Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कर्मचाऱ्यांच्या वेतन व आणि निवृती वेतन तसेच भत्यांची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, या प्रलंबित मागणीसाठी एक मार्चपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कर्मचारी काळ्याफिती लावून काम करणार आहेत. चार मार्चपर्यंत निर्णय झाला नाही, तर पाच मार्चपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना कृती समितीने दिला आहे.
समितीचे सरचिटणीस दिलीप वेलके यांनी कळविले आहे, की राज्य सरकारने कृष्णा, तापी, विदर्भ, गोदावरी-मराठवाडा आणि कोकण खोऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतन भत्त्यांचे दायित्व स्वीकारले आहे. या निर्णयाप्रमाणेच शासनाने १९७६ मध्ये स्थापन झालेल्या जीवन प्राधिकरणातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा, अशी मागणी प्राधिकरणाकडून होत आहे. २००५ मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णयही झाला. परंतु, सरकारच्या चालढकलपणामुळे या निर्णयावर अद्याप कुठल्याच प्रकारची प्रत्यक्ष कृती झालेली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना कृती समितीने आता याविरोधात पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. एक मार्चपासून आंदोलनाचे नियोजन करण्या आल्याचे वेलके यांनी सांगितले. यावेळी आनंत कुलकर्णी, संजय टोणपे, बाबासाहेब साळूंके, ए. एम.घुगे, समित भुईगळ, किरण अडगावकर तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे बी. बी. रांजणगावकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संत रविदासांची जयंती पडेगावात उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
येथील सुंदरनगर येथे संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची रविवारी जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पडेगाव ते सुंदरनगर या मार्गावर मिरवणूक निघाली. या मिरवणुकीमध्ये सजीव देखावे सादर करण्यात आले.
मिरवणुकीत महिला, पुरूष, बालके सामील झाले होते. मिरवणुकीचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला. मिरवणुकीनंतर महिला व मुलींच्या संगीत खुर्ची स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी चर्मकार उठाव संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे, विजय धस, गौतम सातपुते, माकणे, राहुल यल्दी, गोपी तुपे, हरिश दुबिले, लक्ष्मण रईवाले, गणेश रईवाले, रमेश कुचे, शामलाल धुपे, कैलास निंभोरे, गुलाब ननवरे, धोंडिराम लष्करे, देवलाल निंभोरे, दिलीप भेंडे, संतोष धनतोले, गुलाब शिराळे, कैलास पुसे, दगडू बरथुने, रंजोश बरभरे, राजेश फुलमाळी, संजय शिकरे, रमेश निंभोरे, राजू शिंगणे, रवी पवार यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जियो शारदा मंदिर

$
0
0



- प्रा. दिनकर बोरीकर

पृथ्वी नावाच्या धरतीवर आकाशातून सृष्टीला, सर्व सजीवांना प्रकाश आणि उष्णता देणारा जसा ‘सूर्य’ आहे तसाच अंधारातही पुसटचा प्रकाश देणारा आणि धरतीला शीतलता देणारा ‘चंद्र’ही आहे. उष्णता आणि शीतलता दोन्हींची गरज असते आणि त्यांच्या दोहोत एक समतोल असतो. अगदी अशीच स्थिती स. भु. शिक्षण संस्थेची आहे. स. भु. प्रशाला औरंगाबाद सूर्याचे काम करते, तर शारदा मंदिर कन्या प्रशाला चंद्राचे प्रतिनिधीत्व करते. या दोन्ही शाळांतून प्रत्यक्ष कामगिरीतून कोणीही गौण नाही. उलट दोघांमध्ये एक प्रकारची स्पर्धा चालू असते. काही वेळेस शारदा मंदिर कन्या प्रशालेने स. भु. प्रशालेवर मात केल्याचे चित्र दिसून येते. महिला ही ‘अबला’ असते, तिचे सक्षमीकरण वाढून ती पुरुषाच्या तुलनेवर ‘सबला’ होईल, यावर अनेक भाषणे दिली जातात, लेख लिहिले जातात, चळवळी चालविल्या जातात. मात्र, स. भु. शिक्षण संस्थेने अशा कोणत्याही स्पर्धेत न उतरता आपल्या कृतीतून पुरुष आणि महिला समसमान आहे, हे दाखवून दिले आहे. म्हणूनच की काय शंभर वर्षांपूर्वी ध्येयवेड्या व द्रष्ट्या व्यक्तींनी महिलांसाठी खास शिक्षण देणारी मुलींची शाळा असावी, या दृष्टीने प्रत्यक्षात भक्कम पाऊलही उचलले. त्याचाच परिणाम म्हणजे १९१६चा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त साधला आणि शारदा मंदिर कन्या प्रशाला या शाळेचा उदय झाला.
शंभर वर्षांपूर्वीचा काळ लक्षात घेता, वातावरण निजामी राजवटीचे, रस्त्यावर स्त्रीचे दर्शन होणे अवघड. अशा परिस्थितीत राजारामपंत पोळ यांनी पुढाकार घेतला आणि वसंतराव वसिष्ठ यांना सोबत घेतले आणि गोकुळ अष्टमीच्या दिवशी मुलींसाठी खास शाळा सुरू केली. जिच्या हाती पाळण्याची दोरी असते, तिच्या हाती पिढ्यांचे भवितव्यही असते. हे लक्षात घेऊन अत्यंत योग्य असे पाऊल त्यावेळी उचलले गेले. स्थापनेच्या आरंभीच या शाळेला मान्यता देतांना शंका-कुशंका व्यक्त करण्यात आल्या. ‘आप लडकियों को भी बागी करना चाहते हो क्या?’ असे तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारल्याची नोंद आहे.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या त्यावेळच्या धुरीणांनी द्रष्टेपण दाखवले, त्याची फळे आता समाजाला मिळत आहेत. ही कन्या प्रशाला सुरू करण्यामागचा उद्देश हाच होता की, मुलींनादेखील मातृभाषेतून शिक्षण द्यावे. जेणेकरून या प्रशालेच्या बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनींची नवीन पिढी कर्तबगार कशी बनेल याची काळजी घेता येईल. श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला १९१६मध्ये सुरू झाली. त्यावेळी एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या २१ होती, क्रमाक्रमाने ही संख्या वाढत गेली आणि घटकेला एक हजार ७७८ संख्या आहे आणि शिक्षक संख्या ५० आहे. असे एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात शारदा मंदिर कन्या प्रशालेने आपला ठसा उमटवला नसेल. शैक्षणिक बाबतीत बोलायचे झाल्यास ही शाळा नेहमी पहिल्या तीन क्रमांकामध्ये राहत आलेली आहे. अनेकदा या शाळेने आपला क्रमांक कधीही सोडला नाही. शिवाय नृत्य, गायन, अभिनय, लेखन, वर्क्तृत्व अशा विविध कला क्षेत्रांतही ही संस्था अग्रेसर राहत आलेली आहे. दोन उल्लेख करू इच्छितो, अपर्णा जोशी या नावाची एक विद्यार्थिनी. ती शैक्षणिक क्षेत्राबरोबरच विविध कला क्षेत्रात पहिली राहत आलेली. दुर्दैवाने शारदा मंदिरची ही हरहुन्नरी कन्या एका अपघातात काळाने हिरावून घेतली. दुसरा उल्लेख करावासा वाटतो तो मुग्धा अतुल मिरजगावकर या कन्येचा. तिचा बुध्यांक प्रचंड होता, समज खूप व्यापक आणि सखोल होता. स्मृती नेहमीच तल्लख आणि ताजी राहत होती. पण निसर्गाने तिच्यावर अन्याय केलेला होता. तिच्या शरीराचे स्नायू कार्यरत होत नव्हते. शारदा मंदिरच्या संपूर्ण तिच्याबरोबरच्या विद्यार्थिनींची आणि सर्व शिक्षिका यांची अत्यंत लाडकी होती. दुर्दैवाने तिचे अकाली निधन झाले. या दोन्ही कन्या अंगभूत गुणांमुळे अग्रेसर तर राहिल्याच परंतु त्याचबरोबर शारदा मंदिर प्रशालेने त्यांच्या संगोपनात जिवापाड लक्ष घातले. या शाळेला पहिल्या मुख्याध्यापिका लाभल्या त्यांचे नाव श्रीमती भागिरथीबाई उर्फ बबूताई गोडबोले. नंतर क्रमाक्रमाने मुख्याध्यापिका लाभत गेल्या. या सगळ्याच मुख्याध्यापिका प्रशासनात तरबेज तर होत्याच, शिस्तीने कडक होत्या. कणव आणि प्रेम याची कास त्यांनी कधीच सोडली नाही.
शारदा मंदिर कन्या प्रशालेत संस्कृत विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींची फार मोठी संख्या होती आणि शंभरपैकी शंभर असा निकाल सतत तीन वर्ष या शाळेत लागला. तिन्ही वर्षी त्यासाठी जो पुरस्कार ठेवण्यात आलेला होता, तो या शाळेने पटकावला. या कन्या प्रशालेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनी आपल्या आयुष्यात प्रचंड आत्मविश्वास घेऊन जगल्या आणि जगत आहेत. समाजात त्यांनी फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. या शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे आणि अनेक वर्ष बोर्डाच्या परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थिनींतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारी विद्यार्थिनी याच शाळेने दिली आहे. या शाळेतील विद्यार्थिनींचा सामाजिक उपक्रमदेखील असाच उल्लेखनीय आहे मग ते स्काऊट-गाइड असो, समाजसेवा असो, या शाळेचे बँडपथक हे तर उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे बँण्डपथक आहे. अल्पबचत संख्येयिकाचा उपक्रम यात कितीदा तरी शासनाने प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या शाळेचे ग्रंथालय अत्यंत संपन्न आहे.
स्त्री शिक्षण म्हटल्याबरोबर सावित्रीबाई फुले, धोंडो केशव कर्वे, एस. आर. गुरूजी अशी नावे येतात. त्यांच्या चरण पावलावर शारदा मंदिर कन्या प्रशाला वाटचाल करण्याचा प्रयत्न करील, असाही आमचा विश्वास आहे. नवीन अर्थव्यवस्थेत शासन खासगी उपक्रमशीलतेवर जास्त भर देत आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक स्रोत आता कमी-कमी होत जाणार, तेव्हा या शाळेच्या महिलांना लोकाश्रयाचा आधार घेणे क्रम प्राप्त आहे. त्यात आमच्या महिला कोठेही कमी पडणार नाही. एक साधा उपक्रम ‘भाऊबीजेचा’ असतो. या उपक्रमातून गोळा झालेला निधी गरीब विद्यार्थिनींच्या अर्थसाहाय्यासाठी वापरला जावा. आता तर या शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी संघच बांधला आहे. या शाळेच्या विकासाकरीता आम्ही काही कमी पडू देणार नाही अशा प्रकारची इच्छा माजी विद्यार्थिनी एकत्र येऊन व्यक्त करत असतात. अशा श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या शताब्दीपूर्तीसाठी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती लाभत आहे, ही फार मोठी सौभाग्याची बाब आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे तर याच भूमीचे सुपूत्र आहे. त्यांच्याही मायेचा पदर संस्थेला लाभणार आहे. अशी शारदा मंदिर कन्या प्रशाला सतत आणि सातत्याने प्रगतीपथावर राहो, प्रगतीपथावर जावो अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो.

(लेखक श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहांची ‘दामिनी’कडून तपासणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थिनींची छेडछाड रोखण्यासाठी शाळा, कॉलेजांमध्ये त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याच्या सूचनेनंतर आता शहरातील मुलींच्या वसतिगृहांकडे पोलिस प्रशासनाने मोर्चा वळविला आहे. दामिनी पथक मुलींच्या वसतिगृहांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना कोणाचा त्रास आहे का, हे जाणून घेत आहे. अनेक वसतिगृहांची कोठेच नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा विषय गंभीर बनला आहे. शहरातील अनेक शाळा, कॉलेज प्रशासनाने याबाबत आवाज उठविला आहे. रोडरोमिओ व मद्यपींच्या त्रासाला कंटाळलेल्या जेएनईसीच्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी थेट पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे धाव घेतली. टवाळखोरांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून पाउले उचलली जात आहेत. आता शहरातील दामिनी पथकाने शहरातील मुलींच्या वसतिगृहांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. पथकाकडून मुलींची विचारपूस करण्यात येत आहे. तशा सूचना आयुक्तांनी पथकाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचा दैनंदिन अहवालही आयुक्त तपासत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वसतिगृहांना भेटीची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून, कॉलेज, खाजगी वसतिगृह शोधून, तेथे जाऊन मुलींना मार्गदर्शन केले जात आहे. त्यांच्याशी पथकातील सदस्य संवाद साधत आहेत. काही त्रास आहे का, कोणी त्रास देते का, असे प्रश्न विचारून, त्यांना संबंधितावर कारवाईचा दिलासाही महिला पोलिस अधिकारी देत आहेत.

अनेक वसतिगृहांची नोंदणीच नाही
शहरात अनेक वसतिगृहांची कोठेच नोंद नसल्याचे पथकाला आढळून आले आहे. त्यामुळे वसतिगृहांची माहिती मिळवून दामिनी पथक तेथे जात आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थिनी, महिला कॉट बेसीसवर, खोली करून राहतात. अशा वसतिगृहमालकांना, घरमालकांना जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदी करण्याच्या सूचना पथकाकडून दिल्या जात आहेत. वसतिगृहांच्या ठिकाणी पेट्रोलिंगही केली जाणार असल्याचे पथकातील सूत्रांनी सांगितले.

प्रत्येक वसतिगृहाला भेट देऊन मुलींना काय अडचणी आहेत, कोण त्रास देते का हे जाणून घेतले जात आहे. त्यांना दामिनी पथकाचे क्रमांक दिले जातात. अडचण वाटली, तर त्यांनी ताबडतोब संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अनेक वसतिगृहांची रितसर नोंद नाही. काही ठिकाणी कॉट बेसिसवर विद्यार्थिनींना रूम देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे अशी ठिकाणे शोधणे, तेथे जाऊन मुलींशी संपर्क साधणे अवघड होते. नोंद ठेवण्याच्या सूचनाही संबंधितांना देत आहोत.
- अरुणा घुले, दामिनी पथक प्रमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुली नाही, तर पगार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वीज बिल थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळणार नाही, असे इशारा महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी हा इशारा दिला, मात्र लाइन कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजनाचे परिपत्रक आचार संहिता संपताच निर्गमित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजीवकुमार म्हणाले, ‘मासिक वसुलीचे ४३०० कोटीचे उद्दिष्ट असताना फक्त ३३०० ते ३४०० कोटीच्यावर वसुली जात नाही. गेल्यावर्षीची चार हजार कोटीपेक्षा अधिक तूट आहे. ओव्हर ड्रॉप घेऊन किती दिवस कर्मचाऱ्यांचे पगार करणार. औरंगाबाद, लातूर, नांदेड, जळगाव, अकोला, अमरावती या परिमंडळाची वसुली वीज ग्राहकांकडून न झाल्यास फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळणार नाही.’ औरंगाबादेतील वीज वाहिनी गळतीचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस कविता घरत, सय्यद जहिरोद्दिन, भाऊसाहेब भाकरे आदी उपस्थित होते. मुंबईत १४ फेब्रुवारी रोजी मेडिक्लेम कॅशलेशसाठी सर्व संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

लाइन कर्मचाऱ्यांसाठी व्हीआरएस
५० वर्षांपेक्षा अधिक वय आणि वैद्यकीयदृष्ट्या अपात्र घोषित केलेल्या लाइन कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू करण्याचा निर्णय संचालकांच्या नऊ फेब्रुवारीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचेही संजीवकुमार यांनी सांगितले. ऑपरेटरशी संबंधित विषयावर बोलताना ते म्हणाले, ‘मोबाइल अॅप रीडिंग, सर्व्हर डाउन अथवा इतर अडचणींमुळे पाठवता येत नसल्यास हाताने रजिस्टरवर लिहून ते उपविभागीय कार्यालयास पाठवावे. त्यात कोणतीही अडचण नाही.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळी समाजाचा वधू- वर परिचय उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संत सावता सुमन वधु-वर संस्था आयोजित १७ वा राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवारी संत एकनाथ रंग मंदिरात उत्साहात पार पडला.
या मेळाव्याला आमदार अतुल सावे, संस्थेच्या संचालिका संगीता पवार, संचालक हरिभाऊ पवार, पंडित धानोरकर, रत्नाकर काळे, प्रदीप राऊत, भगवान घडमोडे, शांताराम गाडेकर, मंजुषा पेरकर, सुभाष वाघमारे, तुकाराम खांडेभराड, गणेश चोपडे, शंकर गांगवे, गोविंद डाके, प्रकाश उगले आदींची उपस्थिती होती. या मेळाव्यात ४५० मुली आणि ३५० मुलांचा सहभाग होता. बदलती जीवन शैली, उच्च शिक्षणामुळे आलेली स्वतंत्र आणि निर्णायक विचारशैली मुलींमध्ये दिसून आली. कोणी इंजिनीअर, कोणी बँक, कोणी फार्मसिस्ट असलेल्या तरुणी आत्मविश्वासाने अपेक्षा व्यक्त करत होत्या. आजवर सरकारी नोकरी हवी अशी मुलींची व त्यांच्या पालकांची अपेक्षा राहिली आहे. आता मात्र तरुणींना निर्व्यसनी, नोकरी करण्याबरोबरच माणूस म्हणून चांगला आणि आपल्या फिल्डमध्ये नोकरी करणारा मुलगा हवा असल्याचे स्पष्टपण सांगितले. मुलांमध्ये सुंदर आणि सुशिक्षित मुलीची अपेक्षा व्यक्त होत असल्याचे दिसून आले. राज्यभरातील विविध ठिकाणाहून मेळाव्यात तरुण-तरुणी पालकांसह उपस्थित होते. विशाखा रुपल यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिरूप न्यायालया’त रंगले युक्त‌िवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वकिली कौशल्याच्या व उत्तमरित्या युक्तिवादाच्या बळावर ‘अभिरूप न्यायालय’ स्पर्धा गाजविली. एम. पी. लॉ कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या १७व्या अभिरुप न्यायालय स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिग्गज चार संघांवर मात करत पुण्याच्या सिम्बायोसीस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेवर आपले नाव कोरले. सर्वोत्कृष्ठ अधिवक्ता पुण्याची शिवानी अग्रवाल ठरली.
एम. पी. लॉ कॉलेजतर्फे घेण्यात येणारी ही स्पर्धा देशपातळीवर नावाजली जाते. यंदा शनिवारपासून स्पर्धेला सुरुवात झाली. रविवारी सकाळी ९पासून तापडिया नाट्यमंदिरात अंतिम फेरीला सुरुवात झाली. एका एचआयव्हीबाधित व्यक्तिला कामावरून कमी केले जाते. तेव्हा विविध अंगाने ही केस स्टडी मांडायची होती. व्यक्तीचा मूलभूत हक्क, तिच्यावरील अन्याय, सामाजिक दृष्टिकोन अशा सर्वांगाने या केसबाबत आपल्या वकिली कौशल्याच्या वापर करत, उत्तमरित्या युक्तिवाद या बळावर ही फेरी जिंकली ती सिम्बायोसीस लॉ कॉलेजच्या संघाने. उपविजेता संघाचे पारितोषिक डीईएस नवलकमल फिरोदिया लॉ कॉलेजने पटकाविले. या अंतिम फेरीचे परीक्षण तेलंगणा व आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. नवीन राव, न्यायमूर्ती ए. व्ही. शेषासाई यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्याहस्ते पारितोषिकेही देण्यात आली. सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी अधिवक्ता शिवानी अग्रवाल हिला अॅड. सुधाकरराव देशमुख चषक याचबरोबर वैयक्तिक-सर्वोत्कृष्ठ वादी ठरलेल्या दिव्यांगना चौधरी अॅड. एल. एन. सिरसमकर चषक आणि प्रथम फेरीतून सर्वोत्कृष्ट अधिवक्तासाठीचे घाटे फाउंडेशन चषक एम. पी. लॉ कॉलेजच्या गोविंद शर्मा या विद्यार्थ्याने पटकाविले. पारितोषिक वितरण सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष अॅड. जे. के. वासडीकर, अॅड. उमाकांत पाटील, अॅड. डॉ. कल्पलता पाटील-भारस्वाडकर, अॅड. एस. डी. कुलकर्णी, न्या. अे. बी. नाईक, अॅड. व्ही. जे. दिक्षित, अॅड. राजेंद्र देशमुख, अॅड. अविनाश देशमुख, प्रशांत सिरसमकर, अॅड. व्ही. पी. सपकाळ, अडॅ. सुधीर पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. एम. राव, उपप्राचार्य डॉ. बी. व्ही. परांजपे, समन्वयक प्रा. दिनेश कोलते, डॉ. अमोल चव्हाण, प्रा. अभय चव्हाण, प्रा. अभय जाधव यांनी परिश्रम घेतले.

पाच संघामध्ये चुरस
प्रथम फेरीतून पुणे येथील डीईएस नवलकमल फिरोदिया लॉ कॉलेज, सिम्बायोसिस लॉ स्कूल, सांगलीतील भारती विद्यापीठाचे न्यू लॉ कॉलेज, औरंगाबादचे एमपी लॉ कॉलेजसह दिल्ली येथील फेअरफिल्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी स्कूल ऑफ लॉ ही पाच महाविद्यालये अंतिम फेरीत पोचली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेली समाज मेळाव्यास भरभरून प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रत्येक समाजाने शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले असल्याचे गेल्या काही दिवसात शहरामध्ये झालेल्या विविध समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यातून दिसून येत आहे. औरंगाबाद तेली राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्यातही बहुतांश उच्चशिक्षित उपवर वधू-वर मुला मुलींनी सहभाग घेतला. यावेळी अनुरूप जोडीदारालाच पसंती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संत तुकाराम नाट्यगृहामध्ये रविवारी आयोजित या मेळाव्यासाठी राज्यभरातील १५० मुली आणि ३०० मुले व त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम आमदार अतुल सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर भगवान घडमोडे, अंबादास देवराये, धोंडिराम वाळके, गोपाळ सोनवणे, दिपक राउत यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्‍घाटन करण्यात आले, यावेळी तेली समाजाच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असलेल्या या मेळाव्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील उच्चशिक्षीत तरुण-तरुणींनी हजेरी लावली. त्यांच्यात डॉक्टर, इंजिनीअर, फार्मासिस्ट, एमसीए, शिक्षक, प्राध्यापकांचा समावेश होता. परिचय देताना मुला, मुलींनी आपल्या शिक्षण, नोकरीच्या अनुरूप जोडीदाराची अपेक्षा व्यक्त केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मेळाव्यातच अनेकांची पसंती झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले. या मेळाव्यासाठी राज्यभरातून साडेतीन हजार समाजबांधवांनी हजेरी लावली होती. यावेळी सुरेश मिटकर, मनोज संतान्से, बाबासाहेब पवार, विष्‍णुशेठ शिदलंबे, सुरेश कर्डिले, सोमनाथ गोरे, कचरु वेळंजकर, रमेश बागले, नितीन मिसाळ, ईश्वर पेंढारे आदींनी मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धाडसाचं स्मारक

$
0
0



- डॉ. श्रीरंग देशपांडे


शारदा मंदिर कन्या प्रशाला शंभर वर्षांची झाली! मुलींच्या शिक्षणासाठी १९१६मध्ये कै. राजारामपंत पोळ वकील, कै. दिगंबरदासजी चौधरी वकील, कै. अण्णासाहेब पारगावकर वकील, वशिष्ट या धुरिणांनी जे धाडस दाखवल. त्या धाडसाचं स्मारक म्हणजे आजची शारदा मंदिर. निजामी राजवटीत औरंगाबादच्या रस्त्यावरून महिलांना, मुलींना बाहेर निघनं मुश्कील होतं. त्याकाळात उभी राहिलेली ही शाळा. तेव्हापासून आतापर्यंत कितीतरी पाणी वाहून गेलं असेल. परंतु आज तरी महिला, मुली रस्त्यानं एकट्या काय किंवा घोळक्यात काय बिनधास्तपणे फिरू शकत आहेत का? रोजच्या वर्तमानपत्रातून जे वाचायला मिळते, त्यावरून तरी नाही असंच म्हणावं लागेल, काळ बदलला पण परिस्थिती जवळपास तशीच आहे. आता मुला-मुलींच्या सहशिक्षणाचा काळ आला असं म्हटलं जातं. आता मुलींच्या शाळेची गरज नाही; मुलींची शाळा ही जुनी संकल्पना आहे-सोडून द्या, असे ऐकायला मिळतं. शारदा मंदिरने शाळेत कर्मचारीही महिलाच असाव्यात, ही परंपरा आजतागायत जोपासली आहे. समायोजनच्या धुराळ्यात पुरूष शिक्षक शारदा मंदिरसाठी पाठविण्यात आले आणि परंपरा कायम राखण्यासाठी संस्थेने ते नम्रपणे ते नाकारले; तेव्हा असंही ऐकवण्यात आलं की, बदलत्या काळानुसार आता शारदा मंदिरमध्येदेखील मुला-मुलींच्या सहशिक्षणाची सोय करावी! काही व्यक्तींच्या सोयीसाठी ध्येय आणि धोरणांमध्ये तडजोड करणाऱ्यापैकी ही संस्था नाही. हे कदाचित असा अनाहूत सल्ला देणाऱ्यांना माहीत नसावं. दोन वर्षापूर्वी शिक्षण संस्थेच्या कला महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापकांनी (डॉ. नवनाथ आघाव आणि डॉ. स्मिता शिंदे) पालकांचं एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात सत्तर टक्क्यांहून अधिक पालकांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा असावी असा कौल दिला होता; अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलींना स्वतंत्रपणे जोपासलं जावं, अशी इच्छा व्यक्त केली. मराठी शाळांना ज्या आज सेमीइंग्रजी या नावाने चालतात, वाईट दिवस असतानाही केवळ मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या शारदा मंदिरला अजूनही प्रवेश बंदची पाटी लावावी लागते. शाळेनं राखलेली शिक्षणाची प्रत हे तर मुख्य कारण आहेच; परंतु पालकांच्या मनात असलेल्या मुलींच्या असुरक्षिततेचा प्रश्न हेदेखील कारण आहे हे नाकारून चालणार नाही. शारदा मंदिरच्या समोरच दिमाखात उभी असलेली तेवढ्याच वयाची स. भु. प्रशाला ही सुरुवातीला मुलांच्या शिक्षणासाठी होती; कालांतराने तेथे मुला-मुलींच्या सहशिक्षणाची सोय करण्यात आली. या शाळेचा शैक्षणिक दर्जा शारदा मंदिरापेक्षा तसूभरही कमी नाही. तरीही मुलींच्या प्रवेशासाठी पालकांची पहिली निवड शारदा मंदिरच असते. मुलींच्या समाजात वावरताना ज्या अडचणी आहेत. त्या आजही कायम असल्याचे हे द्योतक आहे असं वाटतं. नैतिकतेचं प्रबळ अधिष्ठान असलेल्या आपल्या देशात सरत्या दिवसागणिक स्त्रियांची असुरक्षितता वाढती आहे. आपण मनुस्मृती तर जाळली; पण पुरुषी वृत्तीला आवर घालण्याचा विचार केला नाही. स्त्रीकडं एक व्यक्ती म्हणून बघण्याची दृष्टी आपण देऊ शकलो नाही. व्यक्तीचं व्यक्तिमत्त्वः ही शरीरापलीकडील बाब आहे, ही जाणीव निर्माण करू शकलो नाही. ‘स्त्री ही एक उपभोग्य वस्तू’ या पुरुषी धारणेला आपण छेद देऊ शकलेलो नाही. प्रचलित शिक्षण पध्दतीचं हे एक मोठं अपयश मानावं लागेल. राष्ट्रीय सभ्यता, संस्कृती पिढ्यानपिढ्या संक्रमित करणं व्यक्तिमत्त्वाला नैतिकतेचे अधिष्ठान देणं ही शिक्षणाद्वारे साध्य करण्याची दोन अतिशय महत्त्वाची उद्दिष्टं आहेत. कळत-नकळत आपण या उद्दिष्टांकडं दुर्लक्ष करीत आहोत. पूर्वग्रह, राग-लोभ, ईर्षा सोडून यावर मोकळेपणाने मुळापासून विचार होणं आवश्यक आहे.

(लेखक स. भु. शिक्षण संस्थेचे सहचिटणीस आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजारच्या जिल्ह्यांतून वाळूची तस्करी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात वाळूठेक्यांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांमधून वाळूचा उपसा बंद आहे, मात्र बीड व जालना जिल्ह्यांतून चोरून आणलेली वाळू औरंगाबाद शहरामध्ये सर्रास विक्री करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाळूतस्करांवर करण्यात आलेल्या कारवाईमध्ये बहुतांश वाळू ही शेजारच्या जिल्ह्यातून चोरून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोट्यवधी रुपयांचा वाळूचा ठेका घेण्याऐवजी सर्रास वाळूचोरी करून शहरात विक्री करण्याचा गेल्यावर्षीचा फंडा तस्करांनी यंदाही अवलंबला आहे. यावर्षी पोलिस, जिल्हा प्रशासनाने कारवाई करून पकडलेली वाळू शेजारच्या जिल्ह्यातून आणल्याचे चौकशीत समोर आले आहे. जालना व बीड जिल्ह्यांतून चोरी करून आणली आहे. चोरी करण्यामध्ये औरंगाबादही पिछाडीवर नाही. जिल्ह्यातील पैठण, वैजापूर व गंगापूर तालुक्यांतूनही वाळूचोरी करून शहरात विक्रीसाठी आणण्यात येते.
वाळू जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, भोकरदन, तीर्थपुरी, घनसावंगी, शहागड, बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातून औरंगाबाद शहरात आणण्यात येते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यांतूनही शहरात चोरट्या मार्गाने वाळू आणली जात आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सातारा, देवळाई, वाळूज या शहराच्या लगतच्या भागामध्ये वाळूचे ट्रक औरंगाबादच्या महसूल विभागाच्या पथकाने पकडले. बीड, जालना जिल्ह्यांतील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या चोरीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. ज्या गावातून वाळुचोरी होते तेथील तलाठी, मंडळ अधिकारी तहसीलदारांनी चोरीकडे दुर्लक्ष केले काय, असा प्रश्न उपस्थित होतो

सातारा परिसरात वाळूचे साठे
सातारभागात सातत्याने वाळूच्या बेकायदा वाहतुकीच्या वाहनांवर महसूल पथकाकडून कारवाई होत आहे. या भागात मोकळ्या भूखंडांवर सर्रास बेकायदा वाळूचा साठा करून विक्री करण्यात येते. रात्रं-दिवस वाळूचे ट्रकची ये-जा सुरू असल्यामुळे रहिवासी प्रचंड त्रस्त असून, वाळूचा हा सावळा गोंधळ बंद करण्याची मागणी करत आहेत. या भागात तैनात असलेले महसूल विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी मात्र डोळ्यावर पट्टी लावली आहे.

स्थानिक पथके त्रस्त
वाळूची नाकाबंदी करण्यासाठी औरंगाबाद परिसरातील ५४ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये महिला तलाठ्यांचाही सहभाग आहे. रात्री-अपरात्री वाळूच्या वाहनांवर कारवाई करावी लागत असल्यामुळे पथक त्रस्त असून, ज्या जिल्ह्यातून वाळूचोरी होते तेथील महसूल व पोलिस प्रशासन करते काय, असा प्रश्न औरंगाबादच्या महसूल कर्मचाऱ्यांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कॅम्पेन : क्रिकेट क्षेत्रात पारदर्शकता हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी स्वतंत्र समिती नेमून पुढाकार घेण्याची योजना निश्चित चांगली आहे. या प्रोजेक्टचे दायित्व भक्कम होण्याकरिता समितीची नोंदणी करणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून औरंगाबादेतील क्रिकेटचा विकास थांबलेला आहे. कामकाजात पारदर्शकता आणणे गरजेचेच आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा क्रिकेट संघटनेच्या आजीव सभासदांनी व्यक्त केली आहे.
‘क्रिकेट स्टेडियम मटा कँपेन’मालिकेंतर्गत क्रिकेट स्टेडियमसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना आजीव सभासद किरण जोशी म्हणाले, ‘ओम प्रकाश बकोरिया व सुनील केंद्रेकर यांच्यासारख्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र स्टेडियम समितीत महत्त्वाची भूमिका असेल. समिती स्थापनेबरोबरच जिल्हा क्रिकेट संघटनेचे आस्तित्त्वही अधिकृत होणे तेवढेच गरजेचे आहे. आतापर्यंत काय झाले आणि काय नाही अशी उणे-दुणे काढून काहीच उपयोग नाही. सर्वांनी मन मोठे करून एक दिलाने स्टेडियम उभारणीसाठी पुढे आले पाहिजे. स्वतंत्र स्टेडियम समितीचे कामकाज अधिक भक्कम होण्यासाठी या समितीची नोंदणी करणे आवश्यक वाटते. समितीच्या माध्यमातून या प्रोजेक्टला चालना मिळेलच. शहराच्या आसपास अनेक सरकारी जमिनी आहेत. यापैकी एखादी जागा स्टेडियमसाठी नक्कीच उपलब्ध होऊ शकेल. नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर समितीच्याच नेतृत्त्वाखाली स्टेडियम उभारले जाऊ शकते. जिल्हा क्रिकेट संघटना मॅचेस मागवू शकते. हे सामने या ठिकाणी होऊ शकतील. सद्यस्थितीत जिल्हा क्रिकेट संघटना ‘डिफक्टो’ असल्याने कोणतेही पॉलिसी निर्णय घेतले जाऊ शकत नाही. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करताना अनेकांची पदे जाणारच आहेत. नव्या दमाच्या लोकांना संधी द्यावीच लागणार आहे. त्याचसाठी पुढाकार घेऊन योग्यवेळी शहरातील क्रिकेटच्या विकासाला योग्य दिशा देण्याची हीच योग्य वेळ आहे. डिफेक्टो बॉडीमुळे शहराचे क्रिकेट हे पन्नास वर्षे मागे गेले आहे. चुकांची पुनरावृत्ती करण्याचे दिवस आता संपले आहेत हे लक्षात घेऊन सर्वांनीच एकत्रित पुढाकार घ्यावा आणि आपले घर नीट करावे, असे जोशी यांनी स्पष्ट केले.
‘औरंगाबादेत आधुनिक क्रिकेट स्टेडियम व्हावे, याविषयी दुमत असूच शकत नाही,’ असे नमूद करून आजीव सभासद हेमंत मिरखेलकर म्हणाले, ‘स्वतंत्र स्टेडियम समितीच्या माध्यमातून क्रिकेट विकासाला दिशा मिळणार असेल, तर त्याचे स्वागत करावेच लागेल, परंतु जिल्हा क्रिकेट संघटनेचे कामकाज सुधारल्याशिवाय क्रिकेटचा संपूर्ण विकास करणे अवघड आहे. हेवेदावे बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी निवडणूक घेणे हाच समर्थ पर्याय आहे. त्याशिवाय ही कोंडी फुटणार नाही. सर्वांनीच प्रयत्न केले, तर स्टेडियम उभारणी शक्य आहे.’
आजीव सभासद मोहन बोंबले म्हणाले, ‘औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेला स्वतःच्या मालकीचे मैदान आहे. ही गोष्ट आपण अभिमानाने सांगत होतो, परंतु एडीसीएच्या पाठीमागून एमजीएम आणि गरवारे क्रीडा संकुल उभारले गेले. त्यात आपण मागे पडलो. अनेक वर्षांपासून न्यायालयात वाद सुरू आहेत. अनेक मोठी मंडळी असूनही क्रिकेट विकासाला योग्य दिशा मिळू शकली नाही, याची खंत वाटते. स्वतंत्र स्टेडियम समिती स्थापनेचा निर्णय योग्यच आहे. बकोरिया, सुनील केंद्रेकर यांच्यासारखे क्रिकेटप्रेमी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हे शक्य होऊ शकेल याची खात्री वाटते. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. क्रिकेटपेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळेच क्रिकेट संघटनेच्या कामकाजात पारदर्शकता असणे अतिशय आवश्यक आहे. स्टेडियम समितीत योग्य व्यक्तींचाच समावेश असावा असे वाटते, असे बोंबले यांनी सांगितले.

‘समिती, संघटनेत योग्य समन्वय हवा’
जिल्हा क्रिकेट संघटनेची १९७४मध्ये स्थापना झाली. त्यावेळचे सभासद शांतीलाल संचेती यांनी क्रिकेट स्टेडियम समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मटा कँपेनच्या माध्यमातून हा विषय चांगल्या प्रकारे पुढे आला आहे. औरंगाबाद हे मराठवाड्याची राजधानी असल्याने शहरात क्रिकेट स्टेडियमची उभारणी गरजेचे आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून क्रिकेटमध्ये राजकारण घुसले आणि त्या राजकारणाने सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबादचे क्रिकेट सुधारण्याकरिता शहरातून एखादा लोढा निर्माण होण्याची गरज आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेला अधिकृतपणा येत नाही तोपर्यंत क्रिकेट विकासाला दिशा मिळणार नाही. स्टेडियम समिती व क्रिकेट संघटना यांच्यात योग्य समन्वय असणेही तेवढेच गरजेचे आहे, असे संचेती यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९१ हेक्टर एमआयडीसीकडे सोपवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गौण खनिजांची चोरी आणि अतिक्रमणे होण्याची शक्यता असल्याने करमाड आणि लाडगाव येथील ९१.१३ हेक्टर (२२५ एकर) सरकारी जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करावी, असा प्रस्ताव मंडळ अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकाऱ्यांना दिला आहे.
करमाड व लाडगाव येथील लोहमार्गाच्या उत्तरेकडील संपूर्ण जमीन एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आली. तेथे शेंद्रा औद्योगिक वसाहत उभारण्यात आली आहे. या जमिनीच्या उत्तरेला करमाड व लाडगाव येथे या सरकारी जमिनी आहेत. भविष्यात करमाड व लाडगाव औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरीकरण होईल. परिसरात वेगाने विकासकामे सुरू होतील. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाची मागणी असेल. औद्योगिक क्षेत्रालगतच सरकारी जमीन उपलब्ध असल्यामुळे अतिक्रमणाचा धोकाही आहे. त्यामुळे या जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करणे महसूल विभागासाठी अवघड होऊ शकते. या भागातून रात्री-अपरात्री गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर चोरी होऊ शकेल. त्यामुळे सरकारी महसुलालाही फटका बसू शकतो.
ही जमीन डोंगराळ असली, तरी एमआयडीसीने यापूर्वी संपादित केलेल्या क्षेत्रालगत उत्तर बाजूने अाहे. पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने; तसेच हरितपट्टा निर्माण करण्यासाठी ही जागा उपयुक्त असल्याने एमआयडीसी यांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार हस्तांतर करणे योग्य होईल, असा प्रस्ताव मंडळ अधिकारी सतीश तुपे यांनी उपविभागीय अधिकारी, भूसंपादन अधिकारी शशिकांत हदगल यांना दिला आहे.

अशी आहे जमीन
करमाड : गट क्रमांक ४४मधील १२.१८ हेक्टर
करमाड : गट क्रमांक ११२मधील ४१.५३ हेक्टर
लाडगाव : गट क्रमांक ४०मधील ३७.४२ हेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सरकारच्या काळात आरक्षण विसरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

२०१३ मध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारला अहवाल दिला आहे. मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याची शिफारस करूनही सरकारने आरक्षण दिले नाही. जोपर्यंत भाजपचे राज्य आहे तोपर्यंत मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बाजारसावंगी येथील सभेत केले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्त काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी ही सभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर माजी आमदार एम. एम. शेख , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, माजी महापौर सुदाम सोनवणे, तालुकाध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे, पक्ष निरीक्षक मीर हिदायत अली, खुलताबादचे नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर, माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग, उमेदवार मधुकर सोनवणे, भावराव काटकर, अथर पटेल, संजय मोरे, पुष्पाबाई भांडे, श्वेता वरकड आदी उपस्थित होते.

संभाजीनगर !
नारायण राणे यांनी सभेत बोलताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला. संभाजीनगरमध्ये काँग्रेसची सत्ता आणा मी पुन्हा येईन, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते सेवाव्रतींचा गौरव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये मागच्या १६ वर्षांपासून अखंडपणे रुग्णसेवा करणाऱ्या सेवाव्रतींचा प्रातिनिधिक गौरव लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. त्याचवेळी रुग्णालयातील सेवाभाव, शिस्त, निष्ठा आदी गुणांचा गौरवही लोकसभा अध्यक्षांनी सोमवारी रुग्णालयाला दिलेल्या भेटीत केला आणि तसा अभिप्रायही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिला, हे विशेष.
श्रीमती महाजन यांनी भेटीदरम्यान रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या प्रसंगी महाजन यांच्या हस्ते रुग्णालयातील सेवाव्रती प्रल्हाद पानसे, अर्चना वैद्य, डॉ. शोभा तांदळे, व्यंकटेश देशपांडे, स्वाती देशपांडे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला, तर रुग्णालयाच्या संस्थापक सदस्य व ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर यांच्या हस्ते महाजन यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. प्रतिभा फाटक, डॉ. आनंद फाटक, डॉ. मयुरा काळे, डॉ. सीमा कुलकर्णी, डॉ. शिल्पा वैष्णव, डॉ. रंजना देशमुख, डॉ. मधुश्री सावजी, माधुरी आफळे, उद्योजक राम भोगले आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यनाथ बँकेत २०० कोटींचा गैरव्यवहार ?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेतील कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात याचिकाकर्त्याने एक आठवड्यात परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी. त्यांच्या तक्रार अर्जावर लवकरात लवकर निकाल द्यावा, असा आदेश या याचिकेच्या अनुषंगाने न्या. संभाजी शिंदे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी सोमवारी दिला.
विद्यमान चेअरमन अशोक जैन आणि संचालक, तसेच इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. परळीची ही बँक विद्यमान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असून, त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडे बँकेच्या संचालिका आहेत. त्यामुळे अधिकारी कार्यवाही करीत नाहीत, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता. बँकेचे सभासद सुभाष निर्मळ यांनी यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.
बँकेचे विद्यमान चेअरमन अशोक जैन आहेत. जैन व इतर संचालकांनी २०१२-१३ ते २०१६ दरम्यान जवळपास २०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून बेकायदेशीर कर्ज वाटप केले आहे. जैन व अन्य संचालकांनी कोट्यवधी रुपये बेकायदेशीररीत्या कर्जरुपाने वाटप केले. त्यातील काही रक्कम जैन यांच्या नावावर हस्तांतरित झाली आहे, असा आक्षेप याचिकाकर्त्याने याचिकेत घेतला आहे. त्यासंदर्भात बँकेचे लेखापरीक्षक सुनील कोचेटा यांनी २०१२-१३ ते २०१५-१६ पर्यंतच्या लेखापरीक्षण अहवालात उल्लेख केला असून, बेकायदा कर्ज वाटपासंदर्भात बँकेला दोषी धरले आहे.
यासंदर्भात निर्मळ यांनी रिझर्व्ह बँकेकडे तक्रार दाखल करून चौकशीची विनंती केली होती. रिझर्व्ह बँकेने पुणे येथील सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, सहकार आयुक्तांनी राजकीय दबावाखाली अद्याप कुठलीही चौकशी केली नाही, असे निर्मळ यांचे म्हणणे होते.
निर्मळ यांनी २१ जानेवारी २०१७ रोजी परळी पोलिस ठाण्यात अशोक जैन व इतर संचालकांविरुद्ध तक्रार दिली. तसेच २०१२ ते २०१६ पर्यंतच्या बँकेच्या लेखापरीक्षण अहवालाच्या प्रती तक्रारींसोबत जोडल्या. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. म्हणून त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडेसुद्धा तक्रार देऊन सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतरसुद्धा संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाही. म्हणून निर्मळ यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. खंडपीठाने तक्रारदारास ‘फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) नुसार एक आठवड्यात परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी मांडली. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीर्थक्षेत्रांच्या रस्त्यांचे प्रस्ताव सादर करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वेरूळ - म्हैसमाळ - शुलीभंजन - खुलताबाद विकास प्राधिकरणांतर्गत जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती तसेच मजबुतीकरणाचे प्रस्ताव तयार करून सादर करावेत, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी दिले.
तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नियोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक झाल्यानंतर पर्यटनस्थळांच्या विकासाचा आराखडा ठरविण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने सोमवारी विभागीय आयुक्तांनी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची बैठक घेतली. वेरूळ, म्हैसमाळ, शुलीभंजन, खुलताबाद येथील तीर्थक्षेत्रांना पुरविण्याबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित या तीर्थक्षेत्रांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची चर्चा झाली. शुलीभंजन, खुलताबाद आणि म्हैसमाळ या तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते कसे करता येतील, त्यासाठी झेडपीच्या निधीतून खर्च करता येईल काय, याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश भापकर यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुळजापुरात काँग्रेसची अस्तित्वासाठी लढाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यात प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ जागांसाठी चौरंगी लढत होत आहे. तुळजापूर तालुक्यात आमदार मधुकरराव चव्हाण व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटी यांचे सुपूत्र वेगवेगळ्या ठिकाणहून निवडणूक लढवित असल्याने या तालुक्यात काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे.
तुळजापूरचे आमदार काँग्रेसचे असले तरी तुळजापूर व नळदुर्ग या दोन्ही ये नगरपरिषेदवर राष्ट्रवादीने कब्जा आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या नऊ पैकी पाच जागांवर विजय मिळविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन आणि शिवसेनेने एक जागा पटकाविली होती. तुळजापूर पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यामुळे येथाल लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अणदुर गटात आमदार मधुकरराव चव्हाण यांचे सुपूत्र बाबुराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. येथे त्यांचा मुकाबला राश्ट्रवादीचे अॅड. दिपक आलुरे , पंडीत घुगे (भाजप) व संजय भोसले (शिवसेना) यांच्याशी होणार आहे. आजपर्यंत पडद्यामागून सूत्र हलविणारे बाबुराव चव्हाण हे स्वतःच यावेळी मैदानात उतरल्याने ही लढत आमदार चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
सिंदफळ गट यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. या गटातून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष कुलदीप (धीरज) पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विनोद गंगणे यांचे पुतणे संदीप गंगणे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेससाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे.
आमदार मधुकर चव्हाण यांना अणदूर गटात व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांना सिदेफळ गटात गुंतवून राष्ट्रवादीने काँग्रेसला शह दिला आहे. सिंदफळ गटात भाजपकडून अर्जुन कापसे तर सेनेकडून संदीप देशमुख हे उमेदवार आहेत.
काटी गटात संतोष बोबाडे (काँग्र्रेस) राजकुमार पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि संजय देशमुख भाजपचे उमेदवार आहेत. संतोष बोबाडे व राजकुमार पाटील हे सावरगाव येथील रहिवाशी असल्याने येथे संजय देशमुख यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. काक्रंबा गट सर्व साधरण महिलांसाठी आरक्षीत असून येथे पंचरंगी होण्‍्याची चिन्हे आहेत. तिथे कुसुम बंडगर (काँग्रेस), वर्षा बंडगर (राष्ट्रवादी), उज्वला मुळे (भाजप), सुमन खांडेकर (शिवसेना) तर सागरबाई कोळेकर (राष्ट्रीय समाजपक्ष) या उमेदवार आहेत. मंगरूळ गट अनुसूचित जाती-महिला प्रवर्गासाठी आरक्षीत असून येथे. राजश्री मस्के (काँग्रेस), अस्मिता शिवदास कांबळे (राष्ट्रवादी), सविता क्षीरसागर (भाजप), लक्ष्मी पारधे (शिवसेना) यांच्यात चौरंगी लढत होत आहे.
काटगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून मधुमती जोकार (काँग्रेस), सुषमा लोंढे (राष्ट्रवादी काँग्रेस), भाग्यश्री शिंदे (भाजप), शामल वडणे (शिवसेना) यांच्यात लढत होत आहे. नंदगाव गटाकडेही यंदा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येथे दिलीप सोमवंशी (काँग्रेस), महेंद्र धुरगुडे ( राष्ट्रवादी काँग्रेस) सत्यवान सुरवसे (भाजप), सुरज साळुंके (शिवसेना) हे उमदेवार निवडणूक रिंगणात आहेत.

जळकोट, शहापूर गटात चूरस

जळकोट गटातून शिवसेनेकडून गणेश सोनटक्के यांनाच उमेदवारी दिली आहे. या गटात सोनटक्केचा प्रभाव असला तरी त्यांना काँग्रेसचे पंचायत समितीचे सभापती प्रकाश चव्हाण यांनी तगडे आव्हान दिले आहे. त्याशिवाय धनाजी चव्हाण (राष्ट्रवादी) तर विजय शिंगाडे (भाजप) हे उमेदवार आहेत. शहापूर गट इतर मागास प्रवर्ग महिलांसाठीआरक्षीत झाला असून याठिकाणी मीरा सचिन घोडके ( भाजप), सविता सोनटक्के ( शिवसेना), छाया पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), सालेहा अझहर मुजावर ( काँग्रेस) यांच्यात चुरशीची लढत होत आहे. ‌

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएममध्ये आढळली दोन हजाराची बनावट नोट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी,जालना
जालन्यातील विजया बँकेच्या बडी सडकवरील एटीएममधून दोन हजार रुपयांची बनावट नोट निघाल्याने खळबळ माजली आहे. शहरात बनावट नोटा चालविणारा रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संभाजीनगर येथील रामप्रसाद बाबुराव भुजंग यांनी शनिवारी दुपारी विजया बँकेच्या बडी सडकवरील एटीएममधून ४ हजार रुपये काढले. त्यांना मशिनमधून २ हजार रुपयांच्या दोन नोटा आल्या. दरम्यान, भूजंग हे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले असता तेथील कर्मचाऱ्याने नोट ( क्रमांक ३ बीए ५६२३९५) बनावट असल्याचे म्हणत पेट्रोल देण्यास नकार दिला. परंतु, शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने यांनी सोमवारी सकाळी बँकेत जाऊन मॅनेजरला सदर प्रकार सांगितला. दरम्यान, बँक अधिकाऱ्यांना देखील नोट संशयित वाटल्याने त्यांनी तात्काळ संशयित नोट ताब्यात घेतली. भुजंग यांना दुसरी नोट बदलून दिली.

एटीएममध्ये नोट टाकण्याचे काम खासगी एजन्सीमार्फत करण्यात येते. त्यामुळे बँकेचा याच्याशी थेट संबध येत नाही. संशयित नोट ग्राहकाला बदलून देण्यात आली आहे. ही नोट मुख्य कार्यालयाला तपासणीसाठी पाठविण्यात येईल. तपासणी अहवाल मिळाल्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
-नितीन घुले, शाखा व्यवस्थापक, विजया बँक, जालना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्येक ठाण्यात दामिनी पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाविद्यालयीन तरुणी, महिलांची होणाच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी आता पोलिस ठाणेस्तरावर स्वतंत्र दामिनी पथक स्थापन करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार विविध पोलिस ठाण्यांत नियुक्ती केलेल्या महिला अधिकाऱ्यांची यासंदर्भात सोमवारी बैठक घेतली.
रोडरोमिओंकडून होणाऱ्या छेडछाडीसंदर्भात महाविद्यालयीन तरुणींनी नुकतीच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली होती. आयुक्तांनी ही बाब‌ गांर्भीयाने घेतली. पोलिस आयुक्तालयात रोडरोमिओंवर अंकुश ठेवण्यासाठी दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडे संपूर्ण शहराची जबाबदारी आहे. त्यांची मर्यादा लक्षात घेऊन आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील प्रमुख १५ पोलिस स्टेशन व दोन पोलिस चौक्यांमध्ये दामिनी पथकांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.
या ठाण्यांत कार्यरत असलेल्या महिला उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पथकाची प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला पोलिस ठाण्यातील तीन महिला पोलिस कर्मचारी देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थिनींना भेटून जाणून घेणार अडचणी
सबंधित पोलिस ठाण्यातील दामिनी प‌थक त्यांच्या हद्दीत असलेल्या शाळा, कॉलेज, होस्टेल, कोचिंग क्लास आदी ठिकाणी विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडचणी, प्रश्न दामिनी पथकाकडून जाणून घेण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींची काही तक्रार असल्यास ती सोडवण्यासाठी दामिनी पथक मदत करणार आहे. विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दामिनी पथकावर सोपवण्यात आली आहे. सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दामिनी पथकांत नियुक्त केलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भात सूचना दिल्या.

पोलिस ठाणे व दामिनी पथक प्रमुख अधिकारी
क्रांतिचौक ः सुनिता मिसाळ,
वाळूज एमआयडीसी ः आरती जाधव
बेगमपुरा ः जयश्री कुलकर्णी
उस्मानपुरा ः कोमल शिंदे
सिडको एमआयडीसी ः साधना आढाव
छावणी ः वनिता चौधरी
सिडको ः सरिता कुवारे
मुकुंदवाडी ः सुषमा पवार
सातारा ः सुशीला खरात
वेदांतनगर ः वर्षाराणी आजले
जिन्सी ः वर्षा काळे
जवाहरनगर ः मीरा लाड,
पुंडलिकनगर ः अनिता फसाटे
वाळूज ः प्रिती फड
दौलताबाद ः स्नेहा करेवाड (प्रभारी)
हर्सूल ः आश्लेषा पाटील

गेल्या दोन ‌वर्षांतील महिलांशी संबंधित गुन्हे
वर्ष.............२०१५.....२०१६
बलात्कार......६७........७७
विनयभंग......३८३......४३७
अपहरण.......१७४.......१९२

विद्यार्थिनींच्या अडचणी व रोडरोमिओंकडून होणारा त्रास विचारात घेऊन पोलिस ठाण्यांच्या स्तरावर दामिनी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. संबधित पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या हद्दीतील शैक्षणिक संस्था, होस्टेलला भेट घेऊन या विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या दणक्यानंतर तोडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका आणि महावितरणमधील वादावर कोर्टाच्या बडग्यानंतर तोडगा निघाला. थकित वीज बिलापोटी मंगळवारी पालिका महावितरणकडे एक कोटी रुपये भरणार आहे. पुढील ६० दिवसांत चालू महिन्याच्या बिलासह थकित रक्कम भरण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे संपूर्ण शहर पाच दिवस अंधारात होते. यासंदर्भात हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. कोर्टाने महापालिका व महावितरणला, आपसात चर्चा करून मार्ग काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. थकित वीज बिलापोटी मंगळवारी महावितरणकडे एक कोटी रुपये जमा करण्याचे ठरल्याचे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले. महावितरणने महापालिकेला ३२ कोटी रुपयांचा व्यावसायिक कर आकारला आहे. वास्तविक पाहता ही रक्कम नऊ कोटी असली पाहिजे. शहरी भागाचे बिल १५ कोटी रुपये दिले आहे. हे बिल दोन कोटी रुपयेच असायला हवे, असे आयुक्त म्हणाले.
१५ आणि २३ लाखांचे अन्य बिल आहे. त्यात काही वाद नाही. पथदिव्यांच्या वीज बिलाचे २४ कोटी ४ लाख रुपये थकलेले आहेत, पण एलबीटीचे २७ कोटी रुपये महावितरणकडे थकलेले आहेत. येत्या ६० दिवसांत चालू बिलासह थकबाकीची अन्य रक्कम भरण्याचे बैठकीत ठरविण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. पन्नालालनगर येथील महापालिकेच्या मालकीची ५५१५ चौरस मीटर जागा महावितरणला २ लाख ८ हजार रुपये वार्षिक भाडेपट्टीवर दिला आहे, पण त्याचा करार महापालिकेने करून घेतलेला नाही. महापालिका व महावितरणच्या विधी विभागाचे अधिकारी कराराचा मसूदा तयार करतील. रेडीरेकनरनुसार भूखंडाला भाडे आकारण्याचा व त्यात दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा करार आता केला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

जाहीर दिलगिरी
पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे संपूर्ण शहर अंधारात होते. याबद्दल शहरातील नागरिकांची महावितरण व महापालिका प्रशासनाने जाहीर माफी मागवी, अशी अपेक्षा हायकोर्टाने व्यक्त केली होती. त्यानुसार पालिका आयुक्तांनी जाहीर दिलगिरी प्रसिद्धी केली. हायकोर्टात दाखल असलेल्या जनहित याचिकेमधील महापालिकेचे म्हणणे राखून ठेवून ही दिलगिरी देण्यात येत आहे, असे पालिका आयुक्तांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images