Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लोटू पाटलांचे रंगभूमीवर योगदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सोयगाव
‘सोयगावच्या नाट्य पंढरीत नटवर्य लोटू पाटील यांचे योगदान महान आहे. मराठवाडा विद्यापीठात नटवर्य लोटू पाटलांच्या नावाने दालन आहे, याचे समाधान आहे,’ असे मत शशिकांत बऱ्हाणपूरकर यांनी मांडले.
‘नागरी व ग्रामीण मराठी रंगभूमीः बालगंधर्व लोटू पाटील ते मकरंद अनासपुरे, राजकुमार तांगडे’ विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत असून दरवर्षी सोयगाव येथे एकांकिका महोत्सव घेणार असल्याचे डॉ. बऱ्हाणपूरकर यांनी जाहीर केले. याप्रसंगी ज्येष्ठ नाट्य कलावंत अमृतमामा चौधरी यांनी नटवर्य लोटू पाटील यांनी पदरमोड करून नाट्यगृह उभारले. यांनी ग्रामीण रंगभूमीला सोन्याचे दिवस आणले, मात्र त्यांना एकही पुरस्कार मिळाला नाही, अशी खंत व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक मंगेश नारायण काळे यांनी लोटू पाटील यांच्या कारकीर्दीतील नाटकाचा अनमोल ठेवा आपण विद्यापीठाला दिला. तसेच मराठी रंगभूमीला पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी माझी आर्थिक मदतीची तयारी आहे, असे सांगितले. प्रा. दिलीप घाटे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मकरंद अनासपुरे या कलावंताने सिनेमाचा कायापालट केला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. भा. ना. गाडेकर यांनी केले, तर समारोप प्रा. शिवाजी शिरसाट यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावच्या पाण्यावर शेतकऱ्यांची मालकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सोयगाव
‘गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून ते गावात जिरवावे. त्यावर मालकी फक्त गावातील शेतकऱ्यांची राहील,’ असे मत कृषीतज्ज्ञ हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी मांडले.
मराठवाडा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शेती या विषयावर ‘आता उठवू सारे रान’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब, कृषीतज्ज्ञ भगवानराव कापसे यांनी भाग घेतला. या परिसंवादात बोलताना पोपटराव पवार यांनी जलसंवर्धन ही काळाची गरज असून शासनाच्या अभियानात ग्रामस्थांनी सहभाग घेऊन त्याला यशस्वी करण्याची गरज व्यक्त केली. अनेक आदर्श गावांत चांगले काम होऊनही ग्रामस्थांनी त्याकडे पाठ फिरवल्याने गाव बकाल झाले आहे. हिवरेबाजारात ग्रामस्थांनी वर्गणी करून मशीद बांधली हे आदर्श उदाहरण आहे. सरकारी अनुदानाची वाट न पाहता श्रमदान करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा अतिवापर टाळून बारमाही पिकांपेक्षा आठ महिन्यांचे पीक घ्यावे. सरकारने सर्व अनुदान बंद करून शेतकऱ्याला त्याच्या मालाचे हमीभाव मिळाल्यास शेतीला चांगले दिवस येतील, असे पवार म्हणाले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी ज्या कायद्यामुळे शेतकऱ्याला गळफास बसत आहे ते कायदे बदलण्याची गरज व्यक्त केली. सत्ताधारी व विपक्ष या दोन्ही पक्षांतील नेत्यांना खडे बोल सुनावत त्यांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या नेत्याला श्रद्धांजली द्यायला वेळ नाही याबद्दल खंत व्यक्त केली.
ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी गटशेतीचे फायदे सांगितले. या कार्यक्रमात शेती उद्योगात क्रांती करणारे रवींद्र पाटील व हळद-अद्रक लागवडीचे अभिनव यंत्र तयार करून ते बांगलादेशमध्ये विकणारे इंद्रजीतसिंह यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. ज्योती स्वामी यांनी केले, तर आभार प्रा. काकासाहेब वराडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर मग, होय आम्ही देशविरोधीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘नोटबंदीविरुद्ध आम्ही ५० दिवसानंतर आंदोलन सुरू करत आहोत. नोटबंदीला विरोध करणाऱ्यांना देशविरोधी म्हटले जात आहे. असे असेल तर, होय आम्ही आहोत देशविरोधी आहोत. पण, आरएसएसने आम्हाला चारित्र्य शिकवू नये,’ अशा शब्दात भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फटकारले.

कार्यकर्ता मेळव्यानिमित्त अॅड. आंबेडकर हे बुधवारी शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशाच्या चलनातील ४० टक्के पैसा ‘नॉन टॅक्सेबल’ असून त्यावर कर बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण, त्याला देशभक्ती आणि बेहिशोबी पैशाचे नाव देण्यात आले. देशाचे पंतप्रधान ‘प्लॉस्टिक मनी’ वापरण्याचा सल्ला देत आहेत पेटीएम ही कंपनी चीनची असून चीनने पाकिस्तानी अतिरेक्यांना पाठिशी घातले होते. पेटीएमचा वापर करून आपण चीनला मदत करत आहोत. चीनच्या माध्यमातून सध्याचे सरकार पाकिस्तानाला मदत करत आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘नोटबंदी विषयावर देशाचे पंतप्रधान सर्वोच्च सभागृहात बोलत नाहीत. काळा पैसा, देशभक्ती असे भावनिक शब्द वापरले जात आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असे ते म्हणाले.
बेहिशोबी पैसा शोधण्यासाठी नेमलेली व्होरा समिती व जे. शहा एसआयटी समितीने दिलेल्या अहवालात एकही आदिवासी आणि दलित नाही. त्यामुळे या अहवालावर शासन कार्यवाही करत नाही, असा आरोप त्यांनी केला.

‘देशाच्या सभागृहात मला बोलू दिले जात नाही, असे पंतप्रधान खोटे सांगत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी सभागृहात उत्तर देण्याचे टाळले होते,’ अशी माहिती त्यांनी दिली. बहुजन समाज पक्षाच्या बँक अकाउंटवर मोठी रक्कम मिळाल्याबद्दलच्या प्रश्नावर अॅड. आंबेडकर यांनी बीएसपी व बीजेपी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका केली. निवडणुकीपूर्वीच उत्तरप्रदेश हातचा गेल्याचे लक्षात आल्याने भाजपतर्फे बसपला प्रकाशझोतात आणले जात आहे, असा दावा त्यांनी केला. मराठा, मुस्लिम व इतर जातींकडून आरक्षणाची मागणी होत असल्याबद्दलच्या प्रश्नावर, आरक्षण हा एकमेव मार्ग त्यांना दिसत आहे, त्यामुळे सर्वांना आरक्षण देऊन टाका, असे मत मांडले. पण, संपूर्ण समाजाचा विचार केल्यास आरक्षण हाच विकासाचा एकच मार्ग आहे का, याचा विचार करून पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधींनी ‘ब्लफ मास्टर’ होऊ नये
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर आरोप केले आहेत. सहारा प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू असून कोर्टासमोर पुरावे नाहीत. शीला दीक्षित यांनी कोर्टात शपथपत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती केल्यानंतर कोर्टाची कारवाई सुरू होईल. त्यासाठी राहुल गांधींनी शीला दीक्षित यांना तसे सांगावे. फक्त आरोप करून राहुल गांधी यांनी ‘ब्लफ मास्टर’ होऊ नये, अशी बोचरी टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

नोटंबदीविरुद्ध आंदोलनांची हाक
सिडकोतील संत संत तुकाराम सभागृहात भारिप-बहुजन महासंघाच्या मेळाव्यात नोटंबदीविरुद्ध ‘रोटी द्या किंवा नोटा द्या’ हे आंदोलन घोषित करण्यात आले. या मेळाव्याला अॅड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे ५० दिवसांचा वेळ संपला आहे. या काळात स्थिती बिघडली असून बेरोजगारी वाढण्याची शक्यता असल्याची टीका त्यांनी केली. राज्यात सर्वत्र महाराष्ट्र लोकशाही आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात सौर दिवे शोभेचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावात सौर पथदिवे बसविण्यात. आले मात्र देखभाल दुरुस्तीअभावी हे पथदिवे बंद पडले आहेत. जवळपास सर्व गावातील बंद पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
शासनाचा १३ वा वित्त आयोग, बीआरजीएफ योजना, समाज कल्याण विभागाची दलित वस्ती सुधार योजना, पर्यावरण समृद्ध योजना, जिल्हा परिषदेचा उपकर निधी यामधून तालुक्यातील अनेक गावांमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आले होते. परंतु, स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील निम्म्याहून अधिक पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. अनेक पथदिव्याचे दिवेच गायब आहेत, तर अनेक ठिकाणी नुसतेच खांब उभे आहेत. या दुर्लक्षामुळे या योजना डबघाईला येऊन शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत.
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये बसविण्यात आलेल्या सौर पथदिव्यांना नादुरुस्तीमुळे आजच्या घडीला भंगाराचे स्वरुप आले आहे. अनेक सौर पथदिव्यांच्या बॅटरी खराब झाल्या आहेत. या बॅटरी व सौर पथदिवे देखभाल, दुरुस्तीअभावी धूळखात पडून आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत. सौर उर्जेवरील या दिव्यांमुळे ग्रामीण भागात प्रकाशाची सोय झाली होती. स्थानिक प्रशासनाच्या वेळकाढू धोरणांमुळे गावातील सौर पथदिवे केवळ भुईला भार झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करून अडचण दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

मुलांची अडचण
वीज बचतीचा चांगला पर्याय या पथदिव्यामुळे निघाला होता. अनेक ठिकणी मुले दिव्याखाली अभ्यास करत होती, तर ग्रामस्थांना रात्रीच्या बैठकीसाठी पथदिव्यांचा उपयोग होत होता. गावामध्ये लोडशेडिंग असताना मुले अभ्यास करण्यासाठी या दिव्यांचा वापर करत होती. आता लोडशेडिंगच्या काळात मुलांचा अभ्यास बुडत आहे.

अधिकाऱ्यांचे हात वर
बंद पडलेल्या सौर पथदिव्यांबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी यांच्याकडे विचारणा केली. पण, त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कसल्याही प्रकारची माहिती नसल्याचे सांगून त्यांनी पंचायत समितीशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. पंचायत समितीचे गटविकास अधिककरी एम. सी. राठोड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मी नव्यानेच रुजू झालो असून माहिती जमा करून सांगतो, असे म्हणून वेळ मारून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएम नगरसेवक पालिका सभेत आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजाबाजार ते जिन्सी या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारे सिद्धेश्वर महादेव मंदिर अद्याप का पाडले नाही, असा मुद्दा उपस्थित करून गुरुवारी सर्वसाधारण सभेत एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. आयुक्त या संदर्भात निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असे सांगत महापौरांनी सभा संपवली.
राजाबाजार ते जिन्सी या रस्त्यावर सिद्धेश्वर महादेव मंदिर हे पुरातन मंदिर आहे. रस्ता रुंदीकरणात या मंदिराचा समोरचा भाग पडतो, पालिकेच्या नगररचना विभागाने तशी मार्किंग देखील केली आहे. दरम्यानच्या काळात खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्या मंदिराच्या परिसरात जाऊन नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची भूमिका त्यानंतर घेण्यात आली. गुरुवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना नगरसेविका समीना शेख, फेरोज खान, नासेर सिद्दिकी यांनी या मंदिराचा मुद्या उपस्थित केला. प्रशासन मुद्याम हे मंदिर पाडत नाही, त्यांच्यावर नेत्यांचा दबाव आहे, असा आरोप हे नगरसेवक करीत होते. नंदकुमार घोडेले, राजू वैद्य यांनी हे आरोप खोडून काढले. धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासंदर्भात शासनाने काही नियम तयार केले आहेत. पुरातन धार्मिक स्थळे असतील, तर त्यांना संरक्षण देण्याची तरतूद आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आयुक्त सक्षम आहेत, असे घोडेले म्हणाले. महापौर भगवान घडमोडे यांनी देखील हाच मुद्दा ग्राह्य धरला. आयुक्त योग्य तो निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी सर्वसाधारण सभा संपवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यास मंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टी. व्ही. सेंटर, हर्सूल आणि पडेगाव येथे नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यास गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. या कामासाठी २ कोटी ८२ लाख ४८ हजार रुपये खर्च येणार आहे. नवीन अग्निशमन केंद्र उभारताना सातारा-देवळाईसह शहागंजचा देखील विचार करा, अशी सूचना करीत महापौर भगवान घडमोडे यांनी हा प्रस्ताव मंजूर केला.
महापालिकेचे सध्या बन्सीलालनगर व सेव्हनहिल्स येथे अग्निशमन केंद्र आहे. परंतु, शहराचा विस्तार लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने आणखी अग्निशमन केंद्रांची गरज आहे. त्यामुळे नवीन तीन केंद्र उभारण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या समोर मांडण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवक नंदकुमार घोडेले म्हणाले, इटखेडा येथे अग्निशमन केंद्र बांधण्याचे यापूर्वी ठरले होते. त्यानुसार येत्या काळात नियोजन झाले पाहिजे. इटखेड्याला लागूनच सातारा-देवळाईचा परिसर देखील आहे. या सर्व भागासाठी मध्यवर्ती पडेल, अशी जागा बीड बायपास रस्त्यावर निश्चित करून तेथे अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे. महापौर भगवान घडमोडे यांनी ही सूचना मान्य केली. सातारा-देवळाईसह शहागंजचा विचार करून अग्निशमन केंद्र बांधा, असे आदेश देत त्यांनी हा विषय मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०९ वॉर्डात दारावरून कचरा संकलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील ११५ वॉर्डांपैकी १०९ वॉर्डांमध्ये कचऱ्याचे ‘डोअर टू डोअर’ कलेक्शन केले जात आहे. ६१ वॉर्डांमध्ये ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे, अशी माहिती देत महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी महापालिकेने केलेल्या प्रयत्नांचे गुरुवारी सर्वसाधारण सभेत सादरीकरण केले.
या अभियानात औरंगाबाद महापालिकेने केलेल्या कामाची पाहणी व त्याआधारे पालिकेची रँकिंग निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक ४ ते ६ जानेवारी दरम्यान शहरात येणार आहे. त्यामुळे या अभियानाचा आढावा घेण्याचा विषय पत्रिकेवर होता. आयुक्तांनी अभियानाबद्दल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. केंद्रीय पथक २००० गुणांची परीक्षा घेणार आहे. त्यापैकी ९०० गुण डाक्युमेंटेशनला आहेत. डाक्युमेंटेशनमध्ये उल्लेख असलेल्या बाबींमध्ये काही त्रुटी, उल्लेख असत्य ठरल्यास निगेटिव्ह मार्किंग मिळणार आहे. त्यामुळे वास्तववादी डाक्युमेंटेशन करण्यावर भर दिल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी झालेल्या चर्चेत राजू वैद्य यांनी विविध सूचना केल्या. कैलास गायकवाड, नंदकुमार घोडेले, मनीषा मुंडे, चेतन कांबळे, अॅड. माधुरी अदवंत, राजेंद्र जंजाळ, त्र्यंबक तुपे, गजानन मनगटे, नासेर सिद्दिकी, जहांगीर खान, नाईकवाडी आदी नगरसेवकांनी सहभाग घेतला.

शहरात झालेली कामे
शहरातील १२ वॉर्डांत कचऱ्यापासून खत निर्मिती, सुमारे १० ते १२ टन प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. ५० वॉर्ड कचराकुंडी मुक्त केले असून ५० कामगार फक्त दुभाजकांमधील कचरा काढण्यासाठी नियुक्त केले आहेत. कचरा वाहतुकीसाठी ५० रिक्षा नव्याने प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्यावर व कचरा वाहतुकीच्या मोठ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली लावली जाणार आहे. जीपीएस प्रणालीला प्रक्रियेत वेगळे गुण आहेत. ५० ठिकाणे ‘ओडीएफ’ करणे बाकी असून येत्या काळात हे काम करू, असे आयुक्त बकोरिया यांनी सांगितले.

..तर कारवाई करणार
महापालिकेतील सफाई कामगाराने दुसऱ्याला कामावर ठेवून पेमेंट केल्याचे उघड झाले, तर त्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले. एखादा कर्मचारी स्वच्छतेचे काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल व त्याचे काम मुलगा किंवा सून करीत असेल, तर मानवतेच्या दृष्टीकोनातून कारवाई केली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन पदाधिकाऱ्यांची जेष्ठांकडून कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून शिवसेनेतील वादावर पडदा पडला नसल्याचे गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक पहिल्या बाकावर, तर सभागृहनेता भाजपच्या वळचणीला आणि गटनेता दुसऱ्या रांगेत असे चित्र होते.
महापौरपदासोबतच शिवसेनेने महापालिकेतील दोन महत्त्वाच्या पदांमध्ये बदल करून सभागृहनेतेपद गजानन मनगटे व गटनेतेपदावर मकरंद कुलकर्णी यांची वर्णी लावली. यामुळे संतापलेल्या ज्येष्ठ नगरसेवकांसह इतर नगरसेवकांनी संपर्कनेते, पक्षप्रमुखांपर्यंत नाराजी व्यक्त केली. त्यांनी बंडाची तयारी केली पण, पक्षप्रमुखांच्या अश्वासनानंतर त्यांनी माघार घेतली. परंतु, थंड झालेल्या बंडाचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले नसले तरी ज्येष्ठ नगरसेवकच सर्वेसर्वा असल्याचे सभागृहात दिसले. सभागृहात नगरसेवकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांच्या आसनासमोरील रांगेत पहिल्या दोन बाकांवर सभागृहनेता, गटनेता, विरोधीपक्षनेता, सभापती बसण्याची पद्धत आहे. पण गुुरुवारच्या सभेत पहिल्या बाकावर त्र्यंबक तुपे, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ यांनी कब्जा केला होता. त्यामुळे सभागृहनेते गजानन मनगटे यांना भाजपचे नगरसेवक व गटनेते बसलेल्या रांगेतील पहिल्या बाकावर सभागृहनेते मनगटे जावून बसले. गटनेते मकरंद कुलकर्णी यांना मात्र शेवटपर्यंत दुसऱ्या क्रमांकाच्या बाकावर बसावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्ष संपताना अखेर रेल्वे स्टेशन वायफाय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर वायफायची सुविधा देण्यात आली असून याची चाचणी बुधवारी रात्री घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर गुरुवारपासून प्रवाशांसाठी वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. स्टेशनवर १६ वायफाय पॉइंट तयार करण्यात आले असून हे स्टेशन वायफाय सुविधा असलेले राज्यातील २१ वे रेल्वे स्टेशन ठरले.
देशभरातील १०० ए आणि ए प्लस दर्जा असलेल्या रेल्वे स्टेशनवर डिसेंबरअखेरपर्यंत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात मुंबई सेंट्रल, चर्चगेट, बांद्रा, बांद्रा टर्मिनस, दादर, खार, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, भायखळा, पनवेल, बोरिवली, ठाणे, कुर्ला, अधेरी, सीएसटी, बेलापूर, वाशी, पुणे, नागपूर आणि सोलापूर स्टेशनवर वायफायची सुविधा देण्यात आली आहे. पण, डिसेंबर महिना संपत आला तरी औरंगाबादमध्ये ही सुविधा देण्यात आली नव्हती.
स्टेशनवरील ही सुविधा रेलटेलच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक प्रवाशाला ४५ मिनिटांसाठी मोफत वायफाय मिळणार आहे. औरंगाबाद स्टेशनवर सध्या ३ जी स्पिड असल्याची माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली.

ओटीपीद्वारे ‌कनेक्ट
औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरील वायफाय वापरण्यासाठी मोबाइलवरील वायफायचे बटन दाबावे. त्यानंतर येणाऱ्या स्क्रिनमध्ये मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. हा क्रमांक दिल्यानंतर काही क्षणात चार अंकी ओटीपी क्रमांक मिळेल. हा क्रमांक वायफायच्या पासवर्डमध्ये टाकल्यानंतर ४५ मिनिटांसाठी सुविधा मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा सुविधा मिळवण्यासाठी ४५ मिनिटानंतर हीच पद्धत अनुसरावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठीच्या पुस्तकांसाठी कोर्टात जाण्याचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पहिले ते आठवीपर्यंत मोफत पुस्तके देण्याचे धोरण असताना प्रत्यक्षात उर्दू माध्यमाच्या पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा विषयाचे पुस्तक देण्यात आले नाही. गणवेश पुरविण्याबाबतही शासन उदासिन असल्याने गरीब कुटुंबातील पालकांना आर्थिक फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी जनजागरण समिती न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे.
समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष मोहसीन अहेमद यांनी पत्रकारांना माहिती दिली. शिक्षण कायद्यानंतर सुद्ध सरकारीपातळीवरून उदासिनता असून उर्दू माध्यमातील पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा विषयाचे पुस्तके अनेक वर्षापासून दिले जात नाही. वारंवार मागणीकरून दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. शिष्यवृत्ती, गणवेश, हजेरी भत्त्याबाबतही अनियमितता आहे. प्रत्येक घर मालकाकडून दोन टक्के शिक्षण स्थानिक कर व ५ टक्के राज्यशासन शिक्षण कर असा एकूण ७ टक्के कर घेतला जातो. त्यानंतरही शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद, मनपा शाळांमधील रिक्त जागा भरल्या जात नसल्याने शिक्षणावर परिणाम होत आहे. या सर्व बाबींवर विचार करत, शिक्षण हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी जनजागरण समिती कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक वसंत देशमुख, शेख मुनाफ, रमजान खान, अबिदा बेगम, सुलताना नइम, अब्दुल जब्बार, विधी सल्लागार पृथ्वीदास गोदमगावकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृह सोडण्याच्या विद्यार्थिंनीना सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाने एमफीलच्या विद्यार्थिंनींना वसतिगृह सोडून जाण्याचे निर्देश दिले आहेत. अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक अद्याप झाले नसल्याने प्रशासनाच्या या भूमिकेबाबत विद्यार्थिंनींमध्ये नाराजी आहे. विद्यार्थिनींनी ही नाराजी कुलगुरूंना निवेदन देऊन व्यक्त केली.
विद्यापीठातील वसतिगृहांची प्रवेश क्षमता आणि प्रत्यक्ष मागणी यात मोठी तफावत आहे. २०० मुलींच्या क्षमतेचे नवीन वसतिगृह नुकतेच बांधण्यात आले. परंतु, ही नवीन वसतिगृहाची वास्तू शोभेची बनली अाहे. त्याचच एमफीलच्या विद्यार्थिंनींना वसतिगृह सोडण्याबाबत सांगण्यात आले आहे. विद्यापीठात १७ विषयात एमफील अभ्यासक्रम शिकविला जातो. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी वसतीगृह क्रमांक ३मध्ये राहतात. अभ्यासक्रमाचा कालावधी १८ महिन्यांचा आहे. तो कालावधी संपला मात्र, अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिकाचा भाग असलेला शोधप्रबंध पूर्ण झालेला नाही. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्याची मागणी विद्यार्थिंनींनी केली आहे. याबाबत त्यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन सादर केले. अभ्यासक्रमाचा कालावधी पूर्ण झाला, तरी संशोधनाची प्रक्रिया अपूर्ण आहे. तोपर्यंत वसतिगृहात राहण्यास परवानगी द्यावी, त्यासाठी गेस्टचार्ज भरण्यासही तयार असल्याचे विद्यार्थिनींनी निवेदनात म्हटले आहे.

कुलगुरूंची भेट नाहीच
संबंधित विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी प्रयत्न केला. परंतु, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची त्यांची भेट होऊ शकली नाही. कुलगुरू म‌िटिंगमध्ये असल्याने विद्यार्थिंनींनी कुलगुरूंना अर्ज सादर करत शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत राहू देण्याची विनंती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात बालविवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. ‌‌शिरूर कासारमध्ये चार वर्ष अभ्यास केला. त्या जोरावर हे मी ठामपणे सांगू शकते,’ असा दावा युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडच्या राज्य समन्वयक वर्षा देशपांडे यांनी गुरुवारी औरंगाबादमध्ये केला.
देशपांडे म्हणाल्या, ‘मुलींना शिकण्याची इच्छा असली तरी त्यांना सुविधेअभावी शाळा सोडावी लागते. मात्र, शालेय प्रशासन आपली तिजोरी शाबूत ठेवून अनुदान लाटण्यासाठी त्यांना पटावर हजर दाखवतात. मराठवाड्यात बालविवाहाचे प्रमाण ३० टक्‍के आहे. खुलताबादही हाय रिस्कवर आहे. संस्‍थेने वेळोवेळी केलेल्या पाहणीनुसार बालविवाह होणार अशी ७५ प्रकरणे आढळली. यामध्ये काहींचे ‌बालविवाह झाले होते. काही १८ वर्षांखालील मुली होत्या. ज्यांना शिकण्याची इच्छा होती. मात्र, घरातून लग्नासाठी दबाव होता. काही प्रकरणांमध्ये वयाचे दाखले मागवण्यात आले. सुदैवाने हे अहवाल प्रशासनापर्यंत वेळेत पोचले. पोलिस स्टेशन, ग्रामसेवक कामाला लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आणि आम्ही हे बालविवाह रोखू शकलो. काही विवा‌‌ह पुढे ढककले गेले. मुलींचे प्राथमिक शिक्षण सुरू आहे. मात्र, वयात येणाऱ्या मुलींचे शिक्षण बंद करण्यात आले. यामागे निर्जन रस्ते, अपुरी बस व्यवस्‍था, रस्ते या बाबी प्रामुख्याने पुढे आल्या. संस्‍थेमार्फत २०१२ मध्ये शिरूर कासारमध्ये बस डेपोची प्रस्ताव देण्यात आला. यामुळे शिरुर कासारसह राक्षसभुवन, खालापुरी, मानूर, रायमोहा जोडले जाईल. संस्‍थेने बस डेपोसाठी जागाही उपलब्‍ध करुन दिली, पण आंदोलनकर्त्यांना असे विषय दिसत नाही,’ असे देशपांडे म्हणाल्या.

अल्पवयीन मातृत्व अत्याचारच
‘बालविवाह म्हणजे समाजमान्य बलात्कार आहेत. मुलीची संमती नसतानाही तिच्यावर अल्पवयात मातृत्व लादणे म्हणजे अत्याचारच आहे. अशा पालकांवर, सासरच्या मंडळीवर पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले पाहिजे. कारण हे बलात्कार कधी रेकॉर्डवर येत नाहीत. बालविवाह झालेल्या मुलींचा माता मृत्यू दर याचाही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. खुलताबादमध्ये अशा बालविवाह, कुमारीमाता मृत्यूचे प्रमाण खूप आहे. बेटी पढाओ, बेटी बढाओ अभियान व बालविवाह, अल्पवयीन मातृत्व ही सगळी विसंगती आहे. त्यामुळे अगदी खोलवर जावून उपाय व्हायला हवे,’ असेही देशपांडे म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रामाणिक ग्राहकाने केले जास्तीचे पैसे परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
नोटबंदीनंतर बँकेच्या विविध शाखांत अनेकविध प्रकार घडत आहेत. अनेकांच्या खात्यात अचानकपणे रक्कम जमा होत आहेत. बीड बायपास येथील एनकेजीएसबी बँकेच्या शाखेत गुरुवारी दुपारी गडबडीत कॅशियरने ग्राहकास दहा हजार रुपये जास्त दिले. त्या ग्राहकाने फोन करून प्रामाणिकपणे हे पैसे परत केले.
देवळाईतील म्हाडा कॉलनीत संतोष घायवट हे पेपर विक्रेते राहतात. त्यांचे एनकेजीएसबी बँकेच्या बीडबायपास येथील शाखेत खाते आहे. गुरुवारी दुपारी ते बँकेत पैसे काढण्यासाठी गेले. त्यांनी १० रुपयांची विड्रॉल भरली व पैसे काढले. कॅशियरने पैसे दिल्यावर तेव्हा त्यांना दुसऱ्या कामानिमित्त फोन आल्याने पैसे न मोजता पासबूकमध्ये टाकले व तेथून निघून गेले. घरी गेल्यावर त्यांनी पैसे मोजले असता २ हजाराच्या १० नोटा या प्रमाणे २० हजार रुपये आढळल्यावर चुकून १० हजार रुपये जास्तीचे आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेत फोन करून जास्तीचे पैसे आल्याचे कळविले. लगेच बँकेच्या शाखेत देऊन जास्तीचे आलेले १० हजार परत केले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानून कौतुक केले.

बँकेत गर्दी असल्यामुळे कॅशियरच्या चुकीने १० हजार रुपये जास्त दिले गेले. घायवट यांनी प्रामाणिकपणे ते परत केले.
- प्रशांत जोशी, एबीएम, एनकेजीएसबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपच्या बिलावरून पालिकेत वादावादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पाइपच्या बिलावरून एमआयएमचे नगरसेवक फेरोज खान व महापालिकेचे कार्यकारी अभियंता सरताजसिंह चहल यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी पालिकेच्या आवारात घडला.
फेरोज खान यांच्या वॉर्डात जलवाहिनी टाकण्यासाठी आणलेले पाइप काही महिन्यांपासून पडून आहेत. कंत्राटदाराने खरेदी केलेल्या पाइपचे बिल महापालिकेने द्यावे, हे सांगण्यासाठी फेरोज खान हे चहल यांच्याकडे गेले होते. पण, चहल यांनी बिल देण्यास नकार दिला. त्यामुळे खान यांनी चहल यांच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला जात असताना एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दिकी तेथे पोहोचले व त्यांनी वाद मिटवला.
या संदर्भात माहिती देताना चहल म्हणाले, कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या पाइपचे बिल कंत्राटदाराला द्यावे, असे फेरोज खान यांचे म्हणणे होते. त्या पाइपचे बिल महापालिकेने देणे शक्य नाही. तुम्ही पाइप खरेदी केले असतील, तर कंपनीच्या नावासह बिल सादर करा, त्याची शहानिशा करून पैसे देण्याची प्रक्रिया करू, असे फेरोज खान यांना सांगितले. पण, त्यांनी असंसदीय भाषा वापरली. याची तक्रार आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, असे चहल यांनी सांगितले.
फेरोज खान यांनी पाइप व बिलांचा मुद्दा फेटाळून लावला. खासगेटजवळच्या जलवाहिनीवरील एक व्हॉल्व्ह सहा महिन्यांपासून खराब झाला आहे, त्याची दुरूस्ती करा, असे मी सांगत होतो. वारंवार पाठपुरावा करून देखील काम होत नसल्यामुळे चहल यांना जाब विचारला, असा दावा फेरोज खान यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नगरसेवकांना महापौरांचा आहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सर्वसाधारण सभेत आयुक्त बसून का बोलले,’ म्हणत राजशिष्टाचाराचा मुद्दा पुढे करून पहिल्याच सभेत खोडा घालणाऱ्या भाजप नगरसेवकांना महापौर भगवान घडमोडे यांनी गुरुवारी घरचा आहेर दिला. मानापमानाला महत्त्व न देता आयुक्तांना खुर्चीत बसून उत्तरे देण्याची मुभा दिली. त्यामुळे नाराज नगरसेवकांनी सभात्याग केला.
घडमोडे यांची महापौर म्हणून असलेल्या आजच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेला सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली. मात्र, गणपूर्तीअभावी पाच मिनिटांसाठी महापौरांना सभा तहकूब करावी लागली. त्यानंतर सभा सुरू झाल्यावर विषयपत्रिकेवरील स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या विषयावर चर्चा सुरू झाली. नगरसेवक नंदकुमार घोडेले, अॅड. माधुरी अदवंत, गजानन मनगटे यांनी मते मांडली. त्यानंतर महापौरांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना ‘या विषयावर केवळ चर्चा नको, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करून माहिती द्या,’ असे सांगितले. आयुक्तांनी त्यानुसार माहिती देणे सुरू केले. तेव्हा माजी उपमहापौर प्रमोद राठोड बोलण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले, ‘सभागृहात महापौरांचा मान राखला पाहिजे. महापौरांनी देखील ही बाब लक्षात घेतली पाहिजे. मान राखला जात नसेल, तर सभा तहकूब करा,’ अशी मागणी त्यांनी केली.
राठोड यांचे वक्तव्य संपत असतानाच नगरसेवक राजू शिंदे उभे राहिले. ‘काय चालले आहे, काय अडचण आहे,’ असा प्रश्न त्यांनी विचारला. तेवढ्यात दिलीप थोरात म्हणाले, ‘महापौर पिठासन अधिकारी आहेत. सर्वसाधारण सभेत त्यांनीच खुर्चीवर बसून बोलले पाहिजे. बाकीच्यांनी उभे राहून बोलावे अशी नियमात तरतूद आहे.’
राजगौरव वानखेडे म्हणाले, ‘महापौरांनी आयुक्तांना राजशिष्टाचार काय आहे हे सांगावे.’ स्वपक्षीय नगरसेवकांनीच राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे विचलित झालेल्या घडमोडे यांनी सर्वसाधारण सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली.
सभा पुन्हा सुरू झाल्यावर राजू शिंदे यांनी पुन्हा तोच मुद्दा मांडला. ‘सभेच्या संदर्भातील नियम सचिवांनी वाचून दाखवावेत,’ असे ते म्हणाले. सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी महापौरांच्या आदेशानुसार सभा कामकाज नियमावली मधील कलम वाचून दाखवले. ‘पालिकेच्या सभागृहात पिठासन अधिकाऱ्यांशिवाय अन्य सदस्यांनी उभे राहूनच बोलले पाहिजे. पिठासन अधिकाऱ्यांनी आदेश दिले, तरच सदस्य खर्चीत बसून बोलू शकतात,’ असे ते म्हणाले. सचिवांनी केलेल्या खुलाशानंतर महापौरांनी या संदर्भात आयुक्तांना खुलासा करण्यास सांगितले.
आयुक्त ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, ‘आतापर्यंत जेवढ्या सर्वसाधारण सभा झाल्या, त्या सर्व सभांमध्ये मी खुर्चीत बसूनच बोललो आहे. आताही बसूनच बोलणार.’ आयुक्तांच्या खुलाशामुळे राजू शिंदे संतापले. ‘सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालले पाहिजे. आयुक्त नियमानुसार काम करणार नसतील, तर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करून तो शासनाकडे कारवाईसाठी पाठवावा. महापौरांच्या मान सन्मानाचा हा विषय आहे,’ असे ते म्हणाले.
यावर भूमिका स्पष्ट करताना महापौर म्हणाले, ‘आयुक्त म्हणाले खुर्चीत बसून बोलतो. सुरुवातीपासूनच ते बसून बोलतात. मान अपमानाचा हा विषय नाही. आपल्याला शहर विकासाचे काम होण्याशी मतलब आहे. आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत खुर्चीत बसून बोलावे, असे आदेश मी त्यांना देतो.’ महापौरांच्या अशा पवित्र्यामुळे प्रमोद राठोड, राजू शिंदे, दिलीप थोरात व गोकुळसिंह मलके यांनी सभात्याग केला.

मला माझ्याच पक्षाच्या नगरसेवकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, असे म्हणणे योग्य होणार नाही. ते चौघे मला सांगूनच बाहेर गेले. दीड वर्षाच्या काळात सर्वसाधारण सभेच्या सभागृहात आयुक्त खुर्चीत बसूनच बोलतात. हा पायंडाच पडला आहे. हा पायंडा एकदम मोडून काढणे शक्यच नाही. मान अपमानात न गुरफटता शहर विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे. सभा कामकाज नियमावलीच्या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी आग विझवण्याचे काम करतोय.
- भगवान घडमोडे, महापौर

सभागृह नियमानुसार चालले पाहिजे. नियमाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे. शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मान-सन्मान, इगो यात गुरफटून राहण्याची आमची इच्छा नाही. नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आज सभागृहात घडलेल्या घटनेसंदर्भात महापौरांशी चर्चा करतो. भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना समज देखील दिली जाईल.
- किशनचंद तनवाणी, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जनावरांची कत्तल सिल्लेखान्यात सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिल्लेखाना परिसरात पोलिसांनी वारंवार कारवाईसुद्धा जनावरांची कत्तल थांबलेली नाही. क्रांतिचौक पोलिसांनी बुधवारी सायंकाळी कारवाई करत ११ जनावरांची सुटका केली. या भागात पोलिसांनी पाच वेळा कोम्बिंग ऑपरेशन करत दोन महिन्यात कत्तलीसाठी आणलेल्या ७४ जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
टेंपोमधून उतरवून सिल्लेखान्यातील ईस्माईल कुरेशी याच्या गोठ्यात नेत असताना क्रांतिचौक पोलिसांनी कारवाई करत बुधवारी सायंकाळी ११ जनावरांची सुटला केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी केली. याप्रकरणी ईस्माईलसह टेंपोचाकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लेखाना परिसरात गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार जनावरांची कत्तल करण्यास मनाई करण्यात आली आहे. पडेगाव परिसरात महानगरपालिकेने अधिकृत कत्तलखाना सुरू केला असला तरी सिल्लेखान्यातील जनावरांची कत्तल थांबलेली दिसत नाही. जनावरांची अवैध वाहतूक करून त्यांना सिल्लेखान्यात कत्तल केली जाते, असे सतत होणाऱ्या पोलिस कारवाईवरून दिसून येते. येथील अवैध कत्तल थांबवण्यासाठी महानगरपालिकेने स्थापन केलेले पथक येथे गस्त घालत असते हे विशेष. त्याउप्परही येथील खाटीक कत्तलीसाठी जनावरे आणत आहेत. पोलिसांनी दोन महिन्यापूर्वी मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबवून ५० गायींची सुटका केली होती. सातत्याने कारवाई होऊनही या भागात कत्तल सुरूच आहे.

सिल्लेखान्यात पोलिसांतर्फे सातत्याने मोहीम राबवून बेकायदा कत्तलीसाठी जनावरे आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या सराईत लोकांची माहि‌ती जमा करून तसेच एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर हद्दपारी किंवा कठोर स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे.
-वसंत परदेशी - पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...लाजवाब पनीर कस्तुरी!

$
0
0



abdulwajed.shaikh@timesgrouo.com
पनीर कस्तुरी. या पदार्थाच्या नावातला अस्सल गोडवा चाखण्यासाठी तुम्हाला एपीआय कॉर्नरजवळ असलेले ‘द ग्रॅण्ड कैलास हॉटेल’ गाठावे लागेल. पनीर पुस्तक टिक्का, मशरूम नजाकत, घर की दाल असे एक से बढकर एक पदार्थ तुम्हाला येथे चाखायला मिळतील. आजच्या फूड कॉर्नरमध्ये तुम्हाला तृप्त करणारी ही लाजवाब सफर...
औरंगाबाद दर्दी खव्वयांचे शहर. त्यासाठी फक्त तुम्हाला कुठे काय मिळते, हे माहित असावे लागते. एपीआय कॉर्नरजवळचे ‘द ग्रॅण्ड कैलास हॉटेल’ कधी आवर्जुन गाठावेच. स्वच्छता आणि चवीसाठी याची शहरात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. हॉटेल कैलासची एक खासियत म्हणजे इथल्या शेफनी तयार केलेले नवनवीन पदार्थ. हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक संजय दाणी यांनी याबद्दल माहिती दिली. इथला पनीर कस्तुरी हा पदार्थ खवय्य्यांच्या आवडीचा. व्हेज, नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे पदार्थ तुम्हाला येथे मिळतील. त्यात पनीर कस्तुरी व्हेजमध्ये मोडतो. हा पदार्थ तयार करण्यासाठी पनीरचे छोटे-छोटे काप करावेत. मिरची, धने, हळद, अदरक, लसूण एकत्र करत त्याचा मसाला केला जातो. त्यात बारीक चिरलेला कांदा, काजू पेस्ट टाकली जाते. त्यात गरम मसाला चवीनुसार टाकला जातो. मग पनीरचे काप टाकले जातात. कस्तुरी मेथीची ग्रेव्ही तयार केली जाते. त्यात पनीर कस्तुरी मसाला टाकून देण्यात येतो.
येथे डाळीच्या दहा प्रकारच्या भाज्या बनविल्या जातात. इथली ‘घर की दाल’ लोकांना आवडते. ही खमंग दाळ तयार करण्याची एक विशेष पद्धत आहे. त्यासाठी अदरक, लसूण पेस्ट तयार करून घेतली जाते. बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यात मसाला टाकावा. शिजवलेली तुरीची दाळ बारीक करून त्यात हिरवी मिरची, बडी शेपसह इतर पदार्थ मिसळले जातात. शुद्ध तुपातली ही घर की दाल खवय्यामध्ये लोकप्रिय आहे.

पनीर पुस्तक
येथील पनीर पुस्तकही प्रसिद्ध आहे. एखाद्या पुस्तकाप्रमाणे पनीरचे चौकनी काप केले जातात. त्यात मसाला टाकून पनीर पुस्तक तयार करण्यात येते. दही, हिरवी आणि लाल चटणीसोबत हे प‌नीर पुस्तक खाण्यासाठी दिले जाते. याशिवाय या हॉटेलमध्ये मॅक्सिकन कॅबेज रोल, शब्ज निजामी कबाब, तवा सब्जीसह इतर अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटबंदीत १८ कोटी वसूल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटबंदीच्या निर्णयानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत पालिकेत जुन्या नोटांच्या स्वरुपात तिजोरीत करापोटी १८ कोटी रुपये जमा झाले. सध्या पालिकेची कर वसुली ढेपाळली असून ही तूट भरून काढण्यासाठी व्यावसायिक मालमत्तांना टार्गेट केले जात आहे.
‘कॅशलेस’ पद्धतीने कर भरण्याचे व्यवहार व्हावे, यासाठी पालिकेच्या कर आकरणी विभागाने लेखा विभागाशी संपर्कसाधून प्रत्येक वॉर्ड कार्यालयात स्वाइप मशीनची व्यवस्था केली. मात्र, नागरिकांनी ‘कॅशलेस’ व्यवहार करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. रोखीने कर भरण्यासाठी नागरिकांकडे पैसा नाही. त्यामुळे कर भरणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. १ एप्रिलपासून आतापर्यंत मालमत्ता कराची ६२ कोटी वसुली झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे १५ कोटी रुपयांची कर वसुली वाढली.

सील केले, पुन्हा काढले
पालिकेच्या वॉर्ड ‘फ’ कार्यालयाने शुक्रवारी शिवाजीनगरातील वरद विद्या मंदिरवर कारवाई केली. या शाळेकडे दहा वर्षांचा २ लाख ७४ हजार रुपयांचा कर थकला होता. त्यामुळे वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या शाळेच्या कार्यालयाला सील ठोकले. शाळेच्या संचालकांनी एक लाख रुपयांचा चेक दिल्यावर सील उघडण्यात आले. थकलेल्या कराची उर्वरित रक्कम मार्च अखेर पर्यंत भरण्याची हमी संचालकांनी दिल्याचे पालिकेने कळविले आहे.

जुन्या नोटांतून ४ कोटींची वसुली
नोटबंदी झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून विक्रीकर विभागाने युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या सहकार्याने करभरणा करण्यासाठी एक स्वतंत्र काउंटर सुरू केले. यात तब्बल ४ कोटी २९ लाख रुपयांची बंपर वसुली झाली. एकूण वसुलीत ४८ कोटींची वाढ झाली. २०१६/२०१७ या आर्थिक वर्षात औरंगाबाद विभागातून नोव्हेंबर २०१६पर्यंत १७६२ कोटी ५७ लाख रुपयांचा विक्रीकर वसूल केला. गेल्यावर्षाच्या तुलनेत करवसुली ४८ कोटी २७ लाख रुपयांनी अधिक झाली. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना नव्या संगणकीय प्रणालीची अर्थातच सॅपची माहिती देण्यासाठी वेळोवेळी शिबिर घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

$
0
0

शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
जिल्हा विद्युतीकरण समिती बैठकीत खासदार खैरेंचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः
शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वीज अधिकाऱ्यांंवर कारवाई का केली जात नाही, असा थेट सवाल खासदार चंद्रकांत खैरे यांनी करताच महावितरणच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. वैजापूर तालुक्यातील भगूर येथे ७ महिन्यांपासून जळालेले रोहित्र बदलून न देणाऱ्या तत्कालीन अभियंता मोरे यांना निलंबित करा असा आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
महावितरणच्या मिल कॉर्नर येथील परिमंडळ कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विद्युतीकरण समितीची बैठक खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, आमदार अतुल सावे, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवले, प्राध्यापक रमेश बोरनारे, अनिल पोलकर, गिरजाराम हळनोर, लक्ष्मण सांगळे, शिवाजी डापके, अप्पर जिल्हाधिकारी चोरमारे, विद्युत निरीक्षक पांडव, नंदकुमार कुलकर्णी, ग्राहक मंचाचे शरद चोबे, बी. व्ही. जोशी, अॅड. आशुतोष डंख, अधिक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, अधिक्षक अभियंता अशोक फुलकर, कार्यकारी अभियंता ए. पी. पठाण यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सोयगाव, कन्नड, वैजापूरमधील डीपी मंजूर असतानाही शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा सवाल खैरे यांनी मुख्य अभियंता गणेशकर यांना केला. अभियंता मोरे यांना निलंबित करण्याचे आदेश देतानाच त्यांनी बारा बाधित शेतकऱ्यांना विद्युत नियमानुसार ३० लाख २४ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.
आमदार अतुल सावे यांनी मध्य विभागातील विविध समस्यांचे पत्र शहर अभियंत्यांना दिले. आमदार भाऊसाहेब चिकटगावकरांनी वैजापूर डीपी प्रकरणातील शेतकऱ्यांची नावे पोलिस तक्रारीतून वगळण्याची मागणी बैठकीत केली. त्यावर खैरे यांनी कंत्राटदार व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.
जिल्हा परिषदेच्या शाळांना नाममात्र विद्युत शुल्क
जिल्हा परिषदेच्या शाळांना नाममात्र दरात वीज देण्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. परीक्षा काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडगावकरांच्या कवितेची लोकप्रियता वादातीत

$
0
0

पाडगावकरांच्या कवितेची लोकप्रियता वादातीत
‘पाऊसगाणी’ कवितासंग्रहाचे लोकार्पण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कवी मंगेश पाडगावकर अतिशय लोकप्रिय कवी असल्यामुळे समीक्षकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. कारण उत्तम साहित्य व लोकप्रियतेचे प्रमाण व्यस्त असल्याचे मानले जाते. पाडगावकरांवर गांभीर्याने लिहिले गेले नसले तरी त्यांची लोकप्रियता कायम राहिली’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी केले. ‘पाऊसगाणी’ या कवितासंग्रहाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
राजहंस प्रकाशनाने दिवंगत कवी मंगेश पाडगावकर यांचा ‘पाऊसगाणी’ नवीन कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. पाऊस विषयावरील कवितांचा संग्रहात समावेश आहे. पाडगावकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी या कवितासंग्रहाचा लोकार्पण कार्यक्रम ‘राजहंस’च्या कार्यालयात झाला. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि श्याम देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगेश पाडगावकर यांच्या कवितांच्या वैशिष्ट्याला रसाळ यांनी उजाळा दिला. ‘पाडगावकर अतिशय लोकप्रिय कवी होते. त्यामुळे मराठी समीक्षकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. कारण लोकप्रियता व उत्तम साहित्याचे प्रमाण व्यस्त असते असे मानतात. तसेच रोमँटिक कविता लिहिणे वाईट अशी मराठी साहित्यात हवा तयार झाली. पाडगावकरांची कविता रोमँटिक आणि लोकप्रिय होती. यातून १९५० पासून आजतागायत या कवितेवर मराठी साहित्य जगतात फारसे लिहिले गेले नाही. कलामूल्य कलेच्या निकषावर ठरावे. पण, विविध प्रकारचे साहित्य लिहूच नये अशी भूमिका योग्य नसते. पाडगावकरांच्या कवितेत प्रतिमा आणि सौंदर्य यांचा विलोभणीय संगम दिसतो’ असे डॉ. रसाळ म्हणाले. दरम्यान, यावेळी सुधीर मोघे, सीमा मोघे आणि श्रीकांत उमरीकर यांनी ‘पाऊसगाणी’ कवितासंग्रहातील निवडक कवितांचे वाचन केले.
वाङ्मय प्रतिष्ठा संपली
‘मागील ३०-४० वर्षात लेखक-कवींचे स्मृतिदिन-जयंती साजरी करण्याची प्रथा निकाली निघाली आहे. आम्ही मराठवाडा साहित्य परिषदेत हा उपक्रम घेत होतो. आपल्या समाजात वाङ्मय, कवी-लेखक यांना फार प्रतिष्ठा राहिलेली नाही. समाजात सांस्कृतिक अनास्था निर्माण झाली’ अशी खंत डॉ. रसाळ यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images