Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आठ लाख मृत्यू; कायदे कागदावरच

$
0
0

आठ लाख मृत्यू; कायदे कागदावरच

१२ कोटी प्रौढ, २५ लाख मुलांकडून रोज तंबाखुचे सेवन, तरीही बाल न्याय कायद्यात शिक्षा शून्य

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंबाखुमुळे जगभरात दरवर्षी ७० लाख व्यक्तींचा, तर देशामध्ये ८ लाखांवर व्यक्तींचा मृत्यू होतो. देशातील तब्बल एक तृतियांश व्यक्तींना तंबाखुचे व्यसन आहे. देशातील २५ लाख मुले, तर १२ कोटी प्रौढ जनता दररोज तंबाखुचे सेवन करते. तसेच १३ ते १५ वर्षातील २० टक्के मुले तंबाखुने व्यसनाधीन आहे. अशी सगळी भयावह स्थिती असतानाही जवळजवळ प्रत्येक टपरीवर गुटखा मिळतो. अगदी शाळा-कॉलेजजवळ असतानाही टपऱ्यांवर सर्रास गुटखा मिळतो आणि दोन पुड्या एकत्र करुन गुटख्याचा ‘आस्वाद’ घेणारेही जिथे-तिथे दिसतात. तरीही कुठलीही कारवाई होत नाही. त्याचवेळी अल्पवयीन मुलांना तंबाखू-अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. हा कायदा लागू होऊन सव्वावर्ष लोटले असले तरी या कायद्याअंतर्गत राज्यामध्ये एकालाही शिक्षा झाली नसल्याचे पुरते स्पष्ट झाले आहे.

जागतिक तंबाखुविरोधी दिनानिमित्त ही स्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर होत आहे; परंतु कडक कायदे असूनही त्यांची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. धक्कादायक म्हणजे तंबाखुमुळे होणाऱ्या आजारांवरील उपचारासाठी दरवर्षी एक लाख कोटींपेक्षा जास्त खर्च होत असल्याचे खुद्द केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही कठोर पावले उचलली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळेच ‘टोबॅको-ए थ्रेट टू डेव्हलपमेंट’ अशी यंदाच्या जागतिक तंबाखुविरोधी दिनाची संकल्पना आहे.

शहरातील शासकीय दंत महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शिरीष खेडगीकर म्हणाले, असांसर्गिक रोगांमध्ये तंबाखुमुळे होणारे मृत्यू मोठ्या प्रमाणावर व अतिशय चिंताजनक आहेत. तंबाखुमुळे हृदयांचे तसेच फुफ्फुसांचेही अनेक विकार होतात. तंबाखुमुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि यामध्ये ३० वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण १२ टक्के आहे. तंबाखुजन्य आजारांमुळे व्यक्तीची एकूणच उत्पादनक्षमताही कमी होते. एका सर्व्हेनुसार तंबाखुमुळे देशातील सव्वादोन कोटी जनता विपन्नावस्थेत आहे व तरीदेखील अशा व्यक्ती त्यांच्या उत्पन्नाच्या १० टक्के रक्कम व्यसनावर खर्च करते. त्यामुळे अशा व्यसनाधीन व्यक्ती कुटुंबाला आरोग्य-शिक्षण-किमान सोयी-सुविधा देऊ शकत नाही व पर्यायाने कुटुंबाचे अपरिमित नुकसान होते. तंबाखुच्या शेतात काम करणाऱ्या १४ टक्के महिला-मुली व्यसनाधीन होतात, असेही दिसून येते. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघातील सदस्य देशांनी तंबाखुविरोधी कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करावी. शाश्वत विकासासाठी वैयक्तिक व व्यापक प्रमाणात समुपदेशन-प्रबोधन करावे, असेही आवाहन यंदा करण्यात आल्याचे डॉ. खेडगीकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

१५ वर्षांच्या कर्करुग्णावरही उपचार

तंबाखु-गुटख्यामुळे मागच्या वर्षभरात १५ ते १७ वयोगटातील किमान तीन-चार कर्क रुग्णावर उपचार करण्याची वेळ आली. गुटख्यामुळेच २७ ते ४० वयातील कर्करुग्ण महिन्याला एक-दोन केसेस हमखास असतात. अलीकडे ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेटस्’चाही ट्रेंड वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेटस्’चे दुष्परिणाम नसल्याचे सांगितले जात असले तरी त्याचेही अनेक दुष्परिणाम असल्याचे स्पष्ट झाल्याचे कॅन्सर सर्जन डॉ. राजेश सावजी म्हणाले.

‘बाल न्याय’अंतर्गत शिक्षा नाही
बाल न्याय (निगा आणि संरक्षण) कायदा १५ जानेवारी २०१६ रोजी लागू झाला. या नवीन कायद्याच्या कलम ७७ अन्वये अल्पवयीनांना अंमली पदार्थ, बिडी-सिगारेट, दारू, सायकोट्रॉपिक औषधे आणि एकूणच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना सात वर्षांपर्यंत सक्तमजुरी व एक लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या कायद्याअंतर्गत सव्वा वर्षांत एकही शिक्षा झाली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आतापर्यंत बाल न्याय कायद्याअंतर्गत शिक्षा झाली नसली तरी राज्यामध्ये गुटख्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली आहे, होत आहे.

– डॉ. हर्षवर्धन कांबळे, आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निकालाचा टक्का वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत औरंगाबाद विभागात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.६४ टक्क्यांनी जास्त आहे. विभागात ८९.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मंडळाने मंगळवारी निकाल ऑनलाइन जाहीर झाला. ‘सीबीएसई’पाठोपाठ राज्य मंडळाच्या निकालातही मुलींचाच वरचश्मा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण २.०३ टक्क्यांनी वाढले. मुलींचेही उत्तीर्णतेचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ०.४२ टक्क्याने अधिक आहे. विभागातून १ लाख ५७ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४१ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी बारावीचा टप्पा पार केला.
बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत औरंगाबाद विभागातील विद्यार्थ्यांनी निकालात आघाडी घेतली आहे. उत्तीर्णतेची टक्केवारी २.०३ टक्क्यांनी वाढली आहे. २८ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा झाली. विभागातून १ हजार ११० उच्चमाध्यमिक, ज्युनिअर कॉलेजांमधून १ लाख ५७ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४१ हजार ४३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, ४ हजार ६२० पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी २ हजार १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मुलींची आघाडी
मुलांच्या तुलनेत मुलीच पुढे असल्याचे निकालातून स्पष्ट केले. औरंगाबाद विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.६४ अधिक आहे. ते गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.४२ टक्क्याने अधिक आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतून ५८ हजार ३०८ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. यापैकी ५४ हजार ७९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.७५ एवढे आहे. हे प्रमाण दरवर्षी वाढत असून, यंदाही मुलींनी निकालात आपला दबदबा कायम असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हानिहाय निकाल
जिल्हा.......परीक्षार्थी.........उत्तीर्ण
औरंगाबाद...५९६४३...........५३५३८
बीड............३७१५६...........३३६२२
परभणी.......२२०५९...........१९९८४
जालना.......२६०९७...........२३०९४
हिंगोली......१२४९१...........१११९४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सामान्य गणित’ने केली ४७१ जणांची अडचण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दहावीला सामान्य गणित विषय असताना, नियमबाह्यपणे बारावीला गणित विषय देत संस्थांनी तब्ब्ल ४७१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय करायचे असा प्रश्न विभागीय मंडळाला पडला आहे.
दहावीला अनेकांना गणित अवघड ठरत असल्याने आणि नापासांची संख्या वाढत असल्याने आठ वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने दहावीला सामान्य गणित हा पर्यायी विषय उपलब्ध करून देण्यात आला. दहावीलाच पर्यायी विषय देण्यात आल्याने हा विषयाच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिकस्तरावर बारावीला गणित विषय घेऊन परीक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. असे असताना राज्यातील उच्चमाध्यमिक, ज्युनिअर कॉलेजांनी अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय घेण्यास मुभा दिली. विद्यार्थी हे विषय घेऊन परीक्षाही दिली. अशा नियमात न बसताना प्रवेश घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय, असा प्रश्न मंडळाला पडला आहे.
राज्य मंडळ यावर सकारात्मक विचार करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असले, तरी औरंगाबाद विभागीय मंडळाचे अध्यक्ष शिशीर घोनमोडे यांनी तशा कोणत्याही सूचना नसल्याचे ‘मटा’ला सांगितले. औरंगाबाद विभागात अशा प्रकारे ४७१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

प्रात्यक्षिकाचे गुण नाहीत!
सामान्य गणित प्रकरणातील ४७१ वगळता इतर ३४५ विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये विषय बदल, प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण शाळांकडून न येणे अशा विविध कारणांसाठी हे निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही अनेक शाळांकडून योग्य ती कार्यवाही झाली नसल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

२५ शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार
मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत विविध कारणांनी यंदा २५ शिक्षकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांना मंडळाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. परीक्षेत गैरप्रकार, कॉपी पुरविणे अशा कारणांसह परीक्षेदरम्यान बंदी असताना मोबाइल बाळगणे यामुळेही शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.

शाळांना कारणे दाखवा नोटीस
या प्रकरणात मंडळाने अशा प्रकारे प्रवेश दिलेल्या शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून चूक असलेल्या संस्थांवर कारवाई करण्यात करण्यात येईल, असेही मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

विभागातील कॉलेज : १,११०
नियमित परीक्षार्थी : १,५७,४४६
उत्तीर्ण : १,४१,४३२
पुनर्परीक्षार्थी : ४,६२०
उत्तीर्ण : २,०१९

शाखानिहाय निकाल
शाखा........परीक्षार्थी.....उत्तीर्ण
विज्ञान........७१२१०.......६८१८०
वाणिज्य......१३२७९......१२१६०
कला..........६७४३७.....५६३८७
व्होकेशनल..५५२०.......४७०५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष प्रावीण्यासह गुण घेणाऱ्यांचे प्रमाण घटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारावीच्या निकाल वाढ झाली असली, तरी विशेष प्रावीण्यासह गुण घेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे ‌तज्ज्ञांचे मत आहे.
औरंगाबाद विभागातही असेच चित्र असून, मागील वर्षीच्या तुलनेत गुणवत्ता घसरल्याचे तज्ज्ञांना वाटते आहे. निकालांमध्ये आलेला फुगवटा हा गुणवत्ता नसून, कॉलेजांमधील अनुपस्थिती, स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला कल यामुळे हे चित्र असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
निकालात औरंगाबाद राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यासह विभागचा निकालही मागील वर्षीच्या तुलनेत २.०३ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी विशेष प्रावीण्यासह गुण घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बारावी परीक्षेला महत्त्व राहिले आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागे विषयातील तज्ज्ञांची मतमतांतरे आहेत. स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला कल, ज्युनिअर कॉलेजांमधील अनुपस्थिती यामुळे बारावीच्या परक्षेला विद्यार्थी महत्त्व देत नाहीत. त्यामुळे निकालात फुगवटा दिसताे आहे, परंतु गुणवत्ता फारसी दिसत नसल्याचे म्हटले जात आहे.

निकालाची टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसते, परंतु त्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याचे आपल्याला लक्षात येईल. यामागे अनेक कारणे आहेत. त्यांवर उपाय शोधणे गरजेचे आहे.
- रजनीकांत गरूड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘समांतर’ पुन्हा मानगुटीवर बसवण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक

$
0
0

‘समांतर’ पुन्हा मानगुटीवर बसवण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, कंपनीच्या प्रतिनिधीलाही बोलावणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून शहरवासियांच्या मानगुटीवर पुन्हा समांतर जलवाहिनीचा प्रकल्प बसवण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीला कंपनीच्या प्रतिनिधींना देखील बोलावले जाणार आहे. समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
पीपीपीतत्वावरील समांतर जलवाहिनीचा रद्द करण्यात आलेला प्रकल्प पुन्हा स्वीकारला जावा यासाठी सत्ताधारी पक्षाच्या एका राष्ट्रीय नेत्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. एसपीएमएल व औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या माध्यमातूनच या प्रकल्पाचे काम व्हावे असा आग्रह धरला जात आहे. समांतर जलवाहिनीचा प्रकल्प त्याच कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्याचा संदेश त्या नेत्याच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत पोचल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याच कामात औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी अचानकपणे पुढाकार घेतला. ‘मटा’ शी बोलताना सावे म्हणाले, समांतर जलवाहिनीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयातून या प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी ८ - १० वर्षांचा कालावधी देखील लागू शकतो. दरम्यानच्या काळात पाण्यावाचून औरंगाबादेतील नागरिकांचे हाल होतील. त्यामुळे समांतर जलवाहिनीच्या करारात आवश्यक ते बदल करण्यात यावेत, नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा बोजा पडणार नाही अशी तरतूद करून नवीन करार करण्यात यावा व समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढील आठवड्यात या संदर्भात बैठक घेण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. समांतर जलवाहिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला त्याच कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवावे लागणार आहे. न्यायालयाच्या बाहेर तडजोड करून तीच कंपनी काम करण्यास तयार असेल तर त्या कंपनीला काम करू देण्यास हरकत नाही. ती कंपनी काम करण्यास तयार नसेल तर दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीनंतर या बाबी स्पष्ट होतील, असे सावे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बीडबायपासवरील पाडापाडीला मुहूर्त लागेना

$
0
0

बीडबायपासवरील पाडापाडीला मुहूर्त लागेना

पुन्हा दिली २४ तासांची नोटीस

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

बीडबायपासच्या सर्व्हिस रोडवरील बांधकामे पाडण्यास महापालिकेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. बांधकामे स्वतःहून काढून घ्या, अन्यथा पालिका कारवाई करेल असा निर्वाणीचा इशारा देणारी २४ तासांची नोटीस बांधकाम करणाऱ्यांना बजावण्यात येणार असल्याचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले.

बीडबायपास रस्त्यावर गेल्या काही महिन्यात अपघातांचे प्रमाण वाढले. त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला. या रस्त्याच्या दोन्हीही बाजूने असलेले सर्व्हिस रोड मोकळे करून त्याचे महापालिकेने मजबूतीकरण केले तर अपघातांचे प्रमाण कमी होईल असे मानले जात आहे. सर्व्हिस रोडवरील अनधिकृत व अतिक्रमीत बांधकामे पाडण्याची जबाबदारी महापालिकेची असल्यामुळे महापालिकेने हे काम युद्धपातळीवर करावे असे ठरविण्यात आले. त्यानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने बांधकामांचे सर्वेक्षण करून मार्किंग केले. ११४ बांधकामे बाधीत होणार असल्याचे स्पष्ट झाले. या बांधकामांना नोटीस बजावण्यात आली. ३१ मे पर्यंत सर्व बांधकामे पाडण्यात येतील असे जाहीर करण्यात आले. त्यासाठी मंगळवारपासून पाडापाडी सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले, पण मंगळवारी पाडापाडी सुरू झाली नाही. या संदर्भात आयुक्त मुगळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, बांधकाम केलेल्यांना २४ तासांची नोटीस द्यावी लागणार आहे. नोटीस तयार करण्यात आली असून बुधवारी सकाळपर्यंत ती बजावली जाईल. नोटीसची मुदत संपल्यावर बांधकामे पाडण्यास सुरुवात होईल. पावसाळ्यात निवासी बांधकामे पाडण्यास निर्बंध आहेत. बीडबायपास रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर बहुतांश बांधकामे व्यावसायिक आहेत, त्यामुळे ती पाडण्यास पावसाळ्याचा अडसर निर्माण होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढ‌ील वर्षी चार परीक्षा केंद्रे रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कॉप्यांचे वाढते प्रमाण, शिक्षक, उपकेंद्रसंचालकाला मारहाण अशा घटनांमुळे बारावी परीक्षा गाजली. विभागीय मंडळाने अशा केंद्रावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. विभागील चार परीक्षा केंद्रांना पुढील वर्षी परीक्षा केंद्र न देण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष शिशीर घोनमोडे यांनी सांगितले. त्यात खुलताबाद येथील कोहिनूर कॉलेज, हिवराळा येथील राजकुंवर, बोकूड जळगाव येथील एस. एस. नाईक आश्रम शाळा आणि पाटोद्यातील जयभवानी ज्युनिअर कॉलेजचा समावेश आहे.
विभागीय अध्यक्ष घोनमोडे यांनीही काही केंद्रांची पाहणी केली होती. अनेक ठिकाणी गैरप्रकार, कॉपीला प्रोत्साहन दिल्याचे आढळले. या चार केंद्रांना २०१८मध्ये होणाऱ्या परीक्षेचे परीक्षा केंद्र नसेल, असे घोनमोडे यांनी सांगितले.

विभागात परभणी पुढे
बारावी निकाला विभागामध्ये यंदा परभणी जिल्हा पुढे आहे. परभणी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९०.५९ एवढी आहे. त्यापाठोपाठ बीड ९०.४९, औरंगाबाद ८९.७६, हिंगोली ८९.६२ तर, जालना जिल्ह्यातून एकूण परीक्षार्थींपैकी ८८.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्परीक्षार्थींच्या निकालातही परभणी आघाडीवर आहे.

गुणपडताळणी प्रक्रिया आजपासून
गुणपडताळणी, छायांकित प्रतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ३१ मेपासून सुरू होत आहे. यंदापासून अॅनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून यासाठी अर्ज करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना १९ जूनपर्यंत अर्ज करता येतील.

विज्ञान शाखा आघाडीवर
निकालात विज्ञान शाखा इतर शाखांच्या तुलनेत पुढे आहे. परीक्षार्थी संख्या आणि निकालातही विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. विभागातून विज्ञान शाखेतून ७१ हजार २१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९५.७४ टक्के आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखा ९१.५७ टक्के, व्होकेशनल ८५.२४, तर कला शाखेच्या निकालाची टक्केवारी ८३.२४ एवढी आहे.

गैरप्रकरणी २१२ जणांवर कारवाई
कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षेत फारसा प्रभाव जाणावला नाही. त्यात अनेक भरारी पथकांची कामगिरी सुमार राहिल्याचे मानले जाते. बारावी परीक्षेत यंदा एकूण २२२ विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यांची सुनावणी घेतल्यनंतर १० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले, तर २१२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ‘१ + १’ अशी कारवाई करण्यात आली. त्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यात १४६ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवली दंगलीतील एकाला जन्मठेप

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, जालना

टपरीवर लागलेल्या गाण्यावरून सेवली येथे तीन एप्रिल २००८ रोजी उसळलेल्या दंगलीतील एका आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर, अन्य २१ आरोपींना कैद व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस. कोसमकर यांनी आज ही शिक्षा सुनावली. सेवलीच्या बाजारपट्टी भागात तीन एप्रिल २००८ रोजी बाबा बंदुके यांच्या टपरीवर ‘बनायेंगे मंदिर’ हे गाणे सुरू होते. त्यावरून दोन गटात वाद झाला आणि त्याचे पर्यावसान दंगलीमध्ये झाले. या दंगलीमध्ये बळीराम जाधव याचा मृत्यू झाला होता. तसेच, दहा ते पंधरा जण जखमी झाले. त्यातील संतोष गवलकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करून ३० जून २००८ रोजी याप्रकरणी न्यायालयात ३३ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीएमटी एस. एस. कोसमकर यांनी मुख्य आरोपी शेख ख्वाजा याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर शे. ख्वाजा शब्बीर कुरेशी, शे. युसूफ शे. इब्राहिम, शे. जुल्फेकर शे. मुनाफ आणि शे.तस्लिम शे. रशीद यांना प्रत्येकी १० वर्षे कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच उर्वरित आरोपींना प्रत्येकी एक वर्ष कैद व एक हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अॅड. संजीव देशपांडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले. त्यांना अॅड. संदीप घुगे, अॅड. नितीन रुणवाल, विनोद राठोड आणि कोर्ट पैरवी टीमने सहकार्य केले.

कडेकोट बंदोबस्त
सेवली दंगल प्रकरणाची अंतिम सुनावणी असल्याने न्यायालय परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. निकालानंतर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सेवली गावात आणि न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. तसेच दोन्ही बाजूंकडील नातेवाइक व गावकऱ्यांना न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखण्यात आले होते.

...आरोपींना अश्रू अनावर झाले
दरम्यान, आज दुपारी पावणे दोन वाजेच्या दरम्यान न्यायालयाचे कामकाज सुरु होताच न्यायमूर्ती श्रीमती कोसमकर यांनी सर्व आरोपींना पिंजऱ्यातून समोर उभे करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी एकेक करून सर्व आरोपींची शिक्षा वाचून दाखविली. शिक्षा ऐकताच सर्व आरोपींना अश्रू अनावर झाले. आरोपींनी जोरजोरात रडण्यास आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्याने थोडा गोंधळ उडाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ प्रयासच्या सदस्यांनी घेतली वन अधिकाऱ्यांची भेट

$
0
0

प्रयासच्या सदस्यांनी घेतली वन अधिकाऱ्यांची भेट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सामाजिक बांधिलकी जोपासत निसर्ग संवर्धन, स्वच्छता, समाजोपयोगी काम करण्याचा ध्यास घेतलेल्या प्रयास संस्थेने सातारा, देवळाई परिसरातील वन क्षेत्रात सुमारे दहा हजार रोपे लावण्याचा संकल्प हाती घेतला आहे. यासंदर्भात संस्थेच्या स्वंयसेवकांनी सोमवारी वन विभागाचे उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांची भेट घेत चर्चा केली.

सातारा देवळाई मागील काही भाग व वन विभागाच्या कार्यक्षेत्रात आहे. तेथील काही परिसर हा उजाड माळरान असून तो परिसर हिरवागार करण्यासाठी वन विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रयास संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांची प्रयासच्या स्वंयसेवकांनी भेट घेत कामाबाबत चर्चा केली. प्रकल्पाच्या कार्यवाहीबाबत माहिती घेतली. अनुरंग डोरले, सिद्धार्थ इंगळे, रोहित जाधव, अमोल मेहकर, राजश्री सावळे, केतकी कुलकर्णी, आरती थोरात, शिवानी देशपांडे आदी स्वंयसेवक उपस्थित होते.

औरंगाबादकरांसाठी एक चांगले निसर्ग पर्यटन केंद्र येथे उभारावे, अशी स्वंयसेवकांची संकल्पना असून पहिल्या टप्प्यात किमान एक हजार रोपे लावण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी तुटवडा रुग्णांच्या जिवावर

$
0
0

कर्मचारी तुटवडा रुग्णांच्या जिवावर

घाटीतील २३० पदे रिक्त; प्रत्येक विभागात निम्मे कर्मचारी; ५ वर्षांत ५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल २३० पदे रिक्त आहेत. त्याचवेळी दरवर्षी किमान १०-१२ कर्मचारी निवृत्त होत आहे आणि आजारपण, कामाचा ताण व व्यसनाधीनतेतून किमान ४ ते ५ कर्मचाऱ्यांचा प्रत्येक वर्षी मृत्यू होत आहे. मागच्या पाच-सहा वर्षांत सुमारे ५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. अशी स्थिती असतानाही १९९८ पासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सरळसेवा भरती व ‘आऊटसोर्सिंग’देखील बंद आहे. याचा गंभीर फटका २४ तास रुग्णसेवेला बसत असून, प्रत्येक विभागात गरजेच्या निम्मेच कर्मचारी आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळेच ‘पीआयसीयू’ हा नवीन विभाग सुरू होण्यात अनेक अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळेच रुग्णांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात नेणे-आणणे, तपासणीसाठी नेणे-आणणे, तसेच रुग्णालयात-वॉर्डात दाखल करण्याचे बहुतांश काम नातेवाईकांनाच करावे लागत आहे. एवढेच काय तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळेच कर्मचाऱ्यांचे काम निवासी डॉक्टर, डॉक्टरांवर करण्याची वेळ येत आहे, असेही दिसून येत आहे.

घाटीच्या रुग्णालयासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची एकूण ७४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५१४ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत, तर तब्बल २३० पदे रिक्त आहे. चिंताजनक बाब म्हणजे रिक्त होणाऱ्या पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी दरवर्षी १० ते १२ कर्मचारी निवृत्त होत आहेत. येत्या ३१ मे रोजी किमान ४ ते ५ कर्मचारी निवृत्त होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. सतत वाढणाऱ्या रिक्त पदांमुळेही कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिवसागणिक वाढत आहे आणि अशा स्थितीत तब्बल ४० टक्के कर्मचाऱ्यांना उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात, कर्करोग अशा गंभीर आजारांनी ग्रासले आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये व्यसनाधीनताही वाढत असून, अनेक कर्मचारी पुरते व्यसनाधीन बनल्याचेही सांगण्यात आले. या स्थितीमुळेच बहुसंख्य कर्मचाऱ्यांना जास्तीचे काम करावे लागते, ओव्हरटाईमही करावा लागतो. आजारपण, कामाचा ताण, व्यसनाधीनतेमुळे कर्मचाऱ्यांच्या रजांचे प्रमाणही उल्लेखनीयरित्या वाढले आहे. काही दिवस सलग काम केल्यानंतर काहींच्या रजा हमखास ठरलेल्या असतात, असेही दिसून येते. या सगळ्याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांची एकूणच उत्पादकता कमी झाली आहे. याच सगळ्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. म्हणूनच मागच्या अनेक वर्षांपासून घाटी रुग्णालयामध्ये स्ट्रेचर ओढण्याचे-ढकलण्याचे काम, व्हीलचेअर ढकलण्याचे काम रुग्णांच्या बहुतांश नातेवाईकांना करावे लागत असल्याचे चित्र हमखास दिसते. अनेकदा तर स्ट्रेचर, व्हीलचेअरसह चतुर्थश्रेणी कर्मचारीही नसतो आणि अशा वेळी नातेवाईकांना रुग्णाला चक्क उचलून नेण्याची वेळ येते आणि असे चित्रही घाटीमध्ये नवीन नाही.

स्वच्छतेवर थेट परिणाम

रुग्णालयातील अस्वच्छतेमागेदेखील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तुटवडा हे एक प्रमुख कारण आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळेच वॉर्डा-वॉर्डातील स्वच्छतेवर परिणाम होत आहे. वॉर्डा-वॉर्डातील स्वच्छतागृहे अपेक्षेप्रमाणे स्वच्छ न होण्यामागेदेखील कर्मचाऱ्यांचा तुटवडा हे एक प्रमुख कारण आहे. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळेच प्रशासनाने अनेकदा आदेश देऊनही अनेक कामे मार्गी लागत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळेच प्रत्येक विभागात निम्मेच कर्मचारी आहे. गरजेनुसार प्रत्येक विभागात-शस्त्रक्रियागृहात १० ते १२ कर्मचाऱ्यांची गरज असताना, प्रत्यक्षात ४-५-६ कर्मचारी कार्यरत असतात, असेही सूत्रांनी सांगितले.

तुटवड्यावर तोडगा नाहीच

एकीकडे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सरळसेवा भरती १९९८ पासून बंद आहे. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) आऊटसोर्सिंगला परवानगी दिली असताना, घाटीमध्ये अद्याप कर्मचाऱ्यांचे आऊटसोर्सिंग करण्यात आलेले नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा प्रश्न दिवसेंदिवस अतिगंभीर होत आहे.

‘पीआयसीयू’मध्येही अडसर?

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळेच ‘पेड्रियाट्रिक इंन्टेसिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे समजते. या नवीन विभागासाठी तब्बल ३० लाख खर्चुन युनिट सुसज्ज करण्यात आले. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीमध्ये अध्यक्ष आमदार अतुल सावे यांनी आठ दिवसांत ‘पीआयसीयू’ सुरू करा, असे आदेश दिले होते. मात्र महिने लोटले तरी या विभागाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. अर्थात, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याबरोबरच अनास्था हेदेखील महत्वाचे कारण यामागे असल्याचे सांगितले जाते.

रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची २३० पदे रिक्त आहेत. तरीदेखील ‘लाड पागे समिती’अंतर्गत सुमारे २५, तर ‘२९ दिवसांच्या सेवे’अंतर्गत सुमारे ३५ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात आले. राज्यात सरळसेवा भरती बंद आहे व न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे आऊटसोर्सिंग करण्यात आलेले नाही.

– डॉ. भारत सोनवणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, घाटी



कामाचा ताण, आजारपणामुळे मागच्या पाच वर्षांत घाटीतील ५०-६० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे व दरवर्षी १०-१५ कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळेच प्रश्न गंभीर होत आहे. राज्यातील सर्व शासकीय विभागामध्ये १ लाख ४३ हजार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. हा प्रश्न सरळसेवा भरतीशिवाय सुटणे शक्य नाही.

– राजेंद्र पोहाल, प्रदेशाध्यक्ष, भीमशक्ती कर्मचारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारपेक्षा खासगी यंत्रणा सक्षमः बागडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलयुक्तशिवार, जलसिंचन, बंधारा निर्मिती किंवा केटीवेअर काहीही काम असो सरकारी यंत्रणेपेक्षा खासगी यंत्रणा अधिक सक्षम आणि स्वःस्तात मस्त काम करून देते, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.
कॉन्फ‌‌िडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिजतर्फे (सीआयआय) आयोजित च्यावतीने ‘दुष्काळप्रवण ते दुष्काळमुक्त गाव’ या विषयावर बुधवारी आयोजित परिषदेचे विधानसभा अधअयक्ष बागडे यांचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हॉटेल अजंता अॅम्बेसेडर येथे ही परिषद आयोजित केली आहे. व्यासपीठावर सीआयआयचे महाराष्ट्र स्टेट कौन्सिल चेअरमन ऋषी बागला, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या शाश्वत विकास कार्यक्रमाच्या मुख्य करुणा भाटिया, सीआयआयच्या त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूट का‌र्यकारी संचालक आणि सीईओ कपिल नरुला, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बजाज ऑटोचे व्हाइस चेअरमन मधुर बजाज, सीआयआयच्या महाराष्ट्र वॉटर मिशनचे समन्वयक व उद्योजक प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती.
बागडे म्हणाले, मी फुलंब्री, चिकलठाणा या परिसरातील माझ्या मतदारसंघात बंधाऱ्यांची कामे करण्यास घेतली. आधी मला साडेतीन कोटींचे खर्च येईल म्हणून सांगितले, मी हे काम एका कंत्राटदाराकडून फक्त १५ लाखात केले. याशिवाय केटीवेअर बंधारे व दरवाजा दुरुस्तीचे काम काढले त्याला खूप वेळ लागेल, असे संबंधित खात्याकडून सांगण्यात आले. मी ते काम खासगी पातळीवर व तेथील तुटका दरवाजा, माती आणि कापड वापर करत दुरुस्त करून घेतले. तो केटीवेअर दरवाजा आजही लागून आहे, कामही झाले व पाणीही अडत आहे. यामुळे शासकीय यंत्रणा वेळखाऊ, शास्त्रीय आणि अशास्त्रीय कारणांचा दाखला देणारी आहे, असे बागडे म्हणाले. देविगरी बँक, खासगी यंत्रणा, एनजीओ यांच्यामार्फत होणारी कामे अधिक समर्पक, शाश्वत आणि लोकसहभागाची असल्याचेही त्यांनी सांगितले. सीआयआयच्या सर्व कामांचा आढावा घेत सीआयआयला आम्ही सर्व मदत करू आणि दुष्काळमुक्तीसाठी आखत असलेल्या सर्वप्रयत्नांना आपण मदत करू, असे आश्वासन बागडे यांनी दिले.
सीआयआयचे ऋषी बागला म्हणाले, ‘दुष्काळप्रवण ते दुष्काळमुक्त गावे’ ही संकल्पना राबवून वॉटरस्कॅन नावाचे टुल विकसीत केले आहे. सीआयआय फाउंडेशनद्वारे शाश्वत विकासाची कामे केली जात असून त्याचा भाग ही परिषद आहे. बजाजचे व्हाइस चेअरमन मधूर बजाज म्हणाले, दुष्काळग्रस्त भागातील नद्या आणि अतिवृष्टी होणाऱ्या भागातील नद्यांची जोडणी झाली पाहिजे. त्यातूनच ओल्या व कोरड्या दुष्काळाला उत्तर मिळेल. श्रीमती जानकीदेवी बजाज ट्रस्टतर्फे फुलंब्री, पैठण आणि औरंगाबाद तालुक्यातील गावांत विविध कामे करून शाश्वत विकासाला चालना दिल्याचे बजाज यांनी सांगितले.
महाराष्ट्र वॉटर मिशनचे समन्वयक प्रशांत देशपांडे यांनी बागडे यांच्या कामाचे कौतुक केले. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या करुणा भाटिया यांनी आम्ही सीआयआयच्या सोबत असल्याचे सांगून बँकेच्या विकासकामांविषयी माहिती दिली.

पाणीटंचाईवर चर्चा
या परिषदेत पाणीटंचाई, दुष्काळ, दुष्काळमुक्ती व त्यावरील विविध प्रयोग यावर दोन सत्रांत चर्चा करण्‍यात आली. ‘उद्योग आणि शासकीय यंत्रणेचा सहभाग’ या विषयावर सीआयआय मराठवाडा झोनल कौन्सिलचे चेअरमन एन. श्रीराम यांच्या अध्यक्षतेखाली पहिले सत्र झाले. यात वॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे पंकज गुप्ता, सीआयआय त्रिवेणी इन्स्ट‌िट्यटू ऑफ वॉटरच्या शिल्पा निश्चल, विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे श्रीकांत समृतवार, सीएचटूएम हिल्स इंटरनॅशनल लिमिटेडचे बी. की. हरिप्रसाद यांनी भाग घेतला. दुसरे सत्र ‘पाणी टंचाई आणि मानवीय विकास आणि आर्थिक विकास’ या विषयावर झाले. यात एक्सपर्ट ग्लोबल सोल्यूशन्सचे प्रशांत देशपांडे, स्टरलाइट टेक्नॉलॉजीचे दर्शन मुंदडा, बजाज ऑटोचे सीएसआर अॅडव्हायझर सी. पी. त्रिपाठी, सावित्रीबाई फुले एकात्मिक विकास मंडळाचे डॉ. प्रसन्न पाटील, मराठवाडा विकास मंडळाचे विषय तज्ज्ञ शंकर नागरे यांनी सखोल मांडणी केली. प्रशांत देशपांडे यांनी दोन्ही सत्रांचे समारोप केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला हव्यात आठ नवीन शिवशाही बस

$
0
0

एसटीला हव्यात आठ नवीन शिवशाही बस

म. टा. प्रतिनिधी , औरंगाबाद ः

औरंगाबाद - पुणे मार्गावर धावणाऱ्या वातानुकुलित शिवनेरी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासाठी आता आणखी आठ बस मागविण्याचा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाकडून मुंबईच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

सर्वप्रथम दादर-पुणे मार्गावर वातानुकुलित शिवनेरी बस सुरू झाली होती. त्यानंतर औरंगाबाद-पुणे बस सुरू करण्यात आली. या बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये अशा वातानुकुलित बस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र एसटी महामंडळाची परिस्थिती चांगली असल्यामुळे कंत्राटावर बस प्रवासी वाहतुकीसाठी घेण्यात आली. त्यामुळे खासगी बस कंत्राटदाराला एसटीच्या उत्पन्नाचा हिस्सा द्यावा लागत होता. त्यानंतर एसटी प्रशासनाने वातानुकुलित बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने काही बस खरेदीही केल्या.

त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर शिवशाही बसची एसटी महामंडळाच्या ताफ्यात एन्ट्री झाली. यातील काही बस मुंबई-पुणे मार्गासाठी देण्यात आल्या आहेत. औरंगाबादसाठी आठ नवीन शिवशाही बस देण्याचा मागणी औरंगाबाद विभाग नियंत्रक कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. औरंगाबाद - पुणे मार्गासह औरंगाबाद - नागपूर आणि औरंगाबाद - मुंबई या मार्गावर या बस चालविण्याचा विचार आहे.

कार्यशाळेत स्टील बॉडी करणार

एसटीच्या चिकलठाणा कार्यशाळेत बस बांधणी अल्युमिनियमद्वारे करण्यात येते. नवीन बस कोड प्रमाणे नवीन स्टीलमध्ये बसची बॉडी तयार करण्यात आली आहे. आता कार्यशाळेत तयार केल्या जाणाऱ्या बस या स्टील बॉडीमध्ये तयार होणार आहेत. ही प्रक्रिया दोन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व पाणीपुरवठा योजनांची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले आहेत. मंजूर कामाऐवजी वेगळाच सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला गेला आहे. दोन गावांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वच पाणीपुरवठा योजनांच्या कामाची चौकशी करावी, असे आदेश जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत देण्यात आले.
झेडपी पाणीपुरवठा विभागाची बैठक बुधवारी झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर अध्यक्षस्थानी होत्या. सदस्य रमेश पवार, पल्लवी नवथर, पार्वती जाधव यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती उपस्थित होते. बैठकीसाठी कार्यकारी अभियंता पांढरे उपस्थित नव्हते. अध्यक्षांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यावर संतापलेल्या सदस्यांनी कारवाईची मागणी केली. अध्यक्ष अॅड. डोणगावकर यांनी आजच्या बैठकीसाठी उपस्थित नसल्याबद्दल पांढरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यानंतर पाणीपुरवटा विभागाची बैठक झाली. अन्वी आणि शेंद्रा बन येथील पाणीपुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या होत्या. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे विचारणा केली गेली. संबंधित योजनांसाठी मंजूर झालेल्या अहवालापेक्षा प्रत्यक्षात काम वेगळे झाले आहे. कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे रमेश पवार व सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अध्यक्ष श्रीमती डोणगावकर यांनी पाणीपुरवठ्याच्या जिल्ह्यात झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले.

पिसादेवीला एमआयडीसीचे पाणी
पिसादेवीला पाण्याची अडचण आहे. तिथे एमआयडीसीतून पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आ‍ली. त्यावर कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी यासंदर्भात प्रस्ताव पाठवून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आजपासून संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे निर्णायक लढा आता सुरू झाला असून, राज्यातील शेतकरी एक जूनपासून संपावर जाणारच, अशी माहिती किसान क्रांतीचे राज्य समनव्यक विजय काकडे पाटील, जयाजी सूर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकांराशी बोलताना दिली. शहरांतील भाजीपाला, दुधाचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. प्रमुख अशा ४२ संघटनांसह अनेक पक्ष, संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपास पाठिंबा दिला असून, शेतकरी स्वंयस्फूर्तीने सहभागी होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतीमालाला भाव नाही, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळेच रोज मरण्यापेक्षा न्यायहक्कासाठी एक निर्णायक लढा उभारण्यात आला आहे. शासनातर्फे निरोप मिळाल्याने मुख्यमंत्र्यासोबत चर्चेसाठी मंगळवारी मुंबईला किसान क्रांतीचे काही पदाधिकारी गेले होते. रात्री अडीच तास बैठक झाली, पण कर्जमाफीसह अन्य मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप सूर्यवंशी यांनी करत राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले.
संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्याला न जुमानता शेतकरी स्वंयस्फूर्तीने या लढ्यात सहभागी होत आहे. विदर्भात ग्रामपंचायत, तहसील कार्यालय आदी ठिकाणी शेतकरी धरणे देणार आहेत. विविध ठिकाणी यानिमित्त मोर्चा, निदर्शन आदीचे आयोजन स्थानिक शेतकरी, संघटनेने केले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साऱ्यांचेच लक्ष वेधण्यासाठी शहराचा भाजीपाला, दुधाचा पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मागण्या
- सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती
- आठ तास मोफत वीज
- मोफत ठिबक सिंचन
- दुधाला ५० रुपहे हमीभाव
- शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा
- ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन
- स्वतंत्र हमीभाव कमिटीच्या शिफारशीनुसार हमीभाव
- शेतकऱ्यांचे वीजबिल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅकमेल करून मुलीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोबत काढलेले फोटो नियोजित पतीला दाखवण्याची धमकी देत १७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. हा प्रकार २० मे रोजी सायंकाळी सात वाजता घडला. याप्रकरणी मुलीच्या मित्राविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी सय्यद अश्रफ सय्यद हसीन हा पसार झाला आहे.
सातारा येथील १७ वर्षांच्या मुलीची दोन वर्षांपूर्वी संशयित आरोपी सय्यद अश्रफ सय्यद हसीन याच्यासोबत ओळख झाली होती. दोघांत मैत्री झाल्याने दोघांचे काही फोटो होते. अश्रफने या मुलीला २० मे रोजी बोलावून घेतले. दुचाकीवर बसवून तिला आमेरनगर परिसरातील एका खोलीवर नेले, तेथे जुने फोटो दाखवून नियोजित पती व सासरच्या मंडळीना दाखवण्याची धमकी दिली. तिला धमकावत लैंगिक शोषण केले. हा प्रकार पीडित तरुणीने नुकताच घरी सांगितला. याप्रकरणी मंगळवारी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून आरोपी अश्रफ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक खरात तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मयूरनगरमध्ये वाइन शॉपला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्थंलातर प्रक्रियामार्फत मयूरनगरात उघडण्यात येणाऱ्या वाइन शॉपला तेथील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात बुधवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नगरसेविका स्वाती नागरे यांचा जबाब नोंदविला. वॉर्ड परिसरात दारूचे एकही दुकान सुरू होऊ देणार नाही, असा इशारा नागरे यांनी यावेळी दिला.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्यात आली आहेत. बंद झालेल्या दुकानचालकांनी दुकान अन्यत्र स्थंलातर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, पडेगाव येथील बंद झालेले दारू दुकान मयूरनगर वॉर्डात येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने त्यास विरोध करण्यासाठी एक महिन्यापासून प्रयत्न करत असल्याचे किशोर नागरे व नगरसेविका स्वाती नागरे यांनी सांगितले. परिसरातील काही शाळा, स्वंयसेवी संस्था आदींच्या पत्रासह त्यांनी पोलिस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागास निवेदन सादर केले. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शिवाजी वानखेडे यांनी नगरसेविका स्वाती नागरे यांचा जबाब घेतला.

सार्वजिक जबाब घ्या
घरात नव्हे, तर जनतेसमोरच म्हणणे नोंदवून घ्या, असा आग्रह नागरे यांनी धरला होता. त्यास वानखेडे यांनी होकार दिल्यावर मनोरमा पार्क परिसरात नागरे यांचे लेखी म्हणणे अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतले. स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, माजी नगरसेवक किशोर नागरे, मनोज मेंठी, विनोद पाटील, रमेश इधाटे, विशाल आहेर, लक्ष्मण कुलकर्णी, राहुल रोजतकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाले सफाई तोंडदेखली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी नाले सफाईची कामे केली जातात. यावर्षी ही कामे नावापुरतीच केली जात असल्याचे चित्र आहे. भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे अनेक नाल्यांमध्ये मातीची भर टाकण्यात आल्यामुळे नाल्याकाठच्या घरांत राहणाऱ्या औरंगाबादकरांना जीव मुठीत घेऊन पावसाळा काढावा लागणार आहे. पावसाच्या पाण्याबरोबर संसारही वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिकेने पूर्वीच्या रचनेनुसार औरंगाबाद शहराची विभागणी सहा वॉर्ड कार्यालयात केली आहे. आता नऊ वॉर्ड कार्यालये तयार करण्यात आली असली, तरी मुख्य कारभार पूर्वीच्या सहा वॉर्ड कार्यालयांतूनच चालवला जातो. सहा वॉर्ड कार्यालयांच्या कार्यकक्षेतून सुमारे ७० नाले वाहतात. हेच नाले पुढे एकमेकांना येऊन मिळतात. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या सर्व नाल्याची स्वच्छता करण्यात येते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत कंत्राटदारांच्या माध्यमातून नाले सफाई केली जात असे. दोन वर्षांपासून महापालिकेच्या यंत्रणेमार्फत नाले सफाईचे काम केले जात आहे. यंदाही महापलिकेने स्वतःच्या यंत्रणेमार्फत नाला सफाईचे काम करण्याचा निर्णय घेतला, पण अपेक्षेनुसार अद्याप काम झालेले नाही. बारूदगर नाला, सुंदरनाला, औरंगपुऱ्यामधून वाहणारा नाला, शहानूरवाडीचा नाला, चाणक्यपुरीच्या पाठीमागचा नाला, न्यायनगरच्या बाजूने वाहणारा नाला अद्यापही स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहे. सिडको-हडको भागातून वाहणाऱ्या नाल्यांची अवस्था देखील अशीच आहे.
शहरात भूमिगत गटार योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. या कामासाठी रस्ते खोदले. खोदलेल्या रस्त्यांची माती नाल्यांमध्ये टाकण्यात आली. त्यामुळे नाल्यांची रुंदी कमी झाली आणि नाल्याच्या काठावर असलेल्या घरांना धोका निर्माण झाला. पावसाळ्यात ही घरे जलमय होण्याची भीती आहे. पालिके प्रशासनाने याबद्दल कंत्राटदाराला नोटीस देण्यापलीकडे अद्याप काहीच केले नाही. त्यामुळे नाले तुंबून पावसाळ्यात नागरिकांचे हाल होणार असल्याचे मानले जात आहे.

कार्यालयनिहाय नाल्यांची माहिती
वॉर्ड कार्यालय ‘अ’
एकूण नाले ः ७
नाल्यांची लांबी ः १२८०० मीटर

वॉर्ड कार्यालय ‘ब’
एकूण नाले ः १४
नाल्यांची लांबी ः ४९५० मीटर

वॉर्ड कार्यालय ‘क’
एकूण नाले ः ११
नाल्यांची लांबी एकूण नाले ः २९७७.५० मीटर

वॉर्ड कार्यालय ‘ड’
एकूण नाले ः ९
नाल्यांची लांबी ः ५०९९ मीटर

वॉर्ड कार्यालय ‘ई’
एकूण नाले ः ११
नाल्यांची लांबी ः १०००० मीटर

वॉर्ड कार्यालय ‘फ’
एकूण नाले ः १८
नाल्यांची लांबी ः २१००० मीटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९६ कोटींच्या मालमत्ता गहाण ठेवणार

$
0
0

Unmesh.Deshpande@timesgroup.com
Tweet : @UnmeshdMT
औरंगाबाद ः भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचे महापालिकेच्या प्रशासनाने ठरविले आहे. ९८ कोटींच्या कर्जासाठी पालिकेला बँकांकडे तब्बल १९६ कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता गहाण ठेवाव्या लागणार आहेत. कोणकोणत्या मालमत्ता गहाण ठेवणे शक्य आहे याचे ‘होमवर्क’ केले जात आहे. जून महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी पालिकेच्या प्रशासनाने २०० कोटींचे कर्ज बँकेकडून काढले. त्यासाठी ३०० रुपये किंमतीच्या मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत.
केंद्र सरकारच्या यूआयडीएसएसएमटी या योजनेतून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी शासनाने ३६५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पालिका मात्र ४६५ कोटी रुपये खर्च करून हे काम करून घेत आहे. वाढीव १०० कोटी रुपये महापालिकेला आपल्या फंडातून टाकावे लागणार आहेत. त्याशिवाय शासनाने एकूण खर्चात १०० कोटी रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला भूमिगत गटार योजनेच्या कामाला कात्री लावावी लागली आहे. केवळ मुख्य ड्रेनेज लाइन बदलण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठीही निधीची कमतरता निर्माण होत असल्यामुळे ९८ कोटी रुपयांचे कर्ज काढून निधी उभारण्याचा निर्णय पालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे.
९८ कोटी रुपयांच्या कर्जासाठी पालिकेला बँकेकडे १९६ कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता गहाण ठेवाव्या लागणार आहेत. पूर्वीच्या ३०० कोटी रुपये किंमतीच्या मालमत्ता सोडून नव्या १९६ कोटींच्या मालमत्ता पालिकेला बँकेकडे गहाण ठेवाव्या लागणार आहेत. कोणत्या मालमत्ता गहाण ठेवणे शक्य आहे याची माहिती जमावण्याचे काम मालमत्ता विभागातर्फे केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गहाण ठेवावयाच्या जागांच्या यादीसह कर्ज काढण्याचा सुधारीत प्रस्ताव जून महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महापौरांनी प्रस्ताव बाजूला ठेवला
भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा प्रस्ताव पालिकेच्या प्रशासनाने मे महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवला होता, पण हा प्रस्ताव महापौर भगवान घडमोडे यांनी बाजूला ठेवला. ९८ कोटींचे कर्ज काढल्यावर त्याच्या परतफेडीचे नियोजन काय आहे. कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवाव्या लागतील. यापूर्वी ३०० कोटींच्या मालमत्ता गहाण ठेवण्यात आल्या आहेत. नव्याने जागा गहाण ठेवण्यासाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध आहेत का, या सर्व मुद्यांचा खुलासा महापौरांनी प्रशासनाकडून मागवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकऱ्यांमध्ये जागृतीसाठी यंदा अवयवदान दिंडी

$
0
0

वारकऱ्यांमध्ये जागृतीसाठी यंदा अवयवदान दिंडी

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

वारकरी वर्षभर आतुरतेने ज्याची वाट पाहतात तो पंढरपूर दिंडी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्रभरातून हजारो दिंड्यांद्वारे लाखो वारकरी पायी जाऊन लाडक्या विठूरायाचे दर्शन घेतात. देहू आणि आळंदी येथून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात वारकरी पंढरीकडे प्रयाण करतील. पालखी मार्गावरील नागरिक आणि वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी यंदा घोरावडेश्वर प्रासादिक दिंडी, देहू आणि ‘दोस्त’ परभणी यांच्यावतीने अवयवदान दिंडी काढण्यात येणार आहे.

परभणी येथील डॉ. कैलास जवादे यांच्या पुढाकाराने ही दिंडी यंदा काढण्यात येणार आहे. जवादे मुंबईत असतात. २०१५ पासून घोरावडेश्वर प्रासादिक दिंडीसोबत दोस्त या सेवाभावी संस्थेचे सदस्य दिंडीत सहभागी होतात. दोस्त ही संस्था परभणी जिल्ह्यात आरोग्य व महिला सक्षमीकरणाचे मोठे काम करते. गेल्या वर्षी याच दिंडीच्या माध्यमातून संस्थेने ५० हजार माहितीपत्रके वाटली होती. त्याद्वारे अवयवदानाचे महत्व, आपण अवयवदान केल्याने कसा फायदा होतो ? याची माहिती दिली गेली.

त्यापुढे जात यंदा देहू ते पंढरपूर मार्गावरील गावे आणि दिंड्यामध्ये सहभागी होणारे वारकरी यांच्यामध्ये अवयवदान जागृती व्हावी, यासाठी अवयवदान दिंडी काढण्यात येणार आहे. घोरावडेश्वर दिंडीप्रमुख नाना अंबोले, प्रकाश दिसले यांच्यासह दोस्त संस्थेच्या सदस्यांची बैठक नुकतीच झाली. त्यात दिंडी मार्ग, अवयवदान दिंडीत काय असणार आहे ? यासंदर्भात चर्चा झाली. अवयवदान दिंडीची संकल्पना सांगितल्यानंतर एकाने ट्रक देण्याचे कबूल केले. या ट्रकला रथाची प्रतिकृती तयार करून त्यावर अवयवदानाची माहिती लावण्यात येईल. याशिवाय डिजिटल स्क्रिनही असणार आहे. दिंडी एक दिवसांत तीन ठिकाणी थांबते. त्याठिकाणी जमणाऱ्यांसाठी अवयवदानाचे व्हिडिओ दाखविण्यात येतील. अवयवदानाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असणार आहे.

तपासणीची सुविधा

अवयवदान दिंडीत भाविकांसाठी हिमोग्लोबीन, रक्तशर्करा, अॅनिमिया, मूत्रविकार तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत. मुक्कामादरम्यान ही शिबिरे आयोजित केली तर भाविकांचीही सोय होईल, या अनुषंगाने प्लॅनिंग करण्यात येत आहे.

‘‘ पंढरीच्या वारीत जमणारे लाखो भाविक आणि दिंडी मार्गावरील नागरिकांमध्ये अवयवदान जागृती व्हावी, यासाठी आम्ही १८ दिवस दिंडीसोबत असणार आहोत. घोरावडेश्वर प्रासादिक दिंडीच्या सहकार्यानेच हा उपक्रम पूर्ण होणार आहे. आरोग्य तपासणीच्या दृष्टीनेही आमचा प्रयत्न सुरू आहे. दिंडीतील रथातून अवयवदानाची माहिती दिली जाईल.’’
- डॉ. कैलास जवादे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘भूमिगत’ चा साठ कोटींचा ठराव विखंडित करा

$
0
0

‘भूमिगत’ चा साठ कोटींचा ठराव विखंडित करा
विरोधीपक्षासह शिवसेनेची मागणी
म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
भूमिगत गटार योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेला ६० कोटींची टोपी घालणारा ऐनवेळी मंजूर करण्यात आलेला ठराव रद्द करा किंवा विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवा, अशी मागणी महापालिकेतील विरोधीपक्षासह शिवसेनेने केली आहे.
केंद्र सरकारच्या योजनेतून भूमिगत गटार योजनेचे काम केले जात आहे. खिल्लारी - घारपुरे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला या योजनेचे काम देण्यात आले आहे. या कंपनीचे काम संपल्यावर योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुन्हा खिल्लारी - घारपुरे कंपनीला कंत्राट देण्याचा ऐनवेळचा प्रस्ताव २० मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दरवर्षी या कंपनीला ६ कोटी रुपये देण्याचा उल्लेख प्रस्तावात होता. दहा वर्षासाठी या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम कंपनीला दिले जाणार आहे. दहा वर्षात ६० कोटी रुपये या कामासाठी खर्च केले जाणार आहेत. याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर बुधवारी महापालिकेत वातावरण तापले.
शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक रेणुकादास वैद्य यांनी या ठरावाच्या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भूमिगत गटार योजनेच्या देखभाल दुरुस्तीपोटी कंत्राटदाराला सहा कोटी रुपये देण्याचा ठराव गुपचूपपणे मंजूर करण्यात आला ही बाब गंभीर आहे. हा ठराव रद्द करण्यात यावा अथवा शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवावा. भूमिगत गटार योजनेच्या संदर्भात अनेक बाबी यापूर्वी आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यावर कारवाई अपेक्षित असताना गुपचूप ठराव मंजूर करण्यात आला. ६ कोटींच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया करावी. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही. पारदर्शक कारभाराचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महापौरांच्या कार्यकाळात गुपचूप ठराव मंजूर केला जाणे पारदर्शकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असे वैद्य ‘मटा’ शी बोलताना म्हणाले.
विरोधीपक्ष नेते अय्युब जागीरदार यांनीही या ठरावाच्या संदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिले. भूमिगत गटार योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठीचा ठराव गुपचूप मंजूर करणे संशयास्पद आहे असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या ठरावाची चौकशी करा, तो विखंडीत करा, टेंडर काढून देखभाल दुरुस्तीचे काम द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठकीतील अनियमीततेची चौकशी करा व संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images