Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘...त्या लहानग्या पोराचं नाव शरद पवार‘

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्वातंत्र्यपूर्व काळात, जिल्हा परिषदेप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड असायचे. त्यात महिलेची एकच जागा. काँग्रेसच्या तिकिटावर आई निवडून आली. डीएलबीच्या पहिल्या सभेच्या चार दिवसांपूर्वीच आई बाळंत झाली. शिस्त पाळण्यासाठी आई पुण्याला सभेसाठी हजर राहिली. यावेळी अध्यक्षांनी कौतुक करत इतरांना आदर्श घेण्याचे सांगितले. आपल्यासोबत घेऊन गेलेल्या त्या चार दिवसांच्या पोराचं नाव शरद पवार...,’ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी औरंगाबादेत जीवनपट उलगडला.
मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार शरद पवार यांना ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रपर ग्रंथासाठी ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मराठी रंगभूमीवरील लक्षणीय कार्यासाठी डॉ. जब्बर पटेल यांना नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी पवार यांनी राजकीय, सामाजिक जीवनातील किस्स्यांनी कारकिर्दी मांडली. पवार यांना ऐकण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह तुडूंब भरले होते. कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते मधुकर अण्णा मुळे, माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. मनोहरराव जाधव, डॉ. दिलीप घारे, कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, ना.धों. महानोर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
‘मसाप’तर्फे मला पुरस्कार देण्यात येतो. तोही साहित्यासाठी, हे आगळं वेगळं आहे. पुरस्कारामुळे आणखी काही लिहावं, असे वाटतेय. असे सांगत पवार यांनी राजकीय व सामाजिक जीवनात किस्से सांगितले. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, मुंबई या भागातील मराठी भाषा आणि लोकांचे स्वभावगूण त्यांनी एकेका किस्स्यांतून सांगितले. डॉ. जब्बार पटेल यांनी, पुस्तकदिनी पुरस्कार
मिळाला हे महत्त्वाचे अाहे. मी कायम हौशी, प्रायोगिक रंगभूमीवर रमलो, असे सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार व आपली मैत्री; तसेच घाशीराम कोतवाल नाटकाला झालेला विरोध, सामना या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी पवार यांनी उपलब्ध करून दिलेली इमारत आदींच्या आठवणी सांगितल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राऊंड टेबल : सर्व्हिस रोडसह भुयारी मार्गही हवा

$
0
0

बीड बायपास रोडवरील अपघात वाढले. सातारा, देवळाई परिसरातील नागरिकांसह औरंगाबादकरांसाठी रस्ता धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी सर्व्हिस रोड आवश्यक आहे. केवळ सर्व्हिस रोड करून भागणार नाही, तर या प्रस्तावित रस्त्याला भुयारी मार्ग तयार करण्याची गरज असल्याचे मत वाहतूक क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह लोकप्रतिनिधींनी ‘मटा राऊंड टेबल’मध्ये व्यक्त केले आहे. या राऊंड टेबलमध्ये शिवाजीनगरचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ, वाहतूक क्षेत्रातील जाणकार सुमित जैस्वाल, प्रा. प्रशांत अवसरमल, विद्यार्थी स्वराशा बेदमुथा, निखील महाले हे सहभागी झाले होते. या रस्त्यावर भुयारी मर्गांचीही गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

डीसी रुल्सनुसार सर्व्हिस रोड व्हावा
बीड बायपास रोडवर होणारे अपघात ही मोठी समस्या आहे. जड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला, मात्र हा निर्णय म्हणजे कायमचा उपाय नाही. रस्ते शहराच्या धमन्या असतात. रस्त्यांमुले शहराचे दैनंदिन जीवन सुरू असते. म्हणून बीड बायपास रोडवर अपघात थांबविण्यासाठी मोठी शस्त्रक्रियाच करावी लागेल. ‌या रस्त्याला सर्व्हिस रोडची नितांत गरज आहे. सर्व्हिस रोड तयार करताना डीसी रूलचा वापर करावा लागेल. डीसी रुल्सनुसार (डेव्हपलमेंट कंट्रोल रुल्स) रस्त्याच्या ३०० मीटरपर्यंत असलेली जमीन संपादित करावी. त्याचबरोबर बायपासवर सर्व्हिस रोड तयार करण्याची गरज आहे. यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी दूर होऊ शकते. भूसंपादनात काही अडचणी येतील, मात्र रस्ता मोठा केल्याने भविष्यातील ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आज शिवाजीनगर भागातील रेल्वेच्या क्रॉसिंगमुळे बरीच अडचण होत आहे. या क्रॉसिंगमध्ये एक जखमी मुलगी अडकली. तिला वेळेवर उपचारासाठी जाता येत नसल्याने तिचा मृत्यू झाला. बीड बायपासलगत सर्व्हिस रोडसह काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याची गरज आहे. नॅशनल हायवे अथॉरिटीकडून बीड बायपास रस्ता तयार केला जाणार आहे. ‘एनएचएआय’ शिवाजीनगर येथेही उड्डाणपूल तयार करणार आहे, मात्र हा उड्डाणपूल भविष्याच्या दृष्टीने फिजिबल राहिल का, याचाही विचार करण्याची गरज आहे. देवळाईकडे जाणाऱ्या वाहनांना या उड्डाणपुलाचा उपयोग होईल, मात्र झाल्टा फाटा किंवा बीडबाय पासकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कोणता मार्ग असेल. शहानूरमियॉ दर्गा पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल संपल्यानंतर बीड बायपासचा चौक लागतो. या चौकात दोन ते तीन अपघात घडलेले आहेत. सर्व्हिस रोड तयार करताना पादचाऱ्यांसाठीही वेगळी व्यवस्था होणे आवश्यक आहे.
- राजेंद्र जंजाळ, नगरसेवक, शिवाजीनगर

सर्व्हिस रोडचे काम नियोजनपूर्वक व्हावे
बीड बायपास हा रोड दोनशे फुटांचा होता. सध्या हा रोड शंभर फुटांचा आहे. या रस्त्याच्या विकासासाठी अजूनही लाडगाव येथील टोल नाक्याच्या माध्यमातून पैसे वसूल केले जातात, मात्र त्या तुलनेत रस्त्यावर केला जाणार खर्च कमीच वाटतो. बीड बायपास रोडवर आतापर्यंत ६४ जणांचे प्राण गेले आहेत. हा रस्ता लहान मुलांना ओलांडणेही सध्या अवघड बनले आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार या रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना सु‌चविण्यात आल्या आहेत. या उपाययोजना रस्त्यात कोठेही दिसत नाहीत. दुकानधारकांनी केलेल्या पार्किंगमुळे हा रस्ता अरूंद केला आहे. या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न मिटविण्यासाठी सर्व्हिस रोडची गरज आहे. ‌सर्व्हिस रोड तयार केल्यानंतर फक्त वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार नाही, तर जलवाहिनी व इतर आवश्यक सुविधाही सातारा, देवळाई; तसेच अन्य वसाहतींपर्यंत नेणे सोपे होईल. या रस्त्याचे फेरनियोजन आवश्यक आहे. सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लागल्यास हा रस्ता अपघातमुक्त होण्यासाठी अधिक मदत होईल. सर्व्हिस रोड तयार करताना या रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक इमारतीचे किंवा प्रत्येक सोसायटी, दुकानांचे पार्किंग स्वतंत्र आणि सुरक्षित असावे, असा नियम करावा. जेणेकरून वाहनांच्या पार्किंगमुळे सर्व्हिस रोडवर वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.
- प्रा. प्रशांत अवसरमल, जलक्रांती

परदेशातील रस्त्यांचा अभ्यास करावा
बीड बायपास रस्ता आणि हायवे यातील फरक आधी ओळखला पाहिजे. बीड बायपास रोड हा जड वाहने; तसेच अन्य वाहनांसाठी आहे. या रस्त्यावरून दुचाकी आणि तीन चाकी वाहने गेल्यास अपघात होण्याची शक्यता जास्त असते. विदेशातील रस्त्यांचा अभ्यास केल्यास अपघात टाळण्यासाठी त्यांनी विशेष नियोजन केले आहे. एक अंतर्गत रस्ता हा शहरी वाहनांसाठी असतो, तर दुसरा रस्ता हा बायपास किंवा हायवे म्हणून वापरला जातो. हे दोन्ही रस्ते वेगवेगळे असतात. हे दोन्ही रस्ते सुरक्षित रित्या एकमेकाला मिळतात. तेथे शहरी वाहने बायपासच्या रोडवर येत नाही. भारतात हे नियोजन करण्यात आलेली नाही. बीड बायपासबाबतही अशीच काहीशी परिस्थिती आपल्यास पहायला मिळते. विदेशातील अॅटोबॅन म्हणजेच हायवेवर ताशी २०० किलोमीटर वेगाने वाहने जात असतात, मात्र आपल्याकडील बीड बायपासचा रोड तसा वेग घेता येत नाही. हा आता वॉर्डातील रस्ता, मॉल रोड बनला आहे. बीड बायपास रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपल्याला तसेच नियोजन करावे लागते. विदेशातील रस्त्यांचा अभ्यास करून रस्ते तयार केल्यास अपघाताचा प्रश्न सुटेल. बीड बायपास रोडवर सर्व्हिस रोड करावा आणि सर्व्हिस रोडवरील वाहने बायपास रोडवर येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण करावी लागले. सर्व्हिस रोड तयार करताना जड वाहने किंवा छोटी वाहन अशी विभागणी करण्यात आली नाही, तर भविष्यात ही समस्या अधिकच कठीण होत जाईल. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागेल. सर्व्हिस रोडबरोबर रस्ता क्रॉस करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करून स्वतंत्र दोन्ही बाजूने रस्ते तयार होतील. या मुळे भविष्यात होणारे अपघात टळतील.
- प्रा. सुमित जैस्वाल, वाहतूक अभ्यासक, एमआयटी कॉलेज

बायपासला वेगमर्यादा हवी
बीड बायपास रोडवर अनेक ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना दूरचे दिसत नाही. यामुळे अपघाताची शक्यता वाढत असते. या रस्त्याचा नीट अभ्यास केल्यास, या रस्त्यालगतचे पंखेही व्यवस्थित तयार करण्यात आलेले नाही. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. एखादे वाहन रस्त्याखाली उतरण्याचा धोका अाहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी डिव्हायडर बंद केलेले आहेत. हा रस्ता बायपास असल्यामुळे कदाचित डिव्हायडर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, मात्र यामुळे बायपास रोडवरील वाहनांचा वेग वाढला आहे. परिणामी अपघातांची संख्याही वाढली आहे. शिवाय राँग साइडने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात वाढले आहेत. प्रशासनाने याचा विचार करण्याची गरज आहे. बीड बायपास अपघातमुक्त करण्यासाठी आधी चौकातील रोटरींचे नियोजन करण्याची गरज आहे. या रस्त्यांवर सिग्नल बसविले, पण त्याचा फायदा किती झाला, असा प्रश्न आहे. यामुळे कोंडी वाढली आहे. रोटरीचे नियोजन व्यवस्थित केल्यास अपघात कमी होतील. राँग साइड गाड्या येतात तेथील डिव्हायडर खुले करावेत. शिवाय बीड बायपास रोडवर सध्या वाहतूक वेग मर्यादित करण्याबाबत उपाययोजना करावी. रात्रीच्या वेळी या मार्गावर वाहने वेगात चालत असतात. शिवाय दुपारीही वेगात जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. यामुळे या मार्गावर वेग मर्यादा घातल्यास अपघाताला नियंत्रणात आणता येतील.
- निख‌िल महाले, विद्यार्थी

नव्या बायपासचेही काम सुरू करावे
बीड बायपास रोडवर अपघात होण्याची कारणांचा विचार केल्यास या रस्त्यावर अनेक पथदिवे रात्री बंद असतात. राँगसाइडने वेगाने वाहने येतात. यामुळे या रस्त्यावर अपघात होत असतात. बीड बायपासच्या रस्त्याच्या पलिकडे रहिवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सातारा किंवा देवळाई येथून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने या भागातील लोकांना दुचाकी किंवा चारचाकी वाहनांशिवाय पर्याय नाही. यामुळे वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बायपासवर छोट्या वाहनांची संख्या जास्त आहे. बीड बायपासला पर्यायी मार्ग नसल्याने नाइलाजाने या रस्त्याचा वापर स्थानिकांना करावा लागतो. सायकलपासून ते मोठ्या वाहनांपर्यंत सर्व प्रकारची वाहने या रस्त्यावर असतात. शिवाय महानुभव आश्रम ते उड्डाणपूल या रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे रस्ता अरूंद बनत चालला आहे. यारस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी कोणतीच कारवाई होत नाही. याचा फटका रहिवाशांना; तसेच वाहनधारकांना बसतो. पोलिस आयुक्तांनी जड वाहनांना बंदी केली. बंदीने प्रश्न मिटणार नाही. या रस्त्याला पर्याय हवा. पर्याय हा सर्व्हिस रोड असू शकतो, मात्र येत्या पाच किंवा दहा वर्षांचा विचार केल्यास नागरीकरण वाढणार आहे. यामुळे आतापासून बीड बायपाससाठी वेगळा बायपास करण्याचे काम सुरू व्हावे. वाल्मीजवळून बीड बायपास जाणार आहे. सध्या सातारा, देवळाई, नक्षत्रवाडीपर्यंत शहराचा विकास झाला आहे. पुढे हाही रस्ता शहरामध्ये येणार आहे. यामुळे बीड बायपासला पर्यायी रस्ता तयार करायचा झाल्यास एका मोठा उड्डाणपुलच तयार करावा. हा उड्डाणपुल पैठण रोडपासून ते झाल्टा फाटा किंवा त्या रस्त्यावर उतरला पाहिजे. यामुळे बायपासची समस्या आगामी २० वर्षे राहणार नाही. नागरिकांना सुरक्षित रस्ता मिळेल.
- स्वराशा बेदमुथा, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजूर, वृद्धाची प्लॉट खरेदीत फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, त्याचा गैरफायदा घेणारे कमी नाहीत. घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्लॉट खरेदी करणाऱ्या दोघांनी दोन वेगवेगळ्या घटनांत फसवणूक करण्यात आली आहे. त्यापैकी एक जण मजूर असून दुसरा सेवानिवृत्त कर्मचारी आहे. या दोन प्रकरणांत एकूण साडे पंधरा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
प्रकाश मधुकर नरवडे (वय ३० रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) हे मजूर आहेत. त्यांच्या परिचयातील गणेश राजाराम शेजूळ (रा. देवळाई) हा पंक्चर काढणारा दुकानदार आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये शेजूळ याने नरवडे यांना मला पैशांची गरज आहे, असे सांगून त्याच्या ताब्यातील प्लॉट विकला होता. त्याबाबत सिडको एन ३ येथील एका वकिलाकडे शंभर रुपयांच्या बाँडवर नोटरी करून दिली होती. मुदत संपल्यानंतर नरवडे यांनी शेजूळ याला पैशाची मागणी केली. त्यावेळी शेजूळने उडवाउडवीची उत्तरे दिली. नरवडे यांनी प्लॉटवर जाऊन माहि‌ती घेतली असता हा प्लॉट वादग्रस्त असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, शेजूळने नरवडे यांना चार लाखांची बँकेची विथड्रॉल स्लीप भरून दिली होती. नरवडे बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता त्या खात्यावर पैसे नसल्याचे सांगण्यात आले. चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नरवडे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश शेजूळ विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसविणाऱ्यास पुतण्याही सामील

गारखेडा परिसरातील गणेशनगर येथील (सर्वे नंबर ४२) दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे बनावट भूखंड विक्रीप्रकरणात निवृत्त कर्मचाऱ्याची ११ लाख ५० हजाराची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांसह लुबाडणूक झालेल्या व्यक्तीच्या पुतण्यावरही मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
शेषराव वर्जू राठोड (वय ६२, जिजामाता कॉलनी, जयभवानीनगर) यांनी प्लॉट खरेदी करणार असल्याचे पुतण्या सुरेश केशवराव राठोड याला सांगितले होते. सुरेश याच्या ओळखीतून संशयित आरोपी गंगासागर शिंदे, दगडू शिंदे आणि महेश शिंदे यांच्या मालकीचे गणेशनगर येथील प्लॉट नंबर ११२ व १०१ खरेदीसाठी २१ मे २०१५ रोजी ११ लाख ५० हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर शेषराव राठोड यांच्या नावे भूखंड विक्री केल्याबद्दल नोटरी खरेदीखत करून दिले. पण, काही दिवसानंतर दोन्ही भूखंडावर दुसऱ्यांत ताबा असल्याचे राठोड यांना समजले. त्यामुळे राठोड यांनी संशयित आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यासाठी टोलवाटोलवी केली. या फसवणुकीत पुतण्या सुरेश सुद्धा सहभागी असल्याचे समजले. याप्रकरणी शेषराव राठोड तक्रारीवरून गंगासागर दगडू शिंदे, दगडू शिंदे, महेश शिंदे, सुरेश केशवराव राठोड याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चासकर हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटकांनंतरही प्याले वाढताहेत

$
0
0

Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT
उस्मानाबाद : ‘नाटकात करमणूक कमी असते. करमणुकीसाठी वेगळे मार्ग असतात. नाटक हे प्रबोधन, शिक्षणाचे माध्यम आहे. ज्यांना प्रबोधन करून घ्यायचे ते नाटकाला येतात. एकच प्यालाने प्याले कमी व्हायला पाहिजे होते, पण प्याले वाढत आहेत. नटसम्राटमुळे घरातील वातावरण चांगले व्हायला पाहिजे होते, पण वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे,’ अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी चौफेर फटकेबाजी केली.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे उस्मानाबाद येथे आयोजित ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे रविवारी सूप वाजले. त्या वेळी बागडे बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, खासदार रवींद्र गायकवाड, स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, ओमराजे निंबाळकर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे, धनंजय शिंगाडे उपस्थित होते.
‘माझ्या ६२ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच गर्दी पाहिली. प्रथमच लेखकाने लिहिलेले संवाद न बोलता, मी माझे विचार मांडू शकलो. रसिकांनी कला जिवंत ठेवली आहे,’ अशी भावना सावरकर यांनी व्यक्त केली. स्वागताध्यक्ष ठाकूर यांनी भावपूर्ण भाषणाने नागरिकांची मने जिंकली. ‘काही उणिवा राहिल्या असतील तर माफ करा,’ अशी दिलगिरी वारंवार व्यक्त करत त्यांनी आपल्या भाषणाची छाप सोडली.

गायकवाडांचे जाहीर दर्शन
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर प्रसिद्धीच्या झोत्यात आलेले खासदार रवींद्र गायकवाड हे उस्मानाबाद येथे आयोजित नाट्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. रंगमंचावरील पहिल्या रांगेत महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गायकवाड यांनी दुपारी एका नाटकाचाही आस्वाद घेतला. ते येणार म्हणून नाटकाला दोन तास विलंब झाला. एअर इंडियाच्या प्रकारानंतर नाट्य संमेलनाच्या निमित्ताने खासदार गायकवाड यांचे उस्मानाबादकरांना पहिल्यांदाच जाहीर दर्शन झाले. भाषण करण्याचे मात्र त्यांनी टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिकलेला जोडीदार हवा; पण कुटुंब महत्त्वाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तरुण असो की तरुणी, दोघांनाही शिकलेला जोडीदार हवा, मात्र कुटुंब अतिशय महत्त्वाचे असून, आई-वडिलांना सांभाळणारी कुटुंबवत्सल सहचरिणी असावी, असा सूर वधू-वर प‌रिचय मेळाव्यात होता. तरुणांचाही कल कुटुंबाकडेच अधिक होता. या मेळाव्यात आधुनिक समाजव्यवस्थेत कालानुरूप बदल करत समाजातील पोटजातींनाही एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सकल दिगंबर जैन वधू-वर परिचय मेळावा रविवारी शहागंजच्या चंद्रसागर धर्मशाळेजवळ हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगणात घेण्यात आला. अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जयचंद सेठी, अभय पनवेलकर (नागपूर), डॉ. प्रदीप नांदगावकर (अमरावती), पंचायत अध्यक्ष ललित पाटणी, महामंत्री अशोक अजमेरा, सतीश पेंढारी (नागपूर), हिराकाका कासलीवाल उपस्थित होते.
सोशल मीडियाद्वारे जनजागृती करून संपूर्ण देशातूनच इच्छुकांची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान किंवा वधू-वर परिचय मेळाव्याच्या परिचय पुस्तकाच्या माध्यमातून एका वर्षादरम्यान विवाह जुळला, मात्र दोन्ही कुटुंबाची लग्न करण्याची आर्थिक परिस्थिती नसेल, तर विवाह लावून देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष सरोज काला यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
पुलकसागर महाराज, आचार्य पुष्पदंत सागर महाराज (हैदराबाद), आचार्य गुप्तीनंद महाराज (कचनेर), उपाध्याय मयंकसागर महाराज (औरंगाबाद) यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. भारतीय पुलक जन चेतना मंचचे अध्यक्ष मोहित पहाडे, राष्ट्रीय अध्यक्ष सुनील काला, उपाध्यक्ष सुनील पांडे, महामंत्री निर्मल पांडे, कोषाध्यक्ष राजू सवाईवाला, प्रकल्पप्रमुख सुरज पेंढारी, राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचच्या अध्यक्ष ‌कविता अजमेरा, उर्मिला कासलिवाल, सरला गंगवाल यांनी पुढाकार घेतला. तीर्थरक्षा समितीचे अध्यक्ष अॅड. प्रमोद जैन, राहुल मिश्रीकोटकर, कस्तुरचंद बडजाते, शैलेश रावका, नरेंद्र अजमेरा, पियूष कासलीवाल, मनोज पाटणी यांनी स‌हाय्य केले.
मेळाव्यासाठी ८४ मुली व २०० तरुणांनी नोंदणी केली. मराठवाड्यासह नागपूर, अमरावती, इंदूर, राजस्थान, आंध्र प्रदेश येथूनही नोंदणी करण्यात आली. तरुण-तरुणींना व्यासपीठावर बोलावून सुरेखा बेताळ, रुचिता काला व तेजू पाटणी यांनी संवाद साधला.

कुटुंब महत्त्वाचे आहे, असेच संस्कार आमच्यावर झाले आहेत. म्हणूनच शिक्षण आवश्यक, पण कुटुंबव्यवस्था महत्त्वाची वाटते.
- अश्विनी अजमेरा

मी विशाखापट्टणमचा असून व्यावसायिक आहे. माझी भावी जोडीदार आई-वडिलांचा सांभाळ करणारी व कुटुंबाला जवळ आणणारी हवी. महाराष्ट्र व आंध्र प्रदेश यातील पद्धती भिन्न असल्या तरी कुटुंबचा स्वीकार ही संस्कृती सारखीच असावी.
- विभोर जैन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे पाण्याची सोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जंगलातील पाणवठे कोरडे झाल्याने पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वन विभागाला कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या या अभयारण्यात बिबट्या, काळवीट, निलगाय, सायाळ आदी प्राणी प्रामुख्याने आढळतात; तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, वनसंपदा येथे आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला, मात्र गौताळा औट्रमघाट अभयारण्य परिसरातील बहुतेक पाणवठ्यातील पाणी सध्या आटले आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी प्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेत वन विभागाने तातडीने कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

गौताळ्यात २५ पाणवठे
पाणवठ्यातील पाणी कमी होऊ शकते, हे लक्षात घेऊन आधीच नियोजन करण्यात आले होते, अशी माहिती सुत्रांनी दिली. परिसरात सुमारे २५ पाणवठे असून, दोन मोठे तलाव आहे. प्रत्येक रेंजमध्ये असलेल्या पाणवठ्यात प्रत्येकी दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किर्दक यांची मासिआ अध्यक्षपदी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लघुउद्योजकांची संघटना असलेल्या मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरच्या (मासिआ) अध्यक्षपदी सुनील किर्दक, तर सचिवपदी किरण जगताप, अनिल पाटील यांची निवड करण्यात आली.
संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. या सभेत मावळते अध्यक्ष विजय लेकुरवाळे यांनी गेल्या वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. सचिव अभय हंचनाळ, कोषाध्यक्ष गजानन देशमुख यांनी उर्वरित प्रशासकीय माहिती सादर केली. सभेच्या मंजुरीने २०१७-१८ साठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. योगेश घोडके, सुनील किर्दक, सी. जी. आगलावे, भगवान राऊथ, पुष्पगंध गायकवाड, अनिल उबरहांडे यांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या नियमानुसार २०१७-१८ साठी २७ कार्यकारिणी सदस्य निवडण्याची प्रक्रिया निवडणूक अधिकारी सुनील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. संघटनेचे दोन चॅप्टर असून त्यात वाळूजमधून १३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. चिकलठाणा चॅप्टरमधून १३ सदस्य निवडून आले. मागील वर्षाचे अध्यक्ष व दोन्ही सचिव आणि नवनिर्वाचित सदस्य अशी ३० सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली.
अध्यक्षपदासाठी राहुल मोगले यांनी सुनील किर्दक यांचे नाव सूचविले, त्यास गजानन देशमुख यांनी अनुमोदन दिले. अन्य कुणाचेही नाव न आल्याने भोसले यांनी किर्दक यांची बिनविरोध निवड जाहीर केली. विजय लेकुरवाळे यांनी किर्दक यांचे स्वागत केले. त्यानंतर किर्दक यांनी चिकलठाणा व वाळूज विभागासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. ती पुढीलप्रमाणेः चिकलठाणा चॅप्टर- उपाध्यक्ष किशोर राठी, सचिव किरण जगताप, सहसचिव मनिष गुप्ता, कोषाध्यक्ष सचिन गायके, सहसंपादक विक्रम डेकाटे, सहप्रसिद्धीप्रमुख मनीष अग्रवाल. वाळूज चॅप्टर- उपाध्यक्ष ज्ञानदेव राजळे, सचिव अनिल पाटील, सहसचिव गजानन देशमुख, कोषाध्यक्ष अब्दुल शेख, संपादक रवींद्र कोंडेकर, प्रसिद्धीप्रमुख राहुल मोगले. कार्यकारिणी सदस्य-अजय गांधी, अर्जुन गायकवाड, संदीप जोशी, सुमित मालानी, आशिष नरवडे, विकास पाटील, राजेश पाटणी, सर्जेराव साळुंके, नारायण पवार, फुलचंद जैन, निलेश पाटील, राजेंद्र चौधरी, संजय काकडे, विनय राठी, भगवान राऊत, कुंदन रेड्डी, विजय लेकुरवाळे, अभय हंचनाळ.

मासिआ युवा कनेक्ट
आगामी वर्षात मासिआ युवा कनेक्टच्या माध्यमातून युवकांना प्रेरित केले जाईल. ज्यातून उद्योगविकासाला चालना मिळेल. महिला उद्योजकांचा विशेष विभाग यावर्षी सुरू करण्यात येईल. क्लस्टर्स स्थापन करून सभासदांना व्यवसायाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आदी प्रकल्प राबविण्यात येईल, असा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील किर्दक यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांची मानसिकता दृढ करावी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अन्नधान्याच्या उत्पादनात आपण स्वावलंबी होणे आवश्यक अाहे. त्यादृष्टीने अन्नधान्याचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांची मानसिकता दृढ केली पाहिजे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
कृषी विभाग व औरंगाबाद पंचायत समिती यांच्यावतीने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी येथे खरीप २०१७ - १८ हंगामपूर्व नियोजन व जलयुक्त शिवार अभियानासंदर्भातील आढावा बैठक शनिवारी बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सभापती तारा उकिरडे, जिल्हा परिषद सभापती मीना शेळके, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, तहसीलदार सतीश सोनी, कृषी अधिकारी दिनकर जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बागडे यांनी, कृषी क्षेत्र समाज आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यादृष्टीने शासन शेती व शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी व्यापक योजना राबवित आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा. यासाठी कृषी विभागाने जनजागृती करावी, असे आवाहन केले.
पंतप्रधान पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना यांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढवावा. मुबलक पाणीसाठा निर्माण करण्यासाठी पाणी अडवणे, जिरवणे व नियोजनपूर्वक पाणी जपून वापरणे या त्रिसूत्रीचा वापर गरजेचा अाहे. त्यासाठी ठिबक सिंचन अनिवार्य करावे. शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खतांचा पुरवठा करावा, अशा सूचना बागडे यांनी यावेळी केल्या. बैठकीस जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य,कृषी,तहसिल कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

खरिपाचे क्षेत्र ७४ हजार हेक्टर
खरीप हंगामात औरंगाबाद तालुक्यात कडधान्यासाठी ११ हजार हेक्टर,र तर अन्नधान्यासाठी ३३ हजार ३३० हेक्टर क्षेत्र, तेलबियांसाठी ११४० हेक्टर असे ७४ हजार ५७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. रासायनिक खतांची एकूण मागणी २९ हजार २८२ टन असून, जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा रास्तदराने उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अज्ञात वाहनांच्या धडकेत होमगार्ड ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अज्ञात वाहनाने दिलेल्‍या धडकेमध्ये चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या होमगार्डचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी चिकलठाण्यापुढील केंब्रिज चौकाजवळ घडला. त्रिंबक उखर्डू घुनावत (वय ४७, रा. महालपिंप्री ता. औरंगाबाद), असे या होमगार्डचे नाव आहे.
घुनावत हे केंब्रिज चौक ते नारेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी अडीच वाजता बेशुद्धावस्थेत जखमी अवस्थेत पडून होते. ही माहि‌ती नागरिकांनी कंट्रोल रुमला कळवली. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पीसीआर व्हॅनचे जमादार बी. एस. गिरी, पोलिस नाईक पोपट गायकवाड, सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घुनावत हे गेल्या १५ वर्षांपासून चिकलठाणा पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. ते शनिवारी रात्री ड्युटी संपल्यानंतर घरी गेले होते. रविवारी पुन्हा ड्युटीवर येत असताना हा प्रकार घडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक फौजदार पंडित पचलुरे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायनगरात भरदिवसा एक लाखाची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गारखेडा, न्यायनगर भागात चोरट्यानी भरदिवसा घरफोडी करीत एक लाखाचा ऐवज लांबवला. शुक्रवारी दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. लग्नासाठी गेलेल्या कुटुंबीयाचे घर चोरट्यानी फोडले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा परिसरातील न्यायनगर येथे देवगिरी अलंकार अपार्टमेंट मध्ये शेख बुशरा शेख कैसर (वय २०) ही विद्यार्थिनी आपल्या आई, बहीण आणि लहान भावासोबत राहते. बुशराची आई हैदराबादला गेलेली आहे. शुक्रवारी हर्सूल येथे त्यांच्या नातेवाईकांचे लग्न होते. बुशरा व त्याचे भाऊ-बहीण या लग्नासाठी घराला कुलूप लावून शुक्रवारी दुपारी दोन वाजता गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता त्यांच्या शेजाऱ्याने बुशराला घराचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच बुशरा व भाऊ बहीण घरी परतले. त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यानी घरातील दागिने, असा एकूण एक लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बुशराच्या तक्रारीवरून पुंडलीकनगर पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पीएसआय झिने हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० हजारांचा ऐवज दोन चोऱ्यांत लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिमेंट कंपनी व हॉटेल फोडून चोरट्यानी ३० हजारांचा ऐवज लंपास केला. हर्सूल व एन ९ परिसरात या घटना घडल्या. यामध्ये संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एका घटनेत चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हर्सूल फुलेनगर भागात चामुंडा सिमेंट कंपनी आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या कंपनीच्या रुममधून रोख १४ हजार २०० रुपये, कटर मशीन, ड्रिल मशीन, पाण्याची मोटर, पान्हे आदी २४ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर सुधीर शामराव दांडगे (रा. वैशालीनगर, जसवंतपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी पवन उईक व राम प्रसाद उईक (दोन्ही रा. भाजीपाणी, जि. सिवना, मध्यप्रदेश) यांच्या विरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जमादार सोन्ने तपास करीत आहेत. चोरीची दुसरी घटना शनिवारी मध्यरात्री एन ९, शिवनेरी कॉलनी भागात घडली. मिलींद बाळू घुसळे (वय २९ रा. आंबेडकरनगर) यांचे ऋतूराज स्नॅक्स अँड टी सेंटर नावाने हॉटेल आहे. हे हॉटेल बंद असताना मागचे दार तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. हॉटेलमधील सिलेंडर व तीन अॅल्युमिनीयमचे पातेले लंपास केले. घुसळे याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अनिस शहा हमिद शहा (रा. पिसादेवीरोड) याला अटक करण्यात आली. अनिसने गुन्ह्याची कबुली देत चोरीचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक आघाडे तपास करीत आहेत.

कारमधून बॅग लांबवली
कारमधून मागच्या खिडकीची काच खाली करून चोरट्यानी लॅपटॉपची बॅग लंपास केली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल नंदनवनसमोर घडला. या प्रकरणी विशाल दिलीप सोन्नेकर (वय ३२ रा. तरोडा नाका, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीस पळ‍वणाऱ्यास नाशिकमधून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वीरगाव पोलिसांनी तालुक्यातील सिरसगाव येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या एकास नाशिक येथे सापळा रचून पकडले. त्यांना शुक्रवारी रात्री उशिरा वीरगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना मदत करणाऱ्या मध्यप्रदेश येथील अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
सिरसगाव येथील अल्पवयीन मुलीला २४ मार्च रोजी तिच्या घरातून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी वीरगाव पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी गेल्या १५ दिवसांपासून पोलिसाचे पथक आरोपीच्या मागावर होते. परंतु, त्याचे मोबाइल लोकेशन मध्यप्रदेश येथे दाखवित होते. या मुलाचे लोकेशन शुक्रवारी नाशिक येथे असल्याचे कळाल्यानंतर वीरगाव पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल भगवान टिप्परसे, शिवनाथ सरोदे, सोमनाथ तागडे यांनी नाशिक येथून त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिंनीसाठी ‘कॉस्मो’तर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉस्मो उद्योग समूहातर्फे महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत महिला अभियंत्यांसाठी विशेष अभियानाअंतर्गत निवड चाचणी घेण्यात आली. यात यंत्र, विद्युत आणि प्लास्टिक पॉलिमर्स या शाखांचा समावेश होता. शहरातील शासकीय अभियांत्रिकी, जेएनईसी, एमआयटी, श्रीयश, सीएसएमएस, देवगिरी, पीईएस या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कॉस्मो फिल्म्सतर्फे विपुल दवे, महेश भाले, रितेश पेन्सलवार, मनिष शर्मा, अलोक कुलकर्णी, स्निजा सहदेवन आणि हर्षित खट्टर यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली. एकूण १० विद्यार्थिनींची अंतिम मुलाखतीसाठी निवड करण्यात आली असून यामध्ये इलेक्ट्रिकल ३, मेकॅनिकल ४ आणि पॉलिमर्स ३ विद्यार्थिनींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका स्थायी समितीसाठी फिल्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थायी समितीवर वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. स्थायी समितीमधील आठ नगरसेवक निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थायी समितीमधील मोहन मेघावाले, रावसाहेब आमले, कमलाकर जगताप, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी (सर्व शिवसेना), नितीन चित्ते (भाजप), विकास एडके, समिना शेख (एमआयएम) हे आठ सदस्य १ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य निवृत्त होणार आहेत, त्या पक्षाचे तेवढेच सदस्य स्थायी समितीमध्ये नियुक्त केले जातात. त्यामुळे शिवसेनेचे पाच, एमआयएमचे दोन आणि भाजपचा एक सदस्य नव्याने स्थायी समितीमध्ये येणार आहेत.
स्थायी समितीचे यंदाचे सभापतिपद भाजपच्या वाट्याला आहे. भाजपच्या वाट्याचे हे पद भाजप पुरस्कृत अपक्ष आघाडीच्या नगरसेवकाच्या पदरात टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी स्थायी समितीत असलेल्या भाजप पुरस्कृत अपक्ष आघाडीच्या दोन पैकी एका नगरसेवकाला स्थायी समितीतून राजीनामा देण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. स्थायी समितीचे सभापतिपद पुढील वर्षी शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे. या पदावर डोळा ठेवून शिवसेनेत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पालिकेत यापूर्वी महत्त्वाची पदे भुषविणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये यासाठी स्पर्धा लागली आहे. महापौरपद ओबीसीसाठी राखीव असल्यामुळे शिवसेनेचे जे नगरसेवक ओबीसी प्रवर्गात मोडत नाहीत त्यांनी स्थायी समितीचे दरवाजे ठोठवणे सुरू केल्याचे मानले जात आहे.

आज सदस्य निश्चित होणार ?
स्थायी समितीमध्ये शिवसेनेच्या कोणत्या नगरसेवकांना स्थान द्यायचे याचा निर्णय सोमवारी होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री रामदास कदम सोमवारी शहरात येणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध आढावा बैठका होणार आहेत. याच दरम्यान ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थायी समितीसाठी नगरसेवकांची नावे निश्चित करतील, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्न समारंभात दोन गटात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गंगापूर येथील आसेगाव येथील सावता मंगल कार्यालयात एका लग्न समारंभात छोट्या मोठ्या वादावरून दोन गट एकमेकांच्या विरोधात भिडले. हाणामारी करून काही जण जखमीही झाले. दोन्ही गटाने एकमेकांच्या विरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
गंगापूर येथील आसेगाव येथील सावता मंगल कार्यालयात पांडुरंग शिंदे आणि विश्वनाथ चव्हाण यांच्या घरच्या लग्नासाठी जमलेल्या मंडळीत आपसात जुन्या वादावरून भांडणे झाली. या प्रकरणात रामभाऊ गुडगूळ यांनी दिलेल्या फिर्यादीत जुन्या भांडणावरून बबन कांबळे, सुधाकर कांबळे, रत्नाकर कांबळे, भगवान जाधव, अक्षय नंदू जाधव, विक्रम जनार्दन जाधव यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे. सुधारक पंढरीनाथ कांबळे यांनी दुसरी तक्रार दिली आहे. इंद्रजित कांबळे आणि त्याचा भाऊ मंगल कार्यालयाच्या गेटवर उभे होते, त्यावेळी त्यांची बहीण गायत्री चंद्रकांत जाधव ही जात होती; विश्वनाथ चव्हाण यांनी बहिणीबाबत अपशब्द वापरून हिच्यामुळे माझा मुलगा खुनाच्या गुन्ह्यात अडकला असल्याचे सांगितले. हे अपशब्द ऐकल्यानंतर सुधारक कांबळे यांनी त्यांना टोकले असता, विश्वनाथ मोहन चव्हाण, सुरेश गडगूळ, रामभाऊ गडगुळ, पांडूरंग शिंदे, नारायण शेगुळे, संतोष चव्हाण यांना बोलावून मारहाण केली. या प्रकरणात सुधाकर कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक डी. एस. सूर्यवंशी हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदली धोरणाविरुद्ध शिक्षकांचा आक्रोश मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या संदर्भात २७ फेब्रुवारी रोजी शासननिर्णय जाहीर केला. त्यात संदिग्धता आहे. परिणामी शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या नवीन बदली धोरणाविरुद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे २६ एप्रिल रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३००० शिक्षक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्य संपर्कप्रमुख मधुकरराव वालतुरे यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
वालतुरे म्हणाले, प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रयत्नामुळे प्रशासकीय बदल्यांचे धोरण १५ मे २०१४ रोजी फक्त प्रशासकीय बदली तालुक्यातील तालुक्यात व विनंती बदली मागणीनुसार जिल्ह्यात कोठेही करण्याचे धोरण ठरविण्यात आले होते. यंदा सरकारने शिक्षकांनी वेगळे बदली धोरण जाहीर केले. त्यात अनेक दोष असून शिक्षक विस्थापित होणार आहेत. या धोरणाचा शाळेच्या गुणवत्ता तसेच शिक्षकाच्या स्थैर्यावर परिणाम होणार असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याचा धोका आहे. अवघड आणि सोपे क्षेत्र यंदा बदली निकषासाठी ठरविले आहेत. त्यात संदिग्धता आहे. सेवाज्येष्ठता कुठेच ग्राह्य धरली जाणार नाही. शाळेतील किंवा तालुक्यातील सेवा बदलीसाठी ग्राह्य धरली जणार नाही. त्यामुळे समुपदेशन पद्धतही बंद होणार आहे, असे वालतुरे म्हणाले.
‘या धोरणाविरोधात तसेच राज्यातील शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करावा, डोंगरी, दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांना विशेष भत्ता मिळावा, शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्ग ६ ते ८ वर्गासाठी टक्केवारीची अट न ठेवा १०० टक्के पदवीधर शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, शिक्षकाचे वेतन दरमहा १ तारखेलाच अदा करावे, चौथीपर्यंतच्या शाळेला ५ वी तर सातवीपर्यंतच्या शाळेला ८ वीचा वर्ग विनाअट जोडण्यात यावा, प्राथमिक शाळेला १० टक्के सादिल मिळावा आदी मागण्या मोर्चाद्वारे मांडण्यात येणार आहेत. २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल. यात शिक्षकांनी सहभागी व्हावे,’असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष काकासाहेब जगताप, सरचिटणीस कैलास गायकवाड, संपर्कप्रमुख प्रशांत हिवर्डे, अंकुश जाधव, प्रवीण पांडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात ९७ अर्ज दाखल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि अकरा पंचायत समितीच्या १२० गणासाठी निवडणूक होत असून सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी अमावस्या असल्याने जिल्ह्यात एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. सोमवारी जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी ४७ अर्ज दाखल झाले होते. तर पंचायत समितीसाठी ५० अर्ज दाखल झाले.
गेवराई तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी १२ व पंचायत समितीसाठी २१ उमेदवारी अर्ज आले आहेत. बीड तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ११ व पंचायत समितीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले. माजलगावमध्ये पंचायत समितीसाठी आठ तर जिल्हा परिषदेसाठी चार अर्ज दाखल झाले. केज तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी सहा तर पंचायत समिती गणासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. परळीत जिल्हा परिषद गटासाठी सात तर पंचायत समितीसाठी सात अर्ज आले आहेत. आष्टीत जिल्हा परिषदेला व पंचायत समितीत दोन अर्ज आले आहेत. शिरूर, धारूर, वडवणी तालुक्यात प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. चकलंबा आणि उमापूर अशा दोन जिल्हा परिषद गटातून आज जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी उदयसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, आदी उपस्थित होते. तर बीड तालुक्यातून नाळवंडीमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी तर पालीतून राष्ट्रवादीकडून उषा आखाडे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. एक फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद विकास समुद्रेंवर अंत्यसंस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

काश्मीर येथे हिमस्खलनामुळे बीड जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलाच्या जवान विकास पांडुरंग समुद्रे हे शहीद झाले होते. त्यांच्या पार्थीवावर बीड जिल्ह्यातील गांजपूर येथे शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद विकास समुद्रे हे सैन्य दलाच्या मुळ युनिट १८ महार रेजिमेंटमध्ये व सध्या ५१ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. जम्मू काश्मीर मधील गुरज भागात अतिरेकी घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याकरीता तैनात करण्यात आले होते. २५ जानेवारी रोजी अचानक झालेल्या हिमस्खलनामध्ये विकास समुद्रे शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव गुरज सेक्टर येथून श्रीनगर मिलिटरी हॉस्पीटल येथे हेलिकॉप्टरने ३० जानेवारी सायंकाळी आणण्यात आले. श्रीनगर येथून दिल्ली, दिल्लीहून विमानाने पुणे आणि बुधवारी सकाळी पुण्याहून हेलिकॉप्टरने धारुर आणि तेथून त्यांच्या मुळगावी गांजपूर येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. प्रथम धारुर शहरात त्यानंतर गांजपूर गावात आणि त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. गावकऱ्यांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यांचा तिरंग्यामधील पार्थिव गावात आणताच गावकऱ्यांनी तसेच एनसीसी व स्काऊट गाईडच्या पथकांनी अंतयात्रेत सहभाग घेतला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी शहीद विकास समुद्रे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या पथकाने तसेच भारतीय सैन्य दलाच्यावतीने लेप्टनंट कर्नल नितिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख, सैनिक कल्याण विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल हरीभाऊ दळवी, कॅप्टन भीमराव पारवे यांच्यासह असंख्य अधिकारी, पदाधिकारी व देशप्रेमी नागरिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. शहीद विकास समुद्रे यांचे भाऊ परमेश्वर यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी आई, पत्नी, बहिनी, चिमुकली मुलगी आणि नातेवाईकांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस नेत्यांचं सोन्याच्या ताटात शाही भोजन

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार आहेत, गरिबांना दोन वेळचं अन्न मिळत नाहीए, मध्यमवर्गीय जनता महागाईनं हैराण आहे, मग कुठे आहेत 'अच्छे दिन'?, असा सवाल करत राज्य सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उस्मानाबादमध्ये सोन्याच्या ताटात जेवणावर ताव मारल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, हाच का काँग्रेसचा गरिबांबद्दलचा कळवळा?, असा प्रश्न विचारला जात आहे.

उस्मानाबादमधील येणगूरमध्ये काँग्रेसने जिल्हा परिषद प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील ही नेतेमंडळी सभेसाठी पोहोचली होती. त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. तिथे पोहोचल्यानंतर सगळ्यांचेच डोळे विस्फारले. सोन्याचा मुलामा दिलेली ताटं-वाट्या डायनिंग टेबलवर मांडल्या होत्या आणि एकापेक्षा एक झक्कास पदार्थ घेऊन वाढपी सज्ज होते. नेत्यांच्या ताटातील एकेक वाटी सुग्रास पदार्थांनी भरत गेली. ते पाहून कुणालाच मोह आवरला नाही. सगळ्यांनीच आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पोटावरून हात फिरवला.

अर्थात, हे शाही भोजन त्यांना पचणार का, हा प्रश्नच आहे. कारण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अनेक गरिबांच्या घरी जाऊन चक्क पत्रावळीवर जेवले आहेत. त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांचा हा डामडौल रुचेल का, याबद्दल शंका आहे.

याआधी, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अशाच शाही मेजवानीला स्पष्ट नकार दिला होता. बीडमधील दुष्काळी दौऱ्यादरम्यान एका कार्यकर्त्यानं त्यांच्या भोजनाची जय्यत तयारी केली होती. परंतु, जनता दुष्काळात होरपळत असताना आपण हे शाही भोजन जेवणार नाही, असं त्यानं सांगितलं होतं. परंतु, त्या चव्हाणांसारखा समंजसपणा अशोक चव्हाणांनी आणि इतर नेत्यांनीही दाखवला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेऊर-आष्टी मार्गासाठी दहा कोटी

$
0
0

पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी मानले प्रभूंचे आभार

म. टा. प्रतिनिधी, बीड

जेऊर ते आष्टी या बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे पत्राद्वारे आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी ते जेऊर ७० किलोमीटर या मार्गासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने जिल्ह्यवासियांच्या दृष्टीने दुधात साखर अशी भावना आहे. परळी-बीड-नगर हा रेल्वे मार्ग १९९५ मध्ये मंजूर करण्यात आला होता. २६१ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचा सुरूवातीला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी ३५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केंद्र व राज्य सरकार संयुक्तरित्या करेल असे ठरले होते. या मार्गासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, या मार्गासाठी मोठी तरतूद कधीच झाली नाही. दहा वीस कोटी रुपये देवून दरवर्षी या रेल्वे मार्गाची बोळवण केली जात होती. वीस वर्षांत ३०० कोटी रुपयांचा निधी या मार्गाला मिळाला. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटी रुपयांची आवश्यकता होती. २८०० कोटी प्रकल्प खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी राज्याने मान्यता दिली. त्यासाठी निम्मा वाटा उचलावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ हजार ४१३ कोटी या नगर-बीड-परळी रेल्वेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. बीडचे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न हा रेल्वे प्रकल्प होता. दिवंगत मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदींनाच्या पूर्व संध्येला हा निर्णय घेऊन राज्य सरकारने एक प्रकारे मुंडे यांच्या स्मृतीला अभिवादन केले होते. पंतप्रधानांच्या हस्तक्षेपामुळे हा मार्ग 2019 पर्यंत पूर्ण होणार असून सध्या त्याचे काम वेगाने सुरू आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images