Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१५ हजार क्विंटल तूर औरंगाबाद जिल्ह्यात पडून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भरघोस उत्पादन आलेल्या तुरीची खरेदी ३१ मे पर्यंत करावी, असे राज्य सरकारचे आदेश होते. मात्र अध्यादेशामध्ये धोरण स्पष्टपणे मांडले न गेल्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टोकन घेऊनही खरेदी न झालेली तब्बल १५ हजार क्विंटर तूर अद्याप शेतकऱ्यांकडे पडून आहे. खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण कायम आहे.
राज्यात यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. राज्य सरकारकडे शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर बाजार समिती, तात्पुरते खरेदी केंद्रे आणि नाफेडमार्फत तूर खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. १६ मे रोजी अध्यादेश काढून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या समन्वयाने नियोजन करण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात पैठण आणि गंगापूर येथे तूर खरेदी केंद्रे सुरू झाली. वास्तविक जिल्हाभर चांगले पीक आलेले असताना केवळ दोनच तालुक्यांमध्ये केंद्रे सुरू केल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली. मागणी केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात वैजापूरला केंद्र सुरू केले. या काळात अवकाळी पावसाची शक्यता गृहित धरून शेतकऱ्यांची तूर भिजू नये म्हणून टोकन पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेशित केले होते. जेणेकरून ३१ मेपूर्वी शेतकऱ्यांची तूर टोकन देऊन नोंदली जाईल आणि त्याची मुदतीनंतरही खरेदी करता येईल, असे म्हटले होते. दरम्यान तीनही केंद्रांवर ३१ मे नंतर शेतकरी तूर विक्रीसाठी गेले असता खरेदीसाठी नकार दिला गेला. एकीकडे संपूर्ण खरेदीचे आश्वासन दिले गेले आणि आता ३१ मेची मुदत संपल्यानंतर खरेदीस नकार त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी आशेने टोकन घेऊन तूर विकली जाणार या विश्वासात पुढचे नियोजन केले होते. ३१ मे नंतरही टोकनची तूर खरेदी केली जाईल असे सांगितले गेले आणि नंतर राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागविण्याचे धोरण जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १५ हजार क्विंटल तूर खरेदीअभावी पडून आहे. आता सरकार या बाबत काय निर्णय घेणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गंगापूर तालुक्यातील २४१ शेतकऱ्यांची २५०० क्विंटलहून अधिक तूर खरेदीविना शिल्लक आहे. सरकारी पातळीवर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. आता वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. शेतकरी अडचणीत आहे.
- विजय हिवाळे, सचिव गंगापूर मार्केट समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ‘सेतू’मध्ये दलालांची चांदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातील महाऑनलाइन पोर्टलमध्ये बिघाड झाल्यामुळे सेवा ऑफलाईन सुरू आहे. कामाचा वेग मंदावल्याचा फायदा दलालांनी घेतला असून लवकर प्रमाणपत्र देतो, बिनचूक फॉर्म भरून देण्यासाठी जादा पैसे आकारत विद्यार्थी, पालकांची लूट होत आहे.
महिन्यापासून सेतू सुविधा केंद्रामधील महाऑनलाइन पोर्टलमध्ये बिघाड झाला आहे. दरम्यानच्या काळात बारावी तसेच दहावीचाही निकाल लागल्यामुळे सेतूमध्ये विद्यार्थी, पालकांची तुफान गर्दी आहे. ऑनलाइन कामे ठप्प असल्याने विद्यार्थी, पालकांसह सेतू सुविधा केंद्रातील कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. याचा फायदा दलालांनी घेतला असून लवकर प्रमाणपत्र काढून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थी, पालकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम आकारण्याचे काम बिनबोभाट सुरू आहे. सध्या सेतू सुविधा केंद्रामध्ये महा-ई-सेवा केंद्राच्या सर्व खिडक्यांवर विविध प्रमाणपत्रांसाठी मोठ्या रांगा लागत आहेत. पोर्टल संथ झाल्यामुळे तासंतास खिडकीजवळ उभ्या असलेल्या विद्यार्थी-पालकांना दुसऱ्या खिडकीवर पाठवण्यात येत आहे. या त्रासाला कंटाळून लोक दलालांच्या जाळ्यात अडकत आहेत. सध्या सेतू सुविधा केंद्रामध्ये रहिवासी, उत्पन्न तसेच राष्ट्रीयत्वासाठीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी मोठी गर्दी असून येथून सातबारा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, वय व अधिवास, भूमीहिन, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक, ३० टक्के महिला आरक्षण, वास्तव्य दाखला आदी विविध १८ प्रमाणपत्रे वितरित केली जातात.

३० रुपयांत फॉर्म भरण्याचा प्रकार
तासंतास रांगेमध्ये ताटकळत उभे राहिलेल्या विद्यार्थी, पालकांकडून प्रमाणपत्राचा फॉर्म भरताना काही चुका राहिल्यास त्यांना रांगेतून बाहेर पाठवणए सुरू आहे. त्यामुळे दलाल ३० रुपयात बिनचूक फॉर्म भरून देतो म्हणत विद्यार्थ्यांच्या मागे फिरत आहेत. शिवाय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणत्र काढून देण्यास पाचशे रुपये घेण्यात येत असल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आहे.

विद्यार्थी काय म्हणतात...
नाव न छापण्याच्या अटीवर विद्यार्थी म्हणाले, ‘आम्हाला इंजिनीअरिंग प्रवेशासाठी प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. राष्ट्रीयत्वाचे, रहिवासी तसेच उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेसाठी खूप वेळ वाट पाहावी लागते.’ दुसरा विद्यार्थी म्हणाला, ‘सेतू सुविधा केंद्रातील संपूर्ण सिस्टीम सुधारण्याची गरज आहे. या परिसरामध्ये दलालांचा सर्रास वावर असून विद्यार्थ्यांकडून अधिकचे पैसे घेऊन लूट सुरू आहे. फॉर्मचा ताबा घेण्यासाठी दलाल थेट काउंटरपर्यंत येत असल्याची स्थिती आहे.’ अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिनारा विद्यार्थी म्हणाला, ‘दलालाने फार्म भरून देतो तसेच राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र काढून देतो ५०० रुपये द्या, अशी मागणी केली.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीवर शंका घेत शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
कर्जमाफीची घोषणा झाली तरी सातबारा कोरा होईपर्यंत शेतकऱ्यांचे काहीच खरे नाही, या अर्थाचे तीन पानांचे पत्र लिहून ठेऊन तालुक्यातील बालानगर येथील पत्रकार असलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दरम्यान, त्यांच्या मोठ्या भावाने ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुक्रम बद्रोद्दीन शेख वय ४५), असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
मुक्रम बद्रोद्दीन शेख यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या शेताजवळील चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. त्यांनी आत्महत्येपूर्वी तीन पानी नोट लिहिली आहे. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली तरी जोपर्यंत त्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांला कर्जापासून मुक्ती मिळत नाही. कारण कर्जमाफीनंतर बँका त्यांचे जाचक नियम व अटी शेतकऱ्यांवर लादतात, असा कटु अनुभव मला २००९ च्या कर्जमाफीवेळी आला आहे,’ असे या पत्रात म्हटले आहे. सततचा दुष्काळ व शेतीचे उत्पादन कमी झाल्याने आर्थिक संकटात सापडलो. त्याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची खंत या नोटमध्ये व्यक्त केली आहे. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत असून याला कोणीही जबाबदार नसल्याचे त्यात लिहले आहे. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन हे पुढील तपास करत आहे.

खूनाचा संशय
मृत मुक्रम शेख यांचे मोठे बंधू मैनोद्दीन शेख यांनी ही आत्महत्या नसून खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. जमिनीच्या व सॉ मिलच्या वादामुळे नातेवाईकांनी दोन दिवसापूर्वी मला बेदम मारहाण करत माझे दोन्ही पाय तोडले होते. मुक्रमला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुक्रमने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला, असावा असे त्यांनी पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आरोपीची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या कोठडीत बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शतपावली करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळणाताना त्याला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. गणेश रमेश नेमाने (वय २७, राजळगाव सपकाळ ता. भोकरदन जि. जालना), असे त्याचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास बजाजनगर परिसरातील सुलोचना रवींद्र खैरनार (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी आर. एम. १६२, बजाजनगर) या जेवणानंतर पतीसह शतपावली करत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या शिवायल चौकातील लता सुपडा वराडे या शेजारी महिलेसोबत शतपावली करत होत्या. त्या त्रिमूर्ती शाळेजवळ असताना एका दुचाकीस्वाराने त्याच्याही गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. यावेळी वराडे यांनी मदतीसाठी हाका मारल्यानंतर काही नागरिकांनी त्या दुचाकीवरील गणेश रमेश नेमाने (वय २७, राजळगाव सपकाळ ता. भोकरदन जि. जालना) याला पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोन्ही महिलांना बोलवून मुद्देमाल व आरोपीची ओळख परेड केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश नेमाने याने कोठडीत असताना सतरंजीच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला तत्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

अशी केली आत्महात्या
संशयित आरोपी गणेश नेमाने याला एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. त्याला बसण्यासाठी देण्यात आलेल्या सतरंजीचे दोरे काढून त्याने दिवसभरात पक्का दोर तयार केला. पोलिसांची नजर चुकवून कोठडीत लावलेल्या जाळीच्या वरच्या भागाला दोर बांधून आत्महत्या केल्याची माहिती पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा खून; पती, सासू-सासऱ्याला जन्मठेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
चारित्र्याचा संशय घेऊन विवाहितेला पेटवून देणाऱ्या पतीसह सासू व सासऱ्याला जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी बुधवारी (१४ जून) ठोठावली.
विवाहिता रेखा रवींद्र खेत्रे (२७, रा. निमखेड, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) हिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार, सासरच्या मंडळीकडून चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक-मानसिक त्रास दिला जात होता. मृत रेखा यांनी २८ ऑगस्ट २०१५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास यांनी प्रल्हादपूर येथे माहेरी जाऊन येते, असे म्हणाली. त्याला सासरच्या मंडळींनी विरोध केला. त्यावर ‘तुला फार बाहेरची हवा लागली आहे, शेतावर काम कर’ असे म्हणत तिला माहेरी पाठवण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिला. ‘माझी दोन महिन्यांची लहान मुलगी आहे, मी शेतावर काम करू शकत नाही’ असे रेखा म्हणताच संतापलेली सासू रुक्मिणीबाई येडुबा खेत्रे (वय ५४) हिने रेखा हिचे दोन्ही पाय धरले, तर सासरा येडुबा आश्रुबा खेत्रे (वय ५८) याने दोन्ही हात धरले आणि पती रवींद्र येडुबा खेत्रे (वय ३०) याने रेखाच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात रेखा ९० टक्के भाजली. त्यानंतर त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा उपचार सुरू असताना ३१ ऑगस्ट २०१५ रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी रेखा यांच्या मृत्युपूर्व वडोदबाजार पोलिस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत्युनंतर कलम ३०२, ४९८ (अ), ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील शरद बांगर यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. याप्रकरणी नायब तहसीलदार शिवानंद बिडवे व सहायक पोलिस उपनिरीक्षक दौंड यांनी मृत्युपूर्व जबाब नोंदविले व ते खटल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

…तर सहा महिने कारावास
दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यावरून कोर्टाने पती, सासू व सासऱ्याला कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा टोठावली. दंड न भरल्यास आरोपींना सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे, असेही कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात १५ शाळा अनधिकृत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्याच्या शिक्षण विभागाने अनेक पातळ्यांवर तपासणी करूनही जिल्ह्यात १५ शाळा अद्याप अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख या सर्व शाळांच्या संस्थाचालकांना नोटीस बजावली असून, नवीन शैक्षणिक वर्षात पालकांनी या शाळांमधून प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एम. के. देशमुख यांनी केले आहे.
यासंदर्भात देशमुख यांनी सांगितले की, शिक्षण विभागाकडे वर्षभर विविध शाळांबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी काही शाळा अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रशासनाने शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमून अनेक शाळांची चौकशी केली. आमच्याकडे नोंद असलेल्या ठिकाणी शाळा आहे काय, तेथे काय सुविधा आहेत, कोणत्या परवानगीच्या आधारावर या शाळा सुरू आहे, पटसंख्या, शिक्षकसंख्या याची तपासणी करून अहवाल सादर केले होते. त्याआधारे १५ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले.
या शाळांमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते. त्यामुळे पालकांनी नवीन शैक्षणिक वर्षात या शाळांमधून प्रवेश घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण विस्तार अधिकारी लईक सोफी, एस. बी. साळुंके, एस. जी. सावळे; तसेच तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी सादर केलेल्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या सर्व शाळांच्या अध्यक्ष, सचिवांना नोटीस बजावली आहे. त्यात म्हटले आहे, की आरटीईनुसार कोणतीही शाळा शासन प्राधिकरणाकडून मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय स्थापन करता येणार नाही, असे आदेश आहेत.
शासन प्राधिकरणाकडून मान्यता न घेता शाळा सुरू केल्यास संबंधित शाळेस एक लाख रुपये दंड व शाळा सुरू केल्यापासून दहा हजार रुपये प्रतिदिन दंड आकारण्यात येतो. शाळा अनधिकृतपणे सुरू असून, ती त्वरित बंद करावी, मान्यता नसताना शाळा सुरू का करण्यात आली, याचा खुलासा एक महिन्यात करावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

अनधिकृत शाळांची यादी
पॅराडाईज इंग्लिशन स्कूल हडको एन -११ (प्राथमिक), पॅराडाईज इंग्लिश स्कूल नागेश्वरवाडी (प्राथमिक), लिटिल एंजल प्रायमरी स्कूल नागेश्वरवाडी (प्राथमिक), अल्फलाह इंग्रजी प्राथमिक शाळा, पैठणगेट (प्राथमिक), अल्फलाह इंग्रजी प्राथमिक शाळा, चाऊस कॉलनी (प्राथमिक), अल्फलाह इंग्रजी प्राथमिक शाळा, रोशनगेट औरंगाबाद (प्राथमिक), जिजामाता बालक मंदिर रांजणगाव, ता. गंगापूर (माध्यमिक), स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल शरणापूर (ता. औरंगाबाद, प्राथमिक), रॉयल स्टँप इंग्रजी शाळा अब्दीमंडी (ता. औरंगाबाद) (प्राथमिक), छत्रपती राजे संभाजी विद्यालय वडगाव कोल्हाटी (ता. औरंगाबाद) (प्राथमिक), जानकीदेवी पब्लिक स्कूल अंधानेर (ता. कन्नड) (प्राथमिक), रायभानजी जाधव इंग्लिश स्कूल उंबरखेडा (ता. कन्नड) (प्राथमिक), वल्हेगाव प्रायमरी इंग्लिश स्कूल, ता. वैजापूर ( प्राथमिक), हॅपी चाइल्ड स्कूल कमळापूर रोड, वाळूज (ता. गंगापूर) (प्राथमिक), शिवाजी कन्या प्राथमिक शाळा रांजणगाव शेणपुंजी (ता. गंगापूर) (प्राथमिक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायबर ठकांचा तिघांना साडेचार लाखांचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सायबर ठकांनी शहरातील तीन नागरिकांना ऑनलाइन खरेदी करीत चार लाख ४० हजारांचा गंडा घातला. क्रेडिट व एटीएम कार्डची म‌ाहिती विचारून हा प्रकार करण्यात आला. याप्रकरणी सिटी चौक, बेगमपुरा व मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजू विश्वासराव म्हस्के (रा. खडकेश्वर) यांच्या क्रेडिट कार्ड रजिस्टर मोबाइल क्रमांक सुबोध मेहरा नावाच्या आरोपीने बदलत स्वतःचा क्रमांक रजिस्टर केला. हा क्रमांक रजिस्टर करीत असताना म्हस्के यांच्या मोबाइलवर वनटाइम पासवर्डचा मॅसेज आला. मेहरा याने हा पासवर्ड विचारून घेत म्हस्के यांच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल एक लाख ७० हजार रुपयांची ऑनलाइन खरेदी केली. हा प्रकार ७ जून ते १२ जूनच्या दरम्यान घडला. याप्रकरणी म्हस्के यांनी मंगळवारी सिटी चौक पोलिस ठाणे गाठून संशयित आरोपी सुबोध मेहरा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद हनिफ मोहम्मद इब्राहीम (वय ४४ रा. आसेफिया कॉलनी) यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड आहे. त्यांच्या मोबाइलवर शनिवारी सकाळी सात वाजता अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. बँकेतून बोलत असल्याची थाप मारीत त्याने एटीएम कार्डची सगळी म‌ाहिती विचारून घेतली. यानंतर मोहम्मद हनिफ यांच्या बँकेच्या क्रांती चौक येथील शाखेतून ऑनलाइन एक लाख २० हजार रुपये वळते करण्यात आले. या प्रकरणी मोहम्मद हनिफ यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर ठकाने तिसऱ्या घटनेत अॅड. अप्पाराव भीमराव खारोसेकर (वय ५८, रा. मायानगर, एन २) यांची फसवणूक केली. त्यांना मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. समोरील व्यक्तीने अॅड. खारोसेकर यांच्या एटीएम कार्डची माहिती विचारून घेतली. त्यानंतर काही वेळातच अॅड. खारोसेकर यांच्या खात्यातून ऑनलाइन ४८ हजारांची खरेदी करण्यात आल्याचा मॅसेज त्यांना आला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अॅड. खारोसेकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६४ तालुक्यांत दमदार पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठवाड्यावर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही जून महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने कृपादृष्टी केली आहे. अवघ्या १२ दिवसांमध्ये मराठवाड्यातील ७६पैकी ६४ तालुक्यांमध्ये आतापर्यंत अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. विभागात आतापर्यंत १०४ मिलिमीटर पाऊस झाला असून, अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात १५६.६ टक्के पाऊस झाला आहे.
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दुष्काळाने नेहमीच होरपळलेल्या बीडमध्ये प्रारंभीपासूनच दमदार पाऊस सुरू असून, नांदेड वगळता मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या दहा दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, उमरी, माहूर, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद व नायगाव तालुक्यांमध्ये, लातूर जिल्ह्यातील जळकोट, ‌हिंगोली जिल्ह्यातील वसमत, जालना जिल्ह्यातील बदनापूर, तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात कमी पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याला पावसाने सर्वाधिक झोडपले असून, जून महिन्यातच तुळजापूर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल २९.१ टक्के (एकूण २३२ मिली मीटर) पाऊस झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यात वार्षित सरासरीच्या तुलनेत २७ टक्के, तर उमरगा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत २६.६ टक्के पाऊस झाला आहे.

मराठवाड्यातील पाऊस
जिल्हा..........आजपर्यंत अपेक्षित पाऊस.......पडलेला पाऊस......टक्क्केवारी
औरंगाबाद...............६१.३३...............................९४.५१..............१५१.४
जालना....................६४.८१...............................९०.६५..............१३९.९
परभणी...................५९.०९...............................८४.५२..............१४३.१
हिंगोली...................७८.६१...............................१०४.२२.............१३२.६
नांदेड......................७६.९३..............................७३.८०...............९५.९
बीड........................५९.७५..............................११०.६६..............१८५.२
लातूर......................६७.८१...............................१३१.७८..............१९४.३
उस्मानाबाद..............७६.२०...............................१६२.१६..............२१२.८
एकूण......................६८.७.................................१०६.५६..............१५६.५
(पाऊस मिलीमीटरमध्ये, १३ जूनपर्यंतची स्थिती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पती, सासूकडून महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
पोलिस असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेऊन पतीने रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार वडोदबाजार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पीडित महिला फुलंब्री पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई असून तिचा पती महावितरणच्या औरंगाबाद येथील छावणी कार्यालयात कार्यरत आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, तक्रारदार महिला पोलिसाचा गजानन रघुनाथ आढाव यांच्यासोबत २४ एप्रिल २०१६ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर मला दोन ते तीने महिने चांगले वागवले व त्यानंतर पती व सासू कौशल्या आढावा यांनी सतत पैशाची मागणी केली. दुसरीशी लग्न केले असते तर १५ लाख रुपये हुंडा द्यायला तयार होते, औरंगाबाद येथे फ्लॅट घेण्यासाठी आई-वडिलांकडून १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. पैसे देण्याची लायकी नसल्याचे म्हणत पती गजानन आढाव व सासू कौशल्या आढाव हे शारीरिक व मानसिक छळ केला. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात राॅकेलची कॅन आणून अंगावर ओतली, सासू माचिस आणण्यासाठी गेल्या असता आरडाओरडा केली असता शेजाऱ्यांनी धाव घेतली व समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण, पतीने गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध कलम ३०७, ४९८ अ, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ रामोड हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल मेडिकल युनिट चालविण्यास मान्यता

0
0

औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद महापालिकेसाठी शासनाने मोबाइल मेडिकल युनिट चालवण्यासाठी मंजुरी दिली आहे. हे युनिट झोपडपट्टी भागात २४ तास उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी कळविली आहे.
मेडिकल युनिटसंदर्भात आरोग्य सेवा आयुक्तांकडे २०१४-१५मध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आता या युनिटला मंजुरी मिळाली आहे. युनिटचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. त्याचा महापालिकेवर बोजा पडणार नाही, असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत यापूर्वी महापालिकेला आठ नवीन आरोग्य केंद्रांचे बांधकाम, नऊ आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, दोन रुग्णालयांच्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळाली आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून, नवीन आरोग्य केंद्र बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी एक कोटी ९० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारवालांची निवड संकटात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नगरसेवक गजानन बारवाल यांच्या स्थायी समितीवर झालेल्या निवडीबद्दल स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करा, अशी सूचना करणारे पत्र राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने महापालिकेच्या आयुक्तांना पाठवले आहे. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
गजानन बारवाल यांच्या महापालिकेच्या स्थायी समितीवर झालेल्या निवडीला त्यांचे प्रतिस्पर्धी संजय बारवाल यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांसह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या २९ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ९८७नुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३१ (अ)अन्वये स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागांवर महापालिका सदस्यांमधून गटांच्या तौलनिक संख्याबळानुसार आठ सदस्यांची नियुक्ती केली जाईल, परंतु महापालिकेने नऊ सदस्यांची नियुक्ती केली. नऊ सदस्य नियुक्त करण्याचा ठराव बेकायदा आहे. गजानन बारवाल यांचे स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. याप्रकरणी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. संजय बारवाल यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनाला सादर करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

नऊ सदस्य संकटात सापडण्याची शक्यता
संजय बारवाल यांनी ज्या अधिनियमाच्या आधारे तक्रार केली आहे, त्याच्या तरतूदी शासनाने ग्राह्य धरल्यास केवळ गजानन बारवाल यांचेच नव्हे, तर २९ एप्रिल रोजी सर्वसाधारण सभेने केलेली नऊ सदस्यांची निवड रद्द होऊ शकते, असे मानले जात आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमात स्थायी समिती सदस्याने राजीनामा देण्याची तरतूद नाही. त्यामुळे एका सदस्याचा राजीनामा घेऊन दुसऱ्या सदस्याची निवड कशी काय केली जाऊ, शकते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या धडकेत एक ठार; पत्नी, मुलगा गंभीर जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
शहरातील संभाजी राजे चौकात एसटी बस व मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, त्यांची पत्नी व सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला. शेख अनिस (वय ३५), असे मृताचे नाव आहे. फरजाना बेगम (वय ३०) व मुलगा शेख हुजैफ (वय ६, रा. सर्व उंडनगाव ता. सिल्लोड) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकीचा चुराडा झाला.
शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद-जळगाव रोडवर राजे संभाजी चौक आहे. या चौकातून औरंगाबादहून सिल्लोडकडे येणारी वैजापूर डेपोची बस (एम एच १४ बीटी २४५९) व सिल्लोड येथून औरंगाबादकडे जाणारी मोटारसायकल (एम एच २० डी बी ८६४०) यांचा अपघात झाला. मोटारसायकल बसच्या पुढील चाकात आल्याने शेख अनिस, पत्नी शेख फरजना बेगम व शेख हुजैफ हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाटी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. शेख अनिस यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. शेख फरजाना व शेख हुजैफ यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊस क्षेत्रात वाढ; कारखान्यांना ‘अच्छे दिन’

0
0

Makarand.Kulkarni@timesgroup.com
Tweet : @makrandkMT
औरंगाबाद ः कायम दुष्काळाच्या गर्तेत असलेल्या मराठवाड्याला यंदा काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे उसाच्या उत्पादनात तिप्पट वाढ अपेक्षित आहे. विभागात १३ सहकारी तर ८ खासगी आहेत. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने सर्व २१ कारखाने सुरू होतील, असा अंदाज आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे आलेल्या अहवालानुसार मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह जळगाव, नंदूरबार व धुळ्यात झालेल्या उसलागवडीतून उसाचे ६४.७५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा तिप्पट असल्याने यंदा मराठवाड्यात साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होण्याची शक्यता आहे.
नगदी पिकात उसाला प्राधान्य दिले जाते. मराठवाड्यातील विशिष्ट टापूत उसाची लागवड केली जात होती, पण गेल्या काही वर्षांत पाण्याच्या उपलब्धततेनुसार उसाचे क्षेत्र वाढले. गेल्यावर्षी मराठवाड्यात गंभीर दुष्काळ होता. विशेष म्हणजे २०१५मध्येही मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे चटके बसले होते. त्यामुळे सलग दोन वर्षे औरंगाबाद विभागातील उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर घटली होती. २०१६मध्ये औरंगाबाद, बीड, जालना, जळगाव, नंदूरबार आणि धुळ्यातील एकूण क्षेत्रात केवळ २१ लाख टन उसाचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी सिंचन प्रकल्पांची झालेली कामे आणि त्यात चांगला पडलेला पाऊस यामुळे सर्वच जिल्ह्यांमध्ये उसाचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी यंदा उसाचे बंपर उत्पादन होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा २१३२५.३० हेक्टर, जालना २३७९१.१७, बीड ३६०४९.५५, जळगाव ९३३०.९५ हेक्टर, नंदूरबार जिल्ह्यात १७३८७.६८ हेक्टर उसाची लागवड झाली. विभागात एकूण १०७८८४.६५ हेक्टर उसाची लागवड झाली. त्यात जुन्या (खोडवा) उसाचे प्रमाण २६२३५. १२ हेक्टर एवढे होते. उसाची ४५५९४.९४ हेक्टरवर नव्याने लागवड केली आहे. साखर सहसंचालक विभागाने गेल्या महिन्यात ऊस क्षेत्राचा आढावा घेतला. त्यातून ६४.७५ लाख हेक्टर उस उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट असल्याने यंदा मराठवाड्यात साखरेचे तिप्पट उत्पादन होईल, अशी चिन्हे आहेत.

जिल्हानिहाय अपेक्षित उस उत्पादन
औरंगाबाद : १२.८० लाख टन
जालना : १४.२७ लाख टन
बीड : २१.६३ लाख टन
जळगाव : ५.८० लाख टन
नंदूरबार : १०. २५ लाख टन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजपूत यांच्यावरील आरोप बिनबुडाचे; चौकशीत स्पष्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्याविरुद्ध आघूर (ता. वैजापूर) येथील भीमराज त्रिंबक गायकवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेतील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गायकवाड यांचा तक्रार अर्ज निकाली काढला आहे. याप्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
वैजापूर तालुक्यातील आघूर येथील भीमराज त्रिंबक गायकवाड यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात २०१६ मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेत राजपूत यांनी राजपूत भामटा ही जात विमुक्त जातीमध्ये येत असताना बाजार समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक चुकीच्या पद्धतीने ओबीसी प्रवर्गातून लढवून जिंकली व शासनाची फसवणूक केली. आघूर शिवारातील हाळपट्टीची आठ हेक्टर जमीन बळकावली, असे आरोप केले होते. ही याचिका खंडपीठात दाखल झाल्यानंतर कोर्टाने शासनाला गायकवाड यांच्या दोन्ही अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुनावणी घेतली. यावेळी सादर करण्यात आलेल्या अभिलेखे व महसूल विभागाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता आघूर शिवारातील गट क्रमांक १२१ मधील जमीन ही वारसाहक्काने दीपकसिंग राजपूत यांच्या ताब्यात असून त्यातील १५ गुंठे क्षेत्र हे राजपूत यांनी गावाच्या विकासासाठी दानपत्राद्वारे दिल्याची नोंद आहे. तसेच दीपकसिंग यांची राजपूत भामटा ही जात ओबीसीमध्ये येत असल्याने तक्रारीत तथ्य नसल्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे. दीपकसिंग यांच्यातर्फे अॅड. जी. जे पहिलवान यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५५ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
इंजिनीअरिंगमधील बेसिक ब्रँच असलेल्या मेकॅनिकलची क्रेझ आजही कायम आहे. श्रीयश इंजिनीअरिंगमध्ये बुधवारी झालेल्या ‘जॉब फेअर’मध्ये मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांना मागणी असल्याचे चित्र होते. २६पैकी १५ कंपन्या मेकॅनिकल शाखेशी संबंधित होत्या. जॉब फेअरमध्ये ४५५ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. त्यात डिप्लोमा, आयटीआयच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.
श्रीयश इंजिनीअरिंग कॉलेजतर्फे आज जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या सभागृहात सकाळी दहापासून प्रक्रिया सुरू झाली. त्यात २६ नामवंत कंपन्या सहभागी झाल्या. प्रारंभी काही कंपन्यांनी लेखी, ऑनलाइन टेस्ट घेऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. मुलाखतींचा टप्पा दुपारच्या सत्रात पूर्ण झाला.
पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंग, बीएस्सी, एमसीव्हीसी, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जॉब फेअरसाठी बोलावण्यात आले. त्यात सर्वाधिक डिप्लोमा आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. जॉब फेअरसाठी १ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी सुमारे ७४० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यातून ४५५ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात सर्वाधिक पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानंतर आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा क्रमांक लागतो. यशस्वी विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. आर. एस. पवार, संचालक डॉ. उत्तम काळवणे यांनी अभिनंदन केले.

‘मेकॅनिकल’ आघाडीवर
जॉब फेअरसाठी मेकॅनिकल शाखेशी निगडित कंपन्यांची संख्या अधिक होत. २६पैकी १५ कंपन्या या मेकॅनिकल, ३ इलेक्ट्रिकल, ३ सॉफ्टवेअर, ४ इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राशी संबंधित होत्या. नोकरीमध्ये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना पसंती देण्यात आल्याचे चित्र आहे. त्यात मेकॅनिकलसह इलेक्ट्रिकल, सिव्हिल शाखांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आयटीआयमध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, सीएनसी ऑपरेटर शाखांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १२ ते १५ हजार रुपये प्रतिमहिना वेतन देण्याचे कंपन्यांनी मान्य केल्याचे कॉलेज प्रशासनाने सांगितले.

‘व्यक्तिमत्व विकास’वर भर हवा
निवडीची प्रक्रिया विविध तीन ते चार टप्प्यांत पार पडली. त्यात सुरुवातीला अॅप्टिट्यूड टेस्ट घेण्यात आली. संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास व मुलाखत अशी प्रक्रिया पार पडली. त्यात विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे निरीक्षण काही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले.

जॉब फेअरचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आले होते. उपलब्ध ‌‌डिप्लोमा इन इंजिनीअरिंग, आयटीआयचे विद्यार्थी चांगले होते.
- वर्षा करडखेडकर, एचआर विभाग, ऋचा ग्रुप

जॉब फेअरमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. १४००पेक्षा अधिक विद्यार्थी होते. त्यातून ४५० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. अनेक कंपन्यांनी निरीक्षण नोंदणविले. त्यानुसार मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
- प्रा. दीपक पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार सत्तारांची शेतकऱ्याला मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
दहेगाव (ता. सिल्लोड) येथे एका शेतकरी कुटुंबाला आमदार अब्दुल सत्तार, त्यांचा मुलगा नगराध्यक्ष अब्दुल समीर व इतरांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शेख खलील शेख इब्राहीम, शेख मुख्तार शेख सत्तार, शेख अब्दुल रहीम शेख करीम यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदारांची वडिलोपार्जित जमीन दहेगाव शिवारात गट नंबर ३६ व ३८मध्ये आहे. ते १२ जून रोजी येथे मका पेरत असताना आमदार शेख अब्दुल सत्तार, सिल्लोडचे नगराध्यक्ष शेख समीर अब्दुल सत्तार, शेख वसीम, शेख यासेर व शेख नईम व इतर २० ते ३० शेतात आले. आमदार सत्तार यांनी, ही जमीन माझी असून, तुम्ही येथून निघून जा, येथे पाय ठेऊ नका, असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. ‘आम्ही गरीब लोक असून ही वडिलोपार्जित जमीन आहे. येथे मेहनत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो,’ अशी विनंती केली, मात्र आम्हाला मारहाण केली, असे अर्जात म्हटले आहे.
आमदारांच्या सोबत आलेल्या २५ ते ३० जणांनी मारहाण केली. त्यानंतर आम्ही त्यांच्या तावडीतून सुटून पळत असताना पाठलाग करण्यात आला. यावेळी आमच्या जिवाचे बरेवाईट झाले असते. या घटनेमुळे कुटुंबीय व आम्ही भयभीत झालो आहोत, असे तक्रारीत म्हटले आहे. हे राजकीय कुटुंब असल्याने आमचे व आमच्या कुटुंबांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी विनंती तक्रारीत करण्यात आली आहे.
याप्रकरणी तपास सुरू असून, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिली. सध्या तरी कलम १४५नुसार त्या जमिनीत दोघांनीही जाऊ नये, यासाठी पायबंद करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

प्रकरणाशी संबंध नाही; भाषा मात्र चुकीची
औरंगाबाद ः दहेगाव (ता. सिल्लोड) शेतीच्या वादातून झालेल्या उद्भवलेल्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. मला ती शेती खरेदी करायची नाही. शेतीच्या वादातून तेथे मारहाण सुरू होती. मी सोडवण्यासाठी पुढे गेलो. माणुसकीच्या नात्याने मध्यस्थी केली, पण तेथे बोलण्याचा तोल ढासळला. मी चुकीची भाषा वापरली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत आमदार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना कबुली दिली.सखाराम कल्याणकर, भिकन सपकाळ व परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते. आमदार सत्तार यांनी शेतकऱ्यास मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘भूमिगत’प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून केल्या जात असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून त्याची सीबीआय मार्फत चौकशी करा,’ अशी मागणी करणारे पत्र नगरसेवक कैलास गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
भूमिगत गटार योजनेचे काम निकषानुसार झालेले नाही अशा तक्रारी पालिका प्रशासनाकडे वारंवार केल्या जात होत्या. याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. यंदा पहिल्याच पावसात या योजनेच्या माध्यमातून केलेले काम उघड झाले. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पालिका आयुक्तांकडे या योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. ‘भूमिगत योजनेसाठी फोट्रेस कंपनीची पीएमसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पीएमसीने कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. ‘डीपीआर’मध्ये सहा एसटीपींचा समावेश केला. प्रत्यक्षात दोन एसटीपी रद्द करण्यात आले. ही वेळ कशामुळे आली. पीएमसीने व योजनेचे प्रमुख म्हणून ज्या अधिकाऱ्याने सुरुवातीपासून काम केले त्यांना दोन एसटीपी रद्द करण्याबद्दलचा विचार योजनेचे काम सुरू करण्यापासून का केला नाही. या योजनेचे सर्वेक्षण कशाच्या आधारावर केले. या योजनेचे काम करताना शासनाच्या, महापालिकेच्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग करण्यात आला नाही. त्यामुळे निधी वाया गेला. महापालिकेच्या हिताच्या विरोधात निर्णय घेण्यात आल्याचे यातून स्पष्ट होते. यासह अन्य अनियमिततेचा विचार करून भूमिगतच्या कामाची सीबीआय मार्फत चौकशी करावी,’ असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शाळांच्या ‘सेटिंग’ने ठराविक दुकानांत गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गुरुवारपासून (१५ जून) बहुतांश शाळा सुरू होत असताना शहरातील जवळपास २००पैकी केवळ पाच ते सात दुकांनात ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. शाळांच्या ‘सेटिंग’मुळे हा प्रकार होत असल्याची चर्चा आहे.
यंदा शहरातील बड्या आणि मोठ्या नामांकित शाळांनी ठराविक दुकानांमधूनच पुस्तके, वह्या, शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी सक्तीचे केले आहे. मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी मिळून शहरात ८६१ शाळा, आयसीएससी ३ आणि सीबीएससी पॅटर्नच्या १७ शाळा आहेत. सगळ्या शाळांपैकी शहरातील ठराविक सीबीएससी, आयसीएससी पॅटर्न शाळांनी शहरातील ठराविक दुकानदाराकडूनच वस्तू, गणवेश खरेदी करणे सक्तीचे केल्याने सुमारे २०० हून अधिक व्यापारीवर्गाची गुंतवणूक वाया जाणार असल्याची भीती ते व्यक्त करत आहेत.
सध्या दीड कोटींहून अधिक गुंतवणूक व्यापारीवर्गाने या शालेय साहित्य विक्रीत केलेली आहे. कमिशनच्या नावाखाली शाळांना सुमारे २५ ते ३० टक्के दिले जात आहेत. याशिवाय काही आकर्षक गिफ्टही दिले जात आहेत. यामुळे अशी ‘सेटिंग’ न करणारे व्यापारी बाजारपेठेत ठप्प झाले आहेत. व्यवसायावर परिणाम झाला आहे. यातून किमान दीड कोटींचे नुकसान होईल, अशी शंका व्यापारी व्यक्त करत आहेत.

औरंगुपरा व इतर परिसरातील ठराविक पाच ते सहा दुकानदारांनी शाळांशी सेटिंग करत किमान १० ते २५ टक्के कमिशन देणे सुरू केले आहे. याचा परिणाम इतर व्यापारी वर्गावर होत आहे. यातून जर मराठी शाळांनी तारले तरच आमचा व्यवसाय होईल, पण तेही आगामी दोन-चार दिवसांत कळेल. - विशाल डोणगापुरे, संचालक, छाया बुक्स प्रायव्हेट लिमिटेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पालिका उपायुक्तपदाला मान्यता नाही

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद
उपायुक्त पदाला मंजुरी न दिल्याप्रकरणी महापालिका अधिकारी अयुब खान यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेत शासनाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. न्या. अनुप मोहता व न्या. सुनील कोतवाल यांच्या खंडपीठासमोर प्रकरणात बुधवारी सुनावणी झाली.
११ जून २०१५ रोजी अयुब खान यांना पालिकेने उपायुक्तपदी पदोन्नती दिली. या पदोन्नतीला शासनाने मान्यता दिली नाही. मुंबई महापालिका अधिनियमचे कलम ४५१ नुसार हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला खान यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. पालिकेत एकूण चार उपायुक्त पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे शासनातर्फे तर दोन पदे पालिकेच्यावतीने भरण्यात येतात. पालिकेच्या कोट्यातून पदोन्नती देण्यात आली. तरीही शासनाने पदाला मंजुरी दिली नाही, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला.
नगरसेवक विकास येडके यांनी खान यांच्या पदोन्नतीला शासनाकडे आव्हान दिले होते. उपायुक्तपदी देण्यात आलेली पदोन्नती बेकायदा असल्याचे म्हणणे येडके यांनी मांडले होते. तसेच पालिकेत तीन उपायुक्त व एक कर निर्धारक/संकलक अशी पदाची रचना आहे. त्यामुळे उपायुक्तांचे चौथे पद भरण्याविषयी येडके यांनी आक्षेप नोंदविला. तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी किशोर बोर्डे, आशिष पवार व बी. एल. जाधव हे तीन उपायुक्त असल्याचा अहवाल शासनाला सादर केला. त्यामुळे खान यांच्या पदाला शासनाने मंजुरी दिली नाही.

उत्तरासाठी शासनाला वेळ
खान यांच्या याचिकेसोबतच नगरसेवक येडके यांनीही याचिका दाखल केलेली आहे. शासनाने घेतलेली भूमिका योग्य असल्याचा युक्तीवाद पालिकेचे वकील संजीव देशपांडे यांनी केला. या सुनावणी दरम्यान शासनाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला. त्यास कोर्टाने मंजुरी दिली. शासनाची बाजू अनिकेत देशमुख यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...बरसल्या मोत्यांच्या धारा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मान्सून उंबरठ्यावर असतानाच शहरात पुन्हा एकदा पावसाने दमदार बॅटिंग केली. अवघ्या दोन तासांमध्ये चिकलठाणा वेधशाळेमध्ये परिसरात तब्बल ४०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गेल्या तीन दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने दुपारी अडीच वाजता बरसण्यास सुरुवात केली. शहरातील मुकुंदवाडी, चिकलठाणा, बीड बायपास, सातारा परिसर, सिडको, हडको, औरंगपुरा, हर्सूल, क्रांतीचौक, ज्योतिनगर, शाहनूरमिया दर्गा परिसर, गारखेडा, शहागंज, सिटीचौक, विद्यापीठ परिसर, नंदनवन कॉलनी, रोशनगेट, बाबा पेट्रोलपंप, किराडपुरासह जुने शहर तसेच शहर परिसरामध्ये दमदार पाऊस झाला. पावसामुळे महापालिकेच्या कामांचे पितळ उघडे पडले असून, बजरंग चौक ते कामगार कल्याण केंद्रापर्यंत सुरू असलेल्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. काम झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण केले नसल्यामुळे या ठिकाणी माती टाकण्यात आली असल्यामुळे थोड्या पावसानंतरच येथे चिखल होतो. गेल्या पावसामध्ये येथे काही वाहने फसल्याच्या घटना घडल्या होत्या. गारखेडा परिसरातील गजानन महारज मंदिर चौकातही रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पावसात या भागातील वाहनधारकांची तारांबळ उडाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images