Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

यशस्वी यादव औरंगाबादचे आयुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी सकाळी गृह विभागाने केल्या. त्यामध्ये मराठवाड्यातील १९ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार, ग्रामीण पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, विशेष महानिरीक्षक अजित पाटील, उपायुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप आटोळे यांचा या बदल्यामध्ये समावेश आहे. यशस्वी यादव यांची औरंगाबादच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
औरंगाबादचे आयुक्त अमितेशकुमार यांची मुंबईत वाहतूक सहआयुक्त पदावर बदली झाली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांची पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी, पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची मुंबईत उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
विभागातील बदल्या करण्यात आलेल्या अन्य अधिकाऱ्यांचे मध्याचे नेमणुकीचे ठिकाण व बदली झाल्याचे ठिकाण पुढीलप्रमाणे; वसंत परदेशी उपायुक्त औरंगाबाद ते उपायुक्त ठाणे शहर, संदीप आटोळे उपायुक्त औरंगाबाद ते अप्पर पोलिस अधीक्षक गोंदिया, ‌दीक्षितकुमार अशोक गेडाम अप्पर पोलिस अधीक्षक अंबेजोगाई ते पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग, राहुल माकणीकर अप्पर पोलिस अधीक्षक जालना ते उपायुक्त नागपुर शहर, दीपाली घाटे अप्पर पोलिस अधीक्षक उस्मानाबाद ते उपायुक्त औरंगाबाद शहर, विनायक ढाकणे पोलिस अधीक्षक नागरी हक्क सरंक्षण विभाग ते उपायुक्त औरंगाबाद शहर, बच्चन सिंह सहायक पोलिस अधीक्षक पैठण ते अप्पर पोलिस अधीक्षक जळगाव, डॉ. हरीबालाजी एन. सहायक पोलिस अधीक्षक माजलगाव ते अप्पर पोलिस अधीक्षक गडचिरोली, महेंद पंडित सहायक पोलिस अधीक्षक नांदेड ते अप्पर पोलिस अधीक्षक गडचिरोली, संदीप डोईफोडे अप्पर पोलिस अधीक्षक नांदेड ते अप्पर पोलिस अधीक्षक बुलडाणा, राजतिलक रोशन सहायक पोलिस अधीक्षक तुळजापूर ते अप्पर पोलिस अधीक्षक वसई, लता फड अप्पर पोलिस अधीक्षक लातूर ते अप्पर पोलिस अधिक्षक जालना.

चार जिल्ह्यांचे अधीक्षक बदलले
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांबरोबच जालना, नांदेड, परभणी व हिंगोली येथील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परभणीचे अधीक्षक नियती ठाकर यांची चंद्रपूर येथे अधीक्षकपदी बदली करण्यात आली. नांदेडचे अधीक्षक संजय येनापुरे यांची मुंबईत उपायुक्तपदी, जालन्याच्या अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांची पुण्यात उपायुक्तपदी व हिंगोलीचे अधीक्षक अशोक मोराळे यांची पुण्यात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फुलंब्रीत तालुकयात ५२ शेततळे पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
गेल्या काही वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी विभागाच्या जनजागृतीनंतर तालुक्यात ५२ शेततळे पूर्ण झाले असून ४६ शेततळ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
गेल्यावर्षी दुष्काळ निवारणासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली. निकष व जाचक अटींमुळे योजनेला सुरुवातीच्या काळात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कृषी विभागाने जनजागृती करून तालुक्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात तालुक्यात एक दोन शेतकऱ्यांनीच शेततळ्याचे काम हाती घेतले होते. अडचणी लक्षात घेऊन काही जाचक अटी रद्द केल्या आहेत. शासनाच्या पोर्टलवरच थेट शेतकऱ्यालाच शेततळे मागणी करता येणार आहे. शिवाय २३ हजारापासून ते ५० हजारापर्यंत अनुदान मिळणार आहे.
तालुक्यात ४१३ शेततळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी मार्कआउट तयार असल्याचे तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर यांनी सांगितले. याशिवाय समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत ११ कलमी कार्यक्रम सुरू आहे. यातून कृषी विभागामार्फत भूसंजीवनी युनिट, गांडुळ खत युनिट, फळबाग लागवड, अमृत कुंड शेततळे योजना सुरू आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी घनबहादूर यांनी केले आहे.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमुळे जलसंधारणास मदत होणार आहे. तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना सहकार्य केले जात आहे. शेततळ्याप्रमाणे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण ११ कलमी कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.
- शिरीष घनबहादूर प्रभारी तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्करी जवानाचा तरुणीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फर्दापूर
लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षांच्या तरुणीवर लष्करी जवानाने बलात्कार केल्याचा गुन्हा फर्दापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा पीडित तरुणाचा मामेभाऊ आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील रहिवासी विनोद सयाजी जगताप हा लष्करात कार्यरत असून सुटीवर घरी आला असताना वाकोद (ता. जामनेर) येथील २५ वर्षीय तरुणीसोबत १३ एप्रिल रोजी फर्दापूर शिवारातील बुद्ध मूर्तीकडे फिरण्यासाठी गेला होता. यावेळी लग्नाचे आमिष दाखवून लात्कार केला. यापूर्वीही त्याने तिच्यावर याच भागात एका बांधकाम सुरू असलेल्या खोलीत बलात्कार केला. तो हे कृत्य ऑगस्ट २०१४ पासून करत असल्याचे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. या तरुणीने पोलिस ठाण्यात गुरुवारी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विनोद सयाजी जगताप याच्यालविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक निमिश मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार धनवट, पोकाॅ राजू काकडे, पोकाॅ सावळे, पोकाॅ सरताळे हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी पिस्तुलासह तीनजण अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गावठी पिस्तुल व काडतूस बाळगणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. ही कारवाई पंढरपूर येथील ओयासिस चौकात करण्यात आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर येथील ओयासिस चौकात तीन जण गावठी पिस्तुल व काडतूस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून सापळा रचण्यात आला. खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता एकाच्या कंबरेला पाठीमागून खोसलेले गावठी पिस्तुल, दुसऱ्याकडे दोन जिवंत काडतूस सापडले. संशयित आरोपी संदीप बाळू रावते (वय २१), दिलीप रामा पितळे (वय ३७) व शेख अजम शेख अकबर (वय ४२ तिघेही रा. रांजणगाव) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल रोडे, राजेंद्र बांगर, जमादार सोनवणे, लालखा पठाण, नंदू चव्हाण, योगेश गुप्ता, सुनेश कुसाळे, सिद्धार्थ थोरात, धर्मराज गायकवाड यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनेक काँग्रेस नेते भाजपमध्ये वेटिंगवर

$
0
0

औरंगाबाद : काँग्रेस पक्षात काहीही राम राहिलेला नाही, हे लक्षात आल्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते भारतीय जनता पक्षात येण्यास उत्सुक आहेत. त्यांची लाइन लागली आहे. त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे, असा दावा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
ते एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. महापौर बंगल्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘दिल्ली महापालिका निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे दोन बडे नेते भाजपमध्ये आले. त्या अगोदर पंजाबमध्ये देखील काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपमध्ये आपले भवितव्य घडेल, असे वाटत आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वस्तरातील नागरिक भाजपला स्वीकारत आहेत.’
दिल्ली व उत्तराखंड या दोन राज्यांचे प्रभारी म्हणून जाजू यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी झालेल्या निवडणुकीत पक्षाला लक्षणीय यश मिळाले. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास निर्माण केला, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या १४० विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली.
दोन-तीन अपवाद वगळता सर्व उमेदवार विजयी झाले. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयोग जनतेने स्वीकारला, असे ते म्हणाले. यावेळी महापौर भगवान घडमोडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, गजानन बारवाल, प्रशांत देसरडा, सुरेंद्र कुलकर्णी, राम बुधवंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गवळी समाजाचा विवाह सोहळा उत्साहात

$
0
0

म. टा. प्र‌ति‌निधी, औरंगाबाद
अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर नंदवंशी अहीर गवळी समाजाचा ११ वा सामूहिक विवाह सोहळा शुक्रवारी रात्री आठ वाजता औरंगपुरा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणावर पार पडला. या सोहळ्यात १९ जोडपे विवाहबद्ध झाले.
लग्नात विनाकारण होणाऱ्या अफाट खर्चाला फाटा देऊन कमीत-कमी खर्चात सर्वांच्या सहकार्याने एकाच वेळी समाजातील उपवर युवक-युवतींचे विवाह लावून देण्याचा हा उद्देश होता. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अहीर गवळी समाजाच्या प्रमुख चौधरींच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाध्यक्ष सुंदरलाल गुरखुद्दे व संयोजक समितींसह समाज बांधव परिश्रम घेत आहेत. सामूहिक विवाह संमेलनापूर्वी संध्याकाळी चार वाजता जिल्हा परिषद मैदानवरून वरात काढण्यात अाली. ही वरात औरंगपुरा, गुलमंडी, दिवाणदेवडी, चौराहा, संस्थान गणपती, शहागंज, सिटीचौक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे पुन्हा जिल्हा परिषद मैदानावर अाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूपीआय घोटाळा; १५ वा आरोपी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकूण ६ कोटी ७ लाख रुपयांच्या यूपीआय अ‍ॅप घोटाळ्यामध्ये साडेतीन कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा करणाऱ्या १५व्या संशयित आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, ५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाले यांनी दिले. या घोटाळ्यात आतापर्यंत ७३ लाख ९५ हजार ६३० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या विभागीय कार्यालयाचे सहव्यवस्थापक रवींद्र सोनजे यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, बँकेतील सुमारे ८४ खातेधारकांनी यूपीआय अ‍ॅपचा वापर करुन १६ शाखांमध्ये बँकेची ६ कोटी ७ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेश निर्मल बिसवास, किशोर कृष्णराव देशमुख, गोपाल गोविंद वानखेडे, ज्ञानेश घनश्याम भावसार, विजय गोवर्धन जाधव, किरण अण्णासाहेब गावडे, आनंद मदनलाल लाहोटी, विजय बबनराव गायकवाड, बबनराव नामदेव गायकवाड, संदीप अशोक मुळे, पृथ्वीराज किसन कदम यांना यापूर्वीच अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे, तर विनोद धनराज पाटील (३६, रा. गजाननवाडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, ह. मु. गारखेडा परिसर, औरंगाबाद), दीपक सर्जेराव खराट (२६, रा. सिंदखेड राजा रोड, जि. बुलडाणा) व जितेंद्र मारुती रिंढे (४२, रा. सेलसूर, ता. चिखली, जि. बुलडाणा) यांना शनिवारपर्यंत (२९ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणातील १५वा संशयित आरोपी राजेश जनार्धन बुडुखले उर्फ राजेश सोनी (रा. निमगाव, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) याला गुरुवारी अटक करण्यात आली. सहाय्यक सरकारी वकील नितीन ताडेवाड यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

अडीच कोटीची वसुली बाकी
संशयित आरोपी राजेश बुडुखले याने त्याचे इतर साथीदार व संशयित आरोपी संदीप मुळे, जितेंद्र रिंढे यांना हाताशी धरून तब्बल ३ कोटी ६३ लाख ८ हजार २०८ रुपयांची बँकेची फसवणूक केली आहे. त्यातील ५१ लाख रुपयांचे बिट कॉइन (जागतिक पातळीवरील डिजिटल करन्सी) खरेदी केल्याची कबुली त्याने पुणे येथे अटकेत असताना दिली. पुणे सायबर सेल विभागाने त्याच्याकडून ५१ लाख ६५ हजार ६६१ रुपये जप्त केले असून, आणखी २ कोटी ६५ लाख ६६ हजार ३ रुपये जप्त करणे बाकी असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय परशूराम’च्या जयघोषाने शहर दुमदुमले

$
0
0

औरंगाबाद : ‘जय परशूराम, जय परशूराम’चा जयघोष, सजीव देखावे आणि वाद्यवृंदासह निघालेल्या मिरवणुकीने शहरवासीयांच्या डोळ्याचे पारणे फेडले. भगवान परशूराम यांच्या जयंतीनिमित्त २६ संघटनाची शिखर संघटना असलेल्या ब्राह्मण समाज समन्वय सम‌ितीतर्फेही मिरवणुक शुक्रवारी काढण्यात आली.
संध्याकाळी पाच वाजता संस्थान गणपती, राजाबाजार येथे करवीर पीठाचे जगदगुरू शंकराचार्य विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत ५०० जणांची तीन ढोलपथके सामील झाले होते. लाठी काठी, तलवारबाजी आणि अन्य कवायती सादर करण्यात आल्या. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता भगवान परशुराम स्तभांचे पूजन शंकाराचार्य, माई महाराज, जगदगुरू आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज, हभप योगीराज महाराज पैठणकर यांच्या उपस्थितीत झाला. सकाळी दहा वाजता भगवान परशूराम चौकापासून दुचाकी वाहन फेरी काढण्यात आली. ब्राह्मण समाज समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर, अनिल खंडाळकर, सुरेश देशपांडे, मिलिंद दामोदरे, आनंद तांदुळवाडीकर, मंगेश पळसकर, धनंजय पांडे, संजय मांडे, प्रमोद झाल्टे, आशिष सुरडकर, परिमल मराठे, विजया कुलकर्णी, वनिता पत्की, विजय मिश्रा, माणिक रत्नपारखी, पंकज पाठक, अतुल जोशी, सुषमा पाठक, यज्ञेश कुलकर्णी, लक्ष्मीकांत जयपूरकर, विनोद मांडे, सचिन अवस्थी, जितेंद्र राहुरीकर, दीपक खळेगावकर, सचिन वाढे पाटील, सुभाष बिंदू, शरद बावस्कर, विजेंद्र जोशी, रोहित देशपांडे, विनिता हर्सूलकर, मीना झाल्टे, गीता आचार्य, अनुराधा पुराणिक, अंजली गोरे, मीनाक्षी देशपांडे, विजया विध्वंस आदींची परिश्रम घेतले.

ढोल पथकांनी वेधले लक्ष
संपूर्ण परिसर दणाणून सोडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण ढोल पथकांनी मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या संख्येने तरुण व तेवढ्याच संख्येने तरुणी व महिलांचा मिरवणुकीत सहभाग होता. पावली, लेझीम व ढोल पथकांतील तरुणींचा सहभाग हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. मुला-मुलींसह ज्येष्ठ मंडळींचा सहभागही खास उल्लेखनीय ठरला. राजाबाजार परिसरातील संस्थान गणपती येथे अनेक ढोल पथके, तरुणाई, महिलांसह समस्त ब्रह्मवृंद सज्ज होता व वेगवेगळ्या ढोल पथकांचा निनाद आधीच सुरू झाला होता.

२६ संघटनांचा सहभाग
या मिरवणुकीत सर्वच ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, समाजबांधव सामील झाले होते. संस्थान गणपतीची आरती झाली आणि मिरवणुकीला सुरुवात होण्याआधीच विविध ढोलपथकांच्या घणाघाती व तितक्याच वैविध्यपूर्ण निनादाने क्षणार्धात परिसर व्यापून टाकला. परशूरामाची चित्रे असलेले झेंडे-पताकाही ठेक्यावर फडकावित, प्रचंड उत्साहातील शिस्तबद्ध तरुणाईचे ढोल सादरीकरण पूर्णपणे लक्ष वेधून घेणारे होते. फेटे, कुडते, रुद्राक्षाच्या माळा परिधान केलेले तरुण, तर नथ, नऊवारी, फेट्यातील तरुणी-महिलांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आधार कार्डमुळे फुटली खुनाला वाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
म्हैसमाळ येथे २४ एप्रिलला सापडलेल्या मानवी कवटी व हाडाचे गूढ आधार कार्डामुळे उकलले आहे. शेख नूर शब्बीर (रा. सायगाव ता. येवला), असे त्याचे नाव आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्याने त्याची पत्नी बिस्मिल्ला बी शेख नूर हिने प्रियकराच्या मदतीने विळ्याने वार करून खून केल्याची केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी पत्नीसह प्रियकर मोहमंद वसीम सलीम अन्सारी (रा. टाकली लिप्टा ता. कोपरगाव जि. अहमदनगर) याला अटक केली आहे.
खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील गट नंबर २२ मध्ये सांगाडा २४ एप्रिल रोजी सापडला होता. कवटी व हाडे, केस, काळ्या रंगाची पँट, टी शर्ट, एक स्लीपर चप्पल, खिशातील पाकीट सापडले. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास केला. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू व पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार बेंद्रे यांनी तपास करून गूढ उकलले आहे. बेंद्रे यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. शेख नूर याच्या खिशात सापडलेल्या पाकिटात आधार कार्ड होते. त्यावरील माहितीवरून पोलिसांनी येवला पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता शेख नूर हा ९ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून खुलताबाद पोलिसांनी शेख नूर याचे वडील, भाऊ व नातेवाईकांना खुलताबाद येथे बोलावले. आधार कार्ड, कपडे, चप्पल, कागदपत्रे यावरून शेख नूर असल्याची खात्री झाली.

९ एप्रिल रोजी खून
मृत शेर नूर यांची पत्नी बिस्मिल्ला बी हिचे मोहंमद वसिम यांच्याशी अनैतिक संबंध होते, त्या दोघांनी घातपात केला असवा, असा संशय नूरचे वडील शेख शब्बीर यांनी खुलताबाद पोलिसांजवळ व्यक्त केला. पोलिसांनी तपास केला असता मोहंमद वसिमने याने नूर याला ९ एप्रिल रोजी जलाल पिंपळगाव शिवारातील घरून मोटारसायकलवर बसवून म्हैसमाळ येथे आणले व येथे खून केल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक व्ही .जी. जाधव यांच्या पथकाने बिस्मिल्ला बी हिचा जबाब नोंदविला असता तिने प्रियकर मोहंमद वसिम यांच्या मदतीने शेख नूरला मोटारसायकलवर बसवून म्हैसमाळ येथे विळ्याने वार करून खून केल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लासूरगावच्या यात्रेत व्यापाऱ्याला लूटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तीक्ष्ण हत्याराने वार करून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना तालुक्यातील लासूरगाव येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेत व्यापारी गंभीर जखमी झाला आहे.
कन्नड तालुक्यातील कानडगाव येथील रामदास अंबादास घरमोडे यांनी लासूरगाव येथील दाक्षायणी देवीच्या यात्रेत खेळणीचे दुकान लावले आहे. रात्री उशिरापर्यंत यात्रा सुरू राहते, ते रात्री दीड वाजेच्या सुमारास विधीसाठी नदीकिनारी गेले असता चोरट्यांनी हत्याराने मारहाण केली व त्यांच्याकडील रक्कम घेऊन पोबारा केला. गंभीर जखमी घरमोडे यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडील किती रक्कम लंपास केली हे मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नसून व्यापाऱ्यांतून भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे यात्रेतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत दुकाने बंद ठेवून लासूरगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. लासूरगाव येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात. यात्रेनिमित्त महिनाभर दुकाने सुरू राहतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीवनदायी’ महाराष्ट्र दिनापासून ‘महात्मा फुले’

$
0
0

औरंगाबादः राज्यातील गोरगरीब-अल्प उत्पन्नधारकांना मागच्या पाच वर्षांत पूर्णपणे निःशुल्क उपचार उपलब्ध करून देणाऱ्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ महाराष्ट्र दिनापासून ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ होणार आहे. याबाबचा दीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारचे आदेश नुकतेच प्राप्त झाले. नव्या योजनेमध्ये वाढीव उपचारांचा समावेश करण्यात येणार असून, उपचारांचे पॅकेज वाढवण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येईल व अंमलबजावणी एक जुलैपासून होईल, असे मानले जाते.

कॅन्सर, हृदयविकार आदी मोजक्याच उपचार-शस्त्रक्रियांसाठी असलेल्या पूर्वीच्या जीवनदायी योजनेत आमूलाग्र बदल करून ९७१ प्रकारच्या उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रियांचा समावेश ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’मध्ये करण्यात आला व त्याची अंमलबजावणी २०१२पासून राज्यात झाली. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णाला नामांकित खासगी रुग्णालयात पूर्णपणे निःशुल्क उपचार उपलब्ध झाले. एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना, केशरी, पिवळे रेशन कार्डधारकांना ही योजना लागू करण्यात आली होती. दुष्काळाचा विचार करून मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनादेखील योजना सरसकट लागू करण्यात आली. सात-बारा दाखवा आणि उपचार घ्या, असे त्याचे स्वरूप आहे, मात्र उपचारांचे पॅकेज कमी असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे योजनेची व्याप्ती वाढवण्याची मागणी होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मागेच ‘राजीव गांधी योजने’चे नाव सुधारणांसह ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ करण्याचे जाहीर केले होते. १३ एप्रिल रोजी योजनेच्या नामांतराचा शासन आदेश काढण्यात आला; परंतु एक एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७पर्यंत योजनेतील विमा कंपन्यांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

विमा कवच दोन लाखांपर्यंत

‘राजीव गांधी’मध्ये संपूर्ण कुटुंबाला एका वर्षासाठी दीड लाखांपर्यंतचे विमा कवच होते. नव्या योजनेत कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे विमा कवच मिळणार आहे; तसेच नी-रिप्लेसमेंट, हिप-रिप्लेसमेंटचा समावेश नव्याने असेल व बहुतांश उपचारांचे पॅकेज वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सद्यस्थितीत योजनेमध्ये ‘किडनी ट्रान्स्प्लान्ट’चे पॅकेज अडीच लाखांचे असून, ते नव्या योजनेत तीन लाखांपर्यंत होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२७५ कोटींचे बंपर बजेट

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या १२७५ कोटी ५३ लाख रुपयांच्या बंपर बजेटला शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात १६५ कोटी रुपयांची वाढ करून महापौरांनी अर्थसंकल्प मंजूर केला.
स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले यांनी शनिवारी सर्वसाधारण सभेला अर्थसंकल्प सादर केला. पालिका प्रशासनाने स्थायीला १०४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मेघावाले यांनी त्यात १६० कोटी रुपयांची वाढ करून १११० कोटी ५३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला. हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर केल्यावर त्यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले. सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने गजानन बारवाल, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, भाऊसाहेब जगताप, त्र्यंबक तुपे, कीर्ती शिंदे, अब्दुल नाईकवाडी, सायली जमादार, गजानन मनगटे, अय्युब जहागीरदार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर महापौर भगवान घडमोडे यांनी अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देताना १४ लाख रुपये शिलकीचा १२७५ कोटी ५३ लाख रुपये जमा व १२७५ कोटी ३९ लाख रुपये खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर केला. स्थायीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात १६५ कोटींची वाढ करताना महापौरांनी विविध कर वसुलीच्या उद्दिष्टांमध्ये वाढ केली. स्थानिक संस्था कराच्या वसुलीचे उद्दिष्ट ३०० कोटीवरून ३२५ कोटी, मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ३०० कोटींवरून ३७५ कोटी, नगररचना विभागाचे उद्दिष्ट १२५ कोटींवरून १५० कोटी, शासन अनुदान ९६ कोटींऐवजी १०६ कोटी मिळवण्याचे प्रशासनाला ठरवून दिले. पाणीपट्टीची वसुली १२७ कोटींऐवजी १४७ कोटी रुपये करा असे आदेश त्यांनी दिले. जो पर्यंत महापालिकेच्या उत्पन्नात वाढत नाही, तोपर्यंत विकासाची कामे होणार नाहीत, असे सांगताना उद्दिष्टानुसार कर वसुली करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

अर्थसंकल्पातील ठळक
१) पैठण, जालना, अजिंठा, वेरूळकडून शहरात येणाऱ्या रस्त्यांवर प्रवेशव्दार उभारणे - ५ कोटी
२) खेळाडू दत्तक योजना - १ कोटी रुपये
३) गरवारे जलतरण तलाव - ३ कोटी रुपये
४) गरवारे स्टेडियम येथे व्यायामशाळा, इनडोअर क्रिकेट हॉस उभारणे - १.२५ कोटी
५) महिलांसाठी विविध ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट उभारणे - २ कोटी
६) महात्मा बसवेश्वर व संत गाडगे महाराज यांचा पुतळा उभारणे - १.२५ कोटी
७) महापालिकेच्या खुल्या जागांना संरक्षित भिंत बांधणे - १० कोटी
८) कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारणे - २० कोटी
९) विविध ठिकाणी उद्यानांमध्ये ओपन जिम उभारणे - ५ कोटी
१०) वारकरी भवन उभारणे - २ कोटी
११) विहिरींमधील गाळ काढून आर.ओ. प्लांट उभारणे - ५ कोटी
१२) सातारा देवळाई भागात प्रशासकीय इमारत बांधणे - ५० लाख
१३) विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधणे - १० कोटी १४) एपीआय कॉर्नर जवळील स्मशानभूमी विकसीत करणे - १ कोटी
१५) विविध ठिकाणच्या कब्रस्तान, स्मशानभूमी विकसित करणे - ५ कोटी
१६) मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे - २ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांवर युतीचे वर्चस्व

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या पाच विषय समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती शनिवारी विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली. या समित्यांवर शिवसेना-भाजपचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले. विषय समितींच्या सदस्यांची निवड एक वर्षानंतर संपुष्टात येते. त्यामुळे नवीन सदस्य नियुक्त करण्यात आले. विषय समिती व त्यावर नियुक्त करण्यात आलेले सदस्य पुढील प्रमाणेः

महिला, बालकल्याण समिती
आशा भालेराव, सीमा चक्रनारायण, सीमा खरात (शिवसेना), कमल नरोटे, ज्योती नाडे ( भाजप), शेख समिना शेख इलियास, लता निकाळजे (एमआयएम), रेश्मा अश्फाक कुरेशी (काँग्रेस) आणि विमल कांबळे (शहर विकास आघाडी).

आरोग्य समिती
प्रेमलता दाभाडे, भारती सोनवणे, आत्माराम पवार (शिवसेना), सुरेखा खरात, जयश्री कुलकर्णी (भाजप), तसलिम बेगम अब्दुल रऊफ, खान फेरोज मोईनोद्दिन (एमआयएम), सायली जमादार (काँग्रेस), रमेश जायभाय (शहर विकास आघाडी).

शहर सुधार समिती
ज्योती अभंग, मनोज बल्लाळ, मनिषा लोखंडे ( शिवसेना), अप्पासाहेब हिवाळे, माधुरी देशमुख (भाजप), सायराबानो अजमलखान, विकास एडके (एमआयएम), शबनम बेगम कलीम कुरेशी (काँग्रेस), सत्यभामा शिंदे (शहर विकास आघाडी).

शिक्षण समिती
कमलाकर जगताप, रावसाहेब राधाकिशन आमले, आशा निकाळजे (शिवसेना), शोभा वळसे, नितीन चित्ते (भाजप), शेख जफर शेख अख्तर, खान इर्शाद इब्राहिम (एमआयएम), कलीमा बेगम खाजोद्दिन (काँग्रेस), शोभा बुरांडे (शहर विकास आघाडी).

समाजकल्याण समिती
खतिजा बेगम छोटू कुरेशी, सुभाष शेजवळ, नितीन साळवी (शिवसेना), बबीता चावरिया, विमल केंद्रे (भाजप), सलिमा बानो कुरेशी, शेख अब्दुल रहिम नायकवडी (एमआयएम), अनिता साळवे (काँग्रेस), कैलास गायकवाड (शहर विकास आघाडी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ क्रीडा विकासासाठी १२ कोटींची तरतूद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या अर्थ संकल्पात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी १२ कोटी २५ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. खेळाडू दत्तक योजना, गरवारे क्रीडा संकुलात जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम ही कामे यातून होणार आहेत.
गुणवान खेळाडूंसाठी महापालिकेने खेळाडू दत्तक योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी एक कोटीचा निधी देण्यात येणार आहे. गरवारे क्रीडा संकुलात जलतरण तलाव उभारण्यात येत आहे. तलावाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या तलावाच्या कामासाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. गरवारे क्रीडा संकुलात व्यायामशाळा व इनडोअर क्रिकेट हॉल उभारण्यासाठी एक कोटी २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. शहरात विविध भागांत महिलांसाठी बॅडमिंटन कोर्ट उभारण्यासाठी दोन कोटींचा निधी देण्यात येणार आहे. महिलांना खेळण्याची सुविधा निर्माण करण्याकरिता मनपाने प्रथमच अशा प्रकारे तरतूद केली आहे. फिटनेसविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने महापालिकेच्या शहरातील विविध उद्यानांमध्ये ओपन जिम ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटींच्या तरतुदीला मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील न्यायाधीशांच्या बदल्या

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या असून, यामध्ये शहरातील विविध न्यायाधीशांचा समावेश आहे.
न्यायाधीशांचे नाव, सध्याचे ठिकाण, बदलीचे ठिकाण असेः
एस. सी. सिरसाठ (बुलडाणा) - ग्राहक तक्रार निवारण आयोग (औरंगाबाद), एम. एन. पाटील (मुंबई) - औरंगाबाद, ए. सी. डागा न्यायाधीश (यवतमाळ) – (वैजापूर), श्रीमती एम. एस. काकडे (मुंबई) – औरंगाबाद, एस. डी. कुलकर्णी (नंदूरबार) – औरंगाबाद, व्ही. व्ही. पाटील (मुंबई) - जिल्हा न्यायालय (औरंगाबाद), एच. एस. महाजन (मुंबई) - जिल्हा न्यायालय (औरंगाबाद), श्रीमती एन. टी. घाडगे (रायगड) - जिल्हा न्यायालय (औरंगाबाद), श्रीमती सरीता आर पवार (पुणे) - सहकार न्यायालय (औरंगाबाद), एस. बी. गायधनी (कल्याण) – (वैजापूर), डी. एस. शिंदे (मुंबई) – (औरंगाबाद), एस. ए. मोरे (मुंबई) - कुटुंब न्यायालय (औरंगाबाद), श्रीमती एस. जी. रामगदीया (औरंगाबाद) - दिवाणी न्यायालय (मुंबई), एम. जी. चव्हाण (औरंगाबाद) - (खामगाव, बुलडाणा), श्रीमती वाय. के. मोरे (औरंगाबाद) – महानगर न्यायदंडाधिकारी (मुंबई), एस. जी. शेटे (औरंगाबाद) - शहर दिवाणी न्यायालय (मुंबई), व्ही. एस. पडाळकर (औरंगाबाद) - शहर दिवाणी न्यायालय (मुंबई), के. बी. इप्पार (वैजापूर) - मोटार अपघात न्यायाधिकरण (मुंबई), बी. पी. क्षीरसागर (औरंगाबाद) - (नागपूर), ए. एच. सय्यद (औरंगाबाद) – (धुळे), श्रीमती वैशाली बी कुलकर्णी (औरंगाबाद) - सहकार न्यायालय सदस्य (पुणे), आर. आर. काकाणी (औरंगाबाद) - कंधार (नांदेड).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झाडांचा जीव वाचवा!

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पैठण रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कत्तल केल्या जाणाऱ्या 200 झाडांचे जीव वाचवा, अशी आर्त साद घालत पर्यावरणवादी संघटनांनी शनिवारी मानवी साखळी करत आंदोलन केले.
औरंगाबाद-पैठण हा सर्वात वर्दळीचा रस्ता अरुंद असल्याने महानुभाव आश्रम चौक ते वाल्मीदरम्यान रुंदीकरण करण्याचे नियोजन संबंधित विभागाने हाती घेतले. मात्र, या कामात रस्त्यालगत असलेले सुमारे 200 जुने वृक्ष अडथळा ठरत असून ते हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे वृक्ष वाचविण्यासाठी विविध पर्यावरणवादी संघटना, वृक्षप्रेमींनी एकत्र येत आंदोलन केले.
रोडलगतची जुनी झाडे खऱ्या अर्थाने हेरिटेज वृक्ष असून त्यांची कत्तल करणे पर्यावरणासाठी घातक ठरेल. त्याऐवजी वृक्ष पुनर्रोपन करावे किंवा पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. झाडांची कत्तल थांबवा, पर्यायी रस्ता तयार करा, अशी घोषणाबाजी केली. निसर्ग मित्रमंडळाचे किशोर गठडी, पी. आर. पानसे, नागेश देशपांडे, कमल पहाडे, अतुल येवलेकर यांच्यासह प्रयास ग्रुप, जैन सोशल वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निर्देश पाळले नाहीत
‘याप्रश्नी विभागीय आयुक्ताकडे यापूर्वी झालेल्या बैठकीत त्यांनी ज्या ठिकाणी वृक्ष नाहीत, त्याठिकाणी रुंदीकरणासंदर्भातील कामे करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, असे असतानाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडांची कत्तल सुरू केली आहे,’ असा आरोप वुई फॉर एनव्हॉरमेंटच्या प्रीती शहा यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण रस्ता रुंदीकरणासंदर्भात बैठक

$
0
0


औरंगाबादः चार पदरी रस्ता असताना सहा पदरी असा उल्लेख वारंवार का होतो, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षाची कत्तल न करता पर्यायी मार्ग काढावा, वृक्ष पुनर्रोपन करावे अशा विविध सूचना मुद्दे पर्यावरणवादी, वृक्षप्रेमी व विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी पैठण रोड रुंदीकरणासंदर्भात आयोजित बैठकीत उपस्थित केले.
बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या या बैठकीत बांधकाम विभागाचे अभियंता अंकुश गायकवाड, महापालिकेचे अधिकारी विजय पाटील, एमआयटीचे प्रा. प्रशांत अवचरमल, देवगिरी इंजिनीअरिंगचे प्रा. डॉ. एस.डी. शिंदे, प्रा. प्रियानंद आगळे यांच्यासह वृक्षप्रेमी, पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित थोरात, अत्तदीप आगळे, तसेच किशोर पाठक आदी उपस्थित होते.
सध्या हा रस्ता १२ मीटर रुंदीचा आहे. तो चौपदरी १९ मीटर होईल. मात्र, असे असताना २७ मीटर रुंदीचा घाट का घातला जातो, असा सवाल काहीजणांनी उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले. तर महानुभव आश्रम ते पुलापर्यंत पूर्वीच्या दिशेने रुंदीकरणाऐवजी शेतकी शाळेच्या बाजूने रुंदीकरण केल्यास मोठ्या प्रमाणात झाडांचा बचाव होईल. पुलापासून पुढे पूर्वेच्या बाजूने रुंदीकरण करावे, अशी सूचनाही एका कार्यकर्त्याने मांडली. तर काहींनी रुंदीकरणासाठी पर्याय मार्ग पुन्हा एकदा तपासून पाहावे, झाडांची कत्तल होता कामा नये, वृक्ष पुनर्रोपन करावे अशा विविध सूचना, मत यावेळी मांडले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची नोंद करून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडे वाचविण्यासाठी जनहित याचिका

$
0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
रुंदीकरणासाठी पैठण रोडवर दुतर्फा दीडशे वर्षांपेक्षा जास्त जुनी जवळपास २०० झाडे आहेत. ती तोडण्याचे प्रस्तावित असल्याने या कत्तलीविरुद्ध इको नीड्स फाऊंडेशन या संस्थेने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते आणि तज्ज्ञ यांची बैठक घेऊन रस्ता रुंदीकरणासाठी इतर पर्यायी पद्धतीचा अवलंब करून झाडे वाचविण्याच्या शक्यतेबाबत चर्चा करून बुधवारपर्यंत पर्याय सुचविण्याचे तोंडी निर्देश खंडपीठाने प्रशासनाला दिले आहेत.
औरंगाबाद-पैठण रस्ता रुंदीकरणासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली वड, पिंपळ आणि इतर प्रकारची झाडे तोडण्याचे प्रस्तावित केलेले आहे. ही झाडे तोडण्यासाठी वृक्ष संवर्धन कायदा आणि ग्रीन हायवे पॉलिसी २००५मधील तरतुदींचे पालनही करण्यात आले नाही. रस्ता रुंदीकरणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्याची आवश्यकता नाही. झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठीही चुकीची पद्धती अवलंबिली जात असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
पर्यायी पद्धतीचा अवलंब करून कमीत कमी झाडे तोडून रस्ता रुंदीकरण होऊ शकते. ही झाडे न तोडता ती रस्त्याच्या ग्रीन बेल्टमध्ये संरक्षित करून त्याच्या दुसऱ्या बाजूने सर्व्हिस रोड पद्धतीचा अवलंब करून हे रुंदीकरण शक्य आहे. या झाडांच्या पुनर्रोपणासाठी वापरण्यात येत असलेली पद्धतीही चुकीची असून, ग्रीन हायवे पॉलिसीमध्ये झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी तीन महिने आधीपासून प्रक्रिया सुरू करण्यात यावी. तसेच झाडांचे पुनर्रोपण हिवाळ्यात करावे आणि रस्त्यापासून पाच किलोमीटरच्या आतील परिसरामध्ये झाडांचे पुनर्रोपणाची तरतूद करण्यात यावी, असे याचिकेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला सक्तमजुरी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अक्षर सुधारण्याचा बहाणा करून सातवीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास विशेष सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी ‘बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरीची आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.
छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत आरोपी पांडुरंग नारायण जाधव (रा. सोनोशी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) हा शिक्षक म्हणून नोकरी करतो. १६ ऑगस्ट २०१३ रोजी इयत्ता ७ वी मधील विद्यार्थिनी वर्गात एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिचे हस्ताक्षर वाईट आहे, ते सुधारू असे म्हणत तिचा हात धरून विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनीने शिक्षकाच्या हाताला झटका देऊन स्वत:ची सुटका करून घेतली व घरी जावून आई-वडिलांना घटना सांगीतली. पीडितेच्या वडील चौकशी करण्यासाठी शाळेत गेले असता ‘तो’ शिक्षक गायब होता. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ (फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार बी. जे. मंडलिक यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यांना पैरवी अधिकारी पोलिस जमादार बी. वाय. किरड पाटील यांनी सहकार्य केले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील एस. व्ही. मुंडवाडकर यांनी न्यायालयास विनंती केली की, आजकाल शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांना आळा बसावा यासाठी आरोपीला कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा ठोठावण्याची विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​महाराष्ट्र दिन सोहळा रंगला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र दिनानिमित्त टाइम्स ग्रुप आणि प्रोझोन मॉलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याला थाटात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी किड्स फॅशन शो आणि फ्लॅश मॉबने औरंगाबादकरांची मने जिंकली. यावेळी 'गर्जा महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शनही घडविण्यात आले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रोत्सवाच्या माध्यमाने दिवसभर मॉलमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शनिवारी सायंकाळी ‘वासुदेव आला, वासुदेव आला' म्हणत कलाकाराने लहान मुलांचे मनोरंजन केले. त्यानंतर 'एस अथवा नो' हा अनोखा प्रश्नोत्तर कार्यक्रम घेण्यात आला. पुरुष व महिलांना यात सहभागी करून घेण्यात आले. विशेष म्हणजे विजेत्यांना तत्काळ बक्षिसे देखील देण्यात आली. उत्साहवर्धक वातावरणात भर घातली देसरडा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी 'फ्लॅश मॉब' सादर करून उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. त्यानंतर रंगत आणली किड्स फॅशन शोने. लहान मुले-मुली आकर्षक कपडे परिधान करून रॅम्पवर चालताना उपस्थित पालकांनी भरभरून त्यांना दाद दिली. या आगळ्यावेगळ्या आणि उत्साहवर्धक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रोझोनचे एक्झिक्यूटिव्ह मॅनेजर जितेंद्रसिंग सलुजा यांनी केले आहे.

३० एप्रिलला लहान मुलांसह जोडप्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र दिनी सोमवारी महाराष्ट्राचा गौरव व्यक्त करणाऱ्या विविध सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. वाघ्या मुरळीपासून पोवाड्यापर्यंत असंख्य लोककलांचे दर्शन कलावंत घडवतील. यावेळी म्युझिकल बॅंड, डीजे स्पर्धकांचा उत्साह वाढविणार आहे. प्रोझोनला भेट देणाऱ्या ग्राहकांना महाराष्ट्राच्या परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी रॉक शो, किड्स फॅशन शो ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images