Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘आयसीएसई’चा निकाल जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
काउंन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई) मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी, बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शंभर टक्के निकाल हेच निकालाचे वैशिष्ट आहे. अमोघ वाघमारे याने ९८ टक्के गुण मिळवित यश मिळविले.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालानंतर सोमवारी आयसीएसई मंडळाने आपला दहावी, बारावी परीक्षांचा निकाल दुपारी ३ वाजता जाहीर केला. औरंगाबादमधून बारावीला असलेल्या परीक्षार्थींची संख्या अत्यंत कमी होती, तर तीन शाळांमधून दहावीला विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. निकालात इंग्रजी, गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. दहावीची परीक्षा २ मार्च ते १७ एप्रिलदरम्यान, तर २९ फेब्रुवारी ते १० एप्रिलदरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. देशभरातून सुमारे अडीच हजार शाळांमधून १ लाख ७६ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

पोदार हायस्कूल
पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून १६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना अनेक विषयांत पैकीच्या पैकी गुण आहेत. शाळेचा अमोघ वाघमारेला ९८ गुण मिळाले आहेत. मोहित कुलकर्णी (९६), राहुल बोरूलकर(९५.२०), मानसी पालवनकर(९५), युक्ती गुजराती(९४.८०), वरदराज मोरे (९४.६०), कुशल महाजन (९४.६०), श्रृती अय्यर (९४.६०), तुष्मण कळसे (९४.४०), जिज्ञासा चिंतामणी (९४.२०), अर्णव कुलकर्णी (९४), शुभम गन्नमराजू (९४), शेजल लोया (९४), रोहिण भट (९३.८०), साक्षी अमृतकर (९३.६०), पृथ्वीराज जाधव (९३.४०), आदिती कोळपकर (९३.२०), स्नेहल बावीस्कर (९३), सर्वेश तांबट (९३), शुभम फडणीस (९२.८०), मोहित अग्रवाल (९२.६०), तान्या यादव (९२.४०), मृणमयी देशपांडे (९२.४०), द्विजा बागवे (९२.४०), ऋत्विक सराफ (९२), श्रेया मेहता (९२), वरद पटेल (९२), व्ही. अनुपार्वती (९१.८०), भक्ती तापडिया (९१.८०), श्रेया हंदरळे (९१.८०), समुद्धी बोरा (९१.६०), स्वराज सुराणा (९१.६०), श्रेयस बिकुमल्ला (९१.६०), अक्षदा मुळे (९१.६०), अनिकेत बंग (९१.२०), पूर्वा घाग (९१), विश्वेष कुलकर्णी (९०.८०), यतार्थ गर्ग (९०.६०), अक्षत घारिया (९०.४०), अहना सेन (९०.२०), तुषार पाठक (९०.२०), ऋचा ढाकणे (९०), आंचल मुगदिया (९०), आकांशा ससे (९०) अादी विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

रेयान स्कूल
रेयान इंटरनॅशनल स्कूलचा निकालही शंभर टक्के जाहीर झाला अहे. शाळेचे ३१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यामध्ये विभा अलूर, विशाल दयालानी, भाविशा पारिख, अमेय भट्टड, प्रतीक कुमार, साक्षी काकडे, प्रसन्ना पुजारी यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरू डॉ. चोपडे यांचा राजीनामा घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्ट व नियमबाह्य कारभारामुळे महामानवाच्या नावाच्या बदनामीस ते कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी मराठवाडा विकास कृती समितीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली.
यावेळी समितीने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विद्यापीठाचे नाव शैक्षणिक स्तरावर मागे नेले आहे. त्यांच्या अकर्तव्यदक्ष व ढिसाळ प्रशासकीय कारभारामुळे विद्यापीठाची सर्वत्र बदनामी होत असून, मराठवाड्यातील शेतकरी, गोरगरीब मजुरांच्या पाल्यांचे, विद्यापीठ व विद्यापीठ सं‌लग्नित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा एकही निर्णय न घेता राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करण्यात येत आहे. विद्यापीठाला केंद्रीय दर्जा दिला जाणार नसल्याचे जाहीर केल्यानंतरही यासंदर्भात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. अशा नियमबाह्य आदेशाची चौकशी करण्यात यावी, विद्यापीठाच्या कामकाजासाठी सॉफ्टवेअर ‌विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी नागपूर येथील सत्तेशी संबंध असलेल्या कंपनीस बेकायदा विनानिविदा सहा कोटींच्या कामाचे निर्देश दिले, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यासंदर्भत आमदार संजय शिरसाठ व विविध विद्यार्थी संघटनांनी नियमबाह्य कार्यादेश मागे घेण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करावी. विद्यापीठास स्थापन करण्यात आलेल्या सेंट्रल फॅसिलिटी सेंटरमध्ये अनुभवी व पीजी विभागाचा अनुभव असलेले प्राध्यापकाची नेमणूक अनिवार्य असताना, तेथे यूजी विभागाचा अनुभव असलेले डॉ. देवानंद शिंदे यांची संचालकपदी नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली. या बेकायदा नियुक्तीच्या अनुभवाचा लाभ घेऊन डॉ. शिंदे हे कोल्हापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर मजल मारू शकले, याची चौकशी होऊन कारवाई करावी. तत्कालिन कुलगुरू डॉ. कोतापल्ले यांनी देखील आपल्या कार्यकाळात ३२ कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती रद्द करून चौकशी करावी यांसह विविध विभागांतील गैरकारभाराची, नियमबाह्य करण्यात आलेल्या भरतीची व चुकीच्या निर्णयाची चौकशी करावी आदी मागण्या यावेळी केल्या.
आयुक्तंना निवेदन देण्यासाठी ‌मराठवाडा कृती समितीचे अमोल दांडगे, अॅड. शिरीष कांबळे, दिनकर ओंकार, प्रा. सुनील वाकेकर, विजय हिवराळे, प्रा. दिगंबर गंगावणे आदींची उपस्थिती होती.

राज्यपालांच्या भेटीची विनंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी समितीच्या सदस्यांनी आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेतली. यावेळी समिती पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मिळवून द्यावी, अशी विनंतीही आयुक्तांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत सर्वकाही अालबेल नाही

$
0
0

शिवसेनेत सर्वकाही अालबेल नाही

संपर्कनेत्यांकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घरचा आहेर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादेतील शिवसेनेची शाखा मराठवाड्यातील पहिली शाखा आहे. ३२ वर्षे पूर्ण करणाऱ्या शिवसेनेच्या या शाखेत सर्वकाही अालबेल आहे असे मानण्याचे कारण नाही, असे म्हणत संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाच घरचा आहेर दिला. पक्षाला आपण उभारी देऊ शकलो नाही, असे ते म्हणाले.

शिवसेनेतर्फे १ जूनपासून शिवसंपर्क अभियान सुरू केले जाणार आहे. त्याच्या तयारीच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यात घोसाळकर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, उपमहापौर स्मिता घोगरे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, बंडू ओक, शहरप्रमुख रेणुकादास वैद्य, संतोष जेजुरकर, युवा सेनेचे ऋषीकेश खैरे, माजी सभापती विजय वाघचौरे, मोहन मेघावाले, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

घोसाळकर म्हणाले, ‘शिवसेनेच्या शहरातील बुथप्रमुख व गटप्रमुखांच्या नेमणुकीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समाधानी नाहीत. बुथप्रमुख, गटप्रमुखांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारी पथक नेमा, असे आदेश त्यांनी दिले होते, पण अद्याप आपण ही पथके नेमू शकलो नाही. पक्षाला उभारी देऊ शकलो नाही. त्यामुळे सर्व बुथप्रमुखांच्या नियुक्त्या रद्द केल्या जात आहेत. जे चांगले कार्यकर्ते असतील त्यांना पुन्हा नियुक्त करू.’

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला न भूतो, न भविष्यती असे यश मिळाले असा उल्लेख करून घोसाळकर म्हणाले, ‘मिळालेल्या यशाच्या आधारावर भारतीय जनता पक्ष सत्तेत प्रतिनिधीत्व देईल, महत्त्वाची मंत्रीपदे देईल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. निवडणुकीपर्यंत भाजपने युतीचा अजेंडा वापरला. निवडणूक झाल्यावर सत्तेचा अजेंडा त्यांनी पुढे नेला आणि तेथेच पहिली ठिणगी पडली. मेळाव्याचे प्रास्ताविक रेणुकादास वैद्य यांनी केले. अंबादास दानवे यांनी शिवसंपर्क अभियान व मी कर्जमुक्त होणार या अभियानाची माहिती दिली. या दोन्हीही अभियानाबद्दल करण्यात आलेले नियोजन त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडले. मेळाव्याचे सूत्रसंचालन नंदकुमार घोडेले यांनी केले.

चौकट

घोसाळकर उपमहापौरांचे नाव विसरले

संपर्कनेते विनोद घोसाळकर भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी प्रथेप्रमाणे व्यासपीठावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे घेतली, परंतु ते उपमहापौरांचे नाव विसरले. काही केल्या त्यांना उपमहापौरांचे नाव लक्षात येत नव्हते, त्यामुळे त्यांनी उपमहापौरांचे नाव काय असा प्रश्न अंबादास दानवे यांना केला. दानवे यांनी त्यांना नाव सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर स्मिता घोगरे उपस्थित होत्या. उपमहापौरपदासाठी घोगेर यांचे नाव जाहीर करण्यासाठी घोसाळकरच मुंबईहून औरंगाबादला कारने प्रवास करीत रातोरात आले होते. सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी घोगरे यांचे नाव जाहीर केले होते. त्यांच्या अशा ‘तत्परतेबद्दल’ पक्षातील काही जणांनी बंडाचे निषाणही फडकवले होते. अशी पार्श्वभूमी असलेल्या उपमहापौरांचे नाव घोसाळकर विसरल्यामुळे मेळाव्याला उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती कोण? ‘दादा’ घेणार निर्णय

$
0
0

सभापती कोण? ‘दादा’ घेणार निर्णय

गुरूवारी कोअर कमिटीची बैठक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेच्या स्थायी समितीचा सभापती कोण असावा या संबंधीचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे (दादा) घेणार आहेत. येत्या एक - दोन दिवसात त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या नावाची शिफारस केली जाणार असून सभापतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी गुरुवारी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक शनिवारी (३ जून) होणार आहे. शिवसेना - भाजपमध्ये झालेल्या करारानुसार यंदाचे सभापतिपद भाजपच्या वाट्याला आले आहे. निवडणुकीसाठी पाच दिवस शिल्लक राहिलेले असल्यामुळे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष व कोअर कमिटीचे अध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्याशी संपर्क साधून संभाव्य उमेदवाराबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘सभापतिपदाचा उमेदवार कोण असावा याबद्दल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी आपण उद्या चर्चा करणार आहोत. तेच निर्णय घेतील व आम्हाला आदेश देतील. सभापतिपदाच्या स्पर्धेत तीन - चार नगरसेवक आहेत. त्यांच्या नावाची यादी देखील दानवे यांना सादर केली जाणार आहे. शनिवारी निवडणूक असल्यामुळे गुरुवारी किंवा शुक्रवारी कोअर कमिटीची बैठक घेऊन उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.

सभापतिपदासाठी शहर विकास आघाडी या अपक्ष नगरसेवकांच्या आघाडीचे गटनेते गजानन बारवाल यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या आघाडीत बारा नगरसेवक आहेत. त्यांनी महापालिकेच्या राजकारणात भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या आघाडीला सभापतिपदावर संधा देण्याचे संकेत भाजपच्या नेत्यांकडून मिळाले आहेत. त्यामुळेच यंदा बारवाल यांचा प्रवेश स्थायी समितीमध्ये करण्यात आला. बारवाल यांच्यासाठी कैलास गायकवाड यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपमधील काही स्थानिक नेत्यांनी अपक्ष आघाडीला सभापतिपदासाठी प्रतिनिधीत्व देण्यास विरोध दर्शवला आहे. बारवाल यांच्या बाजूने भाजपमधील बडे पदाधिकारी असल्यामुळे बारवाल यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. बारवाल यांच्या नावाला दानवे यांनी पाठिंबा दिला तर अन्य इच्छुकांना मूग गिळून बसावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोरसेसह तिघांना बुधवारपर्यंत कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांच्या नावाचा वापर करून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा संशयित आरोपी गणेश बोरसे व त्याच्या दोन साथीदारांच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत (३१ मे) वाढ करण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एस. भोसले यांनी दिले.
महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांशी जवळीक असल्याचे भासवून गणेश साहेबराव बोरसे याने आरोग्य, महसूल, समाज कल्याण विभाग व इतर शासकीय कार्यालयात नोकरी लावण्यासाठी विद्यार्थ्यांची फसवणूक कोट्यवधीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. बोरसे याचे दोन्ही साथीदार अजय उर्फ विक्की दादाराव गवई (वय ३१, रा. महात्मा फुलेनगर, बुलडाणा) व गणेश उत्तमराव पवार (वय २९, रा. गोंदी, ता. कराड, जि. सातारा) यांना पोलिसांनी २२ मे रोजी अटक केली होती. कोर्टाच्या आदेशाने तिन्ही आरोपींना सोमवारपर्यंत (२९ मे) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीवेळी,आरोपींनी नोकरीचे आमीष दाखवून विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता अनेक भागांतील विद्यार्थी पोलिसांना फसवणूक झाल्याची माहिती देत आहेत. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. तसेच आरोपी बोरसेने फिर्यादीकडून घेतलेल्या एक लाख रुपयांपैकी ४५ हजार रुपये मैत्रिणीला दिल्याचे कोठडीत कबूल केले. त्यानुसार तिच्याकडून २५ हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे, तर उर्वरित रक्कम जप्त करणे आहे, असा युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील बी. एन. कदम यांनी कोर्टात केला.

तीन आरोपी अद्याप फरार

कोर्टातील सुनावणीवेळी, अजय उर्फ विक्की गवई व गणेश पवार हे पोलिसांना सहकार्य करत नसून, आरोपींचे तीन साथीदार राजू खंडाळकर पाटील, स्वपन गोगाई व कैलास पाचगे हे अद्यापही पसार आहेत. त्यांच्याबाबत चौकशी करणे बाकी असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील कदम यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने तिन्ही आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोक्कामधून सुटताच गुन्हेगारी कृत्ये सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुख्यात गुन्हेगार कल्ल्या उर्फ कलीमखानला परभणी पोलिसांच्या ताब्यातून घेत उस्मानपुरा पोलिसांनी सोमवारी पहाटे शहर गाठले. सात महिन्यांपूर्वी मोक्काच्या गुन्ह्यातून सुटलेल्या कल्ल्याने बाहेर पडताच गुन्हेगारीला सुरूवात केली होती. कल्ल्या हा पोलिसांना दरोड्याच्या तयारीसह पाच घरफोडीच्या गुन्ह्यात वाँटेड होता.
कलीमखान शब्बीरखान उर्फ कल्ल्या (रा. छोटा मुरलीधरनगर) याला परभणी येथे रेल्वे स्टेशन परिसरात पकडण्यात उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी राहुल काळे व ज्ञानेश्वर कोळी यांना यश आले. स्थानिक गुन्हेशाखेच्या मदतीने त्यांनी कल्ल्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हेशाखेच्या सापळ्यातून तीन वेळेस पलायन केले होते. पाच वर्षे मोक्का कायद्याअंतर्गत कल्ल्या हर्सूल कारागृहात शिक्षा भोगून बाहेर पडला होता. बाहेर पडल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्याला समज दिली होती. मात्र काही दिवसातच त्याने गुन्हेगार कृत्याला सुरूवात केली होती. कुख्यात गुन्हेगार टॉम कल्याणी याच्यासोबत दरोड्याच्या तयारीत असताना त्यांच्या टोळीला गुन्हेशाखेने उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली होती. यावेळी टॉम व कल्ल्या पसार झाले होते.

पोलिस ठाण्यात कामगार

कल्ल्या हा १२ वर्षांपासून गुन्हेगारीत आहे. दरवेळी नवीन टोळी करून घरफोडीचे गुन्हे करण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याच्यावर यापूर्वी न्यायालयात न्यायमूर्तीला चप्पल मारल्याचा तसेच न्यायालयातून पीएसआयच्या छातीत लाथ मारून पळाल्याचा गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे त्याने आठ वर्षांपूर्वी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात सफाई कामगार म्हणून काम केले आहे. दिवसा पोलिस ठाण्यात काम व रात्री घरफोड्याचे केल्याचे उघडकीस आले होते.

पोलिस कोठडी

कुख्यात गुन्हेगार कलीम खान उर्फ कल्ल्याला रविवारी (२८ मे) अटक करण्यात येऊन सोमवारी (२९ मे) कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला बुधवारपर्यंत (३१ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी दिले. उस्मानपुरा पोलिसांनी परभणी गुन्हे शाखेच्या मदतीने त्याला परभणी रेल्वेस्टेशन परिसरात जेरबंद केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोमवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जरीना दुर्राणी यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा मावळा’देणार वसतिगृहासाठी लढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या मराठा, बहुजन कुटुंबातील मुलांची निवास व्यवस्था नसल्याने शिक्षणापासूनच वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे मराठा, बहुजन विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी मराठा मावळा संघटना लढा देणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक शिंदे यांनी दिली.
मराठा मावळा संघटन या नवीन सामाजिक संघटनेच्या स्थापनेप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले, गामीण भागातील मराठा समाजाची स्थिती बिकट असली तरी सरसकट समाज आर्थिक विवंचनेत जगतोय असे नाही. एकीकडे प्रस्थापित मराठा प्रगतीकडे आणि विस्थापित अधोगतीकडे असे चित्र आहे. त्यामुळे प्रस्थापित मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा मावळा संघटनेची स्थापना झाली आहे. यातूनच समाजातील सहकारी साखर कारखानदार, शिक्षणसंस्थाचालक आदींनी आपआपल्या कार्यक्षेत्रात समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी करावी यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे. या शिवाय मराठा आरक्षण जाहीर करावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, वेगवेगळ्या संस्था चालवणाऱ्या समाजातील व्यक्तींनी आपल्या क्षमतेप्रमाणे समाजातील विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सोय करावी, आदींसाठी संघटना आक्रमक होणार आहे. राज्यभर संघटनेचा विस्तार व्हावा यासाठी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, मेळावे आदींचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुनील अवटे, गणेश वडकर, हनुमंद कदम, शिवाजी साळुंके, भरत कदम, गणेश औताडे, विजय मास्के, निवृत्ती डक, रावसाहेब घाटे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तू बाईच आहेस ना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकाशवाणी चौकामध्ये वाहतूक पोलिसांनी तरुणाला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांच्या असभ्य वागणुकीचा अनुभव एका अंगणावाडी सेविकेला आहे. एका वाहतूक पोलिसाने मार्च महिन्यात तिला भररस्यात अडवून, ‘तू बाईच आहेस की तृतीयपंथी’, अशी विचारणा केली होती. या वाहतूक पोलिसाविरुद्ध महिलेने शुक्रवारी जालना रोड येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे.

रेहानाची (नाव बददले आहे) उंची साधारणपणे साडेसहा फूट व धिप्पाड शरीरयष्टी. त्या जवळच्या गावात अंगणवाडी सेविका आहेत. आपल्या गावात उत्तम अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या रेहाना यांना २०१५ मध्ये तालुक्यातील उत्कृष्ट अंगणवाडी सेविकेचा पुरस्कारही मिळाला. त्यांच्या अंगणवाडीला आयएसओ मिळाला आहे. औरंगाबादपासून या गावाचे अंतर दीड-दोन तासांचे असून महामंडळाच्या बसेसची संख्या जवळपास नाहीच. त्यामुळे कामानिमित्त रेहाना मिळेल त्या वाहनाने येतात. मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपामध्ये सामील होण्यासाठी त्या गावाहून निघाल्या. मोर्चात वेळेवर पोचणे गरजेचे असल्याने त्या दिवशी त्या ट्रकमध्ये बसून आल्या. नगर नाक्यावर ट्रकमधून पोचल्यावर त्या उतरल्या आणि रस्त्याच्या एका बाजूला उभ राहून पाणी पित होत्या. त्यावेळी तिथे असलेल्या एका वाहतूक पोलिसाने त्यांना अडवले आणि ‘तू बाई आहेस की तृतीयपंथी आहेस’, असा प्रश्न केला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे त्या घाबरल्या. तरी त्यांनी पोलिसाला समजावण्याचा प्रयत्न केला. मी अंगणवाडीसेविका आहे असे सांगितल्यावर वाहतूक पोलिस अजूनच ओरडला. ‘मला उत्तर देतेस. सांग! तू कोण आहेस’? बाई आहेस म्हणते ना तर पुरावा दे. तुझं लग्न झालं आहे का? तुला किती मुलं आहेत, असे प्रश्न त्यांनी विचारले. त्यानंतर तिने आरडाओरडा सुरू केला त्यामुळे तिथे गर्दी झाली. ते पाहून पोलिसाने तिलाच हाकलून लावले. या प्रसंगामुळे रेहाना दुखावल्या. ‘तुझी ड्युटी संध्याकाळपर्यंत असेलच. तू इथंच थांब. मी माझ्या मोर्चात हजेरी लावून पुन्हा इथेच परत येते’ म्हणून त्या मोर्चासाठी निघून गेल्या. मोर्चात पोहोचायला त्यांना उशीर झाल्याने सर्वांनी त्यांची विचारपूस केली तेव्हा रेहाना यांनी ही घटना सांगितली.

मोर्चा आटोपल्यावर रेहाना आाणि इतर २५-३० जणींनी मिळून नगरनाका गाठून वाहतूक पोलिसाला जाब विचारला आणि त्याला वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात नेले. वरिष्ठ, सहकऱ्यांनी त्या पोलिसाला रेहानाची माफी मागायला लावली, पण वारंवार विनंती करूनही रेहानाचा लेखी अर्ज त्यांनी स्वीकारला नाही. अधिकाऱ्यांनी तोंडी माफीने प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. यानंतर रेहाना शांत झाल्या, पण शुक्रवारी पुन्हा त्याच वाहतूक पोलिसाने त्यांना पाणचक्कीजवळ अडविले आणि त्यांना पुन्हा त्रास दिला. त्याच दिवशी रेहाना यांनी वाहतूक पोलिसांच्या मोंढ्याच्या कार्यालयात लेखी अर्ज दिला. त्याहीवेळी संबंधित वाहतूक पोलिस तक्रार करू नका म्हणत त्यांच्याशी वाद घालत होता, पण रेहानांनी अर्ज दिला. त्याच दिवशी त्यांना पुन्हा बोलावण्यात आले, पण हा पोलिस तुमचीच का छेड काढतो आणि वाहतूक पोलिसांचे कार्यालय तुम्हाला पोलिस स्टेशन वाटले का असा उलट प्रश्न त्यांनाच विचारण्यात आला. या प्रकरणावर तपास सुरू
असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात येत आहे.

महिलेची वाहतूक पोलिसांनी काढलेल्या छेडछाडीची तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही. अशी तक्रार आल्यास त्याबद्दल नक्कीच चौकशी करून दोषी असेल तर कारवाई करण्यात येईल.
अविनाश आघाव - पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हैसमाळ विकास आराखड्याची तीन वर्षात अंमलबजावणी

$
0
0

म्हैसमाळ विकास आराखड्याची तीन वर्षात अंमलबजावणी

अंदाजपत्रके तात्काळ सादर करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

म्हैसमाळ विकास आराखडा तीन वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प स्थानिक प्रशासनाने केला आहे. ४३८ कोटी ४४ लाख रुपयांच्या या आराखड्यात राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडून कामे केली जाणार आहेत. या कामांची अंदाजपत्रके तात्काळ सादर करण्याचे आदेश या कार्यालयांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत. अंदाजपत्रकांना मंजुरी मिळाल्यावर येत्या सहा महिन्यात म्हैसमाळसह वेरूळ, खुलताबाद व शुलीभंजनच्या विकासाची कामे सुरू केली जाणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक ४ ऑक्टोबर रोजी औरंगाबादेत झाली. या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद व शुलीभंजनच्या विकासासाठी एकत्रित योजना जाहीर केली. या योजनेला मार्च महिन्यात राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. पाच वर्षात ४३८ कोटी ४४ लाख रुपये खर्च करून या चारही पर्यटनस्थळांचा विकास करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात विकास आराखड्याच्या खर्चाला मंजुरी मिळाल्यावर आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात माहिती देताना महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिदे म्हणाले, आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीत कोणकोणत्या विभागांचा समावेश आहे याची माहिती त्यांनी घेतली. ज्या ज्या विभागांचा समावेश आराखड्याच्या अंमलबजावणीच्या कामात आहे त्या विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहून त्यांच्या आखत्यारित येणाऱ्या कामांची अंदाजपत्रके तात्काळ सादर करण्याचे आदेश द्या, असे डॉ. भापकर यांनी सांगितले होते. त्यानुसार प्रत्येक विभागाला पत्र देऊन त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. विविध विभागांकडून प्राप्त झालेली अंदाजपत्रके शासनाला पाठवून त्याला मंजुरी घेतली जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा उल्लेख शिंदे यांनी केला.

विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, राज्य पुरातत्व विभाग, वनविभाग, नगरपालिका, वीज विभाग आदींचा समावेश आहे. या सर्व विभागांशी समन्वय राखून विकास आराखड्याचे काम गतीने पूर्ण केले जाणार आहे. विकास आराखड्याचा पाच वर्षाचा कार्यक्रम तीन वर्षात पूर्ण करण्याची भूमिका विभागीय आयुक्तांनी घेतली आहे, त्यामुळे आराखड्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.


असा आहे म्हैसमाळ विकास आराखडा

१) रस्ते विकास - १२८ कोटी रुपये.

२) पाणीपुरवठा योजना - ७६ कोटी रुपये.

३) जलसंधारण - ६ कोटी ५० लाख रुपये.

४) लघूपाटबंधारे - २१ कोटी रुपये.

५) वीज वितरण - १ कोटी ८० लाख रुपये.

६) वन विभाग - १० कोटी ७० लाख रुपये.

७) नगरपालिका खुलताबाद - ५४ कोटी रुपये.

८) जिल्हा परिषद - २४ लाख रुपये.

९) राज्य पुरातत्व विभाग - ११ कोटी ५० लाख रुपये.

१०) पर्यटन विकास महामंडळ - ९८ कोटी रुपये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजूर संस्था घोटाळा; मूळ संचिका गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तालुका उपनिबंधक कार्यालयातून भद्रा मारोती मजूर सहकारी संस्थेची मूळ संचिकाच गायब झाली आहे. बनावट कागदपत्राआधारे मजूर संस्थेची नोंदणी करून कोट्यवधी रुपयांचा लाभ उचलल्याप्रकरणी भद्रा मारोती सहकारी संस्थेच्या सभासदासह ३५ जणांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हेशाखेने उपनिबंधक कार्यालय व पाटबंधारे व जलसंधारण विभागाला लेखी पत्र मागवून माहिती मागवली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सारंगधर शंकरराव जाधव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जलसंधारण विभागाचे सेवानिवृत्त शाखा अभियंता त्रिंबक विश्वना‌थ बांगर यांनी शासकीय सेवेत असताना पत्नीच्या नावाने भद्रा मारोती मजूर सहकारी संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये काही सभासद उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असताना औरंगाबाद तालुक्याचे रहिवासी दाखवण्यात आले. तसेच सभासद सधन असताना देखील मजूर म्हणून दाखवत ‌विविध शासकीय कार्यालयातील कामे घेऊन कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतला. या मजूर संस्थेचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांना मदत केल्याप्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे तपास करीत आहेत. पोलिसांनी उपनिबंधक कार्यालयाला पत्र पाठवून या संस्थेच्या मूळ स‌ंचिकेची मागणी केली होती. मात्र उपनिबंधक कार्यलयाकडून ही संचिका देण्यास टाळाटाळ होत असून संचिका गहाळ झाल्याचे सांगण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

३५ आरोपींचा समावेश

भद्रा मारोती मजूर संस्थेच्या या घोटाळ्यात एकूण ३५ आरोपींचा समावेश आहे. शिवनारायण नंदाजी गिते, सोनु शिवनारायण गिते, सुमनबाई नंदाजी गिते, रवींद्र रघुनाथ पाटील, रामेश्वर सुभाष वाडेकर, नंदाजी त्रिंबक गिते, दीपक वसंत मोकळे, रोहन अशोक बांगर, शारदा त्रिंबक बांगर, कल्पना अशोक बांगर, वैभव त्रिंबक बांगर, गिरीश त्रिंबक बांगर, पूजा सुनील मुंढे, अशोक विश्वनाथ बांगर, राहुल अशोक बांगर, श्वेता अशोक बांगर, सुदामती सुनील मुंढे, सुनील सोपान मुंढे, राधा दत्ता मुंढे, प्रशांत दत्ता मुंढे, जयदेव विश्वनाथ बांगर, कांताबाई जयदेव बांगर, महादेव विश्वनाथ बांगर, कृष्णाबाई विश्वनाथ बांगर, बाळू नामदेव सानप, मनीषा बाळू सानप, नामदेव बाबुराव सानप, विमल नामदेव सानप, राधा मोहन बांगर, त्रिंबक मांगू चव्हाण, विमलाबाई त्रिंबक चव्हाण, भिवा बापू मधुमले, बापू वामन मधुमले, त्रिंबक विश्वनाथ बांगर (तत्कालीन शाखा अभियंता लघु सिंचन, जलसंधारण) व बी. एल. जाधव (तत्कालीन उपनिबंधक सहकारी संस्था तालुका औरंगाबाद), तसेच संचिका गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कौशल्य ग्रामीण विकास’ संथगतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना जिल्ह्यात संथ गतीने सुरू असल्याचे समोर आले. या योजनेतून गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील केवळ १५० तरुणांना विविध प्रकाराचे कौशल्य प्रशिक्षणाबरोबर रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील बेरोजगारी निर्मूलनाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत (एमएसआरएलएम) राज्यात या योजनेची अंमलबजावणी केली जात असून, समन्वयक म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
‘एमएसआरएलएम’अंतर्गत कार्यरत बचत गटातील महिलांच्या कुटुंबातील बेरोजगार तरुणांना या योजनेतून कौशल्य विकास प्रशिक्षण देणे; तसेच त्यानंतर संबंधित प्रशिक्षण संस्थेकडूनच त्यांना नोकरी, रोजगारांची उपलब्ध करून देणे, असे या योजनेचे स्वरूप आहे. कौशल्य वृद्धीसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची मदत घेतली जात आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण, तरुणींना याद्वारे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून, जिल्ह्यात कॅपस्टन व ग्लोबल हॉटेल अँड मॅनेटमेंट अँड एज्युकेशन सोसायटी या दोन संस्थेमार्फत विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण देण्याची सोय आतापर्यत झाली, परंतु जिल्ह्यात बेरोजगारांची नोंदणीकृत संख्या सव्वा लाखाच्या वर गेलेली असताना या योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांत केवळ दीडशे जणांनाच कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणार्थींना रोजगारांची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामीण विकास यंत्रणेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, या योजनेबाबत जिल्ह्यात अधिक प्रभावी जनजागृती होणे अपेक्षित असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

प्रशिक्षण संस्थांची संख्या वाढणार
कौैशल्य विकास प्रशिक्षण जिल्ह्यात सध्या दोनच संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत हाऊस किपिंग, सुरक्षा रक्षक, रिटेल ट्रेडिंग आदी कौशल्यविकास विषयक प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारांची संधीही उपलब्ध करून दिली जाते झाली. जिल्ह्यात अन्य पाच संस्थांद्वारे प्रशिक्षण वर्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्तावांतील बनवेगिरीला लगाम

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये अधिकाधिक पाणी साठावे म्हणून जिल्हा परिषदेच्या उपकरातून मंजूर केलेल्या पावणदोन कोटींच्या कामात प्रस्तावांची बनवाबनवी झाल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनाने ही कामे स्थगित केली आहेत. दरम्यान, काही कामे मंजूर करून त्याचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिल्यामुळे ही कामे होणार की थांबणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मावळत्या जिल्हा परिषद सभागृहाने उन्हाळ्यापूर्वी जिल्ह्यातील नाला खोलीकरण, बंधाऱ्यांचे रुंदीकरण; तसेच गाळ काढण्यासाठी उपकरातून पावणदोन कोटींच्या निधीला मंजुरी दिली होती. डिसेंबर २०१६मध्ये या प्रस्तावाला मान्यता दिली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; ६० कामांना मंजुरी देण्यात आली. तांत्रिक मान्यता आणि अन्य प्रशासकीय बाबींसाठी काही कालावधी गेला. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या कामांना ब्रेक लागला. आचारसंहिता लागेपर्यंत काही कामांना मंजुरी दिली गेली. निविदा मागविण्यात आल्या. त्यानंतर काही कार्यारंभ आदेशही देण्यात आले.
ही कामे वाटप करताना विशिष्ट गटांमधील एकापेक्षा जास्त कामे प्रस्तावित केली गेली होती. त्याला बंधारा क्रमांक १, २, ३ यासाठी प्रत्येकी ३ लाख रुपये अपेक्षित खर्च नोंदविला गेला. सर्वच कामे ३ लाखांच्या आसपास प्रस्तावित होती. यामध्ये बनवाबनवी झाल्याची तक्रार अतिरिक्त सीईओ सुरेश बेदमुथा यांच्याकडे करण्यात आली होती. बेदमुथा यांनी तक्रारीची दखल घेऊन प्रत्येक तालुक्यात दोन उपअभियंत्यांची चौकशी समिती नेमून प्रस्तावांची वैधता तपासली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; अशा प्रकारे ३ ते ४ ठिकाणी बनवेगिरी केल्याचे समोर आले होते. चौकशी सुरू करून प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात या प्रस्तावाला स्थगिती दिली. दरम्यान, नवीन सभागृह अस्तित्वात आले. उपकरातून मंजूर झालेल्या पावणेदोन कोटींच्या कामाला ब्रेक लागल्याने जिल्ह्यात एकही काम झालेले नाही. त्यामुळे या पावसाळ्यात अपेक्षित असलेली वाढीव सिंचनक्षमता यंदातरी पाहायला मिळणार नाही, असे चित्र आहे. स्थगिती देण्यापूर्वी जी कामे मंजूर झाली होती. किमान त्या कामांना तरी मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे.

तक्रारीवरून संबंधित प्रस्तावांच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल. तो विभागीय आयुक्तांकडे पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल.
- सुरेश बेदमुथा, अतिरिक्त सीईओ, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तमुळे बदलले ६१ गावांचे चित्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
जलयुक्त शिवार योजनेतून वैजापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षांत सुमारे तीन कोटी ३५ लाख रुपये खर्च करून जलसंधारणाची १९ हजार ३३३ कामे करण्यात आली आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या ६१ गावांतील चित्र या उन्हाळ्यात एकदम बदलले आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून अपुरा व अनियमित पाऊस पडल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्याचा परिणाम शेतीवर झाला. पाणी नसल्याने शेती उत्पादन कमी झाले होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून तालुक्यात कामे करण्यात आली. दोन वर्षांत रिचार्ज शाफ्ट, माती नाला बांध, नाला खोलीकरण, बांधबंधिस्ती (कंपार्टमेंट बंडिग), पाझर तलावातील गाळ काढणे, आदी ३६ प्रकारची कामे करण्यात आली. ई-टेंडर व कार्यारंभ आदेश वेळेत झाल्याने कामांचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले. तालुक्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. मोरे यांनी दिली.
पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, निकामी व अरुंद गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बांधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरण, विहीर पुनर्भरण ही कामे करण्यात आली. परिणामी, दोन वर्षांत कृषी विभागाने निवडलेल्या ६१ गांवामध्ये ३ कोटी ३५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. त्यामुळे ६१ गावांच्या परिसरातील भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तालुक्यात झालेली कामे

कामाचे स्वरूप २०१५-१६ २०१६-१७
रिचार्ज शाफ्ट ६ हजार १२ हजार
शेततळे २४५ ५४
मातीनाला ०१ ३६१
नाला खोलीकरन ५७ ५४
कम्पार्टमेंट बंडिंग १९५ ५४
गाळ काढणे ४९ ७५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ लाखांची फसवणूक; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वडगाव कोल्हाटी परिसरातील एकाच फ्लॅटची विक्री करण्यासाठी चौघांकडून तब्बल साडेनऊ लाखांपेक्षा जास्त रक्कम घेऊन चौघांची फसवणूक करणाऱ्या आरोपी पती-पत्नीपैकी महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी सोमवारी (२९ मे) फेटाळला.
या प्रकरणी सुनील शेषराव आव्हारे (ह. मु. बजाजनगर, औरंगाबाद, मूळ रा. विहामांडवा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, वडगाव कोल्हाटी परिसरातील ‘मिरजगावे कन्स्ट्रक्शन’च्या फ्लॅट विक्रीचा १० लाख रुपयांचा करार सुनिता पंडित म्हस्के व तिचा पती पंडित तुकाराम म्हस्के यांच्याशी २० डिसेंबर २०१६ रोजी करण्यात आला होता. त्यावेळी १० हजार रुपये रोख व ५५ हजार रुपयांचा सेंट्रल बँकेचा धनादेश दिला होता व फिर्यादीला इसारपावती करून दिली होती. उर्वरित रक्कम ५ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्याचे ठरले. त्यानुसार ३ लाख १० हजार रुपये ‘आरटीजीएस’द्वारे सुनिता हिला दिले. त्यानंतर उर्वरित रक्कम घेऊन लवकर खरेदी खत करून देण्याची विनंती केली. त्यानंतर पुन्हा वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून १६ हजार १०४ रुपयांचा धनादेश घेतला व तो धनादेश वटवूनही घेतला. फिर्यादीकडून एकूण ४ लाख १३ हजार १०४ रुपये घेतले. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील व संजय लष्करे यांच्याकडूनही कराराद्वारे त्याच फ्लॅटच्या विक्रीसाठी दोन-दोन लाख रुपये घेऊन त्यांच्या नावे इसारपावती करुन दिल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. काही कारणे देऊन आरोपीने दोघांचा करार रद्द केला व घेतलेल्या रकमेचा दोघांना धनादेश दिला, जो वटलाच नाही. त्याचप्रमाणे (कै.) रामदास केदारे यांचीही आरोपींनी फसवणूक केल्याची तक्रार त्यांचा मुलगा विजय केदारे यांनी केली. या प्रकरणात चौघांची एकूण ९ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले व आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपीच्या साथीदारांचा शोध बाकी

या संदर्भात सुनिता म्हस्के हिने २३ मे रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्याच्या सुनावणीवेळी, आरोपीचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे व आरोपीला अटक करुन चौकशी करणे गरजेचे आहे, तसेच आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, याचाही सखोल तपास करणे गरजेचे असून, आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत अालबेल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबादेतील शिवसेनेची शाखा मराठवाड्यातील पहिली शाखा आहे. ३२ वर्षे पूर्ण करणाऱ्या शिवसेनेच्या या शाखेत सर्वकाही अालबेल आहे असे मानण्याचे कारण नाही, असे म्हणत संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाच घरचा आहेर दिला. पक्षाला उभारी देऊ शकलो नाही, असे ते म्हणाले.
शिवसेनेतर्फे १ जूनपासून शिवसंपर्क अभियान सुरू केले जाणार आहे. त्याच्या तयारीच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यात घोसाळकर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, उपमहापौर स्मिता घोगरे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, बंडू ओक, शहरप्रमुख रेणुकादास वैद्य, संतोष जेजुरकर, युवा सेनेचे ऋषीकेश खैरे, माजी सभापती विजय वाघचौरे, मोहन मेघावाले, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
घोसाळकर म्हणाले, ‘शिवसेनेच्या शहरातील बुथप्रमुख व गटप्रमुखांच्या नेमणुकीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समाधानी नाहीत. बुथप्रमुख, गटप्रमुखांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारी पथक नेमा, असे आदेश त्यांनी दिले होते, पण अद्याप आपण ही पथके नेमू शकलो नाही. पक्षाला उभारी देऊ शकलो नाही. त्यामुळे सर्व बुथप्रमुखांच्या नियुक्त्या रद्द केल्या जात आहेत. जे चांगले कार्यकर्ते असतील त्यांना पुन्हा नियुक्त करू.’
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला न भूतो, न भविष्यती असे यश मिळाले असा उल्लेख करून घोसाळकर म्हणाले, ‘मिळालेल्या यशाच्या आधारावर भारतीय जनता पक्ष सत्तेत प्रतिनिध‌ित्व देईल, महत्त्वाची मंत्र‌िपदे देईल असे वाटले होते, पण तसे घडले नाही. निवडणुकीपर्यंत भाजपने युतीचा अजेंडा वापरला. निवडणूक झाल्यावर सत्तेचा अजेंडा त्यांनी पुढे नेला आणि तेथेच पहिली ठिणगी पडली. मेळाव्याचे प्रास्ताविक रेणुकादास वैद्य यांनी केले. अंबादास दानवे यांनी शिवसंपर्क अभियान व मी कर्जमुक्त होणार या अभियानाची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा इम्पॅक्टः पुन्हा श्रमदानाचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या ‘चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ’ या उपक्रमाचा तालुक्यात फार्स झाल्याचे वृत्त ‘मटा’ने सोमवारी प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले. उपविभागियअधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी अभियानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बोलावून चांगलेच फैलावर घेतले. गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेली सर्व कामे त्वरित रद्द करून पुन्हा श्रमदान करण्याचे आदेश त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले.
वैजापूर तालुकयातील ४७ गावात ‘चला गाव कडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ’ हे अभियान राबवण्यासाठी तहसीलदार सुमन मोरे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी गावी जाऊन श्रमदानातून विविध कामे करणे अपेक्षित होते. त्याअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवणे, पाझर तलावातील गाळ काढणे, शौचालय जनजागृती करणे, महिलांच्या सबलीकरणासाठी उपक्रम राबवणे, वृक्षारोपणखसाठी खड्डे खोदणे ही कामे करण्याचे आदेश होते. मुख्य म्हणजे ही कामे करतांना सरपंच व ग्रामस्थांना या अभियनची पूर्ण माहिती देऊन त्यांना सहभागी करण्याची आवश्यकता होती. पण काही अधिकाऱ्यांनी याबाबत गावकऱ्यांना कल्पना न देताच केवळ कामाचे फोटो काढून श्रमदान केल्याचा दिखावा केल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे हे अभियान श्रमदान न ठरता निव्वळ फार्स ठरले. याबाबत अधिकाऱ्यांना माहिती कळताच विभागिय अधिकारी कार्यालयाचे काटे, कांबळे, मोहिते, देशमुख या अधिकाऱ्यांच्या पथकाने तालुक्यातील गारज येथे भेट दिली. त्यांनी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या.

पुन्हा अभियान

या अभियानची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाचे पथक तालुक्यातील काही गावात सोमवारी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी डॉ. सानप, तहसीलदार सुमन मोरे व गटविकास अधिकारी पुष्पा पंजाबी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालय दिन असताना ग्रामीण भागात फिरून अभियानाची अंमलबजावणी कशा प्रकारे होते याची पाहणी केली. विभागीय आयुक्तांच्या आदेशामुळे कामात हलगर्जी केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा नव्याने अभियान राबवावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपास यंत्रणेबाबत नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
तुळजाभवनी यात्रा अनुदानात गैरव्यवहार करणारे २८ आरोपी गेल्या ६४ दिवसांपासून फरार असून ते पोलिसांना सापडत नाहीत. या प्रकरणी पोलिसांच्या तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या तपास यंत्रणेवर सहपालकमंत्री महादेव जानकर व भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिले.
तुळजाभवनी यात्रा अनुदानातील गैरप्रकार उघडकीस येऊन दोन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. मात्र, पोलिस यंत्रणेकडून या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणातील २९ आरोपी ६४ दिवसांपासून फरार असून ते पोलिसांना सापडत नाहीत. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना याबाबत आदेश दिले असून भ्रष्टाचारी मंडळीना पाठीशी घालणारे हे सरकार नाही. दोषींना माफ केले जाणार नाही. फरार आरोपींना पोलिस पकडत नाहीत, ही बाब गंभीर असून आरोपींचा शोध घ्यावा याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार असल्याचे आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले.
आरोपींना अभय कोण देत आहे का ? तपासात दिरंगाई का होते याबाबत चौकशी होण्याची मागणी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. दरम्यान, तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या संपत्तीवर डल्ला मारणारे २८ आरोपी पोलिसांना गेल्या दोन महिन्यांपासून सापडत नाहीत. गृहमंत्री पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे असून त्यांच्यासाठी ही बाब भूषणावह नाही. यातील
काही आरोपी विरोधात मटक्या बाबतचे तसेच विविध गुन्हे दाखल आहेत. केवळ तुळजापूर येथील पोलिस अधिकाऱ्यांची व या आरोपींची मिलीभगत असल्याने पोलिसांना हे आरोपी सापडत नसल्याचे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.


राज्य सरकार भ्रष्टाचारी मंडळीना पाठीशी घालणार नाही. या प्रकरणातील दोषींना माफ केले जाणार नाही. फरार आरोपींना पोलिस पकडत नाहीत, ही बाब गंभीर आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
सुजितसिंह ठाकूर, आमदार.


तुळजाभवनी यात्रा अनुदानात गैरव्यवहार करणारे आरोपी गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. त्या सर्व आरोपींना तत्काळ ताब्यात घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे.
मधुकरराव चव्हाण, आमदार, तुळजापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकुचा धाकावर प्रवाशाला लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चाकुचा धाक दाखवत प्रवाशाला रिक्षाचालक व तीन जणांनी लुबाडले. हा प्रकार २१ मे रोजी नगरनाका ते पडेगाव दरम्यान घडला. या प्रकरणी रिक्षाचालकासह तिघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा बबन गायकवाड (वय २२ रा. वाळूज एमआयडीसी) हे मजुरी काम करतात. ते २१ मे रोजी सकाळी रांजणगाव येथून औरंगाबादला येण्यासाठी रिक्षात (एमएच २० बीटी ९७२८) मध्ये बसले. या रिक्षामध्ये इतर प्रवाशांसोबत तीन तरूण बसले होते. नगरनाका येथे आल्यानंतर या तिघांनी कृष्णा व सहप्रवाशांना चाकुचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. त्यानंतर बळजबरीने रिक्षा पडेगाव येथील कासंबरी दर्गाजवळील सिल्लेखाना येथील निर्जन परिसरात नेली. या ठिकाणी पुन्हा कृष्णा व सहप्रवाशांना मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून घेण्यात आली. या घटनेत एका आरोपीने गालाला चावा घेतल्याने कृष्णा जखमी झाला. या प्रकरणी रिक्षाचालकासह तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक खंडागळे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेलिकॉप्टरचे अवशेष मुंबईकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईकडे घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला २५ मे रोजी निलंग्यात अपघात झाला होता. त्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरच्या सर्व तपासणी, पंचनाम्याचे काम रविवारी पूर्ण झाले. सोमवारी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून घेतली. त्यानंतर हेलिकॉप्टर मुंबईला नेण्यात आले.
नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या देखभाल दुरुस्ती विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोमवारी दिवसभरात हेलिकॉप्टरचे अवशेष क्रेनच्या साह्याने १६ चाकी ट्रेलरवर चढवले. सोमवारी रात्री निलंग्यातून हे ट्रेलर मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी आगे यांनी दिली. या हेलिकॉप्टरची दुरुस्ती कोण करणार, केंव्हा करणार हे सर्व नागरी हवाऊ वाहतूक संचालनाच्या अधिकाराचा भाग आहे. त्यामुळे त्या विषयी काही सांगता येणार नसल्याचे ही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, हेलिकॉप्टर ट्रेलरवरून मुंबईला नेण्याच्या वाहतुकीचाही विमा उतरविण्यात आला आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवाच्या धडकेने एक ठार, दोन जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
एका हायवा ट्रकने दुचाकीला जोरची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ही घटना मुंबई-नागपूर महामार्गवरील सिडको उड्डाणपुलाजवळ सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. अपघातानंतर जमावाने दगडफेक करून ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
औरंगाबाद येथून लासूर स्टेशनकडे जाणाऱ्या हायवा ट्रकने (एम एच २० व्ही ई ९५००) ने समोरून येणाऱ्या दुचाकीला (एम एच २० डी एन १०९३) धडक दिली. दुचाकीवरील संजय सांगळे (वय ४२, रा. मुंकदवाडी औरंगाबाद) हे रस्याच्या कडेला जाऊन पडले. त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मेंदू बाहेर पडून ते जागेवरच मरण पावले. त्यांच्या पत्नी उज्वला सानप (वय २५) व वैभव सानप (वय २१) हे जखमी झाले. या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेची महिती मिळाल्यानंतर १०८ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्समधून जखमीना औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images