Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आयुक्तालयाबाबत कोर्टाचा ठपका

$
0
0
मराठवाड्यातील दुसरे विभागीय आयुक्तालय नांदेड येथे स्थापन करताना राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायद्यानुसार प्रक्रिया अवलंबिली नाही, असा ठपका ठेऊन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने विभागीय आयुक्तालय विभाजनाची प्रक्रिया तीन महिन्यांत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘उपरा’ कारांच्या तोंडाला काळं फासलं

$
0
0
भटक्या विमुक्त जाती महामंडळाच्या कर्ज अर्जदारांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्या तोंडाला आज काळं फासलं. कर्जपुरवठ्याच्या फाईल मंजूर न केल्याचा आरोप करत अर्जदारांनी केला आहे.

घाटीतील डायलिसिस बंद

$
0
0
घाटी हॉस्पिटलमधील मेडिसीन विभागांतर्गत अत्यवस्थ रुग्णांवर केली जाणारी डायलिसिस प्रक्रिया गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. यंत्र दुरुस्तीसाठी कंपनीचे प्रतिनिधी येण्यास टाळाटाळ करत असून प्रशासनही दुर्लक्ष करत आहे.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे शिबिर

$
0
0
राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे तीन दिवसांचे मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत हे शिबिर होणार आहे.

सिडकोला हवाय वाढीव ‘FSI’

$
0
0
वडगाव कोल्हाटी येथील नियोजित गृहप्रकल्पासाठी ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) वाढवून घेण्यासाठी सिडको प्रयत्न करीत आहे.

वसुलीच्या कामात गैरव्यवहार

$
0
0
पालिकेच्या वॉर्ड ई कार्यालयात पावतीपुस्तके गहाळ करून लाखोंचा गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्याचा अहवाल एक महिन्यात स्थायी समितीला सादर करा, असे आदेश स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

कागदावरच्या ‘साइडड्रेन’ सापडेना

$
0
0
कागदावरच्या साइडड्रेन रस्त्यावर गायब झाल्यामुळे शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून जाण्यासाठी जागाच नसल्यामुळे पाणी रस्त्यावरच साचून शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

शेतक-यांना गोदामांचा आधार

$
0
0
शेतक-यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळेपर्यंत तो माल गोदामात ठेवावा. योग्य भाव मिळाल्यानंतर या मालाची विक्री केल्यास त्याचा फायदा शेतक-यांना होईल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले.

उस्मानाबादमध्ये रब्बीची लगबग

$
0
0
उत्तरा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, जिल्ह्यातील कृषि क्षेत्रामध्ये आता रब्बी पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे.

शिवना येथील कत्तलखाने बंद करण्याची मागणी

$
0
0
शिवना येथे विना परवाना उघड्यावर चालणारा कत्तलखाना नवरात्रीआधी बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे.

कसाबखेडामध्ये कन्यारत्न प्रोत्साहनपर अनुदान

$
0
0
जन्मलेल्या मुलींसाठी कन्यारत्न प्रोत्साहनपर सानुग्रह अनुदान योजना हा पथदर्शी अभिनव उपक्रम कसाबखेडा तंटामुक्त गाव समितीने हाती घेतला आहे.

बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल

$
0
0
अचूक निदान आणि उपचार न झाल्यामुळे गुंतागुंतीच्या बाळंतपणावेळी ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण वाढते.

महिलेची चिमुकलीसह आत्महत्या

$
0
0
दिवाळीसाठी माहेरी जाऊ दिले नाही याचा राग आल्याने, एका नवविवाहितेने तीन वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

डी. पी. प्लॅनचे अधिकार नाझीरकरांकडून काढले

$
0
0
नगर रचना संचालक क. स. आकोडे यांनी नगर रचना उपसंचालक ह. ज. नाझीरकर यांच्याकडील महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीचा विकास आराखडा (डी. पी. प्लॅन) तयार करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहे.

बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण आता रंगीत पत्रिकेसह

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाची आता नवीन निमंत्रण पत्रिका केली जाणार आहे. ‘फोर कलर’मध्ये केल्या जाणाऱ्या या पत्रिकेवर आता बाळासाहेबांचा फोटोही असणार आहे.

मिलकॉर्नर परिसरात रात्री तरुण तरुणीचा गोंधळ

$
0
0
मिलकॉर्नर परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोन मद्यधुंद तरुण व एक तरुणी रस्त्यावर गोंधळ घालत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

नंदकुमार पत्की यांचे निधन

$
0
0
येथील ज्येष्ठ रंगकर्मी व रंगभूषाकार नंदकुमार पत्की यांचे गुरुवारी (१४ नोव्हेंबर) निधन झाले, ते ७६ वर्षांचे होते. ‘नाट्यरंग’ या संस्थेचे ते संस्थापक होते.

एकनाथ रंगमंदिर होणार ‘थंडा थंडा कुल कुल’

$
0
0
रंगकर्मींच्या सेवेत पंचवीस वर्ष काढल्यानंतर आता पालिकेचे संत एकनाथ रंगमंदिर थंडा थंडा कुल कुल होणार आहे.

पोलिसाला फोन करूनच ठाण्यात पैसे फेकले?

$
0
0
गारखेडा येथील ‘एटीएम’मधून लंपास केलेली रक्कम रहस्यमयरित्या चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या आवारात गुरुवारी सकाळी फेकण्यात आली.

मुंबईला जाण्याच्या नियोजनासाठी शिवसैनिकांच्या बैठकांचा जोर

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त औरंगाबादमधून सुमारे पाच हजार शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांचे मुंबईला जाण्यासाठी जोरदार नियोजन करण्यात येत आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images