Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ दीड कोटी झाडांपैकी जगली फक्त २५ टक्के

0
0

दीड कोटी झाडांपैकी जगली फक्त २५ टक्के

जोर वृक्षारोपणावर, संवर्धनाकडे दुर्लक्षच; ४० टक्के जमीन वृक्षारोपणास योग्य, रोपण ४ टक्क्यांवरच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मागच्या वर्षी जिल्ह्यात तब्बल दीड कोटीवर वृक्षारोपण झाले; परंतु त्यातील २५ टक्केच झाडे जगली आहेत, अशी भीती पर्यावरण अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी, विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रा. सतीश पाटील व इतरांनी जागतिक पर्यावरण दिनी व्यक्त केली. अजूनही जोर वृक्षारोपणावर असतो व वृक्षसंवर्धनाकडे पार दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच मराठवाड्यातील तब्बल ४० टक्के जमीन ही वृक्षारोपणास योग्य असूनही केवळ ४ टक्के जमिनीवर वृक्ष असल्याची खंत तज्ज्ञांनी व्यक्त केली.
धक्कादायक बाब म्हणजे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मागच्या वर्षी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ज्या झाडांचे रोपण झाले, ती झाडेही जळाली; म्हणूनच वनमंत्री येण्याआधी त्या ठिकाणी चक्क नवीन रोपे लावण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही मागच्या वर्षी लावलेली झाडे जळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. यार्दी म्हणाले, ब्रिटिश देश सोडताना देशातील वनक्षेत्र हे २५-२८ टक्क्यांपर्यंत होते व पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी हे क्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे जाहीर केले होते. दुर्दैवाने आज देशातील वनक्षेत्र केवळ १५-१८ टक्क्यांवर आले आहे. ‘प्लॅन्टेशन ईज द ओन्ली सोल्युशन टू पोल्युशन’ हे सत्य असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होते, पण वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. मुळात वृक्षारोपणाची योजना ‘लाँग टर्म’ हवी व वृक्षसंवर्धासाठी निधीसह सुयोग्य-शास्त्रशुद्ध नियोजनही हवे, असेही डॉ. यार्दी म्हणाले. कार्बन उत्सर्जन कमी करणे, ‘अॅब्झॉर्बशन झोन’ वाढवणे, कचऱ्यावर प्रक्रिया होणे आदी उपयायोजनाही महत्वाच्या असल्याचे मत डॉ. पाटील यांनी नोंदविले.

दररोज ७ झाडांची कत्तल
पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत असताना, आजही शहरात दररोज ६-७ झाडांची कत्तल होत आहे. चक्क विद्यापीठातही झाडांची कत्तल होत आहे. दुर्दैवाने जायकवाडी-म्हैसमाळसारख्या भागांवरही वृक्षारोपण झालेले नाही, असे पर्यावरणप्रेमी डॉ. किशोर पाठक म्हणाले. वृक्षसंवर्धनासह रेन-वॉटर हार्वेस्टिंग, झिरो गार्बेज, रि-सायक्लिंगही महत्वाचे असून त्यासाठी नागरिकांनीही छोट्या-छोट्या ग्रुपमधून सक्रिय व्हावे, असे स.भु.विज्ञान महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. क्षमा खोब्रागडे म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बारावीनंतर काय’; ८ जून रोजी मार्गदर्शन

0
0

औरंगाबाद : बारावीनंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या क्षमतेनुसार विविध क्षेत्रांत असलेल्या करिअरच्या संधीबाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती व्हावी. बुद्धिमत्ता, अभिरुची, व्यक्तिमत्व अशा निकषांवर स्वतःला ओळखत, करिअरचे योग्य क्षेत्र निवडणे समजावे. त्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र टाइम्सतर्फे ८ जून रोजी ‘बारावीनंतर काय’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. बारावीनंतर काय करावे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह असते. भविष्यातील संधी ओळखत कोणत्या क्षेत्रात करिअर करावे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा ‘बारावीनंतर काय’ या उपक्रमागचा हेतू आहे. डॉ. अजित थेटे या उपक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. ‘इंजिनीअरिंग’, ‘हॉस्पिटॅलीटी मॅनेजमेंट’, ‘आयटी’, ‘कम्प्युटर सायन्स’, ‘अॅनिमेशन’ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी, कॉलेजांची माहिती याबाबत मार्गदर्शन, विद्यार्थी, पालकांशी संवाद साधणार आहेत.

स्थळ ः आइन्स्टाइन सभागृह, एमजीएम
दिनांक ः ८ जून
वेळ ः सकाळी ११ वाजता
मार्गदर्शक ः डॉ. अजित थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीचे ‘एमआरआय’, ‘मॅमोग्राफी’ झाले सुरू

0
0

घाटीचे ‘एमआरआय’, ‘मॅमोग्राफी’ झाले सुरू

‘सिटी स्कॅन’ सुरू होण्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागातील एमआरआय तसेच मॅमोग्राफी उपकरणे दोन आठवड्यानंतर एकदाचे सुरू झाले असून, ‘सिटी स्कॅन’साठी मात्र आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘सिटी स्कॅन’ची ट्यूब नादुरुस्त झाली आहे आणि त्याची किंमत तब्बल ४० लाखांपर्यंत असल्याने सिटी स्कॅन रुग्णसेवेत येण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घाटीतील क्ष-किरण विभागातील एमआरआय, सिक्स स्लाईस सिटी स्कॅन व मॅमोग्राफी ही उपकरणे ‘हाय व्होल्टेज’मुळे नादुरुस्त झाली होती आणि सुमारे दोन आठवडे ही उपकरणे बंद होती. दरम्यानच्या कालावधीत दुरुस्ती झाल्यानंतर एमआरआय शनिवारपासून रुग्णसेवेत दाखल झाले आहे, तर ‘मॅमोग्राफी’देखील सुरू झाले आहे. मॅमोग्राफी उपकरणाचे युपीएस जळाले होते व उपकरणाच्या गॅरेंटी-वॉरेंटी कालावधीमुळे ही दुरुस्ती लवकर होऊ शकली. मात्र सिक्स स्लाईल सिटी स्कॅनच्या नवीन ट्यूबसाठी तब्बल ४० लाखांचा निधी लागणार असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तरीदेखील ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात सिटी स्कॅन रुग्णसेवेत दाखल होईपर्यंत रुग्णांना आठवडाभराची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समजते. अर्थात, ६४ स्लाईस सिटी स्कॅन सुरू असल्याने उशिरा का होईना ही तपासणी घाटीमध्ये होत आहे. त्याचवेळी चारपैकी एक एक्स-रे मशीन नादुरुस्त असून, ही मशीन दुरुस्त होण्यासाठीदेखील वेळ लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘हाय व्होल्टेज’चा बंदोबस्त हवाच

घाटीच्या क्ष-किरण विभागातील तिन्ही उपकरणे ‘हाय व्होल्टेज’मुळे एकाचवेळी नादुरुस्त होतात आणि त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘हाय व्होल्टेज’चा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. उपकरणे नादुरुस्त होण्यासाठी ‘हाय व्होल्टेज’ हेच कारण असेल, तर हा प्रकार पुन्हा होणार नाही, याची दक्षता घेणे व अशाही स्थितीत उपकरणे सुस्थितीत राहतील, याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

एमआरआय, मॅमोग्राफी सुरू झाले असून, सिटी स्कॅन उपकरणही लवकरच सुरू होईल. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.

– डॉ. भारत सोनवणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांचा उद्या देशव्यापी संप

0
0

डॉक्टरांचा उद्या देशव्यापी संप

दिल्लीत फेरी, धरणे आंदोलन; ‘पेन डाउन’ आंदोलनात ‘नो प्रिस्क्रिप्शन’चाही इशारा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉक्टरांवरील हल्लांबाबत कठोर कारवाई करण्यासह वेगवेगळ्या १० मागण्यांकडे देशाचे लक्ष वेधण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’तर्फे देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यानिमित्त मंगळवारी (६ जून) दिल्लीमध्ये फेरी, धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच देशभर मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘पेन डाऊन’ आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाचा भाग म्हणून या वेळेत डॉक्टर कुठलेही प्रिस्क्रिप्शन लिहिणार नाहीत, असा इशारा ‘आयएमए’च्या शहर शाखेच्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

अलीकडे देशभरातील डॉक्टरांवर, रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असून, हल्लेखोरांवर ‘डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्ट’नुसार; तसेच डॉक्टरांच्या संरक्षणार्थ कायद्यानुसार कोणतीही ठोस कारवाई होत नाही, शिक्षा होत नाही; उलट कलम ३०२, ३०४ (अ), ३३७, ३३८ अशी गंभीर गुन्हेगारांवर लावली जाणारी कलमे डॉक्टरांवरच सर्रास लावली जातात. या संदर्भात डॉक्टरांच्या बाजुने सुप्रिम कोर्टाची स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असताना त्यांचे पालन होत नाही व राजकीय दबावातून डॉक्टरांवरच वरील गंभीर कलमे लावली जातात. त्याचवेळी क्षुल्लक तांत्रिक चुकांवरुन पीसी-पीएनडीटी अॅक्ट, एमटीपी अॅक्ट, एचआयव्ही-एडस् अॅक्टमध्ये डॉक्टरांवर खटले होतात, डॉक्टरांना थेट जेलमध्ये पाठवले जाते तसेच डॉक्टरांचा परवानाही रद्द केला जातो. अशात तर जेनेरिक औषधांबाबत डॉक्टरांना गुन्हेगार ठरवले जात असून, डॉक्टरांनी केवळ जेनेरिक औषधांची नावे लिहावीत, असा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. एकीकडे ‘एमसीआय’ने जेनेरिक औषधासह पसंतीचा कंपनी ब्रँड लिहिण्यास मुभा दिली आहे, तर सरकारने केवळ जेनेरिक नाव लिहिण्याचा इशारा दिला आहे. डॉक्टरवर रुग्णाच्या आरोग्याची-जिविताची जबाबदारी असल्याने औषध कंपनीच्या पसंतीचा ब्रँड लिहिण्याचा अधिकारही (राइट टू चॉइस) डॉक्टरला मिळाला पाहिजे, अशी डॉक्टरांची भूमिका आहे. हीदेखील आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे ‘आयएमए’चे शहराध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर, कोषाध्यक्ष डॉ. यशवंत गाडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले. त्याचबरोबर ‘एमबीबीएस’ झाल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी अनिवार्य ठरवण्यात आलेली नियोजित ‘नेक्स्ट’ परीक्षा रद्द करणे, क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट व क्रॉसपॅथीला मान्यता न देणे, मोठ्या प्रमाणात नॉन-मेडिको सदस्यांना स्थान देणाऱ्या ‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’ऐवजी (एनएमसी) ‘एमसीआय’च देशभरात कार्यरत ठेवणे, अशीही ‘आयएमए’ची मागणी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जेनेरिक औषधांच्या दर्जाचे काय?

देशभर जेनेरिक औषधांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, जेनेरिक औषधांच्या दर्जावर अजिबात चर्चा होत नाही. मुळात जेनेरिक औषधांच्या दर्जावर, निर्मितीवर कोणतेच नियंत्रण नाही; शिवाय जेनेरिक औषधे फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत व फार कमी शहरांमध्ये उपलब्ध आहे. या स्थितीत जेनेरिक औषधांनी गुण आला नाही तर पुन्हा डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाणार त्याचे काय, असा सवालही आयएमए पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासी महिलेला मंगळसूत्र चोरट्यांचा फटका

0
0

प्रवासी महिलेला मंगळसूत्र चोरट्यांचा फटका

रेल्वे स्टेशनजवळून दोन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीस्वार चोरट्यांनी तेलंगणा येथून आलेल्या प्रवासी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी लंपास केली. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या गेट क्रमांक दोनवर हा प्रकार घडला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष्मी ईश्वर बागुलवार (वय ५५, रा. कामुल ता. भैसा, जि. निर्मल, तेलंगणा) या महिला शनिवारी शहरात आल्या होत्या. सिडको एन २ परिसरातील सुनील बागुलवार यांच्या घरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमासाठी त्या मुक्कामी थांबल्या. रविवारी दुपारी गावाकडे जाण्यासाठी सिडको बसस्टँड येथून रिक्षाने लक्ष्मी बागुलवार यांच्यासोबत सुनील बागुलवार, दत्तू बागुलवार (भाऊ), श्‍वेता दत्तू बागुलवार (भाची), विठ्ठल गंगान्ना रेड्डी हे नातेवाईक रेल्वे स्टेशन येथे पोहचले. रेल्वे स्टेशनच्या गेटवर उतरून सर्वजण पायी आतमध्ये जात होते. यावेळी पल्सर दुचाकीवर दोन अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने लक्ष्मी बागुलवार यांच्या गळ्यातील चाळीस हजारांची सोनसाखळी हिसकावून राँगसाइडने पसार झाले. सुनील बागुलवार यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे पसार झाले. या आरोपीपैकी दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेट घातले होते. तसेच तोंडाला रुमाल बांधले होते. तर सोनसाखळी हिसकवणाऱ्या चोरट्याच्या अंगात निळसर काळा शर्ट होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक शाहेद सिद्दीकी तपास करीत आहेत.

...
चौकट

पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर प्रकार

रेल्वेस्टेशन समोरच वेदांतनगर पोलिस चौकी आहे. या चौकीपासून जवळच हा प्रकार घडला. भर दुपारी चोरट्यांनी धाडस करीत हा प्रकार केल्याचे दिसून येत आहे. या परिसरात असलेल्या सीसी टीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे किसान मोर्चाकडून स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले. त्याचे भाजप किसान मोर्चाने स्वागत केले आहे. या निर्णयानंतर संघटनेतर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, या निर्णयाचा राज्यातील तब्बल २७ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. भाजपने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. सरकारने गेल्या दोन वर्षांत गारपिटीसह अन्य कारणामुळे झालेल्या शेतीमालाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई दिली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे नसर्गिक आपत्ती आल्यास शेतीमालाची नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांवर नुकसानीमुळे येणारा ताण संपला आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे शास्वत व संरक्षित पाण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. खते, बियाणे योग्य भावात व योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत अाहेत.
सरकारने घोषणा केल्यानंतरही संप सुरू असल्याबाबत उपाध्ये म्हणाले की, राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांपैकी २७ लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सरसकट कर्जमाफी न केल्यामुळे नाराजी शक्य अाहे. शेतकरी संपाचे काही लोकांनी राजकारण केले आहे. पत्रकार परिषदेसाठी एकनाथ जाधव, ज्ञानोबा मुंढे, विलास बनकर, मकरंद कोर्डे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहमार्ग दुहेरीकरण कामाने रेल्वेस उशीर

0
0

औरंगाबाद : परभणी ते मिरखेलदरम्यान १७ किलोमीटरचे लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सोमवारपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे उशिराने धावत आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून देवगिरीसह हैदराबाद-औरंगाबाद, नगरसोल-नरसापूर, मनमाड-धर्माबाद या रेल्वे दोन ‌ते तीन तास उशिराने धावत आहे.
परभणी ते मिरखेलदरम्यान लोहमार्ग दुहेरीकरण कामाच्या अंतिम टप्प्यात आहे. हे काम २४ मेपासून सुरू आहे. ते पाच जूनपर्यंत चालेल. या १३ दिवसांत नॉन इंटरलॉक वर्किंगचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे उशिराने धावत आहेत. रविवारी नरसापूर नगरसोल आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा आली. या रेल्वेचा परतीचा प्रवासही उशिरा सुरू झाला. औरंगाबाद - हैदराबाद पॅसेंजर रेल्वे दुपारी दीड ते दोनपर्यंत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर येते, मात्र ती साडेतीनच्या सुमारास औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. याशिवाय देवगिरी एक्स्प्रेस, हायकोर्ट एक्स्प्रेससह अन्य रेल्वेही उशिरा धावत आहेत. परभणी ते मिरखेल दुहेरी लोहमार्ग पाच जून रोजी करायचा आहे. यामुळे सोमवारीही रेल्वे उशिरा धावण्याची शक्यताही रेल्वे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार बाजारातून भाजीपाला गायब

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी संपामुळे औरंगाबादकरांवर भाजीपाल्याचे संकट मोठ्या प्रमाणावर ओढावले आहे. दूध आणि भाजीपाल्याची आवक बंद झाल्यामुळे रविवार बाजारातून भाजीपाला गायब झाला होता. अगदी तुरळक विक्रेते भाजीविक्रीसाठी दिसून आले.
जाफरगेट परिसरात रविवार बाजार भरतो. घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसह फळे व भाजीपाल्याचा बाजार रविवारी फुललेला असतो. दुपारी बारापासून सायंकाळपर्यंत या परिसरात खरेदीसाठी गर्दी असते. विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संप पुकारला आहे. त्यामुळे शहरातील दूध व भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. संपाच्या चौथ्या दिवशी त्याची तीव्रता शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रविवार बाजारात दिसून आली. एरव्ही बाजारात भाजीपाल्याची विक्री करणारे २५० ते ३०० छोटे मोठे व्यापारी, शेतकरी उपस्थित असतात. आज मात्र अगदी बोटावर मोजण्याइतकेच विक्रेते उपस्थित होते. कांदे, बटाटे व थोड्या पालेभाज्या विक्रीसाठी आल्या होत्या. सोमवारी संपाची तीव्रता आणखी जाणवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी संपाची धग कायम

0
0

शेतकरी संपाची धग कायम

राज्यव्यापी बंद आज, सूर्यवंशी यांच्या घरासमोर निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चार दिवसांपासून चिघळलेल्या शेतकरी संपाची तीव्रता कायम आहे. जिल्ह्यात रविवारी पाच आठवडी बाजार बंद करण्यात आले. किसान क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जयाजी सूर्यवंशी यांच्या घरासमोर मराठा संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने निदर्शने केली. पाच जून रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विविध संघटनांनी केले आहे.
शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाल्यानंतरही दुसऱ्या गटाने संप सुरू असल्याचे जाहीर केले आहे. बळीराजा संघटना, किसान क्रांती मोर्चा, अखिल भारतीय छावा संघटना, संभाजी ब्रिगेड, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने संपाला पाठींबा जाहीर केला आहे. शेतकरी संप संपला नसून अधिक व्यापक झाला असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. शहरात रविवारी दूध व भाजीपाल्याची सुरळीत आवक झाली. मात्र, तुलनेने दर जास्त असल्याने ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात आठ‍वडी बाजारात शुकशुकाट होता. लासूर स्टेशन, गल्ले बोरगाव येथील आठवडी बाजार जेमतेम भरला. पाचोड येथील आठवडी बाजार बंद ठेवून शिवसेनेने निदर्शने केली. तर पानवडोद (ता. सिल्लोड) येथील आठवडी बाजार सोमवारी भरणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शेतकरी संपाबाबत सोशल मीडिया आणि सर्वसामान्यात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. राज्यव्यापी बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. कोणत्याही मागण्या मान्य न करता राज्य सरकारने शेतकरी संप गुंडाळला असल्याची टीका संघटनांनी केली आहे.
आज राज्यव्यापी बंद
किसान मोर्चाने पुकारलेला राज्यव्यापी बंद सोमवारी होणार आहे. या बंदला वेगवेगळ्या संघटनांनी पाठींबा दिला आहे. राज्य सरकारच्या उदासीन कृषी धोरणामुळे शेतकरी हवालदिल आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांची शिकण्याची उर्मी कमी झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून विद्यार्थी अलिप्त राहू शकत नाही. त्यामुळे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, निदर्शने करणार असल्याचे राज्य उपाध्यक्ष सुनील राठोड, नितीन वाव्हळे, रखमाजी कांबळे, अभिमान भोसले यांनी कळवले आहे. संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय छावा संघटना राज्यव्यापी बंदमध्ये उतरणार आहे. जिल्ह्यात संपाची तीव्रता कायम ठेवू असे छावाचे अप्पासाहेब कुढेकर यांनी सांगितले.
जयाजी सूर्यवंशी अज्ञातवासात
शेतकरी संप फोडल्याच्या आरोपामुळे टिकेचे लक्ष्य ठरलेले किसान क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक जयाजी सूर्यवंशी शनिवारी औरंगाबाद शहरात दाखल झाले. शहरात रविवारी बैठक घेऊन संपाची आगामी दिशा ठरवू असे त्यांनी जाहीर केले होते, पण दुपारपर्यंत अधिकृत माहिती मिळत नसल्यामुळे संतापलेल्या मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूर्यवंशी यांच्या घरासमोर निदर्शने केली. सूर्यवंशी यांच्या संरक्षणासाठी घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. छावा संघटनेचे अप्पासाहेब कुढेकर, संभाजी ब्रिगेडचे रमेश गायकवाड, संजय सावंत, रमेश केरे यांच्यासह कार्यकर्ते बीड बायपास परिसरात सूर्यवंशी यांच्या घरी गेले. सूर्यवंशी घरी नसल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी भाजीपाला फेकून घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या जयाजी सूर्यवंशी यांचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाने जोरदार निदर्शने केली. सूर्यवंशी यांच्या घरावर नीळ फेकून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, फकीरचंद अवचरमल, मनोज शेजवळ, गणेश साळवे, सचिन त्रिभुवन, आकाश साळवे आदी सहभागी झाले. जयाजी सूर्यवंशी यांचा शोध घेण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. मात्र, ते कुठे आहेत याची ठोस माहिती मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंच्या प्रयत्नांतून फुलली वनराई

0
0

Sudhir.Bhalerao@timesgroup.com
Tweet : @SudhirbMT
औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा परिसरातील खडकाळ टेकडीवर आजी-माजी खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांनी पुढाकार घेऊन वनराई फुलवली. विविध प्रकारची झाडांमुळे अॅथलेटिक्स संकुल परिसर सुशोभित दिसत आहे. सद्यस्थितीत ६५० झाडे लावलेली असून, यंदाच्या पावसाळ्यात ३५० झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
एकेकाळी क्रिकेटचे मैदान म्हणून प्रसिद्ध असलेले मैदान आज अॅथलेटिक्स संकुल म्हणून सर्वांना परिचित आहे. मैदानावर दहा लेनचा ट्रॅक आहे. देशातील हा सर्वात मोठा ट्रॅक मानला जातो हे विशेष. अॅथलेटिक्स संकुलाचा परिसर काही वर्षांपासून रखरखीत होता. खडकाळ टेकडी, दगडांनी हा परिसर व्यापलेला होता. २०११मध्ये अॅथलेटिक्स प्रशिक्षक सुरेंद्र मोदी व नितीन निरावणे हे विद्यापीठाच्या क्रीडा विभागात नोकरीस लागले. त्यानंतर त्यांनी अॅथलेटिक्स ट्रॅक विकसित करण्यावर लक्ष दिले. त्यावेळी परिसरात अगदी मोजकीच झाडे होती. अज्जुममिया यांनी परिसरात झाडे लावण्याचा विचार मांडला. त्यानंतर मोदी व निरावणे यांनी झाडे लावण्याचा संकल्प केला.
अॅथलेटिक्स मैदाना लगतच असलेली खडकाळ टेकडीवर झाडे लावणे हे मुख्य आव्हान होते. कारण या टेकडीवर थोडे खोदल्यानंतर लगेचच दगड लागत होता. खड्डे खोदणेही कठीण होते. प्रतिकूल परिस्थिती असतानाही झाडे लावण्याचा संकल्प साकारण्याचा चंग प्रशिक्षकांनी बांधला. २०११मध्ये विद्यापीठाच्या ‘ओपन डे’निमित्त उद्यान विभागाने ५० झाडे दिली. माजी खेळाडूंच्या हस्ते ही झाडे लावण्यात आली. येथून परिसरात वनराई फुलवण्यास प्रारंभ झाला व तो आजपर्यंत चालू आहे. २०१४मध्ये विद्यापीठात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर परिसर हिरवागार करण्यावर अधिक लक्ष देण्यास सुरुवात झाली. अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंनीही झाडे लावण्याच्या उपक्रमात हिरारीने सहभाग घेतला.
सलाईन पद्धतीने पाणी : डॉ. प्रशांत मिश्रा यांनी १०० झाडे दिली. ही झाडे पाच फूट उंचीची होती. ही झाडे लावल्यानंतर त्याला पुरेसे पाणी देण्याचा प्रश्न गंभीर बनला. झाडे जगवण्याकरिता खेळाडू, प्रशिक्षकांनी एक उपाययोजना आखली. सलाईन बाटलीच्या माध्यमातून प्रत्येक झाडाला दोन-तीन लिटर पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. दररोज प्रत्येक खेळाडू पाण्याच्या दोन बाटल्या सरावाच्यावेळी घेऊन येत होता. त्यातील एका बाटलीचे पाणी झाडांसाठी वापरण्यात येत होते. झाडे जगवण्याची खेळाडूंची ही धडपड पाहून वरिष्ठ अभियंता रवींद्र काळे यांनी दोन इंचीची पाइप लाइन टाकून दिली. त्यानंतर झाडे जगण्याचे प्रमाण वाढले. अॅथलेटिक्सपटूंना मोफत प्रशिक्षण दिले जाते. यातून शंभर खेळाडू हे पोलिस दलात नोकरीस लागले. नोकरी मिळाल्यानंतर प्रत्येकाने किमान पाच झाडे लाववावेत असा संकल्प करण्यात आला होता. त्यातील बहुतेकांनी शब्द पाळून झाडे लावली. सद्यस्थितीत ६५० झाडे डौलदारपणे उभी आहेत. त्यात वड, लिंब, पिंपळ, काशीद, सप्तपर्णी, सिसम या प्रकारची झाडे आहेत.

पाण्याचे पुनर्भरण
चोहोबाजूने वाहून येणारे पाणी अॅथलेटिक्स संकुलात जमा होत होते. मैदानालगतच एक बोअर घेण्यात आली; तसेच मैदानात वाहून येणारे पाणी रोखण्याकरिता खोलगट नाली बनवण्यात आली. पुनर्भरण पद्धतीने सर्व पाणी बोअरमध्ये जमा होईल, अशी रचना तयार करण्यात आली. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरले. क्रीडा महोत्सवानिमित्त कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी अॅथलेटिक्स संकुलाला तार फेन्सिंग करण्यास मान्यता दिली. त्यामुळे झाडांबरोबरच मैदान सुरक्षित झाले. पावसाळ्यात ३५० झाडे लावण्याचा संकल्प आहे. त्यामुळे झाडांची संख्या एक हजार होईल. या उपक्रमासाठी कुलगुरू बी. ए. चोपडे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, दयानंद भक्त, डॉ. उदय डोंगरे, कमल मुळूक यांनी हातभार लावला; तसेच सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे, मसूद हाश्मी, अभिजीत दिख्खत, किरण शुरकांबळे, अहिरे यांच्यासह खेळाडूंचा यात मोलाचा वाटा उचलला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी खडकावर फुलविली हिरवळ!

0
0

Aashish.Chaudhari@timesgroup.com
Tweet : @AshishcMT
औरंगाबाद ः दौलताबाद घाटातील खडकाळ डोंगरावर छोटी-छोटी झाडे डौलाने डोलत आहेत. शिवछत्रपती कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या चिवट प्रयत्नांमुळे या खडकांवर सुमारे दोन हजार झाडे रुजली आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे विद्यार्थी महाविद्यालयाच्या मदतीने झाडे जगविण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादजवळ चाळीसगाव मार्गावर अजिंक्य देवगिरी किल्ला. पुढे जागतिक कीर्तीची वेरूळलेणी. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारुती. महाविद्यालयीन तरूण तरुणींचा हा आवडता लाँग ड्राइव्हचा रस्ता. याच मार्गावर दौलताबाद घाटात अगदी खडकाळ जागेवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाचा स्पॉट निवडला. वन विभागाने त्यासाठी जागा दिली. खडकाळ जमिनीवर वृक्षालागवड म्हणजे कठीण काम, परंतु विद्यार्थ्यांनी अथक मेहनतीने, जिद्दीने ही झाडी जगविली आहेत. वन विभागाचे १० एकर जागा ‘वृक्षसंवर्धन प्रकल्प’साठी जागा दिली. एका बाजूला खोल दरी, उत्तरेला मावसाळा हे गाव, तर पश्चिमेला कन्नड महामार्ग आणि कागजीपुरा हे गाव. तारेचे कुंपण करून हा भाग संरक्षित करण्यात आला. खडकाळ जमिनीवर धरणातील काळी माती टाकण्यात आली.
विविध जातींची, भारतीय वंशाची १२०० रोपे येथे पहिल्या वर्षी लावण्यात आली. वृक्षारोपणानंतर अवर्षणाचा फटका बसला. खडकाळ भूपृष्ठावर जास्त दिवस ही रोपे तग धरणे शक्य नव्हते. पाण्याच्या चार टाक्या बसवून टँकरने पाणी घालण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. सुमारे २०० विद्यार्थ्यांचा चमू त्यासाठी परिश्रम घेत आहे. विद्यार्थी नियमितपणे तेथे जाऊन झाडांना पाणी देतात. भर उन्हाळ्यात, सुट्टीच्या दिवसांत विद्यार्थी न चुकता झाडांना पाणी देण्यासाठी जातात. या कामाचा खर्च विद्यार्थी, प्राध्यापक यांनी उचलला आहे. विविध सणवार विद्यार्थी वृक्षसंवर्धन प्रकल्पात श्रमदान करून साजरा करतात. त्यांना संस्थेचे अभिजीत आवरगावकर, प्राचार्य डॉ. पी. व्ही. आष्टेकर यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळते.

या वृक्षांची केली जोपासना
कॉलेजचा एनएसएसची टीम गेल्या चार वर्षांपासून परिश्रम घेत आहे. आता झाडे मोठी होऊ लागली आहेत. त्यामध्ये पांगरा, बोर, लिंब, बाभूळ, सीताफळ, काटशेवरी, पिंपळ, करवंद, खैर, ग्लॅरेसिडिया, आपटा, कारबेर, कवट, साबरकांडे, पळस, हिवर, महारूक, करंजी, चिंच यांसह अनेक औषधी वनस्पतींचे संवर्धन केले जाते.

चार वर्षांपासून आम्ही या खडकाळ जमिनीवर वृक्षसंवर्धन प्रकल्प राबवत आहोत. तेथे दोन हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. त्यांची निगा नियमितपणे राखली जाते. खडकाळ जमिनीवर झाडे जगविणे सोपे नसते. उन्हाळ्यात टँकरने पाणी देत झाडे जगविले जातात.
- डॉ. समाधान इंगळे, समन्वयक, एनएसएस, शिवछत्रपती कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याची दुरुस्ती करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातारा परिसरातील रेणुकामाता मंदिर कमान ते म्हाडा कॉलनी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी सातारा परिसरातील नागरिकांनी रविवारी आमदार संजय शिरसाट यांच्याकडे केली. दरम्यान, रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आमदार शिरसाट यांनी दिले.
या रस्त्यावर वाढलेली रहदारी (वाहतुक) आणि त्याची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन या परिसरातील नागरिकांनी आमदार संजय शिरसाट यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे व्यथा मांडली. संकल्प पार्क, चौधरी हेरिटेज, ज्ञानेश्वर नगर, रेणुकापूरम, पृथ्वीनगर, शिल्पनगर, अप्रतिम वास्तू, भागीरथी वैभव, ओम प्लॅटिनम, डिलक्स पार्क, हरिसाई पार्क, लोट्स पार्क, आवरा व्हिलेज, भागोदय नगर, प्रथमेश इन्क्लेव्ह आदी वसाहती या परिसरात आहेत. तेथे वाहनांची वर्दळ वाढली आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी सातारा परिसरातील नागरिकांनी निवदेनाद्वारे केली.
यावेळी उपशहरप्रमुख रमेश बाहुले, आबासाहेब देशमुख, संजय कुलकर्णी, संतोष वाघ, लक्ष्मण किर्दक, रमेश जोशी, उदय म्हसकर, सुखदेव गायकवाड, पांडुरंग यादव, तानाजी गाडेकर, एस. के. देशमुख, मधुकर गायकवाड, संदीप गायकवाड, महोदव बेलुरे, गोपाळ वाघमारे, चेतबस जावळे, स्वप्निल साबळे, रवींद्र चव्हाण, अमरसिंह होलिये, वंदना देशमुख, मीना देशमुख, क्षितिजा पुराणिक, प्रसन्ना पांडव, शोभा पांडव, भगवान ठाकरे, प्रभुदयाल जांगीड, नीलेश चितलांगे, निवृत्ती सपकाळ, कांतीलाल पटेल, नरेश शर्मा, निलेश चितलांगे, संकेत कुलकर्णी, अमीत सोनवणे, अतुल बोरसे, सचिन वाडे, धनंजय चव्हाण, कारभारी नागे, विशाल वाघमारे, सतीश मावस, गणेश तोडकर यांच्यासह सातारा परिसतील नागरिकांची उपस्थिती होती.

बैठक घेणार
आमदार शिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या रस्त्याची माहिती घेतली. या रस्ताचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आमदार शिरसाट यांनी सांगितले. या रस्त्यासंदर्भात संबधित अधिकारी, महापौर, उपमहापौर, आयुक्त, नगरसेवक यांना सर्वांना सोबत घेऊन या परिसरात एक बैठक आयोजित करून या रस्त्याचा प्रश्न व विकास कामांसंदर्भात या आठवड्यात मार्ग काढू, असेही आमदार शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करा

0
0

वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करा

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांचे निर्देश

औरंगाबाद ः

विजबिलाची थकबाकी न भरणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, असे आदेश महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले. महावितरण औरंगाबाद शहर व ग्रामीणच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बकोरिया म्हणाले की, विजेचा वापर करूनही चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा अनेकजण करीत नाही. त्यामुळे थकबाकी वाढत चालली आहे. कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन वीजबिल वसुली करावी. आवश्यकता असल्यास पोलिस बंदोबस्त घेऊन वसुली करावी. एखाद्याचा वीज पुरवठा खंडित केलेला असल्यास व तो त्या ग्राहकाने परस्पर जोडल्याचे आढळल्यास संबंधीत वीज ग्राहकावर व जोडणी करून देणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा.

वीज ग्राहकांना नवीन व प्रलंबित वीज जोडणी लवकरात लवकर द्यावी. ग्राहकांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. याबैठकीत मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, लेखा अधिकारी, अधिकारी यांची उपस्थिती होती.

मोबाइल नंबर नोंदवा

वीज ग्राहकांना वीज बंद, वीजबिलासह इतर माहिती त्यांच्या मोबाइलवर एसएमएसच्या माध्यामातून पोचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महावितरणकडे वीज ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमाकांची नोंदणी करावी, असे आावाहनही बकोरिया यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारु विक्रेते गुन्हेशाखेच्या रडारवर

0
0

अवैध दारु विक्रेते गुन्हेशाखेच्या रडारवर

पाच विक्रेते गजाआड, तेरा हजारांची दारू जप्त

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहरातील अवैध दारू विक्री करणारे गुन्हेशाखेच्या रडावर आहेत. शनिवारी विविध ठिकाणी पाच विक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडून १३ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गुन्हेशाखेने छोटा मुरलीधरनगर येथे कारवाई करीत आरोपी जनसिंग जिवनसिंग कल्याणी याला अटक केली. त्याच्याकडून ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौलताबाद माळीवाडा येथे कारवाई करीत पोलिसांनी संतोष कन्हैया पिंपळे याला अटक केली. पिंपळे याच्याकडून साडेअकराशे रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तसेच दौलताबाद ते क‌ागजीपुरा या रोडवर कारवाई करीत रवींद्र प्रकाश लांडगे (वय २९, रा. शांतीनगर, कन्नड) याला अटक करण्यात आली. आरोपी लांडगे याच्या ताब्यातून साडेचार हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. वाळूज एमआयडीसी परिसरात एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाल ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून अडीच हजार रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गजानन महाराज मंदिराजवळील चौकात धिरज हिरालाल कटारिया (रा. ए सेक्टर, संघर्षनगर, मुकुंदवाडी) याला अटक करण्यात आली. धिरजच्या ताब्यातून ५ हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बनावट कागदपत्राआधारे गोडावूनची विक्री

0
0

बनावट कागदपत्राआधारे गोडावूनची विक्री

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बनावट कागदपत्राआधारे व्यापाऱ्याच्या गोदामाची परस्पर विक्री करण्यात आली. २० जानेवारी २०१६ ते ३ मार्च २०१७ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात कोलकत्त्याच्या आरोपीसह शहरातील एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दामजी गोकुळ पटेल (वय ५२ रा. गांधीनगर, बन्सीलालनगर) यांचे सिडको परिसरातील एलोरा कॉम्पलेक्स येथे दोन गोदाम आहेत. १७९७ स्क्वेअर फूट हे गोडावून असून सध्या पटेल यांचा त्याच्यावर ताबा आहे. शंकरलाल गो‌विंद गुणवाणी यांच्याकडून पटेल यांनी याबाबत खरेदी करारनामा करून घेतला आहे. दरम्यान, या गोडावूनची बनावट खरेदीखत सुरेंद्रकुमार सीताराम गुप्ता (रा. कोलकात्ता) याने काही अधिकार नसताना अनिल जगदीश अग्रवाल (रा. अजंठा कॉम्पलेक्स, सिडको एन पाच) यांना करून दिला आहे. तसेच अनिल अग्रवाल यांना या सर्व प्रकाराची माहिती असून देखील त्यांनी हे गोडावून खरेदी केले. याप्रकरणी पटेल यांच्या तक्रारीवरून सुरेंद्रकुमार गुप्ता व अनिल अग्रवाल विरुद्ध फसवणूक, अपहार, बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय एस.डी. अधाने या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादेत सर्वांत मोठे ‘ऑक्सिजन हब’

0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com
Tweet : @TusharbMT
औरंगाबाद ः साडेसातशे एकरचा रम्य परिसर आणि लहान-मोठी तब्बल ४० हजार वैविध्यपूर्ण झाडे. दिवसभर कधीही गेल्यास निश्चित ताजेतवाने वाटेल असा नैसर्गिक गारवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही प्रमुख वैशिष्ट्यात ही वनसंपदा लक्षवेधी ठरते. दरवर्षी वृक्षारोपण, संवर्धन आणि जतन करण्यावर भर देऊन विद्यापीठ प्रशासनाने शहरातील सर्वात मोठा ‘ऑक्सिजन हब’ आकारास आणला आहे.
दिवसभराची ऊर्जा मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रम्य परिसरात सकाळी एक फेरफटका मारणे शहरवासीयांची नित्याची सवय झाली आहे. पहाटे पाचपासून परिसरात वर्दळ सुरू होते. पुन्हा सायंकाळी व्यायामासाठी तरुणांची रपेट दिसते. घनदाट झाडी, अवतीभवती डोंगररांगा, पाण्याने तुडूंब भरलेले तलाव आणि जैववैविध्य हे या परिसराचे वैशिष्ट्ये आहे. विद्यापीठ परिसर विकास समितीने हा कायापालट केला आहे. २००५-०६मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. के. पी. सोनवणे यांच्या पुढाकाराने विद्यापीठात १५० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने विद्यापीठाला लागवडीसाठी सव्वा कोटी रुपये अनुदान दिले होते. या प्रकारचे अनुदान मिळवणारे हे देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले. सीताफळ, आंबा, चिंच, चिकू आणि आवळा फळबागेची लागवड करण्यात आली. या फळबागेत एकूण सात हजार २१५ झाडे आहेत. विद्यापीठ परिसरात सर्वाधिक वृक्ष लागवड प्रभारी कुलगुरू डॉ. कृष्णा भोगे यांच्या कार्यकाळात झाली. भोगे यांनी परिसराचा परिपूर्ण विकास केला. ‘हे कृषी विद्यापीठ नसल्यामुळे विद्यापीठाची जागा वृक्ष लागवडीखाली आणू नका,’ अशी मागणी एका सिनेट सदस्याने केली होती. ‘शासनाची जमीन वापराविना पडून ठेवल्याबद्दल विभागीय आयुक्त म्हणून विद्यापीठाला नोटीस देतो,’ असे भोगे यांनी संबंधित सदस्याला सुनावले होते. सदस्याने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर जोमाने वृक्ष लागवड करण्यात आली. झाडांनी बहरलेल्या परिसराचे बरेचसे श्रेय भोगे यांचे आहे.

‘जलयुक्त विद्यापीठ’
निसर्गसंपन्न विद्यापीठाला ‘जलयुक्त विद्यापीठ’ करण्याची संकल्पना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी मांडली होती. त्यानुसार दोन वर्षे काम करून विद्यापीठाला जलयुक्त करण्याचे काम सुरू आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रूपये विद्यापीठाला मिळवून दिले. आणखी २५ लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे.

विद्यापीठ परिसरात दरवर्षी झाडांची भर पडत असते. देशभरातील अनेक मान्यवरांनी हा परिसर पाहून कौतुक केले आहे. झाडांचे जतन करण्यासाठी एकूण ७५ कर्मचारी आहेत. झाडे राखल्यामुळे खऱ्या अर्थाने हा ‘ऑक्सिजन हब’ आहे.
- गोविंद हुंबे, उद्यान अधीक्षक, विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० आंतरवासितांना घाटीत मिळाले हॉस्टेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे ३० आंतरवासिता विद्यार्थिनींची घाटी परिसरातील नर्सिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सोय करण्यात आली आहे. या विद्यार्थिनींना बुधवारी (३१ मे) वसतिगृहामध्ये प्रवेश दिला असून, इतरही विद्यार्थिनींची सोय लवकरच केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी आंतरवासिता विद्यार्थिनींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वसतिगृहाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय, तर विद्यार्थिनींना वसतिगृहाची सोय नसल्याबद्दल विद्यार्थिनींनी आक्षेप घेत वसतिगृहाची मागणी केली होती, मात्र आंतरवासितांना वसतिगृहाची सोय करणे प्रशासनाला बंधनकारक नसल्याची भूमिका अधिष्ठातांनी घेतली होती. यावरून वाद निर्माण झाला असताना, ‘एमसीआय’च्या निकषांनुसार पदव्युत्तर व इंटर्न विद्यार्थ्यांना १०० टक्के हॉस्टेल फॅसिलिटी देणे बंधनकारक असल्याचे वृत्त ‘मटा’ने गेल्या मंगळवारी (३० मे) प्रसिद्ध केले होते. त्याची प्रशासनाने दखल घेतली व ३० आंतरवासिता विद्यार्थिनींची सोय नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहामध्ये करण्यात आली.
यासंदर्भात मेट्रनच्या मागणीनुसार; विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी सुरक्षा रक्षकाची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर ३० विद्यार्थिनींना वसतिगृह मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या विद्यार्थिनींना बुधवारी (३१ मे) वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. इतरही विद्यार्थिनींची वसतिगृहात सोय केली जाणार असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात सर्व विद्यार्थिनींची वसतिगृहात सोय होते का, याविषयी अद्याप तरी टांगती तलवार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३० आंतरवासिता विद्यार्थिनींची नर्सिंग कॉलेजच्या वसतिहामध्ये सोय करण्यात आली आहे. इतरही विद्यार्थिनींची हॉस्टेलमध्ये सोय करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिष्ठाता, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडीत १४ तास वीज गायब

0
0



ईटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडीत १४ तास वीज गायब

३३ केव्ही तार तुटली; नागरिक हैराण; महावितरणची अरेरावी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये शनिवारी झालेल्या पहिल्याच पावसाने महावितरणाचे पितळ उघडे पाडले. महानुभाव आश्रम परिसर, जालान नगर, रेल्वेस्टेशन, ईटखेडा, कांचनवाडी आणि नक्षत्रवाडीत १४ तास वीज गायब होती. यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले.

शनिवारी पैठण रोडवरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या कामांचाही फटका महावितरणाच्या कामावर झाला. बेस्टप्राईज या मॉलजवळील ३३ केव्ही तार तुटल्याचे कारण सांगत तब्बल १४ तास या तारेची जोडणीच झाली नाही. यामुळे नागरिक हैराण झाले असून तब्बल १४-१५ तास लाईट नसल्याने त्रास सहन करावा लागला. महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक केंद्रावर सातत्याने फोन करूनही सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही. ग्राहक सेवा केंद्रावर कायम रेकॉर्ड केलेली टेप ऐकत राहण्याशिवाय या परिसरातील नागरिकांकडे पर्यायच नव्हता. या परिसरातील सबस्टेशन छावणी परिसरात येते. या सबस्टेशनवरील फोनही तब्बल १२ तासाहून अधिक ‘ऐंगेज मोड’ वर राहिला, याचे कारणही समजू शकले नाही. यामुळे नागरिकांना त्या फोनवर बोलून तक्रार करणे शक्य झाले नाही. लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. रात्रभर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा बंद ठेवावा लागला असल्याची माहिती वीज कंपनीतील सूत्रांनी दिली असली तरी याला फार ‌उशीर झाला होता. संध्याकाळी साडेपाच ते पहाटे तीन वाजेपर्यंत तब्बल ९ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड उकाड्याने व डासांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले. यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. या‌शिवाय सकाळीही वीजपुरवठा खंडित झाला, यामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. महावितरणचा भोंगळ कारभाराचा फटका हा वारंवार नागरिकांना बसला आहे. समस्यांचा पाढाच शनिवारी पुन्हा या रहिवाशांनी या परिसरातील अधिकाऱ्यांच्या पुढे वाचण्याचा प्रयत्न केला, पण महावितरणाने याकडे दुर्लक्ष केले. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरात होत आहे. रविवारी रात्री ३ ते ७ पर्यंत वीजपुरवठा सुरू झाला व सात वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने आज परिरसात पिण्याचे पाणी येऊ शकले नाही. महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याने प्रतिसाद न दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

नगरसेवकांचे दुर्लक्ष

या परिसरातील वीजपुरवठा तब्बल १२ तासाहून अधिक खंडित झाला होता तरी नगरसेवकांनी याकडे लक्ष दिले नाही. या परिसरातील नागरिकांना खंडित विजपुरवठ्यासह डासांचाही त्रास सहन करावा लागला, या परिसरात फॉगिंग करावे,डासनिर्मूलनाची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपाला पाठिंब्यासाठी पाचोडमध्ये बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
शेतकरी संपाविषयी तालुक्यामध्ये संभ्रमाची स्थिती असून, रविवारी पाचोड व जायकवाडी येथील आठवडी बाजार भरले नाही. संपाला पाठिंबा म्हणून पाचोड बंद ठेवण्यात आले. उर्वरित तालुक्यातील बहुतांशी भागामध्ये संपाचा काहीच परिणाम जाणवला नाही.
शेतकरी संप मागे घेण्याच्या घोषणेचे शनिवारी पैठणमध्ये तीव्र प्रतिसाद उमटले होते. शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी शहरातील महाराणा प्रताप चौकात जयजीराव सूर्यवंशी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी शेतकरी संपाचा पैठण व औरंगाबाद शहराला होणाऱ्या भाजीपाला, दूध पुरवठ्यावर कोणताही परिणाम जाणवला नाही. रविवारी पैठणच्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक झाली होती. दुसरीकडे तालुक्यातील पाचोड व जायकवाडी येथे रविवारी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले. जायकवाडी येथे काही शेतकऱ्यांनी शेतमाल विकण्याचा प्रयत्न केला, मात्र काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भाजीपाला विक्री करू दिला नाही. परिणामी, या शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल शेजारील पिपळवाडी येथे विक्री केला.

आठवडी बाजार नाही
शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी रविवारचा आठवडी बाजार व पाचोड बंद ठेवण्याचा निर्णय पाचोडच्या गावकऱ्यांनी शनिवारी घेतला होता. त्यानुसार रविवारी पाचोड येथे रविवारचा आठवडी बाजार भरला नाही. पाचोड बंद ठेवण्याच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी घेतला. त्याला प्रतिसाद देत रविवारी दिवसभर पाचोड गाव बंद ठेवले. आंदोलनासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यानी विशेष प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर तहसीलदारांच्या बदलीचे प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तीन वर्षांपासून वैजापूर तालुक्यातील गोदावरी व शिवना नदीपात्रातील वाळूपट्ट्यांचा लिलव न झाल्याने शासनाला गौण खनिजामधून अपेक्षित महसूल मिळत नाही, मात्र स्थानिक वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणवर वाळू चोरी करून प्रशासनाची झोप उडवली आहे. चोरीला प्रतिबंध करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेववण्याचे माफियांचे प्रयत्न असून, यातून प्रशासन व वाळू माफियांमध्ये खटके उडत असल्यचे समोर आले आहे.
प्रशासनाला कात्रीत पकडण्याच्या प्रयत्नातून तहसिलदार सुमन मोरे यांची तक्रार थेट मंत्रालयापर्यंत करण्यात आली. यापूर्वीसुद्धा तत्कालिन तहसीलदार वंदना निकुंभ यांनी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावटर यांच्यावर अवैध उत्खननप्रकरणी दंडात्मक कारवई केली होती. त्यानंतर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. याप्रकारातून स्थानिक पदाधिकारी, बड्या नेत्यांच्या नावाचा वापर करून प्रशासनावर जरब बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील प्रशासकीय वर्तुळात बोलले जात आहे. आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने जिल्हा गौण खनिज कार्यालयाच्या पथकाने आता वैजापूर तालुक्यातील वाळू पट्ट्यांचे मोजमाप सुरू करण्यात आले आहे. जिल्हा गौण खनिज अधिकारी भाग्यश्री जोशी, कनिष्ठ भूवैज्ञानिक दिव्या शर्मा, उपविभागिय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांच्या पथकाने नुकतीच तालुक्यातील अव्वलगाव व नागमठाण येथील वाळूपट्ट्यांचे मोजमाप पूर्ण केले असून, इतर वाळूपट्ट्यांचे मोजमाप सुद्धा करण्यात येणार अाहे. या पट्ट्यातून मोठ्या प्रमाणवर वाळूचा उपसा झाला किंवा नाही याचा अहवाल उपविभागिय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. मंत्रालयस्तरापर्यंत अवैध वाळू उपशाची तक्रार गेल्यानंतर ही मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील तक्रारदार हे सत्तारुढ भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असून भाजपच्या मोठ्या नेत्याच्या नावाचा वापर करून ते अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवत असल्याचा आरोप होत आहे.

कोपरगावची वाळू वैजापुरात
दरम्यान प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळूपात्राचा लिलाव केला आहे, मात्र या वाळुपट्ट्यातील कंत्राटदारशी हातमिळवणी करत वैजापूर तालूक्यातील वाळू माफियांनी वाळू उपसण्याचा सपाटा सुरू केला आहे, मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रात्रीसुद्धा वाळू घेऊन जाणारी हायवा वैजापूर शहरातून धावताना दिसत आहेत.

तालुक्यातील वाळूपट्ट्यांची मोजणी झाल्यानंतर अवैध वाळूउपसा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल. त्यात प्रनासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल.
- डॉ. संदिपान सानप, उपविभागिय अधिकारी वैजापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images