Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

३२३ शिक्षणसेवकांच्या शिक्षक म्हणून नियुक्त्या

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या ३२३ शिक्षणसेवकांना सोमवारी बऱ्याच प्रतीक्षेनंतर शिक्षक म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या. त्रुटी असलेल्या ३८ शिक्षणसेवकांचे प्रस्ताव पुन्हा तपासून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

शेंद्य्रातील जमीनविक्री तात्काळ थांबवा

$
0
0
शेंद्रा गाव परिसरातील शेती, सीलिंगच्या जमीनी, हस्तांतरीत न होणारी शेती बिल्डरच्या घशात घालण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. शेतामध्ये गैरमार्गाने अनाधिकृत बांधकाम होत आहेत.

पंचायत विभागातर्फे आजपासून करवसुली

$
0
0
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे मंगळवारपासून दोन दिवस जिल्हाभरात ग्रामपंचायतींतर्गत पाणीपट्टी, घरपट्टी वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे.

सिंचनाच्या कामामध्ये ग्रेडिंग तोडून टाका

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातील कामाचे समान वाटप करावे, अशी मागणी शिवसेना सदस्य संगीता सुंब यांनी झेडपी ‘सीर्इओं’कडे केली आहे. यासंदर्भात सुंब यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

प्रश्न सुटणार नसतील तर, अधिवेशन कशासाठी?

$
0
0
मराठवाड्यातील सर्वच आमदारांनी आगामी हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणे अनिवार्य ठरणार आहे. मराठवाड्याचे प्रश्न कोणाचे वैयक्तिक नाहीत, तर मराठवाड्यातील संपूर्ण जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे.

लाइन ब्लॉकमुळे ‘एक्स्प्रेस’ झाल्या ‘पॅसेंजर’

$
0
0
मानवत रेल्वे मार्गावर भुयारी मार्गाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या रेल्वे लाइन ब्लॉकमुळे सचखंड एक्स्प्रेस आणि तपोवन एक्स्प्रेस या रेल्वेचा प्रवास नांदेडपर्यंत पॅसेंजरप्रमाणे राहिला.

सातारा-देवळाई पालिकेचा प्रस्ताव सादर

$
0
0
सातारा-देवळाई एकत्रित महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने नगर विकास विभागाकडे सादर केला आहे.

पाण्यासह अन्य प्रश्नावर आमदारांची वज्रमूठ

$
0
0
जायकवाडी प्रकल्पासह समन्यायी पाणी वाटप, तसेच अन्य महत्त्वाचे प्रश्न, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मराठवाड्यातील सर्व आमदार संघटित होऊन आक्रमकपणे हा प्रश्न मांडतील, असा निर्धार मराठवाडा जनता विकास परिषदेच्या येथे सोमवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.

सेनेचे बॅनर फाडले कन्नडमध्ये तणाव

$
0
0
तहसील कार्यालय व नगर परिषदेजवळील शिवसेनेचे बॅनर फाडल्यामुळे सोमवारी काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले बॅनर फाडणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसेनेने पोलिसांकडे केली आहे.

उद्यानावरून युतीमध्ये 'कारगिल'

$
0
0
गारखेड्यातील कारगिल उद्यानावरून महापालिकेत भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत छुपे युद्ध सुरू झाले आहे. जिल्हा सैनिक कल्याण मंडळाला कारगिल उद्यान विकसित करण्यासाठी जागा देण्याचा ठराव स्थायी समितीत मंजूर झाला आहे.

मराठवाड्यात जोरदार पाऊस

$
0
0
आंध्र प्रदेशातील हेलन वादळामुळे मराठवाड्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद तालुक्यात सर्वांधिक ४०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

'स्टिंग'मुळे केजरीवालांची जादू गुल

$
0
0
एका वेबसाइट मीडियाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे ‘आम आदमी पार्टी’च्या स्वच्छ प्रतिमेला तडा गेला आहे, त्यांची हवा गुल झाली आहे,’ अशी टीका ‘टीम अण्णा’चे माजी सदस्य स्वामी अग्निवेश यांनी केली आहे.

१३, २६ तारखांवर हल्ल्यांचे 'ढग'

$
0
0
कोणत्याही महिन्याच्या १३, २६ या तारखा सामान्य नागरिकांसाठी फार वेगळ्या नसतात. मात्र, पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा विशेषत: दहशतवादविरोधी पथकांकडून या तारखांना विशेष लक्ष देऊन संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यात येते.

बलात्कारानंतर जाळण्याचा प्रयत्न

$
0
0
होमगार्ड जवानाने १९ वर्षांच्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे सोमवारी रात्री घडली.

मका व्यापारी अडचणीत​

$
0
0
वाळवणीसाठी बाजार समिती आवारात टाकलेला शेकडो क्विंटल मक्याचे पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने आडत व्यापारी अडचणीत सापडला आहे. वाळवणीसाठी दुसऱ्यादा खर्च करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली असून प्रति क्विंटल २५० ते ४०० रुपयाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

‘लेव्ही’तून निधीचा प्रस्ताव

$
0
0
शासनाने राज्यभरातील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या उभारणीत निधीची सर्वांत मोठी अडचण होणार आहे.

रिक्षा चालवून हाती काही नाही

$
0
0
‘साहेब... मी पंचवीस वर्षांपासून रिक्षा चालवितो... या काळात मी कितीतरी प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळापर्यंत पाहोचवले; मात्र यातून मला मात्र फारसे काही मिळाले नाही. माझ्याकडे हक्काचे घर नाही, नावावर आहे ते फक्त रिक्षाचे परमिट

​बेकायदा बांधकामांवर कारवाई का नाही?

$
0
0
अकृषक परवाने (एनए) नियमित करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई का केली जात नाही, असा थेट सवाल अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी सातारा ग्रामपंचायतीच्या बैठकीत सोमवारी (२५ नोव्हेंबर) केला.

पेशंटसाठी घाटीत ‘सेंट्रल ऑक्सिजन’

$
0
0
घाटी हॉस्पिटलमधील मेडिसीन व सर्जरी विभागासाठी सेंट्रल ऑक्सिजनचा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळखात पडून होता. यासाठी आवश्यक असणारे लायसन्स घाटी हॉस्पिटलला अखेर मिळाले आहे. त्यामुळे दोन महिन्यांत सेंट्रल ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकरा हजार बांबूंची लागवड

$
0
0
पडिक जमिनीवर हिरवळ फुलविणाऱ्या सातारा येथील ‘भारत बटालियन’मध्ये मिशन बांबू लागवडीचा पहिला टप्पा जवानांनी यशस्वीपणे पार केला आहे. अवघ्या पाच महिन्यांमध्ये अकरा हजार बाबूंची लागवड करण्यात आली
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images