Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘बेंडिंग’मध्ये ‘जिका’चे यश

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिव्हिल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण अशा राष्ट्रीय पातळीवरील ‘बेंडिंग मोमेंट’ प्रश्नमंजुषा स्पर्धेत देशभरातून औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्रेयांस मुथा व ऋषभ ठोले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशपातळीवर होणारी ही स्पर्धा टाटा टिसस्कॉन व इथोसतर्फे अभियांत्रिकी कॉलेजामधील सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात होते. ऑनलाइन घेतल्या जाणाऱ्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. प्रथम विभागीय फेरी ५ फेब्रुवारी रोजी झाली. देशभरातील चार विभागातून एकूण आठ संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी अंतिम फेरी घेतली गेली. त्यात श्रेयांस मुथा व ऋषभ ठोले यांच्या संघाने देशभरातून तिसरा क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचा सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ, डॉ. उमेश कहाळेकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिल्लीसाठी गल्लीतून तयारी

$
0
0


Ravindra.Taksal@timesgroup.com
Tweet : @rtaksalMT
औरंगाबादः जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत बाजी मारत नंबर एक पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने आतापासूनच लोकसभेसाठी मतदारसंघात पायाभरणी सुरू केली आहे. त्यासाठी काही इच्छुकांनी प्रयत्न सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी सत्ता काबीज केली आहे. औरंगाबाद जिल्हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला एकाही ठिकाणी नगराध्यक्षपद राखता आले नाही. दुसरीकडे भाजपाने गंगापूर आणि पैठणमध्ये नगराध्यक्षपद खेचून आणले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने २२ जागा जिंकून अव्वल स्थान पटकावले. यात गंगापूर, खुलताबाद तालुक्यात त्यांनी घवघवीत यश मिळविले. वैजापूर, कन्नड आदी भागातही चांगली कामगिरी झाल्याने ग्रामीण भागात भाजपाने मुसंडी मारली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

विधानसभा निवडणुकीप्रमाणे पुढील लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती झाली नाही, तर ऐनवेळी धावपळ नको, तसेच पक्षाची वाढलेली ताकद या पार्श्वभूमीवर भाजपमधील काही इच्छुकांनी लोकसभेसाठी आतापासून जोरदार पायाभरणी सुरू केली आहे. यात एका आजी - माजी आमदार, माजी महापौरांसह प्रदेश कार्यकारिणीवर असलेल्या दिग्गज नेत्यांची नावे आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अब दिल्लीही
एका इच्छुकाने शहरासह ग्रामीणकडे अधिक लक्ष कसे देता येईल, यासाठी नियोजनही सुरू केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या विभागाची जबाबदारी दिली होती, तेथे चार पैकी दोन जागांवर विजय मिळविल्याचे त्या इच्छुकाने सांगत आतापासून मतदारसंघात लक्ष दिले, तरच पुढील ध्येय गाठता येईल, असे ऑफ दी रेकॉर्ड सांगितले. दुसऱ्या अन्य एका प्रदेशस्तरावरील नेत्याने खासदारीसाठी आपला दावा राहील, असा विश्वास व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीपर्यंत राजकीय गणिते काय असतील ते आताच सांगणे अवघड आहे. काही जणांनी आतापासूनच लोकसभेसाठी प्रयत्न सुरू केले असतील, तर त्यात चुकीचे काही नाही. पक्ष व संघटना वाढीसाठी निश्चितच त्याचा फायदा होईल. अर्थात या निवडणुकीला बराच अवकाश असून पक्षश्रेष्ठीच उमेदवार ठरवतील. - डॉ. भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर भामट्याने दोघांना घातला गंडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बँक अधिकारी अधिकारी असल्याची थाप मारून सायबर भामट्याने वेगवेगळ्या घटनेत शहरातील दोघांना २५ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पहिली घटना सिल्कमिल कॉलनी परिसरात घडली. मोहम्मद जुनेद अब्दुल वहाब असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांच्या मोबाइलवर ११ फेब्रुवारी रोजी श्रुती शर्मा नावाच्या तरुणीचा फोन आला. तिने एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत आहोत. तुमचे व्हाऊचर येणार आहे. तेव्हा तुमच्या क्रेडिट कार्डबाबत काही माहिती हवी आहे, अशी थाप मारली. मोहम्मद जुनेद यांनी तिच्यावर विश्वास ठेवून तिला क्रेडिट कार्डबाबतची संपूर्ण माहिती दिली. यानंतर त्यांच्या खात्यातून ऑनलाइन १० हजार रुपयांची खरेदी करण्यात आल्याचे समोर आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शुक्रवारी मोहम्मद जुनेद यांनी सातारा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक भारत काकडे हे करत आहेत. तर एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, ते अपडेट कररायचे आहे, अशी थाप मारून एका सायबर भामट्याने नंदनवन कॉलनीतील रहिवासी दयाराम वाकोडे यांना १५ हजार २०० रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. २२ फेब्रुवारी रोजी फिर्यादी वाकोडे यांच्या मोबाइलवर आरोपीने फोन करून बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातून बोलत असून कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगत फिर्यादीच्या बँक खात्याची माहिती मिळवली व त्याआधारे फसवणूक केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीत फूट पाडण्याचा डाव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कुठल्याही परिस्थितीत भाजप काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही. शिवसेना-भाजप अनेक वर्षांपासून परंपरागत मित्र आहेत, तर कॉँग्रेस परंपरागत शत्रू. आम्ही सेनेसोबत युती करायला तयार आहोत, पण आमच्यात फूट पाडण्याचा काँग्रेसचा डाव आहे,’ असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी शनिवारी केला.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपने सर्वाधिक जागा जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे. यानिमित्ताने नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत उस्मानपुरा येथील भाजप विभागीय कार्यालयासमोर सायंकाळी फटाके फोडून, मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, आमदार अतुल सावे, ज्ञानोबा मुंडे, राम बुधवंत आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जाधव म्हणाले, ‘भाजप-शिवसेनेची अनेक वर्षांपासूनची युती आहे. या निवडणुकीत जागावाटपावरून युती तुटली. आता निवडणुका झाल्या आहेत. लोकांची सुद्धा युती म्हणून भाजप-सेनेने एकत्र यावे अशी इच्छा आहे. आम्ही सेनेला सोबत घ्यायला तयार आहोत. आमचा आणि त्यांचा विचार एक आहे. त्यामुळे सेनेने याचा विचार करावा. आम्ही कॉग्रेसचा पाठिंबा घेणार नाही. अद्यापपर्यंत अध्यक्षपदासाठी नाव अंतिम झाले नाही. कोअर कमिटी हा निर्णय घेईल. नऊ पंचायत समितीमध्ये पाच समितीचे सभापती भाजप बहुमताच्या जोरावर निवडून आणू शकेल इतके संख्याबळ आहे. युतीच्या जोरावर दोन ठिकाणी बाजी मारता येईल,’ असेही ते म्हणाले.

मुंबईकडे लक्ष
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसंदर्भात निर्णय झाल्यानंतरच संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीमधील धोरण ठरेल, अशी भूमिका सध्यातरी स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष मुंबईतील निर्णयाकडे लागलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकाच्या सजगतेने चोरटे गजाआड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका जागरूक नागरिकाच्या मदतीने मुकुंदवाडी पोलिसांनी दोन चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून एलईडी टीव्ही, लॅपटॉपसह एकूण ५ लाखांचा ऐवजही जप्त केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भंते व्ही. रतन बोधी यांनी शुक्रवारी रात्री खोलीत मोबाइल चार्जिंगला लावला होता. मध्यरात्री एक तरुण तो मोबाइल चोरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी धाव घेत संशयित आरोपी राजेश ढोले (रा. प्रकाशनगर) यास पकडले. नागरिकांकडून माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेत ढोले याच्या मुसक्या आवळल्या. तर बोधी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गीते, पोलिस कर्मचारी कौतिक गोरे, अस्लम शेख, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी, कैलास काकड, सुनील पवार आदींनी ही कारवाई केली.

संशयितांवर सात गुन्हे
चौकशीत राजेश ढोले याने साथीदार उद्धव काळे (रा. सेलू, परभणी) याच्या मदतीने मुकुंदवाडी पोलिस स्टेशन हद्दीत दोन, एमआयडीसी वाळूज हद्दीत पाच असे एकूण सात गुन्हे केल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी बजाजनगर येथे सापळा रचून काळे यास ताब्यात घेतले. या दोघांकडून लॅपटॉप, एलईडी टीव्ही, मोबाइल असा एकूण ५ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्क जागेसाठी सुरक्षारक्षक मिळेना

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सफारी पार्कच्या शंभर एकर जागेच्या संरक्षणासाठी पालिका प्रशासनाने अद्याप सुरक्षारक्षक उपलब्ध करून दिले नाहीत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पडेगाव परिसरात महापालिकेतर्फे सफारी पार्क विकसित केले जाणार आहे. या पार्कसाठी आवश्यक असलेली शंभर एकर जागा शासनाने पालिकेला विनामोबदला उपलब्ध करून दिली. ज्या कारणासाठी जागा ताब्यात दिली आहे, त्याच कारणासाठी त्या जागेचा वापर करा आणि त्या जागेवर अतिक्रमण होऊ देऊ नका, अशा दोन अटी जागा ताब्यात देताना जिल्हा प्रशासनाने घातल्या आहेत. शंभर एकर जागा सांभाळण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे सुरक्षा विभागातून किमान चार सुरक्षा रक्षक उपलब्ध करून द्यावेत. हे सुरक्षा रक्षक त्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतील, असा प्रस्ताव उद्यान विभागाकडून वीस दिवसांपूर्वी पालिकेच्या मुख्यालयात पाठवण्यात आला. मात्र, अद्याप या प्रस्तावावर काहीच निर्णय झालेला नाही. महापालिका कंत्राट पद्धतीवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करते. मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवले जातात. मात्र, अनेक ठिकाणी गरज नसताना देखील सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाते. अनेक सुरक्षा रक्षकांची नेमणूक कागदावर दाखवून त्यांचा पगार देखील उचलून घेतला जातो. या प्रकरणाची चौकशी सध्या शासनाच्या आदेशाने सुरू आहे.

पालिकेचे दुर्लक्ष
सफारी पार्कसाठी पडेगाव शिवारात जागा मिळावी यासाठी पालिकेतर्फे चार वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर शासनाने जागा उपलब्ध करून दिली. ताब्यात मिळालेली जागा अतिक्रमण मुक्त राहिली पाहिजे याची जबाबदारी महापालिकेची असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वीस दिवसांपासून सुरक्षा रक्षकांची नेमणूक न झाल्यामुळे सफारी पार्कच्या जागेला सुरक्षा रक्षक केव्हा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मन बावरा आयो रे सजनिया

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभिजात शास्त्रीय गायन व नादमाधुर्याचा आनंद देणाऱ्या सरोदवादनाने पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सव संस्मरणीय ठरला. ज्येष्ठ गायिका श्रृती सडोलीकर आणि उदयोन्मुख गायिका सुस्मिरता डवाळकर यांनी आपल्या गायकीतून रसिकांना सुश्राव्य गायकीचा आनंद दिला.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, ध्यास परफॉर्मिंग आर्टस् आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांनी पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सव घेतला. तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी सायंकाळी महोत्सव रंगला. या मैफलीची सुरुवात उदयोन्मुख गायिका सुस्मिरता डवाळकर हिच्या शास्त्रीय गायनाने झाली. राग ‘मारू बिहाग’मधील ‘रसिया न जा’ ही रचना सुस्मिरता हिने ताकदीने सादर केली. आवाजातील आरोह-अवरोह मैफल रंगतदार करणारे ठरले. तर ‘मन बावरा आयो रे सजनिया’ ही रचना रसिकांची दाद घेणारी ठरली. पुणे येथील सारंग कुलकर्णी यांनी सरोद वादनातून नादविश्व उभे केले. वादनातील नजाकत आणि गतिमानता रसिकांना खिळवून ठेवणारी होती. वादनाचा आनंद घेत रसिकांनी मनमुराद दाद दिली. जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर यांच्या सुश्राव्य गायनाने महोत्सवाचा समारोप झाला.
शास्त्रीय गायकीचे अभिजात दर्शन सडोलीकर यांनी घडवले. मैफलीत उदय कुलकर्णी, मंगेश मुळे, शोण पाटील, सुजीत नेवपूरकर यांनी संगीत साथसंगत केली. दरम्यान, मैफलीपूर्वी ज्येष्ठ गायिका पं. शुभदा पराडकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी गायक पं. शौनक अभिषेकी व सचिन नेवपूरकर उपस्थित होते. महोत्सवाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईतील मराठा क्रांती महामोर्चा स्थगित

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। औरंगाबाद

मुंबईत आयोजित करण्यात आलेला ६ मार्चचा मराठा क्रांती महामोर्चा स्थगित करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा असल्यामुळे हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या पुढील मोर्चे काढण्याबाबत सर्व बैठका औरंगाबादला घेण्याबाबतही या बैठकीत एकमत झाले. मोर्चेकऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यासाठी, तसेच मोर्चासंबंधी सर्व आवश्यक माहिती मिळवण्यासाठी मिसकॉल अलर्ट ची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही बैठकीत ठरवण्यात आले. राज्य स्तरीय कोअर कमिटीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ७ सदस्यांची (२महिला ) नावे ५ मार्च पर्यंत औरंगाबाद कार्यालयाकडे मागवण्यात आली आहेत. ही नावे प्राप्त झाल्यानंतर मोर्चासंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले.

औरंगाबाद येथे पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत २९ जिल्ह्यातील सदस्यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेससोबत आघाडी करून १८ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता: पवार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। नांदेड

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी करणार असल्याची भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीनंतरच्या राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात याबाबत चर्चा झाली अाहे. त्यानुसार आमची आघाडी झाली तर राज्यात १७ ते १८ जिल्हा परिषदांमध्ये आमची सत्ता येईल असेही पवार म्हणाले.

मुंबईत ओयोजित करण्यात आलेल्या ३ मार्चच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मिळालेली मते पाहता स्वबळावर काँग्रेस केवळ १ तर राष्ट्रवादी काँग्रेस ३ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करु शकतात. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर एकत्र आले, तर राज्यभरात तब्बल १७ ते १८ जिल्हा परिषदांमध्ये आघाडीची सत्ता येऊ शकते. मग १ ते ३ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करायची की १७, १८ याबाबत निर्णय घ्यावा लागेल असे पवार म्हणाले.

मध्यावधी निवडणुकीला सज्ज आहोत!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यातील सत्तेतून बाहेर पडतील असे त्यांचे निवडणुकीनंतरचे वर्तन पाहता आपल्याला वाटत नाही असे पवार म्हणाले. पण जर ते सत्तेतून बाहेर पडलेच तर आम्ही मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज आहोत असेही पवार पुढे म्हणाले. दोन्ही काँग्रेसचे सख्याबळ पाहता राज्यात आम्ही सत्ता स्थापन करू शकणार नाही. आणि आम्ही शिवसेना किंवा भाजपला पाठिंबाही देऊ शकणार नाही. यामुळे निवडणुकीलाच सामोरे जाण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही असेही पवार पुढे म्हणाले.

मुंबईत भाजप वगळून इतरांना राष्ट्रवादीचा पाठिंबा

मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. भाजप आणि शिवसेनेत दोन जागांचाच फरक आहे. शिवसेना जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करेल, मात्र वेळ आलीच तर भाजप वगळता इतर पक्षांना पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण ९ जागा जिंकल्या आहेत. आपण भाजपला पाठिंबा देणार नाही हे पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र इतर पक्षांना पाठिंबा देण्याचा विचार त्यानी बोलून दाखवला आहे. मात्र हा विषय त्यांनी मुंबईतील स्थानिक नेत्यांवर सोपवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला पाठिंबा नाही!

$
0
0

मुंबईतील राजकीय पेचावर शरद पवारांचे सूतोवाच

म. टा. प्रतिनिधी, नांदेड

मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच, ‘भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेडमध्ये केले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे ८२ नगरसेवक आहेत. त्यामुळे सर्वांत मोठा पक्ष कोणता आणि महापौर कोणाचा, यावरून दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा आहे. यातच भाजपशी हातमिळवणी न करता सत्ता स्थापन करण्याचीही चाचपणी शिवसेना करीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नऊ संख्याबळ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. या पार्श्वभूमीवर, नांदेडमध्ये आलेल्या शरद पवार यांनी वरील वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘मुंबईचा कारभार सुरळीत चालावा, एवढीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. शिवसेनेकडून नगरसेवकाची जुळवाजुळव केली जात आहे, मात्र वेळ आलीच तर पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील.’

पवारांना डी.लिट.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९व्या दीक्षान्त प्रदान समारंभात पवार यांना मानद डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले.

काँग्रेसबरोबर हातमिळवणी

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करू, असे शरद पवार स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात चर्चा झाली आहे. आघाडी झाली, तर राज्यात १७ ते १८ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता येईल. मुंबईत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो, असे पवार म्हणाले.

मध्यावधी निवडणुकीला सज्ज आहोत!

उद्धव ठाकरे हे राज्यातील सत्तेतून बाहेर पडतील असे त्यांचे निवडणुकीनंतरचे वर्तन पाहता आपल्याला वाटत नाही असे पवार म्हणाले. पण जर ते सत्तेतून बाहेर पडलेच तर आम्ही मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज आहोत असेही पवार म्हणाले.


‘मुंबईत भाजपा-सेनेची युती व्हावी’

मुंबई महापालिकेत भाजपा व शिवसेनेची युती झाली पाहिजे. दोन्ही पक्षांनी मानापमान बाजूला सारून एकत्र आले पाहिजे व अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेतले पाहिजे. जागांचा आकडा लक्षात घेता पहिली संधी शिवसेनेला मिळायला हवी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेस्ट फूड’पासून बायोगॅस निर्मिती

$
0
0

ज्ञानेश्वर चव्हाण ‘वेस्ट फूड’पासून बायोगॅस तयार करतात.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पारंपारिक इंधनाचा वापर टाळून अपारंपारिक इंधनाचा वापर करून हॉटेलचालक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी चार वर्षांपूर्वी हॉटेलमधील शिल्लक अन्न व अन्य कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारला. प्रदूषणावर मात आणि पैशाची बचत करणारा हा प्रकल्प हॉटेल व्यावसायिकांसमोर आदर्श निर्माण करीत आहे.

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात पॉवरलूमशेजारी ज्ञानेश्वर चव्हाण यांचे श्री गणेश भोजनालय ही छोटीशी खानावळ आहे. कंपनीत काम करणारे कामगार त्यांच्या शिफ्टनुसार चव्हाण यांच्या भोजनालयात येतात. पाच-सात वर्षांपासून चव्हाण यांचे या परिसरात भोजनालय आहे. सुरुवातीच्या काळात चव्हाण स्पीन टॅक्स वॉटर टँक या कंपनीत कामाला होते. कंपनीत काम केल्यावर उरलेल्या वेळेत ते भोजनालयाचा कारभार सांभाळायचे. कंपनीत बायोगॅसच्या संयत्राची निर्मिती केली जात होती. चव्हाण यांना हे संयत्र आवडले, त्याचे महत्त्वही त्यांच्या लक्षात आले. कंपनीतून बाहेर पडणारा पहिलेच संयत्र त्यांनी खरेदी केले. चार वर्षांपूर्वी १५ हजार रुपयांत हे संयत्र मिळाल्याचे चव्हाण सांगतात. त्याची रचना साधी सोपी आहे. सिनटेक्सच्या दोन टाक्यांच्या माध्यमातून हे संयत्र तयार करण्यात आले आहे. मोठ्या व्यासाच्या टाकीत लहान व्यासाची टाकी बसवण्यात आली आहे. मोठ्या टाकीत रोज रात्री पाणी आणि वेस्ट फूड टाकले जाते. सकाळपर्यंत त्याचा बायोगॅस तयार होतो. गॅसने भरलेली दुसरी टाकी तरंगत वर येते. या टाकीपासून हॉटेलमधील किचनपर्यंत पाइप लाइन करण्यात आली आहे.

टाकीत तयार झालेला गॅस दिवसभर पुरतो. गॅस कमी होत जाताना तरंगणारी टाकी खाली-खाली जाते. रात्री दहापर्यंत संपूर्ण गॅस संपतो. त्यानंतर पुन्हा रात्रीतून गॅस तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

हॉटेलमध्ये अन्न मोठ्या प्रमाणावर वाया जाते. वाया जाणारे दिवसभरातील अन्न वेगवेगळ्या बादल्यांमध्ये जमा केले जाते. त्याशिवाय भांडी धुण्यासाठी वापरलेले पाणीही जमा केले जाते. गॅस निर्मितीसाठी वाया गेलेले अन्न व पाणी एकत्रितपणे मोठ्या टाकीत टाकले जाते.

खर्चात बचत अन् प्रदूषणावर मात

वेस्ट फूडपासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू केल्यापासून गॅस सिलिंडरचा वापर फारच कमी झाला. एकाच वर्षात प्लांट उभारणीसाठीचा खर्च वसूल झाला, असे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे प्रदूषणावर मात करता आली, खर्च आटोक्यात आला. वाया गेलेले अन्न रस्त्याच्या बाजूला टाकल्यामुळे दुर्गंधी निर्माण होत होती, बायोगॅसनिर्मितीमुळे दुर्गंधीही टळली, असे

ते सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिष्यवृत्ती’साठी चक्क भारतीय बैठक!

$
0
0

जटवाड्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा जमिनीवर बसून द्यावी लागली.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण विभागाच्या नियमानुसार परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी बाकांची व्यवस्था असावी. केंद्र देखील जवळ असावे, असा नियम आहे, मात्र रविवारी झालेल्या पाचवी आणि आठवीच्या पहिल्याच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून पेपर सोडवावा लागला. त्यामुळे उत्तरपत्रिका लिहिताना अवघडल्यासारखे झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली, तर आडवळणात दिलेले परीक्षा केंद्र शोधणे देखील अवघड झाल्याचे पालकांनी सांगितले.

गेल्यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा झाली नव्हती, मात्र शासनाने यंदापासून चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने नव्या नियमानुसार पाचवी आणि आठवीसाठी पहिली शिष्यवृत्ती परीक्षा आज औरंगाबाद जिल्ह्यातील ३३३ केंद्रांवर घेण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही परीक्षांसाठी ५३ हजार ६१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पाचवीसाठी ३० हजार ३०२, तर माध्यमिक म्हणजे आठवीसाठी २३ हजार ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधून प्राथमिकची परीक्षा १८३ परीक्षा केंद्रांवर, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीसाठी १५० केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ११ ते सायंकाळी ५पर्यंत अशा दोन सत्रात हे पेपर होते. ओव्हर जटवाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा ओव्हर जटवाडा आणि भारतमाता नगर बीड बायपास येथील स्व.शि वनारायण जैस्वाल प्राथमिक विद्यालयात विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत सुविधांचा अभाव होता. मुलांना पेपर सोडविण्यासाठी खाली बसवण्यात आले होते. शिवनारायण जैस्वाल शाळेकडे जाण्यासाठी नीट रस्ता नाही. बसायला बाक नाहीत. काही विद्यार्थी बाकांवर, तर काहींना त्यामुळे खाली बसून परीक्षा द्यावी लागली. जमिनीवर बसून लिहिताना अवघडल्यासारखे होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

वर्षभर तयारी करायची, परीक्षेसाठीचे शुल्क भरायचे, निमानुसार विद्यार्थ्यांना सुविधा असायला हव्यात. मुलांना खाली बसावे लागले. जटवाडा येथे केंद्रप्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत, असे पालकांनी सांगितले. परीक्षेसाठी केंद्रांना विशेष म्हणजे तीन ते चार हजार मानधन देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखाला आज माहेरी, पुन्हा परतायला सांगू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विडंबन, राजकीय कोट्या, गझलेचे प्रभावी सादरीकरण व हजरजबाबी निवेदनामुळे ‘काव्यधारा’ युवा कविसंमेलन रसिकांनी डोक्यावर घेतले. मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कविसंमेलनात नवोदित कवी आणि कवयित्रींनी आशयपूर्ण कवितांचे सादरीकरण केले. प्रत्येक कविता जगण्याशी थेट भिडत असल्यामुळे रसिकांच्या प्रतिसादाने अवघे सभागृह दणाणून गेले.

राजभाषा मराठी गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला कलारंग सांस्कृतिक मंचाने ‘काव्यधारा’ निमंत्रितांचे राज्यस्तरीय युवा कविसंमेलन घेतले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारी सायंकाळी कविसंमेलन रंगले. कविसंमेलनात आकाश कंकाळ (नाशिक), सुहासिनी देशमुख (परळी), यामिनी दळवी (मुंबई), बंडू अंधेरे (रायगड), रोहित देशमुख (अकलूज), नीलेश चव्हाण (औरंगाबाद), अविनाश भारती (अंबाजोगाई), सुरेखा काळे (जालना) व धम्मपाल जाधव (हिंगोली) या कवींनी सहभाग घेतला. जीवनाचा वेध घेणारी कविता सादर करीत कवींनी संमेलनात रंग भरले. प्रत्येक कवितेला निवेदनाच्या खुमासदार सूत्रात बांधत कवी नीलेश चव्हाण यांनी रसिकांची भरभरून दाद घेतली. कवयित्री सुहासिनी देशमुख यांनी ‘गावकुसाच्या हाका येती जीवन झाले ओझे गं, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊल वाजे दारी गं’ ही कविता सादर करीत रसिकांना अंतर्मुख केले. सुरेखा काळे यांची ‘मी एक सळसळती नागीण, माझ्या फुत्कारात भरली आहे भीती’ ही कविता सादर केली. तर धम्मपाल जाधव यांच्या ‘जिंदगीच्या गाण्यासाठी धुंदपणे जगण्यासाठी’ कवितेला रसिकांनी डोक्यावर घेतले. यामिनी दळवी यांनी गझल सादर केली. ‘सुखाला आज माहेरी, पुन्हा परतायला सांगू, ऋतुंना गायला सांगू, तिलाही यायला सांगू’ या गझलेतून तरूण रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. नीलेश चव्हाण यांची ‘चोर आणि विद्वान’ कविता पुस्तकांचे मोठेपण सांगून गेली. रोहीत देशमुख यांनी ‘कुणी बाप विकत घेतं का बाप’ या कवितेतून व्यथा मांडली. रसिकांच्या प्रतिसादाने संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.

दरम्यान, कविसंमेलनाचे उद‍््घाटन उद्यानपंडित दिलीप चव्हाण यांनी केले. यावेळी देवगिरी कॉलेजचे उपप्राचार्य रजनीकांत गरूड, अशोक काळे व प्रा. कृष्णा काळदाते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवीराज काळे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी नितीन इंगळे, ओंकार काशीद, गौतम निकाळजे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरीयत कायद्यामध्ये बदल नको

$
0
0

मेरी पहेचान शरीयत इस्लाम या परिषदेत रविवारी डॉ. अस्मा जोहर यांचे भाषण झाले.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तलाकवरून वाद निर्माण केला जात आहे. तो चुकीचा आहे. शरीयत कायद्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. शरीयतचा कायदा महिलांच्या सरंक्षणासाठी अाहे. त्यात केलेले बदल स्वीकारले जाणार नाहीत, असा ठराव शरीयत कॉन्फरन्समध्ये रविवारी मुस्लिम महिलांनी मंजूर केला.

‘मेरी पहेचान शरीयते इस्लाम’ या परिषदेचे रविवारी आमखास मैदानावर करण्यात आले. परिषदेसाठी शहर आणि जिल्ह्यांतून अनेक महिलांनी सहभाग नोंदविला. यावेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉच्या सदस्य डॉ. अस्मा जोहर यांच्यासह अन्य मान्यवर महिलांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. जोहर यांनी सांगितले की, इस्लाम धर्मानेच मुस्लिम महिलांना विशेष अधिकार प्रदान केले आहेत. तलाक या विषयाचा वाद सुरू झाल्यानंतर माहितीच्या अधिकाराचा वापर करून मुस्लिम बहुल भागातील तलाक देणाऱ्यांची माहिती मिळविण्यात आली. मुस्लिम समाजाची तलाक देणाऱ्यांमध्ये संख्या नगण्य आहे. याशिवाय मुस्लिम धर्मात न्याय निवाडा करणाऱ्या काजींकडून माहिती घेतली असता, कौटुंबिक वादानंतर महिलांनी आपला विशेष अधिकार वापरून खुला घेऊन विभक्त होण्याचे अधिक निर्णय घेतले आहे. यामुळे तलाकबाबत होत असलेली चर्चा ही योग्य नाही.

या परिषदेत काही ठराव घेण्यात आले. यामध्ये शरीयत कायद्यात कोणतयाही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, देशभरात दारूबंदी लागू करा, देशाचे ऐक्य, अखंडता कायम ठेवण्यासाठी व्यापक योजना आमलात आणा, देशातील कोणत्याही समाज किंवा धर्म यांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, त्यांच्यावर अन्याय होईल अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेऊ नका, देशात अश्लितेता चालना देणाऱ्या प्रथा बंद करा. सच्चर समितीच्या शिफारशीनुसार मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे यांचा समावेश आहे. यावेळी मुबशिरा फिरदौस, फहेमुन्नीस्सा, शाकेरा खानम, शाएस्ता कादरी, खलीदा अजीज, बीना अबरार, मारिया फातेमा सह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.


साधेपणाने विवाह करण्यासाठी चळवळ

लग्न कार्यात मोठा खर्च, हुंडा आणि समाजाला अशा कार्यातून स्वतःच्या ऐपत दाखविण्याचा प्रयत्न ही एक प्रथा बनली आहे. हा खर्च टाळण्यासाठी मुस्लिम समाजातील विविध संघटनांना सोबत घेऊन चळवळ उभारण्यात येणार आहे, अशी माहिती म‌ुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्या डॉ. अस्मा जोहर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'शरद पवार म्हणजे बिना चिपळ्यांचे नारदच'

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नांदेड

'शरद पवारांची बारामती म्हणजे भानामती आहे. माणसं फोडण्यात पवार अत्यंत कुशल आहेत. कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतात याची कुणकुण लागू देत नाहीत. नारदमुनीदेखील पवारांची बरोबरी करू शकत नाही. पवार म्हणजे बिना चिपळ्याचे नारदच आहेत', असं 'गुणगान' शरद पवारांच्याच 'सत्कार' सोहळ्यात गाऊन शेकापचे माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी एकच खळबळ उडवून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला नुकतीच ५० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त ठिकठिकाणी त्यांचे सत्कार सोहळे आयोजित केले जात आहेत. असाच एक कार्यक्रम रविवारी नांदेडमध्ये झाला. स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जाणारे ९५ वर्षीय माजी स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीला व्यासपीठावरच शरद पवारांचा मुका घेऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. पण त्यानंतर, कुठलीही भीडभाड न ठेवता ते पवारांवर तुटून पडले, तेव्हा सगळेच अवाक् होऊन गेले.

सत्कार समारंभात सत्कारमूर्तीवर कौतुकाचा वर्षाव केला जातो. पण, केशवराव धोंडगे यांनी पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीकेची झोड उठवली. पवारांची तुलना थेट कळीच्या नारदाशी केली. पवार कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतात याची कुणकुण लागू देत नाहीत. ते बिना चिपळ्यांचे नारदच आहेत, असा टोला त्यांनी हाणला. पवारांचे सख्खे भाऊ शेकापमध्ये होते; त्यांनाही पवारांनी बुडवले, असा थेट आरोप करून केशवरावांनी खळबळ उडवून दिली. आणीबाणीच्या काळात पवारांनी सत्ता सोडली असती, तर चित्र बदलले असते. पण पुन्हा सत्ता मिळण्याची खात्री नसल्याने पवार सत्तेला चिकटून बसले, अशी चपराकही केशवराव धोंडगे यांनी लगावली.

या सत्कार सोहळ्याआधी, नांदेड विद्यापीठातर्फे शरद पवारांना मानद डी लिट् पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यावरून त्यांनी टोमणा मारला. पवारांना एवढ्या डी लिट् पदव्या मिळतात, ते काय त्याचं लोणचं घालणार आहेत का?, असा सवाल धोंडगे यांनी केला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात रोज दोन शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सततची नापिकी व पावसाअभावी शेतीच्या होत असलेल्या अवस्थेला शेतकरी कंटाळला असून, वाढलेला कर्जाचा डोंगर व भविष्याच्या चिंतेमुळे वर्षाच्या प्रारंभीच दोन महिन्यांत मराठवाड्यातील ११७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
गेल्यावर्षी मराठवाड्यात १०५३ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले होते. यावर्षीही आत्महत्यांचे सत्र कायम असून, अवघ्या ५८ दिवसांमध्ये आत्महत्यांचा आकडा ११७पर्यंत पोचला आहे. यंदा झालेल्या आत्महत्यांपैकी ४६ आत्महत्यांना समितीने पात्र ठरवले असून, १३ प्रकरणांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. ५८ कुटुंब अद्यापही हक्काच्या मदतीची वाट पाहत आहेत. मराठवाड्यात जुलै महिन्यामध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड व त्यानंतर जोरदार पावसाने पिकांची नासाडी केली. यामुळे पेरण्यांसाठी झालेला खर्च, शेतीसाठी काढलेले कर्ज यामुळे त्रस्त झालेला शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे चित्र मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे. दोन महिन्यांत झालेल्या आत्महत्यांच्या प्रकरणांपैकी ४६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात आली आहे.

नांदेड, बीडमध्ये सर्वाधिक प्रकरण
नवीन वर्षात २७ फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यातील ११७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये यंदाही सर्वाधिक २३ प्रकरणे बीड जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यातही २२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. औरंगाबाद जिल्ह्यातील १८, जालना १४, परभणी ८ व हिंगोली प्रत्येकी ८, लातूर ५ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दप्तरी आहे.

जिल्हानिहाय प्रकरणे
जिल्हा............आत्महत्या.....चौकशी प्रलंबित
औरंगाबाद...........१८...............१०
जालना...............१४................१०
परभणी...............०८................०२
हिंगोली...............०८................०८
नांदेड..................२२................१७
बीड....................२३................०३
लातूर..................५.................०४
उस्मानाबाद.........१९................०४
एकूण.................११७..............५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आत्मवाणी-अमृतवाणी रंगली!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठी भाषा गौरवदिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘आत्मवाणी-अमृतवाणी’ या कार्यक्रमाने महोत्सवात रंगत आणली. मराठी भाषेच्या उगमापासून आजपर्यंतचा प्रवास या कार्यक्रमातून उलगडला. अभिनेते सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, उत्तरा केळकर, श्रीधर फडके, कमलाकर सातपुते, मीरा मोडक, मंगेश बोरगावकर, आर्या अंबेकर अशा नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीधर फडके यांच्या सुरेल आवाजातील ‘देवाचिया द्वारी उभा क्षण भरी’ या गीताने झाली. त्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यानंतर आर्या अंबेकरने ‘बोलावा विठ्ठल-पहावा विठ्ठल’ हे गीत सादर केले. मंगेश बोरगावकरने ‘विठ्ठल भक्तजन वत्सले’ तर श्रीधर फडके, आर्या अंबेकर आणि मंगेश बोरगावकर यांनी ‘ओंकार स्वरूपा’ हे गणपती स्तवन गात रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर उत्तरा केळकर यांनी ‘माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली’ हे गीत सादर केले. टाळ्यांची दाद देत रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमात मराठीतील उत्तमोत्तम कथा, कविता, नाटयप्रवेश, ललित लेखन, उत्तम कवितांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात अभिनेते सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, उत्तरा मोने, चिन्मय केळकर, कमलाकर सातपुते व मीरा मोडक सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंगमध्ये दुसऱ्याला प्राधान्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘जगाच्या पाठीवर आपल्या संस्कृतीनुसार दुसऱ्याला प्राधान्य देणारा एकच व्यवसाय उरला आहे आणि तो म्हणजे नर्सिंग’, अशा शब्दांत ‘नर्सिंग’चा गौरव करीत, आपली मराठी भाषा व संस्कृती जपण्याचा बहुमोल सल्लाही प्रख्यात अभिनेते मोहन आगाशे यांनी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मराठी दिनाचे औचित्य साधून दिला. निमित्त होते एमजीएमच्या ‘मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग’च्या शपथग्रहण सोहळ्याचे.
या प्रसंगी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. अजित श्रॉफ, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. बोरा, प्राचार्या डॉ. अनुराधा म्हस्के, प्राचार्या विद्यारानी यमनाम आदींची उपस्थिती होती. यानिमित्त एमजीएमच्या नर्सिंग कॉलेजचाही डॉ. आगाशे यांनी गौरव केला. ‘एखादा नवीन दवाखाना सुरू होणे नव्हे, तर बंद होणे ही आरोग्यदायी समाजाची ओळख आहे,’ असेही मत त्यांनी नोंदविले. याच कार्यक्रमात कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा लँप लायटिंग सोहळाही रंगला. प्रज्ज्वलित मेणबत्ती हातात घेऊन जीवनभर निष्काम सेवा करण्याची शपथही विद्यार्थ्यांनी या वेळी घेतली. या निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रा. प्रेरणा दळवी, प्रा. विश्वनाथ बिरादार, प्रा. सतीश भोईटे, प्रा. य कमलजित कौर, प्रा. दिपा खडके आदींनी पुढाकार घेतला.

माहितीपटाने वेधले लक्ष
कार्यक्रमात नर्सिंग कॉलेजच्या २० वर्षांच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकणारा माहितीपटही दाखविण्यात आला. आतापर्यंत या महाविद्यालयातून दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला असून, चिरंतर विकासासाठी बदलाची गरज असते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते बदल करू, अशी ग्वाही प्राचार्यांनी माहितीपटाद्वारे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक लाख ६२ हजार परीक्षार्थी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. औरंगाबाद विभागात यंदा परीक्षार्थींची संख्या २० हजाराने वाढली असून विभागातून १ लाख ६२ हजार ३३७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
परीक्षेसाठी मंडळात सोमवारी लगीनघाई सुरू होती. प्रश्नपत्रिका पाठविण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा आहे. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान ही परीक्षा होणार आहे. उत्तरपत्रिका फेरलेखन घोटाळा सारख्या प्रकरणांमुळे मागील परीक्षेत औरंगाबाद विभाग गाजला. त्यानंतर यंदा महसूल विभागाने कॉपीमुक्ती परीक्षेसाठी कंबर कसली आहे. यंदा प्रथमच परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात येणार आहे. त्यासह बैठे पथक, महसूलचे भरारी, मंडळाचे भरारी पथकही असणार आहे. विभागात अतिसंवेदनशील केंद्रांची संख्या ३५ च्या आसपास आहे. अशा केंद्रावर मंडळासह महसूल विभागाचे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभिमान यंदा कितपत यशस्वी ठरते हे काही दिवसात समोर येणार आहे.

लेखनिकाचे अधिकार केंद्रप्रमुखांनाही
अनेक परीक्षार्थी लेखनिकाची मागणी करतात. ऐनवेळी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचे अधिकार केंद्रप्रमुखांनाही असल्याचे मंडळातील अधिकारी सूत्रांनी सांगितले. शनिवारपर्यंत विभागातील २० विद्यार्थ्यांनी लेखनिकाची मागणी केली. त्यांच्या अर्जांची शहनिशा करत, त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले.

पर्यवेक्षकांच्या मोबाइल वापरावर बंदी
परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख वगळता इतरांना मोबाइल वापरता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना मंडळाने शाळा, कॉलेजांना दिलेल्या आहेत. परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकांही मोबाइल वापरता येणार नाही. यानंतरही पर्यवेक्षकांकडे मोबाइल आढळला तर केंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजनावरून आयुक्तांना घेरले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बकोरिया कार्यक्षम आयुक्त, पण नियोजन शून्य अधिकारी आहेत म्हणत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी आयुक्तांना घेरले. टीका जिव्हारी लागल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांसह बकोरिया सभात्यागासाठी तयार झाले. त्यामुळे संतापलेले नगरसेवक महापौरांच्या डायससमोर जमा झाले. या गोंधळामुळे महापौरांना अर्ध्यातासासाठी सभा तहकूब करावी लागली.
मालमत्ता कराच्या दरवाढीच्या प्रस्तावाबाबत आज महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झाली. कर वाढीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्यावर भाजप नगरसेवक राजू शिंदे यांनी मूळ विषयाला हात घातला. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट किती होते व प्रत्यक्षात आतापर्यंत वसुली किती झाली याचा खुलासा आयुक्तांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. आतापर्यंत झालेली वसुली समाधानकारक आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता विधाते यांनी मालमत्ता सर्वेक्षणाचे काय झाले, असा प्रश्न विचारला. भाजपचे राजगौरव वानखेडे, दिलीप थोरात यांनी करवाढीच्या प्रस्तावावर बोलताना करवाढीला विरोध असल्याचे स्पष्ट केले. एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी, नासेर सिद्दिकी, काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप यांनीही प्रस्तावाला विरोध केला. शिवसेनेचे नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी कर वसुलीच्या कामाची कुंडलीच मांडली. पालिकेच्या रेकॉर्डवर २ लाख ३ हजार मालमत्ता असताना फक्त ७० हजार मालमत्ताधारकांकडूनच आतापर्यंत कर वसूल केला. हेच मालमत्ताधारक नियमित कर भरतात आणि करवाढीचा बोजा त्यांच्यावरच पडणार आहे. शिवसेनेचा करवाढीला विरोध आहे, असे ते म्हणाले. राजू शिंदे यांनी पुन्हा वसुलीचे टार्गेट किती होते व प्रत्यक्षात वसुली किती झाली असा प्रश्न विचारला व आयुक्तांना समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान दिले. महापौर भगवान घडमोडे यांनीही समोरासमोर चर्चा करा अशी सूचना केली, पण आयुक्तांनी बजेटच्या पुस्तकात सगळे लिहिलेले आहे. सर्व नगरसेवकांच्या प्रश्नांचे एकत्रित उत्तर देऊ, असे महापौरांना सांगितले. त्यामुळे राजू शिंदे संतापले. ते म्हणाले, आयुक्त कार्यक्षम आहेत पण नियोजन शून्य अधिकारीही तेच आहेत. त्यांच्या नियोजन शून्यतेमुळे वसुलीचे प्रमाण घटले आहे. नियोजन शून्य अधिकारी हा शब्द ऐकल्यावर बकोरिया संतापले. असे शब्द वापरू नका, मी असे बोलणे ऐकून घेणार नाही, असे त्यांनी बजावले. त्यानंतर ते खुर्चीतून उठून उभे राहिले. अधिकाऱ्यांकडे हात करीत त्यांनी सर्वांना सभागृहाबाहेर जाण्याचा इशारा केला. आयुक्तांच्या पवित्र्यामुळे महापौर आक्रमक झाले. आयुक्त व अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, पिठासन अधिकारी मी आहे. माझ्या परवानगीशिवाय कुणी सभागृहाच्या बाहेर गेले तर ते सहन केले जाणार नाही. ‘नियोजन शून्य अधिकारी’ हा शब्द कामकाजातून काढून टाकण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. प्रशासन दुखवले जाईल असे शब्द नगरसेवकांनी वापरू नयेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

नगरसेवकांच्या भावना जाणून घ्या
शिवसेनेचे राजू वैद्य म्हणाले, ‘सदस्यांना असे का बोलावे लागते हे लक्षात घ्या. त्यांच्या भावना जाणून घ्या. वसुली होत नसल्यामुळे त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. नगरसेवकांनी केलेले आरोप आयुक्तांनी वैयक्तिक घेवू नयेत. मालमत्ता कराच्या डिमांड नोट नागरिकांना मिळालेल्या नाहीत. मग वसुली कशी होणार? ७५ कोटी रुपयांची वसुली आतापर्यंत झाली आहे. ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत नागरिकांनी स्वतःहून भरली. पालिकेचे त्यात काहीच कतृत्व नाही. वसुलीचे नियोजन नसल्यामुळे शहर खड्ड्यात चालले आहे. वसुली शिवाय पर्याय नाही. वसुलीवर लक्ष केंद्रित करा,’ असे ते आयुक्तांना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images