Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

झालर क्षेत्र आराखडा मंजुरीसाठी रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
झालर क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामे त्वरित थांबवावे व झालर विकास आराखडा मंजूर करावा या मागणीसाठी मराठा मावळा संघटना, महानगर नियोजन समिती व २६ गावांतील शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी केंब्रिज चौक, जालना रोड येथे रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात शहर परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांचा सहभाग होता.
संघटनांतर्फे सकाळी ११ वाजता रस्ता रोको सुरू करण्यात आल्यानंतर काही वेळ चौकातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. यावेळी जय शिवाजी जय भवानी, सिडको झालर विकास आराखडा मंजूर झालाच पाहिजे या घोषणा देण्यात आल्या. मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव शिंदे म्हणाले की, झालर क्षेत्र विकास आरखडा मंजूर होत नसल्यामुळे या गावांचा विकास ठप्प झाला आहे. शहरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ‌काही लोकांचा फायदा व्हावा म्हणून सरकार आराखडा मंजूर करत नसून तो त्वरित मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी महानगर नियोजन समिती संचालक राहुल सावंत तसेच सुनील औटे, गणेश वडकर, हनुमंत कदम, विजय म्हस्के, भरत कदम, निवृत्ती मांडकीकर, अनिल हरडे, दीपक झिमण, भाऊसाहेब गायके, संजय पळसकर, बाबासाहेब गायकवाड, रमेश केरे पाटील, बाळासाहेब भोसले, सचिन मिसाळ यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जगन्नाथा’च्या निनादाने मिरवणुकीत रंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जय जगन्नाथ स्वामी की जय, जय बलदेव स्वामी, जय सुभद्रा... अशा जयजयकारात, टाळ, झांज व मृदंगाच्या निनादात आणि मोठ्या उत्साहाने रथाचा दोरखंड ओढण्यासाठी सरसावलेल्या भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने भगवान जगन्नाथ रथयात्रेचे वातावरण भारून गेले. सिडको एन सात परिसरातून ही मिरवणूक निघाली आणि साई कॉर्नर येथे मिरवणुकीची सांगता झाली.
ओडिसा येथील जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर ही मिरवणूक दरवर्षी शहरातून काढली जाते. यानिमित्त नऊ दिवस वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमही होतात व त्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्याचाच भाग म्हणून रविवारी (२५ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिडको एन सात परिसरातून ही मिरवणूक निघाली. अत्यंत अपूर्व वातावरणात आणि मुख्य म्हणजे खास ओडिसातील मृंदग, टाळ, झांज आदी वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक निघाली. एकीकडे ओडिशा समाजातील आबाल-वृद्ध रथाचा दोरखंड ओढत होते, तर दुसरीकडे स्वामींचा जयजयकार सुरू होता. मुलांसह महिला भाविकांचादेखील उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
मिरवणुकीदरम्यान परिसरातील नागरिकांनीही स्वामींचे दर्शन घेतले. ही आकर्षक रथयात्रा सिडको एन सात परिसरातून बळीराम पाटील हयस्कूलमार्गे साई कॉर्नरपर्यंत काढण्यात आली. या संपूर्ण सोहळ्यासाठी ओडिशातून अनेक भाविक शहरात आले होते. या प्रसंगी नगरसेविका ज्योती पिंजरकर, आशिष मिश्रा, कपील डकवा, रवींद्र श्यामल, श्रीकांत कुंभ, शंकर राव, अनिल जैस्वाल, ऋषिकेश खैरे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा इम्पॅक्टः अखेर साताऱ्यात ब्लिचिंग पावडर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातारा
महापालिका प्रशासनाने सातारा प्रभाग कार्यालयास शुक्रवारी ब्लिचिंग पावडरचा पुरवठा करण्यात आला. महिनाभरापासून ब्लिचिंग पावडर नसल्यामुळे सातारा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून दोन घरांना गढूळ पाणी येत होते. ‘मटा’च्या १७ जूनच्या अंकात ‘सातारा गावाला गढूळ पाणीपुरवठा’ सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध झाले होते.
‘मटा’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी सातारा प्रभाग कार्यालयास ब्लिचिंग पावडरच्या १० गोण्या देण्यात आल्या. त्यापैकी तीन देवळाईसाठी, दोन सातारा तांडा येथील विहिरीत टाकण्यासाठी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ब्लिचिंग पावडर विहिरीत टाकले असून, गावाला स्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली असली तरी साताऱ्यातील विहिरीच्या बाजूला केलेल्या नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम झालेले असल्यामुळे सध्या पाणी आहे. ब्लिचिंग पावडर आले असले तरी विहिरीची उंची वाढवण्याचे, तसेच डागडुजी करण्याचे व विहिरीत घाण पडू नये यासाठी जाळी बसवण्याचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी सोमीनाथ शिराणे, विनोद सोळनर यांनी केली आहे. विहिरीचे काम झाल्यास उन्हाळ्यात थोड्याफार प्रमाणात गावचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एस्सार पंपाच्याही मापात पाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील पेट्रोल पंपावर छापे मारीत तपासणी मोहीम सुरू केली आहे. तिसऱ्या दिवशी रविवारी गारखेडा भागातील एस्सार पेट्रोल पंपाची तपासणी करण्यात आली. यामध्ये पाच लिटर मागे ५० ते ५५ मिलीलीटर पेट्रोल चोरी होत असल्याचे उघड झाले.
ठाणे गुन्हे शाखेने चिप व रिमोटद्वारे पंपावरून पेट्रोल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. या आरोपींच्या माहितीवरून शहरातील पेट्रोल पंपावर देखील अशा पद्धतीने पेट्रोल चोरी होत असल्याची माहिती समोर आली. ठाणे गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी शहरात आले आहे. तपासणी पथकाने रविवारी दुपारी एस्सार पेट्रोल पंपाची केली. यामध्ये दोन मशीनमधून पाच लिटर मागे ५० ते ५५ मिलीलीटर पेट्रोल चोरी होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी मशीनमधील पल्सर व नोजेल जप्त केले आहे. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास घोडके, पीएसआय अविनाश महाजन, शिवराज बेंद्रे, जमादार अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुरके, एस. बी. सुर्वे, वजन मापक निरीक्षक ए. एस. कुलकर्णी, शिवहरी मुंढे आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातच सापडली चोरीस गेलेले ७० हजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर
तालुक्यातील विनायकनगर येथील घरातून चोरी झालेली ७० हजार रुपयांची रक्कम पोलिसांना घरातच सापडली. त्यामुळे पोलिसांसह संबंधितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तालुक्यातील विनायकनगर येथील एका घरातून रोख ७० हजार रुपयांसह मोबाइल संच चोरून नेल्याची घटना २२ जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली होती. विनायकनगर येथील संतोष मेटे हे पहाटेच्या सुमारास घराचा दरवाजा उघडा ठेवून प्रात:विधीसाठी बाहेर गेले असता चोरट्यान ही संधी साधल्याच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव, पोलिस कॉन्स्टेबल अविनाश भास्कर, किशन गवळी, रवी कीर्तिकर, हरी सोनवणे, संतोष धाडबळे, विजय दाभाडे, विलास सुगधान व पीयूष राजपूत आदींनी २३ जून रोजी मेटे यांच्या घरी पाहणी केली. पाहणी करताना पोलिसांना घरातील कोठीमध्ये ७० हजारांची रक्कम सापडली. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली, ती मेटे यांना कोर्टात अर्ज देऊन परत घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दुभाजकातील झाडे धोकादायक

$
0
0

दुभाजकातील झाडे धोकादायक

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगर ते अदालत रोड दरम्यान विवेकानंद कॉलेजसमोर असलेल्या रोडवरील दुभाजकात लावण्यात आलेल्या रोपट्यांचे आता मोठे झाड झाले आहे. दुभाजकांच्या जाळयांच्या बाहेर ही झाडे येत असून यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

समर्थनगर सावरकर चौक ते सतीश पेट्रोल पंपाजवळील मार्गावर मनपाच्या वतीने सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावर असलेल्या दुभाजकांच्या जाळ्यांमध्ये मनपाने शोभेची झाडे लावली आहेत. या झाडांची निगा राखण्यात येत नसल्याने काही झाडांच्या फांद्या बाहेर येऊन त्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. या मार्गावर वाहतुकीची नेहमी वर्दळ असते. दुभाजकाच्या यु टर्नवर वळण घेत असताना या झाडामुळे प‌लीकडून येत असलेली वाहने दिसत नाही. परिणामी या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे.

पोलिस आयुक्तांच्या सूचनेला हरताळ

तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या मार्गावर दुभाजकांमध्ये असलेले गॅप बंद करण्याच्या सूचना मनपा प्रशासनला दिल्या होत्या. मात्र, मनपा प्रशासनाने या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने अपघाताला निमंत्रण ठरणारे हे गॅप अद्यापही कायम आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाला लुटले, दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे स्थानकावरील रेल्वे सिग्नलजवळ लघुशंकेसाठी गेलेल्या प्रवशाला मारहाण करुन लुटणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी शनिवारी (२४ जून) अटक केली. त्यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, मंगळवारपर्यंत (२७ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.
याप्रकरणी गजानन ज्ञानेश्वर घोत्रे (२४, रा. पिंपरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा २३ जून रोजी परभणीहून नंदीग्राम एक्सप्रेसने औरंगाबादला आला होता. फिर्यादी हा रेल्वेस्थानकावर उतरुन लघुशंकेसाठी रेल्वे सिग्नलजवळ गेला असता त्याच्यामागे तिघेजण आले. त्यांनी फिर्यादीला मारहाण करुन फिर्यादीजवळील बॅग, मोबाईल, एटीएम कार्ड, पॅनकार्ड असा सुमारे १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून धूम ठोकली. घटनेनंतर फिर्यादीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली; परंतु फिर्याद नंतर देतो असे सांगत फिर्यादी निघून गेला. दरम्यान, वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या चार्ली पोलिसांनी दोनजणांना बॅग व मोबाईलसह पकडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोघा आरोपींची चौकशी केली असता त्यांनी फिरोज याच्या साथीने लुटमार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून बॅग व मोबाईल असा सुमारे १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. फिर्यादीने २४ जून रोजी रेल्वे पोलिस ठाण्याता दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपी दिपक काशीनाथ सोळस (२१, रा. भिमनगर, मनमाड) आणि सोनू दिलीप वाघमारे (२०, रा. राजवीनगर, औरंगाबद) यांना अटक करुन रविवारी कोर्टात हजर केले असता, आरोपींनी चोरी केलेल्या ऐवजापैकी चार हजारांचा ऐवज जप्त करणे बाकी आहे, आरोपींचा साथीदार फिरोज याला अटक करणे बाकी असल्याने आरोपींना सहा दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षातर्फे कोर्टात करण्यात आली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपींना मंगळवारपर्यंत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती नियमबाह्य

$
0
0

औरंगाबाद : महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कायद्यात तरतूद नसताना डॉ. सतीश पाटील यांची प्रभारी अधिकारीपदी केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी केली आहे. या नियमबाह्य नियुक्तीने विद्यापीठ कायद्याची पायमल्ली झाल्याचे भालेराव यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विद्यार्थी संघटनांनीसुद्धा पाटील यांना हटवण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षण सचिवांकडे केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी अधिकारीपदी डॉ. सतीश पाटील कार्यरत आहेत, मात्र त्यांची नियुक्ती पहिल्यापासून वादात आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम कायदा २०१६ व महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४नुसार प्रभारी अधिकारी पद अस्तित्वात नाही. कायद्यात तरतूद नसताना कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे यांनी कायद्याचे उल्लंघन करून डॉ. पाटील यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी कॉम्प्युटर सायन्स टिचर्स अँड रिसर्च असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी केली आहे.
याबाबत कुलगुरू डॉ. चोपडे यांना भालेराव यांनी निवेदन दिले आहे; तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन पाठवले आहे.
दरम्यान, नवीन विद्यापीठ कायद्यामुळे प्रशासकीय रचनेत मोठा बदल झाला आहे. सध्या जुन्या रचनेनुसार कामकाज असले तरी नवीन कायद्यानुसार कामकाज करण्याची मागणी आहे. तसेच अस्तित्वात नसलेली पदे तात्काळ रद्द करण्यावर विद्यार्थी संघटनांनी जोर दिला आहे.

सचिवांना निवेदन
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भेट दिली. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुंटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. विद्यापीठ कायद्यात प्रभारी अधिकारी पद नसल्यामुळे तात्काळ कारवाई करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगारांच्या पगारात ४८ लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासकीय कर्करोग हॉस्पिटलमधील कंत्राटी कामगारांना नियमानुसार पगार न देता कमी पगार देत ४७ लाख ८६ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी कंत्राटदार व परवानाधारकाविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी २१ कंत्राटी कामगारांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला.
याप्रकरणी मीराबाई हरीदास चंदनशिवे (वय ३५ रा. विश्वासनगर लेबर कॉलनी) या कंत्राटी कामगार महिलेने तक्रार दाखल केली. मीराबाई यांनी एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या कालावधी कँन्सर हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम केले. सुंदर कंन्स्ट्रकशचे कंत्राटदार विलास त्रिभुवन यांच्यामार्फत त्या कामाला होत्या. त्यांच्यासोबत इतर ५० कंत्राटी कामगार देखील कामाला होते. मीराबाई यांना पहिल्या वर्षी महिना तीन हजार, दुसऱ्या वर्षी साडेतीन हजार, तर तिसऱ्या वर्षी चार हजार पन्नास रुपये पगार देण्यात आला. १ जानेवारी २०१७ रोजी या कामगारांना कोणतीही नोटीस न बजावता कामावरून कमी करण्यात आले. मीराबाई व इतर कामगारांनी माहिती घेतली असता कँन्सर हॉस्पिटलच्या प्रशासनाने ५० कामगारांच्या वेतनाचे चार लाख आठ हजार रुपये लेखी कराराप्रमाणे प्रत्येक महिन्यात २०१२ ते २०१६ या कालावधीत दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी कंत्राटदार विलास ‌त्रिभुवन व सुंदर सदाफुले यांच्याविरुद्ध मीराबाईच्या तक्रारीवरून अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमी पगार दिला
कंत्राटदार विलास त्रिभुवन व सुंदर कंन्स्ट्रकशनचा परवाना नावावर असलेले सुंदर अप्पाराव सदाफुले यांनी मीराबाई यांची महिन्याला साडेचार हजार रुपये कमी पगार देत तीन वर्षांत सव्वादोन लाखांची, तर इतर २० जणांची तीन वर्षांत ४५ लाख ३६ हजार अशी एकूण ४७ लाख ८६ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुपरस्पेशालिटी’साठी सुधारित प्रस्ताव

$
0
0

‘सुपरस्पेशालिटी’साठी सुधारित प्रस्ताव
हॉस्पिटलमधील पदांसाठी ‘डीएमईआर’ने मागवला प्रस्ताव; डिसेंबरपर्यंत बांधकाम पूर्ण होण्याचे संकेत
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
१५० कोटींच्या निधीतून उभे राहात असलेल्या घाटी परिसरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ४०८ पदांचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आला होता. मात्र मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सुधारीत प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले असून, गरजेइतत्याच मनुष्यबळाचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने पाठवण्यात येणार आहे आणि डिसेंबरपर्यंत म्हणजेच हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सर्व पदांना मान्यता मिळून पदनियुक्तीला प्रारंभ होऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी प्रस्ताव तातडीने पाठवण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे राज्य शासन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा गांभीर्याने विचार करत असल्याचाही सूचक अर्थ काढला जात आहे.
प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) परिसरामध्ये १०० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे केंद्र व राज्य सरकारच्या १५० कोटींच्या निधीतून उभे राहणार आहे. हॉस्पिटलसाठी केंद्राकडून ७० टक्के म्हणजेच १०५ कोटी रुपये, तर राज्याकडून ३० टक्के म्हणजेच ४५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हे हॉस्पिटल घाटी परिसरातील घाटी क्वार्टर्सजवळ उभे राहात असून, बांधकाम वेगात सुरू आहे. सद्यस्थितीत हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्याचा स्लॅबही पूर्ण झाला असून, इतर बांधकामदेखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे या हॉस्पिटलचे काम डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. या योजनेअंतर्गत हॉस्पिटलचे बांधकाम तसेच उपकरणांचा विषय हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. त्यामुळे केंद्र सरकारमार्फत हॉस्पिटलचे संपूर्ण बांधकाम होणार आहेच; शिवाय हॉस्पिटलमधील उपकरणे व यंत्रसामुग्रीदेखील केंद्रामार्फत उपलब्ध होणार आहे. अर्थात, हॉस्पिटलमधील पदनिर्मिती व पदनियुक्ती ही राज्य सरकारची जबाबदारी असून, हे रुग्णालय घाटीअंतर्गत कार्यरत राहणार आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत रुग्णालयाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि बांधकामाच्या गतीमुळे हे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आठ विभागांमार्फत विशेष सेवा
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी, सीव्हीटीएस, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, निओनॅटॉलॉजी, बर्न्स अँड प्लास्टिक्स, न्युरोलॉजी व न्युरोसर्जरी अशा आठ विभागांमार्फत रुग्णांना विशेष अद्ययावत सेवा दिल्या जाणार आहेत. या विभागाअंतर्गत प्रत्येकी २० खाटा असणार आहेत. हॉस्पिटलच्या ‘जी प्लस फाईव्ह’ इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणांसह सर्व विभागांसह जनरल वॉर्ड, अतिदक्षता विभाग, सुसज्ज शस्त्रक्रियागृह असणार आहेत.
पदे होणार ४०८ पेक्षा कमी?
मुंबईच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमईआर) सुधारीत प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यातही आवश्यक तेवढ्याच पदांचा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलसाठी ४०८ पेक्षा कमी पदे असतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात, केवळ औरंगाबाद नव्हे तर अकोला, यवतमाळ व लातूर येथे होत असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पदांचाही सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे आदेश ‘डीएमईआर’कडून देण्यात आला आहे.
मुंबईतील बैठकीत नव्याने प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पदांची चाचपणी करुन योग्य त्या पदांचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवण्यात येणार आहे. या पदांना मान्यता मिळून हॉस्पिटलचे काम पूर्ण होताच सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशा आशा आहे.

– डॉ. सुधीर चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जनशताब्दी परभणीहून सोडण्याचा प्रस्ताव बोर्डाकडे

$
0
0

जनशताब्दी परभणीहून सोडण्याचा प्रस्ताव बोर्डाकडे

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

जनशताब्दी एक्सप्रेस परभणीहून सोडण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. जनशताब्दी एक्सप्रेस परभणीहून सोडण्याची मागणी खासदार संजय जाधव केली होती.

औरंगाबाद सीएसटी एक्सप्रेस अशी रेल्वे तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या काळात सुरू झाली होती. कालांतराने ही रेल्वे दादरपर्यंत करण्यात आली. त्यानंतर जालनेकरांच्या मागणीनुसार ही रेल्वे जालना ते दादर अशी करण्यात आली. तथापि, जालन्याहून या रेल्वेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. औरंगाबाद स्टेशनवरच ही रेल्वे प्रवाशांनी भरत आहे.

जालन्यापासून जनशताब्दी सुरू झाल्यापासूनच परभणी, सेलू, मानवत या भागातील नागरिकांनी ही रेल्वे परभणीपासून सुरू करण्यासाठी मागणी केली होती. जनमताकडे पाहून खासदार संजय जाधव यांनी नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जनशताब्दी एक्सप्रेस परभणीहून सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला रेल्वेनेही प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. जनशताब्दी परभणीहून सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यावर ही रेल्वे परभणीपासून धावू लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोरगरीब गर्भवतींची खासगीत सोनोग्राफी

$
0
0

Nikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet : @nnirkheeMT
औरंगाबाद ः पालिका, महापालिकेसह राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधाच उपलब्ध नसल्याची अप्रत्यक्ष कबुली देत, उशिरा का होईना गोरगरीब गर्भवतींना सोनोग्राफीच्या सेवा मिळवून देण्यासाठी खासगी सोनोलॉजिस्टचे सहाय्य घेण्याचा निर्णय शासकीय पातळीवर घेतला आहे. परिणामी, गोरगरीब गर्भवतींची दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत सोनोग्राफी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, बाळ-मातेच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे पुढे येत आहे.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, राज्यभरातील सर्व पालिका, शासकीय रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून इच्छुक खासगी सोनोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्टना या अभियानात सहभागी करुन घेण्याचे आदेश सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक; तसेच पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी खासगी डॉक्टरांना प्रत्येक केसमागे ४०० रुपयांपर्यंतचे मानधन देण्याचेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत शासकीय रुग्णालयातील गर्भवतींना खासगी सोनोलॉजिस्टकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये खासगी सोनोलॉजिस्टने येऊन तपासणी करून देण्याचीही सोय अभियानामध्ये आहे. यासंदर्भात इच्छुक खासगी सोनोलॉजिस्टच्या याद्या कराव्यात, वेळा-दिवस निश्चित करावेत, खासगी सोनोलॉजिस्टची नावे शासकीय रुग्णालयात उपलब्ध करावीत, असेही आरोग्य सेवेच्या आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

पूर्वीचे मानधन बुडाले, त्याचे काय?
या अभियानांतर्गत काही महिन्यांपूर्वी १८५ रुपये प्रती केस देण्याचे ठरले होते. त्याला खासगी सोनोलॉजिस्टकडून अत्यल्प प्रतिसाद मिळालाच, शिवाय काहींना मानधनही मिळाले नाही, असेही आरोप झाले होते. नंतर ती योजनाच गुंडाळल्या गेल्याचे सूत्रांनी सांगितले. निदान आता तरी सेवा देणाऱ्यांना त्यांचे मानधन काटेकोरपणे मिळेल व सगळा व्यवहार पारदर्शी असेल, अशी अपेक्षा केली जात आहे. त्याचवेळी गाव, तालुका, शहर, महानगरांच्या ग्रेडनुसार सोनोलॉजिस्टना मानधन मिळावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई-पुण्यात व मोठ्या शहरांमध्ये ‘अॅनॉमली स्कॅन’साठी दीड ते अडीच हजार रुपये शुल्क घेतले जात असेल, तर हेच स्कॅन ४०० रुपयांमध्ये कसे शक्य होईल, याचाही विचार होण्याची गरज व्यक्त होत आहे.

उत्तम निर्णय असून आम्ही सेवा देण्यास तयार आहोत. मात्र शहराच्या ग्रेडनुसार मानधन असावे, पीसी-पीएनडीटी अॅक्टनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता असावी व एकाच दिवशी सर्व रुग्ण न पाठवता रोज विशिष्ट संख्येने पाठवावेत, अशी संघटनेची मागणी आहे.
- डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी, राज्य सचिव, रेडिओलॉजिस्ट संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाटू’ उपकेंद्राला जागा द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला उपकेंद्रासाठी स्थानिक विद्यापीठांती तात्काळ जागा देण्यास सहकार्य करावे, अशा सूचना राज्यशासनाने विद्यापीठांना पत्र पाठवित केले आहे. विद्यापीठांना उपकेंद्रासाठी जागा मिळत नसल्याने विद्यापीठाच्या विस्तारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, तर औरंगाबाद येथे सुरू होणारे उपकेंद्र तात्पुरत्या स्वरुपात शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
राज्यातील तंत्रशिक्षणशी निगडित सर्व संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेशी जोडण्याचा शासनाचे प्रयत्न सुरू आहे. त्यात राज्यातील अभियांत्रिकीच्या ४८सह, १४ विविध अभ्यासक्रमांची कॉलेजांनी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत विद्यापीठाचे संलग्नीकरण स्वीकारले आहे. विद्यापीठाचे चार उपकेंद्रासह विभागीय केंद्रही उभारण्यात येणार आहे. उपक्रेंद स्थानिक विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात येणार होते, परंतु विद्यापीठांनी जागा दिली नाही.
कॉलेजांची संख्या वाढली तरी, विद्यापीठाच्या विस्तारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर पुन्हा राज्यसरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुन्हा विद्यापीठांना तात्काळ पत्र पाठवून विद्यापीठासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शासकीय अभियांत्रिकी कॉलेजात उपकेंद्र
औरंगाबादमध्ये सुरू करण्यात येणारे उपकेंद्र हे कोठे स्थापन करायचे यावरून वाद सुरू होता. दोन खाजगी संस्थांमध्ये वाद झाला. त्यावर विद्यापीठाने दोन्ही कॉलेजांचे प्रस्ताव फेटाळत सरकारी जागेत उपकेंद्र सुरू करण्याचे स्पष्ट केले. त्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या परिसरात हे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.

उपकेंद्राला हवी पाच एकर जागा
तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रासाठी पाच एकर जागा लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने शासनाला साकडे घातले आहे. विस्तारात उपकेंद्राची इमारत, अत्याधुनिक सुविधा, तेथे आवश्यक कर्मचारी याबाबत शासनस्तरावरून लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

शिक्षणमंत्र्यांसोबत विद्यापीठाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली. विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, असे त्यांना सांगितले. सरकारने विद्यापीठांना पत्रही पाठविले आहे. उपकेंद्र उभारणीसाठी जागा मिळेल. तात्पुरत्या स्वरुपात आम्ही ही केंद्र उभारू. ‘ई-गव्हर्नन्स’च्या माध्यमातून आम्ही सुविधा उपलब्ध करून देऊ. त्यामुळे विद्यार्थी, पालक, कॉलेजांची गैरसोय होणार नाही.
- डॉ. विलास गायकर, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या गुणपत्रिका

$
0
0

दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या गुणपत्रिका

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावीच्या ऑनलाइन निकालानंतर शनिवारी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा ऑनलाइन निकाल १३ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. गुणपत्रिका मिळाल्याने विद्यार्थ्यांना आता पुढील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. त्याचा आनंद आज विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसला.

शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल १३ जून रोजी जाहीर करण्यात आला होता, तर विद्यार्थ्यांना आज गुणपत्रिकांचे आज वाटप करण्यात आले. मंडळाकडून वितरण केंद्रावर शाळांनी गुणपत्रिका नेण्यासाठी गर्दी केली होती. त्यावेळी शाळांच्या प्रतिनिधींची झुंबड उडाली होती. त्यानंतर दुपारी ३ नंतर शाळांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप सुरू झाले. गुणपत्रिका हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. अनेक शाळांमध्ये गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. औरंगाबाद विभागातून १ लाख ८३ हजार २३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ६१ हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणपत्रिकांसह विद्यार्थ्यांना कलचाचणीचा निकालपत्र देण्यात आले. फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली होती. कलचाचणीनुसार आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर निवडणे विद्यार्थ्यांना सोपे होणार आहे.

‘कौशल्य सेतू’ अर्ज भरल्यानंतरच गुणपत्रिका

तीनपेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू अंतर्गत विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मागील वर्षीपासून हा उपक्रम राबविला जात आहे. मागील वर्षी प्रतिसाद न मिळाल्याने यंदा नोंदणीनंतरच अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचे फर्मान मंडळाने काढले होते. त्यानुसार आज शाळांनी असे अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. अशा विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ७३२ एवढी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला रुग्णालयाचा चेंडू ‘बांधकाम’कडे

$
0
0

औरंगाबाद ः शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालयासाठी चिकलठाणा परिसरातील सात एकर जागेचा विचार सुरू असून, संबंधित जागा बांधकामाच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही, हे कळविण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने बांधकाम विभागाला पत्र दिलेले आहे, मात्र बांधकाम विभागाने संबंधित जागेविषयी ‘ग्रीन सिग्नल’ दिला नसल्याने जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.
औरंगाबाद जिल्ह्याला २०० खाटांचे शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालय मंजूर होऊन चार वर्षे लोटली आहेत, मात्र पहिली दोन-अडीच वर्षे कुठलीच हालचाल न झाल्याने जिल्हा रुग्णालयाचा विषय पुढे सरकलाच नाही. मागच्या दीड वर्षापासून जिल्हा रुग्णालयाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे, मात्र मागच्या अनेक ‘डीपीसी’च्या बैठकांमध्ये वारंवार विषय निघून व पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही जागेचा शोध लागलाच नाही. यासंदर्भात, बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. व लवकरच जागेचा प्रश्न सुटेल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी ‘मटा’ला सांगितले.

अहवालाची प्रतीक्षा
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला पत्र दिले होते. त्यानंतर केंब्रिज शाळेमागील जागेचा रुग्णालयासाठी विचार सुरू झाला. आरोग्य विभागाने सात एकर जागा रुग्णालयासाठी योग्य आहे किंवा नाही, याविषयी कळविण्याचे पत्र बांधकाम विभागाला दिले. बांधकाम विभागाने अद्याप अहवाल दिलेला नाही. यापूर्वी सातारा, औरंगाबाद लेणी परिसरातील जागेचा विचार झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उर्दू माध्यम शाळा सोयगावात शिक्षकाविना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सोयगाव येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेत शिक्षकच नसल्याने ५८ विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. शिक्षकच नसल्याने विद्यार्थी गेल्या १० दिवसांपासून फक्त बसून आहेत.
सोयगाव येथे जिल्हा परिषद शाळेत उर्दू माध्यमाचे चौथीपर्यंत वर्ग आहेत. येथील चारही वर्ग एकच शिक्षक सांभाळत होता. त्यांची आंतर जिल्हा बदली झाल्याने उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची जागा रिक्त आहे. या शाळेत उर्दू माध्यमाची दोन पदे मंजूर आहे पण सध्या एकही शिक्षक नाही. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आठवडा उलटला आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तालुक्यात केवळ सोयगाव येथे उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषदेचे चार वर्ग सुरू आहेत. दरम्यान, दोन्ही पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे उर्दू शिक्षकाची मागणी एक महिन्यापूर्वी करण्यात आली आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी राजेंद्र फुसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ दाऊदी बोहरी समाजाची इद उत्साहात

$
0
0

दाऊदी बोहरी समाजाची इद उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

मिश्री कॅलेंडरनुसार दाऊदी बोहरा समाजाची इद उल फित्र (रमाजान इद) रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील नजमी मशीद, सैफी मशीद या ठिकाणी दाऊदी बोहरा समाज बांधवांनी इदची विशेष नमाज अदा केली.

पानदरिबा येथील नजमी मशीदमध्ये फज्र (पहाटेची नमाज) अदा करण्यात आली. त्यानंतर रमजान इदची विशेष नमाज अदा करण्यात आली. बोहरा समाजाचे प्रमुख आलीम शेख ताहेर भाई इझ्झी यांच्या उपस्थितीत इदची विशेष नमाज अदा केली. इदनिमित्त विशेष खुदबा (धार्मिक प्रवचन) पठण करण्यात आले. या मशिदीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहा ते बारा मुलांनी कुराण शरीफचे पठण केले. आलीम शेख ताहेर यांनी मानवाच्या कल्याणासाठी दुवा केली. लहान मुलांनी आलीम सहाब आणि घरातील ज्येष्ठांची भेट घेऊन इदच्या शुभेच्छा दिल्या.

सिटीचौक, बोहरी कठडा येथील सैफी मशीद येथेही विशेष नमाजचे आयोजन इद निमित्त करण्यात आले. मौलाना शेख हुजैफा भाई यांच्या उपस्थितीत इदची विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी अली असगर शामगडवाला, एम. मुर्तूजा गोधरवाला, अंजुमन ए सैफी दाऊदी बोहरा संस्‍थेचे सचिव शेख हुसैन बागवाला, जनसंपर्क अधिकारी अली असगर उर्फ अज्जू भाई पेटीवाला, अरशद नवमी यांच्यासह अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

सैय्यदना यांनी दिला समाजाला संदेश

बोहरा समाजाच्या वतीने इद उल फित्रची नमाज आपल्या मशिदींमध्ये अदा करण्यात आली. यावेळी म‌शीद नजमी, मशीद सैफी सह अन्य समाज बांधवांना ठिकाणी बोहरा समाजाचे ५३ वे धर्मगुरू सैय्यदना मुफ्फदल सैफुद्दीन यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. दैनंदिन जीवनात इस्लामी तत्त्वांचा अवलंब करण्याचे यावेळी बोहरा समाजाबांधवांना सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ मराठवाड्यात सरीवर सरी

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
मराठवाड्यात रविवारी दिवसभर सर्वत्र सरीवर सरी येत होत्या. गेल्या काही दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पाहत असलेल्या बळीराजाची चिंता या पावसाने काही अंशी मिटली आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

बीडमध्ये पावसाची रिपरिप
बीड - जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत सरासरी १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळपासूनच आभाळ दाटून आले होते. दुपारी दोनच्या सुमारास पाऊस पडला. त्यानंतर दिवसभर सरीवर सरी कोसळत होत्या. आष्टी तालुक्यात सात पैकी सहा महसूल मंडळात आतापर्यंत दोनशे मिलीमीटर पाऊस झाला असल्याने या दुष्काळी भागात पडलेल्या पावसाने आनंदाचे वातवरण आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील चौदा महसूल मंडळात पावसाने द्विशतक पार केले असून पंधरा मंडळात दीडशेचा टप्पा ओलंडला आहे. गेल्या आठवड्यात बेचाळीस टक्के पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे या आठवड्यात बहुतांश पेरण्या उरकतील अशी स्थिती आहे.

उस्मानाबादमध्ये पावसामुळे तारांबळ
उस्मानाबाद - शहर व परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास काही वेळ पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रमजान ईद निमित्ताने भरलेला बाजार विस्कळीत झाला. बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची
तारांबळ उडाली. उस्मानाबाद शहरासह कळंब तालुक्यातील येडशी, येरमाळा परिसरात पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने सुरूवात केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या पावसामुळे दिवसभर उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.

नांदेडमध्ये हजेरी
नांदेड - नांदेड जिल्ह्यात शनिवारी रात्री उशीरा व रविवारी सायंकाळनंतर हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठवड्याभरापासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजात चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे या पावसाने शेतकयांवरील दुबार पेरणीचे संकट टळले असून आता पीक वाढीसाठी हा पाऊस पोषक मानला जात आहे.

लातूरमध्ये रिमझीम
लातूर - लातूर शहर व परिसरात रविवारी सायंकाळनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. रविवारी दुपारनंतर शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली. लातूर जिलह्यातील बळीराजा अजून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘सहकाराच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
गरीब रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार क्षेत्राचा उपयोग करण्याचे आवाहन राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
लातूर अर्बन कॉ-ऑपरेटीव्ह बँकेच्या कामदार रोड शाखेच्या इमारत उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी गृहमंत्री शिवराज पाटील- चाकुरकर होते. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार बसवराज पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, डॉ. अशोक कुकडे, धीरज देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी देशमुख म्हणाले, ‘लातूरकरांनी ठरवले तर नक्की वेगळे काही घडते. त्यामुळे आता सहकाराच्या माध्यमातून रुग्णसेवा देण्याचा प्रारंभ केला पाहिजे. आदर्श रुग्णसेवा कशी द्यावी याचे उदाहरण हे डॉ. अशोकराव कुकडे आहेत. राज्यातील विकास सहकारी संस्थाची संख्या ही २२ हजारांपेक्षा अधिक आहे. परंतु, त्यातील पन्नास टक्के बंद असून त्याचे उपयोग फक्त जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदान करून घेण्यासाठी होत होता, ते आता बंद करून विकास सेवा संस्था बळकट करण्यावर राज्य सरकार भर देणार आहे. विकास सेवा संस्था सुद्धा आत गावातला पैसा गावतच राहील यासाठी ठेवी स्वीकारणे, आवश्यक ते व्यवसाय सुरू करावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. सहकाराचा केंद्रबिंदु हा सेवा संस्था करून महाराष्ट्रातील सहकार समृद्ध करणार आहे. सहकारात काहीही केले तर चालते शिक्षा होत नसते हा समज दूर करण्यासाठी सहकारातील कायदे कडक करण्याचा प्रयत्न करणार आहे.’
यावेळी चाकुरकर यांनी डिजीटल इंडिया यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात बँकेच्या शाखा अधिक संख्येने सुरू करण्याची सुचना केली. यावेळी खासदार डॉ. गायकवाड यांनी पंतप्रधानाच डिजीटल इंडीयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्बन बँक काम करीत असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रदिप राठी यांनी केले तर सूत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ नांदेडमध्ये आषाढी महोत्सवाचे आयोजन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नांदेड
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी महोत्सवाचे आयोजन नांदेड जिल्हा शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती आमदार हेमंत पाटील यांनी दिली.
१ ते ४ जुलै दरम्यान आषाढी महोत्सवात १ जुलै रोजी ख्यातकिर्त गायिका शर्वरी जेमिनीस यांच्या गायनांचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उदघाटन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते होणार असून यावेळी नांदेडचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, आमदार सुभाष साबणे, जिल्हाप्रमुख भूजंग पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
२ जुलै रोजी नामवंत गायिका वैशाली सामंत यांच्या गायनांचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उदघाटन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रकाशराव आबीटकर, आमदार अनिल परब, शरद पाटील, सुभाष भोईर, शकुंतला अहिरराव यांची उपस्थिती असणार आहे.
३ जुलै रोजी गायिका पुष्पा पागधरे यांच्या गायनांचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार अनिल कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार किशोर पाटील, सुनिल शिंदे, आमदार प्रतापराव पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
४ जुलै रोजी ख्यातकिर्त गायक आदर्श शिंदे यांच्या गायनांचा कार्यक्रम असून या कार्यक्रमाचे उदघाटन आमादा सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आून यावेळी विश्वानाथ नेरुरकर, आमदार नागेश पाटील-आष्टीकर, मिलींद देशमुख आदी शिवसेना नेते उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड जिल्हा शिवसेनेच्यावतीने सुनियोजितपणे करण्यात आले असून २००७ या वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तरी नांदेडकर रसिकांनी या भक्ती रसात चिंब होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक आमदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images