Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अ. भा. साहित्य संमेलन फक्त उत्सवापुरते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘साहित्य क्षेत्रात नेमके काय चालले आहे याविषयी काहीच माहिती नसते, तरी देखील आर्थिक मानपानासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्सव घेण्यात येतो. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे अशा संमेलनांपासून दूर राहणेच बरे,’ अशा परखड शब्दात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी जाहीर टीका केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, औरंगाबाद शिक्षण विकास मंच यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप करताना ते रविवारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार विक्रम काळे, ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, एमजीएमचे अंकुशराव कदम, डॉ. श्रीरंग देशपांडे, बसंती रॉय, डॉ. वसंत काळपांडे, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, डॉ. नरेंद्र काळे, निलेश राऊत यांची उपस्थिती होती.
प्रा. पठारे म्हणाले, साहित्य आणि शिक्षण हा संस्कार आहे. तो परिवर्तनासाठी आणि जबाबदारी म्हणून गांभिर्याने घेतला पाहिजे. कथा, कव‌िता, कांदबरी लिहिणे म्हणजेच लेखन, हा गैरसमज दूर व्हायला हवा. आज शिक्षकांच्या अनेक अडचणी असून त्यांना काम करणे देखील अवघड आहे. या परिस्थितीतही काही शिक्षक खूप चांगले काम करतात. मुळात शिक्षकाने सर्वप्रथम ज्ञान-विज्ञानात परिपूर्ण असावे. ज्या क्षेत्रात काम करतो त्यात पूरिपूर्ण असलेच पाहिजे, असेही प्रा. पठारे म्हणाले.
मराठी भाषेविषयी बोलताना ते म्हणाले, मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी तिच्याबद्दल आदर असावा लागतो. भाषा म्हणजे केवळ शब्दसाठा नाही. मातृभाषेतून ज्ञान-विज्ञानाचे शिक्षण आधुनिक काळात मिळावे. त्यासाठी नवज्ञान देखील विकसित करता यायला हवे. ही जबाबदारी शिक्षकांनी घ्यावी. त्यासाठी वाचनाचा संस्कार आवश्यक आहे, असे मत पठारे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, संमेलनाध्यक्ष बालाजी इंगळे म्हणाले की, शिक्षकांनी आता मुलांनाही लिहिते केले पाहिजे. परिस्थिती कशीही असो, लिखाण-वाचनासोबतच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ज्ञानाच्या कक्षा वाढवा. स्वतःचे पुस्तक लगेच प्रकाशित झाले पाहिजे, याची घाई करू नका. वाचकांसमोर तयारीने या, असे आवाहन इंगळे यांनी केले. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात जवळपास एक लाख रुपयांपर्यंत पुस्तक विक्री झाल्याचे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मागेल त्याला शेततळे योजनेचे तीन तेरा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा ढोल बडवून शासन प्रशंसा करत असले तरी मराठवाड्यात योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. ३९ हजार ६०० लक्षांकापैकी केवळ ६ हजार ३०० शेततळेच पूर्ण झाले असल्याने ‘प्रशासकीय वेग’ सर्वांसमोर आला आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये ३९ हजार ६०० शेततळे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. शेततळे बांधल्यानंतर प्रत्येक शेततळ्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार होते. मात्र, मार्च अखेरही विभागात केवळ ६ हजार ३९० शेततळ्यांचे कामे पूर्ण झाले. त्यापैकी ५ हजार ८२५ शेततळ्यांचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत, तर ३ हजार २२८ कामे सुरू आहेत. जून महिन्यात पावसाळ्यामध्ये शेततळ्यांची पूर्ण कामे थांबवण्यात येतील, त्यामुळे येत्या दोन महिन्यात दहा हजारांचा टप्पाही पार करण्याची शक्यता नाही.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात २१ हजार ६००, तर लातूर विभागामध्ये १८ हजार शेततळे घेण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. दोन्ही विभाग मिळून ५२ हजार २११ शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी अर्ज केले. यापैकी मार्च अखेरपर्यंत केवळ २९ हजार ४१० शेततळ्यांनाच कार्यारंभ आदेश देण्यात आले. या योजनेसाठी प्रथम अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र दुष्काळात अडकलेल्या शेतकऱ्यांना स्वतः पैसे खर्च करून शेततळे बांधावी लागली आहेत, आता ज्यांची शेततळे पूर्ण झाली आहेत अशा शेतकऱ्यांनाही पैशांसाठी प्रशासनाकडे खेट्या माराव्या लागत आहेत.

लातूर विभागाची पिछाडी
औरंगाबाद विभागाच्या तुलनेत लातूर विभागामध्ये शेततळ्यांच्या कामांची कासवगती आहे. औरंगाबाद विभागाला २१ हजार ६०० शेततळ्यांच्या लक्षांकापैकी ५ हजार १०८ शेततळे पूर्ण झाले आहे. लातूर विभागाला १८ हजार लक्षांकापैकी केवळ १२८२ शेततळे पूर्ण करता आले.

शेततळे योजनेची स्थिती
लक्षांक ३९६००
अर्ज प्राप्त ५२२११
मंजुरी ३३५२८
कार्यारंभ आदेश २९४१०
सुरू असलेली कामे ३२२८
पूर्ण कामे ६३९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा हजार तज्ज्ञांची देशात मोफत सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विश्व हिंदू परिषदेच्या ‘इंडियन हेल्थ लाईन’मार्फत (आयएचएल) देशातील ५० शहरांमध्ये सुमारे दहा हजार स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. त्याचवेळी देशभर ४० ते ५० टक्के कमी शुल्कात लॅबच्या दर्जेदार सुविधाही देण्यात येत आहेत. महिलांसाठी लवकरच ‘एचटूओ’ हा खास उपक्रम देशभर राबविण्यात येणार असल्याचे ‘आयएचएल’चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए रणजित नातू यांनी ‘मटा’ला सांगितले.
अलीकडे वैद्यकीय खर्च गोरगरीबांसह मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यातच शासकीय योजना लागू न होणारा व तरीही वैद्यकीय उपचारांचा खर्च न पेलवणारा फार मोठा वर्ग आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयएचएल’मार्फत मागच्या तीन वर्षांपासून मोफत आरोग्य देवा देण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबादमधील सुमारे एक हजार, तर देशभरातील दहा हजारांपेक्षा जास्त स्पेशालिस्ट-सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर मोफत सेवा देत आहे. केवळ एका टोलफ्री क्रमांकावर देशातील कुठल्याही व्यक्तीला त्या त्या भागातील संबंधित सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरची अपॉईंटमेंट उपलब्ध करुन देण्यात येते. त्याचवेळी ४० ते ५० टक्के कमी शुल्कात वेगवेगळ्या तपासण्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या दर्जात्मक लॅबशी करार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ‘आयएचएल’मध्ये सेवा देणाऱ्यांमध्ये सर्व प्रकारच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. आता लवकरच ‘हर हेल्थ ऑर्गनायझेशन’ (एचटूओ) या उपक्रमाद्वारे महिलांमधील अॅनेमिया, स्थूलता, ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी व जनजागरण केले जाणार आहे. याच अंतर्गत देशभर आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून, रक्तदाब, मधुमेह, स्थूलता (बीएमआय) तपासणी केली जात असून, शहरात ४५ शिबिरे व एकूण १४ जिल्ह्यांच्या देवगिरी प्रांतात १०० शिबिरे झाली आहेत. त्यासाठी २२५ हेल्थ अॅम्बेसेडरना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही नातू यांनी सांगितले. ‘हिंदू हेल्प लाईन’अंतर्गत आतापर्यंत सव्वा लाख व्यक्तींना वेगवेगळी मदत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरातील बैठकीत मार्गदर्शन
या संदर्भात कलश मंगल कार्यालयात नुकतीच बैठक झाली. या वेळी राष्ट्रीय संघटन मंत्री प्रदिप गौर, क्षेत्रीय संयोजक प्रदिप जोशी, देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. कुलदीप राऊळ, उपाध्यक्ष डॉ. विक्रम चौबे, सचिव राजीव जहागिरदार, प्रांत प्रभारी हेमंत त्रिवेदी, डॉ. जीवन राजपूत, डॉ. पिनाकिन पुजारी, शैलेश पत्की, काशिनाथ डापके, सतीश मेहता उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेट परीक्षेत गुणवत्तेचा कस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अधिव्याख्याता पदासाठी राज्य पात्रता चाचणी (सेट) परीक्षा रविवारी राज्यभरात घेण्यात आली. औरंगाबाद केंद्राहून ५ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ‘सेट’ परीक्षा दिली. प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी वाढविण्यात आल्याने, परीक्षार्थींच्या गुणवत्तेचा कस लागला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. औरंगाबाद शहरातील परीक्षेचे नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केले. शहरात सरस्वती भुवन विज्ञान कॉलेज, स. भु. कला व वाणिज्य कॉलेज, देवगिरी कॉलेज, देवगिरी अभियांत्रिकी, विवेकानंद कॉलेज, इं. भा. पाठक महिला कॉलेज, मौलाना आझाद, डॉ. झकेरिया महिला कॉलेज या आठ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते दुपारी साडेचार या दरम्यान ही परीक्षा झाली. सकाळच्या सत्रात दोन, तर दुपारच्या सत्रात एक पेपर झाला. विषयाच्या पेपरची काठिण्य पातळी वाढविण्या आली. त्यामुळे गुणवत्तेचा कस लागेल. त्याचा निकालावरही परिणाम दिसेल, असे तज्ज्ञांनी ‘मटा’ला सांगितले. परीक्षेसाठी औरंगाबाद केंद्राहून एकूण ७ हजर ७९ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. त्यापैकी ५ हजार ४७० जणांनी परीक्षा दिली. १ हजार ६०९ जण परीक्षेला अनुपस्थित होते. नावनोंदणीपेक्षा सुमारे ७७ टक्के जणांनी परीक्षा दिली. पुढील आठवड्यात राज्य आयोगाची परीक्षा असल्याने उपस्थितीचा टक्का कमी झाल्याचेही बोलले जात आहे.

अशीही खबरदारी
सरस्वती भुवन विज्ञान कॉलेज व स. भु. कला व वाणिज्य कॉलेज अशा दोन ठिकाणी सेंटर होते. त्यात परीक्षार्थींच्या हॉलतिकीटांवर हायस्कूल असे छापून आले. स. भु. हायस्कूलही कॉलेजच्याच बाजुलाच आहे. या चुकीमुळे परीक्षार्थींचा गोंधळ उडू नये, यासाठी कॉलेज व विद्यापीठ प्रशासनातर्फे खबरदारी घेण्यात आली. बाहेर फलक लावण्यात आला. कर्मचारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेशद्वारावर उभे होते. त्यामुळे परीक्षार्थींना त्रास झाला नसल्याचे परीक्षेचे समन्वयक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. सतीश दांडगे यांनी ‘मटा’ला दिली.

- परीक्षेला नोंदणी : ७०७९
- उपस्थिती : ५४७०
- गैरहजर : १६०९
- परीक्षा केंद्र : ०८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे, मोबाइल चोराची जेलमध्ये रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वेस्थानकावर झोपी गेलेल्या विद्यार्थ्याच्या मोबाईलसह परीक्षेचे प्रवेश पत्र व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांना रविवारी (१६ एप्रिल) कोर्टात हजर करण्यात आले. यापैकी एकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे, तर दुसऱ्याला दोन हजारांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यु़ पी. देवर्षी यांनी दिले.
नांदेड जिल्ह्यातील हादगाव जांभाळा येथे राहणारे अंबादास नागोराव चिरमाडे हे परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला जाणार होते. त्यासासाठ ते पहाटे नांदेड रेल्वेस्थानकावर आले होते. स्थानकावर त्यांना झोप लागली व आरोपी भिकाजी सखाराम शिंदे (३६, रा. रामगड नगर, नांदेड) व आरोपी रविंद्र लालसिंग राठोड (३१, रा. करंजी फाटा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांनी चिरमाडे यांचा मोबाईल परीक्षेचे प्रवेशपत्र व रोख १ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन दोघा आरोपींना अटक करून चोरीचा ऐवज जप्त केला. त्यांना कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपी भिकाजी शिंदे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर आरोपी रवींद्र राठोड याला २ हजारांच्या जात मुलचक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणी सरकारी वकील एस. डी. वर्पे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका आरोग्य विभागात बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महानगरपालिकेत प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गातील ७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता आरोग्य विभागाचा नंबर लागला आहे. आयुक्तांनी आरोग्य विभागातील २८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दरम्यान, संगणक, अस्थापना, लेखा परीक्षण, करमूल्य निर्धारक व संकलक यासह काही ठराविक विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
मनपा आयुक्तांनी प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू केली. त्यात आरोग्य विभागातील २८ कर्मचाऱ्यांचा नंबर लागला. तीन वर्ष जे कर्मचारी एकाच जागेवर आहेत अशा प्रशासकीय आणि तांत्रिक प्रवर्गातील ७९ कर्मचाऱ्यांच्या विविध विभागात बदल्या नुकत्याच करण्यात आल्या त्यानंतर आरोग्य विभागात हे खांदेपालट करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षाचा निकष लावण्यात आला आहे. २८ कर्मचाऱ्यांमध्ये सात एमपीडब्ल्यू, सात नोंदणी लिपिक, चार एनएमएस आणि दहा औषधनिर्माण अधिकारी यांचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना यातील एक औषधनिर्माण अधिकारी शैलेंद्र लोहाडे हे चिकलठाणा आरोग्य केंद्रात होते. त्यांची बदली सिडको एन-८ येथील रुग्णालयाच्या औषधी भंडार विभागात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बदली गेल्या दोन वर्षात तिसरी, तर तीन वर्षात चौथी बदली आहे. काही आरोग्य अधिकाऱ्यांनी मर्जीतील म्हणून त्यांची ही बदली मुद्दाम घडवून आणली असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.

५० टक्के कर्मचाऱ्यांचा ठेंगा
महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी गुरुवारी विविध विभागात ठाण मांडून बसलेल्यांच्या बदल्या केल्या. बदली केलेल्या विभागात तत्काळ रुजू व्हा, असे आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. पण त्यांच्या आदेशाला शनिवारी ५० टक्केच प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिकेच्या कार्यालयाला शुक्रवारी सुटी होती. त्यामुळे शनिवारी सर्व अधिकारी, कर्मचारी बदली करण्यात आलेल्या जागी रूजू होतील असे मानले जात होते, पण ५० टक्केच कर्मचारी नवीन ठिकाणी रूजू झाले.

कर्मचाऱ्यांचे आस्तेकदम
काही कर्मचारी बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात होते. वर्षानुवर्षे एकाच विभागात, एकाच टेबलवर काम केल्यामुळे अन्य विभागात किंवा वॉर्ड कार्यालयात काम करण्याची मानसिकता काही कर्मचाऱ्यांची नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे थोडे थांबण्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेत रोकड; एटीएमला कोरड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये रविवारी पुन्हा एटीएम कोरडेठाक पडल्याचे निदर्शनास आले. शहरातील बहुतांश बँकांना रोकड मिळणार आहे, रोकड भांडारात सुमारे २२५ कोटी रुपये आले आहेत असे वारंवार सांगूनही अजून एटीएमवर पैसे पोहचवण्यात बँकां अयशस्वी ठरल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी शहरातील ७०० पैकी ३०० ते ३२५ एटीएम कोरडेठाक पडले होते.
शहरातील विविध बँकांच्या शाखांना रोकड मिळण्यासाठी २२५ कोटींची रोकड (पूर्वीच्या)स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या रोकड भांडारला (करन्सी चेस्ट) दोन दिवसांत मिळाली आहे. पण ही रोकड एटीएमवर आलीच नाही. एटीएमवर भरणा करण्याची प्रक्र‌िया खासगी संस्था करत आहे. बँकांचा त्यावर अंकुश नाही. यामुळे एटीएम कोरडे पडत असल्याचे एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी रवी धामणगावकर यांनी सांगितले.
शनिवारी विविध बँकांच्या मागणीनुसार आलेली रोकड वितरीत करण्यात येणार होती पण ती वितरीत झालेली नाही. शहरात गुरुवारी रात्री २२५ कोटी रुपयांच्या नोटा आल्या आहेत, त्यानुसार रविवारपर्यंत काही बँकांना नोटा देण्यात आल्या आहेत. प्राप्त झालेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम बँकांना देण्यात आली आहे. उर्वरित निम्मी रक्कम ७०० एटीएममधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे; पण ती रक्कम एटीएमच्या संख्येपुढे कमी आहे. शहरात २२ राष्ट्रीयकृत आणि १२ खासगी बँकांच्या सुमारे ४०० शाखा व ७०० एटीएम आहेत. शनिवारीही शहरात १२५ कोटी रुपये प्राप्त झाले होते. दोन दिवसांपूर्वी आलेली ही रक्कम औरंगाबाद जिल्ह्यासाठी होती.आलेल्या रोकडचे वितरण करताना विविध बँकाना १० ते २२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शहरातील स्टेट बँक, सेंट्रल बँक, आयडीबीआय, स्टेट बँक इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना ही रक्कम देण्यात येणार आहे यामुळे आगामी दोन दिवसात ही रक्कम ‌एटीएमपर्यंत पोहचेल, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारा अभ्यासक्रम हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्गातील प्रत्येक मूल हे गुणवत्तापूर्ण सक्षम होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तके ही सोपी असावीत. त्यात भावना आणि जीवनमूल्याचे व्यवस्थापन करणारी रचना असावी. विद्यार्थी, शिक्षक अभिव्यक्तीला स्वातंत्र्य देणारी स्थिती निर्माण होईल असा अभ्यासक्रमही पाठ्यपुस्तकात असायला हवा, असा सूर ‘पाठ्यक्रमातील साहित्याची निवड व निकष’या विषयावरील परिसवादांतून व्यक्त झाला.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल भुसारे होते. गजानन पळसुले-देसाई, समाधान शिकेतोड, सोमनाथ वाळके यांचा सहभाग होता. ‘आज पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम ठरवतांना भावनिक विकासाचा समावेश देखील आवश्यक आहे,’ असे भुसारे म्हणाले. गजानन पळसुले-देसाई यांनी सांगितले की, साहित्याचा सेतू म्हणून पाठ्यपुस्तके काम करतात. मात्र आज अॅण्ड्राइड दुनियेत मोबाइल अन् टीव्हीच्या आक्रमणाने पाठ्यपुस्तकाचे महत्त्व कमी होईल का, अशी भीती वाटते, असे ते म्हणाले. समाधान शिकेतोड यांनी शिक्षकाच्या सृजनतेला वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार समजेल अशा सचित्र अभ्यासक्रमाचा समावेश पाठ्यपुस्तक निर्मिती करतांना असावा असे मत मांडले. सोमनाथ वाळके यांनी पुस्तक ही माहिती की ज्ञान देण्यासाठी हवी याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. हल्लीची मुले वाचत नाही, त्यांना काहीच कळत नाही. असा आरोप नेहमीच केला जातो. परंतु आताची पिढी ही अधिक जागरूक आहे. त्यांना वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांच्यापर्यंत त्यांच्या आवडीनिवडीची पुस्तके पोहचवणे आवश्यक आहे. त्यांच्या वयानुसार ती पुस्तके त्यांच्या पर्यंत पोहचण्याची जबाबदारी देखील शिक्षक, पालकांची आहे. त्यासाठी मुलांना ‘रोकू नका टोकू नका जे वाचल ते वाचू द्या’,असा सूरही ‘वाचन संस्कृतीशी मुलांना जोडण्यासाठी शिक्षकांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र लांजेवार हे होते. या परिसंवादात शिवाजी आंबुलगेकर, अरविंद शिंगाडे, फारुक काझी यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंतरराष्ट्रीय माध्यमांवर विद्यापीठात दोन चर्चासत्रे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभाग व ‘युनिसेफ’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ ते ३० एप्रिलदरम्यान आंतरविद्याशाखीय दोन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहे. विभागप्रमुख व माध्यमतज्ज्ञ डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या गौरवार्थ चर्चासत्र होणार आहे.
वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभगाच्या वतीने ‘युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट गोल्स्, सोशल जस्टिस अँड मीडिया’ चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय माध्यमतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रात बीजभाषक प्रा. पीटर चेन (कार्यकारी संचालक, आशिया पॅसिफिक डेव्हलपमेंट-कम्युनिकेशन सेंटर, बँकॉक), प्रा. निकिता सुद (ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन), प्रा. गितीअरा नसरीन (ढाका विद्यापीठ, बांग्लादेश) डॉ. सच्चिदानंद जोशी (माजी कुलगुरू, रायपूर), प्रा. पेलिसिटा नियुगुन्ना (केनिया), प्रा. अजंता हाफअराची (कोलंबो विद्यापीठ), ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (संपादक, इंडिया टुडे नेटवर्क), कुमार केतकर, प्रा. के. जी. गणेश (महासंचालक, आयआयएमसी, नवी दिल्ली) सहभागी होणार आहेत. कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. येत्या २० एप्रिलपर्यंत शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन संयोजक प्रा. जयदेव डोळे, डॉ. दिनकर माने, डॉ. स्वाती मोहपात्रा यांनी केले आहे.
दक्षिण आशिया, अरब राष्ट्रातील माध्यमांवरील चर्चासत्रानंतर ‘मीडिया इन साउथ एशिया अँड अरब वर्ल्ड : चॅलेंजेस् अँड अपॉर्च्युनिटीज’ या विषयावर ३० एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय परिषद होईल. या परिषदेत देश-विदेशातील माध्यमतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

डॉ. गव्हाणेंचा गौरव
पत्रकारिता, माध्यमे व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. सुधीर गव्हाणे यांना चर्चासत्रात गौरविण्यात येणार आहे. डॉ. गव्हाणे यांनी वृत्तपत्रविद्या विभागात प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिसभा सदस्य पदासह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले आहे. येत्या ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे गौरव करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यभरातील प्राथमिक शाळांमधून उन्हाळ्याची व दिवाळीची सुटी यात सुसूत्रता राहावी, यासाठी शिक्षण संचालनालयाकडून सुट्यांची निश्चिती करण्यात आली आहे. यंदा १४ जूनपर्यंत शाळांना सुटी असणार असून, १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. रविवारी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम घेऊन शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदेच्या नियोजनानुसार उन्हाळी सुटी लागू करण्यासंदर्भात सूचना देतील.
राज्यात विदर्भ विभाग वगळता अन्यता शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जूनपासून सुरू होणार आहेत. दिवाळीची सुटी १६ ऑक्टोबरपासून देण्यात येईल. शाळांना उन्हाळा व दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यांसारख्या सणांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या (प्राथमिक) परवानगीने समायोजनाने सुटी घेता येईल.

नियोजनाच्या सूचना
पहिली ते पाचवीसाठी किमान २०० दिवस (अध्यापनाचे किमान ८०० घड्याळी तास) तर सहावी ते आठवीसाठी किमान २२० दिवस (१००० घड्याळी तास) निश्चित केले आहेत. त्यानुसार कामाचे नियोजन करावे, अशा सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रोडवर बसवर दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कळंब-औरंगाबाद बसवर जालना रस्त्यावरील धूत हॉस्पिटलसमोर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्यांनी पूर्णा येथील घटनेसंदर्भात निवेदन, पँथर सेनेचे पोस्टर चिकटविले आणि निघून गेले. या दगडफेकीत कुणी जखमी झाले नाही.
यासंदर्भात एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले, की कळंब-औरंगाबाद बस रविवारी दुपारी धूत रुग्णालयाच्या चौकात थांबली होती. प्रवासी खाली उतरत होते. तेवढ्यात पाच, सहा जणांचे टोळके तिथे पोचले आणि बसवर दगड फेकले. या घटनेने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. ड्रायव्हरने आरडाओरड करताच दगडफेक करणारे फरार झाले. दगडफेक करणाऱ्यांनी बसच्या काचेवर पूर्णा घटनेतील जखमींचे फोटो, एक निवेदन आणि पँथर सेनेचे पोस्टर चिकटवले. बसच्या समोरील बाजूच्या काचा फुटल्या. या प्रकरणी चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमधील शॉपिंग कॉम्प्लेक्स कोणाचे ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील बेवारस दुमजली शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नगर पालिकेची बांधकाम परवानगी घेतली का, कोणी बांधले व कोणाच्या जागेवर बांधले यापैकी एकाही प्रश्नांचे उत्तर पैठण नगर पालिका प्रशासनाकडे नाहीत.
नाथषष्ठी यात्रेसाठी आरक्षित मैदानात नगर पालिकेने बांधलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससंबंधी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेची सुनावणी सुरू असताना नगर पालिकेच्या काही पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी ४० व्यापारी गाळ्याचे दुसरे दुमजली शॉपिंग कॉम्पलेक्स बांधले होते. हे कॉम्पलेक्स बांधताना कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे, या बेवारस शॉपिंग कॉम्पलेक्सची नगर पालिकेत नोंद नसल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यानी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती.
या संबंधी तक्रार प्राप्त झाल्यानंतर हे कॉम्पलेक्स सिल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगर पालिकेला दिले होते. मात्र, सर्व दुकानांना सिल न करता केवळ वरच्या मजल्यावरील २० गाळ्यांना सिल लाव्यात आले. तळमजल्यावरील २० गाळ्यांचे भाडे अद्याप आकारलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराचे प्रतिक असलेले हे कॉम्पलेक्स पाडून दोषी पदाधिकारी व नगर पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक बंडेराव जोशी यांनी केली आहे.

सर्वसाधारण सभेत मुद्दा
नगर पालिकेच्या गेल्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक प्रकाश वानोळे यांनी या शॉपिंग कॉम्पलेक्सचा मुद्दा उपस्थित केला. शॉपिंग कॉम्पलेक्सची नगर पालिकेत नोंद आहे का, ते कोणी बांधले, बांधकाम परवानगी घेण्यात आली का व कोणाच्या परवानगीने व्यापाऱ्यांना गाळे ताब्यात देण्यात आले, हे प्रश्न उपस्थित केले. मात्र, नगर पालिका प्रशासनाकडे या एकाही प्रश्नांचे उत्तर नसल्याची माहिती नगरसेवक प्रकाश वानोळे यानी दिली.

डॉ. आंबेडकर पुतळ्याशेजारील कॉम्प्लेक्स संबंधी मला काहीच माहिती नाही. या कॉम्प्लेक्सची नगर पालिकेत नोंद नाही. येथील व्यापारी नगर पालिकेला कोणतेही भाडे देत नसून लवकरच या कॉम्प्लेक्सबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल.
- सूरज लोळगे, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीर्थक्षेत्र विकास आराखडा अडकला

$
0
0

औरंगाबाद : वेरूळ येथील घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ६३ कोटी ४८ लाख रुपयांच्या आराखडा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीसमोर पर्यटन विभागाने सादर केला नाही. त्यामुळे सध्या आराखडा लालफितीत अडकला आहे.
कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली वेरूळ येथे झालेल्या बैठकीत घृष्णेश्वर विकास आराखड्याचे सादरीकरण केले होते. मुनगंटीवार यांनी काही बदल करून आराखडा सरकारला सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नियोजन विभागाने आराखड्यासंदर्भात ३३ विषयांचा समावेश करून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा सादर करण्याचे कळविले. तब्बल ६३ कोटी ४८ लाखांचा प्रारूप आराखडा नियोजन विभागाकडे सादर करण्यात आला होता. या आराखड्यात रस्त्यांसाठी ४७ कोटी ८४ लाख रुपये, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला चार कोटी ७४ लाख रुपये, वन विभागाला एक कोटी ५० लाख रुपये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला दोन कोटी २६ लाख रुपये, राज्य विद्युत महामंडळाला दोन कोटी ७५ लाख रुपये, कार्यालयीन व इतर खर्चासाठी चार कोटी १५ लाख आणि जाहिरातीसाठी २२ लाख रुपये निधी देण्याचा प्रस्ताव पर्यटन विभागाला सादर केला आहे. पर्यटन विभागामार्फत आराखड्यानुसार विकासकामे करण्यास मान्यता दिली जाणार असल्यामुळे आराखडा मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला आहे.

आराखड्याला प्रतीक्षा
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीसमोर विकास आराखडा सादर केला जाणार असला तरी उच्चाधिकार समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे आराखडा लालफितीत अडकला आहे. बैठकीत आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतरच नियोजन व वित्त विभागाकडून निधीची तरतूद केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाइन फ्लू’ग्रस्तांसाठी दोन टक्के बेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादेतील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ‘स्वाइन फ्लू’च्या तब्बल १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, यातील ७ रुग्ण औरंगाबाद शहरातील व ३ रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. या पार्श्वभूमीवर ५०पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांना त्यांच्या एकूण खाटांच्या दोन टक्के खाटा या ‘स्वाइन फ्लू’ग्रस्तांसाठी राखीव ठेवण्याची नोटिस बजावण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
एक जानेवारी २०१७पासून शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (घाटी) विविध खासगी रुग्णालयांमध्ये ३१८६ रुग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे ७९ संशयित रुग्ण आढळून आले. यातील ३२ रुग्णांना स्वाइन फ्लू असल्याचे निदान झाले. त्याचवेळी शहरात उपचार घेणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यासह परभणी, जालना व इतर जिल्ह्यांतील ४५ रुग्णांना स्वाइन असल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे असे चित्र असताना, दुसरीकडे ‘आमच्या रुग्णालयामध्ये स्वतंत्र स्वाइन फ्लू वॉर्ड नाही,’ असे कारण देऊन शहरातील काही रुग्णालयांमधून ‘स्वाइन फ्लू’ग्रस्तांची हकालपट्टी करण्यात आल्याचे; तसेच अशा रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही समोर आले. याकडे ‘स्वाइन फ्लू’ग्रस्तांची हकालपट्टी’ या शीर्षकाखाली ‘मटा’ने लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर ‘स्वाइन फ्लू’ग्रस्तांसाठी दोन टक्के खाटा राखीव ठेवण्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने नुकतीच बजावली आहे. याचे उल्लंघन झाल्यास रुग्णालयांवर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी ‘मटा’ला सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी बॅनर
‘स्वाइन फ्लू’ची काळजी घेण्याबाबत शहातील सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. सर्दी-ताप-खोकला, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अशा रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये आणि लवकरात लवकर तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत; तसेच आरोग्य सेवा देणाऱ्यांनी ‘स्वाइन फ्लू’ची लस घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीला २० कोटींचा फटका

$
0
0

Makarand.Kulkarn@timesgroup.com
Tweet : @makarandkMT
औरंगाबाद ः ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) दिलेल्या निधीचे वेळेत नियोजन न केल्याने तब्बल २० कोटी रुपये परत जाणार आहेत. कामांचे उशिरा नियोजन केले गेले होते. त्यात काही कामे सुरू झाली होती. त्याची बिले आता चालू वर्षाच्या निधीतून द्यावे लागणार असून, नव्याने आलेल्या सभागृहाला याचा फटका बसणार आहे.
जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यासाठी निधी दिला जातो. शिवाय जिल्हा परिषद उपकरातून काही निधी मिळतो, मात्र ग्रामीण भागातील विकासकामांसाठी ही रक्कम पुरेशी नसते. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून शिक्षण, बांधकाम, सिंचन, आरोग्यसह जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागांना निधी दिला जातो.
२०१४-१५मध्ये डीपीसीकडून सिंचन व बांधकाम विभागासाठी प्रत्येकी १० कोटी म्हणजे २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. सिंचन विभागांतर्गत पाझर तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, तर बांधकाम विभागांतर्गत ग्रामीण रस्ते, आवश्यक त्या ठिकाणी छोटे पूल उभारण्याचे नियोजन करणे अपेक्षित होते. दोन वर्षांपूर्वी यासाठी निधी मंजूर केला गेला. तेव्हाच तत्कालीन पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी कामाचे नियोजन करणे आवश्यक होते. पहिल्या वर्षी याबाबत काहीच हालचाल झाली नाही. २०१६-१७मध्ये अखेरच्या टप्प्यात कामांचे कसेबसे नियोजन करण्यात आले. कामांची निविदा प्रक्रिया होण्यास विलंब झाला. त्यानंतर कामे वाटप झाली. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली आणि निवडणूक संपल्यानंतर पुढची प्रक्रिया संपता संपता आर्थिक वर्ष संपले.
नियमानुसार डीपीसीकडून मंजूर झालेल्या निधीचे नियोजन दोन आर्थिक वर्षांतच करावे लागते. सिंचन व बांधकाम विभागाने याबाबत दुर्लक्ष केले. त्यात पदाधिकाऱ्यांचीही तेवढीच जबाबदारी होती. आपापल्या विभागांतर्गत असलेलीची कामे मंजूर करून घेण्यासाठी पदाधिकारी आग्रही राहिले असते, तर पैसे वेळेत खर्च होऊ शकले असते. दोन्ही विभागांचे २० कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा करावे लागणार आहेत. याचा फटका विद्यमान जिल्हा परिषद सभागृहाला बसणार आहे.
डीपीसीच्या निधीचे नियोजन करताना सिंचन व बांधकाम विभागाने काही कामांच्या निविदा काढल्या. त्याची प्रक्रिया पार पडली काही कामेही सुरू झाली. या कामांची बिले एप्रिल महिन्यात येणे सुरू झाले आहे. नियमानुसार डीपीसीतून या बिलांचे पैसे देता येत नाहीत. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात या दोन विभागांना होणाऱ्या तरतुदीतून बिले द्यावी लागणार आहेत. २० कोटींच्या कामांचे नियोजन पाहिले, तर दायित्व देण्यातच निधी संपण्याची शक्यता आहे. नव्याने सभागृहात आलेल्या सदस्यांना पहिल्या वर्षी तरी सिंचन व बांधकाम विभागात कामे प्रस्तावित करणे अवघड जाणार आहे.

दुसऱ्यांदा नामुष्की
डीपीसीकडून मंजूर झालेले, मात्र नियोजन न केल्याने गेल्या वर्षी सिंचन विभागाचे साडेचार कोटी रुपये परत गेले होते. जिल्हा परिषदेतील सिंचन विभागाकडून सातत्याने होणाऱ्या या त्रुटी पाहून डीपीसीने सिंचन विभागासाठी केलेल्या तरतुदीत मोठी कपात केली होती. मिळालेल्या निधीचे नियोजन व्यवस्थित न केल्याचा फटका मात्र ग्रामीण भागाला बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भिमाशंकर कॉलनीत पाण्यासाठी साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका हद्दीत असून नियमित कराचा भरणा करतो, किमान आतातरी पाणी पुरवठ्याची सोयी करा, असे साकडे भिमाशंकर कॉलनी, मुस्तफाबाद परिसरातील नागरिकांनी शनिवारी महापौर भगवान घडमोडे यांना घातले आहे.
महापालिका क्षेत्रात असूनही भिमशंकर कॉलनीसह शिवकृपा, सेना नगर, पीड्ब्ल्युडी, राजगुरूनगर, सेनानगर, देव इंद्रायणी सोसायटी, उद्योग इंद्रकमल, रामचंद्र हॉल परिसर, अथर्व सोसायटी, झांबड इस्टेट, लोटस व्हिनस सोसायटी आदी परिसरात अद्यापही पाणी पुरवठ्याची सोय महापालिकेमार्फत झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज पाण्याची त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, खासगी टॅकर्सद्वारे पाणी घ्यावे लागते.
परिसरात तातडीने जलवाहिनी टाकण्यात यावी, पाण्याची टाकी उभारण्यात यावी, यासाठी नागरिकांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, ठोस कोणताहीच कार्यवाही होत नाही. दरम्यान, नागरिकांनी शनिवारी पुढाकार घेत याप्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महापौर भगवान घडमोडे यांना विनंती करत परिसरात येण्याचे निमंत्रण दिले. त्यास प्रतिसाद महापौरांनी तातडीने प्रतिसाद दिला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल घडमोडे यांचा सत्कार करण्यात आला.
नगरसेविका शोभा बुरांडे, योगेश निकम, किशोर शितोळे, प्रशांत अवसरमल पाटील, विनोद माने, बाबुराव नरवडे, चंद्रकांत देशपांडे, उदय जोशी, राहुल पगारे, सचिन गेवराईकर, ऋषिकेश आहेर, कुशल खिवंसरा, यश जैस्वाल, सचिन अवचार, कृष्णा पवार आदी उपस्थित होते.

२० एप्रिल रोजी मोर्चा
प्रस्तावित मंजूर पाणी टाकी बांधा, अंतर्गत पाणी पाइपलाइन टाका, अशी मागणी करत परिसरातील महिलांनी तातडीने पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढावा, असे साकडे महापौरांना घातले. शैलजा मुंशी, ज्योती अवसरमल, सुनीता कावळे, सुवर्णा निकम, मीना पिसाळे, सुरेखा देशमुख, किशोर पांढरे, उज्वला शिंदे, कल्पना देवडे, अनिता कावळे, आशा कुलकर्णी, रेणुका राजपूत, अनघा जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास २० एप्रिल रोजी महापालिकेवर हंडा मोर्चा काढू, असा इशाराही महिलांनी दिला. त्यावर सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टापरगाव पुलाजवळ शिवसेनेचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
टापरगाव पुलाच्या दुरुस्तीचे काम वेगात पूर्ण करावे व काम होईपर्यंत पर्यायी वळण रस्ता तयार करावा, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे रविवारी सकाळी पुलावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी व जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी केले.
राष्ट्रीय महामार्गावरील टापरगाव येथील पूल हा महिन्यापासून दुरुस्तीकरिता वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला आहे. बस प्रवाशांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे रविवारी रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक सुमारे एक तास प्रभावित झाली. महामार्ग प्राधिकरणचे तांत्रिक व्यवस्थापक महेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी नायब तहसीलदार हारूण शेख यांची उपस्थिती होती. पोलिस निरीक्षक मारुती पंडित, शिवलाल पुरभे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे, व रोहित बेंबरे, वाहतूक शाखेचे चव्हाण, जयंत सोनवणे, सलीम शहा, के. एस. गवळी यांनी बंदोबस्त ठेवला. याप्रसंगी माजी आमदार आण्णासाहेब माने, तालुकाप्रमुख डॉ. आण्णासाहेब शिंदे, केतन काजे, सुनील सोनवणे, शहरप्रमुख राम पवार, डॉ. सदाशिव पाटील, दिलीप मुठ्ठे, शिवाजी थेटे, नगरसेवक बंटी सुरे, अवचित वळवळे, हतनूरचे माजी सरपंच लक्ष्मण केरे, शरद शिरसाठ, ज्ञानेश्वर बोरसे, रमेश वारे, तातेराव साबळे, कमलाकर चौधरी, रंजना कुलकर्णी, नलिनी महाजन, वंदना गवळी, राजश्री पोफळे यांचा सहभाग होता.

१० मे चा वायदा
यावेळी महामार्ग प्राधिकरणचे उपमहाप्रबंधक (तांत्रिक), प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांच्या सहीचे पत्र आंदोलकांना देण्यात आले. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून सॅम फिल्ड या कंपनीमार्फत २३ मार्च रोजी करार करून पुलाची दुरुस्ती केली जात आहे. हा पूल १० मेपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे नमूद केलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवर पुन्हा एक बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बीड बायपास रोडवर नारेगावातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (१६ एप्रिल) या रस्त्यावर ट्रकने चिरडल्याने दुचाकीस्वार एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताच दुचाकीवरील दुसऱ्या तरुण जखमी झाला. हा अपघात सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; अमोल साळवे (३०, रा. जयभवानीनगर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात स्वप्नील देवराव भालेराव (२६, रा. जयभवानीनगर) जखमी झाला. अमोल साळवे याच्या दुचाकीवर (एमएच २०, बीडब्ल्यू ३६५४) तो व स्वप्नील भालेराव बाळापूरकडे गेले होते. तेथे दोघांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली. त्यावेळी तेथील नागरिकांनी दोघांची समजूत काढून पाठवून दिले. बाळापूरहून येताना देवळाई चौकात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या स्वप्नीलचा अचानक तोल गेला. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. स्वप्नील रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या हायवा ट्रकने (एमएच २०, डीई ६९३५) रस्त्यात पडलेल्या अमोल याला चिरडले. हा अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरुन धूम ठोकली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक अफरोज शेख व त्यांचे सहकारी; तसेच सातारा पोलिसांनी धाव घेतली. जखमी स्वप्नीलला तात्काळ घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक सातारा पोलिस ठाण्यात नेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जखमी स्वप्नील यांचा जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोघांच्या नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सातारा पोलिस ठाण्यात सुरू होती.

आठवडाभरापूर्वी दाम्पत्याचा मृत्यू
रुग्णालयात जाण्यासाठी राजनगरहून दुचाकीवर जाणारे दाम्पत्य संतोष मानकर व आशाबाई मानकर यांना विरुद्ध दिशेने जात असताना ट्रकने चिरडले होते. ही घटना ताजी असतानाच हा अपघात झाला. गेल्या दोन महिन्यांत दाम्पत्यासह बीड बायपासवर दोन चिमुकल्या व एका महाविद्यालयीन तरुणीचा बळी गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गीत भीमायण’ला रसिकांचा प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रा. संजय मोहड यांचा ‘गीत भीमायण’ कार्यक्रम विशेष रंगला. लोककवी वामनदादा कर्डक यांची गाणी शास्त्रीय सुरावटीत ऐकणे रसिकांसाठी पर्वणी ठरली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गायक प्रा. डॉ. संजय मोहड यांच्या ‘गीत भीमायण’ कार्यक्रम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रा. मोहड यांनी २४ भीमगीते सादर केली. या मोठ्या संगीत संचात गायक व वादकांची संख्या ४० होती. त्रिशरण पंचशील (भूप कल्याण), धाव घेईल तुझ्या कुळी (पहाडी), माता भिमाई त्या बाळाची आई (तिलक कामोद), जन्मले भीमाईचे बाळ (पहाडी), भीमा मुझ्या महूला (पहाडी), जीवाला जीवाचं दान (पहाडी), रमाचं नांदणं (पहाडी), आज माझ्या मनाची (केदार), मुंबईचा एक अधिकारी (पहाडी), जगातली देखणी (तिलक कामोद), भीमाच्या नावाआधी (पहाडी), तन उजळे पण मन उजळावे (यमन), चांदण्याची छाया (तिलक कामोद), भीमवाणी पडली माझ्या कानी (भूप) आदी गाणी प्रा. मोहड आणि विद्यार्थ्यांनी सादर केली. शास्त्रीय रागदारीत लोकगीते ऐकताना रसिकांचा भान हरपले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. व्ही. बी. तायडे, कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे, नलिनी चोपडे, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. सुहास मोराळे यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्दापूर पोलिसांना बॅटरीवरील मोपेड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर
अजिंठा लेणी परिसरात गस्त घालण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या दोन मोपेड पोलिस दलात दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रदूषणमुक्त भागात गस्त घालणे व मदत पोहचवणे सोपे होणार आहे.
अजिंठा टी पॉइंट ते लेणी पायथा हा चार किलोमीटरचा परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना निषिद्ध ठरवण्यात आला आहे. या मार्गावरून पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या प्रदूषणमुक्त बस धावतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १५ ऑगस्ट २००२ पासून या चार किलोमीटरच्या अंतरात खासगी वाहनांना प्रवेश बंदी आहे. परिणामी डोंगरी गावात किंवा लेणी परिसरात दुर्घटना घडल्यास जखमींच्या वाहतुकीसाठी सुद्धा या बसवरच अलबंलून राहावे लागते. शिवाय पोलिसांना वाहनांद्वारे गस्त सुद्धा घातला येत नाही. त्यामुळे या दोन मोपेडमुळे किमान मदत पोहचवणे व गस्त घालणे शक्य होणार आहे.

नियमपूर्तीची प्रतीक्षा
बॅटरीवरील दोन मोपेड फर्दापूर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. शासकीय नियमांची पूर्तता केल्यानंतर त्या लेणी पायथ्यापर्यंत धावणार आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. या नियमांची पूर्तता करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागेल, असे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images