Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अवैध दारू विक्री रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल

0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. ग्रामीण भागातील अवैध दारू बंद करण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात येणार आहेत. या ग्रामरक्षक दलालाच अवैध दारू पकडण्याचे अधिकार देण्यात येतील. त्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख व उत्पादन शुल्क अधीक्षक यांनी प्रत्येक आठवड्याला कारवाई करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.
एखादा व्यक्ती तीनवेळा अवैध दारूप्रकरणी दोषी ठरत असेल तर, त्याला ‘मोक्का’ लावण्याचे आदेशही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी उस्मानाबादेत बोलताना
दिले. सौर ऊर्जेवर तुळजाभवानी मंदिर उजळण्यासाठी प्रयत्नशील महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या संपूर्ण परिसरासाठी आवश्यक सौर ऊर्जा
प्रकल्प दोनसाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन नामदार बावनकुळे यांनी तुळजाभवानी मंदिरात बोलताना दिले.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी गुरुवारी तुळजापूरला धावती भेट देवून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्यावतीने त्यांचा यथायोग्य
सत्कार करण्यात आला.
यावेळी तुळजापूरचे तहसीलदार तथा देवस्थान समितीचे सदस्य झापले यांनी मंदिराच्या वीज रोषणाईसाठी सौर ऊर्जेचा टप्पा क्रमांक दोन साठीचा
निधी शासनाकडून मिळाल्यास मंदिर परिसराला आवश्यक असणारी ऊर्जा निर्मिती होवू शकते, ही बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाथरी तालुक्यातील पती-पत्नीची आत्महत्या

0
0


परभणी - पाथरी तालुक्यातील आनंद नगर येथील रविकांत पवार याने गळफास घेऊन तर त्यांची पत्नी सुरेखा पवार यांनी जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० जून रोजी उघडकीस आली.
या संदर्भात आनंद नगर तांडा येथील आत्माराम देविदास पवार यांनी पाथरी पोलीसात खबर दिली आहे. ३० जूनच्या पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास रविकांत आत्माराम पवार यांच्या घरातून धूर येत असल्याचे दिसून आले. यावरून आवाज देण्याचा प्रयत्न केला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ज्यामुळे घरावरील पत्रे बाजूला काढून पाहिले असता, सुरेखा रविकांत पवार (वय १९) हिच्या कपड्याला आग लागल्याचे दिसून आले. यामध्ये रविकांतही काही अंशी जळाला होता. लोकांनी घरामध्ये प्रवेश केल्यानंतर रविकांत आत्माराम पवार हा त्या ठिकाणावरुन कुठे तरी निघून गेला. त्यानंतर फोनवरुन खबर आली की, विटा शिवारातील भगवान आरबाड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास रविकांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पीएसआय काझी तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...काय भुललासी वरलिया रंगा!

0
0

dhananjay.kulkarni@timesgroup.com
औरंगाबादः एक देश एक कर. जाहिरातींचा चक्क अमिताभ बच्चन साहेबांच्या आवाजात मारा. हे सगळे ऐकायला नितांत सुंदर. मात्र, जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकरामुळे विविध वस्तूंवरील करभार वाढेल. त्यामुळे ५० हजारांचे मासिक उत्पन्न असणाऱ्या मध्यवर्गीयावर महिन्याकाठी ७०० ते वर्षभराला आठ ते साडेआठ हजारांचा झब्बू सोसावा लागणार आहे.
जीएसटी करप्रणालीमध्ये उत्पादन ते अंतिम विक्री या टप्प्यांमध्ये लागणाऱ्या विविध अप्रत्यक्ष करांऐवजी वस्तू आणि सेवा यांवर केवळ एकच कर लागेल अशी योजना आहे. ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेनुसार जीएसटीची रचना करण्यात आली. मात्र, असे असले तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांचे स्वतंत्र अधिकार आणि दायित्व अबाधित ठेवण्यात आले आहे. त्यासाठी लागणारा महसूल वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून सरकार कराच्या माध्यमातून निधी गोळा करेल. याची चाट सामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

माझा पगार ५० ते ६० हजार आहे. त्यात मासिक खर्च १ ते २ हजार वाढेल, असे मी जीएसटीमुळे गृहित धरले आहे. वर्षाकाठी यात किती वाढ असू शकते, असे मी माझ्या सीए मित्रांना विचारले. त्यांनी सर्वसाधारण पर्यटन, हॉटेलिंग, विमानप्रवास वगैरे इतर सर्व धरले तर एकूण ६ ते ८ हजारांची वाढ अपेक्षित आहे असे सांगितले. ‌- ललित अधाने, नागरिक

सरळसरळ मासिक खर्चात काहीही विशेष वाढ होणार नाही असे स्पष्ट आहे. जीएसटीमुळे वर्षाकाठी थोडीफार वाढ होऊ शकते. यामुळे जीएसटीमुळे महागाई वाढेल असे सरसकट म्हणणे चूक होईल. करात थोडी वाढ होईल एवढेच. - अल्केश रावका, अध्यक्ष, सीए इन्स्टिट्यूट

चौघांच्या कुटुंबाचा खर्च

- मासिक किराणा सध्या ३५००
- जीएसटीनंतर ३२००
- कपडा खर्च सध्या २०००
- जीएसटीनंतर २२४०
----
- रेल्वे प्रवास
- सध्या ३०००
- जीएसटीनंतर ३१५०
---
- विमानप्रवास
- सध्या ५ हजार
- जीएसटीनंतर ५३००
---
- हॉटेल
- २०००
- जीएसटीनंतर २३६०
---
- मनोरंजन
- सध्या १०००
- जीएसटीनंतर १२४०
---
- दोन मोबाइल, एक डीटीएच
- सध्या २०००
- जीएसटीनंतर २६००
---
- सोनेखरेदी
- सध्या ५० हजार
- जीएसटीनंतर ५१,५००
----
- पर्यटन
- सध्या १०,०००
- जीएसटीनंतर १२,९६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ चहल यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव

0
0


म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मूळ सेवेत असलेले पण महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले सरताजसिंग चहल यांच्या एक वर्ष मुदतवाढीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. सर्वसाधारण सभेत मुदतवाढीचा प्रस्ताव न ठेवताच हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या सेवेत कार्यकारी अभियंता म्हणून चहल नांदेडमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे कार्यरत होते. तेथून ते पालिकेत रुजू झाले होते. दरम्यानच्या काळात औरंगाबाद सिटी वॉटर युटीलिटी कंपनी (समांतर) कडून पाणीपुरवठा पुन्हा पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावेळीच चहल रुजू झाले.
पदभार घेतल्यापासून चहल यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. वीजपुरवठा खंडित किंवा जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार या काळात मोठ्या प्रमाणावर घडले. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी विशेष कलमाचा वापर केल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला होता. युटिलिटी कंपनीकडून दैनिक वेतनावरील कर्मचारी घेतलेल्या प्रकरणांवरून सदस्यांनी सभागृहात चहल यांच्यावर आरोप केले होते. सरकारकडून त्यांची प्रतिनियुक्ती रद्द होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पालिका प्रशासनाने त्यांना एक वर्ष मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव शुक्रवारी राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुदतवाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मंजूर होणे आवश्यक आहे. परस्पर प्रस्ताव पाठविता येत नाही. चहल यांना पाठवणे योग्य आहे पण त्यांच्या काळातील प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यांना इथून पाठवणे योग्य राहील. - भगवान घडमोडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ जिल्ह्यात ८० कोटींची कर्जमाफी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा औरंगाबाद जिल्ह्यातील केवळ ७५ ते ८० हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २ लाख १४ हजार ९८३ कर्जदार शेतकरी आहेत. सरकारी निकषांचे प्राधान्य पाहता त्यातून ३५ टक्के शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल, अशी शक्यता आहे.
जिल्हा बँकेने आजवर वाटप केलेल्या कर्जाचा आकडा ५४९ कोटींचा (मुद्दल) आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानंतर गेल्या आठवड्यात राज्य सरकारने कर्जमाफीचे निकष जाहीर केले. त्यातील प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातून ७५ ते ८० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. या शेतकऱ्यांची ८० कोटींपर्यंत कर्जमाफी होऊ शकते. मात्र त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यास विलंब लागणार असल्याचे बँकेतील सूत्रांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यात १३८ शाखा असून दोन लाख ५८ हजार खातेदार आहेत. बँकेची मासिक सभा गुरुवारी झाली. अध्यक्ष सुरेश पाटील, संचालक हरिभाऊ बागडे, उपाध्यक्ष दामोधर नवपुते, रामकृष्ण बाबा पाटील, अभिजित देशमुख, व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर कल्याणकर आदींची उपस्थिती होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या एकूण कर्जदारांपैकी किती जणांना लाभ होईल, यावर चर्चा झाली. एकूण दोन लाख १४ हजार ९८३ कर्जदार आहेत. त्यांच्याकडे मुदल व व्याज असे ७७१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यापैकी प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ ७५ ते ८० हजार शेतकऱ्यांना होईल. ही कर्जमाफी अंदाजे ८० कोटींची राहू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

१० हजारांची तातडीची मदत
शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना तातडीने १० हजारांची मदत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बँकेच्या जिल्ह्यांमध्ये १३८ शाखा असून दहा हजार रुपये कर्जासाठी अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीमुळे घरे महागणार

0
0


जीएसटीमुळे घरे महागणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जीएसटीमुळे उद्योग क्षेत्र, रिअल इस्टेट या सेक्टरमध्ये कमालीची वाढ होणार होणार आहे. सर्वसाधारणपणे जीएसटीअंतर्गत स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी १२ टक्के कर असणार आहे. जीएसटीनंतर राज्यांकडून लावले जाणारे मुद्रांक शुल्क ५ ते ८ टक्के असेल, ज्याचा थेट भार घर खरेदी करणाऱ्या ग्राहकावर पडणार आहे. उद्योगक्षेत्रातील करवाढीत जीएसटीमुळे किमान १२ ते १८ टक्के वाढ होणार आहे.

एसी टीव्ही फ्रीज विक्री वाढणार

ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रात विशेषत: इलेक्ट्र‌िक-इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते प्रामुख्याने जीएसटीच्या बाजूने उभे राहिले आहेत. या नवीन करामुळे दुहेरी कररचना संपुष्टात येणार आहे. टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटरसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री वाढेल. जीएसटी लागू झाल्यानंतर ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी २८ टक्क्यांची कर रचना लागू होईल. ही कर रचना सर्वोच्च असली, तरी सध्या बहुतेक उत्पादनांवर त्यांचे स्वरूप आणि वापरानुसार २६ ते ३१ टक्के दराने कर आकारला जातो. मात्र, अबकारी शुल्कातील सवलत यापुढेही राहील की नाही याविषयी संभ्रम आहे.

रिअल इस्टेट

जीएसटी करप्रणालीअंतर्गत रिअल इस्टेटवर काय परिणाम होतील याची पुरेपूर माहिती सध्या विकासकांनाही नाही, अशी स्थिती सध्या दिसत आहे. जीएसटी लागू झाल्यावर घरांच्या किमती कमी होणार की वाढणार याबाबत त्यांच्यात संभ्रम दिसून येतो. घर घेताना विकासकांकडून सेवा कर, व्हॅट व मुद्रांक शुल्क अशा करांची आकारणी करण्यात येते. हे तीनही कर एकत्रित करून ग्राहकाला एकूण रकमेच्या ९.५ ते १० टक्के इतका कर भरावा लागत होता. मात्र, जीएसटी लागू झाल्यावर हे सर्व कर बाद होऊन मुद्रांक शुल्काव्यतिरिक्त एकच करप्रणाली असणार आहे. जीएसटीअंतर्गत स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी १२ टक्के कर असणार आहे. जीएसटीनंतर राज्यांकडून लावले जाणारे मुद्रांक शुल्क ५ ते ८ टक्के असेल, ज्याचा थेट भार घर खरेदी ग्राहकावर पडणार आहे. तसेच कुठलाही व्यवहार करताना प्रत्येकावर कर द्यावा लागणार असल्याने स्थावर मालमत्तांच्या किमती वाढतील. बांधकाम व्यावसायिकांची मध्यवर्ती संघटना क्रेडाईतर्फे स्थावर मालमत्तेवरील मुद्रांक शुल्क रद्द करण्याची मागणी आता होत आहे. कारण जीएसटी लागू झाल्यावर अप्रत्यक्षपणे एकच करप्रणाली असणार असली, तरी राज्यांकडून मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट ग्राहकांवर व परिणामी विकासकांवरही होणार आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून तयार घरे व बांधकामांवर १२ टक्के जीएसटी लागू होणार आहे. एकीकडे रेरा लागू झाल्यानंतर विकासकांवर काही प्रमाणात बंधने आली आहेत. अशातच बांधकामाच्या कच्च्या मालाच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरांच्या किमतींवर याचा परिणाम होऊ शकतो. रेरानुसार, करारनाम्यात सदनिकेची किंमत जी नमूद केली जाईल, तिच किंमत शेवटपर्यंत असेल. मात्र, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यास विकासकांपुढे अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे विकासक आधीच वाढीव किमतींची नोंद करू शकतात. रेरा व जीएसटीचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर होणार आहे. मात्र, जीएसटीचा परवडणाऱ्या घरावर सकारात्मक परिणाम होईल. परवडणाऱ्या घरांच्या किमती कमी होऊ शकतात तसेच करांचा अधिभार नसल्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र, ते बिल्डर-विकसकांच्या योजनेवर आधारित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्लिल वर्तन; कोचिंग क्लास मॅनेजर, शिक्षकाला चोप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन व संभाषण करणाऱ्या आकाश इन्स्टिट्युट क्लासेचा ब्रँच मॅनेजर व शिक्षकाला गुरुवारी दुपारी शिवसैनिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. हा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास जालना रोडवरील आकाशवाणी चौकात घडला.

आकाशवाणी समोरील बग्गा इंटरनॅशनल हॉटेलजवळ आकाश इन्स्टिट्यूट क्लासेस आहे. येथे मेडिकल व इंजिनीअरिंग (नीट व जेइई) प्रवेश परीक्षेचे क्लास घेतले जातात. येथे ब्रँच मॅनेजर म्हणून शिवहरी वाघ व स्टाफ इन्चार्ज म्हणून रोहित सुळ हे काम पाहतात. गेल्या काही दिवसापासून हे दोघे विद्यार्थिनीसोबत अश्लिल संभाषण करत होते. ड्रेसवरून अश्लिल कॉमेंट करणे, मोबाइल क्रमांकाची मागणी, विद्यार्थिनी क्लासला येत नाहीत, चित्रपट पाहण्यासाठी जातात असे घरी फोनवरून सांगून ब्लॅकमेल करणे आदी प्रकार हे दोघे करत होते, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली. एका विद्यार्थीनीला बुधवारी बॅचची वेळ बदलून हवी होती. तिच्यासोबतही अश्लिल भाषेत संभाषण करण्यात आले. तिने हा प्राकर भावाला सांगितला. तिच्या भावासह गुरुवारी दुपारी शिवसैनिकांनी क्लास गाठला. इतर विद्यार्थिंनीनीही हा प्रकार काही दिवसापासून सुरू असल्याचे सांगितले. या दोघांना जाब विचारत संतापलेल्या शिवसैनिक व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी दोघांना बेदम चोप दिला. जिन्सी पोलिसांना माहिती दिल्यानंतर चार्लींनी घटनास्थळी धाव घेतली. मॅनेजर शिवहरी वाघ व रोहित सुळ यांना जिन्सी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी जिन्सी पोलिस ठाण्यात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, संजय रिडलॉन, गणेश अंबीलवादे, राजेंद्र दानवे, अभिजित थोरात यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. मुलीच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

त्रास वाढल्यानंतर घरी सांगितले

जून २०१६ मध्ये येथे प्रवेश घेतल्यापासून वाघ व सुळ यांच्याकडून हे प्रकार सुरू होते, असे विद्यार्थिनींनी सांगितले. सुरुवातीला पालकांना सांगितले नाही, मात्र नंतर त्रास वाढल्याने हा प्रकार घरी सांगितल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॉक बजेटमधून ऑगस्टमध्ये रस्त्यांची कामे

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्लॉक बजेट तयार करून ते शासनाला मंजुरीसाठी पाठवू. त्यानंतर निधी प्राप्त झाल्यावर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केला जाईल, असा विश्वास महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाने औरंगाबादेतील रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. तसे पत्र शासनाच्या नगरविकास खात्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पाठवले आहे. त्या पत्राची प्रत आयुक्तांच्या नावेदेखील देण्यात आली आहे. या पत्रात म्हटले आहे की, रस्त्यांच्या कामासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही रक्कम शंभर टक्के अनुदानाची आहे. यातून रस्त्यांची कामे निश्चित करून तांत्रिक मान्यतेसाठी ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवा. त्यानंतर निधी वितरित केला जाईल. तांत्रिक मान्यतेसाठी रस्त्यांची कामे पाठवताना प्रत्येक रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल पाठवावा लागणार आहे.
या संदर्भात आयुक्त म्हणाले, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी खूप वेळ लागेल. त्यामुळे रस्त्यांचे ब्लॉक बजेट तयार करून ते शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू. त्याला मंजुरी मिळून निधी प्राप्त झाल्यावर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केला जाईल. कोणत्या रस्त्यांची कामे करायची त्याची यादी सर्वांच्या सहमतीने तयार करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान याच संदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आयुक्तांच्या नावे पत्र दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी शासनाने दिलेल्या २४ कोटी रुपयांच्या निधी बाबत काय झाले याचा आपणास व संपूर्ण शहरास अनुभव आहे. त्यामुळे शंभर कोटींच्या रस्त्यांच्या निविदा रस्तेनिहाय काढाव्यात. एकत्रित निविदा काढण्याचा दुष्परिणाम मागील वर्षभरापासून सर्वजण भोगत आहेत. त्यामुळे एका कंत्राटदाराला काम देवून त्याच्या मर्जीप्रमाणे संपूर्ण शहर वेठीस न धरता प्रत्येक रस्त्यानुसार निविदा काढून काम करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उस्मानाबाद आयुर्वेदिक महाविद्यालयाला लॉटरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला शासकीय वनमहोत्सवाचा सोहळा लाभदायक ठरला. या सोहळ्यासाठी महाविद्यालयात आलेले दुग्धविकास व पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर व विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी जाहीर केला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील वनमहोत्सवाची सुरुवात शनिवारी सकाळी महादेव जानकर यांच्या हस्ते व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन प्रकाश खापर्डे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या हॉस्पिटलला जानकर यांनी आमदार ठाकूर यांच्या समवेत भेट दिली. डीन खापर्डे यांनी यावेळी मंत्रीमहोदयाना येथील विविध औषधोपचाराबाबतची माहिती दिली. या महाविद्यालयाचा संपूर्ण कारभार पाहून प्रमुख पाहुणे मंडळी भारावून गेली. येथील कामांची त्यांनी प्रशंसा केली. इतकेच नव्हे तर येथील सर्व डॉक्टर्स मंडळींना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देत येथील उणिवा दूर करण्यासाठी या उभयंत्यांनी आमदार निधीतून प्रत्येकी दहा लाखांचा निधी जाहीर केला. आगामी उस्मानाबाद दौऱ्यात या रुग्णालयात येऊन येथील उपचाराचा लाभ घेणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीतही या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वाल्मी’ला देणार संपूर्ण स्वायत्तता

0
0



म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘वाल्मी’ला (वॉटर अॅण्ड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट) संपूर्ण स्वायत्तता देणे, प्रशासकीय इमारतीचे विस्तारीकरण व परिसरातील इतर इमारतींच्या दुरूस्तीसाठी तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले. वाल्मी परिसरातील मृद व जलसंधारण आयुक्तालयाचे शिंदे यांनी शनिवारी उदघाटन केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
प्रशिक्षणार्थींना पाणलोट क्षेत्राचा नकाशा आधुनिक पद्धतीने तयार करुन पाणलोट क्षेत्राचे उत्कृष्ट मॉडेल तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संस्था जलसंधारणबाबतची राज्यातील नोडल संस्था म्हणून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत जलसंधारण सचिव एकनाथ डवले, आयुक्त ह. कां. गोसावी, गोदावरी पाटबंधारे विकास विभागाचे कार्यकारी संचालक हरिभाऊ ढंगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, जलसंधारण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पवार, मृदसंधारण विभागाचे संचालक डॉ. के. पी. मोते, ‘वाल्मी’चे सहसंचालक डॉ. डी. एच. पवार, वाल्मीचे प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने शहर स्मार्टसिटी करण्यावर देणार भर

0
0




म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी स्मार्टसिटीबद्दल नवीन संकल्पना मांडली आहे. जुने - मूळ शहर योग्य प्रकारे विकसित करणे, ते स्मार्ट बनवणे म्हणजे स्मार्टसिटी करणे आहे. त्यामुळे जुने शहर स्मार्टसिटी करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
स्मार्टसिटीच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली व कामाचे प्राधान्यक्रम ठरविले. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी ‘पीएमसी’ म्हणून काम करणाऱ्या ‘सीएचटूएमएल’ या संस्थेला तातडीने डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.
या संदर्भात शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, स्मार्टसिटीचा प्रकल्प ग्रीनफिल्डशी निगडीत आहे असे मानून आतापर्यंत आपली यंत्रणा त्याभोवतीच गुरफटली होती. प्रकल्पाचा ग्रीनफिल्ड हा एक भाग आहे, परंतु लोकांच्या मनात स्मार्टसिटीची संकल्पना वेगळी आहे. जुने - मुळ शहर स्मार्ट पद्धतीने विकसित झाले पाहिजे अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. त्यादृष्टीने स्मार्टसिटी प्रकल्पाचे जास्तीत जास्त काम जुन्या शहरात करण्याचा आपला विचार आहे. त्यामध्ये स्मार्ट रस्ते, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट सिग्नलिंग, स्मार्ट वाहतूक, सुशोभित चौक, आकर्षक वाहतूक बेटाचा समावेश असू शकतो. ही कामे केली तर, शहराचे स्वरूप एकदम बदलू शकते. स्मार्टसिटी प्रकल्पातून नागरिकांना हेच अपेक्षित आहे. एसपीव्हीच्या बैठकीत हा मुद्दा मांडून संचालक मंडळाला यावर विचार करण्यास भाग पाडू, संचालक ठरवतील त्यानुसार काम केले जाईल असे मुगळीकर म्हणाले.
ग्रीनफिल्डमध्ये गृहनिर्माणाची संकल्पना आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्याव्या लागणार आहेत. ही प्रक्रिया मोठी आहे. त्यामुळे जुन्या शहरात मोठी आणि चांगली कामे करण्यावर भर देण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वारसा स्थळांसाठी स्मार्टसिटीचा निधी
औरंगाबाद शहर जागतिक वारसा स्थळांचे शहर म्हणून ओळखले जाते. या स्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्मार्टसिटी प्रकल्पातील निधी वापरण्याची महापालिकेची योजना आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पालिकेची सर्वसाधारण सभा व एसपीव्हीची मान्यता मिळाल्यावर वारसा स्थळांवर स्मार्टसिटीचा निधी खर्च केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ कथक म्हणजे, फास्ट फूड नव्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नांदेड
कथक नृत्यकला ही फास्ट फूड सारखी लगेचच आत्मसात होणारी नाही. ही कला आत्मसात करण्यासाठी श्रम, अक्षम्य शक्ती आणि चिकाटी आवश्यक आहे. ही कला सादर करण्यासाची पात्रता येण्यासाठी वर्षानुवर्षे रियाझ करावा लागतो, अशा शब्दात सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी कथक विषयी मत व्यक्त केले.
नांदेड शहरात आमदार हेमंत पाटील यांनी आयोजित केलेल्या आषाढी महोत्सवात अमृतगाथा हा कार्यक्रम सादर करण्यासाठी शर्वरी नांदेडमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या, ‘आजकाल आपल्या मुलीला नृत्य प्रशिक्षणास पाठवतांना या मुलीचे आई-वडील प्रशिक्षकांना विचारतात. आमची मुलगी डान्स परफॉंर्मंन्स किती दिवसात करेल ? या पालकांना आणि या मुलींना मला इतकेच सांगायचे आहे. कथक नृत्यकला काही फास्ट फूड नाही, ‘पी हळद अन हो गोरी’ असे व्हायला. त्यासाठी काळवेळ कशाचेही भान न ठेवता मनःपूर्वक आणि चिकाटीने सराव करावा लागतो.’
बिनधास्त, मी तुझी रे, कायद्याच बोला या सिनेमात अभिनय केलेल्या जमेनीस म्हणाल्या ‘नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे. माझ्या नृत्यनैपुण्यामुळे मला चित्रपटात काम मिळाले. त्यासाठी कोणत्याही स्पर्धेस मला तोंड द्यावे लागले नाही. नृत्यकलेत आपल्या गुरु पंडिता रोहिणी भाटे, पं. बिरजू महाराज, पं.रवींद्र गंगाली हे आपले आदर्श होते.’
वयाच्या सातव्या वर्षांपासून नृत्याराधना आणि नृत्योपासना करणाऱ्या शर्वरी जमेनीस यांचे आत्तापर्यंतचे देशात व विदेशात असंख्य कार्यक्रम झाले आहेत. ऑस्ट्रेलिया येथील आंतरराष्ट्रीय प्रतिष्टेच्या ‘ऑपेरा हाऊस’ मध्ये कार्यक्रम करण्याची संधी मिळविणाऱ्या ए. आर. रहेमान आणि लता मंगेशकर यांच्या नंतरच्या त्या तिसऱ्या भारतीय कलाकार आहेत.
शर्वरी जमेनीस यांना अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले असले तरी राष्ट्रीय कला अकादमीचा कला गौरव पुरस्कार शर्वरीच्या दृष्टीने महत्वाचा पुरस्कार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी साठे निर्मितीसाठी वृक्षलागवड आवश्यक

0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना
गतकाळात पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मराठवाडा संपूर्ण टंचाईमुक्त करावयाचा असेल तर शाश्वत पाण्याचे साठे निर्माण करण्याबरोबरच पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत असलेल्या वृक्षांची अधिकाधिक लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
चार कोटी वृक्ष लागवड सप्ताहाच्या व वन महोत्सवाच्या सुरुवातीप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री लोणीकर यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करण्यात आली. त्यासोबतच माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री लोणीकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते.
व्यासपीठावर माजी आमदार अरविंद चव्हाण, रामेश्वर भांदरगे, सिद्धीविनायक मोरे, भुजंगराव गोरे, आयेशा खान, प्रभारी जिल्हाधिकारी पी. बी. खपले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे हित लक्षात घेऊन वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतलेली आहे. मानवी जीवनामध्ये वृक्षांचे फार मोठे महत्व आहे. गतकाळात राज्यासह मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला. यामागचे कारण वृक्षांची घटत चाललेली संख्या असुन वृक्षांच्या कमतरतेमुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. याच बाबीचा विचार करून राज्य सरकारने येत्या २०१९ पर्यंत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. या बाबीची जाणीव ठेवून मी जिल्हा नियोजन समितीमधून सामाजिक वनीकरण व वनविभागाला रुपये चार कोटी निधी दिला आहे. त्यामधून वड, पिंपळ यासारखी ऑक्सीजन देणारी व प्रजन्यमानास अनुकूल असलेली दर्जेदार रोपे तयार करण्यात आली.’
शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करणे व त्यांचे संगोपन करणे आदी बाबीवर हा निधी खर्च करण्याच्या बाबतीत मी स्वत: लक्ष पुरवित आहे. आज या निधीमुळे जी रोपे बाजारामध्ये ५० रुपयाला मिळतात ती रोपे राज्य सरकारमार्फत केवळ सहा रुपयांमध्ये जिल्हाभरात उपलब्ध आहेत. यावर्षी संपूर्ण राज्यात चार कोटी वृक्षांची लागवड एक ते सात जुलै दरम्यान करण्यात येत आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम केवळ राज्य सरकारचा आहे ही मानसिकता समाजाने बदलण्याची आवश्यकता असून वृक्ष लागवड व त्याचे संगोपन ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. ही भावना समाजामध्ये दृढ होण्याची आवश्यकता असल्याचेही पालकमंत्री लोणी
..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निगर्वी अभिनेत्याच्या भूमिकांना उजाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ज्येष्ठ अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांचे रविवारी सायंकाळी मुंबईत निधन झाले. नाटक आणि चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे तोरडमल रसिकप्रिय कलाकार होते. ‘तरूण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाच्या प्रयोगासाठी तोरडमल औरंगाबादेत अनेकदा आले. या आठवणींना रंगकर्मींनी उजाळा दिला.
भारदस्त आवाज, भेदक नजर आणि मुद्राभिनयाच्या छटा ही प्रा. मधुकर तोरडमल यांच्या अभिनयाची बलस्थाने होती. अहमदनगर येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असलेले तोरडमल उतारवयात मराठी रंगभूमीकडे वळले. दर्जेदार नाट्यकृतीतून त्यांनी रसिकांचे लक्ष वेधले. ‘तरूण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गुडबाय डॉक्टर’ या नाटकासह ‘आत्मविश्वास’, ‘शाब्बास सूनबाई’, ‘घायाळ ’या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या. नाट्य प्रयोगासाठी तोरडमल औरंगाबादेत अनेकदा आले. राज्यभरात हक्काचा चाहतावर्ग तयार करण्यात त्यांना यश आले होते. नाट्य लेखन, अनुवाद करून त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले. रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१२ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने तोरडमल यांचा ‘नटवर्य लोटू पाटील’ पुरस्काराने सन्मान केला होता.

उत्तम आवाज आणि अष्टपैलू अभिनय असलेले मराठी रंगभूमीवरील निवडक कलाकारात प्रा. मधुकर तोरडमल यांचा समावेश होतो. ‘तरूण तुर्क म्हातारे अर्क’, ‘काळे बेट लाल बत्ती’, ‘गुड बाय डॉक्टर’ अशा दर्जेदार नाट्यकृती त्यांनी केल्या. विनोदी, गंभीर, नकारात्मक अशा सर्व छटांच्या भूमिका केल्या. एके काळी राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या नाटकांचे वर्चस्व असायचे. मराठी रंगभूमीवरील एक चिरा निखळला.
- डॉ. दिलीप घारे, ज्येष्ठ रंगकर्मी

हरहुन्नरी अभिनयाने मराठी रंगभूमी गाजवणारे प्रा. मधुकर तोरडमल माझ्या भावासारखे होते. रंगभूमीवर त्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग केले. निगर्वी कलाकार असलेले तोरडमल माणूस म्हणून मोठे होते. त्यांच्या अष्टपैलू भूमिका नेहमी स्मरणात राहतील.
- प्रा. त्र्यंबक महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी

२०१२मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने प्रा. मधुकर तोरडमल यांना ‘नटवर्य लोटू पाटील पुरस्कारा’ने सन्मानित केले. वार्धक्यामुळे ते औरंगाबादला येऊ शकले नाही. मुंबईला घरी जाऊन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला होता. यावेळी रंगभूमीवरील आठवणींना उजाळा देत तोरडमल यांनी ‘मसाप’बद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.
- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, मसाप

व्यावसायिक नट म्हणून जनमानसात मान्यता मिळाल्यानंतरसुद्धा हौशी नाट्य संस्थांशी प्रा. मधुकर तोरडलम नेहमी जोडलेले होते. नवीन कलावंतांना त्यांनी व्यावसायिक रंगभूमीशी जोडले. तोरडमल यांनी लिहिलेल्या अनेक नाटकात मानवी स्वभावाचे विलक्षण रूप दिसते. तोरडमल यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी एका लेखक नटाला पारखी झाली आहे.
- वसंत दातार, रंगकर्मी

मुंबईच्या बाहेरच्या अनेकांनी मुंबईच्या नाट्यविश्वात मोठी कामगिरी बजावलेल्या कलाकारात प्रा. मधुकर तोरडमल यांचे नाव अग्रेसर आहे. त्यांच्या नाटकांनी वेगळी ओळख निर्माण केली. ‘तरूण तुर्क’ नाटकाने तर त्यांची प्रसिद्धी देशात आणि देशाबाहेर झाली. आमच्यासारखे मुंबई बाहेरील रंगकर्मींना एक प्रकारे मानसिक आधार वाटला आहे. अत्यंत देखणे व्यक्तिमत्व असलेल्या तोरडमल यांचे वाचन अत्यंत चांगले होते. इंग्रजीवर प्रभूत्व होते. सर्वांना वडिलकीच्या नात्याने महत्त्वाचा वाटणारा नाटककार, दिग्दर्शक. नट आपल्यातून निघून गेल्याचे दुःख आहे.
- प्रा. अजित दळवी, ज्येष्ठ नाटककार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडिलांच्या अंत्यविधीला जाताना पती-पत्नी ठार

0
0

औरंगाबाद : दुचाकीला कारने धडक दिल्याने दुचाकीवरील जखमी झालेल्या पती-पत्नीचा उपचारादरम्यान घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांची मुलगी व पुतणी गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी सायंकाळी वैजापूरजवळील घायगाव फाटा येथे झाला. वडिलांच्या अत्यंविधीच्या कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली.
अन्वर शेखलाल शाह (वय ३५ रा. भालगाव ता. गंगापूर) यांच्या वडिलांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. अन्वर शाह त्यांची पत्नी शहनाज (वय ३०), मुलगी शाहीन (वय ६) व पुतणी रेश्मा उस्मान शहा (वय १०) हे चौघे दुचाकीवर भालगाववरून वैजापुरला जात होते. यावेळी गंगापूर-वैजापूर रोडवर घायगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जात असलेल्या कारने धडक दिली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले. अन्वर शाह यांचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला तर शहनाज शाह यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. जखमी शाहीन व रेश्मा यांच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नातेवाईकात हळहळ
पाच दिवसांपूर्वी अन्वर शाह यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात अन्वर शाह व त्यांच्या पत्नी शहनाज यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आषाढी एकादशीनिमित्त छोटे पंढरपूर सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज
प्रति पंढरपूरात म्हणून ओळखले जाणारे छोटे पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त सज्ज झाले आहे. भाविकांसाठी मंदिर प्रशासनांची तयारी पूर्ण केली आहे. पोलिस प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने कडेकोट बंदोबस्त ठेवून वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची दखल घेण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्माई मंदिरात मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी कृष्णा पाटील डोंणगावकर यांच्या हस्ते महाआरती होणार आहे. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. येथे दर्शनासाठी तिरंगा चौक व कामगार चौक या दोन ठिकाणावरून मंदिरापर्यंत लाकडी कठडे लावून रांग केली आहे. दिंडीतील वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गतवर्षीपेक्षा भाविकांची संख्या जास्त राहणार असल्याचा अंदाज मंदिर प्रशासनाने कळविल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. पोलिसांनी एसआरपीची तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांसाठी मंदिर प्रशासन व खासगी संस्थांचे स्वयंसेवक राहणार आहेत. त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, अग्निशमन बंब, दोन फिरते दोन स्वच्छतागृह अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीला लावला हातभार

0
0


वृक्ष लागवडीला लावला हातभार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलांचे प्रश्न, त्यांचा विकास, सबलीकरण यासाठी प्रामुख्याने कार्य करणाऱ्या जागृती मंच महिला बहुउद्देशीय संस्थेने वृक्ष संवर्धनासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. वृक्ष लागवड व त्यांच्या संवर्धानाची गोडी इतरांनाही लागावी, यासाठी वृक्ष भेट हा उपक्रमही जागृती मंच सातत्याने राबवित आहे. शहर परिसरात यंदा ४०० रोपट्यांची लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

महिलांवरील अत्याचार, अन्याय याच्या विरोधात आवाज उठवून पीडितांना न्याय मिळावा, या हेतूने जागृती महिला मंचाची स्थापना झाली. तारा बसोले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. १९९९ पासून मंचाचे कार्य सुरू असून सात वर्षांपूर्वी संस्थेची रितसर नोंदणी करण्यात आली. महिलांचे; तसेच अन्य सामाजिक, नागरी विकास प्रश्नांसाठी कार्य करणाऱ्या या मंचाने पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या तीन वर्षापासून अधिक कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. मंचाच्या वतीने वर्षभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रत्येक कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत हे फूल, फळांचे रोप देऊन करण्याची प्रथा अंगीकारली अशी माहिती मंचाच्या अध्यक्ष भारती भांडेकर यांनी िदली.

पर्यावरण दिनानिमित्त मंचाने ५ जून रोजी क्रांतीचौक परिसरात ‘माझे झाड - माझे मूल’ हा अभिनव उपक्रम राबविला होता. याअंतर्गत शहरवासियांना ५०० रोपट्यांचे वाटप करण्यात आले. सविता कुलकर्णी, प्रा. सुषमा सोनी, प्रा. भारती भांडेकर, नेहा गुंडेवार, मृणालिनी फुलगीरकर, सविता कुलकर्णी, डॉ. अर्चना वैद्य, भारती पवार, अॅड. अंजली कुलकर्णी, ललिता चौधरी, शर्मिष्ठा रोडगे, नीती माळाळे, ज्योती मचाळे, अॅड. ज्योती पत्की, हेमलता लखमल, शुभदा पवार, सुषमा शिंदे, नीता माळाळे, अर्चना सुरासे, ज्योती मसले यांच्यासह मंचाचे असंख्य सदस्यांनी शहर झाडांनी भरलेले असावे, यासाठी पुढाकार घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील सर्व जलकुंभांची तपासणीः महापौर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सिडको एन-७, एन-५ परिसरातील जलकुंभ धोकादायक बनले आहेत. सिडको एन-७ येथील जलकुंभाच्या पायऱ्या शनिवारी कोसळल्या. या घटनेची दखल घेत महापौर भगवान घडमोडे यांनी रविवारी जलकुंभाची पाहणी केली. धोकादायक जलकुंभाबाबत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. त्यासह यानंतर शहरातील जलकुंभांची पाहणी करून ते किती मजबूत आहेत, याचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिडकोतील एन-७ येथील जलकुंभाच्या पायऱ्या निखळून परिसरातच असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर पडण्याची घटना शनिवारी घडली. या घटनेत कर्मचारी व त्यांचे कुटूंब बचावले. या घटनेनंतर शहरातील जलकुंभांच्या डागडुजीचा प्रश्न समोर आला आहे. अनेक जलकुंभाचे बांधकाम जुने आहे. त्यामुळे कमकुमतपणा आल्यागत स्थिती आहे. त्यात या जलकुंभांच्या डागडुजीकडेही दुर्लक्ष आहे. त्यामुळे मात्र, परिसरात राहणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या घटनेनंतर सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाल्याने रविवारी महापौर भगवान घडमोडे यांनी या जलकुंभांची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या प्रकरणात डागडुजीकडे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासह तत्काळ त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.
सिडको एन-७, एन-५ मध्ये असलेल्या जलकुंभही अशाच प्रकारे धोकादायक बनल्याचे चित्र आहे. सिडकोतील हे जलकुंभ सुमारे ४० वर्षांपूर्वीचे आहेत. मागील दोन वर्षापूर्वी परिसरातील नगरसेवकांनी जलकूंभ धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून दिली. त्यानंत तत्कालिन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जलकुंभाला भेट देऊन दुरूस्तीचे आश्वासन ही दिले होते.

अफवांनी गर्दी वाढविली
स्लॅब कोसळून कर्मचाऱ्याच्या निवासस्थानातील साहित्याचे नुकसान झाले. घटनेनंतर महापौर घडमोडे यांनी पाहणी केली तर, याचवेळी रविवारी सकाळी जलकूंभ पडल्याची अफवा सिडको-हडकोमध्ये होती. त्यानंतर अनेकांनी घटनास्थळाला भेट देण्यासाठी गर्दी केली.

सर्व जलकुंभांचा घेणार आढावा
या घटनेनंतर जलकुंभांच्या डागडुजीचा आणि सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. यामुळे शहरातील सर्व जलकुंभांची तपासणी करून जलकुंभ किती सक्षम आहेत याचा आढावा घेतला जाणार आहे. या प्रकरणात आपण आयुक्तांची सोमवारी भेट घेणार असल्याचे महापौर घडमोडे यांनी ‘मटा’ला सांगितले. अनेक दिवसापासून जलकूंभ धोकादायक झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यात कोण दोषी आहेत. त्यासह पुढे दुरुस्ती, डागडुजीसाठी काय उपाययोजना करायच्यायाबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.

जलकूंभ धोकादाय आहे, याबाबत दुर्लक्ष केले गेले. या प्रकरणी कोण कर्मचारी, अधिकारी दोषी आहे हे पाहिले जाईल. त्यासह दुरपस्तीसाठी तत्काळ उपाययोजना करण्यात येतील. शहरातील जलकुंभांचे सर्वेक्षण करण्यात येईल.
-भगवान घडमोडे, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या अभ्यासक्रमात घोकमपट्टी बाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या दैनंदिन घटनांकडे त्यांनी विज्ञानातून दृष्टीने पहावे, त्यातून सक्षम वैज्ञानिक घडावेत, हा हेतू समोर ठेवून विज्ञानाच्या नवीन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आल्याची माहिती अभ्यास मंडळाचे सदस्य गजानन सूर्यवंशी यांनी दिली. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘ओळख पाठ्यपुस्तकाची’ उपक्रमात त्यांनी शनिवारी सरस्वती भुवन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिकातून त्यांनी विषयाचे महत्त्व आणि त्यातील बदल मांडले.
सरस्वती भुवन हायस्कूलच्या सहकार्यायाने गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता सातवीच्या बदलेल्या अभ्यासक्रमातील विज्ञान विषयाची माहिती माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या विज्ञान अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य गजानन सूर्यवंशी यांनी दिली. व्यासपीठावर शिरीष मोरे, ज्येष्ठ शिक्षक व्याहाळकर, पांडे, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूर्यवंशी यांनी विज्ञान अभ्यासक्रमातील बदल विद्यार्थ्यांसमोर सहज, सोप्या शब्दात मांडले. विज्ञानाच्या पुस्तकातील नव्या रचनेत विज्ञान विषयाचे महत्त्व व व्याप्ती, विज्ञानाच्या विविध शाखांचे भविष्यातील महत्त्व, काठिण्यपातळीचा विचार करण्यात आलेला आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व विज्ञानाशी संबंधित इतर शास्त्रांचा एकत्रित विचार करून अभ्यासक्रमाची रचना केली आहे. अवकाश तंत्रज्ञानासह बदलत्या तंत्रज्ञानाचा वापरही यात करण्यात आला आहे. विषयाशी संबंधित वेबसाइटवर उपलब्ध मजकुरही विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. त्याच्या लिंकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांकडे वाढत कलही अभ्यासक्रम तयार करताना विचारात घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
अभ्यासक्रमातील बदलामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित वाढतील. त्यांनीही आपल्या आजुबाजुच्या गोष्टीकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. कान, डोळे उघडे ठेवून प्रत्येक घटनेकडे विज्ञानाच्या नजरेने पहायला शिका, असे आवाहन त्यांनी केले. प्रयोगशाळा व त्यानुसार प्रायोगिक कौशल्ये विकसित होण्यासाठी विविध कृती व विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित प्रयोग अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत.

विज्ञानाचा बदलेला अभ्यासक्रम नेमका कसा आहे, हे अतिशय उत्तमरित्या सरांनी समजून सांगितले. त्याचा फायदा आम्हाला विज्ञान शिकताना निश्चित होईल.
- साधना जाधव

विज्ञानातील संकल्पना अतिशय सोप्या शब्दात नवीन अभ्यासक्रमात मांडण्यात आल्या आहेत. हे बदल, त्याचा उपयोग याबाबत सूर्यवंशी सरांनी अतिशय सोप्या शब्दात सांगितले.
- जागृती शिसोदे

विज्ञान विषयाबाबतच्या अनेक शंका मनामध्ये होत्या. त्या शंका तर, दूर झाल्याच त्यासह अनेक नवीन बाबींवर मार्गदर्शनातून सरांनी प्रकाश टाकला. विज्ञान विषयाचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
- प्रणाली लोंढे

विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका असतात. माझ्याही मनात शंका, प्रश्न होते. सरांच्या मार्गदर्शनामुळे या शंका दूर झाल्या. बदललेला अभ्यासक्रम तंत्रज्ञानाशी निगडितही असल्याने चांगला आहे.
- अनुजा वझूरकर

विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सोपे झाले. विज्ञान हा विषय अतिशय सोपा करून देण्यात हा उपक्रम उपयुक्त ठरला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तरे त्यांनी दिले.
- शर्वरी नेरकर

कृतीयुक्त अभ्यासक्रम असणे किती गरजेचे आहे, हे या उपक्रमातून कळाले. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेत अभ्यासक्रम तंत्रज्ञानाशी जोडला गेला हेही अतिशय महत्त्वाचे आहे.
- रुद्र ढवळे

विज्ञानातील संकल्पना स्पष्ट होण्यास हा मार्गदर्शनपर उपक्रम अतिशय प्रभावशाली ठरला. विज्ञाना विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, हा हेतूही यातून साध्य झाला.
- स्नेहा शिदळे

आजुबाजुला घडणाऱ्या गोष्टींकडे पाहताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या किती महत्त्वाच्या आहेत हे उपक्रमातून समजले. विषयाची बदलेली रचना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच माहिती मिळाली.
- सत्यम शेटे

विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची गुंतागुंत असते. त्यात यंदा बदलेला अभ्यासक्रम कसा आहे याबाबतही शंका होती. या उपक्रमामुळे अनेक शंकांचे निरसन झाले.
- तेजस आखाडे

विज्ञानातील गमती जमती, नवनवीन संकल्पना नव्या पद्धतीने अभ्यासक्रमात मांडल्या आहेत. त्याची माहिती ही अतिशय सोप्या शब्दात त्यांनी मांडली.
- अमर घारे

जीवनात विज्ञानाचे महत्त्व कितपत आहे आणि जीवनातील दररोजच्या घडामोडिंना आधारित सातवीच्या इयत्तेत करण्यात आलेल बदल याबाबत उपयुक्त माहिती उपक्रमातून मिळाली.
- शिवप्रसाद चिंचोळे

नवीन अभ्यासक्रमात पाठांतरापेक्षा कृतीला महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्याच क्षमतेत वाढ होणार आहे. त्यासह ‘क्यू-आर’ कोड हा बदलही नवीन आहे.
- वेदांत लकडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याधुनिक अॅनॉटॉमी हॉल घाटीमध्ये सज्ज

0
0

अत्याधुनिक अॅनॉटॉमी हॉल घाटीमध्ये सज्ज
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) शरीररचनाशास्त्र (अॅनॉटॉमी) विभागातील पहिलाच अत्याधुनिक ‘सेमिनार हॉल’ नुकताच सज्ज झाला असून, वेगवेगळ्या वैद्यकीय परिषदा, संशोधन कार्यशाळा, बैठकांसह छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी या हॉलचा मोठा उपयोग होणार आहे. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुसज्ज हॉलच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर या हॉलमुळे काही प्रमाणातील उणीव भरुन निघणार आहे.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या (एनसीआय) नियम-निकषांनुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विशिष्ट संख्येतील अत्याधुनिक सेमिनार हॉल आवश्यक ठरविण्यात आले आहेत. मात्र मराठवाड्यातील सर्वांत जुन्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण हॉलची कमतरता होती व आजही काही प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर शरीररचनाशास्त्र विभागातील ‘सेमिनार हॉल’मध्ये अधिकाधिक अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न झाला आणि हा हॉल आता सज्ज झाला आहे. हा संपूर्ण हॉल वातानुकुलित असून, एलसीडी प्रोजेक्टरची हॉलमध्ये सोय आहे. तसेच ३० खुर्च्या व एक ‘यु’ आकारातील मोठा टेबल हॉलमध्ये उपलब्ध करण्यात आला असून, या हॉलची आसन क्षमता ही ८० ते ९० जणांची आहे.

या हॉलमध्ये आता सर्व प्रकारच्या बैद्यकीय परिषदा, कॉलेज कौन्सिलची बैठक, रिसर्च वर्कशॉप होऊ शकतात. तसेच पदवीस्तरीय व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे उपक्रमदेखील होऊ शकतात. या हॉलवर सुमारे सात लाखांचा खर्च झाला असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज झालेला हा महाविद्यालयातील पहिलाच हॉल आहे.

आणखी सुविधांचा प्रयत्न

हा हॉल सर्वदृष्टीने परिपूर्ण करण्यासाठी त्यामध्ये ‘साउंड प्रुफ’, ‘साउंड सिस्टीम’, ‘पोडियम’, ‘ई-क्लास’ आदी सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. तसेच आणखी ६० खुर्च्यादेखील लागणार आहे. त्यासाठी सुमारे पाच लाखांच्या निधीची आवश्यकता असून, या निधीतून एक सर्वोत्तम हॉल तयार होऊ शकतो, असेही विभागप्रमुख डॉ. शिवाजी सुक्रे यांनी ‘मटा’ला सांगितले.

सर्व प्रकारच्या सीएमई, रिसर्च वर्कशॉप, अभ्यागत समिती किंवा कॉलेज कौन्सिलच्या बैठकीसाठी हा हॉल चांगला झाला आहे आणि आणखी परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांचा रुग्ण व विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्याने ही विषयही लवकरच मार्गी लागेल, अशी आशा आहे.

– डॉ. शिवाजी सुक्रे, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images