Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हुकुमी उपचारांनी ‘स्किझोफ्रेनिया’वर मात शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुठल्याही मनोविकाराला सामाजिक कलंक मानणे, उपचार टाळणे, उशिरा-अनियमित उपचार घेणे, यामुळे अपरिमित नुकसान होते. त्यापेक्षा खुल्या मनाने मनोविकारांचा स्वीकार करुन तातडीने योग्य उपचार घेण्यामुळेच ‘स्किझोफ्रेनिया’सह सर्व मानसिक आजारांवर यशस्वीपणे मात करणे शक्य आहे. अत्याधुनिक उपचार पद्धतींनी ‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्त व्यक्ती पूर्वदावर येत असल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बरे होण्याची संधी चुकवू नका, असा बहुमोल सल्ला ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. विनय बाऱ्हाळे व डॉ. विनायक पाटील यांनी बुधवारी येथे ‘वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे’निमित्त दिला.
शहरातील शांती नर्सिंग होम तसेच ‘स्किझोफ्रेनिया स्वास्थ आणि पुनर्वसन प्रतिष्ठान’च्या वतीने बुधवारी (२४ मे) तापडिया नाट्य मंदिरात आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते आणि त्यांना बोलते केले प्रख्यात लेखक, आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले व लेखिका नीलांबरी जोशी यांनी.
या प्रसंगी ‘शांती नर्सिंग होम’चे संचालक डॉ. बाऱ्हाळे व डॉ. पाटील म्हणाले, विचार, भावना व वर्तणूक पुरती बिघडवून टाकणारा, विस्कळीत करणारा स्किझोफेनिया हा गंभीर मानसिक विकार आहे. त्याला विचारांचा विकार असेही म्हटले जाते. यामध्ये मेंदूचे कार्य बिघडते व त्याचे अनेकविध परिणाम दिसून येतात. संगोपनातील दोषांसह अनुवंशिकता, ताणतणाव, मेंदुला होणाऱ्या दुखापतींमुळे ०.५ ते १ टक्के व्यक्तींमध्ये हा मनोविकार सर्रास सर्वत्र सर्व जात-धर्म-व्यक्तींमध्ये दिसून येतो. एका पालकास स्किझोफ्रेनिया असेल तर, अपत्यास हा आजार असण्याची शक्यता १२ टक्क्यांनी वाढते, तर दोन्ही पालकांना स्किझोफ्रेनिया असल्यास अपत्यास हा आजार असण्याची शक्यता ४० टक्क्यांनी वाढते. त्यातच २० ते ३० या वयोगटामध्ये हा आजार सर्वाधिक प्रमाणात दिसून येतो. अर्थात, अत्यल्प प्रमाणात मुलांमध्येही ‘चाइल्डहूड स्किझोफ्रेनिया’ असतो व त्याचे स्वरुप जास्त गंभीर असू शकते. मात्र या आजारावर तातडीने व योग्य प्रमाणात उपचार झाले तर, अनेक रुग्णांचा आजार पूर्वपदावर येऊ शकतो. यामध्ये २५ टक्के रुग्णांना एकदाच उपचार घ्यावे लागतात, २५ टक्के रुग्णांना त्या त्या ‘एपिसोड’मध्येच उपचार घ्यावे लागतात, २५ टक्के रुग्णांचा आजार दीर्घकालीन औषधोपचारांनी नियंत्रणात ठेवता येतो. मात्र २५ टक्के रुग्णांना औषधोपचारांचा फारसा उपयोग होत नाही व आक्रमक झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावे लागतात. या आजारावर ईसीटी (शॉक ट्रिटमेंट) उपचार अतिशय प्रभावी असून, नवनवीन औषधेही अतिशय गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. सगळ्याच मनोविकारांची ट्रिटमेंट ही पेनलेस आहे व योग्य उपचारांनी रुग्ण त्यांची नोकरी-व्यवसाय करू शकतो आणि अशी असंख्य उदाहरणे समाजामध्ये आहे, असेही दोघांनी स्पष्ट केले. सई चपळगावकर, अमृता पंजाबी यांनी शांती नर्सिंग होमची माहिती दिली.
...
सध्याच्या ‘रॅटरेस’ने
मनोविकारांमध्ये वाढ
अलीकडे प्रचंड व सततची स्पर्धा, रॅटरेस, टोकाची विषमाता व स्पप्न पूर्ण न झाल्यास येणारे नैराश्य यामुळे एकूणच मनोविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आज दोन हजारांवर काम करणारे इंजिनीअर आहेत व २० लाख वेतन घेणारेही इंजिनीअर आहेत. ही टोकाची आर्थिक विषमता असल्यामुळेच आजचा विद्यार्थी एकलकोंडा होत असल्याचे निरीक्षण गोडबोले यांनी नोंदविले. या प्रसंगी गोडबोले व जोशी यांनी ‘मनात’, ‘मनकल्लोळ’, ‘लाइमलाइट’ या पुस्तकांमागची प्रेरणा, भावना व भूमिकाही अतिशय रंजकपणे स्पष्ट केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ दोनशे मीटरवरून मनीषा माघारी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टचा सगरमाथा अवघ्या दोनशे मीटरवर राहिलेला असताना हिमवादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गिर्यारोहक मनीषा वाघमारेला माघारी परतण्याचा निर्णय घ्यावा लागला. सुरक्षितेच्या कारणामुळेच मनीषासह अनेक गिर्यारोहकांना हा कटू निर्णय घ्यावा लागला. सध्या मनीषा एव्हरेस्टच्या बेसकँप सुखरूपपणे पोहचली आहे.

औरंगाबादची पहिली महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारेचा आजचा (२४ मे) एव्हरेस्ट मोहिमेतील ५२ वा दिवस आहे. प्रदीर्घ काळापासून मनीषा ही प्रतिकूल हवामानाशी झुंज देत आहे. एव्हरेस्ट शिखर मोहिमेचा प्रारंभ केल्यानंतर मनीषाने कँप वनऐवजी कँप टूवर थेट जाण्याचा निर्णय घेतला. वेळ वाचवण्याचीच तिची भूमिका होती. कँप थ्री व कँप फोरच्या चढाईत हवामानाशी झुंज तिची सुरू झाली होती. त्यामुळे दोन दिवसांचा कालावधी त्यात गेला. तरीही जिद्दी व कणखर स्वभावाच्या मनीषाने शंभर किलोमीटरच्या वेगाने वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याचा सामना करताना आपली मोहीम चालूच ठेवली. कँप फोरला दाखल झाल्यानंतर एव्हरेस्टवरील वातावरण बिघडण्यास सुरुवात झाली. काही गिर्यारोहक तशाही परिस्थितीत समीटसाठी जात होते. कँप फोरपासून एव्हरेस्टचा सगरमाथा अवघ्या ८०० मीटर अंतरावर आहे. एवढ्या जवळ आल्यानंतर मागे परतण्यापेक्षा पुढे जाण्याचा निर्णय मनीषा व तिच्या शेर्पाने घेतला. अवघ्या अर्धा तासाच्या विश्रांतीनंतरच मनीषासह तिच्या टीममधील १३ गिर्यारोहकांनी सगरमाथ्याच्या दिशेने कूच केले. सगरमाथा अवघ्या २०० मीटर अंतरावर राहिलेला असताना तेथील वातावरण अधिकच बिघडले. मनीषा व तिच्या टीमला बिघडत्या वातावरणाने घेरले. तरीही ते चढाई करीतच राहिले. समीट अगदी जवळ असताना बर्फाने समीटसाठी गेलेल्या दोन गिर्यारोहकांना आपल्या कवेत घेतले. ही घटना त्यांच्या डोळ्यासमोरच घडली. या प्रसंगानंतर टीमला लीड करणाऱ्या शेर्पांनी मनीषासह सर्वांना माघारी परतण्याचे सांगितले. त्यावेळी मनीषा व टीमपासून सगरमाथा अवघ्या २०० मीटर अंतरावर राहिलेला होता. परंतु, हवामान अधिक बिघडल्याने त्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला.

कणखर स्वभावाच्या मनीषाने प्रतिकूल परिस्थितीतही २७ मेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान अनुकूल झाल्यास पुन्हा चढाई करण्याचा तिचा इरादा असल्याने सद्यस्थितीत मनीषाची एव्हरेस्ट मोहीम संपली नाही हेच सांगता येईल.

हेलिकॉप्टरचा वापर

मनीषा व त्यांची टीम कँप फोरवर दाखल झाली. तेथे त्यांनी वातावरण शांत होण्याची काही काळ वाट पाहिली, परंतु साऊथ कोल आणि कँप फोरवर २४ तासांचा अवधी घालवल्यामुळे सर्वच गिर्यारोहकांची शारीरिक व मानसिक कसोटी लागत होती. थकलेल्या गिर्यारोहकांना त्रास होण्यास प्रारंभ झाला होता. शरीरातील ऑक्सिजन लेवल कमी होत चालली होती. त्यामुळे कँप फोरवरून कँप टूपर्यंत ते खाली उतरले. कँप टूवर आल्यानंतरही हवामानाची स्थिती बिघडलेलीच होती. त्यानंतर बेसकँपला परत जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा समर्थ पर्यायच शिल्लक राहिलेला नव्हता. मनीषाची तब्येत बिघडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून मनीषाला कँप वनवरून हेलिकॉप्टरने बेसकँपला तातडीने नेण्यात आले.

मनीषाच्या टीममधील चार-पाच गिर्यारोहकांना हिमदंशाचा त्रास जाणवू लागला आहे. एका विदेशी गिर्यारोहकाची स्थिती गंभीर झाली आहे. अशा कठीण परिस्थितीतही मनीषाची जिद्द एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याचीच आहे. हवामान अनुकूल होण्याची ती आणखी तीन दिवस वाट पाहाणार आहे, असे मनीषाचे सहकारी जगदीश खैरनार यांनी सांगितले.

खैरनार म्हणाले, ‘एव्हरेस्ट शिखर मोहिमेसाठी मनीषाला तब्बल २७ लाख रुपयांचा खर्च लागलेला आहे. एवढा मोठा खर्च उभा करणे हे मोठे आव्हानच आहे. मनीषाने १२ लाख रुपयांचे कर्ज काढलेले आहे. उर्वरित रक्कम ही शहरातील गिरीप्रेमी व दानशूर मंडळींच्या मदतीमुळे उभी राहू शकली आहे. कँप फोर हा भाग ‘डेंजर झोन’ म्हणूनच परिचित आहे. या डेंजर झोनमध्ये मनीषाने तब्बल २४ तास काढले. दोन रात्री काढल्या ही मोठीच गोष्ट मानावी लागेल. एव्हरेस्ट शिखर समीट करण्यापासून अवघे २०० मीटर अंतर बाकी राहिले. तरीही आमच्यादृष्टीने मनीषाने समीट केल्यासारखेच आहे. पुढील वर्षी मनीषा नव्या जोमाने एव्हरेस्ट मोहीम फत्ते करू शकेल असा विश्वास तिने या मोहिमेतून निर्माण केला आहे हे नक्की.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यातील नेते चिंता‘तूर’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना
जिल्ह्यातील तूर खरेदी घोटाळ्यात अनेक दिग्गज नेते आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या सावलीत वावरणारे बडे व्यापारी अडकले आहेत. या सर्व प्रकरणाचा आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, तुरीच्या सगळ्यात मोठ्या भानगडीचा ससेमिरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याने भरकटला आहे. तर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
तुरीच्या आलेल्या बंपर उत्पादनांच्या मालाने शेतकऱ्यांना गत अनेक वर्षांच्या तुलनेत चांगला आर्थिकदृष्ट्या फायदा मिळाला. हे सगळे घडत असताना सरकारी अधिकारी आणि नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तुरीची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली. जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांना काही लक्षात येण्यापूर्वीच लाखों क्विंटल तूर सरकारच्या हमीभाव केंद्रावर व्यापाऱ्यांनी भरभरून टाकून दिली.
जालना जिल्ह्यातील साधारणपणे सात लाख एकर शेत जमीनीवर सगळी तूर पेरली होती, असे गृहीत धरले तरी येणाऱ्या उत्पादनांच्या कितीतरी पटीने अधिक तूर जालन्यातील सरकारच्या हमीभाव केंद्रावर खरेदी झाली असल्याचे या एकूण बोगसगिरीचे पुरावे आहेत.

भाजपच्यावतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने सुरू झालेल्या कार्यविस्तार अभियानात तूर हीच मध्यवर्ती चर्चेचा विषय झालेली आहे. तुरीची काय भानगड आहे ? कुणी कशी कुठे अन कुणाला हातात धरून, पैसे चारून, तूर विकल्याच्या चर्चा रंगत आहेत.
तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने चौकशी सुरू केली आहे. मात्र, या सर्व संदर्भात राजकीय नेत्यांच्या घरातील नावे समोर येत आहेत. हे सगळे एकूणच तपासाची दिशा भरकटत घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचे मत चौकशी करणाऱ्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘मटा’शी बोलताना सांगितले.

तूर खरेदी केंद्रावर पहिल्या टप्प्यातील सरकारच्या खरेदीमध्ये एक लाख ४२ हजार क्विंटल तूर खरेदी झाली. दुसऱ्या टप्प्यात १२,५७५ क्विंटल तूर खरेदी राज्य सरकारच्या माध्यमातून झाली. तर पुन्हा आता नव्याने सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या तूर खरेदी योजनेत २३ मे पर्यंत तीन हजार ४५५ क्विंटल तूर खरेदी झाली आहे.
भारतभूषण पाटील,
जिल्हा व्यवस्थापक मार्केटींग फेडरेशन, जालना

दानवेंचे शुक्लकाष्ट संपेना
तूर खरेदी घोटाळ्याची चौकशी होऊन काय व्हायचे ते होईल. मात्र जिल्ह्यातील राजकारणात सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी व विरोध पक्षाचे नेते तुरीच्या या एकूणच वादांच्या सगळ्या मुद्द्यावर अडचणीत आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मागे तुरीचेच लागलेले शुक्लकाष्ट त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. तूर घोटाळ्याची सर्वाधिक राजकीय किंमत दानवे यांनीच मोजल्याचे सांगितले जाते. तूर खरेदी प्रकरणातील वक्तव्यासंदर्भात संपूर्ण राज्यात प्रतिक्रिया उमटल्या. मात्र जिल्ह्य़ातील राजकारणात दानवे यांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न एकाही त्यांच्या राजकीय विरोधातील नेत्यांनी केलेला नाही हे विशेष आहे.

बदनामी करण्याचे षडयंत्र - खोतकर
आपल्या नावावर फक्त १२२ क्विंटल तूर विकल्याचा मुद्दा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्टपणे सांगितला. यात गाढेसावरगाव व हिस्वन येथे शेती आहे असे ते म्हणाले. आपल्या एकूण परिवारातील सदस्यांच्या नावावर २७४ क्विंटल तूर विकल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या विरोधात हे बदनामी करणारे राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । लातूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. लातूरहून मुंबईकडं येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. सुदैवानं मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधील अन्य चारजण सुखरूप आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या शिवार यात्रेला आज लातूर जिल्ह्यातील निलंग्यातून सुरुवात झाली. त्यासाठी मुख्यमंत्री लातूरला गेले होते. तिथं श्रमदान केल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडं येण्यासाठी निघाले होते. मुंबईकडं येण्यासाठी त्यांच्या हेलिकॉप्टरनं टेकऑफ घेतला खरा, पण काही क्षणातच ते जमिनीवर कोसळलं. मात्र, दुर्घटनेच्या वेळी हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्यानं अनर्थ टळला. पंख्यात बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं कळतं.

58837694

काळजी नसावी!: फडणवीस

अपघातानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेच्या आशीर्वादामुळं मी सुखरूप आहे. काळजीचं कारण नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं.




58837722

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार गांजा तस्कर दौलताबादेत गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना दौलताबाद पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी शरणापूर रोडवर रेल्वे रुळाजवळ करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चार किलो गांजा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरणापूर रोडवर रेल्वे रुळाजवळील लिंबाच्या झाडाखाली चारजण गांजाची तस्करी करण्यासाठी आले असल्याची माहिती दौलताबाद पोलिसांना बुधवारी दुपारी चार वाजता मिळाली होती. त्यावरून सापळा रचून चौघांना अटक केली. त्यांच्याजवळील प्लास्टिक कॅरिबॅगमध्ये ४८ हजार रुपयांचा चार किलो गांजा सापडला. संशयित आरोपी नंदलाल रतन बेलदार (वय २५ रा. बनकोटे, ता. एरंडोल, जि. जळगाव), सुनील रघुनाथ मोहिते (वय ३६ रा. भालगाव, ता. एरंडोल, जि. जळगाव), विनोद नथ्थू सोळंके (वय ३२ रा. अजबनगर, माळीगल्ली औरंगाबाद) व इफ्तेकार हारूण कुरेशी (वय ३० रा. सिल्लेखाना, औरंगाबाद) यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी उपनिरीक्षक विक्रम दयानंद वडणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंमली पदार्थ विक्री विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे तपास करीत आहेत.

एरंडोलवरून तस्करी

पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी विनोद सोळंके याला गांजाचे व्यसन आहे. एरंडोल येथून गांजाची तस्करी शहरात करण्यात येत होती. पकडण्यात आलेले बेलदार व मोहिते हे गांजा शहरात घेऊन येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठात अधिकार मंडळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादमध्ये स्थापन करण्यात आलेल्या विधी विद्यापीठात अधिकार मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. ‘विधी विद्यापीठ कायदा-२०१४’ नुसार या अधिकार मंडळांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहेत. विविध अधिकार मंडळांची स्थापन झाल्याने विद्यापीठाच्या प्रशासकीय, शैक्षणिक कामांना गती येणार आहे. अधिकार मंडळांची पहिली बैठक ४ जून रोजी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून एस. सूर्यप्रकाश यांची मार्चमध्ये निवड झाली. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या विद्यापीठात कुलगुरूंच्या निवडीनंतर पुढील प्रक्रियेला वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात ‘बीएएलएलबी’चे वर्ग भरणार आहेत. त्याअनुशंगाने तयारी सुरू आहे. त्यासह विधी विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधी विद्यापीठात अधिकार मंडळांमध्ये ‘अॅकडमिक कौन्सिल’, ‘जनरल कौन्सिल’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह कौन्सिल’चा समावेश आहे. पारंपरिक विद्यापीठात अधिकार मंडळ सदस्यांची निवड निवडणूकीद्वारे होते. तर, विधी विद्यापीठात सदस्यांचे नामनिर्देशन केले जाते. प्रत्येक अधिकार मंडळावर १२ ते १५ सदस्य असतात. औरंगाबादच्या विधी विद्यापीठात त्यानुसार सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आली आहे. या अधिकार मंडळामध्ये मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे वर‌िष्ठ न्यायमूर्ती, विधिज्ञ, प्राध्यापक, शासकीय वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधी विद्यापीठात ४ जूनला बैठक
विधी विद्यापीठात अधिकार मंडळांची स्थापना झाल्याने प्रशासकीय, शैक्षणिक कामकाजाला गती येणार आहे. अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया अशा विविध बाबतीत अधिकार मंडळातून निर्णय प्रक्रियेला वेग येणार आहे. अधिकार मंडळाच्या स्थापनेनंतर पहिली बैठक ४ जून रोजी होणार आहे. त्यासाठी संबंधित सदस्यांना रितसर निमंत्रण पाठविले जात असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंग वसतिगृहात मध्यरात्री धुडगूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव
पडेगाव येथील पॉवर हाउसमागील शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात बुधवारी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान अनोळखी चार ते पाच जणांनी धुडगूस घातला. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी भयभित झाल्या होत्या. त्यांनी खिडक्या फोडल्या व नळाच्या तोट्या चोरून नेल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्र निवासी वसतिगृहाच्या मागच्या बाजुला असलेल्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारून चार ते पाच जण मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास घुसले. ते पाइपलाइनवरून चढून छतावर गेले व जिन्याचा दरवाजा तोडून खोल्यांमध्ये प्रवेश केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थिनी भयभित झाल्या. त्यांनी दहशद निर्माण करून विद्यार्थिनींना शिवीगाळ केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या घुसखोरांनी बाथरूममधील सुमारे तीन हजार रुपयांच्या लोखंड, पितळ व तांब्याच्या २२ तोट्या चोरून नेल्या, शिवाय खिडक्या फोडून सामानांची नासधूस केली.
याप्रकरणी प्राचार्या शुभांगी थोरात व आरोग्य उपसंचालक विभागाचे व्ही. एस. भटकर यांनी गुरुवारी सायंकाळी छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, धूडगूस घालणारे लोक परिचयातील आहेत. याप्रकरणी देवीदास वाघ व रामा, अशा दोघांवर संशय आहे.

सुरक्षारक्षक नाहीत

या वसतिगृहात ३५ विद्यार्थिनी राहतात. येथे सुरक्षारक्षक नाही. शिवाय रात्री पुरेसा उजेड पडावा, अशी विजेची योजना नाही. या वसतिगृहात सीसीटीव्ही नाहीत. शासकीय वसतिगृहात सुरक्षारक्षक नसताना जीव मुठीत धरून विद्यार्थिनी राहतात. सुरक्षा रक्षक नेमावा, सीसीटीव्ही लावावेत, अशी सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडखोर मोठ्या भावाचा लहान्याकडून खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी वाळूज
दारू पिऊन सतत भांडणे, वादीवाद करणाऱ्या मोठ्या भावाचा त्रास सहन न झाल्याने सख्या लहान भावाने गळा दाबून खून केला. ही घटना वाळूज एमआयडीसीतील स्वाती इंटरप्राईजेस कंपनीत गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बी ५१/२३ येथील स्वाती इंटरप्राईजेस या कंपनीत मयत योगेश रामलाल पाटील (रा. गणपूर, ता. चोपडा, जि. जळगाव) हा १९ मे रोजी झोपला होता. त्याचा भाऊ धनराज पाटील हा कंपनी बाहेर झोपला होता. धनराजने सकाळी कंपनीचे दार उघडले असता त्याला योगेश बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्याने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन योगेशला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. योगेशच्या गळ्यावर जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी होता. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास केला. पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिस हेडकॉन्स्टेबल सय्योद्दीन सिद्धीकी, गोकुळ वाघ यांनी तपास करून खुनाचे गूढ उकलले.
कंपनी शेजारील आदिनाथ इंडस्ट्रिज येथील सुरक्षारक्षक राजाराम महादजी मारकर यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मृत योगेश व त्याचा लहान भाऊ धनराज हे दोघे १९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बाहेरून आले. त्यांनी जेवण केले व जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी शेडवर गेले. सुमारे १५ मिनिटांनी धनराज हा मारकर यांच्याकडे आला व लिंबू व मीठ मागितले. मारकर यांच्याकडे लिंबू नसल्याने त्यास मीठ त्यांनी दिले. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास धनराज पाटील त्यांच्याकडे येवून दीड ते दोन तास थांबला व परत शेडकडे गेला. त्यानंतर पुन्हा मारकर यांच्याकडे आला व माझा भाऊ योगेश उठत नाही, असे सांगून मारकरांना सोबत घेऊन गेला. त्यानंतर मयत योगेश उठला नाही. ही बातमी कंपनीचे मालक जाधव यांना देण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी मिळाली.

खुनाची उकल

शेजारच्या कंपनीचा सुरक्षारक्षक राजाराम मारकर यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना धागेदोरे मिळाले. पोलिसांनी संशयावरून धनराज पाटील याला ताब्यात घेऊन घटनेची उकल केली. त्याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ताहेर पटेल हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा इंजिनीअरिंग कॉलेज ‘बाटू’कडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी (बाटू) राज्यातील ४८ अभियांत्रिकी कॉलेज जोडण्यास अखिल भारतीय तंत्र परिषदेने (एआयसीटीई) मान्यता दिली आहे. एआयसीटीईने या कॉलेजांना ‘चेंज ऑफ युनिर्व्हसिटी’ची मान्यता दिल्याने हे कॉलेज ‘बाटू’शी जोडली गेली. औरंगाबाद विभागातील १० कॉलेजांचा समावेश आहे.
तंत्रशास्त्र विद्यापीठाला विविध विद्यापीठातील अभियांत्रिकी कॉलेज जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेला सलंग्निकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. संलग्निकरण हवे की नको, हे कॉलेजांवर अवलंबून होते. राज्यातील ४८ अभियांत्रिकी कॉलेजांनी ‘बाटू’शी सलंग्निकरणाबाबत इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते. त्यात अनेक विद्यापीठांनी ना हारकत प्रमाणपत्र देण्यास विलंब केला. त्यासह या विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीला सोलापूर वगळता इतर विद्यापीठांनी जागा ही दिली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्याशी संलग्निकरण असलेल्या कॉलेजांना ना हारकत देण्यास विलंब केला होता. हे प्रकरण शिक्षणमंत्र्यांपर्यंत गेले. त्यानंतर अखेर प्रस्ताव सादर केलेल्या कॉलेजांना ना हारकत प्रमाणपत्र देण्यात आले.
राज्यस्तरावरून ‘अखिल भारतीय तंत्र परिषद’कडे हे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. ‘एआयसीटीईने’ या कॉलेजांना ‘चेंज ऑफ युनिर्व्हसिटी’ची मान्यता देण्याचे पत्र पाठविले आहे. राज्यातील ४८ अभियांत्रिकीचे महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बाटू’शी जोडले जाणार आहेत.
यंदा ‘बाटू’शी संलग्निकरण हे कॉलेजांना ऐच्छिक ठेवण्यात आले होते. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व अभियांत्रिकी कॉलेजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्नीकरण बंधनकारक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तसा निर्णय झाल्यास राज्यातील सर्व अभियांत्रिकी कॉलेज एकाच विद्यापीठाच्या छताखाली येतील.

औरंगाबादेतील महत्त्वाचे कॉलेज ‘बाटू’कडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत असलेल्या अनेक महत्त्वाच्या इंजिनीअरिंग कॉलेजांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्निकरणासाठी प्रस्ताव पाठविले होते. एआयसीटीईने हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता या कॉलेजांचे प्रथम वर्ष ‘बाटू’शी जोडलेले असेल. ‘एमएचटी-सीईटी’ प्रवेश प्रक्रियेदरम्यान या कॉलेजांचे विद्यापीठ ‘बाटू’ दर्शविण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागातील १० कॉलेजांचा यात समावेश आहे. ‘बाटू’कडे जाणारी अनेक कॉलेज नामांकित आहेत.

‘सीएसएमएसएस’मध्ये विभागीय केंद्र?
तंत्रज्ञान विद्यापीठाचे औरंगाबाद, पुणे, नागपूर व मुंबई असे चार विभागीय केंद्र असतील. हे केंद्र संपूर्णपणे ‘व्हर्च्यूअल सेंटर’ म्हणून काम करतील. केंद्रातील संपूर्ण कामकाज हे ऑनलाइन असेल. यामुळे संबंधित कॉलेजांना विद्यापीठात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. औरंगाबादचे सेंटर हे ‘सीएसएमएसएस’ कॉलेज कॅम्पसमध्ये स्थापन करण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी विद्यापीठाने नेमलेले संचालक असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर परिसरात रोहिण्या बरसल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
वैजापूर शहर व परिसरात बुधवारी दुपारी रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडला. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्यान सर्वत्र दाणादाण उडाली.
कोर्ट परिसरातील एक झाड उन्मळून पडले. तसेच अन्य भागातही अनेक झाडे पडल्याची माहिती आहे. एका ठिकाणी विजेचा खांब पडल्याने शहराचा वीजपुरवठा दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत खंडित झाला होता. शहरातील मुरारी पार्क भागातील साळुंके यांच्या घरावरील दुरध्वनी टॉवर जोराच्या वाऱ्यामुळे कोसळला. शिवराई रोड परिसरात पत्र्याच्या टपऱ्या वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर येऊन पडल्या होत्या. रोटेगावपर्यंत गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा होता. पाऊस पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते. सोयगाव शहराला गुरुवारी सायंकाळी तासभर वादळाचा सामना करावा लागला. प्रचंड वाऱ्यामुळे एकच धावपळ उडाली होती. बसस्थानक परिसरातील दुकानांतली सामान फेकले गेले. वादळी वाऱ्यासोबतच ढग दाटून आल्याने अचानक वातावरणात बदलले. सोयगाव-जरंडी रस्त्यावर झालेल्या झाडांची पडझड झाली. वादळाचा तडाखा बसल्याने वीजवाहिन्या तुटून रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेला नग्न करून वाकला येथे मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
शेतीच्या वादातून एका ४३ वर्षीय महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. ही घटना तालुक्यातील वाकला येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी १४ जणांविरुद्ध शिऊर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला व आरोपींमध्ये शेतीचा जूना वाद आहे. आरोपींनी संगनमत करून गट क्रमांक ६२७ मधील शेतात अनाधिकृतपणे प्रवेश केला, तसेच अतिक्रमण करून शेत नांगरले. याबद्दल विचारणा करण्यासाठी महिला गेली असता तिला गज व काठीने जबर मारहाण करण्यात आली. तसेच तिच्या अंगावरील कपडे काढण्यात आले. याशिवाय शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी वाकला येथील मिनीनाथ वाल्मिक सोनवणे, वाल्मिक सूर्यभान सोनवणे व इतर १२ अनोळखी, अशा १४ जणांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार प्रकाश जाधव हे करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांचा ठणठणाट निवळण्याची चिन्हे

$
0
0

औषधांचा ठणठणाट निवळण्याची चिन्हे

घाटी प्रशासन म्हणते, ‘३७ औषधांच्या खरेदीला मान्यता, लवकरच पुरवठा होणार सुरळीत’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) मागच्या तब्बल दोन महिन्यांपासून असलेला औषधांचा ठणठणाट लवकरच निवळण्याची चिन्हे असून, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) ३७ प्रकारच्या औषधांच्या खरेदी मान्यता दिली असल्याने दोन दिवसांत महत्वाच्या व दैनंदिन गरजेच्या बहुतांश औषधांचा पुरवठा सुरळीत होईल, असे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी सध्या रुग्णालयामध्ये सलाईन, इन्सुलिन यासारख्या मोजक्याच औषधांचा पुरवठा झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील औषधांची राज्यस्तरावर खरेदी होणार आहे आणि त्यासाठीच मध्यवर्ती खरेदी समिती (सेंट्रल पर्चेस कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फतच औषधांची एकत्रित खरेदी होणार आहे. मात्र राज्यस्तरीय खरेदी केली जाणार असल्यामुळे अधिष्ठाता पातळीवर एरवी केली जाणारी स्थानिक खरेदी (लोक पर्चेस) पूर्णपणे बंद करण्याचे आदेश समितीमार्फत देण्यात आले आहे. एकीकडे स्थानिक खरेदी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर दुसरीकडे समितीकडे ६७ प्रकारच्या औषधांचा प्रस्ताव पाठवूनही समितीमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. परिणामी, अगदी दैनंदिन वापरातील औषधे, नेहमीची औषधे व प्रतिजैविके आणि रुग्ण अतिगंभीर व मृत्युच्या दारात उभा असताना तात्काळ उपयोगात आणल्या जाणाऱ्या जीवरक्षक औषधांचाही घाटीमध्ये मागच्या जवळजवळ दीड ते दोन महिन्यांपासून ठणठणाट होता व अजूनही बऱ्याच प्रमाणात आहे. या स्थितीमुळेच जवळजवळ प्रत्येक रुग्णाला बाहेरुन औषधे आणण्यास सांगितली जात होती व आजघडीलाही सांगितली जात आहे. दुर्दैवाने घाटीतील ९० टक्के रुग्ण हे गोरगरीब असल्यामुळे बहुतेकांना ही औषधांची खरेदी शक्य नसल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. कित्येकांना औषधांशिवाय किंवा जमेल तशी औषधे घेऊन घाटीमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत योजना लागू असणाऱ्या प्रत्येक रुग्णावर प्रत्येक उपचार-तपासणी मोफत केली जाणे अनिवार्य आहे. मात्र अशा रुग्णांनादेखील औषधांचे-वैद्यकीय साहित्याचे प्रिस्क्रिप्शन दिले जात आहे. मागच्या दोन महिन्यांपासून घाटीमध्ये ऑग्मेन्टिन, अॅमॉक्सिसिलीन, टॅक्झिम यासारखी प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स), इन्सुलिन, व्हिटॅमिन्स, अॅनालजेसिक (पेनकिलर), आयव्ही फ्लुईड्स, अँटीसेप्टिक, बँडेज, कॉटन, बिटाडिन आदी औषधांचा गंभीर तुटवडा रुग्णांना भोगावा लागतो आहे. नित्याचे वैद्यकीय साहित्यदेखील नसल्याने गोरगरीब रुग्णांना फटका बसत आहे. प्लास्टरसाठी वापरले जाणारे ‘जिप्सो रोल’देखील घाटीमध्ये नसल्याने प्लास्टरच्या प्रत्येक रुग्णाला हजार-दीड हजार रुपयांचा फटका बसत आहे. एकीकडे अशी स्थिती असताना मध्यवर्ती खरेदी समितीने औषधांच्या स्थानिक खरेदीला पूर्वी मान्यता दिली नव्हती.

सलाईन, इन्सुलिन झाले उपलब्ध
या एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ३७ प्रकारच्या महत्वाच्या व दैनंदिन औषधांच्या खरेदीला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे निदान काही दिवसांत तरी औषधांची टंचाई निवळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. त्याचवेळी तुटवडा असलेले सलाईन, इन्सुलिन यासारखी मोजकीच महत्वाची औषधे घाटी रुग्णालयामध्ये काही प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

३७ प्रकारच्या दैनंदिन तसेच महत्वाच्या औषधांच्या खरेदीला ‘डीएमईआर’ने नुकतीच मान्यता दिली असल्याने औषधांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पूर्वी दर करारावर असलेल्या कंपन्यांमार्फत हा औषधांचा पुरवठा होईल व अगदी दोन दिवसांत मागवलेली औषधे उपलब्ध होतील. यातील काही औषधांच्या पुरवठ्याला सुरुवातदेखील झाली आहे. मध्यवर्ती खरेदी समितीमार्फत औषधांचा पुरवठा होईपर्यंत या पद्धतीने खरेदी होईल.
– डॉ. भारत सोनवणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेशनवमीनिमित्त उत्सवाचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महेशनवमीनिमित्त २५ मे ते ३ जून दरम्यान माहेश्वरी मंडळतर्फे शहरात महेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात गुरुवारपासून आरोग्य शिबिरच्या माध्यमातून करण्यात आली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद तोतला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी प्रमाणे यंदा उत्सवात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. माहेश्वरी मंडळ व त्यांचे अठरा प्रभाग, संलग्न संस्था एकत्र येत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. पर्यावरण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, स्पर्धात्मक, शैक्षणिक अशा विविध विषयांशी निगडीत हे उपक्रम असणार आहेत. गुरुवारी आरोग्य चिकित्सा शिबिर, २८ मे रोजी मॅरोथॉन स्पर्धा, सायंकाळी ‘श्री देवी-देवताओंका धरती पे वास’, २९ मे रोजी ‘गाणे सुने-अनसुने’, ३१ मे रोजी ‘प्रश्न मंजुषा’, १ जून रोजी सकाळी ‘बचपन के खेल’, दुपारी ‘जल बचाओ बॅनर स्पर्धा’ सायंकाळी ‘हेल्दी वेलकम ड्रिंक्स स्पर्धा’, ‘हास्यनाटिका रिश्तों की नोक झोक’, ‘ग्लिटर्स ऑफ माहेश्वरी’, २ जून रोजी सकाळी ‘हॅपी स्ट्रीट’, ‘निबंध एवं चित्रकला स्पर्धा’, ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ तर, ३ जून रोजी सकाळी रुद्राभिषेक, रक्तदान शिबिर, माहेश्वरी जॉब डॉट कॉम बेवसाइटचे उदघाटन सोहळा. ११ जून रोजी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे, असे तोतला यांनी सांगितले.

३ जून रोजी शोभायात्रा

महेशनवमीनिमित्त ३ जून रोजी शोभ यात्रा काढण्यात येणार आहे. खडकेश्वर मंदिरा, महेश चौक ते गुलमंडी, पैठणगेट मार्गे तापडिया नाट्य मंदिर येथे ही शोभा यात्रा पोहचेल. यावेळी अरुण सिकची, द्वारकाप्रसाद सोनी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेला अनिल बाहेती, सुनिल मालाणी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकवर्गणीतून गाळ काढण्याची मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद तालुक्यातील जोगवाडा येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या १९ दिवसांपासून हे काम सुरू असून, आतापर्यंत अडीच हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला अाहे. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत दिला जात आहे.
जोगवाडा हे अवघ्या १५० कुंटुब वस्तीचे गाव आहे. गाव परिसरात जुना पाझर तलाव असून, यात कचरा, गाळ साचला होता. त्यामुळे प्रदूषणही वाढले होते. ही बाब लक्षात घेऊन गाळमुक्त तलाव करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून एक लाख रुपये जमा केले. त्यांच्या या कामात महात्मा फुले ग्रामविकास संस्थेनेही मदतीचा हात पुढे करून तीन लाखांची मदत केली. त्यानंतर ८ मेपासून गाळ काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी सुरेश बेदमुथा यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी जोगवाडा येथे भेट देत लोकवर्गणीतून सुरू असलेल्या या कामाची पाहणी करत ग्रामस्थांनी हाती घेतलेल्या कामाचे कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर घोटाळा; आरोपी हर्सूलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अभियांत्रिकी पेपर घोटाळ्यातील आरोपी व साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक, परीक्षा केंद्रप्रमुख व सदस्य अशा पाचजणांची रवानगी न्यायालयीन कोठडी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी गुरुवारी दिले. त्याचवेळी आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.
साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. विजय आंधळे, संस्थाचालक सदस्य मंगेश मुंढे, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. गंगाधर मुंढे, परीक्षा केंद्रप्रमुख अमित कांबळे व प्राचार्य संतोष देशमुख यांच्या वाढीव पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीवेळी, पोलिस कोठडीच्या कालावधीत आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. आंधळे याच्यानुसार मंगेश मुंढे याच्या सांगण्यावरुन टीव्ही सेंटर येथे आरोपी विद्यार्थी किरण सुरे याच्याकडे उत्तरपत्रिका दिल्या होत्या; परंतु २५ उत्तरपत्रिका स्वत:कडे बाळगण्याचा उद्देश सांगत नाही. घटनेच्या दिवशी आरोपी कोणाशी संपर्कात होते, याबाबत त्यांचे मोबाइल कॉल डिटेल्स व टॉवर लोकेशनची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कातील विद्यार्थी-प्राध्यापकांना ताब्यात घ्यावयाचे आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातील स्लीप नंबर-३ जप्त करावयाची आहे व प्रकरणाचा सखोल तपास करावयाचा आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची मुदत वाढवावी, अशी विनंती तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले व विशेष सहायक सरकारी वकील सय्यद शेहनाज यांनी कोर्टात विनंती. तर, बचावपक्षातर्फे अ‍ॅड. निलेश घाणेकर, अ‍ॅड. मच्छिंद्र दळवी, अ‍ॅड. जनार्दन मुरकुटे, अ‍ॅड. शांताराम ढेपले आणि अ‍ॅड. एन. डी. सोनुने यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर कोर्टाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

आरोपी करू शकतात फेरफार

आरोपींनी जामीन अर्ज सादर केला असता, आरोपी हे संस्थाचालक, प्राध्यापक व पदाधिकारी आहेत आणि सकृतदर्शनी त्यांचा गुन्ह्यात मुख्य सहभाग दिसून येतो. त्यांना जामीन मंज़ूर केल्यास ते कागदपत्रांमध्ये फेरफार करुण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत कोर्टाने आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रक कारचा अपघात, एक ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तेलंगणा येथून शिर्डी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात होऊन एक जण ठार व पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी नागपूर-मुंबई महामार्गावरील शिवराई शिवारात घडली.
सुरेश विरय्या येलगंदला (वय ३९) असे या घटनेतील मृताचे नाव आहे. या कुटुंबातील वरलक्ष्मी येलगंदला, साईशिव (वय ११), स्वाती (वय ९), संपतकुमार उतोरी व कारचालक साईकृष्णा राजेश्वर पुपाला हे जखमी झाले आहेत. ते औरंगाबाद येथून कारने (टी एस ०१ इ जी ११८४) शिर्डी येथे दर्शनासाठी जात होते. त्यावेळी शिवराई शिवारात ट्रकने (एम एच १७ टी ५३५३) धडक दिली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेट’ परीक्षा होणार का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
येत्या ३० मे पूर्वी पीएच. डी. पूर्वपरीक्षा (पेट) जाहीर करून ३० जूनपर्यंत परीक्षा घेण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा पदभार काढून डॉ. राजेश रगडे यांना सोपवण्यात आला. पण, दीक्षांत समारंभाच्या तयारीत गुंतलेल्या प्रशासनाला ‘पेट’चा विसर पडला आहे. तब्बल साडेतेरा हजार विद्यार्थी अडीच वर्षांपासून ‘पेट’ परीक्षेची वाट पाहत असतानाही प्रशासकीय पातळीवर उदासीनता कायम आहे.
अडीच वर्षात किमान दोन ‘पेट’ परीक्षा होणे अपेक्षित असताना एकही परीक्षा झालेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय उदासिनतेचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. पीएच. डी. पूर्वपरीक्षेसाठी (पेट-४) साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेची वाट पाहत अडीच वर्षे उलटली. विद्यार्थी संघटना आणि शैक्षणिक शिष्टमंडळांनी ‘पेट’ घेण्याबाबत अनेकदा पाठपुरावा केला. यानंतरही ‘पेट’ झाली नाही. काही दिवसांपूर्वी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विविध मागण्यांसह ‘पेट’ घेण्याची मागणी केली होती. येत्या ३० मे पूर्वी ‘पेट’चे वेळापत्रक जाहीर करून ३० जूनपर्यंत परीक्षा घेण्यात येईल असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी आश्वासन दिले. त्यामुळे ‘पेट’ लवकरच होईल असा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला होता. साई इंजिनिअरिंग कॉलेजच्या मास कॉपी प्रकरणानंतर विद्यापीठ स्तरावर मोठ्या हालचाली झाल्या. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना हटवून डॉ. राजेश रगडे यांना पदभार सोपवण्यात आला. त्यामुळे ‘पेट’ परीक्षेचे नियोजन ठरणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात काहीही नियोजन झाले नाही असे सूत्रांनी सांगितले. येत्या ३० मे रोजी दीक्षांत समारंभ असल्यामुळे विद्यापीठ प्रशासन तयारीत गुंतले आहे. या गडबडीत ‘पेट’ परीक्षा जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत.

विद्यार्थी प्रतीक्षेत
‘पेट’ परीक्षेसाठी साडेतेरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ५८ विषयांत परीक्षा होणार आहे. यंदा ऑनलाइन परीक्षा घेणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. तसेच विषय तज्ज्ञांकडून प्रश्नावली तयार करण्यात येणार होती. पण, विषयतज्ज्ञांनी प्रश्नावली पाठवली नसल्याने ‘पेट’चे नियोजन कोलमडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजीदकडे नोट छापण्याचे कौशल्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट नोटा प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने नोट तयार करताना दोन्ही बाजूने प्रिंट सारखी आल्यासच ही बनावट नोट हुबेहूब खऱ्या नोटेसारखी तयार होत असल्याची माहिती दिली. योग्य नोट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागद लागत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, संशयित आरोपी माजीदखान याच्यावर रेल्वे भरतीची बनावट नियुक्तीपत्रे दिल्याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
बायजीपुरा येथील माजीदखान हा खऱ्या नोटांच्या बदल्यात दुप्पट बनावट नोटा देत असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेने सापळा रचून त्याला ५० हजारांच्या बनावट नोटा खबऱ्या मार्फत मागवल्या होत्या. यावेळी माजीदखानने दोन दिवस लागतील असे सांगि‌तल्याने माजीद या नोटा बाहेरून मागवत असावा, अशी शंका पोलिसांना आली होती. दरम्यान १९ मे रोजी गुन्हेशाखेने सापळा रचून माजीदच्या घरावर छापा टाकला. यावेळी दोन हजार, पाचशे व शंभर रुपयांच्या पाच लाखांच्या बनावट नोटा तसेच स्कॅनर, प्रिंटर आढळले. चौकशीमध्ये माजीदखानने या नोटा घरीच बनवल्याची माहिती समोर आली. दहावी पास असलेल्या माजीदने बनावट नोटा तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले होते. या बनावट नोटा तयार करताना नोटेच्या दोन्ही बाजूची छपाई कागदावर सारखी आल्यास ही नोट तयार होत होती. एका बाजूची थोडी जरी प्रिंट सरकली तर ही नोट बनावट असल्याचे लगेच समजून येत होते. यासाठी मोठ्या प्रमाणावर कागद लागत असल्याचे माजीदखानने पोलिसांना सांगितले.

बनावट नियुक्तीपत्रे

माजीदने बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळवाडी राजा येथील तरुणांची देखील रेल्वे भर्ती प्रकरणात फसवणूक केली आहे. या तरुणांना बोगस नियुक्तीपत्रे बनावट सही शिक्के मारून माजीदने दिली होती. याप्रकरणी तेथील पोलिस ठाण्यात माजीदविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची सिटीबस सुरू राहणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सवेरा ग्रुपच्या सिटीबस चालवण्यास पालकमंत्री रामदास कदम यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. ‘येत्या ५ जूनपासून या बस सुरू करा,’ असे आदेश त्यांनी दिल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. खासगी सिटीबसबरोबरच एसटी महामंडळाच्या बस देखील सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त मुगळीकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी यासाठी एका खासगी संस्थेच्या संचालकांशी चर्चा केली. त्या संस्थेने सिटीबस चालवण्याची तयारी दर्शवली. पहिल्या टप्प्यात १५ बस चालवू, असे त्यांनी मुगळीकर यांना सांगितले. त्यानुसार आवश्यक तो प्रस्ताव तयार केला. मुगळीकर यांनी स्वतः मुंबईला जाऊन परिवहन विभागात प्रस्ताव सादर केला. त्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत मुंबईतच आढावा बैठक झाली. या बैठकीत खासगीकरणातून सिटीबस चालवण्यावर चर्चा झाली. त्याची माहिती गुरुवारी मुगळीकर यांनी पत्रकारांना दिली. ही माहिती देताना त्यांनी त्या संस्थेचे नाव उघड केले नव्हते, पण सवेरा ग्रुप सिटीबस सेवा चालवण्यास तयार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
जागतिक पर्यावरण दिनी, ५ जून रोजी सिटीबस सेवा सुरू करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत, असे मुगळीकर यांनी सांगितले. या दिवशी खासगीकरणातून सिटीबस सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासगी सिटीबसेससह एसटी महामंडळाच्या बस देखील सुरू राहतील. महामंडळाच्या बसचे मार्ग वगळून खासगी बससाठी मार्ग ठरवून दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. खासगीकरणातून सिटीबस चालवण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. ५ जूनपर्यंत शासनाची परवानगी मिळाली नाही, तर शासनाच्या परवानगीच्या आधीन राहून सिटीबस सेवा सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मकरंदने सांगितले जलसंधारणाचे महत्त्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन श्रमदान करणाऱ्या गोळेगावात बुधवारी मकरंद अनासपुरे यांच्या पाणीसमस्येवरील चित्रपटाचे गुरुवारी चित्रीकरण करण्यात आले. हे चित्रीकरण पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल दिवे असून मकरंद अनासपुरे, रवींद्र मंकणी, तेजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येथे दोन दिवस चित्रीकरण करण्यात येणार आहे. गोळेगाव येथील जाफरवाडी रस्त्यावरील डोंगराळ भागात गावकरी श्रमदानातून खोल समतलचर खोदण्याचे काम करण्यासाठी जमले आहेत. मकरंद अनासपुरे यांनी हातात फावडे घेऊन ग्रामस्थांना कामाचे स्वरूप समजून सांगतानाचे दृश्य चित्रीत करण्यात आले. समतल चर खोदणे, त्यामुळे थांबणारी जमिनीची धूप, वृक्षारोपणाचे महत्व आदीवर आधारित प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आले. यावेळी चित्रीकरण पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
‘पाणी समस्या हा जिव्हाळ्याचा प्रश्न झाला असल्याने हा चित्रपट स्वीकारला आहे. गोळेगावचे सरपंच संतोष जोशी हे मित्र असून त्यांचे काम पारदर्शी आहे. गावाचे कल्याण हे उद्दिष्ट ठेवून ग्रामस्थ येथे श्रमदान करत आहेत,’ असे मकरंद अनासपुरे यांनी ‘मटा’बोलताना सांगितले.

प्रगतीसाठी एकत्र या

ग्रामविकासासाठी विरोध असू नये. गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत मकरंद अनासपुरे यांनी ‘मटा’ शी बोलताना व्यक्त केले. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जबाजारी शेतकरी कुटुंबासाठी दोन वर्षांपासून काम सुरू केले आहे. फाउंडेशनने मराठवाडा व विदर्भात जलसंधारणाची कामे केली आहेत. सध्या जत, माण, खटाव या भागातील २० गावांमधअये कामे सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images