Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बारावीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

$
0
0



लातूर ः धनेगावच्या महादेव विद्यालयात बारावीच्या परीक्षेत राज्यशास्त्राचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. देवणीच्या गटशिक्षण अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर केंद्रप्रमुख आर. बी. कांबळे, पर्यवेक्षेक बी. एम. होनराव, सेवक सतीश बिराजदार आणि एका विद्यार्थिनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण संचालक गणपत मोरे यांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधी विद्यापीठात पहिल्या वर्षी बीए

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात सुरू होत असलेल्या विधी विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया देशपातळीवर होणाऱ्या ‘कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट’द्वारे (क्लॅट) प्रवेश प्रक्रियेतून केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव येत्या दोन दिवसांत तयार केला जाणार आहे. प्रथमवर्षी बीए एलएलबी हा अभ्यासक्रम सुरू होईल, अशी माहिती कुलगुरू प्रो. एस. सूर्यप्रकाश व उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून विधी विद्यापीठ सुरू होत आहे. सुरुवातीची दोन वर्षे या विद्यापीठाचे वर्ग शासकीय अध्यापक महाविद्यालयात भरतील. विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तयार आहे. बीएड कॉलेजमध्ये शनिवारी त्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारांना माहिती देण्यात आली. कुंटे यांनी सांगितले की, ‘तात्पुरत्या स्वरुपात बीएड कॉलेजमध्ये वर्ग सुरू होतील. त्याअनुशंगाने पुरेशी सुविधा येथे उपलब्ध आहे. त्यानंतर प्रस्तावित ठिकाणी उभारणीची प्रक्रिया सुरू होईल. विद्यापीठ उभारणीस शासन आवश्यक ती मदत करेल. यंदा ‘क्लॅट’ प्रक्रियेची जबाबदारी चाणक्य नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, पाटणा यांच्याकडे आहे. त्यासाठीचा प्रस्तावाची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करून हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.’

एकच अभ्यासक्रम
यंदा बीए एलएलबी (ऑनर्स) हा पाच वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. याची प्रवेश क्षमता ६० असणार आहे. आवश्यकतेनुसार भविष्यात इतर अभ्यासक्रम टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात करण्यात येणार आहेत.

‘जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू’
भोपाळ येथील नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी येथे कार्यरत असलेले प्रो. सूर्यप्रकाश कुलगुरुपदाचा पदभार १६ मार्चला स्वीकारणार आहेत. आपण विद्यापीठाला जागतिक दर्जाची कसे बनवता येईल, त्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देऊ, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​झेडपी अध्यक्षपदासाठी फिल्डिंग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी भाजप निवडणूक लढविणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जाहीर केले. त्यामुळे औरंगाबाद व जालन्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मोर्चेबांधणीला सोमवारपासून सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना आणि भाजप एकत्र येणार की नाही याची चर्चा होती. जर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला नाही, तर राज्यातील दहा महापालिका आणि २७ जिल्हा परिषदांमध्येही राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पण मुंबईच्या निर्णयानंतर आता दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्हा परिषदेत युतीची सत्ता स्थापन होऊ शकते. नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबादमध्ये दोन्ही पक्षांचे संख्याबळ कमी आहे. लातूरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुढचा आठवडा मोर्चेबांधणीचा असणार आहे.
यावेळी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली. जिल्हा परिषद निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश मिळाले. ६२ पैकी २२ जागांवर भाजपने यश मिळविले तर एक अपक्ष भाजप पुरस्कृत होता. केंद्र आणि राज्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या १८ जागा असून काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, तर मनसे, रिपाइ आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपकडून या प्रवर्गात चार महिला निवडून आल्या आहेत. त्यात आमखेडा (ता. सोयगाव) येथून पुष्पाताई काळे, अजिंठा (ता. सिल्लोड) सर्कलमधून सरला बनकर, गणोरी (ता. फुलंब्री) येथून अनुराधा चव्हाण तर शेंदूरवादा (ता. गंगापूर) येथून छाया अग्रवाल विजयी झाल्या.
सिल्लोडमध्ये काँग्रेसच्या गडाला भाजपने कधी नव्हे ते पहिल्यांदा जोरदार धक्का दिला. आठ पैकी चार गटांत विजय मिळविला. गंगापूरमध्येही आमदार प्रशांत बंब यांनी निकराची लढाई देत चार जागा निवडून आणल्या. खुलताबाद तालुक्यातील तीनही गटांमध्ये विजय मिळविला. फुलंब्री तालुक्यात भाजपने चार पैकी तीन जागा जिंकल्या.

दानवेंचा पेच
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यात विशेष लक्ष केंद्रित केले होते. एकूणच भविष्यातील राजकारणाचे डावपेच पाहत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आता अध्यक्षपदासाठी कोणत्या तालुक्याला पसंती द्यावयाची याचा पेच पडणार आहे. कारण अध्यक्षपदासाठी तीनही तालुक्यांचा प्रबळ दावा असेल. जालन्यातही भाजप सेनेपेक्षा पुढे असल्याने साहजिकच अध्यक्षपदासाठी भाजपचा दावा असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहरणाचा बनाव; मुलगी पोलिसांच्या ताब्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मध्यवस्तीतील एका शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने स्वतःचे अपहरण झाल्याचा फोन मुख्याध्यापिकांना केला. आग्रा येथे पळून गेल्यानंतर पाच लाखांची मागणीही केली. सदर मुलीस क्रांतिचौक पोलिसांनी आगरा येथून ताब्यात घेतले आहे.
शाळेतील प्रथम सत्रातील परीक्षेत नापास होण्याची भीती व घरचे कोणीही माझ्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नसल्याचे कारण पळून गेलेल्या मुलीने पोलिसांना सांगितले. ही मुलगी दहावीत शिकत असून, २७ फेब्रुवारी रोजी परीक्षेसाठी शाळेत आली होती. त्यानंतर ती स्वतःच दुपारी साडेबारा वाजता पळून गेली. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर जाऊन तिने एका महिलेचा फोन घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिकांना फोन केला. तुमच्या शाळेतील मुलीचे अपहरण केले असून पाच लाख रुपये द्या, असे सांगितले. त्यानंतर ही मुलगी २७ तारखेला सचखंड एक्स्प्रेसने आग्रा येथे गेली होती. मुलीच्या नातेवाइकांनी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. आग्रा येथील रेल्वेस्टेशनवरील वेटिंगरूममध्ये बसून एका महिलेचा फोन घेऊन तिने पुन्हा फोन केला. तेव्हा पोलिसांनी फोन ट्रेस केला, तेव्हा मुलगी आग्रा रेल्वेस्टेशनवर असल्याचे समजले. पोलिसांनी आरपीएफ पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली. त्यांनी या मुलीस ताब्यात घेतले. तीन मार्चला क्रांतिचौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गंभीरराव व पथकाने आग्रा येथे जाऊन मुलीस सुखरूप ताब्यात घेतले व शनिवारी शहरात घेऊन आले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त वसंत परदेशी, निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीमुक्ती नियमात अडकली !

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्त्रियांचा दैनंदिन जीवनातील वावर, मंगळसूत्र-कुंकू परंपरेबाबतचे नियम आणि विधवेच्या वागणुकीचे नियम एकीकडे शिकवले जातात. तर दुसरीकडे स्त्री सक्षमीकरणाचे ढोल बडवले जातात. या प्रकारात नवी पिढी संभ्रमात सापडली आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांनी केले. ‘स्त्री जीवनाचा इतिहास आणि वर्तमान’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
महिला दिनानिमित्त एमजीएम वृत्तपत्रविद्या महाविद्यालय आणि सक्षमा ग्रुपने लेखिका कविता महाजन यांचे ‘स्त्री जीवनाचा इतिहास आणि वर्तमान’ विषयावर एमजीएम कॅम्पसमधील आइन्स्टाइन सभागृहात शनिवारी दुपारी व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मंचावर अपर्णा कक्कड, प्राचार्य डॉ. रेखा शेळके व डॉ. प्राप्ती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचीन ते अर्वाचीन असा स्त्री जीवनाचा आढावा महाजन यांनी घेतला. ‘रुढी, संस्कृती, परंपरा या तीन स्त्रीलिंगी शब्दांनी विकासात खोडा घातला असे स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रिया म्हणतात. स्त्रीमुक्तीबाबत बोलणाऱ्या बायका आणि प्रत्यक्ष तळागाळातील बायका यांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य स्त्रियांना पडतो. स्त्रियांचा इतिहास सांगतानाही एक-दोन यशोगाथा सांगतात. कर्तृत्ववान स्त्रियांचे आयुष्य आणि आमचे आयुष्य-अडचणी वेगळ्या आहेत. या अडचणी नसल्यामुळे त्या कर्तृत्ववान झाल्या असा विचार सामान्य स्त्री करते. प्राचीन काळात मातृसत्ताक पद्धत असताना स्त्रियांनी औषधोपचार आणि व्यापाराचा शोध लावला. मात्र, पितृसत्ताक पद्धतीत स्त्रियांवर मालकी लादली. वरिष्ठ जातींचे नितीनियम कनिष्ठ जातींना स्वीकारावे लागले. आपल्या स्त्रिया आपल्याच मालकीच्या रहाव्यात म्हणून नियम केले गेले. सध्या स्त्रिया वेगाने बदलत असल्या तरी पुरुषांची मानसिकता बदलत नसल्याचे दिसते. स्त्री शिकलेली असावी, उत्तम गृहिणी असावी अशा अपेक्षा असतात. उलट पुरुषांनी आता गृहस्थ-सखा-सचिव होण्याची गरज आहे’ असे महाजन म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा शेळके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय शर्मिष्ठा भोसले यांनी करून दिला आणि अश्विनी दाशरथी यांनी सूत्रसंचालन केले.

स्त्री मुक्त आहे का ?
‘भारतात सती प्रथा बंद झाली असली तरी राजस्थानात अजूनही सतीमातेच्या मंदिरात यात्रा भरते. स्त्रियांनी कसे वागावे याचे नियम सांगणाऱ्या लाखो पुस्तिकांची विक्री होते. वडील, भाऊ, पतीच्या आज्ञेबाहेर जाऊ नका आणि निमूट रहा असे पुस्तिकेतून सांगितले जाते. कर्नाटकात ४८ हजार देवदासींना पेन्शन दिली जाते. एकट्या मुंबईत १० लाख वेश्या आहेत. ही परिस्थिती पाहिल्यानंतर स्त्रियांचे वर्तमान भयावह असल्याची जाणीव होते’ असे कविता महाजन म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकप्रतिधिनींनी संधीचे सोने करावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
नुकत्याच पार पडलेल्या सर्व निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी मताचा आशिर्वाद दिल्याने त्यांना लोकप्रतिनिधींनी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून या आशिर्वादासाठी कार्य करण्यास कटीबद्ध राहून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी संधीचे सोने करावे. आगामी लातूर मनपाच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकाविण्यासाठी या सर्व लोकप्रतिनिधींनी साथ द्यावी, अशी हाक पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांचा सत्कार व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून नागपूरचे आमदार अनिल सोले, खासदार सुनील गायकवाड, आमदार विनायक पाटील, आमदार सुधाकर भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, रमेश कराड, दिलीप देशमुख यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा विश्वास व जिद्द या बळावर ही लढाई जिंकता आली असून या विजयाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांनाच असल्याचे सांगून पालकमंत्री निलंगेकर यांनी निवडणुकीत मिळालेला विजय हा मतदारांचा विश्वास असून या विश्वासास पात्र राहण्याची जबाबदारी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची आहे. लोकप्रतिनिधी झालो म्हणून मोठे आहोत, असे न समजता लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मतदारांनी मताचा आशिर्वाद देवून लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवता येणाऱ्या जनहिताच्या व विकासाच्या योजना अधिक सक्षमपणे राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचविण्याचे कर्तव्य तुमचे आहे. या कर्तव्याचे भान ठेवूनच कोणत्याही चुकीच्या कामाला साथ न देता कोणाच्या सांगण्यावरुन चुकीचे काम ही करू नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्याची स्पर्धा मराठवाडयातील जिल्ह्यांशी नव्हती तर विदर्भातील जिल्ह्याशी होती असे सांगून पालकमंत्री निलंगेकरांनी ही स्पर्धा सर्वजण जिंकलो असून विदर्भाच्या तोडीस तोड निकाल जिल्हा भाजपने दिला असल्याने आता आगामी लातूर मनपाची निवडणूक जिंकून जिल्हा काँग्रेसमुक्त करावा असे आवाहन पालकमंत्री निलेगकरांनी केले.
ही निवडणूक जिंकण्यासाठी जिल्ह्यातील भाजपच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आतापासूनच कामाला लागून शहर भाजपला साथ द्यावी अशी हाक त्यांनी दिली. स्पर्धा सकारात्मक असावी मात्र, ही विकासाची ठरावी असे सांगून आगामी काळात जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत जास्तीत जास्त निधी प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री निलेगकरांनी यावेळी दिली.
नुकत्याच पार पडलेल्या मनपा व जिल्हा परिषदच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या कामावर शिक्कामोर्तब असल्याचे सांगून आमदार अनिल सोले यांनी हे यश मिळविण्यासाठी गेली अनेक वर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेले बलिदान नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी विसरु नये, असे आवाहन करुन हे यश टिकवुन ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यापासूनच लोकहितांसाठी काम करणे गरजेचे आहे. तुम्हाला मिळालेले यश हे कायम नसते. या यशाला कायम ठेवण्यासाठी लोकांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविणे तितकेच गरजेचे आहे. पंचायत टू पार्लमेंट शत-प्रतिशत भाजप हे पाहिलेले पंडित दिनदयाल उपाध्याय यांचे स्वप्न पूर्ण होत असून त्यांच्या स्वप्नानुसारच भाजपच्या लोकप्रतिनिधींनी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये भाजपला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या पालकमंत्री निलंगेकरांचा सत्कार जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे व शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी केला. व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अजित माने, मेघराज बाहेती, गुरुनाथ मगे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत डिगोळे, सूर्यकांत शिंदे, शैलेश गोजमगुंडे आदींनी केला.
या बैठकीचे सूत्रसंचलन गुरुनाथ मगे यांनी केले. या बैठकीला जिल्ह्यातील नगर पालिकेचे ५४, पंचायत समितीचे ७४ तर जिल्हा परिषदचे ३६ नवनिर्वाचित सदस्यांसह जिल्हा व शहर जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मनपात झिरो टू हिरो’
जिल्ह्यातील पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला उद्धवस्त करत भाजपने प्रथम क्रमांक प्राप्त केला. कार्यकर्ते व केंद्र, राज्य सरकारच्या विकासाच्या बळावर हे यश प्राप्त झालेले असून लातूर मनपाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसह पक्षाची सर्व ताकद शहरातील कार्यकर्त्यांना मिळणार असून याही निवडणुकीत भाजप प्रथम क्रमांक प्राप्त करत ‘झिरो टू हिरो’ होणार असे सांगून विरोधकांना दुहेरी आकडा सुद्धा गाठणे शक्य होणार नाही, असा आत्मविश्वास पालकमंत्री निलंगेकरांनी यावेळी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड झेडपी अध्यक्षपदासाठी मंगला सोळंके उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या राष्ट्रवाउी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून मंगला सोळंके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर सभागृहाचे गटनेते म्हणून बजरंग सोनवणे यांची निवड करण्यात आली. शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर या दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवसस्थानी बैठक पार पडली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सुरेश धस, माजी मंत्री प्रकाश सोळंके, अक्षय मुंदडा, जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद निवडणुकीत साठ पैकी सर्वाधिक २५ जागी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली होती. राष्ट्रवादी समर्थक अपक्ष एक सदस्य तर काँग्रेसचे तीन सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष मिळून आकडा २९ पर्यंत पोचतो आहे. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना दोन सदस्यांची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील महिलासाठी राखीव आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत माजलगाव मतदारसंघावर माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा वरचष्मा सिद्ध केला आहे. माजलगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अकरा पैकी नऊ सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर प्रकाश सोळंके यांचा दावा होता. त्यांची पत्नी मंगला सोळंके या गंगामसला गटातून विजयी झाल्या. त्यामुळे अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय माजी सभापती बजरंग सोनवणे आणि त्यांच्या पत्नी दोघेही जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. त्यामुळे सभागृह गटनेता म्हणून बजरंग सोनवणे यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ कोटी सरकारजमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नोटबंदीच्या काळात बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड जमा करणाऱ्या खात्यांचे केंद्रीय पातळीवर प्राप्तिकर खात्याकडून स्कॅनिंग सुरू होते. मराठवाड्यातील अशा खात्यांची माहिती औरंगाबादमधील प्राप्तिकर विभागाला गेल्या आठवड्यात मिळाली. त्यावरून विभागाने मराठवाड्यात चार दिवसांत १७ ठिकाणी छापे मारले आणि ८ कोटी रुपयांच्या रकमेचे स्पष्टीकरण मिळू शकले नाही. त्यानंतर औरंगाबादमधील कोचिंग क्लासच्या खात्यांची तपासणी करून ५ कोटी रुपयांची रक्कम बेहिशेबी आढळून आली. यासंदर्भात काहीच स्पष्टीकरण न मिळाल्याने हे १३ कोटी रुपये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत जमा करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी जाहीर केली. ५०० व १००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांकडे जमा असलेल्या नोटा बँकांमध्ये भरण्याची मुभा दिली होती. डिसेंबर अखेरपर्यंतच्या मुदतीत ज्या बँक खात्यांमध्ये मोठ्या रकमा झाल्या त्यावर प्राप्तिकर खात्याची नजर होती. ही माहिती संकलित करून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधून जिथे मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा केली गेली त्या खात्यांची चौकशी आता सुरू झाली आहे. प्राप्तिकर खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील बड्या खात्यांची यादी प्राप्त झाली असून गेल्या चार दिवसांत औरंगाबाद, बीड, लातूर आणि जालना जिल्ह्यात १७ ठिकाणी छापे मारले. त्यात ८ कोटी रुपये जमा केलेल्या खातेदारांची चौकशी करून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले गेले. मात्र संबंधित खातेदारांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत जमा करून घेण्यात आली. गेल्या चार दिवसांत प्राप्तिकर विभागाने औरंगाबाद मध्ये ६, जालना २, वैजापूर २, बीड २, लातूरमध्ये ३ ठिकाणी छापे मारले.

दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद शहरातील कोचिंग क्लासच्या खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ३ कोचिंग क्लासच्या खात्यांत नोटबंदीच्या काळात ५ कोटी रुपये भरले गेले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता संबंधितांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे हे ५ कोटी रुपयेही गरीब कल्याण योजनेत जमा केले गेले. त्यामुळे मराठवाड्यात नोटबंदीनंतर जमा केलेले बेहिशेबी १३ कोटी रुपये सरकारजमा झाले आहेत. ज्या खातेदारांनी अशा प्रकारची रक्कम जमा केली असेल त्यांनी पुढची कारवाई टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत ही रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हरे राम हरे कृष्ण’चा शहरात गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात ‘हरे राम हरे कृष्ण’ या गजरात इस्कॉनची रथयात्रा उत्साहात निघाली. इस्कॉनने रविवारी संस्थान गणपती मंदिर ते खडकेश्वर मैदान दरम्यान रथयात्रा काढली. हजारो भाविकांनी रथयात्रेत सहभागी होत उत्साव वाढवला.
आंतरराष्ट्रीय कृष्णभवनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने आयोजित जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाला खासदार चंद्रकांत खैरे व आमदार अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, नंदकुमार घोडले, मकरंद कुलकर्णी, डॉ. भागवत कराड, विकास कुलकर्णी, दिलीप थोरात, इस्कॉनचे अध्यक्ष डॉ. रोहिणी प्रिया प्रभू, डॉ. जयहनुमान प्रभू, डॉ. प्रेमप्रद प्रभू आदी उपस्थित होते. ‘हरे कृष्ण हरे राम’ या जयघोषाने रथयात्रेचा परिसर चैतन्यमय झाला. मान्यवरांनी हातात झाडू घेत स्वच्छतेचा संदेश दिला व रथयात्रेचा मार्ग स्वच्छ केला. भाविकांनी रथ ओढून रथ मार्गस्थ केला. टाळ - मृदंगाच्या गजरात भजन करीत भाविकांनी परिसर दणाणून सोडला. रांगोळी, फुलांची आरास आणि भगव्या पताका यांनी रथयात्रेची शोभा वाढवली. ठिकठिकाणी भाविकांनी भगवंताची पूजा केली. रथयात्रेत शहरातील उद्योजक, व्यावसायिक, गृहिणी व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपास्थिती होती. संस्थान गणपती येथून निघालेल्या रथयात्रेचा खडकेश्वर मंदिर मैदानावर समारोप झाला. या ठिकाणी लहान मुलांनी कथा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४६०० रुपये मानधन सफाई कामगारांना द्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान चार हजार सहाशे रुपये मानधन देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले.
पोलिस मुख्यालय ग्रामीण अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून १२ कामगार तुटपुंज्या वेतनावर कार्यरत होते. त्यामुळे सांडु उकरडे, यशोदाबाई राठोड, शेख महेमुद, रमेश साळवे, मनोहर पाटील, राहुल चंदनशिवे, सिद्धार्थ सातदिवे, शशिकला मिसाळ, कैलास कांबळे, संतोष कांबळे, कांतीलाल देवकर, लक्ष्मण वाघ या कर्मचाऱ्यांनी मानधन वाढवून मिळण्यासाठी प्रशासकीय न्यायधिकरणात धाव घेतली. गेल्या दोन वर्षापासून केवळ बाराशे रुपये प्रतिमहा तुटपुंजे वेतनावर काम करावे लागत असल्याने मानधन वाढवण्याची विनंती करण्यात आली. किमान चार हजार सहाशे रुपये वेतन देण्याचा शासनाचा निर्णय असतानाही याचिकाकर्त्यांना तुटपुंजे वेतन दिले जात असल्याचे न्यायधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सुनावणीनंतर याचिका मंजूर करुन शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे किमान ४,६०० रुपये वेतन देण्याचे आदेश न्यायधिकरणाने दिले. याचिकाकर्त्यांतर्फे आनंदसिंह बायस यांनी तर शासनातर्फे पी. आर. भारस्वाडकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर काँग्रेसमध्ये स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

महापालिकेप्रमाणेच काँग्रेस पक्षातही स्वच्छता मोहीम राबवविली जात आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच लातूर महापालिकेत पुन्हा सत्तेवर येऊन स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करेल असा ठाम विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

लातूरच्या पूर्व भागातील विविध विकास कामांची सुरुवात व लोकापर्ण सोहळा रत्नापूर चौकात शनिवारी रात्री पार पडला. यामध्ये व्यायामशाळा व क्रीडांगण विकसीतकरण, गणेशोत्सव २०१६ पुरस्कारांचे वितरण, कै. राचप्पा हत्ते मार्ग नामकरण, सार्वजनिक पाणपोईचे भूमिपूजन, नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कार वितरण व महापालिकाच्यावतीने निर्मित स्वच्छता अभियान गीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी आमदार अमित देशमुख बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अॅड. दीपक सुळ, उपमहापौर चांदपाशा घावटी, आयुक्त रमेश पवार, माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे, गटनेते रविशंकर जाधव, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, अॅड. समद पटेल, माजी महापौर कैलास कांबळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, पूजा पंचाक्षरी, केशरताई महापुरे, मीना सूर्यवंशी, कल्पना भोसले, राम बोरगावकर, सपना किसवे, सुनीता चाळक, यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले, ‘लातूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापौर आणि आयुक्त रमेश पवार स्वच्छता अभियान राबवित आहेत. योगा-योगाने याचवेळी मी ही काँग्रेस पक्षात स्वच्छता मोहीम राबवत आहे. आता येथे निभाव लागणार नाही म्हणून काहीजण पक्षांतर करीत आहेत. परंतु, आशा संधीसाधुना जनता कदापी स्वीकारणार नाही, याची मला खात्री आहे. लातूर शहराच्या विकासासाठी स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार पक्षांकडून दिले जाणार आहेत. ज्या नगरसेवकांनी चांगले काम केले आहे. त्यासर्वांना पुन्हा पक्षाकडून उमेदवारी मिळणार आहे. त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. ज्यांचे काम चांगले नाही आणि पक्षांकडून उमेदवारी मिळणार नाही याची खात्री आहे. ती मंडळी इकडून-तिकडे गेली आहेत. त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. पक्षाचे लोक जिद्दीने निवडणूक लढणार आहेत. जनतेचाही भरघोस प्रतिसाद त्यांना मिळणार आहे.’

यावर्षीपासून लातूर महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेला पहिला नटवर्य श्रीराम गोजमगुंडे कलारत्न पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे यांना देण्यात आला. शरीर सौष्ठव स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मंगेश सोनकांबळे, व्दितीय सुमित शिंदे व तृतिय सुनिल पवार यांचाही सत्कार आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

लातूर महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वच्छता गीत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गीत लातूरचेच कलाकार शैलेश लोखंडे यांनी गीताची शब्दरचना व संगीत दिले आहे. तर गायक मंगेश बोरगावकर यांनी हे गीत गायले आहे. या स्वच्छता गीताच्या सिडीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रस्ताविकात स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.

पक्षांतर करणारे एक दिवसाचे नवरदेव

पक्षांतर करणारे हे एक दिवसाचे नवरदेव असतात. ज्याप्रमाणे नवरदेवाचे कौतूक एका दिवसासाठी होते तसेच पक्ष बदलणाऱ्यांना एक दिवसासाठी महत्व असते. त्यानंतर जनताही आशांना विसरुन जाते. काँग्रेस पक्ष नेहमीच काम करणाऱ्यांच्या पाठी मागे उभा राहिला आहे, असे मत उपमहापौर चांदपाशा घावटी यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर टीका करताना व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात शांततेसाठी इज्तेमात प्रार्थना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात शांतता व सुख नांदो, पीडितांचे दुःख अल्लाहच्या कृपेने दूर होवो, अशी विशेष प्रार्थना मौलाना मंजूर साहब यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या विशेष प्रार्थनेनंतर दोन दिवसाच्या जिल्हास्तरीय इज्तेमाचा रविवारी समारोप झाला. या विशेष प्रार्थनेला दोन लाख भाविकांची उपस्थिती होती.
औरंगाबाद-नगर रोडवरील लिंबेजळगाव (ता. गंगापूर) येथे शनिवारपासून जिल्हास्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कन्नड, पैठण, खुलताबाद, सिल्लोड, वैजापूर, गंगापूरसह जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इज्तेमाची तयारी तीन महिन्यांपासून तयारी सुरू होती. दीडशे एकरमधील भव्य मंडपात भाविकांची व्यवस्था करण्यात आली. ठिकठिकाणच्या मशिदीतर्फे जेवणासाठी व्यवस्‍था करण्यात आली.
इज्तेमात रविवारी देशभरातून आलेल्या मौलवींनी प्रवचन दिले. सकाळी डॉक्टर, वकील यांच्यासाठी विशेष सत्र होते. त्यात मौलाना मुबीन, मुफ्ती उस्मान, मौलाना शोएब मामुरा यांनी उपदेश केला. या इज्तेमात शंभरावर जोडप्यांचा सामूहिक विवाह करण्यात आला. रात्री साडेआठला ‌तब्लिगी जमातचे महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना मंजूर साहब यांच्या नेतृत्वात विशेष प्रार्थना करण्यात आली.

वाहतूकीसाठी चौकाचौकात स्वयंसेवक
लिंबेजळगाव इज्तेमामध्ये जात असताना, तसेच इज्तेमा संपवून लाखो लोक परत येत असताना, चौकाचौकात स्वयंसेवक उप‌स्थितीत होते. चौकाचौकात हे स्वयंसेवक उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करित होते. याशिवाय विविध भागातून इज्तेमाला येण्यासाठी वेगळा मार्ग देण्यात आला होता. यामुळे वाहतूक व्यवस्‍थाही होती.

वाहतूक नियोजन
कायगाव टोकापासून टोल नाक्यापर्यंत, टोल नाक्यापासून बडवे इंजिनीअरिंगपर्यंत दुपारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. इज्तेमा संपल्यानंतर आधी पादचारांना सोडण्यात आले. त्यानंतर दुचाकी, तीनचारी, चारचाकी, अवजड वाहने, या क्रमाने वाहने सोडण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करता आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट विकण्याचा सिडकोचा प्रयत्न फसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन-२ महाजन कॉलनी येथील न्यू विकास मेन्टेनन्स सहकारी गृहनिर्माण संस्थेतील ४९९.२ चौरस मीटर (सुमारे ५००० चौैरस फुट) क्षेत्रफळाची चिल्ड्रन पार्कसाठी राखीव असलेली जागा प्लॉट करून विकण्याचा सिडको प्रशासनाचा प्रयत्न मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशामुळे फसला आहे.
मुंबई हायकोर्टाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. कालिदास वडणे यांनी संबंधित प्लॉटच्या वापरात बदल करावयाचा झाल्यास सोसायटीच्या सभासदांना विश्वासात घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे निर्देश दिले आहेत. सोसायटीने रितसर पद्धतीने सिडकोकडे यासंबंधी हरकत नोंदवावी असेही निर्देश कोर्टाने दिले आहेत.
सिडको एन-२ येथील महाजन कॉलनीमधील ले-आउटला सिडकोने मान्यता प्रदान केली होती. या ले-आउटमध्ये १७५० चौरस फुट जागा चिल्ड्रन पार्कसाठी राखून ठेवण्यात आली होती. यासंबंधी सिडकोने अवार्ड १९९० मध्ये पारीत केला होता. संबंधित पार्कसाठी सोडलेल्या जागेच्या बाजूला थोडी जागा शिल्लक होती. त्यामुळे पूर्वीच्या आणि सिडकोने नव्याने मोजलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ५००० चौरस फुट इतके झाले. सिडकोने संबंधित जागेला मार्किंग करून त्यास स्वतंत्र प्लॉटच्या रूपाने विक्री करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविला होता. एपीआय कॉर्नरच्या शेजारी जालना रस्त्याला लागून असलेल्या जागेचे बाजारमूल्य मोठे आहे. महामार्गाला असलेल्या फ्लॉटपासून मोठी किंमत सिडकोला अपेक्षित होती. सिडकोचा प्लॉट विक्रीचा प्रयत्न सोसायटी सभासदांच्या लक्षात येताच त्यांनी आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. प्राथमिक सुनावणीत संबंधित प्लॉटच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामास खंडपीठाने स्थगिती दिली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत प्लॉट संमती अवार्डद्वारे चिल्ड्रन पार्कसाठी राखून ठेवल्याचा युक्तिवाद करण्यात आला. खंडपीठाने संबंधित प्लॉटसंबंधी कुटलाही निर्णय घ्यावयाचा झाल्यास सोसायटी सभासदांना विश्वासात घ्यावे, असे आदेश दिले. सभासदांची बाजू अतुल कराड यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींवर कारवाई, चारचाकींना अभय

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद शहरातील ट्रॅफिकला शिस्त लागावी म्हणून पहिल्या टप्प्यात वाहतूक पोलिसांनी दुचाकी वाहनांना लक्ष्य करीत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यावर कोठेही बिनदिक्कतपणे वाहने उभी करून प्रशासनाला आव्हान देत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांना वाहतूक पोलिस अभय देत असल्याची तक्रार सर्वसामान्य नागरिकांची आहे.
फेब्रुवारी महिन्यात १ हजार ९१० दुचाकी वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून दोन लाखांहून अधिक दंड वसूल केला. यामध्ये दुचाकीवर ट्रिपल सीट ये-जा करणाऱ्या ३९३ वाहनांवरील कारवाईत ३९ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दुचाकीवर फॅन्सी नंबरचा वापर करणाऱ्या २४० जणांवर कारवाई करीत २५ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
उस्मानाबादच्या वाहतूक विभागाकडून करण्यात येत असलेल्या या दंडात्मक कारवाईचे व वाहतुकीला शिस्त लावण्याचे येथील सूज्ञ नागरिक कौतुक करीत आहेत. दुसरीकडे चारचाकी वाहनांना वाहतूक पोलिस अभय देत असल्याची तक्रार आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था, वाढलेली वाहने, वाहतूक नियमांचा भंग करणारे वाहनचालक, सिग्नलवर न थांबणे, दुचाकीवर तीन जणांचा प्रवास, रिक्षातून होणारे अवैध प्रवासी वाहतूक यामध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई व्हावी या हेतूने जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देशमुख, अप्पर जिल्हा पोलिसप्रमुख दीपाली घाडगे यांनी पहिल्या टप्प्यात दुचाकीवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
शहरात दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांच्या ट्रॅफिकला शिस्त लागावी यासाठी सहायक वाहतूक निरीक्षक प्रशांत पाटील व त्यांचे कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत असले तरी नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची वाहतूक शाखेची तक्रार आहे.
शहरातील सिग्नल व्यवस्था नियमितपणे सुस्थितीत कार्यान्वित ठेवणे, पार्किंग झोन उभारणे, नो पार्किंग झोनचे फलक लावणे ही जबाबदारी व कामे नगरपालिकेची असताना नगरपालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय शहरातील सिग्नलसमोरील झेब्रा क्रॉसिंग पट्टे पुसट झाल्यामुळे त्या पट्ट्यांचे महत्त्वच राहिले नाही. त्यामुळे वाहनचालकांकडून येथे नियमांचे उल्लंघनही होते. वाहतूक पोलिसांसमोर हा प्रकार चाललेला असतो. पण वाहतूक त्यांच्याकडून अशा वाहनचालकांवर कोणतीही कारवाई होत नाही किंवा वाहनचालकांना मार्गदर्शनही केले जात नाही. त्यामुळे सिग्नल पॉइंटवरील झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या या पादचाऱ्यांसाठी सुविधा बनण्याऐवजी नाममात्र राहिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

पादचाऱ्यांसाठी सिग्नलमध्ये दिवा नाही
पादचारी महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी सिग्नल असलेल्या चौकातून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडताना दिसतात. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल यंत्रणेत व्यवस्था असायला हवी. मात्र, पादचाऱ्यांच्या या रास्त मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव
उस्मानाबाद शहरातील विविध भागांतील बाजारपेठेला व शॉपिंग कॉम्प्लेक्सला सध्या चारचाकींनी घेरले आहे. चारचाकींसाठी पार्किंगचे कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे चारचाकी वाहनांद्वारे पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणारे वाहनचालक जिथे जागा मिळेल तेथे वाहतुकीवर होणाऱ्या परिणामाचा विचार न करता मनमानीपणे वाहने उभी करून गैरवर्तन करताना दिसतात.

चारचाकी वाहनावरील कारवाईबाबत नियोजन चालू आहे. यासाठी आरटीओ कार्यालयाशी संपर्क सुरू आहे. नगरपालिकेशी सुसंवाद साधला जात आहे. कारवाई करीत असताना त्यांना सुविधा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे.
प्रशांत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक (वाहतूक).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभागीय आयुक्तांसमोर तक्रारींचा पाढा

$
0
0

विभागीय आयुक्तांसमोर तक्रारींचा पाढा
अनियोजित भेटीत खेळाडू, नागरिकांशी संवाद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विभागीय क्रीडा संकुलातील सुविधांबाबत खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक व पालकांच्या तक्रारी वाढल्याने विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी रविवारी (५ मार्च) सकाळी अचानक भेट देऊन संकुलाची पाहणी केली. संकुलातील दुरवस्था दूर करण्यासाठी दुरूस्तीसंबंधीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
विभागीय आयुक्त भापकर हे विभागीय क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून विभागीय क्रीडा संकुलातील सुविधांबाबत तक्रारी वाढतच चालल्या होत्या. संकुल परिसरातील अस्वच्छता, अॅथलेटिक ट्रॅकची दुरावस्था, उखडलेले बॅडमिंटन कोर्ट, स्वच्छतागृहांची अवस्था पाहून विभागीय आयुक्त भापकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या भेटीत भापकर यांच्याशी खेळाडू, पालक, संघटक, ज्येष्ठ नागरिक यांनी संवाद साधला. त्यांनी आयुक्तांसमोर संकुलातील सुविधांबाबतच्या अडचणींचा पाढाच वाचला. या अडचणी भापकर यांनी सविस्तर समजावून घेतल्या. त्यानंतर आठ दिवसांत अडचणी, तक्रारीसंदर्भात काय उपाययोजना करता येऊ शकतात, त्याबाबत अहवाल सादर करण्याचा आदेश त्यांनी यावेळी दिला. तीन टप्प्यांमध्ये विभागीय संकुलाचा चेहरामोहरा बदलून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात जी कामे सहजपणे करता येऊ शकतात, ती कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात संकुल समितीकडे असलेल्या निधीतून करता येण्याजोग्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात शासनाकडून निधी मिळवून अन्य कामे करण्यात येईल, असे भापकर यांनी स्पष्ट केले.
विभागीय आयुक्त भापकर यांनी संपूर्ण संकुल परिसराची पाहणी केली. स्टेडियमच्या मागील बाजूस असलेला कचरा, मातीची ढिगारे, दारूच्या बाटल्या आदींची साफसफाई त्वरित करण्याचे आदेश त्यांनी क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांना दिले. या पाहणीच्यावेळी क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड हे उपस्थित नव्हते. ते आजारी रजेवर असल्याचे समजले. या भेटीत संकुल खेळाडू, नागरिकांनी आपल्या सर्व सूचना लेखी स्वरूपात क्रीडा अधिकाऱ्यांकडे जमा करण्याची सूचनाही भापकर यांनी केली. सूचनांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करावा, असेही त्यांनी सूचवले. पुढील काही दिवसांत भापकर पुन्हा संकुलाला भेट देणार असल्याचे समजते.

भेटीतील महत्त्वाचे निर्णय
- क्रीडा संकुलातील समस्यांवरील उपाययोजनांबाबत आठ दिवसांत अहवाल देण्याची सूचना.
- क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये प्रयत्न करणार.
- खेळाडू, नागरिकांच्या समस्यांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्याची सूचना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादकरांवर पाणीबाणीचे संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जायकवाडी धरणापासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने घेतले जाणार असून, त्यामुळेच मंगळवारी सकाळी आठपासून तब्बल २४ ते ३६ तासांपर्यंत शहरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे. जलवाहिनींच्या दुरुस्तीनंतर शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पालिकेने स्पष्ट केले असले, तरी मंगळवारी व बुधवारी शहरवासीयांचे पाण्याविना हाल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही मुख्य जलवाहिन्या जुन्या झाल्या असून, जलवाहिन्यांमधून तब्बल ३५ ठिकाणी गळती होत आहे. त्यामुळेच १४०० एमएम व ७०० एमएम व्यासाच्या जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी लागणार आहे. बहुतांश एअर वॉल, जॉइंटमधून गळती होत आहे. परिणामी, दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिला नसल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी स्पष्ट केले असले, तरी या कामासाठी किमान ३६ तास लागू शकतात, असेही सूत्रांनी सांगितले.
या काळात पाणीपुरवठा बंद राहणार आहेच; शिवाय पालिकेच्या टँकरद्वारेही शहरात पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसल्याचेही पालिकेने म्हटले आहे. धरणातून १५० ते १६० एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाण्याचा उपसा केला जातो, परंतु ठिकठिकाणच्या गळतींमुळे केवळ ११० ते ११५ एमएलडी पाण्याचा शहराला पुरवठा होत आहे, असेही सूत्रांनी सांगितले. एकूणच शहरवासीयांना मंगळवारपासून गुरुवारपर्यंत पाणी टंचाई जाणवणार असल्याची चिन्हे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१८ खातेदारांकडून ९ कोटींची वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काळ्या पैशाविरोधातील मोहिमेत प्राप्तिकर विभागाने १८ बँक खातेदारांकडून सुमारे ९ कोटींचा प्राप्तिकर वसूल केला आहे. ही वसुली ‘सर्व्हे’ आणि ‘सर्च’ या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती प्र‌ाप्तिकर विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
नोटबंदीनंतर शहरातील १८ बँक खात्यांत मोठ्या प्रमामात रक्कम जमा करण्यात आली होती. हे १८ खातेदार या पैशाचा हिशेब देण्यास असमर्थ ठरले. त्या खात्यांवर नोटबंदीनंतर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. ‘सोर्स ऑफ इन्कम दाखवा,’ असे वारंवार सांगण्यात आले. त्यानंतरही त्यांनी पैशाचा स्त्रोत सांगितला नाही. त्यामुळे या सर्व खातेदारांना ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’त पैसे भरण्याचे सुचवण्यात आले. या खातेदारांकडून ९ कोटी रुपये प्राप्तिकर वसूल करण्यात आला आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
नोटबंदीच्या काळात बचत खात्यात अडीच लाख रुपये आणि चालू खात्यात १२ लाख रुपये जमा केल्यामुळे अनेक खात्यांवर संशय निर्माण झाला होता. या बँक खातेदारांची यादीही करण्यात आली आहे. यामुळे संशयित खातेदारांवर पहिल्या टप्प्यातील कारवाई शनिवारी संपवण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

आयटीचे आवाहन
दरम्यान, अद्याप संपत्ती जाहीर केलेली नाही, बेहिशेबी संपत्ती बाळगली आहे, अशा नागरिकांनी ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजने’चा (पीएमजीकेवाय) लाभ उचलत ३१ मार्चपर्यंत संपत्ती जाहीर करावी, असे आवाहन प्रा‌प्तिकर विभागाने केले आहे. या योजनेंतर्गत काही सुटही दिली जाणार आहे. त्याचाही फायदा घेता येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ती..., तिची बाइकवारी..., अन् तिचा रस्ता...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बाइक, बुलेट, स्कुटर महिला रोज चालवत असतात, पण रविवारी खास ‘जागतिक महिला दिना’निमित्त नारी शक्तीचा जागर करण्यासाठी डोईवर भगवे फेटे बांधून रविवारी बाइक रॅलीत सामील झाल्या. निमित्त होते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑल वुमन बाइक रॅली’चे. जीन्स-टी शर्ट, सलवार कुर्ता, पैठणी, नऊवारी साड्या अशा रंगीबेरंगी पेहरावतील नारीशक्तीने बाइक रॅलीत सर्वांचे लक्ष वेधले.
जागतिक महिला दिन आठ मार्चला साजरा केला जातो. त्यानिमित्त रविवारी महाराष्ट्र टाइम्सने या ‘ऑल वुमन बाइक रॅली’चे आयोजन केले होते. ‘मटा’च्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत सर्वच वयोगटातील महिलांनी ही रॅली यशस्वी केली. बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी सकाळी साडेसहापासून महिला आणि तरुणी दुचाक्या घेऊन क्रांतिचौकातील हॉटेल मॅनोरच्या लॉन गाठत होत्या. बाइकची किक मारण्यापूर्वी तब्बल अर्धा तास महिलांनी नाव नोंदणी, एकत्रिकरण करत जल्लोष केला. त्यानंतर साडेआठच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी रॅलीला झेंडा दाखवला. तिथून पुढे तब्बल पाऊण तास शहरातल्या मुख्य रस्त्यांवर बाइकवरून राइड मारत महिलांनी औरंगाबादकरांचे लक्ष वेधून घेतले.
पारंपरिक वेशभूषेतील महिला लक्ष वेधून घेत होत्या. साडेआठच्या सुमारास मॅनोर हॉटेलच्या लॉनवरून रॅलीला सुरुवात झाली. संकल्पनांवर आधारित पेहराव करत ‘लेक वाचवा’, ‘महिला सुरक्षितता’ या विषयी संदेशही देण्यात आले. संपूर्ण रॅलीच्या मार्गावर महिलांनी एकच जल्लोष केला. ‘मटा रॅली’चे झेंडे फडकावत व ठिकठिकाणी हॉर्नचा आवाज करत ‘महिलाराज’चा माहोल निर्माण केला. गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूल या उपक्रमाचे प्रायोजक, तर इंडियन ऑइल सहप्रायोजक होते. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव वंदना वाहूळ, शासकीय कला महाविद्यालयाच्या प्राचार्य कुमुद गोरे-खेडेकर, ‌मिलिंद कॉलेजच्या प्राचार्या वैशाली प्रधान, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या अलकनंदा दोडके, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक धनंजय लांबे, वरिष्ठ सहसंपादक प्रमोद माने यांची उपस्थिती होती. ‌निकिता मांजरमकर यांनी सूत्रसंचालन केले.

असा होता मार्ग
ऑल वुमन बाइक रॅलीला हॉटेल मॅनोर येथून सकाळी साडेआठ वाजता सुरुवात झाली. क्रांती चौक - उस्मानपुरा स्वेअर - बन्सीलालनगरमार्गे रेल्वे स्टेशन चौक ते आरटीओ कार्यालयासमोरून बाबा पेट्रोल पंपमार्गे मुख्य बसस्थानकासमोरून मिल कॉर्नर चौक ते अंजली टॉकिजकडे जाणारा रस्ता - महात्मा फुले चौक ते सरस्वती भुवन कॉलेज समोरून निराला बाजारकडून समर्थनगरकडे जाणारा रस्ता - सावरकर चौक सिग्नलमार्गे - नूतन कॉलनीमार्गे क्रांती चौक व हॉटेल मॅनोर येथे रॅलीचा समारोप झाला.

इंडियन ऑइलतर्फे पेट्रोल कुपन
बाइक रॅलीत सामील झालेल्या महिलांना इंडियन ऑइलकडून ५० रुपयांचे पेट्रोल कुपन देण्यात आले. यावेळी इंडियन ऑइलचे मॅनेजर (रिटेल सेल्स) प्रवीण जाधव आणि सेल्स ऑफिसर अपेक्षा भदोरिया यांची उपस्थिती होती.

अमाप उत्साह
गृहिणी असो की, नोकरदार आपल्या कर्तव्यांची धुरा यशस्वीपणे पेलणाऱ्या प्रत्येकीला सलाम करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने ऑल वुमन बाइक रॅलीमध्ये सामील झाल्या होत्या. रॅलीची आठवण स्मरणीय करण्याचा प्रयत्न करताना कुणी पारंपरिक वेशभूषेत आले, तर कुणी सामाजिक संदेश देत होते.

यांनी केली मदत
रॅलीत वाहतूक शाखेचा सहभाग महत्त्वाचा ठरला. वाहतूक शाखा नियंत्रक व्ही. एस. मोरे, आर. एल. वाघ, डी. बी. सूर्यवंशी, के. एस. मोरे, पंकज राऊत यावेळी उपस्थित होते. रोडविर्नस ग्रुपच्या सदस्यांनीही बाइक रॅलीदरम्यान मार्ग दाखवायला मदत केली. यामध्ये नितीन ठोंबरे, गणेश कासले, हर्षवर्धन दळवी, श्रेयस पाठक, सुमेध हिवाळे व संकेत जाधव यांनी साह्य केले.

प्रमाणपत्र वितरण
बाइक रॅलीनंतर सहभागी महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूलचे सतीश तांबट यांच्या हस्ते विविध बक्षिसांचे वितरण आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यांनी नोंदवला सहभाग
स्फूर्ती महिला मंडळ , एन १
कॅनॉट शक्ती मंडळ
जागृती महिला मंच
- तेजस्विनी महिला मंडळ
‌‌- सिद्धकला फायनान्शियल ओपीडी
- जैनम महिला मंच
- माहेश्वरी बहु मंडळ
- शिवाई महिला मंडळ
- राजस्थानी विप्र महिला मंडळ
- ओंजळ महिला मंडळ
- भारतीय समाज सेवा केंद्र
- भारतीय महिला फेडरेशन
- ताई फाउंडेशन
- जैन सोशल ग्रुप संगिनी
- आदिशक्ती नारी विकास प्रतिष्ठान
- आयडियल इंटरनॅशनल स्कूल
- ओंकार बालवाडी
- इनरव्हील क्लब ऑफ औरंगाबाद लोटस
- देवगिरी इंजिनीअरिंग कॉलेज
- एमआयटी कॉलेज
- माहेश्वरी महिला मंडळ
- बॅकिंग असोसिएशन
- सीए असोसिएशन महिला सदस्य
- माहेश्वरी ममता ग्रुप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विधी’साठी ‘ओएसडी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विधी विद्यापीठाला कुलगुरू मिळाल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवरही पुढिल प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. विद्यापीठासाठी ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) यांची नियुक्तीही करण्यात आली आहे, मात्र विद्यापीठासाठी निधीचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. बीएड कॉलेज परिसरातील सरकारी निवासस्थानांची अवस्था फारशी चांगली नसल्याने नवनियुक्त कुलगुरूंच्या निवासाची व्यवस्थाही इतरत्र केली जाणार आहे.
विधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून एस. सूर्यप्रकाश यांची निवड झाली. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाचे वर्ग भरणार आहेत. सुरुवातीची दोन वर्षे हे वर्ग बीएड कॉलेजमध्ये भरणार आहेत. त्यामुळे निवडीनंतर कुलगुरू एस. सूर्यप्रकाश, प्रधान सचिव सीतराम कुंटे यांनी शनिवारी बीएड कॉलेजला भेट देत पाहणी केली. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी ‘ओएसडीं’ची नेमणूकही करण्यात आली आहे. शासकीय फॉरेन्सिक सायन्स संस्थेचे डॉ. एस. जी. गुप्ता यांची ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आवश्यक कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करम्यातयेणार आहे. कुलगुरू १६ मार्च रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
कुलगुरूंच्या निवासस्थानाचा प्रश्न समोर आला आहे. बीएड कॉलेजच्या अधिकारी, प्राध्यापकांसाठी असलेले निवासस्थान त्यांना दाखविण्यात आले, परंतु त्याची अवस्था पाहून त्यांनी तेथे राहण्यास नकार दिल्याचे कळते. विद्यापीठातील कामकाजासाठी लागणारा आवश्यक तो खर्च करण्यासाठी अद्याप निधीची तरतूद कशी केली जाणार, हे अद्याप स्पष्ट नाही. सोमवारी प्रशासकीय पातळीवरून त्याबाबत हालचाली होण्याची शक्यता आहे.

‘क्लॅट’साठी प्रस्ताव
विधी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीला विलंब झाला. त्याचदरम्यान २०१७-१८ शैक्षणिक वर्षासाठी देशपातळीवर होणाऱ्या ‘कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट’द्वारे (क्लॅट) प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यामुळे ‘क्लॅट’मध्ये या विद्यापीठाचा समावेश व्हावा, या दृष्टीने तयारी सुरू आहे. यंदा ‘क्लॅट’ घेण्याची जबाबदारी चाणक्य नॅशनल लॉ युनिर्व्हसिटीकडे आहे. ‘क्लॅट’साठीचा प्रस्ताव तयार असून, सोमवारी हा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदा बीए एलएलबी (ऑनर्स) हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कविता म्हणजे स्वतःशी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘माझी कविता माझे चारित्र्य असून, स्वतःच्या शोधात स्वतःशी साधलेला तो संवाद आहे. जेव्हा मला माझा शोध घेता येईल तेव्हाच कविता लिहून पूर्ण होईल,’ असे प्रतिपादन युवा कवी रामप्रसाद वाव्हळ यांनी केले. ‘स्वागत’ उपक्रमात ते बोलत होते.
चाकोरीबाह्य कविता लिहून नवोदित कवी रामप्रसाद वाव्हळ व माणिक जयस्वाल यांनी साहित्य रसिकांचे लक्ष वेधले आहे. या कवींची लेखन भूमिका जाणून घेण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेने ‘स्वागत’ उपक्रम घेतला. ‘मसाप’च्या सभागृहात रविवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिवर्तनवादी वाङ्मयीन चळवळ माझ्या लेखनाची प्रेरणा असल्याचे रामप्रसाद यांनी सांगितले. ‘शोषणाच्या विरोधात पुकारलेला आवाज हा माझाच आवाज आहे. जात, धर्म, वर्ग आणि प्रादेशिक अस्मितांमध्ये आवाज बंदिस्त करावासा वाटत नाही. असत्य, थोतांड आणि विवेकाच्या मार्गात अडसर ठरणारे लाथाडण्याचे काम कवितेतून करतो. अर्थात, हा विचार संत वाङ्मयाने दिला. पुढे फुले-शाहू-आंबेडकरांच्या क्रांती लढ्याने विचार बळकट केला. परिवर्तन चळवळी आणि परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्या वाङ्मयीन चळवळी माझ्या प्रेरणा आहेत. आदिवासी वस्तीवरील अंधार आणि कुपोषण दिसले नसते,’ असे वाव्हळ म्हणाले.
या मनोगतानंतर ‘आश्चर्याची गोष्ट म्हणजे’, ‘अस्वस्थ चेहरे’, ‘बरं झालं रोहीत’ या कविता सादर केल्या. माणिक जयस्वाल यांनी वास्तववादी लेखनाची आवश्यकता मांडली. ‘लिखाणात पारदर्शकता हवी असते. स्वप्नरंजन टाळून वास्तववादाचा विचार करा. जगणे समृद्ध करण्यासाठी साहित्याची गरज आहे, मात्र वास्तवाचा विसर नको,’ असे जयस्वाल म्हणाले. प्रा. कैलास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

सोशल मीडियाचा फॉर्म
‘सध्या सोशल मीडियावर कविता आणि ललित लेखन करणारे खूपजण आहेत. खूप चांगले लिहण्याच्या शक्यता त्यांच्यात आहे, पण कोणत्या फॉर्ममध्ये लिहावे हे लक्षात येत नाही. दर्जेदार लेखन आपल्यापर्यंत पोचत नाही. त्यांची कविता इथे आणणे काळाची गरज आहे,’ असे रामप्रसाद म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images