Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अरे देवा, आता मुंबईला जायचं कसं ?

$
0
0
नाशिकजवळील घोटी येथे आज सकाळी मंगला एक्सप्रेस घसरून भीषण अपघात झाला.

आला अन्नसुरक्षेचा गहू आला...

$
0
0
केंद्र शासनाने अन्न सुरक्षेचा विधेयक देशाच्या संसदेत पास केला आहे. या अंतर्गत दोन महिन्याचा गहु साठवूण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

फूलशेतीचा ‘गंध’ उडाला

$
0
0
जिल्ह्यात फूलशेतीचे प्रमाण झपाट्याने कमी झाले असून केवळ ४० हेक्टरवर फूलशेती शिल्लक आहे. फूल विक्रीसाठी मध्यस्थांचा अभाव आणि कृषी विभागाच्या योजनांची माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फूलशेतीकडे पाठ फिरवली आहे.

CM दौ-यावर आंदोलनांचे सावट

$
0
0
उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये भाव द्यावा आणि दराची निश्चिती करूनच लातुरात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

रेल्वे सर्वेक्षणातून पैठण बाद

$
0
0
सोलापूर ते जळगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणातून पैठणला बाद करण्यात आले आहे. मध्यरेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात सोलापूर ते जळगाव या रेल्वेमार्गाचे जालना येथून एकच सर्वेक्षण करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कुंडात बुडून चौघांचा मृत्यू

$
0
0
माहूर गडावर रेणुकामातेच्या दर्शनासाठी गेलेल्या चार ‌भाविकांचा मातृतीर्थ कुंडात बुडाल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी ही दुर्घटना घडली. मृतामध्ये आई, मुलगा, विवाहित मुलगी व नातीचा समावेश असून, शहरातील गारखेडा भागातील ते क्षीरसागर कुटुंबातील हे सदस्य होते.

GAD कडून शिक्षकांच्या कामांना खोडा

$
0
0
जिल्हा परिषद शाळेतील जिल्ह्यातील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची विविध प्रश्न जिल्हा परिषद स्तरावर वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

सुधारित पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावाला विरोध

$
0
0
पाणीपुरवठा विभागांतर्गत मनूर (ता.वैजापूर) येथील मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित प्रस्तावाला शनिवारी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या बैठकीत विरोध करण्यात आला.

‘पदवीधर मतदारांची दुबार नावे वगळा’

$
0
0
मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमधील दुबार नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

कारगिल स्मृती उद्यानाच्या जागेचा होणार विकास

$
0
0
गारखेडा भागातील वॉर्ड क्रमांक ८४मधील नाथ प्रांगणाजवळ असलेल्या कारगिल स्मृती उद्यानाच्या जागेचा विकास होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

बजेटसंदर्भात शासन दरबारी सुनावणी

$
0
0
पालिकेच्या वाढीव १९९.३८ कोटींच्या बजेटच्या संदर्भात शासन दरबारी सुनावणी झाल्याची माहिती मिळाली आहे. शासनाने वाढीव बजेटला ‘स्टे’ दिल्याचीही चर्चा आहे.

कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मानापमान नाट्य

$
0
0
खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शन व अखंड हरिनाम सप्ताहात राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मानापमान नाट्य रंगले.

दंगल प्रकरणातील ९२ जणांवरील खटले मागे

$
0
0
औरंगाबाद शहरात सहा डिसेंबर १९९९ रोजी उसळलेल्या दंगलीतील ९२ जणांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचा राज्य शासनाचा विनंती अर्ज मान्य कोर्टाने मान्य केला आहे.

अखेर रंगीत निमंत्रणपत्रिका

$
0
0
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाची रंगीत निमंत्रणपत्रिका अखेर शनिवारी आली. पालिका प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांनी फोल्डिंगच्या आकारातील रंगीत पत्रिका काढणे भाग पडले.

मद्यपीने पत्नीस पेटविले

$
0
0
मद्यपीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. विश्रांतीनगर भागात शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली असून जिवे मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी आरोपी सुभाष बनकर विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

पाणी आले पण... पातळीत घट

$
0
0
जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागाच्या धरणातून सोडण्यात आलेले पाणी जायकवाडी प्रकल्पात येण्यास सुरुवात झाली आहे.

पैसे भरण्यास खदानधारक तयार

$
0
0
जिल्हा प्रशासनाने रॉयल्टीच्या प्रश्नावरून स्टोन क्रशर आणि खदानींना सील ठोकले आहे. खदानधारक पैसे भरण्यास तयार आहेत.

सभेत शेतकरी संघटनेची निदर्शने

$
0
0
उसाला साडेतीन हजार रुपये भाव दिलाच पाहिजे, अशा घोषणा देऊन शेतकरी संघटनेच्या, तर ‘इंदू मिलची जागा ताब्यात द्या’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे काम झालेच पाहिजे,’ अशा घोषणा पँथर संघर्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

ऊस दरासाठी पंतप्रधानांची भेट घेणार

$
0
0
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांचे आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ घेऊन पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लातूरमध्ये दिली.

संधीच्या शोधात तरुणाई

$
0
0
केंद्रीय युवक महोत्सवातील सप्तरंगी कलाविष्कार पाहताना मराठवाड्यातील अस्सल प्रतिभेची चुणूक दिसते. तीन दिवसांच्या उत्सवानंतर कलांचा आणि कलाकारांचा विसर पडेल, तो थेट पुढील वर्षांपर्यंत. म्हणूनच या अस्सल कलाकारांचा व्यावसायिक कार्यक्रम विद्यापीठाच्या पुढाकारातून सुरू झाल्यास मराठी कलाक्षेत्राला गुणवंत कलाकारांची फौज मिळू शकते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images