Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खोलीकरणामुळे साठले २५ लाख लिटर पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
भाजप नेते सुधीर पाटील यांच्या पुढाकाराने कळंब तालुक्यातील हळदगाव-सातेफळ व सौदना येथील नदी खोलीकरण व रुंदीकरणचे काम पूर्ण झाले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने हळदगाव-सातेफळ नदी खोलीकरणाच्या ठिकाणी २५ लाख लिटर पाणी साठले आहे. येत्या काळात काम झालेल्या ठिकाणी जवळपास ३५ कोटी लिटर पाणीसाठा होणार असून या परिसरातील शेती सिंचनाबरोबरच येथील पाणी पुरवठा विहिरींचे शिवाय शेतातील विहिरींचे पाणी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
दुष्काळावर शाश्वत उपाययोजनेसाठी येथील युवकांनी एकत्र येत जलसंधारणाचे काम हाती घेतले होते. येथील कामासाठी त्यांनी सुधीर पाटील यांच्याकडे यंत्रसामुग्री व निधीची मागणी केली होती. येथील गरज लक्षात घेत पाटील यांनी त्यांना नदी खोलीकरण व रुंदीकरणसाठी यंत्रसामग्री व निधीची उपलब्धता करून दिली. यातूनच हळदगाव-सातेफळ व सौदना येथील नदी खोलीकरण व रुंदीकरणचे काम हाती घेण्यात आले.
या तीनही ठिकाणचे मिळून नदीचे सुमारे ५ किलो मीटरचे काम पूर्ण झाले आहे. या तीनही ठिकाणी मिळून सुमारे ३५ कोटी लिटर पाणी साठणार आहे. हळदगाव-सातेफळ येथे जवळपास २१ कोटी लिटर आणि सौदना येथे १४ कोटी लिटरचा पाणीसाठा होणार आहे. या तीनही ठिकाणी सुमारे ३५० टीसीएम पाणी उभे राहणार आहे. येथील कामांवर लोकसहभागाबरोबरच सुधीर पाटील यांनी १० लाख ६५ हजार रुपये इतका खर्च केला आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून ३ लाख ५० हजार घनमीटर इतके काम झाले आहे. सुधीर पाटील यांच्या पुढाकाराने व लोकसहभागातून झालेल्या या तीनही कामाचे शासन मूल्य हे २ कोटी पेक्षा जास्त आहे.
दरम्यान, हळदगाव-सातेफळ येथील तीन हजार मीटर लांब, ३२.५० मीटर रुंद व २.१५ मीटर खोलीकरणाचे सुमारे २ लाख १० हजार चौरस घनमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी या परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने २१ कोटी २३ लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या ठिकाणी सुमारे २५ लाख लिटर पाणी साठले आहे. या पाणीसाठ्याचा फायदा परिसरातील शेती सिंचनाबरोबरच येथील पाणी पुरवठा करीत असलेल्या विहिरींचे शिवाय शेतातील विहिरींचे पाणी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.


वाशी तालुक्यात काम सुरू
वाशी तालुक्यातील बावी येथील नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे सुमारे पाच किलो मीटरचे काम सुधीर पाटील यांनी हाती घेतले आहे. याठिकाणी सुमारे ८ कोटी ५७ लाख लिटर पाणी साठा होणार आहे. या कामावर ही सुमारे ४ लाख रुपयांची तरतूद सुधीर पाटील यांनी केली आहे. सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी भाजप नेते सुधीर पाटील हे त्यांच्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ अन नवऱ्यासाठी त्यांनी चढली ठाण्याची पायरी

$
0
0


विजय कमळे, जालना
सावित्रीच्या लेकींनी गुरुवार पोलिस ठाण्याची पायरी चढून आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यासाठी वडाला साकडे घातले. निमित्त होते ते वटपौर्णिमेचे.
पोलिस ठाणे म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर साहजिकच चित्र उभा राहतो तो खाकी गणवेशातील फौजदार किंवा ठाणे अमलदाराची आरोपीना तंबी देतानाची खमक्यागिरी अन वायरलेसवर सुरू असलेला सांकेतिक भाषेतील संवाद. तक्रारदार व पोलिस कर्मचाऱ्यांची रेलचेल. परंतु, गुरुवाा जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात जरा वेगळेच चित्र पहायला मिळाले. सकाळी सातच्या दरम्यान साज श्रृंगार केलेल्या एका नववधूने हातात पूजेचा ताट घेऊन थेट पोलिस ठाण्यात प्रवेश केला. त्या पोलिस ठाण्यात बदलीवर नव्यानेच रुजू झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला हा प्रकार जरा विचित्रच वाटला. सुरुवातीला त्याला वाटलं की पोलिस ठाणे समोरच दोन-दोन जैन मंदिरे असल्याने कदाचित बाहेर गावाहून आलेली ही महिला मंदिरात जाण्याऐवजी चुकून पोलिस ठाण्यात आली असावी. तो पोलीस जाऊन त्या महिलेची चौकशी करणारच होता की तेवढ्यात एक-एक करून इतर १०-१२ महिला परत पोलिस ठाण्यात दाखल होत होत्या. या सर्व महिलांचा मोर्चा थेट पोलिस निरीक्षकांच्या चेंबरसमोरील वडाच्या झाडाकडे वळत होता. त्या सर्व महिला वडाची पूजा करून ‘सात जन्मी हाच नवरा मिळो’ यासाठी वडाला फेऱ्या मारत होत्या. तेव्हा कुठे त्या पोलिस कर्मचाऱ्याला आठवले की वटपौर्णिमेच्या सण असून त्यानिमित्त वडाची पूजा करण्यासाठी आल्या होत्या. सकाळी ७ वाजेपासून ते संध्याकाळीपर्यंत सुमारे ५०० विवाहितांना सदर बाजार पोलिस ठाण्यात जाऊन वटपौर्णिमा साजरी केली. रस्त्यावरून येणारे जाणारे नागरिकदेखील पोलीस ठाण्यात जाणाऱ्या या विवाहितांकडे कुतूहलाने बघत होते.

वटपौर्णिमेच्यानिमित्ताने का होईना सुमारे ५०० महिलांनी पोलीस ठाण्यात प्रवेश केला. यापैकी बहुतांश महिला अशा होत्या ज्यांची पोलिस ठाण्यात येण्याची ही पहिलीच वेळ होती. जनतेने एरव्ही पण पोलिस ठाण्याला भेट दिली तर त्यांना पोलिसांच्या कामाची माहिती होईल व पोलिसांची भीती दूर होईल.
-साईनाथ ठोंबरे, पोलिस निरीक्षक, सदर बाजार


वडाचे पूजन करण्यासाठी ठाण्याची पायरी चढताना अगोदर थोडी भीती वाटली, पण त्यानंतर काहीच वाटले नाही. शेवटी पोलिस पण माणसेच आहेत.
आर. व्ही. पाटील,
महिला, जालना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्तापूर्ण कामे करा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
जिल्ह्यात विकासात्मक कामे करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करून सर्वांनी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ च्या नियोजना संदर्भात जिल्ह्यातील सर्व यंत्रणेच्या विभागप्रमुखासमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री रावते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल यादव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रावते पुढे बोलताना म्हणाले, ‘जिल्ह्यातील विकासकामांना सर्व यंत्रणांनी अधिक गती देवून जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा काटेकोर विनियोग करावा, कामे गुणवत्तपूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. केलेल्या कामांची तपासणी करण्यात येईल. कामाची प्रशासकीय मान्यता वेळेत व्हावी यासाठी पाठपुरावा करा. झालेल्या कामांचा, चालू असलेल्या कामांचा मी स्वत: आणि सहपालकमंत्री जानकर हे वेळोवेळी परीक्षण करतील. यामध्ये विशेषत: जलयुक्त शिवारची कामे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची पाहणी स्वत: सहपालकमंत्री जानकर हे त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून करणार आहेत.’
जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी पालकमंत्र्यांची असल्याने त्यासाठी अतिरिक्त निधी आणण्यासाठी ज्या आवश्यक गरजा आहेत. त्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करा यासाठी मी स्वत: व्यक्तिश:अर्थमंत्र्याकडून अतिरिक्त निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करीन, असेही यावेळी पालकमंत्री रावते यांनी सांगितले.
आरोग्य विभागाने कामे करत असताना ज्या मूलभूत गरजा आहेत त्याला प्रथम प्राधान्य दयावे, जनसुविधा योजनेतून जास्तीत जास्त शेडची उभारणी करावी, जिल्ह्याच्या विकासात्मक कामांची नवीन यादी तयार करावी, वृक्षलागवड करताना वड, पिंपळाची झाडे ही पडजमीन, स्मशानभूमी येथे लावावीत, व्यायाम शाळेसाठी निधी देताना तो प्राधान्याने शाळा महाविद्यालयालाच द्यावा, स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी करण्यासाठी एक-एक गाव शंभर टक्के शौचालय बांधून पूर्ण करा. नागरिकांच्या मूलभूत गरजा नियोजनबद्ध लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत,अशा सूचना पालकमंत्री रावते यांनी केल्या.

‘ग्रामपंचायतचे बांधकामाचे प्रस्ताव तयार करा’
या बैठकीत जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी सन २०१७-१८ च्या जिल्हा वार्षिक योजनेचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नरेगा मधून ग्रामपंचायतचे बांधकामाचे प्रस्ताव तयार करून त्यातून ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करावे व नियोजन तयार करून कामे करावीत अशी सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ कर्मचाऱ्याचे वेतन रोखण्याच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
लातूर नगर परिषद, शहर महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी विविध कामासाठी रोख रक्कमाची उचल केली होती. त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्याही झाल्या आहेत. परंतु, उचल केलेल्या रक्कमेचे हिशोब पूर्ण झाले नाहीत. अशा दोन कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याच्या सूचना लातूर शहर महापालिकेच्या मुख्य लेखाधिकारी सविता चंपावाड यांनी औसा आणि निलंगा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
लातूर महापालिकेतील अनामत रक्कमाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते मल्लीकार्जुन भाईकट्टी यांनी हा विषय उघडकीस आणला होता. लाखो रुपयांच्या रक्कमा अनामत म्हणून घेतल्या त्या खर्च झाल्या किंवा नाही याचा कुठेही हिशेब लागला नाही. त्यामुळे त्या रक्कमा या त्या-त्या कर्मचाऱ्यांच्या नावावर तशाच दिसून येत होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा विषय जगजाहीर झाल्यामुळे तो प्रचाराचाही मुद्दा झाला होता. आता महापालिका प्रशासनाने जे कर्मचारी पालिकेतच कामावर आहेत. त्यांच्याकडून वसुली सुरू केलेली असून ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्यांना वेतन रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सूचना दिलेल्यामध्ये तत्कालीन ग्रंथपाल एन. व्ही. गायकवाड यांची निलंगा नगर परिषदेत बदली झाली आहे. गायकवाड यांच्या नावावर ८० हजार रुपये थकीत दाखवलेले आहेत. तत्कालीन कर अधिक्षक ओमप्रकाश मुतंगे यांच्या नावावर एक लाख दहा हजार रुपये थकीत आहेत. सध्या त्यांची बदली औसा नगर पालिकेत झालेली आहे. या दोघांनीही त्यांच्या नावावर असलेल्या अनामत रक्कमेचे अद्यापही समायोजन केलेले नाही. त्यामुळे या दोघांच्या पगारातून दरमहा वसुली करून महापालिकेला माहिती देण्याचे पत्रात म्हटले आहे.
या बाबत बोलताना ओमप्रकाश मुतंगे म्हणाले, ‘अनामत रक्कमा वेळोवेळी विविध कामासाठी घेतलेल्या आहेत. त्या-त्या रक्कमेचे व्हाउचर आणि संचयिकाची मी संबंधित लिपिकाकडे मागणी केलेली आहे. त्याला ते सापडत नव्हते. त्यामुळे समायोजन करण्याचे राहिले आहे. व्हाउचर आणि संचयीका तपासून तातडीने मी समायोजन करणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दशमेशनगरात घरांमध्ये पावसाचे पाणी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
दशमेशनगरमधील मुथियान कॉर्नरच्या शेजारी असलेल्या घरांमध्ये शुक्रवारी पावसाचे पाणी शिरले. यामुळे घरांमधील किमती वस्तूंचे नुकसान झाले. या भागात करण्यात आलेला रस्ता आणि लावण्यात आलेले प्लेव्हर ब्लॉक्स याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे नागरिकांना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
या भागातील रहिवासी कीर्तीकुमार परमार यांनी घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याबद्दल ‘मटा’ ला माहिती दिली. घरात पाणी शिरण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे आपण नगरसेवकाकडे मदत मिळवण्यासाठी धाव घेतली, पण नगरसेवकाची भेट झाली नाही. त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर काही काळ बसून राहिलो, पण त्यांना न भेटताच परतावे लागले, असे त्यांनी नमूद केले आहे. नाले सफाईचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे या समस्या निर्माण होत आहेत. नगरसेवकाकडे याबद्दल तक्रार केली, तर महापालिकडे पैसा नाही असे सांगितले जाते. महापालिकडे पैसा असो की नाही नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत असे परमार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विमानतळावरील दुकानांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विमानतळावर असलेल्या दुकानांमधून छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली होती. वैधमापनशास्त्र विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्याकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी गुरुवारी विमानतळावरील दुकानावर छापे मारले. त्यात जादा दराने विक्री होत असल्याचे उघडकीस आल्यामुळे तीन दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यासंदर्भात वैधमानपशास्त्र विभागाचे सहायक निरीक्षक अरुण खैरनार यांनी सांगितले, ‘औरंगाबाद विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी काही दालने सुरू केली आहेत. त्याठिकाणी पाणी, शीतपेये, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने विकली जातात. काही दालनांमधून वस्तूंची विक्री छापील किमतीपेक्षा जादा दराने केली जात असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. यापैकी एका प्रवाशाने मुंबईत अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रारी केली. त्यावरून वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक अरुण खैरनार, वरिष्ठ निरीक्षक अशोक शिंदे, शिवहरी मुंडे, निरीक्षक काकासाहेब बोराडे, मिलिंद गावडे यांनी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास औरंगाबाद विमानतळास भेट दिली. त्याठिकाणी सहा दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात जाऊन वस्तूची खरेदी केली आणि त्याचे रितसर बिल मागितले. त्यात हॉटेल श्रीकृष्ण मणिकांता येथे डाएट कोकची ३३० मिलिलिटरची बाटली छापील किंमत ६० रुपये असताना १०० रुपयांत विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. हे हॉटेल राकेश जैस्वाल चालवितात. औरंगाबादेतील दालनात नितीन स्वामी हे कार्यरत होते. श्री साई आकाश स्टोअर्समध्ये एका कंपनीचा बॉडी स्प्रे मूळ किमतीवर स्टिकर चिकटावून चढ्या दराने विकला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. कायद्यानुसार स्टिकर चिकटावून किमती टाकून कोणत्याही वस्तूची विक्री करता येत नाही. ठाकूर बालाजीसिंग यांच्या मालकीचे हे दुकान आहे,’ असे खैरनार यांनी सांगितले.

बिले मागून कारवाई
‘अरुण फूड्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दालनात बदाम बीचे २०० ग्रॅमचे पाकिट ३३० रुपये मूळ छापील किंमत असताना ३५९ रुपयांस विक्री केले जात होते. आम्ही तीनही दुकानातून वस्तू खरेदी केल्या. त्याची बिले मागितली आणि त्यानंतर कारवाई करून गुन्हे दाखल केले. वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू नियम) २०११ नुसार अंतर्गत नियम १८-२,१८-७ नुसार ही कारवाई केली. नागरिकांनी त्यांना असे गैरप्रकार आढळल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा,’ असे आवाहन खैरनार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भूमिगत’चे थर्डपार्टी ऑडिट

$
0
0



औरंगाबादः ‘भूमिगत गटार योजनेचे काम निकषानुसार झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या योजनेच्या कामाचे थर्डपार्टी ऑडिट करा,’ असे आदेश खासदार चंद्रकांत खैरे यांनी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना दिले.
पहिल्याच पावसात शहराच्या विविध भागात रस्ते खचले, त्यात वाहने अडकली. भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी या रस्त्यांचे खोदकाम केले होते, पण त्यानंतर रस्ते सुस्थितीत आणले नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. याची दखल घेऊन खासदार चंद्रकांत खैरे यांनी पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर स्मिता घोगरे, सभागृहनेते गजानन मनगटे, शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, आयुक्त डी. एम. मुगळीकर व अधिकारी उपस्थित होते.
खैरे यांनी या योजनेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘आतापर्यंत या योजनेंतर्गत जेवढी कामे झाली, त्याचे तांत्रिक व अतांत्रिक (टेक्निकल अँड नॉनटेक्निकल) ऑडिट अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून करून त्याचा अहवाल सादर करा. भूमिगत गटार योजनेचे काम करताना नाले सफाई, रस्त्यांची दुरुस्तीही योग्य प्रकारे झाली नाही. जे रस्ते खोदले त्या रस्त्यांवर डांबरीकरण झालेले नाही. ही सर्व कामे तातडीने पूर्ण करा. भूमिगतच्या कामासाठी ३५ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च मंजूर करण्यात आला. त्याशिवाय देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी सहा कोटी रुपये कंत्राटदाराला देण्याचे ठरविण्यात आले. या दोन्हीही प्रस्तावांचा फेरविचार करा. या दोन्ही प्रस्तावांना राज्य व केंद्र सरकारची मंजुरी घ्या,’ अशी ताकीद खैरे यांनी आयुक्तांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अधिकारी, कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई

$
0
0

अधिकारी, कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई
औरंगाबादः ‘भूमिगत गटार योजनेच्या कामांतर्गत आवश्यक कामे समाधानकारक झालेली नाहीत. ही कामे तातडीने पूर्ण करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी महापौर भगवान घडमोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अधिकारी व कंत्राटदाराला दिला.
पावसाने भूमिगत गटार योजनेचे काम ‘उघड’ केले. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. त्याची दखल घेऊन महापौरांनी शुक्रवारी सायंकाळी आपल्या दालनात बैठक घेतली. या बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांसह आयुक्त डी. एम. मुगळीकर व अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मुगळीकर म्हणाले, ‘कंत्राटदार खिल्लारी-घारपुरे इन्फ्रास्ट्रक्चर चे प्रतिनिधी व पालिकेचे अधिकारी यांना अल्टिमेटम देण्यात आला आहे. ‘भूमिगत’चे काम करताना माती नाल्यांमध्ये टाकण्यात आली. त्यामुळे नाले धोकादायक बनण्याची शक्यता निर्माण झाली. नाल्यातील गाळ काढा, रस्ते पूर्ववत करा, कोणत्याही तक्रारीच्या निवारणासाठी चोवीस तास उपलब्ध रहा, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. नाल्यातील गाळ काढणे व रस्ते पूर्ववत करणे याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. ही कामे युध्दपातळीवर न झाल्यास कंत्राटदारासह अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. कंत्राटदाराला रेल्वे रूळाच्या खालून ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी चार महिन्यांची मुदवाढ दिली आहे,’ असा खुलासा मुगळीकर यांनी केला. ‘भूमिगतचे काम करताना काही ठिकाणी लेव्हल्स मिळाल्या नाहीत. मुख्य ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही, असे आयुक्तांनी मान्य केले. ही कामे देखील लवकर पूर्ण करा. खासदार खैरे यांनी या योजनेसंदर्भात आठ-दहा मुद्दे उपस्थित केले आहेत. या मुद्यांचा खुलासा त्यांच्याकडे केला जाईल,’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
‘भूमिगतच्या कंत्राटदाराने योग्य काम केले नाही तर त्याच्यावर कारवाई करू,’ असा इशारा महापौर भगवान घडमोडे यांनी दिला. ‘पावसाळ्यात सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. फोन सुरू ठेवा. नागरिकांनी, नगरसेवकांनी केलेल्या फोनला प्रतिसाद द्या,’ अशी सूचना त्यांनी केली.

... तर निलंबनाची कारवाई
‘प्रत्येक वॉर्ड कार्यालयात कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अधिकारी-कर्मचारी देखील नियुक्त केले आहेत. कंट्रोल रूम २४ तास सुरू ठेवा. प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घ्या व ती तक्रार सोडवा असे आदेश संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांना दिले आहेत. जे अधिकारी-कर्मचारी या कामात कुचराई करतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू,’ असा इशारा आयुक्तांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ मद्य दुकाने बंदविरोधात ६०० याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय व राज्य मार्गावरील मद्याची दुकाने, हॉटेल व बार बंद करण्याच्या बारा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ६०० याचिकांवर शुक्रवारी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. याचिकार्त्याच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याने चार आठवड्याने या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गजवळची पाचशे मीटर अंतरावरील बिअरबार व हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १२ जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी मद्यविक्रीचे दुकाने, हॉटेल व बार बंद केले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दुकाने बंद केल्याचा आक्षेप घेऊन या विरोधात औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील १२ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ६०० याचिका खंडपीठात दाखल झाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय याचिकाकर्त्यांच्या दुकाने, हॉटेल व बारला लागूच होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे दुकाने बंद करण्याचे आदेश रद्द करावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या पूर्वीच्या सुनावणीत खंडपीठाने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, हॉटेल किंवा बार पाचशे मीटरच्या अंतरात येतात किंवा नाही याची शहनिशा करून अहवाल देण्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप हा अहवाल खंडपीठासमोर आलेला नाही. खंडपीठातील सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे युक्तीवाद केला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात याचिकाकर्त्यांना राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त किंवा शासनाकडे अपील करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ते अपील करू शकतात, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी त्याच कोर्टात दाद मागावी. त्याचप्रमाणे या प्रकरणांमध्ये अनेक वादग्रस्त मुद्दे असल्याने सर्व याचिका फेटाळून लावाव्यात, अशी विनंती गिरासे यांनी केली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतल्याने पुढील सुनावणी चार आठवड्याने ठेवली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अजित काळे, व्ही. डी. सपकाळ, सिद्धेश्वर ठोंबरे, विजय लटंगे, प्रकाश पाटील, हेमंत पवार, विक्रम उंदरे, देवदत्त पालोदकर, विशाल बगडिया, पंकज भराड, रवींद्र गोरे आदी वकील बाजू मांडत आहेत.

राजपत्र प्रसिद्ध केले नाही
राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या कलम ३(१) नुसार राष्ट्रीय महामार्गाची अधिसूचना निघणे आवश्यक आहे. राज्य महामार्गासंदर्भात महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करणे आवश्‍यक आहे. राज्य महामार्गासंदर्भात १९ एप्रिल १९६७नंतर राज्य महामार्ग घोषित करणारी अधिसूचना राज्य शासनाने राजपत्रात घोषित केलेली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय याचिकाकर्त्यांच्या दुकाने, हॉटेल व बारला सध्यातरी लागूच होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तर ‘सीईटी’ १० जुलै रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग आणि विद्यापीठाचा उस्मानाबाद कॅम्पस व संलग्नित १२७ महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पूर्वपरीक्षा अर्थात ‘सीईटी‘च्या माध्यमातून होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सुरुवात होणार असून, १० जुलै रोजी ‘सीईटी‘ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पदव्युत्तर वर्गांसाठी सीईटी घेण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली अधिष्ठाता व अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक होऊन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. येत्या १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. औरंगाबाद कॅम्पसमधील ५५ विषय, उस्मानाबाद कॅम्पसमधील पाच विषयांसाठी व विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद जिल्हयात १२७ पदव्युत्तर महाविद्यालयात ‘सीईटी’ घेण्यात येईल. महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ७० विषयांसाठी ‘सीईटी’ देणे बंधनकारक आहे. प्रवेशाबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या bamu.ac.in वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती प्रभारी अधिकार डॉ. सतीश पाटील यांनी दिली.
दरम्यान, पदवी परीक्षेचे निकाल जाहीर करण्यासाठी प्रचंड विलंब झाला आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे सीईटी लांबणीवर पडली आहे. ‘सीईटी’ची प्रक्रिया पूर्ण होऊन तासिका ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रथम सत्र संपणार असल्यामुळे दोन महिन्यात अभ्यासक्रम कसा शिकवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पदव्युत्तर व पदवीचे निकाल जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

‘सीईटी’चे वेळापत्रक
१२ जून ते ३ जुलै ः ऑनलाइन अर्ज दाखल करणे
४ ते ६ जुलै ः हॉलतिकीट वितरण
१० जुलै ः प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी)
१५ जुलै ः निकाल
१५ ते २५ जुलै ः नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे व कागदपत्रे तपासणी
३० जुलै ः सर्वसाधारण यादी
१ ऑगस्ट ः पहिली यादी
७ ऑगस्ट ः दुसरी यादी
१० ऑगस्ट ः स्पॉट अॅडमिशन
११ ते १४ ऑगस्ट ः प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे
१६ ऑगस्ट ः तासिकांना सुरुवात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचे खासगीकरण परस्पर नकाे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांना देण्याचा निर्णय परस्पर घेऊ नका, असे पत्र महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रमोद राठोड यांनी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या नावे दिले आहे. सर्वसाधारण सभेत यासंदर्भात धोरण ठरवले जावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात राठोड यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या बंद अवस्थेत असलेल्या किंवा विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळांच्या इमारती काही व्यक्तींमार्फत भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. पालिकेच्या शाळा खासगी संस्थांना भाडेतत्वावर देण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेत सर्वानुमते धोरण ठरवून निर्णय होणे गरजेचे आहे. जोपर्यंत असा निर्णय होत नाही तोपर्यंत अशा स्वरुपाच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ नये.
‘मटा’शी बोलताना राठोड म्हणाले, महापालिकेच्या काही शाळांच्या इमारती व परिसर मोठा आहे. तो मिळावा अशी काही जणांची इच्छा आहे. तसे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाल्याचे कळाले आहे. पालिका शाळांच्या इमारती खासगी संस्थांना भाडेतत्वावर दिल्यातर या शाळांमधील विद्यार्थ्यांचे काय होणार, हा प्रश्न आहे. पालिकेच्या शाळेत गरीब घरातील मुले शिक्षण घेतात. या शाळांचे खासगीकरण झाले, तर गरीब विद्यार्थ्यांना शाळाच शिल्लक राहणार नाही. याचा सारासार विचार झाला पाहिजे. त्यामुळे आयुक्तांना पत्र दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज पडल्यास विमानही उडू देणार नाही ः कडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ६० वर्षांत लुटीचे धोरण राबविले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कधीच फायद्यात आले नाही. कर्जमाफी सोबतच शेतीमालाला हमी भाव, स्वामिनाथन आयोग स्वीकारा आदी आमच्या मागण्या आहेत. १२ व १३ जून रोजीच्या राज्यव्यापी शेतकरी आंदोलनानंतरही सरकारने काही निर्णय घेतला नाही, तर विमानही उडू देणार नाही,’ अशा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
नाशिक येथे गुरुवारी सुकाणू समितीची बैठक झाली. त्यास उपस्थिती राहून कडू औरंगाबादेत आले आणि त्यांनी संवाद साधला. शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यावेळी उपस्थित होते. कडू म्हणाले, ‘गेल्या ६० वर्षांत परिस्थितीनुसार शेतकरी बदलला, पण त्याच्या हाती कायम निराशाच आली. पीकपद्धती, आधुनिक शेती करूनही उपयोग झाला नाही. सत्ता बदलली, नेते बदलले तरी शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. नेत्यांमध्ये प्रामाणिकपणा नसल्याने हे हाल होत आहेत. कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते एवढे धाडसाचे पाऊल उचलले आहे. १२ व १३ जूनला राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. तोपर्यंत सरकारने पाऊल उचलले नाही तर प्रसंगी राज्यातील विमाने उडू दिली जाणार नाही.’
हमीभाव पन्नास टक्के नफा गृहित धरून द्यावा आणि शेतीला रेड‌िरेकनर दरानुसार कर्ज मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पीककर्जाचे निर्देश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींच्या नावे तहसील कार्यालयातून स्वखर्चाने राष्ट्रीय अर्थसाह्य योजनेची संचिका तयार करून योजनेचा लाभ द्यावा, या कुटुंबाला पीककर्ज मिळवून द्यावे, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सर्व तहसीलदारांना दिले. त्यानंतर सोयगावचे तहसीलदार प्रभाकर गवळी यांनी सर्व बँकांना भेट देऊन कर्ज वितरणाच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब या विषयावर बैठक घेण्यात आली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना या शैक्षणिक वर्षापासून मोफत शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे, यासाठी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माहिती बैठकीत घेण्यात आली. खरीप हंगामासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पीककर्ज मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संबंधित बँकांमध्ये जावून याची खातरजमा करावी, ज्या बँका वारसांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील, त्या बँकांवर कारवाई करावी, अशी सूचना बैठकीत देण्यात आली. त्यामुळ सोयगाव तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापकांना तहसीलदार प्रभाकर गवळी यांनी भेटी देवून तत्काळ कर्ज वितरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना पीककर्ज मिळण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान तालुक्यातील सन २०१५ ते २०१७ या कालावधीत आत्महत्या केलेल्या २८ शेतकऱ्यांच्या संचिका मदतीसाठी पात्र ठरवण्यात आल्याने एक लाख रुपये रोख आणि वारसांच्या नावे २५ हजार रुपये याप्रमाणे शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयगाव तालुक्यात धूळपेरणी वेगात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोयगावसह तालुक्यातील सर्वच भागात मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने जमिनीतील ओल खोलवर गेली आहे. त्यामुळे धूळपेरणीला प्रारंभ झाला आहे. परंतु, हा पाऊस तण वाढण्यास पोषक असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. परिणामी, धूळपेरणीसोबतच तननाशक फवारणी करण्यात येत आहे.
सोयगाव तालुक्यात २ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तिसऱ्याच दिवशी जमिनीत ओलावा निर्माण झाला. त्यामुळे धूळपेरणी केलेले बियाणे उगवून येण्याआधीच तण जमिनिबाहेर डोके काढतांना दिसत आहे. धूळपेरणीसोबतच तणनाशक फवारणीचा निर्णय शेतकऱ्यांनी सोयगावला घेतला आहे. दरम्यान, तणनाशक फवारणी केल्यानंतर काही शेतात त्याचा प्रादुर्भाव धूळपेरणी केलेल्या बियाण्यांवर होताना दिसून येत आहे. दरम्यान बुधवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर कापूस, मका आदी पिकांच्या धूळपेरणीला धडाक्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या सुरू होण्याआधीच तालुक्यात मजुरांची टंचाई भासत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोयगाव तालुक्यात चलनटंचाईचा फटाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांतील चलनकोंडी सोयगाव तालुक्यात संपताना दिसत नाही. खरीप हंगामात पैशाची गरज असतानाही बँकांमधून पुरेशी रोख रक्कम मिळत नसल्याने शेतकरी एक महिन्यापासून हवालदिल झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यावर कापूस पीक नुकसानीचे अनुदान जमा केले आहे. पण, आता गरज असताना जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, अशी तक्रार आहे. सोयगाव येथे एकदिवसाआड जिल्हा बँकेत रोकड येते. त्यामुळे सोयगाव, जरंडी, फर्दापूर, सावळदबारा, बनोटी, गोंदेगाव, किन्ही आदी जिल्हा बँक शाखांमध्ये शेतकऱ्यांना रांगाच लागत आहेत. काही शेतकरी अनुदान सोडा पण खात्यावरील रक्कम तरी द्या अशी विनवणी बँक व्यवस्थापकांना करत आहेत. सोयगावच्या जिल्हा बँकेच्या तालुका शाखेत मोठी चलन टंचाई निर्माण झाल्याने शहरातील शेतकरी हवालदिल झाले आहे. जरंडी येथील शाखेत दररोज शेतकऱ्यांच्या रांगा लागत असतानाही पैसे मिळत नसल्याची तक्रार आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत संगणकीय बिघाडामुळ दोन दिवसांपूर्वी व्यवहार ठप्प झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांनी करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
‘शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकट व कर्जाच्या ओझ्याने खचून न जाता आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करावा,’ असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले. ते पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित शेतकरी जनसंवाद मेळाव्यात बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष बाळू कोतकर, शहराध्यक्ष प्रवीण कोतकर, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा प्रतिभा जगताप, प्रशांत पाटील सदाफळ व मोतीभाऊ वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. खेडेकर म्हणाले, २६ वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या मराठा सेवा संघातर्फे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे व त्यांनी आत्महत्येचा मार्ग सोडून द्यावा या उद्देशाने मेळायांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांनी व्यसनांचा त्याग करावा, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे व मुला-मुलींना परीपूर्ण शिक्षण द्यावे. मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी फिरून जात पात विसरून सर्वांशी प्रेमाचे व माणुसकीचे नाते जोडावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाला वाल्मिक इंगळे, बाळू निखाडे, पी. डी. शेटे, वर्षा भगत, अश्विनी वाणी, पद्मा वाणी, मालन शिंदे, संतोष त्रिभुवन, बाबासाहेब पगारे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणे दोन कोटींचे व्याज अनुदान मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील विविध बँकेची नियमित कर्ज फेडणाऱ्या खातेदारांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत २०१५-२०१६ या वर्षासाठी शासनाने एक कोटी ७४ लाख ५ हजार २८४ इतके अनुदान मंजूर झाले आहे.
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विविध बँकाच्या १२ शाखा कार्यरत आहेत. तसेच जिल्हा बँकेमार्फत ११५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना कर्ज वाटप केले जाते. राष्ट्रीकृत, व्यापारी व ग्रामीण बँक तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे पीककर्ज घेऊन विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या सभासदांना सवलत दिली जाते. या योजनेनुसार शासनाकडून एक लाख कर्ज घेणाऱ्यांना ३ टक्के व तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या खातेदारांना एक टक्के अनुदान दिले जाते. या योजनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षात ११५ सोसायट्यांच्या २२ हजार १०३ खातेदारांना एक कोटी १२ लाख ११ हजार ६०५ व विविध बँकाच्या ३ हजार ७५९ खातेदारांना ६१ लाख ९३ हजार ६७९ रुपये, असे एकूण २५ हजार ८६२ खातेदारांना एक कोटी ७४ लाख ५ हजार २८४ इतके अनुदान मंजूर झाले आहे. सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ए. बी. खरे यांनी या अनुदानाला मंजुरी दिली. सर्व अनुदान संबंधित खातेदाराच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाडीच्या वाळूपट्ट्याला जिल्हा प्रशासनाचे अभय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
नियमांचे उल्लंघन करून वाळू उपसा करत असल्याने वाघाडी वाळूपट्ट्याचा लिलाव रद्द करण्याची शिफारस तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चार महिन्यापूर्वी पत्र देऊन केली आहे. मात्र, या वाळूपट्ट्याबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील कंत्राटदार ऐन पावसाळ्यात यंत्राच्या साह्याने बिनबोभाट वाळू काढत आहे, अशी तक्रार येथील शेतकरी करत आहेत.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एस. एस. सप्लायर्सकडून रावसाहेब मोहन टेके यांनी तालुक्यातील वाघाडी येथील वाळूपट्टा सात लाख सात हजार ७७७ रुपयांत विकत घेतला होता. ६ फेब्रुवारी रोजी वाळूपट्ट्याचा ताबा देण्यात आला. मात्र, या कंत्राटदाराने नियमांचे उल्लंघन करून वाळू उत्खनन करत असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या. त्यावर १२ फेब्रुवारी रोजी वाघाडीचे तलाठी यांनी प्रत्यक्ष वाळूपट्ट्यात जावून स्थळ पंचनामा केला. कंत्राटदाराने गट नंबर ७, ८, ९ व १० मधून जवळपास ५०० ब्रास वाळू उत्खनन केले, परवानगी नसताना वाळू उत्खनन करताना यंत्राचा उपयोग केला, रविवारी व दररोज रात्री उशिरापर्यंत वाळू उपसा करण्यात येतो व वाळूवाहतूक रस्त्यावर वृक्षलागवड केली नाही, वाळूपट्ट्यात सीसीटीव्ही लावले नसल्याचा अहवाल तलाठ्यांनी तहसीलदारांना दिला. त्यावर तहसीलदारानी नियमांचे उल्लंघन होत असल्याने हा वाळूपट्टा रद्द करावा, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास १ मार्च रोजी पाठवले. पण, या चार महिन्यांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, येथे चार महिन्यापासून यंत्रांच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याचा आरोप वाघाडी, वडवाळी, दादेगाव, आपेगावच्या ग्रामस्थानी केला आहे.

नदीवरील आपेगाव बंधाऱ्यात पाणीसाठा असल्याने वाघाडी येथे नदीपात्रात पाणी आहे. या भागातून कंत्राटदार यंत्राच्या साह्याने वाळू उपसा करत आहे. त्यामुळे, नदीच्या नैसर्गिक पात्रात बदल होत असून शेतकऱ्यांना दुष्परिणाम भोगवा लागणार आहे.
-प्रदीप पाटिल, शेतकरी

मी दोन दिवसांपूर्वी पैठणच्या तहसीलदारपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. याप्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणार आहे.
- महेश सावंत, तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रामाणिक प्रवाशामुळे मिळाले दोन लाख रुपये परत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एका बसमधून क्रांती चौकात उतरताना एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाची बॅग घेतली. या बॅगमध्ये एक लाख ९९ हजार रुपये होते. पण, या घटनेमुळे हवालदिल झालेल्या व्यापाऱ्याला दुसऱ्या प्रवाशाच्या प्रामाणिकपणामुळे ही रक्कम परत मिळाली.
प्रितेश लखमीचंद अग्रवाल हे शिरपूर (जि. धुळे) येथील ईलेक्ट्रॉनिक साहित्याचे व्यापारी आहे. ते जालना येथे बहिणीकडे गेले होते. तेथून दोन लाख रुपये घेऊन ते शुक्रवारी दुपारी खामगाव-पुणे बसने औरंगाबादला खरेदीसाठी येत होते. दरम्यान, क्रांती चौकात दुपारी साडेबारा वाजता काही प्रवासी उतरले. त्यावेळी एक प्रवासी चुकून अग्रवाल यांची पैसे असलेली बॅग घेऊन उतरला. हा प्रकार अदालत रोडवर अग्रवाल यांच्या लक्षात आला. त्यांनी बस थांबवून रिक्षाने क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. त्याच वेळी दोन लाखांची बॅग घेऊन उतरलेल्या प्रवाशाला आपण दुसरीच बॅग घेतल्याचे लक्षात आले. त्याने मध्यवर्ती बसस्टँडमध्ये जाऊन खामगाव-पुणे बसचालक व वाहकाकडे ही बॅग सुपूर्द केली व स्वतःची बॅग घेऊन निघून गेला. अग्रवाल यांनी दोन लाखाची बॅग नेल्याची माहिती दिल्यानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्याचे एपीआय श्यामकांत पाटील यांनी घटनास्थळ गाठले. वेदांतनगर पोलिसांना देखील या घटनेची माहि‌ती देण्यात आली. वेदांतनगरचे पोलिस निरीक्षक शरद इंगळे देखील घटनास्थळी आले. या तिघांनी बसची माहिती घेण्यासाठी बसस्टँड गाठले. स्थानक प्रमुखांनी ही बॅग त्या प्रवाशाने आणून दिली असली, तरी ती खामगाव-पुणे बसमध्येच असल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक इंगळे व पाटील यांनी तत्काळ नेवासा पोलिस ठाण्याला ही माहिती दिली. ही बस थांबवून व्हिडिओ शुटिंग करून पंचासमक्ष बॅगमध्ये रक्कम आहे का नाही याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या. नेवासा पोलिसांनी तपासणी केली असता बॅगमध्ये रक्कम सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वेदानंतनगरचे निरीक्षक इंगळे, हेडकॉन्स्टेबल अशोक गुजराथी, कॉन्स्टेबल राहुल कांबळे, अशोक अंभोरे व प्रितेश अग्रवाल यांनी नेवासा गाठून बॅग हस्तगत केली.

तपासणीचे व्हिडिओ शुटिंग
क्रांती चौक पोलिसांनी नेवासा पोलिस ठाण्याला खामगाव बसमध्ये बॅग असल्याची माहिती दिली. ही बस थांबवून व्हिडिओ शुटिंग करून पंचासमक्ष बॅगमध्ये रक्कम आहे का नाही याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या. नेवासा पोलिसांनी तपासणी केली असता बॅगमध्ये रक्कम सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहून जाणाऱ्या मजुरांना वाचविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बारूदगर नाला साफ करताना पावसामुळे आलेल्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून जाणाऱ्या पाच मजुरांना नागरिकांनी वाचविले. किलेअर्क भागात दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
सिटीचौक पोलिस स्टेशनच्या पाठीमागून वाहणाऱ्या बारूदगर नाल्याच्या स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी सूरज जाधव, गणेश जाधव, सुनील तुपे, नितीन आदमाने यांच्यासह अन्य एक मजुराने नाला सफाईच्या कामाला सुरुवात केली. हे काम दुपारी किलेअर्कच्या भागापर्यंत पोचले. दुपारी तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर जास्त असल्याने नाल्यातील पाण्याची पातळी एकदम वाढली. काही कळण्यापूर्वीच सफाईचे काम करणारे मजूर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागले. नाल्यातील एका खांबाला पकडले. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी आजुबाजुच्या नागरिकांना साद घातली. काही नागरिकांनी या घटनेची माहिती सिटीचौक पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळविली. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत परिसरातील लोकांनी दोरीच्या सहाय्याने मजुरांना बाहेर काढले. हे सर्व मजूर १७ ते १८ वर्षे वयोगटातील असून ते जयभवानी नगर भागातील रहिवासी आहेत.

पावसाळ्यातही काम सुरू
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाला सफाईचे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. यावर्षी नाला सफाईकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळा सुरू होऊनही नाला सफाईची कामे पूर्ण झालेली नाही. किलेअर्क भागात पाच मजूर वाहून जाताना बचावले. आता या घटनेनंतर शहरालीत नाल्यांची सफाई होईल की नाही, असा प्रश्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images