Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ उदगीर बंदला जोरदार प्रतिसाद

$
0
0

उदगीर बंदला जोरदार प्रतिसाद
म. टा. प्रतिनिधी, लातूर
‘लातूर एक्सप्रेस’ ही रेल्वे बिदरपर्यंत विस्तारित केल्यानंतर लातूर जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. या असंतोषामुळे, तसेच बिदर-मुंबई एक्सप्रेस रेल्वे नियमित करावी या आणि अन्य मागण्यांसाठी गुरुवारी ‘उदगीर बंद’चे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उदगीरात जोरदार प्रतिसाद मिळाला.
शुक्रवारी सकाळपासून उदगीरातील दुकाने, व्यापाऱ्यानी बंद ठेवली होती. उदगीर बंद करण्यासाठी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मोतीलाल डोईजोडे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी आमदार मनोहर पटवारी, माजी आमदार शिवराज तोंडचिरकर, राम मोतीपवळे, चंद्रकांत वैजापुरे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सर्वपक्षीय नेते शहराच्या प्रमुख मार्गावरून ‘बंद’चे आवाहन करीत होते. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदनही सादर करण्यात आले.
रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले की,बिदर-मुंबई रेल्वेमुळे उदगीर आणि परिसरातील प्रवाशांची सोय झाली आहे. या रेल्वेविषयी जनतेच्या भावना तीव्र आहेत. शुक्रवारी उदगीर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बंदमध्ये उदगीरकर स्वंयस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बिदर-मुंबई ही सध्या आठवड्यातून तीन दिवस असलेली रेल्वे नियमित करावी, त्याचप्रमाणे बिदर-यशवंतपूर, बिदर-हैदराबाद या दोन रेल्वेंचा विस्तार लातूरपर्यंत करण्यात यावा, या मागण्यांचा समावेश आहे.

आज लातूर बंद
रेल्वेशी संबंधित मागण्यांसाठी पुकारलेल्या उदगीर बंदला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर
लातूर-मुंबई या लातूर एक्सप्रेसचे बिदरपर्यंत झालेले विस्तारीकरण रद्द करावे या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बंदची तयारी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावर मी माझा व्यापार बंद ठेवणार आहे, अशा आशयाचे संदेश पाठवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आब गेल्यानंतर कचरा धुमसला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहर स्वच्छ, सुंदर आहे अशा बाता मारणारे कारभारी आणि प्रशासनाला केंद्रीय पथकाने केलेल्या सर्वेक्षणाने झटक्यात जमिनीवर आणले. स्वच्छतेत देशात २९९ व्या क्रमांकावर ढकलल्याने आता घनकचरा विभागाच्या कामकाजाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासाठी चिंतन व चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर भगवान घडमोडे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात घडमोडे यांना सभागृह नेते गजानन मनगटे यांच्यासह रेणुकादास वैद्य, सीताराम सुरे, ऋषिकेश खैरे, सिद्धांत सिरसाट, स्वाती नागरे, रुपचंद वाघमारे यांनी हे पत्र दिले आहे. शिवसेना संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी स्वच्छता अभियानाच्या निकालाची दखल घेतली आणि भविष्यात औरंगाबादमधील स्वच्छतेबाबत अधिकाधिक लक्ष द्यावे, अशी सूचना केली. स्वच्छता अभियान राबवून, जनजागृती करूनही शहर एवढ्या पिछाडीवर का गेले ? यापुढे शहराची स्वच्छता कशी राखता येईल ? याबाबत काय उपाययोजना करता येतील ? यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावून उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले.
शहर स्वच्छतेच्या अभियानात गेल्या वर्षी ७३ शहरांपैकी औरंगाबाद शहर ५६ व्या क्रमांकावर होते. यंदा मात्र देशपातळीवर एकूण ४३४ शहरे सहभागी झाली होती. केंद्राच्या पथकाने महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या स्वच्छतेचे सर्वेक्षण केले. त्यांच्या अहवालानुसार औरंगाबादचा क्रमांक २९९ आला. पालिका प्रशासनाकडे घनकचरा प्रक्रिया यंत्रणा नाही. त्यामुळे सर्वेक्षणात त्याचे मिळणारे अपेक्षित गुण शहराला मिळाले नाहीत.

कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
लोकसहभागाऐवजी अनेक ठिकाणी नकारात्मक वातावरण तयार झाले होते. शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती झाली नाही, बनावट लाभधारकांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता तपासणी आलेल्या केंद्रीय पथकाला लाचन घेताना रंगेहाथ पकडले होते. या घडामोडींमुळे पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापौर घडमोडे यांनीही शहराचा क्रमांक तळाला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि या विषयावर सर्वसाधारण सभा बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्तीसंग्राम संग्रहालयाचा तिसऱ्या टप्पा लवकरच

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हैदराबाद मुक्तिसंग्रामाची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी पालिकेने उभारलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालयाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करताना याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंसह छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
मुक्तिसंग्राम संग्रहालयाच्या पुढच्या टप्प्याच्या कामाच्या नियोजनासंदर्भात शुक्रवारी महापौर भगवान घडमोडे यांच्या दालनात बैठक झाली. आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृहनेता गजानन मनगटे, गटनेते मकरंद कुलकर्णी, गजानन बारवाल, भाऊसाहेब जगताप, शिवाजी दांडगे, दिलीप थोरात, हेमंत कोल्हे, एस. पी. खन्ना यांची यावेळी उपस्थिती होती.
संग्रहालय उभारताना कोणत्या पद्धतीने उभारले जावे, त्यात कोणत्या सुविधा असाव्यात ? यासंदर्भात बैठकीत चर्चा करून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंसह छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा निर्णय झाला. हे पुतळे संग्रहालयात कोणत्या ठिकाणी असावेत यासंदर्भात पालकमंत्री रामदास कदम पाहणी करून निर्णय घेतील. मुक्तिसंग्राम संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावरील छत आरसीसी ऐवजी जीआयचे करावे, बांधकाम करताना त्याचे सिव्हिल व अंतर्गत सजावटीचे काम करण्यासाठी स्वतंत्र निविदा काढाव्यात, अनुभवी संस्थांकडून काम करून घ्यावे, ऑडिओ व्हिज्युअल स्टुडिओ तयार करताना त्याचा दर्जा एखाद्या चित्रपटगृहापेक्षा उत्तम ठेवावा, त्यात विविध ऐतिहासिक छायाचित्रे व ऐतिहासिक महत्वाच्या लघुचित्रफिती दाखवण्याची व्यवस्था करण्यात यावी, तळमजला आणि पहिल्या मजल्याचे इलेव्हेशन एकमेकांना सुसंगत राहील यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात आदी निर्णय घेण्यात आले.

प्रवेशद्वाराचे नूतनीकरण
सिद्धार्थ उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार जुनाट झाले आहे. ते अधिक आकर्षक करावे आणि प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात चर्चा झाली. हे काम मुक्तिसंग्राम संग्रहालयाचे काम करणाऱ्या संस्थेकडून करून घ्यावे, असा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शिवसेनेने सरकारी यंत्रणेच्या पुढे जाऊन स्वतंत्र यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व आमदार मराठवाड्यातील ४६ तालुक्यांमध्ये दौरा करणार आहेत. शिवसंपर्क अभियानासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादेत येत आहेत.
मराठवाड्यात सद्यस्थितीला दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्यावर्षी तुलनेत चांगला पाऊस होऊनही पीकपरिस्थितीबद्दल शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ मे (शनिवार व रविवारी) मराठवाडाभर हे अभियान राबविले जाईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे रविवारी औरंगाबादेत आमदारांची बैठक घेणार आहेत. याप्रसंगी पालकमंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार विनायक राऊत तसेच संयोजक खासदार चंद्रकांत खैरे तसेच महाराष्ट्रातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ तालुके, नांदेड जिल्हा, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांत शिवसेना आमदार शेतकऱ्यांशी संपर्क करणार आहेत.

काय आहे उद्देश?
शिवसंपर्क अभियानांतर्गत दुष्काळी परिस्थितीची जिल्हानिहाय पाहणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती विषयी म्हणणे ऐकणे, जनावरांसाठी छावण्या व चारा विषयी माहिती, पाणी परिस्थिती, तूर, कांदे व शेतकऱ्यांच्या अन्य पिकांचे भाव व त्यातील व्यथा जाणून घेणे आदी उद्देश आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धावत्या रेल्वेत ‘दौलत’चा जन्म

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वेने मनमाड स्टेशन सोडले आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला. पोटात कळा सुरू झाल्या. या कठीण प्रसंगी प्रवासी महिला आणि रेल्वे सेनेचे कार्यकर्ते तिच्या मदतीला धावले. आणि गुरुवारी रात्री बरोबर सव्वानऊ वाजता तिने ‘दौलत’ला जन्म दिला.
चित्रपटाला शोभेलसी अशी घटना. अहमदनगर येथील एक नऊ महिन्याची गर्भवती महिला (वय ३०) पती, आते सासू व इतर नातेवाईकांसह दौंड-निजामाबाद पॅसेंजरने हिंगोलीला सासरी जाण्यासाठी निघालेली. मनमाडजवळील अंकाई स्टेशन सोडल्यानंतर तिला प्रसववेदना सुरू झाल्या. या डब्यात रेल्वे प्रवासी सेनेचे राजू शेंगुळेही प्रवास करत होते. त्यांनी मोबाइलवर प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांना हा प्रकार कळवला. सोमानी यांनी तत्काळ सूत्रे हलवली. रेल्वे प्रवासी सेनेच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. गाडीने नगरसोल स्टेशन सोडल्यानंतर महिलेच्या वेदना वाढल्या. शेंगुळे यांनी प्रवाशातील इतर महिलांना मदतीची विनंती केली. या महिलांच्या मदतीने नगरसोल ते तारुर स्टेशनदरम्यान या महिलेची प्रसुती झाली. पावणेपाच पौंड वजनाच्या गोंडस चिमुकल्याला तिने जन्म दिला. सोमानी यांनी या महिलेच्या मदतीसाठी रोटेगाव स्टेशनवर सगळी व्यवस्था केली. वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांनी देखील महिलेला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी त्यांच्या महिला पोलिस व वाहनांची व्यवस्था केली. १०८ क्रमांकांच्या मोबाइल सेवेला फोन लागत नसल्याने सोमानी यांनी औरंगाबादच्या पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून अॅम्बुलन्सची मदत मागितली. रात्री उशीरा ही अॅम्बुलन्स रोटेगाव स्टेशनवर दाखल झाली. तोपर्यंत रोटेगावचे स्टेशन मास्तर प्रसाद व औरंगाबाद स्टेशनचे एल. के. जाखडे यांनी या महिलेला रोटेगाव स्टेशनवर थांबवण्यास सहकार्य केले आणि रात्री साडेदहा वाजता वैजापूर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या महिलेवर उपचार सुरू आहेत. यावेळी संतोषकुमार सोमाणी यांच्यासह रेल्वे प्रवासी सेनेचे सलीम पठाण, भरत देवरे, रहिमखान पठाण, सुरेंद्र संचेती, शंकर कवडे, दादा पाटील घोडके, मनोज मुथा, संजय गायकवाड आदींनी महिलेच्या मदतीसाठी रात्री उशिरापर्यंत परिश्रम घेतले.

प्लॅटफॉर्मवर नामकरण
महिलेची प्रसुती सुखरूप झाल्याने तिच्या पतीसह नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. रेल्वे प्रवासी सेनेच्या कार्यकर्त्यांना देखील समाधान वाटले. या मुलाचे नाव काय ठेवायचे, अशी चर्चा सुरू असताना संतोषकुमार सोमानी यांनी ‘दौलत’ नाव सुचवले. महिलेसह तिच्या पतीनेही होकार दिल्यानंतर प्लॅटफॉर्मवरच या चिमुकल्याचे नाव ‘दौलत’ ठेवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅशलेस’साठी पायाभूत सुविधा गरजेच्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॅशलेस सुविधा व व्यवहार समजून सांगाताना आपण पायाभूत सुविधा दिल्या आहेत का, याचा विचार व्हावा. त्या पायाभूत सुविधा आधी पुरवायला हव्यात, असे मत औरंगाबाद मध्यचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
सरकारच्या रोकड विरहित धोरणाला प्राधान्य देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरर्मेशन टेक्नॉलॉजीचे (निलिट) प्राध्यापक, विद्यार्थी यांनी शुक्रवारी व्यापाऱ्यांसह, ग्राहकांना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मुख्य अतिथी म्हणून इम्तियाज जलील बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, उपाध्यक्ष सरदार हरिसिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉरर्मेशन टेक्नॉलॉजीचे (निलिट) कार्यकारी संचालक डॉ. संजीवकुमार गुप्ता यांची उपस्थिती होती.
आमदार जलील म्हणाले, ‘कोणी नोटबंदीच्या विरोधात बोलणारे, तर कोणी बाजूने बोलणारे आहेत. या निर्णयाकडे दूरगामी परिणाम म्हणून पाहिले पाहिजे. यातून नक्कीच फायदा होईल.’
कार्डपेमेंट करताना व्हिसा, मास्टरकार्डचा वापर न करता रुपेकार्डचा वापर करावा. व्हिसा आणि मास्टकार्डच्या पेमेंटद्वारे आकारलेले शुल्क परदेशी कंपन्यांना जाते. यामुळे आता रुपेचा वापर वाढयला हवा. डिजिटल पेमेंट शिकण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यशाळांना निलिटचे कर्मचारी आणि फार थोडे व्यापारी आले, ही नक्कीच विचार करायला लावणारी बाब आहे, याचाही निलिटने विचार करायला हवा, असे सांगून निलीट आणि व्यापारीवर्गाची आमदार जलील यांनी कानउघडणी केली.
खासदार खैरे यांनी निलिटच्या अशा डीजीधन कार्यशाळांचे कौतुक करत हा धोरणात्मक निर्णय केंद्रीयमंत्री रवीशंकर यांनी चांगल्या पद्धतीत राबवून घेतला असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी डिजीधनासंबंधी माहिती दिली.
कार्यकारी संचालक डॉ. संजीवकुमार गुप्ता यांनी सांगितले की, ‘देशभरात रोकडविरहित व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. भारताने स्वतःची ‘रुपे कार्ड सिस्टीम’ तयार केली आहे. अशा प्रकारच्या व्यवहारासाठी स्वतःची सिस्टीम असणारा भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा देश आहे.’
कार्यशाळेत व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. मिलिंद क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.

कॅशलेस तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन
भविष्यात ‘कॅशलेस’ व्यवहार उपयुक्त ठरणार आहे. त्यात ग्राहकांचा फायदा आहे, मात्र अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. हे संभ्रम आणि व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी काय आहेत, नवीन तंत्रज्ञान काय आहे, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, भीम अॅप, डिजीटल पेमेंट म्हणजे काय, मोबाइल बॅँकिंग, कॅशलेस व्यवहार करताना कोणती काळजी घ्यायची याबाबींचे मार्गदर्शन केले गेले. बँक ऑफ महाराष्ट्रचे किरण परदेशी आणि यूडीआयचे प्रतिनिधी यांनीही मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी हॉस्पिटलमध्ये वाकडे पाय सरळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील संजरपूरवाडी येथील गंगाबाई रामसिंग नागलोत यांच्या नवजात मुलाच्या डाव्या पायाच्या जांघेतून दुमडलेला गुडघा व सांधा दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या मुलाचे आयुष्य सुकर झाले आहे.
नागलोत यांच्या मुलाचे पाय जन्मजात वाकडे होते. डॉक्टरांनी या रोगाचे निदान आर्थोगायपोसिस, असे केले होते. या मुलावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील उपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी गेल्या पाच महिन्यांपासून उपचार करण्यात आले. या मुलाच्या पायाला पाच महिन्यात आठ वेळा प्लास्टर करण्यात आले. त्यामुळे या नवजात बालकाचा पाय सरळ झाला. या रुग्णाचे नाव अमोल आहे. अमोल यास प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र सोनवणे व जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी क्लब बूट देण्यात आले. याप्रसंगी बालकाचे आजोबा आसाराम शामलाल जारवाल उपस्थित होते. तालुक्यात किंवा जिल्ह्यात असे जन्मताच पाय दुमडलेले आर्थोगायपोसिस आजाराचे बालक असल्यास त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खंदारे यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्या बालकांवर उपचार करण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरला महाराष्ट्र बँकेत अग्नितांडव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
बँक अॉफ महाराष्ट्रच्या डेपो रस्त्यावरील इमारतीला शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शॉर्ट सक्रिटमुळे आग लागली. या आगीत फर्निचर, संगणक आदी २६ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. बँकेचे स्ट्राँग रूम व लॉकरपर्यंत आग पसरली नसल्याने रोख रक्कम, कर्ज प्रकरणांच्या फाइल्स व अन्य महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहिले.
शहरातील डेपो रस्त्यावरील एका खासगी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बँक अॉफ महाराष्ट्रची शाखा आहे. येथील सायरन अचानक सकाळी साडेसहाच्या सुमारास वाजेच्या सुमारास बँकेचा सायरन वाजायला लागला. यावेळी बँकेतून धूर येत असल्याचे परिसरातील कोठारी कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब तेजस जगताप, रवींद्र मालपाणी, परेश कोठारी, निलेश पारख, अहमद पठाण, फेरोज पठाण आदींना सोबत घेऊन या घटनेची माहिती नगर पालिका व पोलिसांना दिली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावेळी डेपो रस्त्यावरील अग्नितांडव बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी उसळळी. दरम्यान, घटनास्थळी नगर पालिकेच्या अगनिशामन दलाचा बंब दाखल झाला. तोपर्यंत या भागातील दामोदर पारिक व त्यांचा मुलगा विष्णू पारिक यांनी घरातील कार्बनडाय अॉक्साइडचे दहा सिलिंडर आणून आग विझवण्यासाठी सहकार्य केले. नगर पालिकचे मोतीभाऊ हिवाळे, प्रमोद निकाळे, महावितरणचे मोतीभाऊ मापारी आदींनी ही आग दोन तासात आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी तातडीने प्रयत्न केल्याने अनर्थ टळला, अन्यथा ही संपूर्ण इमारत व तिच्यामधील दुकानांत आग पसरण्याचा धोका होता.
बँकेचे व्यवस्थापक पी. एल. तायडे, झोनचे उपव्यवस्थापक रवींद्र सोंजे, मुख्याधिकारी विठ्ठल डाके, सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

आजपासून व्यवहार
बँकेने शेजारच्या इमारतीमध्ये नागरिकांना बँकेचे व्यवहार करण्याची व्यवस्था केली. या बँकेत व्यवहार शनिवारपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरु होतील, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन व्यवहार त्वरित सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

लांडगा आला रे आला...
महाराष्ट्र बँकेचा सायरन नेहमीच वाजत असतो, असा नागरिक व बँकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. शुक्रवारी सकाळी सायरन वाजला, पण त्याकडे सुरक्षा कर्मचाऱ्यासह सगळ्यांनी दुर्लक्ष केले. परंतु, बँकेतून धूर येत असल्याचे काहीजणांनी पाहिल्यामुळे ताबडतोब हालचाल करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलविकास आराखडा दुरुस्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गोदावरी खोरे एकात्मिक जलविकास आराखड्यात तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाने जोरदार निदर्शने केली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयसमोर शुक्रवारी दुपारी झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
जलप्रकल्पांचे चुकीचे व मनमानी नियोजन, निसर्गाचा लहरीपणा, पाणीमाफियांची राज्यकर्त्यांसोबतची युती हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरली आहे. २००५मध्ये समन्यायी पाणी वाटपासाठी जलनियमन प्राधिकरण कायदा झाला. जलप्रकल्पांचे अचूक नियोजन करण्यासाठी शेती, उद्योग व पिण्यासाठी समन्यायी पाणी, पाणी पुनर्वापर, पीक रचनेत बदल, आर्थिक शिस्त यांचा विचार करून राज्याचा एकात्मिक जलविकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. गोदावरी महामंडळाने २००७पासून दहा वर्षे कालावधी वाया घालून केवळ एकांगी जलविकास आराखडा सादर करून मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केले असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक कैलास गायकवाड यांनी केला.
के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली १२ जलतज्ज्ञांची समिती नेमून आराखडा दुरुस्तीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी दिले. उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर ३० जुलै २०१७पर्यंत गोदावरी खोरे जलविकास आराखडा मंजूर करण्याचे शासनाला लेखी वचन द्यावे लागले, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
या आंदोलनात रमेश जायभाय, शमीमबी महेबू चौधरी, के. व्ही. गायकवाड, लक्ष्मण शिंदे, सचिन गंगावणे, गौतम गणराज, मन्साराम आमराव, विकास पाखरे, अनिल साळवे, रवींद्र गायकवाड, शिवाजी शेजूळ, अजय गंगावणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

चुकीचा आराखडा मंजुरीचे प्रयत्न
आपल्या चुका झाकण्यासाठी जलसंपदा विभाग चुकीचा आराखडा मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून तयार केलेला आराखडा दुरुस्त करणेसुद्धा आराखडा समितीला अवघड जात आहे. सामान्यांचे हाल रोखण्यासाठी आराखड्यात तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलताबादचे पाणी तीन दिवस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातील पंप हाउसमध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम नगर पालिकेने हाती घेतले आहे. यामुळे खुलताबाद शहरात पाणीपुरवठा तीन दिवस बंद करण्यात आला आहे.
येसगाव येथील पंप हाउसमध्ये गाळ साचल्याने विद्युत पंपाचे बुश निकामी होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. १९९८ पासून पंप हाउसमधील गाळ काढण्यात आलेला नव्हता. नगर पालिकेने गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. त्यामुळे गुरुवारपासून दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे नगरपालिकेने कळविले आहे. गाळ काढल्यामुळे वारंवार विद्युतपंपात बिघाड होण्याचे थांबणार असून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. गाळ काढण्याचे काम सुरू असतांना नगराध्यक्ष एस. एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक अविनाश कुलकर्णी, नगरसेवक दिलीप बावस्कर, मुख्याधिकारी एन. के. पाटील उपस्थित होते.

प्रस्ताव पडून

पाणीटंचाईचा प्रस्ताव पडून येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पात नगर पालिकेच्या चार विहिरी आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी आणखी एक नवीन विहीर, पाइपलाइन, विद्युत पंपाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पडून आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास खुलताबादकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपींना दूध, दही, ताक वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पैठण दारूमुक्त व्हावे यासाठी शहरातले तरूण एकवटले असून शुक्रवारी देशी दारूच्या दुकानासमोर मद्यपींना दूध, दही व ताक वाटप करण्यात आले. यावेळी तरुणांनी दारूविरोधी जनजागृती फेरी काढली.
शहर दारूमुक्त व्हावे ही पैठणकरांची जुनी मागणी आहे. यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शहरातील मद्यविक्रीची दुकाने बंद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पैठण शहर राज्यमार्गापासून अर्ध्या किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्याने केवळ एकच बियर बार बंद झाले. सध्या पैठण तालुक्याशेजारील शेवगाव, गेवराई, अंबड, पाथर्डी या तालुक्यातील बहुतांशी दारू दुकाने बंद झाली आहेत. शहरात सहा देशी दारूची व जवळपास दीड डझन बियर बार व बियर शॉपी आहेत. यामुळे शेजारील तालुक्यातील दारूड्यांची पैठणमध्ये गर्दी होत आहे. त्यांचा शहरात येणारे पर्यटक, भाविक, वारकरी व महिलांना त्रास होत आहे.
दारूमुक्त शहरासाठी तरुणांनी कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीतर्फे शुक्रवारी देशी दारूंच्या दुकानासमोर मद्यपींना दूध, दही व ताक वाटप करून निषेध करण्यात आला. यावेळी शिवाजी चौक ते डॉ. अांबेडकर पुतळा अशी जनजागृती फेरी काढण्यात आली. शहर दारूमुक्त होईपर्यंत दर आठवड्याला दारूविरोधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.
या आंदोलनात कपिल पहिलवान, गणेश मडके, संतोष गोबरे, विजय सुते, विजय आचार्य, यशवंत लोहारे, सुमित मगरे, लोहारे, अतिश गायकवाड, सुनील आडसुल, रवींद्र जोशी, संदीप लोहारे, शुभम लोहारे, अविनाश कुलकर्णी, महेंद्र साळवे, संतोष शिंगटे, सचिन वनवे, राम जमादार, रवींद्र हिवराळे, निकेश वैद्य, अमोल भागवत, प्रथमेश थोटे, राम भुकेले, श्रीकांत कांबळे, राहुल दाभाडे, शुभम पहिलवान इत्यादींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमध्ये कोंबून भर बाजारात चाकू हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
घर खरेदीसाठी दिलले पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने तिघांनी एकावर भरबाजारात कारमध्ये कोंबून हल्ला केला. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे.
बजाजनगरातील रहिवासी शिवाजी भानुदास तायनाक हे लेबर ठेकेदार असून त्यांनी दीड वर्षांपूर्वी कमळापूर येथील किशोर बाबुराव लोहकरे याला घर खरेदीसाठी ७ लाख रुपये दिले होते. पण, त्यांना अद्याप घर देण्यात आले नाही, त्यामुळे तायनाक यांनी लोहकरे याच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. शिवाजी तायनाक हे गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रांजणगाव येथील जयभवानी हॉटेलजवळ उभे होते. त्यावेळी किशोर लोहकरे याच्यासह तिघे फॉर्च्युनर कारमधून (एम एच ५० ए ७२७४) तेथे आले. त्यांनी तायनाक यांच्यासोबत वाद घातला व बळजबरीने कारमध्ये बसवून मारहाण करण्यास सुरवात केली. दोघांनी तायनाक यांना धरून ठेवले व किशोर लोहकरे याने चाकू काढून पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तायनाक यांनी प्रतिकार केला असता मांडीवर वार बसून जखमी झाले. यावेळी हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती, गर्दी झाल्याने हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रबोधन वारशाला पुरेसा निधी मिळेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
समतेचा विचार रूजवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहिलेल्या राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा जतन करण्याचे काम ‘छत्रपती शाहू महाराज अध्यासन’ करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत अध्यासनात मौलिक संशोधन झाले असून उदबोधन शिबिरातून समताधिष्ठीत विचार पोहचवण्यात येत आहेत. मात्र, पुरेसा निधी आणि स्वतंत्र इमारत नसल्यामुळे इतर अध्यासनाप्रमाणे या अध्यासनाच्या कामालाही मर्यादा पडल्या आहेत.
महापुरुषांच्या विचारांचा वारसा जतन करीत वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव संशोधन करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध अध्यासन केंद्र सुरू करण्यात आली. २००३मध्ये छत्रपती शाहू महाराज अध्यासन केंद्र सुरू झाले. पुरोगामी विचारसरणी अवलंबणाऱ्या शाहूंच्या विचारांचा प्रसार करणे व संशोधन करणे अध्यासनाचा उद्देश आहे. गेल्या १४ वर्षांच्या कार्यकाळात तांत्रिक अडचणींवर मात करून अध्यासनाने भरीव काम केले. संशोधन, प्रबोधन व विविध उपक्रम घेण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यातील अनेक कॉलेजात उद्‍बोधन शिबिरे घेण्यात आली. महाविद्यालयाने प्रस्ताव दिल्यास एक दिवसाचे उद्‍बोधन शिबिर घेण्यात येते. प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण, विनायकराव पाटील महाविद्यालय कन्नड, शिवछत्रपती महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालयात शिबिरे झाली आहेत. शाहू महाराजांच्या कार्यावरील संशोधनासाठी प्रत्येकी दोन एम.फिल आणि पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना अध्यासनाच्या माध्यमातून दरमहा सहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. यावर्षी दोन विद्यार्थी संशोधन करीत आहेत. एप्रिल महिन्यात शाहू महाराज अध्यासन व शिवाजी महाराज अध्यासन केंद्राने ‘शिवकालीन जलव्यवस्थापन आणि सद्यस्थिती’ विषयावर दोन दिवसांचा परिसंवाद घेतला. देशभरातील नामांकित अभ्यासक परिसंवादात सहभागी झाले. परिवर्तनवादी चळवळीत विशेष योगदान देणारे कॉ. गोविंद पानसरे, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत कोकाटे यांनी अध्यासन केंद्रात व्याख्याने दिली आहेत. विद्यापीठातील सर्व अध्यासन केंद्रांचा कारभार संबंधित संचालकाच्या कक्षातूनच चालतो. स्वतंत्र इमारत किंवा कक्ष नसल्यामुळे अध्यासनाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. डॉ. उमेश बगाडे यांच्यानंतर २०१०पासून डॉ. राजेश करपे अध्यासन संचालक आहेत. पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात डॉ. करपे कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने पर्यटनशास्त्र विभागाच्या इमारतीत शाहू अध्यासन केंद्रासाठी खोली दिली आहे. या लहानशा जागेत अध्यासनाचे काम करणे कठीण झाले आहे.

तुटपुंजा निधी
विद्यापीठ प्रशासन अध्यासनाला वार्षिक तीन लाख रूपये निधी देत असत. मात्र, मागील वर्षीपासून फक्त एक लाख रुपये निधी देण्यात येतो. या निधीत वर्षभर विविध उपक्रम राबवणे शक्य नाही; तसेच एका इमारतीत सर्व अध्यासन केंद्र सुरू करून संचालक नेमण्याची घोषणा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केली होती, मात्र या घोषणेनंतर प्रत्यक्ष काम झाले नाही. अध्यासनाचे काम गतिमान करण्यासाठी स्वतंत्र इमारत देऊन कर्मचारी नियुक्त करावे, अशी मागणी आहे. संशोधन साहित्य आणि अध्यासनाची कागदपत्रे ठेवण्यासाठीसुद्धा जागा नाही.

छत्रपती शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या माध्यमातून प्रबोधन विचार सर्वदूर पोहचवणे गरजेचे आहे. विद्यापीठ प्रशासनाने अध्यासनाकडे लक्ष दिल्यास व्यापक काम होईल. कार्यशाळा, चर्चासत्र, उद्‍बोधन शिबिर उपक्रमांसाठी पुरेसा निधी आवश्यक आहे.
- डॉ. राजेश करपे, संचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ एप्रिलपर्यंतचीच तूर सरकार खरेदी करणार

$
0
0

औरंगाबाद ः शेतकऱ्यांची उर्वरित तूर खरेदीवर केंद्र व राज्य सरकारने शुक्रवारच्या सुनावणीत हमी घेतली नाही. या उर्वरित तुरीवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोणतेही मत व्यक्त केले नाही. २२ एप्रिलपर्यंतचीच तूर सरकार खरेदी करणार असल्याचे राज्य शासनाने पुन्हा स्पष्ट केले. केंद्र व राज्य शासनाला नोटीस बजावून त्यांना सहा आठवड्यानंतर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे.
शेतकऱ्यांकडे असलेली सर्व तूर शासनाने खरेदी करावी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. कालिदास वडणे यांच्यासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज्य, केंद्र शासनाने तूर खरेदीसंदर्भात असलेली धोरणे, आयात, उत्पादन, बाजार हस्तक्षेप योजना आणि तूर खरेदीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना, धोरणांसंदर्भात आपापली भूमिका स्पष्ट केली.
शेतकऱ्यांकडे असलेली सर्व तूर शासनाने खरेदी करावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका ‘अन्नदाता शेतकरी संघटने’चे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी केली आहे. लातूरचे तूर उत्पादक शिवाजीराव माने यांनीही याचिका केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाला वेध निवडणुकांचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नवीन विद्यापीठ कायदा लागू केल्यानंतर विद्यापीठाअंतर्गत अधिकार मंडळाच्या निवडणुकांचे परिनियम उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केले आहेत. अधिकार मंडळाच्या अर्हता नमूद करण्यात आल्या आहेत. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने विद्यापीठ प्रशासन तयारीला लागले आहे. मे महिन्याच्या अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात नवीन विद्यापीठ कायदा लागू केल्यानंतर विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांसंदर्भात अर्हतेचे परिनियम उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठाला पाठवले आहेत. एक मार्चपासून विद्यापीठ कायदा लागू झाला आहे, तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून प्राधिकरणांच्या नेमणुकीसाठी विद्यापीठाने तयारी केली आहे. विद्यापीठ कायद्यानुसार सूचना, निवडणूक घेण्याची सूचना, मतदान प्रक्रिया, मतदानाचे हक्क, आरक्षण आणि पात्रतेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यापीठाला परिनियम दिले आहेत. या परिनियमाची प्रक्रिया उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पूर्ण करून इंग्रजी व मराठी भाषेत जारी केले आहेत. विद्यापीठाअंतर्गत अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अभ्यास मंडळ, विद्यापीठ विभाग आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास मंडळ, महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षण मंडळ, आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, माहिती तंत्रज्ञान मंडळ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहचर्य मंडळ, आर्थिक विकास मंडळ अशा १५ प्राधिकरणांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठ स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. नवीन विद्यापीठ कायद्याला डिसेंबर महिन्यात विधिमंडळाने मंजुरी दिली होती. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तीन मार्चपासून कायदा लागू झाल्याचे जाहीर केले. नवीन कायद्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठांची प्रक्रिया सुरू होईल. नवीन नियमावलीनुसार विद्यापीठांना कार्यप्रणाली अवलंबावी लागणार आहे.

राजकीय प्रभाव?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कामकाजातील राजकीय हस्तक्षेप नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. सध्या सत्ताधारी पक्षाचे नेते विद्यापीठाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप अनेक संघटना करीत आहेत. यापूर्वीच्या सत्ताधारी पक्षांवरही हेच आरोप झाले आहेत. त्यामुळे अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेच्या निवडीत राजकीय प्रभाव किती टिकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड कोटी खर्चूनही पाण्यासाठी वणवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दीड कोटी रुपये खर्च करूनही वडगाव कोल्हाटी येथील नागरिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत येणाऱ्या शिवसेनेच्या पथकामार्फत योजनेची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतरही वडगावकरांना पाणी कधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष्य लागून राहील.
वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीसाठी १४ व्या वित्त आयोगानुसार ग्रामपंचायत हद्दीमधील लोकसंख्येच्या प्रमाणात एक कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून लोकउपयोगी योजना राबविण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. वडगाव कोल्हाटीची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्र ते गावातील जलकुंभापर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव ग्रामसभेने मंजूर करून कामाला सुरवात केली. जवळपास वर्षभरापासून सुरू असलेले हे काम अर्धवट राहिल्याने गावकर्‍यांना पुन्हा एकदा टँकरचा सहारा घेत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत लगत असलेल्या भागांमध्ये पाण्याची मुबलकता असते तर आयोध्यानगर, सलामपुरेनगर आदी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. केवळ जलकुंभापर्यंत पाणी पोहचविण्याचे काम ठेकेदाराचे असल्याचे ठेकेदारांने सांगितले. गावातील वितरण व्यवस्था कुचकामी असल्याने जलकुंभातील पाणी पुरविण्यासाठी गावातील वितरण व्यवस्थेसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीकडे ग्रामपंचायतीचे डोळे लागले आहेत.

अहवाल देणार
ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण, अर्धवट कामांचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत बसला. या कामाची पाहाणी करण्यासाठी शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर, मुंबईचे नगरसेवक अॅड. सुहास वाडकर, स्वप्नील टेंबवलकर हे येत आहेत. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार संजय शिरसाट हे राहतील. हे पथक मातोश्रीवर अहवाल देणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ्याच्या सुटीत मोफत वाचन सुविधा

$
0
0

औरंगाबाद ः उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी, नागरिक यांना ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम शिवाजीनगर परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाने सुरू केला आहे. येत्या १५ जूनपर्यंत महाविद्यालयाचे ग्रंथालय सुरू ठेवण्यात येणार आहे.
अजिंठा शिक्षण संस्थेच्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या ग्रंथालयात कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांच्या अभ्यासक्रमांची पुस्तके आहेत. त्याशिवाय अनेक दुर्मिळ ग्रंथ, संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त वाचन साहित्य, कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, प्रवास वर्णने, ऐतिहासिक ग्रंथ, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आदी विषयांचे उपयुक्त ग्रंथही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील दैनिके, मासिके, ई-बुक, ई-जर्नल्स महाविद्यालयात उपलब्ध आहेत. उन्हाळाच्या सुटीत हे साहित्य विद्यार्थी, नागरिकांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाची एक मेपासून सुरुवात झाली. येत्या १५ जूनपर्यंत ग्रंथालय सर्वांसाठी खुले राहणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी पाच या वेळेत ग्रंथालय सुरू राहील. शिवाजीनगर, गारखेडा परिसर, बीड बायपास रोड, मुकुंदवाडी, सिडको परिसर आदी भागांतील नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यांच्यासह शहरातील नगारिकांसाठी ही सुविधा उपयुक्त आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. अशोक नाईकवाडे, ग्रंथपाल राजू तुपे, कार्यालय अधीक्षक एम. आर. खान यांनी केले आहे.

पुस्तके घरी नेण्याची मुभा
ग्रंथालयातील पुस्तके सात दिवसांसाठी घरी वाचनासाठी नेण्याची मुभा महाविद्यालयाने दिली आहे. त्यासाठी पुस्तकाच्या किमतीएवढी रक्कम डिपॉझिट स्वरुपात महाविद्यालयात भरावी लागेल. त्याचवेळी ग्रंथालयाचे अल्प कालावधीचे सदस्य म्हणून नागरिकांना मान्यता देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड माफियांना घालणार वेसण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील भूखंड माफिया पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या रडारवर असून येत्या तीन महिन्यात त्यांना वेसण घालण्यात येणार आहे. त्यांच्यावर मोकोका, झोपडपट्टी दादा कायदा व हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा आयुक्त यादव यांनी दिला आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पोलिस ठाण्यात जनता संमेलन भरवण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी आठ दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. शहरात गरिबांचे भूखंड हडप करण्याचे अनेक प्रकार घडतात. तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्या कार्यकाळात आर्थिक गुन्हे शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेतर्फे अनेक भूखंड माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आयुक्त यादव यांनी देखील भूखंड माफियांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. बनावट कागदपत्रे, बाँडपेपर आधारे गोर-गरिबांच्या जमिनी बळकावणे, सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे यापुढे चालणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या भूखंड माफियांवर गरजेनुसार मकोका, झोपडपट्टी दादा कायद्यानुसार तसेच हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

जनता संमेलन
शहरातील पोलिस ठाण्यांत प्रलंबित तक्रारी निकाली काढण्यासाठी पोलिस आयुक्तांनी जनता संमेलन भरवणार असल्याचे सांगितले. आठवड्यातून दोन दिवस पोलिस ठाण्यात जनता संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांच्या तक्रारी जागच्या जागी सोडवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. या ठिकाणी सबंधित तपास अधिकारी, गुन्ह्याची क‌ागदपत्रे आदी असल्यामुळे तक्रारी सोडवणे सोयीस्कर जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात येत्या मंगळवारी सिटीचौक पोलिस ठाण्यापासून करण्या येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पती व मुलाच्या केसमध्ये मदत करण्याचे आमिष दाखवत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या जमादारविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा महिलेने ‌दाखल केला आहे. याच प्रकरणात महिलेने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हा नोंदवला आहे. २९ एप्रिल रोजी दुपारी विभागीय आयुक्तालयाजवळ हा प्रकार घडला होता.
या प्रकरणी ४५ वर्षाच्या महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये वडोदबाजार पोलिस ठाण्याचा जमादार सुरेश बबनराव सनवे याच्याकडे महिलेचा पती व मुलासंदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आहे. सनवे याने या महिलेला २९ एप्रिल रोजी सकाळी मोबाइल करून गुन्ह्यातील कागदपत्रे घेऊन बोलावले. ही महिला कागदपत्रे घेऊन दिल्लीगेट येथील विभागीय आयुक्तालयाजवळ पो‌हचली. यावेळी सनवे याने तिला एका कोपऱ्यात घेऊन जात तुमच्या पती व मुलाच्या केसचा फैसला करून टाकतो, असे म्हणत हात धरून विनयभंग केला. या महिलेच्या तक्रारीवरून गुुरुवारी सनवे विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेविरुद्ध तक्रार
याच प्रकरणात जमादार सुरेश सनवे यांनी महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यामध्ये या महिलेने त्यांना २९ एप्रिल रोजी मुलाची टीसी तसेच घाटी हॉस्पिटलच्या कागदपत्राची झेरॉक्स द्यायची असल्याचे सांगत दिल्लीगेट येथे बोलावले. या ठिकाणी तुम्ही माझ्यावर पतीवर व मुलावर खोटा गुन्हा का दाखल केला. त्यांना तीन दिवस हर्सूलला का पाठवले, आता तुमच्यावर विनयभंगाची केस करून जेलमध्ये पाठवते, तुझी नोकरी घालवते असे म्हणत सनवे यांना शर्टाची कॉलर पकडून मारहाण केली. या प्रकरणी सनवेच्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायक्रोमॅक्स, कोहम औरंगाबादेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
किया मोटर्स, नेस्ले आणि सात ऑटोमोबाइल कंपन्यांनी पाठ फिरवल्यानंतर नाराज झालेल्या औद्योगिक क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्ट फोन क्षेत्रातील नामांकित कंपनी मायक्रोमॅक्स आणि कृषी अवजारांची निर्मिती करणारी कोहम कंपनी यांनी शेंद्र्यातील डीएमआयसीत गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे.
या गुंतवणुकीच्या विषयी आणि डीएमआयसीच्याअंतर्गत असलेल्या कामांचा आढावा औरंगाबाद इंडस्ट्र‌‌िअल टाउनशिप लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील नुकताच औरंगाबादला येऊन घेतला. त्यांनी सादर केलेल्या पॉवर पाॅइंट प्रेझेंटेशनमध्ये कोहम आणि मायक्रोमॅक्स या कंपन्या भविष्यात गुंतवणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. या कंपन्यांची महाराष्ट्रातील ऑरिक सिटीत गुंतवणुकीसाठी चर्चा सुरू केली आहे. याशिवाय राज्य सरकारने चीन, बेल्ज‌ियमच्या चार-पाच कंपन्यांशी बोलणी सुरू केली आहे. या कंपन्यांची नावे किंवा त्याच्या‌ विषयी अधिक माहिती मिळू शकली नाही, पण यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू आहे.
ऑरिकमधील जमिनीची किंमत आणि पायभूत सोयीसुविधांसाठी ११ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. सुमारे ११ अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणुकीची क्षमता आणि संपूर्णपणे विकसित झाल्यावर सुमारे ३ लाख ३० हजार उच्च कुशल रोजगार या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहेत. ऑरिक सिटीत ४२ टक्के पाण्याचा फेरवापर केला जाईल. सध्या या मुद्द्याचेही मार्केटिंग करण्यात येत आहेत. चीन आणि बेल्जियममधील कंपन्यांना पाणी आणि इतर सोयीसुविधांविषयी माहिती दिली जात आहे. यामुळे या कंपन्या नक्कीच येथे गुंतवणूक करतील, असा विश्वास अधिकारीवर्गाला आहे.

देशातील पहिल्या स्मार्ट औद्योगिक सिटीचे काम अत्यंत वेगाने सुरू असून, आम्ही ऑरिक सिटीत गुंतवणूक करण्यासाठी चीन, बेल्जियमच्या कंपन्यांशी बोलत आहोत. आगामी ४-५ महिन्यांत यश येईल.
- गजानन पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, ऑरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images