Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गुन्हेगाराचा पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार पऱ्या उर्फ प्रवीण साबळे याने गळ्यावर ब्लेड मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी पावणेसात वाजता सिडको पोलिस ठाण्यात घडला. रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांची चौकशी सुरू असताना मद्यप्राशन करून आलेल्या प्रवीणने हे कृत्य केले.
सिडको पोलिस ठाण्याचे पथख शनिवारी मिसारवाडीमध्ये गस्त घालत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार किशोर कसारे, अमोल घुगे व हर्षद मुळे हे संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांना चौकशीसाठी सिडको पोलिस ठाण्यात आणले होते. पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या खोलीत त्यांची चौकशी सुरू असताना रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार प्रवीण सोपान साबळे उर्फ पऱ्या (वय ३१, रा. आंबेडकरनगर) हा मद्यधुंद अवस्थेत पोलिस ठाण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण खोलीच्या बाहेर पऱ्याने हातातील ब्लेडने गळ्यावर वार करून घेतले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्याच्या हातातील ब्लेड हिसकावून घेतली. पऱ्याच्या पाठोपाठ त्याची आई देखील पोलिस ठाण्यात आली होती. त्यांच्यासमोर हा प्रकार घडला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये रवाना केले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र महादू सुरे याच्या तक्रारीवरून पऱ्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस जमादार पवार हे तपास करीत आहेत.

यापूर्वी देखील प्रयत्न
प्रवीण साबळे याच्यावर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे सिडको पोलिस ठाण्यात दाखल आहेत. चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुबाडण्याचा गुन्ह्याचा जास्त समावेश आहे. यापूर्वी देखील पऱ्याने सिडको पोलिस ठाण्यातच मद्यधुंद अवस्थेत लॉकअपवर डोके फोडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी प्रवीण साबळेला ताब्यात घेतले नव्हते. मिसारवाडी येथे ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांची चौकशी सुरू असताना दारू पिलेल्या अवस्थेत तो स्वतः पोलिस ठाण्यात आला होता. गळ्यावर ब्लेड मारल्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलला रवाना करण्यात आले.
कैलास प्रजापती, पोलिस निरीक्षक, सिडको पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१९ हजार विद्यार्थ्यांची ‘सीईटी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १९ हजार विद्यार्थी सोमवारी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) देणार आहेत. चार जिल्ह्यांतील ५१ केंद्रावर परीक्षा होईल, अशी माहिती समन्वयक डॉ. दिलीप खैरनार यांनी दिली. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्यांदाच सीईटी घेण्यात येत आहे.
विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग आणि विद्यापीठाचा कॅम्पस उस्मानाबाद संलग्नित १२७ महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पूर्वपरीक्षा अर्थात ‘सीईटी’च्या माध्यमातून होणार आहेत. सीईटी नोंदणी प्रक्रिया १२ जूनपासून सुरू झाली असून, १० जुलै रोजी ‘सीईटी‘ घेण्यात येणार आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील ५५ विषय, उस्मानाबाद कॅम्पसमधील पाच विषयांसाठी; तसेच विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील १२७ पदव्युत्तर महाविद्यालयात ‘सीईटी’ होईल. महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ७० विषयांसाठी ‘सीईटी’ बंधनकारक आहे. परीक्षा झाल्यापासून प्रशासकीय पातळीवर नियोजनात ढिसाळपणा होता. ऑनलाइन अर्ज भरताना त्रुटी असल्यामुळे विद्यार्थी हवालदिल होते. विषयाचा पर्याय नसल्यामुळे गोंधळ वाढला होता. अखेरीस सीईटीचे परिपूर्ण नियोजन करून कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रश्न मार्गी लावला.
दरम्यान, हॉलतिकीट वाटपाची यंत्रणा पुरेशी प्रभावी नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. काही परीक्षा केंद्र ऐनवेळी जाहीर करण्यात आले. या प्रकारात विद्यार्थ्यांची धावपळ होण्याची शक्यता आहे. १९ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून, चार जिल्ह्यांतील ५१ केंद्रावर सीईटी होणार आहे. या परीक्षेचे समन्वयक डॉ. दिलीप खैरनार, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. मजहर फारुकी व डॉ. संजय साळुंके आहेत. प्रभारी अधिकारी डॉ. सतीश पाटील, उपकुलसचिव संजय कवडे व पदव्युत्तर विभाग, युनिकमधील कर्मचारी प्रयत्नशील आहेत. ‘सीईटी’चा निकाल १५ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

परीक्षेचे नियोजन
- औरंगाबाद ः २७ केंद्र, १० हजार ५७३ विद्यार्थी
- जालना ः ८ केंद्र, २ हजार ६७४ विद्यार्थी
- बीड ः ९ केंद्र, ३ हजार ३७४ विद्यार्थी
- उस्मानाबाद ः ७ केंद्र, २ हजार ४०० विद्यार्थी

प्रवेश प्रक्रिया
सीईटीचा निकाल १५ जुलै रोजी जाहीर होणार असून, नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे, कागदपत्रांची तपासणी या प्रक्रिया १५ ते २५ जुलैदरम्यान होणार आहे. सर्वसाधारण यादी ३० जुलै रोजी जाहीर होईल. प्रथम यादी एक ऑगस्ट, द्वितीय यादी सात ऑगस्ट आणि स्पॉट अ‍ॅडमिशन १० ऑगस्टला होतील. प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविण्याचा कालावधी ११ ते १४ ऑगस्ट आहे. १४ ऑगस्टपासून नियमित वर्ग सुरू होतील, असे विद्यापीठाने कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयावर शाईफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या भाग्यनगर परिसरातील प्रल्हाद भवन या कार्यालयावर तरुणांच्या जमावाने शाई व पत्रके फेकत घोषणाबाजी केली. हा प्रकार रविवारी दुपारी अडीच वाजता घडला. या पत्रकावर बहुजन क्रांती मोर्चा समितीचा उल्लेख आहे. या घटनेनंतर प्रल्हाद भवन येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रल्हाद भवन या कार्यालयाचे प्रमुख प्रशांत लिंगायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लिंगायत व त्यांचे सहकारी कार्यालयात बसलेले होते. त्यावेळी १० ते १२ जणांचा जमाव गेटमधून आत शिरला. या जमावाने निषेधाच्या घोषणा देत त्यांच्याजवळ असलेला काळा रंग इमारतीच्या दर्शनी भागावर फेकला तसेच त्यांच्या हातातील पत्रके फेकून हा जमाव पसार झाला. या पत्रकावर बहुजन क्रांती मोर्चा समितीच्या नावाचा उल्लेख असून बाळासाहेब आंबेडकरांच्या केसाला सुद्धा धक्का लागला, तर आरएसएसच्या मोहन भागवत यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. संघ विचारधारेचा, मनुवादाचा व ब्राह्मणवादाचा निषेध करण्यात आला आहे. या घटनेची माहिती क्रांतीचौक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

आमदारांची भेट
ही घटना घडल्यानंतर भाजप आमदार अतुल सावे, माजी नगरसेवक अनिल मकरिये यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रीत झाला असून पोलिसांनी या फुटेजची पाहणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक न्यायालयातील १९ प्रकरणे तडजोडीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ती कुणाचेच ऐकत नाही. अॅडजेस्ट करत नाही. ती स्त्री असल्याने कायदे आणि तुम्ही पण तिच्याच बाजूने बोलता. तर दुसऱ्या बाजूने दोन वर्षांचा मुलगा असलेली अवघ्या विशीतली आई झालेली महिला मला नवऱ्यासोबत नांदायचे नाही, असे म्हणत होती. संसार दोघांचा असतो. तो एकमेकांना समजून, एकमेकांच्या गुणदोषांचा स्वीकार करूनच करायचा असतो. नवरा-बायकोच्या भांडणाचा परिणाम थेट मुलांवर होतो. म्हणून सुसंवाद करा. अशा प्रकारे सर्वांनाच समुपदेशनाद्वारे समजावण्याचा प्रयत्न न्यायालय स्वत: करत होते.
निमित्त होते राष्ट्रीय लोकन्यायालयाचे. सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया या धोरणावर शनिवारी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कौटुंबिक न्यायालय यांच्या वतीने कौटुंबिक न्यायालयामध्ये दोन पॅनलसमोर ७३ दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित व दखलपूर्व तडजोडपात्र, वैवा​हिक वादा​बाबतची प्रकरणे समुपदेशन, सुसंवादाच्या आधारे निकाली काढणे व कुटुंब टिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पॅनल क्रमांक एकमध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश के. के. गायकवाड, विवाह समुपदेशक के. एच. जाधव व अॅड. माधुरी अदवंत-देशमुख होत्या. त्यांना एस. डे. केसकर, ए. बी. बागुल, मंगेश गव्हाणे, के. एम. तुपे, के. सी. पुहाल व डी. एस. साळवे यांनी साह्य केले. पॅनल क्रमांक दोनमध्ये निवृत्त प्रमुख न्यायाधीश डी. पी. खोत, वि​वाह समुपदेशक एम. जी. जाधव व डी. के.टोंपे व अॅड. छाया गायकवाड होत्या. त्यांना एस. यू. निनगुरकर, एस. आर. दाणी, सतीश चेडे, रेखा धाकरे, जी. एस. मालकर, व्ही. डी. वाघमारे यांनी साह्य केले.
‘मी माझ्या बायकोचा सांभाळ करायला तयार आहे, पण ती काही ऐकायलाच तयार नाही. माझ्या आईने काही म्हटले की तिला टोमणे वाटतात. तर स्वतःच्या आईचा सल्ला हिला महत्त्वाचा वाटतो,’ असे नवरा म्हणत होता. ‘सासूचेच ऐकतात, माझे ऐकत नाही. मला नांदायचे आहे, पण नवराच न्यायला तयार नाही,’ अशी स्थिती.
लग्नानंतर वर्षभराच्या आत कोर्टासमोर आलेल्या नवदांम्पत्यापासून ते अगदी सत्तरीवर पोचूनही ‘पोटगी वाढवून देत नाही,’ असे म्हणत कोर्टात तारीख आल्यावर पाहून घेऊ, असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच तज्ज्ञ समजावून सांगत होतो.
पॅनल एकमध्ये १२, तर पॅनल दोनमध्ये ७ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. तडजोडीच्या प्रकरणांच्या पक्षकारांच्या सोयीनुसार ट्रायल पिरिएड देण्यात आला. दरवेळीच्या तुलनेत यावेळी बऱ्याच प्रकरणांमध्ये तडजोड झाली, असे अनुभव व्यक्तींनी सांगितले. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश अरुणा जी. फरस्वाणी व न्यायालय व्यवस्थापिका वंदना कोचर यावेळी उपस्थित होत्या.

‘सासरी फॅन नाही म्हणून...’
लोकन्यायालयासमोर नवीन लग्न झालेली प्रकरणे आली. केवळ एकमेकांशी संवाद नाही आणि पूर्वग्रह करून एकमेकांविषयी गैरसमज करून दाम्पत्य कोर्टासमोर आलेले पहायला मिळाले, तर ‘मुलगी झाली आणि ती सात महिन्यांनीच वारली. जन्म झाल्यापासूनच तिला कुणी स्वीकारले नाही आणि ती गेल्यानंतरही नवरा सोडून कुणी बघायला आले नाही. तरी मी सासरी जायला तयार आहे, पण ते मला नेत नाही, अशी व्यथा मांडणारी महिलाही होती. एका प्रकरणात तर ‘सासरी फॅन नाही, टीव्ही नाही म्हणून मुलीला नांदवायचे नाही,’ असे एका मुलीची आई म्हणाली. बऱ्याच प्रकरणांमध्ये केवळ ‘इगो प्राब्लेम’मुळे एकमेकांवर आरोप होतात असे तज्ज्ञांचे निरीक्षण होते.

संसार टिकावा, असे मला वाटते. नवरा-बायकोच्या भांडणांचा मुलांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे किमान एक संधी दोघांनाही मिळावी.
- अॅड. माधुरी अदवंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरांची अवैध वाहतूक; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सात जनावरांची अवैधरित्या व अतिशय निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (१० जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी दिले.
या प्रकरणी नियंत्रण कक्षातील कॉन्स्टेबल सुभाष ज्ञानेश्वर नाईक यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा शनिवारी सकाळी अंबरहील भागात ड्युटीवर असताना व्हॅन जटवाडा रोडकडून औरंगाबादकडे येताना दिसली. संशयावरून व्हॅनची तपासणी केली असता, त्यामध्ये चार गायी व तीन बैल अत्यंत दाटीवाटीने घेऊन जाताना दिसून आले. व्हॅनचालक व आरोपी रहीम रऊफ पठाण (वय २५, रा. कैलासनगर गल्ली, औरंगाबाद) याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता, आरोपीकडे वाहनाची कागदपत्रे तसेच जनावरे वाहून नेण्याचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी ७० हजारांची जनावरे व दोन लाखांची व्हॅन जप्त करण्यात येऊन आरोपीविरुद्ध ‘महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५’च्या कलम ५ (१) (अ) व ‘प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंधक अधिनियम’अन्वये हर्सूल पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने जनावरे कुठून आणली होती व कुठे घेऊन जात होता, तसेच आरोपीने यापूर्वी जनावरांची अवैध वाहतूक केली होती किंवा नाही, याबाबत विचारपूस करणे बाकी असल्याने आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरुन कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहिणीच्या जिद्दीला हवे समाजाचे पाठबळ

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com
Tweet : @ramvaybhatMT
औरंगाबाद ः पाऊस आला तरच शेतीचे उत्पन्न, अन्यथा वर्षभर मोठे आर्थिक संकट, कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. अशा स्थितीत प्रसंगी कर्जबाजारी होऊ, पण मुलांनी शिक्षण घ्यावे, अशी वडिलांची इच्छा. त्यामुळे त्यांनी मुलांना औरंगाबादेत शिक्षणासाठी ठेवले. त्यांची इच्छा पूर्ण करत रोहिणी दशरथ जाधव हिने दहावीमध्ये ९३.२ टक्के गुण मिळवले. आर्किटेक्ट व्हायचे स्वप्न रोहिणीने बाळगले आहे. तिला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देशसेवाही करायची आहे. तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी समाजाची साथ गरजेची आहे.
रोहिणीचे वडील दशरथ जाधव यांची औरंगाबाद शहरापासून ३०-‌३५ किलोमीटर अंतरावर धामनगाव (ता. फुलंब्री) येथे डोंगराच्या पायथ्याशी जमीन आहे. जमीन मुरमाड. पाऊस झाला तरच काहीतरी हाती लागेल अशी स्थिती. संपूर्ण कुटुंबाचा डोलारा शेतीवरच अवलंबून. त्यामुळे शेती हाच कुटुंबाचा मुख्य आर्थिक स्त्रोत. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. अशा स्थिती वाढलेली रोहिणी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. त्यामुळे तिला शहरात शिक्षण द्यावे, अशी वडीलांची इच्छा. रोहिणीला पुढे शिकवावे, असे शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी वडील दशरथ जाधव यांनी दहा वर्षांपूर्वी जयभवानीनगर येथे भागीदारीमध्ये लहानसा प्लॉट घेतला. जसे पैसे येतील तसे तेथे दहा बाय दहाच्या दोन खोल्या कशाबशा बांधल्या. औरंगाबाद शहरात हाच काय ते जाधव कुटुंबाचा आधार. शेती सांभाळण्यासाठी आई, वडील व भाऊ गावी राहतात. त्यामुळे जयभवानगीनगर येथील घरामध्ये बहिण व आजीसोबत रोहिणी राहते. नातीच्या शिक्षणासाठी औरंगाबादेत राहणाऱ्या आजींचेही वय झाले आहे, तरीही खर्चाला हातभार लागावा म्हणून त्या केटरिंगमध्ये, मेसमध्ये स्वयंपाक करण्यासाठी जातात. शेतीतून मिळालेले धान्य; तसेच किरकोळ खर्चासाठी वडील दशरथ जाधव हे शहरात येऊन वेळोवेळी मदत करतात. आर्थिक अडचणीच्या काळात वडील दशरथ जाधव यांनी कर्ज घेतले. ते फेडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. लहानपणीपासुन हुशार असलेल्या रोहिणीला शिकवण्यासाठी वडीलही प्रयत्नांची पराकाष्टा करत अाहेत. त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही, मात्र मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.

शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे
दहावीच्या आव्हानात्मक परीक्षेसाठी; तसेच अभ्यासासाठी वडिलांसह ‌शाळेतील सर्वच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे रोहिणी सांगते. जयभवानीनगर परिसरातील लहानशा घरात परिसरातील गोंगाटामुळे दिवसा अभ्यास करणे शक्य नसल्यामुळे रात्री जागून अभ्यास केल्याचे तिने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बृहत आराखडा निर्मितीचे काम विद्यापीठामध्ये सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आगामी पाच वर्षांसाठीचा बृहत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, सोमवारपर्यंत (१० जुलै) शिक्षण संस्था, शिक्षणप्रेमी मंडळींनी नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६च्या कलम १०७ अन्वये शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ ते २०२२-२०२३ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सम्यक योजना-बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील स्थाननिश्चितीसाठी संबंधितांना एक ते दहा जुलैदरम्यान प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. या सम्यक योजनेत, उच्च शिक्षण महाविद्यालयांनी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अभ्यासक्रम, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा आणि आंतर विद्याशाखेमधील अभ्यासक्रमाअंतर्गत नवीन महाविद्यालय, नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विषय विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र आणि खासगी कौशल्य शिक्षणप्रदत परिसंस्थांना विविध पदव्या, पदविका, प्रगत पदविका व प्रमाणपत्र पाठ्यक्रम आणि परिसंस्थांना परवानगी द्यायचे विषय, नवीन तुकड्यांची संख्या आणि सॅटेलाइट केंद्र सुरू करण्यासाठी ठिकाणांचे समर्पक कारणांसह अधिकृत संस्थेच्या लेटरपॅडवर विनंती अर्ज प्रास्ताव सादर करावेत, असे आवाहन डॉ सतीश पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीकांत देशमुखांच्या साहित्यात विविधता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्यात विषयांची विविधता आणि वेगळेपण आहे. त्यामुळेच त्यांची ओळख असून प्रशासकीय सेवेत असताना आलेले अनुभव आणि निर्माण झालेल्या प्रश्नांचा त्यांच्या लेखनाला आधार आहे,’ असा सूर रविवारी आयोजित चर्चासत्रात व्यक्त झाला.
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे नांदापूरकर सभागृहात लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्यावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्‍घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. समारोपाच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे होते. व्यासपीठावर मसापचे कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष के. एस. अतकरे, भारत सासणे, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते यांची उपस्थिती होती.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, हल्ली प्रशंसा करणारे लेखक ही प्रवृत्ती वाढली आहे. चांगल्या पुस्तकांवर चर्चा होताना कमी दिसते. तुम्ही आमची आणि आम्ही तुमची तारीफ करतो, असे साहित्य कार्यक्रम वाढले आहेत. केवळ उत्स्फूर्त आविष्कारावर चांगले लेखन करता येत नाही. त्यासाठी अभ्यास करावा लागतो. दाखले समजून घ्यावे लागतात. प्रशासकीय सेवेत अनेक अनुभव येतात. त्या अनुभवांना कसे सादर करतो हे महत्त्वाचे असते. लक्ष्मीकांत देशमुख यांचे लेखन हे पीडित, शोषित आणि गरिबांच्या वास्तवातून आले आहे. मानवी जीवनातील गुंतागुंत उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या लेखनातून केला आहे, असे ते म्हणाले. डॉ. कोतापल्ले यांनी देशमुख यांच्या ‘इन्कलाब विरुद्ध जिहाद’ या कादंबरीवर देखील भाष्य केले.
उदघाटनानंतर पहिले सत्र भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या सत्रात ‘लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीलेखन’ या विषयावर प्रा. अविनाश सप्रे, डॉ. गणेश मोहिते यांनी ‘लक्ष्मीकांत देशमुख यांची समस्या केंद्रीकथा’ आणि डॉ.रामचंद्र काळुंखे यांनी ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद व कादंबरीचे राजकीय आकलन’ या विषयावर निबंध सादर केले. सूत्रसंचालन दादा गोरे यांनी केले. समारोपाच्या सत्रात सतीश बडवे यांनीही लक्ष्मीकांत देशमुख यांचे साहित्य व वाङमयाची दखल मसापने घेतली आहे याचे कौतुक करत देशमुखांच्या साहित्यावर समीक्षण अधिक झाले पाहिजे, होते असे वक्तव्य केले. अध्यक्षीय समारोप कौतिकराव ठाले पाटील यांना केला. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन रामचंद्र काळुंखे यांनी केले. या चर्चासत्रासाठी किरण सगर, भास्कर बडे, कार्यक्रम समितीचे डॉ. रामचंद्र काळुंखे व मसापच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सात दिवसात पकडल्या १२२ वीज चोऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महावितरणाच्या शहर एक विभागात सात दिवसांपासून वीज चोरी विरोधी मोहीम राबवण्यात येत आेया मोहिमेत १२२ वीज चोरीची प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय शंभर वीज मीटर जप्त करण्यात आल्याची माहिती शहर विभाग एकचे कार्यकारी अभियंता ए. पी. पठाण यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
औरंगाबाद शहरात वीज वापर व बिलाची वसुली यात अंतर वाढले असून वीज गळतीचे प्रमाण २४ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे महावितरणाचे उपमहाव्यवस्‍थापक ओमप्रकाश बकोरिया यांच्या सूचनेवरून वीज चोरी विरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली १ जूलै पासून मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत २६ अभियंते, २४ वीज कर्मचारी आणि ४० लाइन स्टॉफ, असा ९० जणांचा समावेश आहे. या पथकाने रोशन गेट, जिन्सी, नवाबपुरा, बायजीपुरा, मंजूरपुरा, हर्षनगर, एसटी कॉलनी, गणेश कॉलनी, सिटीचौक या भागात आठ पथकांद्वारे तपासणी करण्यात आली. या पथकांनी वीज चोरीची १२२ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या प्रकरणांत १० ते १५ लाख रुपयांचा महसुली तोटा झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे पठाण यांनी सांगितले.

वीज अभियंत्यावर हल्ला
वीज बिल वसुली आणि चोरी विरोधी पथकावर करोडी येथे गुरुवारी हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरणाचे सहाय्यक अभियंता माधव पांडुरंग मोरताळे हे पथकासह तपासणी करत असताना विलास दामोधर जाधव याने त्यांच्या अंगावर धावून जात शासकिय कामात अडथळा निर्माण केला. त्यांच्याशी झटापट केली. झटापट व बघ्यांच्या गर्दीमुळे सहायक अभियंत्यांच्या हातातील पावती पुस्तक, जमा केलेली काही रक्कम गहाळ झाली. या प्रकरणी विलास जाधव याच्यावर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका तासात शोधली पंचवीस हजारांची पर्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
रिक्षामध्ये विसरलेली २५ हजारांचा ऐवज असलेली पर्स महिलेला अवघ्या एका तासात वेदांतनगर पोलिसांनी‌ मिळवून दिली. हा प्रकार रविवारी सकाळी घडला. या कामी सेफसिटी प्रोजेक्ट व आरटीओ कार्यालयाची मदत घेण्यात आली.
सुजाता भाऊसाहेब जाधव (रा. सिडको परिसर) या रविवारी सकाळी रेल्वे स्टेशनवरून सिडको परिसरात जाण्यासाठी रिक्षामध्ये बसल्या होत्या. या महिलेजवळील पिशवीत साडेचोवीस हजार रुपये रोख व लहान मुलांचे कपडे होते. सिडको येथे उतरताना पैशाची पिशवी रिक्षाच्या मागच्या भागात विसरल्याचे त्यांना घरी गेल्यानंतर लक्षात आले. त्यांनी वेदांतनगर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. यावेळी ड्युटी ऑफीसर म्हणून पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी आजळे कार्यरत होत्या. त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांना सेफ सिटी प्रोजेक्टच्या पोलिस आयुक्तालयातील कार्यालयात पाठवले. या ठिकाणी रेल्वे स्टेशन येथील चौकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही महिला कोणत्या रिक्षात बसली त्याचा क्रमांक फुटेज पाहून मिळवण्यात आला. आरटीओ कार्यालयाच्या मदतीने या ‌रिक्षा क्रमांकाच्या मालकाचे नाव व पत्ता शोधण्यात आला. हडको एन-९ भागात हा रिक्षाचालक राहत होता. त्याचा शोध घेऊन त्याला ही माहिती देण्यात आली. या रिक्षाचालकाला देखील आपल्या रिक्षामध्ये पिशवी असल्याचे माहित नव्हते. या पिशवीमध्ये रक्कम सुरक्षित होती. रिक्षाचालकासह पोलिसांनी वेदांतनगर गाठले. या महिलेला तिची पर्स सुखरूप पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या उपस्थितीतीत ओळख पटवून देण्यात आली. पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वर्षाराणी आजळे, जमादार अहिरे, कांबळे व आहेर यांनी ‌ही कामगिरी एका तासात यशस्वी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेच्या मृत्युप्रकरणी दोन वर्षानंतर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
विवाहितेला विष पाजून खून केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ऑक्टोबर २०१५ मध्ये घडला होता. या प्रकरणी वडिलांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. पुंडलिक बंडुजी साळवे (वय ७८, रा. नंदनवन अपार्टमेंट, नंदनवन कॉलनी) यांनी कोर्टात दाद मागितली होती. त्यांची मुलगी नंदा हिचा विवाह सत्येन सुभाष तायडे याच्यासोबत झाला होता. १ एप्रिल २००६ ते ११ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत तिचा शरीरिक व मानसिक छळ करण्यात आला. यामध्ये विषारी औषध प्राशन केल्याने नंदाचा मृत्यू झाला. सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने साळवे यांनी कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी कोर्टाने शुक्रवारी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार साळवे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पती सत्येन सुभाष तायडे (वय ४४), सासू लिलाबाई, सासरे, सुभाष व दीर संदीप (सर्व रा. कासलीवाल मार्बल, बीड बायपास) यांच्यासह डॉ. सुरेश पारधे व सविता सुरेश पारधे (दोघे रा. गारखेडा परिसर) यांच्या विरुद्ध खून, हुंड्यासाठी छळ, कट रचणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बहुरे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तेजोमह’ उत्सवाने जबिंदा लॉन दुमदुमले

$
0
0

औरंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपूलाशेजारील जब‌िंदा लॉन येथे रविवारी वैश्विक स्वाध्याय परिवारातर्फे ‘तेजोमह’ उत्सव साजरा करण्यात आला. पांडुरंगशास्त्री आठवले यांना यावेळी १५ हजाराहून अधिक स्वाध्या‌यींनी गुरूवंदन केले.
संध्याकाळी पाच ते सात या वेळेत हा कार्यक्रम झाला. दादांच्या कन्या धनश्री तळवळकर या दिवशी वयाच्या ६१व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यांच्याशीही व्हिडिओकॉन्फरन्सिंगने संवाद साधला, असे यावेळी स्वाध्यायी राजेंद्र वाणी यांनी सांगितले. याचवेळी माधववृंद संकल्पनेखाली स्थापन झालेल्या सोहळ्याला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने या वर्षीच्या कार्यक्रमाला ‘तेजोमह उत्सव असे नाव देण्यात आले आहे. यावेळी तुळशीपूजन आणि वृक्षारोपण करण्याचीही प्रथा आहे. याशिवाय १२ जुलै रोजी वड-पिंपळासह विविध झाडे लावण्यात येणार आहेत, त्याची आठवण करून देण्यात आली. या शिस्तबद्ध कार्यक्रमात स्वाध्याय परिवराच्या परंपरेनुसार गुरूवंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लंभेची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रेडिट सोसायटीमधील ठेवींवर जास्त व्याज दराचे आमिष दाखवून अनेक खातेदारांना गंडवणाऱ्या विलास नारायण लंभे पाटील याच्या मालमत्तेवर पोलिसांकडून लवकरच जप्तीची कारवाई केली जाणार आहे. लंभे हा सध्या एका महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात न्यायालायीन कोठाडीत आहे. या कोठडीची मुदत संपल्यानंतर सिडको पोलिस त्याला ताब्यात घेणार आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास लंभे याने एसटी अर्बन मल्टी स्टेट को-ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थापन करून अनेक शिक्षक आणि इतर खातेदारांना रक्कम दुप्पट करण्याची योजनेचे अमिष दाखवून लाखो रुपयांच्या ठेवी घेतल्या. मुदत संपल्यानंतर लंभे याने ठेवीदारांना गुंगारा देऊन पळ काढला होता. फसवणूक झालेल्या ठेवीदांरापैकी अशोक नामदेव गुंजकर (वय ५३, रा. विवेकानंदनगर, देऊळगावराजा, जि. बुलढाणा) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली आहे. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याने लंबे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी सिडको पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

कोट्यावधींची फसवणूक
क्रेडिट सोसायटीच्या नावे ठेवीदारांसह ग्राहकांची देखील फसणूक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आलेले आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची फसवणुक झाल्याचा प्राथमिक अंदाज आर्थिक गुन्हे शाखचे पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये होणार हिमॅटोलॉजी लॅब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
‘स्टेट कॅन्सर सेंटर’चा दर्जा मिळालेल्या शहरातील शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या कर्करोगाच्या निदानासाठी अद्ययावत हिमॅटोलॉजी प्रयोगशाळा लवकरच सुरू होणार आहे. त्याचवेळी स्वतंत्र रक्तपेढी उभी राहणार असून, सिटी स्कॅन, एमआरआय यासह विविध महत्त्वाची व अत्याधुनिक उपकरणेही दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या ३५ कोटींच्या निधीतून या सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध होणार असल्याचे मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे शैक्षणिक संचालक आणि राज्य सरकारने नियुक्त केलेले सल्लागार व समन्वयक डॉ. कैलाश शर्मा यांनी ‘मटा’ला सांगितले.
केंद्र सरकारने दिलेल्या ३५ कोटींच्या नियोजनासंदर्भात आढावा घेण्यासाठी डॉ. शर्मा हे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत निधीचे नियोजन होणार आहे. यानिमित्त त्यांनी हॉस्पिटलच्या विस्तारात होऊ घातलेल्या बाबींविषयी ‘मटा’शी संवाद साधला.
केंद्र सरकारने हॉस्पिटलला अलीकडेच ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट’चा दर्जा जाहीर केला. १२ व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत व ‘नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटीस, कार्डिओव्हॅस्कुलर डिसीज अँड स्ट्रोक’अंतर्गत (एनपीसीडीसीएस) केंद्राकडून १२० कोटींपर्यंत निधी देण्याची तरतूद असून, हा निधी ‘स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट’साठी दिला जाणार आहे. यात ७५ टक्के (९० कोटी रुपये) निधी केंद्र सरकारने, तर २५ टक्के (३० कोटी रुपये) निधी राज्य सरकारने दिला जाणार आहे. अर्थात, २५ टक्क्यांपेक्षा जास्त निधी कॅन्सर हॉस्पिटलवर झाल्यामुळे आता केंद्राकडून ९० कोटी येणे अपेक्षित आहे आणि त्यातील ३५ कोटींचा पहिला हप्ता हॉस्पिटला नुकताच प्राप्त झाला आहे.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून २१ सप्टेंबर २०१२ रोजी सुमारे ५० कोटी रुपये खर्चू करून राज्यातील पहिले शासकीय कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाले. २५ कोटींची लिनॅक-सिटी सिम्युलेटर यासारखी अत्याधुनिक उपकरणे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सुरुवातीला तज्ज्ञ मनुष्यबळाअभावी असुविधा होत्या. हळूहळू मनुष्यबळ व सुविधा वाढत गेल्या आणि मराठवाडा-विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून कर्करुग्णांच्या रांगा लागत आहेत. रुग्णसंख्या वाढल्यामुळे रेडिएशनचे वेटिंगही अनेक महिन्यांवर गेले आहे. हे वेटिंग कमी करण्याचा प्रश्न उभा ठाकला असतानाच ३ जून २०१५ रोजी ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’ने कॅन्सर हॉस्पिटलला आपले उपकेंद्र घोषित केले. रेडिएशनच्या रुग्णांचे वेटिंग कमी करण्यासाठी ‘टाटा’कडून ‘भाभा ट्रॉन’ हे खास भारतीय बनावटीचे रेडिएशन मशीन देण्यात आले. बंकरचे काम पूर्ण होताच ‘भाभा ट्रॉन’ रुग्णसेवेत दाखल होणार आहे. ‘टाटा’कडून दोन वर्षांपासून एक ऑन्कॉलॉजिस्ट व एक ऑन्कोसर्जन हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. दरम्यान,

आता होणार लिम्फोमाचे निदान
केंद्राच्या ३५ कोटींच्या निधीतून अद्ययावत हिमॅटोलॉजी प्रयोगशाळा सुरू होणार असून, त्यात ‘लिम्फोमा’सह बहुतांश प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान होणार आहे. त्याचवेळी कर्करुग्णांना रक्ताची गरज पडल्यास त्याची सोय करण्यासाठी स्वतंत्र रक्तपेढी उभी राहणार आहे. साडेचार वर्षांपासून प्रतीक्षा असलेली सिटी स्कॅन, एमआरआय, शस्त्रक्रियागृहातील महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे-साहित्यदेखील या निधीतूनच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कर्करुग्णाला कोणत्याही तपासण्यांसाठी, रक्तासाठी घाटीमध्ये किंवा इतरत्र जाण्याची गरज नाही, असेही डॉ. शर्मा यांनी स्पष्ट केले.

रेसिडेन्टचा प्रश्न सुटणार !
हॉस्पिटलसाठी निवासी डॉक्टरांची (रेसिडेन्ट) पदे मंजूर असली तरी तांत्रिक चुकीतून १४ हजार रुपयांच्या वेतनामुळे हॉस्पिटलला निवासी डॉक्टर मिळत नव्हते. त्यांचे वेतन योग्य त्या नियमानुसार करण्यात येणार असून, २४ ते ३० रेसिडेन्ट व फेलो हॉस्पिटलमध्ये मिळतील, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे हॉस्पिटलला तरूण व तज्ज्ञ हात मदतीला मिळतील. त्याचवेळी विस्तारीत हॉस्पिटलसाठी ३०० पेक्षा जास्त पदांचा प्रस्ताव तयार असून, तो लवकरच सरकारला सादर केला जाणार आहे, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवगिरी एक्स्प्रेसनंतर आता मुंबईवारीसाठी नवी रेल्वे

$
0
0

औरंगाबाद : औरंगाबादहून मुंबईकडे जाण्यासाठी देवगिरी एक्स्प्रेसनंतर एकही रेल्वे नव्हती. त्यामुळे नांदेड - मुंबई मार्गावर नवी रेल्वे लवकरच सुरू होणार आहे. ही २२ डब्यांची रेल्वे सकाळी दहा वाजता सीएसटीएमला पोचेल अशा पद्धतीने नियोजन केले आहे.
औरंगाबादहून मुंबईला ‘देवगिरी’, ‘नंदीग्राम’ आणि ‘तपोवन’ या तीन एक्स्प्रेस रेल्वेतून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. ‘जनशताब्दी’लाही गर्दी असते. या रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने मुंबईला जाण्यासाठी रेल्वे वाढविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन रेल्वे विभागाने नांदेड - मुंबई अशी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू परळी येथील कार्यक्रमात करणार होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे तेथेया रेल्वेची घोषणा केली नाही. नांदेड - मुंबई रेल्वे सुरू करण्याची निर्णय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नांदेड येथे मुंबईसाठी फलाट निश्चितीनंतर; तसेच सकाळी नांदेड मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेंच्या वेळांच्या नियोजननंतर रेल्वे सुरू होणार आहे. त्याला महिनाभराचा कालावधी लागेल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

असे असेल वेळापत्रक
- नांदेड येथून मुंबईला जाण्यासाठी ही रेल्वे रात्री दहा वाजता सुटेल
- ही रेल्वे औरंगाबाद स्टेशनवर रात्री दोनपर्यंत पोचेल
- मनमाडला ही रेल्वे पहाटे पाच वाजता पोचेल
- सकाळी दहा वाजता मुंबईतील सीएसटीएमला रेल्वे पोचेल
- मुंबईहून या रेल्वेचा प्रवास सायं. साडेसहा वाजता सुरू होईल
- रात्री दोनच्या सुमारास रेल्वे औरंगाबादला पोचणार असून, सकाळी सात ते आठदरम्यान नांदेडला पोचेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवतींची छेड काढणाऱ्यास अटक, पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
वसतिगृहातील युवतींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोला अटक करून त्याला कोर्टात हजर केले असता, त्याला सोमवारपर्यंत (१० जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी एस. एस. जांभळे यांनी दिले.
सिडको परिसरातील एका वसतिगृहात राहणाऱ्या २२ वर्षीय युवतीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, २४ फेब्रुवारी रोजी पीडिता बसच्या सवलत पासच्या अर्जावर स्वाक्षरी घेण्यासाठी सिडको बसस्थानकावर आली होती. तेथून परत येताना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या तरुणाने अश्लील चाळे करत छेड काढली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच त्रास दिला. त्यानंतरही त्याच तरुणाने वसतिगृहातील वेगवेगळ्या पाच ते सहा मुलींची छेड काढून वारंवार त्रास दिला. या प्रकरणी युवतींनी दामिनी पथकाकडे तक्रार केली. तसेच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातही तक्रार अर्ज सादर केला. त्यानंतर दामिनी पथकाने त्या रोडरोमियोला दुचाकी क्रमांकावरुन ताब्यात घेतले व या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन मीर मुज्जादीन मीर मुक्करम हुसैन आबादीन (वय ३२, रा. अंबारी मशिदीजवळ, देवडी बाजार, औरंगाबाद) याला अटक केली. त्याला कोर्टात हजर केले असता, आरोपीने हा गुन्हा वारंवार केला असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कोणाची मालकीची आहे, याचा शोध घेणे बाकी आहे. तसेच आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी कोर्टात केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत (१० जुलै) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बार्टी’च्या प्रयत्नाने मोलकरणी प्रशिक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
घरकाम करणाऱ्या मोलकरीण म्हटले की तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलून जातो. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) या मोलकरणींना प्रशिक्षण देऊन हा दृष्टीकोण बदलण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती विभागीय प्रकल्प संचालक श्रीकांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घरगुती काम करणाऱ्या कामगार महिलांना त्यांच्या कार्याची गुणवत्ता वाढावी, आर्थिक विकासासोबत समाजात त्यांची ओळख निर्माण व्हावी, महिलांनी स्वयंपूर्ण होऊन कुटुंब व समाजाच्या विकासात हातभार लागावा यासाठी यासाठी ‘बार्टी’ कडून २१ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणासाठी ‘बार्टी’ संस्थेतर्फे शहरातील चार भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये मुकुंदवाडीमध्ये १३०, रेल्वेस्टेशन ७०, जयभीमनगर टाउन हॉल १५०, तर भावसिंगपुरा भागात १३० महिला मोलकरणी असल्याचे आढळले. यामधील टाउन हॉल आणि भावसिंगपुरा भागातील प्रत्येकी ४० महिलांची निवड करण्यात आली. त्या त्या भागातील दोन ठिकाणी दुपारी दोन ते चार या वेळेत या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी मुंबईतील एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेच्या वतिने मोलकरणींना कपडे कसे वापरावे, कसे बोलावे, इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा हाताळाव्या तसेच मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, कुलर, एसी बरोबर अन्य वस्तुंची सफाई करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

आज प्रमाणपत्र वाटप
या प्रशिक्षणाचा समारोप सोमवारी (१० जुलै) दुपारी अडीच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन खोकडपुरा येथे होणार आहे. या कार्यक्रमात मुख्य प्रकल्प संचालक (बार्टी) प्रद्न्या वाघमारे, उपमहापौर स्मिता घोगरे, घाटी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, सहायक पोलिस आयुक्त श्रीमती जमादार यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र, बार्टी किटचे वाटप करण्यात येणार अाहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॅथालॉजिस्टअभावी महालॅब सेवा बंद

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, उस्मानाबाद
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंतच्या रुग्णांना अत्याधुनिक लॅब चाचण्यांच्या सेवा देण्याचा करार झालेल्या एचएलएल कंपनीकडे उस्मानाबादसह अनेक ठिकाणी पॅथालॉजिस्ट नसल्याने उस्मानाबादसह
राज्यातील सुमारे ११० लॅब बंद करण्याची पाळी या लॅब एजन्सीजवर आली आहे. परिणामी राज्य सरकारने घाईगर्दीत सुरू केलेल्या या लॅबकडून होणाऱ्या
चाचण्यापासून लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे.
मे महिन्याच्या अखेरीस उस्मानाबादेत सुरू झालेल्या या लॅबला सध्या टाळे लागले आहेत. एचएलएल लाईफ केअर कंपनीमार्फत राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये सुमारे १२५ प्रयोगशाळा उभारुन, दैनंदिन तसेच अत्याधुनिक
चाचण्यांच्या सेवा देण्यात येणार आहेत. सध्यस्थितीत या कंपनीकडे
पॅथालॉजिस्टची वानवा असताना मुंबईतील एका तज्ज्ञांच्या सहीवर राज्यातील हा कारभार सुरू होता.
‘मटा’मधून या डोळेझाक कारभाराची वाच्यता झाल्यानंतर या कंपनीने सर्वत्र पॅथालॉजिस्टची नियुक्ती करणार अशी ग्वाही दिली. परंतु याची पूर्तता न झाल्याने सध्या अनेक ठिकाणच्या लॅब बंद ठेवण्यात आल्या असल्याची माहिती, या कंपनीचे उस्मानाबाद विभागीय को-ऑडीनेटर दत्तात्रय कोकाटे यांनी दिली.
या महालॅबमध्ये अत्यंत महत्वाच्या ५२ चाचण्या निशुल्क करण्यात येणार असून, ही सेवा २४ तास दिली जाणार असा दावा कंपनीच्यावतीने करण्यात आला होता. मात्र,उस्मानाबादेत या लॅब मध्ये चार-पाच टेस्ट करण्यात येत होत्या. सध्या अत्यंत निकडीची असणारी थायरॉईडची टेस्टसुद्धा येथे होत नव्हती. त्याशिवाय येथे कंपनीचा अधिकृत व्यवस्थापकही नाही. त्यासोबतच येथील लॅब दहा तास ही
उघडी राहत नव्हती. पॅथालॉजिस्ट नसताना शिवाय या लॅबमधून करारानुसार काम होते किंवा नाही याची कसलीही खातरजमा न करता शासनाने जीवनाशी खेळणाऱ्या या लॅबशी करार केलाच कसा ? यातील गौडबंगालची चौकशी होवून, खरोखरच सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थांशी असे करार करणे गरजेचे असताना केवळ सरकारला लुटण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हाताला धरून असे जीवघेणे खेळ करणाऱ्या या कंपनीची चौकशी होणे गरजेचे आहे.
आता ही कंपनी जागोजागी पॅथॉलॉजिस्ट नियुक्त करून त्यानंतरच सेवा देणार असे सांगत आहे. मात्र, याची पडताळणी होवून खरोखरच ते नेमले आहेत का याची खातरजमा करण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.तंत्रज्ञाअभावी सध्या या सेवा बहुतांश ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे या कंपनीवर आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई करत त्यांना बॉयकाट करायला हवे.

महालॅबची एक महिन्यांपूर्वी सुरू केलेली उस्मानाबादेतील सेवा सध्या बंद
आहे. यांच्यावर आमचे थेट नियंत्रण नसल्याने केंव्हा चालू होईल हे सांगू शकत नाही.
डॉ. एकनाथ माले,
सिव्हिल सर्जन,उस्मानाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातुरात चिनी वस्तूंची होळी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, लातूर
चीन-भारताच्या सीमेमध्ये वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच मानस सरोवरची यात्रा चीनने रोखवली आहे. भारत चीन सिमेवर वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील तरुणांनी चिनी वस्तूंची होळी केली. त्यासोबतच येत्या काळात चिनी वस्तुंचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले. सुभाष चौक येथे पार पडलेल्या या निर्देशनामध्ये नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली तरुणाई रस्त्यावर उतरली होती.
चिनी वस्तूंचा वापर करून अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात पैसा चीनला पाठवत आहोत, उद्या याच पैशातून आलेल्या शस्त्रांचा वापर करून सैनिकांवर गोळ्या झाडल्या जातील व आपल्यावर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न चीन करेल हे आपणास मान्य होईल का ? असा सवाल करत तरुणांनी चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. वापरात असलेल्या चिनी वस्तुंची होळी यावेळी करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी सहभाग नोंदवत खेळण्यांची होळी केली. यापुढे चिनी खेळणी न वापरण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासोबतच शेख खमरोद्दीन या व्यापायाने स्वताचा चिनी बनावटीचा मोबाइलही होळीच्या हवाली केला. यावेळी मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू जाळण्यात आल्या. भारताचा राष्ट्रीय ध्वज हाती घेऊन देशभक्तीपर गीते गात हे तरुण आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनामध्ये नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, सुभाष पंचाक्षरी, अॅड. प्रदिपसिंह गंगणे, अॅड. राजेश खटके, रणधीर सुरवसे, खमर शेख, गजानन भुमकर, जफर नाना, इस्माइल शेख, सुरज राजे, यशपाल कांबळे, आशिष साठे, मुज्जमिल शेख, ओमकार सोनवणे, अॅड. किशन शिंदे, अॅड. सिद्धेश्वर धायगुडे, कुनाल वागज, अॅड. गणेश गोजमगुंडे, मनोज गोजमगुंडे इत्यादीसह सुभाष चौक मित्रमंडळ, गोंधळी ग्रुप, मी लातूरकर, लष्कर भीमा, इत्यादी संघटन व सुभाष चौक परिसरातील व्यापारी सहभागी झाले होते.

चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा
चीन सध्या आर्थिक संकटात असून चिनी मालावर बहि‍ष्कार घातल्यास चिनची आर्थिक नाकेबंदी करून कोंडी करावी. आपण सर्वजण सीमेवर जाऊन लढू शकत नसलो तरी चिनी वस्तुंचा वापर न करूनही देशसेवा करू शकतो. त्यामुळे यापुढे चिनी बनावटीच्या वस्तू वापरू नये, सर्वदेशी अथवा पर्याय नसल्यास इतर देशांच्या उत्पादित वस्तू वापरा. परंतु चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ पेरण्या उरकल्या आता प्रतीक्षा पावसाची

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. पेरणी योग्य पाऊस पडला व शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, त्यानंतर गेल्या काही दिवसात पावसाची अनुपस्थिती चिंतेचा विषय ठरला आहे.
बीड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलीमीटर आहे. या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात १७६ मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी सरासरीच्या २६ टक्के पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात समाधानाचे वातवरण होते. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. ठिकठिकाणी कापूस लागवड सुरू झाली आहे. बीड जिल्ह्याचे सरासरी खरीप क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर आहे. या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात कापूस ३ लाख २६ हजार ५ हेक्टर, सोयाबीन एक लाख ५० हजार ६५३ हेक्टर, बाजरी ५७ हजार ६९७ हेक्टर, तूर ३२ हजार १७१ हेक्टर, मूग १७ हजार ६२० हेक्टर, उडीद ३२ हजार १८८ हेक्टर असे एकूण ६ लाख ३५ हजार १५१ हेक्टर म्हणजेच सरासरी ९६.४९ टक्के क्षेत्रावर पेरणी उरकली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यावर्षी पेरणीची लगबग करून शेतकऱ्याने पेरणी उरलकली असली तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहतो आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी उरकल्यानंतर पाऊस गायब झाल्याने पिके अडचणीत आली असून सुकू लागली आहेत. त्यामुळे आता शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस पडले तर जे पेरले आहे ते उगविण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images