Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परळीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय व रामेश्वर मुंडे यांच्यात लढत होत आहे. या पूर्वी बीड जिल्ह्यातील गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष साऱ्या राज्याने बघितला. गोपीनाथ मुंडेंच निधन झाल्यानंतर पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष तर सर्वश्रुत आहेच. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडेंचा संघर्ष मिनी मंत्रालयासाठी परळी तालुक्यातील पिंपरी गटात अजय मुंडे विरुद्ध रामेश्वर मुंडे यांच्यात पहावयास मिळणार आहे.

अजय मुंडे हे गोपिनाथ मुंडे यांचे पुतणे आणि पंकजा आणि धनंजयचे सख्खे चुलत भाऊ आहेत. तर रामेश्वर मुंडे हे धनंजय आणि पंकजा मुंडेचे सख्खे चुलत भाऊ आहेत. हे दोघे आताच चर्चत येण्याचे कारण या जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोघे भाऊ एकमेकासमोर उभे आहेत. ज्या वेळी धनंजय मुंडे यांनी बंड करून आपला वेगळा मार्ग पत्करला त्याच वेळी अजय मुंडे हे धनंजय मुंडे सोबत राष्ट्रवादीत आले. युवक राष्ट्रवादीत प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करीत आहेत. या पूर्वी नाथ्रा ग्रामपंचायतीचे ते बिनविरोध सरपंच राहिले. आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात त्यांचा सामना रामेश्वर मुंडे सोबत असणार आहे.

रामेश्वर मुंडे हे धनंजय मुंडेच्या बंडानंतर ही पंकजा मुंडे सोबतच राहिले. एक भाऊ दूर गेला तरी एक भाऊ पंकजासोबत स्थानिक राजकारण करीत होता. मात्र, अजय मुंडे यांच्या तुलनेत रामेश्वर राजकारणात नवखे आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील गावात ही लढत होणार असल्याने शेतकरी अपल्यालाच मतदान देतील असे रामेश्वर मुंडेंना वाटते.
मागच्या पाच वर्षापासून परळीच्या सगळ्या छोट्या-मोठ्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजयचा सामना झालेला म्हणूनच आता परळीच्या पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात पुन्हा या भावंडातील लढत लक्षवेधी असणार आहे. या दोन मुंडेच्या लढतीत कस पंकजा व धनंजय यांचा लागणार आहे.

धनंजय मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत तर पंकजा मुंडे या राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता भाऊबंदकीच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाला पहिल्या वर्षी १५९ कोटी, दुसऱ्या वर्षी तिनशे कोटी आणि आता थेट ७८० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. यापैकी पाचशे कोटी हे अर्थसंकल्पा बाहेरून म्हणजे वित्तीय संस्थांकडून उपलब्ध होणार आहेत. या रेल्वे मार्गावरील नगर ते नारायणडोहपर्यंत १५ किलोमीटर रेल्वेमार्ग टाकण्याचे काम झाले आहे. बीड जवळ असणाऱ्या पालवण ते तिप्पटवाडी या साडेसात किलोमीटरमध्ये मातिकाम पूर्ण झाले असून या साडेसात किलोमीटरवर केवळ रेल्वे रुळ अंथरण्याचे काम बाकी आहे. नारायणडोह ते तिपट्टवाडीपर्यंत मातीचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या महिनाभरात बीड ते परळी रेल्वेमार्गाचे माती कामाच्या निविदा निघणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे-पाटील यांनी दिली. दरम्यान, पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांनी या तरतूदीबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांच्या घरात संस्कारांची कमी: पंकजा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'व्यक्ती हयात नसताना त्यांच्या जन्मतारखेवर भाष्य करून वाद निर्माण करणं योग्य नाही. पण पवारांच्या घरात संस्कारांची कमी आहे,' अशी बोचरी टीका पंकजा यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. पवारांचा वाढदिवस राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते पाहूनच मुंडेंनी देखील १२ डिसेंबर हीच जन्मतारीख लावली होती, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला होता. पवार यांच्या या वक्तव्यावर पंकजा यांनी नाराजी व्यक्त केली. 'अजित पवारांच्या या वक्तव्यामुळं संपूर्ण मुंडे कुटुंबीयांना वेदना झाल्या आहेत. मी नेहमीच शरद पवार यांचा आदर आणि सन्मान केला आहे. तो माझ्या संस्काराचा भाग आहे. पण पवारांच्या घरात अशा प्रकारच्या संस्कारांची कमी आहे हेच अजित पवारांच्या वक्तव्यातून दिसते. 'धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार हे बोलत आहेत,' असा आरोपही पंकजा यांनी केला. 'गोपीनाथ मुंडे यांना जन्मतारीख बदलायचीच असती तर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती,' असंही त्या म्हणाल्या.

गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. मुंडे ऐंशीच्या दशकात राजकारणात आले. त्यावेळी शरद पवार यांचे वलय राज्याच्या राजकारणात होते. पवारांप्रमाणेच आपलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठीच त्यांनी ही तारीख जाहीर केल्याचे ते म्हणाले होते.

काँग्रेसप्रवेशाची चर्चा झाली नव्हती!

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यांच्यासोबत पाच आमदार देखील होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोध केल्यामुळे तसेच सुषमा स्वराज यांनी मुंडेंना समजावल्यानेच ते भाजपमध्ये राहिल्याचे अजित पवार म्हणाले होते. पंकजा यांनी याबाबत वेगळे मत मांडले. 'काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी कधीही माझ्याशी चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीला गेले नव्हते,' असा दावाही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडेंना धक्का; धनंजय मुंडेंची सरशी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्हा परिषद निवडणुकीत धक्का बसला आहे. परळीतील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली आहे. परळी विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या १० जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहे. तर बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडमध्ये पराभव: पंकजा मुंडे राजीनामा देणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पराभव झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

काही महिन्यांआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पंकजांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. कामे करूनदेखील जनतेने असा कौल का दिला, याचे विश्लेषण करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले. भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवणार असल्याचे पंकजा मुंडेंनी जाहीर केले आहे.

परळीतील जिल्हा परिषद निवडणूक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. जिल्हा परिषदेशिवाय परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवरदेखील राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. भाजपने २०१२ साली झालेल्या परळी व अंबाजोगाई पंचायत समितीवर विजय मिळवला होता. पण यंदा धनंजय मुंडे यांनी दोन्ही पंचायत समिती भाजपकडून खेचून आणल्या. नगरपालिका पाठोपाठ आपल्या मतदारसंघात कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ६० जागांपैकी २४ जागांवर विजय मिळला. भाजपला २०, शिवसेना ५, काकू नाना आघाडी ४, शिवसंग्रामला तीन, काँग्रेसला दोन आणि अपक्ष एका जागेवर विजयी झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्यांचे सत्र सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असून, गेल्या तीन महिन्यांमध्ये ३७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. नापिकी आणि दुष्काळासारख्या कारणांबरोबरच, कृषी उत्पादनाला हमी भाव न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हे टोकाचे पाऊल पडल्याचे दिसून येत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये २०१०पासून दुष्काळाचे संकट आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेमध्ये १२५ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये एकूण ९ लाख २७ हजार ४३० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ८ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगावरून खरीप पिकांच्या सरासरी उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे सिद्ध झाले. जिल्ह्यात १४०३ महसुली गावे आहेत. सर्वच गावांमध्ये तीन वर्षे पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या वर्षी पहिल्यांदा अंतिम पैसेवारी सरासरी ५८.२४ पैसे नोंदविण्यात आली. उत्पादन वाढल्याचे दिसून येत असताना, पिकांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. सोयाबीन, तूर यांसारख्या प्रमुखांना दर न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते मार्चपर्यंत ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील जानेवारीमध्ये वीस, फेब्रुवारीत सात तर मार्चमध्ये दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील २७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीस पात्र ठरली आहेत. तर, एक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरली असून, एक प्रकरण चौकशी स्तरावर आहे.

बीड जिल्ह्यामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग ,उडीद, मका, खरीप ज्वारी याच्या उत्पादनात मोठी तूट आली आहे. तसेच, ज्वारी, गहू, हरबरा यासारख खरीप आणि रब्बी उत्पादन शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे, चांगला पाऊस झाल्यानंतरही मिळणाऱ्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वय वाढलं की हुंडा वाढतो म्हणून...

$
0
0

म. टा. विशेष प्र‌तिनिधी, शिरूर कासार (बीड)

बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, धारूर, आष्टी, वडवणी या बालाघाटातल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ कायम मुक्कामाला असल्याने कर्जबाजारीपणा पाचवीला पुजलेला. खासगी सावकारांचा सुळसुळाट. लहान मुलींना कमी हुंडा. वय वाढलं की लग्न जमत नाही, हुंडा वाढतो म्हणून मुलगी ‘वेळेत’ सासरी पाठवायची मानसिकता इथे आढळते.

लग्नात कर्ज काढावंच लागतं. लग्नात ऊसतोडीची उचल, वरून कर्जही संपतं. ‘पदरात दोन-तीन पोरी असल्या की आई-बापाचं आयुष्य कर्जातच संपतंय’, पुतण्यांच्या लग्नांत झालेल्या कर्जात बुडून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याची विधवा पत्नी आरती सांगत होती. तेराव्या वर्षी लग्न झालेल्या आरतीच्या पदरी एकोणिसाव्या वर्षी तीन मुलं होती! आता मुलांना घेऊन ती शांतिवन संस्थेत राहते.

दुष्काळामुळे या हंगामात ऊस कमी होता. कारखाने जेमतेम दोन महिने चालले. लोक लवकर परतले. मुकादमाकडून घेतलेली उचल अर्धीही फिटली नाही. ‘आता पुढची दोन वर्षे ते फेडण्यात जातील’, शीतलच्या सासूबाई काळजीने सांगतात.

पण म्हणून बालाघाटातले बालविवाह थांबलेले नाहीत. ही बातमी लिहित असताना लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून, पोलिसांना सूचना देऊनही पांगरी गावातल्या मुलीचं लग्न लागल्याची बातमी येतेय. कार्यकर्त्यांना मिळालेल्या जन्म दाखल्यात तिचं वय १५ आहे!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगी सातवी पास झाली? लग्नाचं बघा...

$
0
0

शिरूर कासार(बीड) : शिरूर तालुक्यात बडेवाडीची रूपाली. वडिलांचं छत्र हरवलेलं. गेल्या एप्रिलमध्ये दहावीची परीक्षा झाली आणि तिचं लग्न झालं. नवरा हमाल. दारू पिऊन मारहाण करायचा. एक दिवस चाकू घेऊन मागे लागला. दीपाली जीव वाचवायला माहेरी परत आली ती परतलेली नाही

वडवली तालुक्यातल्या चिंचवणच्या वस्तीवरची शीतल. सातवी पास झाली आणि गेल्या जुलैमध्ये लग्न झालं. तीनच महिन्यांत सासरच्या लोकांसोबत कर्नाटकात ऊस तोडायला जावं लागलं. ‘पहाटे चार वाजता शेतात कोयता घेऊन धावायचं. ऊस तोडून मोळ्या बांधून गाडीत टाकायच्या. दुपारी कोपीवर येऊन सैपाक, धुणी-भांडी. लय अवघड होतं सारं’, कसनुसं हसत ती सांगते.

रूपाली आणि शीतलसारख्या लग्न ठरलेल्या, झालेल्या, मोडलेल्या आणि विधवा झालेल्या शाळकरी वयाच्या मुली बालाघाटात गावागावांत दिसतात. उघड्या बोडक्या बालाघाट डोंगरांच्या आडोशाला पहुडलेल्या या तालुक्यांत दुष्का मुलगी सातवी पास झाली? लग्नाचं बघा...ळ कायमचा मुक्कामी. जमीन रेताड. खरीपाचं जमेल तेवढं पीक घेऊन दसरा झाला की बैलगाड्या जुंपून इथली ७५ टक्के जनता ऊस तोडणी कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातेत जाते. बीडमधून ४ लाख लोक ऊस तोडायला बाहेर जातात, त्यात बालाघाटातले सर्वाधिक. चार ते सहा महिने तिकडेच. तान्ही लेकरं सोबत, जाणती घरी. वयात आलेली मुलगी गावात ठेऊन जाणं लोकांना असुरक्षित वाटतं. कारखान्यांवर उघड्यावर संसार. तिथे मुलगी सोबत असणं धोक्याचं. लग्न करून जबाबदारी संपवणं हा एकच पर्याय उरतो. ‘इपरीत झालं तर गरीबाच्या अब्रूचं खोबरं व्हतंय, पोरीच्या जातीचा जीवाला लय घोर’, मातोरी गावातल्या सुमन जरांगे सांगतात. बीडमध्ये बलात्कार, अपहरण या गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यांची मुलगी शिकतेय, पण नातेवाईकांनी लग्नाचा तगादा लावलाय. पती आजारपणात गेल्यामुळे जबाबदारी अंगावर पडलेल्या सुमनबाई तणावात होत्या.

या पट्ट्यात वंजारी समाजाची लोकसंख्या मोठी. त्यांच्यात हुंड्याची मोठी प्रथा. तेच अनुकरण इतर समाजातही दिसतं. ‘पोरगं नावाला शिकल्यालं, ऊस तोडणारं असलं तरी लाखभर रुपय मोजावं लागतेत. नोकरदार आसंल तर तीन चार लाख’, वारणीचे पोलिस पाटील श्रीनिवास बोटे सांगत होते. ऊसतोडणीला एक कोयता म्हणजे एक जोडपं. पूर्ण कोयत्याला जास्त पैसे मिळतात. मुलगा जाणता झाला की त्याचं लग्न उरकायची घाई. पुष्कळदा मुलगाही २१ हून कमी वयाचा असतो!

वय वाढलं की हुंडा वाढतो म्हणून...

बीड जिल्ह्यातील शिरूर, पाटोदा, धारूर, आष्टी, वडवणी या बालाघाटातल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ कायम मुक्कामाला असल्याने कर्जबाजारीपणा पाचवीला पुजलेला. खासगी सावकारांचा सुळसुळाट. लहान मुलींना कमी हुंडा. वय वाढलं की लग्न जमत नाही, हुंडा वाढतो म्हणून मुलगी ‘वेळेत’ सासरी पाठवायची मानसिकता इथे आढळते.

लग्नात कर्ज काढावंच लागतं. लग्नात ऊसतोडीची उचल, वरून कर्जही संपतं. ‘पदरात दोन-तीन पोरी असल्या की आई-बापाचं आयुष्य कर्जातच संपतंय’, पुतण्यांच्या लग्नांत झालेल्या कर्जात बुडून आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याची विधवा पत्नी आरती सांगत होती. तेराव्या वर्षी लग्न झालेल्या आरतीच्या पदरी एकोणिसाव्या वर्षी तीन मुलं होती! आता मुलांना घेऊन ती शांतिवन संस्थेत राहते.

दुष्काळामुळे या हंगामात ऊस कमी होता. कारखाने जेमतेम दोन महिने चालले. लोक लवकर परतले. मुकादमाकडून घेतलेली उचल अर्धीही फिटली नाही. ‘आता पुढची दोन वर्षे ते फेडण्यात जातील’, शीतलच्या सासूबाई काळजीने सांगतात.

पण म्हणून बालाघाटातले बालविवाह थांबलेले नाहीत. ही बातमी लिहित असताना लेक लाडकी अभियानाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून, पोलिसांना सूचना देऊनही पांगरी गावातल्या मुलीचं लग्न लागल्याची बातमी येतेय. कार्यकर्त्यांना मिळालेल्या जन्म दाखल्यात तिचं वय १५ आहे!

(अल्पवयीन मुलींची नावे बदलली आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृह खातं आवडतं, ते मिळाल्यास आनंदः पंकजा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

गृह खातं हे माझं आवडतं खातं असून या खात्यावर माझं विशेष लक्ष असतं, ते खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, असं विधान करून बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गृह खात्यावर थेट दावा केला आहे. याआधी, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून बरंच रामायण घडलं होतं.

माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी निवासस्थानांचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी झालं. त्यावेळी त्यांनी राजकीय वर्तुळात नवी पुडी सोडली.

गृह खातं माझं आवडतं खातं आहे. माझ्या वडिलांनी - गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या हिमतीने गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी पोलिसांना सदैव प्रोत्साहन दिलं होतं. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांचं मनोबल उंचावलं होतं. त्यांनी केलेलं काम मी अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे या खात्याबद्दल विशेष जिव्हाळा आहे. हे खातं सांभाळायला मिळाल्यास आनंदच होईल, अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या गृह खात्याचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. पुन्हा एकदा फडणवीस यांच्याकडील खात्यावरच दावा सांगून पंकजा यांना नेमकं काय सूचित करायचं आहे, असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जातोय. पंकजा यांच्या इच्छेला पक्षश्रेष्ठींकडून काय प्रतिसाद मिळतो, याबद्दलही उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंधरा वर्षांची आई अन् पस्तिशीची आजी!

$
0
0

धानोरा (जि. बीड) : बाजारचा दिवस असल्याने खालापुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्हरांड्यात गर्दी होती. त्यात चार-पाच फिकुटलेल्या, अशक्त तरुण बायका नंबर यायची वाट बघत बसलेल्या. डॉ. अंजली भांगे तिथल्या तरुण डॉक्टर. म्हणाल्या, ‘लग्नं लवकर त्यामुळे गर्भारपणही लवकर. मुली आधीच अॅनेमिक असतात. वजनही कमी. कोवळ्या वयात लादलेल्या शरीरसंबंधांमुळे रक्तस्राव, पोटदुखी, पाळीच्या तक्रारी असतातच. वेळेआधी प्रसूती, कमी वजनाची मुलं हे या भागात सर्रास दिसतं.’

या आरोग्य केंद्राची दोन वर्षांची आकडेवारी धक्कादायक होती. एप्रिल ते फेब्रुवारी, २०१६ दरम्यान ९१९ प्रसूती झाल्या. त्यापैकी ३० अर्भकमृत्यू होते. एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी, २०१७ यादरम्यान ८८७ प्रसूती झाल्या त्यापैकी २२ अर्भकमृत्यू होते. यातल्या बालमाता किती होत्या हे कळायला मार्ग नाही. कारण नाव नोंदवताना वय १८ वर्षांच्या आत नोंदवण्याचा आरोग्य विभागाचा प्रघात नाही!

आर्वी गावात आशाताई भेटल्या. जेमतेम पस्तीशीच्या असून, पन्नाशीच्या दिसत होत्या. चार मुलं. सततच्या रक्तस्रावामुळे गर्भाशय काढून टाकावं लागलं. आता त्रास थांबलाय, पण घरात काम होत नाही म्हणाल्या. तिशी पस्तिशीत गर्भाशय काढून टाकलेल्या ऊसतोडणी कामगार बायका या भागात मोठ्या संख्येनं.

केंद्र सरकार किशोरींसाठी विशेष योजना राबवते. यात आयर्न, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या शाळकरी मुलींना दिल्या जातात. दर सहा महिन्यांनी रक्त तपासणीही होते. शाळकरी वयाच्या संसारी मुलींपर्यंत मात्र या गोळ्या पोहचायला मार्ग नाही. मातोरीमध्ये आशा वर्कर सांगत होत्या, केंद्र सरकारने मुलींसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले. त्यांचा दर्जा इतका वाईट होता की मुलींनी ते घेतलेच नाहीत. मुदत संपून गेलेली अशी शेकडो खोकी अक्षरशः जाळून टाकावी लागली. बालाघाटातल्या मुली कुपोषण आणि अॅनेमिया सोबत घेऊन जगणाऱ्या. त्यामुळे पाठीची दुखणी, सांधेदुखी, अशक्तपणा यांची कायमची सोबत. जन्मलेली मुलंही अशक्त कुपोषित. डायरिया, न्यूमोनियाला बळी पडणारी. पस्तीशीत सासू हपन्नाशीच्या आत बाई म्हातारी होते. तोवर १५ वर्षांची सून हाताशी आलेली असते.

२१ वर्षांच्या मनीषाचं नुकतंच कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं. मनीषाला दोन मुली आणि एक मुलगा! ‘इथे गर्भनिरोधकं पहिल्या खेपेला कुणीही घेत नाही,’ धारूरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. अभिजित सांगळे सांगत होते. इथे रायमोहापेक्षा बरी स्थिती. पण शस्त्रक्रिया बंदच होत्या. हल्लीच सर्जनची नेमणूक झाली आहे. इथे जून २०१६ मध्ये कुटुंबनियोजनाच्या १३ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. पैकी ११ जणींना तीन मुलं होती आणि वय सरासरी २३!

मातोरीच्या शाळेत एक मुलगा म्हणाला, शेजारच्या आठवीतल्या मुलीचं लग्न ठरलंय. तिच्या आई-वडिलांशी बोलू म्हटलं तर ते शेतात. मग तिची मोठी बहीण आली. १६ वर्षांची. नऊ महिन्यांची गरोदर! जालना जिल्ह्यात अंबडचं सासर. चेहऱ्यावर बाळासारखे निरागस भाव. थोडी थकलेली. पायावर सूज होती. तपासण्या केल्या का, नाव कुठे घातलंस… असं काहीबाही विचारलं तर तिला काही कळेना. लाजत राहिली नुसती. हे वाचकांपर्यंत पोहोचेल तोवर तिनं बाळाला जन्म दिलेला असेल. सुखरूप सुटका झाली असेल ना तिची?

आजारी पडलेलं ग्रामीण रुग्णालय

रायमोहच्या ग्रामीण रुग्णालयात आत शिरताना पायरीवर झोपलेले कुत्रे हाकलावे लागले. कुबट वास नाकात शिरला. कुणीही वैद्यकीय अधिकारी जागेवर नव्हता. अॅडमिट केलेले रुग्ण व्हरांड्यात गप्पा मारत होते. कुणीतरी धावपळ करून ‘एनआरएचएम’च्या डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञाची बदली झाल्याचं सांगितलं. बाकी वैद्यकीय सोयींचा उजेडच होता. गरीबांना साहजिकच खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, हजारो रुपयांच्या बिलांत घेतलेली उचल संपून जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी खाते झाले नापास

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यातल्या कृषी विभागाला शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे जमले नाही. ते नापास झाले आहे,’ असे टीकास्त्र सोमवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी सोडले.
जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, जि. प. अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी प्रास्ताविकात पिकांचा पेरा वाढल्याचे सांगितले. यावेळी हरिभाऊ बागडे म्हणाले ‘केवळ पेरा वाढला म्हणजे खुप काही केले असे नाही. गेल्यावर्षी भाव मिळाला म्हणून पेरा वाढला. पीक वाढले म्हणजे ज्या शेतीपिकाला भाव अधिक मिळतो तेच पीक शेतकरी घेतात.’
कदम म्हणाले, ‘जिल्ह्यात बिगर कर्जधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने पीककर्ज देताना नवीन शेतकरी सभासदांना कर्ज द्यावे. ज्या कृषीपंपांचा विद्युत पुरवठा प्रलंबित आहे अशा ३६६१ शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा करावा, जिल्हा नियोजन समितीतून खरेदी करण्यात आलेल्या ९ पोकलेन मशीनची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्‍ध करून द्याव्या. जिल्ह्याला ९१०० शेततळ्यांचे उद्दिष्ट असल्याने मागेल त्याला शेततळे मंजूर करावे,’ असे आदेश कदम यांनी दिले.

सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख व्हावी
‘रासायनिक खत व किटकनाशके औषधी याचा भरमसाठ वापर होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित करावे, यासाठी जनजागृती करून सेंद्रीय खत उपलब्‍ध करुन द्यावे, भविष्यात औरंगाबाद जिल्हा सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्ळणून ओळखला जावा, या संबंधात जिल्ह्यातील बेरोजगारांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण द्यावे, कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकामार्फत काय कारवाई होत आहे याची माहिती द्यावी,’ असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. मग्रारोहयो योजनेतून सेंद्रीय खत निर्मितीस चालना देण्यात येऊन केवळ वीस दिवसांत सेंद्रीय खत तयार करता येत असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रस्त्याची वृक्षतोड सुरू

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद - पैठण रस्त्याच्या रुंदीकरणाचा तिसरा टप्पा काही दिवसांपूर्वी सुरू झाला. रुंदीकरण करताना रस्त्यातील झाडे तोडण्यात येणार आहेत. त्यापैकी काही झाडे तोडण्यात आली.
या झाडांना वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याचे ठरविले होते. मात्र, रस्त्याच्या जवळची काही झाडे तोडली जाणार आहेत. पैठण रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात महानुभाव आश्रम चौक ते वाळूज लिंक रोड या साडेचार किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामादरम्यान २५० हून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत. त्या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकची झाडे लावून ती जगविली जाणार आहेत, पण या रस्त्यावरील वडाची झाडे १५० वर्षांहून जुनी आहेत. वृक्षसंपदा टिकवून रुंदीकरण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यादृष्टीने विभागाकडून विचार सुरू आहे, पण अगदी रस्त्यालगत खेटून असलेली काही झाडे तोडावी लागणार असल्यामुळे त्यातील काही झाडे तोडण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’ परीक्षार्थींसाठी निवासाची व्यवस्था

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात ७ मे रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ‘नीट’ परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून ही परीक्षा देण्यासाठी हजारो विद्यार्थी औरंगाबाद शहरात येणार आहेत. बाहेरगावाहून आलेल्या परीक्षार्थींची औरंगाबादमध्ये निवासाची, भोजनाची तसेच परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्याची मोफत व्यवस्था आमदार सतीश चव्हाण यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.
‘नीट’ परीक्षेचे महत्व लक्षात घेता तसेच ऐनवेळी परीक्षा केंद्र सापडण्यास अडचण नको म्हणून अनेक पालक आपल्या पाल्यासह एक दिवस आधीच औरंगाबाद शहरात येतात. मात्र, आर्थिक परिस्थिती अभावी सर्वांनाच हॉटेल, लॉजवर राहणे परवडत नाही. त्यामुळे अनेक पालक व विद्यार्थी रेल्वे स्टेशन, बस स्टँडवरच मुक्काम करतात. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी राहण्याची, भोजनाची व्यवस्था देवगिरी महाविद्यालयाच्या मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात करण्यात आली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रांपर्यंत पोहचविण्याची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. गरजू विद्यार्थ्यांनी नावनोंदणीसाठी संपर्क कार्यालयात संपर्क करावी व सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रामेश्वर कदम, भारत खैरनार, उमाकांत कोरे, अनिल परदेशी, मंगेश मोरे, मनोज वडीकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीएमआयए’ सदस्यांना ‘जेट एअरवेज’ची सवलत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’च्या (सीएमआयए) सदस्यांना देशातील तसेच विदेशातील विमान प्रवासामध्ये विशेष सवलत व खास सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. याबाबत ‘जेट एअरवेज’चे अहमद जलील यांच्याशी ‘सीएमआयए’चे अध्यक्ष गुरुप्रितसिंग बग्गा व सचिव दुष्यंत पाटील यांनी नुकताच समन्वय साधला आणि त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून ही खास सवलत ‘सीएमआयए’च्या सदस्यांना मिळणार आहे.
‘जेट एअरवेज’च्या वतीने ‘सीएमआयए’ला अशा प्रकारची विशेष सवलत पहिल्यांदाच देण्यात येत आहे. शहरातील उद्योजकांचा व्यवसाय-उद्योग वाढावा व एकूणच शहातील व्यवसाय-उद्योगाला आणखी चालना मिळावी, या व्यापक उद्देशाने ‘जेट’च्या वतीने ही विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे अहमद जलील यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले. ‘सीएमआयए’च्या सदस्यांनी या सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा व इच्छुकांनी ‘सीएमआयए’च्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही ‘सीएमआयए’तर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रोकडिया हनुमान कॉलनीतील डॉक्टरची शेत जमीन विक्री प्रकरणात सहा लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अब्दुल असद अब्दुल हनीफ, विवेक थोरे व सचिन ठाकूर या तिघांना अटक केली आहे.
रोकडिया हनुमान कॉलनीत डॉ. राजेश रमेश सावजी यांचे सावजी कॅन्सर क्लिनिक आहे. त्यांच्याकडे अब्दुल असद अब्दुल हनीफ हे नेहमी उपचारासाठी येत होते. त्यातून डॉ. सावजी यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. अब्दुल असद यांनी गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे गट क्रमांक २४४मध्ये दहा एकर जमीन असून ती स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने सावजींना जमिनीची कागदपत्रे दाखवून जमीन मालकाशी भेट करून घ्या असे सांगितले. अब्दुल असद व संदीप प्रकाश हिवाळे (रा. ज्युबली पार्क) यांनी भेंडाळा येथील जमिनीचा सातबारा व इतर कागदपत्रे दाखवली. ही जमीन गोरखनाथ खंडू कडू, भीमाबाई गोरखनाथ कडू, राम कडू, लक्ष्मण कडू यांच्या मालकीची असल्याची सातबारावर नोंद होती. डॉ. सावजी यांना जमीन दाखवण्यात आली. त्यांना ती पसंतही पडली. शेत जमीन खरेदी करण्यासाठी १३ लाख रुपये एकर या प्रमाणे भाव ठरवला. त्यानंतर १३ ऑक्टोबर २०१६ रोजी हिवाळे व शेत मालक गोरखनाथ कडू, भीमाबाई कडू, लक्ष्मण कडू, राम कडू, शेख मोहंमद नजीब व नवनाथ कडू यांनी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर जमिनीची इसारपावती करून दिली. त्यावेळी त्यांनी सर्वांची ओळखपत्रे झेरॉक्स प्रतीत आणली होती. या सर्वांची खात्री केल्यानंतर डॉ. सावजी यांनी मलकापूर बँकेचा एक लाख रूपयांचा धनादेश लक्ष्मण कडू यांच्या नावाने तर रोख पाच लाख रुपये हिवाळेला दिले. त्यानंतर जाहीर प्रकटनही देण्यात आले. त्यावर कोणाचेही आक्षेप आले नाहीत.
डॉ. सावजी हे आठ दिवसांनी शेतावर गेले. त्यावेळी निवृत्ती कडू याने संपूर्ण शेत दाखवले. तसेच ही जमीन निविर्वाद असल्याचे सावजींना सांगितले. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी चार लाख रूपयांचा धनादेश सावजींनी राम कडू यांच्या समक्ष हिवाळेला दिला. पुढे जमिनीचे खरेदीखत करून देण्यासाठी सावजींनी सांगून देखिल हिवाळे, अब्दुल असद, नवनाथ कडू यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. दरम्यान, सावजींनी चौकशी केली असता हिवाळेचे नाव संदीप हिवराळे असल्याचे समोर आले. तसेच नाथा कूड यांच्या खात्यावर जमा झालेली उर्वरित रक्कम जमिनीच्या मूळ मालकांना मिळाली नसल्याचे उघड झाले.

ती नावे बनावट
गोरखनाथ कडू, भीमाबाई कडू, लक्ष्मण कडू, राम कडू ही नावे बनावट असल्याचे सावजींच्या लक्षात आले. गोरखनाथ कडू यांना नवनाथ कडू नावाचा कोणताही मुलगा नाही. हिवराळे याने नवनाथ कडू म्हणून ज्याची ओळख करून दिली. त्याचे खरे नाव विवेक थोरे असल्याचे समजले. या प्रकरणी अब्दुल असद, संदीप हिवराळे, विवेक थोरे, सचिन ठाकूर, निवृत्ती कडू तसेच इसार पावती व करारनाम्यामध्ये असलेल्या तीन अनोळखी व महिला तसेच साक्षीदार असलेले शेख मोहंमद नजीब यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, विलास कुलकर्णी, विठ्ठल फरताळे, दत्तू गायकवाड, महेश उगले, दादासाहेब झारगड, मनोज ऊईके, सचिन संपाळ, गाडेकर, भागवत सुरवाडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राऊंड टेबल : सर्वांगीण विकासासाठी पुढाकार आवश्यक

$
0
0

मराठवाड्याची राजधानी, आशिया खंडात एकेकाळी सर्वाधिक वेगाने वाढलेल्या औरंगबादचा विकासाचा वेग काही वर्षांपासून मंदावला आहे. झालर क्षेत्र, सिडको, डीपी प्लॅन, समांतर जलवाहिनी आणि आता नव्याने जाहीर झालेले प्राधिकरण या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. त्याचा परिणाम अनेक घटकांवर होत आहे. शहराचा चौफर विकास आणि सर्वांगीण प्रगती व्हायची असेल, तर लोकप्रतिनिधी, नागरिक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत ‘मटा राऊंड टेबल’मध्ये व्यक्त करण्यात आले. राऊंड टेबलमध्ये क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार, सचिव आशुतोष नावंदर, बालाजी येरावार, सुनील बेदमुथा, पंजाबराव तौर, विजय शक्करवार, संग्राम पटारे, नितीन बगडिया हे सहभागी झाले होते.

क्रेडाईच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांनी शहराच्या विकासावर संवाद साधून आपापली मते मांडली. औरंगाबाद चारही बाजूंनी वाढत आहे. पूर्वेकडे दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, पश्चिमेकडे वाळूजच्या पुढे औद्योगिक आणि नागरी वसाहत गेली आहे. दक्षिण भागात सावंगीच्या डोंगरापर्यंत तर उत्तरेकडे सातारा डोंगर पार करून टाउनशीप उभ्या राहिल्या आहेत. महापालिकेच्या बाहेर वाढलेल्या शहराच्या विकासासाठी झालर क्षेत्र विकास योजना जाहीर झाली. त्यापूर्वी सिडकोने मोठ्या विकास योजना राबविल्या. सध्या वाळूज परिसरात त्यांची योजना सुरू आहे. शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन समांतर जलवाहिनीचा प्रकल्प जाहीर झाला, पण त्यासाठी घातलेल्या अटींमुळे शहराचे नुकसान होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने समांतरची हालचाल थांबविली. विकास आराखड्यात केलेल्या गडबडीमुळे सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेले. एकूणच शहराच्या विकासाच्या योजनांना प्रभावी अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच प्रशासकीय, तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे सद्यस्थितीत शहराच्या विकासावर परिणाम झाला आहे. ‘डीएमआयसी’च्या पायाभूत सुविधांच्या कामानंतर टाउनशीप उभ्या राहतील, एक नवीन शहर वसेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. वर्ष उलटून गेले तरी हालचाल झालेली नाही. सरकारने औरंगाबाद विकास प्राधिकरणाची घोषणा केली. त्याला तीन महिने उलटून गेले आहेत. एकूणच विकासाच्या घोषणा झाल्या पण हालचाली होत नाहीत. यावर तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

नियोजनातील त्रुटी दूर व्हाव्यात
प्रत्येक योजनांचा आढावा घेऊन त्यावर प्रशासकीय पातळीवर विचार झाला पाहिजे. नियोजनाल त्रुटी दूर करून योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विचार केला गेला, तर सर्व योजना वेळेत मार्गी लागतील.
- बालाजी येरावार

नागरी सुविधा पुरवाव्यात
रस्ते, पाणी या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. औरंगाबाद वेगाने वाढत आहे. नवीन नागरी वसाहती उभ्या राहत आहेत. या वसाहतींना सुविधा पुरविण्यासाठीच्या काही योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- सुनील बेदमुथा

भविष्याचा वेध घेऊन नियोजन व्हावे
प्राधिकरण, झालर क्षेत्र, समांतर जलवाहिनी यांसारख्या महत्त्वांकाक्षी योजनांची अंमलबजावणी त्रुटींमुळे थांबली आहे. याबाबत योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. राज्यातील अन्य शहरात विकास योजनांबाबत जसे आग्रही राहिले जाते तसे आपल्या शहरातून होण्याची गरज आहे. भविष्यात डीएमआयसीमुळे मोठे उद्योग येतील. त्यामुळे शहरांची लोकसंख्या वाढणार आहे. परदेशी नागरिकांची संख्याही वाढणार आहे. शहराचे भविष्यात बदलणारे स्वरूप विचारात घेऊन विकास आराखडा निर्माण करायला हवा.- विजय शक्करवार

सातारा, देवळाईकडे लक्ष द्यावे
देवळाई, सातारा परिसरातील पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा भाग महापालिकेत आला आहे. पूर्वी या भागात विकास योजना राबविताना शहर विकास निधी सिडकोकडे दिला गेला. त्याची रक्कम जर पालिकेकडे वर्ग करून घेता आली, तर त्यातून निश्चितपणे चांगल्या पायाभूत सुविधा पुरविता येतील. सातारा, देवळाई भागात पायाभूत सुविधांची उभारणी केल्यानंतर या भागातील विकासाला आणखी वेग येईल. अन्य योजनांच्या विकासासाठी पुढाकार आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे शहर विकासाचे रिव्ह्यू घेऊन त्यादृष्टीने प्लॅनिंग केले पाहिजे.
- रवी वट्टमवार

प्राधिकरणाचे कार्यालय सुरू व्हावे
प्राधिकरणाच्या अंमलबजावणीवर आग्रह धरला गेला पाहिजे. औरंगाबादच्या आजुबाजुंच्या गावांचा आणि परिसरात त्यातून विकास साधला जाणार आहे. प्राधिकरण कसे असेल? त्यातून काय विकास साधला जाईल? याबाबत नागरिकांना फारशी माहिती नाही. प्रशासनाने प्राधिकरण कार्यालय स्थापन करावे. त्यामाध्यमातून विकासाबाबत माहिती उपलब्ध करून दिली, तर भविष्यातील सकारात्मक विकासाला चालना मिळेल.
- पंजाबराव तौर

पायाभूत सुविधा महत्त्वाच्या
सरकारकडून परवडणारी घरे योजना जाहीर झाली आहे. शहरात अॅफोर्डेबल हाउस योजनेंतर्गत प्रकल्प राबविली जाईल, पण या भागात ड्रेनेज, रस्ते, पाण्याची सुविधा प्रशासनाकडून दिली गेली पाहिजे, तरच या योजनेचा हेतू सफल होईल. एकूण सर्वांगीण विकास साधताना पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- संग्राम पटारे

लोकप्रतिनिधींचा पुढाकार आवश्यक
सातारा, देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश झाला. या भागातून सिडकोकडे सिटी डेव्हलपमेंट चार्जेस भरले गेले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा निधी पालिकेकडे घेण्यासाठी प्रयत्न केले, तर निश्चितपणे या भागाचा चेहरामोहरा बदलून जाईल.
- नितीन बगडिया

प्राधिकरण कार्यान्वित व्हावे
औरंगाबाद शहर व परिसरासाठी विकास प्राधिकरणाची घोषणा झाली, पण या प्राधिकरणाचे स्वरूप अद्याप निश्चित झालेले नाही. या योजनेसाठी सरकारने अधिकारी नेमून कार्यालय सुरू केले, तर पुढची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. प्राधिकरण कार्यान्वित झाल्यानंतर अनेक काम मार्गी लागतील. रस्ते रुंदीकरणाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
- आशुतोष नावंदर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बकोरिया जाताच ‘चेहरे’ खुलले

$
0
0

औरंगाबाद : आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची बदली झाल्यानंतर या पदाची सूत्रे नवे डी. एम. मुगळीकर यांनी सोमवारी दुपारी स्वीकारली आणि महापालिकेत अचानक वर्दळ वाढली. काही निलंबित अधिकारी अचानक सक्र‌िय झाल्याची चर्चा सुरू झाली. कंत्राटदारांचीही पालिकेच्या मुख्यालयात वर्दळ वाढली. आयुक्तपदावरून पालिकेत सोमवारचा दिवस नाट्यमय घडामोडींचा ठरला.
सरकारने आयुक्त बकोरिया यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यांच्या जागी डी. एम. मुगळीकर यांची नियुक्ती करण्यात आली. बकोरिया यांच्या बदलीचे आदेश निघाल्यापासून पालिकेतील विशिष्ट लॉबीमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्याचे स्पष्ट दर्शन सोमवारी महापालिकेत झाले.
बकोरिया सकाळी नेहमीप्रमाणे कार्यालयात आले. त्यांचा आठवड्याचा पहिला दिवस नागरिकांना भेटण्यासाठी असतो. त्यामुळे बकोरिया यांच्याकडे गाऱ्हाणी मांडण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने आले होते. दरम्यानच्या काळात आमदार संजय शिरसाट त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी सुमारे अर्धातास बकोरिया यांच्याबरोबर चर्चा केली. त्याचवेळी सुभेदारी विश्रामगृहात पालकमंत्री रामदास कदम विविध विषयांच्या आढावा बैठका घेत होते. शिरसाट यांनी कदम यांची भेट घेऊन बकोरिया यांची बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू झाली.
महापालिकेत पत्रकार बकोरिया यांच्याशी संवाद साधत असताना ‘पालकमंत्र्यांनी तुम्हाला तातडीने बोलावले आहे,’ असे निरोप त्यांना आला. पत्रकारांशी संवाद साधून बकोरिया पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी निघून गेले. दरम्यानच्या काळात त्यांनी, आणखी दोन दिवस आयुक्त म्हणून राहणार असल्याचे संकेत दिले होते.
पालकमंत्री व बकोरिया यांच्यात बैठक सुरू झाल्यावर पालिकेतील विशिष्ट लॉबीच्या हालचालींना वेग आला. पालकमंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी बकोरिया यांची बदली रद्द केल्यास अवघड होईल, असे वाटल्यामुळे या लॉबीने यंत्रणा हलवली. दुपारी तीनच्या सुमारास विक्रीकर खात्याच्या कार्यालयातून पत्रकारांना फोन करण्यात आले. ‘मुगळीकरसाहेब साडेचार वाजता आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तुम्ही उपस्थित रहा,’ असे निरोप पत्रकारांना विक्रीकर विभागाच्या कार्यालयातून देण्यात आला. नवीन आयुक्त पदभार स्वीकारणार असल्याबद्दल महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून निरोप दिले जातात, पण तसे घडले नाही. साडेचार वाजता मुगळीकर यांचे महापालिकेत आगमन झाले.

स्वागतासाठी झुंबड
मुगळीकर आयुक्तपदाच्या खुर्चीत बसल्यावर त्यांच्या स्वागतासाठी अक्षरशः झुंबड उडाली. स्वागत करणाऱ्यांमध्ये नगरसेवकांबरोबर कंत्राटदार व स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्यांचाही समावेश होता. काही निलंबित अधिकाऱ्यांनीदेखील आयुक्तांच्या दालनाबाहेर चक्कर मारून अंदाज घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्ती जीवनाला नवी दिशा देते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सेवानिवृत्ती ही माणसाला नवीन चेतना निर्माण करून देते. चळवळीत सहभागी, ज्ञानी, गुणवान व्यक्ती सेवानिवृत्तीनंतर एक नवी दिशा घेऊन मार्गक्रमण करतो. डॉ. सुधीर गव्हाणे हेही असेच व्यक्तिमत्व आहे, असे गौरवोद्गार माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी काढले.
प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे सेवा गौरव व सत्कार समारंभात ते बोलत होते. सेवा गौरव समितीतर्फे तापडिया नाट्यमंदिरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला व्यासपीठावर रायपूर येथील कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता व जनसंचार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मानसिंह परमार, ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, डॉ. सुरेश पुरी, यशवंत भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी न्या. देशमुख म्हणाले,‘कोणत्याही क्षेत्रात आपला प्रभाव असावा असे वाटत असेल. आपला ठसा निर्माण करायचा असेल, तर नवनवीन शिकणे, नवनव्या संशोधनाचा मागोवा घ्यायला हवा. डॉ. गव्हाणे यांनी तरुणपणापासूनच विचाराला महत्त्व दिले. विचार, सद्गुण सोडला नाही. पत्रकारीतेतून समाजाची फार मोठी सेवा त्यांनी केली. त्यासह सामाजिक, कृषी अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले. निवृत्तीनंतरही ते नवी दृष्टी घेऊन समाजाची सेवा करतील.’ सत्काराला उत्तर देताना डॉ. गव्हाणे म्हणाले,‘जीवन जगण्याची ऊर्जा मी माझ्या गुरूजनांकडून शिकलो. माणसाने परिस्थितीशी लढले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. अशाच संघर्षातून घडलो. मी आज जो आहे, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामुळे आहे.’
यावेळी कुलगुरू डॉ. मानसिंह परमार, ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, डॉ. सुरेश पुरी यांचेही भाषणे झाली. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

पीएचडीसाठी शिक्षक पैसे घेत आहेत
आपल्या भाषणात डॉ. गव्हाणे यांनी काही शिक्षणात चुकीच्या प्रथा कशा वाढल्या यावर भाष्य केले. ‘विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. त्याकडे शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षक कसा आहे, हे त्याच्या चारित्र्य, बोलण्या, वागण्यावरून कळते. आज विद्यापीठात गुण वाढवून देण्यासाठी, पीएचडीसाठी पैसे घेणारे मागणारे अनेक प्राध्यापक आहेत. विद्यापीठे हे वैश्विक विचार देणारी केंद्र आहेत. असे न होता अनेक प्राध्यापक जातीपातीचे विद्यार्थी घेऊन राजकारण करत आहेत,’ असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय पोषण आहार संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. केंद्र व राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेली ही योजना केवळ प्रशासनाचा काणाडोळा होत असल्याने अडचणीत येत आहे. स्वयंपाकी व मदतनीसांना पाच महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात आहार योजना सुरू राहणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. ठरवून दिलेल्या निकषानुसार सहा दिवस आहार दिला जातो. पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागांसाठी ठरवून दिलेल्या मानकानुसार पोषण आहार दिला जातो. बचतगटामार्फत किंवा वैयक्तिक पातळीवर शाळा व्यवस्थापनाकडून शालेय पोषण आहार शिजविला जातो. त्यासाठी स्थानिक स्वयंपाकी आणि मदतनीसांचा मदत घेतली जाते. मुख्याध्यापक किंवा नेमून दिलेला शिक्षक धान्यादी व अन्य व्यवस्थेवर लक्ष ठेवतो. मदतनीसांकडून केलेल्या मदतीपोटी त्यांना मानधन दिले जाते. स्वयंपाकी, मदतनीसांना दरमहा १००० रुपये मानधन दिले जाते. राज्य सरकारकडून आलेल्या अनुदानातून हे मानधन जिल्हा परिषदेतून संबंधित शाळेला दिले जाते. मुख्याध्यापक ते संबंधितांना देतात.
औरंगाबाद जिल्हा परिषदेने गेल्या पाच महिन्यांपासून या मदतनीसांचे मानधन दिलेले नाही. जिल्ह्यात ६२९० स्वयंपाकी व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्या मानधनाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासकीय पातळीवर तपासणीसाठी ही फाइल पेंडिंग ठेवल्याचे सांगण्यात आले. स्वयंपाकी, मदतनीसांच्या नैपुण्याची शहानिशा करण्याबाबत सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. इतके वर्षे विनासायास दिले जाणारे मानधन अगदी बारीक तांत्रिक मुद्दे काढून अडवून ठेवल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

हा तर उलटा न्याय
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इंधन व भाजीपाल्यासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. फेब्रुवारी २०१७ पर्यंतचा ७ कोटी १२ लाख रुपये संबंधित शाळांना देण्यात आले. आता केवळ मार्च महिन्याचे मानधन देणे बाकी आहे. जो पोषण आहार तयार करण्यासाठी असलेल्या स्वयंपाकी, मदतनीसांना मात्र पाच महिन्यांपासून मानधन दिलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तूर-सोयाबीनचे वरण खा’

$
0
0

औरंगाबाद ः राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून, सरकारमार्फत तुरीची खरेदी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे २९ लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी खरेदी केद्रांवर मोठ्या रांगा लागल्या आहेत. तूर खरेदी नियोजनात सरकार कमी पडले, अशी कबुली अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी दिली. भविष्यात तूर आणि सोयाबीन यांचे वरण खाण्याचे प्रयोग करावे लागतील, असेही बापट यांनी स्पष्ट केले.
बापट यांच्या अध्यक्षतेखाली ‌मंगळवारी पुरवठा विभागाशी संबंधित सुनावण्या झाल्या. त्यानंतर ते बोलत होते. रेशन दुकानांवर तूर देण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगत बापट यांनी सांगितले.
तूर व सोयाबीन एकत्र करून त्याचे वरण केल्यास अत्यंत चविष्ट लागते, हा प्रयोग अण्णा डांगे यांनी सांगलीमध्ये केला असल्याचे सांगत येणाऱ्या काळात तुरीबाबत प्रयोग करावे लागतील, असे बापट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना अटक

$
0
0

जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या सिमेंट नाल्याच्या कामाला मुदतवाढ मिळण्यासाठी तक्रारदारकडून एक लाख रुपयांची लाच घेतांना लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पकडले.
भारासवाडा येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची मुदत तीन महिने होती, परंतु पावसाळा व त्यापुर्वी पाणी टंचाई असल्यामुळे त्याचे काम बाकी होते. गुत्तेदाराने मुदतवाढ देण्याची मागणी कोंडेकर यांच्याकडे केली. त्यांनी एक लाख रुपये मागितले. गुत्तेदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार २४ एप्रिल रोजी लाचलुचपत विभागाने लघुसिंचन कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून प्रथम ८८ हजार रुपये व त्यानंतर १२ हजार असे एक लाख रुपये स्वीकारताना अधिकाऱ्यांनी पकडले.
पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलिस अधीक्षक डी. डी. गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक हेमंत सोमवंशी, पोलिस निरीक्षक विकास पाटील, अनिता वराडे, पोलिस नाईक गणेश पडुळे, रवींद्र देशमुख, संदीप आव्हाळे, चालक संदीप चिंचोले यांनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images