Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ अंगणवाडी बांधकामासाठी आठ कोटी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीकडून आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ज्या अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाही, त्यांना हक्काची इमारत आता मिळेल.
जिल्ह्यात तीन हजारांवर अंगणवाड्या असून जिल्हा परिषदेच्या बालविकास प्रकल्पाअंतर्गत या अंगणवाड्या चालतात. आजही सुमारे २५० अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत. तर ज्यांना आहेत त्यातील काही जुन्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी बांधकामासाठी निधी आला नव्हता. यावर्षी आठ कोटी रुपये आले आहेत.
अंगणवाड्यांच्या इमारतींचा आराखडा बदलण्यात आला असून तरतूदही वाढवून सहा लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अंगणवाड्यांमध्ये किचन, स्वच्छतागृह, हॉल, समोर बाग असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या अंगणवाड्या प्रशस्त होतील.

स्मार्ट अंगणवाड्या
शहराजवळ असलेल्या गावामध्ये किरायाच्या इमारतीत अंगणवाड्या भरविल्या जातात. त्या ठिकाणी जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे इमारतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरीकडे जिल्ह्यामध्ये आयएसओ अंगणवाड्या होत असतानाच आता स्मार्ट अंगणवाड्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार काम सुरू झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट नोटा प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या चार आरोपीविरुद्ध गुन्हे शाखेने गुरुवारी शंभर पानाचे दोषारोपपत्र गुरुवारी दाखल केले. हा प्रकार २२ जानेवारी रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्यापही पसार आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारी रोजी शहाबाजार परिसरात सापळा रचून इर्शाद महम्मद इसाक (रा. शहाबाजार) याला अटक केली होती. त्याच्या ताब्यातून दोन हजारांच्या बनावट १८ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यानंतर त्याने‌ दिलेल्या माहितीवरून फेरोज अब्दुल रशीद देशमुख (रा. नारेगाव) याला अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून दोन हजारांच्या दोन बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. अंबड येथे या नोटा तयार करण्यात आल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी अंबड येथे छापा टाकून एका खोलीतून नोटा तयार करण्याचे साहित्य, प्रिंटर, संगणक, केमिकल आदी साहित्य जप्त केले. मात्र प्रमुख आरोपी सय्यद समीर सय्यद अकबर व अन्वर देशमुख हे पसार झाले. या दोघांचा अद्याप शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जाधव हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिता-पुत्रावर कुऱ्हाडीने हल्ला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पिता-पुत्रावर कुऱ्हाड व काठीने हल्ला केल्याच्या प्रकरणात ३० आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, यातील ६ आरोपींना मंगळवारपर्यंत (२५ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी शुक्रवारी दिले.
घारदोन (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रकाश लिंबाजी औचरमल व लिंबाजी औचरमल या पिता-पुत्राने काही महिन्यांपूर्वी घारदोन येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधले होते. त्याला काहींनी विरोध केला होता. यातून वाद होऊन औचरमल कुंटुंबियांनी चरणसिंग गोहुळसिंग शिहरे, ज्ञानेश्वर हरिभाऊ नवपुते, विलास धनलाल शिहरे, योगेश कचरू माटे, नारायण लिंबाजी मोटे, कृष्णा कचरू मोटे (सर्व रा. घारदोन) व इतर २४ आरोपींविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. तक्रार मागे घेण्यासाठी पिता-पुत्रावर हल्ला चढवीत जातीवाचक शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी प्रकाश औचरमल (२२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ३० जणांवर अॅट्रॉसिटी व जिवे मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वरील सहा जणांना अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले असता कोर्टाने सहा आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

हत्यार जप्त करणे बाकी
आरोपींकडून हत्यारे जप्त करणे व सखोल तपास करणे बाकी आहे, फरार आरोपींचा शोध घ्यावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्स-कंटेनरच्या अपघातात दोन ठार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
खासगी ट्रॅव्हल्स आणि कंटेनरच्या अपघातात दोन ठार, तर १८ जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर गंगापूर फाट्याजवळ शुक्रवारी पहाटे घडली.
गंगापूर फाट्याजवळ बिघडलेला कंटेनर (क्रमांक एन. एल. ०२ के ९६२६) चालकाने कोणतेही सूचक चिन्ह न ठेवता तसाच रस्त्यावर उभा केला होता. दरम्यान यवतमाळ येथून निघालेली चाणक्य ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एम. एच. २९ एण ८४९३) चालकाला कंटेनरचा अंदाज न आल्याने कंटेनरवर पाठीमागील बाजूस जोरात धडकली. या धडकेत चालक अंबादास डोंगरे (वय ४०, रा. दारव्हा) यांचा जागीच मृत्यू झाला. चालकाच्या पाठीमागे बसलेले राजेश शंकर गावंडे (वय ४५) हे केबिनमध्येच अडकले. तासभर क्रेनच्या मदतीने प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली. मात्र, रुग्णवाहिकेत टाकल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेची माहिती समजताच गंगापूर पोलिस ठाण्याचे डी. ए. कराळे, विकास चव्हाण, डी. के. थोरे, अमित पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. याच मार्गावरून जाणारे एसआरपी राज्य राखीव पोलिस दलाचे निरीक्षक आर. जी. राणा व त्यांच्या पथकाने मदत केली. शकील पटेल, कलीम पटेल, राजू सावंत, अमोल सावंत यांनीही जखमींना बाहेर काढण्याकरिता मदत केली. कंटेनर चालकाविरूद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एस. मुठाळ हे तपास करीत आहेत.

जखमींवर उपचार सुरू
अपघातात अठरा जण जखमी झाले आहेत. त्यात मंगेश भारत सावडे, बाळू अशोक जाधव, विनोद श्यामराव जाधव, अनिल रुपसिंह जाधव, चंदू नारायण चव्हाण, रेखा सुनील वाघमारे, साक्षी सुनील वाघमारे, माधव दाजी काळे, देविदास श्यामराव शिंदे, माऊली देविदास शिंदे, विठ्ठल नारायण सदार, हरिदास नामदेव लोखंडे, चंद्रकला रामराव लपटे, अर्चना नंदकिशोर राडने, बाळू अशोक जाधव (सर्व राहणार यवतमाळ), उषा कान्हा कोदमले, लक्ष्मन कान्हा कोदमले, कान्हा रमेश कोदमले (रा. काळींदी महागाव) हे जखमी झाले आहेत. जखमींवर गंगापूर उप जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांपासून जेवण नाही

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आदिवासी वसतिगृहातील मेस बंद झाल्यामुळे दहा दिवसांपासून जेवण न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आदिवासी विकास कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह शहराच्या उस्मानपुरा भागात आहे. शासनाच्या या वसतिगृहातील मेस दहा दिवसांपासून बंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदिवासी विकास कार्यालयातील अधिकारी व मेसचा कंत्राटदार यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे कंत्राटदाराने मेस बंद ठेवली आहे. त्यामुळे सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना दहा दिवसांपासून जेवण मिळाले नाही. वडा - पाव, भजे - पाव खात त्यांनी दहा दिवस काढले. शुक्रवारी या विद्यार्थ्यांची व्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना कळाली. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सोबत घेत आझाद चौकातील आदिवासी विकास खात्याचे कार्यालय गाठले. संचालकांच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी परिषदेचे महानगरमंत्री मोहन भिसे, शिवा देखणे यांनी केले. बंद पडलेली मेस लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मेस सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदनही स्वीकारले नाही
सायंकाळी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले, पण त्याची दखल आदिवासी कल्याण विभागाचे संचालक गजानन फुंडे यांनी घेतली नाही. रात्री नऊ वाजेपर्यंत ते विद्यार्थ्यांना भेटून त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत कार्यालयाच्या बाहेर बसून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांचे काम बंद

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
वकील कायदा दुरुस्ती विधेयक २०१७च्या विरोधात शुक्रवारी (२१ एप्रिल) वकिलांचे काम बंद व बिल दहन आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा उच्च न्यायालय वकील संघ, जिल्हा न्यायालय वकील संघ, कामगार व औद्योगिक न्यायालय वकील संघ तसेच शहरातील सर्व वकील संघांसह ऑल इंडिया लॉयर्स युनियनतर्फे करण्यात आला आहे.
दुरुस्ती बिल हे वकिलांची, अखिल भारतीय वकील परिषदेची आणि राज्य वकील परिषद या स्वायत्त संस्थांच्या स्वायत्ततेची गळचेपी व मुस्कटदाबी करणारे असल्याने आज दुपारी संपूर्ण देशभरातील न्यायालयांसह औरंगाबादेतील तालुका कोर्टापासून औरंगाबाद खंडपीठासमोर या बिलाच्या प्रतीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. दुपारनंतर वकिलांनी निषेध म्हणून न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही. ते बिल रद्द करावे या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांमार्फत केंद्रीय कायदा मंत्री व संबंधितांना पाठविण्याची विनंती करण्यात आली. तसेच स्थानिक खासदारांना निवेदन देऊन बिल संसदेत ठेवू नये आणि सादर झालेच तर ते मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची विनंती करण्यात येणार आहे.
या आंदोलनात उच्च न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, सचिव बी. आर. केदार व इतर पदाधिकारी, राज्य वकील परिषदेचे माजी सदस्य व्ही. डी. साळुंके, एस. बी. तळेकर, एन. एल. जाधव आणि वकील संघाचे सदस्य, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन बा भोसले, सचिव विजेंद्र सरोसया, ऑल इंडिया लॉयर्स युनियनचे सचिव बी. एम. वावळकर, वकील संघांचे अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊंड टेबल : शहरांना प्रदूषणाचा विळखा!

$
0
0

औद्योगिकीकरण आणि विकासाच्या गतीत पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत आहे. जल, जंगल, जमीन यांचा विकासाच्या नावाखाली अतिरिक्त वापर सुरू आहे. परिणामी, भारतात दरडोई अवघे ०.८ टक्के वनक्षेत्र शिल्लक आहे. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, अवैध वृक्षतोड, दूषित भूजल अशा समस्यांनी पर्यावरणाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी दरवर्षी २२ एप्रिल हा ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. ‘पर्यावरण आणि हवामान साक्षरता’ ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ कार्यालयात झालेल्या ‘मटा राऊंड टेबल’मध्ये पर्यावरण तज्ज्ञांनी विविध विषयांवर मते मांडत उपाय सुचवले. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य डॉ. दिलीप यार्दी, पर्यावरण अभ्यासक प्रा. क्षमा खोब्रागडे, निसर्ग मित्रमंडळाचे किशोर गठडी, कचरा व्यवस्थापन अभ्यासक डॉ. लक्ष्मण माने, भूजल अभ्यासक डॉ. अशोक तेजनकर, निसर्ग अभ्यासक प्रकाश कहाळेकर हे या राऊंड टेबलमध्ये सहभागी झाले होते.

जेवढी झाडे लावा; तेवढी टिकवा
पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी ‘जागतिक वसुंधरा दिन’ साजरा करण्यात येतो. दरवर्षी वेगवेगळी संकल्पना राबवून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करतात. तथाकथित औद्योगिकरण नसतानाही भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात. कारण नैसर्गिक साधनसंपत्ती हीच भारताची खरी संपत्ती होती. या संपत्तीवर हक्क स्थापन करण्यासाठी अनेक राजवटींनी आक्रमणे केली. इंग्रज भारतातून गेले तेव्हा भारतात २३ टक्के वनक्षेत्र होते. सद्यस्थितीत वनक्षेत्र १५ ते १८ टक्के आहे. १९५२मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी देशाचे वनक्षेत्र ३३ टक्के करण्याचा ठराव मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर दरवर्षी वनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही वनक्षेत्र वाढवण्यात अपयश आले. उलट दरवर्षी वनक्षेत्र झपाट्याने कमी होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे. देशात दरडोई फक्त ०.८ टक्के वनक्षेत्र आहे. अमेरिकेत हे प्रमाण १३ टक्के आणि कॅनडात १४ टक्के आहे. वेगवेगळ्या विकासयोजना राबवण्यासाठी दरवर्षी दीड लाख हेक्टर जमीन बिगरशेती क्षेत्राखाली जाते. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात ४२ टक्के पक्षी आणि सरीसृप २२ टक्के आहेत. देशाचा विचार केल्यास जैववैविध्य महाराष्ट्रात चांगली आहे, मात्र नद्या आणि जंगले वाचवण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशात नदीकाठ हिरवेगार करण्यासाठी ‘चुनरी’ प्रकल्प राबवण्यात आला. या पद्धतीचा प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्याची गरज आहे. नदीचे पाणी शुद्ध करण्यासाठी चांगला उपयोग होईल. पर्यावरण साक्षरतेची राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना गरज नाही. सर्वसामान्यांनाही त्याची गरज नाही. फक्त प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. पृथ्वीचे पर्यावरणदृष्ट्या रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव उपाय आहे. शहरात अनेक संस्था वृक्षारोपणासाठी पुढे येतात, मात्र एखाद्या कॉलनीत झाडे लावल्यानंतर कॉलनीवर संवर्धनाची जबाबदारी सोपवून संस्थेचे कार्यकर्ते निघून जातात. या संस्थांना शासनाने मोकळी जागा उपलब्ध करून दिल्यास वनक्षेत्र वाढू शकते. प्रत्येक लोकप्रतिनिधीने स्वेच्छा निधीतून झाडांचे संवर्धन करावे. कोणत्या जमिनीत कोणती झाडे लावावी याची शास्त्रशुद्ध माहिती घ्यावी. ऑक्टोबर महिन्यापासूनच वृक्षारोपणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. सामूहिक वृक्ष लागवडीत झाडांचे संगोपन होत नसल्याचे दिसते. या समस्येवर मात करण्यासाठी मोजकीच झाडे लावून त्यांना वाढवण्यावर भर देणे नितांत गरजेचे आहे. शंभर झाडे लावली तर किमान दहा तरी टिकतील असा विचार लोक करतात. उलट जेवढी झाडे लावू तेवढी टिकवू हा विचार रुजला पाहिजे. कमी झाडे लावा, पण त्यांना मोठे करा.
- डॉ. दिलीप यार्दी, सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती

पाणी फेरवापर हा बचतीचा उपाय
फक्त रोपे लावून पर्यावरण जतन होणार नाही, तर वृक्ष लागवडीचा आढावा घेऊन उपाययोजना करणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. जलस्रोतांचे सर्वेक्षण केल्यानंतर भयावह स्थिती समोर आली. जलस्रोत कचराकुंडी झाली आहेत. पाण्याचा लवलेश नाही. विकासाचा चुकीचा अर्थ लावून वाटचाल करीत आहोत. मूलभूत पर्यावरणाचा विचार न करता, स्थानिक संसाधने लक्षात घेऊन उद्योग उभारणीचा कोणताही विचार दिसत नाही. विकासाच्या वाटेवरील शहर असे बिरूद मिळाले तरी धन्यता वाटते, मात्र पर्यावरणाचे होणारे नुकसान कसे भरून काढणार? कारखानदारीला उत्तेजन देताना सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन नाही. सांडपाण्याचा निचरा करणारे संनियंत्रण अस्तित्वात नाही. विदेशात कारखाना सुरू करतानाच पर्यावरणविषयक अटींची पूर्तता करावी लागते. आपल्या देशात कारखानादारीच्या प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. सांडपाण्याने नद्या प्रदूषित झाल्या आहेतच. शिवाय जमिनीत सांडपाणी मुरल्याने भूजल प्रदूषित होत आहेत. शहरात काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असले तरी त्यांची कार्यक्षमता अत्यंत कमी आहे. जल, जंगल, जमीन यांचा विचार करून एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. प्रत्येकाला कामाच्या मर्यादा असल्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे पर्यावरणविषयक काम करून विघातक कृतींना रोखणे आवश्यक आहे. पर्यावरण नियमांच्या तरतुदी अनेक आहेत. नियमांची अंमलबजावणी नसल्यामुळे प्रश्न जटील झाले आहेत. पृथ्वी ग्रहावरच पाणी असल्यामुळे त्याला ‘नील’ ग्रह म्हणतात. पर्यावरण समस्यांमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. देशात महाराष्ट्र आणि हिमालय या दोन भागातच सर्वाधिक जैवविविधता आहे. मानवी हस्तक्षेपामुळे यातील कोणते जीव संपुष्टात येत आहेत याची माहितीसुद्धा आपल्याला नाही. आम्ही विद्यार्थ्यांसाठी पाण्याचे ‘पासबुक’ बनवले होते. दिवसभरात किती आणि कशासाठी पाणी वापरले याचा ताळेबंद ‘पासबुक’मुळे समजला. फ्लशच्या निमित्ताने सर्वाधिक पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याचा फेरवापर करण्यासाठी काही तांत्रिक त्रुटी आहेत. विशेषतः सांडपाणी प्रक्रिया करून वापरता येईल. पाणी फेरवापर करता येईल, अशा पद्धतीचे प्लम्बिंग करूनच नवीन बांधकामे करावीत. पाण्याचा फेरवापर झाल्यास किमान ६० टक्के पाणी बचत होईल. पाणी वापराबाबत धरबंद नसल्यामुळे अतिरेकी उपसा झाला आहे. वृक्षतोड, प्रदूषण, पाणी उपसा, मर्यादित पाऊस यांचा विचार करून प्रत्येकाने विचारपूर्वक कृती करावी अशी अपेक्षा आहे.
- प्रा. क्षमा खोब्रागडे, पर्यावरण अभ्यासक

ईपीआरची अंमलबजावणी व्हावी
कचरा ही आता एक जागतिक समस्या बनली आहे. कचरा व्यवस्थापनेची गरज आपल्याकडे २०००पर्यंत वाटलीच नाही. कायदे असले तरी त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच विविध प्रकारच्या कचऱ्यांचा प्रश्न गंभीर होत अाहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, मानवी आरोग्य, जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. त्यामुळेच या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आजही काही अपवाद वगळता कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने संकलन, वाहतूक व त्यानंतर प्रक्रिया होताना दिसत नाही. गेल्या काही वर्षांपासून विविध वस्तू ग्राहकांपर्यंत पॅकेजिंग पद्धतीने पोचविल्या जात आहे. दूध, ताकापासून तेल, बिस्किट अशा असंख्य वस्तू, खाद्यपदार्थ पॅकिंग स्वरुपात मिळतात. १९९२पर्यंत पॅकेजिंग एवढ्या प्रमाणात नव्हती, त्यावेळी कचऱ्यांची समस्याही फारशी भेडसावत नव्हती. त्यामुळे कचरा वाढत आहे. या कचऱ्याची संबंधित कंपनीने निर्मित केला, पण त्यासाठी नागरिकांनाच जबाबदार धरले जाते. खरेतर पॅकेजिंग करून वस्तू विक्री करणाऱ्या कंपनीवरच या कचऱ्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी कायदेशीर तरतुदींपैकी असलेल्या ‘एक्स्टेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी’नुसार (ईपीआर) कंपनीवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. पॅकिंगसाठी वापरलेल्या प्लॉस्टिक पिशव्या, बाटल्या आदी पुन्हा गोळा करून त्याची विल्हेवाट (योग्य प्रकारे) लावण्याची वा रिसायकलिंग करण्याची जबाबदारी पूर्णपणे उत्पादक कंपनीवर टाकली आहे. तसे न केल्यास संबंधित उत्पादन निर्मितीची नोंदणी रद्द करणे, नूतनीकरण रद्द करणे अशा तरतुदी आहेत. संबंधित कंपनी निर्माण होणारा हा कचरा पुन्हा संकलित करून नेत नसेल, तर कंपनीच्या वस्तू शहर वा ग्रामपंचायत हद्दीत आणण्यास स्थानिक स्वराज संस्था बंदीही घालू शकतात. ‘ईपीआर’ची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी विविध क्षेत्रातील सदस्यांची एक कृती समिती असावी. व्यापक जनजागृती करून एक दबाबगट निर्माण झाला पाहिजे.
- डॉ. लक्ष्मण माने, अभ्यासक, कचरा व्यवस्थापन


कचऱ्याकडे दुर्लक्ष भविष्यासाठी घातक
आपण जसजशी भौतिक प्रगती करतो, तसतसे आपले वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने आपण निर्माण केलेल्या कचऱ्याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक वाढतात. कचरा एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसतात. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या परिसरातही कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला दिसतो. यासर्व प्रकारामुळे प्रदूषण वाढत असून, त्याचा पर्यावरणावर, आरोग्यावर परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी कचऱ्याचे संकलन, वाहतूक व योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेची आहे. याकडे केलेले दुर्लक्ष भविष्यासाठी घातक ठरले. यासाठी साऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट लावली जावी; तसेच कॅरीबॅग, बाटल्यासह अन्य काही कचऱ्याचे रिसायकलिंग करणे शक्य असेल, तर ते केले जावे. त्यामुळे प्लास्टिकच्या या वस्तुंची निर्मिती थांबविता येणे शक्य होईल. हे काम करत असतानाच दुसरीकडे वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन यांकडे अधिक भर दिला जावा.
- प्रकाश कहाळेकर, निर्सग अभ्यासक


पर्यावरण समिती स्थापन करा
पर्यावरण समतोल टिकवण्यासाठी झाडांचे महत्त्व असते. झाडे लावून संवर्धन करण्याबाबत अनास्था दिसते. उलट वनक्षेत्र कमी होऊनही काळजी दिसत नाही. मागील अनेक वर्षांपासून निसर्ग मित्रमंडळाच्या माध्यमातून वृक्ष लागवड उपक्रम राबवतो. यावर्षी ‘सीड बॉल’ संकल्पना राबवत आहोत. वनक्षेत्र, डोंगराच्या उतारावर व इतर ठिकाणी बिया टोचून लागवड करीत होतो, मात्र अनेकदा बिया पक्षी किंवा मुंग्या खातात. जास्तीचा पाऊस झाल्यास बी वाहून जाते. या समस्येवर मात करण्यासाठी ‘सीड बॉल’ उपयुक्त ठरेल. माती व शेणाच्या मिश्रणात बी ठेवून त्याला गोल आकार दिला आहे. या बॉलमुळे बी बाहेर येणार नाही. पावसाळ्यात लवकर बी रुजून रोप तयार होईल. शेणाचे मिश्रण असल्यामुळे रोपाला ताबडतोब खत उपलब्ध होईल. उगवणक्षमता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. निसर्ग मित्रमंडळाच्या ठिकठिकाणी निसर्ग सहली असतात. या माध्यमातून वृक्षारोपण करीत आहोत. गौताळा अभयारण्य, सातारा, पितळखोरा, अजिंठा येथे लागवड करण्यात येईल. आवाहन केल्यानंतर लोकांनी बिया संकलित करून आमच्याकडे दिल्या आहेत. सध्या दीड लाख बिया गोळा झाल्या आहेत. सोशल मीडियाचा या कामासाठी खूप चांगला उपयोग झाला. शहरात वृक्षारोपण वाढवण्यासाठी व्यापक नियोजन गरजेचे आहे. प्रत्येक वॉर्डात पर्यावरण समिती स्थापन झाल्यास झाडे लावण्याचे प्रश्न मार्गी लागतील. जवाहर कॉलनीत वृक्ष लागवडीचा चांगला उपक्रम राबवण्यात आला. या धर्तीवर प्रत्येक कॉलनीत जागरूकता निर्माण करून वृक्ष संवर्धन शक्य आहे. शहर आणि गाव पातळीवर नियोजनपूर्वक वृक्ष लागवड झाल्यास वनक्षेत्र निश्चित वाढू शकेल.
- किशोर गठडी, सदस्य, निसर्ग मित्रमंडळ

पाण्याचा योग्य वापर गरजेचा
मुबलक पाणी आहे म्हणून त्याचा हवा तसा वापर करणे चुकीचे अाहे. पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ कधीही येणार नाही. गेल्या काही वर्षांत पाण्याचा वापर वाढला आहे. दरडोई पाण्याचा वापर वाढला आहे. सरासरीपेक्षा पाच ते दहा टक्के पाऊस कमी पडला, तर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. भूर्गभातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्याने पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे काम केवळ सरकारचे नव्हे, तर त्याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाचे आहे. त्यासाठीच जल साक्षरता, प्रबोधन महत्त्वाचे आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, योग्य नियोजन व बचत महत्त्वाची आहे. पाण्याच्या फेरवापरावर भर दिला जावा. शहराचा विचार करता आपल्याकडे केवळ दहा टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते ९० टक्के पाणी प्रक्रियेविना वाया जाते. त्यामुळे भूजल दूषित होत आहे. वापरलेले पाणी ड्रेनेजमधून नाल्यांत आणि तेथून मोठ्या जलाशयापर्यंत जाते. नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरात असलेल्या शेतांतील विहिरींचे पाणीही दूषित होते. त्याच पाण्यावर भाजीपाला, पिके घेतली जातात. त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ योजना केवळ कागदावर राहता कामा नये. आंघोळ, धुणी-भांडी स्वच्छतागृहांतील पाण्याचा फेरवापर केल्यास पाण्याची मोठी बचत शक्य आहे. त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणात नाही. सोसायटी, कॉलेज, वसतिगृहे आदी ठिकाणी हे सहज शक्य आहे. प्रक्रिया केलेले हेच पाणी नंतर उद्यानांतील झाडांना देता येते. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याने प्रदूषण होत नाही. पाण्याचा साठाही टिकून राहण्यास मदत मिळते. जास्त विहिरी, बोअर घेऊन उपयोग नाही, तर आहेत त्यांचे योग्य पद्धतीने जलफेरभरणा होणे आवश्यक आहे. त्यामुळे भूजल पातळी खाली जाणार नाही. वृक्षरोपण, जलफेरभरणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांवर भर देणाऱ्या सोसायटी, परिसर यांना प्रोत्साहन देण्याचे काम स्थानिक स्वराज संस्थांनी करावे. प्रत्येक वॉर्डात पर्यावरण समिती स्थापन केली जावी.
- डॉ. अशोक तेजनकर, भूजल अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्तफाबादचे नामकरण स्वामी विवेकानंदनगर

$
0
0

मुस्तफाबादचे नामकरण स्वामी विवेकानंदनगर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

मुस्तफाबाद वसाहतीचे नाव स्वामी विवेकानंदनगर करण्याचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर करू नका, मुस्तफाबाद असेच नाव राहू द्या, असे म्हणत एमआयएमच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण हा विरोध डावलून स्वामी विवेकानंदनगर असे नामकरण करण्यात आले.

देवानगरी, प्रतापनगर भागात मुस्तफाबाद या नावाने एक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सोसायटी, सनानगर, राजगुरूनगर, भीमाशंकर कॉलनी, देवइंद्रायणी सोसायटी, शिवनगर, स्वप्नपूर्ती इनक्लेव्ह, शिवकृपा कॉलनी, किनकोरबेननगर, कासलीवाल मार्व्हल या कॉलनींचा समावेश आहे. गट क्रमांक १ ते ४ मध्ये मुस्तफाबाद वसलेले आहे. मुस्तफाबाद हे नाव बदलून स्वामी विवेकानंदनगर असे नाव करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली होती, त्यानुसार नगरसेविका शोभा बुरांडे यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वसाहतीचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला अर्चना निळकंठ व कमलाकर जगताप या नगरसेवकांनी अनुमोदन दिले. पालिकेच्या सभागृहात चर्चेसाठी हा प्रस्ताव पुकारण्यात आला तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला. मतीन, समीना शेख, गंगाधर ढगे, अब्दुल नाईकवाडी आदी नगरसेवक प्रस्तावाला विरोध करीत महापौरांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. मुस्तफाबाद हे नाव जुने नाव आहे, ते तसेच राहू द्या अशी मागणी करीत हे नगरसेवक आक्रमक झाले. महापौर भगवान घडमोडे यांनी या नगरसेवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. प्रस्ताव मंजूर करून तो नामांतर समितीकडे पाठवण्यात येइल, असे ते म्हणाले. यावरही एमआयएमच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांचा विरोध सुरूच राहीला. या विरोधाला न जुमानता मुस्तफाबादचे स्वामी विवेकानंदनगर असे नाव करण्यास महापौरांनी मंजुरी दिली.

मुस्तफाबाद गावाचे नाव

मुस्तफाबाद हे गावाचे नाव आहे. महापालिकेत गारखेडा, शहानूरवाडी अशी अनेक गावे समाविष्ट करण्यात आली. त्यातच मुस्तफाबाद हे गाव महापालिकेत समाविष्ट करण्यात आले. महसूल विभागात मुस्तफाबाद अशीच नोंद आहे. महापालिकेत मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार या भागाचे नाव शासनाच्या दप्तरी स्वामी विवेकानंदनगर असे करायचे असेल तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधिचा निर्णय झाला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५५ जोडप्यांनी बांधल्या कुंजखेड्यात लग्नगाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
तालुक्यातील कुंजखेडा येथे यंदाही ऑल इंडिया मेवाती महासभेकडून गुरुवारी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात औरंगाबाद जिल्ह्यातून आलेल्या मेवाती समाजाच्या ५५ मुस्लिम जोडप्यांचा विवाह रिवाजानुसार पार पडला.
या सामूहिक विवाह सोहळ्यात जिल्ह्यातील नांदगीरवाडी, गराडा, तळेगाव, सिल्लोड, केऱ्हाळा, फर्दापूर, तळेगाव, कुंजखेडा, डोंगरगाव येथील जोडप्यांची मुस्लिम समाजाच्या धार्मिक विधीनुसार विवाहासाठी उपस्थिती होती. या परिसरातील नावाजलेली शैक्षणिक संस्था उमर बीन खत्ताब संस्थेचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद फारुख वस्तानवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शानदार विवाह सोहळा पार पडला. या विवाहप्रसंगी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार नितिन पाटील, कन्नडचे उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अहेमद अली, जिल्हा परिषद सभापती धनराज बेडवाल, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते, जिल्हा बँकेचे संचालक अशोक मगर, बाजार समिती सभापती राजेंद्र मगर, राजेंद्र चौहान, पंचायत समिती सभापती मीना मोकासे, उपसभापती रुबिनाबी सिकंदर, पाणी पुरवठा विभागाचे एम. एम. देवकर यांच्यासह वऱ्हाडी, ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनिमम बॅलन्ससंबंधी खातेदार अजूनही अनभिज्ञ

$
0
0

मिनिमम बॅलन्ससंबंधी खातेदार अजूनही अनभिज्ञ

एसबीआय खातेदारारांना द्यावेच लागणार ‘हे’ चार्जेस

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांमध्ये ‘मिनिमम बॅलन्स’ व त्या अनुषंगाने कापले जाणारे ‘चार्जेस’ याबाबत बराच घोळ नि‌र्माण झाला आहे, परंतु खातेदारांना एक एप्र‌िलपासून लागू झालेले दर द्यावेच लागणार आहेत. यासंबंधी अजून स्टेट बँक मॅनेजमेंटने कुठलेही दर कमी अथवा शिथिल केल्याचे सांगितलेले नाही, असे स्पष्टीकरण औरंगाबाद शहरातील स्टेट बँकेच्या अधिकारीवर्गाने केले आहे.

अकाउंटमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक रक्कम असल्यास एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणताही चार्ज आकारला जाणार नाही. तसेच तुमच्या अकाउंटमध्ये १ लाखाहून अधिक रक्कम असल्यास दुसऱ्या बँकांच्या एटीएममधूनही पैसे काढण्यासाठी कोणातही चार्ज आकारला जाणार नाही. एसएमएस अलर्टसाठी चार्ज लावला जाईल. १००० रुपयांपर्यंत युपीआय/युएसएसडी ट्रंझॅक्शनवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. खात्यात किमान रक्कम किती असावी याचे काही नियम बँकेने घालून दिले आहेत त्यानुसार दंड आकारला जाणार आहे. किमान रकमेपेक्षाही कमी रक्कम खात्यात असल्यास १ एप्रिलपासून त्यावर दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तुमच्या राहण्याच्या ठिकाणावरून दंडाची रक्कम ठरणार आहे. मेट्रो शहरासाठी किमान रक्कम ५००० रुपये शहरासाठी किमान रक्कम ३००० रुपये, निमशहरी भागासाठी २००० रुपये ग्रामीण भागासाठी १००० रुपये कमीतकमी खात्यात‌ ठेवावे लागणार आहे. असे न केल्यास दंड भरावा लागणार आहे. किमान रकमेच्या ७५ टक्क्यांहून अधिक कमी रक्कम तुमच्या खात्यात असल्यास १०० रुपये दंड आकारला जाईल. किमान रकमेच्या ५० ते ७५ टक्क्यांची कमी असल्यास ७५ रुपये आकारले जातील. ५० टक्क्यांहून कमी रक्कम असल्यास ५० रुपये आकारले जातील. ग्रामीण भागात ग्राहकाच्या खात्यात किमान रक्कम नसल्यास सर्व्हिस टॅक्ससहित २० ते ५० रुपये दंड आकारला जाईल.

एसबीआय व्यतिरिक्त अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता तीनपेक्षा अधिक ट्रांझॅक्शन झाल्यास प्रत्येकी २० रुपये आकारले जातील. तसेच एसबीआयच्या एटीएममध्ये महिन्याला पाच ट्रंझॅक्शन फ्री असतील. त्यानंतर मात्र प्रत्येक ट्रंझॅक्शनसाठी १० रुपये आकारले जातील.

एक एप्र‌िलपासून संपूर्ण देशभर जे दर स्टेट बँके‍च्या प्रशासनाने लागू केले आहेत ते दर तर द्यावेच लागतील. हे दर खातेदारांनी आपल्या शाखांमध्ये जाऊन तपासून घ्यावे व शंकांचे निरसन करून घ्यावे. लागू झालेले नियम अटी शर्ती शिथिल करण्यात आलेल्या नाहीत याची नोंद घ्यावी, अटी शर्ती शिथिल झाल्यास एसबीआय प्रशासन तसे जाहीर करत असते.
रवी धामणगावकर, एसबीआय अधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयगावात पकडले १८ लोटाबहाद्दरांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आदेशामुळे नगर पंचायत व पोलिस ठाण्याच्या संयुक्त गुड मॉर्निंग पथकाने शुक्रवारी पहाटे सोयगावमध्ये मोहीम राबवून उघड्यावर शौचास जाणाऱ्या १८ जणांवर कारवाई केली. परंतु, काही कारणामुळे पहाटेपासून ताब्यात घेतलेल्या लोटाबहाद्दरांना कारणेदाखवा नोटीस बजावून सोडण्यात आले.
सोयगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी १८ जण उघड्यावर शौचास बसल्याचे संयुक्त पथकाला आढळले. त्यांना कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. परंतु, नागरिकांनी सोयगाव पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी करून सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, सार्वजनिक शौचालयात पाण्याचा अभाव, स्वच्छ भारत अभियानातील अपूर्ण असलेली शौचालायांची कामे आदी मुद्दे उपस्थित केले. त्यामुळे पोलिसांना कारवाई आटोपती घ्यावी लागली. या १८ जणांना कोर्टात हजर करण्यात आले. पण, दंडात्मक कारवाईत कोर्टाला आढळलेल्या त्रुटीमुळे त्यांना पोलिसांनी कारणेदाखवा नोटीस बजावून सोडून दिले. योग्य कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना सोमवारी हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. ज्ञानेश्वर बावस्कर, अनिल बावस्कर, शेख हुसेन उस्मान, सुलतान शेख युसुब, अनिल जाधव, अजीज शेख कादर, जगन सोनवणे, ज्ञानेश्वर आगे, प्रभाकर घनघाव, अमोल चौधरी, चंद्रकांत खरात, विष्णू सोनवणे, रामदास धुणकर, कडुबा चौधरी, रामेश्वर चौधरी, संतोष चौधरी, नितीन जाधव, अमोल जाधव यांना तात्पुरती नोटीस देऊन सोडले आहे.

नगर पंचायतीवर रोष
नागरिकांना पोलिस ठाण्यातच शहरात सुविधा पुरविणाऱ्या नगर पंचायतीवर रोष व्यक्त केला. त्यामुळे पोलिस ठाण्यात काही वेळ गोंधळ उडाला होता. यामुळे ही कारवाई म्हणजे डोकेदुखी झाल्यासारखे पोलिसांना वाटत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअरपोर्टवर नोकरीचे आमिष; फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एअरपोर्टवर सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत पाच तरुणांची एक लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत घडला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका स्थानिक वर्तमानपत्रात ६ डिसेंबर २०१६ रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद येथील एअरपोर्टवर नोकरी असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ती पाहून विठ्ठल शेषराव नागवे (वय ३२ रा. समर्थनगर, चिंतामनी कॉलनी) यांनी जाहिरातीत प्रसिद्ध झालेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधला. नागवे यांच्या प्रमाणे इतर पाच तरुणांनी देखील संपर्क साधला होता. यावेळी अजयकुमार व सुभाष ढाका यांच्याची त्यांचा संवाद झाला. या दोघांनी रजिस्ट्रेशन, प्रोसेसिंग फी आदी कारणे सांगून नागवे व इतरांकडून एकूण एक लाख २० हजार रुपये घेतले. ९ जानेवारीनंतर अजयकुमार व सुभाष ढाका यांनी नागवे व इतरांना प्रतिसाद देणे कमी केले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे देत होते. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने नागवे यांनी गुरुवारी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक फौजदार मोहम्मद एजाज हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोडमध्ये रविवारी सामूहिक विवाह सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने गेल्या दहा वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा यंदा २३ एप्रिल रोजी होत आहे.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनखाली नॅशनल एज्युकेशन सोसायटीतर्फे होणाऱ्या या सोहळ्यात ५५५ विवाह लावण्याचे नियोजन आहे. हा सोहळा जमालशाह कॉलनीतील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. अक्कलकुवा येथील मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभाकर पालोदकर, मौलाना मुसा साहब वस्तानवी, हाफिज मो. इलियास रियाजी, मौलाना रफिक दानापुरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नवीन दांपत्यांना संसारोपयोगी साहित्य, पाहुण्यांसाठी जेवण देण्यात येणार आहे. या मेळाव्यात यापूर्वी शेकडो विवाह लागले असून अनेकांच्या खर्चाची बचत झाली आहे. मेळाव्यात विवाहासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्या आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांना मारून दारू तस्कराला पळवले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दारू तस्कराला अटक केल्यानंतर, सात ते आठ गुंडांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला. दोन अधिकाऱ्यांना जखमी करून हल्लेखोरांनी अटकेतील तस्करासह पळ काढला. ही घटना उत्पादन शुल्क विभागाच्या उस्मानाबाद येथील कार्यालयात घडली.
उस्मानाबाद राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० एप्रिल रोजी सायंकाळी कळंब येथील कुसळंब-माजलगाव रस्त्यावर दारूची तस्करी करणाऱ्या टेम्पोला पकडले. यामध्ये बनावटीची दारू घेऊन जाताना एक टेम्पो पाठलाग करून पकडला. त्यामध्ये नऊ लाख रुपयांची दारू होती. या ट्रकसह मोतीराम भोसलेलाही अटक करण्यात आली. त्याला उस्मानाबाद येथील कार्यालयात आणले व त्याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. या वेळी कायदेशीर कारवाई सुरू असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ लाखाची दारू जप्त करून कायदेशीर कारवाई सुरू केली. त्यावेळी रोहन उर्फ मुन्ना खुणे हा सात ते आठ जणांना घेऊन कार्यालयात आला आणि भोसलेला सोडविण्यासाठी धमकी दिली. अधिकाऱ्यांनी त्याला नकार दिल्यानंतर, लोखंडी रॉडने मारहाण करत, भोसलेला पळवून नेले. या हल्ल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संतोष जगदाळे व उपनिरीक्षक राजकुमार राठोड जखमी झाले. खुने हा रिपाइंच्या युवक विभागाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असून, पोलिसात त्याच्यासह अन्य आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्री प्रतिनिधीकडून पावणेतीन लाख लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ग्राहकांच्या कलेक्शनचे जमा झालेले दोन लाख ८३ हजार रुपये विक्री प्रतिनिधीने कंपनीकडे जमा न करता परस्पर लांबवले. हा प्रकार एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पगारिया ऑटो सेंटरची फसवणूक झाल्याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीच्या वतीने नितीन अरुण बनकर (वय ३५ रा. जुना मोंढा) यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, कंपनीने स्वप्निल अच्युतराव कुलकर्णी (रा. माऊलीनगर, बीड बायपास) याची विक्री प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली होती. कुलकर्णी याच्याकडे ग्राहकांनी जमा केलेली रक्कम पगारिया ऑटो सेंटरच्या मुख्य शाखेत भरण्याची जबाबदारी होती. जमा झालेली रक्कम कुलकर्णी यांने एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत मुख्य शाखेत न भरता अपहार केला. याप्रकरणी पोलिस नाईक गोराडे हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन मुख्याध्यापक लाच घेताना गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुकुंदवाडी येथील नालंदा विद्यालयाच्या दोन मुख्यध्यापकासह सहशिक्षकाला लाच लुचपत विभागाने शुक्रवारी दुपारी अटक केली. शालेय पोषण आहाराचे अन्न शिजवून देणाऱ्या कंत्राटदाराचे ३३ हजाराचे बिल काढण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती.
मुकुंदवाडी येथे नालंदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. या ठिकाणी शालेय पोषण आहाराचे अन्न शिजवून देण्याचे कंत्राट एका कंत्राटदाराने २०१५ पासून घेतले होते. या ठेकेदाराचे मागील अडीच महिन्याचे खर्चाचे बिल ३३ हजार रुपये बाकी होते. कंत्राटदाराने शुक्रवारी मुख्यध्यापक मुकुंद पुंडलिक जाधव व संतोष सॅम्युअल पैठणे यांची भेट घेतली. यावेळी बिल काढण्यासाठी जाधव यांनी सहा हजार, तर पैठणे यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने लाच लुचपत विभागात तक्रार दिली. या तक्रारीवरून शुक्रवारी दुपारी शाळेमध्ये सापळा रचण्यात आला. मुख्यध्यापक जाधव व पैठणे यांची लाचेची रक्कम दुपारी सव्वा वाजता शिक्षक सूर्यकांत बच्छाव यांनी स्वीकारली. यावेळी सापळा रचलेल्या पथकाने जाधव, पैठणे व बच्छाव यांना अटक केली. आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक विवेक सराफ, हेमंत सोमवंशी, सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल परंडवाल, हरीभाऊ कुऱ्हे, संदीप आव्हाळे, रवी देशमुख, रवींद्र अंबेकर, संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ हजार मालमत्तांचा शोध; पालिका कर आकारणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बांधून तयार असलेल्या मात्र महापालिकेच्या लेखी नोंद नसलेल्या तब्बल आठ हजार मालमत्तांचा शोध लागला आहे. या मालमत्तांना कर आकारल्यानंतर पालिकेच्या तिजोरीत आठ कोटींची भर पडणार आहे.
महापालिकेचा आर्थिक डोलारा प्रामुख्याने मालमत्ता कराच्या वसुलीवर उभा आहे. कर वसुलीकडे व कर आकारणीकडे विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे कर वसुलीवर त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून नेहमीच केला जातो. या आरोपाला उत्तर देण्यासाठी नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पालिका प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. करमूल्य निर्धारक व संकलक वसंत निकम यांनी याची माहिती अर्थसंकल्पाबद्दल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत दिली.
ज्या मालमत्तांना कर आकारणी झालेली नाही, त्या मालमत्तांना कर आकारणी करण्याच्या उद्देशाने कर आकारणीच्या कामाचे खासगीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार टेंडर काढले, पण त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे खासगीकरणाच्या माध्यमातून अद्याप काम सुरू झाले नाही. खासगीकरणातून कर आकारणी होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर विभागाने स्वतःची यंत्रणा वापरून वर्षभरात आठ हजार नवीन मालमत्तांना कर आकारणी केली. नव्याने रेकॉर्डवर आलेल्या मालमत्तांकडून पालिकेला आता वर्षाला आठ कोटी रुपयांचा महसूल मिळू शकणार आहे.
२०१६-१७ या आर्थिक वर्षात २३० कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट होते. यापैकी चालू वर्षाची मागणी ८४ कोटी रुपये होती, तर १४६ कोटी रुपये थकबाकी होती. २३० कोटींपैकी ८९ कोटी रुपयांची वसुली पालिकेतर्फे करण्यात आली. यंदा प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट २३० कोटी रुपयेच ठेवले आहे. त्यात स्थायी समितीने ७० कोटींची वाढ करून मालमत्ता कर वसुलीचे ३०० कोटींचे उद्दिष्ट प्रशासनाला दिले आहे.

दोन लाख तीन हजार मालमत्ता
महापालिकेच्या रेकॉर्डवर सध्या दोन लाख तीन हजार मालमत्तांची नोंद आहे. या मालमत्तांना कराच्या डिमांड नोट पाठवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. डिमांड नोटची छपाई सीएसआर फंडातून करण्यात आली असून वॉर्ड कार्यालयांपर्यंत या नोट पोचवण्यात आल्या आहेत. तिथून या नोट मालमत्ताधारकांपर्यंत पोचवल्या जाणार आहेत.

मालमत्ता कर वसुली
- २०१६-१७चे २३० कोटींचे टार्गेट
- ८४ कोटी चालू वर्षाची मागणी
- १४६ कोटी थकबाकी
- ८९ कोटी प्रत्यक्ष वसुली
- २३० कोटी २०१७-१८चे टार्गेट
- ३०० कोटी स्थायीने दिलेले उद्दिष्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरदारीची मानसिकता सोडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम नोकरदारीची मानसिकता सोडा. उद्योगात अनेक आव्हाने असली तरी त्यावर मात करण्याचे धाडस बाळगले तर यश मिळवणे अवघड नाही,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मॅनेजमेंट गुरू डॉ. अजित मराठे यांनी शनिवारी केले.
ब्राह्मण समाज समन्वय समितीतर्फे आयोजित ‘उद्योजकता आज, काल, उद्या’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी उद्योजक शिरीष बोराळकर, मकरंद देशपांडे, जितेंद्र राहुरीकर, धनंजय पांडे, प्रमोद झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजकांशी संवाद साधताना डॉ. मराठे यांनी अतिशय सोप्या भाषेत नोकरदारवर्ग ते उद्योजक हा प्रवास उलगडला. डॉ. मराठे म्हणाले, ‘बिझनेसमनला कोणतीही जात नसते. बिझनेसमन हीच जात असते. त्याला एकच भाषा कळते ती पैशाची. त्यामुळे टिपीकल मानसिकतेतून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. बहुतांश लोकांना सुरक्षितता सोडवत नाही. त्यामुळे तो कळपात राहणे पसंत करतो. मात्र, उद्योजकाला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रत्येकी वेळी ओळखीचा व्यक्ती भेटतोच असे नाही. या चाकोरीबद्धतेतून जो बाहेर पडून व्यवसाय करतो, तोच खरा उद्योजक आहे. चांगले शिकून मोठ्या पगाराची नोकरी मिळवणे. त्यातही बँक, शासकीय नोकरी अशा नोकरीकडे पालकांचा ओढा एकेकाळी होता. ही मानसिकता अनेक वर्षे होती. नोकरदार ते बिझनेसमन हा प्रवास करण्यासाठी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. नोकरदार व्यक्तीला कोणताही चॉइस नसतो. सेल्फ एम्प्लॉमेंट करणाऱ्यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य लाभते. बिझनेसमन स्वतः तयार केलेल्या सिस्टिममुळे भरपूर स्वातंत्र्य उपभोगू शकतो. उद्योजकाला उद्योगाच्या वाढीसाठी पैसे मागण्याची लाज वाटते. ही मानसिकताही बदलणे गरजेचे आहे. व्यवसायवृद्धीसाठी पैशांची नितांत गरज असतेच. तसेच नाही म्हणायची आणि नाही ऐकायची सवय देखील उद्योजकांनी ठेवली पाहिजे. नोकरदार वर्गात राहून बिझनेसमन होता येत नाही. त्यासाठी उद्योजक वर्तुळात नियमितपणे वावरले पाहिजे. प्रत्येक उद्योजकाने आपले व्हिजन स्टेटमेंट बनवण्याची गरज आहे. नियोजनप्रमाणे काम केले, तर यशस्वी होता येते. उद्योजक हा लीडर असतो. उद्योगात यशस्वी होण्याकरिता तेवढाच तोलामोलाचा मार्गदर्शकही सोबत असणे आवश्यक आहे,’असे डॉ. मराठे यांनी सांगितले. या प्रसंगी शिरीष बोराळकर व मकरंद देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. मंगेश पळसकर यांनी सूत्रसंचालन केले.

अपयशातून खूप काही शिकता येते
‘अपयश व संघर्षातून खूप काही शिकता येते. या गोष्टीची देवाण-घेवाण झाल्यास त्यातून बरेच काही कमावतो. कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची तयारी उद्योजकाची असलीच पाहिजे. स्पर्धेच्या युगात खूप दक्ष रहावे लागते. परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. प्रसंगी चार पाऊले मागे यावे लागते, हे विसरून चालणार नाही,’ असे डॉ. मराठे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी वाढ रद्द करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी दरवर्षी दहा टक्के वाढवलेली पाणीपट्टी रद्दा करा, या मागणीसाठी शनिवारी पाणीपट्टी वाढ विरोधी नागरी कृती समितीतर्फे महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सोमवारी आयुक्तांना दिले जाणार आहे.
आंदोलनात कृती समितीचे सुभाष लोमटे, अण्णासाहेब खंदारे, प्रा. प्रदीप पुरंदरे, उद्धव भवलकर, मनोहर टाकसाळ, भगवान भोजने, मेराज सिद्दिकी, सचिन गंडले, देविदास कीर्तीशाही, सुभेदार बन, अब्दुल हमीदखान, शेख रफिक, सिद्धेश्वर पिंपळे, रवी अंभोरे, सुभाष जाधव, महादू धर्मे, शेख खुर्रम यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले.
आयुक्तांच्या नावे तयार करण्यात आलेल्या निवेदनात कृती समितीने म्हटले आहे की, ‘समांतर पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी महापालिकने २०११मध्ये खासगी कंपनीसोबत करार केला. मात्र, कंपनीचे काम समाधानकारक नसल्याने सर्वसाधारण सभेने ३० जून २०१६रोजी हा करार रद्द करण्यात आला. हा करार करताना पाणीपुरवठा व पाणीपट्टी उपविधी तयार करण्यात आले. आता हा करारच रद्द झाला असल्याने तो उपविधीदेखील रद्द करून तो रद्द झाल्याची घोषणा राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. कंपनीचा करार रद्द झाल्याने उपविधीही संपुष्टात आले असून पाणीपट्टीत वाढ न करता करारापूर्वी २०११मध्ये असलेली अर्धा इंची नळासाठीची १८०० रुपये वार्षिक पाणीपट्टीच कायम ठेवावी,’ ही मागणी यावेळी करण्यात आली.

नियम काय सांगतो
‘केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणीय अभियांत्रिकी संघटनेने सार्वजनिक पाणीपुरवठाविषयक तयार केलेल्या नियमात म्हटले आहे की, वार्षिक पाणीपट्टी नळधारकाच्या मालमत्ता कराच्या २ टक्के असावी आणि त्यात दर पाच वर्षांनी १० टक्के एवढी वाढ करावी. या तरतुदीच्या विरुद्ध
महापालिका चढत्या दराने पाणीपट्टी आकारत आहे. यासाठी पाणीपट्टी आकारणीचा पुनर्विचार करून केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणीय अभियांत्रिकी संघटनेच्या सूचनांनुसार पाणीपट्टी आकारावी,’ अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती आयुक्त हल्लाप्रकरणी आरोपींना कोठडी

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
दादर येथील आंबेडकर भवन पाडण्यासाठी पाठबळ देणाऱ्या आणि वादग्रस्त विधान करणारे राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना सुभेदारी विश्रामगृहात मारहाण करणाऱ्या सहा जणांची पोलिस कोठडी संपली. त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उपाध्य यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी सोमवारपर्यंत (२४ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावली.
सोमवारी (१७ एप्रिल) राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे दौऱ्यावर आले असता त्यांचे आगमन सुभेदारी विश्रामगृहावर झाल्यावर भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी गायकवाडांवर हल्ला केला. त्यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात भारिप बहुजन महासंघाचा जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ याच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक व्ही. एच. हश्मी यांनी तपास करून अमित भुईगळ, श्रीरंग ससाणे, दिनेश साळवे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे, गौतम गवळी आणि अन्य दोन महिला अशा आठ जणांना अटक केली. त्यांना १८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता सहा जणांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर दोन महिलांना न्यायालयीन कोठडीत सुनावली. माहिती आयुक्तांचा पाठलाग करण्यासाठी वापरण्यात आलेली अमित भुईगळची कार जप्त करण्यात आली. अमितने हल्ला करण्यापूर्वी मोबाइलवरून कोणाशी संपर्क साधला, त्याचा मारण्याचा उद्देश काय होता, सुभेदारी विश्रामगृहात बसून कट रचला असून त्याचे सीसिटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. त्या फुटेजमध्ये असलेल्या व्यक्तीचे नाव आणि पत्ते निष्पन्न करावयाचे आहे, माहिती आयुक्तांवर हल्ला करण्यापूर्वी कोणत्या नेत्यांशी संवाद साधला होता याची माहिती घ्यावयाची आहे, या गुन्ह्याचा सुक्ष्म तपास करून पुरावे गोळा करावयाचे आहेत, ते कस्टडीत असल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकणार नाही असा युक्तीवाद सरकार पक्षाच्या वतीने विशेष वकील राजेंद्र मुगदिया यांनी केला. बचाव पक्षाच्या वतीने बी. एच. गायकवाड, संजय भिगारदेव, एम. एन. देशमुख, एस. एम. पटेल, विलास वाघ, प्रवीण कांबळे यांच्यासह १०२ वकिलांनी काम पाहिले.

वेगळा न्याय का?
पोलिस ठाण्यात जखमी व्यक्ती गेल्यावर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करा असे, घसा फाडून ओरडले तरी पोलिस गुन्हा दाखल करत नाहीत. त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र आणल्याशिवाय गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणून झिडकारून टाकतात. मात्र, राज्याच्या माहिती आयुक्तांची वैद्यकीय तपासणी होण्यापूर्वीच ३०७ कलमानुसार गुन्हा नोंदविला का? माहिती आयुक्त म्हणून त्यांच्यासाठी नियम आणि कायदा वेगळा आहे का? कोठडीत असताना तपास पूर्ण झाला असून वाहन जप्त करण्यात आले आहे. मोबाइलवरून संपर्क कोणाशी साधला, सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यासाठी कोठडीची गरज नाही असा युक्तीवाद बचावपक्षाच्या वतीने करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images