Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

माझ्या मुलास मारले कोणी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वर्षभरापूर्वी पैठण रोडवर अपघातात पोटचा मुलगा गेला. त्याला धडक मारणाऱ्याचा ठावठिकाणा लागेना. पोलिस दरबारी ‘अज्ञान वाहन’ अशी नोंद. हीच अज्ञान वाहन अशी नोंद एका मातेला अस्वस्थ करून गेली. ‘माझ्या मुलाच्या अपघाताचा तपास करा. अपघाताला कारणीभूत कोण, याचा शोध घ्या,’ अशी मागणी करीत त्यांनी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजविले, पण हाती काही लागले नाही. मग त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा मार्ग निवडला. गेल्या ४२ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले, पण सरकारी यंत्रणेपर्यंत या मातेच्या वेदना पोचू शकलेल्या नाहीत.
जिल्हाधिकारी कार्यालायसमोर मीना रघुनाथ म्हस्के (रा. त्रिवेणीनगर, सिडको, एन-७) यांचे उपोषण सुरू आहे. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा ४२वा दिवस. त्यांचा एकुलता एक मुलगा सतीश पैठण रोडवरील एका कंपनीत नोकरी करीत होता. गेल्या वर्षी २१ एप्रिल रोजी त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. पोलिस दप्तरी सतीशच्या दुचाकीला धडक देणारे वाहन ‘अज्ञात’ आहे.
या अपघाताची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली. मुलाला धडक देणारे वाहन अज्ञात असल्याने ही माता अस्वस्थ झाली. तिने हे अज्ञात वाहन पोलिसांनी शोधून काढावे, यासाठी पोलिस ठाण्याचे तीन महिने उंबरठे झिजविले. ‘पोलिस ठाण्यात मी सकाळ-संध्याकाळ जात होते, पण तिथे उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती,’ असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर म्हस्के यांनी १५ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. अपघातास कारणीभूत अज्ञात वाहनाचा तपास लावावा. अपघातात जबाबदार असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी आहे.
या उपोषणाची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने कागदोपत्री घेतली. यासंदर्भात पोलिसांनी पत्रही पाठविण्यात आली. पोलिस अनेकवेळा उपोषणस्थळी आले. ते म्हस्के यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करतात, मात्र म्हस्के,‘माझ्या मुलाच्या तपासाचे काय झाले,’ अशी विचारणा करतात. त्यावर ‘आम्ही लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ. उपोषण मागे घ्यावे,’ असे विनंतीपत्र पोलिस देतात. गेल्या ४२ दिवसांत जिल्हा प्रशासनाकडून एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणार्थी म्हस्के यांची भेट घेतली नाही. त्यांची मागणी जाणून घेतली नाही. केवळ पोलिसांशी पत्रव्यवहारावर प्रशासनाचे काम थांबते.

पोलिसांशी पत्रव्यवहार
निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावावा, अशी महिलेची अपेक्षा गैर नाही. यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडेही वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र वाहनधारक अज्ञात आहे, त्याला कोण काय करू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ऑफ रोड रेसिंग’ स्पर्धेत जेएनईसीचे यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोईम्बतूर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील ‘ऑफ रोड रेसिंग’ स्पर्धेत औरंगाबादच्या जेएनईसी कॉलेज संघाने देशात सातवा क्रमांक मिळविला. तसेच एन्ड्युरन्स रेसमध्ये तिसरे स्थान मिळविले.
जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जेएनईसी) अश्व ३.० टीमने या स्पर्धेत यश संपादन केले. यात सूरज शेळके (कर्णधार), अजिंक्य भोकरे, सुमित तिवळकर, आकाश शेलार, कल्याण काळे, योगेश गायकवाड, प्रतीक बाविस्कर, उत्कर्ष वाणी, रोषण पाटील, कांचन जाधव, सागर अंतकवार, बादल नाईक, अथर्व टोके, आदित्य सारडा, प्रतिक मैद, नितीन थोरात, रविकांत घोडके, नीरज कुलकर्णी, किरण मागराती, अक्षय जाधव, अमित त्रिशाळ, सौरभ वडगावकर, वेदश्री जोशी, अमन अघाम, नवनाथ जाधव या २५ विद्यार्थ्यांच्या टीमने सहभाग घेतला होता.
अश्व ३.०चे इंजिन हे ब्रिग्स आणि स्ट्रॅटनचे ३०५ सीसीचे पेट्रोल इंजिन सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक १० एचपीचे वापरले आहे. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी सीव्हीटी प्रणालीवर विकसित करण्यात आली आहे. स्टेरिंग रॅक अँड पिनियन प्रकारातील असून सस्पेंशन हे ट्राय लिंक प्रकारातील आहेत. या गाडीची चेसिस बनवण्यासाठी सीमलेस पाइप वापरण्यात आले आहे. या गाडीचे वजन फक्त १५० किलो आहे. चालकाच्या सुरिक्षततेचा यात अधिक विचार करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनाचे पालन करूनच बनवण्यात आली आहे. या स्पर्धेत एक्सलरेशन, स्प्रिंट, मान्युबिलिटी, एन्ड्युरन्स असे डायमॅनिक तर डिझाइन, कॉस्ट, सेल्स असे स्टॅटिक इव्हेंट होते. या सर्वात जेएनईसीच्या अश्व ३.० बोल्टने देशात सातवा क्रमांक तर एन्ड्युरन्स रेसमध्ये तिसरा क्रमांक मिळविला. या संघास प्रा. सुदर्शन धारूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ऑटोमोबाइल क्षेत्रातील तज्ज्ञ लालाजी चव्हाण यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लालाजी चव्हाण, डॉ. एम. एस. कदम, डॉ. आर. आर. देशमुख, प्रा. राहुल अंधारे, रामदास जाधव, प्रा. एस. एल. ठेंगडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी घाटीच्या ‘सांगाड्या’त एक्स-रे

$
0
0

मिनी घाटीच्या ‘सांगाड्या’त एक्स-रे
रुग्णालयाचे काम झाले एकदाचे पूर्ण; आता प्रशासन म्हणते यंत्रसामुग्री होईल लवकरच उपलब्ध
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागच्या काही वर्षांपासून चकाचक इमारत बांधून तयार असलेल्या चिकलठाण्यातील भव्य-दिव्य जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बांधकाम एकदाचे पूर्ण झाले आहे, तसेच दीर्घ प्रतिक्षेनंतर एक्स-रे मशीनही दाखल झाले आहे आणि आता इतर यंत्रसामुग्री व वैद्यकीय साहित्यदेखील लवकरच उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र २०० खाटांपासून अनेक प्रकारचे वैद्यकीय साहित्य व उपकरणे अद्यापही उपलब्ध झालेली नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याने हे साहित्य-यंत्रसामुग्री कधी उपलब्ध होणार, मनुष्यबळाची नियुक्ती कधी होणार आणि ‘मिनी घाटी’ सुरू कधी होणार, असा प्रश्न कायम आहे आणि याचे उत्तर स्थानिक प्रशासनाकडे नाही.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय पहिल्यापासून कार्यरत आहे आणि त्याला औरंगाबाद जिल्हा हा पहिल्यापासूनच अपवाद राहिला आहे. जिल्हा रुग्णालय कार्यरत नसल्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (घाटी) वर्षानुवर्षे ताण आहे आणि हा ताण दिवसागणिक वाढतोच आहे. त्यातच शहरातील महापालिकेच्या २७ पेक्षा जास्त आरोग्य केंद्रांमध्ये व ५ रुग्णालयांमध्ये अपुऱ्या आरोग्य सेवा मिळत असल्याने रुग्णसेवेचा सगळा भार पुन्हा एकट्या घाटीवर येत आहे. तसेच जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आणि ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमधूनदेखील दररोज मोठ्या संख्येने रुग्ण घाटीला पाठविण्यात येतात. या स्थितीमुळे घाटीवर दिवसेंदिवस रुग्णभार वाढत आहे आणि त्यामुळेच निदान उशिरा का होईना शहराध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी दीर्घ मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर २०११ मध्ये २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला दीर्घ प्रतिक्षेनंतर मान्यता मिळाली. त्यासाठी ३८ कोटी ३१ लाखांचा निधीदेखील मंजूर झाला व चिकलठाणा परिसरात हे रुग्णालय उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात रुग्णालयाचे काम सुरू होण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली. त्यानंतरही रुग्णालयाचे काम २.६७ कोटींसाठी कित्येक महिने रखडले. अर्थात, २ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर करुन कित्येक महिने लोटले असले तरी अद्याप रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. आताशी कुठे एक्स-रे मशीन व इतर काही मोजके वैद्यकीय साहित्य रुग्णालयामध्ये उपलब्ध झाले आहे. मात्र अजूनही रुग्णालयासाठी अत्यावश्यक असलेल्या २०० खाटा उपलब्ध होणे बाकी आहे. तसेच सिटी स्कॅन, व्हेंटिलेटर यासारखी अतिशय महत्वाची उपकरणे, शस्त्रक्रियागृहाची उपकरणे-साहित्य, प्रसुतीगृह-अतिदक्षता कक्षाची उपकरणे-साहित्यदेखील उपलब्ध होणे बाकी आहे. केवळ जमेची बाब म्हणजे अनेक महिन्यांपासून रखडलेली सेंट्रल ऑक्सिजन लाईन, सेंट्रल सक्शन लाईनचे काम एकदाचे पूर्ण झाले आहे. तसेच रुग्णालयाचे बांधकामही पूर्ण झाले आहे.
१२ कोटींच्या उपकरणांना मुहूर्त कधी?
रुग्णालयासाठी १० कोटी २१ लाखांची मोठी उपकरणे येणार आहेत. यामध्ये एक्स-रे मशीन, सिटी स्कॅन मशीन, ओटी साहित्य, रुग्णालयाचे फर्निचर आदींचा समावेश आहे. त्याशिवाय ९३ लाखांची किरकोळ खरेदी उपसंचालक कार्यालयामार्फत होणार होती. तसेच ९० लाख ६३ हजारांमधून कार्यालयीन फर्निचरची खरेदी अपेक्षित आहे. त्यासाठी २५ मार्च २०१६ व ३१ मे २०१६ रोजी खरेदीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असला तरी, एकूण १२ कोटींच्या खरेदीला मुहूर्त लागणार तरी कधी, असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे.
३०० पदनियुक्तीचे मोठे आव्हान
या रुग्णालयासाठी वर्ग तीन व चारची २७८ पदे असणार आहेत, तर ४४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्ग एक व दोनची पदे असणार आहे. यापैकी २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदांची नियुक्ती यापूर्वीच झाली आहे, तर २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांची; म्हणजेच एकूण ३०० पदांची नियुक्ती होणे बाकी आहे आणि हेच मोठे आव्हान आहे. अलीकडे कोट्यवधींची उपकरणे रुग्णालयामध्ये दाखल होतात व कोट्यवधी खर्चुन इमारतीदेखील उभ्या राहतात; पण तज्ज्ञ व तंत्रज्ञ नसल्याने उपकरणे व इमारती धूळ खात पडू राहतात. असाच अनुभव घाटीच्या ‘सीव्हीटीएस’, ‘नेफ्रॉलॉजी’वरून वर्षानुवर्षे येत आहे. खुद्द ‘मिनी घाटी’ची रिकामी इमारतदेखील दोन वर्षांपासून उभी आहे.

जिल्हा रुग्णालयासाठी उपकरणे-साहित्याच्या खरेदीची प्रक्रिया राज्यस्तरावर सुरू आहे व येत्या मे अखेरपर्यंत सर्व उपकरणे-साहित्य उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मनुष्यबळाची नियुक्ती होईल व त्यानंतर प्रत्यक्षात रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

– डॉ. जी. एम. गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौशी ट्रेकर्संनी अनुभवला एव्हरेस्ट मोहिमेचा थरार

$
0
0

हौशी ट्रेकर्संनी अनुभवला एव्हरेस्ट मोहिमेचा थरार
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादेतील नऊ हौशी ट्रेकर्संनी एव्हरेस्ट शिखर मोहिमेचा थरार अनुभवण्यासाठी बेसकँपपर्यंतची मोहीम आखून फत्ते केली. या मोहिमेसाठी त्यांनी तीन महिने गिर्यारोहकाप्रमाणे कसून सराव केला होता. जगातील सर्वात कठीण, धोकादायक आणि आव्हानात्मक ट्रेकचा अनुभव घेतल्याचा अनुभव हौशी ट्रेकर्संनी शेअर केला.
माऊंट एव्हरेस्ट शिखर हे केवळ गिर्यारोहकांनाच खुणावत असते असे नाही. शहरातील काही ट्रेकर्संना माऊंट एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्यापर्यंत म्हणजेच १७ हजार ५०० फूट उंचीवरील ‘बेसकँप’ पोहोचण्याची जिद्द निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी तीन महिने नियमितपणे गिर्यारोहकाप्रमाणे ट्रेनिंगही घेतले. बेसकँपपर्यंतची मजल गाठल्यानंतर त्यांना एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवण्याइतकाच आनंद झाला. या मोहिमेत उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, डॉ. प्रशांत दरख, डॉ. नवीन कासलीवाल, हॉटेल व्यावसायिक कुणाल लहेरिया, सीए मीनल नाईक, गृहिणी सीमा जाखेटे, उद्योजक मनोज शहा, सोहम शहा यांनी सहभाग घेतला. या मोहिमेचे नेतृत्त्व मराठवाड्यातील पहिला एव्हरेस्टवीर रफिख शेखने केले. सात ते एकवीस एप्रिल या कालावधीत ही मोहिम त्यांनी पूर्ण केली.
या मोहिमेसाठी रफिक शेख यांनी त्यांच्याकडून कसून सराव करून घेतला. शारीरिक क्षमता वाढवणे, व्यायाम, सराव, धावणे, डोंगर चढणे असे उपक्रम सुरू झाले. डोंगर चढण्याकरिता विविध तंत्रे, कसे चालावे, काय टाळावे या गोष्टी त्यांना सांगण्यात आल्या. गोगाबाबा, सातारा डोंगर, शूलिभंजन, भांगसीमाता गड, पाटणादेवी आणि कळसुबाई शिखर तसेच गोगाबाबा ते दौलताबाद ट्रेक, सहा ते सात तास चालण्याचा सराव त्यांनी नियमितपणे केला. या तयारीमुळे चारशे मीटर धावू न शकणारे ट्रेकर्स दहा किलोमीटरपर्यंत धावू लागले. या ट्रेनिंगचा प्रत्यय त्यांना एव्हरेस्ट बेस कँपपर्यंतच्या ट्रेकमध्ये पदोपदी आला.
या मोहिमेचा अनुभव सांगताना उद्योजक मनोज शहा म्हणाले, ‘या मोहिमेची तयारी सुरू असताना मी माझा मुलासोबत जात होतो. त्यांच्यासोबत तयारी करू लागलो. तयारी चांगली होत असल्याने मी देखिल या मोहिमेचा एक भाग बनलो. तयारी उत्तम झाल्यामुळेच बेसकँपपर्यंतचा थरार अनुभवता आला. ही मोहिम सदैव लक्षात राहिल.’
डॉ. प्रशांत दरख म्हणाले, ‘एव्हरेस्ट शिखरावर केवळ गिर्यारोहकच चढाई करू शकतात. पण बेसकँपपर्यंत जाण्याचे धाडस कोणीही करू शकतो. हेच धाडस प्रत्यक्षात आणण्याकरिता ही मोहिम आम्ही आखली आणि यशस्वीपणे पूर्ण केली. या मोहिमेसाठी जिद्द व ट्रेनिंग या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसेच सकारात्मक विचार करणे तेवढेच महत्त्वाचे ठरते.’
सीमा जाखेटे म्हणाल्या, ‘या मोहिमेत सहभागी झालेले सर्वजण हे व्हेजिटेरियनच होते. खाण्या-पिण्याच्या अडचणी होत्या. पण आम्ही त्यावर मात करण्यात यशस्वी ठरलो. कोणीही आजारी पडले नाही की दुखापतही झाली नाही. ‘लाईफ टाइम अॅचिव्हमेंट’ सारखा हा क्षण आम्ही अनुभवला.’

महसूल विभागात काम करीत असल्याने चाकोरीबद्ध आयुष्य जगत होते. फिटनेस हा मोठाच प्रश्न होता. कारण माझा उजवा गुडघा कायम दुखत असायचा. तीन महिने कसून तयारी केल्यामुळेच या मोहिमेत सहभागी होऊ शकले. एव्हरेस्ट शिखर मोहिमेतील वातावरण आणि आपण दररोज अनुभवतो ते वातावरण यात जमीन-आस्मान इतका फरक आहे. निसर्गाच्या सान्निध्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करताना फिटनेसची कसोटी लागली. बेस कँप मोहिमेत आम्ही एव्हरेस्ट शिखराचा थरार अनुभवला. हा अनमोल असाच ठेवा आहे.

- सरिता सुत्रावे, उपजिल्हाधिकारी

गेल्या दहा वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे गिर्यारोहण अथवा क्रीडा विषयापासून मी दूरच होतो. माझ्यासाठी असंभव गोष्ट होती. परंतु, रफिक शेख यांच्या मार्गदर्शनामुळे उत्तम तयारी झाली. आठ ते दहा तास दररोज चालावे लागे. चढ-उताराचे अंतर, थंडगार वारा, कधीही होणारे हिमवादळे या सर्व गोष्टींचा अनुभव या ट्रेकिंगमध्ये मिळाला.
- कुणाल लहेरिया, हॉटेल व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहेरी आलेल्या विवाहितेवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माहेरी आलेल्या विवाहितेवर बलात्कार झाल्याचा प्रकार दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. ही घटना १५ दिवसांपूर्वी घडली असून महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध बलात्कार व अॅट्रासिटी अॅक्टनुसार दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित १८ वर्षांच्या तरुणीचे लग्न अहमदनगर येथील तरुणासोबत झाले आहे. ती १५ दिवसांपूर्वी माहेरी आली होती. ही तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून संशयित आरोपी सतीश सोनवणे हा घरात घुसला. आई-वडिल व भावांना जाळून मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार पीडित तरुणीने आरोपी सतीशचा मोठा भाऊ नंदकिशोर सोनवणे याला सांगितला. यावेळी नंदकिशोरने तिला झाले ते विसरून जा, पोलिसात तक्रार दिल्यास पेटवून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपी सतीशने पीडित तरुणीला माझ्या भावाला हा प्रकार का सांगितला, या कारणावरून काठीने मारहाण केली. या तरुणीने मंगळवारी दौलताबाद पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित आरोपी सतीश सोनवणे व नंदकिशोर सोनवणे (दोघे रा. सिंधी सिरसगाव, ता. गंगापूर) यांच्या विरुद्ध बलात्कार, धमकी देणे तसेच अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर ठकांचा दोघांना ८० हजारांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दोन विविध घटनात सायबर ठकाने दोघांना ऑनलाइन ऐंशी हजाराचा गंडा घालत फसवणूक केली. कंपनीतील अधिकाऱ्याचे क्रेडिट कार्ड हॅक करीत सिंगापूर येथून ७१ हजारांची खरेदी करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत एटीएममधून रक्कम काढून परतल्यानंतर त्याच एटीएममधून पुन्हा तरुणाचे साडेआठ हजार रुपये काढण्यात आले. याप्रकरणी क्रांतीचौक व मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दीपक भीमराव बोर्डे (वय ३२ रा. खोकडपुरा) हे रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथील एका कंपनीत अकाउंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. बोर्डे यांच्याकडे अॅक्सिस कंपनीचे क्रेडिट कार्ड आहे. ते मंगळवारी सकाळी कंपनीत असताना त्यांच्या मोबाइलवर मॅसेज आला. सिंगापूर येथील मिनिट क्लिनिक, गुगल ईसीसी या कंपनीतून खरेदी झाली असून त्याचे पेमेंट बोर्डे यांच्या क्रेडीट कार्डमधून करण्यात आले. एकूण ७० हजार २०१ रुपयाची खरेदी करीत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बोर्डे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८,५०० रुपये लंपास
दुसऱ्या घटनेत सायबर ठकाने एटीएम कार्डधारकाची ८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. अजय कचरू बताडे (वय २३ रा. रोहिदासनगर, मुकुंदवाडी) हे १६ एप्रिल रोजी सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान, एपीआय कॉर्नर जवळील एसबीआयच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पाच हजार रुपये काढले, पण साडेआठ ते पावणेनऊ या दरम्यान अज्ञात आरोपीने अजयच्या पासवर्डचा वापर करीत पुन्हा त्याच्या खात्यातून ८ हजार ५०० रुपये काढले. याप्रकरणी अजयने दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी शाळांचे परफॉर्मन्स कार्ड

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक मंडळी कार्यरत झाली आहेत. शाळांनी त्यासाठी परफॉर्मन्स कार्ड तयार केली आहेत. वाढलेली पटसंख्या, डिजिटायझेशन व गुणवत्ता ही कार्डमधील माहिती नवीन प्रवेशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड व शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांच्या संकल्पनेतून आगामी शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी झेडपी शाळांचा सकारात्मक आलेख दर्शवण्यासाठी एक बुकलेट तयार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत परफॉर्मन्स कार्ड तयार करण्यात आले आहे. आपल्या शाळेची प्रगती कोणत्या प्रकारे झाली याच्या नोंदी या कार्डात असून, त्याच्या प्रती पालकांना दिल्या जात आहेत. खाजगी शाळांना स्पर्धेस तोंड देण्यासाठी झेडपीने राबविलेली ही अभिनव संकल्पना प्रभावी ठरत आहे. आगामी शैक्षणिक वर्षात चांगला फायदा दिसून येईल, अशी अपेक्षा शिक्षक भारतीचे प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, दत्ता गायकवाड, मच्छिंद्र भराडे, नजीर पठाण, महेंद्र बारवाल आदींनी व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळांमधून मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

काय आहे कार्डात?
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या कार्डात तेथील सुविधांची संपूर्ण माहिती असणार आहे. उदाहरणादाखल; धामणगाव येथील झेडपी शाळेने केलेल्या कार्डात ‘फुलंब्री तालुक्यातील मराठी व उर्दू समांतर वर्गांची उपक्रमशील शाळा’ अशी टॅग लाइन दिली आहे. सुविधांमध्ये इमारत, क्रीडांगण, खेळणी, किचनशेड, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृह, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, शिष्यवृत्ती, पोषण आहार, कम्प्युटर लॅब, ग्रंथालय, विज्ञान प्रयोग, आयोजित उपक्रम-ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्ययन व अध्यापन, कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांचा विकास, शारिरीक विकासासाठी विविध स्पर्धा. विद्यार्थ्यांचा यशोगाथा दर्शविणारी छायाचित्रे या कार्डात समाविष्ट करण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी व दलित न्यायापासून दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘देशात गरीब, आदिवासी आणि मागासवर्गीयांना न्याय मिळत नाही. कोर्टाकडून मिळालेला न्याय सध्याच्या व्यवस्‍थेकडून ‌दिला जात नाही. या परिस्थितीत राजकीय दबाव वाढवल्याशिवाय या समाजघटकांना न्याय मिळणार नाही,’ असे मत तहलका पत्रिकाचे पत्रकार अजित साही यांनी व्यक्त केले.
नुमाइंदा काउंसिलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काउंसिलसतर्फे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. ‘कोर्टाने दिलेले आदेश पोलिस व इतर विभागांकडून पाळले जात नाहीत. राज्यांतील सत्ताधारी पक्षांकडून शासकीय विभाग, संघटनांना पाठबळ दिले जात आहे. गरीब, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. या वर्गांना न्याय व सरंक्षण देण्याचे काम शासनाचे आहे, या हल्‍ल्यांना सरकारही जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क प्रतिनिधींची दर पाच वर्षांनी होणारी बैठक ४ मे रोजी होत आहे. २०१२ मधील बैठकीत पाकिस्तानातून पाठविण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या बैठकीत अमेरिका, कॅनेडा, युरोप, फ्रान्स, जर्मनी, आयरलँड, डेन्मार्क आदी देशांनी कश्मीरमधील आर्मड् फोर्स कायदा मागे घेण्याची सूचना केली होती. यंदाच्या बैठकीत दहशतवादी कारवायांच्या नावे भारतात तरुणांना होणारी अटक, न्यायदानाच्या प्रक्रियेतील उशीर, बिफच्या नावाखाली होत असलेले हल्‍ले या विषयांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारणा होण्याची शक्यता आहे, असे अजित साही यांनी सांगतिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोकरीचे आमिष; दीड लाखाला गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची एक लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सप्टेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधी घडला. याप्रकरणी दोन आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कृष्णा रामेश्वर वाघ (वय २३, रा. आदर्शनगर, मुधलवाडी. ता. पैठण) हा विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात असून औरंगपुऱ्यात राहतो. त्याची सप्टेंबर महिन्यात तुषार लक्ष्मीकांत चौधरी (रा. दत्त मंदिराजवळ, बीड बायपास) व सुमित अशोक नागडे (रा. नागपूर) यांच्यासोबत ओळख झाली. या दोघांनी आपल्या विविध सरकारी कार्यालयात ओळखी असून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. या आमिषापोटी त्याच्याकडून वेगवेगळ्या वेळी एकूण एक लाख ४० हजार रुपये वेगवेगळी कारणे दाखवत उकळले. यानंतर या दोघांनी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याने कृष्णाने मंगळवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीकक गंभीरराव हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलचाचणीचा निकाल ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर झाला. आवड, क्षमतेनुसार आपला कोणत्या क्षेत्राकडे कल आहे, ‌हे विद्यार्थ्यांनी मोबाइलवरच पाहणे पसंत केले. दुपारी तीनपासून कल अहवाल पाहता येईल, असे सांगण्यात आले होते, मात्र, तासभराने वेबसाइट सुरू झाली.
दहावीनंतर करिअर निवडताना विद्यार्थ्यांना त्यांची आवड व क्षमता काय आहे, यावर त्यांना कलचाचणीतून मार्गदर्शन केले जाते. ९ फेब्रुवारी ते ३ मार्च यादरम्यान राज्यभरात ही चाचणी घेण्यात आली. त्याचा निकाल आज www.mahacareermitra.in या वेबसाइटवर बुधवारी जाहीर झाला.
राज्यभरात १६, लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांची ही कलचाचणी घेण्यात आली. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला, फाइन आर्ट, वाणिज्यसह यंदा कृषी आणि संरक्षण क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांना कलजाणून घेता आला. आपल्या किंवा मित्रांच्या मोबाइलवरच कल अहवाल पाहण्यात विद्यार्थी गुंग होते. सुरुवातीला तासभर वेबसाइट सुरळीत चालत नव्हती. दुपारी चारनंतर ही वेबसाइट सुरळीत झाली. त्यानंतर पोर्टलवर विद्यार्थ्यांना इतर माहिती मिळाली. निकाल आलेखस्वरुपात देण्यात आला आहे. त्यासह प्रत्येक क्षेत्राला किती कल आहे, त्याची टक्केवारीत दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कल समजणे सोपे झाले. ऑनलाइन प्रमाणपत्र सध्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. मूळ प्रमाणपत्र गुणपत्रिकेसोबत दिले जाणार आहे.

क्षेत्रांची माहितीही
सातही क्षेत्रांची माहिती, अभ्यासक्रम, जिल्हानिहाय संस्था, प्रवेशाची प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना पोर्टलवर माहिती उपलब्ध आहे. त्या-त्या क्षेत्राची माहिती देणारा व्हिडिओही विद्यार्थ्यांना पाहता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या माहितीचा लाभ घेता आला.

मार्गदर्शनाचीही सुविधा
कल अहवालानंतर विद्यार्थ्यांना अधिकची माहिती हवी असेल, तर त्यासाठी समुपदेशनाची व्यवस्था विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था येथे करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी सुमारे दहापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी संस्थेत येऊन चौकशी केली. २५ एप्रिल ते १५ मेपर्यंत हे समुपदेशन उपलब्ध असणार आहे.

कलचाचणीचा निकाल वेबसाइटवर पाहता येतोच, त्यासह त्यांना आवश्यकत ती माहिती, संधी याबाबतही उपयुक्त माहिती पोर्टलवर आहे. त्यासह काही अधिक अडचण असेल तर, आम्ही ही त्यांचे समुपदेशन करतो. निकाल अतिशय सुटसुटीत कळेल अशा पद्धतीने मांडलेला आहे. विद्यार्थ्याला ग्राफ दर्शवित ‌त्याचा कल त्याच्या आवड व क्षमतेनुसार कोणत्या क्षेत्राकडे आहे हे कळते. आज करिअरच्या अनेक संधी आहेत, त्या प्रत्येक संधीबाबत माहिती देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
- दीपक म्हस्के, समुपदेशक, विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नौगाजी बाबांच्या उरुसाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
सर्व धर्मियांचे प्रतिक असलेल्या येथील हजरत सय्यद शहा रुकनुद्दिन उर्फ नौगोजी बाबा यांचा उरुसाला मंगळवारपासून सुरुवात झाली. हा उरुस दहा दिवस सुरू राहणार आहे. त्यानिमित्त दर्गा परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेला राज्यभरातून लाखो भाविक गर्दी करतात.
उरुसाला मंगळवारी संदल शरीफच्या मिरवणुकीने सुरवात झाली. संदल मिरवणुकीत ब्रास बँडचा मुकाबला चांगलाच रंगला. गुरुवारी मुनव्वर मासूम व रूबी ताज यांचा कव्वाली मुकाबला आयोजित करण्यात आला आहे. हाजी गणी सेठ, निजाम मामू, जाफर शेख व सहारा फ्रेंड सर्कलतर्फे भाविकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आली आहे. शहरातील रहीम बेग दारुवाले यांच्यातर्फे शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली. अभय पाटील चिकटगावकर यांच्यातर्फे गुरुवारी दुपारी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व काजी हफीजउद्दीन सदरोद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली उरूस समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. नगराध्यक्ष शिल्पा परदेशी या समितीच्या अध्यक्ष असून माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, साबेर खान, विशाल संचेती, राजूसिंग राजपूत, उल्हास ठोंबरे, काजूभाई काजी, हाजी गनी शेख, अब्रार मिर्झा, राजू शेख, खालिक शेख, अतीक शेख,आवेज शेख, खालील शहा, सलीम वैजापुरी ,रियाज कुरैशी, योगेश टेके, गणेश पवार, राहुल पाटील, समद शेख हे सदस्य आहेत. नगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

वैजापूरचे शहंशाह !
प्रसिद्ध सुफिसंत हजरत सय्यद शहा रुखरोद्दिन उर्फ नौगोजी बाबा वैजापूर शहराचे शहंशाह म्हणून ओळखले जातात. केलेला नवस फेडण्यासाठी अनेक भाविक येतात. सुफिसंत यांच्या उरुसाची कथा देखील प्रसिद्ध आहे. उर्दू तारीख २६ शाबान हा त्यांचा मुख्य वफात दिवस म्हणून त्यांचे खादीम (प्रमुख संदल) साजरा करतात. त्यांच्यात फक्त खादीम यांनाच भाग घेता येतो, त्यानंतर उरुसाला प्रारंभ होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमिच्या जागेवर बागायती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
तालुक्यातील औरंगपूरवाडी येथील स्मशानभूमिच्या जागेवर बन्सी भवर या व्यक्तीने अतिक्रमण करून बागायती शेती सुरू केली आहे. यामुळे गावात अंत्यविधीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने कार्यवाही न केल्यास गावातील मयत व्यक्तीचा तहसील कार्यालयासमोर अंत्यविधी करण्याचा इशारा उपसरपंच लक्ष्मी भवर यांनी दिला आहे.
औरंगपूरवाडी येथील गट नं १८३ च्या २० आर क्षेत्रावर स्मशानभूमी आहे. गेल्या २० वर्षांपासून गावकरी या जागेवर अंत्यविधी करत असून सातबारावरही स्मशानभूमी असा उल्लेख आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून बन्सी भवर याने जागेवर अतिक्रमण केले करून बागायती शेती करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप अलियाबाद ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच लक्ष्मी राजू भवर यांनी केला आहे.
अलियाबाद ग्रामपंचयतीने या जागेवरील अतिक्रमण काढून शेड टाकण्याचा प्रयत्न केला असता सुरेश भवर व राधाकिसन भवर दादागिरी करतात व काम होऊ देत नाहीत. जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यविधी कोठे करावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या जागेचा ताबा ग्रामपंचयतीला मिळावा यासाठी ११ एप्रिल २०१६ रोजी तहसील कार्यालयास पत्र लिहिले. पण एक वर्ष उलटूनही अद्याप तहसील प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचे उपसरपंच लक्ष्मी भवर यांनी सांगितले.

स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याने अंत्यविधी कुठे करावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने लवकर कारवाई न केल्यास या दरम्यान मृत झालेल्या व्यक्तीवर तहसील कार्यालयाच्या आवारात अंत्यविधी करणार आहोत.
-लक्ष्मी भवर, उपसरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्रक उत्पादकांना व्यापाऱ्यांचा ठेंगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड
कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ व भाजीपाल्यावरील नियंत्रण उठवल्याने ग्रामीण भागात खाजगी व्यापारी व पोटव्यापाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांची लूट व फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यात बहुसंख्येने अद्रक उत्पादक शेतकरी आहेत.
कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणात अद्रक उत्पादन होते. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अद्रक व्यापारी व पोट व्यापाऱ्यांकडे अडकून पडले आहेत. पैसे कसे मिळतील यासाठी अद्रक विकलेल्या शेतकऱ्यांचा आटापिटा चालू आहे. तालुक्यातील कन्नड, बहीरगाव, हतनूर, कोळवाडी, कळंकी, अंधानेर भागात अद्रक खरेदीदार, खासगी पोटव्यापाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दरामध्ये स्पर्धा वाढल्याने नगदीसाठी वेगळे व उधारीवर वेगळे दर मिळत होते. गेल्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अद्रक विकली. परंतु, त्यापैकी सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांना पैशासाठी व्यापाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. व्यवहारात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सांगून काही व्यापारी संपत्ती विकून पैसे देत आहेत. परंतु, अनेक व्यापारी शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील एक हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हे पैसे मिळण्याची शक्यता कमीच आहे.

ठोक व्यापाऱ्यांकडून फसवणूक

दुसरीकडे ठोक व्यापाऱ्यांकडून भावाच्या बाबतीत मोठी अडवणूक झाल्याचे किरकोळ व्यापारी सांगत आहेत. खरेदीच्या वेळी एक भाव आणि ट्रक पाठवल्यानंतर वेगळा भाव यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सद्यस्थितीत तक्रार करावी तर कुणाकडे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकेकाळी भरभराटीचे दिवस पाहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत.

माझ्या दोन हेक्टरवरील एक लाख ९७ हजार रुपयांची अद्रक डिसेंबर महिन्यात नगदीच्या बोलीवर बहीरगाव येथील व्यापाऱ्यास दिली. त्याने मला चेक दिला. परंतु, तो दोन वेळेस बाउन्स झाला. परंतु दोनदा माझा चेक बाउन्स झाला आहे.
-आप्पाराव मगर, शेतकरी हतनूर

शेतकरी कन्नड येथील बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये अद्रक विकू शकतो. यामुळे संभाव्य फसवणूक टाळता येते. खासगी व्यापाऱ्यांकडून पैसे मिळत नसतील, तर त्यांनी कायदेशीर मार्गाने तक्रार दाखल करावी. शेतमाल विकताना काळजी घ्यावी.
-राजेंद्र मगर, सभापती, बाजार समिती

शेतकऱ्यांनी अद्रक व भाजीपाला विकताना व्यापाऱ्याविषयी माहिती घेवूनच नगदीने माल विकावा. फसवणुकीचे प्रकार वाढल्याने माल विकताना काळजी घ्यावी.
- किशोर सोनवणे, शेतकरी बहीरगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधार महिलांना एक वर्षाचे धान्य

$
0
0

म. टा. प्रातिनिधी, पडेगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दौलताबाद येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद लायकोद्दीन यांनी ५१ निराधार विधवांना एक वर्ष मोफत धान्य देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार त्यांनी महिलांना नुकतेच कार्ड वितरण केले.
दौलताबाद येथे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर सय्यद लायकोद्दीन यांनी प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन खारीचा वाटा म्हणून निराधार विधवा महिलांना एक वर्ष मोफत धान्य देण्याचा संकल्प केला. यावेळी सरपंच सय्यद हारुन, माजी सरपंच संजय कांजुणे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सय्यद जिलानी मामू, ग्रामसेवक पी. एस. पाटील, उपसरपंच गुलाबराव बळी, शेख लालाभाई, डी. के. पैठणे, सय्यद शेरू, रहीम भाई, विलास गायकवाड, सुभाष त्रिभुवन, कारभारी गायकवाड, ललिताबाई दिवेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग; शिक्षकास कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या २८ वर्षीय शिक्षकास शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी मंगळवारी दिले.
सिल्लोड शहरातील १६ वर्षीय मुलगी पाच, सहा महिन्यांपूर्वी मामे बहिणीसोबत पायी शाळेत जाताना पाठलाग करत संशयित आरोपी शिक्षक इफ्तेखार आलम गुलाम रसुल देशमुख (वय २८, रा. अंबादास प्रसाद नगर, सिल्लोड, जि. औरंगाबाद) हा पाठीमागून दुचाकीवरून आला आणि अंगावर चिठ्ठी फेकून ती उचल म्हणत पुढे निघून गेला. काही दिवासानंतर पुन्हा तो तीन मित्रांसोबत कारमधून आला आणि टोमणे मारत पुन्हा अंगावर चिठ्ठी फेकून निघून गेला. २४ एप्रिल रोजी संबंधित मुलगी भाजी आणण्यासाठी जात असताना तो पुन्हा आला आणि टोमणे मारत व हात ओढत जबरदस्तीने तिला कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न करत होता. तिने त्याच्या हाताला झटका देऊन सुटका करून घेतली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबाला दिली. तिच्या तक्रारीवरून शिक्षक इफ्तेखार आलम विरोधात कलम ३५४, ३५४ (अ), (१), ३५४(ड), (१), ३४ सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. शेख यांनी तपास करून इफ्तेखार आलम यास सोमवारी रात्री अटक करून मंगळवारी कोर्टात हजर केले. शिक्षकाने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चार चाकी जप्त करावयाची आहे, साथीदारांचा शोध घ्यावयाचा असल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात विनंती सहायक लोकअभियोक्ता के. एन. पवार खंडाळकर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूईगळसह सहाजणांची जेलमध्ये रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या भारिप बहुजन महासंघाच्या अमित भुईगळसह सहाजणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी बुधवारी दिले.
राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर १७ एप्रिल रोजी हल्ला करणारे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक अमित भुईगळ, श्रीरंग ससाणे, दिनेश साळवे, संदीप वाघमारे, प्रदीप इंगळे, गौतम गवळी यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणे बाकी आहे, तसेच अनेकांची नावे निष्पन्न करावयाची असून आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देत आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक व्ही. एच. हाश्मी व विशेष सरकारी वकील राजेंद्र मुगदिया यांनी कोर्टात केली. तर, बचाव पक्षाच्या वतीने भूईगळसह सहाजण मागच्या ९ दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना पोलिस कोठडीची गरज नाही, पोलिस अन्य आरोपींची नावे निष्पन्न करू शकतात, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर कोर्टाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकान फोडले; तीन परप्रांतीय अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
निराला बाजार परिसरातील मोबाइलचे दुकान फोडून १५ लाखांचे मोबाइल चोरणाऱ्या तिघा परप्रांतिय आरोपींना पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केले असता, मंगळवारपर्यंत (२ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. तोष्णीवाल यांनी दिले.
या प्रकरणी योगेश रमेशलाल गोकलानी (रा. सिंधी कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे निराला बाजार येथे मोबाइलचे दुकान आहे. १४ एप्रिल रोजी फिर्यादी रात्री दुकान बंद करून गेला असता, आरोपींनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील १५ लाख ८ हजार ३११ रुपये किंमतीचे १०४ मोबाइल चोरुन नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी बिहारमधील समीर शहा मुस्तफा देवान, मिन्युकुमार देविकांत ठाकूर व अब्दुल कदीर इस्लाम देवान यांना बुधवारी अटक केली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, तिघांच्या ताब्यातून दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून, उर्वरित तब्बल १०२ मोबाइल जप्त करावयाचे आहेत, त्यांचे अन्य कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील अ‍ॅड. बी. एन. कदम यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने तिघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर खरेदीसाठी हायकोर्टात याचिका

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

मराठवाड्यात लाखो क्विंटल तूर शिल्लक असतानाही केंद्र सरकारने २२ एप्रिल रोजी पूर्वीच्या निर्णयानुसार राज्यातली सर्व खरेदी केंद्रे बंद केली आहेत. शेतकऱ्यांची तूर हमी भावाने खरेदी करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे.

अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी ही जनहित याचिका केली आहे. २२ एप्रिलपर्यंत रांगेत असलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा निर्णय तूर उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा आहे. आजही सर्वच खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा आहेत. २०१६-१७ या हंगामात तुरीसाठी साडेपाच हजार रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करून केंद्र सरकारने नाफेड आणि अन्य संस्थांच्यामार्फत तूर खरेदी केली जाईल, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात मात्र तुरीची खरेदी केंद्रे महिनाभर उशिरा सुरू झाली. त्यामुळे बाजार समित्यात तूर नेेलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात म्हणजे ३५०० ते ४०० रुपये क्विंटलने तुरीची खाजगी व्यापाऱ्यांना विक्रीही केली होती.

याचिकेनुसार, तूर खरेदीसाठी यंदा नाफेडवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. तूर खरेदीसाठी ९२ दिवस देण्यात आले, पण १७ दिवस शासकीय सुट्यात गेले, तर २५ दिवस बारदाना नसल्याने तूर खरेदी करण्यात आली नाही. एकच ग्रेडर असल्याने खरेदीची गती अत्यंत कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर तूर पडून आहे. शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. याचिकाकर्त्याची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे हे मांडत आहेत.

तुरीची मराठवाड्यातील स्थिती

जिल्हा.........आतापर्यंत खरेदी.....शिल्लक
औरंगाबाद..........६२९११...............६००००
बीड...................२७५०००.............१५०००
जालना..............१४४५६०..............५००००
परभणी..............१५०४६३.............४००००
नांदेड.................११२२९१.............१३५००
लातूर.................२४९०००.............६१०००
उस्मानाबाद.........२७१०००.............१०००००
हिंगोली...............२८०००...............२८०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडित महिलेवर दुसऱ्यांदा बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बलात्काराचा दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी विवाहितेचे अपहरण करीत तिला दोन महिने डांबून ठेवून पुन्हा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. गारखेडा परिसरात हा प्रकार घडला असून पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली. या महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध दुसरा बलात्काराचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या पलीकडे ही पीडित महिला पती, दोन मुले, आई व आजी सोबत राहते. या महिलेवर १६ एप्रिल २०१६ रोजी या भागातील प्रकाश नरवडे याने बलात्कार केला होता. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र पाठवले होते. ही केस लवकरच सुनावणीला येणार असून तिचा कोर्टात जबाब होणार होता. ही महिला २६ फेब्रुवारी रोजी कॅनाट परिसरात सामाजिक संघटनेच्या बैठकीसाठी गेली होती. या महिलेच्या मानलेल्या भावाने तिला बाहेर बोलावले. या महिलेला त्याने एका हॉटेलमध्ये नेले. या ठिकाणी प्रकाश मधुकर नरवडे (रा. संतोषीमातानगर, मुकुंदवाडी) हा बसलेला होता. या महिलेला तू बलात्काराचा गुन्हा मागे का घेत नाहीस, असे म्हणत तिचे अपहरण केले. गारखेडा भागातील एका घरात तिला कोंडून ठेवण्यात आले. पती, मुलगा व आजीला मारून टाकण्याची धमकी देत त्याने या महिलेचे वारंवार लैंगिक शोषण केले. हा प्रकार पीडित महिलेच्या आईने नागरिकांच्या कानावर टाकला. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त माणिक बाखरे यांनी तातडीने मुकुंदवाडी पोलिसांना या महिलेची सुटका करण्याचे आदेश दिले. या महिलेच्या जबाबावरून नरवडे विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीकक सुषमा पवार या तपास करीत आहेत.

पहिले प्रकरण कोर्टात

या महिलेवर १६ एप्रिल २०१६ रोजी प्रकाश नरवडे याने बलात्कार केल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी कोर्टात दोषारोपपत्र पाठवले आहे. ही केस लवकरच सुनावणीला येणार असून तिचा कोर्टात जबाब होणार आहे. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा परत घेण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी अपहरण करून नरवडेने पुन्हा बलात्कार गेल्याचा आरोप आहे. त्यावरून बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारंपारिक लेंगी नृत्याने घातली साद

$
0
0

पारंपारिक लेंगी नृत्याने घातली साद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पारंपारिक वेशभूषा व समुहातील पारंपारिक लेंगी नृत्य पाहताना पाय कधी थिरकतात याचा पत्ताच लागत नाही. बंजारा बोलीतील गाणी तसे थेट समजणे अवघड असले तरी नृत्यातून नेमका संदेश देणारे बंजारा समाजबांधव मोठया उत्साहात पाहणाऱ्याला एकरूप करतात. म्हणूनच लेंगी नृत्य पाहणे खूप गमतीशीर ठरते.
संपूर्ण देशात विखुरलेल्या भटक्या बंजारा बांधवांच्या या देखण्या पद्धतीला पाहण्याची संधी मंगळवारी मिळाली. बंजारा क्रांती सेनेतर्फे तापडिया नाट्य मंदिरामध्ये लेंगी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये संपूर्ण राज्यातून स्पर्धकांनी हजेरी लावून लेंगी नृत्य सादर केले. क्रांती चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळयास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ. अष्टपुत्रे, बाबुराव पवार, बंजारा क्रांती सेनेचे अध्यक्ष गोरखनाथ राठोड उपस्थित होते. क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडीमार्गे तापडिया नाट्य मंदिर अशा मिरवणुकीदरम्यान स्पर्धकांनी लेंगी नृत्य सादर केले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासह यवतमाळ, बीड, बुलढाणा, जळगाव या​ जिल्ह्यांमधूनही स्पर्धक आली होती. यावेळी बाबुराव पवार, श्रीचंद पवार, डॉ. कुलकर्णी, डॉ. दुनाखे, गोपी जाधव, हिरालाल राठोडख, रमेश गायकवाड, किशन राठोड, देव राठोड उपस्थित होते. प्रत्येक बंजारा तांड्यांवर होळीच्या १५ दिवस आधी लेंगीचा सूर ऐकायला येतो. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला होळीच्या दिवशी सुरुवात होते. या दिवशी गावातील नायकाच्या घरासमोर पुरुष मंडळी जमा होऊन गाणे गात नृत्य सादर करतात. होळीमध्ये लेंगी गीत, नृत्य, डफलीचा ताल धरला जातो. लेंगी गीतामध्ये होळीचे वर्णन असते. या गीतावर स्त्री-पुरुष गोलाकार नाचतात. बंजारा समाजाच्या सर्व लोकांनी एकत्र यावं या उद्देशानं लेंगी महोत्सव साजरा करून समाज प्रबोधन केले जाते. आकर्षक बंजारा वेशभुषेत बंजारा गाण्यावर स्पर्धकांनी ताल धरला तेव्हा उपस्थित मंडळीही थिरकत होती. विशेषत: महिलांचा उत्साह दांडगा होता. यावेळी समाजातील पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. उन्मेष टाकळकर, लहुजी साळवे केंद्राचे डॉ. दिवाकर कुलकर्णी आदींचाही विशेष गौरव करण्यात आला.
स्पर्धेतील विजेते -
रहाळपट्टी तांडा, औरंगाबाद, लाखी, ता. पुसद, बुलढाणा, जामरी, ता. कन्नड यांना ढाल देण्यात आली. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक काढण्यात आले.

गेल्या १७ वर्षांपासून आम्ही प्रत्येक वर्षी या उपक्रमाचे आयोजन करतो. हा एक व्रिकम असून सर्वसामान्यांना बंजारा संस्कृती जवळून पाहण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली आहे.
गोरखनाथ राठोड, बंजारा क्रांती सेना अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images