Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

यंदाही मिळणार बांधावरच खत

$
0
0
खरीप हंगामासाठी तालुका कृषी विभागाकडे रासायनिक खतांचा संरक्षित (बफर) साठा उपलब्ध आहे. युरिया, डीएपी आदी खते मुबलक असून 'बांधावर खत' योजनेअंतर्गत शेतक-यांना खत वाटप केले जाणार आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे शेतक-यांना शेतातच खत मिळणार आहे.

पॉलिटेक्निकला नापास? नो टेन्शन

$
0
0
तुम्ही औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी असाल आणि नापास झाला असाल तरी आता चिंता करण्याचे कारण नाही. तुम्हाला परीक्षेनंतर एक महिन्यात पुन्हा ही परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी विशेष वर्ग घेतले जातील व त्यांनतर ही परीक्षा होईल.

गणवेश, पुस्तके जुलैमध्ये मिळणार

$
0
0
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना यंदाही गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी जुलै महिना उजाडेल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. एक लाख ६७ हजार पाठ्यपुस्तके येणेही बाकी आहे, असे ते म्हणाले.

जीटीएलला दोन हजाराचा दंड

$
0
0
वारंवार पाठपुरावा करूनही बील न देता पुरवठा खंडित करून वीज ग्राहकाचा छळ केल्याबद्दल वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाने जीटीएलला दोन हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. बीलात आकारलेले ६१६ रुपयांचे व्याज व ३४ रुपये डीपीसी चार्जेस परत करण्याचे निर्देश मंचाने दिले आहेत.

पालिकेच्या कामांचा बुरखा फाटला

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोल विभागाने पालिका आयुक्तांच्या नावे पालिकेच्या कारभाराचा बुरखा फाडणारेच पत्र पाठवले आहे. रस्त्यांच्या कामातील अनियमितता त्यामध्ये निःसंदिग्धपणे स्पष्ट केली आहे.

डोनेशन घ्याल, तर कारवाईला सामोरे जा

$
0
0
बीड शहरातील खासगी इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांची जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी बैठक घेतली आणि प्रवेशासाठी पालकांकडून फीव्यतिरिक्त डोनेशन घेऊ नका. तक्रारी आल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा दिला.

महसूल विभागाची माहिती फक्त एकाच वेबसाइटवर

$
0
0
महसूल विभागाचे नाव घेतल्यानंतर, फायलींचे ढिगारे डोळ्यासमोर येतात. मात्र, लातूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विकास नाईक यांनी पुढाकार घेऊन एक वेबसाइट तयार केली आहे आणि महसूल विभागाची इत्यंभूत माहिती या वेबसाइटवर आणली आहे.

करंट्या प्रशासनामुळे पाणीपाणी

$
0
0
वसाहत वाढल्यामुळे साहजिकच मुलभूत गरजाही वाढल्या आहेत. मागणी करूनही प्रशासनाकडून जलवाहिनी बदलणे, नवीन व्यवस्था करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रामनगर वॉर्डातील नागरिकांना पाणीपाणी करावे लागत आहे.

शाळांच्या आवारात बहरणार झाडे

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत जागरुक करण्यासाठी गरवारे कम्युनिटी सेंटरने दोन झाड शाळेसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शहरातील ५० शाळांमध्ये प्रत्येकी दोन झाडे लावून संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवण्यात येणार आहे.

रेल्वेतून उतरताना अपंग युवकाचा मृत्यू

$
0
0
हिमायतनगर रेल्वे स्थानकावर उतरणाताना चाकाखाली आल्याने एका अपंग युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडली. शिवानंद भीमराव शिनकरे (वय ३०, रा. करंजी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असेय या युवकाचे नाव आहे.

अपंगाचा मुंबई फेरा झाला कमी

$
0
0
वाहन चालविण्याचा प्रमाणपत्र एखादया अपंग व्यक्तीला घ्यायचा असेल तर त्याला मुंबई येथील रिहॅबिलिटेशन सेंटरला जावे लागत होते. मात्र, आता परिवहन आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या एक आदेशानुसार लायसन्ससाठी जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकिय मंडळाचे किंवा वैद्यकिय महाविद्यालयातील वैद्यकिय महामंडळाकडून मिळालेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

चिकलठाणा रस्ता झाला अडचणीचा

$
0
0
काही वर्षांपर्यंत औरंगाबाद ते जालना या मार्गावरून जाण्यासाठी चिकलठाण्याच्या छोट्याश्या रस्‍त्यावरून जावे लागत होते, मात्र तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी या भागात भूसंपादनाची प्रक्रिया राबविली.

स्वच्छतेवर देखरेखीसाठी ६ वरिष्ठ अधिकारी नेमा

$
0
0
'शहरातील स्वच्छतेच्या कामावर देखरेख करण्यासाठी सहा वरिष्ठ अधिकारी नेमा. जे मजूर गैरहजर राहतील त्यांच्यावर कारवाई करा', असे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी पालिका आयुक्तांना दिले.

घाऊक औषध विक्रेत्यांवर कारवाईचा 'FDA'चा इशारा

$
0
0
औषध विक्रेता संघटनेने औषधी खरेदी बंद करण्याबाबत दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यातील सुमारे १२० घाऊक विक्रेत्यांना पत्र पाठवत खरेदी पुर्ववत सुरु ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शेतमालासाठी खासगी गोडाऊन

$
0
0
प्रचंड मेहनतीनंतर शेतातील उत्पादन बाजारात येते आणि भाव अक्षरश: गडगडतात, हा अनुभव वारंवार येतो. त्यामुळे शेतामध्ये काबाडकष्ट करणारा शेतकरी कोलमडून जातो. शेतकऱ्यांची ही ससेहोलपट थांबविण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

महा-इ-सेवा केंद्राकडे सेतूमधील गर्दी वळवणार

$
0
0
सेतू सुविधा केंद्रात विविध प्रमामपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थी, पालकांची गर्दी होत आहे. त्यामुळे महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रमाणपत्रांचे वितरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवार सुविधा केंद्राला भेट देऊन विद्यार्थी, पालकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

रोस्टरची झेरॉक्सहीन परवडणारी

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तब्बल सात वर्षांनंतर बिंदूनामावली (रोस्टर) तयार केली. पदोन्नती, पदस्थापना, समायोजन, वेतनवाढ, आंतरजिल्हा बदल्या देण्यासाठी आवश्यक असलेले रोस्टर हे सर्वांत महत्त्वाचे आहे.

नारेगावातील अतिक्रमणे ४८ तासांत पाडा

$
0
0
नारेगाव येथील पालिकेच्या मालकीच्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे येत्या ४८ तासांत पाडून टाका. याशिवाय त्या भागात जे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, त्यावरही कारवाई करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

सौरउर्जेचे दिवेच अंधारात दिव्याखाली अंधार

$
0
0
एकेकाळी संपूर्ण शहराच्या कौतुकाचा विषय ठरलेले व वैधानिक विकास मंडळाच्या पथदर्शी प्रकल्पातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बसविण्यात आलेले सोलार पथदिवे आता बंद पडले आहेत.

पालिकेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न

$
0
0
शहरातील अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे प्रशासन पाठिशी घालीत आहे, असा आरोप करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बुधवारी महापालिकेला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, टाळे ठोकण्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलकांना अटक केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images