Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खड्ड्यांमुळे मळणी यंत्र उलटले; एकाचा मृत्यू

$
0
0
कसाबखेडा फाटा ते वेरूळ रस्त्यावरील खड्ड्यात मळणी यंत्राचे चाक अडकून मळणी यंत्र पलटी झाल्याने या दुर्देवी घटनेत एका बावीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. शेख अल्ताफ शेख शरीफ राहणार कसाबखेडा असे या युवकाचे नाव आहे. इतर पाच जण जखमी झाले.

...अन् त्या पक्ष्याचे वाचले प्राण

$
0
0
सातारा भागात रस्त्याच्या डांबरामध्ये अडकलेल्या बगळ्यावर उपचार केले नाही, तर त्याचे प्राण जाण्याच्या भयाने कॉलेजमधील युवकांनी त्याला सिद्धार्थ उद्यानाच्या हवाली केले.

अभिजात नृत्याचे विदेशात गारुड

$
0
0
अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्य आत्मसात करण्यासाठी मेक्सिको येथील सुजाना रेस ही तरुणी शहरात आली आहे. भारतीय नृत्यामुळे आपल्या अभिनयात कमालीची सुधारणा झाली असल्याचे तिने सांगितले.

साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कारवर कोसळला

$
0
0
जळगाव रोडवरील आंबेडकरनगर चौकात गुरुवारी पहाटे विचित्र अपघातात एका कारचालकाचा मृत्यू झाला. साखरेच्या पोत्याची वाहतूक करणारा ट्रक एक्सल रॉड तुटल्यामुळे या कारवर कोसळला. चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाचा या घटनेत मृत्यू झाला असून ट्रकचालक पसार झाला आहे.

सहा कोटींचा प्रस्ताव स्थायीची बैठक

$
0
0
सहा कोटी चौदा लाख रुपयांवरचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज, शुक्रवारी होत आहे. यंदाच्या स्थायी समितीसमोर एवढ्या मोठ्या रकमेचे प्रस्ताव येण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे समितीच्या काही सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नॅशनल हाय-वेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

$
0
0
नॅशनल हाय-वे क्रमांक २११वरील येडशी ते औरंगाबाद दरम्यानची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कंत्राटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, काम मिळवण्यासाठी ३२ कंपन्यामध्ये स्पर्धा आहे.

युवक महोत्सवासाठी झटलं अवघं कुटुंब

$
0
0
यंदाच्या युवक महोत्सवाचे वैशिष्ट ठरले, ती ग्रामीण भागातील कॉलेज. त्यांनी सरस कामगिरी करून शहरी भागातील भल्या-भल्या कॉलेजांना मागे टाकले. या यशामागे प्रशिक्षकांचा सिहांचा वाटा आहे.

पाण्याच्या मोर्चासाठी कर्मचाऱ्यांच्या बैठका

$
0
0
जायकवाडी प्रकल्पासाठी हक्काचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सरकारी निमसरकारी कर्चमारी, शिक्षक कृती समितीतर्फे येत्या रविवारी (२४ नोव्हेंबर) काढण्यात येणाऱ्या मोर्चाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

तीनशे कॉलेज गेली कोठे?

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव जल्लोषात पार पडला. विद्यापीठांतर्गत कॉलेजांची संख्या पाहता महोत्सवातील कॉलेजांचा सहभाग मात्र नगण्य होता.

वडगाव कोल्हाटीला सिटी बस

$
0
0
वडगाव कोल्हाटीच्या गावातील विद्यार्थी आणि गावातील लोकांसाठी सिटी बससेवा अखेर सुरू झाली. पोलिस विभागाच्या मागणीवरून फक्त १२ तासांत ही सेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी विभागाने घेतला. या सेवेचे उद‍्घाटन वडगाव कोल्हाटीला करण्यात आले.

विशेष जीबीसाठी पालिकेत हालचाली

$
0
0
ठप्प झालेली विकास कामे व बजेटवरून निर्माण झालेला पेच यातून सुटका करून घेण्यासाठी पालिका आयुक्तांवरच अविश्वास आणण्याची व्यूहरचना आखली जात आहे. त्यासाठी काही नगरसेवक सरसावले आहेत.

गोविंदभाईंच्या पुतळ्याचे अनावरण

$
0
0
हैदराबादमध्ये एका हृद्य सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्याचे आज (गुरूवारी) अनावरण करण्यात आले. निजामाच्या तत्कालीन राजधानीत गोविंदभाईंचा पुतळा बसविण्यात आल्याने मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

रुग्णालयात कार्डियाक सेंटर्स

$
0
0
सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राज्यातील निवडक जिल्हा रुग्णालायंमध्ये हृदयाशी संबंधित उपचार करण्यासाठी कार्डियाक सेंटर्स स्थापण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

‘निळवंडे’चे पाणी गायब!

$
0
0
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातून संकटात सापडलेल्या जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची घोषणा सरकारने केली. त्यानंतर लगेचच बांधकामासाठी नगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प रिकामा करण्यास सुरुवात केली, मात्र निळवंडेतून आतापर्यंत सोडलेल्या १३२.५ दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी केवळ १५.८२ दशलक्ष घनमीटर पाणी नाथसागरापर्यंत पोचले आहे.

पुत्राची वृद्ध पित्याला मारहाण

$
0
0
दुस-या विवाहासाठी वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने वृद्ध वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी पदमपुरा भागात घडला.

४० जणांचे कॉल रेकॉर्ड तपासणार

$
0
0
गारखेडा भागातील स्टेट बँकेच्या एटीएममधून १६ लाखांची रक्कम लंपास केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोघांची सोमवारी जामीनावर मुक्तता करण्यात आली.

अंबाबाई देवस्थानाच्या पदाधिका-याविरूद्ध गुन्हा

$
0
0
‘नळदूर्ग’ (ता. तुळजापूर) येथील अंबाबाई देवस्थानच्या सिमोलंघनासाठी राखून ठेवण्यात आलेल्या शासकीय जागेवर बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक करून बीओटी तत्वावर व्यापारी गाळे (दुकाने)बांधल्याप्रकरणी अंबाबाई देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्याविरूद्ध तुळजापूर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण विरोध : भाजपचे आंदोलन स्थगित

$
0
0
भवन येथील ३३ के. व्ही. उपकेंद्रांतर्गत मंजूर झालेले येथे मंजुर झालेले ५ एम. व्ही. एच. च्या नवीन ट्रान्सफार्मरची निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत येथे बंद असलेले ३.१५ एम. व्ही. एच. चे ट्रान्सफार्मर तात्पुरते सुरू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

विवाहितेवर सामूहिक बलात्कार

$
0
0
अर्धापूर तालुक्यातील देगांव येथील ४० वर्षीय विवाहीतेवर चार नराधमांनी बलात्कार केला. याप्रकरणी शुक्रवारी दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीत प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

$
0
0
शहराचे विद्रुपीकरण थांबवून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी बोकळलेल्या प्लॅस्टिक बॅगवर बंदी घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तीनच दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या बंदीनंतर शहरात सर्वत्र कडक अंमलबजावणी सुरू आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images