Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिक्षकांचे पगार जानेवारीपासून ऑनलाइन

$
0
0
राज्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमधील शिक्षकांना ऑनलाइन पगार देण्याचा प्रस्ताव कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडून होता. आता सर्व संबंधित यंत्रणांनी सकारात्मक भूमिका घेतल्या जानेवारीपासून गुरूजींना ऑनलाइन पगार मिळणार आहे.

बाजार समितीवर आता ‘सीसीटीव्ही’चा वॉच

$
0
0
जाधववाडी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हालचाली शुक्रवारापासून येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणे सुरू झाले आहे. परिसरात प्रमुख ठिकाणी अकरा कॅमेरे बसविण्यात आले असून, गरजेनुसार त्यात वाढ करण्यात येईल, अशी माहिती समिती अधिकाऱ्यांनी दिली.

बाजारात तुरी!

$
0
0
पालेभाज्यांची आवक बाजारात जोमाने सुरू झालेली असतानाच आता गाजरासह तुरीच्या शेंगाची आवकही सुरू झाली आहे. सध्या परपेठांच्या मालांची आवक सुरू असून, स्थानिक परिसरातील गाजर दहा ते वीस दिवसात दाखल होतील, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

कारगिल उद्यानाची जागा सैनिकी मंडळाला

$
0
0
गारखेडा भागातील वॉर्ड क्रमांक ८४ मधील कारगिल स्मृती उद्यानाची जागा विकसीत करण्यासाठी जिल्हा सैनिकी मंडळाला तीस वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा सैनिकी मंडळ तीन कोटी रुपये खर्च करून या जागेचा विकास करणार आहे.

संतसृष्टीसाठी सुमारे पाच कोटी

$
0
0
उल्कानगरी भागात संतसृष्टी उभारण्याच्या प्रस्तावासह सहा कोटींच्या व ऐनवेळी आलेल्या दोन कोटी रुपये किंमतीच्या प्रस्तावांना मान्यता देत सभापती नारायण कुचे यांनी आज शुक्रवारी स्थायी समितीची बैठक संपवली. ‘नगरसेविका उर्मिला चित्ते यांच्या राजीनामा प्रकरणानंतर स्थायी समितीची बैठक तहकूब करा.

औरंगाबाद-तिरुपती रेल्वेला 'ब्रेक'

$
0
0
औरंगाबादहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी औरंगाबाद ते तिरुपती विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. भक्तांच्या मागणीनुसार ही रेल्वे सेवा वाढविण्यात आली, मात्र पुढील महिन्यापासून ही सेवा खंडित होण्याची चिन्हे आहे.

पवननगरात राजकारण्यांची गर्दी

$
0
0
सिडको एन - ९ पवननगरमधील त्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्या पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गाजला आणि लगोलग त्या जागेवर राजकारण्याची गर्दी होणे सुरू झाले.

पुढील वर्षी नवे उड्डाणपूल

$
0
0
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या तीन उड्डाणपुलांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या कोणी खोडा घातला नाही तर, निविदा प्रक्रिया डिसेंबरअखेर पूर्ण होऊन २०१४ मध्ये उड्डाणपुलांच्या बांधकामाला सुरूवात होईल.

भाजप नगरसेविकेने फेकला राजीनामा

$
0
0
सिडको एन ९ पवननगर येथील बुद्ध विहारावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात पालिका प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नसल्याच्या निषेधार्थ स्थायी समितीमधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका उर्मिला चित्ते यांनी आज (शुक्रवार) स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींच्या अंगावरच राजीनामा फेकला.

मतदार यादीतील नावे दबावाखाली वगळली

$
0
0
इंदिरानगर, बायजीपुरा भागात राजकीय दबावाखाली हिंदू व दलीत मतदारांची नावे वगळण्याचे कारस्थान सुरु आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदारांवर याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या डेमोक्रेटिक पक्षाने केली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात पेशंटची गैरसोय

$
0
0
वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी व परिसेविका यांची सामान्य रुग्णालय, औरंगाबाद येथे प्रतिनियुक्तीवर नेमणूक झाली आहे.

बीडचा ट्रक हिंगोलीत पेटविला

$
0
0
उसतोडणीसाठी कामगारांना घेऊन जाण्यासाठी आलेला ट्रक चाकूचा धाक दाखवून पेटवून देण्यात आला. औंढा नागनाथ जवळच्या गांगलगाव-दुधाळा रस्त्यांवर हा प्रकार घडला.

महानगर-३ साठी शेतजमीन देण्यास विरोध

$
0
0
सिडकोच्या वाळूज महानगर-३ साठी जमीन देण्यास शेतक-यांनी तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेताखालील जमीन देणार नाही, असा निर्धार शेतक-यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केला.

कायद्याच्या नियमांना आक्षेप घ्या

$
0
0
मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यातील तरतुदी प्रभावी आहेत. या कायद्यातील महत्त्वाच्या कलमांच्या अंमलबजावणीचा आग्रह धरावा. या कायद्याचे नियम विधान मंडळात मांडले जाणार आहेत.

८६ लाखांचा पतसंस्थेत गैरव्यवहार

$
0
0
सेनगाव येथील संत नामदेव सहकारी पतसंस्थेत ८६चा लाखां अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. लेखा परीक्षकांनी बँक व्यवस्थापकासह इतर चार जणाविरंद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

जिल्हा साहित्य संमेलन बाजारसावंगीत

$
0
0
मराठवाडा साहित्य परिषद शाखा खुलताबाद व महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, बाजारसावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले जिल्हा मराठी साहित्य संमेलन येत्या १९ डिसेंबर रोजी बाजारसावंगी (ता. खुलताबाद) येथे आयोजित करण्यात आले आहे.

जनता, प्रशासनाचा आपसात समन्वय आवश्यक

$
0
0
आगामी काळात निवडणुका होत आहेत. हा विषय जनता व प्रशासनासाठी महत्वाचा असून त्यासाठी जनता व प्रशासनाचे आपसातील समन्वय महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.

फॉल्टी बिल दाखवून होणारी वसुली थांबवा

$
0
0
कन्नड भागात अनेक ठिकाणी फॉल्टी मीटर दाखवून सर्वसामान्य नागरिकांकडून हजारोंची बिले उकळली जात आहेत. ही पद्धत बंद करून फॉल्टी मीटर आढळल्यास ते त्वरित बदलून, दोषरहित मीटरप्रमाणे बिल प्रमाणे केली जाणारी वसुली बंद करावी, अशी मागणी वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाने केली आहे.

२ विविध घटनांमध्ये दोघांच्या आत्महत्या

$
0
0
दोन विविध आत्महत्येच्या घटना शहरातील चिकलठाणा व हर्सुल भागात घडल्या. या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नसून सबंधीत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विभागप्रमुखांचेही यापुढे कामांसाठी जिल्ह्यात दौरे

$
0
0
जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांना यापुढे जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी दौरे करावे लागणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी गेल्या आठवड्यापासून धडक तपासणी मोहिम सुरू केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images