Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पाण्यासाठी आता सरकारी कर्मचारी रस्त्यावर

$
0
0
मराठवाड्याची भाग्यरेषा असेल्या जायकवाडी प्रकल्पाला वरच्या धरणांतून त्वरित पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कृती समिती येत्या रविवारी (२४ नोव्हेंबर) विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

चोरटा ‘CCTV’मध्ये कैद; आरोपी मोकाट

$
0
0
एन २, परिसरातील तुकोबानगर येथे रविवारी पहाटे दोन घरे फोडण्याची घटना घडली. चोरट्याचा हा सर्व प्रताप घरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

‘तपास लागेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मानधन नाकारावे’

$
0
0
‘नरेंद्र दाभोळकर यांचा मारेकरी पकडेपर्यंत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानधन घेऊ नये. त्यामुळे तपास यंत्रणेवर दबाव येईल,’ असे मत प्रसिद्ध समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

मारेक-यांच्या अटकेसाठी कार्यकर्त्यांचे आंदोलन

$
0
0
डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना व त्यामागील सुत्रधारांना त्वरीत अटक व्हावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे पैठण गेट येथे बुधवारी तीव्र निदर्शने करण्यात आली.

पेमेंट थांबले; पालिकेचा डिझेल पुरवठा बंद

$
0
0
पेमेंट थांबल्यामुळे पुरवठादाराने पालिकेचा डिझेलचा पुरवठा बंद केला आहेत. त्यामुळे येत्या एक - दोन दिवसात पालिकेची सर्व वाहने थप्पीला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संग्रामनगरचा पूल पूर्णत्वाकडे

$
0
0
शहानूर मियॉ दर्गाह येथील संग्रामनगर रेल्वे उड्डाणपूलाचे काम पूर्णत्वाकडे आहे. येथील रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूचे पूल गर्डरने जोडण्यात आले आहेत. संग्रामनगर रेल्वे उडडाणपूलाचे काम रेल्वेमुळे थांबलेले होते.

बाजार समितीच्या ओट्यांची लॉटरी अद्यापही लागेना

$
0
0
जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधववाडी येथील भाजीपाला मार्केटमध्ये बांधण्यात आलेले ओटे भाडेतत्वावर देण्याचे काम गेल्या अडीच महिन्यांपासून रेंगाळले आहे.

वाळूपट्ट्यांचा लिलाव ३ डिसेंबर रोजी

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील ४४ आणि सहा संयुक्त वाळू पट्ट्यांचा येत्या तीन डिसेंबर रोजी लिलाव करण्यात येणार आहे. ई-ऑक्शन पद्धतीने वाळूपट्ट्यांची विक्री करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रकाश कोरे यांनी दिली.

सिमेंट बंधा-यांच्या दुरुस्तीचे ‘झेडपी’समोर संकट

$
0
0
सोयगाव तालुक्यात २० वर्षांपूर्वी बांधलेल्या दोन सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कुठून आणायचा? असा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर पडला आहे.

कष्टक-यांच्या पेन्शनसाठी निर्णायक लढा

$
0
0
कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी येत्या २५ नोव्हेंबरपासून दिल्लीत तीव्र आंदोलन पुकारण्यात येणार आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी दिला.

पर्यायी व्यवस्था करूनच कार्यालयाबाहेर जा

$
0
0
जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातून नागरिक अडलेली कामे घेऊन येत असतात. बहुतांशवेळा संबंधित खात्याचे अधिकारी विविध कारणांनी कार्यालयाबाहेर असतात.

क्रांती चौक-स्टेशन रस्त्याचे काम रखडले

$
0
0
टेंडर काढूनही पापलाईन शिफ्टिंगचे काम होत नसल्यामुळे क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काम पुन्हा खोळंबले आहे. जागोजागी खणून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून वाहतुकीची कोंडी होत आहे.

स्वाक्षरी करण्यासाठी अधिकारीच नाही

$
0
0
स्वाक्षरी करण्यासाठी अधिकारीच नसल्यामुळे पालिकेच्या लेखा विभागात दोनशेवर चेक खोळंबले आहेत. त्यामुळे छोट्या ठेकेदारांसह पालिकेकडे विविध कामांसाठी अॅडव्हान्स भरणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

स्मशानजोग्यांचे पेमेंटही रखडले

$
0
0
पालिकेच्या प्रशासनाकडून चेक न मिळाल्यामुळे स्मशानजोग्यांचे पेमेंटही रखडले आहे. चार आठवड्यांपासून स्मशानजोग्यांना पालिकेकडून छदामही मिळालेला नाही.

मनविसेचे ‘लक्ष्य’ ग्रामीण भाग

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विस्तारित कार्यकारिणीत तीन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. एकूण पाच जिल्हाध्यक्ष निवडल्यामुळे गटबाजी वाढण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वीज चोरी रोखण्यासाठी तपासणी

$
0
0
जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने भरारी पथकांमार्फत केलेल्या मीटर तपासणीत सुमारे १० टक्के मीटरमध्ये वीज चोरी आढळली. बारा हजार वीज मीटरच्या तपासणीत १ हजार २८२ मीटरमध्ये चोरी सापडली.

चिनी द्राक्ष आली शहराच्या बाजारात

$
0
0
स्थानिक भागातील अंजीरसह अन्य फळांची आवक वाढलेली असताना बाजारात चिनी द्राक्षही दाखल झाले आहे. फिकट लालसर रंगाची आकर्षक व चवीने गोड असलेल्या या द्राक्षांना ग्राहकांची मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ब्रेक डाउन अटेडिंग व्हॅन नाहीच

$
0
0
औद्योगिक वसाहतींतील वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्यात २५ ठिकाणी २४ तास ब्रेक डाउन अटेंडिंग व्हॅनची सुविधा देण्यात आली आहे. महावितरणचे संचालक मारुती देवरे यांच्यासोबतच्या बैठकीत औरंगाबादच्या उद्योजकांनी ही मागणी केली होती, मात्र जीटीएलकडे वितरण असल्याने येथील तीन एमआयडीसींमध्ये ही सुविधा मिळालेली नाही.

उद्योजकांची दुहेरी गळचेपी

$
0
0
राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असलेले उद्योग क्षेत्र सध्या चिंतेत सापडले आहे. ३८ टक्क्यांची वीज दरवाढ, वर्षभरात दोनदा पाणीदरात केलेली वाढ उद्योगांना अडचणीची झाली आहे.

आता ब्लड बँकांवर ‘एफडीए’ची नजर

$
0
0
फार्मासिस्टची नेमणूक न करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अन्न व औषध प्रशासानाने (एफडीए) आता ब्लड बँकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images