Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नवरात्रोत्सवासाठी तुळजापूर सज्ज

$
0
0
कुलस्वामिनी तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असून या महोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. के. एम. नागरगोजे यांनी दिली.

आरक्षण हक्क समितीतर्फे आज राज्यभर रास्तारोको

$
0
0
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जात पडताळणी बंधनकारक करणारे परिपत्रक रद्द करा अशा मागणीसाठी महाराष्ट्र मागासवर्गीय आरक्षण हक्क समितीतर्फे सोमवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

LBT अंमलबजावणी : पालिकेची मोर्चेबांधणी

$
0
0
नांदेड शहरात आगामी काळात एलबीटीची अंमलबजावणी प्रभावीपणे करता यावी यासाठी स्थानिक संस्था कर विभागातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू ‌केली आहे.

आमदार रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

$
0
0
मराठवाड्याचे हक्काचे पाणी मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले, अशी भावना आमदारांनी व्यक्त केली. आमदार प्रशांत बंब यांनी जायकवाडीच्या हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातील आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, लोकप्रतिनिधींची बैठक बोलाविली होती.

पेट्रोलियम डिलर्स आंदोलनाच्या पवित्र्यात

$
0
0
नवीन पेट्रोल पंपासाठी परवानगी देऊ नये, वितरकांचे मार्जिन हे टक्केवारीवर करण्यात यावे, लॉकिंग सिस्टीम मजबुत व अद्ययावत करावी अशा मागणीसाठी पेट्रोलियम डिलर्स आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

मोक्का अंतर्गत कारवाई करा

$
0
0
वाळू तस्करी, संघटीत गुन्हेगारी व अपहरणासारखे गंभीर गुन्हे करून तीन जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या भाजयुमोचे माजी सरचिटणीस शेख युनुस शेख चांद याच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करा, अशी मागणी त्याचा सख्खा भाऊ शेख अहमद शेख चांद यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.

राजकारणाला ठेकेदारांचे ग्रहण

$
0
0
महाराष्ट्रातील राजकारणाला बिल्डर्स व ठेकेदारांचे ग्रहण लागले आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळींसोबतच विरोधी पक्षातील नेतेमंडळींचादेखील समावेश आहे.

कॅन्सर तज्ज्ञ केंद्रापासून दूर

$
0
0
गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या मराठवाडा विभागीय विशेषोपचार केंद्रात तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून टाळाटाळ केली जात आहे.

चेक वटला नाही, महिलेस कैद

$
0
0
दहा लाख रुपयांचा चेक न वटल्याप्रकरणी वैजापूर न्यायालयाने पुणे येथील महिलेस एक महिन्यांची साधी कैद व तक्रारदारास दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे.

रस्त्यांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष

$
0
0
मराठवाड्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. राज्य सरकारचे विभागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. विभागासाठी निधीही कमी दिला जातो, असा आरोप गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी रविवारी येथे केला.

पाणी आणा, अन्यथा मंत्रिपद सोडा

$
0
0
जायकवाडी प्रकल्पात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातून पाणी आणण्यात मराठवाड्यातील मंत्र्यांचा दबाव कमी पडला आहे. विभागातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडावे, अन्यथा त्यांचे राजीनामे मागण्यात येतील, अशा इशारा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी रविवारी येथे दिला.

दहावी, बारावीची परीक्षा उद्यापासून

$
0
0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारी दहावी, बारावी परीक्षा बुधवारी २५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

पालिका, घाटीवर अंधाराचे संकट

$
0
0
जीटीएलने महापालिका व घाटी हॉस्पिटलकडील थकबाकी वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. २८ सप्टेंबरपर्यंत थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात वर्षात १५० पेट्रोल पंप

$
0
0
‘एस्सार’ आणि ‘रिलायन्स’नंतर आता आगामी काळात ‘शेल’सारख्या कंपन्यांनी राज्याच्या पेट्रोलियम क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेल्या कंपन्यांनी आगामी वर्षभरात मराठवाडयात १५० पेट्रोल पंप देण्याचा निर्णय घेतला.

शेंगदाणा, सोयाबीन तेल झाले स्वस्त

$
0
0
सातत्याने होणारी इंधन दरवाढ व महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला खाद्यतेलाने काहीसा दिलासा दिला आहे. यात शेंगदाणा तेल प्रतिलिटर १० रुपयांनी, तर सोयाबीन तेल ५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

रस्त्यांसाठी ११८ कोटींची ‘वाट’

$
0
0
महापालिकेने शहरातील रस्त्यांसाठी गेल्या आठ वर्षांत तब्बल ११८ कोटींची उधळपट्टी केली आहे. एवढे पैसे खर्च करूनही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

‘गोरोबा काका मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा’

$
0
0
तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संत गोरोबा काका मंदिरास ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात यावा शिवाय येथील विकासकामी कृती आराखड्यानुसार ११ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करावेत अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा परिषदेने एका प्रस्तावाद्वारे सरकारकडे केली आहे.

१० वी, १२ वी परीक्षा कॉपीमुक्त करणार

$
0
0
दहावी व बारावीच्या परीक्षांना येत्या २५ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. यावेळी सुद्धा संपूर्ण कॉपिमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यात येत आहेत.

एकनाथ कारखाना चालणार

$
0
0
संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पुढच्या वर्षी सुरू न झाल्यास आपले राजकीय भविष्य संपुष्टात येणार या चिंतेने ग्रासलेल्या माजी आमदार संदिपान भुमरे यांना अखेर केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत घ्यावी लागली.

उस्मानाबादेतील रस्त्यांची लागली वाट

$
0
0
उस्मानाबाद शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून हे रस्ते तातडीने दुरुस्त करावे याकडे लोकप्रतिनिधींबरोबरच नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images