Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जिल्हा बँक फोडण्याचा बाजारसावंगीत प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाजारसावंगी शाखेत मंगळवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला. रोकड ठेवलेल्या खोलीत चोरटे न गेल्याने बँकेची तिजोरी सुरक्षित राहिली. या शाखेत चोरीचा प्रयत्न होण्याची ही चौथी वेळ आहे.
बाजारसावंगी येथील ग्रामसचिवालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. बँकेचे अधिकारी-कर्मचारी मंगळवारी कामकाज आटोपून घरी गेले. ते बुधवारी सकाळी बँकेत आले असता पश्चिमेकडील दाराची लाकडी फळी निघालेली दिसली. तेथून चोर बँकेत घुसल्याचे स्पष्ट झाले. बँकतील सीसीटीव्ही सुरू असल्याचे लक्षात येताच एका चोराने दुसऱ्याला तोंड झाकण्याचे सांगितल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. यापूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे हे गस्त घालत असताना बँकेतील लाइट सुरू असल्याचे दिसले. त्यावेळी पोलिस आल्याचे लक्षात येताच चोर पळून गेले होते. त्यानंतरही बँकेने रात्रपाळीत सुरक्षारक्षक नेमला नाही. दरम्यान, शाखाधिकारी अनिल शिसोदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हा बँकेची झडती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या साडेआठ कोटीच्या बेकायदा कर्जमाफी प्रकरणात संचालक मंडळातील आमदार संदीपान भुमरे यांनी गुरुवारी आर्थिक गुन्हेशाखेत हजेरी लावली. याच प्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने अदालत रोडवरील बँकेच्या मुख्य शाखेत झडती घेतली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५२ सहकारी संस्थांना बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल साडेआठ कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याप्रकरणी बँकेच्या संचालकांसह, विधी अधिकारी, सीए आणि सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, विद्यमान आमदार अब्दुल्ल सत्तार, संदीपान भुमरे यांच्यासह इतर संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. बँकेचे माजी संचालक सद‌ाशिव गायके यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने आरोप असलेल्या संचालकांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. आमदार संदीपान भुमरे यांनी गुरूवारी आर्थिक गुन्हेशाखेत हजेरी लावली. मात्र वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसल्याने थोडा वेळ थांबून आमदार भुमरे निघून गेले. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी अदालत रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयास भेट देत झाडाझडती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणीशिवाय गुणपत्रिका नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘कौशल्य विकास अभ्यासक्रम’ योजनेला मागीलवर्षी अल्प प्रतिसाद मिळाल्याने यंदा शिक्षण मंडळाने नवी शक्कल लढवली आहे. दहावी उत्तीर्ण व ‘एटीकेटी’मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून कौशल्य सेतूचा नोंदणी अर्ज भरून घ्या, हा अर्ज भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देऊ नका, असे फर्मान मंडळाने शाळांना सोडले आहे.
दहावीला विद्यार्थ्यांवरील नापासाचा शिक्का पुसण्यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. दहावीत तीनपेक्षा अधिक विषयातील नापास विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पात्र ठरविण्यात आले. मागील वर्षीपासून दहावीच्या गुणपत्रिकते खास कौशल्य विकासास पात्र, असा उल्लेख करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक कॉलेजांमध्ये प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आली. त्यासाठी १६ अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली. जी कौशल्याधारित आहेत. मागील वर्षी राज्यभरात २४ हजार ३२२ विद्यार्थी तर, औरंगाबाद विभागात २ हजार ४ विद्यार्थी यासाठी पात्र ठरले. त्यांना प्रशिक्षणाचे कॉलेजही निश्चित करण्यात आले, परंतु त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ढेपाळल्याने आणि प्रतिसाद कमी मिळाल्याने हा उपक्रम फारसा प्रभावी ठरला नाही. मागील वर्षी उपक्रम फारसा प्रभावी न ठरल्याने यंदा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने नवा फंडा शोधला आहे. त्याबाबत आधी नोंदणी करा नंतर गुणपत्रिका असा पवित्रा घेतला आहे. शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांना २४ जून रोजी गुणपत्रिका देण्यात येणार आहे. त्यात शाळांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, दहावी उत्तीर्ण व ‘एटीकेटी’मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून कौशल्य सेतुचा नोंदणी अर्ज भरून घ्या. हा अर्ज भरल्याशिवाय या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात येऊ नये. शाळांना गुणपत्रिका देताना मंडळ कौशल्य सेतूचे अर्जही भरून घेणार आहेत. अशा विद्यार्थ्यांची संख्या किती याबाबत ही मंडळ अद्याप साशंक आहे.

ऑफलाइन नोंदणी
मागील वर्षी ही योजना सुरू झाली. मागील वर्षीही शाळांकडेच जबाबदारी होती. त्यासह ऑनलाइन नोंदणीसाठी ‘अॅप’ही तयार करण्यात आले. त्यानंतरही प्रतिसाद फारसा मिळाला नाही. त्यामुळे यंदा त्यासाठी प्रथम अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलवर सुचना दिल्या जातील. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना आवड असलेल्या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हे आहेत अभ्यासक्रम
तीनपेक्षा अधिक विषयामध्ये अनुत्तर्णीय असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकासास पात्र असा उल्लेख आहे. त्यांना प्रशिक्षण पॉलिटेक्निक कॉलेजांमध्ये दिले जाणार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांची रचना त्या-त्या परिसरातील औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेत करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात मेकॅनिकल अँड ऑटोमोबाइल टेक्निशियन, हँड एम्ब्रॉयडरी, मशीन ऑपरेटर, सिव्हील कन्स्ट्रक्शन टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन, अन्न प्रकिय्रा, सेटअप बॉक्स इन्स्टॉलर अँड सर्व्हिस टेक्निशियन, प्लबिंग अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

कौशल्य सेतुसाठी विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका देतेवेळीच अर्ज भरून घेणार आहोत. तशा सुचनाही शाळांना दिलेल्या आहेत. त्याचे अर्ज शाळांना गुणप‌त्रिकांच्यासोबत दिले जाणार आहेत. हा उपक्रमाची जबाबदारी वेगवेगळ्या स्तरावर देण्यात आलेली आहे. मंडळाकडे नोंदणीची प्रक्रिया आहे.
- वंदना वाहुळ, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात बारा दिवसानंतर पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री
तब्बल १२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी अानंदी झाला अाहे. हा पाऊस फुलंब्री व गणाेरी सर्कलमधील काही गावांत पडला.
या वर्षी सुरुवातीचे दाेन-तीन पाऊस चांगले झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवड झाल्यानंतर तब्बल १२ दिवसांनी गुरुवारचा पाऊस पिकासाठी समाधानकारक झाला. दडी मारल्यानंतर संपूर्ण बारा दिवस प्रखर ऊन व दमट वातरवरण होते. त्यामुळे लागवड केलेले पीक वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. तालुक्यातील फुलंब्री व गणाेरी सर्कलमधील काही गावांत ही चिंता दूर झाली आहे. दुपारी चार ते पाचच्या दरम्यान पाऊस झाला. या पावसामुळे फुलंब्री, गणाेरी, बिल्डा, किनगाव, वारेगाव, वाणेगाव, शिराेडी या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बाबरा व वडाेद बाजार सर्कलमध्ये नेहमीप्रमाणे ऊन पडले होते. गेल्यावर्षी बाबरा सर्कलमध्ये दुष्काळाचे सावट हाेते यंदाची अशीच अवस्था आहे. या सर्कमलध्ये सुरुवातीचा थाेडाफार पाऊस झाला. या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीचे ऑनलाइन प्रवेशच ग्राह्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विशिष्ट कॉलेजांनाच प्रवेश घ्या, असा पालक, विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जात असल्यापासून १७ नंबर अर्ज भरताना काय करायचे, आमच्या शाळेतील मुलांनी इतर ‌ठिकाणाहून अर्ज भरले, त्या अर्जांची निश्चिती झाली आता काय, अशा प्रश्नांनी अकरावी प्रवेशाबाबत बोलावण्यात आलेली मुख्याध्यापक, प्राचार्यांची बैठक गाजली. ‘ऑनलाइन प्रक्रियेतून झालेलेच प्रवेशच गाह्य धरले जातील,’ असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
ऑनलाइन अकरावी प्रवेशात नोंदणी प्रक्रियेचा टप्पा सध्या सुरू आहे. शिक्षण विभागाने यंदा पहिले वर्ष असल्याने शाळांनीच विद्यार्थ्यांची नोंदणी करून देण्याचे आदेश दिले. त्यानंतरही अनेक त्रुटी राहिल्याचे समोर येत आहे. प्राचार्य, मुख्याध्यापकांची प्रवेशासंदर्भात गुरुवारी देवगिरी कॉलेजमध्ये बैठक झाली. प्रवेश प्रक्रियेतील अडचणी बैठकीत मांडण्यात आल्या. या बैठकीसाठी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके, उपशिक्षणाधिकारी गजानन सुसर, उपप्राचार्य रजनीकांत गरूड, राजेंद्र पगारे यांची उपस्थिती होती. विशिष्ट कॉलेजात प्रवेशासाठी, पसंती क्रमांक भरण्यासाठी सक्ती केल्याचा आरोप काहींनी केला, तर अनेक शाळांनी आपल्या शाळेतून अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांचे आर्ज निश्चिती झाली, आता काय करायचे, असा प्रश्न केला. १७ नंबर फॉर्म भरून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे करायचे काय, असा प्रश्नही समोर आला. काहींनी ‘इन हाउस कोटा’ संस्थेच्या शहरा बाहेरील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीही द्यावा, अशी मागणी केली, तर काहींनी ५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून होणारे प्रवेश हे प्रक्रियेत शेवटी असावेत, असे मांडले. या प्रकारावर उपसंचालकांनी माहिती पुस्तिकेतील विविध मुद्दे स्पष्ट केले. ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि नियमानुसारच प्रवेश होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रक्रियेतील त्रुटी तात्काळ दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विद्यार्थी, पालकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवगिरीत विभागाने मदत केंद्र सुरू केल्याचे सांगितले.

पुस्तिका परत करा
माहिती पुस्तिका कमी पडत असल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी बाहेरूनही ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. अशा शाळांनी शिल्लक माहिती पुस्तिका माहिती पुस्तिका परत कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या.

शाळांनी विद्यार्थी, पालकांची बैठक नाही
अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पहिल्यांदा होत आहे. त्या प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालकांना माहिती द्यावी, यासाठी शाळांनी आपल्या स्तरावर विद्यार्थी, पालकांची बैठक घ्यावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यानंतरही अनेक शाळांनी अशा प्रकारच्या बैठका घेतल्या नसल्याने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शाळांच्या थोड्याशा चुकांमुळे काही अडचणी आलेल्या आहेत. माहिती पुस्तिकेत परिपूर्ण माहिती दिली आहे. त्यानंतरही अडचणी आल्या, तर आम्ही उपलब्ध आहोत. काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत लगेचच ‌शिक्षण विभागाशी संपर्क साधावा.
-वैजनाथ खांडके, शिक्षण उपसंचालक, ‌औरंगाबाद विभाग.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हटकरवाडीच्या तरुणांनी ओढली डोंगरातून बैलगाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
संत एकनाथाच्या पालखीसोबत आलेल्या नाथवंशजाना बैलगाडीत बसवून ती तीन किलोमीटर ओढून डोंगरापलिकडे नेण्याची परंपरा शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी येथील तरुणांनी गुरुवारी परंपरेने यावर्षी सुद्धा पाळली.
संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने १६ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान केले असून सात मुक्कामानंतर ती गुरुवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी येथे सकाळी दहा वाजता पोहोचली. दिंडीचा पुढील मुक्काम पाटोदा यथे असतो. हटकरवाडीहून गारमाथा डोंगर चढून दिंडी पाटोद्याकडे प्रस्थान करते. या दगड धोंड्यांच्या अत्यंत खडतर मार्गावरून वारकऱ्यांना पायी चालावे लागते.
अनेक वर्षांच्या परंपरेनुसार हटकरवाडी येथील तरूण पालखीसोबत आलेल्या नाथवंशजाना बैलगाडीत ती ओढत डोंगरापलिकडे नेतात. पालखीसोबतच्या वारकऱ्यांचा पाहुणचार केल्यानंतर हटकरवाडीच्या गावकऱ्यांनी नाथववंशजाना एका सजवलेल्या बैलगाडीत बसवले. नाथवंशज बसलेली बैलगाडीला तीन किलोमीटर ओढत डोंगरमाथ्यावर पोहचवली. बैलगाडी ओढण्याची परंपरा पाहण्यासाठी या भागातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
‘यावर्षी आतापर्यंत १५ हजार वारकरी व ५५ दिंड्या सहभागी झाल्या असून येत्या काही दिवसात वारकऱ्यांची सख्या लाखाच्या घरात जाईल, असे नाथवंशज पोलखीप्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी सांगितले.

पालखी मार्गात बदल नाही
संत एकनाथ महाराज पालखी मार्गाचे काम सुरू होणार असून नाथांच्या पारंपरिक पालखी मार्गात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याने या भागातील नागरिक व वारकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आमदार भीमराव धोंडे व विनायक मेटे हे गुरुवारी हटकरवाडी येथील सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. वारकरी व या भागातील नागरिकांनी पालखी मार्गात होणाऱ्या बदलाविषयीचा प्रश्न उपस्थित केला. त्याबर बोलताना आमदार धोंडे यानी नाथांच्या पारंपरिक पालखी मार्गात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीच्या पुस्तकांचा खुलताबादेत तुटवडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद
यावर्षी सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना सातवीची पुस्तके मोफत देण्यात आली. पण विकत घ्याव्या लागणाऱ्या नववीच्या पुस्तकांचा बाजारात तुटवडा आहे.
अभ्यासक्रम बदल्याने यावर्षी नवीन पुस्तकात झालेले बदल पाहण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांना आहे. पण पुस्तकेच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. शासनाने अभ्यासक्रम बदलताना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच नवीन अभ्यासक्रम असलेले पुस्तके उपलब्ध का केली नाहीत, असा प्रश्न पालक विचारात आहेत. उपलब्ध झालेली पुस्तके हातोहात संपली आहेत. नवीन नियमानुसार तासिकांमध्ये झालेले बदल लक्षात घेता पुस्तकेच नसतील, तर ४५ तासिका पूर्ण कशा करायच्या असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. एकीकडे बाजारात पुस्तके उपलब्ध नाहीत, तर दुसरीकडे शिक्षक उद्यापासून पुस्तके आणा, असे सांगत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. नववीची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी मार्गदर्शन कार्यशाळा

0
0

औरंगाबाद : इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून (२३ जून) ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. फार्मसीसाठी ही प्रक्रिया २५ ते २८ जूनदरम्यान होणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी कॉलेजांची निवड, विषय, कट ऑफ यांसह प्रवेश प्रक्रियेबाबत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळावित म्हणून ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे शुक्रवारी (२३ जून) मिशन इंजिनीअरिंगअंतर्गत ‘ऑप्शन फार्म कसे भरावेत’ याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इंजिनीअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या सुधारित प्रवेश प्रक्रियेत नोंदणी, अर्ज निश्चितीची प्रक्रिया संपली आहे. आता प्रत्यक्ष प्रवेश फेरीला सुरुवात होत आहे. ती प्रक्रिया कशी असेल, ऑप्शन फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी, कोणता अभ्यासक्रम चांगला, सीईटी स्कोअर चांगला आहे, पण निवड कशी करावी, विविध जागांचा तपशील, टीएफडब्ल्यूएस योजना काय, अशा विविध प्रश्नांची माहिती विद्यार्थी, पालकांना व्हावी म्हणून या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या सभागृहात शुक्रवारी (२३ जून) रोजी सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे. तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्रवेश प्रक्रियेचे समन्वयक डॉ. गोविंद संगवई हे मार्गदर्शन करणार आहेत.

स्थळ ः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सभागृह, उस्मानपुरा
तारीख ः २३ जून, शुक्रवार
वेळ ः सकाळी ११ वाजता
मार्गदर्शक ः सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, डॉ. गोविंद संगवई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भूमिगत’मुळे शहर कोमात

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे पर्यटनाची राजधानी कोमात गेली आहे. या योजनेवर आजवर २३२ कोटी रुपये खर्चून ही योजना अपूर्ण आहे. विशेष म्हणजे मुदतीत काम होणार नसल्याचे लक्षात आल्यावर या योजनेला गुपचूप मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
केंद्र सरकारच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्टर डेव्हलपमेंट स्किम फॉर स्मॉल अँड मीडियम टाऊन्स (युआयडीएसएसएमटी) मधून शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर करण्यात आली. सुमारे ३६५ कोटी रुपयांची ही योजना असून यापैकी ८० टक्के निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार आहे. १० - १० टक्के निधी राज्य शासन व महापालिकेने उपलब्ध करून द्यायचा आहे. या योजनेसाठी शासनाकडून महापालिकेला २९२ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी २३२ कोटी रुपये खर्च केले. पालिकेने १८ कोटी रुपयांचा हिस्सा या योजनेसाठी टाकला. आणखी ५५ कोटी रुपये पालिकेला या योजनेसाठी द्यावे लागणार आहेत. २३२ कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागातून आतापर्यंत ६२.५० किलोमीटरची ड्रेनेज लाइन टाकली आहे. मात्र, ही लाइन अद्याप सुरू नाही. शहरातून वाहणारे सर्व नाले भूमिगत करण्याची ही योजना. मात्र, अद्याप एकही नाला भूमिगत झालेला नाही. नारेगाव - मिसारवाडीतील एक नाला वगळता अन्य नाले वाहताना दिसतात. भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराबरोबर पालिकेने केलेल्या करारानुसार ३० जून २०१७ रोजी योजनेच्या कामाची मुदत संपणार आहे. त्यासाठी आठ दिवस शिल्लक राहिलेले असताना योजनेचे काम मात्र खूप बाकी आहे. त्यामुळे या योजनेला पालिका प्रशासनाने चार महिन्यांची गुपचूप मुदतवाढ दिली. यासाठी शासनाची मंजुरी घेण्यात आले नसल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले.

दोन एसटीपी वगळले
‘भूमिगत’चा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला सादर केला. त्यात शहराच्या विविध भागात सहा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प अर्थात सिवरेज ट्रिटमेंट प्लांट तयार करण्याचा उल्लेख होता. शासनाने या सहा प्रकल्पाला मंजुरी दिली. पालिकेने मात्र विमानतळ आणि सिद्धार्थ उद्यानाशेजारचा एसटीपी परस्पर वगळला. त्याला शासनाची मान्यता देखील घेतली नाही. आता कांचनवाडी, पडेगाव, बनेवाडी व झाल्टा येथे एसटीपीचे काम केले जात आहे. करारानुसार कामाची तीन वर्षांची मुदत संपत आलेली असताना चार पैकी एकही एसटीपी सुरू नाही. ते केव्हा सुरू होणार, याचे उत्तर पालिका प्रशासनाकडे नाही.

पाइपांचे स्पेसिफिकेशन बदलले
‘भूमिगत’च्या डीपीआरमध्ये एलपी - ३ या स्पेसिफिकेशनची ड्रेनेज लाइन वापरण्याचे नमूद केले होते. शासनाने या ड्रेनेज लाइनच्या वापराला मान्यता दिली, पण प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर एलपी - ३ च्या ऐवजी एलपी - २ हे पाइप वापरले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एलपी - ३ पाइप वापरण्याची शिफारस केली होती. ही शिफारस परस्पर बदलली. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मान्यता घेतली नाही. पाइपांमध्ये बदल केल्यामुळे खर्चात बचत झाल्याचे बोलले जाते. खर्चात झालेली बचत कुणाच्या फायद्याची ठरली असा प्रश्न विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘स्थायी’च्या बैठकीत शिवसेना नगरसेवक राजू वैद्य यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी उत्तर देऊ शकले नाहीत.

रस्ते खोदले - नाले भरले
‘भूमिगत’च्या माध्यमातून ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते खोदले. त्यामुळे शहराची दुर्दशा झाली. अगोदरच खड्ड्यात असलेले शहर आणखी खोल खड्ड्यात गेले. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ड्रेनेज लाइनसाठी खोदलेल्या रस्त्यांची माती व अन्य मलबा शेजारून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये टाकला. त्यामुळे नाले अरुंद झाले आणि आजूबाजूच्या वसाहतींना धोका निर्माण झाला. नाल्यात टाकलेल्या मलब्यामुळे नाला सफाईच्या कामातही अडथळे निर्माण झालेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अग्निशमन’चा ४८ कोटींचा डीपीआर शासन दरबारी

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे करोडी येथे उभारण्यात येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा ४८ कोटी २४ लाख रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. याशिवाय फायरमनची १८ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाणार आहे,’ अशी माहिती स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बारवाल यांनी गुरुवारी अग्निशमन विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘शहराच्या विविध भागात पाच अग्निशामक केंद्र बांधली जाणार आहेत. या केंद्रांच्या बांधकामाच्या निविदा काढल्या आहेत. केंद्रांच्या बांधकामासाठी ३ कोटी ३१ लाख पन्नास हजारांची तरतूद केली आहे. अग्निशमन विभागात ३३ पदे रिक्त असल्याचे आढावा बैठकीदरम्यान लक्षात आले. त्यामुळे १८ फायरमनची तातडीने कंत्राटीपद्धतीने त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून भरती करा असे आदेश दिले.’

करोडी येथे विभागीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन केले जाणार आहे. गट क्रमांक २४ मधील ७ एकर २६ गुंठे जमीन यासाठी ताब्यात घेतली आहे. या जमिनीवर सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. याशिवाय हेलिपॅड, परेड ग्राऊंड, वसतिगृह, गोदामाचे बांधकाम केले जाणार आहे. या केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. - गजानन बारवाल, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात पडताळणीसाठी विलंब

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
नगरपालिकेच्या निवडणुका संपून आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकांना अद्यापही जात पडताळणी कार्यालयाकडून विविध कारणे सांगत जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यास हेतूत: विलंब केला जात आहे. परिणामी, उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा पालिकेतील सुमारे २९ नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे.
या प्रमाणपत्रासाठी उस्मानाबाद येथील कार्यालयाबरोबरच अध्यक्षांच्या अनुपस्थितीचा अडसर ठरत आहे. जिल्ह्यातील आठही नगरपालिकेत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी निवडणुकीच्यावेळी तहसीलदार यांचे जात प्रमाणपत्र जोडलेले असतांना शिवाय, यासाठीचे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडलेली असताना अव्यवहारिक त्रृटी काढून हे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीचे कार्यालय विशिष्ट हेतूने लाभार्थ्यांना वेठीस धरत आहेत. लाभार्थ्यांना उस्मानाबाद व लातूर येथे खेटे मारावे लागत आहे.
जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीमुळे प्रमाणपत्रे रखडल्याचे उस्मानाबाद येथील या कार्यालयाचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. उस्मानाबाद विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष हे नाशिक निवासी पाटोळे हे आहेत. मध्यतरी त्यांचा अपघात झाला. सध्या ते नाशीक येथे उपचार घेत आहेत. आता त्यांचा पदभार अहमदनगरचे वायचळ यांच्याकडे आहे. त्यांच्याकडेही विविध नऊ समित्यांचा पदभार असल्यामुळे त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील कामकाजाची माहिती नाही किंवा त्यांना येथील कामाबाबत फारसा रस नाही. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जात पडताळणी प्रमाण पत्राचे कामकाज पूर्णतः रखडलेले आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत देणे गरजेचे आहे. सदरील प्रमाणपत्र वेळेत लाभार्थीना न दिल्यास त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई होवू शकते, याची
जाण या कार्यालयाला असतानाही हे कार्यालय केवळ लाभार्थ्यांना कागदपत्रांच्या त्रुटींची वारंवार यादी देवून त्यांना खेटे मारायला लावण्यात धन्यता मानत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ पैकी सहा नगरपालिकेतील जवळपास २९ नगरसेवक व नगरसेविका या प्रमाणपत्रासाठी उस्मानाबाद व लातूर कार्यालयाचे दरवाजे गेल्या सहा महिन्यांपासून ठोठावत आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या पदरी निराशाच आहे. उस्मानाबाद विभागीय जात पडताळणी समितीच्या अध्यक्षाचा अडसर हा अलीकडील एक-दीड महिन्यातील आहे. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून या कार्यालयातील काम हेतूत: रखडलेले आहे.


जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील रखडलेले काम येत्या आठवड्यात मार्गी लागेल. अनेक लाभार्थींना प्रमाणपत्रासाठी सुनावणीस बोलावून त्यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेतली आहे.
स्वाती इथापे, उपायुक्त, उस्मानाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बीड जिल्ह्यात ४२ टक्के पेरण्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. पेरणी योग्य पाऊस पडला व शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ४२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, त्यानंतर गेल्या काही दिवसांत पावसाची अनुपस्थिती चिंतेचा विषय ठरला आहे.
बीड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिली मीटर आहे. या तुलनेत आतापर्यंत यावर्षी जिल्ह्यात १५२ मिली मीटरहून अधिक पाऊस झाला. यावर्षी सरासरीच्या बावीस टक्के पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात समाधानाचे वातवरण होते. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. ठिकठिकाणी कापूस लागवड सुरू झाली आहे. बीड जिल्ह्याचे सरासरी खरीप क्षेत्र ६ लाख ५८ हजार हेक्टर इतके आहे. या तुलनेत
आतापर्यंत जिल्ह्यात कापूस एक लाख ६८ हजार हेक्टर, सोयाबीन ६२ हजार ७८९ हेक्टर, बाजरी १९ हजार ८७५ हेक्टर, तूर १४ हजार ३६९ हेक्टर, मूग पाच हजार ५९५ हेक्टर, उडीद चार हजार ८३१ हेक्टर व इतर असे एकूण २ लाख २८ हजार ४८८ हेक्टर सरासरीच्या ४२.७६ टक्के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
यावर्षी पेरणीची लगबग करून शेतकऱ्याने पेरणी उरकली असली तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहतो आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीचा हात आखडता घेतला असून एखादा पाऊस पडल्यानंतर पेरणीचा टक्का वाढेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला स्वच्छतागृहांचे काम रखडले

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शहराच्या विविध भागात महिलांसाठी पाच स्वच्छतागृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन तीन महिन्यांपूर्वी झाले, पण या पैकी वनस्पत्योद्यानाच्या शेजारील स्वच्छतागृहाचे काम वगळता अन्य चार कामे रखडल्याचे लक्षात आले आहे. उपमहापौर स्मिता घोगरे यांनी गुरुवारी (२२ जून) या कामांची पाहणी केली.
शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने त्यांची मोठी कुचंबना होते. ही बाब लक्षात घेऊन घोगरे यांनी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थायी समितीच्या सभापतींच्या अध्यक्षतेखाली चार महिला सदस्यांची समिती गठीत केली. ८ मार्च रोजी पाच स्वच्छतागृहांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सिडको एन ८ येथील वनस्पत्योद्यान, औरंगपुरा, ज्युबलीपार्क, पैठणगेट, बीबी-का-मकबरा या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्याचे ठरले. बांधकामासाठी महापालिकेचा निधी वापरला जाणार आहे. भूमिपूजन होऊन तीन महिने झाले, तरी बांधकाम सुरू झाले नसल्याचे घोगरे यांना समजले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी स्थळपाहणी केली. वनस्पत्योद्यानाच्या शेजारील स्वच्छतागृहाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, असे पाहणीच्या वेळी लक्षात आले. अन्य चार ठिकाणी नागरिकांनी, संस्थांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे तेथील कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. जागेबद्दल आक्षेप येण्यापूर्वी नगररचना व मालमत्ता विभागाने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, असे मत स्मिता घोगरे यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सफारी पार्कसाठी सात संस्थांचा पुढाकार

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
टायगर सफारी, लॉयन सफारी, नाइट सफारी, वॉटर सफारी सुरू करण्याचे सादरीकरण पीएमसीसाठी इच्छुक असलेल्या संस्थांनी केले. सफारी पार्कच्या पीएमसीसाठी सात संस्थांनी पुढाकार घेतला. सफारी पार्क बद्दलच्या त्यांच्या संकल्पनेचे बुधवारी सादरीकरण झाले.
महापालिकेतर्फे पडेगाव शिवारात सफारी पार्क विकसित केले जाणार आहे. या पार्कसाठी शासनाने शंभर एकर जागा दिली आहे. महापालिकेने आणखी शंभर एकर जागेची मागणी केली आहे. सध्या सिद्धार्थ उद्यानात असलेले प्राणिसंग्रहालय सफारी पार्कमध्ये स्थलांतरीत केले जाणार आहे. सफारी पार्क उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्थेची पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) म्हणून नियुक्ती करण्यासाठी महापालिकेने संस्थांना आवाहन केले होते. त्यानुसार नऊ संस्थांनी इच्छा दाखवली. बुधवारी झालेल्या सादरीकरणाच्या वेळी सात संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डिझाइन हब (औरंगाबाद), ब्रॉक लार्सन डिझायनर (युएसए), एनव्हायरो डिझायनर ( बेंगलोर), अॅब्रॅहम पॅत्रोज (औरंगाबाद), शिरीष भावे अँड कंपनी (पुणे) समकालीन इन्टरप्रायजेस (पुणे), माया वैद्य (औरंगाबाद) या संस्था सादरीकरणात सहभागी झाल्या होत्या.
सफारी पार्कचा विकास कसा केला जाऊ शकतो, या बद्दल या संस्थांच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. यावेळी आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपायुक्त अय्युब खान, शहर अभियंता सिकंदर अली, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उद्यान अधीक्षक विजय पाटील आदी उपस्थित होते. प्राणिसंग्रहालयात सध्या वाघांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सफारी पार्कमध्ये टायगर सफारी यशस्वीपणे सुरू करता येईल, अशी कल्पना एका संस्थेच्या प्रतिनिधीने मांडली. लॉयन सफारीची कल्पनाही यावेळी मांडण्यात आली.

कोणत्या संस्थेची निवड?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात पैकी चार संस्था पीएमसीसाठी निवडल्या जाणार आहेत. या संस्थांचे फायनांशियल बीड उघडल्यावर चार पैकी कोणत्या संस्थेची निवड पीएमसी म्हणून करायची याचा निर्णय आयुक्त घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय टेनिस व्हॉलिबॉल संघास सुवर्ण

0
0

भारतीय टेनिस व्हॉलिबॉल संघास सुवर्ण
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषद कॅनडातर्फे काठमांडू येथे आयोजित जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय टेनिस व्हॉलिबॉल संघाने सुवर्णपदक जिंकले. नेपाळ संघाने रौप्य, तर बांगलादेश संघाने ब्राँझपदक पटकाविले.
भारतीय संघाने अंतिम फेरीत नेपाळ संघास २१-१७, २१-१८ अशा फरकाने पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत भारताच्या साक्षी गुरव, आदिती सालीन, सृष्टी ढोतीगर, प्रियांका महाला, माया सिनवार, डिंपल सोनार, दीपा, सीमा पटेल, ऐश्वर्या व्यंकटाचलपती, विनोद सुधार, ब्रजपाल, रणजितसिंह, समीर अली शेख, के. साथियासिलन, व्ही. इंजिलेराजन, राजेशकुमार सामल, मुकेशकुमार जागीर, सुमित चौधरी, अनिकेत माशी, शुभम कोरे, निखिलेश दास, एस. आर. चंदनकुमार, तुषार शर्मा, शुभम लोखंडे, जोशुवार एम. जोशी, शेरॉन वेरघैसे, अँथनी अल्लापत्त या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी बजावली. या संघासमवेत गणेश माळवे, प्रफुल्ल कुमार बनसोड, धर्मवीरसिंह जडेजा, जेकब अल्लापत्त, गजानन शिंदे, गणेश पाटील, दयाराम सुधार, मणीराम स्वामी यांचे पथक होते. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा परिषदेच्यावतीने अजित कुमार यांनी टेनिस व्हॉलिबॉल महासंघाचे सरचिटणीस डॉ. व्यंकटेश वांगवाड यांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ पर्यावरणप्रेमी कंपन्यांचा गौरव

0
0

पर्यावरणप्रेमी कंपन्यांचा गौरव
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या सात कंपन्यांचा शुक्रवारी (२३ जून) महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक्स टाइम्सच्या 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन टू’ उपक्रमात गौरव करण्यात आला.
शहरातील हॉटेल गिरिराजमध्ये शुक्रवारी सकाळच्या सत्रात सुमारे दोन तास रंगलेल्या या सोहळ्याला आमदार अतुल सावे, उपमहापौर स्मिता घोगरे, महापालिका उपायुक्त रवींद्र निकम, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सीएमआयएचे अध्यक्ष गुरूप्रीतसिंग बग्गा, क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष रवी वट्टमवार, टाइम्स ग्रुपचे क्लस्टर हेड सुनील शांडिल्य, रिजनल व्हर्टिकल हेड श्याम पिल्लई, औरंगाबाद ब्रांच हेड प्रसाद पुल्लीवार यांची उपस्थिती होती. यावेळी पॅरासन मशिनरी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, मॅक्सफ्लो पम्पस अँड कंट्रोर्ल्स आयएनसी, रेयॉन इल्युमिनेशन्स, लोया प्री इंजिनीअर्ड बिल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, मॅट्रो मेटल इंडस्ट्रीज, पावरकॉन, विश्वा टुलिंग सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा गौरव करण्यात आला. कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि आरोग्यदायी तुळशीचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कंपन्यांना 'क्लीन एनर्जी अॅवार्ड', 'इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन अॅवार्ड', 'एक्सलन्स इन वॉटर मॅनेजमेंट अॅवार्ड', 'एक्सलन्स इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अॅवार्ड' आणि 'सीएसआर अॅवार्ड' देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपापल्या परीने कार्य करण्याचा संकल्प केला. सोहळ्यावेळी शरयू टोयोटा वतीने टोयोटा कोरोला अल्टिस कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ बँकांना आजपासून तीन दिवस सुट्या

0
0

बँकांना आजपासून तीन दिवस सुट्या
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
बँकांना शनिवारपासून सलग तीन दिवस सुट्या आहेत. यामुळे खातेदारांसह नागरिकांना आर्थिक व्यवहार तब्बल तीन दिवस तुंबणार आहेत. उद्या (२४ जून) चौथा शनिवार, परवा रविवार आणि सोमवारी (२६ जून) रमजान ईद अशा या सुट्या असतील. ईद खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार असल्यामुळे एटीएममध्ये पैसे काढणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममध्ये पैशांची कमतरता भासू शकते. बँकांच्या मते एटीएममध्ये पुरेसे पैसे उपलब्ध करून दिले आहेत. आगामी तीन दिवसांत आर्थिक चणचण उदभवू नये म्हणून शहरातील ९० टक्के एटीएमवर गुरुवारी (२२ जून) पैसे भरण्यात आले आहेत. याशिवाय पैसे भरत असलेल्या एजन्सीजना देखील मुबलक रोकड उपलब्ध करून दिल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूविकास बँकेच्या निवृत्तांचा पीएफसाठी संघर्ष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भूविकास बँकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होऊन दहा वर्ष उलटल्यानंतरही पीएफची रक्कम मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेकांचे वय आता ७० ते ७५ वर्षे असून असून बँक प्रशासनाच्या चुकीमुळे पीएफची सुमारे २० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूही पदरी काहीच पडत नसल्याने हे कर्मचारी हतबल झाले आहेत.
‘औरंगाबाद जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकेत (भूविकास बँक) अनेक वर्षे नोकरी केली, निवृत्तीनंतर हक्काची सर्व देणी तातडीने मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सेवानिवृत्तीला दहाव्या वर्षीही त्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे कधीच वाटले नव्हते. अनेक सहकारी मित्र थकले आहेत. चालता येत नाही, काहीजण मरणाच्या वाटेवर आहेत. आम्हाला न्याय केन्हा मिळणार,’ अशी भावना हतबल झालेले जयवंतराव चव्हाण यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. निवृत्ती कर्मचाऱ्यांचे वाढीव महागाई निर्देशकांचे सन १९९६च्या कराराप्रमाणे महागाई भत्ता मिळवा, यासाठी त्यांनी औद्योगिक कोर्टात दावा दाखल केला होता. निकाल त्यांच्याबाजूने लागला आणि त्यानुसार देय रक्कमेपैकी बँक व्यवस्थापनाने ८० टक्के रक्कम अदा केली. पण, त्यातून कर्मचाऱ्यांचा तसेच बँकेने स्वतः १२ टक्के हिस्सा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केला नाही. ही बाब तत्काळ लक्षात आणून दिली होती.
कायदेशीर रक्कमेसाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू असून आता कार्यालयाच्या पायऱ्या झिजविणेही शक्य होत नाही. येत्या १५ दिवसात हक्काची रक्कम द्यावी, अन्यथा पूर्व सूचना न देता बेदमुत उपोषण करू, असा इशारा चव्हाण, आर. एन. बोर्डे, बी. आर. पांढरे यांच्यासह सेवानिवृत्त, अशा ३१ कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय कामगार मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह सहकार आयुक्त, पीएफ आयुक्त आदींना निवेदन सादर केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजुने
यासंदर्भात मार्च २०१५मध्ये भविष्य निर्वाह निधी कार्यालयात दावा दाखल केला असता निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजुने लागला आणि ३४ लाख १९ हजार रुपये व्यवस्थापनास जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल येऊन दीड वर्ष उलटले तरी अद्याप पुढील कारवाई झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट मदरसे; सात जणांविरुद्ध गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करत दोन मदरसे दाखवून साडेसहा लाखांचा निधी उकळण्यात आला. याप्रकरणी लोकहित शिक्षण संस्थेच्या सात जणांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुनव्वर अहमद नईम अहमद (वय ४३ रा. कबाडीपुरा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मुनव्वर अहमद यांनी माहिती अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पसंख्याक विभागातून माहिती मागवली होती. यामध्ये लोकहित शिक्षण संस्थेअंतर्गत उम्मेहलिमा अरबी मदरसा व मरयब अरबी मदरसा असे दोन मदरसे सुरू असल्याचे दाखवण्यात आले होते. या दोन्ही मदरशांना २०१४-१५मध्ये एकूण सहा लाख ४० हजारांचा निधी प्राप्त झाल्याची नोंद आहे. हे मदरसे प्रत्यक्षात अस्तिवात नसताना त्यामध्ये ६ ते १२ वयोगटातील ८५ विद्यार्थी ‌शिक्षण घेत असल्याचे दाखवण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी मुनव्वर अहमद यांच्या तक्रारीवरून संस्थेचे अध्यक्ष शेख मोहम्मद नदीम, उपाध्यक्ष मोहम्मद हम्माद मोहम्मद रफी, सचिव शेख मोहम्मद नदीम, शेख फरहीन तबसुम खमर पाशा, शेख शफीक यासीन, डॉ. मोहम्मद हादी, डॉ. इमरा उस्मान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटे अधिकारपत्रप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
वाळूज येथील १२ एकर जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून सिडको वाळूज महानगर कार्यालयातून नाहरकत प्रमानपत्र काढणाऱ्या दोघांविरुद्ध कोर्टाच्या आदेशानुसार एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे दोन कोटी रुपयांची जमीन हडप करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसिंग रामसिंग घुनावत राजपूत (वय ५५, रा. वाळूज) यांची वाळूज शिवारात गट नंबर २७८ मध्ये १२ एकर २३ गुंठे जमीन आहे. या जमिनीची बनावट ईसार पावती करून संशयित आरोपी विकास भगवान आठल्ये (वय ६०, रा जे-१, प्लॅट नं. ४ कासलीवाल शाहनूरवाडी औरंगाबाद) व प्रशांत दतात्रय कुचेकर (वय ३९, रा. नारळीबाग औरंगाबाद) यांनी सिडको प्रशासकांकडे २४ फेब्रुवारी २००४ रोजी जमीन विक्रीसाठी नाहारकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यासाठी फिर्यादी, त्यांचे वडील व भावाची बनावट स्वाक्षरी केली होती. त्यानंतर ८ मार्च २००४मध्ये दहा रुपयांच्या स्टँपपेपरवर खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून त्यावर फिर्यादीच्या व नातेवाईकाच्या खोट्या सह्या करून नोटरी वकील एस. पी. देवरा यांच्याकडून नोटरी करून सिडको वाळूज महानगर कार्यालयाकडून अधिकारपत्र मिळविले. हे अधिकारपत्र मिळ‍ताना सिडकोच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची खात्री केली न करता ९ मार्च २००४ रोजी अधिकारपत्र दिले.
ही माहिती समजल्यानंतर फिर्यादीने चौकशी केली. कागदपत्रांची पडताळणी केली असता बनावट दस्ताएेवजाआधारे अधिकारपत्र मिळवल्याचे उघड झाले. फिर्यादीने विकास भगवान आठल्ये व प्रशांत दतात्रय कुचेकर यांनी केलेल्या बनावट सहीचा अहवाल हॅडरायटिंग फिंगरप्रिंट अॅण्ड फॉरेन्सिक एक्स्पर्ट डॉ. शैलेश चांदजकर यांच्याकडून घेण्यात आला. त्याआधारे ३ सप्टेंबर २०१६ रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात संशयित आरोपी, नोटरी वकील व तत्कालीन सिडको प्रशासक अधिकारी व प्रमाणपत्र देणारे संंबंधित आधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली होती. पण, पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने गंगापूर कोर्टाता दावा दाखल करण्यात आला. कोर्टाच्या आदेशानंतर आठल्ये व कुचेकर, त्यांना मदत करणारे नोटरी वकील, सिडको प्रशासक व अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गौतम खंडागळे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images