Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शहर, जिल्ह्याला ७ नवीन पोलिस ठाणी

$
0
0
वाढत्या शहरीकरणानुसार पोलिस ठाण्याच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यात १२५ नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. ठाण्यांची निर्मिती करताना औरंगाबाद शहर व‌ जिल्ह्यामध्ये सात नवीन पोलिस ठाणे मिळणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

वाळूज महानगर प्रकल्पाची मूळ संकल्पना अबाधित

$
0
0
वाळूज महानगरची मूळ संकल्पना बदलली नसून सिडको शेतकऱ्यांची ७५ टक्के जमीन घेणार नसल्याचा दावा सिडकोने केला आहे. जमिनीचे वाढते भाव लक्षात घेता काही शेतकऱ्यांच्या मागणीनंतर ‘विकास हक्क,’ स्वरुपात मावेजा देण्याची सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे, असे सिडकोने कळविले आहे.

‘फमुं’च्या गैरहजेरीतही कोट्याच कोट्या

$
0
0
महानगरपालिकेकडून होणारा सत्कार स्वीकारण्यास फ. मुं. शिंदे उपस्थित नव्हते. मात्र, त्यांच्या गैरहजेरीतही या समारंभात उपस्थितांनी भरपूर कोट्या केल्या. ‘फमुं’ असते तर, पोट धरून हसलो असतो, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, समारंभात बोलणाऱ्यांनी केलेल्या कोट्यांमुळे हसलो असतो, तर बरे झाले असते, असे सगळ्यांना वाटत राहिले.

अवकाळी पाऊस रब्बीला वरदान

$
0
0
जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके आडवी झाली असून, काढणी झालेला मका भिजला आहे; मात्र ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या दोन मंडळातच नुकसान झाले आहे.

वाळूपट्ट्यांची किंमत ६.७५ कोटी

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ वाळूपट्ट्यांसाठी प्रशासनाने सुमारे सहा कोटी ७६ लाख रुपये किंमत निश्चित केली आहे. वाळूपट्ट्यांचा लिलाव येत्या तीन डिसेंबर रोजी होणार आहे. ही विक्री ई-ऑक्शन पद्धतीने करण्यात येणार आहे.

नऊ लाखांची फसवणूक

$
0
0
शिक्षकाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन संस्थचालक जोडप्याने तरुणाला नऊ लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

‘डमी प्रश्नपत्रिकेने’ लाखोंची उलाढाल

$
0
0
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांचे दोन पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, तंत्रशिक्षण मंडळ चक्रावले असून खबरदारी म्हणून तातडीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात मंडळाचे संचालक मंगळवारी दिवसभर औरंगाबादमध्ये ठाण मांडून होते, तर पोलिसांनी ही तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून तीन जणांना आज ताब्यात घेतले.

सातारावासीयांना हवे ‘एनए - ४७’

$
0
0
सातारा परिसरातील मालमत्तांना ‘एनए ४७’ नियम लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व सातारावासीयांनी मंगळवारी सातारा ग्रामपंचायतीसमोर घंटानाद आंदोलन केले.

दाभोलकर हत्येच्या तपासात अपयशी

$
0
0
‘अंनिस’चे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सर्व तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही तपासात अपयश आल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी खंत व्यक्त केली. पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या उदघाटनासाठी ते मंगळवारी शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

१ कोटी १९ लाखांची वसुली

$
0
0
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे मंगळवारपासून ग्रामपंचायत करवसुली मोहिम सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी १९ लाखांची वसुली केल्यामुळे यावेळी प्रशासनाचा उत्साह द्विगुणित झाला होता.

आरोग्य सहाय्यकास लाच घेताना अटक

$
0
0
लोहगाव तालुका बिलोली येथील शेतक-यांकडून बदलीसाठी लाच घेणा-या आरोग्य सहाय्यकास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बळीराम बोडके या शेतक-यांकडून त्याच्या पत्नीची व भावजयीची बदली करण्यासाठी जिल्हा परिषद नांदेड येथील आरोग्य विभागातील आरोग्य सहाय्यक सुरेश इंगळे यास १० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी ऍन्टी करप्शन ब्युरो नांदेडच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

समता परिषदेचा बीडमध्ये मोर्चा

$
0
0
ओबीसीच्या विद्यार्थ्यावरील अन्यायाच्या निषेधार्थ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर समता परिषदेने बुधवारी मोर्चा काढला. ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभेत रूपांतर झाले.

पाणी सोडण्यासाठी शेतक-यांचे उपोषण

$
0
0
‘आपेगाव व हिरडपुरी बंधारे भरेपर्यंत जायकवाडी धरणातून पाणी सोडा,’ या मागणीसाठी या भागातील शेतकरी व जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे कार्यकर्ते गुरुवारपासून हिरडपुरी बंधाऱ्यावर बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहे.

शेतकऱ्यांना लेखी माहिती द्या

$
0
0
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॅरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यापूर्वी शेतकऱ्यांना सर्व माहिती लेखी स्वरुपात द्यावी, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर हक्क समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जुन्या वादातून तरुणांवर चाकूहल्ला

$
0
0
जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला.

जायकवाडीच्या पाण्यासाठी कोर्टात

$
0
0
जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून हक्काचे पाणी सोडावे, या मागणीसाठी आता काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत.

​जालन्याचा आरोग्य योजनेत समावेश

$
0
0
आरोग्य सुविधा उपलब्ध करुण देणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना पहिल्याटप्यामध्ये आठ जिल्ह्यात प्राथमिक तत्वावर सुरू करण्यात आली असून यात जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

शेतकरी भवनाला नवा ‘लूक’

$
0
0
जाधववाडी येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात उभारण्यात आलेल्या शेतकरी भवनाला नवा लूक देण्यात आला आहे.

पोलिसांनी अपडेट राहण्याची गरज

$
0
0
आधुनिक काळामध्ये गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

पार्किंग फी बाबत मनमानी

$
0
0
शहरातील सिद्धार्थ गार्डन शहरवासीयांच्या मनोरंजनाचे एक प्रमुख स्थान आहे. हजारो नागरिक येथे दररोज गर्दी करतात, परंतू वाहने घेऊन येणाऱ्या वाहनधारकांसाठी गार्डनला भेट देणे महाग पडत आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images