Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांना नुसते हेलपाटे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावी, दहावी परीक्षेच्या हॉलतिकिटावरील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. परीक्षा मंडळ, शाळा, कॉलेज यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांची फरफट होते आहे. दुरुस्तीसाठी अनेक तास ताटकळत बसावे लागले. परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यास सोडून रांगेत उभे राहण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर आली आहे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळतर्फे बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होत आहेत. मंडळाने दिलेल्या अनेक हॉलतिकिटांमध्ये चुकांचा भरणा असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. चुक दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना मंडळात यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना तासन््तास ताटकळत बसावे लागते आहे. त्यात बुधवारी कम्प्युटर बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. हॉलतिकिटांवर चुकीचे माध्यम लिहिण्यात आल्याचे प्रमाण जास्त आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया होते. अर्ज भरल्यानंतर कॉलेजमध्ये याद्या पाठविल्या जातात. त्या विद्यार्थ्यांकडून तपासून घेतल्यानंतर दुरुस्तीसह अर्ज पुन्हा पाठविले जातात. त्यानंतरही चुका राहिलेल्या आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

आर्थिक भुर्दंड
परीक्षा चार दिवसांवर आली असताना अभ्यास सोडून हॉलतिकीट दुरुस्तीसाठी विद्यार्थी मंडळात खेटे मारत आहेत. हॉलतिकीट दुरुस्तीसाठी त्यांचा वेळ खर्च होतो आहेच. त्याचबरोबर आर्थिक भुर्दंडही विद्यार्थ्यांनाच बसत आहे. दुरुस्तीसाठी ५० ते १०० रुपये मंडळ शुल्क आकारण्यात येत आहे. वेळ, पैसा खर्च करून वेळेत दुरुस्ती होईल की नाही? हा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. या गोंधळामुळे विद्यार्थी, पालकांनी संताप व्यक्त केला.

- दहावी विद्यार्थी संख्या.........१,९१,४८८
- बारावी परीक्षार्थी संख्या.......१,६२,१६२

मंडळ, शाळा, कॉलेजांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागते आहे. विशेषतः मंडळाने जन्मस्थळाचा कॉलम यंदा प्रथमच अर्जात दिला. त्यात झालेल्या दुरुस्तीसाठी दिलेल्या वेळेत त्यांची वेबसाइट वारंवार हँग होती. परीक्षा चार दिवसांवर आल्या आणि विद्यार्थी मंडळाच्या दारात माध्यम, विषय बदलाच्या प्रक्रियेसाठी रांगेत आहे. मंडळाच्या अशा गलथान कारभाराचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाहक सोसावा लागतो आहे. त्याचा आर्थिक भुर्दंडही विद्यार्थ्यांनाच बसत आहे, हे थांबायला हवे.
- प्रकाश वाघ, कर्मचारी, शहीद भगतसिंग हायस्कूल, बजाजनगर.

दिवसभर आज हॉलतिकीट दुरुस्तीसाठी रांगेत उभे रहावे लागले. मंडळातील कर्मचारी उशीर का केला, असा प्रश्न करतात. कॉलेजकडून पत्र उशिरा मिळाले. ते घेऊन औरंगाबादला मंडळात यावे लागले. येथे बराच वेळ उभे राहून दुरुस्तीसाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळे अभ्यास बुडाला.
- भागवत कांबळे, विद्यार्थी, गंगामसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाबासकीसाठीच वाळूतस्करांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्षभरापासून सर्रास वाळूची वाहतूक होत असली, तरी गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका महसूल विभागाच्या पथकाने लावला आहे. केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशंसा व शाबासकी मिळवण्यासाठी ही कारवाई होत आहे.
जिल्ह्यातील यंदा ४५ वाळूपट्यांपैकी केवळ ६ पट्यांचा लिलाव झाला आहे. यापैकी तीन-चार वाळूपट्यांचाच ताबा ठेकेदाराने घेतला आहे. अशी स्थिती असली, तरी शहरात सर्रास वाळूची विक्री होते. मनाला आले तेव्हाच शहरात येणारे ट्रक, हायवा आणि एल.पी. ट्रकवर कारवाई करण्यात येते. जिल्ह्यात वाळूवाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाची पथके तयार करण्यात आली आहेत. थातुरमातूर कारवाया करून काही जण वाहनांसमोर फोटो काढण्यात येतात व ते तत्काळ वरिष्ठांच्या मोबाइलवर पाठवण्यात येतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशंसा करावी, यासाठी ही धडपड सुरू केली आहे.
तालुकापातळीवरील महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात वाळूची सर्रास चोरटी वाहतूक सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील वाळूपट्यांचा ठेका न घेताच धंदा करण्याची पद्धत वाळूमाफियांनी अवलंबली आहे. यामुळे महसूल विभागाला यंदाही फटका बसणार, हे निश्चित. दुसरीकडे अवैध वाळूवाहतुकीला लगाम लावण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केवळ थातूरमातूर कारवाई करून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशंसेला पात्र ठरण्याची धडपड सुरू केली आहे. रात्री-पहाटे कारवाईच्या नावाखाली एक-दोन ट्रक पकडून त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत केलेल्या कारवाईचा निरोप पोचवण्याची विशेष दक्षता घेतली जात आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात अवैध वाळूचा धंदा फोफावला आहे. सातारा, देवळाई; तसेच शहर परिसरातील इतर भागांमध्ये वाळूचे मोठे साठे तयार करण्यात आले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सातारा भागामध्ये वाळूचे बेकायदा साठा करून ठेवला आहे. त्याकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही.

गुन्ह्याऐवजी दंडात्मक कारवाई
गेल्या काही दिवसांत वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली. ठराविक वाहनांच्या मालकांवर वारंवार कारवाई केली जात आहे, तरी वारंवार गुन्हा करत असलेल्यांवर महसूल प्रशासन फौजदारी करीत नाही. केवळ दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंक फूड टाळा; निरोगी राहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘अतिसेवन व कमी सेवन दोन्ही सवयी चुकीच्या आहेत. पौष्टिक नसलेला कोणताही पदार्थ व अतिसेवन म्हणजे जंक फूडच. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, मेद या सर्वांचा समावेश असलेला आहार असावा,’ असे आवाहन डॉ. अर्चना सारडा यांनी केले.
सकल मारवाडी युवा मंचतर्फे आ. कृ. वाघमारे प्रशालेमध्ये ‘जंकफूड से जंग’ व्याख्यानात त्यांनी मुलांशी संवाद साधला. मुख्याध्यापक अभिजित कुलकर्णी, सकल मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष संजय मंत्री उपस्थित होते. डॉ. सारडा म्हणाल्य, ‘पिझ्झा, बर्गर, पाणीपुरीचे अतिसेवन करू नका. मटकी, गाजर, काकडी, टमाटे, डाळींचा आहारात समावेश करा. आहाराचे संतुलन कराल, तर जंकफूड शरीरास हानिकारक ठरत नाही. चुकीच्या आहारशैलीमुळे कमी वयात केस गळणे, थकवा, डोळांखाली काळी वर्तुळ, अॅसिडिटी, एकाग्रातेची कमी, शुष्क त्वचा आणि सांधेदुखीचे आजार जडतात,’ असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदीप मुळे, माया सराफ, बाळासाहेब कुलकर्णी, दगडू लांडगे, युवा मंचतर्फे प्रकल्पप्रमुख संजय भारुका, हर्षल उपाध्याय, स्वप्नील खंडेलवाल, आशिष सोमाणी, स्वप्नील पारेख, नितीन तोतला, सुर्दशन, श्रीकांत उपाध्याय आदी उपस्थित होते.

हेल्दी स्नॅक्स्
‘बिस्किट, चिप्स, पिझ्झा, पाणीपुरी, समोसा, फ्रेंच फ्राइज, नूडल्स, नान बटर, फ्राइड राइस ‌या स्नॅक्समध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप असते. त्याऐवजी कडधान्य भेळ, फुटाणे, पनीर सॅँडविच, कॉर्न भेळ, ढोकळा, व्हेज मोमोज, व्हेज पराठा, आटा नूडल्स, व्हेज पुलाव हे पदार्थ स्नॅक्स म्हणून घ्या. २०० मिली सॉफ्ट ड्रिंकमध्ये ८ चमचे साखर व ३ चमचे मीठ, तर १ बर्गरमध्ये ५४० कॅलरीजचे सेवन होते,’ असे डॉ. सारडा म्हणाल्या.

पौष्टिक थाळी
हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, फळ, दही, चीज, नॉन व्हेज, भाजी, मासे, अंड्यांचा पिवळा बल्क, मटार, ओटस, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, तेल, सलाद, न चाळलेले पीठ, डाळी, कडधान्य, चिकन, मशरुम, तेल, तूप व लोणी, पोळी, भात, रवा, पोहे

आपला गणवेश टापटीप असावा, याची जशी तुम्ही काळजी घेता, त्याचप्रमाणे रोजच्या आहारात कर्बोदके, प्रथिने, तंतूमय पदार्थ व मेद हे चार घटक आवश्यक असतात, मात्र हे प्रमाण संतुलित हवे. चिमुटभर मेद, मूठभर प्रथिने, ओंजळी भरेल इतकी प्रथिने व खूप सारे तंतूमय पदार्थ आहारात हवेत, असे जंक फूड अजिबात नकोच असे नाही, मात्र जोडीला तितकाच व्यायामही हवा.
- डॉ. अर्चना सारडा, बालमधुमेह तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरीचे भाव गडगडले; बंपर उत्पादन शेतकऱ्यांच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या दोन वर्षांत १० हजार ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोचलेले तुरीचे दर ३४०० ते ३७०० रुपयांपर्यंत गडगडले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडीत सध्या मोठ्या प्रमाणात तुरीची आवक सुरू आहे. गेल्या महिन्याभरात तुरीच्या दरात सारखा चढ-उतार सुरू असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा होती. तूर पिकाबाबत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमाकांवर असून, लातूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, अकोला व नागपूर ही महाराष्ट्रातील तुरीची प्रमुख व्यापारी केंद्र मानली जातात. या सर्व ठिकाणी सध्या बंपर आवक होत आहे. लातूरला ३८०० ते ४००० पर्यंत भाव मिळाला आहे. मागील १५ वर्षांत पहिल्यांदाच एवढे बंपर पीक आले आहे. रोज किमान १५०० पोत्यांची आवक होत आहे. औरंगाबादसारख्या बाजार पेठेत ही अवस्था असेल, तर इतर मुख्य बाजारपेठांत काय स्थिती असेल, याची कल्पनाच करवत नाही, असेही जाधववाडीतील ज्येष्ठ व्यापारी हरिष पवार यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन-तीन वर्षांत तुरीचे दर १० हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. त्यामुळे या खरीप हंगामात तुरीच्या क्षेत्रात वाढ झाली. डिसेंबरमध्ये तूर काढणीचा हंगाम सुरू होताच बाजारातील तुरीचा दर १२ हजार रुपयांहून ६५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरला. आता तर तो ४ हजारांच्या खालीच आला आहे.
दरम्यान, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे उत्पादन यावर्षी कमी झाल्याने तूर साथ देईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लातूर बाजारपेठेतील मागील १६ वर्षांच्या कालावधीतील तुरीच्या किमतीचे मासिक सरासरी पृथक्करण करून समतोल हवामानात तुरीची डिसेंबर २०१६मध्ये सरासरीची किंमत जवळपास ७,५०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता वर्तविली होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अाम्ही बैचेन
पळशीचे शेतकरी महमंद शेख म्हणाले की, यंदा तुरीला चांगला भाव येईल, असे वाटत होते, परंतु ३ हजार ४०० ते ३ हजार ७०० रुपयांपर्यंतच भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. राबराब राबून पीक काढायचे आणि त्याला भाव नाही मिळाला की दु:ख करत बसायचे, अशीच आमची अवस्था आहे. यामुळे सध्या आम्ही बैचेन आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुबलक पाणीपुरवठ्यात अडचण काय?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणात पाणीसाठा असतानाही औरंगाबादवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करण्यात अडचण काय, अशी विचारणा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजी शिंदे व न्या. के. के. सोनवणे यांनी महापालिकेला केली आहे. याचे सविस्तर उत्तर देण्यासाठी पालिकेने कोर्टाकडून वेळ मागितला.
पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडितप्रकरणात पालिका व महावितरण यांना शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. संपूर्ण शहरवासीयांची ससेहोलपट होत असल्याने यापुढे जीवनाश्यक नागरी सुविधा खंडित न करण्याचे आदेश महावितरण, पालिका व राज्य शासन यांना द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी केली आहे.
या याचिकेच्या सुनावणीदरम्यान असताना पाणीपुरवठ्याचा प्रश्नही उपस्थित झाला. गेल्या वर्षी दुष्काळ होता. यंदा पाऊस चांगला झाल्याने जायकवाडी धरणात ८५ टक्के उपयुक्त साठा झाला आहे. औरंगाबादेत पाणीपुरवठा अनियमितपणे होतो. अनेक भागांत कमी-जास्त प्रमाणात पाणी पुरविले जाते. काही भागात तर पाणीपुरवठाही केला जात नाही, असे कोर्टाने सांगितले.
खंडपीठाने विचारणा केली असता, सविस्तर उत्तर दाखल करण्याकरिता महापालिकेच्या वतीने वेळ मागून घेण्यात आला. या प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे देवदत्त पालोदकर, महावितरणतर्फे अनिल बजाज, महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख, तर शासनाच्या वतीने अमरजितसिंह गिरासे हे काम पाहत आहेत. या याचिकेची सुनावणी ८ मार्चला होणार आहे.

कायमस्वरुपी तोडगा आवश्यक
महापालिका आणि महावितरण यांना एकत्र आणून या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे खंडपीठातील सरकारी वकील गिरासे यांनी कोर्टात सांगितले. यावर खंडपीठाने, हा प्रश्न फक्त या बिलासंदर्भात नसून, वारंवार उद्भवणारा असल्याने त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी कुणाची; आज फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई, पुणे या महापालिकांसह राज्यातील २५ जिल्हा परिषदा, ११८ पंचायत समित्या आणि १० महापालिकांचे कारभारी कोण, याचा फैसला गुरुवारी दुपारपर्यंत होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांची मतमोजणी उद्या सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिला हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात परिषदेच्या ६२ गटांसाठी आणि १२४ पंचायत समिती गणांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सरासरी ७०.२२ टक्के मतदान झाले आहे. सर्व तालुक्यांमध्ये मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद गटांची मतमोजणी सुरुवातीला केली जाईल. सोयगाव, खुलताबाद, फुलंब्री या तालुक्यांत गट आणि गणांची संख्या कमी आहे. त्यामुळे तेथे मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल. मतमोजणीसाठी जागा; तसेच सुरक्षेच्या योग्य उपाययोजना असल्यास गट आणि गणांची एकत्रित मतमोजणी ते करू शकतात. इतर ठिकाणी गट, गणांची संख्या अधिक असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पोलिस प्रशासनाला विश्वासात घेऊन मतमोजणीसंदर्भात पर्यायी व्यवस्था करता येईल.

होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी
औरंगाबाद तालक्यातील १० गट आणि २० गणांची मतमोजणी हडको एन १२ येथील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात होणार आहे. मतमोजणीसाठी २० टेबल लावण्यात आले असून, १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैठण तालुक्यात भाजपच्या हाती भोपळा

$
0
0

चंदन लक्कडहार, पैठण
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर पैठण तालुका हा अजूनही शिवसेनेचा अभेद्य किल्ला असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने सात जागा जिंकल्या. काँग्रेस व मनसेला प्रत्येकी एक जागा मिळाली. नगरपालिका निवडणुकीत यश मिळालेल्या भाजपच्या हाती भोपळा आला.
२००९ च्या विधानससभा निवडणुकीचा अपवाद वगळता १९९० पासून पैठण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या संत एकनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत तालुक्यातील सर्वच स्थानिक पक्षांनी शिवसेनेच्या विरोधात आघाडी करून, कारखान्याची निवडणूक जिंकली होती. तेव्हापासूनच पैठणमध्ये शिवसेनेला पराजित करू शकतो, असा विश्वास या पक्षांना आला होता. पैठण नगरपालिका निवडणुकीत, भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सहा नगरसेवक या निवडणुकीत निवडून आल्यावर या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्यातच अन्य पक्षांचे द्वितीय फळीतील नेते मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश घेत असल्याने आगामी सर्व निवडणुकीत आपलाच पक्ष जिंकणार अशा अतिआत्मविश्वासात भाजपचे काही नेते वागत होते.
या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व काही मंत्र्यांच्या सभा झाल्यावर या जिप व पंचायत समिति निवडणुकीत भाजप तालुक्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल असा विश्वास हे नेते व्यक्त करत होते. दुसरीकडे नप निवडणुकीत सहा नगरसेवक निवडून आल्यावर जिप व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला तगडे आव्हान देण्याची भाषा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत होती.

आमदार भुमरेंचे एकहाती यश
जिल्हा परिषदेच्या नऊपैकी सात व पंचायत समितीच्या अठरा पैकी अकरा जागा जिंकून शिवसेनेने भाजप व राष्ट्रवादीला उत्तर दिले आहे. ठण हा शिवसेनेचा अभेद्य किल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या एकाही मोठ्या नेत्याची पैठण मध्ये प्रचार सभा झाली नाही. आमदार संदीपान भुमरे यांनी एकहाती किल्ला लढवत हा विजय मिळवून, पैठण मध्ये सध्यातरी त्यांच्यासमोर कोणत्याही पक्षाचे आव्हान नसल्याचे अन्य पक्षांना दाखवून दिले आहे.

विजयी उमेदवार
मनीषा सोलाटे, शिवसेना पिंपळवाडी, कविता चव्हाण शिवसेना आडूळ, विलास भुमरे शिवसेना पाचोड, विजय चव्हाण मनसे बिडकीन, साधना एडके शिवसेना दावरवाडी, पल्लवी नवथर काँग्रेस विहामांडवा, अक्षय जायभाये शिवसेना चितेगाव, कुसुमबाई लोहकरे शिवसेना ढोरकीन, शिल्पा कापसे शिवसेना आपेगाव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद तालुक्यात काँग्रेस अव्वल

$
0
0

जिल्ह्यात एकीकडे काँग्रेसला संमिश्र यश मिळाले असताना औरंगाबाद तालुक्यात मात्र काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेच्या १० पैकी ५, तर पंचायत समितीच्या २० पैकी ८ जागांवर विजय मिळवत अव्वल ठरला आहे.
लाडसावंगी गटातून काँग्रेसच्या रेणुका शिंदे ५७३८, गोलटगाव बबन कुंडारे ५२४७, मीना शेळके ९५८०, सावंगीतून संतोष शेजुळ ७२९१ व दौलताबाद गटामध्ये सय्यद कलीम कोदन यांनी ५८४४ मते घेऊन विजय मिळवला. तर वडगाव कोल्हाटी उत्तर पूर्व गटातून भाजपच्या रेखा नांदुरकर ३५९८, वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम मधून ज्योती चोरडिया ३४८१ तर पिंप्री बु. गटातून ८०३६ मते घेऊन प्रकाश चांगुलपाये यांनी विजय मिळवला. आगडगाव बु. गटातून शिवसेनेचे रमेश पवार यांनी ५९९१ मते घेऊन तर पंढरपूर गटातून रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) रमेश गायकवाड ५१५७ मते घेऊन विजयी झाले.
२० पंचायत समितीमधील विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या ८ उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये लाडसावंगी येथून अर्जुन शेळके ३११८, करमाड येथून ताराबाई उकीरडे ५१६६, वरुडकाजी येथून छाया घागरे ४७८६, पळशीतून चंदाबाई राठोड ३३८१, सावंगीतून सुभाष भालेराव ४१४७, दौलताबाद वनिता मुळे ४११५ व तीसगाव गणामधून विजय जाधव २२१५, गेवराई ब्रूकबॉण्ड येथून अनुरा‌ग शिंदे २२५२ मते घेत विजय मिळवला. भाजपच्या उमेदवारांना ७ जागांवर यश मिळाले. यामध्ये चौका गणातून भाजपचे चंद्रकांत घुगे ३५४१, गोलटगाव येथून विमल साळुंके १७९६, वडगाव कोल्हाटी पूर्वमधून सतीश पाटील १७३५, वडगाव कोल्हाटी पश्चिममधून लक्ष्मण लांडे २२०१, आडगाव बु. येथून मनिषा चौधरी ३६१५, पिंप्री बु. रामकिसन भोसले २४४२ तर कचनेर येथून भाजपच्या शर्मिला गायकवाड यांनी ३७४२ मते घेऊन विजय मिळवला.
शिवसेनेच्या विजयी उमेदवारांमध्ये गाढेजळगाव येथून मालतीबाई पडूळ २२५३, वडगाव कोल्हाटी उत्तर मधून राजेश साळे २७५३, तर गांधेली गणातून शिवसेनेच्या कविता राठोड यांनी ३६६३ मते घेऊन विजय मिळवला. तालुक्यातील गणांमध्ये अपक्षांनीही खाते उघडले असून यामध्ये वडगाव कोल्हाटी पश्चिममधून संतोष गवळी १४९३ मते घेउन विजय मिळवला, तर रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) शमीम चौधरी यांनी २१५८ मते घेत विजय मिळवला. तालुक्याची मतमोजणी हडको एन १२ परिसरातील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रात सकाळी १० वाजता सुरू करण्यात आली. यामध्ये प्रारंभी पोस्टल मतदानाची मतमोजणी करण्यात आली, यानंतर गटाची व त्यानंतर पंचायत समितीच्या मतांची मोजणी करण्यात आली.

पक्षीय बलाबल
जिल्हा परिषद गट – १०
काँग्रेस – ०५
भाजप – ०३
शिवसेना – ०१
रिपब्लिकन पक्ष – ०१

पंचायत समिती गण - २०
काँग्रेस - ०८
भाजप – ०७
शिवसेना - ०३
अपक्ष – ०१
रिपब्लिकन पक्ष - १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत कमळ; काँग्रेसची पकड ढिली

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
परंपरेने ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेची काँग्रेसची पकड आता पुरती ढिली झाली आहे. ग्रामीण भागात रुजलेल्या शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी दणका दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि गेल्यावेळच्या मनसेला ग्रामीण जनतेने नाकारून भाजपला पसंती दिली आहे. आगामी राजकारणाच्या दृष्टीने ही सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धोक्याची घंटा आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीत सुरुवातीपासून भाजपने नियोजनबद्ध आखणी केली होती. दुसरीकडे शिवसेनेचेही जोरदार तयार होती, पण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील पुढारी फाजील आत्मविश्वासात गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत झेडपी व पंचायत समितीचा प्रचार करून आपण निवडणूक जिंकू शकतो, असे वाटल्याने सगळीकडे प्रचारात स्थानिक मुद्दे कुठेच आले नाहीत. काँग्रसचे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे हे तीन माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काही नेतेमंडळ जिल्ह्यात आले, पण त्यांच्या प्रचारात कुठेच नियोजन नव्हते. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचे खापर वरिष्ठ नेत्यांवर फोडून जिल्हाध्यक्षपद सोडले होते. त्यांनी केवळ सिल्लोड तालुक्यापुरेच पाहिले. त्यांचे श्रेष्ठींशी संबंध ताणले गेल्याने सिल्लोडमध्ये प्रचारासाठी बाहेरून एकही नेता गेला नाही. त्याचा फटका सिल्लोडमध्येही बसला. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार निश्चित करण्यापासून प्रचार यंत्रणा राबविण्यात ते एकटे पडले. फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यात माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी आपला गड राखण्यात यश मिळविले. पण वैजापूर, गंगापूर आणि कन्नडमध्ये आमदार सुभाष झांबड, माजी आमदार नितीन पाटील यांना मात्र पुरते अपयश आले. काँग्रेसमधील गटबाजी कायम चिंतेचा विषय असतो. त्याचा फटका यावेळच्या निवडणुकीत बसला.
शिवसेनेची प्रचारयंत्रणा प्रभावीपणे राबबिण्यासाठी जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रयत्न केले. कन्नड, वैजापूर आणि गंगापूरमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले. पण पैठणमध्ये आमदार संदीपान भुमरे यांनी जशी एकहाती सत्ता मिळविली. तशी किमया साधण्यात मात्र, सेनेच्या नेत्यांना अपयश आले. त्याचे अंतर्गत गटबाजी हे एक कारण आहे. औरंगाबाद तालुक्यात शिवसेनेच्या जागा हिसकावून घेण्यात भाजप यशस्वी झाले. गेल्यावेळच्या आकड्याला शिवसेना पोचली, पण यावेळी अव्वल राहील असा जो अंदाज व्यक्त होत होता. तो साफ चुकला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्यावेळी आठ जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र केवळ एक जागा त्यांना मिळाली. एकूणच भाजपने अन्य पक्षांच्या तुलनेत वेगळी प्रचार यंत्रणा राबविली आणि त्याचा फायदा मिळाला. भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार प्रशांत बंब, माजी आमदार किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड आदींनी प्रचारयंत्रणा सांभाळली.

राष्ट्रवादीची अवस्था बिकट
राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था मात्र बिकट झाली आहे. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, सतीश चव्हाण यांनी प्रचारयंत्रणा राबविली. राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या पण त्यांना मतदारांची मने जिंकता आली नाहीत. गेल्यावेळच्या दहा जागांवरून राष्ट्रवादी आता तीन जागांवर आली आहे. आता पुढे लवकर निवडणूक नाही. तोवर पक्ष बांधून ठेवण्याचे आव्हान नेते पेलविणार की नाही हा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी अध्यक्षपदी चव्हाण, काळे की बनकर ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच आता अध्यक्षपदाची समीकरणे जुळविण्यास सुरुवात झाली आहे. अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपकडून अनुराधा चव्हाण (गणोरी), पुष्पाताई काळे (आमखेडा) आणि सरला बनकर (भाजप) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
६२ पैकी २२ जागा जिंकून भाजप झेडपीतील अव्वल पक्ष ठरला आहे. भाजप वरचढ ठरल्याने साहजिकच त्यांच्याकडून निवडून आलेल्या सदस्यांची चाचपणी सुरू झाली. फुलंब्री तालुक्यातील गणोरी गटातून निवडून आलेल्या अनुराधा चव्हाण, सोयगाव तालुक्यातील आमखेडा गटातील पुष्पाताई काळे आणि सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गटाच्या सरला बनकर या तीन सदस्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राजकीयदृष्ट्या तीनही सदस्यांचे भाजपमध्ये चांगले वजन आहे. पुढच्या दोन तीन दिवसांत भाजपच्या नेत्यांची बैठक होईल. त्यात झेडपीमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला की अध्यक्षपदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस, राष्ट्रवादीचा गंगापुरात धुव्वा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडाला, शिवसेना भाजपमध्ये सरळ लढत झाली. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे पाच व भाजपचे चार उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीमध्ये दोन्ही पक्षाचे प्रत्येकी नऊ उमेदवार विजयी झाले.
गंगापूर तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गुरुवारी तहसील कार्यालयात मतमोजणीला करण्यात आली. तालुक्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. पंचायत समितीमध्ये शिवसेना व भाजपचे समान उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

विजयी उमेदवार- जिल्हा परिषद- सावंगी- शिवसेना देवयानी कृष्णा पाटील, तुर्काबाद- शिवसेना मनीषा ज्ञानेश्वर सिदलंबे, शिलेगाव -शिवसेना शितल प्रशांत बनसोड, जामगाव -शिवसेना स्वाती दिलीप निरपळ, शेंदुरवादा-शिवसेना छाया जीवन अग्रवाल, आंबेलोहळ-भाजप पुरस्कृत शामराव आनंद बन्सोडे, रांजणगाव शे.पु.- भाजप उषा दत्तू हिवाळे, वाळूज गट-भाजपा रामदास गंगाधर परोडकर, नेवरगाव-भाजप मधुकर काशीनाथ वालतुरे.

पंचायत समिती- शेंदूरवादा भाजप अर्चना कृष्णा सुकासे, गुरुधानोरा भाजप ज्ञानेश्वर रामचंद्र देशमाने, रांजणगाव शेणपुंजी भाजप दीपक हरीराम बडे, जोगेश्वरी भाजप पुष्पा योगेश दळवी, अंबेलोहळ शिवसेना पुंजाराम कचरू दाभाडे, असेगाव भाजप सावळीराम भानुदास थोरात, वाळूज भाजप ज्योती भिकचंद गायकवाड, लिंबेजळगाव भाजप लता रामेश्वर मालुसरे, घोडेगाव शिवसेना भानुदास रामकिसन पवार, शिलेगाव-शिवसेना सविता सुनील केरे, सिद्धनाथ वाडगाव शिवसेना लिंगायत मेनका महेश, जामगाव-शिवसेना-जगदाळे दिनेश शिवाजी, वाहेगाव गण-शिवसेना बद्रीनाथ लक्ष्मण चव्हाण, नेवरगाव गण-भाजपा राधाबाई उद्धव तोगे, कायगाव-भाजप सुमीत रामेश्वर मुंदडा, माळी वाडगाव शिवसेना उर्मिला विश्वनाथ बारसे, सावंगी शिवसेना संपत सोहनराज छाजेड, तुर्काबाद शिवसेना शिलाबाई शिवाजी देवबोने.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयगावात काँग्रेस बहुमतापासून दूर

$
0
0

सोयगाव पंचायत समितीमध्ये काँग्रेसने सहा पैकी तीन जागा मिळवित वर्चस्व कायम राखले, पण त्यांना बहुमतासाठी एक जागा कमी आहे. भाजपने दोन व शिवसेनेला एक जागा मिळाली.
फर्दापूर गणातून काँग्रेसच्या रस्तुलबी पठाण यांनी भाजपच्या अनिता काळे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख असेफाबी इसा यांचा पराभव केला. सावळदबारा गणात काँग्रेसचे धरमसिंग चव्हाण यांनी यांनी भाजपच्या ज्योती टिकारे व शिवसेनेचे विलास राठोड यांचा पराभव केला. आमखेडा गणातील भाजपचे संजीवन सोनवणे यांनी काँग्रसेचे किशोर सोनवणे व शिवसेनेचे दीपक रावळकर यांचा पराभव केला. निंबायती गणातून भाजपच्या लताबाई राठोड यांनी काँग्रेसच्या ज्योती गव्हाळे व शिवसेनेच्या वंदना पालकर यांचा पराभव केला. बनोटी गणातील काँग्रेसच्या प्रतिभा जाधव यांनी शिवसेनेच्या वैभवी पाटील व आघाडीच्या रंजनाबाई पाटील यांचा पराभव केला. गोंदेगाव गणातील शिवसेनेचे साहेबराव गायकवाड यांनी काँग्रेसचे मोसम बर्डे, आघाडीचे सुनील लाडके यांचा दारूण पराभव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नेत्यांना निर्वाणीचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसल्यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी या पक्षाच्या आमदार, खासदारांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे मानले जात आहे. केवळ भावनिक आवाहनावर निवडणूक लढवण्याचे दिवस संपले. आता शिवसेनेला विकासाचे काम करून दाखवावे लागेल, असे बोलले जात आहे.
मावळत्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १७ सदस्य होते. आता १८ सदस्य निवडून आले आहेत. वाढलेल्या एका जागेचा दिलासा शिवसेनेला मिळाला आहे. औरंगाबाद जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, परंतु विधानसभेच्या दोन निवडणुकांपासून हा बालेकिल्ला ढासळण्यास सुरुवात झाली. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसेनेच्या फक्त तीन जागा निवडणून आल्या. त्यापैकी पैठणची संदीपान भुमरे यांची जागा जालना लोकसभा मतदार संघात मोडते. त्यामुळे कन्नड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणून आलेले आमदार हर्षवर्धन जाधव व औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले संजय शिरसाट हे दोनच आमदार जिल्ह्यात शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोन्ही आमदार आपापल्या मतदारसंघातून शिवसेनेच्या जागा योग्य प्रमाणात निवडून आणतील असे मानले जात होते. मात्र, दोन्हीही मतदारसंघात शिवसेनेच्या पदरी निराशाच आली. कन्नडचे आमदार जाधव यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपासून बाजूला होत स्वतंत्र आघाडी उभारली, या आघाडीलाही यश मिळाले नाही. जाधव यांच्या आघाडीला बाजूला ठेवत शिवसेनेने कन्नड तालुक्यात उमेदवार उभे केले, पण एकच उमेदवार विजयी होऊ शकला.
औरंगाबाद जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाच विचार जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीत करावा लागला आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे, तर पश्चिम मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचे संजय शिरसाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाच्या क्षेत्रातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळेल असे मानले जात होते, पण या मतदारसंघात शिवसेनेच्या पदरी निराशीच पडली. चार पैकी एकही जागा शिवसेनेला जिंकता आली नाही. चार पैकी तीन जागा भाजपने जिंकल्या, तर एका जागेवर रिपाइं डेमॉक्रेटिक पक्षाचा उमेदवार निवडून आला.

धोक्याची घंटा
सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यांमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. सोयगाव तालुक्यात एक जागा पारड्यात पडली. वैजापूर - गंगापूर तालुक्यात प्रत्येकी चार जागा शिवसेनेला मिळाल्या. त्याचे श्रेय माजी आमदार आर. एम. वाणी व अण्णासाहेब माने यांना जाते. पैठण तालुक्यातील सर्वच्या सर्व सात जागा शिवसेनेने जिंकल्या असल्या, तरी जालना लोकसभा मतदारसंघाचा तो भाग असल्यामुळे या तालुक्यात मिळालेले यश सेनेला औरंगाबाद जिल्ह्याच्या नावावर लिहिता येणार नाही. झेडपीच्या या निकालावरून शिवसेनेसाठी धोक्याची घंटा वाजणे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीची पकड वैजापुरात ढिली

$
0
0

मकरंद कुलकर्णी, वैजापूर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. राष्ट्रवादीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठपैकी केवळ दोन, तर पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी पाच जागा मिळवल्या. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची ग्रामीण राजकारणावरील पकड निसटल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या चार, तर पंचायत समितीच्या सात जागा जिंकल्या आहेत. पंचायत समितीत कुणालाच बहुमत मिळाले नसले तरी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला सहाच जागा मिळाल्याने ते सत्तेपासून दूर राहिले आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीमध्ये चौदा पैकी नऊ जागा जिंकून शिवसेनेची सत्ता हिसकावून घेतली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर विजयी झाले. या दोन्ही सत्ता असुनसुद्धा राष्ट्रवादीच्या कारभाराबाबत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. त्यामुळे प्रत्येकाला सभापतिपद देण्याचा प्रयोग आमदारांच्या चांगलाच अंगलट आला. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाची स्थिती कमकुवत झाली व त्याचा फटका या निवडणुकीत बसला. भाजपने तीन जागा जिंकून ग्रामीण राजकारणात प्रवेश केला आहे. सवंदगाव गटातून नीता राजपूत यांना तिकीट नाकारण्याचा निर्णय शिवसेनेला चांगलाच महागात पडला. वांजरगाव गटातून बाबासाहेब जगताप यांची उमेदवारी कापल्याचा फटकाही शिवसेनेला बसला. काँग्रेसची मात्र या निवडणुकीत पूर्ण अधोगती झाली. काँग्रेसने वांजरगाव गटातून व गणातून बाजी मारली आहे. गटातून पंकज ठोंबरे, तर गणातून विनायक गाढे हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

रामकृष्ण बाबांची पकड
लासूरगाव गटातील काँग्रेसच्या उमेदवार संगिता तांबे यांना शिवसेनेच्या वैशाली पाटील यांच्याकडून केवळ १५८ मतांनी हार पत्करावी लागली. या गटात शिवसेनेचा निसटता विजय झाला असला तरी रामकृष्णबाबांची राजकारणावरील पकड अजूनही मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विजयी उमेदवारः वाकला- शोभाबाई शिवदास पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), बोरसर- पार्वतीबाई रामहरी जाधव (शिवसेना), शिऊर- सपना वसंत पवार (भाजपा), सवंदगाव- गट नीताबाई दीपकसिंह राजपूत (राष्ट्रवादी), लासूरगाव- वैशाली दादासाहेब पाटील (शिवसेना), घायगाव- रमेश नानासाहेब बोरनारे (शिवसेना), वांजरगाव- पंकज सुधाकर ठोंबरे (काँग्रेस), महालगाव- अविनाश अशोक गलांडे (शिवसेना).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातग्रस्त रुग्णाचे ३० हजार सहीसलामत !

$
0
0

अपघातग्रस्त रुग्णाचे ३० हजार सहीसलामत !

रुग्णाची शुश्रुषा करताना सापडलेले पैसे घाटीच्या कर्मचाऱ्यांनी केले परत; रुग्णाला संजीवनी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचे कपडे बदलताना सापडलेले ३० हजार रुपये घाटीच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे परत करुन प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत त्याला दाखल करण्यात आले होते; परंतु सर्वच कर्मचाऱ्यांनी त्याची योग्य ती सुश्रुषा घेतल्यामुळे आता या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. घाटीच्या वॉर्ड क्रमांक १९ मध्ये हा रुग्ण उपचार घेत आहे.

सिल्लोड परिसरात झालेल्या अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन चाळीशीतील रामदरस विश्वकर्मा यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शल्यचिकित्साशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक १९ मध्ये १८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. असंख्य ठिकाणी झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांना हालचाल करणेदेखील कठीण झाले असताना, घाटीतील डॉक्टर, परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांची पहिल्या दिवसापासून शुश्रुषा केली. त्यांना स्वतःचे कपडेदेखील स्वतः बदलणे शक्य नव्हते. अशा वेळी सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांची पहिल्या दिवसापासून सेवा केली. त्यांची स्वच्छता करणे, औषधोपचार करणे, मलमपट्टी करणे अशा सगळ्याच बाबतीत त्यांना अवलंबून राहावे लागत होते व अजूनही ते बऱ्याच प्रमाणात कर्मचाऱ्यांवरच अवलंबून आहेत. अशा परिस्थिती त्यांचे कपडे बदलत असताना कक्षसेवक समीर बेग व इमान बेग यांना रुग्णाजवळ ३० हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे सापडली. त्यांनी ही बाब परिसेविका रजनी देहाडे यांच्या लक्षात आणून दिली, तर परिसेविका देहाडे यांनी ही बाब तातडीने युनिट इन्चार्ज डॉ. आनंद बीडकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिली. तसे लेखी पत्र वैद्यकीय अधीक्षक यांना दिले. त्यानंतर ती रक्कम रुग्णाच्या नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आली. यानिमित्ताने घाटीतील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचा प्रेरणादायी पायंडा घालून दिला आहे.

रुग्णाची दिवसरात्र सुश्रुषा

संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्यावर विविधांगी उपचार केले जात आहेत आणि त्यासाठी युनिट इन्चार्ज डॉ. बीडकर, निवासी डॉ. सिद्धार्थ वैद्य, परिसेविका देहाडे, अधिपरिसेविका संगीता पारले, जिजा राठोड, संगीता देशपांडे आदी त्याची काळजी घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर पंचायतीत भाजपची सत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शिवसेनेने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठपैकी चार व पंचायत समितीच्या सोळापैकी सात जागा शिवसेनेला मिळाल्या. परंतु, सभापतीपद अनुसूचित जमाती महिला राखीव आहे. या प्रवर्गाच्या शिऊर गणातून भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या. त्यामुळे भाजपला १५ वर्षांनंतर पंचायत समितीचे सभापतीपद मिळणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पुत्र अजय पाटील चिकटगावकर यांना जरूळ गणातून पराभव पत्करावा लागला.
तालुक्यातील पंचायत समितीवर गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यावेळी मात्र त्यांना सत्ता गमवावी लागली आहे. पंचायत समितीमध्ये शिवसेनेने सात, भाजप तीन, राष्ट्रवादी काँग्रेसला पाच व काँग्रेसला एक जागा मिळाली. जिल्हा परिषदेच्या चार जागा मिळ‍वून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला दोन व भाजपला एक जागा मिळाली. शिवसेनेने घायगाव, महालगाव, लासूरगाव व बोरसर हे चार गट तर बोरसर, लाडगाव, घायगाव, खंडाळा, लासूरगाव, पालखेड व महालगाव हे सात गण जिंकले आहेत. राष्ट्रवादीने वाकला व सवंदगाव हे गट व वाकला पोखरी, मनूर वीरगाव व सवंदगाव हे गट ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. काँग्रेसने वांजरगाव या गटात व गणात विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाने शिऊर हा गट तर पंचायत समिती सभापतीपदासाठी राखीव झालेल्या शिऊर या गणासह नागमठाण व जरूळ हे गण ताब्यात मिळवले आहेत. त्यामुळे भाजपाच्या शिऊर गणातील इंदुबाई जालिंधर सोनवणे या सभापती पदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदारपुत्राचा पराभव
जरूळ गणातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार भाऊसाहेब पाटील यांचे पुत्र अजय पाटील चिकटगावकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा भाजपाचे सुरेश राऊत यांनी २२७ मतांनी पराभव केला. त्यामुळे या गणात जनशक्तीने धनशक्तीचा पराभव केला अशी चर्चा आहे.

गणातील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणेः नागमठाण मुक्ता बाबासाहेब डांगे (भाजपा), वाकला राजेंद्र धोंडिराम मगर (राष्ट्रवादी काँग्रेस), पोखरी योगिता आनंद निकम (राष्ट्रवादी काँग्रेस), मनूर अण्णा रामसिंग चौधरी (राष्ट्रवादी कॉग्रेस), बोरसर माया अरुण होले (शिवसेना), शिऊर इंदुबाई जालिंधर सोनवणे (भाजप), खंडाळा सुनिता नामदेव बागुल (शिवसेना), जरुळ सुरेश वाल्मिक राऊत (भाजप), सवंदगाव प्रताप बाबुलाल मरमट (राष्ट्रवादी), पालखेड सिनाबाई मनाजी मिसाळ (शिवसेना), लासूरगाव सुषमा राजेंद्र वाघ (शिवसेना), घायगाव रवींद्र मुरलीधर कसबे (शिवसेना), लाडगाव माधुरी भाऊसाहेब गलांडे (शिवसेना), वांजरगाव विनायक बाबुराव गाढे (काँग्रेस), वीरगाव प्रभाकर साहेबराव बारसे (राष्ट्रवादी), महालगाव कल्पना संभाजी डांगे (शिवसेना).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात भाजपची सरशी, सेनेची पिछेहाट

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. ४६० गटांपैकी १२९ जागा जिंकून भाजपने मराठवाड्यात पहिले स्थान कमावताना लातूरच्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवले. नांदेड, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि बीडमध्ये त्रिशंकू परिस्थ‌िती आहे. परभणी आणि उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे.
लातूरची सत्ता पारंपरिक काँग्रेसच्या ताब्यात होती ही सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश मिळाले आहे. याचे सर्व श्रेय कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना द्यावे लागेल, मात्र बीडच्या कँबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्हा परिषदेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवून दिल्या आहेत. एकहाती सत्ता घेण्यात त्यांना आपयश आले. जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांना अपक्ष किंवा राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागणार आहे.
माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा सत्ता मिळवून दिली आहे. माजी खासदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबा जानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्यांदा परभणीत सत्ता मिळवून दिली आहे.
औरंगाबाद आणि जालना जिल्हा हा शिवसेनेचा गड मानला जात होता, परंतु त्याला तडा देण्याचे काम भाजपने केले आहे. या दोन्ही जिल्हा परिषदांत प्रत्येकी २२ जागा जिंकून भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे.

पक्षीय संख्याबळ
औरंगाबाद (६२)
शिवसेना १८, भाजप २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी ०३, मनसे १, रिपाई कांबळे १, अपक्ष १
जालना (५६)
शिवसेना १४, भाजप २२, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १३, अपक्ष २
परभणी (५४)
शिवसेना १३, भाजप ३, काँग्रेस ५, राष्ट्रवादी २४, अपक्ष ६
बीड (६०)
शिवसेना ४, भाजप १९, काँग्रेस ०३, राष्ट्रवादी २५, काकू-नाना आघाडी ०३, गोपीनाथ मुंडे आघाडी ०१, अपक्ष ०२, शिवसंग्राम ०३
हिंगोली (५२)
शिवसेना १५, भाजप १०, काँग्रेस १२, राष्ट्रवादी १२, अपक्ष ०३
नांदेड (६३)
शिवसेना १०, भाजप १३, काँग्रेस २८, राष्ट्रवादी १०, अपक्ष २
उस्मानाबाद ५५
शिवसेना ११, भाजप ०४, काँग्रेस १३, राष्ट्रवादी २६, अपक्ष ०१
लातूर (५८)
शिवसेना १, भाजप ३६, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ५, अपक्ष ०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समितीत खुलताबादेत भाजप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
खुलताबाद पंचायत समितीमध्ये भाजपने काँग्रेसचा पराभव केला. पंचायत समितीच्या सहा पैकी चार जागा भाजपने मिळवल्या. प्रत्येकी एक जागा शिवसेना बंडखोर व काँग्रेसने मिळवली.
खुलताबाद पंचायत समितीमध्ये सध्या काँग्रेसच्या तीन, आमदार बंब आघाडी एक व शिवसेनेच्या दोन जागा होत्या. यावेळी भाजपने शिवसेनेला पूर्ण पराभूत केले तर, काँग्रेसला एकच जागा मिळाली. पंचायतीचे निकाल पुढीलप्रमाणेः बाजारसावंगी-प्रभाकर बाबुराव शिंदे, (विजयी भाजप ३३११), सखाहरी पांडुरंग बनसोड (राष्ट्वादी काँग्रेस १८७३), भावराव शाहुबा काटकर (काँग्रेस १७५३), टाकळी-राजाराय गणेश जिजाबा आधाने, (विजयी भाजप २८०३), भगवान कामठे (राष्ट्रवादी काँग्रेस २१२४ ), अथर सत्तार पटेल (काँग्रेस १५५२) ताजनापूर- अर्चना दिनेश अंभोरे, (विजयी भाजप ३०३६), काशीबाई भीमराव जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस २१३५), परीगाबाई बाबुराव भांडे (काँग्रेस १२६२) गदाना- रेखा प्रकाश चव्हाण (विजयी अपक्ष २५२०), ज्योती धनाजी आढाव (भाजप २२४७), सुनंदा दादा जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस १७८६), वेरूळ- हीना अजीम मनियार (विजयी (काँग्रेस, २६६८), अनिता साहेबराव पांडव (शिवसेना, २१५७), कल्पना प्रल्हाद निकुंभ (भाजप १९००) गल्ले बोरगांव-युवराज कचरु ठेंगडे (विजयी भाजप ३३१२), सुरेश रामसिंग निमरोट (काँग्रेस २०१८), विशाल विजय खोसरे (शिवसेना १९८०).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images