Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जुन्या मोंढ्यातील हमालांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी, सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली कष्टकरी, हमाल, कामगारांनी सोमवारी जुना मोंढ्यात थकित मजुरी मिळण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, व्यापारी व कामगार संघटनांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन कामगार उपायुक्त कार्यालयातील बैठकीत मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल चौधरी यांनी दिली.
मजुरीत वाढ करण्याचा निर्णय १ जानेवारी २०१५ रोजी झाला असतानाही जुना व नवीन मोंढा येथील अनेक व्यापारी नवीन दराप्रमाणे मजुरी देत नसल्याने आंदोलन पुकारण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड, कार्याध्यक्ष संतोष जगताप, सरचिटणीस सचिन अहिरे, सहसरचिटणीस दीपक खोतकर आदींसह पदाधिकारी, कष्टकरी उपोषणात सामील झाले.
माथाडी बोर्डाने थकित मजुरी बोर्डात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. पण, काही व्यापारी त्यास जुमानत नाही, कायद्याचे पालन करत नाही, असा आरोप आंदोलनकांनी थकबाकी मिळावी व नवीन दराप्रमाणे नियमित मजुरी द्यावी या मागण्यात आहेत. व्यापारी व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची सोमवारी सायंकाळी कामगार उपायुक्त अभय गिते यांच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत तोडगा काढण्यासाठी एक आठवड्यात बैठक घेण्याचे ठरवण्यात आले, अशी माहिती संघटनचे अध्यक्ष चौधरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नाच्या एक महिन्यात विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लग्न होवून महिनाही उलटला नसताना एका नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी रात्री बीडबायपास जवळील नाईकनगर भागात घडला. पूजा विशाल बोर्डे (वय २०, रा. नाईकनगर) असे या विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी‌ दिलेल्या माहितीनुसार, पूजा यांचे लग्न २३ मे रोजी सोयगाव तालुक्यातील विशाल बोर्डे याच्यासोबत पारंपरिक पद्धतीने झाले होते. लग्नानंतर पूजा आणिा विशाल दोघेही शहरातील बीडबायपास येथील नाईकनगर येथे भाड्याने राहत होते. घरी कोणी नसताना पूजाने रविवारी छताला दोरी अडकवून गळफास घेतला. त्यांना पोलिसांनी बेशुद्धावस्थेत घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशीनाथ लाटे, संपत राठोड हे करीत आहेत.

पतीवर छळाचा आरोप
लग्नात ३५ हजार रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. त्यापैकी पाच हजार रुपये द्यायचे बाकी होते. या रक्कमेसाठी विशाल पूजाचा छळ करीत होता. छळाला कंटाळूनच पूजाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृत विवाहितेचे वडील दिलीप येलदोडे यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद-दिल्ली फक्त दोन हजारांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद ते दिल्ली विमानाची वारी फक्त दोन हजार रुपयांत शक्य होणार आहे. एअर इंडियाने श्रावण योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना २१ जूनपर्यंत तिकीट बुकिंग करावी लागणार आहे.
पावसाळ्यात विमान प्रवाशांची संख्या कमी होत असते. या काळात विमान प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी विविध कंपन्यांकडून विविध ऑफर दिल्या जातात. एअर इंडियाने एक जुलै ते २० सप्टेंबर यादरम्यान प्रवास करण्यासाठी श्रावण विशेष योजना जाहीर केली आहे. देशांतील सर्व मार्गांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
औरंगाबाद ते मुंबई या मार्गावर प्रवाशांना हवाई प्रवासासाठी आठ ते १२ हजार रुपये मोजावे लागतात. तीन ते चार महिने आधी बुकिंग केल्यानंतर हवाई प्रवाशाचे दर सात ते आठ हजारांपर्यंत कमी होतात, मात्र एअर इंडियाच्या ‘७०६ श्रावण योजने’त २१ जूनपर्यंत तिकीट बुक केल्यास फक्त १२०० रुपयात हवाई प्रवास करता येईल.
औरंगाबाद ते दिल्ली मार्गावर प्रवासासाठी या योजनेत तिकीट बुकिंग केल्यास २००० ते २२०० रुपये खर्च येईल, अशी माहिती एअर इंडियाचया अधिकाऱ्यांनी दिली.

जेट एअरचीही ऑफर
जेट एअरवेजने आपल्या विमान प्रवाशांसाठी मोबाइलद्वारे तिकीट बुकिंगवर विविध ऑफर ‌जाहीर केल्या आहेत. याशिवाय विशेष अॅपद्वारे तिकीट बुकिंगसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश बोरसेला दुसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा नातेवाईक असल्याचे सांगत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपी गणेश बोरसे याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला बुधवारपर्यंत (२१ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. जी. एम. शेख यांनी दिले.
याप्रकरणी श्रीनिवास श्रीपाद कुलकर्णी (रा. सिडको, औरंगाबाद) यांना शहरातील सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गणेश साहेबराव बोरसे पाटील (वय ४६, रा. करजगाव, ह. मु. अंजली रेसिडेन्सी) याने पैठण एमआयडीसी येथे व्यावसायिक प्लॉट मिळून देण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव सांगून फिर्यादीकडून अडीच लाख रुपये घेतले होते. सहा महिन्यानंतरही प्लॉटबाबत काहीच न केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार केली होती. याप्रकरणी आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यातून ताब्यात घेऊन सोमवारी (१९ जून) कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून रक्‍कम हस्तगत करणे बाकी आहे, तसेच आरोपीचे कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साई’च्या कारवाईत दिरंगाई कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सामूहिक कॉपी प्रकरणी साई इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटचे संलग्नीकरण रद्द करण्याच्या निर्णयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने चालढकल सुरू केली आहे. विद्यापीठाने नेमलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पाठवण्यात येणार आहे. पोलिसांचा अहवाल आणि विद्यापीठाचा अहवाल तपासून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. या अहवालावर विद्या परिषदेच्या बैठकीत मंगळवारी विशेष चर्चा करण्यात येणार आहे.
चौका येथील साई इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. ‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शन’ विषयाचा पेपर सोडवत असताना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरातून २८ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. प्राचार्य, उपप्राचार्य यांनाही पोलिसांनी अटक केली. आतापर्यंत एकूण ३१ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी उत्तरपत्रिका विद्यापीठाने परीक्षा विभागात आणणे अपेक्षित असते, मात्र उत्तरपत्रिकांचे गठ्ठे संबंधित कॉलेजात ठेवल्यामुळे रात्री कॉपीचा प्रकार घडत होता. इंजिनीअरिंगच्या परीक्षेत घडलेल्या गैरप्रकाराने राज्यभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तीन सदस्यांची सत्यशोधन समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष डॉ. एम. डी. शिरसाट असून डॉ. साधना पांडे व डॉ. प्रवीण वक्ते सदस्य आहेत. या समितीने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना शनिवारी चौकशी अहवाल सादर केला. अहवालावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली, मात्र साई कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करण्याबाबत निर्णय झाला नाही. सामूहिक कॉपी प्रकरणात विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा सहभाग नाही; तसेच कॉपीचा प्रकार यापूर्वी घडला असण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे.
दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ विशेष मोहीम राबवित असते, मात्र, इंजिनीअरिंग परीक्षेत हा प्रकार घडल्यामुळे विद्यापीठाची नामुष्की झाली आहे. यावर्षी साई कॉलेजात पहिल्या वर्षाचे प्रवेश विद्यापीठाने थांबवले आहेत. तर दुसरीकडे संस्थाचालकांनी कोर्टात दाद मागितली आहे. त्यामुळे कॉलेजवर कठोर कारवाई करणे विद्यापीठाला कठीण आहे. ‘एखाद्या कॉलेजवर तात्काळ कारवाई अपेक्षित असली तरी कारवाई करता येत नाही. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल,’ असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले.

राज्य शासन घेणार निर्णय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने कॉपी प्रकरणाचा अहवाल विद्यापीठाला सादर केला आहे. हा अहवाल विद्यापीठ प्रशासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाला पाठवणार आहे. अहवाल तपासून संबंधित विभाग कारवाईचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉलेजचे संलग्नीकरण रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाला याबाबत पत्र दिल्यास कारवाई होऊ शकते, पण विद्यापीठ तांत्रिक अडचणींचा पाढा वाचत चालढकल करीत आहे.

आज बैठकीत चर्चा
सत्यशोधन समितीच्या अहवालावर विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. मंगळवार, २० जून रोजी कुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत चर्चा होईल. त्यानंतर २७ जून रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करून हा अहवाल कुलपती, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिटेक्निकचे प्रवेश अर्ज घेण्यासाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तंत्रशिक्षण विभागातर्फे पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. प्रवेश कीट घेण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी, पालकांनी सकाळीच गर्दी केली. दहावीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांकडे नसल्याने कागदपत्र तपासणीची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना २३ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. त्यानंतर प्रक्रियेला गती मिळेल. दरम्यान, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कीट उशिराने मिळाल्याने विद्यार्थ्यांना काहीवेळ ताटकळावे लागले.
पॉलिटेक्निक प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून ३० जूनदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे व नोंदणी निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी अॅप्लिकेशन कीटची विक्रीही सुरू झाली. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी उशिराने विद्यार्थ्यांना कीट मिळाले. तर, कीटसाठी विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. कीट वेळेत न आल्याने काहीवेळ विद्यार्थी, पालकांना ताटकळावे लागले, सकाळी ११ नंतर अॅप्लिकेशन कीट विक्रीला सुरुवात झाली. मराठवाड्यात ६८ पॉलिटेक्निक असून प्रवेश संख्या २२ हजार ५८५ आहे.

गुणपत्रिका वाटपानंतर गती
इंजिनीअरिंग प्रमाणे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत कागदपत्र तपासणीची प्रक्रियेत गुणपत्रिकेची अडचण आली आहे. राज्यमंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना २३ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांच्या कागदपत्र तपासणीची प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही. गुणपत्रिका मिळाल्यानंतरच प्रक्रियेला वेग येईल असे प्रक्रियेतील तज्ज्ञांना वाटते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे जलयुक्तसाठी आठ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्टतर्फे (प्रभादेवी मुंबई) आठ कोटी रुपये देण्यात आले आहेत. हा निधी प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये आहे.
श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे तसेच अॅड. हरीश सणस यांच्या हस्ते सोमवारी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांचा धनादेश प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची उपस्थिती होती. औरंगाबाद जिल्ह्याचा एक कोटींचा धनादेश यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गेल्यावर्षी निधी खर्चाबाबतची माहिती दिली. औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आणि जालना जिल्ह्यांना देण्यात आलेला सर्व निधी खर्च केला असून विभागाने एकूण ८४.६५ टक्के निधी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. श्री सिद्धीविनायक ट्रस्टकडून प्रामुख्याने शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या कामाबद्दल तसेच इतर उपक्रमांची माहिती नरेंद्र राणे यांनी दिली. या निधीतून काम झालेल्या ठिकाणी ट्रस्टचे फलक लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निधीतून प्रत्यक्षात काय काम होते, कामाचा दर्जा काय आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ट्रस्टतर्फे एक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यांच्या मार्फत कामांची माहिती मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, परभणी, हिंगोलीसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जलयुक्त शिवार अभियानात चांगले काम झाले असल्याचे यावेळी नरेंद्र राणे यांनी दिली. यावेळी त्यांनी काही कामांचे उदाहरणेही दिली.

६७ कोटी ५० लाखांची मदत
जलयुक्त शिवार अभियानास निधी उपलब्‍ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद देऊन या अभियानास निधी उपलब्‍ध करून देण्याचा श्रीगणेशा सिद्धीविनायक ट्रस्टने केला होता. सर्वप्रथम राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये याप्रमाणे ३४ कोटी, मार्च-एप्रिलमध्ये प्रत्येक जिल्ह्याला १९ लाख ११ हजार याप्रमाणे ६ कोटी ५० लाख रुपये अर्थसाह्य केले होते. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्याना एक कोटी याप्रमाणे २७ जिल्ह्यांना पुन्हा २७ कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. ट्रस्टतर्फे राज्याच्या महात्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाला एकूण ६७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध करून देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीच्यावेळी पोस्टात २ हजार ६९ कोटी जमा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
टपाल कार्यालयात सर्वाधिक बँकिंगचा संबध सर्वसामान्य व मध्यम वर्गातील नागरिकांचा येतो. त्यामुळे या कार्यालयाला सर्वसामान्यांची बँक म्हणूनही
ओळखले जाते. याच सर्वसामान्यांच्या बँकेत नोटाबंदीच्या काळात महाराष्ट्रातील पोस्ट कार्यालयातून तब्बल २ हजार ६९ कोटी रुपयांच्या जुन्या
नोटा विविध खातेदारांमार्फत जमा झाल्या. ही माहिती उमरगा तालुक्यातील मुरूम येथील माहिती अधिकार कार्यकर्ते निखील चनशेट्टी यांनी मागविलेल्या माहितीतून समोर आली असून या कार्यालयातील बड्या रकमा जमा झालेले खातेदार, ठेवीदारांवर इन्कम टॅक्स विभागाने लक्ष केंद्रित केल्याने चांगलीच उडाली आहे.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १ हजार रुपयांच्या चलनी नोटा
भारतीय अर्थव्यवस्थेतून रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आणि देशभरात एकच खळबळ उडाली. नागरिकांना त्यांच्या जवळील ५०० व १००० रुपयांच्या नोटा पोस्ट, बँका आदी ठिकाणी जमा करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. वास्तविक पाहता पोस्ट कार्यालयाला सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखले जाते. बहुतांश गरीब व मध्यम वर्गीयांचेच विविध माध्यमातून पोस्ट कार्यालयात बँकींग व्यवहार होतात. याच महाराष्ट्रातील टपाल कार्यालयांमधून सदरच्या नोटबंदीच्या कालावधीत जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांद्वारे २ हजार ६९ कोटी रुपयांची विक्रमी रक्कम जमा झाली. यामध्ये ३०९ कोटी रुपयांच्या किंमतीच्या ५०० व १००० हजार रुपयांच्या जुन्या नोटांची अदला-बदल करण्यात आली आहे तर, १७६० कोटी रुपयांच्या जुन्या चलनी नोटा पोस्टातील विविध खात्यांमध्ये जमा झाल्या आहेत. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते निखील चनशेट्टी यांनी राज्यभरातील पोस्ट कार्यालयांकडे माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून हे आकडे समोर आले आहेत. वास्तविक पाहता पोस्ट कार्यालयातील दैनंदिन व्यवहाराच्या तुलनेत या रक्कमा मोठ्या असल्याने तसचे पोस्टातील अनेकांच्या खात्यामध्येही मोठ्या रक्कमा जमा झाल्याने ही खाती रडारवर घेत त्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

१२ माहिती अधिकारासाठी ९३४ रुपयांचा खर्च
मुरूम येथील माहिती अधिकार कार्यकर्ते निखील चनशेट्टी यांनी यासंदर्भात
माहिती मागविण्यासाठी पहिला अर्ज ९ जानेवारी रोजी पाठविला. तेंव्हापासून
सर्व विभागीय पोस्ट कार्यालयात एकूण १२ माहिती अधिकाराचे अर्ज देऊन ही
माहिती मागवली. यामध्ये अपवादात्मक श्रीरामपूर, धुळे, औरंगाबाद मुख्यालय
व औरंगाबाद ही कार्यालये वगळता राज्यभरातील उर्वरित सर्व विभागांनी तसेच
उपविभागांनी याबाबतची माहिती दिली. यातून पोस्ट कार्यालय माहिती
अधिकाराच्या कामकाजाबाबत सजग तसेच तत्पर असल्याचेही दिसून आले.

माहिती देण्यास रिझर्व्ह बँकेची असमर्थता
निखिल चनशेट्टी यांनी अशीच माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेकडून ही देशभरातील सर्व बँकांची मागविली होती. त्यासाठीचा पाठपुरावा ही केला. मात्र, ही माहिती देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने असमर्थता दर्शविली, असा आरोप निखिल चनशेट्टी यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दोन वर्षांपासून अधिकार मंडळे अस्तित्वात नसल्यामुळे सर्वांचे निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. विद्यापीठात रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा मतदार नोंदणीपासून मतमोजणीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. पहिल्या टप्प्यात प्राचार्य (१० जागा), प्राध्यापक (१० जागा) आणि पदवीधर अधिसभा सदस्य (१० जागा) अशा ३० जागांसाठी नोंदणी होणार आहे. यातील प्रत्येकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त जाती-जमाती व महिलांसाठी प्रत्येकी एक जागा आहे; तसेच संस्थाचालक प्रवर्गातून सहा आणि पदव्युत्तर शिक्षकासाठी तीन अशा ३९ जागांसाठी प्रारंभी मतदान नोंदणी आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक आहे. दोन वर्षांपासून अधिकार मंडळे अस्तित्वात नसल्यामुळे निवडणुकीची प्रतीक्षा होती. येत्या ३१ ऑगस्टपूर्वी अधिकार मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. निवडणूक लढवण्यासाठी संघटनानिहाय तयारी सुरू आहे. प्रतिस्पर्धी पॅनलवर मात करण्यासाठी मतदारांशी संपर्क साधण्यात येत आहे.

अधिसूचनेपूर्वीच अर्ज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकार मंडळाची निवडणूक चुरशीची होणार आहे. परिवर्तन घडवण्यासाठी काही उमेदवार ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठाने अधिसूचना काढण्यापूर्वीच काहींनी अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यापीठाचा लोगो वापरून मतदार नोंदणी केली जात आहे. निवडणुकीपूर्वीच हा प्रकार झाल्यामुळे निवडणूक काळात काय घडणार याची चुणूक दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार सत्तार यांचे सिल्लोडमध्ये शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
आमदार अब्दुल सत्तार यांची बदनामी थांबवावी या मागणीसाठी काँग्रेसतर्फे आयोजित बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. काँग्रेसतर्फे काढलेल्या मूक मोर्चातील गर्दीमुळे शहरवासियांचे लक्ष वेधले.
आमदार अब्दुल सत्तार यांनी दहिगाव शिवारातील शेतकऱ्याला मारहाण व हिंदू देवताचे नाव घेऊन शिविगाळ केल्याचे कथित प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे. याचे राजकीय भांडवल करणाऱ्या भाजपसह हिंदुत्ववादी संघटना जनतेस वेठीस धरत असून आमदारांची बदनामी करत आहेत, हा प्रकार थांबवावा, या मागणीसाठी सोमवारी दुपारी एकपर्यंत बंदची हाक देण्यात आली होती. शिवाय आमदारांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहर व ग्रामीण भागातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते, सामान्य नागरिक सामील झाले. या मोर्चाचे तहसील कार्यालयाजवळ सभेत रुपांतर झाले. काँग्रेसतर्फे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
‘भाजप व हिंदुत्ववादी संघटना काँग्रेस व आमदार सत्तार यांची बदनामी करण्याचा कुटील प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न मतदारसंघातील जनता कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांनी या सभेत बोलताना केले. राजकीय दबावाचा वापर करून दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावे अन्यथा काँग्रेस तीव्र आंदोलन पुकारेल, असा इशारा या सभेत बोलताना विविध नेत्यांनी दिला. या सभेत तालुकाध्यक्ष गणेश दौड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हा परिषध उपाध्यक्ष केशवराव तायडे, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दुर्गाताई पवार, रमेश दांडगे, विठ्ठलराव सपकाळ, लक्ष्मण कल्याणकर यांची भाषणे झाली.
मूक मोर्चात बाजार समिती सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, काशिनाथ जंजाळ, नरसिंग चव्हाण, विजय दौड, कौतिकराव बडक, उपनगराध्यक्षा शकुंतला बनसोड, जिल्हा परिषद सदस्य सीमा गव्हाणे, मीना गायकवाड, दामू गव्हाणे, कुशीवर्ता बडक, भीमराव गाडेकर, नाना कळम, शांतीलाल अग्रवाल, दशरथ सुरडकर आदींसह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी सामील झाले होते.

खुलताबादेत अटकेची मागणी
हिंदू देवतेचा अपमान केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत पायी जात आमदार सत्तार यांच्याविरोधात घोषणा दिल्या.
या निवेदनात म्हटले आहे की, सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील एका प्रकरणात हिंदू देवीदेवतांच्या नावाने शिवीगाळ करून भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध धार्मिक उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, पंचायत समिती सभापती अर्चना अंभोरे, उपसभापती गणेश अधाने, जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बारगळ यांच्यासह नगरसेवक, भाजप पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांची उपस्थिती होती.

भाजपचा पैठण बंद फसला
शेतकऱ्याला शिवीगाळ व मारहाण करत हिंदू देवतांविषयी अपशब्द काढणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ भाजपतर्फे आयोजित बंदला पैठणकरांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. शहरातील व्यवहार सोमवारी सुरळीत सुरू होते.
शहरातील बहुतांशी व्यापारी सोमवारी साप्ताहिक बंद पाळतात, त्यांची दुकाने बंद होती. उर्वरित बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पैठण भाजपतर्फे पोलिस स्टेशन व तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनावर भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, शहराध्यक्ष विजय चाटुपळे, रेखाताई कुलकर्णी, घनश्याम शेळके, सतीश आहेर आदींच्या सह्या आहेत.

वैजापुरात निदर्शने
सिल्लोड तालुक्यातील दहिगाव शिवारात जमिनीचा ताबा घेतांना हिंदू देवतांबाबत अपमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील आंबेडकर पुतळ्यासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. आमदार सत्तार यांना त्वरित अटक करावी, अन्यथा भाजपचे कार्यकर्ते गावोगावी रस्त्यावर उतरतील व तालुका बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा जाधव यांनी दिला. याप्रसंगी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. प्रकाश गायके, प्रशांत कंगले, बाबासाहेब डांगे, कचरू आण्णा डिके, अनिल वाळुंज, ज्ञानेश्वर इंगळे, राजाराम शिंदे, नारायण कवडे, हर्षल तोडरवल, उदय सोनवणे, सुरेश निकम, शशिकांत निकाळे, सुधाकर डगळे, महेश भालेराव, सचिन दाढे, दीपक त्रिभुवन, केतन आव्हाळे, कडू बागुल, बबन गायके, सविता पुणे, ज्ञानदेव कदम आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस मतदार याद्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
पश्चिम मतदारसंघात होत असलेल्या बोगस मतदार याद्या व मतदान करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार संजय शिसाट यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन निवेदन दिले.
पश्चिम मतदार संघाची बोगस मतदार यादी आपल्याकडे असल्याचे सांगत या संदर्भात वारंवार तक्रार देऊनही दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जे अधिकारी बोगस मतदार याद्या तयार करून नागरीकांची व शासनाची फसवणूक करत आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही बोगस मतदारांकडून मतदान करून घेण्यात आले आहे, याची चौकशी व्हावी व खुलासा आम्हाला द्यावा, अशी मागणीही शिरसाट यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ‌केली.
बोगस मतदार याद्या बनवून त्या मतदारांचा व उमेदवारांचा हक्क निवडणूक विभाग हिसकावून घेत आहे. एका व्यक्तिचे मतदार काही ठिकाणी दोन ते तीन वेळेस येते ‌काही ठिकाणी मृत व्यक्तींचे नावावर मतदान करण्यात आले असल्याचे सांगत बोगस मतदार याद्या तयार करत असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिरसाट यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गासाठी महिन्यात जमीन खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,
मुंबई-नागपूर या ७१० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील जमीन मोजणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या महिन्याभरात शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करून जमीन खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाड्याचे भाग्य उजळवणारा समृद्धी महामार्गाच्या भूमीपूजनासाठी शासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तत्काळ जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (११२.३१ कि.मी.) आणि जालना (४२ कि. मी.) या दोन जिल्ह्यातील पाच तालुक्यांतून महामार्ग जाणार आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील ६२ गावांमध्ये सुमारे ११२.२१ किलोमीटरपैकी ११० किलोमीटरवरील जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यातील ६१ गावांमधून हा मार्ग जाणार आहे. जिल्ह्यात १५ मार्चपासून समृद्धीच्या मार्किंगला सुरुवात करण्यात आली होती. समृद्धी महामार्गाला औरंगाबाद जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी मोठा विरोध करत अनेक आंदोलने केली, तरीही प्रशासनाने पोलिसांची नियुक्ती करून जमीन मोजणी पूर्ण केली. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही अधिकाऱ्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व महामार्गाविषयी जनजागृती केली होती. आता प्रशासनाने एक पाऊल पुढे जाऊन १५ जुलैनंतर जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११वी प्रवेश चार फेऱ्यांत होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद शहरात प्रथमच होत असलेल्या ऑनलाइन अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक सोमवारी शिक्षण विभागाने जाहीर केले. ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २७ जूनपर्यंत आहे. तर, प्रवेश प्रक्रिया ४ फेऱ्यांमध्ये होणार असून २६ जुलै रोजी अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. औरंगाबाद महापालिका हद्दीतील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले नव्हते. ते सोमवारी जाहीर करण्यात आले. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत वेबसाइटवर अर्ज करायचे आहेत.

असे आहे वेळापत्रक
- १६ ते २७ जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी
- २८ जून कोटा प्रवेश पहिली गुणवत्ता यादी
- २८ व २९ प्रवेश निश्चिती
- २९ जून सायंकाळी प्रवेश निश्चितीनंतर रिक्त जागा
- ३० जून ऑनलाइन प्रवेश अर्जातील वैयक्तिक माहितीबाबात हरकती, त्रुटी मार्गदर्शन केंद्रावर स्वीकारणे
- ३० जून कोट्यातील (इनहाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन) गुणवत्ता यादी
- ३० जून व १ जुलै प्रवेश निश्चिती
- १ जुलै कोटा प्रवेशाच्या रिक्त जागा जाहीर.
- ५ जुलै केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी
- ५, ६, ७ जुलै या यादीतील प्रवेश
- ८ जुलै रिक्त जागा व पहिल्या फेरीचे कट ऑफ
- ९ जुलै विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदल
- १३ जुलै केंद्रीय प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी
- १३ व १४ जुलै प्रवेश निश्चिती
- १५ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशिल जाहीर आणि दुसऱ्या फेरीचे कट ऑफ जाहीर
- १६ व १७ जुलै पसंतीक्रम बदल
- १९ जुलै केंद्रीय प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी
- १९ व २० प्रवेश निश्चिती,
- २१ जुलै रिक्त जागांचा तपशिल व कट ऑफ
- २१ व २२ जुलै पसंतीक्रम
- २४ जुलै केंद्रीय प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी
- २४ व २५ जुलै प्रवेश निश्चिती
- २६ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगारनांदूरच्या महिलांची दारुड्यांविरुद्ध तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
आगरनांदूर येथील अवैध दारूविक्री व दारुड्यापासून त्रस्त झालेल्या महिलांनी सोमवारी थेट पैठण पोलिस स्टेशन गाठून निवेदन दिले. येथील अवैध दारूविक्री बंद करावी व दारुड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय व राज्य महमार्गावरील दारू बंद झाल्यापासून तालुक्यातील आगरनांदूर येथे काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदा दारू विक्री सुरू केली आहे. शहागड रस्त्यावरील एकाही गावात दारू मिळत नसल्याने त्या भागातील दारूडे आगरनांदूर येथे दारू पिण्यासाठी येत आहेत. परिणामी दोन महिन्यांपासून गावातील महिला व मुलीना त्रास सहन करावा लागत आहे. या गावातील ५० महिलांनी सोमवारी पैठण पोलिस स्टेशन येथे येऊन बेकायदा दारू विकणाऱ्या चार जणांविरुद्ध निवेदन दिले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वसान पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिले. निवेदनावर लताबाई मारकडे, मुक्ताबाई थोरात, नीलाबाई कोलगे, सुलभा सिरसाट, छाया थोरात, चंद्रकला थोरात, लता जोजारे, सुमन गंगावणे, मीना थोरात आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अद्ययावत फेको मशीन घाटी हॉस्पिटलमध्ये सेवेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नवीन फेको मशीनचे उद्‍घाटन सोमवारी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी, विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी छेद देऊन बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी हे उपकरण महत्त्वाचे आहे. या उपकरणामुळेच शस्त्रक्रियेनंतरची छोटी जखमदेखील लवकर भरून निघते आणि रुग्ण आठवडाभरात कामावर रुजू होऊ शकतो, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. नांदेडकर यांनी विभागात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली उने यांनी केले, तर डॉ. अर्चना वरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी विभागाचे डॉ. अमरनाथ आवरगावकर, डॉ. वेणुकुमार रंगू, डॉ. तपन जक्कल आदींनी पुढाकार घेतला. या वेळी डॉ. जैन, डॉ. राजन बिंदू, डॉ. डोईफोडे, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. सरोज जाधव, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. अनिल जोशी, डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. सईदा अफरोज, डॉ. अविनाश लांब आदींची उपस्थिती होती.

अत्याधुनिक मशीन
यापूर्वीही घाटीच्या नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागामध्ये फेको मशीन होती; परंतु नवीन मशीन ही सध्याची सर्वांत अद्ययावत व ‘हाय एंड’ मशीन आहे. या मशीनची किंमत ३६ लाखांपर्यंत आहे. या अद्ययावत मशीनवर गोरगरीब रुग्णांच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत किंवा नाममात्र शुल्कात लवकरच होणार आहेत, असे डॉ. नांदेडकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टेम्पोची अॅपेला धडक; चिमुकल्यासह १२ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
नागपूर मुंबई महामार्गावर लाडगाव चौफुली येथे सोमवारी सायंकाळी टेम्पो व अॅपेरिक्षा यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात एका चिमुकल्यासह बारा जण जखमी झाले. हे सर्व कोपरगाव तालुक्यातील शिंगणे येथील रहिवासी आहेत. जखमींपैकी एकाला प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. इतर जखमींना शिर्डी येथील साई हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील शिंगणे येथील ठोंबरे कुटुंबातील सदस्य शिवराई (ता.वैजापूर) येथे नातेवाईकांना भेटून बाळांतिणीला घेऊन जाण्यासाठी आले होते. तिला घेऊन अॅपेरिक्षातून शिंगणेकडे जाताना टेम्पोने जोराची धडक दिली. या घटनेत चिमुकल्यासह दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. नर्मदाबाई दत्तू ठोंबरे (वय ५०), अरुणा पंढरीनाथ ठोंबरे (वय ४५), दत्ता त्रिंबक पवार (वय ४८), लिलाबाई परसराम भोसले (वय ४८), सिंधुबाई नामदेव शिंदे (वय ४०), वनिता संतोष गोजरे (वय ३५), दत्तु राणे ठोंबरे (वय ७०), सुनीता सुनील ठोंबरे (वय ४०), राहुल पवार (वय ३५), सिद्धांत सुनील ठोंबरे (वय २ महिने), वैष्णवी संतोष ठोंबरे (वय ६) व वेदांत गणेश ठोंबरे, अशी जखमींची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, बाबासाहेब जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. बोरनारे यांच्या अॅम्ब्युलन्समधून जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. सर्व जखमींवर वैजापूर येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये डॉ. सचिन चवहाण, डॉ. पाटणी व डॉ. कासार यांनी प्रथमोपचार केले. या प्रकरणी पोलिसांत नोंद घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करून पैसे लुटणाऱ्याला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मारहाण करून पैसे लुटणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी दिले.
याप्रसंगी गौरव विष्णुप्रकाश बरेजा (वय २९, रा. उस्मानपुरा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. ते १७ जून २०१७ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हॉटेलमधून घरी जाताना संशयित आरोपी गणेश कारभारी आघाव (वय ४०, रा. सुदर्शननगर, औरंगाबाद) व त्याचे दोन साथीदार आले. त्यांनी फिर्यादीला ‘हॉटेलमध्ये दादागिरी करतो का’ असे म्हणत गंभीर मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील ९०० रुपये हिसकावून घेतले. फिर्यादीने आरडाओरड करताच हॉटेलसमधील काहीजण धावत आल्याने संशयित आरोपी पळून गेले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध कलम ३९२, ५०४, ५०६, ३४ अन्वये सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी गणेश आघाव याला रविवारी अटक करण्यात आली. त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून पैसे जप्त करणे व त्याच्या इतर दोन साथीदारांना अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपीने या प्रकारचे गुन्हे यापूर्वी केले आहेत का, याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस दूरध्वनी प्रकरणी आणखी तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर
बोगस दूरध्वनी केंद्र प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, एटीएसच्या पथकाने रविवार आणि सोमवारी हैदराबाद, सोलापूर आणि लातूरात छापे टाकले. याप्रकरणी हैदराबाद येथून इब्राहिम महंमद रशीद, अब्दुल फैय्याज महमंद यांना रविवारी तर सोलापूरातून सुदाम दगडु घुले यास अटक केली. अटकेत असलेल्या आरोपीनी सांगितल्याप्रमाणे लातूरातील शाम नगर भागात पोलिसांनी रविवारी संजय केरबावाले याच्या खोलीवर छापा मारला. त्याठिकाणी ३६ सीमकार्ड आणि मशिन सापडले. संजय केरबाले मात्र फरार झाला. तीन आरोपींना न्यायालयाने २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे निरिक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली.
शनिवारी औरंगाबाद आणि लातूरच्या एटीएसच्या पथकाने लातूरात बोगस दूरध्वनी केंद्रावर धाडी घातल्या होत्या. त्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली. अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीप्रमाणे रविवारी हैदराबाद येथे धाड घालून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बोगस दूरध्वनी केंद्राची स्थापन करून देणारा रिलायन्स कंपनीचा माजी कर्मचारी सुदाम दगडु घुले (रा. कुमार चौक, सोलापूर) असल्याची माहिती आरोपीनी दिली होती. त्याला सोमवारी पहाटे अटक केली असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणातील बहुसंख्य सीमकार्ड हे सुद्धा बोगस आहेत. नाव एकाच वापरणारा दुसरा आहे. त्यामुळे या सिमकार्डवरुन कोठे-कोठे फोन लावले आहेत, याची तपासणी करण्यासाठी हे सिमकार्ड पाठविण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणातील व्याप्ती दिवसेंदिवस वाढू शकते असा अंदाज ही काही जणांनी व्यक्त केला असून प्रश्न फक्त महसूल बुडल्याचा नसून बोगस सीमकार्डचा वापर का केला ? कुठे केला हा आता तपासाचा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवक पुत्राची लेखा विभागात तोडफोड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केलेल्या कामाचे बिल मिळत नसल्यामुळे माजी नगरसेवक एकबाल मुजाहेद यांचा मुलगा शहारेख याने थयथयाट करत सोमवारी (१९ जून) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास महापालिकेच्या लेखा विभागात तोडफोड केली. शहारेख हा बुढीलेन वॉर्डच्या नगरसेविका परवीन कैसर खान यांचा जावई आहे.
महापालिकेच्या लेखा विभागाकडे विकास कामांची सुमारे पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बिले बाकी आहेत. वारंवार मागणी केल्यावर देखील बिले मिळत नाहीत म्हणून कंत्राटदार त्रस्त झाले आहेत. रमजान ईदसाठीतरी महापालिकेने केलेल्या कामाचे बिल द्यावे, अशी कंत्राटदारांची मागणी आहे. शहारेख यानेही महापालिकेत कंत्राटदार म्हणून काम केले होते, पण त्याने केलेल्या कामाचे बिल अद्याप देण्यात आले नाही. बिलाच्या चौकशीसाठी तो सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पालिकेच्या लेखा विभागात आला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला दोन दिवसांपूर्वी बहुतांश बिले बँकेकडे पाठवली आहेत. एक - दोन दिवसांत कंत्राटदारांच्या खात्यावर जमा होतील, असे सांगितले. कर्मचाऱ्याच्या या उत्तरावर शहारेखचे समाधान झाले नाही. त्याने मुख्यलेखाधिकारी आर. एम. साळुंके यांच्या दलानासमोरच्या खुर्च्या फेकण्यात सुरुवात केली. यामुळे लेखा विभागात खळबळ उडाली. या प्रकरणात पालिका प्रशासनाने कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाभा ट्रॉन’साठी प्रतीक्षा ‘बंकर’ची

$
0
0

‘भाभा ट्रॉन’साठी प्रतीक्षा ‘बंकर’ची

२.६९ कोटींपैकी केवळ ४० लाखांचा निधी प्राप्त; उर्वरित सव्वादोन कोटींचा निधी मिळणार कधी?

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील आमखास मैदानासमोरील महाराष्ट्रातील पहिल्याच शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अस्सल भारतीय बनावटीचे ‘भाभा ट्रॉन-दोन’ हे खास उपकरण अलीकडेच दाखल झाले असून, हे उपकरण कार्यरत होण्यासाठी ‘बंकर’ची आवश्यकता आहे. मात्र, बंकरचे काम रखडले असून, २ कोटी ६९ लाखांपैकी केवळ ४० लाखांचा निधी राज्य सरकारकडून बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. उर्वरित सव्वा दोन कोटींचा निधी कधी मिळणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबईतील ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’ने औरंगाबादच्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला आपले उपकेंद्र म्हणून जाहीर केले आहे आणि त्याचाच भाग म्हणून ‘टाटा हॉस्पिटल’कडून कॅन्सर हॉस्पिटलला ‘भाभा ट्रॉन दोन’ हे अस्सल भारतीय बनावटीचे उपकरण देण्यात आले आहे. ‘भाभा ट्रॉन’साठीच ‘बंकर’चे काम हॉस्पिटलच्या मागे सुरू आहे. अर्थात, ‘बंकर’चे काम अपेक्षेप्रमाणे रखडले आहे. २१ सप्टेंबर २०१६ रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ‘बंकर’च्या कामाचे भूमिपूजन झाले. या प्रसंगी, सहा महिन्यात बंकरचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिली होती. मात्र, आठ महिने उलटूनही काम पूर्ण झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. एवढेच नव्हे तर ‘बंकर’साठीचा निधीदेखील रखडला आहे. एकूण २ दोन कोटी ६९ लाखांच्या निधीपैकी आतापर्यंत ४० लाखांचा निधी मिळाला असल्याचे बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ‘बंकर’चे काम पूर्ण झाल्याशिवाय ‘भाभा ट्रॉन’ कार्यरत होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन काम जलद गतीने पूर्ण होण्याची गरज व्यक्त होत आहे.

अस्सल भारतीय बनावटीचे उपकरण

‘भाभा ट्रॉन-२’ हे अस्सल भारतीय बनावटीचे उपकरण असून, अणुउर्जा विभागाच्या (डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जी) तंत्रज्ञानाखाली बंगळुरू येथील ‘पनाशिया मेडिकल टेक्नॉलॉजिस’ येथे ‘भाभा ट्रॉन’ची निर्मिती होत आहे. ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’कडून आतापर्यंत देशभरात अशी १० ते १२ उपकरणे विविध रुग्णालयांमध्ये देणगी स्वरुपात देण्यात आली आहे. विदेशातही ८ ते ९ उपकरणे देण्यात आल्याचे ‘टाटा’ शैक्षणिक संचालक डॉ. कैलाश शर्मा यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images