Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पोलिस स्कूलमध्ये सुरू होणार नवे वर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस पब्लिक स्कूलमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी पालकांचा ओढा वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी वर्ग वाढविण्याच्या सूचना केल्या अाहेत. त्याचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या कार्यकाळात हडको पोलिस वसाहतीजवळ पोलिस पब्लिक स्कूलची स्थापना करण्यात आली. या शाळेमध्ये पोलिसांसह सामान्य नागरिकांच्या मुलांनाही प्रवेश घेता येतो. यामध्ये ६० टक्के जागा पोलिसांच्या पाल्यांसाठी, तर ४० टक्के जागा सर्वसामान्यांसाठी राखीव आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी प्राथमिक व माध्यमिक विभाग वेगळे करण्याच्या सूचना देत नवे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन वर्गांसाठी शाळेजवळच जागेचा शोध सुरू असल्याची माहिती आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. बाहेरगावातील पोलिसांच्या मुलांसाठी बॉइज होस्टेल सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सहा वर्षांत १३०० विद्यार्थी
नाथ व्हॅली स्कूलचे प्रशासन पोलिस पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन सांभाळत आहे. गेल्या सहा वर्षांत या शाळेतील विद्यार्थीसंख्या १३००पर्यंत पोचली आहे. नव्या शैक्षणीक वर्षाला सुरुवात झाली आहे, मात्र विद्यार्थी क्षमता पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेकांना अॅडमिशनपासून वंचित राहावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कॉपी-पेस्ट संशोधन थांबवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘सध्या संशोधनाची वाताहत झाली आहे. संशोधनाच्या नावाखाली फक्त कॉपी-पेस्ट सुरू आहे. संशोधनात गाइड सांगतील त्याप्रमाणे संशोधक काम करतात. संशोधकांच्या संकल्पना स्पष्ट पाहिजे. पीएच. डी. करणारा संशोधक स्वतःच्या संशोधनाबाबत अर्धा तास बोलू शकत नाही, अशी विदारक स्थिती आहे,’ असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी व्यक्त केले. साधन परीक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागातर्फे इतिहास वस्तुसंग्रहालयात सोमवारी साधन परीक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला कुलसचिव डॉ. जब्दे आणि प्रा. डॉ. उमेश बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संशोधन पद्धतीवर डॉ. जब्दे यांनी परखड भाष्य करीत विद्यार्थ्यांना आश्चर्यचकित केले. ‘विद्यार्थ्यांच्या डोक्यात संशोधनाच्या संकल्पना स्पष्ट पाहिजेत. गाइड सांगतील तसे संशोधन करण्यापेक्षा आपल्या संकल्पनेसाठी त्यांचे मार्गदर्शन घ्या. या पुस्तकातील हे घ्या आणि त्या ग्रंथातील ते पहा असे ऐकून संशोधन उरकले जाते. तीन वर्षे संशोधन केलेल्या बिचाऱ्या संशोधकाला आपण काय केले ते अर्धा ताससुद्धा सांगता येत नाही. मुलाखती घेताना तो सारखा गाइडकडे पाहतो. सगळा भार गाइडवर येऊन पडतो. आपल्या अवतीभवती घडते ते बदलले पाहिजे. विद्यार्थ्यांत गुणवत्ता निर्माण होण्याची गरज आहे,’ असे डॉ. जब्दे म्हणाले.
डॉ. उमेश बगाडे यांनी इतिहास संशोधनावर मार्गदर्शन केले. ‘संशोधनातून ऐतिहासिक सत्य प्रस्थापित करायचे असते. प्राचीन दस्तावेज नष्ट झाले तरी अवशेष सापडतात, मात्र अवशेषांना बोलते करता आले पाहिजे. इतिहास विभागाचे वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे वस्तूसंग्रहालय आहे. ज्ञात नसलेला इतिहास समोर आणणे ही इतिहास मांडणीची चौकट असते. भौतिक व लिखित अवशेषांचा वापर करून विद्यार्थ्यांनी उत्तम संशोधन करावे,’ असे डॉ. बगाडे म्हणाले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात वस्तूसंग्रहालयाचे अमोल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्राचीन वस्तूंची सचित्र माहिती दिली. यावेळी प्रा. डॉ. गितांजली बोराडे, कुमार भवर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

निधीची आवश्यकता
इतिहास वस्तूसंग्रहालयात १७ हजार कागदपत्रांची सूची आहे. साडेतीन हजार नाणी, एक हजार चित्रे, शेकडो शस्त्रे आणि मुर्ती आहेत. वस्तूसंग्रहालय अधिक आकर्षक करण्यासाठी माहितीपूर्ण फलक लावा. यातून वस्तूसंग्रहालय अधिक उठावदार होईल, असे डॉ. जब्दे म्हणाले. या कामासाठी निधी आवश्यक असल्यास प्रशासन पुढाकार घेईल, असे त्यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅसिडिटीच्या गोळ्या घातक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीर्घ कालावधीपर्यंत अॅसिडिटीच्या गोळ्या घेतल्यास मेंदूतील ‘डोपामिन’ या रसायनाची पातळी घटून तात्पुरत्या स्वरुपातील पार्किन्सन्स होतो. त्याची बहुतांश लक्षणे ‘पार्किन्सन्स’प्रमाणेच असतात व त्याला ‘पार्किन्सोनिझम’ म्हटले जाते. अनेकदा रुग्ण-नागरिक स्वतःच्या मनाने अशी औषधे कित्येक दिवस-महिने घेतात आणि अशा अनेक रुग्णांना ‘पार्किन्सन्स’चा फटका बसत असल्याचे मेंदुविकारतज्ज्ञांनी जागतिक कंपवात दिनानिमित्त स्पष्ट केले.

बहुतेक आजारांवरील उपचारांमध्ये तसेच वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना अॅसिडिटी होऊ नये म्हणून ‘लिव्होसल्पिराइड’ व यासारखी इतर औषधी दिली जातात. त्यामुळे रुग्णांना आम्लपित्ताचा त्रास होत नाही. त्यामुळे या गोळ्या आवर्जून दिल्या जातात, परंतु या गोळ्या ठराविक दिवसांसाठीच दिल्या जातात. अनेक रुग्ण डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा कितीतरी जास्त दिवस घेतात. अनेक नागरिक मळमळ, पित्ताचा त्रास झाला की थेट मेडिकल दुकानांमधून अशा गोळ्या कित्येक दिवस घेतात. बरे वाटते म्हणूनही अशा गोळ्या घेणारे आहेत. अशा रुग्णांमध्ये चालताना तोल जाणे, कामाचा वेग मंदावणे, अस्पष्ट उच्चार अशी कंपवाताची लक्षणे दिसून येतात. मनोविकृतीच्या काही औषधांमुळे, चक्कर येण्याच्या त्रासावरील काही औषधांमुळेही कंपवाताची लक्षणे दिसून येतात. अशांना तपासल्यानंतर कंपवाताचा उलगडा होता. अर्थात, मेंदूविकारतज्ज्ञाकडे अशा रुग्णांचे निदान लवकरात लवकर होते.

रुग्ण येतो पूर्व पदावर

मळमळ-उलटी-अॅसिडीटीच्या गोळ्यांनी झालेल्या ‘पार्किन्सन्स’चे म्हणजेच ‘पार्किन्सोनिझम’चे निदान झाल्यानंतर अशा गोळ्या-औषधे बंद केल्या जातात आणि गोळ्या बंद करताच रुग्ण पुन्हा पूर्व पदावर येतो, मात्र बरेच रुग्ण अशा गोळ्या घेत असले, तरी डॉक्टरांपासून लपवतात व डॉक्टरांनी खोदून-खोदून विचारल्यानंतर हा ‘प्रताप’ समोर येतो, असेही मेंदूविकारतज्ज्ञांनी सांगितले.

''असे रुग्ण रोजच येतात. नागरिकांनी मळमळ-उलटी-अॅसिडिटीच्या गोळ्या स्वतःच्या मनाने घेऊ नये. अशा गोळ्या घेतल्यास त्याची माहिती डॉक्टरांना जरूर द्यावी.''
- डॉ. मकरंद कांजाळकर, मेंदूविकारतज्ज्ञ

''या प्रकारच्या गोळ्या कित्येक महिने घेतल्यास संबंधित व्यक्तीला कायमचा पार्किन्सन्सदेखील होऊ शकतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. अर्थात, अशा केसेस कमी असतात.'' - डॉ. आनंद सोनी, मेंदूविकारतज्ज्ञ

''काही रुग्णांमध्ये ‘फ्रोजन शोल्डर’ची लक्षणे दिसतात व ते अस्थिरोगतज्ज्ञांकडे जातात, मात्र अशा रुग्णांना ‘पार्किन्सोनिझम’ असू शकतो.'' - डॉ. श्रीकांत देशमुख, मेंदूविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८०० चौकांत १५०० कॅमेरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागपूरप्रमाणे औरंगाबाद शहर देखील आता स्मार्ट होणार आहे. शहरातील ८०० चौकांत दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यांतील काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केली. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
औरंगाबाद शहरातचा केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय, स्मार्ट बसस्टॉप आदी अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत शहरातील ८०० चौकात दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी नुकतीच एक बैठक विभागीय आयुक्तालयात घेण्यात आली. जून-जुलै महिन्यांच्या अखेरीस यासंदर्भातील टेंडर भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर नोव्हेंबर अखेरीपर्यंत शहरात हे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची शक्यता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केली. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच सहा ड्रोण कॅमेरे देखील मागवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महत्त्वाच्या घटनांसाठी एक मोबाइल सरव्हिलन्स व्हॅन देखील असणार आहे. या व्हॅनमध्ये संबंधित ठिकाणांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे स्क्रीन दिसू शकतील. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी परिस्थितीवर नियत्रंण ठेवणे शक्य होणार आहे, अशीही माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

गुन्हेगार ओळखणार कॅमेरा
हे कॅमेरे अत्यंत अत्याधुनिक स्वरुपाचे असतील. त्यांच्या सिस्टिममध्ये एखाद्या गुन्हेगाराचा फोटो नोंदविल्यास तो गर्दीमध्ये कोठेही असला तरी कॅमेऱ्यातील सॉफ्टवेअरमुळे त्याला लगेच ओळखता येईल. कॅमेऱ्यामध्ये अॅटोमॅटिक नंबर प्लेट स्कॅनिंग सिस्टिम जोडण्यात आली आहे. यामुळे सिग्नल तोडून पलायन करणाऱ्या वाहनांचा क्रमांक टाकून त्याच्या मालकाच्या नावाने दंडाचे चलन तयार होईल. यानंतर वाहन मालकाकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकास अधिकारी लोकरेंना अटकपूर्व जामीन

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
तुळजापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ लिपीक अशोक काळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत लोकरे यांना अटकपूर्व जामीन मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंजूर केला.
अशोक काळे हे १७ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. त्यानंतर ४ मार्च रोजी त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. त्यांच्या खिशात दोन चिठ्ठया आढळल्या. त्यात ग्रामविकास अधिकाऱ्यांची नावे होती व त्यांना मनःस्ताप दिल्याचा उल्लेख होता. या मनःस्तापामुळेच आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहिलेले होते. त्यानुसार दोनही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण जिल्हा कोर्टाने अर्ज फेटाळला. त्याविरोधात त्यांनी खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. काळे २००६ पासून त्यांच्याअंतर्गत कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत नव्हते, त्यामुळे या प्रश्नाशी त्यांचा संबंध नसल्याचे म्हणणे याचिकाकर्त्याने मांडले. सुनावणीअंती न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या बंधपत्रावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. लोकरे यांची बाजू अभिजीत मोरे यांनी मांडली .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागसेनवनात लावणार पाच लाख वृक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती समारोप वर्षाच्या निमित्ताने नागसेनवन परिसरात पाच लाख वृक्ष लागवड करत परिसर हरीत करण्यात येणार आहे. आगामी पाच वर्षात ही झाडे टप्प्या-टप्प्याने लावली जातील, अशी माहिती प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील उद्योजकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नागसेनवन परिसरात पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विविध कॉलेज, शाळा आहेत. येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निसर्गरम्य वातावरणात शिक्षण घ्यावे, परिसर हिरवागार दिसावा, हा परिसर पाहण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना निसर्गरम्य परिसर पाहून समाधान मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परिसरात सुमारे पाच लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. उपक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलपासून होणार आहे. सकाळी १०.३० वाजता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याहस्ते वृक्षारोपण करून सुरुवात होणार आहे. उद्योजक सचिन मुळे, गौरव भारुका, शिवराम त्रिवेदी, प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येणार. पहिल्या टप्प्यात पन्नास हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. किशोर साळवे, प्राचार्य डॉ. मोहम्मद शफी, प्राचार्य डॉ. अभिजीत वाडेकर यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलसचिव जब्देंवर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनीधी, औरंगाबाद
विद्यापीठातील संशोधन कॉपी-पेस्ट असते. संशोधक विद्यार्थ्यांना काही येत नाही असे बोलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी बदनामीचे वातावरण तयार केले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाने राज्यपालांकडे पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
संशोधनाबाबत अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या जब्दे यांच्याबद्दल नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुलसचिव पदासाठी डॉ. जब्दे यांनी जुलै २०१५ मध्ये मुलाखत दिली होती. मात्र, ते अपात्र ठरले होते. सप्टेंबर महिन्यात त्यांना प्रभारी कुलसचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. याबाबत महाराष्ट्र शासनाने विद्यापीठाला पत्र पाठवून त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असून विद्यापीठ निधीतून दिले जाणारे वेतन तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. तरीसुद्धा मार्च महिन्यात नवीन विद्यापीठ कायद्यानुसार शासकीय प्रतिनियुक्तीवर विद्यापीठाने प्रभारी कुलसचिव म्हणून सहा महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती केली. गुणी संशोधकांच्या दर्जावर त्यांनी केलेली टिप्पणी विद्यापीठाची बदनामी करणारी आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रोहित कांबळे, बरकतअली पठाण, मुजाहेद पटेल, शेख वसिम, रिजवान मुलतानी व अल्तमश शेख यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या भेटीसाठी आरोपीचे पलायन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खूनाचा आरोप असलेला संशयित मुकेश लाहोट याने सोमवारी रात्री नऊ वाजता घाटी हॉस्पिटलमधून पलायन केले. तो मंगळवारी पहाटे चार वाजता पत्नीसह पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बंगल्यावर शरण आला. आपल्याला खुनाच्या गुन्ह्यात नाहक गोवले असल्याचे सांगून फेरतपासाची मागणी केली. आयुक्तांनी मुकेशला गुन्हेशाखेच्या स्वाधीन करीत गुन्ह्याचा फेरतपास करण्याचे आदेश दिले आहेत.
मुकेश सुखबीर लाहोट (वय ३६ रा. पडेगाव) हा शेख अल्ताफ याच्या खुनप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे. मुकेश हा सध्या हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत कच्च्या कैदेत आहे. त्याला सोमवारी सायंकाळी तपासणीसाठी घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. कैद्यासाठी असलेल्या वॉर्ड क्रमांक १० मध्ये त्याला ठेवण्यात आले होते. त्याला रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक्स रे काढण्यासाठी पोलिस नाईक संजय इंगळे यांनी नेले होते, त्यावेळी हिसका देऊन तो पळून गेला.
मुकेश हा पहाटे चार वाजता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बंगल्यावर पत्नीसोबत शरण आला. याबाबत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी माहिती दिली. मुकेश याने रात्री पलायन केल्यानंतर रिक्षाने पहाडसिंगपुरा भागातील घरी गेला. या ठिकाणी त्याने कैद्याचा गणवेश काढून कपडे बदलले. यानंतर घरून पैसे घेतल्यानंतर दुचाकी घेऊन पडेगाव येथील दुसऱ्या पत्नीच्या घरी गेला. या ठिकाणावरून त्याने पत्नीला सोबत घेतले. मात्र, त्यांच्यात बाचाबाची झाल्याने पेट्रोलपंपाजवळ पत्नीला सोडले. त्यानंतर पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरल्यानंतर तो भांगसीमाता गडमार्गे लासूर स्टेशन येथे एका परिचिताकडे गेला, तेथून वैजापूर येथे गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, त्याने पत्नीला फोन करून तयार राहण्यास सांगीतले. तो पहाटे चार वाजता पत्नीला सोबत घेऊन पोलिस आयुक्तांच्या बंगल्यावर पोचला. त्याने तेथील गार्डला पोलिस आयुक्तांची भेट घ्यायची असल्याचे सांगतिले परंतु, गार्डने नंतर येण्यास सांगितले. मुकेश पुन्हा सकाळी सहा वाजता पत्नीसह बंगल्यावर गेला. यावेळी गार्डला त्याने आपण पसार आरोपी मुकेश लाहोट असल्याची माहिती दिली. गार्डने ही माहिती तत्काळ पोलिस आयुक्तांना दिली. आयुक्तांनी गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना बोलावून घेत मुकेशला त्यांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, मंगळवारी दुपारी मुकेशला पोलिस आयुक्तांसमोर हजर करण्यात आले. यावेळी त्याने आपल्याला अल्ताफच्या गुन्ह्यात गोवले असल्याचे सांगत निर्दोष असल्याचा दावा केला. त्याला मारहाण करताना आपण तेथे नव्हतो, तसेच आपल्या स्कॉर्पिओमधून त्याचा मृतदेह नेला असला तरी त्याबाबत आपल्याला माहिती ‌नसल्याचे सांगितले. या खुनप्रकरणाचा फेरतपास करण्याची मागणी त्याने केली. या गुन्ह्याचा फेरतपास गुन्हेशाखेचे पोलिस ‌निरीक्षक मधुकर सावंत यांच्याकडे सोपवल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

काय आहे प्रकरण
मुकेश लाहोट याच्या पत्नीने एप्रिल २०१५ मध्ये भावसिंगपुरा वॉर्डातून मनपा निवडणूक लढवली आहे. त्यावेळी शेख अल्ताफ नावाचा त्याच्या मित्राशी मुकेशचा वाद झाला होता. अल्ताफला मुकेशसह चौघांनी २० मार्च २०१६ रोजी पडेगाव भागात बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत मृत्यू झाल्याने अल्ताफचा मृतदेह मुकेशच्या स्कॉर्पिओमध्ये पहूरजवळ असलेल्या वाकोद गावाजवळ नेला होता. येथील आम्रपाली या बंद ढाब्याच्या हौदामध्ये त्याचा मृतदेह फेकण्यात आला होता. याप्रकरणी अल्ताफच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. संतोष नरवडे, चंद्रकांत शिर्के, सनी राणा आणि विराज सौदागर यांच्यासह मुकेश लाहोटला २३ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांच्या आशीर्वादाने गुन्ह्यात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील गांधीनगर, बापूनगर, बहादूरपुरा परिसरातील अवैध धंदे पोलिसांच्या आर्शीवादाने सुरू असल्याचा आरोप नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन केला. याप्रकरणी आयुक्तांनी शिष्टमंडळाला कारवाईचे आश्वासन दिले आहे.
गांधीनगर भागात रविवारी रात्री योगेश राजू लव्हेरा या संशयित आरोपीने गच्चीवर झोपलेल्या १४ वर्षांच्या मुलीला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला आहे. याप्रकरणी पसार आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलिस आयुक्तांची मंगळवारी दुपारी भेट घेतली. यावेळी गांधीनगर, बापूनगर भागात महिलांची छेडछाड, अवैध दारू विक्री, पत्त्याचे क्लब, गांजा विक्री आदी प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप केला. या अवैध धंदे करणाऱ्या मंडळीकडे पोलिस अधिकारी कर्मचारी येत असल्याने या मंडळीची परिसरात दहशत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला आहे. पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी करूनही काही फरक पडला नसल्याचे ‌आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गुन्हेगारांची सबंध असलेल्या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.
शिष्टमंडळात प्रा. प्रशांत साठे, रवी अंभोरे, देवीदास किर्तीशाही, चंद्रकांत हिवराळे, सुनील मगरे, प्रा. गजेंद्र प्रधान, राजेश जाधव यांच्यासह बलात्कार झालेल्या पिडित मुलीचे कुटुंब व इतर महिलांचा समावेश होता. पोलिस आयुक्तासोबतच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, महिला आयोगाला निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या असल्याची माहिती प्रा. प्रशांत साठे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघाताताली जखमीला दीड लाख भरपाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कार व दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला नुकसान भरपाई म्हणून एक लाख ५४ हजार ६०० रुपये ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकारणाचे सदस्य ए. एच. सय्यद यांनी दिला.
रवी महादे हे मित्र ज्ञानेश्वर घरमोडे यांच्यासह ३ ऑगस्ट २०१२ रोजी भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी दुचाकीने खुलताबादकडे निघाले होते. त्यावेळी त्यांचा एक मित्र हेमचंद काकस हे रस्त्याने खुलताबादकडे पायी जात असताना प्रकृती खालावलेल्या अवस्थेत आढळले. त्यामुळे महादे व घरमोडे हे काकस यांना दुचाकीवर बसवून खुलताबादच्या रुग्णालयाकडे घेऊन निघाले. त्याचवेळी औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात रवी महादे यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन जखमी महादे यांनी नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला. सुनावणीवेळी, महादे यांना अपघातामुळे २० टक्के कायमचे अपंगत्व आल्याने त्यांचा रोजगार बुडाल्याचा युक्तीवाद महादे यांच्याकडून करण्यात आला. दोन्ही बाजुंचा युक्तीवादानंतर कारचालक मालक व ‘श्रीराम जनरल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड’ यांना एक लाख ५४ हजार ६०० रुपये ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मुलांसह सात जणांना कुत्र्यांचा चावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शहरात विविध रहिवासी भागात मंगळवारी दिवसभरात मोकाट कुत्र्यांनी प्रचंड हैदोस घालत सात जणांना चावा घेत जखमी केले. त्यापैकी पाच बालके आहेत. लहान मुलांना कुत्र्यांनी लक्ष्य केल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संताप आहे.
शुभम योगेश शिंदे (वय ६, रा. गोदावरी कॉलनी), सार्थक सुधाकर वाघचौरे (वय ६, रा. दुर्गानगर), साईराज सोमनाथ वनारसे (वय ५, रा. लक्ष्मीनगर), बिपीन रुबाब तडवी (वय ३८), सोफियान युसूफ शेख (वय ७, रा. झेडपी गेस्ट हाउस परिसर), अायुष राजेंद्र बोरगे (वय १०, रा. दुर्गानगर), भारती रामेश्वर कदम (वय ३५, रा. दर्गानगर) यांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले. जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. नागरी भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्यामुळे नागरिकांत दहशत आहे. नगर पलिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ कर्मचाऱ्यांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केडरपदांच्या पुनर्बांधणीस विरोध तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी पीएफ (भविष्य निर्वाह निधी) कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर निदर्शने केली.
भविष्य निधी कर्मचारी महासंघ आणि भविष्य निधी कर्मचारी संघटना मुंबईच्या नेतृत्वाखाली १० एप्रिलपासून देशभरातील पीएफ कार्यालयातील कर्मचारी आंदोलन करत आहेत. आज सिडकोतील पीएफ कार्यालयासमोर दुपारच्या सत्रात कर्मचाऱ्यांनी निदर्शन केली. कर्मचारी एकता जिंदाबाद, हम सब एक है, केडर रिस्ट्रचरिंग धोका है, कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करा, यासह अन्य घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. संघटनेचे कार्याध्यक्ष पवनकुमार हलदीकर, सुखदेव साळवे, संजय वाघमारे, मनोहर जोशी, अनुप खोबरे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच टप्प्यांत आंदोलन
‘पीएफ कर्मचाऱ्यांचे आंदोलन पाच टप्प्यांत होणार आहे. १७ एप्रिल रोजी तोंडाला पट्टी बांधून काम करण्यात येईल. २७ व २८ एप्रिल दिवशी महासंघाचे महासचिव रामबाबू सिंग, कार्याध्यक्ष मोहन उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. ११ आणि १२ मेला येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. २३ मे रोजी एकदिवसीय संपात सर्व कर्मचारी सहभागी होतील,’ अशी माहिती संघटनेचे नेते पवनकुमार हलदीकर यांनी दिली.

आंदोलकांच्या मागण्या
- अ वर्गाच्या अधिकारी पदाची पुनर्बांधणीला नको.
- पदाची पुनर्बांधणी फसवी.
- इतर कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ वाढवावे.
- कार्यालयातील कामाचा व्याप जास्त.
- १७५ कर्मचाऱ्यांचे काम केवळ १०० जणांवर.
- कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी.
- नियमानुसार तातडीने बढती द्यावी.
- अनुकंपधारकांना नोकरीत सामावून घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्त शिवार योजना २२७ गावांत निरंक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जाहीर केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाची मराठवाड्यात यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच परिस्थिती आहे. पावसाळा, शेतीतील उभे पीक यामुळे कामे पूर्ण होऊ शकली नाही, असे सांगणाऱ्या प्रशासनाने मार्च अखेरीस सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, अद्यापही गेल्यावर्षी निवडण्यात आलेल्या १२८२ गावांपैकी २७० गावांमध्ये कामे अपूर्ण आहेत. नवीन आारखड्यातील २२७ गावांमध्ये कामांना सुरुवातच झालेली नाही.
जलयुक्त शिवार योजनेतून २०१५-१६ या वर्षात निवडण्यात आलेल्या गावांमध्ये काम पूर्ण करण्याची अखेरची मुदत अनेकदा हुकली. जिल्हा प्रशासनाकडून मार्च २०१७ अखेरीस कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षी तब्बल ९७९ कोटी रुपये खर्च करून १४१२ गावात कामे पूर्ण केली असली तरी नियोजनातील २२७ गावे अद्याप ‘जलयुक्त’ होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मराठवाड्यातील १२४ गावांत मध्ये केवळ ५० टक्के, २ गावांमध्ये ३० टक्के, तर एका गावामध्ये ३० टक्केही कामे पूर्ण झाले नाही. यंदाही मराठवाड्यामध्ये गावांमध्ये अशीच ‌परिस्थिती आहे. २०१६-१७ मध्ये निवडण्यात आलेल्या १५१८ गावांपैकी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत २२७ गावांमध्ये कामच सुरू झालेले नाही.

३ हजार ८९३ कामे अपूर्ण
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मार्च अखेरपर्यंत घेण्यात आलेल्या ७७ हजार ३६० कामांपैकी ७३ हजार ४६७ कामे पूर्ण झाली आहे. ३ हजार ८९३ कामे प्रगतिपथाच्या नावाखाली अपूर्ण आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्दापूरची पाणीयोजना निधीविना

$
0
0

म टा. प्रतिनिधी, फर्दापूर
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी गेल्या वर्षी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. परंतु, निधी न मिळाल्याने अद्याप योजना सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी, या उन्हाळ्यात सुद्धा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीजवळ असलेल्या व जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील फर्दापूर येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. शिवाय या मोठ्या गावात २० वर्षांपासून ग्रामपंचायतीची कायमस्वरुपी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना नाही. संपूर्ण गावाला बाराही महिने खासगी बोअर धारकांकडून ३०० रुपये महिना मोजून पाणी घ्यावे लागते. गेल्या आठवड्यापासून खासगी पाणी विक्रेते व बोअरधारकांनी ४० रुपये प्रति ड्रम, असा दर केला आहे. ही दरवाढ नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे.
फर्दापूरची लोकसंख्या १५ हजार असून येथे २० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या संदर्भात फर्दापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांच्याकडे विचारणा केली असता गेल्या आठवड्यात टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजुरी मिळालेली असल्याने फर्दापूर येथील पाणीप्रश्न आता कायमस्वरुपी निकाली निघणार असल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, योजना कार्यान्वीत होण्यापूर्वी पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

पाण्याची दरवाढ
संपूर्ण गावाला बाराही महिने खासगी बोअर धारकांकडून ३०० रुपये महिना मोजून पाणी घ्यावे लागते. गेल्या आठवड्यापासून खासगी पाणी विक्रेते व बोअरधारकांनी ४० रुपये प्रति ड्रम, असा दर केला आहे. ही दरवाढ नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे.

जून २०१६ मध्ये सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण केल्यामुळे योजना मंजूर केली. परंतु, निधी दिलेला नाही. मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा सरपंच व सदस्य पुन्हा एकदा आंदोलन करतील.
-विलास वराडे, ग्रामपंचायत सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्याचा सीड पार्क मार्गी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

बियाण्यांचे केंद्र म्हणून ओळख असणाऱ्या जालना शहराजवळ सीड पार्क उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. या पार्कसाठी शहराजवळील सिंदखेडराजा रस्त्यावर सरकारी मालकीची ३० हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा ताब्यात घेऊन, पार्कच्या कामाला गती देण्याची सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
जालना शहराजवळील सीड पार्कविषयी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या विषयी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पाणीपुरवठा मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती लोणीकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस कृषी विभागाचे सचिव विजयकुमार, कृषी आयुक्त विकास देशमुख, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उद्योग विभागाचे उपसचिव देगांवकर, कृषी विभागाचे उपसचिव धपाटे, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे (एमएआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक कारंजकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप जाधव उपस्थित होते.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले, ‘जालना परिसरातील बियाणे प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जालना येथे सीड पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सीड पार्कच्या उभारणीस मान्यता देण्यात आली. प्रकल्पाची किंमत अंदाजे १०९ कोटी रुपये असून त्यासाठी जागेचीही पाहणी करण्यात आली आहे. आता एमआयडीसीने ही जागा ताब्यात घेऊन तिथे तातडीने काम सुरु करणे गरजेचे आहे.’
मंत्रिमंडळाच्या औरंगाबाद येथील बैठकीतील घोषणेनंतर पालकमंत्री लोणीकर यांनी पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प लवकरात लवकर साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, असे फुंडकर यांनी सांगितले.
जालना हा जिल्हा बियाण्यांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या बियाणे कंपन्यांचे उत्पादन जिल्ह्यामध्ये घेण्यात येते. या सीड पार्कच्या माध्यमातून या उत्पादनाला आणखी चांगले व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे, हा प्रकल्प लवकरात लवकर आकाराला यावा, अशी अपेक्षा सामान्य शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सावकारांविरोधात दवंडीद्वारे जागृती

$
0
0



मोतीचंद बेदमुथा, उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खासगी सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी गावोगावी दवंडी देऊन सावकारांविरोधात मोहीम छेडणार असल्याची माहिती पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. शेतकऱ्यांची सावकारी जाचातून मुक्त करणाऱ्यासाठी व सावकारांविरोधात लेखी तक्रारी याव्यात, यासाठी गावात दवंडी देऊन शेतकऱ्यांत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेत शासकीय अधिकाऱ्यांबरोबर शिवसैनिकही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री यांनी सहकार विभागाच्या अधिकारी व पोलीस अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यात वाढलेल्या सावकारी व सावकारी जाचावर उपाय योजना करण्याचे आदेश देण्यात आले. महसूल व सहकार विभागाचे अधिकारी गावागावांमध्ये जातील व गावात सावकारांविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन करतील. सावकारीविरोधी कायद्याची जनजागृती करतील, असे त्यांनी सांगितले.
उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव घटनेतील दोन्ही सावकारांच्या विरोधात दोन नवीन तक्रारी आल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री रावते यांनी दिले. कौडगाव येथील तानाजी थोरात या तरुण शेतकऱ्यांने शिक्षक असलेल्या दोन खासगी सावकारांच्या आर्थिक जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे. तानाजीच्या वडिलांनी द्राक्षबाग लावण्यासाठी २००३मध्ये तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर सावकाराने त्यांची एक एकर शेतजमीन खरेदी करून घेतली होती. थोरात कुटुंबीयांनी आतापर्यंत १० लाख रुपयांचे व्याज दिले आहे. तरीही, सावकारांकडून त्रास सुरूच होता. तानाजीच्या बहिणीचे मेमध्ये लग्न आहे. यातच होत असलेल्या त्रासामुळे तानाजीने विष पिऊन आत्महत्या केली. आप्पासाहेब गुट्टे व व्ही. आर. जाधव अशी या सावकारांची नावे आहेत.
दिवाकर रावते सोमवारी उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना, संतप्त गावकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. रावते बळीराजा चेतना अभियानाचा आढावा घेण्यासाठी आले होते. रावते यांनी या प्रकरणाची तात्काळ याची दखल घेत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांची बैठक घेतली व गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सावकार विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्यचा गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही सावकार फरार आहेत. पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी पथके नेमली आहेत.
उस्मानाबाद व यवतमाळ हे दोन्ही जिल्हे राज्य सरकारने शेतकरी आत्महत्या मुक्त जिल्हे करण्याचा निर्णय घेतला लाखो रुपयांच्या उपाययोजना करूनही शेतकरी आत्महत्या व सावकारी जाच थांबण्याचं नाव घेत नाहीत त्यामुळे आता कुठेतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे रावते यांच्या आश्वासनानंतर जिल्ह्यामध्ये सावकारांचा सुळसुळाट थांबविण्यासाठी प्रशासन आणि पोलिस काय कारवाई करणार, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपतींच्या आजोबांच्या तलावाचे खोलीकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या काळातील वेरूळ येथील डमडम तलावाची मोजणी करण्यास भूमिअभिलेख विभागाने सुरुवात केली आहे. या तलावाच्या खोलीकरणाचे काम प्रशासन करणार आहे.
नागपूर संस्थानचे राजे मुधोजी भोसले यांनी यंदा छत्रपती शहाजी राजे भोसले जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात डमडम तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल खंत व्यक्त केली होती. वेरूळ हे शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पाटीलकीचे गाव. त्यांचे भाऊ विठोजी व जानोजीराजे भोसले यांनी या परिसरातील सिंचन वाढवण्यासाठी ५०० वर्षांपूर्वी डमडम तलाव बांधला होता. छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजे मुधोजी भोसले यांनी डमडम तलावाची नोंद असलेल्या कागदपत्रांसह याची माहिती दिली. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी तत्काळ डमडम तलावाचे संवर्धन करण्याचा निर्धार बोलून दाखवला. त्यानुसार डॉ. भापकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देवून अहवाल मागवला. त्यानुसार तहसीलदार डॉ.अरूण जऱ्हाड यांनी तलावाची पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर भूमिअभिलेख कार्यालयाने तलावाच्या मोजणीस सुरुवात केली आहे. यावेळी भूमिअभिलेखचे उपअधीक्षक चंद्रकांत सेवक, भूमापक के. एस. सोनवणे, पोलिस पाटील रमेश ढिवरे, प्रशांत बोरसे, सतीश फुलारे, आबेद जहागीरदार, अप्पाराव पवार, साहेबराव जाधव हे उपस्थित होते.

असा आहे तलाव
वेरूळ परिसरातील गट नंबर १६४ मध्ये डमडम तलाव आहे. तलावाचे क्षेत्र ५३ हेक्टर ७ गुंठे असून तलावाच्या पाळी जवळ २१ पायऱ्या आहेत. त्यापैकी ७ उघड्या असून १४ पायऱ्या गाळाखाली बुजल्या आहेत. यामुळे हा तलाव आणखी २५ फुट खोल असल्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरात पोलिसांचा फिक्स पॉइंट

$
0
0

गांधीनगरात पोलिसांचा फिक्स पॉइंट

अधिकाऱ्यांच्या बैठकीत तक्रारीचा भडीमार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गांधीनगर बहादूरपुरा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रारीचे निवेदन दिले. यानंतर रात्री पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनी नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचला. या ठिकाणी तंबूच्या स्वरुपात फिक्स पॉइंट लावण्यात आला आहे.

गांधीनगर हा परिसर पूर्वीपासून संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या भागात रविवारी रात्री चाकूचा धाक दाखवून एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकात संताप आहे. याठिकाणी अवैध दारू-गांजा विक्री, महिलांची छेडछाड आदी घटना सातत्याने होतात. बलात्काराच्या घटनेनंतरही आरोपीला अटक झाली नसल्याने नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत तक्रारीचे निवेदन सादर केले. या निवेदानाची पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर मंगळवारी रात्री पोलिस उपायुक्त वसंत परदेशी, क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस‌ निरीक्षक धनंजय येरूळे यांनी नागरिकांची बैठक घेतली. या बैठकीली सुमारे २०० ते २५० नागरिक उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. उपायुक्त परदेशी यांनी नागरिकांना अवैध धंद्याविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले. बैठकीनंतर या परिसरात पोलिसांचा फिक्स पॉइंट तैनात करण्यात आला आहे.



पोलिसांवर आरोप

या परिसरातील नागरिकांचा क्रांतीचौक पोलिसांवर रोष आहे. येथील अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी पोलिस येतात. त्यांच्याशी असलेल्या अर्थपूर्ण सबंधामुळे हे गुंड परिसरात सर्रास दादागिरी करतात. पोलिसांकडे तक्रार केल्यास ते तक्रार गांर्भीयाने घेत नाहीत. हेच गुंड अनेक वेळा पोलिस ठाण्यातही वावरताना दिसून येतात, असे आरोप नागरिकांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाच्या नावाखाली संस्कृती मिटवण्याचा घाट

$
0
0

विकासाच्या नावाखाली संस्कृती मिटवण्याचा घाट
नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
जागतिक वारसा स्थळांचा बळी देऊन विकासाची कामे करणे योग्य नाही. नवीन पिढीला आपण आपली संस्कृती कशी दाखवणार असा सवाल करीत वारसा स्थळांचे जतन करीत विकासाची कामे करा, अशी भावना पर्यटन व संस्कृती जतनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांनी ‘मटा’ शी बोलताना व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली संस्कृती मिटवण्याचा घाट घातला जात आहे, असे मतही काही जणांनी व्यक्त केले.

रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने दमडीमहल व खासगेट या दोन जागतिक वारसा सांगणाऱ्या वास्तू काही दिवसांत तोडल्या. खासगेटवर तर शुक्रवारी रात्री महापालिकेने हातोडा मारला. या संदर्भात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वारसा हळूहळू लुप्त होईल -

जागतिक वारसांचे संवर्धन करीत विकासाची कामे करावी लागतील. विकास कामांसाठी अशा वास्तू पाडण्याचे सत्र सुरुच राहिले तर जागतिक वारसा हळुहळु लुप्त होईल. येणाऱ्या काळात काहीही शिल्लक राहणार नाही. औरंगाबाद शहराची ओळख हेरिटेज सिटी, पर्यटनाची राजधानी अशी आहे. एका नंतर एक हेरिटेज वास्तू पाडण्यात येणार असतील तर पर्यटकांनी या शहरात कशासाठी यायचे असा प्रश्न निर्माण होईल. महापालिकेची हेरिटेज कमिटी आहे. या कमिटीच्या प्रमुख पदावर हेरिटेजची माहिती असणारी व्यक्ती असला पाहिजे, ही कमिटी व्यापक असली पाहिजे. जागतिक वारसा वास्तू आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहेत. रस्त्याच्या आड येणाऱ्या मंदिर - मशिदी वाचवल्या जातात. मंदिर - मशिदींइतकेच जागतिक वारसा वास्तूंचे पावित्र्य आहे. त्या देखील वाचवल्या पाहिजेत.

प्रा. डॉ. राजेश रगडे (पर्यटनशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)

जुन्या - नव्याची सांगड घाला

विदेशात जागतिक वारसा स्थळांचे जतन करीत विकासाची कामे केली जातात. आपल्या देशातही अनेक शहरांमध्ये अशा प्रकारची उदाहरणे आहेत. औरंगाबादमध्येच या वास्तू पाडून विकास कामे करण्याचा घाट घातला जात आहे. वास्तविक पाहता या वास्तूंचे सुशोभीकरण करून विकास कामे करणे शक्य आहे. जागतिक वारसा स्थळे आपली जुनी संस्कृती सांगतात. जुनी संस्कृती सोडून विकास केला जाऊनये. जुन्या - नव्याची सांगड घालून विकास केला पाहिजे.

जसवंतसिंह, (अध्यक्ष, टुरिस्ट प्रमोटर गिल्ड)

लोकांनी पुढाकार घ्यावा

हेरिटेज वास्तू पाडून विकास केला जात असेल तर ते योग्य नाही. हेरिटेज वास्तू पाडण्याची कारवाई थांबवण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. हेरिटेज वास्तूंच्या संदर्भात ‘इन्टॅक्ट’ ही संस्था काम करते, पण सध्या ही संस्था काय करते हा प्रश्नच आहे. या संस्थेने विद्यार्थ्यांमध्ये, लोकांमध्ये जागृती केली पाहिजे. लोकांना अशा स्थळांचे महत्त्व पटले पाहिजे. त्यासाठी या संस्थेने काम करावे, त्यातूनच हेरिटेज वास्तू जतन करण्यासाठी वातावरण निर्माण होऊ शकेल.

राजेंद्र देशपांडे ( पदाधिकारी, इन्टॅक्ट संस्था)

नवीन पिढीला आपण काय सांगणार ?
जागतिक वारसा स्थळे पाडून आपण आपली संस्कृती मिटवत आहोत. संस्कृती मिटवल्यावर आपण नवीन पिढाला काय सांगणार असा प्रश्न निर्माण होतो. आमच्या मागच्या पिढीने या वास्तू जतन केल्या, त्यामुळे या वास्तूंचे महत्त्व आम्हाला समजते. प्रशासनाने विकासाच्या नावाखाली या वास्तू पाडल्यातर नवीन पिढाला त्याची माहिती मिळणारच नाही. बाहेरच्या देशात किंवा आपल्या देशातील अनेक शहरांमध्ये जागतिक वारसास्थळांचे जतन केले जाते आपल्या शहरात मात्र त्या पाडल्याजात आहेत ही दुर्देवी घटना आहे.
समीर राजुरकर, (माजी नगरसेवक)

विकासाला खीळ घालणे योग्य नाही
पुरातन वास्तूंच्या नावाखाली विकासाला खीळ घालणे योग्य नाही. ज्या वास्तूंमुळे जीवीत हानी होणार असेल, विकासाला बाधा येणार असेल अशा वास्तू अपवादात्मक परिस्थितीत पाडल्याच पाहिजेत. या वास्तू वाचवण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नसेल तर त्या पाडण्याचा विचार झाला पाहिजे. ज्या वास्तू धोकादायक नाहीत त्यांचे जतन योग्यप्रकारे झालेच पाहिजे.
भगवान घडमोडे (महापौर).

हेरिटेज कमिटीची पुनर्नियुक्ती करा
शहरातील ऐतिहासिक वास्तू पाडल्यानंतरच हेरिटेज कमिटीचे सदस्य वर्तमान पत्रातून फक्त प्रतिक्रिया देतात. त्याशिवाय त्यांना दुसरे काम नाही. सध्या एवढे एकच काम या कमिटीच्या सदस्यांना राहिले आहे. खास गेट वाचविण्यासाठी हेरिटेज कमिटीने आतापर्यंत काय केले? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोणतीही ऐतिहासिक वास्तू पाडण्यापूर्वी हेरिटेज कमिटीकडून मंजुरी घ्यावी लागते. खास गेट पाडण्याबाबत अशी मंजुरी घेण्यात आली होती का? हा प्रश्न आहे. ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन हे काम कमिटीचे आहे. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे काम कमिटीचे लोकप्रतिनिधींचे आहे. प्रशासन चुकत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम या समितीकडून अभिप्रेत आहे. मात्र, तसे काही होताना सध्या तरी दिसत नाही. यामुळे या हेरिटेज कमिटीची पुनर्नियुक्ती करून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सुपूर्द करावा. या वास्तू सरंक्षित झाल्यास शहराच्या पर्यटनातही वाढ होईल. पर्यटन वाढीसाठी आणि पुरातन वास्तूंचे सरंक्षण करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची गरज आहे.
इम्तियाज जलील
आमदार, औरंगाबाद मध्य, (एआयएमआयएम)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आवक - जावक क्रमांकाशिवाय फाइलींचा प्रवास

$
0
0

आवक - जावक क्रमांकाशिवाय फाइलींचा प्रवास

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटदारांच्या फाइलींचा प्रवास आवक - जावक क्रमांकाच्या नोंदीशिवाय बिनदिक्कतपणे केला जातो. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही असा आक्षेप लेखा परीक्षण अहवालात घेण्यात आला आहे. फाइलींच्या अशा प्रवासाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे.

विद्युत विभागातील पाच वर्षाच्या कारभाराचे लेखा परीक्षण मुख्य लेखापरीक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले असून त्याचा प्राथमिक अहवाल कारवाईसाठी सादर करण्यात आला आहे. या अहवालात अनेक आक्षेपांचा उल्लेख आहे. कोणतीही फाइल सादर करताना त्यावर सादर केल्याचा दिनांक, आवक - जावक क्रमांक असणे गरजेचे असते. या प्राथमिक बाबींची पूर्तता झाल्याशिवाय विभागांतर्गत फाइलचा प्रवास सुरूच होत नाही. विद्युत विभागात मात्र यापैकी कशाची नोंद नसताना फाइलींचा प्रवास झाल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. फाइल सादर करताना विद्युत विभागाने विद्युत फिटिंग, पोल उभारणे आदी कामे यापूर्वी झाली होती का याची नोंद करणे गरजेचे होते, पण कोणत्याही फाइलमध्ये याचा उल्लेख नाही, त्यामुळे एकूणच कार्यपद्धती संशयाच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

फाइल सादर करताना कामाची खरोखरच आवश्यकता आहे का हे कारणमिमांसेसह स्पष्ट करणे गरजेचे असते. विद्युत विभागाच्या बहुतांश फाइलींमध्ये कारणमिमांसा दिसून येत नाही. त्यामुळे एकाच भागात वारंवार विद्युतीकणाची कामे झाल्याचे स्पष्ट होते, असे लेखा परीक्षण अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. शहराच्या ज्या भागात विद्युतीकरणाची खरोखरच गरज आहे त्या भागात विद्युतीकरणाचे कामच करण्यात आले नाही.

पालिकेच्या विद्युत विभागाने काही निविदा कोटेशनद्वारे मागविल्या आहेत. कोटेशन मागवताना कोटेशन नोटीसवर जावक क्रमांक, दिनांक असणे आवश्यक असते. मात्र, कोटेशनवर दिनांक नसल्याचे लेखा परीक्षणाच्या वेळी स्पष्ट झाले आहे. ही गंभीर स्वरुपाची अनियमितता असल्याचे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images