Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रक्तदान करूनच होणार वाढदिवस साजरा

$
0
0
सातत्याने जाणवत असणारा रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून, वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्याचा संकल्प जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

आयुक्तांची मुंबईवारी वेगळ्याच कामासाठी

$
0
0
महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना मंगळवारी कोणीही मुंबईला बोलावले नव्हते.

बाहेरच्या परीक्षकांमुळे काटेकोर मूल्यांकन

$
0
0
विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवातील आयोजन आणि नियोजनाची चर्चा नेहमीच होते, मात्र आतापर्यंतच्या अनुभवावरून धडा शिकत विद्यापीठाने यंदा काही चांगले बदल केल्याचेही दिसून येत आहे.

सामाजिक प्रबोधनासाठी विद्यार्थ्याने मागितली ‘भीक’

$
0
0
अंगात उसवलेला सदरा, पायात फाटकी वहाण अशा अवतारामध्ये एक पोरसवदा युवक विद्यापीठाच्या आवारामध्ये प्रत्येकाकडे काही तरी मागत होता. केंद्रीय युवक महोत्सवाचा जल्लोष सुरू असताना हा युवक काय मागतोय, असा प्रश्न पडत होता.

काँग्रेसने सोबत घेतले तर आनंद, नाही तर आभार

$
0
0
‘काँग्रेस पक्ष हा मोठ्या भावासारखा आहे. काँग्रेसने सोबत घेतले, तर आनंद आहे आणि नाही घेतले, तर आभारी आहोत. मात्र, सत्तेसाठी शिवसेना-भाजपशी हात मिळवणी केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

विकासकामे होत नसल्याने नगरसेवक संतप्त

$
0
0
पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डातच विकास कामे होतात. आमच्या वॉर्डात कामेच होत नाहीत. अधिकाऱ्यांचे तर त्या कडे लक्ष नाहीच, पण पदाधिकारीही या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप करीत सत्ताधारी शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संतापले.

‘समांतर’ला केंद्राचीच मान्यता

$
0
0
समांतर जलवाहिनीच्या मूळ प्रकल्पास जून २००९ मध्ये केंद्र शासनाच्या अर्बन ‘इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अँड मीडियम टाउन’ (यूआयडीएसएसएमटी) या योजनेंतर्गत मान्यता दिली असल्याचे पालिकेच्याच पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मान्य केले आहे.

हंगाम लांबला : ऊसतोड मजुरांना फटका

$
0
0
बीड जिल्ह्यातून दरवर्षी चार ते पाच लाख ऊसतोड मजूर ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. यंदा दिवाळी उलटून पंधरा दिवस झाले तरी ऊस दराच्या प्रश्नी पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाण्याचे धुराडे अद्याप पेटलेले नाहीत.

अफवेमुळे बेगमपु-यात पुन्हा तणाव

$
0
0
मारहाणीमध्ये जखमी असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूची अफवा पसरल्यामुळे सोमवारी रात्री बेगमपुरा तसेच परिसरात पुन्हा तणाव झाला. त्यामुळे या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.

जिल्ह्यात जुन्या रिक्षाच नाहीत!

$
0
0
शहर आणि ग्रामीण भागातील रिक्षांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. रिक्षा चालविण्याचे परमिट बंद असताना, रिक्षाची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. आरटीओ कार्यालयात मागील साडेतीन वर्षांत फक्त ५५१ रिक्षा स्क्रॅप झाल्याची नोंद करण्यात आली.

खदानधारकांकडून १५ कोटींची वसुली

$
0
0
बेकायदा खाणकाम करणाऱ्या जिल्ह्यातील खदान मालकांकडून आठ महिन्यांच्या रॉयल्टीपोटी सुमारे १५ कोटी रुपयांची वसुली प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

उद्योगांचे पाणी महाग

$
0
0
जागतिक मंदी, वाढती महागाई त्यात मोठी वीजदरवाढ करून उद्योजकांना शॉक दिलेल्या सरकारने वर्षभरात दुसऱ्यांदा पाणीपट्टीत वाढ करून उद्योजकांना मोठा दणका दिला आहे.

विरोध झुगारून २५ लाखांना मंजुरी

$
0
0
पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. पैसा नसल्यामुळे विकास कामे रखडली आहेत. ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी प्रशासनाकडे पैसा नाही. असे असताना अधिवेशन व स्पर्धांसाठी २५ लाख रुपये कशासाठी वाटता, असा सवाल करीत नगरसेवकांनी प्रस्तावाला विरोध केला, काही नगरसेवकांनी राजदंड पळवून नेला.

पेडगावकरांबद्दलचे इतिवृत्तच बदलले

$
0
0
उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या संदर्भात घेतल्या गेलेल्या निर्णयाचे इतिवृत्तच बदलून टाकण्याचा प्रताप पालिकेच्या प्रशासनाने केल्याचे आज मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाले.

इंधनविक्रीत ४० टक्के घट

$
0
0
शहरातील पेट्रोल पंपाच्या एकूण विक्रीत चाळीस टक्के घट झाली आहे. सरकारने शहरातील पेट्रोलपंप धारकांकडून दोन टक्के अतिरिक्त कर वसुली सुरू केल्यामुळे या वसुलीचा फटका शहरवासीयांना आणि महापालिकेला बसत आहे.

पेन्शनधारक निघाले रेल्वे अडवायला

$
0
0
निमशासकिय कार्यालयात वर्षानुवर्षे नौकरी करून सेवेतून निवृत्त झालेल्या माजी कर्मचारी तसेच आताचे पेन्शनधारक यांना अत्यल्प पेन्शन मिळत आहे. महगाई वाढली आहे.

आरोपींना डांबून ३.७५ लाखांचे तोडपाणी

$
0
0
माजलगाव येथील गुन्ह्यामध्ये पसार असलेल्या बारा आरोपींकडून गुन्हेशाखेच्या पथकाने रिवॉल्वरचा धाक दाखवत पावणेचार लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मतदारांच्या जागृतीसाठी ‘गुजरात मॉडेल’

$
0
0
मतदाराचे प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने गुजरातमध्ये राबविलेल्या मोहिमेप्रमाणेच राज्यातही मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार जागृतीसाठी लोककलांसह रेडिओ, एसएमएस यांचीही मदत घेण्यात येणार आहे.

पाण्याअभावी पिके धोक्यात

$
0
0
वैजापूर व गंगापूर या दुष्काळी तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत नाशिक पाटबंधारे विभागाने अनिश्चितता दाखवल्याने लाभार्थी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बाळासाहेबांचे नाव देण्याच्या प्रस्तावात तडजोड

$
0
0
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कॉम्प्रमाइज करून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्याची नामुष्की सत्ताधारी शिवसेना - भाजपयुतीवर आली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images