Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बळी तो डॉक्टरांना पिळी!

$
0
0


Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT
मागील सात वर्षांत राज्यात शेकडो डॉक्टरांवर हल्ले झाले. मात्र, ‘द महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन अॅक्ट २००९’ नुसार आजपर्यंत एकालाही शिक्षा झाली नाही.
मागच्या केवळ दीड वर्षांत राज्यामध्ये डॉक्टरांवरील मारहाणीच्या किमान ५५ गंभीर घटना घडल्या, तर किरकोळ घटनांची मोजदाद नाही. अलीकडे धुळ्यासह राज्यामध्ये झालेल्या विविध घटनांबरोबरच रविवारी शहरातील घाटीमध्येही मारहाणीची घटना घडली. तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या संरक्षणार्थ ‘द महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन (प्रिव्हेन्शन ऑफ व्हॉयलन्स अँड लॉस टू प्रापर्टी) अॅक्ट २००९’ हा दखलपात्र व अजामीनपात्र कायदा दीर्घ प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आला. या कायद्याअंतर्गत आरोपींना तीन वर्षापर्यंतच्या सक्तमजुरीची व ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, दुर्दैवाने या कायद्याअंतर्गत संपूर्ण राज्यात आतापर्यंत एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही. शिक्षा सोडाच, या कायद्याअंतर्गत गुन्हादेखील नोंदविला जात नाही, अशी एकंदर स्थिती आहे. फार कमी प्रकरणात हे कलम लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
घाटीमध्ये रविवारी (१९ मार्च) झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींवर मंगळवारपर्यंत केवळ कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा आणणे) व कलम ५०४ (सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. धक्कादायक बाब म्हणजेच अशा प्रकरणांमध्ये ‘डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट’खाली गुन्हा दाखल करण्यासाठी व खटला चालवण्यासाठी राज्य शासनाकडून पोलिस प्रशासनावर कुठलाही दबाव नाही, असेही स्पष्ट झालेले आहे.

‘ऑडिट’नुसार रक्षक एक तृतीयांश
मुंबई हायकोर्टाच्या मागील आदेशानुसार ‘महाराष्ट्र सिक्युरिटी कॉर्पोरेशन’द्वारे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील सुरक्षा रक्षकांचे लेखापरीक्षण करण्यात आले व ऑडिटनुसार प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरक्षा रक्षक कमी असल्याचेही स्पष्ट झाले होते. याच लेखापरीक्षणानुसार घाटी रुग्णालयामध्ये १३७ सुरक्षा रक्षक असणे गरजेचे असताना प्रत्यक्षात केवळ ६३ रक्षक कार्यरत आहेत. यातील ९ रक्षक शासकीय कर्करुग्णालयामध्ये, तर काही रक्षक महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. याचाच अर्थ घाटीमध्ये ४५ ते ५० रक्षक म्हणजेच ‘ऑडिट’नुसार केवळ एक तृतीयांश रक्षक कार्यरत आहेत. मात्र हायकोर्टाच्या आदेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी का केली नाही, हा सवाल उपस्थित होत आहे.

‘आयएमए’, ‘एमएपीपीएम’चा संप सुरू
निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठींबा देत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’सह (आयएमए) ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट’तर्फे (एमएपीपीएम) बुधवारपासून (२२ मार्च) संप पुकारण्यात आला आहे. संप काळात राज्यातील छोटे-मोठे क्लिनिक तसेच रुग्णालयांच्या ओपीडी, दैनंदिन तपासण्या बंद राहणार असून, सर्व तात्कालिक रुग्णसेवा सुरू राहतील, असे दोन्ही संघटनांच्या वतीने कळविण्यात आले आहे. दरम्यान, घाटीतील निवासी व आंतरवासिता डॉक्टरांचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. प्रणय जांभूळकर यांनी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कळविले.

‘डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट’खाली आजपर्यंत एकही शिक्षा झालेली नाही. गुन्हादेखील दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. या कायद्याखाली आरोपींवर गुन्हे दाखल होऊन शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची पूर्वीपासून मागणी आहे. हल्ल्यांच्या निषेधार्थ आम्ही आजपासून आंदोलन करणार आहोत. – डॉ. अशोक तांबे, राज्य अध्यक्ष, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांच्या दक्षतेमुळे विद्यार्थ्याचा जीव वाचला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भल्याभल्या गुन्हेगारांची बोलती बंद करणारे पोलिस हळवे आणि तितकेच लाघवी असतात. याच गुणांवर पुंडलिकनगर पोलिसांनी आत्महत्या करण्याच्या मानसिकेत असलेल्या एका दहावीच्या विद्यार्थ्याचा जीव वाचवला. गारखेड्यात बुधवारी ही घटना घडली.
दहावी परीक्षेनिमित्त सर्व परीक्षा केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गारखेडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय केंद्रावरही पुंडलिकनगर पोलिसांचा बंदोबस्त आहे. सकाळी दहाच्या सुमारास विद्यार्थ्यांना केंद्रात तपासणी करून सोडले होत जाते. त्यावेळी पोलिस कर्मचारी राजूसिंग सुलाने हे कर्तव्य बजावत असताना एका १५ वर्षीय विद्यार्थ्याच्या खिशात चिठ्ठी दिसली. कॉपी असेल अशी शक्यता लक्षात घेत, त्यांनी त्या कागदावर नजर फिरवली तर ती सुसाइड नोट निघाली. त्यात आई व मामा मारहाण करतात, त्यामुळे आत्महत्या करत आहे, असा संदेश होता. सुलाने यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. थोडे बाजुला जात त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिस निरीक्षक ए. के. मुदीराज यांना दिली. त्यानंतर मुलाचे पेपरचे नुकसान होऊ नये, म्हणून जणू काहीच घडले नाही, असे दाखवत कर्मचाऱ्यांनी त्यास शुभेच्छा देत केंद्रात सोडले. त्यानंतर निरीक्षक मुदीराज यांच्या आदेशाप्रमाणे त्यावर नजर ठेवली. परीक्षा संपल्यानंतर पोलिसांनी त्या मुलाशी मैत्री करत विश्वास संपादित करून मुदीराज यांच्याकडे आणले. त्यास जेवण दिले व त्यानंतर त्याच्या आईला बोलवून घेण्यात आले. मुदीराज यांनी त्या मुलासह त्यांच्या आईचे समुपदेशन केले आणि आत्महत्येच्या मानसिकेत गेलेल्या त्या मुलाचे मन परिवर्तन केले आणि त्यास मिठाई देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

...अन् गुंता सुटला!
त्या मुलाची आई माळीकाम करते. वडील टेम्पोचालक आहेत. मुलगा अभ्यासात हुशार असून सनदी अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. अभ्यासावरून पालक रागविल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता, अशी माहिती चौकशीत समोर आली.

प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेत विद्यार्थी व आईचे समपुदेशन केले. विद्यार्थ्याने असा कोणाही विचार करणार नाही, अभ्यासावर अधिक लक्ष केंद्र‌ित करेन असे सांगितले. - ए. के. मुदीराज, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हाला का डावलले; उपमहापौर भडकल्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वाट न पाहता जलदिनाचा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल उपमहापौर स्मिता घोगरे बुधवारी चांगल्याच भडकल्या. त्यांनी महापौर व आयुक्तांना ‘आम्हाला डावलण्याचे कारण काय?’ असा जाब विचारला. ‘महापौरांच्या मर्जीनेच काम करायचे असेल तर करा,’ असे सांगत बदलत्या राजकारणाच्या अनुषंगाने इशाराच दिला.
क्रांतिचौक येथील जलकुंभाच्या परिसरात सकाळी अकरा वाजता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ऐनवेळी जलदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी नऊ वाजता पदाधिकारी व आयुक्तांना फोन करून कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यानुसार महापौर भगवान घडमोडे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया व विरोधीपक्षनेते अय्युब जहागिरदार कार्यक्रमाला वेळेवर आले. कार्यक्रमही वेळेवर सुरू करण्यात आला. कार्यक्रम अर्ध्यावर आल्यानंतर उपमहापौर स्मिता घोगरे कार्यक्रमस्थळी आल्या. त्यांच्या बरोबर सभापती मोहन मेघावाले, सभागृहनेते गजानन मनगटे, गटनेते मकरंद कुलकर्णी देखील होते. कार्यक्रम संपल्यावर घोगरे यांनी महापौर व आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली. ‘आम्हाला येऊ द्यायला हवे होते, थोडी वाट का पाहिली नाही. आम्हीपण महापालिकेचे महत्वाचे पदाधिकारी आहोत. आम्हालाही तेवढेच अधिकार आहेत. आम्हाला डावलण्याचे कारण काय,’ असा सवाल त्यांनी केला. महापौर व आयुक्तांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘दुपारी तीन वाजता डॉ. आंबेडकर संशोधन केंद्रात आणखी एक कार्यक्रम आहे, तेथे वेळेवर या,’ असे आयुक्तांनी घोगरे यांना सांगितले.
महापौर व आयुक्त डॉ. आंबेडकर संशोधन केंद्रात दुपारी तीन वाजता वेळेवर आले, पण उपमहापौर आल्या नाहीत. कार्यक्रमाच्या आयोजकांनी उपमहापौरांना फोन केला व लवकर या असा निरोप दिला, पण त्यांना येण्यासाठी पाऊणतास उशीर झाला. त्या येईपर्यंत संशोधन केंद्रातला कार्यक्रम सुरू झाला नाही. या संदर्भात पत्रकारांनी उपमहापौर घोगरे यांना विचारले असता त्यांनी घडलेल्या घटनेला दुजोरा दिला. ‘मी पण महत्वाची पदाधिकारी आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी त्यांनी आपली वाट पहायला हवी होती. वाट न पाहता त्यांनी जलदिनाचा कार्यक्रम सुरू केला. शिवसेनेचे आम्ही चारही पदाधिकारी एकत्रच होतो. चौघांनाही डावलून कार्यक्रम सुरू करण्यात आला.’

पाऊणतास ताटकळले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एनजीओंच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पल्स पोलिओ मोहिमेत महापालिकेला सहकार्य केलेल्या एनजीओंच्या प्रतिनिधींचा या वेळी निमंत्रित करण्यात आले होते. नियोजित वेळेपेक्षा उपमहापौर उशीरा आल्यामुळे या प्रतिनिधींना पाऊणतास ताटकळत बसावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादप्रकरणी समितीची स्थापना

$
0
0

औरंगाबाद : खुलताबाद येथील कोहिनूर कॉलेजमध्ये दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देण्याच्या प्रकाराच्या चौकशीसाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. परीक्षा विभागाने मंगळवारी अहवाल सादर केला होता. एका प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षाच्या मुलाचे हे प्रकरण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्याक्रमांच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरू आहेत. त्यात कोहिनूर कॉलेजमध्ये एका प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्षाच्या मुलाच्या नावावर दुसरा विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती परीक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर परीक्षा विभागाच्या पथकाने केंद्रावर भेट दिली. त्यावेळी संबंधित विद्यार्थी तेथे उपस्थित नव्हता. पथकाने याप्रकाराचा तपास केला. त्याचा अहवाल मंगळवारी कुलगुरूंना सादर केला. त्यानंतर कुलगुरूंनी अहवाल वाचल्यानंतर समिती नेमल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत डॉ. दिलीप खैरनार, डॉ. विक्रम खिलारे यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अहवालात गुपिते उघड
परीक्षार्थीच्या नावावर दुसराच परीक्षा देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परीक्षा नियंत्रकांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. परीक्षा केंद्रावरील तपासणी केलेला अहवाल परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांनी कुलगुरूंना सादर केला. परीक्षा नियंत्रकांना भेटीदरम्यान अनेक संघटनांकडून फोन येत असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे या अहवाल नेमके काय, याबाबत चर्चा रंगली आहे. अहवालात परीक्षा केंद्रातील काही गुपिते समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंटणखान्यावर छापा; तीन तरुणींची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विमानतळलगतच्या स्वराजनगर येथील एका कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा मारून तीन तरुणींची सुटका केली. याप्रकरणी कुंटणखानाचालक महिला व एका ग्राहकास पकडण्यात आले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कुंटणखानाचालक महिलेस कोर्टाने २६ मार्च रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
स्वराजनगरमधील एका घरात १८ ते २० वयोगटातील तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्याआधारे पोलिस पथकाने रात्री दहा वाजता पथकाने सापळा रचला. एका व्यक्तीसह एका पोलिस कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्याठिकाणी कुंटणखाना चालविला जातो, याची खात्री पटताच छापा टाकला. या ठिकाणी तीन तरुणींसह कुंटणखानाचालक महिला, एक ग्राहक आढळून आले. पोलिसांनी त्या तीन तरुणींची सुटका केली. या तरुणी शहर परिसरातील रहिवासी असून, त्यांची रवानगी शासकीय महिला संस्थेत करण्यात आली आहे,असे पोलिसांनी सांगितले. उपायुक्त संदीप आटोळे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्चना पाटील, उपनिरीक्षक विजय पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हा कुंटणखाना काही दिवसांपासून सुरू असावा, अशी माहिती समोर आली आहे. घरझडतीत मोबाइल, रोख १२ हजार रुपये व अन्य साहित्य सापडले. येथे ग्राहकांसाठी विशेष खोल्या तयार केलेल्या होत्या. या महिलेच्या दोन बँक खात्यांत सुमारे सव्वा तीन लाख रुपये व तिच्या नावावर काही एकर शेजजमीन असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या त्या महिलेला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अाधुनिक तंत्राची कास धरा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नाट्यशास्त्र विभागने बदलत्या काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरावी, असे मत ज्येष्ठ नाटकाकार, समीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे पहिले विभागप्रमुख कमलाकर सोनटक्के यांनी व्यक्त केले.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘शास्त्रीय नाट्य महोत्सवा’चे उद्‍घाटन बुधवारी संध्याकाळी विद्यापीठाच्या नाट्यगृहात सोनटक्के यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी नाट्यशास्त्रविभाग प्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, प्रभारी अधिकारी सतीश पाटील, एनएसडीचे अनुपकुमार बारुआ यांची उपस्थिती होती.
यावेळी सोनटक्के म्हणाले, मी या विद्यापीठाच्या नाट्यशास्त्रविभागाचा प्रमुख होतो. त्यानंतर अनेक विभागप्रमुख, प्राध्यापक, व्याख्याते यांनी यासाठी मेहनत घेतली. हा विभाग एवढी प्रगती करू शकेल, असे त्याकाळी कोणाला वाटले नव्हते. या विभागाने चार पिढ्यांना दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री व कलाकार दिले. नाट्यप्रेमाने झपाटलेल्या माझ्यासारख्या एका शिक्षकाने साडेचार दशकांपूर्वी सुरू केलेल्या विभागाने नावलौकिक मिळविला आहे.’
डॉ. शेवतेकर यांनी प्रास्ताविक केले.नवीद इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. अनुपकुमार बरुआ यांनी आभार मानले. उद्‍घाटनानंतर प्रसिद्ध रंगकर्मी, संगीतकार, चित्रकार आणि अभिनेते रतन थियाम यांनी दिग्दर्शित केलेले ‘उरुभंगम’ हे महाकवी भास लिखित नाटक मणिपूर येथील कोरस रिपर्टरी थिएटरने सादर केले.

पडदा उघडलाच नाही
महोत्सव सुरू होताना विश्वनाथ दाशरथे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नांदी सादर केली. त्यावेळी स्वयंचलित पद्धतीत पडदा उघडण्याची सोय अाहे, पण हा पडदा तांत्रिक अडचणींमुळे उघडलाच नाही. यामुळे बराच गोंधळ झाला. नाट्यशास्त्र विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक रुस्तम अचलखांब यांनी, ‘शिडी आणा आणि पडदा उघडा. अडचण दूर करा,’ असे ओरडून सांगितल्यावर तांत्रिक अडचणी दूर केल्या गेल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारख्याच प्रश्नांमुळे विद्यार्थी संभ्रमात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत बुधवारी राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न अनेकवेळा विचारण्यात आला. सारख्याच प्रश्नामुळे विद्यार्थी गोंधळात पडले. समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतही असाच काहीसा गोंधळ झाल्याची चर्चा आहे.
विद्यापीठ पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ मार्चपासून सुरू आहेत. तोतया परीक्षार्थीचे प्रकार उडघकीस अाल्यानंतर पदवी परीक्षेत आज चक्क एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने अनेकवेळा विचारल्याचा प्रकार समोर आला. बुधवारी बीए तृतीय वर्षातील ‘राजकीय विचारप्रणाली’ या विषयाचा पेपर होता. त्यात ‘समाजवाद म्हणजे काय’ हा प्रश्न अनेकदा वेगवेगळ्या स्वरुपात विचारला आहे. रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे द्या ते सविस्तर उत्तरे लिहा यापर्यंत हा प्रश्न आला आहे. ५० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत अनेकदा एकच प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थीही संभ्रमात होते. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांमध्ये या प्रकाराची चर्चा होती.

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न?
राज्यशास्त्रच्या प्रश्नपत्रिकेत एकच प्रश्न अनेकदा आला यावरच हा गोंधळ थांबला नाही, तर काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरीलही विचारण्यात आल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. प्रश्न क्रमांक ‘२ ब’मध्ये थोडक्यात उत्तरे लिहा, यामध्ये कोणतीही दोन प्रश्न सोडवायचे होते. त्यातील प्रश्न हे अभ्यासक्रमाबाहेरील असल्याची चर्चा होती.

‘पेपर सेटर’वर कारवाई?
प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारचा त्रुटी समोर आल्याची ही पहिली घटना आहे. या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पेपर सेटरवर विद्यापीठाचा परीक्षा विभाग कारवाई करणार का, असा प्रश्न आहे. यापूर्वीच्या परीक्षेतही असे प्रकार समोर आले होते. प्रश्नपत्रिकेतील अशा त्रुटींमुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होते, परंतु दोषींवर कारवाईबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष होते, असा अनुभव आहे.

‘समाजशास्त्र’मध्येही गोंधळ
राज्यशास्त्राबरोबर समाजशास्त्र विषयाच्या ‘अर्बन सोशॅलॉजी’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांची पातळी हा विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय होता. प्रश्नपत्रिकेत नेमके काय विचारायचे होते? असेही काही प्रश्नाबाबत गोंधळल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉ परीक्षेला तोतया विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षेत एक तरुण दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देत असल्याचा प्रकार बुधवारी दुपारी व्ही. एन. पाटील लॉ कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर उघड झाला. पकडण्यापूर्वीच तो पसार झाला. सुदर्शन अशोकराव पारधे याच्या नावावर तो परीक्षा देत होता. या प्रकरणी या विद्यार्थ्यासह अनोळखी तरुणावर मुंकुदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देण्याच्या हा तिसरा प्रकार उघडकीस आला आहे.
विधी अभ्यासक्रमात आज ‘आब्रिट्रेशन कौन्सिल अँड एडीआरएस’चा पेपर होता. सिडकोतील व्ही. एन. पाटील परीक्षा केंद्रावर सहकेंद्रप्रमुख डॉ. महेश खरात हे परीक्षा केंद्रावर फिरत होते. हॉल क्रमांक ३५मध्ये जोत्स्ना जेम्स अंबिलढगे पर्यवेक्षक म्हणून काम करीत होत्या. डॉ. खरात यांनी डेक्स नंबर ५वर बसलेल्या विद्यार्थ्यास नाव विचारले. त्याने नाव सोनू सांगितले. त्यावर खरात यांनी त्यास, ‘पूर्ण नाव काय आहे,’ असे विचारत त्याचे हॉलतिकीट हातात घेतले. त्याने, पारधे सुदर्शन अशोकराव, असे सांगितले. त्यांनी, ‘तू कोणत्या विषयाचा पेपर देत आहेस,’ असे विचारले असता, त्याला पेपरचे नाव सांगता आले नाही. यावर खरात यांना संशय आल्याने ते बाहेर आले. त्यांनी ही बाब संबंधित कॉलेजच्या प्राध्यापकांना सांगितली. तोपर्यंत विद्यार्थी हॉलमधून पळून गेला. त्याच्या टेबलावर उत्तरपत्रिका सिरिअल क्रमांक ५१२४८६३७३९ व त्याचे हॉलतिकीट आढळले. हा विद्यार्थी पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही बाब पोलिसांना समजली होती. त्यामुळे पीएसआय गोरख चव्हाण व त्यांची टीम तेथे पोचली. परीक्षा नियंत्रक डॉ. दिंगबर नेटके यांच्यासह परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राला भेट देत पाहणी केली. सायंकाळी उशिरा संबंधित परीक्षार्थी व अनोळखी विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. लॉ कॉलेजच्या प्राध्यापक सबिया युसूफ शेख यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

मी हॉलमध्ये विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट पाहत होतो. या विद्यार्थ्याला नाव सांग म्हणालो, त्याने सोनू सांगितले. हॉलतिकीट हातात घेऊन परत विचारले, त्यावेळी शंका आली. पेपरचे नाव त्याला सांगता आले नाही. त्यानंतर त्याला बाहेर बोलावले, तर तो बाहेर येऊन पायऱ्या उतरून कॉलेजबाहेर पळून गेला. त्याला आम्ही त्याला पकडण्यासाठी धावलो, तोपर्यंत तो पसार झाला होता. त्याच्या जागेवर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तशीच होती.
- डॉ. महेश खरात, सहकेंद्रप्रमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीज बिलासाठी जूनपर्यंत बडगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरण कार्यालयाने थकित वीज बिल वसुलीसाठी सुरू केलेली महामोहीम येत्या जून महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. एक मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल २०९७ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. बुधवारी औरंगाबाद परिमंडळात ४३३ ग्राहकांचा वीजपुरवठा ५९ लाख ३८ हजार रुपयांच्या थकबाकीसाठी कायमस्वरुपी खंडित करण्यात आला.
औरंगाबाद शहरात थकबाकीदारांविरोधात बुधवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत १९२४ ग्राहकांकडून १ कोटी ५२ लाख ९१ हजार रुपये वसूल करण्यात आले. पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सिलोड, पिशोर, फुलंब्री, सोयगाव परिसरातील २१२४ ग्राहकांकडून ७७ लाख ९१ हजार रुपये वसूल करण्यात आले. अनेक वेळा सूचना देऊन, नोटीस बजावूनही दाद न देणाऱ्या ४३३ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केला. त्यांच्याकडे ५९ लाख ३८ हजार रुपये थकबाकी आहे. त्यांचे मीटर व वायर जप्त करण्यात आले. जालना जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत ३७६ ग्राहकांकडून वीज बिलाचे १२ लाख ४२ हजार रुपये वसूल करण्यात आले.
या कारवाईत २२ दिवसांत २०९७ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला. ही वसुली मोहीम जून महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिले.

नगरसेवकाची वसुलीसाठी मदत
महावितरण छावणी उपविभागातील सादातनगर, राहुलनगर येथील नगरसेवक नावीद रशीद यांच्या कार्यालयात औरंगाबाद शहर मंडळचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, औरंगाबाद शहर विभाग-एकचे कार्यकारी अभियंता ए. पी. पठाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर यांच्या उपस्थितीत ग्राहकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरसेवक नावीद रशीद यांच्याकडे थकबाकीदारांची यादी देण्यात आली. त्यांनी थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

आठ आकडेबहाद्दरांवर गुन्हे
कन्नड तालुक्यातील वडनेर, वडनेरतांडा, दौलागड या गावात थकबाकीमुळे काही ग्राहकांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, मात्र आठ जण परस्पर आकडे टाकून विजेचा वापर करताना आढळून आले. त्यांच्यावर भरारी पथकाने छापा टाकून वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

...तर कठोर कारवाई
वीज बिल वसुली मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. बिलाचा भरणा केल्याशिवाय वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार नाही. थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणच्या परस्पर वीजपुरवठा जोडून घेतल्यास संबंधितांवर विद्युत कायदा २००३नुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांच्या ४० शाखा एक एप्र‌िलपासून बंद

$
0
0

Dhananjay.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @dhananjaykMT
औरंगाबाद : स्टेट बँकेच्या ५ ‌सहयोगी बँकांच्या विलिनीकरण प्रक्रियेला राष्ट्रीयपातळीवर १ एप्र‌िलपासून सुरुवात होणार असून, त्यामुळे मराठवाड्यातील सुमारे ४० शाखा कायमच्या बंद होणार अाहेत. या बँकांतील सुमारे ४००हून अधिक अधिकारी, कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बँकांच्या विलिनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या (एसबीएच) ३२ ते ३३ शाखा बंद होतील. पतियाळा बँकेच्या (एसबीपी) चार ते पाच आणि जयपूर अँड बिकानेर बँकेची (एसबीबीजे) एक शाखा बंद होणार आहे. औरंगाबादला स्टेट बँक ऑफ इंडियाचे मराठवाडा पातळीवरील सर्कल ऑफिस असेल. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये रिजनल ऑफिस आणि लातूर, नांदेड, बीड येथे झोनल ऑफिस असतील. विलिनीकरणाचे एक मोड्युल ऑफिस औरंगाबादमध्ये असेल, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

भागधारकांना एसबीआयचे शेअर्स
एसबीबीजेच्या भागधारकांना दर दहा शेअर्सच्या मोबदल्यात एसबीआयचे २८ शेअर्स दिले जाणार आहेत. एसबीएम (म्हैसूर बँक) आणि एसबीटीच्या (त्रवणकोर बँक) शेअर्सधारकांना दर दहा शेअर्सच्या मोबदल्यात एसबीआयचे २२ शेअर्स दिले जातील. एसबीपी आणि एसबीएचसाठी शेअर्स स्वॅप किंवा रोख रक्कम दिली जाणार नाही. कारण या दोन्हींवर एसबीआयची पूर्ण मालकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता वॉर्डातच कचऱ्यावर प्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वॉर्ड कार्यालयनिहाय प्रकल्पांची उभारणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रकल्प किमान दहा टन क्षमतेचा असेल. त्यामुळे वॉर्ड कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध वॉर्डांतील कचऱ्यावर तेथेच प्रक्रिया केली जाईल. या उपक्रमामुळे कचरा डेपोवर जाणाऱ्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर घट होईल, असे मानले जात आहे.
महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी मंगळवारी स्थायी समितीला नवीन वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. घनचकरा व्यवस्थापनासाठी २४ कोटी ८३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातून रोज ४५० टन कचरा जमा केला जातो. हा कचरा नारेगाव येथील कचरा डेपोमध्ये नेला जातो. नारेगाव येथील कचरा डेपो स्थलांतर करण्याचा प्रशासनाने खूप प्रयत्न केला. चार ग्रामपंचायतींकडे यासंदर्भात संपर्क साधला, पण महापालिकेला त्या ग्रामपंचायतींचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे कचराडेपो स्थलांतरित करता आलेला नाही.
नारेगाव येथील डेपोवर रोज सध्याच्या तुलनेत कमी कचरा जमा केला जावा, असा प्रयत्न येत्या काळात केला जाणार आहे. त्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प वॉर्ड कार्यालयनिहाय उभारण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
एक प्रकल्प पाच ते दहा टन क्षमतेचा असेल. एका वॉर्ड कार्यालयांतर्गत दहा ते तेरा वॉर्डांचा समावेश आहे. या वॉर्डांमधून रोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाणार आहे. त्यातून खत निर्मिती व बायोगॅस निर्मितीचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. हे प्रकल्प ‘बायो मिथेन थर्मल कंपोस्टिंग’चे आहेत, असे बकोरिया यांनी स्पष्ट केले.

प्रोत्साहनपर बक्षीस योजना
घनकचरा व्यवस्थापनात सहभागी होऊन स्वच्छ शाळा, स्वच्छ महाविद्यालय व स्वच्छ ले आउट ठेवणाऱ्या संस्थांना पालिकेतर्फे प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची योजना पालिकेने आखली आहे. अशा योजनेमुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसह संस्थाचालक, सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकेतील, असा विश्वास बकोरिया यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू विक्रेत्यांवर हद्दपारीची तलवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रेते व विनापरवाना बार चालकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. एकूण ७४ अवैध दारू विक्रेत्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस आयुक्त व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच विना परवाना ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था करणाऱ्या सिडको एन-६ येथील हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात आली.
शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री करण्यात येत असून पोलिस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फ कारवाई केली जाते. पण, यावेळी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे. शहर व जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या ७४ जणांची यादी तयार करण्यात आली आहे. शहरातील दारू विक्रेत्यांविरुद्धचे हद्दपार प्रस्ताव पोलिस आयुक्तालय व ग्रामीण भागातील दारू विक्रेत्यांचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत.

बजरंग चौकात छापा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मंगळवारी बजरंग चौकातील एका इमारतीच्या तळमजल्यातील हॉटेल जय शिवराज येथे काही ग्राहक परवाना नसताना मद्यप्राशन करताना आढळले. पथकाने छापा टाकताच ग्राहक पसार झाले. पण, हॉटेलचालक प्रकाश गणपतराव बहिरट (वय ३२, रा. सिडको एन-७) याला ताब्यात घेण्यात आले. हॉटेलमधील टेबलवरील दारूच्या बाटल्या, दारूच्या रिकाम्याच्या बाटल्यांची पोती, हॉटेलचा भाडेपट्टा करार आदी साहित्य पथकाने जप्त केला. ही कारवाई अधीक्षक सी. बी. राजपूत, उपअधीक्षक शिवाजी वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रावसाहेब कोरे, दुय्यम निरीक्षक गणेश पुसे, आनंद शिंदे, अशोक कोतकर, शेख निसार, विनायक चव्हाण, संजय गायकवाड, बालाजी चालनिवाड यांनी केली.

शहर व जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अवैध दारू विक्रीच्या सराईत गुन्हेगारांचे हद्दपार प्रस्ताव पाठवण्यात आले. यामध्ये एकूण ७४ अवैध विक्रेत्यांचा समावेश आहे.
सी. बी. राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या मुलींची पाठलाग करून छेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीच्या परीक्षेसाठी खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींची छेड काढल्याचा प्रकार बुधवारी बुधवारी दुपारी सोयगाव-जरंडी रस्त्यावरील फाट्यावर घडली. याप्रकरणी विद्यार्थिनींच्या सामहिक तक्रारीवरून आमखेडा येथी दोघांविरुद्ध सोयगाव पोलिस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडी येथील १० शालेय विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेसाठी सोयगावला येथे येतात. हर्षल भगवान अस्वार (वय २२) व मुन्ना पाटील (वय २३) हे दोन तरूण त्यांचा पाठलाग करत होते. परीक्षा केंद्रात प्रवेशपत्र तपासणीवेळी त्यांच्यासडे एकटक पाहणे, पेपर संपल्यानंतर विद्यार्थिनींच्या खासगी वाहनामागे मोटारसायकलने पाठलाग करून त्रास देत होते. त्यांनी बुधवारी पाठलाग करत वाहनात बसलेल्या एका मुलीच्या हातातील चिप्सचे पाकिट हिसकावून अश्लिल शेरेबाजी केल्याचा प्रकार माळेगाव (पिंपरी) फाट्याजवळ घडला. त्यानंतर विद्यार्थिनींनी सोयगाव पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक संजय सहाने यांना घडलेला प्रकार सांगितले. पोलिसांनी सामूहिक तक्रार घेवून हर्षल अस्वार, मुन्ना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अस्वार यास अटक केली. मुन्ना पाटील पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक जळगावला रवाना झाले आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना, काँग्रेसला प्रत्येकी दोन पदे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आता विषय समिती सभापतिपदे मिळविण्यासाठी शिवसेना-काँग्रेसमधील सदस्यांमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेकडे अर्थ, बांधकाम व महिला, बालकल्याण तर काँग्रेसकडे शिक्षण, आरोग्य व समाजकल्याण समितीची सभापतिपदे जाऊ शकतात. या पदांवर संधी मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसने युती करून सत्ता मिळविली. दोन पदाधिकारी निवडीनंतर आता २ एप्रिलपर्यंत विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी दोन सभापतिपदे येतील. शिवसेनेच्या वाट्याला अर्थ व बांधकाम तसेच महिला व बालकल्याण ही दोन सभापतिपदे तर काँग्रेसकडे शिक्षण व आरोग्य आणि समाजकल्याण सभापतिपदे मिळतील. शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी अॅड. देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना संधी दिल्याने कन्नड व पैठण तालुक्यातील सदस्यांना साहजिकच झुकते माप द्यावे लागणार आहे. अर्थ व बांधकाम सभापतिपदावर विलास भुमरे यांची वर्णी लागू शकते. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी कन्नडच्या शुभांगी काजे यांना संधी दिली जाऊ शकते. अध्यक्षपदासाठी काजे यांचे नाव अखेरपर्यंत चर्चेत होते. पैठणमधून सर्वाधिक आठ सदस्य निवडून आल्याने दोन्ही सभापतिपदे पैठणलाच मिळावीत, अशीही चर्चा शिवसेनेतील एका गटात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोणाची निवड करायची यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना निश्चितच योग्य तो विचार करावा लागणार आहे.
काँग्रेसचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. औरंगाबाद तालुक्यातून सर्वाधिक सदस्य निवडूनही उपाध्यक्षपद न मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून शिक्षण व आरोग्य सभापतिपदासाठी किशोर बलांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. समाजकल्याण सभापतिपदही औरंगाबाद तालुक्याकडे दिले जाऊ शकते. अर्थात याचा निर्णय दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी घेतील पण तूर्तास पुढचा आठवडाभर नावांची चर्चा मात्र होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक फोडेणारे दोघे पैठणमध्ये जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील नवगाव येथील एसबीएच बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना पैठण पोलिसांनी २४ तासांत मुद्देमालासह जेरबंद केले. या चोरट्यांकडून चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री नवगाव येथील स्टेट बँके ऑफ हैदराबाद शाखेच्या प्रमुख दरवाजाचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. चोरट्यांनी बँकेची स्ट्राँग रूम तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आल्याने बँकेतील बारा हजार रुपये किमतीचे कंप्युटरचे चार जूने मॉनिटर चोरून नेले होते. बँकेचे मेनेजर दीपक यशपालसिंग चौधरी यांच्या फिर्यादीवरून सोमवारी याप्रकरणी पैठण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान बँकेतील सीसीटीवी फुटेज तपासले असता पोलिसांना दोन चोरट्यापैकी नवगाव येथील दत्ता हंसराज तांबे या चोरट्याची ओळख पटली. दरम्यान, चोरट्यांना अटक करण्यासाठी, ग्रामीण पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी व उपविभागीय पोलिस अधिकारी बचनसिंग यांच्या मार्गदर्शनाख़ाली पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी पोलिस कर्मचारी आर. बी. जावले व किरण गोरे यांचे पथक स्थापन केले. दोन्ही चोरटे गेवराई तालुक्यातील कुरणपिंपरी येथे लपल्याची माहिती पथकाला मिळताच पथकाने दत्ता हंसराज तांबे व आसाराम विष्णू झेंडेकर या दोघांना सापळा रचून अटक केली. दोन्ही चोरट्यांकडून चोरीतील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चोरीच्या इतर घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी व्यक्त केली.

सीसीटीव्हीची भीती
बँक फोडल्यानंतर स्ट्राँग रूममध्ये प्रवेश करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर, बँकेबाहेर जाताना आपण बँकेतील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे चोरट्याच्या लक्षात आले. आता कम्प्युटर मध्ये दिसणार म्हणून कम्प्युटरचे मॉनिटर चोरून नेल्याची माहिती चोरट्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमाफीसाठी रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बुधवारी नागपूर-मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार आर. एम. वाणी यांनी केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
शिवसेनेच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी कर्जमाफीविषयी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी नायब तहसीलदार दीपाली खेडेकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख आनंदीबाई अन्नदाते, अॅड. आसाराम रोठे, संजय निकम, एल. एम. पवार, सलीम वैजापुरी, प्रशांत शिंदे, विठ्ठल डमाळे, अमीर सय्यद यांची भाषणे झाली. जिल्हा परिषद सदस्य प्रा. रमेश बोरनारे, अविनाश गलांडे, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, साहेबराव औताडे, लिमेश वाणी, रमेश सावंत, भीमाशकर तांबे, घनश्याम वाणी, सचिन वाणी, किशोर कोळेकर, मनाजी मिसाळ, अशोक निखाडे, प्रमोद कुलकर्णी आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बरखास्त मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांची धरपकड

$
0
0


औरंगाबाद : जिल्हा कार्यकारिणी बरखास्त असतानाही मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत बुधवारी अॅड श्रीहरी अणेंचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी गुरुवारी महसूल प्रबोधनीकडे धाव घेतली. यावेळी आठ कार्यकर्त्यांनी ताब्यात घेत पोलिसांनी नंतर सोडून दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव संदीप कुलकर्णी, मनसेचे माजी शहराध्यक्ष बिपीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे कार्यकर्ते खोकडपुरा येथील महसूल प्रबोधिनीसमोर जमा झाले होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती. शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलिसांच्या वाहनात बसवून त्यांची रवानगी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संदीप कुलकर्णी, बिपीन नाईक, चेतन पाटील, आकाश गोंडे, अरविंद शेलार, चंदू नवपुते, दीपक पवार, महेश डोंगरे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये ‘डिफरन्स’ राहिलाच नाही ः ढवळे

$
0
0


औरंगाबाद : ‘पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे म्होरके सामील झालेत. पक्षाने जिल्हा परिषद निवडणुकीत बेरजेचे गलिच्छ राजकारण केले. शिवाय इतर राज्यातही पैशांचा वापर केला. यामुळे भाजपमध्ये आता डिफरन्स काहीच राहिले नाही,’ अशी बोचरी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अशोक ढवळे यांनी गुरुवारी (२३ मार्च) पत्रकार परिषदेत केली.
ढवळे म्हणाले, ‘भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उत्तर प्रदेश निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कब्रस्थान’ आणि ‘शमशान’ असे दोन समाजामध्ये वैमनस्य निर्माण करणारे वक्तव्य केले. अमित शहा यांनी ‘कसाब’ शब्दप्रयोग केल्यानेही धार्मिक ध्रुवीकरण झाले. यादवेत्तर ओबीसींना एकत्र करून त्यांना यादवांविरोधी लढवले, तर जाटवेत्तर दलित समाजाला एकत्र करून बहुजन समाज पक्षाविरुद्ध लढवले, अशा पद्धतीचे जातींचे समिकरण भाजपने उत्तरप्रदेश निवडणुकीत मांडले. केवळ उत्तरप्रदेशातच नाही तर मणिपूर व गोव्यातही बहुमत दुसऱ्या पक्षाकडे असताना भाजपने पैशांचा वापर करून सत्ता स्थापन केली. मोदी सरकार आल्यानंतर देशामध्ये मोठ्याप्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत आहेत. नरेगाची वाताहात झाली असून शहरांमध्ये रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे’ असा आरोप ढवळे यांनी केला. पत्रकार परिषदेसाठी जिल्हा सचिव प्रा. पंडित मुंढे, अॅड. भगवान भोजने, भाऊसाहेब झिरपे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...‘हे शुभारंभ हो शुभारंभ’ने गणगौर उत्साहात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पारंपरिक वेशभूषा व राजस्थानी गीतांवर ताल धरत खंडेलवाल महिला मंडळाने गुरुवारी गणगौर बिंदोरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. कलश मंगल कार्यालय, उस्मानपुरा सर्कलदरम्यान ‌मिरवणूक काढून लक्ष वेधून घेतले.
खंडेलवाल महिला मंडळाच्या गणगौर बिंदोरा कार्यक्रमाची सुरुवात मंडळाच्या अध्यक्ष संजीवनी माली यांनी दीपप्रज्वलन करून केली. गणेश वंदनेनंतर महिलांनी पारंपरिक गणगौर गीतांवर राजस्थानी नृत्य सादर केले. मंडळाच्या सचिव पुष्पा खंडेलवाल यांनी ‘हे शुभारंभ हो शुभारंभ,’ या गाण्यावर नृत्य सादर केले. वनिता नाटाणी, अलका झालाणी, बिंदिया लाभी, कृष्णा सिदोया, ज्योती जसोदिया, कल्पना सोकिया, संतोष खुटेटा व पुष्पा झालाणी यांनीही नृत्य सादर केले.
जयश्री जंघिनिया, मीना कुलवाल, कांता मेठी, उषा तांबी, प्रज्ञा जसोरिया, ज्योती तंबोलिया आदींनी शिव-पार्वतीची भूमिका साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मारवाडी भाषेतील नाटिका घेण्यात आली. आजच्या काळातील सासू व सुनेतली तू-तू-मैं- मैं नाटिकेचा विषय होता. शशिकला ढाकढिया व पुष्पा घिया यांनी नाटिकेमध्ये धमाल केली. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, हौजीच्या खेळानेही गणगौर बिंदोरा कार्यक्रमात धमाल आणली. यावेळी खंडेलवाल समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रमिला दुसाद व रश्मी जसोरिया यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या सरला दुसाद, सुधा खुटेटा, मीना बेवाल, मंजू घेवाल, ममता तांबी, अनिता खंडेलवाल, सुनिता नाटाणी, कोमल कायथवाल, अनिता कुलवाल, अनिता झालाणी, नीथा कायथवाल, सीता कुलवाल, विद्या कासलीवाल, हीरा ठाकरिया, उमा खुटेटा, संगीता खुटेटा, शैला कुलवाल, सुनिता खुटेटा, ज्योती कासलीवाल आदींनी प‌रिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाटाघाटीतून समृद्ध मार्ग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी सक्तीचे भूसंपादन करणार नाही. वाटाघाटीच्या मार्गाने तोडगा काढू,’ अशी माहिती उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी संयुक्त मोजणीसाठी ८ पथकांची नियुक्ती केली आहे. यानुसार पथकाने काम सुरू केले असून, औरंगाबाद तालुक्यातील ३६ गावांसाठी ४, तर वैजापूर व गंगापूर तालुक्यात प्रत्येकी दोन पथकांकडून मोजणी करण्यात येत आहे. या विषयी हदगल म्हणाले की, ‘समृद्धी महामार्गासाठी काही ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. त्या ठिकाणी मोजणी करण्यात येत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या सहमतीनेच जमीन घेऊ. यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीचा भाव ठरवावा व त्यानंतर प्रशासनासोबत बोलणी करावी. त्यांनी ठरवलेल्या दराबाबतही सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू. यामध्ये रेडिरेकनर दरापेक्षाही अधिक भाव मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्यात येणार आहे. सध्या नियुक्त केलेल्या पथकामध्ये एक समन्वय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, सर्व्हेअर, शाखा अभियंता, कृषी विभगाचे पर्यवेक्षक, ग्रामीण पाणीपुरवठा तसेच वन विभागाचे प्रत्येक एक अधिकारी, या शिवाय मंडळ अधिकारी, तलाठी, भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच मोनार्च व ल्युईस बर्गर या मोजणी करणाऱ्या खासगी संस्थेचे अधिकारी उपस्थित आहेत. या शिवाय शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठीही प्रत्येक पथकामध्ये दोन ते तीन अधिकारी असतात. या पथकाने काम सुरू केले आहे. गावागावात हे पथक जाऊन शेतकऱ्यांशी प्रकल्पाविषयी माहिती देऊन संमती घेणार आहेत. जिल्ह्यात १२०७ हेक्टर आणि जालना जिल्ह्यात ४७८ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे,’ असे हदगल यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पथकांना ३१ मार्चपर्यंत काम संपवण्याचे आदेश दिले असून येत्या काही दिवसांत काम कसे पूर्ण होईल असा प्रश्न आहे. हा महामार्ग राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक व कोकण या पाच महसूल विभागांतील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व ठाणे या दहा जिल्ह्यांतून जाणार आहे.

शेतकऱ्यांचा विरोध कायम
जमीन मोजणीसाठी ज्या गावामध्ये पथके जात आहेत तेथून शेतकऱ्यांकडून विरोध सुरूच आहे. गुरुवारी दुधड, शेवगा, डोणगाव या ठिकाणी जमिनीची मोजणी करण्यासाठी पथक गेले असता भाकपचे कार्यकर्ते व शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मोजणीला विरोध करून पथकाला पिटाळून लावले. शुक्रवारी टाकळीवाडी व कदीम टाकळी येथे पथके आली, तर शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचा इशारा भाकपने दिला आहे.

आज आंदोलन
शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, लालबटा शेतमजूर युनियन व जिल्ह्यातील ३, तर जालना जिल्ह्यातील २ तालुक्यातील कृती समितीच्यावतिने दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी महामार्ग व नवनगर भूसंपादन व भूसंचयन विरोधी कृतीसमितीचे विदर्भातील नेते व भाकपचे राज्य सहसचिव कॉ. तुकाराम भस्मे हे उपस्थित राहणार आहेत.

रेडिरेकनर दराचा आधार घेऊन प्रशासनाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असून, यापेक्षा कितीतरी अधिक पट जमिनीचे भाव आहेत. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन घेणार नाही असे म्हणत असले, तर मोजणी करायला येता कशाला ? जोपर्यंत शेतकऱ्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. - राम बाहेती, जिल्हा सचिव, भाकप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images