Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

एटीएमवर रोकडसंकट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चलनटंचाईमुळे औरंगाबादेतील बहुतांश एटीएम गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. बँकांच्या काउंटरवरही ग्राहकांना रोख रक्कम देताना अडचणी येत आहेत. रोख उपलब्ध असलेल्या एटीएमला शोधत नागरिक फिरत होते.
गेल्या काही दिवसांपासून कॅशचा तुटवडा जाणवत आहे. एटीएम आणि बँक काउंटर यांना रोज किमान ४०० कोटींची गरज आहे, पण रिझर्व्ह बँकेकडून शहरासाठी तुलनेत कमी रोकड मिळत आहे. करन्सी चेस्टकडूनही विविध बँकाना रोज किमान २० लाख ते ६० लाखापर्यंतच कॅश पुरवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे चलनाची मागणी केली आहे. बँकांमध्ये जमा होणारे वेतन विचारात घेता शहरात सुमारे ४५०० कोटी रुपयांची गरज असल्याचे एसबीआय, एसबीएचने, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय या बँकांच्या सूत्रांनी सांगितले.
८ नोव्हेंबर २०१६ पासून शहराची मागणी पूर्ण होईल एवढी कॅश आलेली नाही. नोटांची गरज लक्षात घेऊन बँकांना सुमारे ५ हजार कोटींच्या कॅशची गरज आहे, असे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे बँक अधिकारी सांगतात.

कॅशचा तुटवडा जाणवत आहे. आता पगार होत आहेत. त्यामुळे कॅशची मागणी वाढली आहे. शहरासह जिल्ह्यात किमान ५ हजार कोटींची आवश्यकता आहे.
- रवी धामणगावकर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोंधळ तासभर, पण काम १२-१२ तास!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘लोकसभेतील गोंधळ पाहून राजकारणात करिअर करावे की नाही, असे वाटते,’ असा प्रश्न शारदा मंदिर शाळेतील विद्यार्थिनींनी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना विचारला. ‘तासभर गोंधळ होतो, पण १२-१२ तास सभागृहाचे कामकाज चालते. देशाचे कायदे तेथे तयार केले जातात. समाजकारणाची आवड असेल तरच राजकारणात या,’ असे उत्तर महाजन यांनी त्यांना दिले.
शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर महाजन यांनी शारदा मंदिर शाळेला भेट दिली. त्यांनी शाळेच्या आवारातच काही विद्यार्थिनींशी संवाद साधला. एका विद्यार्थिनीने लोकसभेतील गोंधळाबद्दल प्रश्न विचारला. ती म्हणाली, ‘लोकसभेत अस्थैर्य आहे असे वाटते. तेथे होणारा गोंधळ पाहून राजकारणात करिअर करावे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.’ या प्रश्नाला उत्तर देताना महाजन म्हणाल्या, ‘राजकारणात यायचे म्हणून काहीही करू नका. उत्तम शिक्षण घ्या, खूप खेळा. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत जेवढे काही वाचता येईल तेवढे वाचा. त्यानंतर वाचनाची गती कमी होत असते. समाजकारणाची खरोखरच आवड असेल, तर राजकारणात येता येते. लोकसभेतला एक खासदार दहा-वीस लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करीत असतो. त्यांना खूप बोलायचे असते. वेळेचाही प्रश्न असतो. प्रत्येकाला वाटते आपण खूप बोलावे. खासदारांना पक्षाचीही धोरणे मांडायची असतात. गोंधळ अर्धा-एक तास असतो. त्यानंतर लोकसभेचे काम बारा-बारा तास चालते. चर्चा होतात. निर्णय घेतले जातात. राजकारण तसे वाईट नसते. प्रत्येकाने आपला तोल सांभाळणे गरजेचे असते.’
लोकसभा अध्यक्षापर्यंतचा प्रवास कसा झाला, असा प्रश्न महाजन यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, मी काही आज अचानक अध्यक्ष झाले, असे नाही. २६-२७ वर्षे मी लोकसभेत खासदार म्हणून आहे. काही काळ मंत्रीही होते.’
चिपळूण ते दिल्लीच्या प्रवासात दिल्लीची प्रेरणा कशी मिळाली, या प्रश्नावर महाजन यांनी काही बाबी स्पष्ट केल्या. चिपळूणला मी शाळेत जात होते. त्या काळात खेळतही खूप होते. वाचन देखील खूप केले. नंतर मुंबईला आले, नोकरी करून शिकले. मी लहान असतानाच आई वारली, नंतर काही वर्षांनी वडीलही गेले. आम्ही भावंड एकमेकांना धरून राहून शिकत गेलो. वाढत गेलो. लग्नानंतर इंदूरला गेले. सुदैवाने सासू-सासरे चांगले मिळाले. लग्नानंतरच बीए, एमए, एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. राष्ट्रसेविका समितीचे काम करीत होते. त्यावेळी रामायण-महाभारतावर प्रवचन देऊ लागले. १९७५मध्ये आणीबाणी लागली. त्यानंतरच्या निवडणूकीत इंदूरमधून लोकसभेवर निवडून आले. तेव्हापासून दिल्लीच्या राजकारणात आहे.’

अहल्याबाई होळकर आदर्श
अहल्याबाई होळकर या आपल्या आदर्श आहेत. दुःख बाजूला सारून त्यांनी समाजासाठी काम केले. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी मंदिरे आणि घाट बांधले, असे सुमित्रा महाजन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

लोकसभेत अस्थैर्य आहे असे वाटते. तेथे होणारा गोंधळ पाहून राजकारणात करिअर करावे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
- विद्यार्थिनीचा प्रश्न

गोंधळ अर्धा-एक तास असतो. त्यानंतर लोकसभेचे काम बारा-बारा तास चालते. चर्चा होतात. निर्णय घेतले जातात. राजकारण तसे वाईट नसते.
- सुमित्रा महाजन, लोकसभा अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅरेक्टर बिल्डिंगही करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
करिअर तर होतच असते. त्यासोबत कॅरेक्टर बिल्डिंग करा, असे आवाहन लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींना केले. शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या शताब्दीपूर्ती सोहळ्यात त्या बोलत होत्या. ‘मी दिशा देणारी ठरू शकते एवढे ज्ञान येण्याच्या दृष्टीने शिका. स्त्रीने उत्तम सारथी व्हावे,’ असेही त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले.
शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून सुमित्रा महाजन बोलत होत्या. व्यासपीठावर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, उपाध्यक्ष बॅ. जवाहरलाल गांधी, सरचिटणीस अॅड. दिनेश वकील, सहसचिव डॉ. श्रीरंग देशपांडे, शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. रश्मी बोरीकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला शालेय मुला-मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचे पाहून सुमित्रा महाजन यांनी तयार करून आणलेले लेखी भाषण बाजूला ठेवले व उत्स्फूर्तपणे उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या,‘ नवीन प्रकारचे शिक्षण गरजेचे आहेच, पण आजच्या स्थितीत आमची मुले मार्क कमावणारी मशीन झाली आहेत. मुलं काय शिकतात, काय बोलतात, कसे वागतात, हे पाहण्यापेक्षा पालकांचे लक्ष मुलांच्या टक्क्यांवर आहे. त्यामुळे भविष्यात मुले ‘टक्के’ कमवायला लागतील. अलीकडच्या काळात ‘पॅकेज’चा विषय नेहमी बोलला जातो. पॅकेज महत्त्वाचे असले, तरी जीवनात मनुष्य बनायला शिका.’
तंत्रज्ञानाचे शिक्षण महत्त्वाचे आहेच, पण साहित्य माणून बनवायला मदत करते. त्यामुळे इतर शिक्षणाबरोबर साहित्यही महत्त्वाचे आहे, असे महाजन म्हणाल्या. शिकण्याचा मूळ उद्देश ज्ञानाबरोबरच मुलांचे जीवन घडवणे हा आहे. शाळेत जाऊन मुले खेळली नाहीत, तर त्यांना या मातीची ओळख कशी होणार. ही जननी जन्मभूमी आहे हे, त्याला कसे कळणार, असा प्रश्न त्यांनी विचारला.
मुला-मुलींनी खूप खेळले पाहिजे. खेळता खेळता पडले पाहिजे. खेळामुळे अनेकानेक गुण आत्मसात करता येतात. एकत्र कसे रहायचे, ते खेळामुळे शिकता येते. टीमवर्क काय असते ते खेळामुळे कळते, असे त्यांनी सांगितले.
बागडे म्हणाले, ‘माणसाचे वय मर्यादित असते. संस्थेमध्ये चांगली माणसे आली पाहिजेत. सरस्वती भुवन ही दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेतून चांगले शिक्षक, चांगले विद्यार्थी निर्माण झाले आहेत.’
अॅड. दिनेश वकील यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थिनींच्या प्रतिनिधी म्हणून डॉ. सविता पानट यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स.भु.शिक्षण संस्थेला ५१ हजारांची देणगी दिली. शारदा मंदिर शाळेच्या माजी शिक्षिका ताराबाई लड्डा, रत्नप्रभा आवडेकर-गोगटे यांचा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. रिले स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल राशी जाखेटी या विद्यार्थिनीचाही गौरव करण्यात आला.

शंभर वर्षांची तरुणी
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर म्हणाले, ‘शारदा मंदिर कन्या प्रशाला शंभर वर्षांची झाली, म्हणजे ही प्रशाला म्हातारी झाली असे नव्हे. ही प्रशाला शंभर वर्षांची तरुणी आहे.’ सुमित्रा महाजन यांनीही या संस्थेचा उल्लेख गौरवाने केला. त्या म्हणाल्या, ‘औरंगाबादचा इतिहास मोठा आहे. तसाच संस्थेचा इतिहास देखील मोठा आहे. ही माणसांनी झिजून मोठी केलेली संस्था आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दख्खनचा ताज’ भुरळ घालतो!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मध्ययुगीन स्थापत्यशैलीचे अजोड स्मारक बीबी का मकबरा पाहून लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन हरखून गेल्या. मकबऱ्याचे वेगळेपण जाणून घेत महाजन यांनी सहलीसाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मकबरा भेटीवेळी पर्यटक आणि विद्यार्थ्यांनी महाजन यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली.
शारदा मंदिर प्रशालेच्या शताब्दीपूर्ती कार्यक्रमानिमित्त लोकसभा अध्यक्ष महाजन सोमवारी शहरात होत्या. या कार्यक्रमानंतर महाजन यांनी दुपारी पाणचक्की आणि बीबी का मकबरा या पर्यटनस्थळांना भेट दिली. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक आर. सुब्रमण्यम, पुरातत्व संरक्षक विभागाचे शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. बीबी का मकबऱ्याच्या बांधकाम शैलीची महाजन यांनी माहिती घेतली. केंद्रीय पुरातत्व विभागाचे सहाय्यक सर्वेक्षक किशोर चलवादी यांनी मकबऱ्याची संपूर्ण माहिती सांगितली. औरंगजेबाच्या मुलाने आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मकबरा बांधला. आग्रा येथील ताजमहालाच्या प्रतिकृतीशी साधर्म्य असल्यामुळे मकबऱ्याला ‘दख्खनचा ताज’ म्हणतात. पूर्ण बांधकाम चुन्यात करण्यात आले. उद्यान आणि वास्तूसह परिसर ३२ एकर आहे,’ असे चलवादी यांनी सांगितले. मकबऱ्याचे वैशिष्ट्य जाणून घेत महाजन यांनी वास्तूबद्दल आश्चर्य व्यक्त केले. परिसरात वीटभट्ट्या असल्यामुळे मकबरा काळवंडत असल्याची माहिती रहाटकर यांनी दिली. ही वास्तू जतन करण्याची आवश्यकता असल्याचे महाजन म्हणाल्या. पर्यटक आणि विद्यार्थ्यांनी महाजन यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. वेळेअभावी पूर्ण मकबरा पाहणे शक्य नसल्यामुळे महाजन यांनी दहा मिनिटांत भेट आटोपली.

मी कोण आहे?
बीबी का मकबरा पाहण्यासाठी मुसळगाव (ता. सिन्नर) येथील शाळेची सहल आली होती. विद्यार्थ्यांनी सुमित्रा महाजन यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. ‘तुम्ही माझ्यासोबत फोटो काढत आहेत, पण मी कोण आहे,’ असा प्रश्न महाजन यांनी विचारताच विद्यार्थिनी स्तब्ध झाल्या. ‘या लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन आहेत,’ असे एका शिक्षिकेने पटकन सांगून वेळ मारून नेली अन् महाजन यांनी विद्यार्थ्यांसह आनंदाने फोटो काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कँपेन : पर्यटनाला चालना मिळेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद शहर ओळखले जाते, परंतु ऐतिहासिक स्थळांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा शहरात नाहीत. पर्यटनाला चालना देण्याकरिता आधुनिक क्रिकेट स्टेडियम उभारण्याची गरज आहे. क्रिकेट स्टेडियम समितीत कोणतीही भूमिका करण्याची तयारी असल्याचे सीए रोहन आचलिया यांनी सांगितले.
‘क्रिकेट स्टेडियम मटा कँपेन’ मालिकेबद्दल बोलताना सीए रोहन आचलिया म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम औरंगाबादेत व्हावे यासाठी चालना देण्यासाठी ‘मटा कँपेन’ नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. क्रिकेटबरोबरच अन्य कोणत्याही खेळांच्या आधुनिक सुविधांचा शहरात मोठा अभाव आहे. क्रिकेट हा खेळ घराघरांत लोकप्रिय आहे. साहजिकच मुलांचा या खेळाकडे अधिक कल आहे. क्रिकेटमुळे पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते. गेल्या २५ वर्षांपासून मी क्रिकेटशी संबंधित आहे. आधुनिक सुविधांशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. किती वर्षे बेसिक सुविधांवरच आपण समाधान मानणार आहोत. क्रिकेट स्टेडियम समिती स्थापन करण्याचा निर्णय योग्यच आहे. या समितीत अगदी बाराव्या खेळाडूची भूमिका करण्याचीही आपली तयारी अाहे.’
औरंगाबादेतील युवा खेळाडूंची गुणवत्ता चांगली असून, त्यांना योग्यवेळी योग्य संधी मिळाल्यास आपलेही खेळाडू राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडतील, असे सीए वसीम अमीन बेग यांनी सांगितले. बेग म्हणाले, ‘औरंगाबाद शहर हे शेकडो वर्षांपासून ऐतिहासिक ओळख आहे. आता यापुढे जाऊन औरंगाबादची ओळख निर्माण होणे आवश्यक आहे. क्रिकेट हा देशभर प्रचंड लोकप्रिय असलेला खेळ आहे. क्रिकेट स्टेडियम उभारल्यास दर्जेदार सामने होतील. त्यातून पर्यटनला मोठी चालना मिळू शकेल. कसोटी, वन-डे, टी-२० सामन्यांकरिता हजारो लोक पाहण्यासाठी येतात. या लोकांमुळे पर्यटनाला सुगीचे दिवस येऊ शकतील. क्रिकेटचा सर्वांगिण विकास होणे आता गरजेचे आहे. सुविधांअभावी खेळाडू घडू शकत नाही. इक्बाल सिद्दिकी हा एकमेव कसोटीपटू शहरातून घडला आहे. रणजीपटू अंकित बावणेनंतर कोण हा प्रश्न आहेच. क्रिकेट स्टेडियम समितीत अनुभवी खेळाडूंचाही समावेश असावा असे वाटते. कार्पोरेट क्षेत्र व राजाश्रय लाभला तर स्टेडियम उभारणी शक्य होणारी गोष्ट आहे.’
सीए पुनीत अग्रवाल म्हणाले, ‘क्रिकेट खेळाचे स्वरूप खूप आधुनिक झालेले आहे. त्यानुसार आता सुविधांचे निर्माण करणे आवश्यक आहे. मराठवाड्यात एकही क्रिकेट स्टेडियम नाही. अनेक खेळाडूंना पुणे, मुंबईला जावे लागते. स्टेडियम उभारणीनंतर या परिस्थितीत निश्चित बदल होईल. मैदानांवर लशग्रीन लॉनही दिसत नाही. खेळपट्टींचा उपयोग अधिक व्हायला हवा. नेट सुविधा शहरात अनेक ठिकाणी असण्याची गरज आहे. आगामी पाच वर्षांमध्ये खेळांना खूप चालना मिळणार आहे. सुविधा नसल्याने अनेकजण पुढे येत नाहीत. क्रिकेट स्टेडियम समितीने प्रोफेशनल मॅनेजमेंटसारखे काम केले तर एक नवे इन्फ्रास्ट्रश्चर उभारल्याशिवाय राहाणार नाही हे निश्चित.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कामकाजानंतर मी आजी असते’

0
0

औरंगाबाद : कामकाज संपल्यावर मी आजी असते, नातवांना घेऊन सिनेमाला जाते. मुलं तिकीट काढून देतात. कामात कितीही व्यस्त असले तरी आपल्याला वेळ काढावा लागतो, असे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
लोकसभा अध्यक्ष झाल्यापासून तुम्ही कुटुंबाला वेळ कसा देता, महिला असल्याचा अध्यक्ष म्हणून काम करताना फायदा होतो की तोटा, असे प्रश्न पत्रकारांनी महाजन यांना विचारले. त्यावर त्या म्हणाल्या,‘महिला असल्याचा फायदाच असतो. महिलेत मातृत्वगुण असतात, सर्वसमावेशकतेचा गुण देखील तिच्यात असतो. आईला आपल्या मुलाचा खूप राग आला, तर ती रागावते, पण दुसऱ्याच क्षणाला ती त्या मुलाला जवळही घेते. महिलेमध्ये हे आपोआप घडते. पुरुषांमध्ये ममत्वाची भावना तुलनेने कमी असते. खासदारांनी गोंधळ घातला म्हणून मी रागावते पण राग मनात ठेवत नाही.’
लोकसभा अध्यक्ष म्हणून कितीवेळ काम करायचे, हे मी ठरवले आहे. त्यामुळे मला माझा वेळ काढता येतो, असा उल्लेख करून महाजन म्हणाल्या,‘मी आजी आहे. नातवांना घेऊन सिनेमाला जाते. मुलं तिकीट काढून देतात. तिकीट न काढता सिनेमाला जात नाही. सिनेमाला जाताना सुरक्षा रक्षकांनाही मी सांगत नव्हते, पण त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मी सिनेमाला येत आहे, असे सिनेमा टॉकीज ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे, तेथे फोन करून सांगते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जण ठार

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

औरंगाबाद आणि यवतमाळ येथे आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद येथे आज दुपारी ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रकाश नारायण देशपांडे (वय ४०) आणि त्यांचा मुलगा शुभम प्रकाश देशपांडे (१८) जागीच ठार झाले. देशपांडे हे आडगाव खुर्द येथील रहिवाशी आहेत. त्यांचा फेब्रिकेशनचा व्यवसाय होता. तर शुभम हा इयत्ता बारावीत शिकत होता.

दुसरा अपघात यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा येथे झाला. भरधाव ट्रॅक्टरमधील सिमेंट आणि सळ्या अंगावर पडल्यानं तिघांना प्राण गमवावा लागला. प्रशांत चौधरी, हनुमान येडमे आणि पांडूरंग येडमे अशी मृतांची नावे आहेत. तर अजय वैद्य असे जखमीचे नाव आहे. घाटंजी ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढसाळांच्या प्रत्येक शब्दात एल्गार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील शिव्या अनेकांना टोचतात. मात्र, त्या शिव्या अर्थपूर्ण व्यापक आहेत. बंडाचा एल्गार दाखवणारे त्यांचे शब्द आहेत. तृतीयपंथीयांसाठी ढसाळ यांनी पहिल्यांदा मोर्चा काढला होता. त्यामुळे माझ्या क्रांतीचे ते जनक आहेत,’ असे प्रतिपादन कवयित्री दिशा शेख यांनी केले. पद्मश्री ढसाळ यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित काव्यस्मृती अभिवाचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पँथर नामदेव ढसाळ यांच्या जन्मदिनानिमित्त रिपब्लिकन सेनेने काव्यरुपी अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिरवळीवर मंगळवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला कवी प्रा. सुदाम राठोड व कवयित्री दिशा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. मशाल पेटवून या काव्यस्मृती अभिवाचन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ढसाळ यांच्या कवितेचे वेगळेपण दिशा यांनी सांगितले. ‘सोशल मीडियामुळे मी लिहिती झाले. तू ढसाळांसारखे लिहितेस अशा प्रतिक्रिया आल्यानंतर मला ढसाळ माहीत झाले. ढसाळांचा प्रत्येक शब्द एल्गार होता. विषमता असलेल्या व्यवस्थेवर परखड भाष्य करणारी त्यांची कविता होती. प्रत्येक कवीला प्रेरणा देणारे कवी ही त्यांची ओळख ठसठशीत आहे,’ असे दिशा म्हणाल्या. यावेळी कवी सुनील उबाळे, ध. सु. जाधव, रामप्रसाद वाव्हळ, अविनाश भारती, नीलेश चव्हाण, प्रा. बाळासाहेब लिहिणार, प्रा. किशोर वाघ व अविराज जवंजाळ यांनी ढसाळ यांच्या कवितांचे अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन निकम यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिमुकल्यांनी केले मतदानाचे आवाहन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. आपल्या गावातील प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावावा, यासाठी भिंदोन (ता. औरंगाबाद) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून घरोघरी जाऊन मतदानाचा संदेश देणाऱ्या निमंत्रण पत्रिका दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी आपण काहीतरी करावे, या उद्देशाने शिक्षक कैलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून संदेश देण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांनी मतदान करण्याचा संदेश देणाऱ्या निमंत्रणपत्रिका तयार केल्या. प्रभातफेरीमध्ये ‘ आधी मतदान केंद्रावर मग जाऊ शेतावर’, ‘पिक्चर नही, सैर नही, शादी करेंगे बादमे, पाच साल का चुनाव है भाई मतदान करेंगे साथ मे’ आदी घोषणा दिल्या. या उपक्रमाचे केंद्रप्रमुख विलास जाधव यांनी कौतुक केले. रियाज शेख, संजय निकम, प्रताप जारवाल, रेखा जारवाल, मीनाक्षी राऊत आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुद्रणासाठी कुशल मनुष्यबळ हवे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुद्रणाचा संबंध आता केवळ छपाईशी निगडित राहिला नसून पॅकेजिंग व अन्य क्षेत्रांतही मोठी प्रगती झाली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या उद्योगासाठी भारतात कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर्स प्रिटर्सचे अध्यक्ष प्रा. कमल चोप्रा यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुद्रण तंत्रज्ञान विभागातर्फे ‘प्रिंटिंग फॉर पॅकेजिंग : अ मल्टी-डायमेन्शनल अॅप्रोच’ या विषयावर मंगळवारी (१४ फेब्रुवारी) राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या परिषदेचे उद्घाटन प्रा. कमल चोप्रा यांच्या हस्ते झाले. कुलसचीव डॉ. प्रदीप जब्दे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. चोप्रा म्हणाले, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुद्रण तंत्रज्ञान विभागातर्फे राबविण्यात येणारे उपक्रम हे विभागातील तरुणांना रोजगार आणि स्वयं:रोजगार मिळण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. औरंगाबादमध्ये शासनाची उद्योगांसाठी डीमआयसी योजना प्रस्तावित आहेत. येणाऱ्या काळात या ठिकाणी प्रिंटिंग आणि पॅकेजिंग क्षेत्राता कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठया प्रमाणावर गरज आहे. रोजगाराभिमुख अभ्यास चालविण्याऱ्या या विभागाला सक्षम करण्यासाठी फेडरेशनतर्फे सहकार्य मिळेल.’
कुलसचिव डॉ. जब्दे म्हणाले, ‘जुन्या प्रिंटिंग प्रेस ते वेब ऑफसेट असा ‘खिळा ते कळा’ मुद्रण व्यवसायाच्या प्रगतीचा इतिहास आहे. विद्यापीठातर्फे सैद्धांतिक ज्ञानासोबतचा प्रत्यक्षकही ज्ञान दिले जात आहे.’ देशभरातून १५० संशोधक, मुद्रक परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत सुनील गुप्ता, प्रा.राजेंद्र कुमार अनयाथ, डॉ. अंजनकुमार, सुनील कोकणे, डॉ. लक्ष्मी प्रिया, गुरुप्रीतसिंग बग्गा, दुष्यंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीचे तीन कोटी परत जाणार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागात सुविधा पुरविण्यासाठी लागणाऱ्या औषधी खरेदीची प्रक्रिया सलग दुसऱ्या वर्षी रखडली आहे. सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काही दिवस प्रस्ताव तयार करून धावपळ केली गेली. पुढचा महिनाभर यात काहीच अपेक्षित कार्यवाही होणार नसल्याने तीन कोटी रुपये परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला औषध खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडन (डीपीसी) तीन कोटी रुपयांची तरतूद केली गेली. त्यापैकी अडीच कोटी रुपये चालू आर्थिक वर्षातील असून ५० लाख रुपये गेल्या वर्षीचे अखर्चित आहेत. यातून स्थानिक पातळीवर औषधी खरेदी करणे अपेक्षित आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून राज्यस्तरावर ज्या औषधी खरेदी करून वितरित केल्या जातात. त्या यादीव्यतिरिक्त ज्या औषधी आवश्यक आहेत. त्या दरकरारानुसार स्थानिक जिल्हा परिषदांनी खरेदी करणे अपेक्षित आहे. त्या अंतर्गत तीन कोटी रुपयांमधून औषधी खरेदी करण्याची प्रक्रिया आरोग्य विभागामार्फत राबविणे सुरू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला गेला. दरकराराचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवल्यानंतर अमुक कंपनीचीच औषधी का खरेदी करायची ? असा सवाल उपस्थित करून सदस्यांनी खरेदीच्या प्रस्तावास मान्यता दिली नव्हती. शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी आरोग्य विभागांतर्गत अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदीची योजनाही जाहीर केली होती. पण प्रशासनाच्या अडचणीमुळे ती मार्गी लागू शकली नाही.

...अन् गंगार्पण
तीन कोटींची औषधी खरेदी करण्याबाबत आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला आणि सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागली. यामध्ये अँटीरेबीज, अँटीबायोटिक्ससह ग्रामीण भागात आवश्यक असलेल्या औषधींचा प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. अर्थ विभागाकडून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर खरेदी प्रक्रिया होईल, पण त्याला कधी मुहूर्त लागेल याबाबत मात्र अद्याप अनिश्चितता आहे. मार्चपूर्वी जर हा प्रस्ताव मार्गी लागला नाही, तर अडीच कोटी रुपये परत जाण्याची भीती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात लावले १०० प्रेमविवाह

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
प्रेमविवाहाला येणाऱ्या अनंत अडचणींमुळे दोन जीवांचे आयुष्य उद्धवस्त होऊ नये यासाठी आर्य समाजाने पुढाकार घेतला असून वर्षभरात १०३ प्रेमविवाह लावले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी गारखेडा परिसरातील आर्य भवनच्या आर्य समाज मंदिरामध्ये चार प्रेमविवाह लावण्यात आले.
जातीभेदामुळे प्रेमविवाह करताना अनंत अडचणी येतात. कधी पालकांचा विरोध, तर कधी नातेवाईकांचा. कायदेशीर प्रकिया करताना जोडप्यांना अडचणी येतात. अशावेळी आर्य समाज मध्यस्थ म्हणून पुढे आला असून गेल्या १४ फेब्रुवारीपासून आर्य समाजाने प्रेमविवाह लावण्यास सुरुवात केली व आज विवाहांची शंभरी पार केली. यामध्ये ४९ विवाह आंतरजातीय असून २० विवाह स्वजातीय आहेत. वैदिक पद्धतीने विवाह लावताना कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. मुलगा- मुलगी अल्पवयीन नसल्याची खात्री करून घेतल्यानंतरच विवाह लावले जातात. स्व. संग्रामस‌िंग चव्हाण, पंडित ज्ञानेंद्र शर्मा, सुग्रीव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या कार्यास सुरुवात झाली. डॉ. भालचंद्र कानगोसुद्धा सहाय्य करतात. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर्य समाजाचे प्रधान प्रा. रमेश ठाकूर, उपप्रधान प्रा. रमेश पांडव, डॉ. लक्ष्मण माने, अंजू माने आदींनी प‌रिश्रम घेतले.

आपल्याकडे आजही प्रेमविवाह करण्यास मनाई असते. अनंत अडचणींचा सामना करून जेव्हा इच्छुक जोडपे आमच्याकडे येते, तेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन करणे व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विवाह लावण्याचे काम आमच्यामार्फत होते. पोलिसही आम्हाला खूप सहाय्य करतात. त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. - लक्ष्मण माने, आर्य समाज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीने काय ते जाहीर करावे

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मध्यावधी निवडणुकांबाबत आधी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची भाजपच्या पाठिंब्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. आता त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे,’ असा खडा सवाल मंगळवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. मात्र, पवारांनी पाठिंबा देणार नाही असे जाहीर केल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यानंतर लगेच यू टर्न घेत ‘आजचे स्टेटमेंट मला माहित नाही,’ म्हणत सारवासारव केली.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी चव्हाण जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली. चव्हाण म्हणाले, ‘मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या जनमताचा अंदाज घेणाऱ्या या निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आम्ही समविचारी पक्षांशी आघाडी केली, कारण भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला रोखणे हे उद्दिष्ट आहे. गेल्या अडीच वर्षांतील राज्य व पावणेतीन वर्षांतील केंद्र सरकारचा पर्दाफाश झाला आहे. नोटबंदीमुळे देश वेठीस धरला गेला. पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. एकूणच केंद्र सरकार सपशेल फेल ठरले आहे. भारतीय अभियंत्यांना अमेरिका सोडून परत यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. नोटबंदीनंतर देशातील ४० लाख नोकऱ्या गेल्या, याला जबाबदार कोण?’ असा सवाल करून चव्हाण म्हणाले, की ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक मुंबईत उभे करण्यासाठी असलेल्या इंदू मिलची जागा अद्याप राज्य सरकारच्या नावावर झालेली नाही. शिवस्मारकाचे भूमिपूजन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले. नोटबंदीनंतर काळा पैसा व्हाइट झाला, पण त्याचा फायदा मोदींच्या मित्रांना झाला. २००० ची नोट पंजाब आणि उत्तरप्रदेशची निवडणूक समोर ठेवून चलनात आणली गेली. त्यामुळे भाजपला पक्षनिधी हाताळण्यास मदत झाली’ असा दावा त्यांनी केला. यावेळी आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीए इन्स्टिट्यूट देशात भारी!

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशभरातील सर्वोत्कृष्ट सीए शाखा म्हणून औरंगाबाद इन्स्टिट्यूटचा नवी दिल्ली येथे बुधवारी गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणारी मराठवाडयातील ही पहिलीच शाखा आहे.
इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्स्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे संपूर्ण देशातील सर्व शाखांमध्ये दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येते. आयसीएआयच्या देशामध्ये १७० शाखा असून सदस्यांच्या संख्येनुसार चार श्रेणीतील मध्यम श्रेणीमध्ये औरंगाबाद शाखा अव्वल ठरली. वर्षभरात घेतलेले कार्यक्रम, प्रशासन, सदस्यांचा सहभाग, शाखेच्या कार्यक्रमास उपस्थित तज्ज्ञ आदी विभागांमध्ये शाखेच्या योगदानावर गुण देण्यात आले. अध्यक्ष रेणुका देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरात वेगळ्या प्रकारचे ३५ ते ४० कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, आयसीएआयचे अध्यक्ष देवराज रेड्डी, उपाध्यक्ष नीलेश विकंमसे, उपाध्यक्ष अल्केश रावका, सचिव गणेश शिलवंत, योगेश अग्रवाल, पंकज सोनी, सचिन लाठी, प्रादेशिक परिषद सदस्य उमेश शर्मा उपस्थित होते.

दर्जेदार व नावीण्यपूर्ण कार्यक्रम घेताना प्रत्येक कार्यक्रमाचे चांगलेच हाती आले. आमच्या श्रेणीतील शाखांचेही चॅलेज होते. मिळालेल्या यशाने आमचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. - रेणुका देशपांडे, अध्यक्ष, सीए इन्स्टिटयूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या पाच अधिकाऱ्यांचे निलंबन

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कामातील अनियमितता, अवैध मीटर रिडिंग, कामात कुच्चरपणा, कमी वीजबिल वसुली असा ठपका ठेवत औरंगाबाद आणि जालना ग्रामीण भागातील पाच अधिकाऱ्यांचे महावितरणने सोमवारी रात्री निलंबन केले. यात लेखा विभागाचा उपव्यवस्थापक राहुल मिश्रा, लेखापाल सच्चितानंद पाटील, कार्यकारी अभियंता बी. जी. पवार आणि सहाय्यक अभियंता रवींद्र भावसारचा समावेश आहे.
महावितरणकडून एकीकडे थकबाकीदारांवर कारवाई सुरू आहे. सोबत विभागाला गाळात घालणाऱ्या अधिकाऱ्यांची झडतीही सुरू आहे. सोमवारी औरंगाबाद ग्रामीण भागातील वित्त व लेखा उपव्यवस्थापक राहुल मिश्रा आणि सहाय्यक लेखापाल सच्चितानंद संभाजी पाटील या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ५५ कोटी २५ लाखांचा निधी खर्च करूनही मुख्यालयाकडे वर्ग न करणे, कामात निष्काळजीपणा हा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. जालन्यातील कार्यकारी अभियंता बी. जी. पवार आणि सहाय्यक अभियंता रवींद्र लालचंद भावसार यांचेही निलंबन करण्यात आले. याशिवाय रात्री उशिरापर्यंत जालना विभागातीलच एक आणखी एका अभियंत्याला निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. या तिघांवर कमी वीजबिल वसुली, चुकीचे मीटर रिडिंग घेणे तसेच इतर आरोप ठेवण्यात आले आहेत.

औरंगाबाद ग्रामीण आणि जालना येथील काही अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. सध्या याबाबत पूर्ण माहिती माझ्याकडे नाही. मात्र, महावितरणाकडून थकबाकी वसुली मोहिम सुरू आहे. या मोहिमेला बगल देण्याचे प्रयत्न जर संबंधित अधिकारी करित असतील, तर त्यांच्यावर पुढेही अशीच कारवाई करू. - सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद जालना परिमंडळ

लेखा विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन योग्य नाही. या विभागातील राहुल मिश्रा आणि अन्य निलंबित व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही. यामुळे ही कारवाई योग्य नाही. महावितरणने स्थानिक प्रशासनाला निलंबनाचे टार्गेट देण्यात आले आहे. क्षुल्लक कारणांवरून निलंबन होत असेल, तर कामगारांच्या कामावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. निलंबनाच्या या टार्गेटविरोधात आम्ही आंदोलन करण्याचा विचार करित आहोत. - अरुण पिवळ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोज ४० लाखांचे बॅँकांना वितरण

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चलनटंचाईला आळा घालण्यासाठी रोकड भांडारातून बॅंकांना रोज २० ते ४० लाखांपर्यंतचा चलन पुरवठा सुरू आहे. मंगळवारी शहरातील बहुतांश एटीएम सुरू झाले.
चलनपुरवठ्याबाबत माहिती देताना स्टेट बँक ऑफ हैदराबादचे रवी धामणगावकर म्हणाले, ‘शहरातल्या ५ रोकड भांडारातून आता हळुहळु रोकड पाठवणे सुरू झाले आहे. दोन महिन्यांपासून किमान ८ ते १० लाख रुपये गेल्या काही दिवसांपासून पाठवणे सुरू होते. ते आता २० ते ४० लाखापर्यंत पाठवणे सुरू झाले आहे. आता मागणीनुसार काही दिवसांत पुरवठा करणे शक्य होऊ शकते. अनेक एटीएमवर संबंधित बँकांकडून रोकड भरणा सुरू झाला आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसांत सुमारे २०० हून अधिक एटीएमवरील भरणा रितसर करण्यात आला.खासगी, सहकारी बँकांमध्ये काऊंटरवरील ग्राहकांना पुरेशी रोकड मिळत नव्हती. यामुळे ग्राहकांना कमी रोकड दिली जात होती. आता ही चणचण कमी होईल. कारण, रोकड भांडारमधून आता त्यांनाही किमान १५ लाखांपर्यंत रोज रोकड वितरण करण्याची व्यवस्था रोकड भांडारातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय युवक महोत्सवात विद्यापीठ संघाची बाजी

0
0


म. टा. प्र‌ति‌निधी, औरंगाबाद
कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने थिएटर चॅम्पियनशिप मिळवली असल्याची माहिती विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी दिली. विद्यापीठाच्या या यशामुळे संघाला आता आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात प्रवेश मिळाला आहे.
यंदा आंतरराष्ट्रीय महोत्सव भारतातील इंदौर येथे होणार आहे. राष्ट्रीय युवक महोत्सवात विद्यापीठाच्या संघाने थिएटरसह स्कीट २, मिमिक्री २, क्ले मॉडलिंग २, कसिक व्होकलमध्ये दोन पारितोषिके पटकावले आहेत. विद्यापीठ संघाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय विद्या‌र्थी कल्याण विभागाचे संचालक सुहास मोराळे यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.
दरम्यान, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी, १० फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते. मंगळवारी, १४ फेब्रुवारी रोजी या महोत्सवाचा समारोप झाला. देशभरातील ७७ विद्यापीठांचे संघ या महोत्सवात सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या संघाने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कुलगुरू, कुलसचिव यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत भरतीसाठी हायकोर्टात याचिका

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) चतुर्थ व तर तृतीय श्रेणीची एकूण २५८ रिक्त पदे भरा, या मागणीसाठी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका करण्यात आली आहे. याचिकेत वैद्यकीय शिक्षण सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय विभागाचे संचालक, शासकीय वैद्यकीय इस्पितळाचे अधिष्ठाता यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. संजय गंगापूरवाला व न्या. कालिदास वडणे यांनी दिले.
पालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती इक्बालसिंग यांनी ही याचिका केली आहे. वाढीव कामाच्या ताणामुळे शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा सेवाकाळात मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरावीत तसेच कर्मचाऱ्यांचे इतर प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही पदे न भरल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतली जात आहेत. वाढीव कामामुळे आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा आजारी पडून सेवाकाळात मृत्यू झाला हे अतिशय गंभीर असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकाची उचलबांगडी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूखंड माफियाशी हातमिळावणी करत खुनाच्या प्रयत्नाच्या खोट्या गुन्ह्यात आरोपींना अडकावल्यामुळे पोलिस आयुक्तांनी बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलिम शेख यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यांची पदावनती करत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षक म्हणून मंगळवारी बदली केली.
९ फेब्रुवारी रोजी रात्री प्लॉटच्या वादातून टाऊन हॉल येथील पुलावर सोहेल बावजीर व शेख कलीम यांना चौघांनी मारहाण केली होती. यामध्ये शेख कलीम याला पुलावरून खाली फेकून दिल्यामुळे कलीम गंभीर जखमी झाला होता. सोहेल बावजीर याच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तत्परता दाखवत ११ फेब्रुवारी रोजी अहेमद शेख इमाम शेख उर्फ पटेल, मुजीब हबीब शेख उर्फ पटेल, शेख नाजेर शेख शाहनूर उर्फ पहेलवान, अब्दुल अहेमद वली महमंद उर्फ मोतीवाला उर्फ कादर अशा चौघांना पकडले होते. यानंतर सोहेलच्या पुरवणी जबाबात देखील काही संशयित आरोपींची नावे टाकली होती. दरम्यान या गुन्ह्यात पकडलेल्या तीन आरोपी पैकी घटनास्थळी नसताना त्यांचे नाव गोवल्याचा संशयास्पद प्रकार समोर आला आहे. या आरोपींकडे तसा पुरावे देणारे सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांच्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

थिटेंकडे कार्यभार
भूखंड माफियांनी पोलिसांना हाताशी धरून खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची जोरदार चर्चा बेगमपुरा पोलिस ठाण्यात रंगली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत शेख यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. बेगमपुरा पोलिस ठाण्याचा कार्यभार सायबर सेलचे एपीआय उन्मेश थिटे यांच्याकडे सोपवला.

पोलिस जमादाराची फूस
हुसैन कॉलनी, न्यायनगर भागात राहणाऱ्या एक भूखंड माफिया या प्रकरणामागे आहे. पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका जमादाराशी या भूखंड माफियाचे घनिष्ठ सबंध आह‌ेत. आरोपींना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची चिथावणी या जमादाराने दिल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजमध्ये ९० कोटी खर्चून ‘एन्ड्रेस’चा प्रकल्प

0
0


म. टा. प्र‌ति‌निधी, औरंगाबाद
पंचवीस एकर जागेत, ९० कोटींची गुंतवणूक करून वाळूजमध्ये पाचवा प्रकल्प उभारून एन्ड्रेस अँड हाऊजर कंपनीने दहावा वर्धापनदिन मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा केला. स्मार्टसिटीला लागणारी उत्पादने तयार येथे तयार होतील, अशी माहिती कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक क्लॉस एन्ड्रेस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
औरंगाबादेतील ऑटोमेशन इन्स्ट्रुमेंटेशन विभागाच्या इमारतीचे विस्तारीकरण नुकतेच करण्यात आले. यामाध्यमातून कंपनीने ४५ कोटींची गुंतणूक या प्रकल्पात केली. या विस्तारीत प्रकल्पाचे उदघाटन आज करण्यात आले. यावेळी अध्यक्ष क्लाऊस एन्ड्रेस, ग्लोबल सीईओ मॅथियस अल्टेनडॉर्फ, कॉर्पोरेट संचालक डॉ. ऍन्ड्रेस मायर, अध्यक्ष व संचालक (ऑटोमेशन इन्स्ट्रुमेंटेशन) श्रीराम नारायण यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
एन्ड्रेस म्हणाले, ‘१९९९ मध्ये आम्ही औरंगाबादेत आलो. सुरुवातीला फ्लोटेक आणि नंतर ऑटोमेशन क्षेत्रातील उद्योग उभारला. नंतर इन्फोसर्व्ह क्षेत्रात उतरलो. गेल्यावर्षी ऑटोमेशन इन्स्ट्रुमेंटेशन विभागाच्या इमारतीचे विस्तारीकरणाचे काम सुरू झाले.’ शिक्षणासोबतच प्रशिक्षण देणारी दुहेरी शिक्षणपद्धत निर्माण करण्यावर आमचा भर राहिला. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आमच्याकडे नोकऱ्या दिल्या. आगामी पाच वर्षांत दोनशे कोटींची गुंतवणूक केली जाणार असून त्यातून तेराशेवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील.’
अल्टेनडॉर्फ यांनी जागतिक कामगिरीविषयीची माहिती दिली. ‘आम्ही १९९९ पासूनच मेड इन इंडियाचा पुरस्कार केला. येथून जगभरात उत्पादने निर्यात केली. केमिकल, पेट्रोकेमिकल, फूड अॅण्ड ब्रिव्हरिजेस, ऑइल अॅण्ड गॅस, वेस्टवॉटर, पॉवर, रिन्यूएबल इनर्जी, लाइफ सायन्सेस, पल्प ऍण्ड पेपर या क्षेत्राशी आम्ही निगडीत आहोत. त्याकरिता लागणारी पुरक यंत्रे आम्ही तयार करतो.'
डॉ. मायर म्हणाले, ‘गेल्यावर्षी कंपनीतर्फे तब्बल ५० नवीन संशोधीत उत्पादने बाजारपेठेत आणली. रिफाइन ऑइल उत्पादन उद्योग क्षेत्राला पूरक अशी हर्टबीट टेक्नॉलॉजी आम्ही निर्माण केली. उत्पादनादरम्यान अपघात टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. जलस्तर किंवा केमिकलस्तराची अचूक माहिती मिळावी, पाइपलाइन प्रेशर नियंत्रित करावे याकरिता वायफायच्या मदतीने नियंत्रित करता येऊ शकणारे मास फ्लो मीटर आम्ही तयार केले. सांडपाणी व्यवनस्थापनात मदतशीर ठरू शकणारी उत्पादने तयार केली जात आहेत.'

देशभर १ हजार रोजगार
श्रीराम नारायण म्हणाले, ‘इमारत विस्तारीकरणासोबतच संपूर्ण परिसरातील इमारतीवर आम्ही सोलार पॅनल यंत्रणा उभारली आहे. तिचे उदघाटन आज केले. यातून जवळपास ८० टक्के वीज वापराची गरज भागेल. २००८ मधील पाच हजार चौरस मीटरवरून साडेआठ हजार चौरस मीटर विस्तारीकरण केले गेले. सध्याच्या विस्तारीकरणानंतर आम्ही येथे जवळपास ४५ कोटींची गुंतवणूक केली असून गुंतवणुकीचा आकडा शंभर कोटींवर गेला आहे. भारतात साडेतीनशे कोटींवर गुंतवणूक केली असून त्याद्वारे एक हजारांवर थेट रोजगार उपलब्ध झाले आहेत.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images