Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वीज ग्राहकांच्या समस्या न सोडल्यास आंदोलन

$
0
0
पैठण तालुक्यातील कृषी, घरगुती व औद्योगिक वीज ग्राहकांच्या प्रलंबित समस्या न सोडविल्यास तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पैठण पंचायात समितीचे उपसभापती बाबासाहेब पवार यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्याला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

बैठक घेत नसल्याने तहसीलदारांवर नाराजी

$
0
0
बीडचे तहसीलदार प्रभोदय मुळे यांनी गेल्या सहा महिन्यापासून संजय गांधी निराधार समितिची बैठक घेतली नाही. त्यामुळे समितीचे सदस्य चांगलेच उखडले आहेत.

सोयाबीन जळीतग्रस्तांना मदत

$
0
0
लातूर तालुक्यातील भोयरा शिवारातील १८ शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजीला समाजकंटकाने आग लावून दिल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी पोलीसांनी पोलीसपाटलासह १३ जणा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

उत्पादकांची लूट करणा-यावर कारवाई

$
0
0
बीड जिल्ह्यातील भाजीपाला आणि फळउत्पादकाकडून जादा दराने कमिशन घेऊन लूट केले जात असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केले होते, याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.

वीज तोडणे बंद करा

$
0
0
सरकाराला वीज खात्यातील हजारो कोटींचे घोटाळे चालतात. परंतु, हजार रुपयांचे शेतकऱ्याचे विजबील थकीत चालत नाही. हे आगामी काळात चालू देणार नाही, असे सांगुन शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे बंद केले नाही तर येत्या हिवाळी अधिवेशानाचे कामकाज चालू देणार नाही.

‘पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा’

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने थैमान घातले. हेलेन चक्रीवादळाने झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील फळबागा, भाजीपाला, कापूस, वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बँकांतील सफाई कामगारांना कायम करण्याची शिफारस

$
0
0
माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या संसदीय समितीने बँकांमधील अंशकालीन सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याची शिफारस अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील एससी, एसटी अँड वेल्फेअर असोशिएशनतर्फे ही मागणी करण्यात करण्यात आली होती.

संग्रामनगर पुलाचा ‘तीन तिघाडा’

$
0
0
संग्रामनगर रेल्वे उड्डाणपूल डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, मात्र हा पूल पुरेसा रुंद नसल्यामुळे अपघातांना आमंत्रणच मिळणार आहे. वाहनचालकांची रेल्वे फाटकाच्या कटकटीतून सुटका होणार असली, तरी हा पूल तीन लेनचा केला आहे आणि त्यावर डिव्हायडरच नसल्यामुळे ‘ओव्हरटेक’च्या गडबडीत अपघात वाढण्याची भीती आहे.

‘जीटीएल’चा हेका कायम

$
0
0
एक महिन्याचे वीज बिल देण्याऐवजी जादा दिवसाचे बिल देण्याच्या प्रकरणात जीटीएलचा हेका कायम आहे. जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत ग्राहकांचा रोष वाढत असून या तक्रारी निकाली काढा, असे आदेश दिल्यानंतरही जीटीएलच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक तक्रारनिहाय पाहता येईल, असे उत्तर देऊन हेका सोडला नाही.

दहशतवादाला जातधर्म नसतो

$
0
0
दहशतवाद ही जगाला भेडसावणारी सर्वांत कठीण समस्या आहे. मात्र दहशतवादाला कोणताही जातधर्म नसतो, दहशतवादी कृत्ये करणारा दहशतवादीच असतो, असे प्रतिपादन श्रीश्री १००८ स्वामी हरिचैतन्य महाप्रभूजी यांनी व्यक्त केले. येत्या शनिवारी व रविवारी खुलताबाद येथे महाप्रभुजींच्या उपस्थितीत धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

रेल्वे तिकिटांसाठी ‘ई-वॉलेट’

$
0
0
रेल्वे प्रवासासाठी तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा ‘इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझ्म कॉर्पोरेशन’च्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावरून तिकीट काढणे सोपे झाले आहे. ‘आयआरसीटीसी’चा तिकीट काढण्यासाठी वाढता उपयोग लक्षात घेता, कंपनीकडून ‘ई-वॉलेट’ची सुविधा देण्यात आली आहे. या ‘ई-वॉलेट’वरून कधीही तिकीट काढण्याची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

जनरल स्टोअरला आग ६ लाखाचे नुकसान

$
0
0
औरंगाबाद ः हडको एन २ भागातील जनरल स्टोअरला शॉर्ट सर्किटने आग लागण्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजता घडली. या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली, तरी सहा लाख रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

९२ मिल‌िमीटर पाऊस, भरपूर नुकसान

$
0
0
‘हेलन’ चक्रीवादळाने शहराला चांगलाच तडाखा दिला. सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. शहरातील मुख्य नऊ वीज वाहिन्या बंद पडल्यामुळे मिट्ट अंधार झाला होता. शहरात ९२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून दुपारी एक वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला.

बिल भरा म्हणता, मग सेवा देता का ?

$
0
0
शेतकऱ्यांचे वीज बिल, बंद ट्रान्सफार्मर व व्होल्टेजच्या मुद्द्यावरून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ‘कायद्यावर बोट ठेऊन सतत बिल भरा, असे म्हणता मग त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काय सेवा देता,’ असा सवाल उपस्थित करताना ‘सेवा द्या पैसे घ्या,’ असे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बजावले.

बेगमपुरा दंगलीतील आरोपींची ओळख परेड

$
0
0
बेगमपुरा दंगल प्रकरणात अटक असलेल्या नऊ आरोपींची ओळख परेड पार पडली आहे. या आरोपींपैकी चार आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये दोन आरोपी पसार असून त्यांचा गुन्हेशाखेच्या वतीने शोध सुरु आहे.

नवजात बालिकेला सोडल्याचे गैरसमजातून पोलिसात नोंद

$
0
0
औरंगाबाद : अतिदक्षता कक्षामध्ये दाखल असलेल्या नवजात अर्भकाजवळ त्याची माता नसल्याने माता पसार झाल्याचा गैरसमज घाटीतील कर्मचाऱ्यांना झाला. याप्रकरणी मेडिकल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली. परंतु ही माता घरी आपल्या नातेवाईकांना बोलावण्यासाठी गेली असल्याचे ‌नंतर निदर्शनास आले. दरम्यान या घटनेत नाजूक प्रकृती असलेल्या बालकाचा मृत्यू झाला.

अधिकारी महासंघातून महसूल अधिकारी बाहेर

$
0
0
मंत्रालयातील नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादामुळे राजपत्रित अधिकारी महासंघातून महसूल अधिकारी संघटना बाहेर पडली आहे. महासंघाच्या विविध पदांवर राज्यभर कार्यरत असलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

‘असंघटितांसाठी देशव्यापी आंदोलन’

$
0
0
कामाची आणि वेतनाची त्यांना शाश्वती नाही, त्यामुळे वेठबिगरी, भूकबळी, कुपोषण, बाल मजूरीच्या समस्या वाढत आहे. हे चित्र बदलण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन हे राष्ट्रीय किमान वेतन म्हणून निश्चित झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय न्यूनतम वेतन अभियान समितीचे निमंत्रक स्वामी अग्निवेश यांनी केली आहे.

एटीएम फोडणारे तीन गुन्हेगार गजांआड

$
0
0
जाधववाडी भागात एटीएम फोडणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना सिडको पोलिसांनी रविवारी मध्यरात्री गजाआड केले. या चोरट्यांनी एटीएममधील रक्कम लांबवण्यापुर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नागरिकाने कंट्रोलरुमला दिलेल्या माहितीवरुन हा प्रकार उघडकीला आला. पकडण्यात आलेले तिघेही आरोपी आंबेडकरनगर येथील रहिवासी आहेत.

नोव्हेंबरमध्ये २० हजार टन गहू

$
0
0
रेल्वे मालधक्क्यावर रविवारी रात्री दोन रेल्वेने एकूण पाच हजार तीनशे टन गव्हाची आवक झाली आहे. हर्दा आणि खंडवा येथून या दोन्ही रेल्वे औरंगाबादला आल्या आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images