबादेत येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली असून सर्व ठिकाणी रेडअलर्ट जारी केला आहे.

  0 0

  सलग दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात पूर्वमोसमी सरींनी हजेरी लावली. औरंगाबादसह जालना, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत दहा मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत २.१३ टक्के पाऊस पडला आहे.

  0 0

  वाळू तस्कराच्या मुनिमाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव शिंदे यांना मंगळवारी रंगेहाथ पकडले. लाचलूचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने ही कारवाई केली.

  0 0

  मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी (चार जून) निचांकी पातळीपर्यंत पोचला. सध्या प्रकल्पात ६२३.६६ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. प्रकल्पाच्या इतिहातास प्रथमच नाथसागरातील पाणीसाठी एवढा खाली गेला आहे.

  0 0

  वाढत्या शहरीकरणामुळे लगतच्या खेड्यांची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. खेड्यांनाही उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) राबविण्यास मंजुरी दिली आहे.

  0 0

  यंदाच्या दुष्काळात सरकारने गेल्या काही महिन्यात सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. टंचाई निवारणासाठी आणखी तीन ते चार हजार रुपये खर्च केले जातील.

  0 0

  पालिकेचे निवृत्त शहर अभियंता एम.डी.सोनवणे यांची मंगळवारी सायंकाळी अचानक पालिकेत एन्ट्री झाली आणि त्यांच्या दालनाच्या परिसरात धावपळ सुरू झाली. बंद केलेले लाईट लावले गेले. सेवक अलर्ट झाले.साहेब आले, साहेब आले असे बोलले जाऊ लागले आणि चर्चेला उधाण आले.

  0 0

  राज्यात अनेक महामंडळांची स्थापना करण्यात आली असून शासनाने सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येप्रमाणे महामंडळांना निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

  0 0

  नायगाव खंडेवाडीच्या सरपंचाच्या पतीच्या खून प्रकरणात गावातील दोन आरोपींना आणि आणखी एका मारेकऱ्याला सातारा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. यामध्ये मुख्य सुत्रधार ग्रामपंचायत सदस्यासह एका सदस्याच्या मुलाचा समावेश आहे. मात्र या खुनामागचे कारण शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

  0 0

  सरकारने राज्यात शंभर कोटी झाडांची लागवड करण्याची मोठी मोहीम जाहीर केली. या मोहिमेत यंदा मराठवाड्यात तीन कोटी ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी आतापर्यंत निम्मेच खड्डे तयार असल्याची माहिती समोर आली आहे.

  0 0

  काँग्रेसचे युवराज राहुल गांधी मराठवाड्यातील दुष्काळ पाहण्यासाठी २८ मे रोजी फुलंब्री तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये, म्हणून सरकारी यंत्रणेने रातोरात खड्डेमुक्त केलेला रस्ता पहिल्याच पावसात चिखलयुक्त झाला आहे.

  0 0

  गव्हाचे भाव वाढलेले असतानाच तांदळानेही चांगला भाव खाण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यापासून तांदूळाचे दर चढते असून अवघ्या महिन्याभरात प्रतिक्विंटलचा भाव ४०० ते ५०० रुपयांनी वाढला आहे.

  0 0

  वाळूज एमआयडीसी भागातून येणारे आणि शहरातून वाळूज किंवा दौलताबादकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वाळूज रस्‍त्यावरचा नगरनाका हा वाहतूक कोंडीचा नवीन चौक बनला आहे.

  0 0

  पाणचक्की या ऐतिहासीक वास्तुच्या नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. केंद्र शासनाने पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत तीन कोटी रुपये पानचक्कीच्या विकासासाठी खर्च करणार आहे. यातील पंधरा लाखांचा निधी एमटीडीसीला मिळाला आहे.

(Page 1) | 2 | 3 | .... | 2131 | newer