Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘विद्यार्थी न्यायाधिकरण’ला मुहूर्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या ‘विद्यार्थी न्यायाधिकरण’ला मुहूर्त मिळाला आहे. विद्यापीठाने ‘विद्यार्थी न्यायाधिकरण’चे नोडल ऑफिसर म्हणून फेब्रुवारीअखेर सेवानिवृत्त होत असलेले सरस्वती भुवनचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. बिराजदार यांची नियुक्ती केली आहे. नवीन विद्यापीठ कायदा मार्चमध्ये लागू होणार आहे. त्यापूर्वीच विद्यापीठाने दाखविलेली तत्परता विद्यार्थ्यांना न्याय देईल का, असा प्रश्न आहे.
कॉलेज, विद्यापीठस्तरावर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवेशातील अडचणी असो की कॉलेजांमधील मनमानीपणे अतिरिक्त शुल्क वसुली असो. याबाबत विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. हे लक्षात घेत विद्यापीठाने ‘विद्यार्थी न्यायाधिकरण’ची घोषणा केली. १६ ऑगस्ट २०१६ रोजी व्यवस्थापन परिषदेत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन वर्षे याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या प्रशासनाला अखेर जाग आली आहे. विद्यापीठाने नोडल ऑफिसर म्हणून नियुक्तीचे आदेश काढले आहेत. या प्राधिकरणाचे नोडल ऑफिसर म्हणून डॉ. एस. व्ही. बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. बिराजदार यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

अन्यायाविरुद्ध दाद मागता येणार
‘विद्यापीठ कायदा- १९९४’ प्रमाणे नवीन विद्यापीठ कायद्यातही तशी तरतूद आहे. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायद्या-१९९४ मधील ६८(१)प्रमाणे हे न्यायाधिकरण होते. यात प्राधिकरण अधिकारी हे प्रमुख असतील असे सांगण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाने निर्णय घेतला. त्यानंतर आता विद्यापीठाला जाग आली आहे. न्यायाधिकरणात विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर निर्णय घेण्याचा त्यांना कायद्यानुसार अधिकार असतो. प्रवेश, प्रवेशाचे नियम, शुल्क यात अन्याय होत असेल तर, विद्यार्थी न्यायाधिकरणाकडे दाद मागू शकतो.

प्राचार्यपदी डॉ. जब्दे यांची चर्चा?
२०१४ला घेतलेल्या निर्णयाची विद्यापीठाला आता आठवण झाली. नोडल ऑफिसर म्हणून डॉ. बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. बिराजदार हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची ऑफिसर म्हणून निवड झाल्याने न्यायाधिकरण चर्चेत आले आहे. त्याचवेळी प्राचार्यपदाच्या रिक्त जागेवर विद्यापीठाचे विद्यमान प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकाळी माहिती पुस्त‌िकांच्या शुल्कात तफावत असते. शुल्क आकारणीतही फरक असतो. त्याबाबत विद्यार्थी न्यायाधिकरणाकडे तक्रार करू शकतो. नवीन विद्यापीठ कायद्यातही तशीच तरतूद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चित दिलासा मिळेल.
- डॉ. एस. व्ही. बिराजदार, प्राचार्य, सरस्वती भुवन विज्ञान कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपीच्या निर्णयाचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य सरकार जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन नियमित करत असताना औरंगाबाद जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांचे पगार जिल्हा बँकेमार्फत करण्याचा घाट घातला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुविधांचा अभाव असल्याने शिक्षकांना फटका बसत आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन उशिराने होत आहे. या त्रासाबाबत वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप यांनी सांगितले, की जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन एप्रिल २०१४पासून शालार्थ वेतन प्रणालीद्वारे होत आहे. हे सुरू असताना मध्येच औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रमुख पदाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनातील काही अधिकारी यांनी शिक्षकांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फतच व्हावे, असा निर्णय घेतला आहे. तथापि जिल्हा बँकेत ६००० रुपयांहून अधिक रक्कम मिळत नाही. आरटीजीएसमध्येही धनादेशाची सक्ती केली जाते. जिल्हा बँकेला एटीएमची सुविधा नाही. त्यामुळे शिक्षक हतबल झाले आहेत. या प्रश्नासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेऊन दाद मागितली जाईल. तिथेही तोडगा न निघाल्यास शिक्षक संघाच्या वतीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावत दाद मागणार येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

८ टक्के कर्जदार
जिल्हा परिषदेच्या सुमारे साडेबारा हजार शिक्षकांपैकी ५ ते ८ टक्के शिक्षक जिल्हा बँकेचे कर्जदार आहेत. त्यांच्याकडून कर्जाची वसुली करण्यासाठी उर्वरित शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याचे आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखा परीक्षकांकडे लेखाधिकाऱ्यांचा चार्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्य लेखा परीक्षकांकडे मुख्य लेखाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे सर्वसाधारण सभेत शनिवारी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना कोंडीत पकडले. तात्पुरत्या स्वरुपात हा पदभार देण्यात आला आहे. मुख्य लेखाधिकारीपदावर शासनाकडून लवकरच अधिकारी मिळणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
मुख्य लेखा परीक्षक कुणाच्या अधिपत्याखाली काम करतात, मुख्य लेखा परीक्षकांना मुख्य लेखाधिकाऱ्याचा पदभार देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत काय, जो खर्च करणार तोच लेखा परीक्षणही करणार असे कसे काय, अशी प्रश्नांची सरबत्ती करून राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवकांनी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आणि मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवतराज यांना कोंडीत पकडले. आयुक्तांची हुकुमशाही चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
नगरसेवकांनी नगरसचिव दिलीप सूर्यवंशी यांना लेखा परिक्षकांची अधिकार आणि कर्तव्य काय हे वाचून दाखवायला भाग पाडले.

मनपा आयुक्तही आक्रमक
लेखा परीक्षक हे स्थायी समितीचे सभापती, सर्वसाधारण सभा, महापौर यांच्या अधिपत्याखाली काम करतात, असे स्पष्ट झाल्यानंतर आयुक्तांना लेखा परीक्षकांना पदभार देण्याचा, त्यांच्याकडे चौकशा सोपवण्याचा अधिकार आहे काय, असा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांना अधिकार नाहीत, असे कायद्यात कुठे लिहिलेले आहे, असे म्हणत आक्रमक झालेल्या आयुक्तांनी नंतर ही एक तात्पुरती व्यवस्था आहे लवकरच शासनाकडून अधिकारी मिळणार आहेत, असे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उर्दू विभागासाठी विशेष तरतूद करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उर्दू विभागातील सोयीसुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्या सोयीसुविधांकडे लक्ष द्यावे, विद्यापीठाने विभागाचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची विशेष तरतूद करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जनजागरण समितीने केली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नांबाबत शनिवारी कुलसचिव, बीसीयूडींची भेट घेतली.
औरंगाबाद उर्दूचे माहेरघर असून, उर्दू भाषेचे अनेक कवी, लेखक, इतिहास अभ्यासक या शहराने दिले. अशा या मराठवाड्याच्या राजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उर्दू विभागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. आवश्यक त्या सोयीसुविधांचा अभाव, शिक्षकांची कमतरता असे अनेक प्रश्न आहेत. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देत विभागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी जनजागरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कुलसचिव, बीसीयूडींची भेट घेत त्यांच्याकडे केली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नांबाबत निवेदनही कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, बीसीयूडी डॉ. सतीश पाटील यांना दिले. यावेळी मोहसीन अहमद, हिदायत अली, जमिल अहमद खान, डॉ. अजिज इरफान, अब्दुल जब्बार, अशफाक अहमद खान, खान मोहमंद यासर, नोमन अहमद आदींची उपस्थिती होती.

वर्गात नव्हे, सभागृहात कार्यक्रम घ्या
उर्दू विभागातील अडचणी लक्षात घेत विद्यापीठ प्रशासनाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी उर्दू विभागासाठी भरीव निधीची तरतूद करावी. अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून विभागाचे प्रश्न सोडवावेत, उर्दू विभागाचे कार्यक्रम विभागातील वर्गामध्ये न घेता ते विद्यापीठ सभागृहात घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हीआरएस’च्या हालचालींना वेग

$
0
0

औरंगाबाद ः स्टेट बँक ऑफ इंडियात पाच असोसिएट बँकांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर या सुमारे सहा ते सात हजार कर्मचारी स्वेस्छानिवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत. देशपातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत कर्मचारी बँक मॅनेजमेंटकडे ‘व्हीआरएस’संबंधी विचारणा करीत आहेत. विलिनीकरणामुळे पाच बँकांच्या सुमारे दोन हजार शाखा बंद होतील. त्यामुळे कर्मचारी व्हीआरएसकडे वळत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियात स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा या पाच बँकांचे विलिनीकरण होणार आहे. पाच बँकांचे विलिनकरणानंतर स्टेट बँकेत असलेल्या कर्मचारीवर्गाची संख्या १२ हजाराने वाढणार आहे. यापैकी सुमारे ७ हजार कर्मचारी सध्या सेवानिवृत्ती घेतील. त्यांचे वय ५५ ते ५८ वर्षांदरम्यन आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबादमधील ९०० ते १०००, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूरमधील १५००ते २०००, स्टेट बँक ऑफ त्रावणकोरमधील २०००, स्टेट बँक ऑफ पतियाळामधील १००० ते १२००, स्टेट बँक ऑफ म्हैसूरमधील १००० ते १२०० कर्मचारी सध्या व्हीआरएससंबंधी चर्चा करत आहेत, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

परिस्थिती गंभीर
हैदराबाद बँक लवकरच स्वेच्छानिवृत्ती योजनाही जाहीर करणार आहे. सर्व बँकांचे मिळून १५ ते १६ हजार जण अतिरिक्त ठरणार आहेत. यापैकी सुमारे सहा ते सात हजार जण सेवानिवृत्त घेतील असा अंदाज आहे असे, ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे राष्ट्रीय सहसचिव देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
येथील विमानतळावरून शेतमाल व औषधी कंपन्यांचे उत्पादन थेट आंतरराष्ट्रीय बाजारात ‌कमी वेळेत पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन तशी तयारी करण्यात आली. एक वर्षानंतरही ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षा उपकरणे तसेच अन्य सुविधा देण्यास होत असलेल्या दिरंगाईमूळे ही सेवा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
एअर इंडिया, जेट एअरवेजच्या माध्यमातून औरंगाबाद विमानतळावरून देशांतर्गत कार्गो सुविधा होती. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याच्या नावाखाली देशातंर्गत कार्गोकरिता सुद्धा विमानतळ प्राधिकरणाने विशेष एजन्सीची नियुक्ती केली आहे. येथून ८ जून २०१६ रोजी देशांतर्गत कार्गो सुविधेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विमानतळाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधाचा विकास करण्यात आला. तत्कालीन संचालक आलोक वार्ष्णेय यांनी कोल्ड स्टोरेज रूम, मेडिसिन कार्गोसाठी विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला होता.
आंतरराष्ट्रीय कार्गोकरिता आवश्यक सुविधा निर्मितीपूर्वी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली होती. एअर इंडिया, जेट एअरवेजनेही आंतरराष्ट्रीय बाजारात मालाची वाहतूक करण्याची तयारी दाखवली होती. शिवाय एअर इंडियाने शहरातील उद्योगपती व आयात-निर्यात करणाऱ्या व्यवसायिकांची बैठक घेतली होती. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आला आहे. थेट विमान सेवा नसणे व औरंगाबाद ते मुंबई किंवा दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय विमानात माल चढवण्यात येत असलेल्या अडचणींमुळे मालाच्या सुरक्षिततेबद्दल अनेक शंका उपस्थित होत होत्या. शिवाय आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुरक्षा उपकरणेही आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाला पाठविण्यात आला आहे. सुरक्षा उपकरणे स्कॅनिंग मशीन तसेच अन्य सुविधा अदयापही देण्यात आलेल्या नाहीत. यामूळे ही सेवा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रती किलो‌ ७० पैशांचा भुर्दंड
औरंगाबाद विमानतळावर देशांर्गत विमान सेवेतून मालाची वाहतूक करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. ही एजन्सी प्रती किलो ७० पैशांची आकारणी करीत आहे. विमानातून पाठविण्यात येणाऱ्या मालासाठी विमान कंपनीकडे शुल्क मोजल्यानंतर शहरातील ग्राहकांना दीड रुपये प्रती किलोप्रमाणे जास्तीचे पैसे खासगी कंत्राटदाराला द्यावे लागत आहेत.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कार्गोमध्ये सुविधा आवश्यक आहेत. त्यानुसार मागणी विमानतळ प्राधिकरणाला पाठविण्यात आलेली आहे. ही मागणी पूर्ण होताच आंतरराष्ट्रीय कार्गो सुरू करण्यात येईल.
- शरद येवले, संचालक, औरंगाबाद विमानतळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्तवेधक शोभायात्रेने औरंगाबाद शिवमय

$
0
0

औरंगाबाद : भगव्या झेंड्यांनी गजबजलेले रस्ते, शहराच्या विविध भागांतून क्रांतिचौकाकडे उत्साहात निघालेली तरुणाई. खांद्यावर भगवी पताका आणि मुखी शिवनामाचा जयघोष. ढोल-ताशाच्या ठेक्यावर थिकरणारी पावले..., अशा अपूर्व उत्साहात रविवारी औरंगाबादकरांनी स्वराज्याचे संस्थापत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.
शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध वसाहतींत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. अनेक चौकांत उभारलेल्या आकर्षक मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. काही मंडळांनी भंडाऱ्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळपासूनच तरुणांचे जत्थे अभिवादनासाठी क्रांतिचौकातील शिवाज महाराजांच्या पुतळ्याकडे येत होते. पुतळ्याच्या परिसरात उत्साह ओसांडून वाहत होता. औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या मिरवणुकीला सायंकाळी राजाबाजारातील संस्थान गणपतीपासून सुरुवा करण्यात आली. आकर्षक रथामध्ये शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत खामगाव येथील तानाजी मंडळाच्या चिमुकल्या सदस्यांनी चित्तथराक मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या ढोल पथकांनी परिसर दुमदुमून गेला.
बेगमपुऱ्यातील संभाजी क्रीडा मंडळाने संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराज भेट, हिंदवी स्वराज्याची शपथ आणि पावनखिंडीच्या प्रसंगाचा सजीव देखावा सादर केला. मंडळाचे ३५ ढोल, ९ ताशांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीच्या मार्गावर विविध संस्था, संघटनांनी मंडळांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथषष्ठीत संपाचा कर्मचाऱ्यांचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
आपल्या विविध प्रलंबित मागण्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास नाथषष्ठी यात्रेदरम्यान संपावर जाण्याचा इशारा पैठण नगरपालिका श्रमिक कामगार संघटनेने दिला आहे.
नगरपालिका कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे थकित वेतन द्यावे, वेतनासाठी देण्यात येणारे मासिक सहायक अनुदान दहा टक्के वाढीसह नियमित द्यावे, १० मार्च १९९३ पूर्वीचे रोजंदारी कर्मचारी कायम करण्यासाठी आस्थापन खर्चातील अट शिथिल करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन, रजा रोखीकरण, उपदान इत्यादी प्रलंबित रक्कमा देण्यासाठी शासनाने विशेष अनुदान द्यावे, लाड कमिशननुसार अनुकंपाधारकांना तत्काळ नोकरी द्यावी, सफाई कामगार व पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्या लागू कराव्यात, कर्मचाऱ्यांना मोफत घरे बांधून द्यावीत, या प्रलंबित मागण्यांचे निवेदन शुक्रवारी कर्मचारी संघटनेतर्फे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास ऐन नाथषष्ठी यात्रेदरम्यान बेमुदत संपावर जाण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांना सुविधा देण्याच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
श्रीक्षेत्र वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्‍वर मंदिर येथे महाशिवरात्र यात्रा महोत्सवासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. भाविकांच्या सेवेसाठी देवस्थान सज्ज झाले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या तयारीसाठी श्री घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची सोमवारी बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर हे होते. सुलभेतेने व सुरक्षितरित्या दर्शन घेता यावे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. पार्किंग, महामंडळाच्या जादा बस, पोलिस बंदोबस्त या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला तहसीलदार अरूण जऱ्हाड, अप्पर तहसीलदार रोशन मकवाने, पोलिस उपनिरीक्षक कल्पना राठोड, अन्न व भेसळ प्रशासन विभागाचे डॉ. राम मुंढे, गटविकास अधिकारी एच. बी. कहाटे, घृष्णेश्‍वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक अग्निहोत्री, विश्वस्त कमलाकर विटेकर, संजय वैद्य, बाबुराव काळे, ग्रामसेवक आसाराम बनसोड, तलाठी एन. बी. कुसनुरे, प्रकाश पाटील मिसाळ, सुरेश ठाकरे, हाजी शेख अल्लाउद्दीनशेठ, गणेश हजारी, जमादार गणेश काथार, पोलिस पाटील रमेश ढिवरे यांच्यासह भारतीय पुरातत्व विभाग, महसूल-वन विभाग, अग्निशामक दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आधार कार्ड दाखवून दर्शन
महाशिवरात्रीच्या पर्वकाळात वेरूळ परिसरातील ग्रामस्थांना आधार कार्ड दाखवून थेट मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी सांगितले. यामुळे वेरूळ ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

वाहतूक मार्गात बदल
२३ ते २५ फेब्रुवारी दरम्यान खुलताबाद मार्गे वेरूळकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली असून त्यास ती दौलताबाद टी पॉइंट कसाबखेडा फाटा, वेरूळ भोसले चौक या मार्गे वळविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३६ हजारांचे दागिने पिश‍वी कापून लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
पायी जाणाऱ्या महिलेच्या पिशवीतील ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दगिने अज्ञात चोराने लंपास केल्याची घटना सोमवारी भर दुपारी शहरातील गजबजलेल्या टिळक रोड भागात घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तालुक्यातील पानवी खंडाळा येथील मंदा गोरखनाथ मोहन यांनी ११९ सोन्याचे मणी व पळ्या अशा दोन पोती गठवून घेतल्या व पिशवीत ठेवल्या. ही पिशवी घेऊन जात असतांना अज्ञात चोरट्याने ब्लेडने कापडी पिशवी कापून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. मंदा मोहन या टिळक रोडवरील साखरे मेडिकलमध्ये औषधी घेण्यासाठी थांबल्या असता पिशवी कापल्याचे लक्षात आले. पिशवीतील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. त्यावरून वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणतात आला असून पुढील तपास हवालदार खोकड करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या
विषारी औषध पिऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील घायगाव येथे घडली. सुनील बाबासाहेब साळुंके (वय ३५), असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. सुनील यांनी ११ फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना ताबडतोब औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी सकाळी साडे आठ वाजता ते मरण पावले. याप्रकरणी घाटी चौकीचे हवालदार एन. ए. तडवी यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीओटीवरील एसटीपी बजाजनगरमध्ये रद्द

$
0
0

बजाजनगरमधील बीओटीवरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम अपेक्षित वेगाने काम होत नसल्याने एमआयडीसीने कंत्राटदाराची निविदा रद्द केली आहे. ही निविदा नव्याने काढून प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला आहे.
राज्यातील पहिली कामगारांची वसाहत म्हणून बजाजनगराची स्थापना करण्यात आली आहे. येथे सुरवातीला तुरळक वस्ती होती, आता लोकसंख्या लाखाच्या आसपास पोहचली आहे. त्यामुळे मुलभूत सोई सुविधांची पुरवण्याची गरज आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन एमआयडीसीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्रकल्प करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष गजानन नांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. वाढती लोकसंख्या व मागणीनुसार एमआयडीसीकडून सांडपाणी प्रकल्पास बीओटीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी १२ कोटी ६० लाख रुपयांचा ड्रेनेज लाइन व प्रकल्प बांधकामाचा खर्च मंजूर करण्यात आला होता. हा बीओटी प्रकल्प भारत उद्योगला २० वर्षाच्या कराराने देण्यात आला. प्रकल्प सुरू झाल्यानंतर दरमहा २८ लाख रुपये कंत्राटदारास अदा करण्याचा करार झाला होता. पण, कंत्राटदारांकडून होत असलेल्या विलंबामुळे एमआयडीसीने कंत्राट
रद्द केले आहे. या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, एमआयडीसीचे उपअभियंता दिलीप परळीकर, सहायक अभियंता बी. एस. दिपके, सामाजिक विचार मंचचे गजानन नांदूकर यांच्यासह एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी जागेची पाहणी केली.

एसटीपी प्रकल्पाची बीओटी कंत्राटदारासोबतची निविदा रद्द झाली आहे. या कंत्राटदारांने किती काम केले याची करण्यात आली. हा प्रकल्प राबवण्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे.
-बी. एस. दिपके, सहायक अभियंता, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा दिवसांनंतर पसार दीराला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विवाहिता ज्योती बोर्डे खून प्रकरणात १५ दिवसांपासून पसार असलेला दीर सचिन बोर्डे याला सोमवारी उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. ज्योती यांना ६ फेब्रुवारी रोजी पेटवले होते, उपचार सुरू असताना त्यांचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.
फुलेनगर, उस्मानपुरा भागातील ज्योती बोर्डे यांना माहेरून पैसे आणण्याची मागणी करीत पेटवून देण्यात आल्याचा आरोप आहे. ज्योती यांनी दिलेल्या जबाबावरून याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान ९५ टक्के जळालेल्या ज्योती यांचा ७ फेब्रुवारी रोजी घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर खुनाचे कलम वाढवण्यात आले. पोलिसांनी संशयित आरोपी पती नितीन, सासरा पुंजाराम, मोठा दीर सचिन व सासू तानाबाईसह दोन नणंदांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती नितीन व सासऱ्याला अटक केली, मात्र सचिन पसार होता. ज्योतीची आई गोदावरीबाई रोठे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे दाद मागितली होती. सचिनला याला अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात आले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलिस‌ निरीक्षक सतीश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी प्रचार केल्याने तरुणाला बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद निवडणूकीत बहिणीच्या विरोधात प्रचार केल्याचा राग मनात धरून भावाने गावातीलच एका २५ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. दौलताबाद परिसरातील डीएसपी कॉलेजजवळ हा प्रकार घडला.
योगेश शिवाजी सांगळे (वय २५, रा. वंजारवाडी, ता. गंगापूर), असे फिर्यादीचे नाव आहे. रामेश्वर गोविंद बोंडारे व कल्याण कान्हेरे (रा. शरणापूर) यांच्या विरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर याची बहिणी पंचायत समितीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार होती. परंतु, योगेश याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता योगेश हे डीएसपी कॉलेज येथून जात असताना रामेश्वर व त्याचा साथीदार कल्याण याने थांबवून भाजपचा प्रचार करुन काय साध्य केले, बहिणीच्या विरोधात प्रचार का केला, अशी विचारणा करत शिवीगाळ केली. टिकवाच्या दांडा व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉप फाइव्ह गुंडांवर पोलिस आयुक्तांची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात गेल्या काही दिवसांत खून व खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या आहेत. या गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्तांनी प्रत्येक पोलिस ठाण्याला त्यांच्या हद्दीतील ‘टॉप फाइव्ह’ गुन्हेगारांची कुंडली जमा करून पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात गेल्या महिनाभरात खुनाच्या तीन घटना घडल्या. रेल्वे धक्क्यावर १४ वर्षांच्या याकुब कांबळे या मुलाची ९ जानेवारी २०१६ रोजी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. बजाजनगर भागात किरकोळ कारणावरून बाळू नरवडे याचा ७ फेब्रुवारी २०१७ चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्याच प्रमाणे फुलेनगर येथे ज्योती बोर्डे या विवाहितेला ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पेटवून ठार मारण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याच्याही शहरात काही खळबळजनक घटना घडल्या आहेत. यामध्ये त्रिमूर्ती चौकात भाजपाचा पदाधिकारी हाफीज शेख याने तलवार घेऊन धुडगूस घालत तरुणांवर प्राणघातक हल्ला केला होता. बजाजनगर येथे देखील तरुणांच्या टोळक्याने रॅलीत सहभागी झाले नाही म्हणून दोघांवर तलवारीने हल्ला केला होता. प्लॉटिंगच्या वादातून शेख कलीम या तरुणाला टाऊन हॉल उड्डाणपुलावरून खाली फेकण्याची घटना नुकतीच घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच तरुणांच्या दोन गटात चाकू व लाठ्याकाठ्यानी कटकटगेट भागात भांडण झाल्यामुळे वातावरणात तणाव पसरला होता. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे निष्पन्न झाले होते.

गुन्हेगारांची माहिती जमा करा
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या पार्श्वभूमीवर शहरात मारामारी करणारे, शस्त्रांचा वापर करून प्राणघातक हल्ला, असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती मागविली आहे. यामध्ये घरगुती भांडणात दाखल झालेल्या गुन्हेगारांना वगळण्यात आले आहे. पोलिस ठाण्याला अशा गुन्हेगारांपैकी त्यांच्या रेकॉर्डनुसार पाच गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

झोपडपट्टी दादा, हद्दपारांवर नजर
झोपडपट्टी दादा कायद्यानुसार स्थानबध्दतेची शिक्षा भोगून आलेले शहरातील गुन्हेगार तसेच हद्दपारी आदेश संपल्यानंतर शहरात पुन्हा परतलेले गुन्हेगार यांच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. हे आरोपी शिक्षा भोगून परतले असले तरी त्यांच्या गुन्हेगारी कृत्ये थांबली आहेत अथवा नाही, यावर पोलिसांचे लक्ष राहणार असल्याची माहिती गुन्हेशाखेतील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३ लाखांची फसवणूक; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन-३ येथील महाराष्ट्र बँकेच्या बंद पडलेल्या खात्यातून युपीआय अ‍ॅपचा वापर करून तब्बल ३३ लाख २५ हजार रुपये पळविले होते. बंद खात्यातून रक्कम लंपास करणाऱ्या तीन भामट्यांपैकी संदीप मुळे याने जामीनीसाठी अर्ज केला. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. जी. शेटे यांनी जामीन अर्ज फेटाळला.
शहरातील महालक्ष्मी चौकात संशयीतरित्या फिरणाऱ्या राजेश मधुकर अंभोरे यास मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात दोन मोबाइल आणि अ‍ॅक्सिस बँकेचे पासबुक आढळून आले. हे पासबुक राजेश अंभोरे यांचे नव्हते. त्यामुळे पोलिसांचा संशय बळवला. हे पासबुक संदीप मुळे या मित्राने ठेवण्यासाठी दिल्याचे अंभोरे यांनी सांगितले. संदीप मुळे याने राजेश अंभोरे आणि शिवाजी पवार या दोन मित्रांना महाराष्ट्र बँकेत व अ‍ॅक्सिस बँकेत खाते काढण्यास सांगितले. त्यानंतर या खात्यावरील ऑनलाइन व्यवहारासाठी महाराष्ट्र बँकेचे युपीआय हे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. या अ‍ॅपवर स्वतःची माहिती भरून महाराष्ट्र बँकेच्या बंद खात्यातून दोन लाख ६० हजार रुपये काढले. महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून पैसे काढून ती रक्कम अ‍ॅक्सिस बँकेत खाते असलेल्या शिवाजी अशोक पवार याच्या खात्यात जमा केली. तसेच शिवाजी पवार याच्या बंद खात्यातून अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यात ३० लाख ६५ हजार रुपये जमा करुन ती रक्कम काढून घेतली. संदीप मुळे, राजेश अंभोरे व शिवाजी पवार यांनी केलेल्या या व्यवहाराच्या विरोधात महाराष्ट्र बँकेच्या सिडको शाखेतील अरविंद मुकुंदराव वायकोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांना अटक केली. हे तिघे न्यायालयीन कोठडीत हर्सूल जेलमध्ये आहेत. त्यापैकी संदीप मुळे याने जामिनासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील के. एन. पवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एलबीटी रद्द झाल्यास महापालिका धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थानिक संस्था कराची (एलबीटी) रक्कम वेळेवर मिळत नसल्यामुळे व बड्या उद्योगांची एलबीटी रद्द करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. यामुळे महापालिकेचे अस्तित्त्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून यंदा २३० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणे अपेक्षित असताना मार्चअखेर एवढा निधी प्राप्त होणार नाही, असे बोलले जात आहे.
मालमत्ता करापाठोपाठ महापालिकेचे उत्पन्न एलबीटीवर अवलंबून आले. शासनाने दोन वर्षांपूर्वी एलबीटी रद्द केला. या कराच्या माध्यमातून महापालिकेला दरमहा मिळणारी रक्कम शासन उपलब्ध करून देईल असे जाहीर करण्यात आले होते. औरंगाबाद महापालिकेला एलबीटीच्या माध्यमातून दर महिन्याला सुमारे १६ ते १८ कोटी रुपये मिळत होते, तेवढीच रक्कम शासनाने पालिकेला द्यावी असे पालिकेने शासनाला कळविले आहे. त्यानुसार शासनाकडून रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा केली जाते. परंतु, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपासून एलबीटीची रक्कम मिळण्यात अडचणी येत आहेत. रक्कम वेळेवर मिळत नसल्यामुळे दैनंदिन कामकाजासोबत विकास कामांवर परिणाम होत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आखत्यारित असलेल्या रजिस्ट्री कार्यालयात दर महिन्याला जेवढ्या रजिस्ट्री होतात त्या रजिस्ट्रीच्या किंमतीच्या एक टक्का रक्कम महापालिकेला एलबीटीच्या स्वरूपात दिली जाते. सुमारे चार ते सव्वाचार कोटी रुपये या माध्यमातून मिळतात. पण गेल्या काही महिन्यांपासून ही रक्कम नियमित मिळत नाही. ५० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या सुमारे २५ कंपन्यांकडून पालिकेला दर महा सुमारे चार कोटी रुपयांचा एलबीटी मिळतो. ही रक्कम येत्या काळात मिळणे बंद होईल, असे संकेत शासनाकडून मिळाले आहेत. त्यामुळे येत्या काळात पालिकेचे अस्तित्त्व धोक्यात येईल असे मानले जात आहे.

एलबीटीची किती रक्कम शासनाकडे थकित आहे, याची माहिती प्रशासनाकडून घेतो. शासनाकडे रक्कम थकली असेल तर ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. भविष्यात एलबीटीची रक्कम वेळेवर मिळावी यासाठी वित्तमंत्र्यांना भेटून विनंती करू. महापालिकेची कोंडी होणार नाही याची काळजी घेऊ.
-भगवान घडमोडे, महापौर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंग कौन्सिलचा वाद; सहा महिन्यात निकाल

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद
भारतीय परिचर्या परिषदेच्या (इंडियन नर्सिंग कौन्सिल) २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीबाबतच्या वादावर सहा महिन्यांत निकाल देण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. संगीतराव पाटील यांनी केंद्र शासनास दिला.
भारतीय परिचर्या परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांची निवडणूक १ जुलै २०१६ रोजी झाली होती. त्यात अध्यक्षपदी टी. दिलीपकुमार, उपाध्यक्षपदी डॉ. आशा शर्मा आणि कार्यकारिणी सदस्यपदी खासदार गणेश सिंग, खासदार किरीट सोलंकी, डॉ. अप्पाराव, जसू पाटीदार, माधवी दास, डॉ. जोगेंद्र शर्मा आणि लाल बियाक संघी हे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले होते.
या निवडीला पडेगाव (औरंगाबाद) येथील किसन लक्ष्मण गायकवाड आणि डोंबिवली (पूर्व) येथील डॉ. रामलिंग माळी यांनी भारतीय परिचर्या परिषद कायद्याच्या कलम ५(२) नुसार केंद्र शासनाकडे प्रकरण दाखल केले होते. त्यानंतर केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातील परिचर्या विभागाने १५ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय परिचर्या परिषदेला पत्र पाठवून याचिकाकर्त्यांच्या वादाबाबत खुलासा मागविला होता. मात्र त्यावर केंद्र शासनाने कुठलाही निकाल दिला नाही. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. केंद्राने सहा महिन्यांत निकाल देण्याचे आदेश कोर्टाने दिले. याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होण आणि अश्विन होण, तर केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुरंग महोत्सवात लोककलेला दाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे दर्शन घडवत गायक नंदेश उमप आणि सहकाऱ्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. ऋतुरंग महोत्सवाचा समारोप उमप यांच्या अस्सल शाहिरीने संस्मरणीय ठरला. रसिकांनी भरभरून दाद देत महोत्सवाचा आनंद घेतला.
रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने चार दिवस ऋतुरंग महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी कलाग्राम प्रांगणात समारोप झाला. महोत्सवात लोकगायक नंदेश उमप यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रम सादर झाला. ‘आदी गणाला रणी आणा हो’ या गणाने उमप यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. पोवाडा, वग, लोकगीते, दिंडी, चित्रपटगीते यांचे प्रभावी सादरीकरण करून उमप यांनी रसिकांची दाद मिळवली. संतोष बोर्डे, सचिन चिरगुटकर, धनंजय कीर, संदीप कांबळे, विशाखा सकपाळ यांनी सहगायन केले. तर रत्नदीप जामसांडेकर, आदेश मोरे व गंधर्व पाटील यांनी संगीत साथसंगत केली. दरम्यान, पहिल्या सत्रात थायलंड येथील सरन्या इम्रदी यांचे भरतनाट्यम सादरीकरण झाले. रोटरी क्लबचे बांगलादेश येथील पदाधिकारी इश्तियाक जमान, अफगाणिस्तानचे संगर नजीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत चौधरी, डॉ. अनिल भादेकर, पल्लवी भादेकर, आरती पाटणकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रयासद्वारे मिळणार अनिवार्य ओळखपत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राजस्थानी समाजासाठी एकाच छताखाली मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स सारखे आवश्यक ओळखपत्र उपलब्‍ध करून देण्याचा प्रयत्न करणयात येणार आहे. सकल मारवाडी युवा मंचद्वारे संपूर्ण राजस्‍थानी समाजासाठी प्रयास उपक्रमाद्वारे ही सोय करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष संजय मंत्री सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
पॅनकार्ड, मतदान कार्ड, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, आधारकार्ड, पारपत्र आदी ओळखपत्र प्रत्येक नागरिकास अनिवार्य आहे. मात्र या प्रत्येक प्रमाणपत्रांसाठी बराच वेळ जातो. राजस्‍थानी समाजातील १८ जातींपैकी अनेक समाजबांधवांकडे यापैकी बरीच ओळखपत्रे नव्हती, असे आमच्या निर्दशनास आले. म्हणून आम्ही संपूर्ण राजस्‍थानी समाजासाठी प्रयास उपक्रम घेण्याचे ठरवले, असे मंत्री यांनी सांगितले. नागरिकांचा वेळ वाचावा व एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्‍ध करुन देण्यासाठी प्रत्येक ओळखपत्राचे स्वतंत्र स्टॉल असतील. तसेच फोटोकॉपी, फोटो व नोटरीची व्यवस्‍था करण्यात आली आहे. यासाठी शासकीय शुल्काप्रमाणेच शुल्क आकाराले जाईल. तसेच पारपत्रासाठी मुंबई कार्यालयाचा वेळ मिळवून देण्यात येईल. ऑनलाइन पैसे भरण्याची व सात दिवसांमध्ये ओळखपत्रे पोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याद्वारे ४ ते ५ हजार नागरिकांना ओळखपत्रे देण्याचा प्रयत्न असून हा प्रकल्प यशस्वी झाल्यास इतर समाजासाठी उपक्रम घेण्यात येईल असेही संजय मंत्री यांनी सांगितले. गणेश इंदानी, आशिष रुहाटिया, दीपक लोहिया, निखिल मित्तल, आशिष अग्रवाल, गिरीश अग्रवाल, विकास पाटणी, धमेंद्र जांगीड, निखील काला, आशिष मेहता प्रकल्पप्रमुख आहेत. प्रयास उपक्रमासाठी नोंदणी सुरू असून कार्यक्रमस्थळीसुद्धा नोंदणी करता येईल. २६ फेब्रुवारी रोजी अग्रेसन भवन, टाऊन सेंटर, सिडको येथे सकाळी १० ते रात्री ८ कार्यक्रमाची वेळ असून उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी आहे. समाजबांधवांनी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्धर आजारावर मदतीची फुंकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गरिबीत आलेले आजारपण माणसाला असहाय करून टाकते. पण, जालन्याच्या पांचाळ कुटुंबीयांच्या मदतीला काही जण धावल्यामुळे सहावीतील मुलाला उपचार मिळाले. सामाजिक संघटनांनी या मुलासाठी प्रत्येकी ३२ हजार रुपये किंमतीचे दोन इंजेक्शन दिले.
जालना येथील लक्ष्मण व आणि उर्मिला पांचाळ यांचा सहावीत शिकणारा मुलगा ऋषिकेश (वय ११) आजारी पडला. लक्ष्मण पांचाळ यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने परिवाराची धुरा उर्मिला यांच्यावर आहे. त्या धुणी-भांडी करून घर चालवितात. यातच मुलाचे आजारपण आल्याने या दांपत्याने त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये खल केले. वार्ड क्रमांक २४ मध्ये उपचार सुरू असताना त्याला दुर्धर आजार झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्याच्या उपचारासाठी उपलब्ध पैसे औषधींवर खर्च झाले. मग डॉक्टरांनी आयव्हीआयजी हे इंजेक्‍शन आणण्यास सांगितले. त्यासाठी पांचाळ यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी डॉक्टरांना अडचण सांगितली. घाटी हॉस्पिटलमधील डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांनी येथे रुग्णांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या राज एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी, के. के. ग्रुप आणि इ. एस. ग्रुपसह अलफरहान सोसायटीच्या सदस्यांना माहिती दिली. या संघटनांनी पुढाकार घेऊन दोन महागडे इंजेक्‍शन आणून पांचाळ कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पांचाळ कुटुंबाने अखिल अहेमद, ‌हाफिज सहाब, किशोर वाघमारे, शेख जुनेद, काजी शारेख, ताहेर पटेल, जमीर पटेल, शेख सिराज, मिर्झा मुहम्मद आसेफ, शेख उबेद, नासेर बसामे, झिशान पटेल, शेख राजू यांचे पाणावलेल्या डोळ्यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images