Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवसेनेनं भाजपकडून 'करवून घेतलं'!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद

'शिवसेना व शेतकरी एकत्र आल्यामुळं सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला आहे. प्रश्न श्रेयाचा नाही. पण कर्जमाफीला फॅशन म्हणणाऱ्यांकडून आम्ही कर्जमाफी करवून घेतली', असं ठणकावून सांगत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारनं केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रविवारी नाशिक ते पुणतांबा हा दौरा केला व तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज औरंगाबाद इथं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'कर्जमुक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशी होते. कुठल्या गावातील कुठल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला, यावर शिवसेना बारीक लक्ष ठेवून राहील, असं ते म्हणाले. 'शेतकऱ्यांची कुठंही फसवणूक होऊ नये ही आमची भूमिका आहे. म्हणूनच कर्जमाफीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी अभासगट स्थापन करावा, अशी मागणी त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंच्या मागण्या

> कर्जमाफी जाहीर करताना ३० जून २०१६ पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्ज थकली होती, त्यांना लाभ मिळणार असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, ही मर्यादा जून २०१७ पर्यंत वाढवण्यात यावी.

> कर्जमुक्तीचा निर्णयाचा नेमका लाभ किती शेतकऱ्यांना झाला, याची यादी सरकारनं जाहीर करावी.

> नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत वाढ केली जावी.

> पुणतांब्यातील ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते तातडीनं मागे घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा आरक्षणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मराठा समाजाच्या आरक्षण देण्यासाठी विलंब होत असून शासनाने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असा सूर सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरक्षण परिसंवादात निघाला.
एमजीएम महाविद्यालयातील आइनस्टाइन हॉल येथे झालेल्या या परिसंवादामध्ये तज्‍ज्ञ आणि मान्यवरांनी आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने याचिकाकर्त्यांची भूमिका, आरक्षणाची न्यायालयातील सद्यस्थिती मागसवर्गीय आयोगाची भूमिका, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत असलेल्या विचारधारेवर विचारमंथन झाले. परिसंवादाची सुरुवात आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अंकुशराव कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण तसेच अभिवादन करून झाला.
एकंदरीत मराठा आरक्षणाबाबत सद्यस्थिती आणि न्यायालयामध्ये सुरू असलेली कायदेशीर प्रक्रिया सर्व समाजबांधवांना मिळावी म्हणून या परिसंवादाचे आयोजन आले आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. ‌शिवानंद भानुसे म्हणाले की, मराठा समाजाचा सरसकट इतर मागसवर्ग प्रवर्गामध्ये समावेश करावा यासाठी राज्यशासनाने व राज्यसासनाला मदतनीस ठरणाऱ्या याचिका व अर्जदार यांच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे व त्यांचे कायदेशीर म्हणणे राज्य मागासवर्ग आयोगाकडे तत्काळ पाठवावे, मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देताना राज्य मागसवर्ग आयोगाकडून कालमर्यादेच्या आत अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र शासन या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आरक्षण हा विषय लांबणीवर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्र दाते पाटील यांनी विविध निकाल तसेच मराठा आरक्षणाचे एतिहासिक पुरावे याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी किशोर चव्हाण, बाळासाहेब सराटे, किशोर शितोळे यांनीही आपले मत मांडले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या समाजबांधवांनी प्रश्न उपस्थित केले, त्यास मान्यवरांनी उत्तरे दिली. रवींद्र बोडखे, रमेश केरे पाटील, माणिकराव शिंदे, अप्पासाहेब कुढेकर, डॉ. आर. एस. पवार, किसनराव गवळी, अशोक वाघ, ज्ञानेश्वर अंभोरे, बाबासाहेब दाभाडे, राम भगुरे, धनंजय पाटील, सचिन मिसाळ आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६५ टक्के विद्यार्थी परीक्षेपासून दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. औरंगाबाद विभागातून ६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या पाहिली, तर, १२ हजार १०० विद्यर्थ्यांनी परीक्षेला अर्ज भरले नाहीत. सुमारे ६५ टक्के अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले नाहीत.
फेब्रुवारी-मार्च परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने लगेच जुलैमध्ये परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांसोबत पुढील शिक्षण घेण्याची संधी ही परीक्षा आहे. नाहीतर त्यांना पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल. बारावीच्या निकालानंतर जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही परीक्षा ११ जुलैपासून होणार आहे. परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, तपासणी केंद्र ठरविण्याची प्रक्रिया मंडळात सुरू आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, विभागातील पाच जिल्ह्यांतून ६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. पुरवणी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे ही गळती आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अर्ज न भरणाऱ्यांचे प्रमाण अधिक
बारावीला अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. विद्यार्थ्यांना लगेच शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने हे बदल करण्यात आला असला, तरी त्यामुळे गळतीचे प्रमाणा रोखणे शक्य झाले, नसल्याचे चित्र आहे. यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या १६ हजार १४ होती. तर, पुन्हा परीक्षा देणाऱ्यांपैकी २ हजार ६०१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यंदाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्याच संख्येचा विचार केला तर, १८ हजार ६१५ विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. त्यापैकी केवळ ६ हजार ४७७ विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरला आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थी (नियमित) ः १६०१४
अनुत्तीर्ण पुनर्परीक्षार्थी ः २६०१
परीक्षेसाठी दाखल अर्ज ः ६४७७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनाधिकृत बीटी बियाणे विक्री; गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शासनाने निलंबित केलेल्या बीटी कापूस बियाणाची अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाच्या भरारी पथकाने लासूर स्टेशन येथील एका विक्रेत्याविरुद्ध कारवाई केली. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाने आरसीएच ६५९ बीजी २ या बीटी कापूस बियाणे निलंबित केलेले आहे. पण या अनधिकृत बियाणाची विक्री लासूर स्टेशन परिसरात होत असल्याची माहिती मिळाल्याने भरारी पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यात ओंकार अॅग्रो एजन्सी येथे हे बियाणे विकले जात असल्याचे आढळले. त्याआधारे पथकातील सदस्य रामकृष्ण पाटील, आंनद गंजेवार, आशिष काळुशे यांनी ओंकार एजन्सीवर छापा मारला. एका पाकिटाची कमाल किंमत ८०० रुपये असताना बनावट ग्राहकास दोन पाकिटे प्रत्येकी २,२०० रुपयांना विकले होते. या दोन पाकिटासह अनाधिकृत बियाणांचे एकूण २१ पाकिटे दुकानात सापडली, ११ पाकिटे यापूर्वीच विकल्याचे दुकानचालक लहू धुमाळ यांने चौकशीत सांगितल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. बियाणे नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुकानचालकाविरुद्ध शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मालाचे नमुने परभणी येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जूनमध्ये मराठवाड्यात ६५ शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
एकीकडे कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे त्रस्त असलेला शेतकरी रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी करत असताना दुसरीकडे, मात्र मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. पावसाळ्यातील पहिल्या तीन आठवड्यात तब्बल ६५ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे.
या महिन्यात राज्यभरात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आंदोलने केली. त्यानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांचे आंदोलन एक जून रोजी सुरू झाली. त्याच्या तीन दिवासानंतरच सरकारने कर्जमाफी करणार असल्याचे जाहीर केले होते. तरीही आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या तीन आठवड्यात आत्महत्यांचा आकडा ६५वर गेला आहे.
गेल्यावर्षी विभागात पावसाचा खंड आणि त्यानंतर हातातोंडाशी आलेले पिकाची मोठ्या पावसाने केलेली धुळधाण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वच आर्थिक गणिते बिघडली. पेरण्यांसाठी झालेला खर्च, लहान मोठे कर्ज, सावकारी यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत विभागात तब्बल ४२६ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले असून, सरकारी समितीने यातील २५७ प्रकरणांना पात्र, तर ११ आत्महत्यांच्या प्रकरणांना अपात्र ठरवले आहे. गेल्या साडेपाच महिन्यांतील ११४ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित असल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे.

मेमध्ये सर्वाधिक आत्महत्या
जानेवारी ते मे महिन्यादरम्यान सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मे महिन्यात झाल्या आहेत. औरंगाबाद महिन्यात ७२, फेब्रुवारी ६२, मार्च ८१, एप्रिल ७६ तर मे महिन्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

जूनमधील आत्महत्या
औरंगाबाद ः १०
जालना ः ०४
परभणी ः १२
हिंगोली ः ०१
नांदेड ः ०८
बीड ः १५
लातूर ः ०४
उस्मानाबाद ः ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस थांबला; टँकर सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
यंदा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक टँकर सुरू असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने १७ जूनपर्यंत तब्बल २८८ टँकरची घट झाली. पण, गेल्या आठ दिवसांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे टँकरच्या या घटीला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यात टँकरचा एकेरी आकडा असून एका मोठ्या पावसानंतर चारही तालुक्यात टँकर बंद होण्याची शक्यता आहे.
यंदा जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि सिल्लोड तालुक्यांमध्ये सर्वाधिक टँकर सुरू होते. मात्र जून महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टँकरसंख्येत घट होण्यास सुरुवात झाली. दोन आठवड्यांमध्येच जिल्ह्यातील तब्बल २८८ टँकर कमी झाले. जूनअखेर जिल्हा टँकरमुक्त होण्याची शक्यता असतानाच १७ जूननंतर पावसाने हुलकावणी दिली, रिमझिम पाऊस सुरू असला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासारखा मोठा पाऊस गेल्या काही दिवसात झाला नाही. त्यामुळे सातत्याने घट होत असलेल्या टँकरसंख्येला आठवड्यापासून ब्रेक लागला आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील १६३ गावांमध्ये १६६ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील फुलंब्री ९, पैठण १३, वैजापूर १६, खुलताबाद ६, कन्नड ९ आणि सोयगाव तालुक्यात ५ टँकर सुरू आहेत. या तालुक्यात एखाद्या मोठ्या पावसानंतर टँकरसंख्या शून्य होण्याची शक्यता आहे. सोयगाव वगळता इतर सर्वच तालुक्यात उन्हाळ्यामध्ये टँकरची मोठी संख्या होती. सध्या सर्वाधिक ४४ टँकर गंगापूर तालुक्यात सुरू असून सिल्लोड तालुक्यात ४१, तर औरंगाबाद तालुक्यात ३१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंमलबजावणीवर आमचे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्यामुळेच कर्जमाफी फॅशन आहे, असे म्हणणाऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीवर आमचे लक्ष आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीतील पारदर्शकता आम्हाला कळू द्या, असे म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजाणी योग्य प्रकारे व्हावी, यासाठी अभ्यासगट स्थापन करा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. केली.
मुंबई - नागपूर या समृद्ध महामार्गात औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमिनी मोठ्या प्रमाणावर जाणार आहे. या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ठाकरे सोमवारी औरंगाबादेत आले होते. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीवर आम्ही लक्ष देणार आहोत. या निर्णयामुळे खरोखरच ४० लाख शेतकरी कर्जमुक्त होणार का, कर्जमुक्त होणाऱ्या ४० लाख शेतकऱ्यांची वर्गवारी शासनाने तयार केली पाहिजे. कोणत्या गावात किती शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे, याची यादी शासनाने द्यावी. कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते गावागावात फिरणार आहेत. मी २९ जून रोजी नांदेड ते औरंगाबाद असा दौरा करणार आहे.’
कर्जमाफीच्या निर्णयाने एक चांगली सुरुवात झाली आहे. त्यात शक्य तेथे सुधारणा झाली पाहिजे. राजकारणापेक्षा निर्णयाची अंमलबजावणी महत्त्वाची आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, कर्जमाफीच्या मुद्यावरून नगर, नाशिक विभागांत आजही अस्वस्थता आहे. त्यामुळे या निर्णयावर शासनाने तातडीने अभ्यासगट तयार केला पाहिजे. त्यात शिवसेना, भाजपचे मंत्री व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असावेत. निर्णयाचा लाभ किती जणांना होतो, याचा अंदाज या गटाने घेतला पाहिजे. कर्जमाफीच्या आंदोलनातील शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, कर्जमाफीसाठी जून २०१६ऐवजी जून २०१७ ही तारीख निश्चित करण्यात यावी, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करावी.’
पत्रकार परिषदेला औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख रेणुकादास वैद्य आदी उपस्थित होते.

कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी विधानसभेत मागा
गॅसची सबसिडी सोडणारे दोन कोटी ग्राहक जसे लपले आहेत, तसेच हे ४० लाख शेतकरी लपले तर? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ होणाऱ्या शेतकऱ्यांची यादी बँकेच्या बाहेर लावा. त्यात सर्वकाही पारदर्शक असले पाहिजे. आमचे लोकप्रतिनिधी बँकांकडून यादी घेतील. कर्जमुक्त झालेल्या ४० लाख शेतकऱ्यांची यादी विधानसभेत मागा. मला ही यादी विधानसभेत पाहिजे,’ असे आदेश त्यांनी मंत्री व आमदारांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ वीज बिलाची माहिती मोबाइलवर

$
0
0

वीज बिलाची माहिती मोबाइलवर

एसएमएस सुविधेसाठी मोबाइल क्रमांक नोंदविण्याचे महावितरणचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ः

मोबाइलवर वीज बिलाची माहिती देण्यासाठी महावितरणने दिलेल्या सेवेला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. उर्वरित ग्राहकांनी एसएमएसद्वारे माहिती मिळविण्यासाठी आपला मोबाइल क्रमांक नोंदविण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

आतापर्यंत औरंगाबाद विभागातील ७, ७८, ५३० वीज ग्राहकांपैकी ६, २२, ९३८ ग्राहकांनी महावितरणकडे आपला मोबाइल क्रमांक नोंदविला आहे. या ग्राहकांना दर महिन्याचे बिल, किती युनीट वापर झाला, वीज पुरवठा खंडित झाल्यास त्यासंदर्भातील माहितीसह अन्य आवश्यक माहिती मोबाइलवर पाठविली जात आहे.

नांदेड विभागातील ७,३३,२०२ ग्राहकांपैकी ३,३४,६४४ ग्राहकांनी, जळगाव विभागातील १०,८३,७६७ ग्राहकांपैकी २,०१,९४६ ग्राहकांनी तर लातूर विभागातील ८,०६,३६९ ग्राहकांपैकी २,७०,७५१ वीज ग्राहकांनी मोबाइल क्रंमाकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.

सर्वच वीज ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदवावा व महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैठण तालुक्यात फक्त २२ टक्के पेरण्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण
मृग नक्षत्राच्या सुरुवातील पावसाने हजेरी लावल्यानंतर सुमारे १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात केवल २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाशिवाय इतर स्त्रोताद्वारे पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी खरीप पेरले आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी पेरणीसाठी दमदार पावसाची वाट बघत आहेत.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला एक-दोनदा पाऊस पडल्याने याच नक्षत्रात खरीप पेरणी होईल, असे शेतकरी सांगत होते. पण, त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. तालुक्यातील एकूण एक लाख नऊ हजार हेक्टर खरीप लागवड क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ २३ हजार ५२५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यातही ९५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. २३ हजार ६५४ हेक्टरवर कापूस, चार हजार ८९७ हेक्टरवर तूर, ९५३ हेक्टरवर बाजरी, १४५ हेक्टरवर मूग लागवड करण्यात आली आहे.
‘तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक लागवड करताना खत टंचाई जाणवू नये यासाठी कृषी विभागाने ३३ हजार टन खताची मागणी नोंदवली आहे. पैठण तालुक्यात खरीप पिकांची उत्पादकता २० टक्क्यांनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले असूनकृषी विभागाकडून नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे,’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पी. एन. पायघन, कृषी सहायक एस. बी. खराद यांनी दिली. पैठण तालुक्यात आतापर्यंत फक्त ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस पेरणीसाठी अपुरा असल्याने खरीप पिकांची लागवड अद्याप झालेली नाही. सध्या २२ टक्के पेरणी झाली असून त्यापैकी ९५ टक्के क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे. पेरणी पूर्ण होण्यासाठी शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मीडिया’सीन, धुआँने घेतला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

$
0
0

‘मीडिया’सीन, धुआँने घेतला प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

गीत, संगीत, नृत्यासोबतच अन्य कलांचाही खुबीने वापर

औरंगाबाद - दर्जेदार आशय, सूचक दिग्दर्शन, कसदार अभिनय यांच्यासोबतच गीत, संगीत, नृत्य यांच्या एकजीव बांधणीतून शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘मीडिया’सीन, धुआँ या दोन एकांकिकांचा प्रयोग लक्षवेधी ठरला. पुण्याच्या फिरोदिया करंडक स्पर्धेत जोरदार कामगिरी करून परतलेल्या या विद्यार्थी कलाकारांच्या या दोन एकांकिकांचा प्रयोग रविवारी (२५ जून) तापडिया रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. ‘मीडिया’सीनच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे या संघाला पुढच्या वर्षी फिरोदिया करंडकच्या दुसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे.

धुआँ ही मूळ कथा गुलजार यांची, त्याचे नाट्यरुपांतर गोपाल तिवारी यांनी केले. या नाटकाचे दिग्दर्शन संजय मोरे या विद्यार्थ्याने केले होते. ‘मीडिया’सीन या एकांकिकेचे लेखन दिग्दर्शन सुदर्शन चव्हाण याने केले. बदलत्या पत्रकारितेसोबतच या क्षेत्राचे बाजारीकरण कसे झाले आणि पत्रकारितेने किती खालची पातळी गाठली हे ‘मीडिया’सीनमध्ये दाखविण्यात आले.

नाटक म्हणजे केवळ एक संहिता, तिचे दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय व त्याला लागणारे संगीत, प्रकाश हा सर्वांचा ढोबळ समज. या विद्यार्थ्यांनी मात्र त्यापुढे पाऊल टाकत अवघ्या पंचेचाळीस मिनीटांच्या कालावधीत कथावस्तू पुढे नेण्यासाठी अभिनेत्यांसोबतच अन्यही कलांचा अत्यंत सुरेख वापर इथे केला. त्यात गीत, संगीत, नृत्य यांचा समावेश होताच. त्यासोबतच सॅन्ड आर्ट, चारकोल पेंटिंग, स्पीड पेंटिंग, फ्लोरोसेंट पेंटिंग, पेंटिंग याचाही सुरेश वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांची कल्पकता यातून दिसून आली. नाटकातील नृत्यही नाटकाचा आशय पुढे घेऊन गेली. सिंथेसायजर, ड्रम्स, गिटार या वाद्यांचाही वापर अत्यंत कल्पकतेने करण्यात आला. या सर्वांच्या एकसंध परिणामातून ही दोन्ही नाटके रसिकांच्या पसंतीस उतरली.

मीडियासीन नाटकातील कलावंत
सायली बाभूळकर, अभय पिंगळे, अनुष्का सरकटे, अजिंक्य अग्निहोत्री
धुआँ नाटकातील कलाकार
अक्षय अवाशंक, अनुष्का सरकटे, निखिल बडवे, शुभम कुलकर्णी
सॅन्ड आर्ट - अमृता कुलकर्णी, चारकोल पेंटिंग - संकेत सपकाळ, स्पीड पेंटिंग - आदर्श मालपेंडीवार, फ्लोरोसेंट पेंटिंग - अक्षय तारडे, पेंटिंग - भरत गुप्ता, आकाश ताठे.
नृत्य - केतन काळे, नारायणी शिरसावकर, मंथन रासे, आशिष बली, अमर माने, उत्कर्षा राऊत.
संगीत - गायक - आरोही नांदेडकर, स्वराली नांदगावकर, चिन्मय कुलकर्णी, किरण इष्टके. तबला - प्रथमेश कानडे, सिंथ - नरेश नागापूरकर, मिहीर देशपांडे. ड्रम्स - अजय बुधेवार. गिटार - हर्षल घोडमारे, यशोदीप कचोनिया. यासोबतच शिवम पमनानी, वैष्णवी बक्षी, निषाद बंडाळे, महेश एरंडे, वेदांत बनसोड, श्रीहरी चिंचखेडकर या विद्यार्थ्यांनीही नाटकासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झाकोळलेल्या वाटा’हा महत्त्वाचा दस्तऐवज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘झाकोळलेल्या वाटा’ हे डॉ. वासुदेव मुलाटेंचे आत्मकथनपर पुस्तक म्हणजे एक उपरे आयुष्य वाटेला आलेल्या माणसाचा वैयक्तिक दस्तऐवज आहे, असा सूर सोमवारी झालेल्या या पुस्तकावरील परिसंवादात निघाला.
ग्रामीण साहित्य चळवळ व समीक्षेतून परिवर्तनाचा विचार मांडणारे डॉ. वासुदेव मुलाटे यांचे ‘झाकोळलेल्या वाटा’ हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. त्यावर महसूल प्रबोधिनी सभागृहात परिसंवादाचे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, प्रगतीशील लेखक संघाचे राज्य कार्याध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, सोलापूर येथील प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, डॉ. वासुदेव मुलाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीपाद जोशी म्हणाले, मुलाटेंचे आयुष्य फार खस्ता खात गेले असले तरी माझ्या मते या पुस्तकात फक्त २५ वर्षांचा अनुभव लिहिला गेला असेल. त्यांनी अजून दोन खंड लिहावे आणि सर्व अनुभव यात सांगावेत. महेश एलकुंचवारांनी अलिकडेच आत्मकथापर लिखाणात अपयश, खरे अनुभव येत नाहीत, असे वक्तव्य केले आहे. पण, मला हे विधानाला खोडायचे आहे. मुलाटेंना आलेले जीवनातील अनुभव त्यांनी समर्थपणे मांडले आहेत. हे लिखाण म्हणजे कारागिरी आहे, फोटोग्राफी आहे, असे तयांनी नमूद केले. चाळीस पुस्तकांचा हा लेखक, समीक्षक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकला नाही, याची खंत वाटते असे जोशी म्हणाले. प्राचार्य डॉ. महेंद कदम म्हणाले, हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. दत्तक म्हणून गेलेल्या मुलाटेंच्या वाटेला आलेले दु:ख, शासकीय स्तरावरील नोकरीत आत्मसन्मानाला पोहचलेली ठेच त्यांनी अनुभवली आहे. प्रा. जयदेव डोळे म्हणाले, आत्मचरित्र लिखाण हे फार अवघड असते असे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितले. पण, आत्मचरित्र लिखाण अजिबात कठीण नाही. मुलाटेंचे लिखाण फार संवेदनशील झाले आहे. दत्तक म्हणून जाताना आणि दत्तक म्हणून नाकारताना आलेले उपरेपण त्यांना कोवळ्या वयात उद्धवस्त करून गेले. तेव्हापासून ते आतापर्यंतचे लिखाण दस्ताऐवजासारखे आहे. या कार्यक्रमाचे प्र‌िया धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ प्रसंगी शेतकऱ्यांसाठी लढू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘समृद्धी महामार्गाविरोधात लढा उभारण्याची वेळ येऊ नये. ही वेळ आलीच तर शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहील,’ अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (२६ जून) माळीवाडा, पळशी येथील शेतकऱ्यांना दिली. माळीवाडा व पळशी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी समृद्धी महामार्गात जाणार आहेत. या जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे सोमवारी या दोन्ही गावात आले होते. माळीवाडा येथील कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले, तर पळशी येथील कार्यक्रमाचे नियोजन ग्रामीण भागाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी केले होते. यावेळी पालकमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, संदीपान भुमरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, बप्पा दळवी, शहरप्रमुख रेणुकादास वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कुणाचे थडगे बांधून समृद्धी होणार असेल तर तशी समृद्धी आम्हाला नको. शिवसेनेचा विकासाला विरोध नाही, पण कुणाच्या तरी घरावर वरवंटा फिरवून किंवा घराची राखरांगोळी करून महामार्ग करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. या महामार्गात कुणाकुणाच्या जमिनी जातात हे पाहण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे. कागदावरची रेषा जीवनरेषा संपवते याचा विचार झाला पाहिजे. माळीवाडा येथे एक शाळा वाचवण्यासाठी महामार्गाने वळण घेतले हे कशासाठी? शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय तुम्ही समृद्ध होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या. समृद्धी महामार्गासाठी आंदोलन करण्याची आमच्यावर वेळ आणू नका. शेतकऱ्यांनो रडू नका, खचून जाऊ नका. तुमच्यात कोण येतो ते शिवसेना पाहून घेईल. समृद्धी महामार्गासाठी लढा करण्याची वेळ येऊ नये, पण तशी वेळ आलीच तर तुमच्यात फुट पडू देऊ नका. एकत्र बसून काय ते ठरवा आणि सांगा. शिवसेना तुमच्या सोबत राहील,’ अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. बैलगाडीची प्रतिकृती आणि घोंगडी देऊन अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांसह माळीवाडा येथे उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. चंद्रकांत खैरे यांनी प्रास्ताविक केले, तर रेणुकादास वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. पळशी येथे नरेंद्र त्रिवेदी यांनी शेतकऱ्यांसह आसूड देवून ठाकरे यांचे स्वागत केले.

जिल्हा बॅँकांचा पैसा सेनेमुळे झाला मोकळा
‘आहे ते टिकवले, फुलवले तर अच्छे दिन येतील. नोटबंदी करून अच्छे दिन येणार नाहीत. नोव्हेंबरपासून जूनपर्यंत जिल्हा बँकांमध्ये अडकलेला पैसा शिवसेनेमुळे मोकळा झाला,’ असा दावा करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात ईद उत्साहात

$
0
0

टीम मटा, औरंगाबाद
मराठवाड्यात सर्वत्र ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा केली. त्यानंतर सर्वत्र घरोघरी ईद मिलान व शिरखुर्म्याचे कार्यक्रम पार पडले. यावेळी मुस्लिम बांधव बहुसंख्येने हजर होते.
मुस्लिम बांधवाना ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.


ईदनिमित्त नमाज पठण
लातूर - शहरात ईद उत्साहत साजरी करण्यात आली. यावेळी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात आली. यावेळी खासदार सुनील गायकवाड, लातूरचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, स्थायी सभापती अशोक गोविंदपूरकर, जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख, माजी आमदार शिंदे, नगरसेवक गुरुनाथ मगे, शैलेश स्वामी, हणमंत जगते, प्रविण अंबुलगेकर, शिवकुमार गवळी, सचिन बंडापाले, पुनीत पाटील, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

परभणीत ईद उत्साहात
परभणी - शहरासह जिल्ह्यामध्ये ईद उत्साहात साजरी झाली. संपूर्ण रमजान महिना रोजे पकडून मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदान तसेच मस्जिदींमध्ये सकाळी ९ ते १० च्या सुमारास नमाज अदा केली. त्यानंतर प्रत्येक घरात ईद मिलान व शिरखुर्म्याचे कार्यक्रम पार पडले.
परभणी शहर महापालिकेच्या वतीने ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी जिल्हा प्रशासनासह पोलिस दल आणि महापालिकेने शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, उपमहापौर माजूलाला, गटनेते भगवान वाघमारे, नगरसेवक गणेश देशमुख, सचिन देशमुख, अॅड. विष्णू नवले, जान मोहम्मद जानू, रवी सोनकांबळे, विशाल बुधवंत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लियाकत अन्सारी, इरफान उर रहेमान खान, बाळासाहेब फुलारी, अमोल जाधव, उपायुक्त विद्या गायकवाड, सहाय्यक आयुक्त प्रकाश कुलकर्णी, राजाभाऊ मोरे, संकिर्ण विभाग प्रमुख राजकुमार जाधव, लक्ष्मण वाघ, सुनील भराडे यावेळी उपस्थित होते. याशिवाय, शहरातील धार रोड अमिनासाब बाबा दर्गा, पिंगळगढ नाला परिसर या ठिकाणी देखील ईद निमित्त नमाज पठण करण्यात आली.


उस्मानाबादेत ईद उत्साहात
उस्मानाबाद - उस्मानाबादसह जिल्ह्यात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उस्मानाबाद येथे दर्ग्याजवळील इदगाह मैदानात ईद निमितची विशेष
नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधव बहुसंख्येने हजर होते.
यावेळी मुस्लिम बांधवाना ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील, सेनेचे माजी आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासह विविध पक्षाची मान्यवर नेतेमंडळी यावेळी
उपस्थित होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ तुळजापुरात सीसीटीव्हीची करडी नजर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान तथा महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या नगरीत आता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात
येणार आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
तुळजापुरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर तसेच प्रमुख चौकात हे कॅमेरे बसविण्याचे नियोजन असून, तसा प्रस्ताव तुळजापुर पोलिसांनी वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवापूवी हे कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी पुजारी मंडळासह स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचेकडे केली होती. देशातील घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापुरात सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून त्यामुळे येथील यंत्रणा सजग करण्यात येत आहे.
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व घातपाती कारवायांना आळा बसावा यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा तुळजापुरात प्राधान्याने कार्यान्वित करावी अशी सूचना तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी येथील पदभार स्वीकारताच पोलिस प्रशासनाला केली होती.
यापूर्वी, केवळ नवरात्र महोत्सवात सीसीटीव्ही कॅमेरे भाडेतत्त्वावर बसविले जात होते. मात्र, व्यावहारीक दृष्ट्या हे योग्य नव्हते. आता तुळजापुरात दररोजच भाविकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे शहरात कायमस्वरूपी कॅमेरे बसवावेत अशी मागणी होत आहे.
आता, हे कॅमेरे उस्मानाबाद रोड, आठवडी बाजार, मलबा स्टॉप, महाद्वार रोड,
कमानवेस, नवीन-जुने बस स्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, घाटशीळ रोड, आर्य चौक, आंबेडकर चौक या ठिकाणी प्रामुख्याने बसविण्यात येणार आहेत.

उस्मानाबाद जिल्हा विकास नियोजन मंडळाने अथवा तुळजाभवानी प्रधिकरणाने निधी उपलब्ध करून दिल्यास कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे शक्य होईल.
पंकज देशमुख, पोलिस अधिक्षक, उस्मानाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅथॉलॉजिस्टच्या ‘स्कॅन’ सह्यांविरुद्ध तक्रारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंतच्या रुग्णांना आधुनिक चाचण्यांच्या सेवा देण्याचा करार झालेल्या ‘एचएलएल’चा पॅथॉलॉजिस्ट मुंबईत असताना, त्याच्या ‘स्कॅन’ सह्या मात्र जालना व जळगावच्या रिपोर्टवर सर्रास वापरल्या गेल्याचे ‘मटा’ने नुकतेच उघडकीस आणले. कॉर्पोरेट-खासगी लॅबमध्ये हे प्रकार सर्रास सुरू असल्याची दखल घेत त्याविरुद्ध काही डॉक्टरांनी ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’कडे (एमएमसी) वैयक्तिकरित्या तक्रार केली आहेच; शिवाय ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट’ (एमएपीपीएम) ही संघटनाही ‘एमएमसी’कडे धाव घेणार आहे.
मुंबईतील गोरेगावस्थित एकाच पॅथॉलॉजिस्टच्या सह्या जालना-जळगावच्या रिपोर्टवर आढळून आल्या व दोन्ही रिपोर्ट ‘मटा’च्या हाती लागल्याचे वृत्त २१ जून रोजी ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाले. जालना व जळगावमध्ये दीडशे किलोमीटरचे अंतर असताना, मुंबईत बसून पॅथॉलॉजिस्ट कशा काय सह्या करू शकतो, याकडे ‘मटा’ने लक्ष वेधले आणि पॅथॉलॉजिस्टच्या ‘स्कॅन’ सह्यांचा सर्रास होत असलेला गैरवापर ‘मटा’ने चव्हाट्यावर आणला. असे गैरप्रकार कॉर्पोरेट तसेच खासगी लॅबमध्ये सर्रास सुरू असून, त्याविरुद्ध एका पॅथॉलॉजिस्टने ‘एमएमसी’कडे लेखी तक्रार केली आहे. ‘ज्याप्रमाणे कोणताही फिजिशियन स्वतः पेशंटवर उपचार करतो, सर्जन स्वतः पेशंटवर शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे पॅथॉलॉजिस्टच्या उपस्थितीत प्रयोगशाळेतील सर्व चाचण्यांवर प्रक्रिया होणे, तंत्रज्ञांनी घेतलेल्या नोंदींची पॅथॉलॉजिस्टने खातरजमा करणे व स्वतः मायक्रोस्कोप व इतर साधनांचा उपयोग करून रिपोर्ट देणे अपेक्षित आहे. मात्र, हल्ली प्रयोगशाळेमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपस्थित नसताना व कित्येक किलोमीटर दूर असताना त्याच्या ‘स्कॅन’ सह्या वापरल्या जात असून, रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकतो. याविषयी ‘एमएमसी’ने आपली भूमिका स्पष्ट करावी’, असेही संबंधित पॅथॉलॉजिस्टने ‘एमएमसी’ला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

‘त्यांचे’ रजिस्ट्रेशन रद्द
एकच पॅथॉलॉजिस्ट वेगवेगळ्या ठिकाणच्या अनेक सेंटरवर सह्या करत असल्याचे उघड झाल्यानंतर मागच्या सहा महिन्यांत किमान चार पॅथॉलॉजिस्टचे रजिस्ट्रेशन सहा महिन्यांसाठी रद्द केल्याचेही सूत्रांनी सांगितले. रजिस्ट्रेशन रद्द झाल्याच्या कालावधीत संबंधित डॉक्टरला प्रॅक्टिस करता येत नाही आणि अशा प्रकारची कारवाई ‘स्कॅन’ सह्यांच्या बाबतीत होऊ शकते व व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

लांबून वैद्यकीय सल्ला दिला जाऊ शकते; परंतु वैद्यकीय सेवा लांबून दिली जाऊ शकत नाही. उपकरणांच्या-तंत्रज्ञांच्या जोरावर ‘क्वालिटी कंट्रोल’चे कितीही दावे केले जात असले तरी, अचूक रिपोर्टसाठी पॅथॉलॉजिस्टच्या उपस्थितीत-मार्गदर्शनाखाली सर्व चाचण्या होणे गरजेचे आहे. योग्य निदान-उपचारासाठी अचूक रिपोर्टला पर्याय असू शकत नाही. चुकीच्या रिपोर्टमुळे १०० टक्के चुकीचे उपचार होणार, हे निश्चित. त्यामुळेच १२ कोटी जनतेच्या सुरक्षित आरोग्यासाठी या प्रकारांविरोधात पुन्हा ‘एमएमसी’कडे तक्रार करणार आहे. – डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंतरराज्य टोळीकडून ७२ लाख जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा उस्मानाबाद पोलिस दलाने पर्दाफाश केला. एकाच आरोपीकडून तब्बल ७२ लाखाची रोकड हस्तगत केल्याने खळबळ माजली आहे. रोडरॉबरीत तब्बल तीन कोटी रुपये लुटल्याचा पोलिसांचा कयास असून व्यापाऱ्याने फिर्याद अवघी चार लाख लुटल्याची दिल्याने प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. रक्कम हैदराबाद येथून मुंबईला नेली जात होती. त्यामुळे सदर रक्कम हवाला, नोटाबदली की अन्य कशाची ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
यासंदर्भात उस्मानाबादचे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या महत्त्वपूर्ण विषयाची माहिती दिली. १८ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी (ता. तुळजापूर) नजीक दरोडेखोरांच्या टोळीने जीप आडवी लावून कारमधील व्यापाऱ्यास लुटून रक्कम लंपास केल्याची खबर मिळाली होती. याप्रकरणी कारच्या चालकाने संशयित उत्तरे दिल्याने मूळ व्यापारी मालकास हैदराबाद येथून पाचारण करुन फिर्याद घेतली. व्यापारी किर्तीकुमार जैन (रा. हैदराबाद, तेलंगणा) याने ४ लाख रुपये लुटल्याची फिर्याद दिली. आपण सोने-चांदीचे व्यापारी असून सदर रक्कम मुंबई येथील नातेवाईकांच्या उपचारासाठी पाठविली जात असल्याचे सांगितले होते.
याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेऊन तपास केला, असता एकास होसपेठ (जि. बेल्लारी, कर्नाटक) येथून ताब्यात घेतले. अन्य आरोपींच्या तपासासाठी कर्नाटकात नेताना यामधील एक आरोपी पळाला होता. त्यामुळे संशय अधिक वाढला. परंतु, ताब्यातील आरोपीच्या मदतीने पळालेल्या आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात यश आले. दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी घेण्यात आली. यामध्ये मिळालेल्या माहितीवरुन आरोपी स्वरुपसिंग भोरसिंग राजपूत (वय ४०, रा. वाल्मिक सर्कल, होसपेठ, जि़ बेल्लारी, कर्नाटक) याच्या घरी धाड टाकून ७२ लाख ५० हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली. ४ लाखाच्या फिर्यादीत तब्बल साडेबहात्तर लाख रुपये नव्या चलनाद्वारे मिळाल्याने प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
दरम्यान, सदर दरोड्यात तब्बल तीन कोटी रुपये लुटल्याचा संशय असल्याचे पोलिस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले. तर या दरोड्यात तब्बल ७ ते ८ जणांचा समावेश असल्याचे अटकेतील आरोपीचे म्हणणे आहे. त्यामुळे आणखी पाच ते सहा आरोपींचा शोध उस्मानाबाद पोलिस घेत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय व्यापाऱ्याने रक्कम कमी का सांगितली ? सदर रकमेचे आयकर विभागास विवरण देण्यात येणार असून त्यांच्या तपशिलासह व्यापाऱ्यास देखील ताब्यात घेऊन प्रकरणाचा छडा लावणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या कारवाईत स्वत: पोलिस अधीक्षक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तांबे, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूर्यवंशी, उपनिरीक्षक किरवाडे, पोलिस नाईक भिसे आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शांतिनिकेतनसारखे ठाकरे स्मृतिवन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘एमजीएमच्या परिसरात महापालिकेतर्फे विकसित करण्यात येणारे बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन कोलकता येथील शांतिनीकेतन सारखे विकसित करा’, अशी सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.
ठाकरे स्मृतिवनाच्या नियोजित जागेला ठाकरे यांनी भेट दिली. या स्मृतिवनाची कल्पना पालकमंत्री रामदास कदम यांनी मांडली. ही कल्पना पुढे नेण्यासाठी माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी पुढाकार घेतला. राज्य शासनातर्फे या प्रकल्पासाठी वीस कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून त्यापैकी आतापर्यंत पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. स्मृतिवनाच्या जागेला ठाकरे यांनी भेट दिली तेव्हा रामदास कदम यांच्यासह परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, तुपे, जंजाळ यांच्यासह काही नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी ठाकरे यांना स्मृतिवनाच्या संदर्भात माहिती दिली. ‘मटा’ शी बोलताना मुगळीकर म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांनी या जागेबद्दल समाधान व्यक्त केले. नीटनेटकेपणाने या जागेवर काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शांतिनिकेतनच्या धर्तीवर या जागेवर काम करा. शांतिनिकेतन येथे वाचनालय आहे, वस्तूसंग्रहालय आहे. तसे या ठिकाणी विकसित करता येते का याचा विचार करा. स्मृतिवनचा आराखडा तयार केलेल्या आर्किटेक्टची मुंबईत शशी प्रभूंबरोबर बैठक लावून आराखड्यात नेमकेपणा आणू. स्मृतिवनाचे प्रवेशद्वार व बाहेर पडण्याचे दार कसे असावे, त्याचे डिझाइन कसे असावे या बद्दल त्यांनी मत व्यक्त केले. रस्ते पायवाट पद्धतीचे असावेत. त्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना करावी. परिसरात वृक्षसंपदा भरपूर आहे, ती जतन करा. आवश्यकतेनुसार आणखी वृक्षारोपण करा, असे सांगितले. ठाकरे यांच्या सूचनेनुसार काम करण्याचा प्रयत्न केला जाईल.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘त्या’ उद्योजकांकडून एक कोटीचा दंड वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीने वाळूज व परिसरात उद्योग थाटण्यासाठी घेतलेल्या जागेत साधे दुकान सुरू केलेल्यांविरोधात दंड थोपटले असून गेल्या आठवड्यापर्यंत अशा आठ उदयोजकांकडून ६४ लाख वसूल केले. आगामी दोन आठवड्‍यांत बारा उद्योजकांकडून ४० लाखांचा दंड वसूल केला जाईल,’ अशी माहिती‌ प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
वायाळ म्हणाले, ‘दंड वसुलीचे काम प्रशासकीय विभागाने केले आहे. वसूल केलेल्या प्लॉट व दंडाच्या रकमेत वाळूज भागातील प्लॉट सी २७१ च्या मालकाकडून २५ लाख ६४ हजार, सी २७२ कडून २५ लाख ३१ हजार, सी-२७३ कडून दोन लाख ४३ हजार, सी २७४ कडून एक लाख ५३ हजार ३००, सी २७५कडून दोन लाख ४३ हजार ९३६, सी २७६ कडून १३ लाख ११ हजार, सी२७९ कडून तीन लाख ४३ हजार, सी २८३ कडून ६७ हजार १८० असा सुमारे एकूण ६४ लाख हजार ८३७ रुपये दंड आठ टक्के दराने वसूल करण्यात आला. हे सर्व प्लॉट सील करण्यात आले आहेत. वाळूज व परिसरात आणखी काही उद्योजक आहेत का, प्लॉट आहेत का याचा शोध सुरू असून निवासी घरे बांधली आहेत, अशाही औद्योगिक फ्लॉटचा शोध सुरू आहे.’

उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली प्लॉट खरेदी करून त्याचा व्यावसायिक स्वरुपासाठी वापर केल्याने सात उद्योजकांवर दंडात्मक कारवाई केली. आणखी काही उद्योजकांचा थांगपत्ता लागला असून त्यां‍च्यावरही कारवाईचा बडगा उगारला जणार आहे. - सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ईद उल फित्र उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतल्या ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा करून सोमवारी (२६ जून) ईद उल फित्रचा सण उत्साहात साजरा केला.
ईदगाह मैदानावर विशेष नमाजासाठी सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची गर्दी केली. जमात-ए-इस्लामीचे इलियास फलाही यांच्यासह नुमांईदा कौन्सिलचे मेहराज सिद्दिकी यांनी मुस्लिमांवर होत असलेल्या हल्ल्यांवर यावेळी चिंता व्यक्त केली. नुमाईंदा कौन्सिलच्या वतीने काही ठराव उपस्थित जनसमुदायासमोर ठेऊन मंजूर करण्यात आले. यात देशात गोरक्षेच्या नावाखाली मुस्लिमांवर होत असलेले हल्ले रोखावे, ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. यानंतर मौलाना नसिम मिफ्ताई यांनी रमजान ईदचे महत्त्व सांगितले. मौलाना मोईजोद्दिन फारूखी यांनी मुस्लिम बांधवांना वर्षभर रमजान महिन्यासारखी इबादत (प्रार्थना) कायम ठेवण्याचे आवाहन केले. जामा मशिदीचे मौलाना हाफिज जाकिर सहाब यांच्या नेतृत्वात ईदची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर जगात शांतता आणि सुव्यवस्था नांदो, पीडितांना न्याय मिळो, अशी दुआ अल्लाहकडे करण्यात आली. ईदगाह मैदानावर एका विशेष मंचावरून नागरिकांची भेट घेऊन, त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे. यंदा पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासह आमदार इम्तियाज जलील, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम. एम. शेख, आमदार सुभाष झांबड यांच्यासह अन्य मान्यवरांनी नागरिकांशी ईद निमित्त भेट घेतली. यावेळी माजी मंत्री राजेंद्र दर्डा हे दोन वर्षाच्या खंडानंतर उपस्थित होते. त्यांच्या हजेरीने ते राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा ईदगाह मैदानावर होती.

हल्ले बंद करा
छावणी ईदगाह मैदानात ईदची विशेष नमाज अदा केल्यानंतर काही तरुणांनी ‘गोरक्षेच्या नावाने होत असलेले हल्ले बंद करा. देशात प्राण्यांच्या नावाखाली होत असलेले अत्याचार बंद करा,’ अशी मागणी करणारे फलक झळकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ आणीबाणीतील कार्यकर्त्यांचा भाजपतर्फे सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर तत्कालीन सरकारविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपच्या वतीने सोमवारी (२६ जून) सत्कार करण्यात आला.
उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात हा कार्यक्रम झाला. माजी खासदार जयसिंहराव गायकवाड, आमदार अतुल सावे, महापौर भगवान घडमोडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आणीबाणी चळवळीत सहभागी झालेले औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील १०० हून अधिक ज्येष्ठ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यात माजी खासदार पुंडलिक दानवे, माजी आमदार रामभाऊ गावंडे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी माजी खासदार पुंडलिक दानवे यांनी अनुभव कथन केले. जयसिंगराव गायकवाड, रामभाऊ गावंडे यांनीही आपापले विचार मांडले. याप्रसंगी केशवराव उबाळे, भीमराव सोनवणे, पांडुरंग काळे, चंद्रकांत कुलकर्णी, शोभावती गुप्ता, विमलबाई राजपूत, लक्ष्मीबाई लांडगे, शिवसंगू डांगू, देवसिंग ताटू, उत्तम चवळी, एकनाथ गवळी, गुलाबराव काळे, रमणलाल श्रीवास्तव, देवसिंग राजपूत, शेख हुसेन शेख इमाम, रघुनाथ सपकाळ, श्रीरंग राऊत, शेषराव भोंबे, भाऊसाहेब शेजवळ आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. कचरू घोडके, राम बुधवंत यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.


आणीबाणीच्या काळात तत्कालीन सरकारने आंदोलनकर्त्यांवर प्रचंड अत्याचार केले. मी सहा महिने कारागृहात होतो. आणीबाणी शिथिल झाल्यानंतर घरी पोचल्यानंतर अवघड परिस्थिती पाहावयास मिळाली. त्यानंतर निवडणुकीच्या माध्यमातून जनतेची ताकद पाहायला मिळाली. जनसंघ, भाजपकडून खासदार होण्याची संधी मिळाली. - पुंडलिक दानवे, माजी खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images