Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मनजीत प्राइडमध्ये कर भरण्याची सोय

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
बीड बायपासवरील महानुभव चौकाजवळ असलेल्या मनजीत प्राइड येथील महापालिकेच्या मालकीच्या सी १ या फ्लॅटमध्ये पालिकेचे कर भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे एक कॅशिअर व डाटा एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. या ठिकाणी करवसुलीचे काम सुरू झाले असले तरी सातारा ग्रामपंचायतीच्या कार्यालयातही सातारा व देवळाईतील नागरिकांना कर भरता येणार आहे.
सातारा प्रभाग अस्तित्वात आला असला तरी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जुन्या ग्रामपंचायत कार्यालयात वार्ड क्र. १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११४ व ११५ या नऊ वार्डांच्या करवसुलीचे काम चालते. ही जागा अपुरी पडत असल्याने नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. बीड बायपासलगत असलेल्या मनजीत प्राइड येथे पालिकेच्या मालकीचे ४ फ्लॅट आहेत. येथेच प्रभाग कार्यालय करण्याचे नियोजन होते. परंतु, जागा लहान व निवासी असल्यामुळे ते बारगळले . त्यानंतर सध्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या ठिकाणी इमारत बांधण्याचा निर्णय झाला. परंतु, त्याला विरोध झाल्याने बीड बायपासवर भाड्याच्या जागेचा शोध घेण्यात आला. हा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. सध्याची प्रभाग कार्यालयाची जागा इतर वॉर्डांसाठी गैरसोयीची आहे. ईटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, हमालवाडा, रेल्वे स्टेशन परिसर, देवानगरी, मयूरबन कॉलनी आदी ठिकाणच्या रहिवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे करवसुली करिता मनजीत प्राइड येथील इमारतीत व्यवस्था करणअयाचा निर्णय घेण्यात आला आहे. या फ्लटी सफाई करण्यात आली असून विजेचा प्रश्न कायम आहे. ही समस्या सुटल्यास येथे सोमवारपासून करवसुलीस प्रारंभ होईल. या ठिकाणी दोन महिन्याची व्यवस्था असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात येत असले तरी प्रतिसाद मिळाला तर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत येथूनच करवसुलीचे काम करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धार्मिक स्थळ कारवाई; ३१ मेपर्यंत मुदत

0
0

एमआयडीसी, सिडको, सार्वजनिक बांधकाम आणि नगर पालिकेच्या जागेवर असलेल्या धार्मिक स्थळे नियमित करणे अथवा स्थलांतरित करण्याची कार्यवाही ३१ मे पर्यंत पूर्ण करावी. या कारवाईचा अहवाल ३१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याबाबत गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रत्नाकर कुलकर्णी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी, वन व पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात अ वर्गात असलेली २९ धार्मिक स्थळे हटवली जाणार नाहीत. ब वर्गात असलेली ६६ धार्मिकस्थळे ही रस्त्यांमध्ये अडथळा निर्माण करणारी किंवा सरकारी जागेवर उभी असल्याचे आढळून आले आहेत. ब वर्गातील धार्मिकस्थळे नि‌ष्कासित न करता त्यांचे स्थलांतर करण्यात यावे किंवा ही धार्मिकस्थळे नियमित करण्यात यावी यासाठी बैठकीचे आयेजन करण्यात आले होते. यामध्ये पंढरपूरमधील धार्मिक स्थळाबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर करावा, वैजापूर येथील लक्ष्मीमाता मंदिर रहदारीस अडथळा येत असल्याने नगर पालिका प्रशासनाने कारवाई करावी, कन्नडमधील मशीद स्थलांतरित करावी, चौका येथील हनुमान मंदिराचा अडथळा येत असेल तर वन विभाग व महसूल विभागाने कारवाई करावी, भांबर्डा येथील शनी मंदिर वनखात्याच्या जमिनीवर आहे. वनखात्याने रहदारीस अडथळा नसल्याचा अभिप्राय देवून नियमित करण्याच्या कार्यवाही करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गैरहजर होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरहजर राहिल्याबद्दल पत्राद्वारे कळवण्याच्या सूचना केल्या. धार्मिक स्थळांबाबत आतापर्यंत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कार्यवाही न झाल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना-भाजपमध्ये अभियानाची स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप व शिवसेना दोन मित्रपक्षांतर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील रायकीय वातावरण ढवळून निघत आहे. परिणामी, नागरिकांना निवडणुकीचे वारे वाहत आहेत का, अशी शंका येत आहे.
भाजपतर्फे शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी २६ मे ते १० जून दरम्यान जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या तयारीच्या बैठकीने सोयगावात राजकीय वातावरण तयार झाले होते. दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने सोयगावात शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही पक्षांच्या अभियानाच्या प्रारंभामुळे सोयगावमध्ये दोन्ही पक्षांचे झेंडे, बॅनर, फ्लेक्स झळकले. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून निवडणुकांची रंगीत तालीम करण्यात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे अभियान राबविण्यात मग्न आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर आहे. सत्तेत असूनही शेतकऱ्यांसाठी काहीही धाडसी निर्णय घेवू न शकणाऱ्या या पक्षांनी घोडेबाजार मांडल्याची टीका करण्याची संधी मात्र शहरवासीयांनी सोडली नाही. यासर्व घडामोडीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मागे राहिल्याचे चित्र सोयगावात दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी हित जपल्याचे समाधान

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेली दोन वर्षे विद्यार्थी कल्याण संचालक म्हणून कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांनी चांगले काम करण्याची संधी दिली. या काळात विद्यार्थी हिताचे निर्णय घेता आल्यामुळे समाधानी आहे, असे प्रतिपादन संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी केले. विद्यार्थी कल्याण संचालकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गुरुवारी ते बोलत होते.
विद्यार्थी कल्याण संचालकपदाची सूत्रे डॉ. मोराळे यांनी १३ मे २०१५ रोजी स्वीकारली होती. या काळात केंद्रीय युवक महोत्सव, इंद्रधनुष्य, आंतरविद्यापीठ युवक महोत्सवासह विविध कार्यक्रम घेण्यात आले; तसेच अल्पसंख्याक विद्यार्थिनी वसतिगृह व यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंजूर विद्यार्थिनी वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले. वसतिगृहात पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यासाठी मोराळे यांनी विशेष प्रयत्न केले. ‘सेंट्रल लंच होम’ सुरू करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर घेतलेल्या विविध कार्यक्रमात विद्यार्थी कल्याण विभागाचा सहभाग होता. डॉ. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही विद्यापीठाच्या हितासाठी काम करीत राहणार असल्याचे डॉ. मोराळे म्हणाले.

निरोप समारंभ आज
डॉ. मोराळे यांचा निरोप समारंभ शुक्रवारी दुपारी तीन वाजता व्यवस्थापन परिषद कक्षात होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. मोराळे १३ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात रुजू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणमध्ये दानवेंचा शिवसेनेतर्फे निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
भाजप प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्याबद्दल काढलेल्या अपशब्दाबाबत पैठण तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
शहरातील महाराणा प्रताप चौकात शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. शेतकऱ्याबद्दल काढलेल्या अपशब्दाबद्दल दानवे यांचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सभापती विलास बापु भुमरे, दत्ता गोर्डे, तुषार पाटील, दादा बारे, ईश्वर दगडे, भुषण कावसनकर, कृष्णा मापारी, भारत लांडगे, एकनाथ गवादे, शिवराज पारिख, संतोष मगरे, अशोक फासाटे, वैभव काळे, अमोल कोथिंबीरे, दिगंबर कोथिंबीरे, गणेश राठोड, बाबा म्हात्रे, दिलीप मगर, नाथ पोरवाल, सतीश पल्लोड, शिवाजी पठाडे, योगेश फासाटे, कुमार काळे, कमलाकर थोटे, कुणाल खताडे, विवेक म्हस्के, अजय पोरवाल, सोनू शिंदे, बबलु जाधव, जयराम फासाटे, योगेश फासाटे, संदीप लबडे, योगेश जाधव, बाप्पा गोरे, अमोल बोंबले, विजय हजारे, बबन ठाणगे, माणिक खराद, राजू मापारी, भरत खराद, अतुल चौधरी, अमोल धस आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पसमध्ये नो पॉलिटिक्स

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
येत्या शैक्षणिक वर्षात नियोजित विद्यार्थी संसद निवडणुकीत राजकीय पक्ष-संघटनांना सहभागी होता येणार नाही, अशी शिफारस आर. एस. माळी समितीने केली आहे. या परिनियमाला राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर ते प्रसिद्ध करण्यात येणार आहे, मात्र निवडणूक सांघिक प्रक्रिया असून, वैयक्तिक प्रक्रिया नसल्याचे सांगत काही विद्यार्थी संघटनांनी शिफारशीला विरोध केला आहे.
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालये आणि विद्यापीठात विद्यार्थी निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीत राजकीय पक्ष-संघटनांचा सहभागी नसावा, अशी शिफारस माजी कुलगुरू माळी समितीने केली आहे; तसेच एकाच दिवशी सर्व महाविद्यालयात निवडणूक घेण्याचे सुचवले आहे. प्रत्येक महाविद्यालयात चार प्रतिनिधी निवडून दिले जाणार आहेत, तर राजकीय संघटनांना निवडणुकीत स्थान राहणार नसल्याचे संकेत आहेत. समितीच्या शिफारशींना राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर त्या राजपत्रात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या शिफारशींचा राजकीय विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. विद्यार्थ्यांनी निवडणूक व्यक्तिगत पातळीवर लढवावी आणि राजकीय संघटनांना दूर ठेवण्याच्या निर्णयाचा ‘एसएफआय’ने निषेध केला आहे. लोकशाही निवडणूक सांघिक प्रक्रिया असल्यामुळे माळी समितीच्या शिफारशीला घटनात्मक आधार नाही. संसदीय प्रणालीत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व विद्यार्थी निवडणुकांमध्ये विद्यार्थी संघटनांना पाहिजे. या गोष्टीचा माळी समितीला विसर पडला असावा, असे ‘एसएफआय’ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनीही शिफारशीला विरोध केला आहे. युती सरकार मागील आघाडी सरकारप्रमाणे कामकाज करीत आहे. खुल्या निवडणुकांचा बोभाटा पसरवून परिनियमांमध्ये विद्यार्थी संघटनांवर अप्रत्यक्ष बंदी घालण्याचे हे कारस्थान आहे असे विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे. या परिनियमातील शिफारशी रद्द कराव्यात. अन्यथा, राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

विसंवाद कशासाठी?
विद्यार्थी संसद निवडणुका राजकीय संघटनांनी लढवणे स्वाभाविक आहे. सामाजिक संघटना निवडणूक लढवत नसतात. राज्य सरकारला गुन्हेगारीकरणाची भीती वाटत असल्यास लिंगडोह समितीने शिफारशीनुसार कॅम्पस बाहेरील राजकीय हस्तकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार प्रशासनाला द्यावेत. तसेच निवडणूक व्यक्तिगत पातळीवर घ्या, असा विद्यार्थ्यांना उपदेश करताना त्यांचा संघटनांसोबत संवाद तोडण्यात येत आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे.

विद्यार्थी संघटना राजकीय असल्या तरी नेहमीच विद्यार्थी हिताचे काम करतात. त्यामुळे ऐन निवडणुकीत संघटनांना दूर ठेवून काय साध्य होणार? शिफारशीला विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहे.
- अमोल दांडगे, विद्यापीठ अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

लोकशाही मार्गाने होणाऱ्या विद्यार्थी निवडणुकीत राजकीय संघटनांना दूर ठेवणे चुकीचे आहे. काही गैरप्रकार होईल अशी प्रशासनाला भीती वाटत असल्यास कडक कायदे करून अंमलबजावणी करा.
- वैभव मिटकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे

प्रत्येक विद्यार्थी कुठल्या तरी विचारसरणीचा पुरस्कर्ता असतो, परंतु तो संघटित असतोच असे नाही. लोकशाही निवडणूक संघटीत प्रक्रिया असून व्यक्तिगत प्रक्रिया नाही. निवडणुकीत सहभागी होण्याचा विद्यार्थी संघटनांचा अधिकार समिती, राज्य सरकार हिरावून घेऊ शकत नाही.
- सुनील राठोड, राज्य उपाध्यक्ष,एसएफआय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोप्या शाळा अवघड केल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षकांच्या बदल्यांसाठी काही जणांनी वजन वापरत शाळा ‘सोप्या’तून ‘अवघड’ क्षेत्रात, तर काही शाळा ‘अवघड’मधून ‘सोप्या’ क्षेत्रात सोप्या करून घेतल्या आहे. शाळांसाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र निवडताना गैरप्रकार करण्यात आले असून, दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता, मुख्यालयापासून जवळ
असतानाही काही शाळा अवघड क्षेत्रात टाकण्यात आल्या आहे, असा आरोप शिक्षक सेनेने केला आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्षा अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामविकास विभागाच्या २७ फेब्रुवारी २०१७च्या परिपत्रकानुसार अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची निवड करून बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेने २३५ शाळांची अवघड क्षेत्रात निवड केली आहे, मात्र शाळांची निवड निकषाची पायमल्ली झाली, असे दिसत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
सोयगाव तालुक्यात अनेक शाळा या दुर्गम भागात येतात. हा तालुका १३५ किलोमीटर अंतरात पसलेला आहे. सोयगावमधील फक्त २५ शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात आला. या उलट सर्वाधिक कन्नड तालुक्यातील सर्वाधिक ५३ शाळा अवघड क्षेत्रात टाकण्यात आल्या आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार, सचिन पोलास, संतोष आढाव, प्रभाकर पवार, प्रदीप जाधव, कल्याण पवार आदी उपस्थित होते.

दुर्गम शाळा सोपी!
सोयगाव तालुक्यातील बोरमाळा तांडा (जंजली कोठा) शाळेला सर्वसाधारण मध्ये टाकण्यात आले. विशेष म्हणजे ही शाळा अंजिठा डोंगराच्या पायथ्याशी आणि सोयगाव तालुक्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. दळणवळणाची साधने नसतानाही शाळा सोप्या क्षेत्रात टाकण्यात आली आहे. येथे पहिली ते आठवीपर्यंत २८४ विद्यार्थी असून, सात शिक्षक कार्यरत आहे, तर दोन पदे रिक्त आहे. ग्रामपंचयतीनेही अवघड क्षेत्रासाठी ठराव घेतलेलो असताना येथील शाळा सर्वसाधारण क्षेत्रात घेण्यात आली. या उलट निंभोरा, पोहरी बुद्रुक येथील शाळा हायवेपासून जवळ असताना त्यांना अवघड क्षेत्रात टाकण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाचा हंगामी कारभार

0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी कल्याण संचालकाची शुक्रवारी निवड करण्यात येणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवड प्रक्रियेस विलंब झाल्यामुळे हंगामी संचालक निवडण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनात आणखी एका हंगामी अधिकाऱ्याची भर पडली आहे.
विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपल्यानंतर नवीन संचालकाची निवड करणे अपेक्षित होते. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निवड प्रक्रिया राबवण्यात आली. या कायद्यानुसार संचालक पदाचा कार्यकाळ पाच वर्षे राहणार आहे. यापूर्वी हा कालावधी दोन वर्षे होता. निवड प्रक्रिया करण्यास विलंब झाल्यामुळे हंगामी संचालक नेमण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला. याबाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा करण्यात आली. अखेर हंगामी पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या पदामुळे विद्यापीठ प्रशासनात आणखी एका हंगामी अधिकाऱ्याची भर पडली आहे.

इच्छुकांची मोठी यादी
विद्यार्थी कल्याण संचालकपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. बीड, उस्मानाबाद येथील काही प्राध्यापकांची नावे चर्चेत होती, पण विद्यापीठ कॅम्पसमधील प्राध्यापकाकडे जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. किमान तीन ते चार महिने संचालकपदाचा कार्यभार संबंधित अधिकाऱ्याकडे राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेतीन हजार क्विंटल तूर मालकाविना​

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
केंद्र सरकारच्यावतीने नाफेडमार्फत झालेल्या जालन्यातील तूर खरेदीची चौकशी सुरू होताच शेतकऱ्यांच्या नावाने घुसलेल्या राजकीय दलालांचे धाबे अक्षरशः दणाणले आहेत. जालन्यातील तूर खरेदी केंद्रावर गेल्या आठ दिवसांपासून साडेतीन हजार क्विंटल तूर बेवारस अवस्थेत पडून आहे. शेतकऱ्यांना फसवणारे व्यापाऱ्यांचे कातडे पांघरलेल्या राजकीय दलालांचा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पर्दाफाश केला असून शुक्रवारी ही सगळी तूर पंचनामा करून जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना दिले.
जालना येथे कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात बाजार समितीच्या आवारात चाललेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना फसवून राजकीय दलाल तूर घालत आहेत, अशा प्रकारच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केल्या होत्या. यासंदर्भात लोणीकर यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा सहकार निबंधक दिलीप गुट्टे, मार्केट कमिटीचे सचिव गणेश चौगुले, मार्केटींग फेडरेशनचे जिल्हा व्यवस्थापक भारतभूषण पाटील
यांच्या सुमारे पाच बैठका घेतल्या. जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबारा व पिक उताराची पाहणी न झाल्याने जालन्यातील तूर खरेदी केंद्रावर कोट्यवधी रुपयांच्या तुरीची बोगसगिरी करून नाफेडच्या माथी तूर दलालांनी खपवल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या राजकारणाचा अड्डा झालेल्या तूर खरेदी प्रक्रियेतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाची नियुक्ती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी २० एप्रिलला केली. तेंव्हा पासूनच जालन्यातील तूर खरेदी केंद्रावरील सगळे वातावरण एकदम बदलले. तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबारा व पिक उताऱ्यांची प्रत आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि हमीपत्र घेतले जाऊ लागले. अगदी पहिल्या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात एक चक्कर मारली असता तूर खरेदी केंद्रावर मोठी पळापळ झाली.


जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या आठ दिवसांपासून बेवारस पडलेल्या तुरीच्या पोत्यांच्या कथित मालकाला शुक्रवारी अंतिम संधी देण्यात येणार आहे. यानंतर जर कुणीच समोर आले नाही तर ती सगळी तूर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन जप्त करणार आहे.
शिवाजी जोंधळे, जिल्हाधिकारी.

तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी आम्ही सुरू केली आहे. मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयातून तूर विक्री करणाऱ्या व्यक्तींचे नावाची यादी त्यांनी विकलेली तूर याचा तपशिलवार माहिती गोळा झालेली आहे. आता आम्ही पुढील तपासणीमध्ये सातबारा उताऱ्यावर तुरीचा पेरा नसलेल्या विक्री करणाऱ्या व्यक्तींचे नावे शोधून काढतो आहोत. त्यासोबतच अन्य काही तपशिलात माहिती जमा करत आहोत.
राजेंद्र गौर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू तस्कराचा भररस्त्यात होरपळून मृत्यू

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । बीड

दुचाकीवरून दारूचा साठा नेत असताना समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही दुचाकींनी अचानक पेट घेतल्याने दारूची तस्करी करणाऱ्या इसमाचा भर रस्त्यात होरपळून मृत्यू झाला. माजलगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर हा विचित्र अपघात घडला.

माजलगाव शहरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील दुगड पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावरील दारूची दुकाने व बिअरबार बंद झाल्यापासून माजलगाव शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. माजलगावमध्ये आज अशीच एक विचित्र घटना घडली आहे. दारूच्या बाटल्या घेऊ येणाऱ्या एका दुचाकीस्वाराची आणि दुसऱ्या एका दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या या अपघातात दोन्ही बाईक्सने पेटल्या. त्यापैकी दारूची तस्करी करणारा तरूण बाईकखाली अडकल्याने त्याचा या विचित्र अपघातात होरपळून मृत्यू झाला. तर दुसरा बाईकस्वार नितीन जयस्वाल हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला बीड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात होरपळून ठार झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.ए. कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डि.डि.मांडवे आणि पोलीस जमादार पी.के.खोडवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंविरोधात शेतकऱ्यांच्या मुलांचे उपोषण

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । जालना

बेलगाम वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात राजकीय पक्षांनी दंड थोपटलेले असतानाच शेतकऱ्यांची मुलंही आता आक्रमक झाले आहेत. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी दानवे यांच्या भोकरदन येथील घरासमोरच उपोषण सुरू केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने दानवे यांची प्रचंड कोंडी केली आहे.

रावसाहेब दानवे यांनी शेतमाल खरेदीच्या मुद्द्यावर बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले होते. विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांनी या वक्तव्याचा कडक शब्दात निषेध नोंदविला. शिवसेनेनेही या मुद्द्यावरून दानवे यांच्या विरोधात रान माजवलेले असतानाच आता या आंदोलनात शेतकऱ्यांची मुलेच उतरली आहे. उस्मानाबाद, नाशिक, परभणी व औरंगाबाद येथून आलेल्या काही तरुणांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून दानवे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अन्नाचा त्याग करीत उपोषण सुरू केले आहे.

आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. दानवे यांनी आमच्या शेतात राबणाऱ्या कष्टाळू बापाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून, ते जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,' असा इशारा शेतकऱ्यांच्या या मुलांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योजना पोचवण्यात अपयशः आयुक्त

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
‘मनरेगा, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वन विभाग, मत्स्यविभागाच्या विविध योजना ज्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाच्या आहेत. मात्र, या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोचवण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. अनेकांना या योजनांविषयीची माहितीच नाही,’ अशी कबुली विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.
गेल्या आठवड्याभरपासून डॉ. भापकर यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचा आढावा घेतला. या आढाव्या विषयी पत्रकारांशी बोलत होते. औरंगाबाद, बीड सारख्या जिल्ह्यामध्ये शासकीय योजनांमध्ये चांगले काम झाले असल्याचे सांगत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंत्रणांचे नियोजन शून्य असल्याचे भापकर यांनी कबुल केले. विभागात घेतलेल्या बैठकांबद्दल ते म्हणाले, ‘शासनाच्या सर्व महत्त्वाच्या योजनांबाबत तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यकांपासून ते उपविभागीय अधिकारी व जिल्हा‌स्तरीय अधिकाऱ्यांसोबत वन टू वन संवाद साधला. अनेक अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती खालच्या स्तरावर पोचवलीच नसल्यामुळे त्यांच्या नंतर गावपातळीपर्यंत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती पोहोचू शकली नाही. विभागीय स्तरावर तसेच जिल्हास्तरावर झालेल्या बैठकांची माहिती अधिकाऱ्यांनी खालच्या स्तरापर्यंत पोचवण्यातच आली नाही. या बैठकांच्या माध्यमातून अनेक तलाठ्यांना योजनांबद्दल माहितीच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे अनेकांची कानउघाडणी केल्याचेही भापकर यांनी सांगितले.

प्रत्येक गावाला ग्रामसंपर्क अधिकारी
मराठवाड्यातील प्रत्येक गावांमध्ये शासकीय योजनांची संपूर्ण अंलबजावणी व गावातील प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामसंपर्क अधिकारी, तर तालुका पातळीवर संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही आयुक्तानी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...अखेर तो मुलगा आईच्या कुशीत

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरच्यांपासून दुरावलेल्या दहा वर्षांच्या मुक्या आणि निरीक्षर मुलाच्या आईवडिलांचा शुक्रवारी तब्बल पाच तास शोध घेत सायबर पथकाने त्यांना शोधून काढले. आणि मुलाला त्यांच्या स्वाधीन केले.
मिलकॉर्नर परिसरात एक दहा वर्षांचा बालक रडत असताना सायबर सेलचे कर्मचारी गोकुळ कुत्तरवडे यांना आढळला. त्यांनी बालकाची चौकशी केली. यावेळी त्याला बोलता तसेच लिहता वाचता येत नसल्याचे दिसून आले. याच्या पालकांचा शोध कसा घ्यावा, हा पोलिसांना प्रश्न पडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती ‌देण्यात आली. एसीपी रामेश्वर थोरात यांनी पथकाला कोणत्याही परिस्थितीत मुलाच्या पालकांचा शोध घेण्याचे आदेश दिले. सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेसद्वारे माहिती देण्यात आली. परंतु कोठेही असा मुलगा हरवल्याची तक्रार आली नव्हती. या मुलाला सोबत घेत पथकाने बेगमपुरा, हर्सूल, जटवाडा,उस्मानपुरा, मुकुंदवाडी, पडेगाव आदी प‌रिसर‌ पिंजून काढला. जयभवानीनगर परिसरात त्यांना यश आले. या मुलाला एका नागरिकाने ओळखले. त्याच परिसरातील मनीषा कांताराम म्हस्के (रा. जयभवानीनगर) यांचा हा मुलगा असल्याची माहिती मिळाली. म्हस्के कुटुंब घरी नव्हते. त्यांचा मोबाइल क्रमांक मिळवत त्यांना कॉल करण्यात आला. म्हस्के कुटुंब देखील बालक बेपत्ता झाल्याने घाटी परिसरात त्याचा शोध घेत होते. पालकांना पोलिस आयुक्तालयात बोलावण्यात आले. एसीपी थोरात यांनी खात्री पटवून बालकाला आईच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे - घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गजानन कल्याणकर, उन्मेश थिटे, पीएसआय हेमंत तोडकर, धुडकू खरे, गोकुळ कुत्तरवडे, अतुल तुपे, धनंजय सानप आदींनी केली.

हात सोडला नाही
मिलकॉर्नर परिसरात पोलिस मुख्यालय असल्याने या ठिकाणी गणवेशात अनेक पोलिस दिसून येतात. हा मुलगा गणवेशातील पोलिसांना घाबरत होता. साध्या वेशात असलेल्या गोकुळ कुत्तरवडे यांनी त्याची चौकशी केली. यावेळी मुलाला धीर वाटल्याने त्याने कुत्तरवडे याचा पकडलेला हात शेवटपर्यंत सोडला नाही. या मुलाच्या जेवणाची व्यवस्था करीत पाच तासासाठी पोलिस याचे पालक बनले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्वतंत्र मूल्यमापन व्हावे

0
0

संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्वतंत्र मूल्यमापन व्हावे
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘संभाजीराजांचे स्वतंत्र राजा म्हणून आपण मूल्यमापन केले नाही. त्यांच्या कार्याला व कर्तृत्वाला स्वतंत्रपणे मुजरा करू शकलो, तर हाच शंभूराजांचा सन्मान आहे,’ असे मत प्रा. नामदेव जाधव यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी टी. व्ही. सेंटर येथे आयोजित संभाजीराजे जयंती उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा. जाधव म्हणाले, ‘आबासाहेब तुम्ही निर्धास्तपणे पुण्याकडे निघा, औरंगाजेबाचे मी बघतो काय ते, असे शिवाजी महाराजांना म्हणणारे अवघ्या ९ वर्षांचे शंभूराजे अडीच महिन्यानंतर रायगडावर जाऊन पोचले. जगात वडिलांनी मुलांची सुटका केल्याचे अनेक उदाहरणे असतील. परंतु मुलांनी वडिलांची सुटका केल्याची दोनच उदाहरणे आहेत. एक कृष्ण व दुसरे संभाजी महाराज.’ आगऱ्यातून औरंगजेबाच्या तावडीतून शिवाजी महाराजांची सुटका कशी झाली हा प्रसंग त्यांनी उलगडला. ते पुढे म्हणाले, ‘शहाजीराजांनी जो पराक्रम केला त्यापेक्षा दोन पावले जास्त पराक्रम शिवाजी महाराजांनी केला. शिवाजी महाराजांच्या दोन पावले पुढचा पराक्रम हा संभाजी राजांचा आहे. १२ मे रोजीचे विशेष महत्त्व आहे कारण याच दिवशी शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्रा येथे गेले होते. परंतु जाताना ते एकटे न जाता अवघ्या नऊ वर्षांच्या शुभराजेंना सोबत घेऊन गेले. तेथे औरंगजेबाने त्यांना नजर कैदेत ठेवल्यानंतर शंभूराजांनी मात्र रामसिंग याच्याकडून आगऱ्यातील सर्व रस्त्यांची माहिती करून घेतली. त्यानंतर १७ मे रोजी शिवाजी महाराज वेशांतर करून बाहेर पडले. त्याच्यानंतर अडीच महिन्यांनी शंभूराजे तेथून बाहेर पडले. शिवाजी महाराज व संभाजी राजे दोघेही युगपुरूष असून प्रत्येकाने आपापल्या कर्तृत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.’ यावेळी नानासाहेब कुटे-पाटील, किशोर शितोळे, अंबादास दानवे, अंकिता विधाते, ऋचा बोडखे, बाळासाहेब थोरात, गणेश अधाने, नितीन शेळके, ज्ञानेश्वर शेळके, बाळासाहेब औताडे, राहुल कोरडे, साहेबराव मुळे, सतीश वेताळ, नानासाहेब पाटील, गणेश कदम, प्रशांत शेळके आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच हजार वाहनांची तपासणी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत शहरात चाललेल्या ऑल आऊट ऑपरेशमध्ये अडीच हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८३४ वाहनांवर केस करून तीन लाख ८० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी ऑल आऊट ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले होते. गुन्हेगारांचा शोध घेणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करणे हा या ऑपरेशनचा हेतू होता. सतरा पोलिस ठाणे हद्दीत हे ऑपरेशन राबवण्यात आले. कोम्बिग व नाकाबंदीमध्ये २५३० वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत १८३४ केसेस करण्यात आल्या. यामध्ये तीन लाख ८० हजार रुपये दंड वसूल झाला.
कागदपत्र तपासणी, वाहन परवाना, सिटबेल्ट, हेल्मेट नसणे, विनाक्रमांक वाहने,‌ चित्रविचित्र नंबरप्लेट, ओव्हर सिट वाहने आदीवर कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे - घाडगे, विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांच्यासह ९० पोलिस अधिकारी व ५२० कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बदल्यांबाबत शुद्धीपत्रक काढा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अवघड व सोपे क्षेत्र त्याचे निकष यामुळे सर्व जिल्ह्यांत अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत शासन निर्णयात दुरुस्तीसाठी शुद्धीपत्रक काढावे, अशी मागणी शिक्षक संघटना समन्वय समितीने केली आहे.
शिक्षक संघटना समन्वय समितीने ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांची भेट घेऊन बदल्यांबाबत चर्चा केली. २७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयातील काही बाबींविरोधात बाजू मांडली. या मुद्द्यांवर सचिवांसोबत चर्चा करून शुद्धीपत्रक काढण्याची मागणी समन्वय समितीकडून करण्यात आली.
या मागण्या मान्य करून यावर लवकरात लवकर शासन निर्णयात शुद्धीपत्रक काढण्याची मागणी समन्वय समितीकडून ग्रामविकास सचिव असिम गुप्ता यांच्याकडे करण्यात आली. याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन गुप्ता यांनी दिले. याप्रसंगी काळूजी बोरसे, सदानंद माडेवार, मधुकर काठोळे, राजाराम वरूटे, काशीनाथ भोईर, शिरीष पाटील आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्या मागण्या
- शिक्षकांच्या बदल्या तालुक्याबाहेर करू नयेत
- महिला शिक्षिकांना अवघड क्षेत्रात पाठवू नये
- ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना बदलीत सूट मिळावी
- सर्वसाधारण क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रातच बदली झाल्यावर पुढील ५ वर्षे बदली पात्र यादीत समाविष्ट करू नये
- पसंतीनुसार पहिल्या टप्प्यात मागणी केलेल्या २० शाळा उपलब्ध झाल्या नाहीत, तर पुन्हा दुसऱ्यांदा पसंतीक्रम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या संमेलनात तक्रारींचा निपटारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात शुक्रवारी झालेल्या पोलिस आयुक्तांच्या जनता संमेलनात नागरिकांनी १४ तक्रारी मांडल्या. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी या तक्रारींचे निरसन केले. शिवाय या भागातील गुटखा विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई, पंढरपूर येथे पोलिस चौकी करणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी ५ वाहतूक पोलिस कर्मचारी, १ गस्ती वाहन, दामिनी पथक तैनात करण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त यादव यांचे हे दुसरे जनता संमेलन होते. या भागातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी परिसरात १५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले. राजंणगाव येथील दत्तु हिवाळे यांनी ग्रामंपचायतीच्या वसुलीसाठी पोलिस बंदोबस्त, महिलांच्या रक्षणासाठी दामिनी पथक, स्वतंत्र पोलिस ठाणे, आदी प्रश्न उपस्थित केले. वडगाव कोल्हाटी येथील सुनील काळे यांनी दत्तक गाव योजना व वाढती गुन्हेगारी हा प्रश्न विचारला. बजाजनगर येथील प्रदीप माळी पोलिस मित्रांना ओळखपत्र देण्याची मागणी केली. या शिवाय रांजणगाव येथे सर्रास गुटखा विक्री होत हे निदर्शनास आणून दिले. माधवराव कावरके यांनी अवैध प्रवासी वाहतूक, सीतराम वैष्णव यांनी अज्ञात व्यक्तींकडून निनावी फोन, भारत फुलारे यांनी पुरूष तक्रार निवारण केद्र, अनिल चोरडाया यांनी अवैध मुरूम चोरी, अशोक खिल्लारे यांनी देशी दारू, श्रीनिवास यांनी एक प्लाटचे सात मालक, आदी विषय उपस्थित केले. जोगेश्वरी येथील वनिता रासवे यांनी अपहरण करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली. या सर्वांच्या प्रश्नांना आयुक्तांनी उत्तरे दिली.
जनता संमेलनाचे प्रास्तविक पोलिस आयुक्त विनायक ढाकणे यांनी केले, तर सहायक पोलिस आयुक्त नागानाथ कोंडे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिस आयुक्तांचा सत्कार केला.
यावेळी संरपच महेश भोंडवे, प्रवीण दुबिले, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, सतीश पाटील, लक्ष्मण लांडे, जिल्हा परिषद सदस्य रेखा नांदूरकर, कलीम सय्यद, दुर्गा निबुळकर, विठ्ठल कांबळे, धनश्री कांबळे, अनिता डाहरिया, उपसरंच विष्णू जाधव, राम पाटोळे, शरद जाधव, शरद किर्तीकर, सय्यद अलिम, रायभान शेलार, महेद्रसिंग ठाकूर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदवलेली तूर खरेदी; पैठणचे केंद्र बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभी असलेली व २२ एप्रिलपर्यंत नोंद करण्यात आलेली सर्व तूर खरेदी करण्यात आली. त्यामुळे येथील शासकीय तूर खरेदी केंद्र शुक्रवारी बंद करण्यात आले.
येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावर २२ एप्रिल रोजी ३१५ शेतकऱ्यांची ७ हजार ५०० क्विंटल तूर पडून होती. शासनाने २२ एप्रिलपर्यंत केंद्रावर नोंद झालेली तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या तुरीचे पंचानामे करण्यात आले. त्यानंतर २९ एप्रिलपासून नोंदणी केलेली व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेली तूर खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली. या १४ दिवसांत २७५ शेतकऱ्यांची ७ हजार ५१९.२० क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती तालुका मार्केटिंग अधिकारी ए. एस. तटकारे यांनी दिली.
बाजार समिती, सहायक निबंधक कार्यालय, खरेदी विक्री कार्यालय, मार्केटिंग फेडरेशन यांनी समन्वय साधून योग्य नियोजन केल्याने २९ एप्रिलनंतर तूर खरेदी सुरळीत पार पडल्याची माहिती सहाय्यक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी दिली.
नोंदणी केलेली सर्व तूर शासनाने खरेदी केली असली तरी तालुक्यात सुमारे सहा हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात आहे. ते शेतकरी पैठण येथील तूर खरेदी केंद्रावर खेट्या मारत आहेत.

शासनाने शेतकऱ्याकंडील सर्व तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदीचे आदेश प्राप्त होताच शासकीय तूर खरेदी केंद्रावर पुन्हा तूर खरेदी सुरू करण्यात येईल.
-ए. एस. तटकारे, तालुका मार्केटिंग अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीडीओ सुटीवर; घरकुलचे पेमेंट थांबले

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
गटविकास अधिकारी डॉ. राम लाहोटी पुन्हा रजेवर गेल्यामुळे पंचायत समितीचा कारभार ठप्प झाला आहे. गटविकास अधिकारी यांची डिजिटल स्वाक्षरी नसल्याने घरकुल योजनेतील ३०० लाभार्थ्यांची रक्कम अडकली आहे.
खुलताबाद तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेतील ३६०, रमाई आवास योजनेतील ६५, शबरी आवास योजनेतील १५,असे ४४० घरकुल मंजूर आहेत. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पेमेंट ऑनलाइन देण्याची पद्धत शासनाने सुरू केली आहे. त्यासाठी गटविकास अधिकारी यांची डिजिटल स्वाक्षरी झाल्याशिवाय लाभार्थ्यांच्या बँक खात्यात घरकुलाचा हप्ता जमा होत नाही. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. लाहोटी हे सात दिवसापासून रजेवर गेल्यामुळे त्यांच्या जागेवर इतर कोणाचीही प्रभारी म्हणून नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे डिजिटल स्वाक्षरी नमुना नसल्यामुळे घरकुलाचे पेमेंट मिळण्यास उशीर होत असल्याने लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारीत आहेत. येथे तातडीने प्रभारी गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेश जिजाबा अधाने, जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गांडूळ’ पदवीने दानवेंचा निषेध

0
0

औरंगाबाद ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून ‘साले’ असा अपमानजनक शब्द वापरला. या असंवेदनशील वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी दानवे यांना विद्यापीठात शिकत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘गांडूळ’ पदवी दिली. शेतकऱ्यांचा मुलगा म्हणवणारे दानवे शेतकऱ्यांचा अत्यंत खालच्या शब्दात अपमान करतात. या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात ‘एसएफआय’चे राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड, लोकेश कांबळे, सत्यजीत म्हस्के, प्राजक्ता शेटे, कुणाल गायकवाड, रवी वाहूळ, राहुल खंडारे, ज्ञानेश्वर पांचाळ, सिद्धार्थ गायकवाड आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images