Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ पर्यावरणपूरक वारी साजरी करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
पंढरीची वारी पर्यावरणपूर्वक करून पर्यावरणासाठी वारकरी, संतानी प्रबोधन करण्याचे आवाहन राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले. लातूर येथील सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार सुनील धांडे, माजी खासदार रुपा पाटील-निलंगेकर, उपमहापौर देवीदास काळे उपस्थितीत होते.
तत्पुर्वी सकाळी आठ वाजता मार्केट यार्डातून दिंडी सोहळ्याची सुरुवात आमदार दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संतकृपा स्मरणीकेचे प्रकाशन ही करण्यात आले. माजी संमेलनाध्यक्ष हभप बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्याकडून नूतन संमेलनाध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सूत्रे स्वीकारली. वारकरी संप्रदायाची विशेष सेवा केल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज-जळगावकर यांना अर्थमंत्र्यांच्या हस्ते वाहन भेट देण्यात आले.
वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविक केले. संत साहित्य संमेलनाला राज्य सरकाराने कायमस्वरुपी पन्नास लाख रुपये दर वर्षी मदत करण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना गृह राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘समाजामध्ये वाढत जाणारा द्वेष कमी करण्यासाठी वारकरी संप्रदाय मोठी भूमिका निभावत आहे. पंढरीची वारी सुखकर होण्यासाठी लवकरच सर्व विभागांची बैठक होणार आहे.’

अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवर यांनी संत साहित्य संमेलन निरंतर सुरू राहावीत यासाठी राज्य सरकार मदत करेल असे आश्वासन दिले. आर्थिक दारिद्र दूर होण्या सोबतच मानसिक दारिद्र दूर होण्यीची आवश्यकता असल्याचे सांगून मुनगुंटीवार यांनी मानसिक दारिद्र दूर करण्याचे काम संत साहित्यच करू शकते असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, माजी खासदार रुपाताई पाटील-निलंगेकर, नूतन संमेलनाध्यक्ष गहिणीनाथ महाराज यांची भाषणे झाली.


करामुळे महागाई वाढेल ही अफवा - मुनगुंटीवार
संमेलनाच्या उदघाटनानंतर पत्रकारांशी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वस्तु आणि सेवा करामुळे महागाई वाढेल ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. जगातील १६० देशात हा कर लावण्यात आला आहे. कर लावलेल्या देशातील महागाई कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्या देशात सुद्धा महागाई वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मध्यवधी निवडणुकीची चर्चा करण्याची गरज नसल्याचे ही मुनगुंटीवार यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२१ दोषींच्या शिक्षेवर आज फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना तालुक्यातील सेवली येथे २००८ साली झालेल्या दंगल प्रकरणातील २१ दोषींवरील शिक्षेचा फैसला मंगळवारी होणार आहे. एकूण ३३ आरोपींपैकी २१ आरोपींना येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर यांनी शुक्रवारीच दोषी ठरविले होते. टपरीवर ‘बनायेंगे मंदिर’ गाणे वाजविण्याचा कारणावरून दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यावसान दंगलीत झाले होते. सोमवारी न्यायालय दोषींना शिक्षा सुनावेल अशी अपेक्षा होती. परंतु दोन्ही पक्षांच्या वकिलांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली.

सेवलीच्या बाजारपट्टी भागात ३ एप्रिल २००८ रोजी बाबा बंदुके यांच्या टपरीवर ‘बनायेंगे मंदिर’ हा गाणे सुरू होते. हा गाणे वाजविण्यावरून दोन गटात वाद झाला आणि पाहता पाहता या वादाचे पर्यावसान हिंदू -मुस्लिम दंगलीत झाले. या दंगलीत बळीराम जाधव याचा मृत्यू झाला होता तर संतोष गवलकर, पवन तळेकर, गंगाधर जाधव, राजू भालेरावसह १० ते १५ जण जखमी झाले होते. तसेच कालांतराने जखमी झालेल्या संतोष गवलकर याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
दरम्यान, या प्रकरणी रुद्रपा मल्लिकार्जुन तळेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करून ३० जून २००८ रोजी याप्रकरणी न्यायालयात ३३ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केला होता. यापैकी शे. अजून कुरेशी ( वय २९), शे.ख्वाजा शब्बीर कुरेशी (वय २२) ,आगाखान यासीनखा पठाण( वय ३०), शे.बाबा शे.समीर कुरेशी( वय ३५), शे.सादिक शे.बाबू शे.गाणी (वय ३०), खालेद अमीदोद्दीन काझी (वय ३०) जमीरोद्दीन काझी(वय ३०), जमीरोद्दीन काझी( वय ४५), शे. रियाज शे.गाणी (वय ४२), शे.जब्बार शे.दाऊद (वय ४१), शे.महेबूब पीर महंमद(वय ५०), अब्रारखा यासिन खा पठाण (वय ४६), इलायसखा पठाण (वय ३३)शे.सईद शे. मलन्ग पटेल (वय ३१), शे.युसूफ शे.इब्राहिम(वय ३६), अब्दुल रशीद अब्दुल अझीज (वय २८), शाबीर रंजक कुरेशी (वय ६५), शे.जुल्फेकर शे. मुनाफ (वय २८), शे.रशीद शे.लाल (वय ३०), शे.युनूस शे.लालमिया तांबोळी(वय ३५), शे.तस्लिमा शे. रशीद (३ वय ५) आणि शे. गौस शे. बाबुलाल कुरेशी (वय २६) या २१ आरोपींना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. कोसमकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सबळ पुरावा व साक्षीआधारे दोषी ठरविले.
सोमवारी न्यायालय दोषींना शिक्षा सुनावेल अशी अपेक्षा होती. परंतु दोन्ही पक्षांच्या वकिलांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली. दरम्यान, मंगळवारी यादोषींना शिक्षा सुनावण्यात येणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सरकारतर्फे अस‌िस्टंट सॉलिसिटर जनरल अॅड. संजीव देशपांडे यांची विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांना अॅड. संदीप घुगे, अॅड. नितीन रुणवाल, विनोद राठोड आणि कोर्ट पैरवी टीमने सहकार्य केले.


सरकार पक्षातर्फे एकूण ३२ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी आम्ही न्यायालयाला केली आहे. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून न्याय मिळेलच अशी अपेक्षा आहे.

-अॅड. संजीव देशपांडे, विशेष सरकारी अभियोक्ता


कडेकोट पोलिस बंदोबस्त
दरम्यान, प्रकरणाची अंतिम सुनावणी असल्याने न्यायालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. निकालानंतर काही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सेवली गावात आणि न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुस्ती प्रशिक्षक नितीशची नियुक्ती

$
0
0

कुस्ती प्रशिक्षक नितीशची नियुक्ती
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बँकॉक (थायलंड) येथे २० ते २३ जुलै या कालावधीत होणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय सबज्युनिअर कुस्ती संघाच्या सराव शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून औरंगाबादचे कुस्तीपटू नितीश काबलिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने ही नियुक्ती केली आहे. लखनौ येथील साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात कुस्ती संघाचे सराव शिबिर १९ मे ते १८ जुलै या कालावधीत होणार आहे. या शिबिरात कुस्ती प्रशिक्षक म्हणून नितीश काबलिये हे काम पाहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सचिव दिनेश गुंड यांनी दिली. या नियुक्तीबद्दल खासदार चंद्रकांत खैरे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, साई केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, विलास कथुरे, डॉ. फुलचंद सलामपुरे, शरद कचरे, हिरालाल सलामपुरे, डॉ. हंसराज डोंगरे आदींनी नितीशचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धांत कोळीचे शतक

$
0
0

सिद्धांत कोळीचे शतक
औरंगाबादच्या पहिल्या डावात २३६ धावा
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिद्धांत कोळीच्या शानदार शतकाच्या जोरावर औरंगाबाद संघाने सोळा वर्षांखालील राज्यस्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पुण्याच्या आर्यन क्लबविरूद्ध पहिल्या डावात २३६ धावा केल्या. त्यानंतर, दिवसअखेर आर्यन क्लबने १ बाद ९० धावा फटाकावल्या. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
नाशिक येथे हा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना औरंगाबाद संघाचा पहिला डाव २३६ धावांवर संपुष्टात आला. औरंगाबादची फैज खान (१९) व गणेश वाघमारे (१०) ही सलामी जोडी झटपट बाद झाली. त्यानंतर फलंदाजीस मैदानात उतरलेल्या सिद्धांत कोळीने १०२ धावांची खेळी करून डावास आकार दिला. सिद्धांतला दुसऱ्या बाजूने समर्थ साथ मिळू शकली नाही. अनिकेत चव्हाण (४), शुभांग शर्मा (७), राधे आनंदगावकर (२), अंश ठोकळ (४) हे खेळपट्टीवर तग धरण्यात अपयशी ठरले. ओंकार शिंदे (२७), आर्यन शेजुळ (२४), कृष्णा पवार (२०) यांच्या हातभारामुळे औरंगाबाद संघास दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. आर्यन क्लबकडून आदित्य कराळे, दिनेश राजपूत यांनी प्रत्येकी ३, तर रवींद्र माच्छाने २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या आर्यन क्लबने दिवसअखेर २२ षटकांत १ बाद ९० धावा काढल्या. आर्यन संघातर्फे पृथ्वीराजने अर्धशतक झळकावले, तर ऋग्वेद पिंपाळकर खेळ थांबला, त्यावेळी २७ धावांवर खेळत होता..
संक्षिप्त धावफलक ः औरंगाबाद जिल्हा संघ ः पहिला डाव - सर्वबाद २३६ (सिद्धांत कोळी १०२, ओंकार शिंदे २७, आर्यन शेजुळ २४, कृष्णा पवार २०, फैज खान १९, गणेश वाघमारे १०, आदित्य कराळे, दिनेश राजपूत प्रत्येकी ३ विकेट्स, रवींद्र माच्छाने २ विकेट्स) विरुद्ध आर्यन क्लब, पुणे ः पहिला डाव - २२ षटकांत १ बाद ९० (पृथ्वीराज ५३, ऋग्वेद पिंपाळकर खेळत आहे २७).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोफसदृश वस्तू सापडल्याने खळबळ

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

परंडा शहरामध्ये तीन फूट लांबीची तोफसदृश वस्तू पोलिसांना सापडली आहे. ही वस्तू इतिहासकालिन तोफ आहे का, याविषयी शहानिशा करण्यात येत आहे. यातून ऐतिहासिक वस्तूंची तस्करी सुरू आहे का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.
रूई रोड परिसरातील माऊली ऑफसेटच्या पाठीमागे असलेल्या खुल्या जागेत तोफसदृश वस्तू कोणीतरी टाकली असल्याची माहिती परंडा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर, त्यानंतर पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे, पोलिस उपनिरीक्षक सानप यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व ही वस्तू ताब्यात घेतली. ही वस्तू तीन फूट लांब आहे. ही तोफ असण्याची शक्यता असून, भंगार व्यावसायिकाने खरेदी न केल्यामुळे चोरट्याने शुक्रवारी रात्री ही वस्तू फेकून दिली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान ही वस्तू तोफ आहे की पुरातन काळातील उखळ, याबाबत मात्र साशंकता आहे. भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाने लोखंडी तोफ घेण्यास नगार दिल्याने चोरट्याने ही तोफ फेकून तेथून पळ काढला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
किल्ल्याचे चौकीदार ज्ञानेश्वर गावडे, अभिजीत शिंदे यांच्या म्हणण्यानुसार ही तोफच आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. यापूर्वीही परंडा किल्ल्यामधील पंचधातूच्या तोफेची मूठ व सिंहाचे तोंड कापून चोरी केल्याची घटना घडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या पाठीवर आयुक्तांची थाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उत्कृष्ट कामगिरी करत आरोपींना जेरबंद केल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी मंगळवारी दुपारी विशेष बैठकीत सत्कार केला.
छावणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेले आरोपी शेख शकील शेख आरेफ, शेख शहारुख व शोयेब सलीम कुरेशी यांना गुन्हेशाखेच्या पथकाने जेरबंद केले होते. यावेळी आरोपींनी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, तरीही त्यांनी आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सावंत व प‌थकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल त्यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी व राहुल काळे यांनी परभणी येथे कुख्यात गुन्हेगार कल्ल्या उर्फ कलीमखानला स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून अटक केली होती. त्याबद्दल काळे व कोळी यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, नागनाथ कोडे, गायकवाड आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटदारांची लॉबी, नेत्यांचा दबाव झुगारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पहिला दौरा औरंगाबाद जिल्ह्यात केला. कृषी विभागामार्फत गोळेगाव येथे करण्यात आलेल्या कामांची पाहणी त्यांनी केली. ‘कामात कुचराई करणाऱ्यांची गय करू नका, कंत्राटदार लॉबी व राजकीय दबावाला बळी पडू नका, थेट गुन्हे दाखल करा,’ असे आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
कृषी विभागातर्फे करण्यात आलेल्या मातीनाला बांध व कंपार्टमेंट बंडिंग कामाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. चारचाकी वाहन जात नाही, अशा ठिकाणी केंद्रेकर यांनी कृषी सहायक अशोक पठाडे यांच्या दुचाकीवर बसून पाहणी केली. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चांगले काम करून घ्या, असे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. ते जूनमध्ये मराठवाड्यात दौरा करून कृषी विभागाच्या कामांचा आढावा घेणार आहेत. यावेळी गोळेगावचे सरपंच संतोष जोशी, विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, मंडळ अधिकारी विशाल आगलावे, मंडळ अधिकारी अशोक अहिरे, कृषी पर्यवेक्षक मिलिंद कोलंबीकर, कृषी सहायक अशोक पठाडे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या
‘शेतकरी आत्महत्यांचे कारण शोधून त्या थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यास प्राधान्य आहे. शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करा,’ असे आवाहन कृषी आयुक्त केंद्रेकर यांनी केले. गोळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात उन्नत शेती समृद्ध शेतकरी रोहिणी पंधरवड्यात त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करा, मिश्र खते वापरून सेंद्रीय खते वापरण्यावर भर द्या, सहायकाच्या सल्ल्याने औषधी फवारणी करावी, कृषी कर्मचाऱ्यंना प्रश्न विचारावेत, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबसचा मुहूर्त हुकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यावरण दिनापासून खासगीकरणातून सिटीबस सेवा सुरू करण्याचे महापालिकेने जाहीर केले, मात्र सरकारच्या मंजुरीशिवाय सेवा सुरू करणार नसल्याचे संबंधित संस्थेने स्पष्ट केल्यामुळे पाच जूनचा मुहूर्त हुकला आहे. आता शहरवासीयांना या सेवेचीसाठी किमान एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सिटीबस ही शहराची गरज आहे असल्याने महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी खासगीकरणातून ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. ही सेवा स्मार्टसिटी प्रकल्पाचा देखील एक भाग अाहे. त्यामुळे सिटीबस सुरू करणे महापालिकेच्या दृष्टीने आवश्यक होते. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यासाठी मुगळीकर यांनी प्रयत्न सुरू केले. सिटीबस सेवा सुरू करण्यासाठी एका खासगी संस्थेचा प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाला होता. या प्रस्तावाच्या आधारे त्या संस्थेच्या संचालकांशी चर्चा करून ५ जूनपासून सिटीबस सेवा सुरू व्हावी यासाठी मुगळीकर यांनी संस्थेसह शासन दरबारी पाठपुरावा केला.
खासगी संस्थेमार्फत सिटीबस सेवा सुरू करण्यासाठी शासनाच्या मंजुरीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने प्रस्ताव सादर केला. शासनाच्या मंजुरीच्या आधीन राहून सेवा सुरू करण्याची तयारी मुगळीकर यांनी दाखवली. याचसंदर्भात मंगळवारी बैठक झाली. बैठकीला संबंधित संस्थेचे प्रतिनिधी व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती मुगळीकर यांनी पत्रकारांना दिली.
मुगळीकर म्हणाले, ‘सिटीबस सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. शासनाच्या मंजुरीच्या आधीन राहून बससेवा सुरू करावी, अशी पालिकेची भूमिका होती, पण शासनाच्या मंजुरीनंतर सेवा सुरू करण्याची भूमिका संस्थेच्या प्रतिनिधींनी मांडली. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार काम करावे लागणार आहे. एसटी महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली आहे. बसला स्टेज कॅरिअरची व्यवस्था (बसला चढण्याचा व उतरण्याचा दरवाजा) करावी लागणार आहे. ही व्यवस्था करण्यासाठी संस्थेला वेळ लागणार आहे. या सर्व प्रक्रियेला किमान दीड महिना लागेल. त्यानंतर सिटीबस सेवा सुरू होऊ शकेल.’

औरंगाबाद दर्शन बस सुरू करा
सिटीबस सेवा सुरू होण्यास किमान दीड महिना लागणार असल्यामुळे ५ जूनपासून औरंगाबाद दर्शनसाठी दोन बस सुरू करा, अशी गळ आयुक्त मुगळीकर यांनी खासगी संस्थेच्या संचालकांना घातली. त्याचा विचार करण्याची तयारी संचालकांनी दाखवली आहे. त्यामुळे या बस सुरू होतील, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हणे, ५० हजार देतो; कानाखाली फटकावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुख्यात गुन्हेगार हद्दपार आरोपी अक्क्या उर्फ आकाश त्रिभुवन याला हर्षनगर परिसरात सोमवारी सायंकाळी कोंम्बिंग ऑपरेशनमध्ये स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी पकडल्यानंतर पैसे देऊन जागेवर सुटका करून घेणाऱ्या आकाशने यावेळी देखील ५० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. मात्र, पोलिसांनी त्याच्या कानाखाली फटकावत उचलबांगडी केली.
आकाश चंद्रकांत त्रिभुवन (वय १९ रा. ‌हर्षनगर) हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून १० गुन्हे दाखल आहेत. त्याला दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. पण, तो शहरात आल्याची माहिती स्थानिक दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. शहरात सोमवारी कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना अक्क्या घरी असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक माधव कोरंटलू व पथकाला मिळाली. त्यांनी हर्षनगरात जाऊन अक्क्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्क्या व त्याचा भाऊ सचिन त्रिभुवन दोघे अट्टल गुन्हेगार आहे. अक्क्या शहरात पाकीटमारांची टोळी चालवत होता. पोलिसांनी पकडल्यानंतर ते लगेच पोलिसांशी बिनधास्तपणे तोडीपाणीची बोलणी करतात. त्याने सोमवारी हीच युक्ती वापरत पोलिसांना जागेवर ५० हजार देण्याचे आमिष दाखवले होते. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कोरंटलू, सहायक फौजदार गौतम गंगावणे, जमादार पठाण, प्रशांत जायभाये यांनी ही कारवाई केली.

बालपणापासून गुन्हेगार
अक्क्या हा बालपणापासून गुन्हेगारीत आहे. त्याच्यावर पाकीटमारीसह खून, दरोड्याची तयारी आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. बेगमपुरा स्मशानभूमित अट्टल पाकीटमार शेख जावेद राजमहंमद याचा पाकिटमारीच्या कमीशनवरून २०११ मध्ये निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात त्यावेळी १३ वर्षांचा असलेला अक्क्याचा प्रमुख सूत्रधार म्हणून समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन चालूच राहणार

$
0
0

कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन चालूच राहणार

मुंबईची बोलणी फिसकटली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

महावितरण, महापारेषण आणि महाऊर्जा येथे कार्यरत असलेल्या २२ हजार वीज तांत्रिक कामगारांचे मागील ९ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत आंदोलन स्थगित करावे, असे संघटनेच्या नेत्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, ही मागणी अमान्य करीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेकडून करण्यात आला.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (२९ मे) रोजी मुंबईत उर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह यांच्या उपस्थितीत वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत उर्जा विभागाचे उपसचिव बी. वाय. संता, महावितरण कंपनीचे सचिन ढोले, वीज कामगार महासंघ अण्‍णा देसाई, वर्कर्स फेडरेशन मोहन शर्मा, वीज कंत्राटी कामगार संघाचे शरद संत, संघटनमंत्री नीलेश खरात यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

या बैठकीत कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या पद्धतीप्रमाणे कंत्राट सेवेचे काम सुरू ठेवण्याची मागणी केली. व्यवस्‍थापकीय संचालक उपस्थित नसल्यामुळे वीज तांत्रिक कामगारांच्या या प्रश्नावर निर्णय होऊ शकत नाही, असे या विषयावर उर्जा सचिवांनी सांगितले. कंत्राटी वीज कामगारांनी आपले आंदोलन स्थगित करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे म्हणणे धुडकावून लावले व आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जाहीर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

औषध विक्रेत्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेकायदेशिररित्या चालविल्या जात असलेल्या ऑनलाइन फार्मसी व केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या नोटीसच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या फार्मसिस्ट अँड केमिस्टच्या बंदला मंगळवारी (३० मे) संमिश्र प्रतिसाद मिळाला.

या संपात औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील औषध विक्रेत्यांनी औषध दुकाने बंद ठेवली. दुपारनंतर काही ठिकाणी दुकाने उघडण्यात आली. शहरातील दलालवाडी भागात असलेल्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोस‌िएशनच्या औषधी भवनमधील होलसेल औषध विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जिल्ह्यातील १५०० दुकानधारकांनी यात भाग घेतला, असे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाला असोस‌िएशनतर्फे निवदेन देण्यात आले. यावेळी विविध औषधविक्रेते उपस्थित होते. या आंदोलनामध्ये राज्यभरातील राज्य केमिस्ट संघटनेचे ५५ हजार औषध विक्रेते सहभागी होते, असे संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले. देशामध्ये सरकार ई फार्मसी व ई पोर्टल लागू करण्याची योजना आखत असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकरण्यात आला असून संपामध्ये सर्वच औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतला, असे स्थानिक संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांनी सांगितले. दुसरीकडे घाटी प्रशासनाचा मेडिकल विभाग, जिल्हा चिकित्सालय आणि ज्या मेडिकलला २४ तास दुकान उघडे ठेवण्यात आली होते. रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना फारसा त्रास झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वर्धापनदिनास लाभणार संस्कृती दर्शनाचे कोंदण

$
0
0

वर्धापनदिनास लाभणार संस्कृती दर्शनाचे कोंदण

गरवारे कम्युनिटी सेंटर वर्धापन दिन कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

गरवारे कम्युनिटी सेंटरच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मे ते ५ जून दरम्यान गरवारे कम्युनिटी सेंटर, एन ७, येथे दररोज सायंकाळी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. लहान मुलांमध्ये विविध कलाकौशल्यांसह नैतिक मूल्यांचे संस्कार देणाऱ्या गरवारे कम्युनिटी सेंटरने शहरवासीयांच्या मनात आदराचे स्थान नि​र्माण केले आहे. सेंटरमध्ये मुलांसाठी अखंड कार्यक्रम व प्रात्यक्षिक घेण्यात येतात. वर्धापनदिना निमित्तही सेंटरच्या विद्यार्थ्यांच्या विविध कला व क्रीडा प्रकार पाहण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुले व निःशुल्क आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सेंटरचे संचालक सुनील सुतवणे यांच्यासह सेंटरमधील अन्य शिक्षकांनी केले आहे.

वर्धापन दिन कार्यक्रम

३१ मे - रिदमिक जिम्नॅस्टिक्स कराटे प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रम - सायंकाळी ६ वाजता

१ जून - गरवारे कला महर्षी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा, कराटे प्रात्यक्षिक - सायंकाळी ६ वाजता

२ जून - लोककला महोत्सव गण गौळण, बजावणी, लावणी, भारुड - सायंकाळी ६ वाजता

३ जून - आनंद नगरी - सायंकाळी ६ वाजता

५ जून - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम - सकाळी ८ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंत गरीब मुलींचे स्वप्न अधिकारी होण्याचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अकरावी, बारावी अभ्यासक्रमासाठी खाजगी शिकवणी, असे समिकरण झाले आहे. त्याला बगल देत, तिने कला शाखेत ९० टक्के गुण मिळवित यश मिळविले. घरची बेताची परिस्थिती, सुविधांचा अभाव अशा परिस्थितीत सरस्वती भुवनच्या आशा प्रभाकर नाडे हिने शिक्षणाची जिद्द कायम ठेवली आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आशाने एक पाऊल त्या दिशेने टाकले आहे.
कला शाखेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळणे अवघड समजले जाते. असे असतानाही औरंगाबादच्या अनेक मुली कला शाखेत चांगले गुण मिळवित यशस्वी ठरल्या आहेत. त्यात सरस्वती भुवनची आशा नाडे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडील प्रभाकर नाडे मजुरी करतात तर, आई धुणी-भांडे करते. घरची परिस्थिती बेताची असताना, सुविधांचा अभाव असताना तिने मिळविलेल्या गुणांमुळे तिच्या आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले आहे. तर, कॉलेजच्या शिक्षकांनीही तिचे भरभरून कौतुक केले. कॉलेजच्या शैक्षणिकसह इतर स्पर्धांमध्ये पुढे असणाऱ्या आशाने दहावीनंतरच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे. भावसिंगपुरा परिसरातील सावित्रीबाई फुले हायस्कूलमधून दहावीचे तिने शिक्षण पूर्ण केले. खासगी शिकवणी न लावता घरीच अभ्यास करत तिने हे यश मिळविले आहे. तर, या कॉलेजचीच ममता विवेकानंद देवांग हिने ही ८५.३८ टक्के गुण मिळवित यशस्वी ठरली आहे. तिलाही घरच्या परिस्थितीमुळे खासगी शिकवणी लावता आली नाही, त्याचा बाऊ न करता हे गुण मिळविले आहे.

खासगी शिकवणीच लावण्याची माझी परिस्थिती नाही. कॉलेजमधील शिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्यास यावर हे गुण मिळाले. एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून तयारी करते आहे.
-आशा नाडे,


शिकवणी न लावताही चांगले गुण मिळू शकतात. मला अधिक गुणांची अपेक्षा होती. यानंतर आता पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असून अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
-ममता देवांग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोध भावंडांचाः यंत्रणा हलली; तक्रारदार गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिशूसदनातील भावंडांचा शोध लागत नसल्याच्या प्रकरणात बालकल्याण समितीने सोमवारी पुणे येथील प्रीतमंदिरला रेकॉर्ड तपासण्याचे पत्र दिले. पण, आता भावंडाचा शोध घेणारा तक्रारदाराशी संपर्क होत नाही. त्यामुळे याप्रकरणाचे गूढ वाढले आहे.
औरंगाबाद येथील शिशूसदनमध्ये १५ वर्षांपूर्वी असलेल्या दोन भावंडाचा शोध घेण्यासाठी अमोल मगर या तरुणाने जिल्हा महिला व बाल विकास विभाग व पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मगर याने विभागाने सूचवल्यानुसार पुणे, यवतमाळ, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड येथे शोध घेतला. औरंगाबादचे निरीक्षणगृह, अनुरक्षणगृह व जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून त्याला अपेक्षित मदत मिळत नाही. मुलांचे रेकॉर्ड नाही, असे महिला व बाल विकास विभागाकडे सांगितले जात असल्याने अमोल मगर याने १७ मे रोजी वेदांतनगर पोलिस चौकीत शिशूसदनविरूद्ध तक्रार नोंदवली. दरम्यान, राज्य महिला आयोगाने दखल घेऊन १९ मे रोजी स्यूमोटो दाखल केला. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत महिला व बाल विकास आयुक्त, पुणे यांना याबाबत पत्र पाठवून चौकशीचे निर्देश दिले. आयुक्तांनी अहवालासह २४ मे ला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. आयुक्तालयाने दिलेल्या अहवालातही रेकॉर्ड नसल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती समजली आहे. महिला व बाल विकास आयुक्तालयामार्फत तपास करण्यात येत आहे. दरम्यान, बालकल्याण समिती अध्यक्षा अॅड. रेणुका घुले यांनी प्रीतमंदिरला लेखी पत्र पाठवले आहे. शिशूसदन बंद झाले तेव्हा त्याच जागेवर प्रीतमंदिर होते व शिशूसदनमधील काही मुले या संस्थेत होती असे समजले आहे. अमोल मगर यानेही अशीच माहिती दिली होती. त्यामुळे बालकल्याण समितीला प्रीतमंदिरकडून उत्तराची अपेक्षा आहे.
अमोल बापुराव मगर याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले व आईचा मृत्यू झाल्याने बहीण निकिता (वय अंदाजे दीड वर्ष) व भाऊ अनिकेत (वय अंदाजे ८ महिने) यांना औरंगाबादच्या शिशूसदनमध्ये ठेवण्यात आले होते. ही संस्था २००२ मध्ये बंद झाली. अमोल २००४ पर्यंत भावंडांच्या संपर्कात होता. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला आहे.

मगरचा संपर्क तुटला
भावंडाचा शोध घेण्यासाठी तक्रार दिलेल्या अमोल मगरसोबत पोलिस आणि महिला व बाल विकास विभागाचा संपर्क तुटलेला आहे. अमोलनेही नंतर स्वतः संपर्क केलेला नाही.

या प्रकरणामध्ये आमचा तपास सुरू आहे. शहरातील विविध संस्थामध्ये तपास सुरू असून सोमवारी प्रीतमंदिरलाही पत्र दिले आहे.
-अँड. रेणुका घुले, अध्यक्ष बालकल्याण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गाव स्वच्छ, देश स्वच्छ’ उत्साहात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद

स्वच्छता मोहिमेविषयी देशात चर्चा होत असली, तरीही हे काम आपल्याच गावातून सुरू करण्याचा विडा बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथील काही तरुणांनी उचलला. तरुणांच्या उत्साहाबरोबर हा उपक्रमही विस्तारत असून, गावात तीन ते चार महिन्यांपासून दर रविवारी एका भागामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे.
अन्य गावांप्रमाणे बेंबळी गावामध्येही कचऱ्याची समस्या होतीच. त्यामुळे, गावातील चार तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छतेचे काम सुरू करण्याचा मनोदय केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा मुहूर्त साधत, या उपक्रमाला सुरुवातही झाली. पाहतापाहता, हा चार जणांचा ग्रुप ४०पर्यंत पोहोचला असून, दर रविवारी गावातील एका भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. त्यामुळे, वीस हजार लोकवस्तीच्या या गावातील अनेक भागांमध्ये बदल दिसून येऊ लागला आहे. या उपक्रमामध्ये उच्चशिक्षित तरुणांबरोबरच वकील, उद्योजक, कर्मचाऱ्यांबरोबर महाविद्यालयी-शालेय विद्यार्थीही आहेत. कामाचा तपशील करण्याच्या दृष्टीने त्यांनी आता एक व्हॉट्स अॅप ग्रुपही तयार केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पुण्यातील शनिवारवाडा येथे या ग्रामसेवा ग्रुपला समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, श्रावण वाकसे, धनंजय तानले उपस्थित होते.

जागृतीचाही प्रयत्न
मागील १५ रविवार अखंडीतपणे स्वच्छता करण्यात आली. गावाचा भौगोलिक भाग, लोकसंख्या आणि त्याप्रमाणात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या-त्या भागातील
युवक, नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. स्वच्छतेच्या कामाबरोबर लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, त्याचे महत्त्व कळावे यासाठी संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. हातात वेगवेगळ्या प्रभावी संदेशाचे फलकातून संदेश देण्यात आला.

वाढदिवसानिमित्त कचराकुंड्यांची सोय
गावात सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे, शाळा, अंगणवाड्या, हॉटेल, पोलिस ठाणे या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. या ठिकाणांची स्वच्छता जपण्यासाठी या परिसरातील व्यावसायिक, रहिवाशांसाठी ग्रुपमधील सदस्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कचराकुंड्या दिल्या आहेत. कचरा कचराकुंडीतच टाकावा, परिसराची स्वच्छता ठेवावी, अशी विनंतीही नागरिकांना करण्यात आली. करण्यात आली. मागील तीन रविवारच्या मोहीमेत एकूण सहा कचराकुंड्या गावात विविध ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. गावातील अन्य नागरिक, संस्थांचे पदाधिकारीही ग्रुपला सहकार्य करीत असून गावासाठी धडपडणाऱ्या ग्रुपला अनेकांनी कचराकुंड्या देऊ केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राव यांच्या भाषणापूर्वीच सभागृह रिकामे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडक मराठवाडा विद्यापीठाच्या मंगळवारी (३०मे) झालेल्या ५७व्या दीक्षान्त समारंभात ४५१ जणांना पीएचडी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रारंभी संपूर्ण भरला होता, मात्र मान्यवरांच्या हस्ते पीएचडी प्रदान करण्यात आल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी भाषणाला उपस्थित न राहता हॉलमधून काढता पाय घेतला. समारंभाच्या प्रमुख अतिथी माजी विदेश सचिव व राजदूत निरुपमा मेनन राव यांच्या भाषणावेळी सभागृहात केवळ पहिल्या दोन ओळीत निमंत्रितांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला चार वाजता सुरुवात करण्यात आली. प्रारंभी १० विद्या शाखांतील ४५१ संशोधकांना पीएचडी प्रदान करण्यात आल्यानंतर संशोधकांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या मित्रपरिवाराने सभागृहामध्येच फोटोसेशन केले. त्यानंतर मान्यवरांच्या भाषणाला बगल देत सभागृहातून काढता पाय घेतला. यामुळे दुपारी तीन वाजता संपूर्ण भरलेले सभागृह अचानक रिकामे झाले. प्रमुख अतिथी निरुपमा मेनन राव यांच्या भाषणाला सुरुवात झाली त्यावेळी नाट्यगृहाच्या केवळ पहिल्या दोन ओळींमध्येच मान्यवरांची उपस्थिती होती.

राव यांच्यासोबत फोटोसाठी धडपड
१० विद्या शाखांतील ४५१ संशोधकांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते पीएचडी प्रदान करण्यात आली. अनेक संशोधकांनी आपल्याला निरुपमा राव यांच्या हस्ते पीएचडी मिळावी, अशी विनंती केली, तर काही संशोधकांनी कुलगुरुंच्या हस्ते पीएचडी स्वीकारून पुन्हा राव यांच्यासोबतही फोटो काढून घेण्याची कसरत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पॉलिटेक्निक’ची वेबसाइट हॅक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजची वेबसाइट हॅकर्सनी हॅक केल्याने समोर आले आहे. हॅकरने त्यावर ‘गो मोदी गो’ अशी घोषणा आणि काश्मिरमध्ये पोलिसांवर दगडफेक करतानाचे फोटो टाकले आहेत. कॉलेज प्रशासनाने हा प्रकार मंगळवारी दुपारी लक्षात आल्यानंतर सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली.
राज्यात नावलौकिक असलेल्या औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतनची www.gpabad.ac.in ही वेबसाइट हॅक झाल्याची चर्चा दिवसभर होती. वेबसाइटवर ‘गो मोदी गो’, ‘दूध मागोगे खिर देंगे कश्मिर मांगोगे चिर देंगे’ अशा घोषणा लिहिल्या आहेत. सोबत काश्मीरमध्ये पोलिसांवरील दगडफेकीचे फोटो अपलोड केले आहेत. वेबसाइटवर ‘हॅक बाय टीम पाक सायबर क्लस’ असा मजूकर लिहिला आहे. हा प्रकार दुपारी समोर आल्यानंतर प्रशासनाची धादंल उडाली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कॉलेजमध्ये धाव घेऊन संताप व्यक्त केला. सायंकाळी प्रशासनाने याबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल करून वेबसाइट हॅक झाल्याची माहिती दिली.
वेबसाइटच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम ‘इन्फोगल्ड’ कंपनीकडे असल्याने ही वेबसाइट त्यांच्या सर्व्हरवर असल्याचे सूत्रांनी ‘मटा’ला सांगितले. हा सायबर हल्ला आहे की काय? नेमकी वेबसाइट कोणी हॅक केली, त्यामागे कोण आहेत, आदी सायबर सेलच्या तपासात पुढे येईल, असे सांगितले जात आहे.

वेबसाइट तात्पुरती बंद
हॅक झाल्याचे समजल्यानंतर सायंकाळी कॉलेजची वेबसाइट तात्पुरती बंद करण्यात आली. वेबसाइटवर कॉलेजची स्थापना, विविध विभाग त्यांची माहिती, अभ्यासक्रम, निकालाची माहिती देण्यात येते.

दोन वर्षापूर्वीच डोमेन बदलले
यापूर्वी कॉलेजची वेबसाइट www.gpabad.ac.in ही होती. २०१५मध्ये याचे ‘डोमेन नेम’ बदलून www.gpabad.ac.in असे करण्यात आले. दोन वर्षांपासून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सर्व्हर कोणाकडे आहे. त्याचा करार झाला आहे की नाही, याबाबत काहीही सांगण्यात आले नाही.

वेबसाइट हॅक झाल्याचे आम्हाला दुपारी समजले. त्यावरील मजूकरही आक्षेपार्ह आहे. वरिष्ठांना सूचना देऊन आम्ही याप्रकराची सायबर सेल विभागाकडे तक्रार केली आहे.
- डॉ. उमेश नागदेवे, प्रभारी प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, औरंगाबाद.

पॉलिटेक्निक कॉलेजचा तक्रार अर्ज आला असून, विविध पातळींवर त्याची चौकशी, तपासणी केली जाईल. वेबसाइटवर अशा प्रकारचा मजकूर कोणी टाकला याचा सर्व्हरवरून शोध घेतला जाईल.
- गजानन कल्याणकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर सेल विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्र खरेदीचे आमिष; चार लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कागदी कप तयार करणारे यंत्र देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची चार लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चेन्नई येथील कंपनी मालक व प्रतिनिधीविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पडेगाव येथील कासलीवाल तारांगण येथील एका महिलेने आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार दिली होती. या महिलेने चेन्नई पेपर कप मशीन कंपनीकडे यंत्र खरेदीसाठी संपर्क साधला होता. कंपनीने त्यांना सहा लाख ६० हजार रुपयांचे कोटेशन दिले. यंत्राची नोंदणी करण्यासाठी त्यांनी मे २०१६ मध्ये एक लाख रुपये बँक खात्यामार्फत पाठवले. कंपनीच्या प्रतिनिधीने यंत्र उपलब्ध झाले असून उर्वरित रक्कम भरा, असे सांगितल्यानंतर या महिलेने १५ दिवसानंतर तीन लाख रुपये पाठवले. त्यानंतर प्रतिनिधीने यंत्र मिळण्यासाठी वॅटकीन क्रमांक लागणार असल्याचे सांगितले. हा क्रमांक मिळवण्यासाठी १५ दिवस लागले. हा क्रमांक मिळाल्यानंतर कंपनीशी संपर्क साधला असता त्या प्रतिनिधीने तुम्हाला उशीर झाल्याने आम्ही रोख रक्कमेत यंत्र दुसऱ्या ग्राहकाला विकल्याचे सांगितले. तुम्हाला दुसरी यंत्र देऊ असेही सांगितले. त्यानंतर या महिलेने वारंवार संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने कंपनीचे मालक व प्रतिनिधी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकष पाळून करणार पीककर्ज वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी काळात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करताना राज्य सरकारने सांगितलेले निकष पाळले जातील, असा निर्णय औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ति सहकारी बँकेच्या संचालक बैठकीत मंगळवारी झाला.
बँक मुख्यालयात आज संचालक मंडळाची बैठक झाली. चेअरमन सुरेश पाटील, व्हाइस चेअरमन दामोधर नवपुते, संचालक व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, रामकृष्णबाबा पाटील, प्रभाकर पालोदकर, आमदार संदीपान भूमरे, किरण डोणगावकर, अशोक मगर, जावेद शेख, जगन्नाथ काळे, अण्णासाहेब माने आदी उपस्थित होते. बँकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बँकेच्या कारभाराविषयी संचालकांनी समाधान व्यक्त केले. विधानसभा अध्यक्ष व संचालक हरिभाऊ बागडे नुकतेच परदेश अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्यांनी अनुभवकथन केले. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील सरकारी कामकाजाच्या पद्धती, सहकारी तत्वावर चालणारे उपक्रम याची माहिती बागडे यांनी दिली. बँकेतर्फे बागडे यांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’ च्या मेंटेनन्ससाठी पालिकेला ६० कोटींची टोपी

$
0
0

‘भूमिगत’ च्या मेंटेनन्ससाठी पालिकेला ६० कोटींची टोपी

ऐनवेळच्या प्रस्तावाला गुपचूप मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

भूमिगत गटार योजनेच्या कामाची पुढील १० वर्षांसाठी देखभाल दुरूस्ती करण्यासाठी एजन्सी निश्चित करण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुपचूप मंजूर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या मंजुरीमुळे पालिकेला वर्षाला ६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ऐनवेळच्या प्रस्तावाच्या माध्यमातून देखभाल दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट खिल्लारी - घारपुरे इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीलाच बहाल करण्यात आले आहे. याच कंपनीने ‘भूमिगत’ चे काम केले आहे. दहा वर्षांसाठी कंपनीला देखभाल दुरुस्तीचे काम देण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी ६० कोटी रुपये खर्च होतील.

केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्टक्चर डव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मिडीयम टाऊन्स (युआयडीएसएसएमटी) या योजनेअंतर्गत सुमारे ४६५ कोटी रुपये खर्च करून महापालिकेतर्फे भूमिगत गटार योजनेचे काम केले जात आहे. या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. खिल्लारी - घारपुरे इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला भूमिगत गटार योजनेचे काम देण्यात आले आहे. या कंपनीचे काम संपल्यावर भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी एजन्सी निश्चित करण्याचा प्रस्ताव २० मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालिका प्रशासनाने ऐनवेळी ठेवला. खिल्लारी - घारपुरे या कंपनीलाच पुढील १० वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात यावे, यासाठी दरवर्षी ६ कोटी रुपये खर्च येईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. या प्रस्तावाला कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजुरी देण्यात आली. प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे १० वर्षात ६ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीतून खर्च होणार आहेत. ४६५ कोटी रुपयांच्या कंत्राटात देखभाल दुरुस्तीचा अंतर्भाव नव्हता का, देखभाल दुरुस्तीचा मुद्दा गृहीत न धरता महापालिकेने कंपनी बरोबर करार कसा केला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

‘भूमिगत’ च्या कामाला ‘डीएलपी’ नाही का ?

महापालिकेतर्फे कंत्राटदाराच्या माध्यमातून करून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाचा डिफेक्ट लायब्लिटी पिरेड (डीएलपी) ठरवून दिलेला असतो. रस्त्यांच्या कामासाठी तो तीन वर्षाचा होता, त्यात सुधारणा करून आता तो पाच वर्षांचा करण्यात आला. कंत्राटदाराने रस्त्याचे काम केल्यावर पाच वर्षाच्या काळात तो रस्ता खराब झाला तर त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी त्या कंत्राटदारावर असते. अशी तरतूद ‘भूमिगत’ चा करार करताना करण्यात आली नाही का, असा सवाल विचारला जात आहे.


भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या देखभाल दुरुस्तीसाठी एजन्सी फिक्सिंगचा ऐनवेळचा प्रस्ताव होता, तो मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या हिताचा हा प्रस्ताव होता म्हणून तो मंजूर केला. प्रशासनाने १० वर्ष देखभाल दुरुस्तीचे काम त्या कंपनीला देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सर्वसाधारण सभेने दोन वर्षासाठी देखभाल दुरुस्तीचे काम त्या कंपनीला द्या, असे आदेश दिले आहेत. देखभाल दुरुस्तीचे काम अन्य कंपनीला दिले असते तर महापालिकेला ते परवडले नसते. सध्याची कंपनी काम करून निघून गेली असती, चुकीच्या कामाबद्दल त्या कंपनीला जबाबदार धरता आले नसते.

भगवान घडमोडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images