Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अधिकाऱ्यांना विचारला जाब

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘घटना घडली त्यावेळी रजेवर होते. गौणखणीज आणि करमणूक शुल्कची जबाबदारी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे,’ असे म्हणत जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांनी महसूल कर्मचारी गजानन चौधरी यांच्या मृत्युप्रकरणी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी भाग्यश्री जोशी यांच्याकडून स्पष्टीकरण घेणार असल्याचे मंगळवारी सांगितले.
अधिकाऱ्यांकडून मागवलेल्या स्पष्टीकरणाबाबत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, ‘कार्यालयात कामाचा तणाव गंभीर प्रश्न आहे. गौणखणिज विभाग तसेच करमणूक शुल्क शाखेमध्ये मार्च अखेर कामाचा अधिक दबाव असतो. मात्र, या विभागांची जबाबदारी ही अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांच्याकडे आहे. त्यामुळे सोरमारे यांची तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे व जिल्हा खणिकर्म अधिकारी भाग्यश्री जोशी यांनी या प्रकरणात काय केले, विभागात कामाचा किती ताण होता, याबाबत चौकशी होईल. तसेच कर्मचाऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत शवविच्छेदन अहवालही जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत तपासण्यात येईल व या संपूर्ण चौकशीचा अहवाल बुधवारी ‌विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे पाठवणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. अपर आयुक्तांकडून होणाऱ्या चौकशीबाबत जिल्हाधिकारी म्हणाल्या की, ‘जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. स्वतःची जबाबदारी मोठी असल्यामुळे चौकशी करणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून होणाऱ्या चौकशीसाठीही सहकार्य करणार आहे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाऊ,’ असे डॉ. पांडेय यांनी सांगितले.

...तर मराठवाड्यात काम बंद
महसूल कर्मचारी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. मंगळवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाज बंद होते. जिल्हाधिकाऱ्यांची बदली तसेच अपर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करत नाही, तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असून येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला नाही, तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन कर्मचारी संघटनेने विभागीय आयुक्तांना दिले. निवेदनावर राज्य कार्याध्यक्ष डी. एम. देशपांडे, महिला प्रतिनिधी वसुधा बागुल, मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र गिरगे तसेच संतोष अनर्थे, अरविंद धोंगडे, विनोद आहेर, सुधाकर मोरे, बबन आवळे, दिलीप त्रिभुवन, मुकुंद गिरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्मार्ट पंचायती’चा आराखडा अंतिम टप्प्यात

$
0
0



Sachin.Waghmare
@timesgroup.com

Tweet : @WaghmareSMT

पुणे : शहरांपाठोपाठ केंद्र सरकारने गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळेच, स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट पंचायत ही नवीन योजना सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विकासांपासून वंचित खेड्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असून, त्यासाठीचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
स्मार्ट पंचायत योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी प्रधान सचिवांसह देशभरातील ३० सनदी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. योजनेत पहिल्या टप्प्यात देशातील किती व कोणती गावे निवडायची, निवडलेल्या गावात काय पायाभूत व मूलभूत सुविधा द्यायच्या, प्रत्येक गावाला लागणारा निधी व त्याचे आर्थिक नियोजन, गावाच्या विकास आराखड्यात समाविष्ट करावयाच्या बाबी यासह योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी या महत्त्वपूर्ण बाबींचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे.
ग्रामीण भागांसाठी मुलभूत सोयीसुविधा काय हव्यात, यावर काम सुरू आहे. देशभरात सर्वत्र हा उपक्रम राबविला जाणार असून लोकसंख्येवर आधारित ग्रामपंचायतीचे मोठी, मध्यम, लघु अशा प्रकारच्या तीन स्तरात वर्गीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने या योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. मसुदा तयार करण्यासाठी आतापर्यंत व‌रिष्ठ पातळीवर दोन बैठका झाल्या आहेत. त्यामध्ये मूलभूत निकष ठरविण्यात आले आहेत. निवड होणाऱ्या गावांना केंद्र सरकारकडून त्या प्रमाणात आर्थिक निधी देण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. योजनेत सहभागी होऊन चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना केंद्र सरकारकडून बोनस निधी मिळणार आहे.

मा‌र्किंग पद्धत अवलंबणार
योजनेत देशभरातील ग्रामपंचायतीना सहभागी होता येणार असून स्मार्ट पंचायत म्हणून निवड करण्यासाठी मार्किंगची पद्धती अवलंबली जाणार आहे. त्यासाठी गावातील पाणीपुरवठा, शौचालय, घरकुल, रस्ते, नाल्या, स्वतंत्रपणे ग्रामपंचायत कार्यालय आहे की नाही, त्यासोबतच ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे काम पारदर्शकपणे चालतो की नाही त्यासाठी मार्किंगची पद्धती अवलंबली जाणार आहे. त्याशिवाय गावात करण्यात आलेले वृक्षारोपण, इंटरनेट कनेक्टिव्हीटी, गाव कॅशलेस आहे की, नाही आदी बाबी पाहिल्या जाणार आहेत. या सुविधांनाही प्लस मार्किंग असणार आहे. या सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या गावाचा स्मार्ट पंचायत योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

स्मार्ट पंचायतीचे फायदे
यामुळे प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता येईल. छोट्या-मोठ्या सरकारी कामांसाठी कार्यालयांचे खेटे मारणे बंद होईल. बऱ्याचशा सेवा ऑनलाइन झाल्याने घरबसल्या कामे होतील. ऑनलाइन तक्रार निवारणप्रणाली कार्यान्वित होईल. पूर्ण झालेल्या योजना व त्याच्यावर होणाऱ्या खर्चाची माहिती वेबसाइटवर मिळणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागाची कार्यक्षमता तर वाढेलच, परंतु प्रशासनातही मोठ्या प्रमाणात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

स्मार्ट पंचायत योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लवकरच सादर केला जाणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. दोन महिन्यात आराखडा तयार होईल.
- डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद्र, तथा सदस्य स्मार्ट पंचायत मसुदा समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईकवाडेंची हायकोर्टात धाव

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
अन्नपाण्यावाचून तडफडून जीव सोडणाऱ्या बिबट्यांच्या तीन बछड्यांच्या चटका लावणाऱ्या मृत्यूप्रकरणी सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांना महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया निलंबित केले. या आदेशाला नाईकवाडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेत नगरविकास सचिव, पालिका आयुक्त व पशुवैद्यकीय विभागाचे उपसंचालक उपायुक्त यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी.आर. बोरा यांनी मंगळवारी दिले.
प्राणिसंग्रहालयासाठी महापालिकेने डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील आमटेज अॅनिमल अर्क येथून राजा आणि रेणू ही बिबट्याची जोडी आणली. रेणूने ७ मार्च २०१६ रोजी तीन पिलांना जन्म दिला, पण या पिलांना वाचवण्यात प्राणिसंग्रहालयाचे व्यवस्थापन कमी पडले. अन्नपाण्यावाचून या तिन्हीही पिल्लांचा ९ मार्च २०१६रोजी मृत्यू झाला. त्याचे पडसाद १५ मार्च २०१६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी डॉ. नाईकवाडे यांच्या निलंबनाची मागणी केली. महापौर त्र्यबक तुपे यांनी ही मागणी मान्य करून डॉ. नाईकवाडे यांना निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर १९ मार्च २०१६ रोजी बकोरिया यांनी डॉ. नाईकवाडे यांच्या निलंबनाचे आदेश काढले. निलंबनाच्या आदेशात सात मुद्यांचा समावेश केला आहे. त्यात आयुक्तांनी म्हटले आहे की, ‘बिबट्याच्या जोडीची वाहतूक ८०० किलोमीटर अंतरावरून केली. प्रवासादरम्यान योग्य काळजी घेतली नाही. त्यातच रेणू ही मादी बिबट्या आजारी पडली. आजारपणात तिची योग्य निगा राखली नाही. रेणू गरोदर असल्याबद्दल डॉ. नाईकवाडे यांना माहिती झाली नाही. तिच्यावर योग्य प्रकारे औषधोपचार झाले नाहीत. मुदतपूर्व प्रसूती झाली, प्रसूतीनंतर पिलांची योग्य प्रकारे निगा राखली नाही. त्यामुळे निष्पाप पिलांचा अन्नपाण्यावाचून मृत्यू झाला. या सर्व कारणांमुळे डॉ. नाईकवाडे यांना निलंबित करण्यात येत आहे. त्यांची विभागीय चौकशी केली जाईल,’ असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले होते. या आदेशाला नाईकवाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. या याचिकेवर मंगळवारी प्राथमिक सुनावणी झाली. कोर्टाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याची बाजू व्ही. डी. साळुंके व मयूर साळुंके हे मांडत आहेत.

निष्काळजीमुळे बछडे दगावले नाहीत
१९ मार्च २०१६पासून नाईकवाडे यांना निलंबित केले आहे. १२ सप्टेंबर २०१६ रोजी पुन्हा बछड्यांचा मृत्यू झाला. मादी रेणूमध्येच नैसर्गिक दोष आहेत असे वाटते. हे बछडेही जन्मांनंतर केवळ २४ तासात दगावले. निष्काळजीपणे बछड्यांचा मृत्यू झाला नाही, असा अहवाल पालिकेकडे सोपविण्यात आला आहे. नाईकवाडे यांना निलंबित केले असले तरी त्यांची चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमला नाही. खरे तर निलंबित केल्यानंतर ६ महिन्यांत चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे. याचिकाकर्त्यांनी पालिका आयुक्तांना निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती करणारे निवेदन दिले. या पत्राला उत्तर मिळाले नाही. बछडे दोन वेळा दगावले. याचा अर्थ याचिकाकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे बछडे दगावले नाहीत, असा दावा याचिकेत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादेत भाजपची पहिल्यांदाच सत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
पंचायत समिती सभापतिपदी भाजपच्या अर्चना दिनेश अंभोरे, तर उपसभापतीपदी गणेश जिजाबा अधाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी अंजली धानोरकर यांनी बिनविरोध निवड जाहीर करताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पीठासीन अधिकारी धानोरकर यांच्या ध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता विशेष सभा घेण्यात आली. या सभेला अर्चना अंभोरे, गणेश अधाने, प्रभाकर शिंदे, रेखा प्रकाश चव्हाण, युवराज ठेंगडे हे भाजपचे सदस्य हजर, तर काँग्रेसच्या हीना मनियार गैरहजर राहिल्या. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सभापतिपदासाठी अर्चना दिनेश अंभोरे व उपसभापतिपदासाठी गणेश जिजाबा अधाने यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. निवडणूक प्रक्रियेत गटविकास अधिकारी हारकचंद कहाटे, राजेश हिवाळे यांनी सहकार्य केले. भाजपने प्रथमच सहापैकी चार जागा जिंकून पंचायत समितीवर वर्चस्व मिळवले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड, सुरेश सोनवणे, हिंदवी खंडागळे, भीमराव खंडागळे, संतोष राजपूत, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक अविनाश कुलकर्णी, परसराम बारगळ, योगेश बारगळ आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

उपसभापतींच्या पत्नीला संधी
खुलताबाद पंचायत समितीचे मा‍‍‍‍‍वळते उपसभापती दिनेश अंभोरे हे आहेत. त्यांच्यानंतर पत्नी अर्चना यांना सभापतिपद मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद पिंपरी-चिंचवड, संघांची विजयी सलामी

$
0
0

औरंगाबाद पिंपरी-चिंचवड, संघांची विजयी सलामी
लोगो - मनपा टी-२० क्रिकेट स्पर्धा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महापालिका निमंत्रित टी-२० क्रिकेट स्पर्धेत यजमान औरंगाबाद महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका संघांनी विजयी सलामी दिली.
एमजीएम क्रीडा संकुलावर ही स्पर्धा सुरू आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात औरंगाबाद महापालिका संघाने नांदेड महापालिका संघाचा सात विकेट्सनी पराभव केला. या लढतीत कांतीलाल थोरात, किरण टाकळकर, शिवाजी दांडगे, हेमंत रिठे, जावेद अकिब, प्रवीण क्षीरसागर, कर्मवीर लव्हेरा, भिवा आडके यांनी लक्षवेधक कामगिरी बजावली. दुसऱ्या सामन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका संघाने ठाणे महापालिका संघावर ५५ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात राहुल गायकवाड, सचिन ल लोणे, योगेश साठे, चंदन गंगावणे, मनोज जैस्वार, अनिल वागेला, संतोष इंदुलकर यांनी प्रभावी खेळ केला.
महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी एमजीएमचे सीईओ डॉ. प्रवीण सूर्यवंशी, महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, उपायुक्त रवींद्र निकम, शिवाजी दांडगे, हेमंत मिरखेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सामनावीर पुरस्कार मोहंमद जहागिरदार, अय्युब गुलाम जिलानी, मोहन मेघावाले यांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, सय्यद सलीमोद्दीन, प्रशांत भुमकर, दीपक जावळे, सय्यद जमशीद, कर्मवीर लव्हेरा, विजयसिंग रागी, संजय जक्कल आदींनी पुढाकार घेतला आहे.
संक्षिप्त धावफलक ः १) नांदेड महापालिका संघ - १६ षटकांत सर्वबाद ७२ (हेमंत रिठे नाबाद २०, धीरेन आठवले १३, जावेद अकिब ३-९, प्रवीण क्षीरसागर २-१३, कर्मवीर लव्हेरा २-१५, शिवाजी दांडगे २-१९) पराभूत विरूद्ध औरंगाबाद महापालिका ः १०.४ षटकांत ३ बाद ७३ (कांतीलाल थोरात नाबाद २८, किरण टाकळकर १८, शिवाजी दांडगे नाबाद १४, भिवा आडके ३-२८).
२) पिंपरी-चिंचवड महापालिका संघ - २० षटकांत ७ बाद १६५ (राहुल गायकवाड ३२, योगेश साठे २७, सचिन लोणे २०, अमर १७, चंदन गंगावणे नाबाद १९, राहुल चावरिया १३, महेश कुडाळे १०, मनोज जैस्वार २-३३, संतोष इंदुलकर, राजेंद्र भालेकर, प्रकाश सारडा प्रत्येकी १ विकेट) विजयी विरुद्ध ठाणे महापालिका संघ - २० षटकांत ८ बाद ११० (अनिल वाघेला ४३, संतोष इंदुलकर २६, किरण परमार १३, नरेश राठोड नाबाद ११, सचिन लोणे २-१७, विकास सिरवळे, राहुल चावरिया, चंदन गंगावणे, योगेश साठे प्रत्येकी १ विकेट).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी व्यापाऱ्यांसाठी आव्हानात्मक

$
0
0



म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

जीएसटी यंत्रणा ही व्यापारी आणि अधिकारी वर्गासही आव्हानात्मक आहे. मात्र, हे आव्हान पेलणे सुकर व्हावे यासाठी व्यापारी महासंघ व टॅली कंपनीचे सेमीनार उपयुक्त ठरत आहेत, असे मत विक्रीकर उपायुक्त डी. एम. मुगळीकर यांनी मांडले.
टॅली कंपनी आणि औरंगाबाद व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित ‘जीएसटी प्रणाली’ या विषयावर मंगळवारी एका सेमिनारचे आयोजन केले होते. यात मुगळीकर यांनी हे मत मांडले. या वेळी व्यासपीठावर टॅली सोल्युशन्सचे अधिकारी दर्शन शहा, औरंगाबाद व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, सचिव राजन हौजवाला, टॅलीचे उमेश पाटील, टेलीसॉफ्टचे बिनु मॅथ्यू, माजी अध्यक्ष भागचंद बिनायके यांची उपस्थिती होती. टॅली कंपनी आणि व्यापारी महासंघाच्या संयुक्त उपक्रमांच्याबाबतीत मुगळीकर यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ‘जीएसटी प्रणाली ही सर्वसमावेशक आणि सर्वांकरिता उपयुक्त आहे. सर्व प्रकारचे कर संपवून एकच कराच्या माध्यमातून एक देश-एक कर-एक किंमत हे सूत्र प्रत्यक्षात येत आहे. त्यामुळे याच्याशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी प्रत्येकाने याची सर्वांगीण माहिती करवून घेणे आवश्यक आहे. यासाठी विशेष मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असून, विक्रीकर विभाग आपल्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांमार्फत तालुका पातळीपर्यंत याबाबत व्यापाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.’ प्रशिक्षक दर्शन शाह आदी या वेळी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमास प्रारंभ झाला.
प्रास्ताविकात जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शाह यांनी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. टेलीसॉफ्ट सर्व्हीस यांच्या माध्यमातून आयोजित या प्रशिक्षणामुळे व्यापाऱ्यांना यातील तांत्रिक बाबी समजतील आणि प्रारंभी क्लिष्ट वाटणाऱ्या बाबी नंतर सहजसोप्या वाटायला लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महासंघाचे सचिव राजन हौजवाला यांनी महासंघाच्या वेबसाईटबद्दल माहिती दिली. ‘जीएसटी’ ही आधुनिक भारतातील फार मोठी क्रांती असल्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक दर्शन शाह यांनी सांगितले.
जीएसटीसाठीची नोंदणी, खरेदी आणि विक्रीच्या नोंदी, रिटर्न दाखल करण्यासाठीच्या पद्धती, कर भरणा आणि परतावा, त्यात सूट, त्यासाठीच्या कायद्यातील तरतुदी आणि या सर्व पद्धतीचा सरकार, व्यापारी आणि ग्राहकांनाही होणारा खूप मोठा लाभ याबाबत अतिशय सविस्तर आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला व्यापारीवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. एकूणच, सर्वत्र जीएसटीविषयी असणारी उत्सुकता या कार्यक्रमाच्या उपस्थितांमध्ये दिसून येत होती. जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेमध्ये नेमका काय बदल होणार आणि या बदलासाठी व्यापाऱ्यांना काय बदल करावे लागणार, याविषयी उत्सुकता होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवड

$
0
0



मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद

हवामान बदलावरील उपाय आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी २०१७ ते २०१९ या तीन वर्षांमध्ये राज्यात ५० कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी विविध विभागांना तसेच ग्रामपंचायतींना दिलेले उद्दिष्टाचे पुढील तीन वर्षाचे वर्षनिहाय नियोजन, आराखडा व कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना सरकारने दिली आहे.
सातत्याने झालेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मानवी जीवनावर होत आहे. वातावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे धोरण राज्य शासनाने हाती घेतले आहे. हे धोरण यशस्वी करण्यासाठी यामध्ये एक जुलै रोजी या एकाच दिवशी राज्यभरात लोकसहभागातून व जनतेच्या सहकार्याने स्वयंस्फूर्तीने २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. या मोहिमेत २ कोटी ८२ लाख वृक्षांची लागवड केली. या उल्लेखनीय कामाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही घेण्यात आली आहे.
राज्यात वृक्षलागवड उपक्रमात सातत्य राहावे यासाठी सरकारने २०१७ ते २०१९ या पुढील तीन वर्षांमध्ये विविध विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. यामध्ये पहिल्या वर्षी १५ जून ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी, दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये १३ कोटी आणि तिसऱ्या वर्षी २०१९ मध्ये ३३ कोटी असे एकूण तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारने निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वनविभाग वनविभाग, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन तसेच शासकीय व निमशासकीय विभाग त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, नगर पालिका आदींना उद्दिष्ट विभागून दिले आहे. या ५० कोटी वृक्ष लागवडीची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, यासाठी विभागीय, प्रादेशिक, जिल्हा व तालुकास्तरावरील संबंधित विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची ‘नियंत्रक अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात येत असून, त्याच्यावर या वृक्षलागवडीसह वृक्ष संगोपनाची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
या नियंत्रण अधिकाऱ्यांनी यापुढील तीन वर्षात लावण्यात आलेल्या वृक्षांची संख्या, वृक्ष लागवडीची स्थळे, वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून उपलब्ध झालेल्या रोपांची संख्या, नर्सरीतून विकत घेतलेल्या रोपांची संख्या, वृक्षरोपणासाठी सहभाग घेतलेली यंत्रणा, व संस्थांची नावे, कोणत्या तारखेस किती वृक्षलागवड केली याची संख्या, लावलेल्या रोपांपैकी जिवंत रोपांची संख्या व टक्केवारी याचे संपूर्ण विवरण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वृक्षारोपन करताना लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती, स्थानिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनाही सहभागी करण्यात येणार आहे.

स्थानिक सहभाग
राज्यातील ३६ जिल्हे, ३५८ तालुके आणि २७ हजार ५०० ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य यांना या कामी सक्रिय केले जाणार आहे. वृक्ष लागवडीच्या एकंदर उद्दिष्टामध्ये कमीत कमी दहा टक्के बांबू प्रजातींची लागवड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, संरक्षण, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांचाही या कामात सहभाग घेतला जाणार आहे. केंद्र सरकारकडील त्याचबरोबर राज्याच्या महसूल विभागाकडील तसेच नगर पालिका यांच्या मोकळ्या व पडीक जागांचा वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. त्या दृष्टीने सर्व माहीती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारच्या धोरणानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्षलागवड केली जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या रोपांच्या निर्मितीचे काम जोमात सुरू आहे. २०१६मध्ये लावलेली सुमारे ९० टक्के रोपे जिवंत आहेत.
- आप्पासाहेब निकम,
उपसंचालक, सामाजिक वनीकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मित्र हर्सूल तलावात बुडाले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोहता येत नसताना पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मित्रांचा मंगळवारी सायंकाळी हर्सूल तलावात बुडून मृत्यू झाला. ट्युशनला जातो, असे सांगून हे दोघे घराबाहेर पडले होते. तलावाजवळ उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी व चपलांमुळे हा प्रकार उघडकीस आला. समी खान अकबर खान (वय २२ रा. मिसारवाडी) व सुफीयान रज्जाक शहा (वय १९, रा. किराडपुरा, मूळ रा. उडंणगाव) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
समी व सुफीयान ट्युशनला जात असल्याचे सांगून मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घराबाहेर पडले. समीच्या दुचाकीवरून ते हर्सूल तलावाकडे गेले. तलावाच्या काठावर दुचाकी उभी करून त्यांनी कपडे व मोबाइल दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवले. यानंतर तलावाजवळ चप्पल सोडून ते पाण्यात उतरले, मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दोघे घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी जिन्सी पोलिस ठाण्यात दुचाकीचा क्रमांक देऊन हरवल्याची नोंद केली. दोघांचे मोबाइल देखील डिकीत ठेवल्याने कोणी उचलत नव्हते.

दुचाकी, चपलांवरून प्रकार उघड
बुधवारी सकाळी तलावाजवळ मासेमारी करणाऱ्या काही तरुणांना बेवारस दुचाकी व चपला आढळल्या. त्यांनी हर्सूल पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांची दुचाकीचा क्रमांक तपासला असता जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल नोंदविलेल्या प्रकरणातील दुचाकीचाही हाच क्रमांक असल्याचे स्पष्ट झाले. अग्नीशमन दलाला ही माहिती कळवण्यात आली. चार तासांच्या शोध मोहिमेनंतर समी व सुफीयानचे मृतदेह जवानांना आढळले.

दोघेही विद्यार्थी
समी खानने आझाद कॉलेजमधून बीएचे ‌शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने एका वर्षाचा पत्रकारीतेचा कोर्सही पूर्ण केला होता. एनसीसीचा कँडेट असलेल्या समी खानने पोलिस भरतीसाठी तयारी सुरू केली होती. त्याला चार भाऊ, दोन बह‌िणी असून, वडील रिक्षाचालक आहेत. सुफीयान हा कटकट गेट परिसरातील एका कॉलेजमध्ये बारावीमध्ये ‌शिकत होता. त्याची बह‌ीण विवाहित असून, ती मिसारवाडी येथे समीच्या घराजवळ राहते. बहिणीकडे नेहमी जात असल्याने सुफीयानची समीसोबत मैत्री झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समृद्धी महामार्गाचे काम रखडल्याने कानउघाडणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनासाठी जिल्ह्यात अत्यंत धिम्या गतीने काम सुरू असून आढावा बैठकीमध्ये व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी औरंगाबादच्या अधिकाऱ्यांची कानडघाडणी केली.
समृद्धी महामार्गासंदर्भात जिल्ह्यातील कामांचा नुकताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, प्रकल्प समन्वयक महेंद्र हरपाळकर आदींसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे मोपलवार यांनी नाराजी व्यक्त केली. इतर जिल्ह्यांमध्ये वेगाने काम सुरू असताना औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मात्र कामाला वेग नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून योग्य तो पाठपुरावा होत नसल्यामुळे मोपलवार यांनी जिल्हाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी तातडीने काम पूर्ण केले जाईल असे सांगितले.
वैजापूर आणि गंगापूर जिल्ह्यामध्ये ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मार्किंगचे काम झाले. मात्र, इतर तालुक्यांमध्ये काम झालेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी ५९ गावांमधील १३८० हेक्टर जमीन संपादन ‌होणार आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील १५५ किलोमीटर अंतर हा महामार्ग व्यापणार आहे. महामार्ग विकास व बांधणीसाठी भूसंपादन करताना लॅण्ड पुलिंग सिस्टीमवर भर देण्यात येणार असला, तरी शेतकऱ्यांसाठी वाटाघाटी करून जमिनीचा मोबदला घेण्याचा पर्याय खुला राहणार आहे. तसेच भूसंपादनाचे इतर पर्यायही खुले ठेवण्यात आले आहेत. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध पाहता प्रशासनाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्याची स्थिती
सध्या रस्ते विकास महामंडळाकडून जिल्ह्यात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या ‌(जीपीएस) सहाय्याने मार्किंगच्या कामाला सुरुवात करण्यात येऊन, खांब रोवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील अने‌क ठिकाणी शेतकऱ्यांनी हे खांब उखडून फेकून दिले आहेत. हा महामार्ग राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक व कोकण या पाच महसूल विभागांतील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व ठाणे या दहा जिल्ह्यांतून जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीत भाजपला राज्यपालांचे सहकार्य

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘गोवा आणि मणिपूर निवडणुकीमध्ये भाजपला राज्यपालांचे सहकार्य मिळाले. राज्यपालांची कार्यालये हे पक्षाचे कार्यालय झाले. उत्तर प्रदेश निवडणुकीत निवडणुकीत भाजपने धनाचा उपयोग, तर धर्माचा दुरूपयोग केला,’ असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी बुधवारी (१५ मार्च) केला. करात एका कार्यक्रमानिमित्त शहरात आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलत होत्या.
करात म्हणाल्या, ‘निवडणुकीच्या नियमामध्ये पक्षाचा खर्च हा निवडणूक खर्चात मोजला जात नाही. त्यामुळे ज्या पक्षांकडे पैसे आहेत ते निवडणुकीत त्याचा मोठ्याप्रमाणात वापर करतात. उत्तर प्रदेश निवडणुकीतही भाजपकडून पैशांचा नंगा नाच झाला. एकीकडे आम्हाला पोस्टर, झेंडे लावण्यास विरोध करण्यात येतो तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या धार्मिक भाषणांकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष करते. मोदी यांनी पंतप्रधान पदाची ‌मर्यादा सोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा वापरली. निवडणुकीत घराणेशाहीपेक्षा कार्पोरेटवाद अधिक धोकेदायक आहे. लोकसभेतील ८२ टक्के खासदार हे कोट्यधीश आहेत. तर २० टक्के खासदारांचा संबंध उद्योगांशी येतो. राजकारणात घरणेशाही ही मतदारांवर अवलंबून असते. डाव्या विचारांच्या पक्षांच्या जागा पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा राज्यात निवडणून येतात. येणाऱ्या काळामध्ये या राज्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, या जागा कशा मजबूत करण्यात येतील,’ असे करात म्हणाल्या.

तडजोड नाही
राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीबाबत करात म्हणाल्या की ‘विचार आणि अजेंड्यासोबत तडजोड करता येत नाही. त्यामुळे अशी युती चालत नसते.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदनेतून तयार होणारे मन समृद्ध करते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
‘साहित्याचा जन्म हा वेदनेतून होत असतो. ते लेखकाला येणाऱ्या अनुभूतीतून निर्माण होते आणि असे साहित्य मन आणि जीवन समृद्ध करते. लेखक हा तळमळीतून लिहत असतो. माणसाला, समाजाला जगण्याचे बळ देण्याचे काम साहित्यिक करत असतात,’ असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांनी केले.
कन्नड येथे मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘साहित्य आणि समाज’ या विषयावर बोलतांना डॉ. लोमटे यांनी, साहित्य हे उपेक्षित, गोरगरीब यांच्या जीवनातून कसे निर्माण होते, त्यांना जगण्याचे बळ देण्याचे काम कसे करते, याबद्दल सविस्तर विवेचन केले.
या व्याख्यानमालेचे उद्‍घाटन मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी कुरुंदकरांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर पाटील हे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिम्मतराव नरके यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ शरद गावंडे यांनी केले, तर आभार प्रा. सरला गोरे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिकेतर्फे वैजापुरात पाणी कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शहरात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन महिन्यातील अडचण लक्षात घेऊन नगरपालिकेने पाणीपुरवठ्यात जवळपास दहा मिनिटांची कपात केली आहे. हा बदल १ एप्रिलपासून लागू होणार आहे. सध्या शहरात तीन दिवसांतून एका नळाद्वारे पाणी मिळते, नवीन निर्णयामुळे आता चौथ्या दिवशी पाणी मिळणार आहे.
वैजापूरची लोकसंख्या ४१ हजार असून कामानिमित्त दररोज अंदाजे चार हजार नागरिक शहरात येतात. त्यामुळे नगरपालिकेला दररोज ४५ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ३५ ते ४० लाख लिटर पाण्याची गरज भासते. नाशिक पाटबंधारे विभागाकडून दर दोन महिन्यांनी गोदावरी कालव्याद्वारे गोयगाव येथील ५० दलघफु क्षमतेच्या पाच साठवण तलावात पाणी सोडले जाते. गोयगाव येथील पाच साठवण तलावांपैकी तीन तलावांतील पाणी संपले असून दोन तलावात पाणी शिल्लक आहे. नारंगी धरणात सुद्धा पाणी नसल्याने पाणीपुरवठ्यासाठी नाशिकच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. येत्या १३ एप्रिल रोजी गोदावरीचे रोटेशन मिळणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्यात येणार आहे.

टँकरचालकांची चांदी
गेल्या वर्षीसुद्धा शहरात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली होती. गोयगाव येथील साठवण तलावात पाणी नसल्याने दर दहा दिवसांनी शहरवासियांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. याकाळात टँकर लॉबी मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली होती. नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागले. यावर्षी तशी परिस्थिती उद्भवल्यास टँकरचालकांची पुन्हा चांदी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेणाऱ्या दोघांची जेलमध्ये रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संस्थेबाबत सकारात्मक अहवाल देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या जिल्हा व्यवसायिक शिक्षण विभागाचा प्रशिक्षण अधिकारी व लघु टंकलेखकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. पाडळकर यांनी बुधवारी दिले.
टॅली कोर्स अभ्यासक्रम चालविण्यासाठी मान्यता मिळावी, यासाठी फिर्यादीने राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ (मुंबई) येथे अर्ज केला होता. त्यासंबंधी अहवाल देण्याचे काम येथील जिल्हा व्यवसायिक शिक्षण विभागाचे प्रशिक्षण अधिकारी शशिकांत दामोदर गुंटूरकर (वय ३२, रा. मुजीब कॉलनी, औरंगाबाद) आणि लघू टंकलेखक सुरेश चंद्रया नरगुल्ला (वय ५३, रा. खडकेश्वर, औरंगाबाद) यांच्याकडे होते. सकारात्मक अहवाल देण्यासाठी त्यांनी फिर्यादीकडे १५ हजारांची मागणी केली व दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. या प्रकरणी फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विवेक सराफ, निरीक्षक अनिता वराडे व पथकाने सापळा रचून दहा हजारांची रक्कम स्वीकारताना गुंटूरकर व नरगुल्ला यांना मंगळवारी पकडले. पोलिस निरीक्षक वराडे यांच्या तक्रारीनंतर सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये बुधवारी गुन्हा दाखल होऊन दोघांना कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. जिल्हा सरकारी वकील शिवाजी नवले यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीच्या तडाख्यात पिके आडवी

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये बुधवारी विजांच्या कडकडाटासह आणि गारांसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. वीज पडल्यामुळे बीड व लातूर जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले आहेत. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना, विशेषत: फळबागांना या पावसाचा जोरात फटका बसला आहे. या पावसामुळे पिके हातची गेली आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जालना शहरासह तालुक्यामध्ये रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली होती.
या पावसाचा सर्वाधिक तडाखा बीड जिल्ह्याला बसला. गारा आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. परळी तालुक्यातील कौठाळी येथील आश्रुबा किसनराव गायकवाड (वय ५७) आणि सुशीला तुळशीराम कुंभार (वय ४०) यांचा शेतातील गहू काढत असताना अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. केज तालुक्यातील येवता येथे ओंकार सटवा निर्मळ (वय ११), तर दरडवाडी येथे भागवत रावसाहेब दराडे (वय ४०) यांचा, तर आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील सीमा गोरख करांडे यांचाही वीज पडल्याने मृत्यू झाला.
वादळी वाऱ्यामुळे अनेक मोठे वृक्ष उन्मळून पडले, तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. आंबा उत्पादकांना प्रचंड फटका बसला आहे. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली कैऱ्याचा खच पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सलग तीन वर्षाचा दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग आनंदात होता, मात्र गारपिटीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. परळी तालुक्यामध्ये कांदा उत्पादकांसह गहू, हरभरा, ज्वारी, आंबा, लिंबू ,द्राक्षे यांच्या बागांचे नुकसान झाले. तसेच मोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, द्राक्षे, लिंबू, आंबा,डाळींब ही पिके भुईसपाट झाली.
दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दुपारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व जीवित आणि वित्त हानीचा आढावा घेतला. सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच कौठळी येथील मयतांच्या कुटूंबियांशी संपर्क साधून त्यांना तातडीने मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ नुकसान केले आहे. औसा तालुक्यातील किल्लारी परिसरातील मंगरुळ, नांदुर्गा, येलोरी गावातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. द्राक्षांची काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक संघाचे पदाधिकारी शिवाजीराव सोनवणे यांनी दिली. भिसे वाघोली वादळी वाऱ्यामुळे गावात अनेक घरावरचे पत्रे उडून गेले असून, झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा बंद होता.
लातूर शहरात दुपारी अचानक पाऊस वाढल्यामुळे अनेकांचे हाल झाले. शहराच्या सखल भागात पाणी ही मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. लातूर तालुक्यातील टाकळी गावात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेत एक म्हैसही दगावली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख साकुब उस्मानी यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, कळंब तालुक्यामध्ये गारा पडल्या. उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा, कळंब तालुक्यातील सरमकुंडी, पारगावा परिसरामध्ये या पावसामुळे नुकसान झाले. या पावसामुळे, फळबागांचे नुकसान झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार आयुष प्रसाद यांनी उस्मानाबाद तालुक्यातील पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. पावसाबरोबरच वारे सुटल्यामुळे द्राक्षे, आंबे यांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ आणि मानवत तालुक्यातील अनेक गावांमध्ये बुधवारी ३ ते ५ च्या सुमारास प्रचंड गारपीट होवून अवकाळी पावसाने वादळी वार्यासह हजेरी लावली. ज्यामुळे खरीपाची तूर आणि रब्बीच्या गहू, ज्वारी, हरबर्यासह आंबा, पपई, संत्रा, मोसंबीच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधीत कर्मचार्यांना तात्काळ नुकसानीच्या पाहणीचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

$
0
0



टीम मटा, औरंगाबाद

मराठवाड्यामध्ये बुधवारी पडलेल्या पावसाबरोबरच पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याच्या या इशारात येत्या ४८ तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्याच्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाने विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही विशेषत: शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या शेतमालाबाबत दक्षता घ्यावी, असेही आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आले आहे.


पावसातील दक्षता

अवकाळी पावसाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी पुढील दक्षता घेण्याची गरज आहे.
विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे.
शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सात या वेळेत विजा पडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे शेतीची व इतर कामे करू नयेत.
दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.
कापणी झालेले धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे.
गारपीटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
पाऊस सुरू असतांना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलीम स्टेपनीचा इन कॅमेरा जबाब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नोटा बदलून देण्याच्या प्रयत्नात लांबवण्यात आलेल्या एक कोटी रुपयाच्या रक्कमेचा मूळ मालक हितेन पुजारा हा अद्यापही भूमिगत आहे. गुन्हेशाखेला पुजारा याचा जबाब घ्यायचा असल्यामुळे त्याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, थापाचा साथीदार सलीम स्टेफनी याचा कोर्टात इन कॅमेरा जबाब घेण्यात आला. हा जबाब महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देण्याचे आमिष दाखवत राजेश ठक्कर या व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये पाच जणांनी २१ फेब्रुवारी रोजी सेंट्रलनाका परिसरातून पळवले होते. कुरिअर व्यावसायिक हितेन पुजारा याने या नोटा दिल्याचा दावा राजेश ठक्कर याने तक्रारीत केला आहे. या घटनेला तीन आठवडे उलटले असून पुजारा अद्याप पोलिसांपुढे हजर झालेला नाही. ही रक्कम त्याची आहे की त्याने कोणाकडून आणली, याबद्दल पोलिसांना पुजाराचा जबाब नोंदवायचा आहे. पण, घटनेनंतर पुजारा भूमिगत झाला असून त्याचा मोबाइल स्वीच ऑफ असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. तो पोलिसांपुढे येत नसल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस जमादार वीरबहादुर गुरंग थापा याचा जवळचा साथीदार सलीम स्टेफनी याचा कोर्टात कलम १६४ प्रमाणे इन कॅमेरा जबाब घेण्यात आल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली. थापाच्या सांगण्यावरून सलीमने थापाच्या घरी ठेवलेली ९४ लाखांची रक्कम झाल्टा फाटा येथे चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांना नेऊन दिली होती. सलीमचा हा जबाब महत्त्वाचा पुरावा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

थापाची स्कॉर्पिओ सलीमच्या नावावर
जमादार थापाकडे स्कॉर्पिओ वाहन आहे. हे वाहन त्याने सलीम स्टेफनी याच्या नावावर घेतले आहे. या वाहनाचे मालक सलीमपूर्वी बदललेले आहेत. ही स्कॉर्पिओ गुन्हेशाखेने जप्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या ओस शाळा संस्थाचालकांना द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महापालिकेच्या ओस पडलेल्या शाळा खासगी शिक्षण संस्थाचालकांना दिल्या पाहिजेत अशी आपली भूमिका असून या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला जाईल,’ अशी भूमिका महापौर भगवान घडमोडे यांनी बुधवारी स्पष्ट केली.
‘महापालिकेच्या सध्या सत्तर शाळा आहेत. यापैकी पंधरा ते वीस शाळा ओस पडलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी असल्यामुळे या शाळा चालवणे कठीण होवून बसले आहे. कमी विद्यार्थ्यांसाठी शाळेची भलीमोठी इमारत, शिक्षकवर्ग व अन्य पायाभूत सुविधा पुरवणे अवघड होणार आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये विद्यार्थी फारच कमी आहेत, त्या शाळा पालिकेच्या प्रशासनाने खासगी संस्थांना चालवण्यासाठी दिल्या पाहिजेत. शाळा खासगी संस्थांना देताना त्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेच्या संचालकांनी आपल्या शाळेत सामावून घेतले पाहिजे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क त्यांनी वसूल करू नये. महापालिका त्या विद्यार्थ्यांना ज्या सुविधा देते त्याच सुविधा त्या संस्थाचालकाने दिल्या पाहिजेत. या विद्यार्थ्यांना वगळून अन्य विद्यार्थ्यांचे प्रवेश संस्थाचालकांनी त्यांच्या धोरणानुसार करावेत,’ असे महापौर म्हणाले.
‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा एक वर्ग आणि अन्य विद्यार्थ्यांचा एक वर्ग असे वर्गीकरण न करता सर्व विद्यार्थ्यांची सरमिसळ करून शिक्षण देणे बंधनकारक करावे लागणार आहे, म्हणजे खासगी शाळांमध्ये ज्या पॅटर्नने शिक्षण दिले जाते त्याच पॅटर्नचे शिक्षण पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळेल व त्यांचा स्तर उंचावेल,’ असे महापौरांनी स्पष्ट केले.

महापालिका शाळांच्या संदर्भातील निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी घ्यावा लागेल. त्यादृष्टीने पदाधिकारी व आयुक्तांशी चर्चा करू.
- भगवान घडमोडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीच्या जलाने छत्रपतींना अभिषेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्रोघोषात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शहरातील पुतळ्याला गोदावरी नदीच्या पवित्र जलाने अभिषेक करून शिवजयंती साजरी करण्यात आली. हा उपक्रम ब्राह्मण महिला मंच व ब्राह्मण सभेतर्फे करण्यात आला.
प्रारंभी ब्राह्मण सभा कार्यालयपासून जल मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घातल्यानंतर सवाद्य कावड मिरवणूक काढण्यात आली, त्यानंतर महिलांच्या हस्ते संत एकनाथ महाराज वाड्यातील ऐतिहासिक रांजणात जलअर्पण करण्यात आले. या सोहळ्यासाठी रेणुकादासशास्त्री गर्गे, प्रसादमहाराज भागवत, अशोकशास्त्री भुसारे, चेतन देव, दत्तागुरू सेवनकर, प्रदीप देशपांडे, शैलेश अंतुले, योगेश गर्गे, प्रमोददेवा, खरे गुरुजी, सखाराम भागवत, सखाराम सेवनकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी, विजय शिवपुरी, गणेश वडवाळीकर, रवी कुलकर्णी, संतोष जोशी, सुदेश कुलकर्णी यांच्या वेदमंत्रघोष केला. शुभांगी सेवनकर, कल्याणी शिवपुरी, वंदना शिवपुरी, कोमल शिवपुरी, वडवाळीकर, जोशी, राणीमामी वाहेगावकर, स्मिता कस्तुरे, शीतल महेशपाठक, सुलभा जोशी, शीला गर्गे, शुभदा आपेगावकर, हेमा कुलकर्णी, लता पेठे, अमृता गर्गे, मजुषा चिंचखेडकर, जोशीकाकू चिंचखेडकर, अंतुले, जयश्री निरखे, छाया देशपांडे, महिला मंचच्या अध्यक्षा सुजाता भंडारी, सचिव संगिता खरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी केले. याप्रसंगी शिवसेना नगरसेवक प्रकाश वानोळे, भाजप शहराध्यक्ष विजय चाटुपळे, महेश जोशी, उपनगराध्यक्षा सुचित्रा जोशी, रमेश पाठक, शरद बीडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवी परीक्षेला आजपासून सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवी परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहेत. पदवी परीक्षांमध्ये विविध अभ्यासक्रमांचे मिळून ३ लाख १८ हजार ४४५ विद्यार्थी परीक्षा देणार अाहेत. ही परीक्षा २४६ केंद्रावर होणार आहे. यंदा बीएस्सी अभ्यासक्रमाच्या परीक्षार्थींची संख्या बीएच्या बरोबरीने आली आहे.
निवडणुकांमुळे या पदवी परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेले. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील बीए, बीएस्सी, बीबीए, बीसीए, एलएलबीसह विविध पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा गुरुवारपासून सुरू होत आहेत. १० एप्रिलपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. परीक्षेतील बैठक व्यवस्था अद्याक्षरांच्या क्रमानुसार असेल. चार जिल्ह्यांतील ३ लाख १८ हजार ४४५ परीक्षार्थी पदवी परीक्षेला बसले आहेत. यंदा बीएस्सीच्या विद्यार्थी संख्येत मोठी वाढ झाली आहे. बीएच्या बरोबरीने ही संख्या आल्याचे चित्र आहे.
पदवी परीक्षांसाठी विद्यापीठाने १७ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. पथकातील सर्व सदस्य हे विद्यापीठ विभाग व शासकीय कॉलेजांमधील आहेत. त्याचबरोबर दीड हजारापेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या परीक्षा केंद्रांवर दोन सहायक परीक्षा केंद्रप्रमखांची (जेसीएस) नेमणूक करण्यात आली आहे.

पदव्युत्तरचे वेळापत्रक पुढे जाणार
विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या पदव्युत्तर परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात येणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार २४ मार्चपासून या परीक्षांना सुुरुवात होणार होती, मात्र काही विषयांच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षा एकत्रित येत आहेत. त्यामुळे हे वेळापत्रक पुढे जाण्याची शक्यता आहे. चार जिल्ह्यांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ९५ केंद्र असून, ६६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथषष्टी यात्रा मैदानात राहटपाळण्यांस बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
सुरक्षेच्या कारणावरून यावर्षी प्रशासनाने यात्रा मैदानात रहाटपाळण्यांना परवानगी नाकारली आहे. पण, रहाटपाळणे नाथषष्ठी यात्रेचे प्रमुख आकर्षण असून त्याशिवाय यात्रेला शोभा येणार नाही. शिवाय व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. रहाटपाळण्यांना यात्रा मैदानापासून एक किलोमीटर दूर दक्षिण काशी मैदानात परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील प्रमुख यात्रा असलेल्या संत एकनाथ षष्ठी महोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. तीन दिवसाच्या उत्सवासाठी आलेले भाविक वारकरी कालाष्टमीनंतर गावाकडे परत जातात. पण, त्यानंतर शहर, परिसरातील गावे व शेजारी तालुक्यातील नागरिकांची खरी यात्रा सुरू होते. कालाष्टमीनंतर जवळपास आठ दिवस म्हणजेच पाडव्यापर्यंत यात्रा सुरू राहते.
कालष्टमीनंतर यात्रेला भेट देणाऱ्यांमध्ये रहाटपाळणे हे प्रमुख आकर्षण आहे. रहाटपाळण्यावर यात्रेतील अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय अवलंबून आहे. पण, पोलिस व महसूल प्रशासनाने सुरक्षेच्या कारणावरून यंदा यात्रा मैदानात रहाटपाळण्यांना परवानगी नाकारली आहे. रहाटपाळण्यांना यात्रा मैदानापासून एक किलोमीटर दूर दक्षिण काशी मैदानात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे १५ दिवसांची यात्रा तीन दिवसाच आटोपण्याची भिती नगराध्यक्ष लोळगे यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय व पोलिस अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे केली आहे.
नाथषष्ठी यात्रेच्या प्रमुख तीन दिवसानंतर, रहाटपाळण्यांचे आकर्षण असते. त्यामुळ मुख्य तीन दिवसांनंतर १५ दिवस चांगला व्यवसाय होतो. यंदा यात्रा मैदानात रहाटपाळणे नसल्यास व्यवसायावर विपरित परिणाम होईल, असे रसवंतीचालक विशाल भोपत यांनी सांगितले.

नगरसेवकांवर आरोप
जिल्हाधिकारी यांचा सहभाग असलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या निगरानीखाली यावर्षी यात्रा होत आहे. त्यामुळे यात्रानिधीतून मलिदा काढण्याचा मार्ग बंद झआला आहे. परिमाणी, काही नगरसेवक व कर्मचारी रहाटपाळण्यांना परवानगी मिळू नये, यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा शहरात आहे.

शहरातील काही विघ्नसंतोषी लोक संत ज्ञानेश्वर उद्यानाप्रमाणे नाथषष्ठी यात्रा संपवण्याचा डाव रचत आहेत. यात्रा मैदानात रहाटपाळण्याना परवानगी न दिल्यास शहराचे व नाथषष्ठी यात्रेचे मोठे नुकसान होणार आहे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
- सूरज लोळगे, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images