Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

राइट टू एज्युकेशनवर भर

$
0
0

राइट टू एज्युकेशनवर भर

ravindra.taksal@timesgroup.com

Tweet : @rtaksalMT,

बालकांच्या हक्कांचे रक्षण करणे हाच आयोगाचा मुख्य उद्देश असून त्यासाठी विविध उपक्रम, उपाययोजना आखल्या जातात. सध्या शाळा प्रवेशाचे दिवस असून आयोगाच्या माध्यमातून ‘राइट टू एज्युकेशन’ची योग्य अंमलबजावणीवर भर दिला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी मटाशी संवाद साधताना दिली.
- आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना बालकांचे कोणते प्रश्न प्रामुख्याने भेडसावतात ? प्राधान्य क्रम काही ठरविला आहे का?
- प्रत्येक बालकाला जन्मजात जगण्याचा, विकासाचा हक्क आहे. त्यासोबतच शिक्षणाचा आणि सामाजिक सुरक्षा मिळणे हा सुद्धा त्याचा हक्क आहे. बालकांच्या हक्कांचे सरंक्षण करणे हे आयोगाचे कर्तव्य आहे व त्यादृष्टीने आयोग काम करते. बालकांच्या दृष्टीने अनेक प्रश्न आहेत, पण सध्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. कोणताही बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही, यासाठी आयोग दक्ष राहणार आहे. राइट टू एज्युकेशनची अंमलबजावणी अधिक योग्यरितीने होण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
- अन्य कोणत्या प्रश्नांकडे आयोग प्राधान्याने लक्ष देणार ?
- बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे, हेच आयोगाचे प्रमुख काम असल्याने प्रत्येक प्रश्नांचा विचार हा गांभीर्यानेच केला जातो. त्यांची तातडीने कशी सोडवणूक होईल, यावर भर दिला जातो. लोकांना, बालकांना आयोगापर्यंत सहज पोचता यावे, संपर्क करता यावा, यासाठी खास व्यवस्था उभारली जात आहे. जे. जे. अॅक्टचा प्रभावी अमंलबजावणी करण्यावर अधिक लक्ष दिले जाईल. पुढील आठवड्यात आयोगाची बैठक होईल. तसेच राज्यातील सर्व बाल कल्याण समित्या अधिक सक्षम करण्यावर भर आहे. बालकांच्या सर्वांगिण विकासाला आमचे प्राधान्य आहे.
- बाल कामगारांच्या प्रश्नाविषयी आयोगाची भूमिका काय आहे?
- बाल कामगार ही एक गंभीर समस्या आहे. बाल वयात त्याला कामासाठी प्रवृत्त केल्याने तो (बालक) शिक्षणाच्या संधी, बालसुलभ खेळ व करमणूक यापासून वंचित राहतो. त्याची पिळवणूक केली जाते. बाल कामगार समस्याचे निवारण करण्यासाठी संबंधित विभागासह आयोग प्रयत्नशील आहे. यासाठी अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई हवी. त्यादृष्टीने निश्चितच अधिक प्रयत्न करू.
- बालगृहाच्या अनुदानाचा प्रश्न अद्याप सुटला नाही.
- संस्थांना सहायक अनुदान महिला व बाल कल्याण विभागामार्फत दिले जाते. थकित अनुदान असेल तर त्याबाबत संबंधित विभागामार्फतच कार्यवाही होत असते. संस्थेत दाखल प्रत्येक बालकांचे संगोपन, संरक्षण योग्य पद्धतीने व्हावे, याची दक्षता घेण्याचे काम बाल कल्याण समितीच्या माध्यमातून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिनाभरात चिकलठाण्यातील मिनी घाटी होणार सुरू

$
0
0

महिनाभरात चिकलठाण्यातील मिनी घाटी होणार सुरू

पालकमंत्र्यांची घोषणा; शिवाजीनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

चिकलठाणा येथे बांधण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाचे (मिनी घाटी) उद्घाटन येत्या महिनाभरात करून हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी शिवाजीनगरातील कार्यक्रमात केली.

शिवाजीनगर येथे केंद्र सरकारच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. यावेळी महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृह नेते गजानन मनगटे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, शिवाजीनगर वॉर्डचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ, महापालिकेचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. जंजाळ यांच्या प्रयत्नातून शिवाजीनगरात आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे.

पालकमंत्री कदम यांनी जंजाळ यांच्या कामाची स्तुती केली. ते नागरिकांना उद्देशून म्हणाले, तुमचा नगरसेवक खूप हुशार आहे. औरंगाबाद शहरासाठी सात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. त्यापैकी शिवाजीनगरातील आरोग्य केंद्राचे भूमीपूजन सर्वप्रथम होत आहे. आमदारांनी या वॉर्डाच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जेथे आमदार कमी पडतील तेथे पालकमंत्री म्हणून आपण मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार अतुल सावे यांनी आपल्या भाषणात चिकलठाणा येथे बांधण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाचा विषय मांडला. हे रुग्णालय बांधून तयार आहे, त्याचे उद्घाटन करून ते सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. सावे यांच्या मागणीचा संदर्भ घेत पालकमंत्री म्हणाले, ‘आरोग्यमंत्री आमचे शिवसेनेचेच आहेत. चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालय लवकर सुरू करा, असे आदेश शिवसेनेचा नेता म्हणून मी त्यांना दिले आहेत. महिनाभरात त्याचे उद्घाटन केले जाईल. हे रुग्णालय सुरू झाल्यावर घाटी रुग्णालयावरचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, महापौर भगवान घडमोडे यांची भाषणे झाली. राजेंद्र जंजाळ यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला शिवाजीनगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या मंत्र्यांना वेळेवर यायला सांगा
आमदार अतुल सावे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या वक्तशिरपणाचा उल्लेख आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता होता, त्यामुळे मी बरोबर साडेदहा वाजता आलो, पण पालकमंत्री त्या अगोदर आलेले होते. सावेंनी केलेल्या या उल्लेखाचा संदर्भ देत कदम म्हणाले, मंत्र्यांनी कार्यक्रमाला वेळेवरच गेले पाहिजे. कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांना वाट पहायला लावू नये. भाजपच्या मंत्र्यांना कार्यक्रमाला वेळेवर यायला सांगा, असा टोमणा देखील त्यांनी सावेंना उद्देशून हाणला तेव्हा हशा पिकला.
निधी २०१३ - १४ या वर्षाचा
भूमीपूजन करण्यात आलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने २०१३ - १४ यावर्षीच निधी दिला होता, पण काम सुरू झाले नव्हते. जनतेवर अन्याय करण्याचे कामच महापालिकेने केले आहे. मुगळीकर आयुक्त म्हणून आले नसते तर आणखीन किती वर्ष हे काम सुरू झाले नसते हे सांगता येणार नाही. याचा अर्थ पूर्वीचे आयुक्त नालायक होते असे मला म्हणायचे नाही, पण सझनेवाले को इशारा काफी होता है, असे रामदास कदम म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवर ‘जैसे थे’ स्थिती ठेवा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
बीड बायपासवर रस्त्यालगत असलेल्या याचिकाकर्त्यांच्या मालमत्तांबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्या. संगीतराव पाटील यांनी दिला. बीड बायपास रोडच्या बाजूला असलेली बांधकामे अनधिकृत असल्याने ती २४ तासांत काढून घेण्यासंदर्भात औरंगाबाद महापालिकेने मालमत्ताधारकांना ३१ मे २०१७ रोजी नोटीस बजावल्या होत्या.
पालिकेच्या नोटीसला अब्दुल वहाब अब्दुल वली व इतर २३ मालमत्ताधारकांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. प्रत्येक याचिकाकर्त्याच्या याचिकेच्या अनुषंगाने स्वतंत्र शपथपत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. सध्या बीड बायपास रस्त्याची रुंदी २०० फूट करण्यासाठी महापालिकेने मालमत्ताधारकांना १५ मे २०१७ रोजी नोटीस बजावून बांधकामांच्या वैधतेबाबत पुरावे मागितले होते. मालमत्ताधारकांनी ते संपूर्ण पुरावे २९ मे २०१७ रोजी सादर केले. पालिकेने त्यावर सुनावणी घेऊन सविस्तर आदेश देणे आवश्यक होते. मालमत्ताधारकांचा खुलासा असमाधनकारक आहे. त्यामुळे रस्त्यालगतचे बाधित बांधकाम २४ तासांत काढून घ्यावे, असा एका ओळीचा आदेश पालिका आयुक्तांनी दिला. याचिकाकर्त्यांतर्फे देवदत्त पालोदकर, व्ही. जे. सपकाळ, मुरली कराड, महेश देशमुख, आबा शिंदे यांनी काम पाहिले. पालिकेतर्फे आनंद भंडारी यांनी काम पाहिले. या याचिकांची सुनावणी ७ जून रोजी होणार आहे.

आदेश नैसर्गिक न्यायाविरुद्ध
पालिका आयुक्तांचा आदेश नैसर्गिक न्यायतत्वांच्या विरुद्ध आहे. त्यांनी मालमत्ताधारकांच्या खुलाशाचा विचार केला नाही. याचिकाकर्त्यांचे बांधकाम वैध असून, अद्याप भूसंपादन झालेले नाही. याचिकाकर्त्यांचा विकास कामास विरोध नाही, मात्र योग्य तो मोबदला देऊन भूसंपादन करावे व त्यानंतर रस्ता रुंदीकरण करावे, अशी विनंती याचिकांमध्ये करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर राहणाऱ्या तलाठ्यांची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बहुतांश गावांमध्ये तलाठ्यांचे काम त्यांचे नातेवाईक किंवा त्यांनी कामाला ठेवलेले इतर कर्मचारी (‌झिरो तलाठी) करत अाहेत. त्यामुळे नोंदी घेण्याच्या कामामध्ये चुका होतात. अशा झिरो तलाठी कामावर ठेवणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
‌जिल्हा नियोजन समितीमध्ये आमदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील अनंदपूर सजाच्या तलाठ्याचे काम त्याचा भाऊ करत असल्याची माहिती दिली. अशीच स्थिती अनेक गावांमध्ये असून, मूळ तलाठ्यांनी विविध कामे करण्यासाठी मुलांना ठेवले अाहे. त्यांन झिरो तलाठी असे म्हणतात. हे मुले उलट सुलट नोंदी घेतात. गेल्यावर्षी दुष्काळी अनुदानात पैठण तालुक्यात अशा तलाठ्यांमुळेच गोंधळ झाल्याचेही भुमरे यांनी बैठकीत सांगितले. याच मुद्द्यावर आमदार अब्दुल सत्तार यांनीही, सिल्लोड तालुक्यातील १७ गावांमधील शेतकऱ्यांना केवळ तलाठ्यांच्या चुकांमुळे अनुदानापासून वंचित रहावे लागले. शासन त्यांना अनुदान देणार का, असा प्रश्न उपस्थित केला. झिरो तलाठी या प्रकरणाची तत्काळ लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी कामावर गैरहजर राहणारे तलाठी; तसेच तलाठ्यांचे काम करणारे झिरो तलाठ्यांची तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. गेल्यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदानात मोठी अनियमितता आढळली होती, नोंदी घेण्यात तलाठ्यांचा महत्त्वाची भूमिका होती.

चुकीच्या नोंदींचा फटका
जमीन नसताना अनुदान मिळणे, कोरडवाहू जमिनीवर फळबागांचे अनुदान, जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारामध्ये खरेदीदाराचे नाव सातबाऱ्यावर न लागल्यामुळे जुन्याच शेतीमालकाच्या नावावर अनुदान टाकणे, एकाच शेतकऱ्यांच्या नावावर दोनदा अनुदान टाकण्यात आल्याचे प्रकार घडले होते. सातबारावरील नोंदींनुसार अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. सातबारावर चुकीच्या नोंदी असल्याने अनुदानाच्या वापटापत गोंधळ झाल्याचे समोर आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाभरात चिकलठाण्यातील मिनी घाटी होणार सुरू

$
0
0

महिनाभरात चिकलठाण्यातील मिनी घाटी होणार सुरू

पालकमंत्र्यांची घोषणा; शिवाजीनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

चिकलठाणा येथे बांधण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाचे (मिनी घाटी) उद्घाटन येत्या महिनाभरात करून हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी शिवाजीनगरातील कार्यक्रमात केली.

शिवाजीनगर येथे केंद्र सरकारच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते. यावेळी महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृह नेते गजानन मनगटे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, शिवाजीनगर वॉर्डचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ, महापालिकेचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. जंजाळ यांच्या प्रयत्नातून शिवाजीनगरात आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे.

पालकमंत्री कदम यांनी जंजाळ यांच्या कामाची स्तुती केली. ते नागरिकांना उद्देशून म्हणाले, तुमचा नगरसेवक खूप हुशार आहे. औरंगाबाद शहरासाठी सात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. त्यापैकी शिवाजीनगरातील आरोग्य केंद्राचे भूमीपूजन सर्वप्रथम होत आहे. आमदारांनी या वॉर्डाच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जेथे आमदार कमी पडतील तेथे पालकमंत्री म्हणून आपण मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार अतुल सावे यांनी आपल्या भाषणात चिकलठाणा येथे बांधण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाचा विषय मांडला. हे रुग्णालय बांधून तयार आहे, त्याचे उद्घाटन करून ते सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. सावे यांच्या मागणीचा संदर्भ घेत पालकमंत्री म्हणाले, ‘आरोग्यमंत्री आमचे शिवसेनेचेच आहेत. चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालय लवकर सुरू करा, असे आदेश शिवसेनेचा नेता म्हणून मी त्यांना दिले आहेत. महिनाभरात त्याचे उद्घाटन केले जाईल. हे रुग्णालय सुरू झाल्यावर घाटी रुग्णालयावरचा ताण कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, महापौर भगवान घडमोडे यांची भाषणे झाली. राजेंद्र जंजाळ यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला शिवाजीनगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

भाजपच्या मंत्र्यांना वेळेवर यायला सांगा

आमदार अतुल सावे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या वक्तशिरपणाचा उल्लेख आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता होता, त्यामुळे मी बरोबर साडेदहा वाजता आलो, पण पालकमंत्री त्या अगोदर आलेले होते. सावेंनी केलेल्या या उल्लेखाचा संदर्भ देत कदम म्हणाले, मंत्र्यांनी कार्यक्रमाला वेळेवरच गेले पाहिजे. कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांना वाट पहायला लावू नये. भाजपच्या मंत्र्यांना कार्यक्रमाला वेळेवर यायला सांगा, असा टोमणा देखील त्यांनी सावेंना उद्देशून हाणला तेव्हा हशा पिकला.

निधी २०१३ - १४ या वर्षाचा


भूमीपूजन करण्यात आलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाने २०१३ - १४ यावर्षीच निधी दिला होता, पण काम सुरू झाले नव्हते. जनतेवर अन्याय करण्याचे कामच महापालिकेने केले आहे. मुगळीकर आयुक्त म्हणून आले नसते तर आणखीन किती वर्ष हे काम सुरू झाले नसते हे सांगता येणार नाही. याचा अर्थ पूर्वीचे आयुक्त नालायक होते असे मला म्हणायचे नाही, पण सझनेवाले को इशारा काफी होता है, असे रामदास कदम म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. परिणामी, पैठणसह तालुक्यात भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले. दूध पुरवठ्यावर आंदोलनाचा परिणाम दिसून आला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपळवाडी येथील आठवडीबाजार बंद पाडला.
शेतकरी संपाच्या एक दिवस अगोदर अन्नदाता शेतकरी संघटनेतर्फे संपूर्ण तालुक्यात पत्रके वाटप करून संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. संघटनेच्या आवाहनाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी, बहुतांशी शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणला नाही. अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलन करत शेतमाल शहराकडे जाऊ दिला नाही.
पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील महानंद दूध संकलन केंद्रावर गुरुवारी सकाळी दूध घेऊन आलेल्या वाहनातील दूध अन्नदाता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतून दिले. पिंपळवाडी येथील आठवडी बाजार बंद पाडला. शहरातील भाजीमंडई येथे घोषणाबाजी करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजीमंडई बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरातील भाजीमंडई काही काळ बंद राहिली. परिणामी, भाजीमंडई येथे दर दुप्पट झाले. ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारा दूधपुरवठा नेहमीप्रमाणे होवू शकला नाही.

संपाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आंदोलन अधिक तीव्र करणार असून भाजीपाला व दुधाचे एकही वाहन शहराकडे जाऊ नये यासाठी तालुक्यातील प्रत्येक रस्त्यावर कार्यकर्ते सकाळी पाच वाजल्यापासून तैनात राहणार आहेत.
माऊली मुळे, तालुकाध्यक्ष, अन्नदाता शेतकरी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहल्याबाई होळकर जयंतीनिमित्त मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या सभागृहात वाघ्या मुरळी, डफ स्पर्धा झाली.
या सांस्कृतिक कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाठ, डॉ. सुभाष माने, जय मल्हार सेनेचे अध्यक्ष लहुजी शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चांगुलपाई, लता शेवाळे, हौसाबाई काटकर, शेषराव जोशी यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर शहरात मिरवणूक काढण्यात आली. रथावर अहल्यादेवी होळकर यांची प्रतिमा ठेऊन अभिवादन करण्यात आले. डफ वादक, पिवळे झेंडे, धनगरी नृत्य यासह मिरवणुकीत समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. चव्हाण सभागृह, रॉक्सी टॉकीज, पैठणगेट, क्रांती चौक, उस्मानपुरा, पद्मपुरामार्गे मिरवणूक कोकणवाडी येथील अहल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचली. येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळी, डफ स्पर्धा झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लहुजी शेवाळे, गयाबाई साबळे, भानुदास कोरे, श्रीहरी पाटील, तुळशीदास खटके, दत्तू वाघमोडे, बळीराम पोले, आर. जी. देठे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६ हजार लिटरची दूध संकलनात घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे अध्यक्ष असलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला शेतकरी संपाचा झटका पहिल्याच दिवशी बसला. गुरुवारी सकाळच्या सत्रात सुमारे १६ हजार लिटर दुधाचे संकलन कमी झाले. यात प्रामुख्याने पैठण, गंगापूर व वैजापूर तालुक्यातून दूध कमी आल्याचे सूत्रांनी सांगितले.
देवगिरी महानंद या नावाने उत्पादने विकणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या ५५० दूध उत्पादक सहकारी संस्था सभासद असून त्यात सुमारे ३५ हजाराहून अधिक दूध उत्पादक शेतकरी नियमित दूध देतात. दररोज सरासरी ८९ हजार लिटरपेक्षा जास्त दूध संकलन होते. पण, शेतकरी संपाचा गुरुवारी परिणाम झाल्याचे दिसून आले. संघातर्फे सकाळ व संध्याकाळ असे दोन सत्रात दूध संकलन केले जाते. दररोज सकाळी सरासरी ५६ हजार लिटर दूध संकलन होते, त्यापैकी १६ हजार लिटर दूध कमी आले. अहमदनगर जिल्ह्या लगतच्या वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यातून दूध संकलनावर परिणाम झाल्याचे संघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळच्या सत्रातही संकलन कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगर व इतर जिल्ह्यातून शहरात येणाऱ्या दूध पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पण, याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ तोंडदेखल्या नालेसफाईवर पालकमंत्री नाराज

$
0
0

तोंडदेखल्या नालेसफाईवर पालकमंत्री नाराज

शहर अभियंत्यांची कानउघाडणी, आयुक्तांना केली सूचना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

तोंडदेखल्या नालेसफाईवर पालकमंत्री रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी शहर अभियंता सिकंदर अली यांची कानउघाडणी केली तर आयु्क्त डी. एम. मुगळीकर यांना सूचना केल्या. पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसह आवश्यक ती सर्व कामे योग्यप्रकारे करा, असे ते म्हणाले.

रामदास कदम जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी गुरुवारी शहरात आले होते. हर्सूल तलावाच्या परिसरातील जांभुळबनाला भेट दिल्यावर त्यांनी शहरातील नाला सफाईच्या कामाची पाहणी केली. सर्वप्रथम त्यांनी किलेअर्क येथील बारूदगर नाला पाहिला, त्यानंतर प्रतापनगरचा नाला पाहून ते चाणक्यपुरीतून वाहणाऱ्या नाल्याजवळ आले. महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या नाला सफाईच्या कामाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. नाल्यांमध्ये गाळ, माती तशीच असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी याबद्दल जाब विचारला. पावसाळा सुरू होत असल्यामुळे स्वच्छतेची आवश्यक ती कामे लवकर करा. नागरिकांना त्रास होऊ देऊ नका, अशी सूचना त्यांनी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना केली.

जांभुळबनाच्या कार्यक्रमाच्या वेळी नगरसेविका ज्योती अभंग यांनी कदम यांच्याकडे पाण्याची समस्या मांडली. वॉर्डाच्या जवळच जलशुद्धीकरण केंद्र आहे, पण या केंद्रापासून अद्याप जलवाहिनी टाकण्यात आली नाही. या संदर्भात अधिकारी टाळाटाळ करतात अशी तक्रार त्यांनी केली. अभंग यांच्या तक्रारीची दखल घेवून कदम यांनी शहर अभियंता सिकंदर अली यांना या कामाबद्दल जाब विचारला. लवकरच जलवाहनी टाकण्याचे काम करतो, असे सिकंदर अली म्हणाले. त्यावर पालकमंत्र्यांनी आतापर्यंत काम का केले नाही, असे विचारले. सर्वेक्षण करावे लागेल असे उत्तर सिकंदर अली यांनी दिले. या उत्तरामुळे कदम संतापले. सिकंदर अली यांना उद्देशून ते म्हणाले, चापलुसी बंद करा. जलवाहिनी टाकण्याचे काम केव्हा करणार ते सांगा. तात्काळ हे काम झाले पाहिजे असे आदेश त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवी प्रवेशसाठी लगबग सुरू

$
0
0

पदवी प्रवेशसाठी लगबग सुरू

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवीस्तरावरील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे विद्यार्थी, पालकांना वेध लागले आहेत. अभ्यासक्रम, प्रवेशाची माहितीसाठी विद्यार्थी, पालक कॉलेजांमध्ये विचारपूस करत आहेत. शहरातील बहुतांश कॉलेजांमध्ये १ जूनपासून प्रवेश प्रक्रियेसाठीची लगबग सुरू झाली. तर, निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटले तरी, विद्यापीठाने ऑनलाइन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले नाही. विभागात पदवी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता १ लाख ९० हजार पेक्षा अधिक आहे. प्रवेश क्षमतांचा विचार करता सर्वांना प्रवेश अशी स्थिती आहे.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला. ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान, कला, वाणिज्य अशा बेसिक पदवी अभ्यासक्रमांना किंवा इतर पदवी अभ्याक्रमांना प्रवेश घ्यायचे आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली. गुरुवारी शहरातील विविध कॉलेजांमध्ये पदवी अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी, पालक येत होते. बारावी निकालानंतर अनेक कॉलेजांनी १ जूनपासून विविध अभ्यासक्रमांची प्रवेशाची माहिती देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. अभ्यासक्रमांची माहिती, संधी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. निकालात यंदा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेतली तर प्रवेशापासून वंचित कोणी राहिल असे चित्र नाही. असे असले तरी आवडते कॉलेज, शाखा मिळविताना विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी महत्वपूर्ण ठरणार आहे. औरंगाबाद विभागात विविध पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता १ लाख ९० हजारपेक्षा अधिक आहे. प्रवेश क्षमता चांगली असल्याने प्रवेशास अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे.

ऑनलाइन वेळापत्रक केव्हा?

कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ऑनलाइन राबविते. बारावीचा निकाल जाहीर होऊन दोन दिवस होत आले तरी पदवी प्रवेशाचे वेळापत्रक आलेले नसल्याचे कळते. निकालापूर्वीच विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेची तयारी करणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही त्याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे कॉलेज प्रशासनाला या वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे.

वाणिज्य विभागाकडे वाढता कल

बेसिक अभ्यासक्रमांमध्ये अलीकडच्या काही वर्षात वाणिज्य शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. अकरावी, बारावीसह पदवी स्तरावर वाणिज्य विद्याशाखेला प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनेक कॉलेजांनी त्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा ही घेण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायवैद्यकशास्त्रसाठी प्रक्रिया

शासकीय न्यायवैद्यकशास्त्र संस्थेत बीएस्सी फॉरेन्सिक सायन्स या अभ्यासक्रमासाठी ही गुरुवारपासून प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. औरंगाबादसह राज्यात केवळ चार ठिकाणी अशा प्रकारची अभ्यासक्रम असलेली महाविद्यालय आहेत. ५० प्रवेश क्षमतेसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. २० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करता येईल, असे संचालक डॉ. एस. जी. गुप्ता यांनी सांगितले.

यंदा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी शाखानिहाय

शाखा....................उत्तीर्ण विद्यार्थी

विज्ञान....................६८१८०

वाणिज्य.................१२१६०

कला.......................५६३८७

व्होकेशनल..............४७०५



प्रवेश क्षमता

बीए...............९४ हजार

बीएस्सी.........५३,६००

बीकॉम...........१९५४५

बीएस्सी कम्पयूटर सायन्स..१५४७९

बीएस्सी सायन्स.............१५९०

बीएस्सी बायोटेक............१०२५

बीएस्सी आयटी...............२१५०


निकालानंतर विद्यार्थी, पालक अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेत आहेत. आम्ही आमच्या स्तरावर विविध शाखांसाठी प्रवेश कमिट्या ही स्थापन केल्या आहेत. त्यासह आम्ही आमची माहिती पुस्तिकाही विक्रीला ठेवली आहे.

डॉ. अलकंदा दोडके,

सरस्वती भुवन सायन्स कॉलेज

विद्यार्थी अभ्यासक्रमाची विचारपूस करण्यासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांना ९ जूनला गुणपत्रिका मिळणार आहेत. त्यात विद्यापीठाचे वेळापत्रक केव्हा येते, त्यानुसारही प्रक्रिया अवलंबून आहे. या आठवड्यात प्रक्रियेला गती येईल आणि गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होईल.

डॉ. शिवाजी थोरे,

प्राचार्य,

देवगिरी कॉलेज.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जांभूळबनच्या कार्यक्रमात महापौरांना टाळले

$
0
0

जांभूळबनच्या कार्यक्रमात महापौरांना टाळले

पालकमंत्र्यांनी आठवण काढताच अधिकाऱ्यांची धावाधाव

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

हर्सूल तलावाच्या परिसरात विकसीत करण्यात येत असलेल्या जांभूळबनाच्या कार्यक्रमात महापालिकेच्या प्रशासनाने चक्क महापौर भगवान घडमोडे यांनाच टाळले. या कार्यक्रमाचे निमंत्रण पुरेसे अगोदर महापौरांना देण्यात आले नाही. त्यामुळे ते या कार्यक्रमाला आले नाही. कार्यक्रमाला महापौर दिसत नाहीत, असे पालकमंत्री रामदास कदम म्हणताच अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली.

हर्सूल तलावाच्या परिसरात जांभूळबन विकसीत केले जात आहे. गतवर्षी पावसाळ्यात या परिसरात जांभळाची पाच हजार झाडे लावण्यात आली होती. ही झाडे पूर्णपणे जगली आहेत. याच ठिकाणी गुरुवारी पुन्हा रामदास कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तलावाच्या परिसरात आला. महापालिकेतर्फे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते लगेचच वृक्षारोपण करण्यात आले. कदम यांनी एक रोप लावले आणि आयुक्तांना उद्देशून म्हणाले, महापौर कुठे आहेत ? त्यांना वृक्षारोपणासाठी बोलवा. महापौर भगवान घडमोडे या कार्यक्रमाला आले नव्हते. पालकमंत्र्यांनी महापौरांची आठवण काढल्यामुळे अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली. शहर अभियंता सिकंदर अली यांनी घडमोडे यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात काही तरी गोंधळ झाल्याचे कदम यांच्या लक्षात आले. जांभूळबनातील कार्यक्रम उरकून ते नाला सफाईचे काम पाहण्यासाठी निघाले. प्रतापनगर येथील नाल्याची पाहणी करीत असताना महापौर तेथे आले. त्यांनी आपल्याला जांभूळबनच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच नव्हते, असे पालकमंत्र्यांना सांगितले. सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होता आणि शहर अभियंत्यांचा नऊ वाजताच फोन आला. कार्यक्रमाला या असा त्यांनी निरोप दिला. एवढ्या तातडीने कार्यक्रमाला येणे कसे शक्य आहे, असा सवाल महापौरांनी केला. शहर अभियंता सिकंदर अली यांना सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे महापौर त्यांच्यावर संतापले. कार्यक्रमांचे निरोप योग्यवेळी देत जा, अशी समज त्यांनी शहर अभियंत्यांचा दिली.

महापालिकेच्या कार्यक्रमांना प्रशासनातर्फे आतापर्यंत उपमहापौर स्मिता घोगरे यांना टाळले जायचे, गुरुवारी महापौरांनाच टाळण्यात आले त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुलगुरू हटाव’ विरुद्ध ‘कुलगुरू बचाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकार मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय डावपेच रंगले आहेत. साई इंजिनीअरिंग कॉलेजच्या मास कॉपी प्रकरणात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना हटवण्यासाठी काही संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर काही संघटनांनी कुलगुरुंच्या कामाचे समर्थन केले आहे. ‘कुलगुरू हटाव विरुद्ध कुलगुरू बचाव’ या वादाने विद्यापीठात रणधुमाळी सुरू आहे.
चौका येथील साई इंजिनीअरिंग कॉलेजचे मास कॉपी प्रकरण विद्यापीठ प्रशासनासाठी तापदायक ठरले आहे. ठोस कारवाई नसल्यामुळे कुलगुरू डॉ. चोपडे यांना विद्यार्थी संघटनांनी लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विभागीय आयुक्तालय परिसरात जोरदार निदर्शने करून कुलगुरूंना हटवण्याची मागणी लावून धरली आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळे वातावरण तापले आहे, तर ‘मुप्टा’ संघटनेने राज्यपालांना निवेदन पाठवून कुलगुरुंच्या विरोधातील मागण्यांकडे दुर्लक्ष करून विद्यापीठाची यंत्रणा सक्षम करण्यासाठी सहाय्य करण्याची मागणी केली आहे. कुलगुरू डॉ. चोपडे जागतिक कीर्तीचे संशोधक व निष्कलंक व्यक्ती आहेत. दबावाला बळी न पडता विद्यापीठाची गुणवत्ता व प्रतिमा उजळण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. या पारदर्शी कारभाराने अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे राजकीय नेते आंदोलनाच्या मार्गाने कुलगुरुंना बदनाम करून राजीनामा देण्यासाठी दबावतंत्र वापर करीत आहेत, असे ‘मुप्टा’ने निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, डॉ. अरविंद धाबे, डॉ. भगवान गव्हाडे, डॉ. अशोक बंडगर आदींची स्वाक्षरी आहे.
डॉ. चोपडे कुलगुरू झाल्यापासून विद्यापीठाची वाटचाल धोकादायक वळणावर आहे. आंदोलने करून प्रश्न सुटण्यासारखा नसल्याने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यपालांना निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या तीन वर्षांत विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे अड्डे तयार झाले आहेत. पंडित दीनदयाल उपाध्याय केंद्र तात्काळ बंद करावे, प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, डॉ. एम. डी. जहागिरदार व उच्च माध्यमिक शिक्षक गजानन सानप यांच्या विविध समित्यांवरील नियुक्त्या रद्द कराव्यात, असे अक्षय पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. कुलगुरूंच्या विरोधातील आंदोलनाला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप ‘मुप्टा’ने केला आहे. विद्यापीठाची प्रतिमा जतन करण्यासाठी चोपडे यांना हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने लावून धरली आहे.

‘निष्क्रिय कुलगुरू हटवा’
कुलगुरू डॉ. चोपडे भूमिका नसलेले, भ्रष्ट व सदोष कार्यपद्धती असलेले कुलगुरू आहेत. अकार्यक्षमपणामुळे विद्यापीठातील वातावरण भ्रष्ट व जातीयवादाने दूषित झाले आहे. एखादा निर्णय अंगलट आल्यास ते जबाबदारी झटकून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा बळी घेतात. परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांचा घेतलेला राजीनामा याचे उदाहरण आहे. अशा निष्क्रिय कुलगुरुंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोशाबा शिक्षक कर्मचारी महासंघाने केली आहे. याबाबत राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनावर प्रा. डॉ. संजय शिंदे, प्रा. डॉ. दिलीप अर्जुने, प्रा. संजय भालेराव, प्रा. शिवा कांबळे आदींची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना मारहाण, जाधववाडीत तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
संपात सहभागी व्हा, असे आवाहन करणाऱ्या किसान क्रांती समितीचे राज्य समन्वयक जयाजी सूर्यवंशीसह अन्य एका शेतकऱ्यावर जमावाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव होता. या संपास पाठिंबा देणाऱ्या कष्टकरी कामगारांनी तसेच पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. संपाला सर्वत्र पाठिंबा मिळत असून संपाची तीव्रता येत्या दोन दिवसात अधिक जाणवेल, अशी माहिती समितीचे राज्य समन्वयक विजय काकडे पाटील व सूर्यवंशी यांनी दिली.
संपाला व्यापारी, नागरिकांचा पाठिंबा मिळावा, यासाठी किसान क्रांतीचे सूर्यवंशी, काकडे यांच्यासह संपकरी शेतकरी सकाळी आठच्या सुमारास जाधववाडी येथील बाजार समिती आवारात आले होते. भाजीपाला मार्केट परिसरात त्यांनी व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांसह नागरिकांशी संवाद साधून संपाला पाठिंबा देण्याचे आवाहन करत होते. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, कर्जमाफी करा, यासह अन्य घोषणाबाजीही संपकरी करत होते. आंदोलनाकडे उपस्थितांचे लक्ष वेधण्यासाठी संपकऱ्यांनी प्रतिनिधिक स्वरुपात काही भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. फळ मार्केटमध्येही काही कार्यकर्त्यांनी असाच प्रकार करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जमलेल्या जमावातून काहींनी एका शेतकऱ्यास पकडत, तो वाहनांची हवा सोडत असल्याचा आरोप करून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहताच सूर्यवंशीसह इतरांनी मध्यस्तीचा प्रयत्न केला. परंतु, संतप्त जमावाने सूर्यवंशीसह अन्य आंदोलकांवर हल्ला चढवला. या प्रकारामुळे परिसरात चांगली धावपळ उडून तणाव निर्माण झाला. त्यामुळे बाजार समिती आवारात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.
संपाचे पाठिराखे, कष्टकरी कामगार, हमाल, मापाड्यांनी सूर्यवंशी व इतरांचा बचाव करण्यासाठी धाव घेतली. ही माहिती मिळाल्यानंतर सिडको पोलिसांनी धाव घेऊन सूर्यवंशी यांना सुरक्षितरित्या बाजारसमितीच्या आवारातून बाहेर आणले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गजानन देशमुख यांना पोलिस वाहनातून नेण्यात आले. हा हल्ला संपास विरोध करणारे काही व्यापारी व त्यांच्या समर्थकांनी केल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला.

व्यापाऱ्यांचा नकार
संपकरी शेतकऱ्यांना बाजार समिती आवारातील विक्रेत्यांनी केलेली नाही, अशी माहिती किरकोळ भाजीपाला विक्रेता संघटनेचे शेख रऊफ यांनी दिली. व्यापारी हे शेतकऱ्यांच्या बाजुने आहेत, असा दावा त्यांनी केला. काही अज्ञात टारगट तरुणांनी मारहाण केली असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात बदल्यांचे वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय गलथानपणा रोखण्यासाठी प्रथम व द्वितीय श्रेणीतील २९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी बुधवारी कार्यालयीन आदेशाचे परिपत्रक जारी केले. तीन वर्षे कालावधीच्या नियमानुसार बदल्या केल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे, मात्र काही अधिकारी अनेक वर्षे एकाच पदावर कार्यरत होते आणि इंजिनीअरिंग परीक्षेतील मास कॉपीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांचा निर्णय झाल्याची विद्यापीठात चर्चा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार अधिक चर्चेत आहे. साई इंजिनीअरिंग कॉलेजमधील मास कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर परीक्षा विभाग पोलिसांच्या रडारवर आला. तांत्रिक कारणे दाखवत परीक्षा नियंत्रक डॉ. डी. आर. नेटके यांचा पदभार काढण्यात आला; तसेच अभियांत्रिकी विभागातील सात कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, मात्र परीक्षा विभागात काही कर्मचारी अनेक वर्षे खुर्चीला चिटकून आहेत. या कर्मचाऱ्यांची बदली कधी करणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला होता. तीन वर्षे कालावधी पूर्ण केलेल्या २९ प्रथम व द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बदल्यांसाठी विशेष निर्णय घेतला. वेगवेगळ्या विभागातील अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे; तसेच पाच प्रोग्रामरची बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज ऑनलाइन करण्यासाठी प्रोग्रामर सक्रिय करण्याची मागणी होती. या कर्मचाऱ्यात सचिन चव्हाण, वैशाली इंगळे, दिवाकर पाठक, संतोष पाटील व राजेश राठोड यांचा समावेश आहे. युनिव्हर्सिटी नेटवर्किंग इन्फर्मेशन सेंटर (युनिक) येथे सर्वांची बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनावरील संघटनांची टीका आणि पोलिस तपासामुळे बदल्या झाल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. बदल्यांद्वारे प्रशासकीय सुधारणा करीत असल्याचा विद्यापीठाचा दावा निव्वळ बनाव आहे, अशी टीका विद्यार्थी संघटनांनी केली आहे. बदलीचे पत्र मिळाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन बदली रद्द करण्याची मागणी केली, मात्र नियमानुसार बदली झाली असल्याने निर्णय रद्द करणे शक्य नसल्याचे कुलगुरुंनी सुनावले. दोन दिवसांत तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कर्मचारी व बदली विभाग
डी. बी. भरड (निवडणूक विभाग), डॉ. पी. पी. कलावंत (परीक्षा व मूल्यमापन), डॉ. जी. आर. मंझा (परीक्षा व मूल्यमापन), डॉ. डी. एम. नेटके (शैक्षणिक), व्ही. एम. कऱ्हाळे (पात्रता आणि शैक्षणिक), एस. एस. कवडे (पदव्युत्तर पीएच. डी.), एस. एस. किसवे (लेखा), एच. जी. ठाकरे (परीक्षा व मूल्यमापन), एस. बी. तोनगिरे (शैक्षणिक), जी. डी. नागे (आस्थापना), बी. बी. ढगे (लेखा-अंकेक्षण), एच. एस. हिवराळे (परीक्षा व मूल्यमापन), आर. आर. चव्हाण (पीएचडी), एन. एम. पाटील (परीक्षा व मूल्यमापन), श्रीमती एस. आर. अंकुश (शैक्षणिक-संलग्नता), एस. एम. मुंजेवार (लेखा), व्ही. एस. खैरनार (शैक्षणिक-अभ्यासक्रम), बी. बी. वाघ (पदव्युत्तर प्रवेश), श्रीमती एम. बी. आहेर (पात्रता), बी. जे. गायकवाड (परीक्षा व मूल्यमापन), बी. एन. फड (परीक्षा व मूल्यमापन), वाय. एस. शिंदे (लेखा), डी. आर. पांढरे (आरक्षण कक्ष) व दुलसिंह आडे (उपकेंद्र).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य बुद्धिबळ स्पर्धेत तनिषाला विजेतेपद

$
0
0

राज्य बुद्धिबळ स्पर्धेत तनिषाला विजेतेपद
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पुणे येथे झालेल्या राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत १३ वर्षांखालील गटात औरंगाबादच्या तनिषा बोरामणीकरने नऊपैकी ८.५ गुणांची कमाई करीत विजेतेपद पटाकाविले. या स्पर्धेत तनिषा अपराजित राहिली.
या स्पर्धेत राज्यातील ३०० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत तनिषाने लक्षवेधक कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत तनिषाने चौथ्या फेरीत अग्रमानांकित ईशा सारडाचा पराभव केला. पाचव्या फेरीत तृतीय मानांकित नारायणी अदानेविरुद्धच्या डावात तनिषाने बरोबरी साधली. सहाव्या फेरीत तिने साताऱ्याच्या ईशा कोळीवरही मात केली. सातव्या फेरीत तनिषाने मुंबईच्या संयुक्ता बांठियालाही पराभूत केले. तनिषाने आघाडी टिकवत नऊ फेऱ्याअखेर साडेआठ गुणांची कमाई करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तनिषाला या स्पर्धेत आठवे मानांकन होते.
तनिषा अकरा वर्षांखालील गटातील खेळाडू असूनही तिने १३ वर्षांखालील गटात राज्य विजेतेपद पटाकावण्याचा पराक्रम केला. २०१४ व २०१६ मध्ये तनिषाने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. उझबेकिस्तान येथे झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने ब्राँझपदक जिंकले होते. २०१३मध्ये तिने राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सात वर्षांखालील गटाचे जेतेपद मिळवले होते. या जेतेपदामुळे तनिषाची जालंधर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तनिषाला प्रशिक्षक सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, अमरीश जोशी, विजय देशपांडे यांनी तिचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ मराठवाड्यातील शेतकरी संपावर

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मराठवाड्यात प्रतिसाद लाभला. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेसह रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने संपाला पाठिंबा दर्शवित संपामध्ये सहभाग नोंदविला. किरकोळ प्रकार वगळता मराठवाड्यात सर्वत्र शेतकऱ्यांनी आंदोलन करीत राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचा संप
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा मिळाला. तुळजापूरमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी न आणल्यामुळे मंडईत शुकशुकाट दिसून आला. उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथे मोटार सायकलवरून दूध वाहतूक करणाऱ्यांचे दूध आंदोलकांनी सांडले.
कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेसह रघुनाथदादा पाटील यांची संघटना यांनी पाठिंबा दिला. जिल्ह्यात संपाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झालेली नसल्याने या संपाविषयी शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. जिल्ह्यात वाणेवाडी, कात्री व कामथा येथील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे आठवडा बाजार नेहमीप्रमाणे भरला होता. उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर येथे मोटार सायकलवरून दूध वाहतूक करणाऱ्यांचे दूध आंदोलकांनी सांडले. उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर्स ( एन साई ) या साखर कारखान्याने शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवित सुमारे २०० दूध संकलन केंद्रावरील दूध घेण्यास नकार दिला.

लातूरात धरणे आंदोलन
लातूर - किसान क्रांती शेतकरी संप कृती समिती लातूर यांच्यावतीने गुरुवारी प्रमुख चार शेतकरी संघटनांसह डावे पक्ष, काँग्रेसच्या वतीने लातूर तहसील कार्यालयासमोर दुपारी चारपर्यंत धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांच्या मागण्याला पाठिंबा दर्शविला.
लातूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आले. राजकीय पक्षासह विविध ४२ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला फळे, शहरात विक्रीला आणू नयेत असे आवाहन करण्यात आले होते, त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला. पुढचे सात दिवस कोणाताही शेतकरी दूध किंवा भाजीपाला विक्रीला आणणार नाही. त्यासाठी प्रबोधन केले जात आहे. सात जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्यामध्ये जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल आणि अरुण कुलकर्णी यांनी सांगितले.
या आंदोलनात माजी आमदार वैजनाथ शिंदे, कम्म्युनिस्ट पक्षाचे डॉ. विठ्ठल मोरे, शेकापचे अॅड. उदय गवारे, सामाजिक संघटनेचे प्रदिप गंगणे सहभागी झाले होते.
औसा तालुक्यातील काजळे चिंचोली येथील शेतकऱ्यांनी संपात सहभागी होताना भाजीपाल्याचे किंवा दुधाची नासाडी न करता ते गावात मोफत वाटप करण्याचा निर्णय केल्याची माहिती आबासाहेब पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली.
लातूरात सकाळी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक निम्याने कमी झाली असल्याचे सांगून आडत बाजारात भाव ही निघाला नसल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी दिली. तूर खरेदी केंद्रावर खरेदी बंद झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नव्या गुळमार्केट समोर काहीकाळ रस्ता रोको आंदोलन केले.

जालन्यात शेतकऱ्यांनी दूध सांडले
जालना- शेतकरी संपाचा मोठा परिणाम जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसला नाही. माहोरा (ता. जाफराबाद) येथील काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिले. तिर्थपूरी ( ता. अंबड) येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. जालना शहरातील भाज्यांचे भाव मात्र वाढले आहेत. टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आणि काही भाज्या दुप्पट महाग झाल्या आहेत.
देऊळगावराजा ( जि. बुलढाणा) येथे स्वभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ठोक भाजी बाजार बंद करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष सतीश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील दूध संकलन केंद्र बंद केले. देऊळगावराजा शहरातून एक शेतकरी प्रचार फेरी काढून संपाचा प्रचार केला. माहोरा ( ता. जाफराबाद) येथील शासकीय दूध केंद्रावर दुधाने भरलेल्या २० कॅन ओतून देण्यात आले. यावेळी गजानन पाटील बंगाळे, योगेश पायघन, कैलास राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
तिर्थपूरी व वडीगोद्री ( ता. अंबड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी ११ ते दुपारी १२ दरम्यान अंबड शहागड हा रस्ता रोको आंदोलन केले.

परभणीत भाजीपाल्याची नासाडी
परभणी - परभणी जिल्ह्यातील शेतकरी संपामध्ये सहभागी झाले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर सांडून दिले तर भाजीपाला जनावरांना खाऊ घातला. काही शेतकऱ्यांनी गाईचे दुध वासरांना पाजले. तर मानवत येथ रस्त्यावर भाजीपाला फेकून देण्यात आला. संपावर सध्यातरी जिल्हा प्रशासनाकडून कसल्याही प्रकारचे नियोजन केल्याचे दिसून आलेले नाही.
परभणी जिल्ह्यामध्ये बंदला पहिल्या दिवशीपासून प्रतिसाद मिळाला. सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी संपाला पाठिंबा म्हणून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, सकाळी शहरामधील शेतकऱ्यांना शेतकरी संघटना व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी संपाची माहिती दिली. उद्यापासून शहरामध्ये दूध व भाजीपाला बाजारात न आणण्याचे आवाहन केले. गंगाखेड येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजारातील भाजीपाला विकत घेवून जनावरांना खाऊ घातला. मानवत येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात जाणारा भाजीपाल्याचा ट्रक अडवून सबंध भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धा आजपासून

$
0
0

राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धा आजपासून
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहर व जिल्हा शुटिंगबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य शुटिंगबॉल संघटना आणि नारायणा व्यायामशाळा, क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३५व्या राष्ट्रीय सबज्युनिअर व ज्युनिअर शुटिंगबॉल अजिंक्यपद स्पर्धेला शुक्रवारी (२ जून) प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत ६३ संघांनी सहभाग घेतला आहे. विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा रंगणार आहे. ३ जून रोजी स्पर्धेचे उद्घाटन राज्य शुटिंगबॉल संघटनेचे अध्यक्ष गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाठ, प्रशांत बंब, अतुल सावे, हर्षवर्धन जाधव, महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, डॉ. उदय डोंगरे, के. आर. ठाकरे, पंडित पाटील, अंबादास दानवे, ऊर्मिला मोराळे यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे, अशी माहिती जिल्हा सचिव अंकुश राठोड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ टँकर-इंडिका धडकेत तीन जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
डिझेल टँकर आणि इंडिका कारची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले. हा अपघात जालना शहरापासून जवळच असलेल्या रेवगाव रोडवर गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान, पहाटे झालेल्या अपघातानंतर सकाळी नागरिकांनी टँकरला गळती लागल्यामुळे नागरिकांनी डिझेलची पळवा-पळवी केली.
गुलाब कासम खान (वय ५२), सन्नो सलमान खान (वय ३५), समीर सलमान खान ( वय ७ महिने, रा. सर्वजण खरुज ता. हिंगोली) असे मरण पावलेल्यांची नावे आहेत. दत्ता त्रिंबक टाळे, शहजान बी गुलाबखॉ, सलमान सरदार यांचा समावेश आहे.जखमी पैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे.
हिंगोलीवरून औरंगाबादच्या दिशेने येणारी कार (क्र. एमएच २६, एके-३०६४) तिच्या विरुद्ध दिशेने येणारे डिझेल टँकरला (क्र. एमएच २६ एडी २०००)धडक बसली. या जबर धडकेमुळे टँकर चालकाचे नियंत्रण सुटून टँकर जागेवर पलटी झाला. मात्र, या अपघातामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हिंगोली तालुक्यातील खुरज गावचे रहिवासी आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर काही जणांनी अपघातग्रस्त टँकरमधून डिझेलची पळवा-पळवी केली. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सोयाबीनच्या पीक विम्याला लागला ब्रेक !

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
गत वर्षी शेतकऱ्यांनी घामाच्या पैशाने उतरविलेल्या पीक विम्याची रक्कम बँकेत जमा होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी बँकेच्या तिजोरीत खणखणाट असल्याने ती रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्य सरकारचे कॅशलेस धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. या बाबतीत राज्य सरकारने वेळीच शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
गतवर्षी माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद देऊन सोयाबीन, कापूस, मुग, उडीद, ज्वारी या पिकासाठी विमा रक्कम भरली. कापूस उत्पादन खर्चा एवढाही पिकला नाही. मूग, उडीद जागेवरच जिरले. ज्वारीचे पीक कडब्या पुरतेच मर्यादित राहिले तरी विमा कंपन्यांनी घट्ट केलेली डोळ्यावरची पट्टी अधिक मजबूत केली आहे. तर कृषी खात्याने केवळ सोयाबीनचा विमा मंजूर केला. ही कोट्यावधीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळती केली आहे.
स्टेट बँकेतच रोकड नसल्याने ही बँक पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा विमा रक्कम देण्यास तयार नाही. पेरणीच्या तोंडावर स्वतःच्या हक्काचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्जमुक्तीच्या आशेने कर्जाची परतफेड झालीच नसल्याने नवीन कर्ज वाटप होण्याची सुतराम शक्यता नसून विम्याची रक्कम हाच एकमेव आधार उरला आहे. त्यामुळे काही बँका विमा रक्कम कर्जात वळती करून घेण्याच्या विचारात असून या प्रश्नावर लोकप्रतिनिधींना विरोधा पुरता विरोध न करता शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तीन वर्षांपासून नुसती चर्चाच

$
0
0

तीन वर्षांपासून नुसती चर्चाच
म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
जालना रस्ता आणि बीड बायपासचे विस्तारीकरण, मजबुतीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून दिली गेलेली आश्वासने अजूनही कागदावरच आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी औरंगाबादेत येऊन केलेली घोषणा अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे औरंगाबादकरांचे स्वप्न साकारण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
औरंगाबाद शहरातील सर्वाधिक रहदारीच्या जालना रस्त्याच्या सहापदरीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत (एनएचएआय) सादर केला होता. २५ डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत मराठवाड्यातील रस्त्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा केली होती. त्यात जालना रस्ता व बीडबायपासचा समावेश होता. या घोषणेनंतर एनएचएआयने सर्वेक्षण करून जालना रस्त्यावरील काही मालमत्तांवर मार्किंग केले. हा रस्ता सहा पदरी करण्यासाठी आराखडा सादर केला गेला. बीड बायपाससुद्धा सहा पदरी काँक्रिटचा करण्याचा प्लॅन सादर केला गेला. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी तीन नवीन उड्डाणपूलही प्रस्तावित आहेत. या दोन्ही रस्त्यांसाठी निधी मंजुरीसाठी दिल्लीत प्रस्ताव सादर केला. त्याच्या मंजुरीला तब्बल आठ महिने लागले. त्यानंतर एनएचएआयने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून निधी मंजुरीसाठी दिल्लीत प्रस्ताव गेला. त्याला मात्र अद्याप मुहुर्त लागलेला नाही. सुरवातीला सादर केलेल्या अहवालात त्रुटी दर्शविल्या गेल्या. एनएचएआयच्या स्थानिक कार्यालयाने त्रुटींची पूर्तता करून नव्याने प्रस्ताव दिल्लीत पाठविला असून त्याला मंजुरी प्रतीक्षा आहे. मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढणे, त्याची मंजुरी मग कंत्राटदार निश्चित होणे यासाठी किमान सहा महिने अपेक्षित आहेत. थोडक्यात जालना रस्ता आणि बीडबायपासचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. तोवर औरंगाबादकरांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images