Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

​ बीड बायपास रस्ता; शपथपत्र दाखल करा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
बीड बायपास रस्त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका केलेली आहे. याचिकेच्या सुनावणीत महापालिका शहर अभियंत्यांनी बायपास रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रस्त्यावरील अडथळे व अतिक्रमण हटविण्यासाठीच्या उपाययोजना शपथपत्रद्वारे सादर कराव्यात, असे आदेश न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. मंगेश पाटील यांनी दिले.
शहातील बीड बायपास रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे निष्पाप बळी जात आहेत. या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी व इतर समस्यांच्या अनुशंगाने उपाययोजना करण्याची विनंती करणारी याचिका वकील शिवराज कडू-पाटील यांनी दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणी दरम्यान महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी बीड बायपास रस्त्यावरी दुतर्फा सर्व्हिस रोड व त्यातील अडथळे हटवण्यासाठी काय उपायोजना केल्या, याची माहिती द्यावी असे आदेश खंडपीठाने दिले. शासनातर्फे अर्चना गोंधळेकर, रस्तेविकास महामंडळातर्फे श्रीकांत अदवंत, महापालिकेतर्फे अमित वैद्य, रेल्वेतर्फे एम. एन. नावंदर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे डी. एस. मनोरकर यांनी काम पाहिले.

१४ जुलैला सुनावणी
गांधेली व बाळापूर शिवारातून जाणारा धुळे - सोलापूर बायपास रस्त्याचे काम धिम्या गतीने होत आहे. देवळाई चौकात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथे चौरस उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे. संबंधित विभागानेही शपथपत्र सादर करावे असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या याचिकेवर १४ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ व्हॉटसअपवर बदनामी; एकास पोलिस कोठडी

$
0
0

औरंगाबाद : कन्नड येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो मिक्सिंग करून ते व्हॉटस्अपच्या ग्रुपवर व लग्न जमलेल्या तरुणाच्या व्हॉटस्अपवर पाठविणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला मंगळवारपर्यंत (२७ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दिले.
कन्नड येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटोचे मिक्सिंग करून तिच्या वडिलांच्या आणि शहरातील अन्य व्हॉटसअपच्या ग्रुपवर पाठविण्यात आले. त्याचवेळी संबंधित मुलीचे लग्न जमलेल्या तरुणाच्या व्हॉटसअपवरही मुलीचे फोटो पाठवून तिची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन कन्नड पोलिसांनी आरोपी उमेश सुभाष राठोड यास अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या ताब्यातून सीमकार्ड व मोबाईल जप्त करणे बाकी आहे, तसेच गुन्हा करण्यास कोणी प्रोत्साहन दिले का, याचा तपास करावयाचा असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक लोकअभियोक्ता कैलास पवार खंडाळकर यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आमच्या बदनामीचा ‘त्यांनी’ कट रचला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘किसान क्रांतीच्या शेतकरी संपाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच शेतकरी नेते म्हणून असलेल्या काहींना आपल्या नेतृत्वाला धक्का पोचला असे वाटले. त्यातून काहींनी आमची बदनामी करण्याचा कट रचला. राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांनाही हे आंदोलन पचनी पडले नाही आणि एका दिवसात खलनायक ठरवून मोकळे झाले,’ असा आरोप किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजी सूर्यवंशी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.
यावेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले, ‘वारंवार फोन आल्याने मुख्यमंत्र्यासोबत दोन जून रोजी रात्री झालेल्या बैठकीला समिती सदस्य गेले होते. बैठकीत ८० टक्के मागण्या मान्य झाल्या, पण चर्चा झाली ती मुख्यमंत्री कानात काय बोलले याची. मुख्यमंत्र्यांनी गावी कसे जाणार, बाहेर एक दोनजणांनीच बोला, अन्यथा प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करेल असे सांगितले. मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरी पहाटे फ्रेश होण्यासाठी गेलो होतो, पण त्यावरुनही नाहक लक्ष्य करण्यात आले. शासनाने मान्य केलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू,’ असा इशारा सूर्यवंशी यांनी यावेळी दिला. यावेळी राज्य समन्वयक विजय काकडे-पाटील, प्रदीप पाटील आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास उशीर केला आहे. या प्रकरणी विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या परीक्षा होऊन दोन महिने उलटले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने निकाल लावण्यास मोठा विलंब केल्यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला मुकावे लागले. मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. पदवीच्या वर्गांचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे पदव्युत्तर वर्गाचे प्रवेश रखडले आहेत. पदव्युत्तर सीईटी जुलै महिन्यात होणार आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल लावणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने ‘पीजी सीईटी’चे वेळापत्रक बदलले. सध्या सर्वत्र प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. निकाल लागले नसल्यामुळे पुढील संधी हुकण्याची भीती त्यांना वाटत आहे. विद्यापीठातील परीक्षा विभागाचे नियोजन कोलमडल्यामुळे निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विद्यापीठातील दिडशे कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. या प्रकारामुळे प्रशासकीय कामकाजाचे नियोजन बिघडले आहे. याचा थेट परिणाम परीक्षेच्या निकाल कार्यक्रमावर झाला आहे.
दरम्यान, पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या परीक्षेचे निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. कुलगुरू व कुलसचिव यांना निवेदन देऊन संघटनांनी निकालाचा प्रश्न लावून धरला आहे. मात्र, निकाल नेमका कधी जाहीर होणार याबाबत प्रशासनाने मौन धारण केले आहे.

कारवाई करा
विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेचा निकाल ३० दिवसात जाहीर करणे बंधनकारक आहे. नैसर्गिक आपत्ती असल्यास ४५ दिवसांपर्यंत मुभा देण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे तुकाराम सराफ यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेऊन निकालाच्या विलंबाचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन कुंटे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ विनयभंग करणाऱ्याला दोन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतात काम करणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. झाटे यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्याविरुद्ध आरोपीने अपील दाखल केले असता, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवली.
या प्रकरणी पिंपळगाव (ता. फुलंब्री) येथील २५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला शेतात काम करत असताना त्याच गावात राहणारा सुखदेव त्र्यंबक इंगळे (४०) हा तिथे आला व त्याने फिर्यादीचा हात ओढून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरड केली असता ‘तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल’ अशी धमकी आरोपीने तिला दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात कलम ३५४ अ, ५०६ कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. सुनावणीवेळी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. झाटे यांनी आरोपीला २० नोव्हेंबर २०१४ रोजी कलम ३५४ अ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी, २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ४ महिने सक्तमजुरी, तर कलम ५०६ कलमान्वे २ वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. यातील २५ हजार रुपये नुकसान भरपाईपोटी फिर्यादी महिलेला द्यावेत, असेही आदेशात नमूद केले. या शिक्षेविरोधात आरोपी सुखदेव इंगळे याने जिल्हा कोर्टात अपील दाखल केले होते. या अपीलाच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकअभियोक्ता उदय पांडे यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादावरून व साक्ष-पुराव्यांवरुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठवलेली शिक्षा कायम ठेवत आरोपीचे आपील फेटाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मंडळ अधिकारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
तलाठ्यांनी पाठविलेल्या १९० ऑनलाइन फेरफार प्रकरणे प्रलंबित ठेवल्यामुळे कांचनवाडीचे मंडळ अधिकारी आर. पी. बागडे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकतेच काढले.
बागडे यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांच्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी महसूल प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. सर्वसामान्य जनतेचे काम वेळेवर न करणे, कर्मचाऱ्यांशी समन्वय न ठेवणे आणि शासनाचे महत्वाचे प्रकल्प चांगल्या पद्धतीने न राबवणे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास झाला होता. बागडे यांच्या कृतीमुळे महसूल खात्याची प्रतिमा मलीन झाली होती. तलाठी असताना बागडे हे सातबारा फेरफार करतात, अशा तक्रारी नागरिकांकडून होत्या. कोणतेही काम वेळेवर पूर्ण न करणे, कार्यालयात गैरहजर राहणे, अधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशाचे पालन न करणे आदी कारणांमुळे तत्कालीन तहसीलदारांनी कांचनवाडी सज्जावरून बागडे यांची शरणापूर येथे बदली केली होती. दरम्यानच्या काळात पदोन्नतीनंतर वैजापूर तालुक्यात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांची कांचनवाडी येथे मंडळ अधिकारी म्हणून बदली झाली. कांचनवाडी मंडळातील कार्यक्षेत्रातही बागडे यांच्याविरुद्ध तक्रारी सुरू होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एमआयएम पक्षाचे आसेफिया कॉलनी प्रभागाचे नगरसेवक जमीर कादरी यांच्याविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात तिसरे अपत्यप्रकरणी आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलरस कॉलनी भागातील वाहेद अली झाकेर अली हाश्मी यांनी ही फिर्याद दिली आहे.
पोलिसामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नगरसेवक जमीर कादरी यांना तिसरे अपत्य आहे. त्यांनी ती माहिती लपवून २०१५ ची महापा‌लिका प्रभाग निवडणूक लढविली. त्यांनी आपल्या शपथ पत्रात दोन अपत्य असल्याचे खोटे सांगितले आहे. त्यामुळे शासनाची, फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा तपास खटावकर करित आहेत.

हायकोर्टात संबंधित फिर्यादीने माझ्या विरोधात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती. कोर्टाने निर्णय देण्यास नकार दिला. सदर प्रकरण पालिकेच्या कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे आज दाखल केलेला गुन्हा न्यायलयीन प्रक्रियेचा अवमान करणारा आहे. - जमीर कादरी, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ महापालिकेला जीएसटीची धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला १ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कराची धास्ती लागली आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी पुढील आठवड्यात आकृतीबंध शासनाकडे सादर केला जाणार आहे. सर्वसाधारण सभेने केलेल्या सूचनेनुसार आकृतीबंधातील सुधारणेसाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे.
महापालिकेने १७९५ वाढीव पदांचा आकृतीबंध तयार केला आहे. या आकृतीबंधाला १७ मार्च २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत गुपचूप मंजुरी दिल्याचा आरोप महापौर भगवान घडमोडे यांच्यावर होत आहे. मार्च महिन्यात मंजूर करण्यात आलेला आकृतीबंधाचा प्रस्ताव विखंडित करून तो पुन्हा सर्वसाधारण सभेत ठेवावा. त्यावर सविस्तर चर्चा करून त्यानंतरच तो मंजूर करावा, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांच्यासह उपमहापौर स्मिता घोगरे, विरोधीपक्षनेता फेरोज खान यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनी अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. मात्र, दुसरीकडे पालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला आकृतीबंधाचा प्रस्ताव सुधारणेसह ३० जूनच्या आत राज्य शासनाकडे सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. जीएसटी लागू झाल्यावर महापालिकेला दर महिन्याच्या खर्चासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात आकृतीबंधातील वाढीव पदांसाठीच्या खर्चाचाही समावेश झाला पाहिजे, या उद्देशाने जून अखेरपर्यंत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची लगबग पालिकेच्या अस्थापना विभागात सुरू झाली आहे. सध्या महापालिकेत सुमारे पावणे चार हजार अधिकारी - कर्मचारी कार्यरत आहेत. आकृतीबंधात नवीन १७९५ पदे निर्माण करण्याची शिफारस आहे. त्यात लेखापाल, उपायुक्त, वॉर्ड अभियंता, वॉर्ड अधिकारी, करमूल्य निर्धारक व संकलक, अभिलेख विभाग, जनगणना विभाग, नगर सचिव, पर्यावरण विभाग, नगररचना विभाग, संशोधन केंद्र या प्रमुख पदांचा समावेश आहे. नवीन पदांसाठी दर महिन्याला २ कोटी ६४ लाख रुपये खर्च योणार असून वर्षाकाठी या खर्चाचा आकडा ३१ कोटी ७४ लाख रुपये येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ ...आले आले नभ भरून!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शब्द आणि सूर यांचा अप्रतिम संगम साधलेल्या ‘पाऊस पाडवा’ कार्यक्रमात कवितांचा पाऊस पडला. लोकप्रिय कवितांच्या सादरीकरणाने रसिकांना खिळवून ठेवले. यानिमित्त जुन्या-नव्या पिढीतील कवींच्या दर्जेदार कविता रसिकांना ऐकायला मिळाल्या.
‘अक्षरलेणं’ प्रस्तुत पाऊस कवितांवर आधारित ‘पाऊस पाडवा’ कार्यक्रम विशेष रंगला. आयएमए हॉलमध्ये शनिवारी सायंकाळी ही पावसाळी कवितांची मैफल झाली. या कार्यक्रमात सुधीर मोघे, सीमा मोघे, हर्षवर्धन दीक्षित, अश्विनी दाशरथे व विश्वनाथ दाशरथे यांनी कविता सादर केल्या. ‘आज म्हटलं पावसाला माफ कर बाबा’ ही कविता अश्विनी यांनी सादर केली. अभिजित दाते लिखित या कवितेत पावसाचे निराळे रंग रसिकांना दिसले. मंगेश पाडगावकर लिखित ‘आले आले नभ भरून, कुणी कलशापरी कुणी मयुरापरी’ ही लोकप्रिय कविता विशेष ठरली. सर्व वाचकांनी कवितेत रंग भरले. ‘घन घुंगूरवाळा आला गं’ ही कविता सुधीर मोघे यांनी सादर केली. तर गदिमांची ‘माउलीच्या दुधापरी आले तुषार’ ही कविता हर्षवर्धन यांनी सादर केली. ‘त्या मृगाला या मातीचा निरोप सांगा गडे’ (अश्विनी दाशरथे), ‘हलकेच निळा घन आला, बरसून गेला’ (सीमा मोघे), ‘खिडकीतून मी बघतो झाड’ (हर्षवर्धन) या कवितांना दाद मिळाली. विश्वनाथ दाशरथे यांनी कविता गायन केले. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ या गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली. दर्जेदार कवितांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलमध्ये ४० मिलीचे 'पाप'

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने शहर गुन्हे शाखेच्या मदतीने शनिवारी दुपारी एपीआय कॉर्नरजवळील भवानी पेट्रोल पंपावर छापा मारला. त्यात एका मशिनमध्ये चाळीस मिलिलीटर पेट्रोल कमी येत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित पल्सर आणि नोजलची तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जप्त केलेल्या मशिनचे नमुने न्यायवैद्यक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.
पेट्रोल पंपाच्या मशीनमध्ये फेरफार करून देणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी नाशिक, कोकण, औरंगाबाद आदी शहरांतील पेट्रोल पंपावर पेट्रोल चोरीसाठी विशिष्ट चीप बसविण्याची माहिती दिली. त्यावरून येथील पेट्रोल पंपावर छापा सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यात त‌िन्ही कंपन्यांचे अधिकारी तसेच संबंधित पेट्रोल डिझेल मशीन बसविणाऱ्या कंपनीचे अधिकारी, वजन मापे विभागाचे अधिकारी आहेत. या अधिकाऱ्यांनी शहरातील काही पेट्रोल पंपाची तपासणी केली. पहिल्या फेरीत युनिक पेट्रोल पंप, हिंद सुपर पेट्रोल पंप, राज पेट्रोल पंप, रिलायन्स पेट्रोल पंपाची तपासणी केली होती. चुन्नीलाल पेट्रोल पंपाची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. त्यात पेट्रोल चोरी होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या पेट्रोलपंपाही सील ठोकण्यात आले.
ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास घोडके, पीएसआय अविनाश महाजन, शिवराज बेंद्रे, जमादार अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुरके, एस. बी. सुर्वे, वजन मापक निरीक्षक ए. एस. कुलकर्णी, शिवहरी मुंढे; तसेच शहर गुन्हे शाखेचे पीएसआय नंदकुमार भंडारे व पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ वर्षांच्या मुलाचीगळफासाने आत्महत्या

$
0
0



औरंगाबाद ः नंदनवन कॉलनी परिसरातील आठ वर्षाच्या मुलाने शनिवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. काझी नवाजुद्दीन असे त्याचे नाव आहे. तो इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत होता. त्याचे वडील वकील आहेत. त्याने शनिवारी दुपारी घरी कोणी नसताना छताच्या फॅनला ओढणी बाधून स्टुलवर उभे राहून गळफास घेतला. नातेवाईक घरी आल्यानंतर घटना दुपारी साडेबारा वाजेच्यासुमारास उघडकीस आली. त्यानंतर त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शनिवारी बाहेर खेळताना वाद झाल्याने राग येऊन त्याने हा प्रकार केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हेड कॉन्स्टेबल प्रकाश जेकब तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शहीद जवानावर अंत्यसंस्कार

$
0
0

शहीद जवानावर अंत्यसंस्कार

नीलेश सोनटक्के, सिल्लोड

पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप जाधव यांच्या पार्थिवावर रविवारी त्यांच्या मूळगावी केळगावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांच्या मुलाचा आज पहिला वाढदिवस होता. त्याच दिवशी मुलाला वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळे संपूर्ण गाव हळहळले.
जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी औरंगाबादमध्ये आणण्यात आले होते. ते रात्री मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. ते शनिवारी सकाळी ते केळगावात आणण्यात आले. तेव्हा जाधव कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अश्रूभरल्या डोळ्यांनी लोक ‘संदीप जाधव अमर रहे’ अशा घोषणा देत होते.
औरंगाबादहून सकाळी सात वाजता पार्थिव त्यांच्या मूळ गावी केळगाव येथे आणण्यात आले. सिल्लोडपासून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावरील गावांतील ग्रामस्थांनी गर्दी केली. भराडी, तळणी, आमठाणा येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर नऊ वाजता केळगाव येथील कमानीपासून हजारो लोकांच्या उपस्थितीत दोन किलोमीटरवर असलेल्या गोकुळवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आले. यावेळी ‘भारत माता की जय, अमर रहे अमर रहे संदीप आबा अमर रहे’ अशा जयघोषात त्यांचे पार्थिव घरासमोर नेण्यात आल्यानंतर त्यांच्या पत्नी उज्ज्वला, वडील सर्जेराव, आई, बहीण, भाऊ, मुलगा शिवेंद्र, मुलगी मोहिनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार किलोमीटरपर्यंत माणसांच्या रांगा लागल्या होत्या. मिळेल त्या जागी नागरिक उभे होते. काही जण झाडावर बसले होते. लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणलेल्या शवपेटीतून त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चितेवर ठेवण्यात आल्याने या वेळी उपस्थितांनी आक्रोश केला. त्यानंतर आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिण व घरच्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. लष्कराच्यावतीने मानवंदना देण्यात आली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. लष्कराच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ला आता राज्य सरकारचा निधी

$
0
0



unmesh.deshpande@timesgroup.com

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीसाठी आता राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. केंद्र सरकारने ‘जेएनएनयूआरएम’ ही योजना रद्द केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा प्रकल्पाला ८० टक्के निधी सरकारकडून मिळणार असून २० टक्के निधी महापालिकेला उभारावा लागणार आहे. समांतर प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
औरंगाबादसाठी समांतरचा प्रकल्प वाढीव पाणीपुरवठा योजना म्हणून तयार करण्यात आला. त्यास संयुक्त लोकशाही आघाडीच्या सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानातून (जेएनएनयुआरएम) मंजुरी दिली. प्रकल्पाची मूळ किंमत ३५९ कोटी ६७ लाख रुपये आहे. या किंमतीपैकी ८० टक्के निधी केंद्र सरकार व दहा - दहा टक्के निधी अनुक्रमे राज्य सरकार व महापालिकेने द्यावा असे ठरले होते. केंद्राकडून पहिल्या टप्प्यात १४३ कोटी, तर राज्य शासनाने १९ कोटी रुपयांचा निधी दिला. ही रक्कम केंद्र व राज्य सरकारच्या वाट्याला आलेल्या निधीपैकी पन्नास टक्के रक्कम आहे. उर्वरित पन्नास टक्के रक्कम प्राप्त होण्यापूर्वीच २०१४ मध्ये केंद्र सरकारने जेएनएनयुआरएम ही योजना रद्द केली. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा निधी अडकला. समांतरच्या प्रकल्पासह राज्यभरात १८ प्रकल्पांचे काम ही योजना रद्द झाल्यामुळे रखडले.
रखडलेल्या सर्व प्रकल्पांना राज्य सरकारच्या माध्यमातून उर्वरित निधी उपलब्ध करून द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (२० जून) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ज्या प्रकल्पांचे काम पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे, त्यांना राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध करून देवून प्रकल्प पूर्ण करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे प्रकल्पावर आतापर्यंत खर्च झालेला पैसा वाया जाणार नाही व नागरिकांचीदेखील सोय होईल असे मत मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
केंद्र सरकारच्या हिश्शापोटी देय निधीपैकी ८० टक्के रक्कम राज्य सरकार देणार असून २० टक्के रक्कमेचा भार महापालिकेला सोसावा लागणार आहे. औरंगाबादसह धुळे येथील पाणीपुरवठा योजनेला या निर्णयाचा लाभ होणार आहे.

आमदार सावे यांचा पुढाकार
महापालिकेने रद्द केलेला समांतर प्रकल्प पुन्हा कार्यान्वित व्हावा यासाठी भाजपचे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी पुढाकार घेतला आहे. जाचक अटी रद्द करून या प्रकल्पाच्या कामाची सुरूवात झाली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. या संदर्भात त्यांनी यापूर्वी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता ३० जूनपर्यंत या संदर्भात बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सावे ‘मटा’ शी बोलताना म्हणाले. या आश्वासनामुळे समांतर जलवाहिनीसाठी पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस परतल्याने पेरणीची लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात यंदा मृग नक्षत्रात पाऊस गेल्या कित्येक वर्षानंतर पडला. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या. मात्र, त्यानंतर एक आठवडा पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. आठवड्याभरानंतर शनिवारी बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाने पुन्हा शनिवारी हजेरी लावली. यामुळे बळीराजा नव्या उमेदीने पेरणीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २५ टक्के पाऊस झाला आहे.
गेल्या रविवारपासून पावसाने उघडीप दिली होती. या आठवड्याच्या पावसाच्या दडीमुळे काही शेतकऱ्यांनी धरलेल्या तिफणीचा हात आखडता घेतला. मात्र, आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पावसाच्या सरी आल्या. शुक्रवारी सायंकाळनंतर काही भागात पाऊस झाला. शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सरासरी १६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी पावसाच्या २५ टक्के यंदा पाऊस झाला आहे. आतापर्यंत वर्षभराच्या सरासरीच्या २५ टक्के नोंद झाली आहे. आठवडाभर थांबून परतलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला असून उर्वरित पेरणी उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असणार आहे.

उस्मानाबाद, बीडमध्ये पावसाची हजेरी
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी अर्धा तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यानिवारी दुपारपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरात मुक्कामाला असलेल्या गजानन महाराज पालखीतील सुमारे ७०० वारकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. वारकऱ्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी धावपळ करावी लागली. या पावसामुळे नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांना दिलासा लाभला आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाची चिंतेत वाढ झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजानन महाराज पालखीचे उस्मानाबादेत स्वागत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज यांची पालखी ‘गण गणात बोते’ बरोबरच विठू नामाच्या गजरात उपळा मार्गे शनिवारी सकाळी उस्मानाबाद शहरात दाखल झाली.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यासाठी उस्मानाबाद शहर व परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी गर्दी केली होती. यंदा पालखीच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी रस्त्यावर जागोजागी कमानी उभ्या केल्या होत्या.
उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने पेरणी कामात गुंतल्यामुळे पालखीच्या स्वागतासाठी ग्रामीण भागातील नागरिक
फारसे दिसून आले नाही. पालखीचे खास आकर्षण असलेल्या हत्ती अभावी
ही पालखी सुनी-सुनी वाटत होती. गणराज विनाच ही पालखी असल्यामुळे भाविकांची त्यासोबतच लहान बाळ गोपाळाची मोठी निराशा झाली.
संत गजानन महाराजांची पालखी शेगावपासून सुमारे ५३० किलोमीटरचा शिस्तबद्ध प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपूर येथे हजेरी लावते. आषाढी
एकादशीच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पालखीचे पावले पुन्हा गजानन
महाराज यांच्या शेगावकडे वळणार आहेत.
शनिवारी सकाळी पालखीचे उस्मानाबादेत आगमन होताच नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी स्वागत करीत दर्शन घेतले. नगरसेवक सोमनाथ गुरव
तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मैदरकर, शीला उंबरे वसंतराव नागदेसह
शहरवासीय व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उस्मानाबाद येथील ज्ञानेशवर मंदिराचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी शहरातून मार्गक्रमण करीत लेडीज क्लब येथे मुकामासाठी थांबली. रविवारी पहाटे पालखी पुढील प्रवासासाठी म्हणून तुळजापूरकडे रवाना होईल.
पालखीचे दर्शन नागरिकांना सहजरित्या व्हावे, म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा न्यायालयासमोर जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. निलेश बारखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखीचे, वारकऱ्यांचे स्वागत करून दर्शन घेतले. शहरातील पालखी मार्गावर विविध गणेश मंडळ व सामाजिक संस्थानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. अने
....................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ युवकाची आत्महत्या, आरोपीच्या अटकेसाठी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
अॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करण्याची धमकी दिल्याने लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील पवन जावळे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेतील आरोपींच्या अटकेसाठी व अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ३० जूनपर्यंत कडक कारवाई न केल्यास जिल्हा बंदसह आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारपासून पूर्ण गाव बंद करून लोक रस्त्यावर उतरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे पवन जावळे ( वय २५) या तरुणाने आत्महत्या केली. पवन गावात रस्त्याचे काम करीत असताना त्याला दलित समाजाच्या महिलांनी बेदम मारहाण केली. अॅट्रॉसिटीचा आणि बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची धमकी दिली. याच कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी पवनने लिहली होती. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या मराठा समाजातील ग्रामस्थ व महिलांनी रस्त्यावर उतरून आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. दोन जणांना अटक केली, तर तीन आरोपी फरार आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी व अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ३० जूनपर्यंत कडक कारवाई न केल्यास जिल्हा बंदसह आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्याकडे काँग्रेस वरिष्ठांचे दुर्लक्ष ?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे वरिष्ठ नेते सातत्याने औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ मात्र यात कुठेच दिसत नसल्याने सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला औरंगाबाद जिल्हा पुन्हा ताब्यात घ्यायचा असेल, तर पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कोंडी करण्यासाठी सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. शेतकरी संपानंतर समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत आले होते. त्याआधी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शहरात आले होते. केंद्र सरकारला तीन वर्षे पू्र्ण झाल्याबद्दल विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, सुरेश प्रभूही शहरात येऊन गेले. ए‍वढ्या राजकीय घडामोडी घडताना काँग्रेसचा एकही वरिष्ठ नेता जिल्ह्यात आला नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांची औरंगाबादेत चांगली ओळख आहे. भाजपविरुद्ध सेना, राष्ट्रवादी काँग्रेस उघडपणे मैदानात उतरलेली असताना काँग्रेसचे वरिष्ठ मात्र शांत राहिल्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने या नेत्यांचे दौरे झाले होते. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी संघर्ष यात्रा काढली गेली. त्यानंतर शेतकरी प्रश्नी काँग्रेस नेत्यांनी अधिक आक्रमक व्हायला हवे होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अन्य पक्ष तयारीला लागलेले असताना काँग्रेस नेत्यांनी मागे राहू नये, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

काँग्रेसकडून सातत्याने जिल्ह्याचा आढावा घेतला जातो. पंधरा दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली होती. याव्यतिरिक्त विविध आंदोलने, उपक्रमांसाठी नेत्यांचे मार्गदर्शन असते. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याकडे दुर्लक्ष आहे असे म्हणता येणार नाही.
- केशवराव औताडे, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद टोळक्याचा मध्यरात्री धुडगूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कारमध्ये फिरणाऱ्या चार तरुणांच्या टोळक्याने शनिवारी मध्यरात्री एपीआय कॉर्नर भागात मद्यधुंद अवस्थेत ‌धुडगूस घातला. प्रवाशाला मारहाण करीत लुबाडण्याचा प्रयत्न करीत असताना सतर्क नागरिकांच्या मदतीने या प्रवाशाचा जीव बचावला. तीन तरुणांना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले, मात्र ते अल्पवयीन असल्याचे सांगत त्यांना सोडण्यात आल्याची माहि‌ती सूत्रांनी दिली.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास एपीआय कॉर्नर भागातील सर्व्हिस रोडवरून एक वॅगन कार वेगाने येत होती. या कारच्या दोन्ही नंबरप्लेट रुमाल टाकून झाकल्या होत्या. येथील चौकात एक प्रवासी ट्रॅव्हल्स बसची वाट पाहत उभा होता. या चार तरुणांनी त्याला अडवून येथे का उभा आहेस, असे म्हणत पैशांची मागणी करीत मारहाण सुरू केली. त्या प्रवाशाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्या तेव्हा त्याच्यावर दगडाने प्राणघातक हल्ला चढवला. दरम्यान, लोकसेवा हॉटेल बाहेर तेथील नगरसेवक मनोज गांगवे, गजेंद्र अग्रवाल, सतीश जैस्वाल, अक्षय चौधरी, रामेश्वर कोठुळे, राज कोलते व सचिन जऱ्हाड हे गप्पा मारत उभे होते. प्रवाशांच्या आरडाओरड्यामुळे हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. एक प्रवासी त्यांच्याच दिशेने पळत येत होता. त्याच्या पाठीमागे हे चार तरूण दगड घेऊन लागले होते. नागरिकांनी त्या प्रवाशाची सुटका करत त्या तरुणांना अडवले. यावेळी हे तरूण मद्यधुंद असून अंगावर केवळ हाफ पँट व तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत होते. गजेंद्र अग्रवाल यांनी पोलिसांना लावण्यासाठी मोबाइल काढला असता त्यांनी अग्रवाल यांच्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान नगरसेवक गांगवे यांनी तरुणांना हिसका दाखवल्यानंतर ते तरूण वठणीवर आले. दरम्यान, पोलिसांना माहिती दिल्यानंतर सिडको एमआयडीसी व मुकुंदवाडी पोलिस ठाण्याची पोलिस पथके त्या ठिकाणी पोहचली. यावेळी तीन तरुणांना पकडून सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, तर एका जण पळून गेला. या तरुणांच्या कारमध्ये महागडी सिगारेटची पाकिटे व बियरच्या बाटल्या सापडल्या. या तरुणांना सिडको एमआयडीसी पोलिसांनी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती दिली, तर मुकुंदवाडी पोलिसांनी ते अल्पवयीन असल्याने व प्रवाशाने तक्रार दिली नसल्याने समज देऊन सोडल्याची माहिती दिली.

कामगार चौक, सिडको बसस्टँडवरही धुमाकूळ
या तरुणांना पकडल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. यावेळी तरुणांच्या टोळक्याने कामगार चौकात देखील एका नागरिकाला व सिडको बसस्टँड चौकातील एका पानटपरीचालकाला मारहाण केल्याची माहिती समोर आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद जा‍धवांच्या अस्थी गोदावरीत विसर्जित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले नाईक संदीप जाधव यांच्या अस्थिंचे रविवारी संत एकनाथ समाधी मंदिरामागे गोदावरी नदीवरील कृष्णकमल तीर्थ येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी शोकाकुल झालेल्या वातावरणात उपस्थित तरुणानी ‘संदीप जाधव अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या.
शहीद जाधव यांच्या अस्थी रविवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान पैठणमध्ये आणण्यात आल्या. यावेळी, शहीद संदीप जाधव यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. तत्पूर्वी, बिडकीन, ढोरकीन व एमआयडीसी पोलिस ठाण्यातर्फे जाधव याना अभिवादन करण्यात आले. शहरात दाखल होण्यापूर्वी पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील सह्याद्री हॉटेलजवळ माजी आमदार संजय वाघचौरे, उपनगराध्यक्षा सुचित्रा जोशी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पोहेकर, दिनेश पारीख, लक्ष्मण ओटे यांच्यासह शेकडो तरुणांनींशहीद श्रद्धांजली अर्पण केली.
शहरातील नाथ समाधी मंदिराच्या पाठीमागील गोदावरी नदीच्या कृष्णकमल तीर्थावर सायंकाळी पाच वाजता जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अस्थीचे विसर्जन केले. यावेळी शहरातील नागरिक, तरूण व महिलांनी मोठी गर्दी केली होती.

महिलांना अश्रू अनावर
शहीद संदीप जाधव यांच्या अस्थीचे पैठण येथे विसर्जन करण्यात येणार असल्याची वार्ता शहरात पसरताच मोठ्या संख्येने महिला नाथ मंदिराच्या पाठीमागे जमा झाल्या. शहीद संदीप जाधव यांच्या अस्थीसोबत त्यांची पत्नी, तीन वर्षीय मुलगी व एक वर्षाच्या मुलाला बघून यातील अनेक महिलांना अश्रु आवरणे कठीण झाले होते.

फुलंब्रीत अस्थींचे दर्शन
फुलंब्रीः शहीद नाईक संदीप जाधव यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी फुलंब्री येथे रविवारी मोठी गर्दी झाली. पैठण येथे अस्थी विसर्जित करण्यासाठी घेऊन जात असातना बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अस्थीचे दर्शन घेतले. यावेळी संदीप जाधव अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम्, पाकिस्तान मुर्दाबादच्या घाेषणा देण्यात अाल्या. येथील देवगिरी बँकेपासून नगर पंचायत कार्यालयापर्यंत अस्थीकलश दर्शनासाठी फिरवण्यात आला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाठ यांनी जाधव यांच्या प्रतिमेस व अस्थीकलशाला हार अर्पण केला. यावेळी बाजारपेठ सुन्न झाली हाेती. बऱ्याच जनांना अश्रू अावरले नाहीत. शेवटी राष्ट्रगीत घेऊन अस्थी कलश मार्गस्थ झाले. यावेळी जे. पी. शेजवळ, पंडित नागरे, रवींद्र काथार, राष्ट्रवादी काॅंग्रेस जिल्हा सचिव तय्यब शाह, जमीर पठाण, भास्कर वानखेडे, दामाेधर पाथ्रे, अॅड. त्रिंबकराव शिरसाठ, भीमराव भाेपळे, सर्जेराव डकले, देवराव राऊत, संजय जैस्वाल, सुमित प्रधान, सुदाम पवार, पवन तिवारी, विठ्ठल शिनगारे, गुलाम पटेल, बाबासाहेब शिनगारे, सनी पाटणी, घनशाम माेराणकर, राजेंद्र साहुजी याच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायकवाड यांच्यावर कारवाईसाठी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरक इतिहास संपवण्यासाठी मुंबईचे आंबेडकर भवन पाडण्यात आले. आंबेडकर भवन पाडणारे माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांनी शहरात मोर्चा काढला. २५ जून हा दिवस ‘ब्लॅक डे’ पाळत मराठवाड्यातील हजारो अनुयायी मोर्चात सहभागी झाले.
परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र असलेले मुंबई येथील आंबेडकर भवन एक वर्षापूर्वी पाडण्यात आले. या घटनेतील दोषींना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याच्या निषेधार्थ रविवारी शहरात मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौक येथून मोर्चा निघाला. पैठण गेट, गुलमंडी, मिलकॉर्नरमार्गे हा मोर्चा भडकल गेट येथे पोहचला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आंबेडकर भवन पाडणारे रत्नाकर गायकवाड यांना सरकार पाठीशी घालत असल्याची टीका करण्यात आली. गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली. २५ जून २०१६ रोजी आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस या ऐतिहासिक इमारती तत्कालीन माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी रात्री पाडल्या होत्या. गायकवाड यांच्यावर अजूनही कारवाई झाली नसल्याने दलित संघटनांनी ‘ब्लॅक डे’ पाळत मोर्चा काढला. या मोर्चात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले. भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा, डावी लोकशाही आघाडी, आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी डॉ. आंबेडकर भवन पुर्ननिर्माण संवर्धन व संरक्षण जनआंदोलनाच्या माध्यमातून मोर्चा निघाला. यावेळी अॅड. बी. एच. गायकवाड, कॉ. भीमराव बनसोड, कॉ. मनोहर टाकसाळ, अमित भुईगळ, के. व्ही. मोरे, चंद्रभागाबाई दाणे, पंडितराव तुपे, अशोक बौद्ध, निवृत्ती घोरपडे, मिलिंद बनसोडे, अभय टाकसाळ, प्रवीण म्हस्के, दीपक राऊत, मंगेश निकम, मुकुल निकाळजे, सतीश पट्टेकर, मेघानंद जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख मागण्या
- डॉ. आंबेडकर भवन पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड व सहकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा.
- रत्नाकर गायकवाड यांची न्यायालयीन चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
- पोलिस आयुक्त अमितेशकुमार व पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या.
- शांताबाई धुळे यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची चौकशी करून कारवाई करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images