Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बीएचआरच्या अध्यक्षांसह १४ संचालकांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देण्याचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आणि संचालक मंडळातील एका महिलेसह १४ जणांना सीआयडीने (राज्य गुन्हे अन्वेषण शाखा) जळगाव कारागृहातून हस्तांतरित करून घेतले. त्यांना मंगळवारी (२० जून) कोर्टात हजर करण्यात आले असता, शुक्रवारपर्यंत (२३ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने मुदत संपल्यानंतरही ठेवीवरील व्याज व आकर्षक बक्षीसे न देता गंडा घातल्याप्रकरणी भालचंद्र ओंकार खोडे (रा. जयभवानीनगर, औरंगाबाद) यांनी ८ जानेवारी २०१६ रोजी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सेवानिवृत्त खोडे यांनी १७ एप्रिल २०१३ ते ३१ जानेवारी २०१५ या काळात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सिडको (एन-६) येथील शाखेत ९५ हजार ७६८ रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावर आकर्षक व्याजदर, परतावा मिळेल, असे सोसायटीने सांगितले होते. खोडे यांच्याप्रमाणेच मच्छिंद्र सूर्यभान सुरासे (रा. सिडको एन-८, महालक्ष्मी कॉलनी, औरंगाबाद) व अन्य काही जणांनी एकूण ५ लाख ७६ हजार रुपये गुंतवले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज देण्यास सोसायटीने टाळाटाळ केली. पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने सभासदांनी सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. अशाच स्वरुपाच्या तक्रारी यवतमाळ, वैजापूर, जळगाव याठिकाणी दाखल झाल्या. हजारो कोटींवर हा घोटाळा असल्याचे समोर येताच शासनाने सोसायटीवर प्रशासक नेमून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला. दरम्यान, जळगाव पोलीसांनी सोसायटीचा अध्यक्ष व संचालक मंडळातील प्रमोद भाईचंद रायसोनी (रा. प्रतापनगर, जामनेर), दिलीप कांतीलाल चोरडिया (रा. तळेगाव), मोतीलाल ओंकार जिरी (रा. शेळगाव), सुकलाल शहादू माळी (रा. नवीन भगवाननगर), सूरजमल बभुतमल जैन, भागवत संपत माळी, भगवान हिरामन वाघ, शेख रमजान शेख अब्दुल नबी, ललिता राजू सोनवणे, (रा. सर्वजण तळेगाव, जामनेर), राजाराम काशीनाथ कोळी, यशवंत ओंकार जिरी, दादा रामचंद्र पाटील (रा. तिघे शेळगाव, ता. जामनेर), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (रा. शनिपेठ, जळगाव), इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (रा. सिंधी कॉलनी) यांना अटक केली होती. सर्वजणांना जळगाव कारागृहातून सीआडीच्या पथकाने शहरात आणून कोर्टात हजर करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन अभ्यासक्रमांच्या प्रतिक्षेत संस्कृत विभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
अध्यापन व व्यावसायिक क्षेत्रात कमी संधी असल्यामुळे संस्कृत विषयाच्या पदव्युत्तर शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संस्कृत विभागात ७० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. मात्र, दरवर्षी ३० विद्यार्थीच पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेतात. विभागाने पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमाचा प्रस्ताव पाठवला असून, अंतिम मान्यतेची प्रतीक्षा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भाषा भवनात संस्कृत विभाग आहे. सध्या पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी हे दोन अभ्यासक्रम सुरू आहेत. संस्कृत विषयात व्यावसायिक संधी नसल्यामुळे हा विषय निवडण्यास विद्यार्थी प्राधान्य देत नाहीत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांपैकी फक्त चार महाविद्यालयांत पदवी स्तरावर संस्कृत विषय आहे. नेट-सेट, पीएचडी झाल्यानंतर अध्यापन क्षेत्रातही संधी नसल्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेतले जात नाही, तर शालेय स्तरावर संस्कृत विषय शिकवणारे शिक्षक अधिक पात्रता संपादन करण्यासाठी एमए करतात; तसेच कीर्तन परंपरेत करिअर करणारे काही अभ्यासक आवर्जून संस्कृत विषयात एमए करतात. कीर्तनात पुराणातील दाखले आणि संस्कृत श्लोक वापरले जातात. या विषयात पारंगत होण्यासाठी संस्कृत साहित्याचा अभ्यास आवश्यक असतो. त्यामुळे कीर्तनकार संस्कृतचा अभ्यास करून प्रावीण्य संपादन करतात. विभागात अशा अभ्यासकांची संख्या लक्षणीय आहे. कीर्तन परंपरा, संशोधन आणि अध्यापन या क्षेत्रातील विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
दरम्यान, इतर भाषा विषयांप्रमाणे संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी आहे. विभागाची प्रवेश क्षमता ७० असून, प्रत्यक्षात ३० प्रवेश होतात. संस्कृत शिलालेख वाचण्यासाठी इतिहास विषयाचे आणि पोथ्या वाचण्यासाठी मराठी विषयाचे काही विद्यार्थी संस्कृतला प्रवेश घेतात. दरवर्षी जागा रिकाम्या राहतात. त्यामुळे कोणत्याही शाखेतील पदवीधराला प्रवेश देण्यासाठी विभागाने नियम शिथिल केला आहे.

नवीन पदविका अभ्यासक्रम
सध्या भाषा भवनात संस्कृत विभाग जेमतेम जागेत सुरू आहे. स्वतंत्र इमारत देण्यासाठी विभागाने पाठपुरावा केला होता. सध्या ‘साई’ संस्थेच्या परिसरात नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीत संस्कृत विभाग स्थलांतरीत होणार आहे. तसेच पुढील वर्षीपासून योग, आयुर्वेद, वैदिक ज्ञान या विषयांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, असे विभागप्रमुख डॉ. क्रांती व्यवहारे यांनी सांगितले.

अर्धवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. कदाचित पुढील वर्षीपासून अभ्यासक्रम सुरू होईल. फक्त चार कॉलेजात संस्कृत विषय असल्यामुळे पुढील पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी आहे. पण, विद्यापीठात विद्यार्थ्यांचा समाधानकारक प्रतिसाद आहे.
- डॉ. क्रांती व्यवहारे, विभागप्रमुख, संस्कृत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाऊसची याचिका वर्ग

$
0
0



म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

‘इस्लामिक स्टेट’चा (आयएस) संशयित दहशतवादी नासेरबीन अबुबकर याफाईने (चाऊस) याने तांत्रिक मुद्द्यावर मुक्तता करण्यासाठी केलेली याचिका मुंबई हायकोर्टात वर्ग करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे राज्य सरकारने निदर्शनास आणून दिल्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला.
न्या. रवींद्र बोर्डे आणि न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ही याचिका उच्च न्यायालयात वर्ग करत राष्ट्रीय तपास यंत्रणेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) नांदेड येथील पथकाने १४ जुलै रोजी परभणी येथील देशमुख गल्लीतील नासेरबीन अबुबकर याफाईला (चाऊस) अटक केली होती. चाऊस हा ‘आयएस’च्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून लॅपटॉप, पाच मोबाइल, दोन पेनड्राइव्ह, कार्ड रीडर, ब्ल्यू टूथ कनेक्टर आणि दोन बॅटरीचे सेल जप्त केले होते. तुर्की, सीरियासह दोन देशांमध्ये त्याने संपर्क साधला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ‘एटीएस’ने अन्य तिघांना अटक केली.
खंडपीठाने चाऊसची याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केली असून राष्ट्रीय तपास यंत्रणेने दोन आठवड्यात कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन उच्च न्यायालयात याचिका सादर करावी. राज्य सरकारच्या वतीने अमरजितसिंग गिरासे, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या वतीने अॅड. शेट्टी, अॅड. सुखदेवे यांनी बाजू मांडली. या याचिकेवर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याची बाजू टी. डब्ल्यू. पठाण यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनर्स अकादमीला विजेतेपद

$
0
0

विनर्स अकादमीला विजेतेपद
आंतर अकादमी क्रिकेट
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित सोळा वर्षांखालील आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत विनर्स अकादमी संघाने नेरळकर अकादमी संघाचा चार विकेट्स राखून पराभव करीत विजेतेपद पटाकाविले.
एडीसीए मैदानावर या स्पर्धेचा अंतिम सामना मंगळवारी खेळवण्यात आला. विनर्स अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. नेरळकर अकादमी अ संघाला अवघ्या ८० धावांवर रोखून विनर्स अकादमीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरविला. चैतन्य वाघमारे (१७), फैसोद्दीन शेख (१६), वैभव सेवलीकर (१९) यांचा अपवाद वगळता नेरळकर संघाचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. धनंजय देशमुखने १६ धावांत ३, तर शशिकांत पवार, श्रेयस गिल्डा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
धावांचा पाठलाग करताना विनर्स अकादमीने १२.१ षटकात ६ बाद ८२ धावा फटाकावत विजयासह विजेतेपद पटाकाविले. शशिकांत पवार (१९) व इशान वाघ (४०) यांनी आक्रमक फलंदाजी करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. नेरळकर संघातील आयुष पटेलने २० धावांत ३ विकेट्स घेतल्या.
लाचलुचपत विभागाचे अधिक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी हेमंत मिरखेलकर, मोहन बोरा, शेख हबीब, कर्मवीर लव्हेरा, सय्यद जमशेद, निकोलस अँथनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेतील मानकरी
उत्कृष्ट फलंदाज - श्रीनिवास कुलकर्णी
गोलंदाज - सुजल राठोड
सामनावीर - धनंजय देशमुख
मालिकावीर - शशिकांत पवार

संक्षिप्त धावफलक ः नेरळकर अकादमी अ संघ - १८.४ षटकांत सर्वबाद ८० (वैभव सेवलीकर १९, चैतन्य वाघमारे १७, फैसोद्दीन शेख १६, धनंजय देशमुख ३-१६, शशिकांत पवार २-१३, श्रेयस गिल्डा २-१९, अनिकेत चव्हाण, ओमकार थोटे प्रत्येकी १ विकेट) पराभूत विरुद्ध विनर्स अकादमी - १२.१ षटकांत ६ बाद ८२ (इशान वाघ ४०, शशिकांत पवार १९, संकेश मोरे ८, आयुष पटेल ३-२०, वैभव सेवलीकर, कृष्णा पवार, आझम खान प्रत्येकी १ विकेट). सामनावीर - धनंजय देशमुख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकोरियांच्या ‘त्या’ बदल्यांवर पालिकेतल्या अडचणींचे खापर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘तत्कालीन महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सुमारे ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण झाल्या. याबद्दल गांभीर्याने विचार व्हावा. बदल्यांचा एकत्रित अहवाल सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे आदेश द्या,’ अशी मागणी शिवसेना नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी केली.
आयुक्त डी. एम. मुगळीकर बैठकीसाठी मुंबईला गेले होते. त्यामुळे आजची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यापूर्वी घोडेले यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विषय मांडला. ते म्हणाले, ‘बकोरिया यांनी एकदम ७८ ते ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन बदल्यांच्या संदर्भात काही तरी ठोस धोरण ठरवले पाहिजे. केलेल्या बदल्यांचा एकत्रित अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याचे आदेश प्रशासनाला द्या,’ अशी मागणी त्यांनी केली. महापौरांनी प्रशासनाला ‘पुढील सर्वसाधारण सभेत बदल्यांचा अहवाल सादर करा,’ असे आदेश दिले.

कोणता अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बाजू घेण्याचा विषय नाही. मात्र, बदल्यांमुळे बहुतेक विभागांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्याची सर्वाधिक झळ लेखा आणि नगररचना विभागाला बसली आहे. कुणाची बदली करा किंवा करू नका असे आमचे म्हणणे नाही, पण बदल्या करताना कारभार विस्कळीत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. - नंदकुमार घोडेले, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्हा बँकेचे ४० कोटी मार्गी लागणार

$
0
0

औरंगाबाद : नोटबंदीनंतर जिल्हा बँकांकडे जमा झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिल्यामुळे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. बँकेकडे असलेले ४० कोटी रुपये आता मार्गी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी जाहीर केली. १००० व ५०० नोटा चलनातून बाद ठरविण्या आला. जुन्या नोटा जमा करण्यासाठी मुदत दिली होती. दरम्यान, या काळात जिल्हा बँकांमध्येही मोठ्या प्रमाणावर रोकड जमा झाली होती. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी केली होती. आता रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांकडून जुन्या नोटा स्वीकारण्याचे जाहीर केले.
याविषयी बोलताना जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश पाटील म्हणाले,‘बँकेकडे ४० कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली होती. त्यामुळे आम्हाला अतिरिक्त व्याज भरावे लागत होते. बँकेची परिस्थिती अवघड झाली होती. ताळेबंदासाठी अतिरिक्त ४० कोटी गुंतले होते. या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेची परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्टेट कॅन्सर’ हॉस्पिटल विस्तारात झेपावणार

$
0
0


‘स्टेट कॅन्सर’ हॉस्पिटल विस्तारात झेपावणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट’चा दर्जा मिळाला असून, या अंतर्गत १२० कोटींपैकी ३५ कोटींचा पहिला हप्ताही केंद्राकडून मिळाला आहे. आता विस्तारीत हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होणे अपेक्षित असतानाच ३४० पदांच्या प्रस्तावालाही राज्य सरकारकडून मान्यता मिळणे अपेक्षित आहे. त्यातूनच डझनभर विभागांचे अद्ययावतीकरण होणार आहे.

हॉस्पिटल सुरू होण्यापूर्वी ३५९ पदांना मंजुरी मिळाली खरी; परंतु सुरुवातीच्या टप्प्यात तज्ज्ञांची कमतरता तीव्र होती. हळूहळू ही कमतरता काही प्रमाणात दूर झाली असली तरी सद्यस्थितीत ३५९ पैकी २३४ पदांवर नियुक्ती झाली असून, १२५ पदे रिक्तच आहेत. तरीही मागच्या साडेचार वर्षांत संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १८ जिल्ह्यातील कित्येक हजार कर्करुग्णांना मिळालेल्या वेगवेगळ्या उपचारांमुळेच शहरातील कॅन्सर हॉस्पिटल हे गोरगरीब कर्करुग्णांसाठी मोठा आधारस्तंभ ठरू पाहात आहे. सतत वाढत गेलेल्या कर्करुग्णांच्या संख्येमुळेच सद्यस्थितीत रेडिओथेरपीच्या उपचारांसाठीचे वेटिंग तीन महिन्यांवर गेले आहे. तसेच इतर उपचार-शस्त्रक्रियांसाठी काही प्रमाणात वेटिंग आहे. दरम्यान, ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’ने हॉस्पिटलला आपले उपकेंद्र जाहीर केले आणि त्याचाच भाग म्हणून ‘भाभा ट्रॉन-२’ हे खास भारतीय बनावटीचे रेडिएशन देण्यासाठीचे उपकरणही ‘टाटा’ने हॉस्पिटलला देणगी स्वरुपात अलीकडेच दिले. या उपकरणासाठीच हॉस्पिटलच्या मागील बाजूस बंकरचे काम सुरू आहे आणि हे काम पूर्ण होताच ‘भाभा ट्रॉन-२’ हे रुग्णसेवेत दाखल होईल.

रक्तपेढीसह रोबोद्वारे होणार बायोप्सी

विस्तारीकरणामध्ये कर्करोगाशी संबंधित किमान १२ विभागांचे अद्ययावतीकरण होणार आहे. सद्यस्थितीत यातील बरेचसे विभाग हॉस्पिटलमध्ये सुरू असले तरी नवनवीन उपकरणांसह नवनवीन सेवांनी या विभागांचे अद्ययावतीकरण होणार आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलची स्वतंत्र रक्तपेढी सुरू होणार आहे आणि शेवटच्या स्टेजमधील कर्करुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘पॅलेटिव्ह केअर डिपार्टमेंट’ही सुरू होणार आहे.

हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र रेडिओलॉजी विभागही कार्यान्वित होईल, ज्यामध्ये सिटीस्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी, डिजिटल रेडिओलॉजीसह रोबोद्वारे बायोप्सी व इतर उपचार प्रक्रिया करण्यासाठी खास ‘रोबोटिक नेव्हिगेशन सिस्टीम’ही कार्यान्वित होणार आहे. या सर्व विभागांसाठी मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, हिमॅटोऑन्कॉलॉजिस्ट, पेडियाट्रिक्स ऑन्कॉलॉजिस्ट, ईएनटी ऑन्कॉलॉजिस्ट असे कर्करोगाशी संबंधित प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,

सहाय्यक प्राध्यापकांसह परिचारिका, तंत्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ३४० पदांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे, असे हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी ‘मटा’लाल सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या

$
0
0

परभणी : पाथरी तालुक्यातील आनंदनगर येथील अल्पभूधारक शेतकरी पती-पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. लक्ष्मण जेसू पवार (वय ६०), चपलाबाई लक्ष्मण पवार (वय ५५) अशी त्यांची नावे आहेत. लक्ष्मण यांच्या नावे आनंदनगर शिवारात ४ एकर जमीन आहे. २७ मे रोजी त्यांच्या नातीचे लग्न झाले. त्यांच्याकडे बँक व खासगी सावकारी कर्ज होते. त्यातच पेरणीसाठी पैसे नसल्याने दोघे नैराश्यात होते. त्यांनी बुधवारी दुपारी घरी विष पिऊन आत्महत्या केली. ही बाब पुतण्या राजेभाऊ धनसिंग पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांनाही पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे मुलगा, चार मुली असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजाबाजारात महिलेची छेडछाड, परस्पराविरुद्ध गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महिलेची छेडछाड करण्यावरून दोन गटात वाद उसळल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता राजाबाजार परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्पराविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात विनयभंग व मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहि‌ल्या घटनेत एका २८ वर्षांच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ही महिला जावेसोबत घरी पायी जाताना संशयित आरोपी चेतन शांतीलाल बारिकवाले याने अश्लिल संभाषण करत अडवले. या महिलेला सोडवण्यासाठी आलेल्या दिराला चेतनने मारहाण केली. याप्रकरणी चेतनविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या गटातर्फे चेतन बारीकवाले याने तक्रार दिली आहे. त्यानुसार चेतन हा घरासमोर थांबला असता संशयित आरोपी बजरंग बबनराव पहाडिये व किशोर बबनराव पहाडिये हे मद्यधुंद अवस्थेत आले व आमच्याकडे का पाहतो. तू आम्हाला ओळखत नाही का, असे विचारत हॉकीस्टिकने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चेतनच्या तक्रारीवरून पहाडिये बंधुंविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरी बंधारे गेटचा तिढा सुटण्याची चिन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता. जुन्या सभागृहाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी विलंब लावल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. नवीन सभागृहाची पहिली बैठक १० जुलै रोजी होणार असून या बैठकीत कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. हा विषय दोन महिन्यात मार्गी लागला तर यंदा कित्येक बंधाऱ्यांत पाणी साठविणे शक्य होणार आहे.
जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटचा विषय गेल्यावर्षी खूप गाजला. पहिल्या टप्प्यात ३५०० गेट बसविण्यासाठी अडीच कोटींची तरतूद केली होती. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरविणे, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी प्रक्रिया पूर्ण झाली. तत्कालीन सभागृहाने या प्रक्रियेत अनेकवेळा शंका उपस्थित केल्या. प्राधान्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे तब्बल आठ महिने हा विषयच मार्गी लागला नाही. दरम्यान नवीन सभागृह अस्तित्वात आले. १० जुलै रोजी पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर यांनी या सभेत कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटचा प्रस्ताव ठेवला आहे. ‘पहिल्याच सभेत हा विषय मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न राहतील जेणेकरून ग्रामीण भागातील भागातील सिंचन क्षमता आणखी वाढेल,’असे डोणगावकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यावधी होणार नाही, पण सदैव सज्ज राहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कोणीही कितीही म्हटले तरी मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, तरीही सदैव सज्ज राहा, गाफील राहू नका, सोशल इंजिनीअरिंगवर भर देत पक्षवाढीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना केले. केवळ कागदावर काम दाखवू नका, असा सज्जड दमही त्यांनी भरला.
पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहचविणे व पक्षविस्तारासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. या विस्तारक योजनेतून जिल्ह्यात झालेल्या कामाचा आढावा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी बुधवारी जालना रोडवरील एका हॉटेलात घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, संघटक भाऊराव देशमुख, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना अनेक गावात योग्य पद्धतीने राबविली नसल्याचे यावेळी समोर आले. त्यावर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आपल्या खास शैलीत काम न केलेल्या कार्यकर्त्यांना सुनावले. सोशल इंजिनीअरिंग करत प्रत्येक गावात आणि बुथ केंद्र परिसरातील प्रत्येक समाजातील व्यक्ती जोडण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

७० पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी

विस्तारक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी दानवे यांनी शहर व जिल्ह्यातील प्रमुख ७० पदाधिकाऱ्यांकडे प्रत्येकी ८ ते १० गावांचे पालक म्हणून जबाबदारी सोपवली. त्यांनी या गावात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत, त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल, कागदोपत्री काम नको, असे त्यांनी सांगितले. ही बैठक दुपारी १२ पासून सायंकाळी सहा पर्यंत चालली. या बैठकीपासून पत्रकारांना दूर ठेवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल विभागाच्या रेकॉर्डचे स्कॅनिंग रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महसूल विभागातील जीर्ण झालेले ऐतिहासिक दस्ताऐवज आणि दरवर्षी जमा होणारे महत्त्वाचे रेकॉर्ड दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी हाती घेण्यात आलेले स्कॅनिंगचे काम रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर यांनी स्कॅनिंग करणाऱ्या एजन्सीला एक महिन्याभराचा कालावधी दिला आहे.
दोन वर्षांपासून महसूल विभागाच्या रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. महसूल विभागात धुळखात पडलेले ऐतिहासिक, निजामकालीन दस्तावेज, शहरासह गावांचे रेकॉर्ड जीर्ण होऊन त्यावरील मजकूर नष्ट होऊ नये म्हणून या सर्व रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. महत्त्वाची कागदपत्रे जीर्ण होऊन रेकॉर्ड नष्ट होत असल्यामुळे न्यायालयीन प्रकरणे हाताळताना अडचणी निर्माण झाल्या होत्या.
मराठवाड्यातील औरंगाबादसह ७ जिल्ह्यांचे काम रिको एजन्सीला मिळाले होते, तर लातूर जिल्ह्याचे काम कार्व्हो एजन्सीला देण्यात आले. रेकॉर्डचे स्कॅनिंग करण्याचे काम पूर्ण करण्याची मुदत डिसेंबर २०१६ पर्यंत होती. मात्र स्कॅन करावयाच्या कागदांची संख्या जास्त असल्याने या दोन्ही एजन्सींनी काम वेळेत पूर्ण केले नाही. त्यामुळे एजन्सीना तीन महिन्यांचे मुदतवाढ देण्यात आली. तरीही एजन्सींकडून काम पूर्ण होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. पुणे येथे झालेल्या महसूल परिषदेमध्येही स्कॅनिंगबाबत विचारणा करण्यात आली होती. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेकॉर्डच्या स्कॅनिंगचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गुन्हा दाखल करणार

दीड महिन्यांपासून एजन्सीकडून स्कॅनिंगचे काम बंद असल्याचे सांगताच एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावून घेतले व महिन्याभरात स्कॅनिंगचे काम न झाल्यास एजन्सीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन ट्रकची धडक; एक माणूस, ५४ शेळ्या ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
तालुक्यातील पळसवाडी जवळ बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या शिवाय ट्रकमधील ५५ शेळ्यांचा चिरडून मृत्यू झाला.
आयशर ट्रक (एम एम १३, आर ४२१५) मध्यप्रदेशहून सोलापूरकडे १४५ शेळ्या व ट्रक (जी जे ०३ बी वी ७२८०) औरंगाबादहून गुजरातकडे लोखंडी सळया घेऊन जात होता. या अपघातात ठार झालेल्याचे नाव नारायण जोतिसिंग धारवाल (वय ५५, रा. काबखा ता. मनावर जि. धाट मध्यप्रदेश), असे आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले होते. आयशर ट्रकमधील सलमान खलील शहा (वय २४) अनिल फुलचंद चव्हाण, नूर मोहम्मद रहीम व ट्रकमधील शैलेश परमार, किरीट दशवन परमार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. या शिवाय २५ शेळया जखमी झाल्या आहेत. ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षाने या अपघाताची माहिती खुलताबाद पोलिसांना कळवली तेव्हा पोलिस ठाण्यात योगदिवस साजरा करण्यात येत आहे. पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी पोलिस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, हेड कॉन्स्टेबल पी. बी. तांबे, बाबासाहेब थोरात, हनुमंत सातपुते यांना घटनास्थळी पाठविले. महामार्ग सहायक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण यांनी जखमींना उपचारासाठी पाठवून वाहतूक सुरळीत केली. पळसवाडी येथील ग्रामस्थांनी जेसीबीच्या साह्याने महामार्गावरील मृत शेळ्या हटवल्या.

अहवालाकडे दुर्लक्ष

पळसवाडी येथील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पूल वळणावर असल्याने वरती असल्याने येथे नेहमी अपघात होतात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव शरद तांबे यांच्या समितीने हा पूल धोकादायक वळणावर असल्याचा अहवाल दिला होता, मात्र त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिलर्सना जीएसटीची धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवी करप्रणाली (जीएसटी) लागू होण्यापूर्वी आपल्याकडे असलेला स्टॉक संपवा, असे आदेश काही वाहन कंपन्यांनी डिलर्सना दिले आहेत. त्यामुळे आपल्या शोरूममध्ये असलेली वाहने १ जुलैपूर्वी विकण्याचे आव्हान शहरातील डिलर्ससमोर उभे राहिले आहे. त्यांनी जीएसटीची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. असलेली वाहने लवकर विक्री करण्यासाठी आता त्यांनी विविध प्रकारच्या ऑफर्सचा धडाका लावला आहे.

एक जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. त्यानंतर २८ टक्के करासह १५ टक्के उपकर लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हायब्रीडसह डिझेल कारच्या किमती वाढण्याची शक्यता आहे; तसेच पेट्रोल कारच्याही किमती वाढू शकतात. जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादित माल आणि मालाची विक्री यात सुसूत्रता असणे आवश्यक आहे. डिलर्सकडे नवीन आणि जुना स्टॉक अशी भानगड राहू नये, यासाठी कंपनीकडून त्यांच्याकडे असलेल्या गाड्या लवकरात लवकर विकण्याच्या सूचना आल्या आहेत. यासाठी कंपन्यांनीही काही ऑफर जाहीर केल्या आहेत. सणासुदीच्या काळात डिलर्सकडे स्टॉक असावा म्हणून दरवर्षी जून, जुलै महिन्यात जास्तीच्या वाहनांचा पुरवठा केला जातो. यंदा मात्र, कंपन्यांनी जास्तीचा स्टॉक पाठविलेला नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर नवी वाहने डिलर्सकडे पाठविली जाणार आहेत, अशी माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली.

सध्या आपल्याकडे असलेल्या वाहनांचा स्टॉक संपविण्याकडे डिलर्सचे लक्ष आहे. त्यासाठी शहरातील जालना रोडवर असलेल्या फोर व्हीलरच्या अनेक शोरुममध्ये गेल्या काही दिवसांपासून विशेष ऑफर देण्यात येत आहेत. या काळात वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० ते १५ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. अशाच सवलती काही वाहनविक्रेत्यांनी देऊ केल्या आहेत. एक जुलैपासून नवीन स्टॉकनुसार व नव्या किमतीत वाहनांची विक्री केली जाणार आहे. जुन्या स्टॉकच्या नोंदणीबाबत अद्याप कोणतेही निर्देश आलेले नसल्याने वाहनांची विक्री विशेष ऑफर देऊन करावी लागत असल्याची माहिती वाहन डिलर्सकडून देण्यात आली.

अशीही शक्यता

एक जुलैपासून कारसह दुचाकी वाहनांच्या किंमतीमध्ये काही प्रमाणात फरक पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ५०० सीसीच्या आतील गाड्यांवरील कर कमी होण्याची शक्यता असून, त्यापेक्षा जास्त सीसीच्या वाहनांवर कराचा बोजा वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यातील रस्त्यांसाठी १७.५ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
साडेसतरा कोटी रुपये खर्च करून सातारा भागात रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. बीड बायपासला मिळणाऱ्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन असून, एक ते दीड महिन्यात ही कामे सुरू होतील, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी दिली.
सातारा, देवळाई भागातील सुमारे १८ कोटी रुपये सिडको प्रशासनाकडे थकलेले आहेत. ही रक्कम महापालिकेला मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या रक्कमेपैकी आठ कोटी रुपये लवकर मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश बारवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले. आठ कोटी रुपयांत महापालिका स्वतःचे साडेनऊ कोटी रुपये देणार असून, साडेसतरा कोटी रुपयांचे रस्ते सातारा भागात तयार केले जाणार आहेत.

अंतर्गत रस्त्यांची कामे नको
सातारा भागातून बीड बायपास रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे करा, अशी स्पष्ट सूचना बारवाल यांनी केली. अंतर्गत रस्त्यांची कामे करू नका, असे त्यांनी बजावले. सातारा भागातून सुमारे पाच रस्ते बीड बायपास रस्त्याला येऊन मिळतात. या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे सातारावासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युथ विंगच्या कार्यकारिणीत सुयोग रुणवाल यांची निवड

$
0
0

युथ विंगच्या कार्यकारिणीत सुयोग रुणवाल यांची निवड
लोणावळ्य ात क्रेडाई महाकॉन परिषद
औरंगाबाद : क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या राज्यस्तरीय परिषदेत युथ ‌िवंगच्या कार्यकारिणीत सुयोग रुणवाल यांची निवड करण्यात आली. १६ व १७ जून रोजी ही परिषद लोणावळा येथे झाली. परिषदेत सुमारे ५००० हून अधिक व्यावसायिक उपस्थित होते तर औरंगाबादच्या क्रेडाई पदाधिकारींसह ४५ जणांनी सहभाग नोंदवला. माहिती अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी दिली. रेरा, कायद्यांसंदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेस राज्यातील ४२ शहरातील क्रेडाई सदस्य आले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज विभागाचे मुख्य एम. जी. वैजनाथ यांनी परिषदेचे उद्घाटन केले. राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर शांतीलाल कटारिया यांची मुख्य उपस्थिती होती. तिघांनी यावेळी समयोचित मनोगत व्यक्त केले ‘महारेरा’चे अध्यक्ष गौतम चटर्जी ‘रेरा’ विषयी मार्गदर्शन केले. परवडणारी घरे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. राज्याचे उपाध्यक्ष राजीव पारीख, राष्ट्रीय सचिव रोहितराज मोदी यांची यावेळी उपस्थिती होती. या परिषदेचे संयोजक गिरीश रायबागे हे होते. परिषदेत जीएसटीची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. बांधकाम व्यवसायाचे पुनरुज्जीवन आणि वाढीविषयीच्या योजना, विविध समस्यांचे निराकरण, जीएसटीची अंमलबजावणी, कामगारांचे कौशल्य व्यवस्थापन या विषयी चर्चा करण्यात आली. या परिषदेला औरंगाबादहून प्रमोद खैरनार, सुनील पाटील, नरेंद्रसिंग जाबिंदा, नितीन बगाडिया, विकास चौधरी, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, सीताराम अग्रवाल, संभाजी अतकरे, अनिल अग्रहारकर, अखिल खन्ना, पंजाबराव तौर, संदेश झांबड, मनोज रुणवाल, मनोज काला, आर. एफ. पाटील, रुपेश अग्रवाल, रविंद्रसिंग बिंद्रा, रविंदरसिंग जोहर यांच्यासह ४५ जणांनी सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाटू’च्या उपकेंद्राची उभारणी आठ दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (बाटू) उपकेंद्र औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा प्रश्न आठ दिवसांत निकाली काढला जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी बुधवारी औरंगाबादेत संलग्न कॉलेजांच्या प्राचार्यांची भेट घेतली. कॉलेजांमधील वादामुळे हे केंद्र सरकारी जागेत होणार असून, विद्यापीठाच्या एकूणच वाटचालीबाबत गुरुवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत विशेष बैठकही मुंबईत होत आहे.
तंत्रशास्त्र विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादमध्ये कोठे स्थापन होणार, याबाबत चर्चेला उत आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जागेची मागणी केली होती, पण विद्यापीठाने उपकेंद्रासाठी जागा दिली नाही. त्यामुळे खाजगी संस्थांमध्ये केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यात दोन कॉलेजांनी प्रस्ताव पाठविले. दोन्ही कॉलेजांमध्ये केंद्रावरून वाद सुरू झाला. राज्यातही विविध ठिकाणी अशा प्रकारचा वाद समोर येण्याची शक्यता लक्षात येताच विद्यापीठ प्रशासनाने खाजगी कॉलेजांचा पर्याय रद्द करून सरकारी जागांवरच हे केंद्र उभारले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर बुधवारी औरंगाबादमध्ये आले होते. त्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेतली. कॉलेजांमधील वादामुळे हे उपकेंद्र खाजगी कॅम्पसमध्ये न करता सरकारी जागेतच सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आठ दिवसांत जागा निश्चित करून उपकेंद्राचा प्रश्न निकाली काढू, असे सांगितले.

शिक्षणमंत्र्यांसोबत बैठक आज
राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाचे कॉलेजांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा (बाटू) पर्याय कॉलेजांसमोर ठेवला. त्यात संलग्नीकरण घ्यायचे की नाही, कॉलेज व्यवस्थापनावर अवलंबून होते. त्यात राज्यातील ४८ इंजिनीअरिंग विद्यापीठाशी जोडले. विद्यापीठाशी कॉलेज मोठ्या प्रमाणात जोडले गेल्याने त्याचा आढावा आणि भविष्यातील नियोजनाबाबत गुरुवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत विद्यापीठ प्रशासनाची बैठक होत आहे. त्यावेळी प्रेझेंटेशन करण्यात येणार असून, उपकेंद्रासाठी लागणारा निधी, पायाभूत सुविधा यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यापीठाच्या औरंगाबाद उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न लवकरच मिटेल. शिक्षणमंत्र्यांसोबत गुरुवारी बैठक आहे. त्यातही याबाबतचे नियोजन आणि विद्यापीठाच्या वाटचालीवर चर्चा होईल.
- डॉ. विलाय गायकर, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्नड तालुक्यातील झेडपी शाळांचे हाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकीकडे जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती सुधारत असताना कन्नड तालुक्यातील काही शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकाच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी गेल्या आठवडाभरापासून शाळेला कुलूप ठोकले आहे. मुख्याध्यापक सहा महिन्यांपासून गायब असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला आहे.
माळेगाव (ठोकळ) (ता. कन्नड) येथील गावकरी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेत आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख हे कामानिमित्त बाहेर असल्याने गावकऱ्यांची भेट होऊ शकली नाही. माळेगावात १०० विद्यार्थी आहेत. शिक्षकांची पाच पदे मंजूर असून, केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत. गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षक देण्याची मागणी केली होती. शालेय सत्र सुरू होण्यापूर्वी गावकऱ्यांनी प्रशासनास मागणी करून शिक्षक न दिल्यास शाळा सुरू न ठेऊ देण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार १५ जून रोजी शाळेस कुलूप ठोकले. दोन दिवस प्रशासनाकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. तात्पुरत्या स्वरुपात दोन शिक्षक देऊ, असा तोडगा सुचविला गेला, पण गावकऱ्यांनी तो अमान्य केला. कारण काही दिवस शिक्षक येतील पुन्हा हे शिक्षक मूळ ठिकाणी गेल्यास विद्यार्थ्यांचे पुन्हा होतील. आमच्याकडे कायमस्वरुपी शिक्षक द्यावेत, या साठी गावकरी मंगळवारी झेडपीत आले होते. दोन्ही प्रमुख अधिकारी नसल्याने ते हिरमुसले. आमच्याकडे कायमस्वरुपी शिक्षक दिले जाणार नाहीत तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असे तुकाराम वाकळे, कैलास ठोकळ यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

मुख्याध्यापक गायब
भारंबावाडी (ता.कन्नड) झेडपी शाळेतील मुख्याध्यापक सहा महिन्यांपासून गायब आहेत. दोन शिक्षकी शाळेत पहिली ते पाचवीचे वर्ग आहेत. एक शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यापुढे जाऊन यंदा दुसरीकडे प्रवेश घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी टीसी मिळणे अवघड झाल्याचे जयलाल राठोड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी सहायकांचे साखळी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मृद संधारण व जलसंधारण विभागाकडे वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
विभागीय सचिव शिवानंद आडे, जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. सुधारित आकृतीबंध त्वरित करावा, तो करताना संघटनेला विश्वासात घ्यावे, कृषी सहायकामधूनच कृषी पर्यवेक्षकांची पदे १०० टक्के पदोन्नतीने भरावेत, आकृतीबंधात कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी करावे, आदी मागण्या आहेत. तातडीने निर्णय न घेतल्यास १ जुलैला पुणे येथील कृषी आयुक्तालयावर मोर्चा व १० जुलैपासुन बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. विलास येवले, विठ्ठलराव गोराडे, रामू सोळुंके, बी. एल. गायकवाड, मच्छिंद्र पाटील, गणेश जाधव, संजीव साठे, योगेश दिवेकर, यशवंत चौधरी, मीरा राठोड, सोनल आगळे, अश्विनी पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साई इंजिनीअरिंगचे संलग्नीकरण रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सामूहिक कॉपीप्रकरणी साई इंजिनीअरिंग कॉलेजची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (२१ जून) झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत महाविद्यालयाची संलग्नीकरण रद्द करण्यात आला असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.
विद्या परिषदेच्या मंगळवार आणि बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीबाबत कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले की, साई इंजि‌नीअरिंग कॉलेजच्या संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय विद्यापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला असून, यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. येत्या २७ जून रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images