Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यापीठ उद्योग परिषद मंगळवारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २० व २१ डिसेंबर रोजी दुसऱ्या ‘विद्यापीठ उद्योग संवाद’ परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील २० कंपन्या, संस्थासोबत सामंजस्य करार होणार असून पाच उद्योगपतींना ‘कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक तथा संयोजक डॉ. वाल्मिक सरवदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेचे उदघाटन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. नाटयगृहात होणाऱ्या कार्यक्रमात कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी (संचालक, एक्सपर्ट सोलूशन्स) यांच्यासह उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. परिषदेत राम भोगले (अध्यक्ष, अप्लाइड इनोव्हेशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी), अनुराग जैन (व्यवस्थापकीय संचालक , एन्डूरन्स टेक्नॉलॉजी), ऋषी बागला (अध्यक्ष, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स्), श्रीकांत बडवे (व्यवस्थापकीय संचालक बडवे ग्रुप) व क्लॉज एन्ड्रेस (अध्यक्ष, एन्ड्रेस-हौजर, स्विर्झलँड) यांना ‘कॉर्पोरेट एक्लन्स अ‍ॅवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिल्लेखान्यातून २५ जनावरांची सुटका

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिल्लेखाना, चिकलठाणा येथून शहर पोलिस व महापालिकेने शनिवारी कत्तलीसाठी आलेल्या २५ जनावरांची सुटका केली. तसेच ३४ जनावरांचे मास, कातडी जप्त केली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरामध्ये विविध ठिकाणी जनावरांची बेकायदा कत्तल करण्यात येत असल्याने पोलिस आणि महापालिका प्रशासनातर्फे पहाटे चार वाजेपासून आठ वाजेपर्यंत सिल्लेखाना व चिकलठाणा भागातील कुरेशी मोहल्ला येथे धडक कारवाई केली. सिल्लेखाना भागात पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा मारण्यात आला. त्यावेळी मुश्ताक अजिज करैशी याच्या चामड्याच्या गोदामातून १८ गोवंश जनावरांची चामडी जप्त करण्यात आली. तर इब्राम फत्ते मोहम्मद कुरैशी याच्या गोदामातून सातशे किलो गोवंश मांस जप्त केले. त्याचप्रमाणे वहाब अब्दुल हसन कुरैशी याच्या गोदामातून १६ जनावरांची कातडी जप्त केली, तर वशिम अजिज कुरैशी याच्या गोदामातून ६ जनावरांची चामडी जप्त करण्यात आली. या प्रकरणी अवैध कत्तल विरोधी पथकाचे प्रमुख अनंत जाधव यांच्या तक्रारीवरून क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त वसंत परदेशी, संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

चिकलठाण्यातही कारवाई
चिकलठाणा येथील कुरैशी मोहल्ल्यात दोन ठिकाणी छापे मारण्यात आले. एका कारवाईत ५० हजार रुपये किमतीची ६ जनावरे आणि दुसऱ्या कारवाईतील दीड लाख रुपये किमतीचे १९ असे मिळून एकूण २ लाख रुपये किमतीचे २५ जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेले सापडले. पोलिसांनी या जनावरांची सुटका केली. त्यानंतर जफर कुरैशी (रा. पुष्पक गार्डन, चिकलठाणा) आणि जफर सत्तार कुरैशी व हरुण गफ्फार कुरैशी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी घनघोर लढाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘शहर यंदा घनकचरा व्यवस्थापन व वैयक्तिक स्वच्छतागृहाचे उद्दिष्ट पूर्ण करून देशात पहिल्या दहा शहरांमध्ये आणण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. दोन हजार गुणांच्या परीक्षेत पालिका उतरणार असून स्वच्छता पाहणीसाठी चार जानेवारीपासून तीन दिवस केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. आपल्या शहराला देशात अव्वल मान प्राप्त करून देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले.
बकोरिया म्हणाले, ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत औरंगाबादचा ५६ वा क्रमांक होता. देशभरातील शहरांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण करण्यासाठी केंद्रीय नगरविकास विभागाने स्वच्छ भारत सर्वेक्षणाची सुरुवात केली आहे. यंदा ५०० शहरांमध्ये स्पर्धा होणार आहे. दोन हजार गुणांची ही स्पर्धा असेल. यापैकी लोकसहभागासाठी ६००, प्रत्यक्ष पाहणीनंतर दिसणाऱ्या वास्तवासाठी ५०० गुण दिले जाणार आहेत. रस्ते झाडणे, घरोघरी जाउन घनकचरा संकलन करणे, वाहतूक व्यवस्था, ओला व सुका कचऱ्याचे वेगवेगळे संकलन, घनकचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतागृह, शहर पाणंदमुक्त करण्यासाठी तयार करण्यात आलेली कार्यप्रणाली आणि लोकजागृती या बाबींसाठी ९०० गुणांची ही स्पर्धा असेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ते म्हणाले, ‘कचरा गोळा करणाऱ्या वाहनांबरोबर जाऊन ७०० हून अधिक वेचक महिला घरोघरी जाऊन साडेतीन टन कचरा गोळा करत आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत सर्वच ११५ वॉर्डात घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जाईल. सध्या ५० वॉर्ड कचराकुंडीमुक्त झाले आहेत. पथक आल्यानंतर त्यांना हे दाखविले जाईल. मार्चपर्यंत सात हजार व्यक्तिगत स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. १४ ठिकाणी सार्वजनीक स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत, यापैकी सहा स्वच्छतागृहे महिलांसाठी राहणार आहेत. स्वच्छताविषयक अॅप डाऊनलोड करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.’

शहरातील टॉप टेन वॉर्ड
स्वच्छतेबाबत पालिकेने प्रत्येक वॉर्डाचे सर्वेक्षण करून त्याचे रँकिंग केले आहे. त्यानुसार टॉप टेन वॉर्ड आयुक्तांनी जाहीर केले. ते पुढील प्रमाणे - १) यादवनगर २) श्रीकृष्णनगर ३) पवननगर ४) विष्णूनगर ५) मयूरनगर ६) भावसिंगपुरा, भीमनगर (दक्षिण) ७) रामनगर ८) जयभवानीनगर ९) रोजाबाग १०) विठ्ठलनगर

आयुक्त म्हणाले...
- ७०० हून अधिक कचरा वेचक
- ३.५ टन रोज गोळा होणारा कचरा
- ३१ डिसेंबरपर्यंत घराघरातून गोळा करू
- ५० वॉर्ड सध्या कचरामुक्त
- ७ हजार व्यक्तिगत स्वच्छतागृहांचे उद्दिष्ट
- १४ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणार
- ६ स्वच्छतागृहे महिलांसाठी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा अग्निकल्लोळ; तीन दुकाने भस्मसात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रोशन गेट परिसरातील मदनी चौकात लागलेल्या भीषण आगीत शनिवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास फर्निचरची तीन दुकाने भस्मसात झाली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
सलमान, सपना फर्निचरसह तसेच शेजारी असलेल्या एका गोदामास सायंकाळी आग लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण दुकानात असलेल्या लाकडी फर्निचरमुळे अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत दुकानातील साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मंजूर विकास आराखड्यानुसार रस्ते बाधित क्षेत्राचा मोबदला घेतलेला असतानाही पुन्हा मोबदला मिळविण्यासाठी महापालिकेला प्रस्ताव सादर करणाऱ्या अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद विरुद्ध तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी दिली.
चेलीपुरा येथील नगरभूमापन क्रमांक १०३१० मधील १५ मीटर रूंद रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आले होते. भूसंपादनाचा मोबदला देखील १९९७ मध्ये देण्यात आला होता. असे असतानाही खतीजा बेगम अब्दुल साजेद व इतरांतर्फे जीपीएधारक (जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी) अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांनी पुन्हा बाधित मिळकत क्षेत्राचा टीडीआर स्वरूपात मोबदला मिळावा, यासाठी प्रस्ताव दाखल केला आणि महापालिकेची दिशाभूल व फसवणूक केली, अशी तक्रारीत महापालिकेने केली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. टीडीआर प्रकरणी
अखेर गुन्हा दाखल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टीत वाढ होणार नाही

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनीचा करार रद्द करण्यात आला. यासंदर्भातील कायदेशीर कारवाई लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर सरकारच्या सूचनेनुसार समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होईल. दरम्यान, युटीलिटीच्या करारात दरवर्षी पाणीपट्टी वाढ मंजूर करण्यात आली होती, पण आता करार रद्द झाल्याने पाणीपट्टीत वाढ होणार नाही, असे संकेत महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले.
‘समांतर’ रद्द झाली आता शहराच्या पाणीपुरवठ्याचे काय ? असे विचारले असता बकोरिया म्हणाले, की कोर्टात यासंदर्भातील सुनावणी होणार आहे. त्यानंतर ही योजना कुणामार्फत राबवायची याचे सरकारकडून मार्गदर्शन मागविले जाईल. समांतरसाठीचे ३२८ कोटी आपल्याकडे आहेत. युटीलिटी कंपनीसोबत झालेल्या करारात दरवर्षी ठराविक रकमेने पाणीपट्टी वाढ मंजूर केली गेली होती. सर्वसाधारण सभेने त्यास मान्यता दिली होती. त्यानुसार २०३० मध्ये एका कनेक्शनसाठी हजारो रुपये लागणार असे प्रस्तावित होते, पण ते तत्वतः योग्य नाही. त्या काळात काय परिस्थिती राहील, यावर पाणीपट्टीचे गणित मांडता येते. सरकार आणि पालिकेने ही योजना पूर्ण केली तर एवढी पाणीपट्टी राहणार नाही. किंबहुना दरवर्षी पाणीपट्टीत दहा टक्क्यांची वाढ करायची की नाही, याबाबतही निश्चित सांगता येणार नाही. पाटबंधारे खात्याकडून आकारले जाणारे दर, विजेचे दर आणि पाणी पुरविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेचा खर्च याची सांगड घालून पाणीपट्टीचे दर निश्चित केले जातील. त्यात वाढ होईल पण पूर्वी ठरल्याप्रमाणे निश्चितच दर राहणार नाहीत, असे संकेत आयुक्तांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद, नांदेडमधील पालिकांसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद निवडणुकीची सेमिफायनल समजल्या जाणाऱ्या नगरपालिका निवडणुकांसाठी जिल्ह्यात चार ठिकाणी रविवारी मतदान होणार आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चौघांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असून शनिवारी मतदानाच्या पूर्वसंध्येला पैठण, खुलताबाद, कन्नड आणि गंगापूरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावून चुरस निर्माण केली आहे.

नगरपालिकेच्या तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेडमधील नऊ नगरपालिका व दोन नगरपंचायतींसाठी रविवारी मतदान आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी ही महत्त्वाची लढाई आहे. गेल्या दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने केलेली कामे जनतेसमोर नेऊन भाजप व शिवसेनेने मतांचा जोगवा मागितला. दुसरीकडे केंद्र व राज्याने घेतलेल्या निर्णयमुळे जनतेची झालेली अडचण हा प्रचाराचा मुद्दा ठेवत विरोधकांनी निवडणुकीत औत्सुक्य निर्माण केले. पैठण, गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद या चारही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत होणार आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, आमदार संदीपान भुमरे, हर्षवर्धन जाधव, प्रशांत बंब यांनी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. गंगापुरात सत्ता राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान असून खुलताबादमध्ये चमत्काराची अपेक्षा आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या कोलांडउड्या तारणार की, मारणार याची उत्सुकता पैठणमध्ये आहे. कन्नडमध्ये जोरदार चुरस असून एमआयएममुळे त्यात रंगत आली आहे. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून या चार नगरपालिकांच्या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मी दर्शनाचा लाभ घ्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, पैठण
पैठण येथील निवडणूक प्रचार सभेवेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण संपल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाषणासाठी उभे राहिले. मात्र, दानवे यांचे भाषण सुरू होताच उपस्थित बहुतांशी नागरिक सभेतून उठून जायला सुरुवात केली. यामुळे संतापलेल्या दानवे यांनी सभेतून उठून जाणाऱ्या नागरिकांना निवडणुकीच्या एक दिवस अगोदर लक्ष्मी दर्शनाची आस लागल्याने हे नागरिक सभेतून उठून जात आहेत. निवडणुकीत लक्ष्मी दर्शन झाल्यास त्याचा बिनदिक्कत लाभ घेण्याचा सल्लाही त्यांनी सभेतून उठून जाणाऱ्या नागरिकांना दिला.
पैठण नगर पालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, औरंगाबादचे आमदार अतुल सावे, महापौर बापू घडामोडे, किशनचंद तनवाणी, भागवत कराड, तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरज लोळगे यांची मंचावर उपस्थितीत होते.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘नोटबंदीमुळे नागरिकांना जरी रांगेत उभे राहावे लागत असले तरी भविष्यात नागरिकांना रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये म्हणून केंद्र शासनाने नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून यामुळे अन्य पक्षामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.’
यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अतुल सावे, तुषार शिसोदे, कांतराव औटे, सुनील शिंदे, शेखर पाटील आदींची यावेळी भाषणे झाली. नागरिकांनी सभेत मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

अन्य पक्षांना कालबाह्य करा
भाजप सरकारने लोकहिताच्या विरोधात निर्णय घेतले असते व जर नोटबंदीचा निर्णय सामान्य जनतेला आवडला नसता तर राज्यात पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीत भाजपला यश मिळाले नसते. यामुळे, ज्याप्रमाणे पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा इतिहास जमा होणार आहे. त्याप्रमाणे पैठण नगर पालिकेच्या निवडणुकीत अन्य पक्षांना कालबाह्य करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठा समिती विरोधात गुन्हा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
भारत निर्माण योजनेतील लाखो रुपये उचलूनही काम पूर्ण न केल्याने उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वर येथील पाणी पुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष अंकुश शंकर मोरे व सचिव प्रमोद भाऊसाहेब पाटील यांच्या विरोधात उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यासोबतच १५५ ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी कारवाईच्या धास्तीने १५ गावच्या ग्रामसमितीने सुमारे ६० लाख ५० हजार रुपये संबंधित यंत्रणेकडे जमा केले असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता दशरथ देवकर यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत निर्माण योजनेअंतर्गत १५५ पाणीपुरवठा योजनेत गैरप्रकार झाल्याचा प्रकार ‘मटा’ने उघडकीस आणला होता. यापूर्वीच तुळजापूर तालुक्यातील गुळहळ्ळीच्या पाणीपुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष अर्चना दीपक घोडके व सचिव तथा तत्कालीन ग्रामसेवक बी. पी. घुगरे यांच्याविरोधात नोव्हेंबर २०१६ मध्ये नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील निलंगाव व सिंदफळ येथील पाणीपुरवठा समिती गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झाली आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण येथील पाणीपुरवठा समितीच्या तत्कालीन अध्यक्षा तथा सरपंच कांचन खडबडे व ग्रामसेवक सुरेश धावारे यांच्या विरोधात शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पैसे भरण्यासाठी नकार दर्शविणाऱ्या ग्रामसमिती विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांनी दिले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वरच्या ग्रामसमितीने सुमारे आठ लाख रुपये तर शिराढोणच्या ग्रामसमितीने ४ लाख ६२ हजार रुपये हडप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात भारत निर्माण योजनेअंतर्गत १५५ योजनेचे काम २००८ मध्ये हाती घेण्यात आले होते. यापैकी ११९ योजनांचा भारत निर्माण अंतर्गत तर ३६ गावच्या योजनांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश होता. भारत निर्माणच्या राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश होता. भारत निर्माणच्या ११९ पैकी ४० योजनेत अनियमितता आढळून आली होती. यामध्ये १ कोटी २ लाख रुपये हडप केल्याचा संशय होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत निर्माण योजना गेल्या आठ वर्षांपासून रखडलेली आहे.
ग्राम समितीमध्ये विविध पक्षाचे पाठबळ असणारी गावपातळीवरील राजकीय मंडळी होती. आठ वर्षांपूर्वी हडप केलेली रक्कम आता वसूल होणार नाही, अशा भ्रमात ही भ्रष्टाचारी नेते मंडळी होती. परंतु, रक्कम हडप करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा बडगा जिल्हा परिषद सीईओ आनंद रायते यांनी उगारताच ६० लाख रुपये वसूल करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे.

पैसे भरण्यास नकार देणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या काळात आणखी काही समितीविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यासोबतच आणखीन येणे असलेले २० लाख रुपये लवकरच जिल्हा परिषदेकडे जमा होतील.
दशरथ देवकर, कार्यकारी अभियंता,
पाणीपुरवठा विभाग, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमधील गावाचा कायापालट करणार खा. सचिन

$
0
0

बीडः दुष्काळग्रस्त कऱ्हेवाडीचे (ता. आष्टी) रूपडे लवकरच बदलणार आहे. मास्टरब्लास्टर खासदार सचिन तेंडुलकर याने त्यासाठी आर्थिक मदत देऊ केली. जिल्ह्यातील दुष्काळीस्थितीची जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतल्यानंतर तेंडुलकरच्या स्वीय सहाय्यकाने प्रत्यक्ष पाहणी केली होती. कऱ्हेवाडी ग्रामस्थांशी चर्चा करून दुष्काळी झळाही जाणून घेतल्या. त्यानंतर तेंडुलकरने बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना पत्राद्वारे खासदारनिधीबाबत कळवले आहे.

कऱ्हेवाडीत पायाभूत सुविधा देणे तसेच, पाणी पातळी वाढण्यासाठीच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे सचिनने जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. विकास कामासाठी सचिनसारखा पालक मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. बीडच्या दुष्काळाची दखल घेऊन सचिनने स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांना फेब्रुवारी बीडमध्ये पाठवले होते. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने आष्टी आणि पाटोदा तालुक्याला भेट दिली. पाटोदा तालुक्यातील कुसळंब आणि आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी या दोन गावांना भेटी दिल्या. यावेळी पाणी, चारा, रोजगार, दळणवळण, रस्त्यांची उपलब्धता यांविषयी चर्चा केली. तसेच कुठल्या प्रकारची मदत दिली जावी याची माहिती कन्हान यांनी घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंदराने कुरतडल्या ६४ हजारांच्या नोटा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दानपेटीत घुसलेल्या उंदराने भाविकांनी दिलेल्या ६४ हजार रुपयांच्या नोटा कुरतडल्या आहेत. दानपेटीत एकूण किती उंदीर घुसले, त्यांनी किती नोटा कुरतडल्या किंवा किती नोटा चालू शकतात, याची माहिती देण्यास संबंधितांनी नकार दिला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या नोटा कुरतडल्याने भाविकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

देवीच्या साडेतीन पीठांपैकी मुख्य पीठ असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे मंदिर विविध कारणांनी गाजत आहे. भाविकांनी दिलेल्या सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात तूट आलेली असून, त्याची सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे. आता मंदिरातील दानपेटीत उंदीर घुसून भाविकांनी दिलेल्या ६४ हजाराच्या नोटा कुरतडल्या असल्याचे उघडकीस आले आहे. मंदिरातील गुप्तदान पेट्यातील रकमांची मोजदाद नुकतीच करण्यात आली होती. यात मंदिर परिसरातील विविध गुप्तदान पेट्यांतील रक्कम ५७ लाखांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. यापैकी मंदिरातील गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या स्नानगृहात ६४ हजाराच्या नोटा कुरतडल्याचे उघड झाले. तुळजाभवानी मंदिर रात्री बंद झाल्यावर तेथे केवळ जमादारखाण्यातील पोलिस आणि सुरक्षा रक्षक असतात. रात्री अकरा वाजल्यापासून सकाळपर्यंत मंदिराचा परिसर वर्दळमुक्त असतो. त्या कालावधीत उंदरांनी जेथून भाविक पैसे टाकतात तेथूनच प्रवेश केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारी पाश! शेतकऱ्याकडे सून-मुलीची मागणी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गहाण जमीन सोडवण्यासाठी मुलगी आणि सूनेला माझ्याकडे पाठव, अशी मागणी सावकाराने बीडमधील धारुर तालुक्यातील शेतकऱ्याकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यानं सावकारावर केलेल्या या गंभीर आरोपाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेतकऱ्यानं केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरु आहे. आरोपात तथ्य आढळल्यास सावकाराविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही याप्रकरणाचा अहवाल मागविला आहे.

शेतकरी इंदर मुंडे यांनी सावकार भगवान बडे यांच्याकडे जमीन गहाण ठेवून कर्ज घेतले होते. कर्ज थकल्यामुळं सावकारानं जमिनीचा ताबा घेतला, अशी तक्रार शेतकरी मुंडे यांनी एप्रिलमध्ये पोलिसांकडे केली होती. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर सावकाराने गहाण जमीन सोडवण्यासाठी मुलगी आणि सूनेला पाठव, अशी मागणी केली, असा आरोप शेतकऱ्यानं केला आहे. या प्रकरणाची आम्ही चौकशी सुरु केली असून, योग्य कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे दिलासा; टँकर संख्येत घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने औरंगाबाद जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. २९ जून रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र दहा दिवसांत ही संख्या बऱ्यापैकी घसरली आहे. सध्या ६०० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हवामान खात्याने पुढच्या दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार पाऊस झाला, तर टँकरची संख्या आणखी घटणार आहे.
भर उन्हाळ्यात जिल्ह्यातील १४ लाख नागरिकांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी दिले जात होते. गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाई होती. यंदा मान्सूनने पहिल्या टप्प्यात हुलकावणी दिली. पण नंतर ठराविक कालावधीने पाऊस झाला. गेल्या आठवड्यात जिल्हाभरात समाधानकारक पाऊस झाल्याने कोरड्या साठ्यांमध्ये थोडेफार पाणी साचले. विहिरींनाही पाणी आले. त्यामुळे टँकरची संख्या घटली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात टँकरची संख्या ९५४ झाली होती. ७ जुलै रोजी ती घटून ६०१ झाली आहे. औरंगाबाद तालुक्यात ८०, गंगापूर १३४, कन्नड २३, खुलताबाद १४, पैठण १५४, फुलंब्री २९, सिल्लोड ४२, वैजापूर १२५.

सोयगाव टँकरमुक्त
सोयगाव तालुक्यात अन्य तालुक्यांच्या तुलनेत जोरदार पाऊस झाल्याने येथील टँकरची संख्या शून्य झाली आहे. मे महिन्यापर्यंत तालुक्यात पाणी उपलब्ध होते. उन्हाळा संपता संपता सोयगाव तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळी आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कॉलनीत वनौषधींचे रोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वृक्षसंवर्धन सप्ताहानिमित्त एसटी कॉलनीतील महिलांनी औषधी गुणांच्या वनस्पतींचे रोपण केले. अडुळसा, कोरफड, तुळस, निर्गुडी, गुळवेल अशा औषधी गुणधर्माच्या वनस्पती परिसरात लावण्यात आल्या.
याप्रसंगी वैद्य अनघा नेवपूरकर यांनी औषधी वनस्पतींची सविस्तर माहिती सांगितली. नेवपूरकर म्हणाल्या, 'औषधी गुणधर्माच्या वनस्पती परिसरात लावल्याने आरोग्य समृद्ध राखता येते.'
विविध औषधी वनस्पतींचे फायदे त्यांनी समजून सांगितले. 'वडाचे झाडही महिलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. मुका मार लागल्यास वडाची पाने बांधल्याने सूज उतरते आणि आरामही मिळतो. निर्गुडीच्या पानांचा लेप सांधेदुखीवर उपयुक्त ठरतो. त्याचे इतर दुष्परिमाण होत नाहीत. कोरफडचा उपयोग त्वचारोग, केसांच्या समस्या, स्त्रियांचे आजार, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होतो, वजन नियंत्रणात राहते. गुळवेलचा काढा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. हाडांना मजबूत ठेवतो. मधुमेहावर गुणकारक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ८० महिलांना आरोग्यवर्धक वृक्षांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पुष्पा गायकवाड, वर्षा गवारे, वंदना पोगुल यांची प्रमुख उपस्थिती होती. आहारतज्ज्ञ डॉ. अलका कर्णिक यांच्या निरामय डाएट व रिचर्स सेंटरतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात ‘इनक्युबेशन सेंटर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील तरुण संशोधक, प्राध्यापकांना मूलभूत व दर्जेदार संशोधनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जमनालाल बजाज इनक्युबेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते शुक्रवारी (८ जुलै) या सेंटरची पायाभरणी करण्यात आली.
सिफार्ट सभागृह परिसरात झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रभारी कुलसचिव डॉ. दिगंबर नेटके, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे, प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. एम. डी. सिरसाठ, नलिनी चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या केंद्रातून मराठवाड्यातील तरुण संशोधक, प्राध्यापकांना मूलभूत व दर्जेदार संशोधनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संशोधन आणि विकास (आर अँड डी) या माध्यमातून नवीन उद्योजक घडावेत, यासाठी विद्यापीठ अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नव्यानेच सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात या तरुण संशोधकांना प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते २ ऑक्टोबर रोजी (महात्मा गांधी जयंती) करण्यात येईल, असेही कुलगुरुंनी पायाभरणी प्रसंगी सांगितले.या कार्यक्रमास डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. सतीश पाटील, उपअभियंता रमेश क्षीरसागर, संजय हुसे, विष्णू कव्हळे, डॉ. गोविंद हुंबे, शिरीष बर्वे, कंत्राटदार अरुण मापारी आदींची उपस्थिती होती.

उद्योगपती बजाज यांच्याकडून २५ कोटी
विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या इनक्युबेशन सेंटरसाठी प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज २५ कोटी रुपये देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. त्यातील दीड कोटीचा पहिला हप्ता विद्यापीठास प्राप्त झाला आहे, असे सांगण्यात आले.

'ग्रीन बिल्डिंग' उभारणार
जवळपास आठ हजार चौरस फूट जागेत इनक्युबेशन सेंटरची 'ग्रीन बिल्डिंग' उभारण्यात येणार अाहे. इमारतीमध्ये नैसर्गिक हवा, प्रकाश व अन्य घटक या असणार आहेत. पहिल्या मजल्यासाठी एक कोटी ५२ लाखांचा खर्च प्रस्तावित असून, विद्यापीठात अद्ययावत सोयी सुविधासह असलेली पहिलीच इमारत असेल, अशी माहिती अभियंता आर. डी. काळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फूड कॉर्नर ः पावसाच्या सरींसगे उस्मानभाईंची भजी

$
0
0

Shripad.kulkarni@timesgroup.com
भजी हा प्रत्येकाचा आवडता पदार्थ. पावसाला सुरुवात झाली की घरोघरी भजांची फर्माइश केली जाते. भजी करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगवेगळी असते. कुणी भजी करताना पिठात मसाले, जिरे, ओवा टाकतात. कुणी बटाटे, पालक यांचा वापर करतात. आळुच्या पानांचीही भजी केली जातात. कांदा भजे, पकोडे हे प्रकार बहुतेकांना आवडता. हरभरा डाळीच्या भजांप्रमाणे मूग डाळीचे भजेही अनेकांना आवडतात.
काही हॉटेल केवळ भज्यांसाठी प्रसिद्ध असतात. कोकणवाडीतील उस्मानभाईचे हॉटेलही त्यापैकीच एक. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून उस्मानभाईंची भजी प्रसिद्ध आहेत. स्टेशन रोडवर अग्निशमन दलासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली त्यांची रोज गाडी उभी असे. गाडीभोवती दिवसभर खवय्यांची गर्दी असे. तेव्हापासून उस्मानभाईंची भजी प्रसिद्ध आहेत. पूर्वी स्टेशन रोडवर देवगिरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी असे. उस्मानभाईंच्या भजांची गाडी हा विद्यार्थ्यांचा खास ठेपा होता. काही वर्षांपूर्वी कोकणवाडीतील जय टॉवर्समध्ये त्यांच्या हॉटेलचे स्थलांतर झाले.
भज्यांची गाडी सुरू करण्यापूर्वी उस्मानभाईंनी अनेक हॉटेलांत काम केले. 'अनेक ठिकाणी काम करताना विविध पदार्थ बनविणे शिकलो. त्यातून मोठा अनुभव मिळाला. या अनुभवाच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. भजांसाठी दर्जेदार आणि ताज माल वापरला जातो. भजांची चव आणि ते गरम सर्व्ह केले जातात. त्यामुळे भजी खवय्यांच्या पसंतीला उतरली आहेत,' असे उस्मानभाई सांगतात.
भज्यांसाठी चांगल्या दर्जाचा, ताजा माल वापरला जातो. हरभरा डाळीचे भरडा पीठ वापरले जाते. कांदा, हिरवी मिरची, मीठ मिसळून भज्याचे पीठ भिजविले जाते. पीठ भिजविण्यापूर्वीच कांदा, मिरच्या चिरल्या जातात. डाळीचे भरडा पीठ वापरल्यामुळे भजी खुसखुशीत होतात, असे ते सांगतात. गेल्या ४० वर्षांत त्यांच्या भज्यांची चव कायम आहे.
तळलेली मिरची आणि पाव यांच्यासोबत गरम भजी सर्व्ह केली जातात. ही भजी गरमगरम खाण्याची मजा काही औरच आहे. या खुसखुशीत भज्यांची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळते. भजी खाण्यासाठी दिवसभर गर्दी असते. त्यात विद्यार्थी, तरुणांची संख्या मोठी आहे. भज्यांसाठी अनेकजण वेटिंगमध्ये असतात. खास उस्मानभाईंच्या हॉटेलातील भजे खाण्यासाठी शहरभरातून खवय्ये येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक घोटाळा: धनंजय मुंडेंना फरार घोषित करणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह बँकेच्या आजी-माजी संचालकांना लवकरच फरार घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. फरार घोषित करण्यात येणाऱ्या आजी-माजी संचालकांमध्ये आमदार अमरसिंह पंडित, खासदार रजनी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह तब्बल ९३ जणांचा समावेश आहे.

बीड जिल्हा बँकेतून विनातारण कर्ज मंजूर करणं, बेकायदा कर्ज वाटप करणं आदींसह वेगवेगळ्या १४ गुन्ह्यांमध्ये अनेक नेत्यांसह बँकेच्या आजी - माजी संचालकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अखेर आरोप निश्चित करण्यात आले. आरोपपत्रात धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील यांच्यासह ९३ जणांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले. मात्र, एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे सर्व आरोपींना लवकरच फरार घोषित करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड शहरात आता विनामूल्य वाय-फाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

इस्लामपूरनंतर वाय फायची सुविधा मिळणारे बीड शहर हे राज्यातील तिसरे शहर असणार आहे. शनिवारी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते भारतभूषण क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी शहरातील बशीरगंज भागात या सेवेची सुरुवात करण्यात आली.

बीड शहर हे साधारण दोन लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल शहर असून स्मार्ट आणि डीजिटल शहराच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. बीड नगरपालिकेने जिओ या कंपनीशी करार केला असून, या करारानुसार बीड शहर वाय फाय फ्री होणार असल्याची माहिती भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली. विशेष म्हणजे नगरपालिकेस याचा एक रुपया खर्च येणार नसून, सर्व खर्च कंपनी उचलणार आहे. या करारानुसार सुरुवातीला बीड शहरातील सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, बशीरगंज, शाहू नगर, मोमीनपुरा, सुभाष रोड या पाच मोक्याच्या ठिकाणी वाय फाय फ्री सुविधा पुरवली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील इतर भागात ही सुविधा देणार असल्याचे ते म्हणाले. या सेवेचा फायदा शहरातील नागरिक, विद्यार्थी, तरुण-तरूणी, व्यावसायिकांना होईल. तसेच नगरपालिकेच्या अनेक सुविधा यामुळे ऑनलाइन उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. या वेळी नगराध्यक्षा दुधाळ व अनेक नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी जिओ कंपनीचे अधिकारी आजिम शेख म्हणाले, 'बीड नगरपालिकेच्या वतीने या सुविधेसाठी एक वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. त्याला आता यश आले. या मोफत वाय फाय सुविधेसाठी कंपनी एक कोटी वीस लाख रुपये खर्च केला असून, बीड शहराला स्मार्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे.' पत्रकार परिषदेनंतर बशीरगंज परिसरात या सेवेची सुरुवात करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’मध्ये बीड अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या २७१ गावांपैकी जवळपास २३६ गावातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेत राज्यात बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. केवळ ३६ गावांमध्ये कामे प्रलंबित असून त्या गावातील कामे प्राधान्याने सुरू करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जलयुक्त शिवार अभियानाच्या बीड जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने आणि परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, लघुसिंचन विभाग, कृषी, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण, जलसंधारण आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील २७१ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २३६ गावांत जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्ण करून राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी राम यांनी अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'उर्वरित ३६ गावांतील कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. जलयुक्तची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याकडे शासनाने विशेष लक्ष दिले असून झालेल्या कामांची छायाचित्रे व तपशिल जिओटॅगिंग करण्याची प्रक्रिया मंदावली असल्याचे लक्षात आले आहे. शंभर टक्के टॅगिंग पूर्ण करावे. त्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विभागांशी संवाद साधून दूर करा.'

झालेल्या कामांची व त्यामध्ये साठलेल्या पाण्याची छायाचित्रे व इतर तपशिल संकलित करण्याच्या सूचनाही सर्व विभागांना यावेळी दिल्या. त्यापैकी कोणत्या गावातील कोणती कामे प्रलंबित आहेत आणि त्यामागील कारणे काय याची माहिती सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी सादर करावी अशी सूचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांकडे शासनाने प्राधान्यक्रम दिला असून मंजूर झालेली सर्व कामे पूर्ण होण्यासाठी महसूल, कृषी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले.

विविध गावातील प्रलंबित कामांचा तालुकानिहाय आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'भौतिक, तांत्रिक किंवा ग्रामस्थांची अडचण याकारणाने कामे होत नसतील तर तेथील प्रकरण सोडविण्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये तीन भावंडांचा बुडून मृत्यू, आई वाचली

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। बीड

बीड तालुक्यातील कामखेडा गावात तीन सख्ख्या भावंडांचा नदीच्या बंधाऱ्यात मृत्यू झाल्याची ह्रद्य हेलावणारी घटना घडली आहे. जिशान, सानिया आणि अफ्फान अशी या मुलांची नावे आहेत. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बुडणाऱ्या लेकरांना वाचवण्यासाठी या मुलांच्या आईनेही पाण्यात उडी घेतली. मात्र गावकऱ्यांनी बुडणाऱ्या आईला वाचवले.

या तीन दुर्दैवी मुलांची आई परवीन शेख कपडे धुण्यासाठी कामखेडजवळच्या बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तीन मुलेही होती. आई कपडे धूत असताना अचानक जिशान पाय घसरुन पाण्यात पडला. हे सानिया आणि अफ्फानने पाहिल्याबरोबर ते दोघे जिशानला वाचवण्यासाठी लगबगीने पाण्यात उतरले. मात्र यांपैकी कुणालाही पोहता येत नसल्याने तिघेही बु़डू लागली.

शेजारीच कपडे धूत असलेल्या परवीन यांनी आपली मुले बुडत आहेत हे पाहताच आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी त्यांनीही पाण्यात उडी घेतली. दरम्यान, गटांगळ्या खाणाऱ्या जिशान, सानिया आणि अफ्फान यांना पाण्याने आपल्यात सामावून घेतले.

तीन मुले पाण्यात पडली आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आईनेही बंधाऱ्यात उडी घेतली आहे, हे पाहताच आसपास असलेल्या गावकऱ्यांनी धाव घेत पाण्यात उड्या घेतल्या आणि परवीन यांचा प्राण वाचवला.

बंधाऱ्यात बुडून मृत्यू पावलेल्या या दुदैवी मुलांचे वडील शेतकरी आहेत. शिवाय त्यांचा कापूस विक्रीचा व्यवसाय आहे.

एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता आपल्या जीवांची बाजी लावणाऱ्या या तीन भावंडांचा दुदैवी मृत्यू झाल्याने कामखेडा गाव आणि बीड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images