Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राउंड टेबलः शेतकरी संपावर तोडगा केव्हा

$
0
0

कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक जूनच्या मध्यरात्रीपासून किसान क्रांतीच्या झेंड्याखाली राज्यातील शेतकरी संपावर जात आहेत. शहरातील भाजीपाला, दुधाची रसदही तोडली जाईल, असा इशारा समितीने दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपकरी, राजकर्ते तसेच विरोधी पक्षाचे प्रतिनिधी, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते यांची भूमिका ‘मटा राउंड टेबल’ मध्ये जाणून घेण्यात आली.

न्यायहक्कासाठी लढा

संपासाठी कोणत्याही पक्ष किंवा संघटनेने पुढाकार घेतला नव्हता, तर शेतकऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने हा लढा पुकारला आहे. त्याला विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलन हे निर्णायक ठरावे, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी संघटनांची मूठ किसान क्रांती समितीखाली बांधण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले हे आंदोलन आहे. संपूर्ण कर्जमाफी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा भाव शेतमालाला मिळला पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने लागू करावयात यासह इतर न्याय मागण्यांसाठी बळीराजा रस्त्यावर उतरला आहे. तसेही शेतकरी रोज मरत आहेत, त्यामुळे दररोज मरण्यापेक्षा न्यायहक्कासाठी शेवट्याच्या क्षणांपर्यंत लढण्याचा आमचा निर्धार कायम आहे. आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मग, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तातडीने का होता नाही, हेच कळत नाही.
- विजय काकडे पाटील, राज्य समनव्यक, किसान क्रांती

निर्णायक लढा

राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येस सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. शेतीमालाला भाव नाही, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. रोज मरण्यापेक्षा न्यायहक्कासाठी एक निर्णायक लढा आता उभारला गेला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलविले, पण त्यात काँग्रेस आघाडी सरकारपेक्षा भाजप सरकारने काय केले, यांचीच तुलना करण्यात धन्यता मानली. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कसे सुटतील, याकडे दुर्लक्ष केले आहे. कर्जमाफीच्या बाजुने असल्याचे ते सांगतात. पण, कर्जमाफीची वेळ अजून आली नाही, असेही ते म्हणतात. अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात ? आता बस्स झाले. न्यायहक्कासाठी शेतकरी पेटून उठला आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. संप काळात शेतकरी शेतातील कामे नेहमीप्रमाणे करतील पण, भाजीपाला, दूध यांचा पुरवठा मुंबईसह अन्य महानगरात केला जाणार नाही. पूर्ण रसद तोडली जाईल. तालुक्यात किंवा शहरात आठवडीबाजार भरणार नाही. बाजार समितीतही माल पाठविला जाणार नाही. शेतकरी स्वयंस्फूर्तीने या लढ्यात सहभागी होत असून इतर राज्यातून येणारा मालही महानगरापर्यंत जाऊ देणार नाही. शेतकरी रस्त्यावर उतरणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी, शासनाला जाग येण्यासाठी नागरिकांनी पाठिंबा द्यावा. संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, त्यास आता कुणीही जुमनणार नाही. अनेक योजना फसव्या आहेत. शेतकऱ्यांना सांगितले तूर घ्या, त्यांनी तूर घेतली, पण उत्पादन झाल्यावर शेतकऱ्यांचीच तूर शासन घेत नाही. शासन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केव्हा घेणार हाच प्रश्न आहे. आतापर्यंत खूप चर्चा झाल्या, अर्ज विनंत्या केल्या. आता फक्त शेतकरी स्वतःसाठी पिकविणार आणि खाणार, अशी भूमिका घेण्यास शासन भाग पाडत आहे. त्यामुळेच आत्महत्या बंद करून हक्कासाठी लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यास विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून नागरिकांनीही पाठिंबा देत शासनावर दबाब निर्माण करावा.
- जयाजी सूर्यवंशी, किसान क्रांती

शेतकऱ्यांना न्याय केव्हा मिळणार

शिवसेनेची भूमिका ही सरकार विरोधी नाही, तर शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजुने आहे. शेतकऱ्यांनी न्यायहक्कासाठी संप पुकारला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हवी, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा भाव शेतमालाला द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासह अन्य मागण्या त्यांनी केल्या आहेत. या सर्व मागण्या रास्त आहेत. या संपाला शिवसेनेचा नैतिक पाठिंबा आहे. एखादा वाहन उत्पादक असो की मोबाइल उत्पादक त्या कंपनी मालकास त्यांनी निर्मिती केलेल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे. पण, कबाडकष्ट करून शेतीमाल पिकवणाऱ्या बळीराजाला त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. आकडेवारीचा खेळ करून शेतकऱ्यांना खूप काही दिले, असे भासविण्याचा केवलवाणा प्रयत्न केला जात आहे. अनेक योजना या सरसकट फसव्या आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ ही त्यापैकी एक फसवी योजना आहे. भाजप शेततळ्यास ५० हजार रुपये देते, तर काँग्रेस राजवटीत एक लाख रुपये दिले जात होते. नऊ हजार शेततळ्यांचे लक्ष्य असताना अडीच हजारांचा पल्ला का गाठला गेला. याचा विचार भाजपाने करावा. ठिंबक सिंचनाचे अनुदान अद्यापही अनेकांना मिळाले नाही. भाजप राज्यकर्त्यांची शेतकरीभिमुख भूमिका नाही, हेच दिसून येते. जाऊन पाहा जिल्हा बँकेत पीकविमा मिळतो का, केवळ मताचे गणित केले जात आहे. शेतकरी हिताचे गणित करण्याचा विसर भाजपला पडला आहे.
- अंबादास दानवे, जिल्हा प्रमुख,शिवसेना

शेतकऱ्यांना हवा न्याय

हे आंदोलन काही कोण्या एका पक्ष, संघटनेचे नाही. हे तमाम शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. रोज रोज ज्या प्रश्नांमुळे बळीराजा भरडला जात आहे, त्यातून सुटका करण्यासाठी त्यांनी हा लढा पुकारलेला आहे. सरकारच्या जाचाला शेतकरी कंटाळल्याने त्याने संपाचे हत्यार उपसले आहे. या लढ्यास आमचा पाठिंबा आहे. शासनाने सांगितले तुरीचे उत्पादन घ्या. शेतकऱ्यांनी त्यास भरघोस पाठिंबा देत उत्पादन घेतले. पण, काय पदरात पडले. उलट शासनाच्या धोरणामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यासह अन्य प्रश्नांवर मुख्यमंत्री म्हणतात अभ्यास सुरू आहे. किती दिवस असाच अभ्यास सुरू राहणार. काय पिकविता, यापेक्षा जे उत्पादन घेतले, त्यास काय भाव दिला गेला, हे महत्त्वाचे आहे.
- जयश्री पाटील, शेतकरी संघटना

शासन शेतकऱ्यांच्या बाजुनेच

सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताचीच आहे. सरकार शेतकऱ्यांच्याच बाजुने असून त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. संप पुकारून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. या संपात छोटे शेतकरी भरडले जातील. चर्चेतूनच मार्ग निघातो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागील पंधरा वर्षांच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतले असतील, पेक्षा कितीतरी पटीने जास्त निर्णय ही गेल्या अडीच वर्षात आम्ही घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण होता कामा नये. गेल्या अडीच वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शेती व पर्यायाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी ५० हजार कोटीची गुंतवणूक केली आहे. ही एक ऐतिहासिक गुंतवणूक आहे. पाणी, वीज, चांगली बाजारपेठ यासह अन्य पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी, शेतकरी पुन्हा कर्जाच्या घाईत जाणार नाही, त्याची प्रगती झाली पाहिजे, श्वावत शेतीसाठी, शासन प्रयत्न करत आहेत. विविध योजना अधिक गतीने राबविल्या गेल्या पाहिजे, यासाठी सरकारच्या मागे लागले पाहिजे. पीकविमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने खास उपाय योजना केल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत ४ हजार ६०० कोटी रुपयांचा पीकविमा होता, तर गेल्या अडीच वर्षात ६ हजार ७३९ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे दिले जात आहे. केवळ विरोधाला विरोध ही भूमिका योग्य नाही.
- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप

सरकार शेतकरी विरोधी

भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे. विद्यामान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकावर होते, त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या ज्या काही मागण्या होत्या, त्यांची अंमलबजावणी जर आता तातडीने केली तर शेतकऱ्यांचे कल्याण होईल. पण, तेव्हा ते जे काही बोलत होते, त्यांची अंमलबजावणी काही होताना दिसत नाही. ‘मागेल त्याला शेततळे’ योजना फसवी आहे. ठिंबक सिंचन अनुदान योजनाही तशीच. अर्जासाठी एकाच महिन्याची मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम या सरकारने सुरू केले आहेत. त्यामुळे बळीराजा त्रस्त झाला असून त्यामुळेच त्याने आता न्यायहक्कासाठी उठाव करत संपाचे हत्यार उपसले. ही एक चांगली बाब आहे. तूर खरेदीचे काय झाले. ग्रेड प्रमाणे खरेदी झाली असती तर शेतकऱ्यांच्या हिताचे झाले असते. पण, तशी इच्छा शक्ती सरकारची नाही. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, मताचे गणित पाहूनच चालणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताकडे पाहण्यास त्यांना वेळ नाही.
- जगन्नाथ काळे, नेते, काँग्रेस

शेतकऱ्यांच्या हितासाठी हवा तोडगा

शेतमालक संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ती का आली याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. शेतमजूर हा शेतात काम करताना असो की रोहयोत कामावर त्यासाठी काही सोयी सुविधा पुरविल्या जातात. त्यांच्या अधिकाराची जपवणूक केली जाते. पण, असे कोणतेही अधिकार शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. निती आयोग हा शेतकऱ्यांच्या बाजुने बोलतो, असे दिसते. आयोगाच्या शिफारशींपैकी बहुतेक मागण्या या संपकरी शेतकऱ्यांच्या अजेंड्यात आहेत. पण, ते पूर्ण करण्यासाठी सरकार धजावत नाही, असे दिसते. मागे झालेल्या कर्जमुक्तीमध्ये सहकारी बँक यांच्याच हाती पैसा आला. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती मिळाला. आताही कर्जमुक्ती झाली तरी बँकेलाच जीवदान मिळेल. त्यामुळे जुने नवे कर्ज कसे होते, हे पाहूनच तपासून, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच कर्जमुक्ती व्हावी. गेल्या अनेक वर्षातील आर्थिक तंगीचा हा प्रश्न आहे, केवळ कर्जमुक्तीने तो सुटणार नाही. आपले प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे, त्याचे स्वागतच आहे. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत लवचिक भूमिका असावी. दीर्घकालीन आर्थिक तरतुदीने प्रश्न सुटला पाहिजे. मध्येच निर्यातबंदी करून बाजारभाव मारला जातो. त्यामुळे बाजारात हस्तक्षेप करणार नाही, तर तो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न व्हायला हवे. शेतकरी स्थिर कसा होईल, यासाठी प्रयत्न हवेत. त्यासाठी शासनाने शेतकरी ककर्जबाजारी झाला हे मान्य करावे, हा गेल्या ६० वर्षातील संचित व्यवहाराचा फटका म्हणून त्यांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्याची भूमिका हवी. दामदुप्पटपेक्षा कर्ज जास्त होता कामा नये. हे तपासून कार्यवाही व्हावी. कारण शेतकऱ्यावरील कर्जाचे आकडे हे फुगीर असल्याचे दिसते. शासनाने शेतकऱ्यांचे उत्पादन पाच वर्षात दुप्पट करून देतो, असे सांगितले. म्हणजे पायाभूत, मुलभूत सुविधा, चांगले मार्केट असे करून काही प्रमाणात ते शक्य होईल. शेती मालास योग्य भाव मिळालाच पाहिजे. पण, शेतकऱ्यांनी केलेल्या एकूणच मागण्यासंदर्भात या ठिकाणी शासन हे मालकाच्या भूमिकेत आहे. खरे तर या संपाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी देण्याची संधी शासनाना मिळाली आहे. त्यास सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे.
- डॉ. मानवेंद्र काचोळे, शेती अभ्यासक

या मागण्यांसाठी लढा
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी.
- उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा भाव शेतमालाला द्या.
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
- फळे, भाजीपाला यांना हमी भावामध्ये समाविष्ट करा
-निर्यादीवरील बंधने काढून टाका
- दुधाला ५० रुपये प्रतिलिटर भाव द्या.
-शेतीसाठी बिनव्याजी कर्ज द्या.
- ६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गव्हाच्या गोणीत दोन किलोची घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
राज्य अन्न आयोग व ग्राहक सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी बुधवारी वैजापूर दौऱ्यात पुरवठा विभागाची झाडाझडती घेतली. त्यांनी शहरातील शासकीय गोदामाला भेट देऊन तहसीलदार सुमन मोरे, पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. गोदामाच्या तपासणीत गव्हाच्या प्रत्येक गोणीमध्ये दोन किलोची घट का आढळून आली या प्रश्नाने अधिकारी निरुत्तर झाले.
राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष अरूण देशपांडे, ग्राहक पंचायतीचे मराठवाडा प्रांत अध्यक्ष दामोदर पारिक यांनी सकाळी साडे दहा वाजता तहसील कार्यालयास भेट दिली. त्यावेळी तहसीलदार सुमन मोरे उपस्थित होत्या, पण कार्यालयाला कुलूप होते. कार्यालय उघडेपर्यंत देशपांडे यांना बाहेरच ताटकळत थांबावे लागले. त्यानंतर त्यांनी पुरवठा विभागाला भेट दिली. नगर पालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार मोरे, पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार डोंगरजाळ, वजन मापे निरीक्षक, नगरपालिका व जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शिक्षण, स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वजन मापे विभागाच्या अधिकाऱ्यांना देशपांडे यांनी त्यांच्याच विभागाचा टोल फ्री क्रमांक विचारला, पण त्यांना सांगता आला नाही. मोंढा मार्केट परिसरातील शासकीय गोदामाला दिलेल्या भेटीत सुद्धा असाच प्रकार समोर आला.

मंत्र्यांना माहिती कळवली
वैजापूरच्या शासकीय गोदामात गव्हाच्या पोत्याच्या वजनात दोन किलोची घट आढळून आल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष देशपांडे यांनी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना दूरध्वनीवरून दिली. त्यामुळे याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३ तहसीलदारांच्या मराठवाड्यात बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यातील २३ तहसीलदारांच्या बदल्याचे आदेश विभागीय आयुक्‍तांनी मंगळवारी सायंकाळी काढले. यावेळी ७ परीविक्षाधीन तहसीलदारांनाही पदस्थाना देण्यात आली आहे. या आदेशामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभारींकडे भार असलेल्या औरंगाबाद शहरातील अन्नधान्य वितरण कार्यालयाला कायमस्वरुपी अधिकारी मिळाला आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात बदलीचे ठिकाण)- सोयगावचे तहसीलदार संतोष बनकर (जालना जिल्हाधिकारी कार्यालय), पूर्णाचे तहसीलदार पांडूरंग माचेवाड (औंढा नागनाथ), औंढा नागनाथचे तहसीलदार एस. आर. मदनूरकर (पूर्णा), परंडाचे तहसीलदार स्वरुप कंकाळ (सेलू), उस्मानाबादचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजकुमार माने (तहसीलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद,), जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अनिता भालेराव (अन्नधान्य वितरण अधिकारी, औरंगाबाद), लोहाचे तहसीलदार (शिरुर अनंतपाळ), बीडचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अविनाश शिंगटे (तहसीलदार शिरुर अनंतपाळ), बीडचे तहसीलदार छाया पवार (सोयगाव), लातूर येथील महसूल सहायक प्रसाद कुलकर्णी (सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर), नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अरविंद नरसीकर (तहसीलदार, अर्धापूर), हिंगोली येथील महसूल सहाय्यक वैशाली पाटील (सेनगाव), नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ज्योती पवार (वसमत), परीविक्षाधीन तहसीलदार स्वप्नील पवार (धान्य खरेदी अधिकारी, लातूर), गेवराईचे तहसीलदार डॉ. आशिष बिरादार (लोहा), गंगाखेडचे तहसीलदार (गेवराई), नांदेड शहर संजय गांधी योजना तहसीलदार बी. एस. मोरे (सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड), जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील संजय गांधी योजना तहसीलदार एस. पी. त्रिभुवन (तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड), लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार रुपाली चौगुले (महसूल सहाय्यक लातूर), तहसीलदार नायगाव येथील के. एच. पाटील (तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय लातूर) परतूर तहसीलदार सखाराम मांडवगडे (सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी), परभणी येथील सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी के. एम. मन्साराम (तहसीलदार संजय गांधी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय जालना) जिल्हाधिकारी जालना येथील संजय गांधी योजना तहसीलदार (तहसीलदार परतूर).
परीविक्षाधीन तहसीलदरांपैकी शिरुर अनंतपाळ येथील अश्विनी डमरे (तहसीलदार घनसावंगी), वाशी तहसीलदार (तहसीलदार, लोहा, नांदेड) बदली करण्यात आली आहे. योगिता कोल्हे यांना तहसीलदार भोकरदन, सुरेश शेजूळ यांना तहसीलदार जिंतूर, नरेंद्र देशमुख यांना तहसीलदार किनवट, स्वप्नील पवार यांना धान्य खरेदी अधिकारी लातूर, संदीप राजपुरे यांना तहसीलदार वाशी, उस्मानाबाद येथे पदस्थापना देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमीभावाअभावी शेतकरी निराश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
‘हमीभाव नसल्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. याचा राेज उहापाेह हाेताे असताना शासन अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे यापुढील काळात शेती व्यवसाय राहताे की नाही,’ अशी शंका माजी अामदार कल्याण काळे यांनी व्यक्त केली.
येथील बाजार समितीमध्ये लिलावगृह, सभागृह, अंतर्गत सिमेंट रस्ते यांचे भूमीपूजन, फळ-भाजीपाला लिलावाचे काजापूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदाम मते, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, सहायक निबंधक परमेश्वर वरखेडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती संदीप बोरसे यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील शेत वस्तीवर जळीत झालेल्या सात कुटुंबांना बाजार समितीतर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
‘पाऊस बऱ्यापैकी झाला, समाधानकारक उत्पादन आले. पण, भाव नसल्याने शेती नकाेशी वाटत आहे. दुग्ध व्यवसायात देखील शेतकऱ्याचे कंबरडे माेडले अाहे. शासन भाव देऊ शकते. मात्र नेमके राज्यात काय चालू अाहे. हे या मंत्रीमंडळास कळत नसल्याने शेतकऱ्याची हेळसांड हाेत अाहे,’ असे प्रतिपादन डाॅ. काळे यांनी केले. यावेळी यावेळी बाजारसमिती सभापती संदीप बाेरसे, उपसभापती राहुल डकले, जिल्हा परिषद सदस्य किशाेर बलांडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आबाराव सोनवणे, सचिव मनोज गोरे, रंगनाथ काेलते, लहू मानकापे, राजू प्रधान, सुभाष जाधव, तेजराव काळे, राेषन अवसरमल, गणेश वाघ, मुदस्सर पटेल, अांबादास गायके, प्रभाकर साेटम, विजय मोरे, रवी काथार, संतोष मेटे, महादू डकले, विठ्ठल लुटे, बाबुराव डकले आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबादमध्ये महालॅब सेवा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात रक्त, लघवी आणि तत्सम वैद्यकीय नमुन्यांच्या महागड्या चाचण्या रुग्णांना विनामुल्य करून मिळणार आहेत. शिवाय या चाचण्यासाठी होणारी रुग्णांची भटकंती थांबणार आहे. या साठी केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या हिंदुस्तान लॅटिकस लिमिटेड या कंपनी समवेत महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेने करार केला आहे. उस्मानाबादमध्ये ही महालॅब सेवा सुरू करण्यात आली असून त्यामुळे आता महागडी रक्त तपासणी मोफत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यतील आरोग्य संस्थामध्ये बाह्यस्थ संस्थेमार्फत वैद्यकीय प्रयोगशाळा सेवा ( लॅबोरेटरी सर्व्हिसेस) उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य संस्थेद्वारा प्रयत्न करण्यात येत होते. एचएलएल लाईफकेअर लिमिटेड या कंपनीसोबत पाच वर्षांसाठी करार करण्यात आल्याने या प्रयत्नांना आता यश आले आहे. या करारानुसार एचएलएल लाईफ केअर राज्यात विविध ठिकाणी प्रयोगशाळा (लॅब) स्थापन करणार आहे. या लॅबमधून त्यांच्याशी संलग्न असलेली शासकीय रुग्णालये, संस्थामधून नमुने (रक्ताचे सॅम्पल) संकलित करून त्यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील. या चाचण्यासाठी रुग्णांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. या चाचण्यांचे शुल्क या संस्थेला राज्य सरकारकडून मिळणार आहे. त्यामुळे रूग्णांना ही सेवा विनामुल्य मिळणार आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यात अशा प्रकारच्या एकूण ११० प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. उस्मानाबादचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही प्रयोगशाळा उस्मानाबादसाठी प्राधान्याने मिळाली आहे. राज्यातील ही १९ वी प्रयोगशाळा आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर आरोग्य संस्थामध्ये त्याचा विस्तार होणार आहे, अशी माहिती या उपक्रमाचे उस्मानाबाद जिल्हा को-ऑडिनेटर दत्तात्रय कोकाटे यांनी दिली. यावेळी वरिष्ठ तंत्रज्ञ प्रयोगशाळा दौलप्पा यंपाळे, रक्त संकलन तज्ज्ञ सचिन क्षीरसागर हे उपस्थित होते.
शासकीय रुग्णालयात रक्त व लघवी यांची तपासणी होत होती. यातून मधुमेह, कावीळ, मलेरिया यांचे निदान होत होते. अन्य गंभीर आजाराबाबतच्या चाचण्या या खासगी प्रयोगशाळेतून कराव्या लागत व त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत होते. सर्व सामन्याच्या आवाक्याबाहेरील हा खर्च होता. पैशाअभावी अनेकजण या चाचण्या करण्याचे टाळत होते. परिणामी रोगनिदान अभावी अनेकजण दगावत होते.

२४ तास सेवा दिली जाणार
सरकारने या सर्व बाबी लक्षात घेऊन सुमारे महत्वाच्या अशा रक्ताच्या ५२ चाचण्या विनामुल्य केल्या आहेत. यामध्ये किडनीचे आजार, लिव्हर, थायराईड, लिकविड प्रोपाईल, कॅन्सर व ट्युमर मार्कर टेस्ट, इलेक्टरोफॉरेसिस टेस्ट, अँटिबायोटिक सेन्सिव्हिटी टेस्ट, पीसीआर, टोटल प्रोटीन, कॅल्शियम सारख्या महागड्या टेस्टचा समावेश आहे. जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा उप रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, या एचएलएल प्रयोगशाळेला जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या आरोग्य सेवेचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्याया लॅबमार्फत अत्यावश्यक तपासणीचे अहवाल केवळ तीन तासांत रुग्णांना उपलब्ध होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सिग्नल नव्हे शोभेच्या वस्तू

$
0
0

वाहतूक सिग्नल नव्हे शोभेच्या वस्तू

सिग्नगलच्या लाल दिव्याकडे कोणाचेच लक्ष नाही

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाह‌तुकीच्या नियोजनासाठी शहरात अनेक नवीन ठिकाणी वाहतूक सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र, हेडगेवार हॉस्पिटलजवळील चौक व रोशनगेट परिसरातील सिग्नल सुरू असूनही त्याचे पालन वाहनधारक करीत नसल्याने शोभेच्या वस्तू बनले आहेत. यासोबतच शहरातील अन्यही अनेक सिग्नल्सवर थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे.

शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक सुरळीत असावी या हेतूने नवीन वाहतूक सिग्नल बसवण्यात आले आहेत. यामध्ये हेडगेवार हॉस्पिटलजवळ असलेल्या चौकाचा तसेच चंपा चौकाचाही समावेश आहे. हेडगेवार हॉस्पिटलजवळच्या चौकातून एक रस्ता गजानन महाराज मंदिराकडे, एक उल्कानगरीकडे तर एक रस्ता त्रिमुर्ती चौकाकडे जातो. या रोडवर दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांची २४ तास वर्दळ असते. येथील सिग्नल सुरू असला तरी वाहनधारक या सिग्नलकडे दुर्लक्ष करून आपली वाहने पुढे काढतात. या ठिकाणी वाहतूक पोलिस थांबत नसल्याने वाहनधारकांना कोणाचाही धाक राहत नाही. हीच परिस्थिती चंपा चौक येथील सिग्नलची आहे. हा चौक देखील वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचा आहे. येथील सिग्नल देखील नियमित सुरू असतो. मात्र, वाहनधारकांना या सिग्नलचे वावडे आहे. सिग्नलचा लाल दिवा सुरू असला तरी वाहनधारक बिनदिक्कत सिग्नलचे उल्लंघन करून निघून जातात. या ठिकाणी देखील वाहतूक पोलिसांचा पॉइंट असणे आवश्यक आहे. मात्र, पोलिस येथे थांबत नसल्याने सिग्नलवरील वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे.

या दोन्ही सिग्नलवर बहुतांशवेळा सिग्नल सुरू असताना वाहनचालक मात्र थांबतच नसल्याचे दिसून येते. त्यासोबतच औरंगपुऱ्यातील महात्मा फुले चौक, मिल कॉर्नरचा शाहू महाराज चौक, वीर सावरकर चौक, समर्थनगर, वीर सावरकर चौक (रोपळेकर हॉस्पिटलजवळील) अशा काही सिग्नल्सवर वाहतूक नियोजनाचे दिवे सुरू असून काहीच उपयोग होत नाही. कारण वाहनचालक लाल दिव्याकडे पाहून थांबत नाहीत. या चौकांच्या चारही बाजुने असलेली वाहने कायमच हिरवा दिवा सुरू असल्यासारखी वाहतूक कोंडी करीत वाट काढत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळा तोंडावर, शहर वाऱ्यावर

$
0
0

औरंगाबाद : रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे नऊ महिने मुदतीचे काम ३६ महिने झाले तरी सुरूच आहे. त्यामुळे या रस्त्यांसह शहरातील अन्यही रस्ते पावसाळ्यात धोकायादक ठरणार आहेत. रस्त्यांच्या कामासाठी पालिका आयुक्तांनी कंत्राटदाराला वेळोवेळी नवनवीन डेडलाइन दिली, पण तिला केराची टोपली दाखवण्यात आली. धिम्यागतीने सुरू असलेल्या कामाबद्दल राजकीय नेते देखील मूग गिळून गप्प आहेत.
महापालिका निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामासाठी २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून महापालिकेला देण्यात आला. २४ कोटी रुपयांच्या निधीतून पाच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे करण्याचे ठरविण्यात आले. हे काम विशिष्ट कंत्राटदारालाच मिळाले पाहिजे, अशा उद्देशाने निविदेमधील अटी तयार करण्यात आल्या. त्यावर मोठा गदारोळ झाला, पण प्रशासनाने अटींमध्ये बदल केला नाही. पाचपैकी महावीर चौक ते क्रांतीचौक या रस्त्याचे काम रद्द करण्यात आले. त्यामुळे चार रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा विषय शिल्लक राहिला. यापैकी संत तुकोबानगर ते कासलीवाल कॉर्नर व कामगार चौक ते महालक्ष्मी कॉलनी या दोन रस्त्यांची कामे पूर्ण झाली. तुलनेने या रस्त्यांची लांबी देखील कमी होती. सेव्हन हिल्स ते सूत गिरणी चौक आणि गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर या दोन रस्त्यांची कामे मात्र रखडलेली आहेत. या रस्त्यांच्या कामांसाठी नऊ महिन्यांचा कालावधी ठरवून देण्यात आला होता. सेव्हन हिल्स ते सूत गिरणी चौक व गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर या दोन्ही रस्त्यांच्या कामाला तीन वर्षे होत आली, तरी कामे पूर्ण झाली नाहीत. पालिका आयुक्तांनी या रस्त्यांच्या कामांसाठी वेळोवेळी डेडलाइन बदलली. शेवटची डेडलाइन ३१ मार्च देण्यात आली होती. ती देखील टळून गेली आहे. या दोन्ही रस्त्यांची कामे सुरूच असल्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होऊ लागला आहे. काम सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी वळण रस्ता वापरावा लागत आहे. वळण रस्त्यावर वाहने नेताना अर्धा ते एक फूट उंचीचा अडथळा पार करावा लागत आहे. पावसाळ्यात हे अडथळे निसरडे होऊन अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सेव्हन हिल्स ते सूत गिरणी चौक या रस्त्याला जोडणाऱ्या काही अंतर्गत रस्त्यांची कामे देखील काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय पालिकेच्या प्रशासनाने घेतला. टेंडर काढून कंत्राटदाराला वर्कऑर्डर देखील दिली, पण या रस्त्यांची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. रिलायन्स मॉलपासून वाडकर कॉर्नरपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था काम सुरू न झाल्यामुळे पावसाळ्यात अत्यंत धोकादायक बनणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर्गत स्पर्धेने ‘एसटी’ पंक्चर

$
0
0


Abdulwajed.Shaikh
@timesgroup.com
औरंगाबाद ः खासगी वाहतुकीची तीव्र स्पर्धा पुढ्यात असताना एसटीला अंतर्गत आव्हानांशी सामना करता करता नाकी नऊ येत आहेत. विभागातून राज्याच्या अनेक भागात बस सेवा सुरू केली. मात्र, डिझेल वरील खर्च आणि कर्मचारी वेतनाचा खर्च भागवणे अनेकदा जिकरीचे ठरते. या आर्थिक कोंडीने नियोजित वेळापत्रकाचा बोऱ्या वाजला आहे. १ जून १९४८ रोजी राज्यात पहिली बस धावली. हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने एसटीच्या कारभाराची घेतलेली ही झाडाझडती.
औरंगाबादहून जळगावला जाण्यासाठी पहाटे साडेसहानंतर सकाळी साडेआठपर्यंत औरंगाबाद आगाराची एकही बस नाही. या रिकाम्या वेळेत जळगाव, रावेर, इंदूर, सिल्लोड आगाराच्या बस सुरू असतात. सिल्लोड, फुलंब्री, जळगावसाठी जाणाऱ्या प्रवाशांना साहजिकच त्यांचा आधार घ्यावा लागतो. अन्य मार्गावरही हीच परिस्थिती आहे. औरंगाबाद - पुणे, औरंगाबाद - जालना, औरंगाबाद - नाशिक मार्गावरही नाशिक, जळगाव, धुळे, रावेर, मलकापूर तसेच अन्य आगाराच्या जादा सेवा सुरू आहेत. औरंगाबाद राज्याच्या मध्यवर्ती आहे. त्यामुळे अनेक भागातील बस आैरंगाबादेतून जातात. या बस सिडको आणि मध्यवर्ती बस स्थानकावरून जातात. यामुळे या दोन्ही आगारांचे नियोजित वेळापत्रक कोलमडले आहे. जादा बस किंवा विशेष बसच्या नावाने सुरू केलेल्या गाड्यांची माहिती त्या मार्गावरील मुख्य आगारांना दिली जात नाही. बस आल्यानंतर बसचा वेळ समजतो. यामुळे प्रवासीही हैराण होत आहेत.
नांदेड, जालना, लातूर विभागातून अनेक गाड्या औरंगाबादमार्गे सोडल्या आहेत. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशच्या गाड्याची संख्या वाढलेली आहेच. सोबत मुंबई, पनवेल, नालासोपारा, वसई - विरार आगारातून विदर्भाकडे जाणाऱ्या बस औरंगाबादमार्गे सोडण्यात आल्या आहे. प्रवासी हंगामाच्या काळात ही संख्या वाढते. यामुळे वाहतूक कोंडी, बसस्थानकावर बसची गर्दी असते. मात्र, सगळा गल्ला इतर विभागांच्या खाती जमा होतो. या अंतर्गत स्पर्धेने विभागाला जेरीस आणले आहे.

सुरक्षा, स्वच्छतेचे वावडे
परिवहन मंत्र्यांनी एसटी स्वच्छतेबाबत वेळोवेळी आगार कार्यालयांना सूचना दिल्या. मात्र, हे आदेशी खुंटीला गुंडाळून ठेवल्याने अनेक बसमध्ये पाय ठेवताच प्रवाशांच्या अंगावर काटा येतो. बसस्थानक अस्वच्छ असतात. हे किळसवाणे चित्र बदलले नाही, तर येणारा काळ धोक्याची घंटा आहे.
एसटी पहिल्यांदा धावली तेव्हा पुणे-नगरचे भाडे ९ पैसे होते. आता हेच शिवनेरीचे भाडे ३४५ इतके झाले आहे. या ६८ वर्षांत एसटीच्या प्रवासात बराच बदल झाला. मात्र, एसटीने स्वच्छता आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. केवळ याच प्रश्नांवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वारंवार आदेश दिले. अधिकाऱ्यांचे कान टोचले. मात्र, परिस्थिती बदलली नाही. डिझेलचे दर वाढताच एसटीचे प्रवासभाडे वाढविण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र, हेच दर कमी झाल्यानंतर भाडे कमी करण्याचा निर्णय एकदाही घेतला नाही.

आयशर बांधणी औरंगाबादला
आगामी काळात आयशर कंपनीच्या चेसिसवर चिकलठाणा कार्यशाळेत २५ बसची बांधणी केली जाणार आहे, अशी माहिती चिकलठाणा विभागीय कार्यशाळेचे व्यवस्थापक जे. पी. चव्हाण यांनी दिली. एसटी विभागात दापोली, नागपूर, औरंगाबाद येथे बस बांधणी होते. मराठवाडयात अशोका लेलँड गाड्यांची मागणी अधिक आहे. यामुळे औरंगाबादला याच चेसिसवर बस बांधणीचे काम करण्यात येते. आता एसटी विभागाने आयशर कंपनीच्या चेसिवरही बस बांधणी करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या दापोली येथे ही बांधणी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


८८ लाखांचा निवडणूक निधी परत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या खर्चापैकी ८८ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाने परत पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र दोन वर्षांनंतरही अद्याप तब्बल ६० लाख रुपयांची बिले रखडली असताना, हा निधी परत गेला कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
२०१४ मध्ये लोकसभा, तर त्याच वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. लोकसभेसाठी १२ कोटी तर विधानसभेसाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन्ही निवडणुकांसाठी झालेला संपूर्ण खर्च प्रशासनाला मिळाला. मात्र, २०१५ मध्ये प्राप्त झालेले ५३ लाख आणि २०१६ मध्ये मिळालेले ३५ लाख असा ८८ लाख रुपयांचा निधी ३१ मार्च रोजी निवडणूक विभागाकडे परत पाठवण्यात आला. विशेष म्हणजे निधी परत पाठवण्यापूर्वी निवडणुकीदरम्यान प्रलंबित राह‌िलेली ६० लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली नाहीत. यामध्ये फर्निचर, मंडप, चहा, नाष्टा, भोजन, प्रिंटिंग, व्हिडिओ शूटिंग या बिलांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याकडे निवडणूक विभागाने बिले सादर केली होती. मात्र, या बिलांवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी न करताच परत निवडणूक विभागाकडे पाठवले होते. तत्‌कालीन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ही बिले प्रलंबित असल्याचा शेरा लिहून ठेवला. मात्र, निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांकडून विद्यमान निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित राहिलेल्या बिलांची माहितीच सादर केली नाही.

चौकशीचे आदेश
निवडणूक विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून ६० लाख रुपयांची बिले प्रलंबित आहेत. मात्र, ही बिले मागण्यासाठी कुणीही कंत्राटदार उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आला नाही. त्यामुळे या बिलांबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही बिले बोगस होती काय, असा संशय व्यक्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बिलांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारकरी महाराष्ट्राचा श्वास’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
पवित्र भारतीय संस्कृती टिकवण्याकामी मोलाची कामगिरी बजावणारा वारकरी महाराष्ट्राचा श्वास असल्याचे प्रतिपादन हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या सांगता समारोहप्रसंगी बोलताना केले.
वारकरी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या सत्रांत व्यासपीठावर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बापूसाहेब महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, अरुण महाराज बुरघाटे , बाबा महाराज राशीनकर, एकनाथ सह अनेक मान्यवर उपस्थित होते. गहिनीनाथ महाराज यांनी आपल्या ओघवत्या भाषेतील मनोगताने सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले. शुद्धत्व कधीही संपत नसते तर त्यामध्ये सातत्याने वाढच होत असते. असे न संपणारे शुद्धत्व वारकऱ्यांकडे असते. वारकरी सांप्रदाय आपल्यापरीने जनजागृती व सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. या संत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मांडण्यातआलेले ठराव वारकरी सांप्रदायाच्या भरीव सामाजिक कार्याची साक्ष देत असल्याचे सांगून सर्वांच्या सहकार्याने लातुरात पार पडलेले हे संमेलन ऐतिहासिक ठरल्याची भावना व्यक्त केली.
हभप अमृत महाराज जोशी यांनी काल्याचे किर्तन सादर केले. काल्याच्या किर्तनानंतर उपस्थितांना काल्याच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी गहिनीनाथ महाराजांसह अनेक मान्यवरांना वारकरी विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिंडी स्पर्धेतील विजेत्यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.

हरिनाम सप्ताहाचा खर्च पाणलोटसाठी वापरावा
गावो-गावी होणाऱ्या वारकऱ्यांच्या हरिनाम सप्ताहाच्या खर्चात बचत करून तो पैसा पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी वापरण्याचा ठराव लातूरात झालेल्या सहाव्या संत साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशात मंजूर करण्यात आला. यावेळी एकूण नऊ ठराव मंजुर करण्यात आले आहेत. संत साहित्य संमेलनाचा समारोप संमेलनाध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर आणि वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पारीत करण्यात आलेल्या ठरावामध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधे वृक्षलागवड करणे,त्यासाठी प्रबोधन करणे, वृक्षाचे संगोपन करुन लातूर जिल्हा वृक्षमय करण्यासाठी शेतकऱ्यांना शपथ घ्यायाला लावणे असा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींची माळ युतीच्या गळ्यात

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून ओळखल्या जाणारा एमआयएमचा गट गाफील राहिला आणि स्थायी समितीच्या सभापतींसह पाचही विषय समितींचे सभापती बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. आता सभापतींच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा गुरुवारी होईल. निवडले जाणारे सभापती शिवसेना - भाजप युतीचे असणार आहेत.
स्थायी समिती व विषय समितींच्या सभापत‌िपदासाठी २ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, १ जून हा शेवटचा दिवस आहे. पालिकेच्या नगरसचिव विभागातून उमेदवारी अर्ज प्राप्त करण्याचा आज शेवटचा दिवस होता. ३० आणि ३१ असे दोन दिवस अर्जांचे वाटप करण्यात आले. दोन दिवसांत २९ अर्जांचे वाटप झाले. त्यातील शिवसेनेचे सभागृहनेते राजेंद्र जंजाळ व भाजपचे गटनेते भगवान घडमोडे यांनी प्रत्येकी १४ म्हणजे एकूण २८ उमेदवारी अर्ज नेले. स्थायी समितीमधील अपक्ष नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी एक अर्ज नेला. दोन दिवसात एकूण २९ उमेदवारी अर्ज नेण्यात आले.
एमआयएमने मात्र एकही उमेदवारी अर्ज नेला नाही. एमआयएमचे महापालिकेत २६ नगरसेवक आहेत. स्थायी समितीमध्ये या पक्षाचे चार नगरसेवक आहेत. एमआयएम महापालिकेतील सर्वात मोठा विरोधीपक्ष असताना या पक्षाने सभापत‌िपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सचिव कार्यालयातून घेतले नाहीत. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतींसह सर्व विषय समितींचे सभापती बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधीपक्षांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे सर्व सभापती बिनविरोध निवडले जाणार आहेत.

काँग्रेस - राष्ट्रवादीला आम्ही आमच्या सोबत येण्याची विनंती केली होती, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आम्ही एकटे लढलो, तर पराभूत होणार हे स्पष्ट होते. पराभूत होण्यासाठी लढण्यापेक्षा न लढलेले बरे, असा विचार करून उमेदवारी अर्ज घेतले नाहीत.
- नासेर सिद्दिकी, गटनेटे एमआयएम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने सव्वाचार लाखांचा गंडा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिक्षक म्हणून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाला ४ लाख २१ हजारांचा गंडा मुंबईच्या दोन भामट्यांनी घातला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौतम किसन सुखधाने (रा. संभाजी कॉलनी, एन ६) याची मार्च २०१४ मध्ये लक्ष्मण वाघ (रा. विजयनगर, कल्याण, पूर्व मुंबई) याच्यासोबत ओळख झाली. वाघने गौतमला शिक्षक म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले होते. गौतमला गरज असल्याने त्याने होकार दिला. यानंतर वाघ याने गौतमला भालचंद्र श्रीपत निकुंभ (रा. सुभाषटेकडी, उल्हासनगर) यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यावर रक्कम जमा करायला लावली. गौतमने टप्प्याटप्प्याने ४ लाख २१ हजाराची रक्कम निकुंभच्या खात्यावर भरली. २५ मे २०१४ पर्यंत हा प्रकार सुरू होता. रक्कम जमा झाल्यानंतर दोघांनी गौतमशी संपर्क कमी केला. पैसे घेऊनही नोकरीचे काम होत नसल्याने गौतमने पैसे वापस मागितले. ही रक्कम देण्यास आरोपींनी टाळाटाळ केली. दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतर अखेर सोमवारी याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यासाठी ४० कोटींची मागणी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने गेल्या वर्षभरापासून विविध यंत्रणांद्वारे सेवा पुरविली आहे. टँकर, विहीर अधिग्रहण तसेच अन्य उपाययोजनांसाठी मार्चअखेर ६८ कोटी रुपये खर्च झाले. एप्रिल व मे महिन्यांसाठी आणखी ४० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.
जिल्ह्यात यंदा गंभीर दुष्काळ आहे. अगदी पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आज टँकरने हजारी पार केली असून १२ लाख नागरिकांना टँकर, खासगी विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने प्रशासनाकडे ६८ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. मार्च २०१६ अखेर ही रक्कम राज्य सरकारकडून प्राप्त झाली होती. मात्र, मे महिन्यात अधिक तीव्रता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यांत टँकर व विहीर अधिग्रहणासाठी २४ कोटी रुपये व मे महिन्यांत अंदाजे १६ कोटी असे ४० कोटी रुपये लागणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून जून महिन्यात समाधानकारक पाऊस होईपर्यंत आणखी निधीची आवश्यकता भासणार आहे. प्रसंगानुरुप हा प्रस्तावही सादर केला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवाकरामुळे खिसा होणार रिकामा

$
0
0


Dhananjay.Kulkarni
@timesgroup.com
औरंगाबाद ः सेवाकरावर अर्धा टक्का अधिभार लावण्यात आल्यामुळे बुधवारपासून विविध सेवा महागणार आहेत. औरंगाबादकरांवर त्याचा पडणारा भार असा असेल....

रेल्वेचे एसी भाडे
प्रथम श्रेणीची तिकिटांवर सध्या ४.५ टक्के सेवाकर आहे. तो ५ टक्के होईल. म्हणजे १००० रुपयांच्या तिकिटावर १५ रुपये वाढ होईल. औरंगाबादहून अजमेरला जाण्यासाठी एसीसाठी १,४९० रुपये व ५३ रुपये सेवाकर लावला जायचा. तो आता १,४९० व सेवाकर ६० ते ६५ रुपये होईल. औरंगाबादहून तिरुपतीला जाण्यासाठी एसीगाडीच्या तिकिटाला १,३३५ रुपये व ६५ रुपये सेवाकर असायचा. तो आता १,३३५ रुपये तिकिटदर व ७० ते ७५ रुपये सेवाकर भरावा लागेल.

विमा हप्ता
विमा हफ्त्यासाठी ०.५० टक्के जास्तीची रक्कम मोजावी लागेल. एलआयसीच्या पहिल्या वर्षीच्या हफ्त्यावर ३ टक्के, दुसऱ्या वर्षाच्या हफ्त्यावर १.५ टक्के सेवाकर होता. आता पहिल्या वर्षीच्या हफ्त्यावर ४ टक्के आणि दुसऱ्या वर्षी २.२५ टक्के कर द्यावा लागेल. याचा अर्थ एक हजार रुपये विमा हफ्ता असल्यास, पूर्वी १ हजार ३० रुपये भरावे लागायचे. आता १ हजार ४० ते ४५ रुपये लागतील.

हॉटेलिंग
हॉटेलमध्ये जेवनावर १०.५ टक्के सेवाकर लागेल. आधी व्हॅट आणि हॉटेलच्या सेवा अधिभारासह तुमचे एकूण बिल १०५० रुपये झाले असेल, तर १०५५ रुपये मोजावे लागत होते. आता १,००० रुपयांच्या बिलावर १०६५ रुपये मोजावे लागतील.

मोबाइल इंटरनेट
मोबाइलच्या बिलांवर आधी १४.०५ टक्के सेवाकर होता. तो आता १५ होईल समजा एका माणसाचे बिल १,००० रुपये असेल, तर ११४५ रुपये द्यावे लागत होते. आता १५ टक्के करामुळे ११५० रुपये द्यावे लागतील. हेच मोबाइल इंटरनेटचे बिल समजा १,००० रुपये येत असेल, तर १,१४५ रुपये द्यावे लागत होते. ते आता ११५०पर्यंत द्यावे लागेल.

करमणूक
तिकिटांचे भाव वाढणार असल्यामुळे चित्रपट पाहणे महाग होईल. सिनेमा पाहण्यासाठी समजा एका तिकिटासाठी सर्व करांसह २०० रुपये मोजावे लागत असतील, तर उद्यापासून २१० रुपये होऊ शकतात.

ब्युटी पार्लर, सलून
ब्युटी पार्लर-सलूनमध्ये मसाज, फेशियल, स्पा सर्वकाही महाग होईल. ही सेवा सुमारे १२.५ टक्क्यांनी महागणार आहे. समजा औरंगाबादमध्ये आधी ५०० रुपये मसाजसाठी लागत असतील, तर आता ५६५ रुपये लागतील. इतर सुविधांवर जे चार्ज असतील, त्यात सुमारे १२ टक्के वाढ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापुरात रोखला मुंबईचा भाजीपाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला वैजापूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर-मुंबई महामार्गावर दत्तवाडी शिवारात भाजीपाला व फळे विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांतील मालाची नासधूस करून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. शिऊर, गारज, परसोडा येथे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिले.
वैजापूर येथील येवला रस्त्यावर गुरुवारी सकाळी व्यापाऱ्यांनी भाजीमंडई भरवली होती. काही शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला पण वैजापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. जाधव, पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे यांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना शांत केले. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणवर होणाऱ्या भुसार मालाच्या उलाढालीवर संपामुळे विपरित परिणाम झाला. या संपाला हमाल मापाडी संघटनेनेसुद्धा पाठिंबा दिल्याने मोंढा मार्केटमध्ये पूर्णपणे शुकशुकाट होता. बाजार समितीमध्ये संपामुळे केवळ ५० ते ६० गोण्यांची आवक झाल्यची माहिती सूत्रांनी दिली. बाजार समितीच्या नागपूर-मुंबई महामार्गावरील कांदा मार्केटवरही संपाचा परिणाम झाला. कांदा मार्केटमध्ये केवळ ३०० कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. पण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव रोखले. त्यामुळे कांदा मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना हातावर हात धरून बसावे लागले. दरम्यान संपप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

खंडाळ्यात दवंडी
तालुक्यातील खंडाळा, नागमठाण व लाडगाव येथील गुरुवारचे आठवडी बाजार संपामुळे भरले नाहीत. खंडाळा ग्रामपंचायतीने बुधवारीच गावात दवंडी देऊन शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केल्याने खंडाळ्याच्या आठवडी बाजारात शुकशूकाट होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील भाज्यांचे दर आवक घटल्याने वाढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी संपाचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहारांवर गुरुवारी परिणाम झाला. भाजीपाल्याची आवक ३० टक्क्यांनी घटल्याने फळभाज्या व पालेभाज्या महागल्या. फळभाज्यांचे फक्त चार ट्रक आले, नेहमी ही संख्या ८ ते १० ट्रक असते. याशिवाय पळशी, सिल्लोड, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर नाशिक येथून येणाऱ्या फळभाज्यांची आवक निम्मी झाली.
आवक घटल्यामुळे दर वाढल्याचे भाजीपाला विक्रेते जर्नादन जाधव यांनी सांगितले. औरंगपुरा, शहागंज, टीव्ही सेंटर, कॅनॉट, पीरबाजार, शिवाजीनगर या परिसरातील भाजीपाला मार्केटवर संपाचा परिणाम जाणवला. या भागात भाजीपाल्यांच्या दुकानांची संख्याच घटली होती. कमी आवक असल्याने दुकानांत माल कमी आहे, अशी माहिती पीरबाजारमधील विक्रेते सुरेश गायकवाड यांनी सांगितले. टरबू‌ज, खरबूज, केळी, मोसंबी, संत्री यासारख्या फळांची आवक गुरुवारी घटली, असे फळविक्रेते युसूफ बागवान यांनी सांगितले. रमजान महिन्यामुळे चार-पाच दिवसांपासून आवक वाढली होती.

जाधवमंडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ३० टक्के कमी भाजीपाला आला. शेतकरी संपाचा परिणाम जाणवला. संप सुरू राहिला तर आवकवर आणखी परिणाम होऊ शकतो.
-विजय शिरसाट, सचिव, जाधवमंडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’वरून कानउघाडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जलयुक्त शिवार अभियानाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. प्रत्येक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केवळ कोट्यवधी रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात येते, मात्र कोणत्या कामावर नेमका किती खर्च झाला, कंत्राट कुणाला दिले याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही. बैठकीचे काम दहा मिनिटे थांबवतो, पण माहिती द्या, असे म्हणत पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व इतर आमदारांनीही जलयुक्त शिवार अभियान, मनरेगाच्या कामांवरून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
पैठण तालुक्यातील सुमारे ८० शेतकऱ्यांची सिंचन विहिरींची देयके अद्यापही अदा न केल्यामुळे रोहयो उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांनाही फटकारले. यावेळी सापन यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची सुरुवातच जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या आढाव्याने झाली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी २०१५-१६मध्ये जलयुक्त शिवार अभियानासाठी तीन टप्प्यात ७२ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. यावर हरिभाऊ बागडे यांनी, आम्हाला खर्चाची माहिती नको तर कोणत्या कामावर किती खर्च केला याची माहिती द्या, असे सांगितले. यानंतर आमदार इम्तिया‌ज जलील, आमदार अतुल सावे यांनीही खर्चाची माहिती मागितली. यावर रामदास कदम यांनी, दहा मिनिट बैठक थांबवतो. खर्चाची तसेच कोणत्या कामावर किती खर्च झाला, गावनिहाय कामांची संख्या, टेंडर कुणाकडे व कितीचे दिले यासंदर्भात तत्काळ माहिती द्या, असे सांगताच सभागृहात शांतता पसरली. पडवळ यांना काय बोलावे ते सुचेना. यावेळी त्यांनी, तालुका अधिकाऱ्यांकडे माहिती आहे. मिळवून देतो, असे सांगितले. यावर ‘दोन दिवसांत संपूर्ण अहवाल घेऊन मुंबईत या,’ असे पालकमंत्र्यांनी सांगितल्यावर प्रकरणावर तूर्त पडदा पडला.
बैठकीसाठी आमदार सावे, इम्तियाज जलील, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, प्रशांत बंब यांची उपस्थिती होती. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, महापालिका आयुक्त डॉ. डी. एम. मुगळीकर, पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळी अनुदान वाटपामध्ये झालेल्या अनियमिततेमध्ये आतापर्यंत १ कोटी ४२ लाख रुपयांपैकी, ८७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली असून, अद्यापही ५४ लाख रुपये वसूल होणे शिल्लक असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली. यावर गुन्हेगारांना पाठीशी घालणे हा गुन्हाच असल्याचे सांगत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक आरती सिंह यांना दिले.

उपजिल्हाधिकारी सानप यांना झापले
रोहयो उपजिल्हाधिकारी संगीता सानप यांना कामाच्या पद्धतीमुळे व त्यांच्या तक्रारींवरून पालकमंत्री रामदास कदम यांनी झापले. पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांनी ‘मतदारसंघातील तीन ग्रामपंचायतींमधील सिंचन विहिरींच्या कामांचे पाच वर्षांपासून १ कोटी ७५ लाख रुपये देयके अदा केली नाहीत. दाभरूळ या गावातील कामांचे रेकॉर्ड जळाल्याचे सांगत सानप या टाळाटाळ करतात, मात्र इतर गावांचे काय,’ असा प्रश्न केला. यावर सानप यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. सानप यांच्या कामावर नाराज असलेले आमदार प्रशांत बंब म्हणाले की, सानप यांच्याविरुद्ध खूप तक्रारी आहेत. त्या नेहमी मिटिंगला गैरहजर राहतात. जाब विचारला, तर त्या भावनिक उत्तर देतात. यावर, ‘मनरेगासाठी पैसा कमी नाही. अधिकारीच सुस्त आहेत त्यामुळे सरकार बदनाम होत अाहे,’ असे बागडे यांनी सांगितले.

अन् अब्दुल सत्तार यांनी बैठक सोडली
पावसाळ्यात विविध गावांमधील डीपी नादुरुस्त होत असल्याने गावांमध्ये अंधार पसरतो. अतिरिक्त डीपी घेण्यासाठी दोन कोटी रुपये देण्याची मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. यावर बागडे यांनी यंदा लोडश‌ेडिंग कमी असल्याचे सांगितले, तर कदम यांनी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगताच आमदार सत्तार, ‘आम्हाला बोलायचाही अधिकार नाही,’ असे म्हणत बैठक सोडून निघून गेले. यानंतर कदम यांना या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले,‘शिस्त पाळलीच पाहिजे. सर्वाधिक सत्तारभाईच बोलतात. मी दादागिरी चालू देणार नाही. डीपीसाठी दोन कोटी रुपये मंजूर केले अाहेत.’

कोल्हापुरी बंधाऱ्याप्रकरणाची चौकशी
कोल्हापुरी बंधाऱ्याला दरवाजा बसवण्याऐवजी सहा फूट भिंत बांधण्याचा प्रस्तावाविषयी ‌जलसंधारण स्थानिक स्तर; तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली. स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याऐवजी प्रस्ताव मंजुरीसाठी नाशिकला पाठवला. यावर रामदास कदम भडकले. मराठवाड्यासाठी वेगळा नियम आहे काय? मोठ्या बंधाऱ्यांचे ठिक आहे, मात्र लहान बंधाऱ्यांचे काय? नियम कोण बनवतो तुम्ही का आम्ही, असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याची तत्काळ चौकशी सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉस्पिटल नव्हे ‘ओपीडी’च

$
0
0

हॉस्पिटल नव्हे ‘ओपीडी’च

बाह्यरुग्ण विभागासह अपघात विभाग व प्रसुतीगृहाला मुहूर्त लागण्याचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका महिन्यात चिकलठाणा परिसरातील ‘मिनी घाटी’ हॉस्पिटल सुरू करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर हालचाल सुरू झाली असली तरी या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांयुक्त हॉस्पिटल नव्हे तर सध्यातरी केवळ ‘ओपीडी’ सुरू होण्याचे संकेत आहेत. अजूनही डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची सुमारे ३०० पदे रिक्त आहेतच; शिवाय २०० खाटा, सिटीस्कॅन, एमआरआय, सुसज्ज शस्त्रक्रियागृहांसह विविध वैद्यकीय साहित्य, फर्निचर उपलब्ध होणे बाकीच आहे. क्ष-किरण उपकरणे वापरण्यासाठी लागणारी ‘एईआरबी’ची परवानगीही मिळालेली नाही. त्यामुळे इथे ‘ओपीडी’च्या सुविधांशिवाय फारशा वैद्यकीय सेवा मिळण्याची शक्यता सध्यातरी नसल्याचे चित्र आहे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय पहिल्यापासून कार्यरत आहे आणि त्याला औरंगाबाद जिल्हा हा पहिल्यापासूनच अपवाद राहिला आहे. जिल्हा रुग्णालय कार्यरत नसल्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (घाटी) वर्षानुवर्षे ताण आहे आणि हा ताण दिवसागणिक वाढतोच आहे. त्यातच शहरातील महापालिकेच्या २७ पेक्षा जास्त आरोग्य केंद्रांमध्ये व ५ रुग्णालयांमध्ये अपुऱ्या आरोग्य सेवा मिळत असल्याने रुग्णसेवेचा सगळा भार पुन्हा एकट्या घाटीवर येत आहे. तसेच जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आणि ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमधूनदेखील दररोज मोठ्या संख्येने रुग्ण घाटीला पाठविण्यात येतात. या स्थितीमुळे घाटीवर दिवसेंदिवस रुग्णभार वाढत आहे आणि त्यामुळेच निदान उशिरा का होईना शहराध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी दीर्घ मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर २०११ मध्ये २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला दीर्घ प्रतिक्षेनंतर मान्यता मिळाली. त्यासाठी ३८ कोटी ३१ लाखांचा निधीदेखील मंजूर झाला व चिकलठाणा परिसरात हे रुग्णालय उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात रुग्णालयाचे काम सुरू होण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली. त्यानंतरही रुग्णालयाचे काम २.६७ कोटींसाठी कित्येक महिने रखडले. अर्थात, २ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर करुन कित्येक महिने लोटले असले तरी अद्याप रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. आताशी कुठे एक्स-रे मशीन व इतर काही मोजके वैद्यकीय साहित्य रुग्णालयामध्ये उपलब्ध झाले आहे. मात्र अजूनही रुग्णालयासाठी अत्यावश्यक असलेल्या २०० खाटा उपलब्ध होणे बाकी आहे. तसेच सिटी स्कॅन, व्हेंटिलेटर यासारखी अतिशय महत्वाची उपकरणे, शस्त्रक्रियागृहाची उपकरणे-साहित्य, प्रसुतीगृह-अतिदक्षता कक्षाची उपकरणे-साहित्यदेखील उपलब्ध होणे बाकी आहे. केवळ जमेची बाब म्हणजे अनेक महिन्यांपासून रखडलेली सेंट्रल ऑक्सिजन लाईन, सेंट्रल सक्शन लाईनचे काम एकदाचे पूर्ण झाले आहे. तसेच रुग्णालयाचे बांधकामही पूर्ण झाले आहे.

१२ कोटींच्या उपकरणांना मुहूर्त कधी?

रुग्णालयासाठी १० कोटी २१ लाखांची मोठी उपकरणे येणार आहेत. यामध्ये एक्स-रे मशीन, सिटी स्कॅन मशीन, ओटी साहित्य, रुग्णालयाचे फर्निचर आदींचा समावेश आहे. त्याशिवाय ९३ लाखांची किरकोळ खरेदी, तर ९० लाख ६३ हजारांची कार्यालयीन फर्निचरची खरेदी अपेक्षित आहे. मात्र यातील अनेक उपकरणे-साहित्याला मुहूर्त लागलेला नाही.

३०० पदनियुक्तीचे मोठे आव्हान

या रुग्णालयासाठी वर्ग तीन व चारची २७८ पदे असणार आहेत, तर ४४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्ग एक व दोनची पदे असणार आहे. यापैकी २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदांची नियुक्ती यापूर्वीच झाली आहे, तर २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांची; म्हणजेच एकूण ३०० पदांची नियुक्ती होणे बाकी आहे आणि हेच मोठे आव्हान आहे.

सिव्हिल सर्जन ‘उवाच’…

पालकमंत्र्यांच्या आदेशाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड म्हणाले, महिन्याभरात हॉस्पिटलमध्ये ओपीडी, अपघात विभाग व प्रसुतीकक्ष सुरू करणार आहे. त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ आदी तज्ज्ञांची नियुक्ती केली जाईल. नवीन एक्स-रे मशीन आहेच व एक सोनोग्राफी मशीनही दुसऱ्या रुग्णालयांतून उपलब्ध केली जाईल. तोपर्यंत ‘अॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड’ची (एईआरबी) परवानगी मिळेल व लवकरच सर्व नियुत्या होऊन सर्व सेवा-सुविधा सुरू होतील, असेही डॉ. गायकवाड म्हणाले.

महिला रुग्णालय, मनोरुग्णालय कधी?

‘मिनी घाटी’बाबत एक पाऊल पुढे पडले असले तरी २०० खाटांच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाला अजूनही कुठलाच मुहूर्त लागलेला नाही. २०० खाटांचे महिला रुग्णालय मंजूर होऊन साडेतीन वर्षे लोटली आहेत; परंतु रुग्णालयाच्या जागेचा शोध संपलेला नाही. अनेक जागा आरोग्य विभागाने विविध कारणे देत नामंजूर केल्या. प्रादेशिक मनोरुग्णालयदेखील जिल्ह्याला मंजूर असताना मनोरुग्णालयाचा विषय तर बासनात गुंडाळून ठेवल्यासारखा आहे. या संदर्भात, ‘जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी (२ जून) भेट घेऊन महिला रुग्णालयाच्या जागेबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल’, असेही डॉ. गायकवाड यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात संप अयशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
शेतीमालाला हमी भाव, स्वामीनाथन आयोगाने सूचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी व संपूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फुलंब्री तालुक्यात परिणाम जाणवला नाही. तालुक्यातील दूध संकलन गुरुवारी नेहमीप्रमाणे झाले.
पहाटे साडेचार पासूनच औरंगाबाद शहरातील भाजी मंडईकडे वाहने रवाना झाली. संध्याकाळचे देखील दूध संकलन व्यवस्थित झाले. दिवसभर भाजीपाला व फळांची दुकाने राेजच्या प्रमाण सुरू हाेते. ग्राहक व विक्रेत्यांचा या संपाचा कुठलाही परिणाम जाणवला नाही.
तालुक्यातील पीरबावडा व निधोना येथील गुरुवारचा अाठवडी बाजार व गणाेरी फाटा येथील हमरस्त्यावर भरणारी भाजी मंडई नेहमीप्रमाणे भरलेली हाेती. या संपाला पाठिंबा म्हणून येथील सर्व कृषी सेवा केंद्र दुकाने बंद हाेती. बाबरा गावातील देखील सर्व दुकाने बंद ठेऊन संपाला पाठिंबा दर्शविला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अद्याप पर्यंत खरेदी-विक्रीचा व्यवहारच सुरू झाला नसल्याने तिचा संपाशी संबंध येत नाही. तालुक्यात शेतकरी संघटना कुठेही कार्यरत नसल्याने हा संप तालुक्यात दिसला नाही. येथील टी-पाॅइंट, बसस्थानकासमाेर, पाेलिस स्टेशन परिसर व शहरातील मध्यवस्तीत भाजी मंडईत फळ व भाज्यांची विक्री सुरू हाेती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुवर्णपदकासाठी निधी सुपूर्द

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एमएस्सी (जीवरसायनशास्त्र) विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला ‘डॉ. सीताराम पवार’ सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. एस. एस. पवार फाउंडेशनने ५ लाख ७५ हजारांचा निधी कुलगुरुंकडे सोपवला आहे.
जीवरसायनशास्त्र विभागातील माजी विभागप्रमुख डॉ. सीताराम साधू पवार यांच्या डॉ. एस. एस. पवार फाऊंडेशनच्या वतीने पाच लाख ७५ हजारांचा निधी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. नंदकुमार राठी, माजी वित्त व लेखाधिकारी शंकर चव्हाण, उपकुलसचिव संजय कवडे आदींची उपस्थिती होती. या निधीतून एमएस्सी (बायोकेमेस्ट्री) या विषयात विद्यापीठात प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याला ‘सुवर्णपदक’ देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. चोपडे यांनी दिली. डॉ. पाटील १९९७मध्ये निवृत्त झाले असून, सध्या पुण्यात स्थायिक आहेत.

विद्यापीठामुळेच घडलो
५० वर्षांपूर्वी तत्कालीन कुलगुरू डॉ. एन. आर. तावडे यांच्या कार्यकाळात रसायनशास्त्र विभागात रुजू झालो होतो. या विद्यापीठाने नावलौकिक मिळवून दिला. माझ्या मार्गदर्शनाखाली २५ विद्यार्थ्यांनी पीएचडी प्राप्त केली. पुण्यात स्थायिक झालो तरी विद्यापीठाशी असलेली नाळ कायम आहे. गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी निधी देत आहे, असे डॉ. एस. एस. पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images