Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शाळांची ‘प्रगती पुस्तके’ ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या कमी होत असल्याची चर्चा होत असली, तरी अनेक शाळा अपवाद आहेत. जिल्हा परिषदेच्या असा शाळांच्या प्रगतीचे रिपोर्टकार्ड पोर्टलद्वारे विद्या परिषद पालकांसमोर ठेवणार आहे. जिल्ह्यातील निवडक ५०० शाळांचे हे रिपोर्टकार्ड असेल. शाळेतील उपक्रम, सुविधांपासून ते भविष्यातील संकल्प जाणून घेता येणार आहेत. या शाळांमधील विद्यार्थी संख्येचा वाढता आलेख तर, थक्क करणारा आहे. येत्या दोन-तीन दिवसांत प्रगती पुस्तकाची वेबसाइट सर्वांना उपलब्ध होईल.
मराठी शाळांच्या तुलनेत इंग्रजी शाळा स्वतःची मार्केटिंग करण्यात आघाडीवर असतात. मराठीची पटसंख्या कमी होत असताना, अनेक जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा टिकाव्यात, यासाठी प्रगत शाळांचे प्रगती पुस्तक आता नव्या स्वरुपात पालकांसमोर, समाजासमोर ठेवण्यासाठी पोर्टल तयार केले जात आहे. प्रादेशिक विद्या परिषद त्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षकांचे प्रयत्न यांमुळे शाळांचा दर्जा उंचावला आहे. अशा ५०० शाळांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात येत आहे.
या शाळांच्या प्रगतीची माहिती पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे. पाच वर्षांत शाळेने केलेली प्रगती, अध्यापन पद्धती, विद्यार्थी संख्या, इतरांपेक्षा वेगळे उपक्रम, स्थलांतर रोखण्यासाठी केलेले उपक्रम आणि त्याचे परिणाम, लोकसहभाग, उपलब्ध सुविधा अशा विविध निकषांवर शाळांची प्रगती मांडली आहे. या बदलांमुळे शाळेच्या गुणवत्तेत पडलेला फरक, मागील पाच वर्षांत विद्यार्थी संख्येत झालेली वाढ, विशेष उपक्रम अशी शाळेची सगळी माहिती वेबसाइटवर उपलब्ध असेल. या उपक्रमाला ‘माझी शाळा-यशोगाथा’ असे नाव देण्यात आले आहे.

प्रगती पुस्तकात काय...
शाळेत आयोजित होणारे उपक्रम, उपलब्ध सुविधांचा उल्लेख प्रगती पुस्तकात आहे. त्याचबरोबर शाळेचे विशेष उपक्रम, संकल्पही मांडण्यात आले आहे. शाळेतील उपक्रमांची दखल घेऊन विविध वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीचेही संकलन करण्यात आले आहे. पाच वर्षांत विद्यार्थी संख्येतील वाढ, शिक्षक संख्या, मंजूर शिक्षक संख्या याची माहितीही प्रगती पुस्तकात असेल. मुख्याध्यापक, त्यांचा मोबाइल क्रमांकही देण्यात उपलब्ध असेल. त्यामुळे शाळेचे प्रगती पुस्तक पाहून प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व पालकांची सोय होईल.

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या हेतूने आमचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील शंभर टक्के प्रगत शाळांची संख्या १६००पेक्षा अधिक आहे. त्यातील ५०० शाळांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. प्रवेशाच्या सुरुवातीलाच आम्हाला आमच्या शाळांची माहिती पोर्टलद्वारे पालकांना उपलब्ध करून द्यायची आहे. रिपोर्टकार्ड पाहून पाल्याला कोठे प्रवेश द्यायचा, हे त्यांना ठरवणे सोपे येईल.
- सुभाष कांबळे, संचालक, प्रादेशिक विद्या परिषद, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरातत्व विभागाकडून खंडोबा मंदिर पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी साताऱ्यातील हेमाडपंती खंडोबा मंदिर, परिसर व दीपमाळेची पाहणी केली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासोबत पुरातत्व विभागाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंदिर संवर्धन व दुरुस्तीसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचा प्रस्ताव नव्याने पाठवण्याचा निर्णय झाला होता. यासंदर्भात लवकरच निविदा काढून कामाला सुरूवात करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी विश्वस्तांना सांगितले.
गेल्या वर्षी मंदिर संवर्धन व दुरुस्तीसाठी एक कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, तीन वेळेस निविदा काढूनही कंत्राटदार न मिळाल्याने निधी परत गेला. मंदिर परिसरात असलेल्या दीपमाळेची आधीच पडझड झालेली आहे. त्यातच २४ एप्रिल रोजी मंदिराच्या मागच्या बाजूची एक चिरा ढासळली. त्यानंतर अधिकारी येऊन फक्त पाहणी करून गेले होते. आता या कामासंदर्भात लवकरच पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार अधिकाऱ्यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी यावेळी केली. यावेळी पुरातत्व विभागाचे संचालक खंदारे, साखरे, गंगाधर पारखे, संतोष पळसकर, विशाल धुमाळ आदींची उपस्थिती होती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम कधी सुरू होणार

$
0
0

एटीएम कधी सुरू होणार

बँक अधिकारीच गोंधळात; ९० टक्के एटीएम बंदच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एटीएम कधी सुरू होणार हे बँक अधिकारीवर्गालाच माहित नसल्याने ते पुरते गोंधळात पडले आहेत. ६५ दिवसांपासून बंद असलेले शहरातील एटीएम सुरू होण्याबाबत आता अधिकृतरित्या कोणालाच माहिती नसल्याचे शहरातील बँक अधिकारी आणि चॅनेल मॅनेजर्सच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहेत. तब्बल ९० ते ९५ टक्के एटीएम बंद आहेत.

काही बँकांच्या मॅनेजर्सच्या मते आता ही परिस्थिती कायमचीच राहू शकते, डिजीटल मनीचा वापर वाढावा यासाठी सर्वच बँकांनाच चलन पुरवठाही कमी केला जात आहे. मागणी केलेल्यापैकी फक्त २५ ते ३० टक्केच बँकांना चलन पुरवठा होत आहे. त्यातून जास्तीत जास्त रक्कम बँकांमध्ये काऊंटरवर ठेवणे अपेक्षित आहे. यामुळे औरंगाबादमधील एटीएम ‘बंद’चे पुराण सुरूच आहे. औरंगपुरा, उस्मानपुरा, क्रांतिचौक,जालना रोड, शहानूरमियाँ दर्गा परिसर, सहकार नगर, दशमेशनगर, सातारा परिसर, बीड बायपास, देवळाई, सिटी चौक, गुलमंडी, निराला बाजार, रोशनगेट, शहागंज या परिसरातील मुख्यत्वेकरून एसबीआयच्या शाखांचे एटीएम बंद आहेत. याशिवाय एचडीएफसी आणि महाराष्ट्र बँकांची सिडको हडकोतील एटीएम बंद आहेत. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. १ एप्र‌िलपासून स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन झालेल्या असोसिएट बँकांचे सर्व्हर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्व्हर बंद झाल्याने एटीएमवर परिणाम झाला आहे. ऑनलाइन आणि ऑफसाइट मशीनचे सर्व्हर बँकांच्या कार्यालयातच असल्याने अधिक त्रास झाला. यातही अनेक तांत्रिक अडचणी आल्या. बँकामध्ये रॅन्समवेअर व्हायरसमुळेही एटीएम बंद करण्याचे सल्ले दिले जात आहेत. यामुळेही एटीएमही बहुतांश ठिकाणी बंदच आहेत, पण याला कुठलाही तांत्रिक पुरावा दिला जात नसल्याने अनेक बँकांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ६० ते ६५ ‌दिवसांत बहुतांश ग्राहकांना बँक व्यवहार करता आलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ श्रमदानासाठी वैरागडमध्ये हजारो हात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, लातूर

गावावरील दुष्काळ सामूहिक प्रयत्नातूनच कायमस्वरूपी हटविण्याच्या निर्धारातून अहमदपूर तालुक्यातील वैरागडच्या ग्रामस्थांनी मंगळवारी दिवसभर श्रमदान केले. गाव शिवारातील पाणी शिवारातच अडले पाहिजे, यासाठी त्यांनी संधारण कामांना आकार दिला.
डाॅ. हरीवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानने वैरागड (ता. अहमदपूर) हे गाव तीन वर्षांपासून दत्तक घेतले आहे. या गावाच्या परिसरामध्ये श्रमदानातून जलयुक्त शिवारचे कामे चालू असल्याचे पाहून गावकऱ्यांनी एक बैठक घेवून सर्व गावकऱ्यांनी मिळून आपल्या शिवारामध्ये डीप सीसीटी, खोल सलग समतल चर, अशा शास्त्रोक्त पद्धतीने पाणी अडवणे शिवारात पाणी जिरवणे या साठी महाश्रमदान करायचे ठरले. कृषि विभागाने सोमवारी कामाचे रेखांकन करून दिले. त्यानुसार मंगळवारी सकाळी गावातील महिला,पुरुष, लहान मुले, युवक वृद्ध असे सर्वजण मिळून टोपले, कूदळ, खोरे असे साहित्य घेवून शिवारात दाखल होत कामाला सुरुवात केली. कोणताही गाजावाजा न करता एकमताने गांवकरी श्रमदान करत होते. याची माहिती मिळताच, तहसीलदार प्रविण मेंगशेट्टी यांनी भेट देऊन त्यांनीही श्रमदान केले. या श्रमदानाच्या निमित्ताने गावाजवळील विस ते पंचवीस हेक्टर शिवारात हे काम पूर्णत्वास जात आहे.
या वेळी तहसिलदार प्रविण मेंगशेट्टी, कृषी सहाय्यक आशा मूंडे, तलाठी माधव जोशी, आदीं सह गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासरी छळ झाल्याने महिलेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
छळ झाल्यामुळे एका २३ वर्षीय विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती आशुतोष सोमदे याला अटक केली आहे.
सिडको वाळूज महानगर येथील कीर्ती (वय २३) यांचा विवाह अशुतोष सोमदे सोबत ११ मे २०१५ रोजी झाला होता. लग्नात पाच लाख रुपयांची मागणी केली होती. सासरच्यांना रोख चार लाख रुपये दिले व उर्वरीत एक लाख रुपये, संसारोपयोगी वस्तू देण्याचे सांगितले होते. पण, त्यावेळी त्यांनी वस्तूऐवजी पैशाची मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांना लग्नाच्या दिवशी एक लाख रुपये दिले. या मुलीली लग्नानंतर तीन महिने नीट नांदवले, त्यानंतर घरकामावरून मारहाण करण्यात येत असे. तिच्या सासरकडील मंडळीनी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आण, असा तगादा लावून फारकत घेण्याची धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून कीर्तीने सोमवारी राहत्या घरी विषारी औषध पिले, तिच्यावर उपाचार सुरू असताना वडील भेटण्यासाठी गेले त्यावेळी तिचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी सारंगधर बापुराव लहाने यांच्या फिर्यादीवरून पती आशुतोष सोमदे, सासरे रामकिशन सोमदे, सासू संगिता सोमदे, दीर किशोर सोमदे, नणंद अश्विनी सोमदे या पाच जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव या करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४३ तलावांमधून जिल्ह्यात गाळ उपसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील ४३ पाझर तलावांमधून गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दहा दिवसांमध्ये २ लाख ८० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी १२५ तलावातील गाळ काढण्याचे अाव्हान यंत्रणेसमोर आहे.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पाण्याची फारशी टंचाई नसताना यंदा औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टँकर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही जूनअखेरपर्यंत सुमारे दीडशे प्रकल्पातील गाळ काढण्यावर भर देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गाळ काढण्याचे निर्देश ‌दिले होते. यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे दोन हजार पाझर तलावांपैकी प्रत्येक तालुक्यांनी जून अखेर २५ तलावातील गाळ काढण्याचे ठरवले आहे. यानुसार औरंगाबाद तालुक्यातील १३, खुलताबाद २, फुलंब्री २, गंगापूर ३, वैजापूर ९, सिल्लोड १३ तर सोयगाव तालुक्यात एका पाझर तलावामधून गाळ काढण्यात येत आहे. पैठण आणि कन्नड तालुक्यांमध्ये अद्याप काम सुरू झाले नाही. लोकसहभागातून तसेच शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून काढण्यात येत असलेला गाळ शेतकरी आपल्या शेतामध्ये घेऊन जातात.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत औरंगाबाद तालुक्यातील जोगवाडी, पिंपळखेडा, औरंगपूर, रहाटपट्टी तांड, गारदोन तांडा, परदरी तांडा, वाहेगाव देमणी, जोगवाडा, पिंपळखुंटा, जटवाडा, मंगरूळ, सटाणा, खुलताबाद तालुक्यातील वेरूळ व गल्लेबोरगाव, फुलंब्री तालुक्यातील पाथ्री, धामनगाव, गंगापूर तालुक्यातील बोलेगाव, आपेगाव, दिघी, वैजापूर तालुक्यातील वाकला, वळण, पाणगव्हाण, आघूर, शिऊर, जांबरगाव, सावरखेडा, वीरगाव धोंदलगावातील पाझर तलावांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील सिंचपूर, शिवना, आमठाणा, मंगरूळ, पळशीमधील २, लिहाखेडी, पालोद, उंडणगाव, पिंपळगाव पेठमधील २, कायगाव व निल्लोड तसेच सोयगाव तालुक्यातील उप्पलखेडा अशा जिल्ह्यातील ४३ पाझर तलावांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ गजानन बारवाल यांचे नगरसेवकपद रद्द करा

$
0
0

गजानन बारवाल यांचे नगरसेवकपद रद्द करा
संजय बारवाल यांची आयुक्तांकडे मागणी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
महापालिकेतील शहर विकास आघाडीचे गटनेते व नगरसेवक गजानन बारवाल यांचे महात्मा गांधीनगर येथील घर अतिक्रमीत आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करा, अशी मागणी संजय बारवाल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. आतापर्यंत पाच आयुक्तांना या मागणीचे पत्र दिले आहे, पण त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आता न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा संजय बारवाल यांनी दिला आहे.
संजय बारवाल यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘गजानन बारवाल यांचे बन्सीलालनगरच्या महात्मा गांधीनगरात तुलसी निवास हे घर आहे. घराचे बांधकाम करताना त्यांनी सार्वजनिक वापराचा रस्ता गिळंकृत केला असून रस्त्यावर अतिक्रमण करून घराचे क्षेत्रफळ वाढविले आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीने अतिक्रमण केले असेल किंवा अनधिकृत बांधकाम केले असेल तर त्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरविण्याबद्दल राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने २ मार्च २००९ रोजी अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाच्या आधारे गजानन बारवाल यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे.
गजानन बारवाल यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी आपण काही वर्षांपासून करीत आहोत. आतापर्यंत चार आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. विद्यमान आयुक्त मुगळीकर हे पाचवे आयुक्त आहेत. त्यांनी जर कारवाई केली नाही तर नाईलाजास्तव न्यायालयात धाव घ्यावी लागेल असा इशारा संजय बारवाल यांनी दिला आहे.
संजय बारवाल यांनी केलेल्या तक्रारीच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना गजानन बारवाल म्हणाले, ‘ माझे ते घर आताच बांधलेले नाही. वीस वर्षापासूनचे ते घर आहे. कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण घर बांधताना केलेले नाही. घराच्या बांधकामासंदर्भात तक्रारी होऊ लागल्यामुळे मीच महापालिकेला पत्र दिले व मोजमाप करून घेण्याची विनंती केली. नकाशानुसार जास्तीची जागा आमच्याकडे निघली तर ती जागा परत करण्याची आमची तयारी आहे. वास्तविक पाहता मी माझी मालमत्ता महापालिकेला दिली आहे. असे असताना मी कसे काय अतिक्रमण करेल ? संजय बारवाल यांना मी दोन वेळा निवडणूकीत हरविले आहे, त्यामुळे ते हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आयुक्त नियमानुसार योग्य ती कारवाई करतील.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीक्षांत समारंभ मंगळवारी

$
0
0

दीक्षांत समारंभ मंगळवारी

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ५७ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात मंगळवार, ३० मे रोजी सायंकाळी चार वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी विदेश सचिव निरूपमा मेनन राव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. राजेश रगडे व कुलसचिव डॉ. प्रदीप जबदे उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ४३९ स्नातकांना पीएच. डी. पदवी प्रदान केली जाणार आहे. इंग्रजी, रसायनशास्त्र व अभियांत्रिकी विषयाचे सर्वाधिक स्नातक आहेत. निरूपमा राव या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. १९७३ मध्ये इंग्रजी विषयात त्यांनी एम. ए. केले. विद्यापीठाशी त्यांचे स्नेहसंबंध आहेत असे कुलगुरुंनी सांगितले. दीक्षांत समारंभाची तयारी सुरू असून वेगवेगळ्या २० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झेडपीत ५० लेटलतिफ

$
0
0

औरंगाबाद ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड यांनी सोमवारी कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जोरदार दणका दिल्यानंतर त्यांच्यात फार सुधारणा झाली नसल्याचा प्रत्यय मंगळवारी आला. सलग दुसऱ्या दिवशी ५०हून अधिक कर्मचारी सकाळी उशिरा आले. त्यांच्या कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कर्मचारी सकाळी पावणे दहा वाजता आपल्या जागेवर हजर असणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक अधिकारी, कर्मचारी या नियमाचे पालन करत नसल्याची ओरड आहे. सीईओ अर्दड यांनी याविरोधात कारवाईचा बडगा उगारत लेटलतिफ अशा १७ अधिकारी व १४४ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर तरी सर्व वेळेचे पालन करतील, अशी अपेक्षा होती. यांचीच तपासणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांनी केली. मुख्यालयातील विविध विभागास त्यांनी सकाळी दहाच्या सुमारास भेटी देत पाहणी केली. त्यात सुमारे पन्नासहून अधिक अधिकारी, कर्मचारी हे त्यांच्या विभागात नसल्याचे समोर आले. अशा लेटलतिफांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारचा पाठलाग करून पकडला दारू साठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
अवैध दारूचा साठा घेऊन जाणाऱ्या एका कारला पोलिसांनी पाठलाग करून खंडाळा येथे पोल्ट्री फार्मजवळ मंगळवारी पकडले. या कारमध्ये ५२ हजार ८०० रुपये किंमतीचे २२ देशी दारूचे बॉक्स आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कसाबखेडा येथील रहिवासी रामधन स्वरूपचंद नागलोत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
देशी दारू घेऊन एक कार औरंगाबादच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अजयसिंह गोलवाल, कर्तारसिंह नागमणे, आत्माराम पैठणकर, उमेश जाधव यांच्या पथकाने औरंगाबाद रस्त्यावर खंडाळ्यापर्यंत कारचा (एम एच २० इ इ ४२८२) पाठलाग केला. हा पाठलाग करतांना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दूरध्वनीचे केबल टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. दरम्यान, कार व देशी दारू, असा दोन लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षासह पाच जणांच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी उत्तरपत्रिका घोटाळाप्रकरणी आरोपी व साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक, परीक्षा केंद्र प्रमुख व सदस्य अशा पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (२५ मे) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले. तर, २४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
जामीन देण्यात आलेल्या संबंधित विद्यार्थ्यांनी दुसरा गुन्हा करू नये तसेच तपासकामी आवश्यक तेव्हा हजर होण्याच्या अटीवर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. या गुन्ह्यातील एकुण ३३ आरोपींपैकी ३ विद्यार्थीनी व एका विद्यार्थ्याची यापूर्वीच जामिनावर मुक्तता झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (२३ मे) प्रा. विजय आंधळे, संस्थाचालक सदस्य मंगेश मुंढे, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. गंगाधर मुंढे, परीक्षा केंद्र प्रमुख अमित कांबळे व प्राचार्य संतोष देशमुख यांच्यासह २४ विद्यार्थ्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे मंगळवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे तसेच विशेष सहायक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी कोर्टाला विनंती केली की, २४ आरोपी विद्यार्थ्यांची विचारपूस पूर्ण झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करावी. उर्वरीत पाच आरोपी हे गैरप्रकार घडलेल्या संस्थेशी संबंधित महत्त्वाचे आरोपी आहेत. त्यांच्याकडे सखोल विचारपूस करून गुन्ह्याचा तपास करणे आवश्यक आहे. पोलिस कोठडी दरम्यान त्यांनी इतर आरोपींची नावे सांगण्यास टाळाटाळ केली असून, त्यांचा गुन्ह्यात महत्त्वाचा सहभाग आहे. यात संस्थेतील इतर कोणाचा सहभाग आहे काय, आरोपींनी विद्यापीठातील कोणत्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन हा गुन्हा केला, आरोपींनी यापूर्वी असा गैरप्रकार किती वेळा व कुठे केला, आणखी इतर विद्यार्थ्यांचा सहभाग आहे का आदींचा तपास करावयाचा असल्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती कोर्टात करण्यात आली. आरोपींतर्फे अ‍ॅड. जनार्दन मुरकुटे, अ‍ॅड. मच्छिंद्र दळवी व अ‍ॅड. शांताराम ढेपले यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा विनयभंग; अॅट्रॉसिटीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
एका धार्मिक कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करून पती व अन्य दोघांना मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील लासूरगाव येथे सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री १० वाजता फिर्यादी महिला कुटुंबासह लासूरगाव येथील रुख्मिणी मंदिरासमोर सुरू असलेला पंचमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जात होती. त्यावेळी गावातील मंदिरासमोर बसलेल्यांनी ‘ही नटी कुठे चालली,’ असे म्हणत तिचा विनयभंग केला. त्यावेळी फिर्यादीच्या पतीने याबाबत विचारणा केली असता त्याला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीसोबत असलेल्या तिचा भाऊ व चुलतीने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली. महिलेसोबत झटापट करून तिला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गणेश माळवदे, भानुदास माळवदे, भावड्या बारहाते, प्रमोद नेटके (सर्व रा. लासूरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल लांजेवार करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साई कॉलेजला बजावली नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अखेर नोटीस बजावली. कॉलेजचे संलग्नीकरण रद्द का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे; तसेच विद्यापीठाची चौकशी समिती कॉपी प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर करण्याची शक्यता आहे.
चौका येथील साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजचे विद्यार्थी सामूहिक कॉपी करीत असल्याचा प्रकार १७ मे रोजी उघडकीस आला होता. नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी कॉपी करताना पोलिसांनी २७ विद्यार्थ्यांना अटक केली होती. संस्थाचालक, प्राध्यापक, प्राचार्य यांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाची राज्यभर प्रचंड चर्चा झाली. संबंधित कॉलेजची मान्यता रद्द करून कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. विशेष म्हणजे नोटीसचा ड्राफ्ट तयार नसल्याचे कारण सांगून विद्यापीठ प्रशासनाने सहा दिवस दिरंगाई केली. कॉपी प्रकरणामुळे कॉलेजचे संलग्नीकरण रद्द का करू नये अशी विचारणा करणारी नोटीस पाठवण्यास विद्यापीठाने उशीर केला. या गलथानपणावर प्रचंड टीका झाल्यानंतर मंगळवारी नोटीस पाठवण्यात आली. ‘कॉलेजला नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यापीठाने स्थापन केलेल्या चौकशी समितीची बैठक होणार आहे,’ असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले; तसेच कॉलेज ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. अभियांत्रिकी कॉपीप्रकरण गाजल्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची भूमिका कुलगुरूंनी घेतली आहे. त्यामुळे साई कॉलेजचे संलग्नीकरण रद्द होण्याची शक्यता आहे.

चौकशी समितीची बैठक
अभियांत्रिकी कॉपी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. एम. डी. शिरसाठ असून डॉ. साधना पांडे व डॉ. प्रवीण वक्ते सदस्य आहेत. संबंधित विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन व मास कॉपीची शहानिशा करून आपला अहवाल सादर करणार आहे. समितीची पहिली बैठक मंगळवारी सायंकाळी पार पडली. चौकशी अहवाल लवकर सादर करण्यासाठी समितीचे सदस्य प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजः आठवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
सध्या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना कर्जमाफी देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यानी तालुक्यातील मुधलवाडी येथील एका कार्यक्रमात केले.
मुधलवाडी येथे मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना-रिपाइंची सत्ता आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी भूमिका घेतली असून आमचीही तिच भूमिका आहे. उद्धव ठाकरे जरी सत्तेत असले तरी त्यांचे भाजपसोबत संबध बिघडले आहे. मात्र, माझे भाजप व शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबध असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणविषयी बोलताना आठवले म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, ते देताना ओबीसी व इतर कोट्यातून देऊ नये. मराठ्यांना आरक्षण देताना ५० टक्क्याची मर्यादा वाढवली तरी चालले. केंद्रातील भाजप सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात अनेक समाजहिताचे निर्णय घेतले आहे. नुकतेच जीएसटी बिल पास केले असून यामुळे सामान्य जनतेचा फायदा होणार असल्याचे आठवले म्हणाले.
या कार्यक्रमाला आमदार संदिपान भुमरे, सरपंच भाऊ लबडे, रिपाइंचे बाबुराव कदम, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, प्रशांत शेवगाकर यांची प्रमुख उपस्थिति होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अण्णाभाऊ लबडे यांनी केले. दिलीप गोटे, एस. ए. निसर्गंध, प्रकाश लबडे, विजय सुते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्स्पेक्टरकडून अपंग मुलीला मारहाण ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तक्रारीची ओसी मागण्यासाठी गेलेल्या अपंग मुलीला हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाने मारल्याचा आरोपी मुलगी व तिच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपायुक्त करीत आहेत. हा प्रकार सोमवारी सायंकाळी हर्सूल पोलिस ठाण्यात घडला. दरम्यान, पोलिस निरीक्षकांनी आरोप खोटा असल्याचे सांगून घटनेचे खंडन केले आहे.
बेरीबाग, हर्सूल परिसरात अकबरखान हे पत्नी व मुलीसह राहतात. अकबरखानच्या पत्नीच्या नावावर हैदराबाद येथे प्लॉट आहे. या प्लॉटच्या खरेदी विक्रीवरून त्यांचा जिया उर रहमान या नातेवाईकासोबत वाद सुरू आहे. या संदर्भात अकबरखान यांच्या अपंग मुलीच्या फोनवर ३ मे रोजी संशयित आरोपी जिया उर रहेमान यांनी धमक्या दिल्याप्रकरणी मुलगी रफतखान अकबरखान हिने हर्सूल पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. यामध्ये आरोपींनी तुम्ही प्लॉट दुसऱ्या व्यक्तीला विकला आहे, आमचे पैसे द्या अन्यथा वडिलांना घेऊन जातो, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. दरम्यान सोमवारी रफतखान ही तक्रारीची कॉपी घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेली होती. यावेळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तिला तुम्ही खोटी तक्रार दिली आहे, असे सांगत मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी आपल्या पायाला बुटाची लाथ मारल्याने वण उमटल्याचेही तिने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवले.

उपायुक्तांकडे चौकशी
रफतखान अकबरखान व तिचे पालक पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी आयुक्तालयात आले होते. यावेळी आयुक्त यादव यांनी उपायुक्त राहुल श्रीरामे यांना चौकशीचे आदेश दिले. आयुक्तालयाच्या मिटिंग हॉलमध्ये उपायुक्त श्रीरामे, एसीपी सुदर्शन मुंडे यांनी दोन्ही बाजूची चौकशी केली. प्रसार माध्यमांशी बोलताना उपायुक्त श्रीरामे यांनी अद्याप चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
दरम्यान या प्रकरणात पीडित मुलीने पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे. तसेच या मुलीसोबत असलेली तिची आत्या युसूफ पाशा यांनी देखील आपल्यासमोर मारहाण केल्याचा दावा केला आहे.

या मुलीला कोणत्याही प्रकारची मारहाण पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही. तिच्या वडिलांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे या अपंग मुलीला पुढे करून तिला मारहाण करण्यात आल्याचा खोटा आरोप करण्यात येत आहे.
-ज्ञानेश्वर साबळे, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘समांतर’ मानगुटीवर बसवण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन करू

$
0
0

‘समांतर’ मानगुटीवर बसवण्याचा प्रयत्न झाला तर आंदोलन करू

सजग नागरिकांनी दिला इशारा

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

समांतर जलवाहिनीचा प्रकल्प शहरवासियांच्या मानगुटीवर पुन्हा बसवण्याचा प्रयत्न झाला तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा सजग नागरिकांनी दिला आहे. एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कुणालाही नसतो, या उपरही हस्तक्षेप झालाच तर ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

‘समांतर’ पुन्हा मानगुटीवर या मथळ्याखाली ‘मटा’ ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. पीपीपीतत्वावरील समांतर जलवाहिनीच्या विरोधात ज्यांनी न्यायालयात धाव घेतली व आंदोलन उभारले अशा व्यक्तींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मटा’ ने केला तेव्हा तीव्र प्रतिक्रिया प्राप्त झाल्या.

मोठे आंदोलन उभारू

पीपीपीतत्वावरील समांतर जलवाहिनीची योजना रद्द करण्यात आली आहे. या योजनेत अनेक जाचक अटी होत्या, अनेक त्रुटी होत्या. खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू केली जाणारी य़ोजना एकदा रद्द झालेली असताना पुन्हा तीच योजना आणण्याचा घाट घातला जात असेल तर त्यात नेत्यांचे अनिष्ट हितसंबंध गुंतले आहेत असे म्हणावे लागेल. पीपीपीतत्वावरील योजना पुन्हा येणार असेल तर मोठे आंदोलन उभारू.

प्रा. विजय दिवाण.

-

हस्तक्षेप नको

-

एखादे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यात कुणाचाही हस्तक्षेप नको. शासनाचे प्रतिनिधी म्हणून आयुक्तांनीच पीपीपीतत्वावरील प्रकल्प रद्द केला, असे असताना त्याच कंपनीला पुन्हा हा प्रकल्प कसा देता येईल. पुन्हा त्याच कंपनीला काम करण्यास सांगितले तर तो अन्याय ठरेल. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी शासनाने या संदर्भात निर्णय घेतला तर ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. जनतेला होणारा त्रास सहन केला जाणार नाही.

राजेंद्र दाते पाटील.

नागरिकांवर बोजा पडूनये

समांतर जलवाहिनीबद्दल चर्चा सुरू आहे, पण त्यात वास्तव (रिअॅलिटी) काय आहे हे अद्याप पुढे आलेले नाही. जनतेवर बोजा पडू नये, त्यांना त्रास न होता मुबलक पाणीपुरवठा व्हावा अशीच आमची भूमिका आहे. त्याच दृष्टीकोनातून राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल. नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही.

शिरीष बोराळकर, भाजप प्रवक्ते.

ठामपणे विरोध करू

पीपीपीतत्वावरील समांतर जलवाहिनीची योजना नागरिकांवर बोजा टाकणारी, नागरिकांच्या गैरसोईची आहे असे शपथपत्र आयुक्तांनीच न्यायालयात सादर केले आहे. असे असताना तीच योजना लादण्याचा प्रयत्न झाला तर ते सहन केले जाणार नाही. जनआंदोलन अधिक तीव्रपणे उभारावे लागेल. पीपीपीतत्वावरची रद्द केलेली योजना आता नकोच अशीच आमची भूमिका आहे. समांतर जलवानिहीची योजना राबवताना जनहित महत्वाचे आहे, ते टाळून ही योजना होणार असेल तर त्याला आम्ही ठामपणे विरोध करू.

अॅड. प्रदीप देशमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हरेस्ट मोहिमेला खराब हवामानाचा फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
हिमवादळांमुळे वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गिर्यारोहक मनीषा वाघमारेच्या एव्हरेस्ट शिखर चढाईला काहीसा ब्रेक लागला आहे. निसर्गाने रौद्ररूप धारण केल्यामुळे मनीषासह मोहिमेवर निघालेले सर्वच गिर्यारोहक व शेर्पा कँप फोरहून कँप टूकडे परतले.
एव्हरेस्ट शिखर मोहिमेसाठी वातावरण अनुकूल राहणे हे नितांत गरजेचे असते. मोहिमेस प्रारंभ झाल्यानंतर अनेकदा वातावरण बिघडते. त्यावेळी वातावरण शांत होण्याचीच वाट गिर्यारोहकांना पाहावी लागते. या मोहिमेतील प्रत्येक टप्पा हा तेवढाच आव्हानात्मक असतो. कँप फोर हा डेंजर झोनच मानला जातो. कँप फोर ते शिखर माथा हे ८०० मीटरचे अंतर देखील अतिशय कठीण मानले जाते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कँप फोर सोडण्याचा निर्णय गिर्यारोहकांना घ्यावा लागला. कँप फोर हे २६ हजार फूट उंचीवर आहे. आता मनीषासह सर्व गिर्यारोहक हे कँप टूवर दाखल झाले. वातावरण अनुकूल होताच मनीषा पुन्हा नव्या जोमाने चढाई करणार आहे. यात आणखी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्तही घेतात ‘फिनिक्स भरारी’

$
0
0

‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्तही घेतात ‘फिनिक्स भरारी’

वेळेत निदान अन् उपचारांनी पुन्हा आयुष्यात उभे राहणे होते शक्य

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘स्किझोफ्रेनिया’ हा एक गंभीर प्रकारचा मानसिक आजार असला तरी आणि या आजारावर दीर्घकालीन उपचार करावे लागत असले तरी, वेळेत निदान व योग्य उपचार झाल्यास असे बहुतांश रुग्ण पुन्हा एकदा आयुष्यात उभे राहू शकतात, आपली नोकरी-व्यवसाय व इतर कामेही करू शकतात, हे आता पुरते सिद्ध झाले आहे. अर्थात, वेळीच लक्षणे ओळखून कुठलाही बाऊ न करता लवकरात निदान-उपचार करणे गरजेचे ठरते. दुर्दैवाने, अशा व्यक्तीला वेडे ठरविले जाते आणि बाबा-महाराजांकडे चित्र-विचित्र उपचार करुन थकल्यानंतरच मनोविकारतज्ज्ञ नेले जाते व त्यामुळे पूर्णपणे सुधारणा होत नसल्याचे ‘वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे’निमित्त तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

एकूण सामान्य लोकसंख्येमागे १ ते २ टक्के व्यक्तींमध्ये स्किझोफ्रेनिया दिसून येतो; म्हणजेच देशामध्ये सव्वा-दीड लाखापेक्षा जास्त स्किझोफ्रेनियाचे रुग्ण आहेत. मानसिक आजारांमध्ये नैराश्य (डिप्रेशन) हा सर्वाधिक प्रमाणात दिसून येणारा मानसिक आजार असून, त्याखालोखाल स्किझोफ्रेनिया या आजाराची व्याप्ती दिसून येते. अर्थात, डिप्रेशन, बायपोलार डिसॉर्डर व स्किझोफ्रेनिया या सर्वाधिक प्रमाणात दिसून येणाऱ्या मानसिक आजारांमध्ये स्किझोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार मानण्यात येतो. ‘स्किझोफ्रेनिया’मागचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अनुवंशिकतेसह इतर कारणे या आजाराला कारणीभूत ठरतात. मूलभूत विचारदोषांसह सतत भ्रम निर्माण होणे, संशय घेणे, भास होणे यामुळे विचारविवेक न राहणे, स्वतःच्या काल्पनिक विश्वात रमणे, काल्पनिक विश्वालाच वास्तविक जीवन मानणे, आक्रमक होणे, असंबंद्ध बोलणे, शिविगाळ करणे अशा विविधांगी दोषांमुळे ‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्त व्यक्ती सामान्य व्यक्तीप्रमणे काम करू शकत नाही. एकूण ‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्त व्यक्तींपैकी १० ते १३ व्यक्ती आत्महत्येने दगावू शकतात. वयाच्या १२-१३ वर्षांमध्ये अशा व्यक्तींच्या मेंदुमध्ये आजारामुळे बदल झालेला असतो व त्याची लक्षणे १५-१६-१७ व्या वर्षी किंवा त्याआधी किंवा त्यानंतरही दिसून येऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता असते. एखाद्या वेळेला नैराश्य किंवा बायपोलार डिसॉर्डरचा रुग्ण पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो; परंतु याच कालावधीत स्किझोफ्रेनियाचा त्रास उद्भवल्यास असा रुग्ण पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकण्याची फार कमी असते. ‘स्किझोफ्रेनिया’ग्र्स्त रुग्णांचे जीवन आजारामुळे तीव्रपणे प्रभावीत होते व त्याचा परिणाम म्हणून असे रुग्ण उपचाराशिवाय त्याचे काम, नोकरी, शिक्षण, व्यवसाय करू शकत नाही. मात्र वेळीच निदान करुन योग्य व दीर्घकालीन उपचार घेतले तर मात्र असे रुग्ण पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात उभे राहू शकतात व अशी अनेक उदाहरणे नक्कीच आहेत, असे नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मनोविकृती विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद देशपांडे म्हणाले.

‘ते’ पुन्हा एकदा उभे राहिले

‘स्किझोफ्रेनिया’मुळे आक्रमक झाल्याने जवळजवळ बेड्या ठोकून घाटीमध्ये दीड वर्षांपूर्वी उपचारासाठी आणलेल्या शहरातील एका चाळीशीतल्या रुग्णावर उपचार झाल्यानंतर मागच्या वर्षापासून हीच व्यक्ती आता रोज ६० लिटर दह्याच्या विक्रीचा व्यवसाय करीत आहे. तर, शहरातील ४५ वर्षीय ‘स्किझोप्रेनिया’ग्रस्त रुग्णावर घाटीत उपचार झाल्यानंतर याच व्यक्तीने आता चॉकलेटची एजन्सी घेतली असून, दररोज दुचाकीवर चॉकलेटचा सप्लाय करण्याचे काम यशस्वीपणे करीत असल्याचे घाटीच्या मनोविकृती विभागाचे डॉ. सादिक कुरेशी यांनी ‘मटा’ला सांगितले.

शास्त्रज्ञाची ‘ब्युटिफुल’ भरारी

‘ब्युटीफुल माईंड’ हा चित्रपट ज्याच्या जीवनावर काढण्यात आला तो जॉन नॅश हा नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञदेखील ‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्त आहे; तरीदेखील त्याने या आजारावर पूर्णपणे मात केली व एक जगप्रसिद्ध गणितज्ज्ञ म्हणूनही नाव कमावल्याचे ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. संजीव सावजी यांनी सांगितले. ठाण्यातील एक इंजिनिअरनेही २५ वर्षांपूर्वी उपचार सुरू केले व आज निवृत्त होईपर्यंत त्याची कारकीर्द यशस्वी ठरल्याचेही डॉ. सावजी म्हणाले. वेळीच उपचार सुरू केले तर पूर्णपणे सुधारणा होते व १०० टक्के आजार नियंत्रणात राहू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७ लाखांचे वीजबिल लोकपालांकडून रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
म्हाडाच्या देवळाली येथील गृहप्रकल्पाला महावितरणाच्या सुरक्षा पथकाने दिलेले ४६ लाख ९५ हजारांचे वीजबिल विद्युत लोकपालने कागदपत्राची पडताळणी करून उभय पक्षांकडून माहिती घेतल्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती महावितरणचे ग्राहक प्रतिनिधी हेमंत कपाडिया यांनी दिली.
पुणे येथील बी. जी. शिर्के कंपनीतर्फे म्हाडाच्या गृहप्रकल्पाचे काम केले जात आहे. या प्रकल्पात ४०४ गाळे बांधण्यात येत आहेत. सिमेंट प्री-कास्ट उत्पादनसाठी औद्योगिक व बांधकामासाठी व्यावसायिक अशा दोन प्रकाराची वीजजोडणीची मागणी कंपनीने महावितरणकडे केली होती. महावितरणने त्यानुसार ऑगस्ट २०१२ मध्ये दोन जोडण्या दिल्या. कंपनीने २०१५ मध्ये सिमेंट प्री-कास्ट उत्पादनचे काम पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक जोडणी कायमस्वरूपी बंद करण्याचे पत्र महावितरणला दिले होते.
महावितरणच्या सुरक्षा पथकाने स्थळपाहणी करून सिमेंट प्री-कास्ट उत्पादनासाठी घेतलेली जोडणी औद्योगिक वर्गवारीत येत नसल्याचे सांगून वीजपुरवठा केलेल्या तारखेपासून व्यावसायिक दराने वीजबिल आकारले. शिवाय विजेचा गैरवापर केला म्हणून वीज कायद्यातील कलम १२६नुसार ४६ लाख ९५ हजारांचे बिल आकारण्याची शिफारस केली. महावितरणने सुनावणी न घेता जानेवारी २०१६ मध्ये कायमस्वरूपी खंडीत केले, पूर्वसूचना न देता थकबाकीची नोटीस बजावण्यात आली.
बी. जी. शिर्के कंपनीने महावितरणाच्या या कारवाई विरुद्ध औरंगाबाद येथील ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचात तक्रार दाखल केली. मंचाने अर्जदाराची तक्रार खारीज करताना वीज कायद्यातील कलम १२६ ऐवजी कलम १३५ अंतर्गत वीजबिल आकारण्याचा आदेश दिला. या आदेशाविरुद्ध कंपनीने हेमंत कापडिया यांच्यामार्फत विद्युत लोकपाल, नागपूर ह्याच्याकडे अपील दाखल केले. विद्युत लोकपालांसमोर बाजू मांडताना कापडिया यांनी सिमेंट प्री-कास्टचे उत्पादन औद्योगिक वर्गवारीत येते, हे वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार असल्याचे सांगितले. शिवाय महावितरणतर्फे इतर सिमेंट प्री-कास्टचे उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांना औद्योगिक दराने बिल आकारणी केली जाते. हे पुराव्यानुसार सिद्ध केले. ग्राहकाने नियमाप्रमाणे दोन वेगळ्या जोडण्या देण्यासाठी अर्ज केले होते व जोडणी देताना महावितरणतर्फे आक्षेप घेतला नव्हता, असे निदर्शनास आणून दिले. यावरून लोकपालांनी हे वीजबिल रद्द करण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत कंपनी खाक; एक कामगार भाजला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज एमआयडीसीमधील घाणेगाव येथील चहाचे प्लास्टिक कप तयार करणाऱ्या सुनंदा इंडस्ट्रिजमध्ये बुधवारी दुपारी बारा वाजता आग लागली. या आगीत एक कामगार भाजला असून सर्व साहित्य जळून खाक झाले.
घाणेगाव येथे गट नंबर ४६ मधील प्लॉटनंबर ३० येथे दिलीप बारगळ याची सुनंदा इंडस्ट्रिज ही चहाचे प्लास्टिक कप तयार करणारी कंपनी आहे. येथे दहा कामगार आहेत. कंपनीतील कामगार बुधवारी दुपारी जेवण करीत होते, त्यावेळी मागील बाजूने धूर निघत असल्याचे त्यांना दिसले. काही कामगार धूर कोठून येत आहे हे पाहण्यासाठी आत गेले असता सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे दिसले. घटनेची महिती मिळाताच वाळूज एमआयडीसी अग्निशाम दलाचे अधिकारी आर. डी. चोरगे, एस. एफ. वासणकर, एस. आर. गायकवाड, ए. ए. चौधरी, सी. आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून तीन तासात आग आटोक्यात आणली. या आगीत सचिन बारगळ हा कामागर भाजला आहे. त्याला उपचारासाठी बजाजनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. कपंनीतील मशीन, कच्चा माल, पक्का माल, रोख रक्कम, केबिन, कागदपत्रे आदी जळून खाक झाले. याप्रकरणी पोलिसांत अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. वाळूज एमआयडीसीमधील घाणेगाव येथील चहाचे प्लास्टिक कप तयार करणाऱ्या सुनंदा इंडस्ट्रिजमध्ये बुधवारी दुपारी बारा वाजता आग लागली. या आगीत एक कामगार भाजला असून सर्व साहित्य जळून खाक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images