Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सिल्लोड तालुक्यात १३ केंद्र संवेदनशील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परीषदेचे आठ गट व सोळा गणाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हनुमंत अरगुंडे व तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली. या निवडणुकीत तालुक्यातील दोन लाख ९ हजार २०३ मतदार हक्क बजाविणार आहेत. तालुक्यात १३ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.

सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषेदेचे अजिंठा, शिवना, उंडणगाव, घाटनांद्रा, पालोद, भराडी, अंधारी, भवन हे आठ गट आहेत. पंचायत समितीचे अजिंठा, हळदा, शिवना, पानवडोद, उंडणगाव, अंभई, घाटनांद्रा, आमठाणा, पालोद, हटी, भराडी, केऱ्हाळा, अंधारी, बोरगाव सारवणी, भवन, निल्लोड हे सोळा गण आहे. छाननीमध्ये अर्ज अवैध ठरणाऱ्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात अपील करता येईल.

२१२ मतदान केंद्र

या निवडणुकीसाठी सिल्लोड तालुक्यात २१२ मतदान केंद्र असून मतदान कक्ष अधिकारी, मतदान अधिकारी, दोन कर्मचारी राहतील. निवडणूक प्रक्रियेसाठी तालुक्यात १२०१ कर्मचारी व १८ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यातील पिंपळगाव पेठ, भराडी, शिवना, आमठाणा, उंडणगाव, अंभई, घाटनांद्रा, अंधारी, भवन, बोरगाव सारवणी, अजिंठा, वांगी (बुद्रुक), गोळेगाव (बुद्रुक) हे १३ केंद्र संवेदनशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोयगावात ६६ उमेदवार रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी २३ व पंचास समिती गणासाठी ४३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अंतिम चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल. जिल्हा परिषदेचे ७ अर्ज व पंचायत समितीचे १० अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले.

सोयगाव तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. एस. पी. सावरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बनकर, नायब तहसीलदार पी. बी. गवळी, संतोष जाधव, गजानन जोशी, देवानंद अंभोरे, सुभाष जाधव, सोळुंके नाना, सहायक आकाश तुपारे यांनी उमेदवारी अर्जाची छाननी केली.

जिल्हा परिषद गटातील उमेदवार पुढीलप्रमाणेः फर्दापूर- जयप्रकाश चव्हाण (भाजप),गोपीचंद जाधव (काँग्रेस), बळीराम जाधव (अपक्ष), मगन जाधव (रॉष्ट्रवादी काँग्रेस), शिवाजी बुढाळ (अपक्ष), भारतीबाई गणेश लोखंडे (शिवसेना), शेख सलीम (एमआयएम), आमखेडा- आगे नंदाबाई संजय (अपक्ष), काळे पुष्पाबाई प्रकाश (भाजप), काळे सुरेखाबाई प्रभाकर (काँग्रेस), पवार निकिता कैलास (शिवसेना), रोकडे मंजुळाबाई चंद्रहास (अपक्ष), वामने पुष्पाबाई युवराज (अपक्ष), गोंदेगाव- कहाळे कमलाबाई प्रभाकर (अपक्ष), गव्हाळे आशाबाई नाना (रिपाइं), जंजाळ सुनंदाबाई एकनाथ (रॉष्ट्रवादी काँग्रेस), पवार साळुकाबाई भरतसिंग (अपक्ष), बोरसे वैशाली नितीन (काँग्रेस), राठोड अरुणाबाई विलासचंद्र (भाजप), राठोड मोनाली राजेंद्र (शिवसेना), राठोड विमलबाई राजेंद्र (अपक्ष), सपकाळ मनीषा राजेंद्र (रायभान आघाडी),

पंचायत समिती गणातील उमेदवार पुढीलप्रमाणेः फर्दापूर- अनिता राजेश काळे (भाजप), रस्तुलाबी उस्मान्खान पठाण (एमआयएम), शेख असिफाबी इसा (रॉष्ट्रवादी काँग्रेस), शेवगण ज्योतीबाई मनोज (शिवसेना), सय्यद जैनबी हसनली (एमआयएम), सावळदबरा- कोळपे विठ्ठल (अपक्ष), चव्हाण धरमसिंग (काँग्रेस), चव्हाण भुरेलाल (रॉष्ट्रवादी काँग्रेस), चव्हाण रमेश (अपक्ष),चोपडे शिवाप्पा (अपक्ष), जाधव नेमीचंद (अपक्ष) टिकारे ज्योतीबाई विनोद, (भाजप), बंडे प्रभाकर (अपक्ष), राठोड दशरथ (अपक्ष), राठोड पंडित (अपक्ष), राठोड विलास (शिवसेना), लोखंडे रेखाबाई सुनील (अपक्ष), आमखेडा- पवार गजानन (अपक्ष), मोरे सिदार्थ (राष्ट्रवादी काँग्रेस), मडवे अनिल (अपक्ष), रावळकर दीपक (शिवसेना), सोनवणे (काँग्रेस), सोनवणे संजीवन (भाजप), सोनवणे संदीप (अपक्ष), निंबायती- गव्हाले ज्योतीबाई आनंदा (काँग्रेस), पाटील प्रतिभाबाई समाधान (अपक्ष), पालकर वंदनाबाई गणेश (शिवसेना), मोरे अलकाबाई उत्तम (अपक्ष), राठोड लताबाई विकास (भाजप), शेख नसरीन रईस (एमआयएम), गोंदेगाव- गायकवाड मीराबाई सीताराम (भाजप), गायकवाड साहेबराव (शिवसेना), बरडे मोसम (काँग्रेस), बागुल दामू (अपक्ष), बेडकुंले दीपक (रॉष्ट्रवादी काँग्रेस), लाडके सुनील (रायभान आघाडी),सोनवणे प्रियतम (रिपाइं), बनोटी- चौधरी भाग्यश्री आनंदा (भाजप), चौधरी लताबाई आनंदा (अपक्ष), जाधव प्रतिभा महेंद्र (काँग्रेस), पाटील रंजनाबाई मुरलीधर (रायभान आघाडी), पाटील वैभवी सागर (शिवसेना), मोठे संगीताबाई गोपीनाथ (रॉष्ट्रवादी काँग्रेस).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप, शिवसेनेविरुद्ध गदानाकरांचे बंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

गदाना येथील रहिवासी शिवसेनेच्या रेखा प्रकाश चव्हाण आणि भाजपच्या सोनाली चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने गदाना ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. गदाना येथील राजकीय हालचालींना वेग आला असून ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी बैठक घेऊन शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवारी नाकारल्यामुळे नाराजी व्यक्त केली. या बैठकीत एका उमेदवाराबद्दल निर्णय घेऊन गावाने त्याच्या पाठिशी राहण्याचा निर्धार करण्यात आला.

गदाना येथील गावकऱ्यांनी माजी तालुकाप्रमुख कारभारी जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांच्या विरोधात रोष व्यक्त करत या बैठकीत घोषणाबाजी केली. यामुळे शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गदाना येथे अडीच हजार मतदार असून हे गाव निर्णायक आहे. एका उमेदवारामागे ठाम राहण्याचा ठराव बैठकीत ग्रामस्थांनी घेतला आहे. या बैठकीत गावाच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

जुने शिवसैनिक व नवीन शिवसैनिक असा वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या उमेदवाराचे काम करत किती दिवस फरफटत जायचे, असा प्रश्न जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना पडला आहे. शिवसेनेची ताकद असलेला गदाना गट व गण गदाना येथील एकच उमेदवार उभा करून निवडणूक लढवून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा निर्धार गदाना ग्रामस्थांनी केला आहे. गदाना येथील या बैठकीस ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. एकंदरीत आजी-माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेची असलेली ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक कोणालाच सोपी नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप हाच मुख्य शत्रू; खासदार खैरेंचा आरोप

$
0
0

वैजापूर : ‘भाजप हाच शिवसेनेचा मुख्य शत्रू असून पैशाच्या जोरावर ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उतरले आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा नारळ शुक्रवारी सराला बेट व लासूरगाव येथे फोडण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. नोटबंदीमुळे जिल्ह्यातील २८ हजार कामगार घरी बेरोजगार झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

‘केंद्र व राज्य सरकार केवळ भाषणबाजी करून जनतेची दिशाभूल व फसवणूक करीत आहेत. तीच तीच भाषणे ऐकून कंटाळा आला आहे. नोटबंदीला ८० दिवस उलटूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. नोटबंदीमुळे कामगारांचे मोठे नुकसान झाले,’ असे खासदार खैरे म्हणाले. प्रचाराचा नारळ फोडण्याआधी वैजापूर शहरातील लाडगाव चौफुली पासून वाहनफेरी काढण्यात आली. सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचे उमेदवारांनी आशीर्वाद घेतले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भाजपच्या अडीच वर्षांत काळात महागाई वाढल्याच आरोप केला. काळा पैसा, राम मंदिर, महागाई, भ्रष्टाचार या मुद्द्यावर निवडणूक जिंकली, पण एकाही आश्वासनाची पूर्तता केली नसल्याकडे लक्ष वेधले.

सभापती बदलून कमाई

‘काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेतील सत्ताकाळात एकही विकास काम केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीत केवळ पैसे कमावण्याचे काम केले. दर सहा महिन्यांनी सभापती बदलून लाखो रुपये कमावले,’ असा आरोप माजी आमदार आर. एम. वाणी यांनी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे नाव न घेता केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेची पैठणमध्ये अस्तित्वाची लढाई

$
0
0

पैठण : गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पैठण तालुक्यामध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या निवडणुकीत मोठी पंचायत झाली आहे. या पक्षावर तालुक्यात अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे. सर्व जागांवर उमेदवार न मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या पाच जागेवर हा पक्ष लढत आहे.

२००९ च्या विधानसभा निवणुकीत मनसेचे उमेदवार डॉ. सुनील शिंदे यांना जवळपास २७ हजार मते मिळाली होती. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पिंपळवाडी गटातून सुनील शिंदे व बिडकीन गटातून शीला चव्हाण, पंचायत समितीच्या गणातून पुष्पा केदारे, कृष्णा गिधाने, विठ्ठल मोगल व मुक्ताबाई सोलाटे हे निवडणूक आले होते. पंचायत समिती सभापती पुष्पा केदारे यांनी पंचायत समितीचे सभापती व कृष्णा गिधाने यांनी उपसभापती पद भूषवले. मात्र, नगरपालिका निवडणूक काळात डॉ. शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केल्याने तालुक्यातील मनसेची अवस्था कठीण झाली. तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने कार्यकर्ते विजय चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी निवड होताच, तालुक्यामध्ये शेवटच्या घटका मोजत असलेल्या मनसेला पुन्हा संघटित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षातर्फे पंचायत समितीच्या बिडकीन, निलजगाव, आडुळ, बालानगर व लोहगाव या पाच गणात उमेदवार उभे आहेत. विजय चव्हाण स्वतः बिडकीन जिल्हा परिषद गट व त्यांची पत्नी शीला चव्हाण या आडुळ गटातून मनसेकडून निवडणूक लढवीत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद सभापती असताना चव्हाण यांनी केलेल्या विकास कामांवर भर दिला जाणार आहे.

लोकप्रतिनिधींची सोडचिठ्ठी

गेल्या एक वर्षांपासून तालुक्यात मनसेला उतरती कळा लागली. उपसभापती कृष्णा गिधाने यांनी मनसे सोडून शिवसेनेचा रस्ता धरला. नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री पैठणला आले असता, त्यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुनील शिंदे, पंचायत समिती सभापती पुष्पा केदारे, मनसे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब सोलाटे यांनी मनसेला सोडचिट्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावरील प्रचारावर बारिक लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक प्रशासनाचे सोशल मीडिया वरील प्रचारावर लक्ष राहणार आहे. आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याने सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्या उमेदवारांना सावध राहावे लागणार आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी पथक स्थापन करण्यात येत आहे.

विरोधी उमेदवार अथवा पक्षावर टीका करतांना काळजी घेतली नाही, तर गुन्हा दाखल होऊन अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आली आहेत. जाहिराती व पोस्टरद्वारे उमेदवार व राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचार करीत असल्याने इलेक्ट्रनिक मीडिया प्रिंट मीडिया याप्रमाणे सोशल मीडियाच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या करीता जिल्हास्तरावर पथक निर्माण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पथकाने सोशल मीडियावरील जाहिराती व पोस्टची तपासणी करून त्यामध्ये काही अक्षेपार्ह बाबी आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. आक्षेपार्ह बाब नसेल तरी देखील अशा जाहिराती करिता झालेल्या खर्चाचा उमेदवाराच्या खर्चामध्ये सामावेश करण्याच्या दृष्टिकोनातून ही माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातब्बरांचे बंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील वांजरगाव, महालगाव व सवंदगाव या जिल्हा परिषद गटात पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवण्यासाठी अर्ज भरले आहेत. त्यांनी अर्ज कायम ठेवल्यास या तिन्ही गटात शिवसेना, भाजप व काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना मातब्बर बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे.

वांजरगाव गटात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी कलापुरे, सवंदगाव गटात शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सभापती नीता राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अर्ज दाखल केला. महालगाव गटातून काँग्रेसचे भाऊसाहेब झिंझुर्डे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपसभापती अॅड. प्रताप निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे न घेतल्यास शिवसेना, भारतीय जनता पक्ष व काँग्रेसला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पक्षांची जिल्हा परिषद गटातील राजकीय समिकरणे बदलू शकतात. बंडखोरी झाल्यामुळे या गटातील लढती कशा राहतील यांचे आराखडे बांधण्यास आत्तापासून सुरुवात झाली आहे. तालुुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून सर्वसाधारण जागेसाठी असलेला महालगाव हा गट काँग्रेसला सुटला आहे. शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या या गटातून शिवसेनेने माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे यांना उमेदवारी दिली आहे, काँग्रेसने खरेदी विक्री सघाचे अध्यक्ष प्रमोद शहादराव नांगरे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, या गटातून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले भाऊसाहेब झिंझुर्डे व माजी उपसभापती अॅड. प्रताप निंबाळकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. त्यांनी अखेरच्या दिवशी अर्ज माघारी न घेतल्यास काँग्रेस व शिवसेनेच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. या गटातून भाजपने नितीन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. वांजरगाव गटात भाजपने दत्तात्रय धुमाळ यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी कलापुरे यांनी या गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. या गटातून काँग्रेसचे पंकज ठोंबरे व शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते रमेश पाटील सावंत यांच्यात काट्याची लढत होणार आहे.

राजपूत यांच्यामुळे संवदगावकडे लक्ष

सवंदगाव गटातून शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत व नंदकुमार शिंदे हे दोघेही इच्छुक होते. ही जागा महिलेसाठी राखीव असल्याने त्यांच्या सौभाग्यवतींना तिकिट मिळावे म्हणून दोन्ही सदस्यांनी जोरदार प्रयत्न केले. परंतु, राजपूत यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेना सोडुून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे शिवसेनेला खिंचार पडल्याचे मानले जाते. सवंदगाव म्हणजे पूर्वीच्या आघुर गटात पक्षाची हक्काची मते असल्याने शिंदे हेच विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेला वाटत आहे. दुसरीकडे पंचायत समितीत नऊ जागा जिंकून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामील झालेल्या राजपूत यांना सुद्धा जिंकण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही लढत लक्षणीय होणार आहे. या गटात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, असा मुकाबला रंगणार आहे. शिवसेनच्या उमेदवार पद्माबाई नंदकुमार शिंदे विजयी होतात की राजपूत बाजी मारतात याबद्दल उत्सुकता आहे.

गटांचे आरक्षण

लासूरगाव - सर्वसाधारण महिला

महालगाव - सर्वसाधारण

वांजरगाव - सर्वसाधारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅन्सर’वर रणरागिणींची मात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कॅन्सरचे नाव घेतले तरी बहुतेकांच्या अंगावर काटा येतो; परंतु शहरातील दोन रणरागिणींच्या कडव्या लढाईने चक्क कर्करोगानेही हात टेकले आहेत. तब्बल दहा वर्षांपूर्वी जडलेल्या कर्करोगातून शहरातील ईएसआयसी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दुर्गा डोईफोडे या मोठ्या हिमतीने बाहेर पडल्या आहेत, तर तीन वर्षांपूर्वी जडलेल्या कर्करोगातून आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी मोठ्या धिटाईने मार्गक्रमण केले. विशेष म्हणजे सर्व प्रकारचे उपचार नेटाने पूर्ण करून दोन्ही रणरागिणीनी पुन्हा आपापल्या कार्यात मग्न झाल्या आहेत आणि स्वतःच्या लढ्याचे मूर्तीमंत उदाहरण समोजासमोर ठेऊन समस्त कर्करोगग्रस्त महिलांना मात करण्याची विलक्षण प्रेरणा दिली आहे.

डॉ. दुर्गा डोईफोडे या ईएसआयसी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना २००७ मध्ये त्यांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. डॉ. दुर्गा स्वतः स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच पती डॉ. संजय मोतीवाले हे कान-नाक-घसातज्ज्ञ; तरीदेखील कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघेही घाबरले आणि भविष्याच्या चिंतेतून अनेकदा आश्रुंना वाट मोकळी करून दिली. मात्र, अश्रूंना बांध घालून तिघांनीही कॅन्सरवर मात करण्याचा विडाच उचलला आणि शस्त्रक्रियेचा तातडीने निर्णय घेऊन निदानानंतरच्या काही दिवसांतच डॉ. विजय बोरगावकर यांनी शस्त्रक्रिया फत्ते केली. अगदी जवळजवळच्या दोन गाठींमुळे झपाट्याने शरीरारात कॅन्सर पसरण्याची भीती होती आणि त्यामुळेच तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय योग्यच ठरला. शस्त्रक्रियेनंतर अगदी तिसऱ्या-चौथ्या महिन्यात किमोथेरपी सुरू करण्यात आली आणि त्याची सुरुवात व नियोजन दिल्लीतील राजीव गांधी कॅन्सर रिसर्च हॉस्पिटलमध्ये झाले. पुढच्या किमोथेरपीच्या सायकल त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूर्ण केल्या. शस्त्रक्रियेसह प्रत्येक सायकल व प्रत्येक उपचार अगदी वेळेवर व नियोजनानुसारच होत होते, ते केवळ डॉ. दुर्गा यांच्या प्रकृतीने साथ दिल्यामुळेच आणि दुर्गा यांची प्रकृती सर्व कठीण उपचारांना साथ देत होती ती केवळ पती डॉ. संजय मोतीवाले यांनी घेतलेल्या काळजीमुळेच. दुर्गा यांचे उपचार सुरू होताच इन्फेक्शन किंवा साधी जखमदेखील होऊ नये म्हणून संजय यांनी घरच्या स्वयंपाकाची व इतर सर्व कामांची स्वतः जबाबदारी घेतली. दुर्गा यांना उपचारादरम्यान दीड वर्ष पूर्ण आराम मिळावा म्हणून संजय स्वतः कणकण झिजले आणि दुर्गा यांना कॅन्सरमुक्त करण्यासाठी दोघांनी किंबहुना तिघांनी एकत्र लढा दिला. त्यांचा १० वर्षांचा मुलगा संजय यांच्या मित्राच्या घरी राहिला आणि एकही दिवस शाळा-अभ्यास न बुडवता त्याने आई-वडिलांना उभारी दिली. पत्नीवर मनापासून प्रेम असल्याशिवाय व तिची संपूर्ण काळजी घेतल्याशिवाय पत्नी कॅन्सरमुक्त होऊ शकत नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे डॉ. संजय मोतीवाले यांनी ‘मटा’ला सांगितले.

संयमाने दिला कडवा लढा

२०१४ मध्ये अलका कर्णिक यांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आणि त्यानंतरच कॅन्सर हा शरीर-मनासह सामाजिक, आर्थिकदृष्ट्या खिळखिळा करणारा आजार असल्याचे खऱ्याअर्थाने लक्षात आले. अनेक शासकीय योजना असल्या तरी असंख्य तपासण्या व निदान चाचण्या कराव्या लागतात आणि त्यासाठी पैसा लागतोच. ‘आपल्यालाच का’, या प्रश्नासह ‘हे तर कर्माचे भोग’ असे सामाजिक दडपणही कळत-नकळत ठायी-ठायी येतेच. या सगळ्याबरोबरच उत्तम रिझल्टसाठी प्रत्येक उपचार-शस्त्रक्रिया अगदी गणितीय पद्धतीनुसार व ठराविक वेळेत कराव्याच लागतात. मात्र, अत्यंत कठीण उपचारांमुळेच केसांपासून ते हाडांपर्यंत अनेक प्रकारचे त्रास होतात आणि अगदी रोज होतात. या सर्वांवर केवळ संयमाने व जिद्दीने मात करता येते आणि त्यामुळेच मी यातून बाहेर येऊन पुन्हा नोकरी करीत आहे, असे अलका कर्णिक यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपचाराचा बनाव; विमा कंपनीला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन अपघाताच्या नावाखाली बनावट कागदपत्र सादर करत एका विमा कंपनीची पावणेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकारचे २० पेक्षा जास्त प्रकरणे असून मोठे रॅकेट असावे, अशी शक्यता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. याप्रकरणी महापालिकेत कार्यरत एक डॉक्टर व पोलिस कर्मचाऱ्यासह तीन जणांना वेदांतनगर पोलिसांनी अटक केली आहे.

अपघात झाल्यानंतर नुकसान भरपाईसाठी दावे दाखल करून विमा कंपनीची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांच्या निर्देशानुसार याप्रकरणी तपास करण्यात आला व विमा कंपनीची फसवणूक करण्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. ५ एप्रिल २०१५ रोजी पुंडलिकनगर येथे रिक्षा व टेम्पो अपघातप्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी लोकअदालतमध्ये तडजोड होऊन जखमींना पावणेसात लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली होती. याप्रकरणातील; तसेच डिस्प्युट क्रमांक ८४/२०१६ प्रकरणातील जखमीचे आडनाव सारखेच आहे. त्यांच्यावर त्रिमूर्ती चौकातील मोहरीर जनरल हॉस्पिटल अँड नर्सिंग होममधील डॉ. उमेश त्रिभुवन यांनी उपचार केल्याचे कागदोपत्री दिसून आले. पण, त्रिमूर्ती चौकात या नावाचे हॉस्पिटल नसून डॉ. महेश मोहरीर हे मोहरीर हॉस्पिटल (बालरोग तज्ज्ञ) चालवित असल्याचे समोर आले. डॉ. मोहरीर यांनीच डॉ. त्रिभुवन नावाचे खोटे कादगपत्र तयार करून त्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. इतर काही नुकसान भरपाई दाव्यातील जखमींना अस्तितावात नसलेल्या जवाहर कॉलनीतील विष्णू हॉस्पिटलमध्ये औषधोपचार केल्याचे दाखविण्यात आले आहे. शिवाय साई अॅक्सिडेंट हॉस्पिटल, जनता हॉस्पिटल आदी अस्तित्वात नसलेल्या काही हॉस्पिटलमध्येही नुकसान भरपाईसाठी दावा केलेल्या वाहन अपघातातील जखमींवर उपचार झाल्याचे दाखविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

याप्रकरणी उपायुक्त संदीप आटोळे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे अधिकारी उन्मेष थिटे यांनी चौकशी केली. फसवणुकीचा प्रकार समोर येताच एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी सतीश औचार यांच्या तक्रारीवरून डॉ. महेश मोहरीर (वय ४२, रा. खिंवसरा पार्क), पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. आर. शेख आणि शेख लतीफ शेख अब्दुल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे हे करत आहेत.

अनेक प्रकरणात शेख तपास अधिकारी

बहुतेक प्रकरणाचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. आर. शेख याने केल्याचे समोर आले. शेख हे सध्या सिटीचौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. शेख याच्यासह अन्य दोन हेडकॉन्स्टेबल यांच्याकडे काही अपघात प्रकरणाचा तपास होता. या तिघांची इतर प्रकरणात काय भूमिका आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

२३ प्रकरणे संशयास्पद

सिटीचौक, मुकुंदवाडी, उस्मानपुरा तसेच छावणी पोलिस स्टेशनमध्ये दाखल एकूण गुन्ह्यांपैकी सुमारे २३ अपघाताच्या प्रकरणात अशाच पद्धतीने बनावट कागदपत्राच्या आधारे गंडा घालण्यात आल्याचा संशय आहे.

डॉ. मोहरीर पालिकेत कंत्राटावर

याप्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी डॉ. मोहरीर हे सध्या महापालिकेत एनयुएचएम योजनेत कंत्राटी पद्धतीने काम करतात. शिवाय ते डॉक्टरांची संघटना, आयएमएचे सचिव आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघांच्या बछड्यांना रोज दोन तास तालीम

$
0
0

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या बछड्यांना रोज दोन तास खुल्या वातावरणात फिरण्याची, बागडण्याची तालीम दिली जात आहे. पंधरा दिवसानंतर त्यांना पूर्णवेळ खुल्या पिंजऱ्यात सोडले जाण्याची शक्यता आहे.

प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या पिवळ्या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला. तीन पैकी एक पांढरा, तर दोन पिवळे बछडे आहेत. पांढऱ्या बछड्याचे नाव वीर असे ठेवण्यात आले आहे, तर अन्य दोन बछड्यांची नावे शक्ती व भक्ती अशी आहेत. तीन महिन्यांच्या या बछड्यांना आता त्यांच्या आईसह खुल्या पिंजऱ्यात मोकळ्या वातावरणात फिरण्याची, बागडण्याची तालीम दिली जात आहे. सकाळी नऊ ते अकरा असे दोन तास त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडले जाते. यावेळेत उन्ह देखील कोवळे असते, त्याचा त्रास बछड्यांना होत नाही. अकरा वाजता बछड्यांना पिंजऱ्यात घेतले जाते. पुढील आठवड्यात सकाळी दोन तास व सायंकाळी दोन तास बछड्यांना खुल्या वातावरणात सोडले जाणार आहे. पिंजऱ्यातील खुल्या वातावरणाशी रुळल्यावर त्यांना त्यांच्या आईसह पूर्णवेळ खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहे. मात्र, यासाठी पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरपाई निवडणुकीनंतर

$
0
0

औरंगाबादः नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीनंतर सुरू होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. सुमारे ७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सोळा टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून निव‌िदा प्राप्त झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी या रस्त्याची घोषणा केली होती. नागपूर ते मुंबई हा ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना मोपलवार म्हणाले, की सध्या हंमागी बागायतीची संकल्पना राबविली जात आहे. जमिनीची भरपाई द्यायची की लँड पुलिंग सिस्टिम पद्धतीने शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा, याचा निर्णय घेतला जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीनंतर घेण्यात येणार आहे. पूर्व अर्हता निविदा या महिनाअखेर पूर्ण होतील. ७०० किलोमीटरच्या रस्त्याचे सोळा टप्पे केले अाहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंत्राटदारांकडून निविदा प्राप्त झाल्या आहेत. आजवर मलेशिया, कोरिया, युक्रेन, जपान, इंग्लंड आदी देशांसह भारतातून ४५ जणांनी निविदा दाखल झाल्या आहेत. कोट्यवधींची कामे करण्याची तयारी आणि पूर्वानूभव या निकषांच्या आधारे ही कामे पात्र कंत्राटदारांना देण्यात येतील.

मोपलवार म्हणाले, की समृद्धी महामार्गालगत असलेल्या जोडरस्त्याची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाणार आहेत, पण राज्यातील ही कामे एमएसआरडीसीमार्फत केली जातील. नऊ फेब्रुवारीपासून या कामांना सुरुवात होईल. पुढील दोन वर्षांत ही कामे समृद्धी महामार्गासोबत पूर्ण होतील. नागपूर-मुंबई महामार्गादरम्यान सात ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल येणार आहेत. या पुलाचे डिझाइन आम्ही रेल्वे खात्याकडे पाठविले असून, त्यास तांत्रिक मान्यताही मिळाली आहे. आमच्या रस्त्यांची कामे सुरू झाल्यानंतर रेल्वे खात्याकडून पुलांची उभारणी सुरू होईल. त्यामुळे रस्ता उभारणीत संलग्नता राहील. केंद्रीय पर्यावरण व वनखात्याकडून अनुक्रमे फेब्रुवारी व मे अखेर ना हरकत प्रमाणपत्र मिळेल, त्यानंतर या रस्त्याच्या कामाला वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तेच दंश करिती, साप हे विषारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंचवीस वर्षांपूर्वी चार मुली, दोन मुले मागे ठेऊन नवऱ्याने जग सोडले. तेव्हा हीराबाई जाधव या माऊलीने काबाडकष्टाने आणि मोठ्या धैर्याने आपला संसार उभा केला. मात्र, याच पोटच्या लेकरांनी उतारवयात आईवर जीव देण्याची वेळ आणली. ह्रदय पिळवटून टाकणारी ही घटना शुक्रवारी संग्रामनगर रेल्वे रुळावर घडली. या हीराबाईंना परिसरातील नागरिकांनी वाचवले. तेव्हाही त्यांनी, ‘मला मरू द्या, मला मुलांकडे जायचे नाही,’ असाच टाहो फोडला.

शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हीराबाई नारायण जाधव (वय ६५, रा. शिवशंकर कॉलनी) या देवानगरी भागातून रेल्वे रुळांकडे निघाल्या. रेल्वेची वेळ झाली होती. त्याचवेळी ट्रॅकवर झोपलेल्या हीराबाईंना देवानगरी भागातील श्रीमंत गोर्डे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिले. त्यांनी तिकडे धाव घेतली. रुळांवर ही गर्दी पाहून नांदेड-मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस काही अंतरावर थांबली. लोकांनी समजूत घालून या महिलेला ट्रॅकपासून दूर नेले. मग रेल्वे काही क्षणातच धडधडत पुढे निघून गेली. हीराबाई यांची समजूत काढण्याचा प्रयत्न गोर्डे-पाटील, कैलास भातपुडे, ‌शशिकांत सूर्यवंशी, संदीप सुक्रे, नेत्रा जोशी, स्वराज गोर्डे-पाटील, स्नेहिल गोर्डे-पाटील यांनी केला. हीराबाई शिवशंकर कॉलनी भागात राहतात. त्या म्हणाल्या, ‘वैजापूरच्या खंडाळा गावात राहात असताना पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचे पती नारायण जाधव यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर चार मुली आणि दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी औरंगाबाद गाठले. धुणी-भांडी करून मुलांचे संगोपन केले. स्वतःचे घरही शिवशंकर कॉलनीत बांधले. मुला-मुलींचे लग्न चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले. मात्र, सुना आणि मुलांकडून छळ सुरू झाला. चार दिवसांपूर्वी मुलांनी घरातून हाकलून दिले. काही दिवस मुलीकडे राहिल्यानंतर मोठे जावई कृष्णा ढोबळे यांनी हीराबाईंना घरी नेऊन सोडले. घरी आलेल्या आईला पाणी विचारण्याचीही तसदी या मुलांनी आणि सुनांनी घेतली नाही. उलट, एका मुलाने मारहाण केली. म्हणून मी मुलांच्या छळाला वैतागून मरण्यासाठी निघाले.’ यानंतर श्रीमंत गोर्डे-पाटील यांनी या आईला संभाळण्याचा निर्णय घेतला.

...असेही परिश्रम

हीराबाईंनी मुलींच्या लग्नानंतर धुणी-भांडी करणे बरे दिसणार नाही, म्हणून घरातच लॉन्ड्री सुरू केली. त्या शिवशंकर कॉलनी, बालाजीनगर येथून लोकांच्या घरून कपडे आणायच्या आणि इस्त्री करून पुन्हा नेऊन देत होत्या.

मीच करणार सांभाळ

‘दोन दिवसांपूर्वी एका ३२ वर्षीय युवकाने, आईसोबत राहत नाही, आईची सेवा करू शकत नाही म्हणून जीव दिला होता. शुक्रवारी याच ठिकाणी पोटच्या मुलांनी छळ केल्यामुळे तिलाच जीव देण्याची वेळ आल्याचे उघडकीस आले. या माऊलीची व्यथा ऐकून आम्हालाच रडू आले. आता मीच या माऊलीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे श्रीमंत गोर्डे-पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही भोजन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळत नाहीए, मध्यमवर्गीय जनता महागाईनं हैराण आहे, मग कुठे आहेत 'अच्छे दिन'?, असा सवाल करत राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उस्मानाबादमध्ये सोन्याच्या ताटात जेवणावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, हाच का काँग्रेसचा गरिबांबद्दलचा कळवळा?, असा प्रश्न विचारला जात आहे.

उस्मानाबादमधील येणगूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषद प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील ही नेतेमंडळी सभेसाठी पोहोचली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. सोन्याचा मुलामा दिलेली ताटं-वाट्या डायनिंग टेबलवर मांडल्या होत्या आणि एकापेक्षा एक झक्कास पदार्थ घेऊन वाढपी सज्ज होते. नेत्यांच्या ताटातील एकेक वाटी सुग्रास पदार्थांनी भरत गेली. ते पाहून कुणालाच मोह आवरला नाही. सगळ्यांनीच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पोटावरून हात फिरवला.

अर्थात, हे शाही भोजन त्यांना पचणार का, हा प्रश्नच आहे. कारण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अनेक गरिबांच्या घरी जाऊन चक्क पत्रावळीवर जेवले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा हा डामडौल रुचेल का, याबद्दल शंका आहे.

याआधी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच शाही मेजवानीला स्पष्ट नकार दिला होता. बीडमधील दुष्काळी दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्यानं त्यांच्या भोजनाची जय्यत तयारी केली होती. परंतु, जनता दुष्काळात होरपळत असताना आपण हे शाही भोजन जेवणार नाही, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु, त्या चव्हाणांसारखा समंजसपणा अशोक चव्हाणांनी आणि इतर नेत्यांनीही दाखवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेऊर-आष्टी मार्गासाठी दहा कोटी

$
0
0

पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मानले प्रभूंचे आभार

म. टा. प्रतिनिधी, बीड

जेऊर ते आष्टी या बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी ते जेऊर ७० किलोमीटर या मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यवासियांच्या दृष्टीने दुधात साखर अशी भावना आहे. परळी-बीड-नगर हा रेल्वे मार्ग १९९५ मध्ये मंजूर करण्यात आला होता. २६१ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या करेल असे ठरले होते. या मार्गासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, या मार्गासाठी मोठी तरतूद कधीच झाली नाही. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वे मार्गाची बोळवण केली जात होती. वीस वर्षांत ३०० कोटी रुपयांचा निधी या मार्गाला मिळाला. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. २८०० कोटी प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिली. त्यासाठी निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ४१३ कोटी या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडचे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा रेल्वे प्रकल्प होता. दिवंगत मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदींनाच्या पूर्व संध्येला हा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केले होते. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हा मार्ग 2019 पर्यंत पूर्ण होणार असून सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परळीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय व रामेश्वर मुंडे यांच्यात लढत होत आहे. या पूर्वी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष साऱ्या राज्याने बघितला. गोपीनाथ मुंडेंच निधन झाल्यानंतर पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष तर सर्वश्रुत आहेच. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडेंचा संघर्ष मिनी मंत्रालयासाठी परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय मुंडे विरुद्ध रामेश्वर मुंडे यांच्यात पहावयास मिळणार आहे.

अजय मुंडे हे गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आणि पंकजा आणि धनंजयचे सख्खे चुलत भाऊ आहेत. तर रामेश्वर मुंडे हे धनंजय आणि पंकजा मुंडेचे सख्खे चुलत भाऊ आहेत. हे दोघे आताच चर्चत येण्याचे कारण या जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोघे भाऊ एकमेकासमोर उभे आहेत. ज्या वेळी धनंजय मुंडे यांनी बंड करून आपला वेगळा मार्ग पत्करला त्याच वेळी अजय मुंडे हे धनंजय मुंडे सोबत राष्ट्रवादीत आले. युवक राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करीत आहेत. या पूर्वी नाथ्रा ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध सरपंच राहिले. आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात त्यांचा सामना रामेश्वर मुंडे सोबत असणार आहे.

रामेश्वर मुंडे हे धनंजय मुंडेच्या बंडानंतर ही पंकजा मुंडे सोबतच राहिले. एक भाऊ दूर गेला तरी एक भाऊ पंकजासोबत स्थानिक राजकारण करीत होता. मात्र, अजय मुंडे यांच्या तुलनेत रामेश्वर राजकारणात नवखे आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गावात ही लढत होणार असल्याने शेतकरी अपल्यालाच मतदान देतील असे रामेश्वर मुंडेंना वाटते.
मागच्या पाच वर्षापासून परळीच्या सगळ्या छोट्या-मोठ्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजयचा सामना झालेला म्हणूनच आता परळीच्या पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात पुन्हा या भावंडातील लढत लक्षवेधी असणार आहे. या दोन मुंडेच्या लढतीत कस पंकजा व धनंजय यांचा लागणार आहे.

धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत तर पंकजा मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता भाऊबंदकीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘त्या’ कंत्राटदारावर आणखी एक गुन्हा

$
0
0



औरंगाबाद : बनावट स्वाक्षऱ्या करून सहा लाख ८१ हजार ६०० रुपयांचे बिल उचलल्याप्रकरणी अजिंठा पेस्ट कंट्रोलचे मालक योगीता रामदास ठोंबरे व त्यांचे सहाय्यक सुशांत देशपांडे यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी संबंधितांविरोधात १३ जानेवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे डास व किटकनिर्मूलनासाठी औषधींची फवारणी केली जाते. फवारणी यंत्रणा नसल्याने कंत्राटदारांकडून हे काम होते. ‘अजिंठा’ त्यापैकीच एक आहे. त्यांच्या मालकांनी महापालिकेतील लिपीकापासून आयुक्तांपर्यंत सर्वांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बिल उचलल्याचे जानेवारीत उघड झाले. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या आदेशाने संबंधितांविरोधात १३ जानेवारीला गुन्हा दाखल झाला. नंतर आणखी एक प्रकरण उघड झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीबाबत ‘मटा’तर्फे सोमवारी चर्चासत्र

$
0
0


औरंगाबाद : दहावीची परीक्षा! वर्षभर तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता या परीक्षेचे वेध लागले आहेत. अनेकांना परीक्षेचे टेन्शन आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’सुद्धा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरसावला आहे. दहावीचे पेपर नेमके कसे सोडवावेत, प्राधान्य कोणत्या गोष्टींना द्यावे, उत्तरांची रचना कशी असावी याविषयी ६ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शनपरसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना यात मार्गदर्शन करणार आहेत.
सिडको एन-२, एन-३, पुंडलिकनगर भागातील विद्यार्थ्यांसाठी एमआयटी हायस्कूलच्या सभागृहात येत्या ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दहावीची परीक्षेचे वेळापत्रक जसजसे जवळ येत आहे. तसतसे अनेकांना परीक्षेचे टेन्शन आले आहे. विद्यार्थ्यांचे हे परीक्षेचे टेन्शन दूर व्हावे या हेतूने ‘मटा’ने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात तज्ज्ञ शिक्षक गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांचे पेपर कसे सोडवावेत, या‌विषयी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तरांचे सत्रही होणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना सोबत वही व पेन आणावा. आपल्या शंका निर्धास्तपणे तज्ज्ञांना विचारून त्यांचे निरसन करून घ्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला धमकावणारा खंडणीबहाद्दर पसार

$
0
0


औरंगाबादः त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर यांना २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीसोबत आणखीन एक साथीदार असावा, अशी माहिती तपासात समोर येत आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही खंडणीबहाद्दराला पकडण्यात यश आले नाही.
डॉ. टाकळकर यांना गुरुवारी दुपारी चार वाजता हॉस्पिटलमध्ये शिरलेल्या खंडणीबहाद्दराने पिस्तूल रोखून खंडणीची मागणी केली. आपल्याला मुख्तारभाईने पाठवले असून या व्यक्तीने एकदा आपले नाव विष्णू सानप, तर एकदा अतुल सांगितले. डॉ. टाकळकर यांच्या कार्यालयातील स्टाफ जमा झाल्यानंतर आरोपीने पलायन केले. गेल्या दोन दिवसांपासून गुन्हे शाखेसह जिन्सी पोलिसांचे एक पथक खंडणीबहाद्दराच्या शोधात आहेत. त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. तर डॉ. टाकळकर यांच्या सुरक्षेसाठी दोन बंदुकधारी पोलिस दिवस-रात्र तैनात केले आहेत.

अटकेची अफवा
डॉ. टाकळकर यांना खंडणी मागणाऱ्या बहाद्दराला अटक करण्यात आली. त्याला मुख्तार भाईकडे नेण्यात आले. त्यांची ओळखपरेड देखील घेतल्याची अफवा शुक्रवारी सायंकाळी सुरू होती. मात्र, हे वृत्त निराधार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरला हवी ५०० कोटींची भरपाई

$
0
0


औरंगाबादः महापालिकेने बजावलेली टर्मिनेशनची नोटीस रद्द करा, काम करण्याची परवानगी द्या. हे करणे शक्य नसेल तर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला पाचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करणारा दावा कंपनीने लवादासमोर नुकताच दाखल केला.
समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात महापालिका आणि कंपनी यांच्यात वाद निर्माण झाला. पालिकेने कंपनीला टर्मिनेशनची नोटीस बजावली. या वादाच्या संदर्भात जे.टी. नाशिककर यांचा लवाद स्थापन करण्यात आला. लवादासमोर कंपनीचे विधीसल्लागार नितीन वांगीकर यांनी सहा खंडांचा १०८३ पानांचा दावा दाखल केला. कंपनीने लवादापुढे सादर केलेल्या दाव्याच्या प्रती सोमवारी पालिकेला दिल्या जाणार आहेत. या दाव्याला उत्तर देण्यासाठी पालिकेला एक महिन्यांचा अवधी आहे. दाव्याचे उत्तर देताना महापालिका कंपनीवर काउंटर क्लेम दाखल करू शकते. लवादासाठी कंपनीतर्फे सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता पी.एस. अंबिके यांची तर महापालिकेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव एस.आर. तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाचक्कीनंतर उपरती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वच्छता अभियानाच्या पाहणीसाठी आलेले केंद्राचे चौकशी पथक लाचखोरीत अडकल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत झालेली नाचक्की शमते न शमते तोच या शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे दुसरे पथक उद्या रविवारपासून दौऱ्यावर येत आहे. पूर्वीच्या पथकात तिघांचा समावेश होता. या पथकात चारजण असणार आहेत. चौथ्याची नियुक्ती निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेतर्फे देशपातळीवरील पाचशे शहराचे स्वच्छतेच्या बाबतीत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शहरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरत येथील न्यू स्टार डॉटकॉम या कंपनीला सोपवण्यात आले आहे. या कंपनीच्या शैलेश बंजानिया, विजय जोशी, गोविंद घिमारे तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती सर्वेक्षण करण्यासाठी करण्यात आली होती. या तिघांच्या पथकाने पिंपरी चिंचवड, नांदेड, अमरावती, हिंगणघाट या शहरांचे सर्वेक्षण केले आणि त्यानंतर ते २० जानेवारी रोजी औरंगाबाद शहरात स्वच्छतेच्या कामाचे सर्वेक्षण करण्यासाठी आले. स्वच्छतेच्या कामात शहराचे रँकिंग वाढवून देण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अडीच लाखांची लाच मागितली आणि १ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना शैलेश बंजानियाला अटक करण्यात आली.

लाचखोरीचे प्रकरण पालिकेच्या डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी उघड केले, त्यांनी ही बाब आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना सांगितली. बकोरिया यांच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देवून लाच घेताना बंजानियाला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकारामुळे औरंगाबाद शहरातील स्वच्छतेच्या कामाचे फेर सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणासाठी चार अधिकाऱ्यांचे पथक रविवारी सकाळीच शहरात दाखल होणार आहे. या पथकाबद्दल महापालिकेलाही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पथकात चारजण असतील, त्यापैकी एकजण निरीक्षक असेल. खासगी वाहन घेवून ते येणार आहेत. सकाळी नऊ वाजता ते थेट महापालिकेत येतील. आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांची चर्चा केल्यावर ते ‘फिल्ड’ वर रवाना होणार आहेत. मंगळवारपर्यंत ते शहरात असतील. महापालिकेतर्फे दोन अधिकाऱ्यांना पथकासोबत लायजनिंग ऑफिसर म्हणून पाठवले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images